Tag: लेखमालिका

  • Retirement Planning | निवृत्तीनंतर दरमहा ₹1 लाख कमाई कशी मिळवाल?

    Retirement Planning | निवृत्तीनंतर दरमहा ₹1 लाख कमाई कशी मिळवाल?

    Retirement Planning: आयुष्यभर कष्ट केल्यानंतर निवृत्ती नंतरचे (Retirement) जीवन शांततेत आणि आर्थिक चिंतेविना जावे, असे प्रत्येकालाच वाटते. पण वाढती महागाई आणि वैद्यकीय खर्च पाहता, निवृत्तीनंतर केवळ साठवलेल्या पैशांवर अवलंबून राहणे धोक्याचे ठरू शकते. तुम्हालाही निवृत्तीनंतर दरमहा किमान १ लाख रुपये नियमित उत्पन्न पाहिजे का? जर तुमचे उत्तर हो असेल, तर हे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकते. त्यासाठी गरज आहे ती योग्य नियोजनाची आणि हुशार गुंतवणुकीची. चला तर मग जाणून घेऊया अशा ४ दमदार योजनांबद्दल, ज्या तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा १ लाख रुपये उत्पन्न मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरतील.

    १. सीनियर सिटिझन सेव्हिंग्स स्कीम (SCSS – Senior Citizen Savings Scheme)

    निवृत्त व्यक्तींसाठी ही भारत सरकारची सर्वात सुरक्षित आणि लोकप्रिय योजना आहे. ही पूर्णपणे सरकारमान्य योजना असल्याने तुमचे भांडवल १००% सुरक्षित राहते. बाजारातील चढ-उतारांचा यावर कोणताही परिणाम होत नाही. या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला दर तिमाहीला म्हणजेच दर ३ महिन्यांनी आकर्षक व्याज मिळते, जे तुमच्या थेट बँक खात्यात जमा होते. जेष्ठ नागरिकांसाठी (६० वर्षांवरील) हमखास आणि नियमित उत्पन्नासाठी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.

    २. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (POMIS)

    Retirement Planning: पोस्ट ऑफिसची ही योजना खास अशा लोकांसाठी आहे, ज्यांना दर महिन्याला एक निश्चित रक्कम हातात हवी असते. पोस्ट ऑफिसची योजना असल्यामुळे यात जोखीम (Risk) शून्य आहे आणि तुमचे मूळ भांडवल पूर्णपणे सुरक्षित राहते. यामध्ये एकदाच एकरकमी गुंतवणूक करून तुम्ही दरमहा निश्चित व्याज मिळवू शकता. निवृत्त व्यक्तींसाठी हा एक अत्यंत सोयीचा आणि लोकप्रिय पर्याय आहे.

    ३. म्यचुअल फंड मधील SWP (Systematic Withdrawal Plan)

    जर तुम्हाला महागाईला (Inflation) मात द्यायची असेल, तर केवळ पारंपरिक योजनांवर अवलंबून राहून चालणार नाही. तिथे म्युच्युअल फंड्सचा SWP पर्याय उपयोगी पडतो. तुम्ही म्युच्युअल फंडात उदा. हायब्रीड किंवा बॅलन्स्ड फंड यामध्ये मोठी रक्कम गुंतवता आणि SWP द्वारे दरमहा एक ठराविक रक्कम तुमच्या बँक खात्यात वळती करता. तुम्ही काढत असलेल्या रकमेव्यतिरिक्त, म्युच्युअल फंडात उरलेली तुमची रक्कम बाजाराच्या गतीने वाढत राहते. ज्यांची मध्यम ते उच्च जोखीम घेण्याची तयारी आहे आणि ज्यांना दीर्घकाळात महागाईवर मात करायची आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

    ४. फिक्स्ड डिपॉझिट (FD) आणि बाँड्स (Bonds)

    Retirement Planning: सुरक्षित गुंतवणुकीचा विचार केल्यास बँक FD आणि कॉर्पोरेट किंवा सरकारी बाँड्सचा पर्याय आजही खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये गुंतवलेले पैसे सुरक्षित राहतात आणि तुम्हाला गुंतवणुकीच्या वेळीच ठरलेला अंदाजे परतावा मिळतो. बाँड्स किंवा एफडीच्या माध्यमातून तुम्हाला मासिक, तिमाही किंवा वार्षिक स्वरूपात व्याजाचे उत्पन्न मिळू शकते. जे लोक कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाहीत, त्यांच्यासाठी हा एक सुरक्षित आणि स्थिर पर्याय आहे.

    ५. गुंतवणुकीचा ‘गोल्डन रुल’

    • १.निवृत्तीचे नियोजन जितक्या लवकर सुरू कराल, तितका कंपाउंडिंगचा (चक्रवाढ व्याजाचा) फायदा तुम्हाला जास्त मिळेल.
    • २.फक्त पैसे साठवू नका, तर तुमचा परतावा महागाईच्या दरापेक्षा जास्त असेल याची काळजी घ्या.
    • ३.तुमचे सर्व पैसे एकाच योजनेत गुंतवू नका. वरील सर्व योजनांमध्ये विभागून गुंतवणूक करा. उदा. काही रक्कम SCSS मध्ये, काही SWP मध्ये आणि काही FD मध्ये गुंतवणूक करा.
    • ४.तुमची गुंतवणूक अशा प्रकारे करा ज्यामध्ये गरज पडल्यास पैसे सहज काढता येतील (Liquidity), पैशांची सुरक्षितता असेल (Safety) आणि चांगला परतावाही मिळेल (Returns).

    Retirement Planning: निवृत्तीनंतर दरमहा १ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवणे हे अजिबात अशक्य नाही. आजच तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा, तुमच्या गरजेनुसार योग्य पोर्टफोलिओ बनवा आणि एका तणावमुक्त निवृत्तीच्या दिशेने पहिले पाऊल टाका!

    (टीप: कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.)

  • New Car Buying Tips: शोरूममधील ४ महागड्या सेल्स ट्रिक्स

    New Car Buying Tips: शोरूममधील ४ महागड्या सेल्स ट्रिक्स

    New Car Buying Tips: तुम्हीही लवकरच नवीन गाडी घरी आणण्याचा विचार करताय? शोरूममध्ये जाऊन टेस्ट ड्राईव्ह घेतली आहे आणि आता फक्त बुकिंग करायचं बाकी आहे? थांब, गडबड करू नका..! गाडी खरेदी करताना आपण फिचर्स, मायलेज आणि रंगाचा खूप विचार करतो. पण ज्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो, ती म्हणजे शोरूममधील सेल्समनच्या सेल्स ट्रिक्स. गोड बोलून आणि भीती दाखवून ग्राहकांच्या खिशातून जास्तीचे पैसे उकळण्यात हे सेल्समन पटाईत असतात. नवीन गाडी घेताना तुमचे लाखो रुपये वाचवायचे असतील, तर सेल्समनच्या फसव्या ट्रिक्स आणि त्यापासून कसं वाचायचं, हे लगेच समजून घ्या.

    १. शोरूमचं कार लोन की डायरेक्ट बँक?

    ट्रिक: सेल्समन तुम्हाला त्यांच्याशी टायअप असलेल्या बँकेकडूनच लोन घेण्याचा आग्रह करेल. इथून लोन घेतलं तर गाडी लवकर मिळेल, असं सांगून यात शोरूम स्वतःचं कमिशन कमवतं.

    स्मार्ट टिप्स: शोरूममध्ये जाण्यापूर्वी स्वतःच्या बँकेत जाऊन कार लोनचा व्याजदर तपासा. बाहेरून डायरेक्ट लोन घेतल्यास व्याजदर आणि प्रोसेसिंग फी कमी मिळते, ज्यामुळे तुमचे हजारो रुपये वाचतात.

