Tea Stall Business: १० रुपयांच्या चहातून लाखोंची कमाई?

रेल्वे स्टेशनजवळील गजबजलेल्या चहाच्या टपरीवर ग्राहकांना चहा देणारा चहावाला आणि त्यामागील नफा-खर्चाचे बिझनेस गणित दर्शवणारे चित्र.

Tea Stall Business: मित्रांनो, सोशल मीडियावर आपण अनेकदा ऐकतो की, “एका चहावाल्याची कमाई आयटी इंजिनिअरपेक्षा जास्त असते!” १०-१२ रुपये देऊन चहा पिताना तुम्हालाही कधीतरी हा विचार नक्कीच आला असेल. वरवर पाहता हे खूप सोपं आणि आकर्षक वाटतं. पण यामागे खरंच एवढा नफा आहे का? चला, आज चहाच्या टपरीचं ‘रिअलिस्टिक बिझनेस मॅथेमॅटिक्स’ समजून घेऊया. सुरुवातीला बघूया […]

Quick Commerce 2026: ऑनलाइन खरेदीचा सर्वात वेगवान अवतार

Quick Commerce 2026: ऑनलाइन खरेदीचा सर्वात वेगवान अवतार

Quick Commerce 2026: क्विक कॉमर्स (Quick Commerce) म्हणजे E-commerce चा पुढचा आणि अत्यंत वेगवान टप्पा. हे नवीन मॉडेल ग्राहकांना किराणा माल, औषधे, खाद्यपदार्थ, आणि इतर दैनंदिन वस्तू अवघ्या काही मिनिटांत पोहोचवते. ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि आधुनिक तंत्रज्ञानातील प्रगती यामुळे क्विक कॉमर्सने जगभरातील Business क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणला आहे. भारतात क्विक कॉमर्स क्षेत्रात झेप […]

E-Commerce: ई-कॉमर्स क्षेत्राची झपाट्याने वाढ

भारतातील ई-कॉमर्स बाजारपेठ, UPI पेमेंट्स, ONDC आणि डिजिटल व्यापारक्रांती याविषयी माहिती

E-Commerce: जाणून घेऊया, भारतीय ई-कॉमर्स मार्केट, UPI आणि बरंच काही…. भारतामध्ये मागील अनेक वर्षांत व्यापारी क्षेत्रात अनेक मोठे बदल घडून आले. स्मार्टफोन, इंटरनेट, स्वस्त डेटा यांमुळे ग्राहकांची खरेदी-विक्रीची सवय झपाट्याने बदलली आहे. घरबसल्या मोबाईलवर अगदी काही क्षणात एका क्लिक वरून वस्तू मागवण्याची सुविधा आता सर्वसामान्यात रूढ झाली आहे. याच बदलाला आपण E-commerce (ई-कॉमर्स) असे म्हणतो. […]

Top indian startup success lessons : नवउद्योजकांनो, यशस्वी व्हा! या ५ गोष्टी शिकून घ्या भारतातील टॉप स्टार्टअप्सकडून

आज अनेक जण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात. तंत्रज्ञानामुळे व्यवसाय सुरू करणं सोपं झालं असलं तरी त्याला यशस्वीपणे पुढे नेणं मोठं आव्हान असतं. दरवर्षी हजारो स्टार्टअप्स सुरू होतात, पण त्यापैकी फारच कमी दीर्घकाळ टिकतात. मात्र, काही स्टार्टअप्स वेगाने वाढतात आणि उद्योगक्षेत्राला नवी दिशा देतात. अशा यशस्वी व्यवसायांकडून अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकता येतात, ज्या नवउद्योजकांसाठी […]

स्मार्ट बचतीसाठी 6 महत्त्वाचे नियम

पैसा कमावणं हे प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचं असतं, पण तो हुशारीने आणि शहाणपणाने वापरणं त्याहून अधिक गरजेचं आहे. अनेकदा आपण मेहनतीने कमावलेला पैसा नको त्या गोष्टींवर नकळत खर्च करून टाकतो आणि आर्थिक नियोजनाच्या अभावामुळे भविष्यात अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, आर्थिक स्थिरता मिळवायची असेल, तर केवळ पैसा कमावणं पुरेसं नाही, त्याचे योग्य व्यवस्थापनही तितकंच महत्त्वाचं आहे. […]

बिझनेसमध्ये पार्टनर गरजेचा आहे का? | Why is a partner necessary in business?

