भांडवल कसे उभे करावे ?

नोकरी करायची की व्यवसाय ह्या प्रश्नाला केवळ भांडवल नाही म्हणून नोकरीचा निर्णय घेणारे कित्येक तरुण मी पाहिले आहेत. कितीतरी ठिकाणी Poll (मतदान) घेतल्यानंतर मिळालेले उत्तर जाणून घेतले. मराठी उद्योजकाला व्यवसाय सुरू करताना सर्वात मोठी समस्या कोणती? हा प्रश्न विचारला असता एका ठिकाणी मिळालेल्या मतदानाची आकडेवारी देत आहे. भांडवल नसणे (३६६ मते)मार्गदर्शन नसणे (२१३ मते)कुटुंबातील व्यक्तीचा […]
व्यवसायासाठी किती भांडवल लागेल?

व्यवसायासाठी किती भांडवल लागेल? हा व्यवसाय प्रक्रियेतला सर्वात अवघड प्रश्न. कारण याचे एक उत्तर नाही. त्यामुळे काय उत्तर द्यावे हा प्रश्न पडतो. जरा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास व्यवसाय प्रक्रियेतला सर्वात सोपा प्रश्नही हाच आहे, कारण याची असंख्य उत्तरे आहेत. त्यामुळे कोणतेही उत्तर हे बरोबरच असते, चूक होण्याची शक्यता फार कमी असते. आता आपण या प्रश्नाचे सुसंगत […]
व्यवसायाच्या वाटेवर चालताना – कशी करावी सुरुवात?

काही तरुणांना भेटून व्यवसायाला कशी सुरुवात करणार? याविषयी विचारले असता मिळालेली काही उत्तरे. ‘घरातून पैसे घेणार नाही’ किंवा ‘घरातले लोक व्यवसायासाठी पैसे देत नाहीत तर अजून शिकायचे असल्यास किंवा नोकरी लागण्यासाठी पैसे द्यायला तयार आहेत’ किंवा ‘कशी सुरुवात करायची याविषयी काही विचार केला नाही’ अशी वेगवेगळी उत्तरे मिळाली. आता ही सर्व उत्तरे सोडून व्यवसायाची सुरुवात […]
व्यवसायच का ? – नोकरदार आणि व्यावसायिक यातील फरक

एका नामांकित कंपनीच्या बाहेर एक सुप्रसिध्द असे समोश्याचे दुकान होते. त्या कंपनीतील कर्मचारी दुपारच्या जेवणासाठी या दुकानात यायचे. तेथील चटकदार, चवदार समोसे खायचे. त्या कंपनीमधील बऱ्यापैकी सर्वजण समोसावाल्याच्या ओळखीचे झाले होते. एके दिवशी कंपनीच्या मॅनेजरला (व्यवस्थापकाला) समोसावाल्याची खिल्ली उडवण्याची लहर आली. मॅनेजरने विचारले, “मित्रा तू तुझे हे समोश्याचे दुकान खूप चांगल्या प्रकारे चालवत आहेस. पण […]
व्यवसायाच्या वाटेवर चालताना – अनुभवाची गरज आहे का?

जगात आजपर्यंत जेवढ्या गोष्टी निर्माण झाल्या त्या केवळ कल्पनेतूनच झाल्या. या कल्पनेच्या जोरावर त्या कल्पनेच्या जन्मदात्याने कार्य करायला सुरुवात केली. कोणताही अनुभव नव्हता, तरीही ते यशस्वी झाले. कारण, एकदा कल्पना करणे हाच एक वेळचा अनुभव असतो. मिकी माऊसचा जन्मदाता वॉल्ट डिस्नेने डिस्ने वर्ल्ड बनवण्याचा निर्णय घेतला. जगातले सर्वात मोठे Amusement Park वॉल्टला बनवायचे होते. त्यासाठी […]
कुटुंबीयांचा पाठिंबा की विरोध ? व उपाय

महाराष्ट्रात जन्माला आलेल्या माणसाने पिढ्यानपिढ्या उद्योग केल्याची उदाहरणे जवळपास नाहीतच. काही वर्षापूर्वीपर्यंत मराठी माणूस हा एकमेकांचे पाय खेचण्यातच धन्यता मानतो असा ठाम समज होता. मात्र आता तो काही प्रमाणात का होईना मोडून निघत आहे. महाराष्ट्राने वारंवार दिग्गज व्यावसायिक दिले आहेत. त्यातील कित्येक व्यावसायिकांची नावे देखील आज आपल्याला माहिती नसतील, पण त्यांचे कर्तृत्व आपण नाकारु शकत […]
लेख ७.२ – बिझनेस प्लॅन कसा तयार करावा?

व्यवसायाचा आत्मा असणारा बिझनेस प्लॅन आता अंतिम टप्प्यात आला आहे. यानंतर भांडवलदारांची/गुंतवणूकदारांची यादी तयार करुन लगेच त्यांना आपला बिझनेस प्लॅन व संपूर्ण प्रकल्प अहवाल (डीपीआर) या दोन प्रभावी ब्रम्हास्त्रांनी भांडवल निर्मितीसाठी वेगवान पावले उचलता येतात. काल चार टप्प्यांचा आपण अभ्यास केल्यानंतर आज उरलेल्या सर्व टप्प्यांची प्रक्रिया पाहू या. ५. स्पर्धक – आपण करत असलेल्या उत्पादनांची […]
बिझनेस प्लॅन कसा तयार करावा?

