Divya Deshmukh : दिव्यानं कसा जिंकला बुद्धिबळाचा वर्ल्ड कप?

Divya Deshmukh :असं म्हणतात, की चपळ बुद्धिमत्ता, कष्टाची तयारी आणि सातत्य असलं, तर कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. याचं जिवंत उदाहरण म्हणजे कु. दिव्या देशमुख .फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकावणारी भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर. वयाच्या सहाव्या वर्षीच तिच्या हातात बुद्धिबळाची पट होती, ज्या वयात इतर मुलं खेळण्यांत गुंग असतात, त्या वयात तिने डाव-प्याद्यांची […]
दोन मित्रांची जिद्द आणि ६०,००० कोटींचे साम्राज्य! – Success Story of Razorpay

नमस्कार! आज आपण अशा एका कंपनीबद्दल बोलणार आहोत, जिचा वापर तुम्ही दररोज करता, पण कदाचित तुम्हाला तिचं नाव माहीत नसेल. तुम्ही जेव्हा झोमॅटोवर ऑर्डर देता किंवा नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन घेता, तेव्हा पडद्यामागे जे काम करतं, ते म्हणजे Razorpay. तुम्ही-आम्ही जेव्हा दुकानात स्कॅन करतो, ते झालं ‘B2C’ पेमेंट. पण एखाद्या स्टार्टअपला किंवा छोट्या बिझनेसला जेव्हा हजारो ग्राहकांकडून […]
रेल्वे रुळांवर इतिहास घडवणारी मराठमोळी लेक | Surekha Yadav

“महिलांना जगातली सर्व कठीण कामे जमतील, पण ड्रायव्हिंग हे त्यांचे काम नाही,” हे वाक्य आपण आजही अनेकदा ऐकतो. पण या पुरुषी मानसिकतेला खोटं ठरवत एका मराठमोळ्या लेकीने थेट रेल्वे इंजिनचं सारथ्य केलं. ती लेक म्हणजे साताऱ्याच्या कन्या, सौ.. सुरेखा यादव. भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक (लोको पायलट) होण्याचा मान मिळवून त्यांनी […]
Sunita Williams | गगनचुंबी स्वप्नांची यशस्वी भरारी : जाणून घ्या अंतराळ साम्राज्ञी सुनीता विल्यम्स यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

१९ मार्च २०२५ हा दिवस संपूर्ण जगासाठी ऐतिहासिक ठरला. नासाचे अनुभवी अंतराळवीर बुच विल्मोर (Butch Wilmore) आणि भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स (Sunita Williams) जवळपास नऊ महिने अंतराळात अडकल्यानंतर सुखरूपपणे पृथ्वीवर परतले. अमेरिकेतील फ्लोरिडा समुद्र किनाऱ्यावर स्पेसएक्सच्या कॅप्सूलच्या यशस्वी लँडिंगनंतर, या दोघांचं जगभरातून जल्लोषात स्वागत झालं. विशेष म्हणजे, ही मोहीम केवळ आठ दिवसांसाठी नियोजित होती, पण […]
कधी टॉयलेट साफ केला, कधी वडापाव विकला: जाणून घ्या ‘छावा’ दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा संघर्षमय प्रवास

सध्या देशभरात “छावा” (Chhaava) या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघर्षमयी जीवन प्रवासावर आधारित आहे, ज्यात महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) यांनी साकारली आहे, तर महाराणी येसूबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मीका मंदाना हिने साकारली आहे, तसेच अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि संतोष जुवेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी सुद्धा […]
ना घरच्यांचा आधार, ना समाजाची मदत तरीही उभा केला करोडोंचा व्यवसाय…

आधुनिक आणि प्रगत भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे महिला सशक्तीकरण. आजच्या भारतात महिला शिकतात, पैसे कमावतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. जगात वावरत असताना जरी आजूबाजूच्या देशांनी आपल्याला मागासलेलं, जुनाट आणि पारंपारिक रूढी-परंपरांना धरून वावरणारं राष्ट्र म्हटलं तरीही भारत विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करतोय आणि ही गोष्ट कुणापासून लपलेली नाही. आम्ही असं नाही म्हणणार की महिला पुरुषांची […]
यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो: There is no shortcut to success.

आयुष्य हे एक न संपणारं युद्ध आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आज कोणत्याही क्षेत्रात जा तिथे स्पर्धा आहे, कष्ट आहे, मेहनत आहे. संघर्षाविना सहज मिळतील अशा खूप कमी गोष्टी राहिल्यात. आज कष्टाशिवाय पर्याय नाही. चिकाटी आणि संयम आत्ताच्या तरुण पिढीमध्ये कमी असल्याकारणाने उतावळेपणात झटपट श्रीमंत व्हावे असे त्यांना वाटत असते.
भारतीय फुटबॉलचा नायक : सुनील छेत्री Real Life Story of Football Legend Sunil Chhetri