    २. कार इन्शुरन्स शोरूममधूनच घेण्याची सक्ती

    ट्रिक: इन्शुरन्स आमच्याकडूनच घ्यावा लागेल, नाहीतर पुढे क्लेम मिळण्यात अडचण येईल, अशी भीती सेल्समन घालतात. हा इन्शुरन्स बाजारापेक्षा खूप महाग असतो.

    स्मार्ट टिप्स: शोरूमची पॉलिसी आणि ऑनलाईन मिळणारी पॉलिसी यांची तुलना करा. बाहेरून तोच इन्शुरन्स १०,००० ते ४०,००० रुपये स्वस्त मिळतो. नियमांनुसार तुम्ही कुठूनही इन्शुरन्स घेण्यास स्वतंत्र आहात, शोरूम सक्ती करू शकत नाही.

    ३. नको असलेल्या महागड्या अ‍ॅक्सेसरीजचं पॅकेज

    ट्रिक: सीट कव्हर्स, मॅट्स, क्रोम फिनिशिंग अशा गोष्टींचं सक्तीचं पॅकेज तुमच्या बिलात जोडलं जातं, ज्याची किंमत मार्केटपेक्षा दुप्पट-तिप्पट असते.

    स्मार्ट टिप्स: हे अ‍ॅक्सेसरीज पॅकेज सरळ नाकारा. गाडीसाठी अत्यंत आवश्यक असेल तेवढंच शोरूममधून घ्या. सीट कव्हर्स किंवा फॅन्सी गोष्टी नंतर बाहेरून निम्म्या किमतीत करून घ्या.

    ४. बेकायदेशीर हँडलिंग आणि लॉजिस्टिक्स चार्जेस

    ट्रिक: फॅक्टरीमधून शोरूमपर्यंत गाडी आणण्याचा खर्च म्हणून बिलात गुपचूप 5000 ते 15,000 रुपये हँडलिंग चार्जेसच्या नावाखाली जोडले जातात.

    स्मार्ट टिप्स: कोर्टाच्या नियमांनुसार हँडलिंग चार्जेस पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. बिलात हा खर्च दिसल्यास तो त्वरित काढून टाकण्यास सांगा. सेल्समनने ऐकलं नाही, तर मॅनेजरशी बोला किंवा कंपनीकडे तक्रार करा. 

    New Car Buying Tips: थोडीशी जागरूकता आणि योग्य माहितीच्या जोरावर तुम्ही सेल्समनच्या या ट्रिक्स सहज ओळखू शकता आणि नवीन गाडीच्या खरेदीवर ₹५०,००० ते ₹१,५ लाख रुपयांपर्यंतची मोठी बचत करू शकता! स्मार्ट ग्राहक बना आणि स्वतःच्या कष्टाचा पैसा वाचवा. आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी आणि बिझनेस-फायनान्सच्या अशाच सडेतोड माहितीसाठी फॉलो करा — नवी अर्थक्रांती!

    आणखी वाचा:

  • D Mart : जाणून घ्या डी-मार्टच्या यशाचं सिक्रेट!

    D Mart : जाणून घ्या डी-मार्टच्या यशाचं सिक्रेट!

    D Mart : आजच्या स्पर्धेच्या दुनियेत जिथे मोठ्या कंपन्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करतात, तिथे एक अशी कंपनी आहे जिने जाहिरातींशिवाय प्रत्येक भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबाच्या मनात घर केलंय ती म्हणजे डी-मार्ट. भारतातातील श्रीमंत आणि मोठ्या उद्योगपतींच्या यादीत नेहमीच मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या नावाचा उल्लेख दिसतोच. कारण भारतीय कॉर्पोरेट जगतात त्यांनी वीज, तेल, डेटा ते बंदरांपर्यंत अर्थव्यवस्थेवर पकड मिळवली आहे. मात्र, आज रिटेल मार्केटमध्ये रिलायन्स रिटेलसारखे बलाढ्य स्पर्धक असतानाही डी-मार्टने आपली वेगळी ओळख कशी जपली? कमी नफा, जास्त विक्री हे मॉडेल कसे यशस्वी ठरले? याचे सविस्तर उत्तर या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया…

    २००२ मध्ये पवईत सुरू झालेलं एक छोटं दुकान आज ३०० हून अधिक स्टोअर्सपर्यंत पोहोचलं आहे. आज प्रत्येक शहरात तुम्हाला डी-मार्ट असल्याचे पाहायला मिळेल आणि या डी-मार्टचे शिल्पकार आहेत राधाकिशन दमाणी. शेअर बाजारात ज्यांना गुरु मानलं जातं, अशा एका साध्या, पांढऱ्या कपड्यांतील माणसाने वयाच्या ४५ व्या वर्षी जेव्हा रिटेल क्षेत्रात पाऊल ठेवले तेव्हा अनेकांना वाटले की हे शक्य होणार नाही. पण राधाकिशन दमाणी यांनी केवळ स्वप्न पाहिलं नाही, तर ते सत्यात उतरवलं आणि घराघरात पोहोचवलं. 

    १) स्वतःच्या मालकीची जागा 

    डी- मार्टच्या यशाचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं सिक्रेट म्हणजे मालकीची जागा. डी-मार्टची बहुतांश स्टोअर्स ज्या जमिनीवर आहेत, ती जागा कंपनीच्या मालकीची आहे. अंबानींची रिलायन्स असो वा इतर रिटेल साखळ्या, बहुतांश कंपन्या मॉल्समध्ये किंवा शहरांच्या मोक्याच्या ठिकाणी भाड्याने जागा घेतात. पण दमाणींनी सुरुवातीपासूनच ओनरशिप मॉडेलकडे लक्ष केंद्रित केले. कारण मालकीची जागा असल्यामुळे दरमहा वाचणारे कोट्यवधींचे भाडे डी-मार्टला ग्राहकांना डिस्काउंटच्या स्वरूपात देता येते. दमाणी यांची ही रिअल इस्टेटची खेळीच डी-मार्टचा खरा पाया ठरली.

     २) लो-कॉस्ट मॉडेल स्ट्रॅटेजी 

    D Mart : दुसरी महत्वाची स्ट्रॅटेजी म्हणजे सप्लायर इज किंग. कोणत्याही व्यवसायात माल खरेदी केल्यावर पैसे द्यायला महिना-दोन महिने लागतात. पण डी-मार्ट आपल्या पुरवठादारांना (Suppliers) १० ते १५ दिवसांत पैसे देतात. यामुळे काय होतं? पुरवठादार आनंदाने डी-मार्टला इतर कंपन्यांपेक्षा २-३% जास्त सूट देतात. तुम्ही आम्हाला लवकर पैसे द्या, आम्ही तुम्हाला माल स्वस्त देऊ, हा साधा व्यवहार डी-मार्टला इतरांपेक्षा वेगळं ठरवतो. जेव्हा कंपनीला माल स्वस्त मिळतो, तेव्हाच ते ग्राहकांना स्वस्तात विकू शकतात. हे लो-कॉस्ट मॉडेल डी-मार्टने इतक्या शिस्तीने पाळले, की आज राधाकिशन दमाणी यांना टक्कर देण्यासाठी मोठ्या कॉर्पोरेट कंपन्याही स्पर्धेत संघर्ष करत आहेत. 

    ३) जाहिरातीवर शून्य खर्च

    जिथे मोठं-मोठ्या कंपन्या मार्केटमध्ये टिकण्यासाठी जाहिरातीवर लाखो रुपये खर्च करतात तिथेच डी- मार्टने आपले वेगळेपण सिद्ध केले. तुम्ही टीव्हीवर डी-मार्टच्या मोठ्या जाहिराती क्वचितच पाहिल्या असतील. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचा ग्राहकच त्यांची जाहिरात करतो. डी-मार्टच्या स्टोअरमध्ये कधी गेलात तर तुम्हाला तिथे रोबोट्स किंवा खूप महागडे इंटिरिअर दिसणार नाही. कारण त्यांनी स्टोअर्सच्या चकाकीवर नाही तर कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित केले. डी-मार्टमध्ये सर्व गरजेच्या वस्तू स्वस्तात मिळतात, नेहमीच काही ना काही ऑफर्स असतात ही माउथ पब्लिसिटीच त्यांची सर्वात मोठी जाहिरात आहे. 