व्यवसाय म्हटलं की अनेक गोष्टी आल्या. प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करण्याच्या आधीही बरीच पूर्वतयारी गरजेची असते. बिझनेस आयडियापासून ते प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करेपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय एक व्यावसायिक म्हणून आपल्याला घ्यावे लागतात.भांडवल, कच्चा माल, यंत्रं, कर्मचारी, ग्राहक, बाजारपेठ, बँका अशा अनेक घटकांचा समावेश करून त्यांच्या साहाय्याने व्यवसाय उभा राहतो. या सर्वांच्या बरोबरीने व्यवसायातील अतिशय महत्त्वाचा असणारा […]

सोशल मीडियामध्ये व्यवसाय संधी | Business Opportunities in Social Media

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे म्हणजेच स्वयंरोजगाराचे बरेच फायदे आहेत. स्वयंरोजगार ही स्वतःला विकसित करण्याची, नवीन ज्ञान संपादन करण्याची निरंतर प्रक्रिया असते. ही प्रक्रिया तुम्हाला नोकरी करून कधीच आत्मसात होणार नाही.  आपण जर सोशल मीडियाचे जाणकार आहात व आपणास काहीतरी नावीन्यपूर्ण असा व्यवसाय करायचा असेल, तर सोशल मीडिया कन्सलटंट हा व्यवसाय एक चांगला पर्याय आहे.  सोशल […]

व्यवसायच का? नोकरदार आणि व्यावसायिक यातील फरक

Why business? Difference Between Employed and Professional

एका ठराविक वयानंतर  प्रत्येकाला जीवनात आर्थिक स्थैर्य अपेक्षित असतं. मग आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक जण हे स्थैर्य प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या संधी शोधत असतो. कधीकधी या संधी आपल्या आवडीच्या क्षेत्रातल्या असतात, तर कधीकधी त्यातून कितपत उत्पन्न मिळतं यावर अवलंबून असतात. कुठेतरी समाधान हा भाग या प्रवासामध्ये दुय्यम स्थानी ठेवला जातो; परंतु स्वतःचं करिअर घडवणं याला […]

जागतिक उद्योजक दिन – प्रवास उद्योजक बनण्याचा 

स्वतःचं वेगळं अस्तित्व कोणाला नको असतं. कोणाला वाटत नाही, समाजात आपली वेगळी ओळख असावी. आपण नोकरी मागणारे नाही, तर चार लोकांना नोकरी देणार्‍यांच्या रांगेत यावे. आपल्या माध्यमातून लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा. समाजातील एखाद्या प्रश्नावर आपल्या माध्यमातून उत्तर शोधलं जावं. समाजाला भेडसावणारी एखादी समस्या आपण शोधलेल्या उत्तरानं दूर व्हावी, आपलं जगणं […]

तुम्ही धंदा कोणता करता याला महत्त्व नाही, तो कसा करता याला महत्त्व आहे!

how-to-be-successful-in-business-in-marathi

आपण उद्योग-धंदा किंवा व्यवसाय कोणता करतो ? यापेक्षा तो कसा करतो याला खूप महत्त्व आहे. चीनमध्ये अशी म्हण आहे, “चेहऱ्यावर जर हसू नसेल, तर त्या दिवशी दुकान उघडू नये.‘ प्रत्येकाच्या व्यवसाय-धंद्याच्या क्षेत्रामध्ये तोच धंदा-व्यवसाय उत्तम प्रकारे करणारे व भरपूर पैसे कमावणारे अगदी मोजकेच चार-पाच उद्योजक असतात. बाकीचे लोक रडतखडत किंवा अगदी नुकसानीत देखील व्यवसाय करीत […]

कमी भांडवलात जास्त टर्नओव्हर कसा करायचा?