बिझनेस प्लॅन हा प्रत्येक व्यवसायाचा आत्मा आहे आणि Finance is the blood of organization म्हणजेच पैसा/भांडवल हे संस्थेचे रक्त आहे असे म्हणतात. जसे शरीरात रक्त नसले किंवा त्याचे प्रमाण कमी झाले तर शरीर काम करण्यास असमर्थ ठरते. त्याचप्रमाणे भांडवल/पैसा नसणाऱ्या संस्था सुध्दा कार्य करण्यास असमर्थ ठरतात. म्हणून या पैसारुपी रक्ताचा मुबलक प्रमाणात पुरवठा करण्यासाठी बिझनेस […]
बिझनेस प्लॅन जरुरी आहे का?

जगातील सर्व देशांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की, काही देश प्रगत, काही देश विकसनशील तर काही देश मागास आहेत. त्यांच्या एकूण परिस्थितीचा आढावा घेतला असता काही अनुमान काढण्यात आले ते असे होते. प्रगत देशामध्ये वयाची ४० वर्षे ओलांडलेले नागरिक हे देशातील नवयुवकांना व्यवसायासाठी मदत करतात, तर विकसनशील देशात चाळिशी ओलांडलेले लोक काहीही न करता […]
कार्यक्षेत्र कसे ठरवावे? – व्यवसाय लोकल ठेवायचा कि ग्लोबल करायचा हे कसं ठरवावं.

व्यवसाय करत असताना आपली उत्पादने (वस्तू/सेवा) आपण मार्केटमध्ये कोणकोणत्या ठिकाणी पोहोचवू शकतो? किती वेळेत व किती लवकर पोहोचवू शकतो? ग्राहकांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी ती उत्पादने वेळेत त्यांच्या हातात मिळतील का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आपल्या व्यवसायाचे कार्यक्षेत्र ठरविण्यासाठी मदत करतात. आपले कार्यक्षेत्र ठरवल्यामुळे आपले ग्राहक व आपण यामध्ये एक नातेसंबंध तयार होत असतो. ग्राहकाच्या […]
व्यवसाय कोणता ?- व्यवसाय करायचा म्हणजे स्वतःची फॅक्टरी पाहिजे, दुकान पाहिजे या कल्पना आता मागे पडत चालल्या आहेत.

आतापर्यंत जगात जेवढे व्यवसाय सुरु झाले आहेत. त्यापैकी बहुतांशी व्यवसाय हे माणसांचा वेळ, श्रम व पैसा या तिन्हीपैकी एक किंवा अधिक गोष्टीची बचत करतात म्हणून ते व्यवसाय चालू असतात. मोबाईल आले त्यामुळे लोकांना पत्राद्वारे संपर्क करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत बचत झाली. वाहतुकीच्या साधनामुळे लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारे श्रम वाचले. याबरोबरच या तीन गोष्टींची […]
व्यवसाय विषयक सल्ला उठसुठ कोणालाही विचारू नका अशाच लोकांचा सल्ला घ्या, जे त्याची योग्य उत्तरे देतील

व्यवसाय करण्यासाठी ज्ञान, माहिती, अनुभव, भांडवल, मनुष्यबळ, यंत्रे व तंत्रज्ञान या गोष्टी लागतातच. या सर्व गोष्टीबरोबर लागणारी एक सर्वात महत्त्वाची व न दिसणारी गोष्ट म्हणजे व्यवसायासाठीची मानसिकता ही होय. व्यवसाय करण्याची वृत्ती किंवा मानसिकता ही स्वतःमध्ये असावी लागते किंवा ती नसली, तर स्वतःहून निर्माण करावी लागते. बाहेरुन पुरवठा करण्याची ही गोष्ट नाही. व्यवसाय करण्याची मानसिकता […]
व्यवसायाच्या वाटेवर चालताना – सुरुवात करण्यापूर्वी काय?

व्यवसायाचे गमभन (ABCD) माहित नसलेले, पण व्यवसाय करण्याची इच्छा असणारे शेकडो तरुण असे काही प्रश्न विचारतात, “मला व्यवसाय करायची इच्छा आहे, तुम्ही मला कोणता व्यवसाय करावा हे सुचवा?”, “माझ्यासाठी कोणता व्यवसाय योग्य राहील?”, “सध्या कोणता व्यवसाय केला, तर चांगला फायदा होतो?”, “कमीत कमी भांडवलात सुरु होणारा कोणता व्यवसाय मी करु?”, “जोखीम (रिस्क) कमी असणारा व्यवसाय […]
व्यवसायाच्या वाटेवर चालताना – प्रस्तावना

महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यात फिरुन माहिती घेतल्यानंतर, वेगवेगळ्या ठिकाणच्या तरुणांकडून त्यांच्याशी चर्चा केल्यावर, तसेच विविध ठिकाणच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय व इतर सर्व प्रकारच्या परिस्थितीचा चिकित्सक अभ्यास केल्यावर सदर लेखमालिका सुरु करत आहोत. तरुणांच्या मनात उठणारे प्रश्नांचे वादळ, प्रत्यक्ष कामाला सुरवात केल्यावर येणाऱ्या अडचणी व अडचणींबरोबरची हतबलता, त्यावर उपाय न शोधता येणे, नोकरी करावा की व्यवसाय? असा […]
व्यवसाय की नोकरी ? – शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी कि व्यवसाय

वयाची १८-२२ वर्षे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी का व्यवसाय करावा हा कोड्यात टाकणारा प्रश्न सर्व तरुणांना पडत असतो. कारण आईवडिलांवर अवलंबून राहण्याचे सोडून स्वतःच्या कर्तृत्त्वाने जगात आपला ठसा उमटवण्याचे हे वय असते. उमेद असते, आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी हवे ते करण्याची तयारी असते. पण आपल्याला काय हवे हे मात्र समजत नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरुन एक […]