    अंबानी-अदानींच्या स्पर्धेत दमाणी सरस कसे ठरले? 

    D Mart : मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेलकडे अफाट पैसा आणि तंत्रज्ञान आहे. त्यांनी ऑनलाइन (JioMart) आणि ऑफलाईन (Reliance SMART BAZAAR) अशा दोन्ही आघाड्यांवर आव्हान दिलं आहे. तर दुसरीकडे, अदानी समूह प्रामुख्याने लॉजिस्टिक आणि बॅकएंडमध्ये मजबूत आहे. पण दमाणी यांनी या दोघांशी थेट स्पर्धा न करता आपली एक वेगळी जागा निर्माण केली. त्यांनी कधीही हाय-फाय ग्राहकांना लक्ष्य केलं नाही. त्यांनी उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवलं. जिथे रिलायन्स झपाट्याने विस्तार करत आहे, तिथे डी-मार्ट हळू पण अत्यंत विचारपूर्वक पावलं टाकत आहे. दमाणी आजही फक्त नफा देणाऱ्या लोकेशन्सवरच स्टोअर सुरू करतात. डी-मार्टच्या यशाचं आणखी एक गुपित म्हणजे त्यांनी कधीही एका रात्रीत शेकडो स्टोअर्स उघडले नाहीत. आधी एक स्टोअर नफ्यात आले की मगच दुसरे उघडायचे हे त्यांचे मुख्य धोरण होते. क्लस्टर बेस्ड अप्रोच वापरून त्यांनी एकाच शहरात किंवा जवळच्या भागात स्टोअर्स वाढवली, जेणेकरून मालाची ने-आण करण्याचा खर्च कमी होईल. आज रिलायन्ससारख्या दिग्गज कंपन्यांशी स्पर्धा करतानाही डी-मार्टचा फोकस स्टेबल राहिलेला दिसतोय. 

    या संपूर्ण माहितीनंतर राधाकिशन दमाणी यांचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की व्यवसायात टिकण्यासाठी फक्त भांडवल असून चालत नाही, तर कामाची एक शिस्त लागते. जाहिरातींच्या आवाजापेक्षा कामाचा दर्जा आणि ग्राहकाचा फायदा मोठा असतो, हे डी-मार्टने सिद्ध केलंय. जर तुम्ही कोणताही छोटा व्यवसाय करत असाल, तर दमाणी यांच्या या तत्त्वांचा वापर करून तुम्हीही तुमच्या क्षेत्रातील किंग बनू शकता. डी-मार्टची ही कहाणी केवळ एका व्यवसायाची प्रगती नाही, तर ती प्रत्येक भारतीयाला स्मार्ट ग्राहक बनवण्याची एक चळवळ आहे. म्हणूनच आज डी-मार्ट हे केवळ दुकान राहिलं नसून ते भारतीय मध्यमवर्गीयांच्या विश्वासाचं प्रतीक बनलं आहे.

    आणखी वाचा:

  • Harshit Godha Success Story: Avocado Farming ने कमावले कोट्यवधी

    Harshit Godha Success Story: Avocado Farming ने कमावले कोट्यवधी

    Avocado Farming: युवा शेतकरी हर्षित गोधा हे मुळचे मध्य प्रदेशमधील भोपाळचे. मूळचे भोपाळचे असलेले हर्षित यांची कौटुंबिक पार्श्वभूमी वकिलीची असली, तरी त्यांना मात्र स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती. 

    ब्रिटनमध्ये डिग्रीचे शिक्षण घेऊन त्यांनी स्वत:च्या मातीत प्राप्त परिस्थितीचा अभ्यास करून एव्होकॅडोची शेती करण्यास सुरुवात केली. 

    ब्रिटनमध्ये शिक्षण घेत असताना हर्षित यांना एव्होकॅडो या फळाबद्दल माहिती मिळाली आणि त्या फळाचे आरोग्यविषयक फायदे त्यांच्या लक्षात आले. अधिक माहिती घेतल्यावर हे फळ इस्त्राईलमध्ये पिकवले जाते हे त्यांच्या लक्षात आले. इंग्लंडसारखा देश हे फळ इस्त्राईलमधून आयात करत आहे म्हणजे नक्कीच या  इस्रायली एव्होकॅडोमध्ये काहीतरी खास आहे.

    सामान्यतः एव्होकॅडो या फळाच्या वाढीसाठी 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. परंतु इस्राईलसारख्या कोरड्या आणि उष्ण देशामध्ये एव्होकॅडो कसे वाढू शकतात यावर आश्चर्यचकित होऊन हर्षित यांनी अधिक संशोधन सुरू केले.

    अभ्यासाअंती हर्षित यांच्या लक्षात आले की इस्त्राईलने परिस्थितीवर मात करत आणि समस्यांवर उपाय शोधत यशस्वी शेती केली आहे आणि त्याचे अनेक संकरित वाण देखील तयार केले आहेत 

    इस्त्राईलसारख्या उष्ण वातावरणात जर ही शेती होऊ शकते तर आपण देखील का करू नये? हा विचार त्यांच्या डोक्यात चमकला.

    त्यांनी इस्त्राईलमध्ये जाऊन या शेतीविषयी अभ्यास केला, तेथील शेतकऱ्यांकडून आवश्यक प्रशिक्षण देखील घेतले. 

    प्रशिक्षण घेतल्यानंतर हर्षित यांनी ॲव्होकॅडोच्या रोपांची इस्त्राईलमधून भारतात आयात केली. आयात प्रक्रियेत देखील हर्षित यांना बऱ्याच अडचणी आल्या.

    Avocado Farming: 2019 मध्ये Order केलेली रोपं त्यांना 2021 मध्ये प्राप्त झाली. यानंतर मात्र हर्षित यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. सध्या 28 वर्षीय हर्षित यांनी 100 एकर जमिनीवर ॲव्होकॅडोची लागवड केली असून त्यातून त्यांना 10 कोटींचे वार्षिक उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. आज हर्षित संपूर्ण भारतात ॲव्होकॅडोची रोपे विकतात आणि करोडोंची उलाढाल करतात. 

    शेती करणं हे केवळ कमी शिक्षण असलेल्या गावाकडील लोकांचं काम आहे अशी समजूत असणाऱ्यांच्या डोळ्यात हर्षित यांनी त्यांच्या कर्तृत्वाने झणझणीत अंजन घातलं आहे.

    आणखी वाचा:

  • Successful Trading Tips: प्रत्येक ट्रेडरने जाणून घ्यावेत ५ Golden Rules

    Successful Trading Tips: प्रत्येक ट्रेडरने जाणून घ्यावेत ५ Golden Rules

    Successful Trading Tips: आपल्या समाजात शेअर मार्केटबद्दल अनेक गैरसमज आहेत. बहुतेकांना वाटते की हे केवळ नशिबावर चालणारे क्षेत्र आहे, परंतु सत्य याच्या अगदी उलट आहे. शेअर मार्केट हे पूर्णपणे गणित, मानसशास्त्र आणि शिस्तीवर आधारित आहे. मार्केटला तुमच्या वैयक्तिक गरजांशी किंवा स्वप्नांशी काहीही देणेघेणे नसते. ते केवळ अचूक नियोजन करणाऱ्यांचा आदर करते. जर तुम्हाला या क्षेत्रात दीर्घकाळ टिकायचे असेल आणि संपत्ती निर्माण करायची असेल, तर केवळ भावनांच्या आहारी जाऊन चालणार नाही. एक यशस्वी ट्रेडर तोच असतो जो स्वतःच्या भीतीवर आणि हव्यासावर नियंत्रण मिळवून मार्केटच्या नियमांचे पालन करतो. तुम्हालाही ट्रेडिंग करण्याची आवड आहे? शेअर मार्केटमधील वेगवेगळे फंडे शिकायला आवडत असतील तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा..  

