कामाचे तास, वेतन आणि सुरक्षितता – जाणून घ्या नवीन लेबर कोड्सची संपूर्ण माहिती
केंद्र सरकारने २१ नोव्हेंबरपासून देशभर नवीन लेबर कोड्स लागू करण्यास सुरुवात केली असून, त्यामुळे विविध क्षेत्रांतील लाखो कामगारांना मोठा फायदा होणार आहे. गिग वर्कर, कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी तसेच आयटी आणि मीडिया क्षेत्रातील प्रोफेशनल्स, या सर्वांसाठी हे कायदे महत्त्वाचे ठरणार आहेत. या नवीन कोड्सचा मुख्य उद्देश म्हणजे कामगारांचे हक्क अधिक मजबूत करणं, त्यांच्या कामाच्या वातावरणात पारदर्शकता आणणं आणि सुरक्षितता वाढवणं.अनेक वर्षांपासून बदलांची प्रतीक्षा करणाऱ्या कामगारांसाठी हे नवे नियम दीर्घकालीन संरक्षण देणारे ठरणार आहेत.
खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने या बदलांबद्दल माहिती ठेवणं खूप आवश्यक आहे, कारण या नव्या बदलामुळे वेतनरचना, कामाचे तास, सुट्ट्या, सामाजिक सुरक्षा, निवृत्ती लाभ आणि कंपनीची जबाबदारी अशा अनेक गोष्टींमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. हे नियम लागू झाल्यानंतर कर्मचारी आणि नियोक्ता दोघांचेही कामकाज अधिक स्पष्ट व नियमबद्ध होणार आहे. त्यामुळे आपल्या हक्कांची योग्य जाणीव ठेवण्यासाठी आणि उपलब्ध फायद्यांचा लाभ घेण्यासाठी हे नवीन लेबर कोड्स नेमके काय आहेत आणि ते तुमच्या नोकरीवर कसा परिणाम करतील, हे आपण आजच्या लेखात समजून घेऊया.
कामाचे तास आणि ओव्हरटाईमचे नवे नियम
कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना योग्य मोबदला मिळावा म्हणून सरकारने कामाचे तास आणि ओव्हरटाईमसंबंधी नवीन नियम लागू केले आहेत. आता ओव्हरटाईमसाठी किमान वेतनाच्या दुप्पट रक्कम देणं अनिवार्य करण्यात आलं आहे. तसंच ओव्हरटाईम करणं हे पूर्णपणे ऐच्छिक असेल. कोणत्याही कामगारावर त्यासाठी जबरदस्ती केली जाऊ शकत नाही. याशिवाय, प्रत्येक राज्य सरकारला त्यांच्या परिस्थितीनुसार ओव्हरटाईमची कमाल मर्यादा ठरवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
कामगारांना अधिक सुविधा मिळाव्यात म्हणून सुट्ट्या आणि वेतनासाठी लागणाऱ्या आवश्यक कामकाजाच्या दिवसांमध्येही बदल करण्यात आला आहे. पूर्वी २४० दिवस काम करण्याची अट होती, ती आता १८० दिवसांवर आणण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांना सुट्या मिळवणं आणि इतर लाभ घेणं अधिक सोयीचं होणार आहे.
ESI योजनेचा विस्तार
ESI म्हणजे Employee State Insuranceयोजना आता अधिक व्यापक स्वरूपात लागू केली जात आहे. आधी केवळ काही विशिष्ट उद्योगांपुरती मर्यादित असलेली ही योजना आता दुकाने, बागायत उद्योग, छोटे व मोठे कारखाने अशा अनेक क्षेत्रांतील कर्मचार्यांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अधिक कामगारांना कमी खर्चात आरोग्य संरक्षणाचा फायदा मिळू शकेल.
या योजनेत कामगारांना वैद्यकीय विमा, मातृत्व लाभ आणि अपंगत्व संरक्षण यांसारखे महत्त्वाचे फायदे दिले जातात. ESI योजनेंतर्गत येणाऱ्या सुविधांमुळे कामगारांना सरकारी आरोग्य सेवा अधिक सोयीस्कर आणि परवडणारी ठरणार असून, त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची अधिक चांगली काळजी घेतली जाईल.