एक सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा झालेला तरुण, पुण्याला आठ वर्षे नोकरी केली, कामाचा चांगला अनुभव घेतला. घेतलेला फ्लॅट ५० लाखांना विकला व नोकरीचा राजीनामा देऊन गावी जिल्ह्याच्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुरु केला. गोड बोलणे, अप्रतिम संवादकौशल्य, बांधकाम व्यवसायाचे चांगले ज्ञान याचा पुरेपूर वापर करून पहिला पाच गुंठ्याचा एक प्लॉट घेतला. मूळ मालकाला पैसे न देता २ […]

बिझनेस मध्ये दिखावा नको, तर प्लानिंग हवी

Importance of Planning in Business

काही दिवसांपूर्वी आमच्या ऑफीसमध्ये व्यवसाय मार्गदर्शन घेण्यासाठी दोन शेतकरी आले होते, एक म्हणजे अनिलराव ते एक मोठे शेतकरी आहेत. तसेच त्यांच्याकडे मळणीयंत्र ट्रॅक्टर व अर्थमुव्हिंग वाहने म्हणजे जेसीबी आहेत. त्यांचे वय अंदाजे ५२ वर्ष आहे आणि गेली ३० वर्षे ते शेती व्यवसाय करतात. परंतु आज त्यांच्या खात्यावर एक रुपयाची सुध्दा बचत होत नाही. उलट त्यांच्या […]

व्यवसायाच्या शुभारंभापासून तो मोठे होईपर्यंत जी प्रोसेस आपण राबवतो ती आपल्या व्यवसायचे भविष्य ठरवते.

be-smart-in-business-to-be-successful

बिझनेस किंवा व्यवसाय हे शब्द कानावर पडले, तरी आपल्याला दोन गोष्टी सर्वात आधी आठवतात त्या म्हणजे नफा आणि तोटा. व्यवसायाचा नेमका ठोकताळा काढायचा तेव्हा नफा आणि तोटा मोजला जातो आणि त्यावर ठरवलं जातं, गणित फायद्याचे आहे कि तोट्याचे. व्यवसायात ही अशी गणितं महत्वाची असली, तरी सगळ्यात महत्वाची असते ती प्रोसेस म्हणजेच प्रक्रिया. व्यवसायाच्या शुभारंभापासून व्यवसाय […]

व्यवसाय : छोट्या गोष्टी, मोठा परिणाम

small-things-big-impact-how-to-grow-your-business

सध्या लोकांचा कल या बिझनेस किंवा व्यवसाय या क्षेत्रात वाढताना जास्त दिसतोय. व्यवसाय करून स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्यावर अनेकांचा भर दिसून येतो आहे. उद्योजक व्हा आणि आपली स्वप्नं पूर्ण करा किंवा मोठी स्वप्नं पूर्ण करायची असतील, तर उद्योजक व्हावे लागेल असे मोटिव्हेशनल डायलॉग वाचून सध्याची तरुणाई मोठ्या प्रमाणात उद्योगाकडे वळताना आपल्याला दिसत आहे. व्यवसाय […]

तुमचा बिझनेस हा नेहमी Updated असणं गरजेचं आहे.

stay-updated-in-business

व्यवसाय! हा शब्द उच्चारला की संपूर्ण सोशल मीडिया पटकन डोळ्यासमोरून तरळून जातो. व्यवसाय असा करा, तसा करा, तुम्ही अमकं केलं पाहिजे, तमकं केलं पाहिजे. अशा सतरा गोष्टी आणि या गोष्टी सांगणारे अठरा गुरु. खरं सांगायचं झालं तर बिझनेस शिकवून किंवा वाचून शिकता येत नाही. तो करताना येणारे अनुभव आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जातात. अत्यंत समर्पित […]