    ट्रेड फायदेशीर बनवण्याचे ५ प्रभावी मार्ग!

    १. ट्रेडिंग प्लॅन (Trading Plan)

    ट्रेडिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी ट्रेडिंग प्लॅन हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा पाया आहे. अनेक नवीन ट्रेडर कोणत्याही नियोजनाशिवाय केवळ टिप्सच्या मागे लागून ट्रेड घेतात, ज्याला आपण जुगार म्हणू शकतो. मात्र, एक व्यावसायिक ट्रेडर ट्रेड घेण्यापूर्वीच आपला प्रवेश (Entry), नफा (Target) आणि तोटा (Stop-Loss) एका कागदावर किंवा जर्नलमध्ये निश्चित करतो. ट्रेडिंग प्लॅन म्हणजे एक अशी चौकट आहे जी तुम्हाला मार्केटच्या अनिश्चिततेमध्ये स्थिर ठेवते. जेव्हा तुमच्याकडे लेखी प्लॅन असतो, तेव्हा तुम्ही बाजारातील अचानक होणाऱ्या हालचालींमुळे गोंधळून जात नाही. नियोजित पद्धतीने केलेला प्रत्येक ट्रेड हा तुमच्या कौशल्याचा भाग असतो, ज्यामुळे तुमची जोखीम कमी होते आणि आत्मविश्वासात वाढ होते.

    २. मार्केटमधील चढ उतारांचे निरीक्षण

    दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे मार्केटमधील चढ-उतारांचे सूक्ष्म निरीक्षण करणे. मार्केटमध्ये तासंतास चार्ट पाहणे म्हणजे केवळ वेळ घालवणे नव्हे, तर तो मार्केटचा स्वभाव समजून घेण्याचा एक प्रयत्न असतो. मार्केट कधीही सरळ रेषेत चालत नाही, ते विशिष्ट पॅटर्नमध्ये हालचाल करते. जेव्हा मार्केट सातत्याने उच्चांक गाठतो, तेव्हा त्याला बुलिश ट्रेड म्हणतात, तर घसरणीच्या मार्केटला बेअरिश म्हटले जाते. या तांत्रिक विश्लेषणासोबतच जागतिक घडामोडींकडे लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. अमेरिकन मार्केटमधील बदल, कच्च्या तेलाचे दर किंवा आरबीआयचे धोरण यांसारख्या बातम्यांचा भारतीय बाजारावर मोठा परिणाम होतो. अशा वेळी केवळ चार्टवर अवलंबून न राहता न्यूज कॅलेंडरचा वापर करून जागृत राहणे, ही एका यशस्वी ट्रेडरची ओळख आहे.

    ३. रिस्क मॅनेजमेंट 

    तिसरा आणि सर्वात कठीण भाग म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. मार्केटमध्ये टिकून राहणे हे पैसे कमावण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे, कारण जर तुमच्याकडे भांडवलच उरले नाही, तर तुम्ही नफा कमावण्याची संधी गमावून बसाल. तुमच्या एकूण भांडवलापैकी किती हिस्सा एका ट्रेडमध्ये लावायचा, याचे गणित मांडणे म्हणजेच पोझिशन सायझिंग होय. एकाच शेअरमध्ये सर्व पैसे गुंतवणे हे आत्मघातकी ठरू शकते. तसेच, प्रत्येक ट्रेडमध्ये स्टॉप-लॉस लावणे अनिवार्य आहे. स्टॉप-लॉस म्हणजे तुमच्या आर्थिक नुकसानीला लावलेला लगाम आहे. जे लोक या नियमाचे पालन करत नाहीत, त्यांना मार्केट मोठ्या नुकसानीसह बाहेर फेकते. त्यामुळे शिस्तबद्ध रिस्क मॅनेजमेंट हे मार्केटमधील तुमचे सुरक्षा कवच आहे.

    ४.  ट्रेडिंग जर्नल

    चौथा मार्गदर्शक मंत्र म्हणजे ट्रेडिंग जर्नल लिहिण्याची सवय. अनेक ट्रेडर आपल्या चुका विसरून जातात आणि त्याच चुका वारंवार करतात. जर्नलमध्ये दररोजच्या ट्रेड्सची नोंद केल्यामुळे तुम्हाला तुमचा स्वतःचा आरसा दिसतो. तुम्ही एखादा ट्रेड घेताना तुमची मानसिक स्थिती काय होती, तुम्ही भीतीपोटी ट्रेड लवकर बंद केला का, किंवा जास्त नफ्याच्या हव्यासापोटी योग्य वेळी बाहेर पडला नाहीत का, या सर्व गोष्टींची नोंद केल्याने तुमची सायकॉलॉजी सुधारण्यास मदत होते. आठवड्याच्या शेवटी जेव्हा तुम्ही हे जर्नल वाचता, तेव्हा तुम्हाला तुमच्या त्रुटी समजतात. स्वतःच्या चुकांमधून शिकणे हाच शेअर मार्केटमध्ये प्रगती करण्याचा सर्वात जलद मार्ग आहे.

    ५. रिस्क-टू-रिवॉर्ड रेशो

    पाचवा आणि अत्यंत प्रभावी मंत्र म्हणजे रिस्क-टू-रिवॉर्ड रेशोचे पालन करणे. हे एक असे तंत्र आहे जे तुम्हाला गणिताच्या आधारावर फायद्यात ठेवते. तुमचा अपेक्षित नफा हा नेहमी संभाव्य तोट्यापेक्षा किमान दुप्पट असावा. उदाहरणार्थ, जर तुम्ही १:३ चा रेशो ठेवला, तर तुम्ही १० पैकी ६ वेळा जरी चुकलात, तरी उरलेल्या ४ वेळच्या नफ्यामुळे तुम्ही शेवटी फायद्यातच राहाल. हा आकड्यांचा खेळ तुम्हाला भावनिक निर्णयांपासून दूर ठेवतो. ट्रेडिंगमध्ये विन रेट (किती वेळा जिंकलात) यापेक्षा रिस्क-टू-रिवॉर्ड (किती जिंकलात) याला जास्त महत्त्व आहे, कारण यामुळे कमी अचूकता असूनही तुम्ही एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता.

    Successful Trading Tips: सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ट्रेडिंगमध्ये कोणती रणनीती निवडावी, हे पूर्णपणे तुमच्या उपलब्ध वेळेवर आणि मानसिकतेवर अवलंबून असते. जर तुम्ही दिवसभर स्क्रीनसमोर बसू शकत असाल, तर ब्रेकआउट किंवा मोमेंटम ट्रेडिंग तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, जिथे तुम्ही झटपट होणाऱ्या हालचालींचा फायदा घेऊ शकता. मात्र, जर तुम्ही नोकरी किंवा इतर व्यवसायात व्यस्त असाल, तर पोझिशन ट्रेडिंग हा सर्वात उत्तम मार्ग आहे, ज्यामध्ये तुम्ही आठवडे किंवा महिन्यांसाठी शेअर्स होल्ड करता. लक्षात ठेवा की, कोणतीही रणनीती १००% अचूक नसते. शेअर मार्केटमध्ये शिकण्याची प्रक्रिया कधीही थांबवू नका आणि गरज पडल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास संकोच करू नका. सातत्य, अभ्यास आणि संयम हीच तुमच्या स्वप्नांना पंख देणारी गुरुकिल्ली आहे.