मीडिया व डिजिटल कर्मचाऱ्यांसाठी औपचारिक नियुक्ती पत्र
मीडिया आणि डिजिटल क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आता औपचारिक नियुक्ती पत्र देणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यात OTT प्लॅटफॉर्मवरील कर्मचारी, पत्रकार, डिजिटल संपादक आणि कंटेंट क्रिएटर्स यांचा समावेश होतो. यामुळे या क्षेत्रातील कामकाज अधिक नियमबद्ध आणि पारदर्शक होण्यास मदत होईल.
नियुक्ती पत्रामुळे कामाचे तास, जबाबदाऱ्या आणि वेतन यांचा स्पष्ट तपशील कर्मचाऱ्यांना मिळेल. यामुळे त्यांच्या हक्कांची खात्री वाढेल आणि कार्यस्थळावरील सुरक्षितता व स्थैर्य अधिक मजबूत होईल.
ग्रॅच्युइटीच्या नियमात बदल
ग्रॅच्युइटीसंबंधीच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला असून, यामुळे लाखो कामगारांना थेट फायदा होणार आहे. पूर्वी ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी कंपनीत सलग पाच वर्षे काम केलेलं असणं आवश्यक होतं. मात्र, नवीन नियमांनुसार आता फक्त एक वर्षाची सेवा पूर्ण केली तरी कर्मचारी ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरेल. याशिवाय, काही कॉन्ट्रॅक्ट कामगारांनाही या योजनेत समाविष्ट करण्यात आलं आहे, जे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा बदल ठरतो.
या सुधारित नियमामुळे कंपनीत कमी कालावधी नोकरी करणाऱ्या कर्मचार्यांनाही आर्थिक लाभ मिळू शकेल. पूर्वी कमी कालावधी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा लाभ मिळत नसल्याने त्यांना मोठं नुकसान होत असायचं, परंतु आता ही अडचण दूर झाली आहे. एकूणच, कमी कालावधीची नोकरी असली तरीही आर्थिक सुरक्षा मिळण्याचा मार्ग उघडल्यामुळे हा बदल कामगारांसाठी अत्यंत फायद्याचा ठरणार आहे.
नियुक्ती पत्र अनिवार्य
नवीन नियमांनुसार, आता प्रत्येक कंपनीने कर्मचाऱ्याला नोकरी स्वीकारताना औपचारिक नियुक्ती पत्र देणं बंधनकारक केले आहे. यापूर्वी अनेक ठिकाणी तोंडी बोलणं किंवा अनौपचारिक करारांवर भर दिला जात होता, परंतु आता प्रत्येक कर्मचारीला जॉइनिंगवेळी त्याच्या नोकरीची संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात मिळणार आहे. त्यामुळे नोकरीची प्रक्रिया अधिक अधिकृत आणि व्यवस्थित होणार आहे.
नियुक्ती पत्रामध्ये पगार, कामाचे तास, कामाचे स्वरूप आणि जबाबदाऱ्या यासंबंधी सर्व तपशील स्पष्टपणे नमूद केले जातात. यामुळे भविष्यातील गैरसमज, वाद किंवा चुकीच्या अपेक्षा टाळता येतात. कर्मचारी आणि नियोक्ता दोघांमध्येही विश्वास वाढतो आणि कामकाज अधिक पारदर्शक व नियमबद्ध होते. एकूणच, हा बदल रोजगार प्रक्रियेला अधिक सुरक्षित आणि स्पष्ट बनवतो.
वेळेवर पगार देणं बंधनकारक
नवीन लेबर कोडनुसार आता सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देणं अनिवार्य करण्यात आले आहे. जर पगार उशिरा दिला गेला, तर नियोक्त्यांवर दंड आकारला जाऊ शकतो. यामुळे कामगारांच्या पगाराची सुरक्षितता वाढेल आणि त्यांच्या आर्थिक हक्कांचे संरक्षण होईल. तसेच, कामाच्या ठिकाणी अपघाताची व्याख्या देखील विस्तृत केली आहे. घरून कामावर जाताना किंवा कामावरून घरी परतताना झालेला अपघात देखील रोजगारसंबंधित मानला जाईल आणि अशा वेळी कामगाराला सर्व लाभ, भरपाई आणि विमा मिळणार आहे.
याशिवाय, केंद्र सरकारने देशभरासाठी एकसमान किमान वेतन दर निश्चित केला आहे. याचा अर्थ कोणतेही राज्य यापेक्षा कमी वेतन ठरवू शकणार नाही. या बदलामुळे देशभरातील सर्व कामगारांना न्याय्य आणि एकसमान वेतन मिळेल, ज्यामुळे आर्थिक असमानता कमी होईल आणि कामगारांचे अधिकार अधिक मजबूत होतील.