फूटबॉलच मैदान,तायवान विरुद्ध सामना भारताने ५-० ने जिंकलाय, मात्र जिंकायचा आनंद कमी आणि राग जास्त आहे. हा राग याचा की, आम्ही देशासाठी खेळतोय आणि कोणी बघायला का येत नाही? याच रागात एक ट्विट होतं आणि ते ट्विट एवढं वायरल होतं की ते २०१८सालचं गोल्डन ट्विट ठरतं. यानंतर, जेव्हा भारताचा केनिया सोबत सामना होतो, तेव्हा मैदान […]
अंतः अस्ति प्रारंभः

“अंतः अस्ति प्रारंभः” हा एक महत्वाचा आणि तात्त्विक विचार आहे जो आपल्याला जीवनातील विविध घटनांचा आणि स्थितींचा, वर्तमान परिस्थितीचा विचार करायला लावतो. या विचाराचा अर्थ असा आहे की, जिथे एक गोष्ट संपली आहे असे आपल्याला वाटते, तिथूनच दुसऱ्या गोष्टीची नवीन सुरुवात होते. जीवनात होणारा प्रत्येक अंत काहीतरी नवीन बदलाची सुरुवात घडवतो. संभाव्य परिवर्तनाची चाहूल देतो.
संख्येने कमी मात्र अब्जाधीशांमध्ये अव्वल; काय आहे पारशी समाजाची गोष्ट?

भारतातील व्यापारी समाज म्हटलं की हमखास आपल्यासमोर टाटा, गोदरेज, वाडिया अशी अनेक नावं समोर येतात. डोक्यावर टोपी आणि अंगात दिमाखदार सूट घातलेली पारशी लोकं पहिली की हा समाज जन्मजात श्रीमंत असल्याची खात्री पटते. आश्चर्याची बाब म्हणजे या समाजात लाखभर रुपये दर महिना कमावणाऱ्या माणसाला गरीब म्हटलं जातं. पारशी लोकं मुळातच व्यावहारिक ज्ञान अंगीकृत करून जन्म […]
सततची टीका आणि मानसिक त्रासाला वैतागलेल्या उद्योजकांसाठी…

गेल्या आठवड्यात प्रताप भेटला. पाठीवर Sack, हातात फोल्डर आणि गळ्यात टाय. चांगला रुबाबदार दिसत होता, पण चेहऱ्यावर हरवल्याचे भाव होते. मी अगदी समोर जाऊन उभा राहिलो तरी लक्ष नव्हतं. थोड बोलणं झाल्यावर लक्षात आले, की त्याने स्वतःचा कुरियरचा व्यवसाय बंद करून एका फायनान्स कंपनीत सल्लागार म्हणून नोकरी धरली आहे. खूप दु:खी वाटत होता. हताश झाला […]
ज्या माणसाला कष्टाची सवय लागलेली असते, अशी माणसे कधीच अयशस्वी होत नाहीत.

यश हे प्रयत्नानेच मिळवावे लागते. गेलेली वेळ पुन्हा मिळवता येत नाही. साक्षर असलेल्या महाराष्ट्रातील लोकांजवळ आत्मविश्वासाचा अभाव आहे. फक्त थडग्यातील दफन केलेल्या व स्वर्गवासी झालेल्या माणसांनाच समस्या नसतात, बाकी प्रत्येकालाच समस्या असतात. आयुष्यात विविधता आणता येते ती यशस्वी माणसांनाच. यशामागे परिश्रम आहेत, प्रचंड असा आत्मविश्वास आहे. बिल गेट्सच्या बाबतीत त्याच्या शिक्षकांनी सांगितले होते की, हा […]
एका रात्रीत मिळणारे यश मिळवण्यासाठी किती वेळ लागतो?

एका रात्रीत पार्सल पोहोचवण्याची कल्पना प्रत्यक्षात यायला फेडेक्सच्या फ्रेड स्मिथला प्रत्यक्षात ११ वर्ष लागली. १९६२ साली फ्रेड स्मिथने त्याच्या अर्थशास्त्राच्या तासाला ‘रात्रीत पार्सल पाठवण्याची सेवा’ या विषयावर एक निबंध लिहिला होता. त्याची कल्पना ही होती की, त्याची कंपनी जगाच्या कोणत्याही भागामधून लहानातील लहान वस्तू जगाच्या कोणत्याही भागामध्ये पोहोचवेल. त्याच्या शिक्षकांनी ‘कल्पना नाविन्यपूर्ण आहे आणि चांगल्या […]
सगळं संपलं असं कधीच होत नसतं! – मोटिव्हेशनल स्टोरी

ही गोष्ट आहे दोन मित्रांची आणि त्यांच्या मैत्रीची. त्यांच्या मैत्रीची सुरुवात एका हॉस्पिटलमध्ये होते. दोघे एकाच वॉर्डमध्ये असतात. त्यातील एक मित्र असतो रामलाल नावाचा, त्याला पॅरालिसिस झालेला असतो. बिचाऱ्याचे संपूर्ण शरीर अधू झाल्यामुळे तो चालू-फिरू शकत नव्हता. दुसरा जयसिंग. तो बाहेरून तरी धडधाकट वाटायचा. तो रोज त्या खाटेवरच पडून राहिलेल्या रामलालला खिडकीबाहेरील जग दाखवत असे. […]