    आणखी वाचा:

  • Mira Kulkarni: मीरा कुलकर्णी यांचा थक्क करणारा प्रवास!

    Mira Kulkarni: मीरा कुलकर्णी यांचा थक्क करणारा प्रवास!

    Mira Kulkarni: वयाच्या ४५ व्या वर्षी लोक आपल्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग करतात. पण एका महिलेने वयाच्या ४५ व्या वर्षी, एका छोट्याशा गॅरेजमध्ये फक्त २ लाख रुपयांची गुंतवणूक करून असा ब्रँड उभा केला… ज्याचं व्हॅल्युएशन आज १,२९० कोटी रुपये आहे!

    ही कथा कुठल्या कॉर्पोरेट घराण्यातील नाही, तर भारतातील सर्वात प्रसिद्ध लक्झरी आयुर्वेदिक ब्रँड ‘फॉरेस्ट एसेंशियल्स’ (Forest Essentials) च्या संस्थापिका मीरा कुलकर्णी यांची आहे.

    १. संघर्षाची काळी बाजू (The Dark Reality)

    ही कहाणी सुरू होते एका अत्यंत कठीण वळणावरून. वयाच्या २० व्या वर्षी मीरा यांचं लग्न झालं आणि शिक्षण अर्धवट सुटलं. लग्नानंतर पतीला दारूचं व्यसन लागल्याने घरची परिस्थिती बिघडत गेली. शेवटी मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी पतीपासून विभक्त होण्याचा कठोर निर्णय घेतला.

    पण नियतीची परीक्षा इथेच संपली नव्हती. वयाच्या २८ व्या वर्षी आई-वडिलांचं एकापाठोपाठ एक निधन झालं. दोन लहान मुलं आणि आधार द्यायला पाठीशी कुणीही नाही. ही ती वेळ होती, जिथे कोणीही खचून गेलं असतं.

    २. एक ‘आयडिया’ आणि गॅरेजमधून सुरुवात

    ४५ व्या वर्षी अमेरिकेत शिकणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी गेल्या असताना, तिथे त्यांनी हाताने नैसर्गिक साबण आणि मेणबत्त्या बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं. भारतात परतल्यावर त्यांनी ठरवलं, आपणही काहीतरी करूया.

    २००० साली, फक्त २ कर्मचारी आणि २ लाख रुपये घेऊन त्यांनी एका गॅरेजमधून ‘फॉरेस्ट एसेंशियल्स’ची सुरुवात केली. पण आता खरा प्रश्न हा आहे की… साबण तर अनेक जण बनवतात, मग मीरा कुलकर्णी १,२९० कोटींपर्यंत कशा पोहोचल्या?

    ३. ‘लक्झरी मार्केटिंगचा’ मास्टरस्ट्रोक! (The Real Business Strategy)

    इथेच मीरा यांनी खरी बिझनेस बुद्धी वापरली. भारतात तोपर्यंत ‘आयुर्वेद’ म्हणजे फक्त स्वस्त आणि आजारांवरची औषधं मानली जायची. मीरा यांनी आयुर्वेदाला ‘लक्झरी’ बनवलं. त्यांनी स्वस्त साबण विकण्यापेक्षा, अस्सल नैसर्गिक घटकांपासून बनवलेली ‘प्रीमियम प्रॉडक्ट्स’ तयार केली.

    B2B मास्टरस्ट्रोक:

    आपली प्रॉडक्ट्स सामान्य दुकानात विकण्याऐवजी, त्यांनी ताज (Taj) आणि हयात (Hyatt) सारख्या फाईव्ह-स्टार हॉटेल्सना ती सप्लाय करायला सुरुवात केली. जेव्हा श्रीमंत आणि परदेशी पाहुण्यांनी त्यांच्या हॉटेल्समध्ये ही उत्पादने वापरली, तेव्हा ‘फॉरेस्ट एसेंशियल्स’ रातोरात एक जागतिक दर्जाचा ‘प्रीमियम ब्रँड’ बनला!

    Mira Kulkarni: या दमदार स्ट्रॅटेजीमुळे २००८ मध्ये जागतिक कॉस्मेटिक जायंट ‘एस्टी लॉडर’ (Estée Lauder) ने त्यांच्या कंपनीसोबत करार केला. आज देशभरातील २८ शहरांमध्ये त्यांची ११० हून अधिक यशस्वी स्टोअर्स आहेत. फॉर्च्युन मॅगझिनने त्यांना ‘भारतातील सर्वात शक्तिशाली व्यावसायिक महिलांच्या’ यादीत स्थान दिले आहे.

    ४. ग्लोबल उड्डाण (The Big League)

    थोडक्यात सांगायचं तर…

    Mira Kulkarni: वयाच्या २८ व्या वर्षी पोरक्या झालेल्या आणि ४५ व्या वर्षापर्यंत स्वतःची कोणतीही व्यावसायिक ओळख नसलेल्या मीरा कुलकर्णी, जर आज १,२९० कोटींचं साम्राज्य उभं करू शकतात… तर “वेळ निघून गेलीये” किंवा “माझ्याकडे पुरेसं भांडवल नाही”, ही फक्त आपली कारणं आहेत.

    मित्रांनो, तुम्हाला ही ‘खऱ्या संघर्षाची आणि बिझनेसची’ स्टोरी कशी वाटली? “सक्सेससाठी वयाची कोणतीही अट नसते”, यावर तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा!

  • Pet Industry Business: कमी गुंतवणुकीत मोठा नफा देणारा व्यवसाय

    Pet Industry Business: कमी गुंतवणुकीत मोठा नफा देणारा व्यवसाय

    Pet Industry Business: काही उद्योजक त्यांच्या उद्योगात, व्यवसायात यशस्वी होतात व काही व्यवसाय अयशस्वी होऊन बंद पडतात. काही जणांना त्यांचा व्यवसाय टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. यामागे बरीच कारणे आहेत, त्यापैकी योग्य व अचूक व्यवसाय क्षेत्र निवडणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. सध्या पाळीव प्राणी व त्यांच्याशी संबंधित उत्पादने म्हणजेच पेट (Pet) इंडस्ट्री हे एक असे क्षेत्र आहे,  ज्यामध्ये गुंतवणूकदार पैसे गुंतवण्यास कायम उत्सुक असतात. बदलत्या काळानुसार कुत्र्या- मांजरासह इत्यादी पाळीव प्राण्यांच्या संगोपणसाठी सुविधा पुरवण्याच्या या व्यवसायाला मोठी गती प्राप्त झाली आहे. मोठ- मोठ्या शहरांमध्ये प्राण्यांसाठी खास ग्रूमिंग सेंटर्स उभी राहिली आहेत.

     सध्या भारतात या क्षेत्रात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे लोकांची जीवनशैली खूप वेगाने बदलत आहे. आजकाल उच्चभ्रू वस्त्यांमध्ये व शहरी भागात पाळीव प्राणी पाळण्याचे प्रमाण तुलनेने वाढत आहे. बऱ्याच जणांना एकटेपणा आल्याने ते घरात पाळीव प्राणी पाळतात, तर काही मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आपल्या ग्राहकांना पाळीव प्राणी पाळण्याचा सल्ला देतात. बऱ्याच लोकांना मूलबाळ नसल्यास तेही पाळीव प्राणी पाळतात, तर काहीजण केवळ एक आकर्षण/फॅड म्हणून प्राणी पाळतात. बऱ्याच जणांना पशुपालनाची आवड असते. असे पशुप्रेमी एकापेक्षा अधिक प्राणी (कुत्रे, मांजर, पक्षी) आपल्या घरात पाळतात. 

    आजकाल बऱ्याच घरांमध्ये देशीविदेशी प्राण्यांच्या जाती पाहायला मिळतात. या सर्व कारणास्तव या व्यवसायास मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच शहरी भागात हा व्यवसाय नेहमीच फायद्याचा आहे.