IT, ITES, निर्यात आणि वस्त्रोद्योगातील कर्मचाऱ्यांसाठी नियम
IT, ITES, निर्यात आणि वस्त्रोद्योगातील कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम लागू झाले आहेत. या क्षेत्रातील प्रत्येक कर्मचाऱ्याला पगार महिन्याच्या ७ तारखेपर्यंत मिळणं अनिवार्य आहे. जर पगार उशिरा दिला गेला, तर कंपनीवर कारवाई केली जाऊ शकते. हे नियम खास करून आयटी आणि निर्यात क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करतात आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करतात.
याशिवाय, ४० वर्षांवरील कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी करणं बंधनकारक केलं आहे. तपासणीचा सर्व खर्च कंपनी उचलेल. यामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित राहील, वेळेवर रोगांचे निदान होईल आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या टाळता येतील. एकूणच, हा बदल कामगारांसाठी आर्थिक आणि आरोग्यदृष्टीने दोन्ही दृष्ट्या फायदेशीर आहे.
मित्रांनो, नवीन लेबर कोडमुळे देशातील कामगारांच्या अनेक वर्षांच्या समस्या आणि अडचणी लक्षात घेऊन मोठे बदल करण्यात आले आहेत. या सुधारित कायद्यांमुळे वेतनाची सुरक्षितता, आरोग्य संरक्षण, कामकाजातील पारदर्शकता आणि कर्मचारी हक्क अधिक मजबूत होतील. नियम लागू झाल्यानंतर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि कामाचे वातावरण अधिक सुरक्षित व सुव्यवस्थित बनेल.
नारळाच्या कवट्या आपण निरुपयोगी समजून फेकून देतो. पण याच नारळाच्या कवट्या Recycle करून केरळच्या एका तरुणीने लाखोंचा बिझनेस उभा केला आहे. आज आम्ही तुम्हाला अशा महिलेबाबत सांगणार आहोत, जिने कचरा म्हणून फेकल्या जाणाऱ्या नारळाच्या कवट्यांपासून कमाईचं नवं साधन शोधलं आणि या महिलेचं नाव आहे मारिया कुरियाकोस.
मारिया कुरियोकोस ही मुळची केरळच्या त्रिशुरची. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर ती स्पेनला शिकायला गेली. 2017 मध्ये तिला नोकरी लागली; पण 2019 मध्ये तिने नोकरी सोडून दिली. तिला स्वतःच असं काहीतरी करायचं होत. थोडं संशोधन केल्यावर तिला समजलं, की लोकं नारळाच्या कवट्या फेकून देतात; पण त्यापासून अनेक उपयोगी वस्तू बनू शकतात. मग तिने नारळाच्या कवट्या Recycle करायला सुरुवात केली आणि त्यापासून सजावटीचे सामान बनवले.
सुरूवातीला तिने 150 किचन बाऊल बनवले. ते एका इव्हेंटमध्ये तसेच तिच्या मित्रपरिवाराला विकले. 60 रुपयाला एक बाऊल असा व्यवसाय तिने सुरुवातीला केला. त्यातून तिला 9000 रुपये मिळाले. मग तिने 1500 रुपयांची ड्रिलिंग मशीन घेतली. एकूण 4000 गुंतवणुकीतून हा व्यवसाय सुरू केल्याचं मारिया सांगते. आता तिच्याकडे महिला कामाला आहेत ज्या तिला हे प्रोडक्ट्स बनवायला मदत करतात. कोविड-19 मध्ये तिने तिचा व्यवसाय ऑनलाईन नेला, तेव्हा तिच्या व्यवसायाला खरी प्रसिद्धी मिळाली. त्यांचे जास्त ग्राहक हे मुंबई, दिल्ली आणि बंगलोर सारख्या शहरातून आहेत, जिथे लोकं इकोफ्रेंडली प्रोडक्ट्सबद्दल जास्त जागरूक आहेत.
पहिल्या वर्षी त्यांचा वार्षिक टर्नओव्हर 20 लाख रुपये होता, तर दुसऱ्या वर्षी तो 50 लाख रुपये इतका झाला. मागच्या आर्थिक वर्षात त्यांचा टर्नओव्हर 1 कोटींपेक्षा जास्त झाला आहे.
