आजच्या गोष्टीचा विषय आहे; पैशातून पुन्हा पैसा कसा कमवायचा शिकलं पाहिजे…
चीनमधील एक प्रसिध्द दंतकथा आहे. एक क्रूर सम्राट राजा चुंग लुई, चीनमधील एका मागून एक लहान राज्यं काबिज करतो. ‘तुम्ही मला शरण या, नाहीतर मरणाला सामोरे जा ‘असा त्याचा आदेश असे. काही छोट्या राजांनी लढून प्राण गमावले, तर काही जीवाच्या भीतीने शरण येऊन गुलाम झाले. जेव्हा चुंग लुईचे आक्रमण मींगझु या राणीच्या राज्याच्या सीमेवर येऊ ठेवलं, तेव्हा राणी मिंगझुला काय करावं सुचेना, इतक्या बलाढ्य राजासमोर आपला टिकाव लागणार नाही, तेव्हा आपल राज्य वाचवायचं कसं याची तिला चिंता लागली.
तिला एक शक्कल सुचली आणि एक पत्र तिने चुंग लुईला पाठवल. राजे तुम्ही इतके ताकदवान, आम्हाला सहज जिंकून आमचा अस्त सहज करू शकता, पण त्यात तुमचा खूप मोठा तोटा आहे. माझ्या राज्यामध्ये खूप मोठ्या सोन्याचा आणि हिऱ्याचा खजिना आहे. खजिना अनेक ठिकाणी पुरून ठेवला आहे, तुम्ही जर आम्हाला मारून टाकलं, तर हा खजिना कुठं आहे तुम्हाला कळणार नाही. आम्ही तुम्हाला जरूर शरण येऊ पण, त्यापूर्वी राज्यातील खजिना कोठे लपवला आहे ह्याचा नकाशा तुम्हाला दाखवायचा आहे, त्यानंतर तुम्ही मला खुशाल मारा किंवा सोडून करा. मग एका तंबूत बैठक ठरली. तंबूत दोघेच असतील सर्व सैनिक बाहेर असतील. राणी गुप्तधनाचा नकाशा राजाला एकट्यालाच दाखवेल अस ठरलं.

राणी नकाशा घेऊन तंबूत आली. तो गोल गुंडाळलेला होता. तिने तो टेबलावर ठेवला आणि हळूहळू उघडू लागली, राजाची उत्सुकता वाढीस लागली, किती खजिना मिळतोय ह्या विचारानं तो आनंदी झाला होता, पण चाणाक्ष राणीने त्या नकाशात धारधार तलवार लपवून आणली होती, नकाशा उघडताच राणीने तलवार काढली व राजाच्या ध्यानीमनी नसताना त्याचे शीर धडावेगळे करुन त्याचा वध केला. सगळीकडे हाहाकार माजला, सैन्य पळू लागले. राणीच्या सैन्यांनी हल्ला चढवून लुईचे सैन्य पळवून लावले व अशा रीतीने राणी मींगझुने आपले राज्य वाचवले.
आज मराठी माणसाकडे मोठे भांडवल नाही, खूप चांगले शिक्षण नाही, अनुभव नाही. उद्योग व व्यवसाय करायचा म्हटलं तर बलाढ्य भांडवलदार यांच्याशी स्पर्धा आहे. तेव्हा आपण आपला उद्योग अशा कल्पक आयडिया शोधून शांत डोक्यानं केला पाहिजे. चाणाक्षपणे गनिमी काव्यानं विजय मिळविण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. डोकं शांत ठेवलं, तरंच ते चालेल आणि आयडिया सुचतील.
तुमच्या आयुष्यात कधी असा प्रसंग आलाय का आला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी नवी अर्थक्रांतीला फॉलो करा.