    Pet Industry Business: शहरात व उच्चभ्रू वसाहतीत पाळीव प्राणी पाळण्याची हौस आणि छंद जवळपास सर्वच लोकांना असतो. या व्यवसाय क्षेत्रामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. विविध देशी विदेशी जातीच्या प्राण्यांचे ब्रीडिंग, उत्पादन त्याची विक्री, पशुखाद्य निर्मिती व विक्री, पेट (Pet) केअर, पेट (Pet) शेल्टर, पेट (Pet) मेडिसिन, पेट (Pet) पार्लर्स, पेट (Pet) शो, पेट (Pet) गेम्स, पेट (Pet) सलून अशा अनेक प्रकारचे व्यवसाय व ब्रँड्स आज बाजारात नावारूपास आले आहेत. त्यामुळे नवउद्योजकांसाठी हे एक आकर्षक व्यवसाय क्षेत्र आहे, ज्यामध्ये पुष्कळ संधी उपलब्ध आहेत व यशाची खात्री आहे. 

    पेट (Pet) इंडस्ट्री व्यवसायातील यशाच्या खात्रीची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत : 

    1.  सर्वात महत्त्वाचे कारण या व्यवसायात प्राणी व त्यांच्यासंबंधित सर्व उत्पादनांना बाजारात कायम वाढती मागणी असते. 
    2. अगदी मंदीच्या काळातही या व्यवसाय क्षेत्रावर फारसा फरक पडत नाही व आर्थिक संकटांचा त्रास होत नाही. उलट मंदीच्या काळातही कुत्रे व मांजरांच्या विविध जातीची मागणी स्थिर होती.
    3.  हा व्यवसाय वर्षभर चालतो, त्यामुळे कॅशफ्लोमध्ये सातत्य टिकून राहते. या व्यवसायातील ग्राहक हे त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी खर्च करण्यास संकोच करत नाहीत.
       
    4. तसेच ग्राहकांना जास्त माहिती पुरवावी लागत नाही, त्यांना कोणतेही स्पष्टीकरण द्यावे लागत नाही, कारण पाळीव प्राणी पाळणाऱ्यांना त्यांच्या प्राण्यांचे आरोग्य, सवयी, प्रशिक्षण व त्यांचे मनोरंजन कसे करावे याबद्दल अगोदरपासून माहिती असते. ते लोक सर्व बाबतीत आधीपासूनच जागरूक असतात. 
    5. पाळीव प्राण्यांच्या पिल्लांबद्दल लोकांना खूप आकर्षण असते. त्यामुळे बाजारात त्यांमध्येही खूप विविधता दिसते व त्यास ग्राहकांकडून खूप मोठा प्रतिसाद मिळतो.
    6. या व्यवसाय वृद्धीचे सर्वात मोठे कारण म्हणजे मार्जिन. या क्षेत्रात एकूण गुंतवणुकीच्या ५० ते ६० टक्के नफा मिळतो. कुत्रे व मांजरांच्या पिल्ल्यांच्या खाद्य उत्पादनांमध्ये ४० ते ५० टक्के मार्जिन मिळते, तर त्यांच्यासाठी लागणाऱ्या खेळण्यांमधून ७० टक्के मार्जिन मिळते. पशुखाद्य उत्पादनातून सर्वात जास्त मार्जिन मिळते आणि त्याची मागणी बाजारात वर्षभर असते.
       
    7. आजकाल पेट (Pet) फॅशनमधूनसुद्धा चांगले उत्पन्न मिळते.
    8. सर्वसाधारणपणे पाहता या व्यवसायात पाळीव प्राणी व त्यांच्या संबधित सर्व उत्पादनांची मागणी वाढते आहे व ती निरंतर वाढतच राहील यात शंका नाही, हे मार्केट रिटेलर्सनाच नव्हे, तर व्यावसायिकांनासुध्दा आकर्षित करत आहे आणि दरवर्षी १० ते २० टक्यांनी वाढत आहे, कारण पाळीव प्राण्यांचे मालक त्यांच्या प्राण्यांच्या पालन- पोषणासोबतच त्यांचे मनोरंजन, आरोग्य यासाठी कितीही पैसे खर्च करायला तयार असतात.
       
    9. पाळीव कुत्रे पाळणारे मालक अंदाजे १० ते १५ हजाररुपये दरवर्षी खर्च करतात, तर मांजरांसाठी दरवर्षी किमान १२ ते १५ हजार रुपये खर्च करतात.

    Pet Industry Business: व्यवसायाच्या या संधीचा फायदा आपण  घेतलाच पाहिजे. या प्रत्येक व्यवसायामध्ये आपली पशुपालनाची आवड ही जोपासली जाते व पैसेही कमावता येतात.

    वाचक मित्रहो, बिझनेसची ही नवीन कल्पना तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.  

  • Tea Stall Business: १० रुपयांच्या चहातून लाखोंची कमाई?

    Tea Stall Business: १० रुपयांच्या चहातून लाखोंची कमाई?

    Tea Stall Business: मित्रांनो, सोशल मीडियावर आपण अनेकदा ऐकतो की, “एका चहावाल्याची कमाई आयटी इंजिनिअरपेक्षा जास्त असते!”

    १०-१२ रुपये देऊन चहा पिताना तुम्हालाही कधीतरी हा विचार नक्कीच आला असेल. वरवर पाहता हे खूप सोपं आणि आकर्षक वाटतं. पण यामागे खरंच एवढा नफा आहे का? चला, आज चहाच्या टपरीचं ‘रिअलिस्टिक बिझनेस मॅथेमॅटिक्स’ समजून घेऊया.

    सुरुवातीला बघूया कागदावरचं गणित:
    समजा, एका गजबजलेल्या रेल्वे स्टेशन किंवा आयटी पार्कबाहेर एक चहाची टपरी आहे.

    • रोजची विक्री: सरासरी ५०० कप चहा.
    • एका कपची किंमत: १० रुपये.
    • दिवसाची उलाढाल: ५,००० रुपये.
    • महिन्याची उलाढाल: १,५०,००० रुपये!

    Tea Stall Business: आता खर्चाचा विचार करूया. एक कप चहा बनवण्यासाठी दूध, साखर, चहापत्ती, गॅस आणि कागदी कप मिळून साधारण ५ ते ६ रुपये खर्च येतो. म्हणजेच एका कपमागे ४-५ रुपये ढोबळ नफा (Gross Profit). या हिशोबाने दिवसाचा नफा २,५०० रुपये आणि महिन्याचा नफा ७५,००० रुपये होतो. कोणत्याही कॉर्पोरेट टार्गेट्सशिवाय आणि टॅक्स न भरता हातात येणारी ही रक्कम ऐकून कुणीही थक्क होईल.

    पण थांबा! आता बघूया ‘खरे वास्तव’ (The Ground Reality):
    कोणताही व्यवसाय फक्त कागदावरच्या हिशोबाने चालत नाही. या ७५,००० रुपयांच्या नफ्यामधून काही मोठे ‘छुपे खर्च’ आणि संघर्ष वजा करावे लागतात:

    प्राइम लोकेशनची किंमत: गर्दीची जागा फुकट मिळत नाही. तिथे टपरी लावण्यासाठी अधिकृत भाडे किंवा स्थानिक पातळीवर द्यावा लागणारा ‘हफ्ता’ (Adjustment) हा या व्यवसायातील एक मोठा खर्च असतो.

    Tea Stall Business: मदतनीसांचा पगार: दिवसाला ५०० कप चहा बनवणे, ग्राहकांना देणे आणि कप उचलणे हे एका माणसाचे काम नाही. यासाठी किमान १-२ कामगार लागतात, ज्यांचा मासिक पगार द्यावा लागतो.