Thenga Coco :
Thenga Coco हा केरळमधील एक स्वदेशी ब्रँड आहे. मल्ल्याळम भाषेत थेंगा या शब्दाचा अर्थ नारळ असा होतो. या ब्रँडमध्ये कचरा मानला जाणाऱ्या नारळाच्या कवट्यांवर पुनर्प्रक्रिया व त्याचे पुनरुत्पादन केले जाते. ही कंपनी नारळाच्या कवचापासून टिकाऊ, पर्यावरणपूरक हस्तनिर्मित वस्तू बनवते. केरळमध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या या उद्योगाने अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. याशिवाय, कंपनी भविष्यात नारळाच्या कवट्यांपासून खेळणी आणि दागिने तयार करण्याचा विचार करत आहे, जे प्लास्टिकच्या खेळण्यांना सुरक्षित पर्याय ठरू शकतात.
थेंगा कोकोचे उत्पादन केवळ पर्यावरणपूरक नसून, हे महिलांना आर्थिक स्वावलंबनही प्रदान करते. कंपनीत 80% कर्मचारी महिला आहेत आणि त्यांच्या हातांनी ह्या वस्तू तयार केल्या जातात. ही उत्पादने स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध आहेत. कंपनीत 18 कर्मचारी आहेत, त्यातील 12 महिला असून, त्यांना लवचिक कामाच्या वेळा दिल्या जातात जेणेकरून त्या घरगुती जबाबदाऱ्यांसह काम करू शकतील.
मारियाची कल्पकता आणि कठोर परिश्रम यामुळे तिच्या व्यवसायाने अडथळ्यांवर मात करत आज स्वतःचा एक मोठा Brand बनवला आहे. मारिया यांच्या यशस्वी प्रवासातून हेच शिकण्यासारखे आहे की योग्य उद्दिष्टं, दृढनिश्चय आणि पर्यावरण संवर्धनासाठीची आंतरिक तळमळ यातून नक्कीच समाजात मोठे परिवर्तन घडवता येऊ शकते.
ओळख जेआरडी यांचा जन्म 29 जुलै 1904 रोजी रतन दादाभॉय व सूनी टाटा यांच्या पोटी पॅरिस येथे झाला. ते टाटा ग्रुपचे चौथे अध्यक्ष होते.शिक्षण जेआरडींचं बालपण फ्रान्समध्ये गेलं. तर शिक्षण लंडन, जपान, फ्रान्स आणि भारतात झालं. त्यांना केंब्रिजमधून इंजिनिअरिंग करायची इच्छा होती, पण वडिलांनी व्यवसाय सांभाळण्यासाठी भारतात बोलावून घेतलं.सुरुवात बिनपगारी अॅप्रेंटिस म्हणून त्यांनी कंपनीत कामाला सुरुवात केली. वयाच्या 22 व्या वर्षी ते टाटा सन्सचे डायरेक्टर बनले, तर 34 व्या वर्षी कंपनीचे चेअरमन बनले.विमान वाहतुकीचे जनक भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक म्हणून जेआरडी ओळखले जातात. ते भारताचे पहिले कमर्शिअल पायलट होते. कराची ते मुंबई हे पहिलं विमान त्यांनी स्वतः उडवलं होतं. त्यांनी 1932 मध्ये टाटा एअरलाइन्स स्थापना केली. ज्याचं नाव नंतर एअर इंडिया झालं.टाटा ग्रुपचा विस्तार जेआरडी अध्यक्ष झाले तेव्हा टाटांच्या 14 कंपन्या होत्या. निवृत्तीच्या वेळेस ही संख्या 95 पर्यंत पोहोचली. ग्रुपचा महसूल 100 दशलक्ष डॉलर्सवरून 5 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. टीसीएस, टायटन, टाटा मोटर्स, वोल्टास, एअर इंडिया इत्यादी कंपन्या जेआरडींच्याच काळात सुरु झाल्या.समाजकल्याण त्यांनी कामगारांसाठी दिवसात 8 तास काम, मोफत आरोग्यसेवा, भविष्य निर्वाह निधी, अपघात विमा योजना सुरु केली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, टाटा मेमोरिअल कॅन्सर रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल इत्यादी संस्था स्थापना करण्यात भूमिका बजावली.पुरस्कार जेआरडी हे पहिले आणि एकमेव उद्योगपती आहेत, ज्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे. फ्रान्सचा लिजन ऑफ ऑनर हा सर्वोच्च नागरी सन्मान सुद्धा त्यांना दिला गेला. भारतीय हवाई दलातील एअर व्हाईस मार्शल हे मानद पद त्यांना देण्यात आले होते. हवाई क्षेत्रातीलदेशातील सामान्य लोकांचा आणि देशाचा जोपर्यंत विकास होत नाही, तोपर्यंत एक उद्योजक म्हणून मिळणारे कोणतेही यश अपूर्ण आहे. – जेआरडी टाटा