    शारीरिक मेहनत (Physical Toll): उन्हाळा असो, थंडी असो वा पाऊस… चहावाल्याला रोज १२-१४ तास गरम गॅसशेजारी उभं राहावं लागतं. इथे शनिवार-रविवारची सुट्टी नसते किंवा ‘पेड लीव्ह’ (Paid Leave) नसते. दुकान बंद, म्हणजे त्या दिवसाची कमाई शून्य!

    स्पर्धा: तुमचा चहा प्रसिद्ध झाला, की दुसऱ्याच महिन्यात आजूबाजूला तशाच ४ नवीन टपऱ्या उघडलेल्या असतात.

    थोडक्यात सांगायचं तर…

    ChatGPT Image Jun 11 2026 11 04 02 AM

    Tea Stall Business: चहाचा व्यवसाय हा नक्कीच ‘कॅश रिच’ (Cash Rich) बिझनेस आहे. जर तुमचं ‘लोकेशन’, ‘चव’ आणि ग्राहकांशी असणारं ‘कौशल्य’ परफेक्ट असेल, तर हा व्यवसाय तुम्हाला उत्तम परतावा देतो. पण आयटी इंजिनिअरची फक्त सॅलरी पाहून चालत नाही, चहावाल्याची ती अफाट शारीरिक मेहनत आणि अनिश्चितताही पाहावी लागते.

    तुम्हाला काय वाटतं? नोकरीमधील सुरक्षितता आणि एसी ऑफिस बरं, की स्वतःच्या व्यवसायातील हा संघर्ष आणि स्वातंत्र्य? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा!

    आणखी वाचा :

  • Quick Commerce 2026: ऑनलाइन खरेदीचा सर्वात वेगवान अवतार

    Quick Commerce 2026: ऑनलाइन खरेदीचा सर्वात वेगवान अवतार

    Quick Commerce 2026: क्विक कॉमर्स (Quick Commerce) म्हणजे E-commerce चा पुढचा आणि अत्यंत वेगवान टप्पा. हे नवीन मॉडेल ग्राहकांना किराणा माल, औषधे, खाद्यपदार्थ, आणि इतर दैनंदिन वस्तू अवघ्या काही मिनिटांत पोहोचवते. ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि आधुनिक तंत्रज्ञानातील प्रगती यामुळे क्विक कॉमर्सने जगभरातील Business क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणला आहे.

    भारतात क्विक कॉमर्स क्षेत्रात झेप घेतलेले अनेक Startups आहेत, जे लोकांच्या जीवनशैलीत आणि खरेदीच्या पद्धतीत वेगाने बदल घडवत आहेत. या लेखात आपण क्विक कॉमर्सची व्याप्ती, त्याचा इतिहास, प्रमुख कंपन्या आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने होत असलेली वाढ, यांचा सखोल आढावा घेणार आहोत.

    क्विक कॉमर्स म्हणजे काय आणि ही संकल्पना कशी कार्य करते?

    क्विक कॉमर्स (Q-commerce) म्हणजेच जलद ई-कॉमर्स सेवा, ज्यामध्ये ग्राहकांना १० ते ३० मिनिटांत वस्तू डिलीव्हर केल्या जातात. पारंपारिक ई-कॉमर्समध्ये Delivery ला काही तासांपासून काही दिवस लागू शकतात, पण Q-commerce तात्काळ सेवा पुरवतो. या सेवेमध्ये किराणा, ताजे अन्न, औषधे आणि इतर रोजच्या गरजेच्या वस्तूंचा समावेश आहे.

    मायक्रो फुलफिलमेंट सेंटर्स (Micro-Fulfillment Centers)

    जलद सेवा देण्यासाठी, शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये छोटे स्टोअर्स उभारले जातात, ज्यांना ‘डार्क स्टोअर्स’ किंवा मायक्रो फुलफिलमेंट सेंटर्स म्हटले जाते. यामध्ये थोड्या प्रमाणात पण अत्यंत आवश्यक वस्तू साठवल्या जातात.

    यामधील डिलीव्हरीची प्रक्रिया Gig Economy वर आधारित असते, म्हणजेच फ्रीलांस काम करणारे Delivery Partners ऑर्डर पोहोचवतात. यात स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर केला जातो ज्यामुळे ऑर्डर मिळाल्यानंतर तात्काळ Route Planning आणि Real-time Tracking यासारख्या सुविधा वापरून ग्राहकांना वेळेत सेवा दिली जाते. अशा प्रकारे, क्विक कॉमर्स जलद आणि सोयीस्कर खरेदीचा अनुभव देते.

    क्विक कॉमर्सचा इतिहास (History of Q-Commerce)

    क्विक कॉमर्स संकल्पनेचा उदय विशेषतः COVID-19 महामारीच्या काळात झाला. २०२० च्या लॉकडाऊन दरम्यान, लोकांना घरातून बाहेर पडणे शक्य नव्हते आणि आवश्यक वस्तूंची तातडीने गरज होती. या स्थितीने किराणा माल, औषधे, आणि दैनंदिन वापराच्या वस्तू जलदगतीने पोहोचवणाऱ्या सेवांची मागणी प्रचंड वाढवली.

    तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या कंपन्यांनी या संधीचा फायदा घेत, डार्क स्टोअर्स आणि Smart Logistics वापरून जलद सेवा सुरू केल्या. भारतासारख्या देशात, जिथे शहरीकरण वेगाने होत आहे आणि लोकांचा दिनक्रम खूप व्यस्त आहे, तिथे क्विक कॉमर्स सेवांनी जलदगतीने बाजारपेठ काबीज केली.

    क्विक कॉमर्समधील प्रमुख कंपन्या (Top Q-Commerce Brands)

    भारताच्या क्विक कॉमर्स क्षेत्रात काही प्रमुख स्टार्टअप्सने आपला मोठा ठसा निर्माण केला आहे:

    • झेप्टो (Zepto): हा स्टार्टअप २०२१ मध्ये मुंबईत सुरू झाला. झेप्टो अवघ्या १० ते २० मिनिटांत किराणा माल घरपोच पोहचवतो. ते मायक्रो फुलफिलमेंट सेंटर्सद्वारे कार्य करतात, ज्यामुळे ग्राहकांच्या ऑर्डर त्यांच्या जवळच्या गोदामातून अतिशय वेगाने पूर्ण केल्या जातात.
    • ब्लिंकिट (Blinkit): हा स्टार्टअप पूर्वी ग्रोफर्स (Grofers) म्हणून ओळखला जात होता. त्यांनी क्विक कॉमर्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपली रणनीती बदलली आहे आणि १०-१५ मिनिटांत वस्तू पोहोचवण्याचा यशस्वी पॅटर्न तयार केला आहे.
    • स्विगी इन्स्टामार्ट (Swiggy Instamart): स्विगी, जी एक प्रमुख Food Delivery कंपनी आहे, तिने इन्स्टामार्टच्या माध्यमातून क्विक कॉमर्समध्ये प्रवेश केला. Instamart ग्राहकांना तातडीने आवश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी स्विगीच्या अवाढव्य लॉजिस्टिक्स नेटवर्कचा वापर करते.

    तंत्रज्ञानाचा प्रगत वापर (Role of Technology)

    कृत्रिम बुद्धिमत्ता (AI – Artificial Intelligence) आणि Data Analytics च्या मदतीने कंपन्या ग्राहकांच्या खरेदीच्या सवयींचा सखोल अभ्यास करत आहेत. यामुळे त्यांना ग्राहकांना वेळेवर आणि अचूक सेवा देणे सोपे जात आहे. उदाहरणार्थ, नियमितपणे काही विशिष्ट वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी AI आधीच त्यांचा साठा तयार ठेवतो, ज्यामुळे डिलिव्हरी प्रक्रिया अधिक वेगवान होते.

    Logistics Management हा जलद वितरणासाठी एक महत्त्वाचा घटक आहे, जिथे कंपन्या GPS System, स्मार्ट रूट प्लॅनिंग आणि रियल-टाइम ट्रॅकिंगचा प्रभावी वापर करतात. तंत्रज्ञानामुळे संपूर्ण प्रक्रिया जलद, कार्यक्षम आणि अचूक होते, ज्यामुळे ग्राहकांचा अनुभव मोठ्या प्रमाणावर सुधारतो.

    भविष्यातील वाटचाल (Future Trends)

    क्विक कॉमर्स हा ई-कॉमर्स क्षेत्रात एक क्रांतिकारी बदल आहे, ज्यामुळे खरेदीचा संपूर्ण अनुभव बदलला आहे. ग्राहकांना जलद सेवा मिळाल्यामुळे त्यांची अपेक्षा वाढली आहे आणि कंपन्यांना त्यांच्या सेवा आणखी सुधारण्याची गरज भासू लागली आहे. भविष्यात, Drone Delivery, Automation (ऑटोमेशन) आणि नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने क्विक कॉमर्स अधिक कार्यक्षम आणि सर्वव्यापी होण्याची शक्यता आहे. या प्रगतीमुळे खरेदी अधिक सुलभ, जलद आणि कार्यक्षम होईल.

    आणखी वाचा :

  • असा उभा राहिला KFC उद्योगसमूह

    असा उभा राहिला KFC उद्योगसमूह 

     प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात एकदा तरी चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितीचा सामना करावा लागतो. प्रत्येक जण आपापल्या परीने याचा सामना करत असतो, काही जण परिस्थितीसमोर हतबल होऊन हार मानतात तर तेच काहीजण त्यावर मात करून स्वतःला सिद्ध करतात. वयाची साठी आली की लोक आपण करत असलेल्या कामातून निवृत्ती घेतात आणि उर्वरित आयुष्य आरामात घालवतात, मित्रांनो अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हटलं जातं ; पण आज आपण ज्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, त्या व्यक्तीने आयुष्यात अपयश हे एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल 1009 वेळा पाहिलं आहे, पण तरीसुद्धा आज ती व्यक्ती यशाचं परमोच्च शिखर गाठून आपल्या सर्वांसाठी आदर्श ठरली आहे. ज्यांनी इतर लोकांच्या निवृत्तीच्या वयात स्वतःची नवीन सुरुवात केली आणि ती सुरुवात यशस्वी करूनही दाखवली. त्या व्यक्तीचे नाव आहे, कर्नल हारलँड सॅंडर म्हणजेच KFC या सर्वात मोठ्या फास्टफूड उद्योगसमूहाचे निर्माते. त्यांचीच आज जयंती आणि त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश. 

    अनेकवेळा नोकरी मध्ये त्यांची निराशा झाली. पत्नीदेखील सोडून गेली. आर्मीमधूनही त्यांची हकालपट्टी झाली. त्यांनी सुरू केलेल्या हॉटेललादेखील आग लागली. निवृत्तीनंतर त्यांना फक्त 105 डॉलर्स मिळाले. पण या सर्व अडचणी त्यांच्या कर्तुत्वाच्या आड कधीच आल्या नाहीत. 

     हारलँड सॅंडर यांचा जन्म 9 सप्टेंबर 1890 मध्ये अमेरिकेमध्ये झाला. भावंडांमध्ये हारलँड सर्वात मोठे. त्यांचे आईवडील शेतकरी होते. पाच वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही हारलँड यांच्या आईवर येऊन पडली. त्यावेळी त्यांच्या आईने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी करायला सुरुवात केली. आई नोकरीला जात असल्यामुळे लहान भावंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी   हारलँड यांच्यावर असायची ते स्वतः त्यांच्यासाठी आणि त्यांच्या भावंडांसाठी जेवण बनवायचे,  तेव्हाच त्यांना कुकिंगची आवड लागली. ते कायम नवनवीन रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करायचे. 

     हारलँड बारा वर्षाचे असताना त्यांच्या आईने दुसरे लग्न केले परंतु दुसऱ्या वडिलांसोबत त्यांचे पटत नसल्याने ते शेतात येऊन राहू लागले आणि शेती करू लागले. सातवीला असताना हारलँड यांनी शिक्षण सोडून दिले व ते त्यांच्या काकांकडे राहायला गेले, त्यावेळी त्यांचे काका एका कारच्या कंपनीत नोकरीला होते. काकांनी  हारलँड यांना कंडक्टर म्हणून नोकरी मिळवून दिली. 

    आर्मी, इन्शुरन्स, कायदा, हॉटेल शेफ, टायरचे दुकान, बोट चालवणे  अशा विविध क्षेत्रात त्यांनी काम केले ; परंतु एकाही नोकरीमध्ये त्यांना स्थिरता लाभली नाही, या काळात एक मुलगी असताना त्यांची पत्नी देखील त्यांना त्यांच्या अस्थिर आयुष्यामुळे सोडून गेली. नंतर त्यांनी पेट्रोल पंपावर काम करायला सुरुवात केली, तेथे काम करत असताना लोकं जेव्हा त्यांना बसची वाट पाहताना दिसली तेव्हा ती संधी ओळखून हारलँड यांनी तेथे छोटे हॉटेल सुरू केले. केंटुकीच्या गव्हर्नरला हारलँड यांची Fried Chicken हा पदार्थ इतका आवडला की त्यांनी हारलँड यांच्यावर खुश होऊन त्यांना “कर्नल” पदवी दिली. रस्त्याच्या कामामुळे नंतर त्यांचं हे हॉटेल देखील बंद झालं.

    हॉटेल बंद झाल्यावर हारलॅंड यांना पुन्हा नोकरी करावी लागली. वयाच्या 60व्या वर्षी निवृत्त झाल्यावर त्यांना सरकारकडून फक्त 105 डॉलरचा चेक मिळाला. अशावेळी त्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा देखील विचार आला. पण तेव्हा देखील अजूनही सगळं संपलं नाही आपण काहीतरी करू शकतो ही हिम्मत त्यांच्यामध्ये होती.

    निवृत्तीच्या वेळी मिळालेले 105 डॉलर आणि प्रेशर कुकर घेऊन हारलँड सॅंडर त्यांच्या Fried Chickenच्या रेसिपीसाठी Business Partnar शोधू लागले. तब्बल 1009 हॉटेल व्यवसायिकांनी त्यांच्यासोबत बिझनेस पार्टनरशिप नाकारली. अनेकदा पदरी फक्त अपयश पडलं.  अखेरीस केंटुकीच्या एका मोठ्या हॉटेल व्यवसायिकाने त्यांची फ्रेंचाईजी स्वीकारली. तेव्हापासून त्यांच्या दुकानाचे नाव Kentucky Fried Chicken म्हणजेच KFC असे ठेवण्यात आले. बघता बघता त्यांच्या या Unique रेसिपीला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अतिशय कमी कालावधीत KFC च्या 600 Franchise पूर्ण झाल्या. 1964 मध्ये वयाच्या 73व्या वर्षी हारलँड यांनी जॉन ब्राऊन यांना KFC 2 मिलियन डॉलर म्हणजेच 14 कोटी रुपयांना  विकली. त्यातील अर्धी संपत्ती त्यांनी दान करून टाकली. आज रोजी 200 हून अधिक देशात KFC चे 18000 हून अधिक रेस्टॉरंट्स आहेत. KFC ची आज वर्षाला अब्जावधींमध्ये उलाढाल होते. आज KFC ही जगातील सर्वात मोठी फास्ट फूड Chain आहे.

    KFC चे संस्थापक कर्नल हारलँड सॅंडर त्यांच्या यशाचं हेच रहस्य सांगतात की,

    मला संकटे जिंकून देत नाहीत आणि मीही हार म्हणायला तयार नाही

    तुम्ही आत्ता जे करत आहात त्यात आवड निर्माण करा

    अथवा तुम्हाला जे आवडते ते करा