मल्लिका श्रीनिवासन या देशातील दुसरी व जगातील तिसरी सर्वात मोठी एक्सपोर्टर TAFE (ट्रॅक्टर अँड फार्म इक्विपमेंट) च्या सीईओ आहेत.त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1959 रोजी मद्रास येथे झाला. मद्रास युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी व्हॉर्टन स्कूल पेनसिल्व्हेनिया येथून एमबीए पूर्ण केलं.त्यानंतर त्या वडिलांना व्यवसायात मदत करू लागल्या. त्याच्या कारकिर्दीत कंपनीने ट्रॅक्टर उत्पादनात खूप प्रगती केली आणि टर्न ओव्हर 160 करोड डॉलरच्या घरात गेला. आज कंपनी ट्रॅक्टर, फार्म मशिनरी, डिझेल इंजिन, जनरेटर, अभियांत्रिकी प्लास्टिक, हायड्रोलिक पंप आणि सिलिंडर, वृक्षारोपण यासारख्या क्षेत्रात अग्रेसर आहे.मल्लिका श्रीनिवासन यांनी भारतीय उद्योग महासंघ, भारतीय विदेश व्यापार संस्था यांसारख्या संस्थेमध्ये विविध पदे भूषविली आहेत. फोर्ब्स इंडिया ने वूमन लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. तसेच फोर्ब्स अशिया टॉप 50 अशिया पॉवर बिझनेसवुमन पैकी एक म्हणून त्यांचा गौरव केला गेला आहे. तर भारत सरकारकडून 2014 मध्ये त्यांना पद्मश्री मिळाला.इतकेच नाही तर कार्पोरेशन AGCO यु एस ए च्या मंडळात त्या सदस्य आहेत. तर युएस इंडिया बिझनेस कौन्सिलच्या जागतिक संचालक मंडळावर देखील त्या सदस्य आहेत.दूरदृष्टी, व्यवसायातील संधी, कार्यक्षमता या अंगच्या गुणांबरोबरच ट्रॅक्टर क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे त्यांना आज “ट्रॅक्टर क्वीन ” म्हणून ओळखले जाते.
गंगाभीषण तथा हल्दिराम अगरवाल यांचा जन्म राजस्थानमधील बिकानेर येथे मारवाडी कुटुंबात झाला. फार लहान वयात ते आपल्या कुटुंबाच्याच व्यवसायात दाखल झाले. या कुटुंबाचा बिकानेरमधील भुजिया बाजार येथे भुजिया (तिखट शेव) बनवण्याचा छोटासा व्यवसाय होता.त्यांचे लग्न चंपादेवींशी झाले होते. सुरुवातीला ते काकूच्या रेसिपीनुसार भुजिया बनवून विकत असत. परंतु नंतर काही कौटुंबिक वादामुळे त्यांनी पत्नीसह घर सोडले.त्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीने घरीच बनवलेल्या मूग डाळ नमकीनची रस्त्यावर विक्री सुरू केली. केली. १९४६ मध्ये हल्दीराम यांनी बिकानेरमध्ये आपले पहिले दुकान सुरू केले. तेथे त्यांनी आपली आधीची भुजिया अजून बारीक करून डुंगर सेव या नावाने विकायला सुरुवात केली. हे नाव बिकानेरचे राजा डुंगर सिंग यांच्या नावावरून ठेवले होते.१९४०-५०च्या दरम्यान दर आठवड्याला शंभर ते दोनशे किलो भुजिया विकली जाऊ लागली. हल्दिरामच्या या लोकप्रियतेमुळे सुरुवातीला दोन पैसे किलोने मिळणारी भुजिया २५ पैसे किलो इतकी महागली.एकदा ते लग्नाच्या निमित्ताने कोलकात्याला गेले असताना सोबत नातेवाईकांसाठी ही भुजिया शेव घेऊन गेले. या नातेवाईकांनी त्यांना थेट कोलकात्याला दुकान सुरू करण्याचा हट्ट धरला. त्यांनी पण तो मान्य केला आणि तिथे शाखा सुरू झाली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपणही आपली शाखा इतरत्र उघडू शकतो.पुढे शिवकिसन आणि मनोहरलाल हे कर्तबगार नातू हाताशी आल्यावर दिल्ली, नागपूर, नोएडा इथे हा व्यवसाय वाढत गेला. २००३ साली अमेरिकेत त्यांनी आपले प्रॉडक्ट्स पाठविण्यास सुरुवात केली. एकेक करत तब्बल ८० देशांमध्ये त्यांचे प्रॉडक्ट्स विकले जाऊ लागले.भुजियाच्या जोडीला मिठाई, फरसाण, दुधापासून बनवलेली उत्पादनं विकायला त्यांनी सुरुवात केली. पुणे, नागपूर, नोएडा, कोलकाता आणि दिल्ली येथे कंपनीची स्वतःची रेस्टॉरंट्स देखील आहेत.कंपनीची आजची उलाढाल ७००० कोटींहून अधिक असून शेवेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज तब्बल ४०० प्रॉडक्ट्सपर्यंत पोहोचला आहे. २०१७ मध्ये इतर सर्व मोठ्या ब्रँड्सना मागे टाकून हल्दीराम भारतातील सर्वात मोठा स्नॅक्स ब्रँड बनला.
धीरूभाई अंबानी यांचा जन्म २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातमधील चोरवाड या गावी झाला. त्यांचे संपूर्ण नाव धीरजलाल हिराचंद अंबानी. त्यांचे वडील हे एक प्राथमिक शिक्षक होते तर आई गृहिणी होती.घरची परिस्थिती बेताची होती.त्यामुळे लहान वयातच धीरूभाई गिरनार पर्वताजवळ पर्यटकांना भजी विकायचे. शाळेत जेमतेम असणारे धीरूभाई यांचं शिक्षण १० वी पर्यंतच झालं.वयाच्या १६ व्या वर्षी धीरूभाई आपले जेष्ठ बंधू रमणीकभाई यांच्यासोबत एडनला गेले आणि तेथे ते एका पेट्रोल पंपावर महिना ३०० रुपये पगारावर नोकरी करू लागले. मेहनत आणि हुशारीच्या जोरावर अवघ्या २ वर्षांत ते मॅनेजर पदापर्यंत पोहोचले.पण स्वतःचा व्यवसाय करण्याची तळमळ त्यांना शांत बसू देईना. येमेनमध्ये स्वातंत्र्यलढ्याची चळवळ सुरु झाल्यावर ते भारतात परत आले. त्यांनी चुलत भावासोबत भागीदारीमध्ये पॉलिएस्टर धागे आणि भारतीय मसाले आयात निर्यातीचा व्यवसाय चालू केला.बचतीचे ५० हजार रुपये गुंतवणूक करून मुंबईतल्या मस्जिद बंदर या ठिकाणी “रिलायन्स कमर्शिअल कॉर्पोरेशन”ची सुरुवात झाली, तीही ३५० चौ. फूटच्या खोलीमध्ये. ज्यामध्ये २ टेबल, ३ खुर्च्या आणि एक टेलिफोन होता. हे होतं धीरूभाईंचं पहिलं ऑफिस.आयुष्यात नेहमी जोखीम घेत व्यवसाय करणाऱ्या धीरूभाईंनी कापड उद्योगातील सगळे बारकावे शिकत, १९६६ साली अहमदाबादच्या नरोडा येथे एका मिलची सुरुवात केली, जिथे कपडे बनवण्यासाठी पॉलिस्टर धाग्याचा उपयोग व्हायचा. तिथं तयार होणाऱ्या कापडाला त्यांनी विमल नाव दिलं, जे त्यांच्या मोठ्या भावाच्या मुलाचं होतं.पाहता पाहता विमलचा डंका संपूर्ण भारतात वाजू लागला. १९७७ मध्ये धीरूभाईंनी आपल्या कंपनीचे शेअर्स सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आणि त्या वेळी ५८,००० हून अधिक गुंतवणूकदारांनी त्या शेअर्सची खरेदी केली.यानंतर त्यांनी रिलायन्स कंपनीचा विस्तार वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केला. रिफायनरी, पेट्रोलियम, टेलीकम्युनिकेशन यांसारख्या क्षेत्रात रिलायन्स आपलं नाव कमवत गेली. रिलायन्स कमर्शिअल कॉर्पोरेशन म्हणून सुरु झालेली कंपनी पुढे रिलायन्स टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड आणि आता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अशी नावं धारण करत प्रगती करत आली.६ जुलै २००२ साली रोजी धीरूभाई अंबानी यांचा मृत्यू झाला. ‘नेहमी मोठी स्वप्नं पहा’ असं सांगणारे धीरूभाई आजही लाखो गरीब आणि कमी शिक्षण घेतलेल्या तरुणांना प्रेरित करतात.
डॉक्टर जॉन पेंबरटन हे अमेरिकेच्या सैन्यामध्ये कर्नल होते. सिव्हिल वॉर दरम्यान सेवा बजावत असताना ते जखमी झाले आणि त्याच दरम्यान त्यांना मर्फिन या ड्रग्जचे व्यसन लागले.खूप वर्षानंतर त्यांनी आपलं व्यसन सोडायचं ठरवलं आणि तेव्हा मर्फिन ड्रग्जच्या जागी आपल्याला दुसरं काय घेता येईल याचा विचार करू लागले. पेंबरटन हे रसायन शास्त्रज्ञसुद्धा होते. त्यामुळे त्यांनी काही घटकांचा प्रयोग करायचं ठरवलं.त्यांनी कोला नट्स आणि कोकाची पाने एकत्र करून मिश्रण तयार केलं. त्यात अजून काही घटक घालून एक सिरप बनवलं आणि त्यामध्ये कार्बोनेटचं पाणी मिसळलं. त्यांनी तयार केलेल्या पेयामध्ये अल्कोहोल असल्यामुळे कायद्याच्या चौकटीत ते बसत नव्हतं. म्हणून पेंबरटन आपले पेय रजिस्टर करू शकले नाहीतपण नंतर त्याच फॉर्म्युलामध्ये काही बदल करून त्यांनी अल्कोहोल विरहित पेय तयार केलं १८८६ मध्ये पेंबरटन यांनी आपले पेय औषधांच्या दुकानांमध्ये विकायला चालू केलं. ते पेय विकताना सांगू लागले की यामुळे अपचनाचा त्रास, डोकेदुखी, मर्फिनचे व्यसन कमी व्हायला मदत होतेयामुळे त्यांचं हे पेय लोकप्रिय होऊ लागलं. नंतर त्यांचे पार्टनर फ्रँक रॉबिन्सन यांनी Cocakola असं नाव सुचवलं, परंतु पेंबरटन यांनी नाव अधिक आकर्षक दिसण्यासाठी kola मधील K काढून तिथं C ठेऊन Cola केलं आणि तयार झाली ती Coca-cola.ही मूळ रेसिपी अजूनही रहस्य आहे. असं म्हटलं जातं की, ही रेसिपी एका वेळेस कोका-कोलाच्या फक्त दोन कर्मचाऱ्यांना माहिती असते आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतरच ती पुढच्या कर्मचाऱ्याला सांगितली जाते.स्वतः बनवलेली नावीन्यपूर्ण उत्पादने, मार्केटिंगचे नवनवीन तंत्र, कौशल्य यामुळे अल्पावधीत Coca-cola एक मोठी कंपनी म्हणून उदयाला आली. आज Coca-Colaचे स्वतःचे पाचशेपेक्षा जास्त ब्रँड असून ३५०० पेक्षा जास्त प्रोडक्टस आहेत. कंपनीचे बाजारमूल्य 278 अब्ज डॉलर्स आहेपहिल्या वर्षी कोका-कोलाच्या फक्त २५ बॉटल्स विकल्या गेल्या होत्या. सध्या कोका-कोला जगातील जवळपास २०० देशांमध्ये विकले जाते व रोज सुमारे १९० कोटी लोक कोका-कोलाचे पेय पितात.
आज ज्या संगणकामुळे आपलं आयुष्य सुखकर झालं त्या संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेज यांनी लावला. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १७९१ला लंडनमध्ये झाला.लहानपणासूनच गणितात अत्यंत हुशार असणारे चाल्स बॅबेज हे एक गणितज्ञ, तत्त्वज्ञ, संशोधक आणि मेकॅनिकल इंजिनिअर होते. त्यांनी १८१२-१३ मध्ये गणितीय समीकरणे सोडवणारे कॅल्क्युलेटर बनवले होते.आपले गणितीय ज्ञान वापरून चाल्स बॅबेज यांनी एक मशीन बनवलं जे मोठमोठी गणित कमी वेळात सोडवत होतं. १८२२ मध्ये तयार झालेल्या या मशीनचं नाव बॅबेज यांनी डिफरन्स इंजिन असं ठेवलं, पण आणखी संशोधन करण्यासाठी पैसे कमी पडल्यामुळे त्यांना हे काम अर्ध्यातच सोडावं लागलं.पुढं आणखी संशोधन करत त्यांनी याच मशीनच पुढचं व्हर्जन १८४२ मध्ये बनवलं. ज्याचं नाव त्यांनी अनॅलिटीकल इंजिन असं ठेवलं. या मशीनचं वैशिष्ट्य म्हणजे याला इनपुट दिल्यानंतर, त्याच्यावर प्रोसेसिंग करत आणि दिलेल्या माहितीची प्रिंट काढत, ती माहिती स्टोअरसुद्धा करत होते.हेच अनॅलिटीकल इंजिन म्हणजे जगातला पहिला संगणक. हे यंत्र पुर्णपणे मॅकॅनिकल असून त्यात कोणत्याही प्रकारचा विद्युतपुरवठा वापरला गेला नव्हता. असे असले तरी आधुनिक संगणकाचे सर्व मुलभूत घटक त्यात समाविष्ट होते.या अनॅलिटीकल इंजिनचा आकार एका खोलीएवढा होता, तर याचं वजन अनेक पटीने जास्त होतं. हे इंजिन वाफेवर चालणार होतं. चार्ल्स बॅबेज यांना हे इंजिन बनवण्यासाठी ब्रिटिश सरकारने फंडिंग केलं होतं.चार्लस बॅबेज यांनी तयार केलेले Analytical Engine हाच आधुनिक संगणकाचा पाया आहे असे म्हटले जाते. म्हणूनच चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचा जनक म्हणतात.असे हे व्यक्तिमत्त्व १८ ऑक्टोबर १८७१ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले. त्यांचा अर्धा मेंदू The Hunterian Museum इथे व अर्धा Science Museum, London इथे जतन करून ठेवलेला आहे.
तो काळ होता १९४२ चा, जेव्हा भारतातील पेंट्स इंडस्ट्री मध्ये फक्त काही परदेशी कंपन्या होत्या आणि भारतीय अशी शालिमार पेंट्स होती.त्यावेळी दुसरं महायुद्ध चालू होतं, ज्यामुळे भारताने बाहेरील देशांकडून रंगाची आयात पूर्णपणे थांबवली होती. आणि हीच संधी होती भारतीय रंग उद्योगांना वर येण्याची.ही संधी ओळखून चंपकलाल चोकसी या व्यापाऱ्याने वयाच्या २० व्या वर्षी आपल्या तीन मित्रांच्या साथीने १९४२ साली मुंबईमधील गिरगावात एका गॅरेजमध्ये Asian Paints ची सुरुवात केली.तो काळ असा होता जेव्हा सगळे पेंट उद्योग औद्योगिक पेंट्स विभागावर लक्ष केंद्रित करत होते आणि ही संधी चोकसी यांच्या सारख्या चाणाक्ष माणसाच्या लक्षात आली.भारतामध्ये सजावटीच्या किरकोळ पेंट विभागात वाढण्याची प्रचंड संधी आहे ही संधी चोकसी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी किरकोळ सजावटीच्या क्षेत्रात शाश्वत असणारी व्यवसायाची वाट निवडली.त्यांनी आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावले. त्यांना अशा बाजारात आपले स्थान मिळवायचे होते, जिथे मूठभर व्यापाऱ्यांनी संपूर्ण भारताचा बाजार नियंत्रित केला होता.त्यानंतर त्यांनी मार्केटिंगसाठी बरेच वेगवेगळे प्रयोग केले जे ग्राहकांना आवडू लागले. ज्यामुळे १९५२ मध्ये त्यांनी २३ करोडचा टर्नओव्हर साध्य केला.आणि पुढे १९६७ मध्ये Asian Paints ही भारतातील क्रमांक १ ची पेंट्स उत्पादक कंपनी बनली आणि आपल्या गुणवत्तेमुळे तसेच अचूक हेरलेल्या संधीमुळे आजही Asian Paints आपले पहिले स्थान टिकवून आहे.आज एशियन पेंट्स भारतातील सर्वात मोठी तर आशियातील तिसरी मोठी पेंट कंपनी आहे. कंपनीची उलाढाल २० हजार कोटींपेक्षा जास्त असून ७६०० हून अधिक कर्मचारी कंपनीत काम करतात.