Tag: उद्योजकता विजडम

  • छोट्या शहरातून मोठा व्यवसाय | 4 यशस्वी Brands ची Story

    छोट्या शहरातून मोठा व्यवसाय | 4 यशस्वी Brands ची Story

    मोठा व्यवसाय उभा करण्यासाठी सुरुवातीपासूनच मोठं ऑफिस, मोठं शहर किंवा प्रचंड भांडवल असायलाच हवं असं नाही. योग्य समस्या ओळखणे, ग्राहकांची गरज समजून घेणे, उत्पादनाची गुणवत्ता टिकवणे आणि सातत्याने व्यवसाय वाढवत नेणे या गोष्टी अधिक महत्त्वाच्या ठरतात.

    भारतामध्ये अशा अनेक व्यवसायांची उदाहरणं आहेत, ज्यांनी छोट्या सुरुवातीपासून मोठा ब्रँड तयार केला.

    Milky Mist – दूध विकण्यापासून मोठ्या व्यवसायापर्यंत

    Satish Kumar यांनी लहान वयात कुटुंबाच्या दुग्ध व्यवसायात काम सुरू केलं. केवळ दूध विकण्याऐवजी त्यापासून पनीरसारखी अधिक मूल्य असलेली उत्पादने तयार करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं.

    हळूहळू उत्पादनांची संख्या वाढवण्यात आली. उत्पादनाची गुणवत्ता आणि स्वतःची मजबूत उत्पादन व्यवस्था तयार करण्यावर भर देण्यात आला. छोट्या स्तरावर सुरू झालेल्या या प्रवासाचं पुढे मोठ्या दुग्ध व्यवसायात रूपांतर झालं.

    Business Lesson: कच्चा माल तसाच विकण्यापेक्षा त्यापासून High-value Product तयार करण्याची संधी शोधा.

    Zoho – छोट्या शहरातून जागतिक तंत्रज्ञान व्यवसाय

    Sridhar Vembu यांनी 1996 मध्ये AdventNet या कंपनीची सुरुवात केली. पुढे याच कंपनीचा प्रवास Zoho या जागतिक तंत्रज्ञान ब्रँडकडे झाला.

    कंपनीने केवळ मोठ्या शहरांमधील प्रतिभेवर अवलंबून न राहता छोट्या शहरांमधील तरुणांना संधी देण्यावरही भर दिला. तेनकाशीसारख्या भागात तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात आल्या.

    आज Zoho ची विविध Software Products जगभरातील व्यवसाय वापरतात.

    Business Lesson: चांगली प्रतिभा आणि मोठा व्यवसाय केवळ महानगरांपुरता मर्यादित नसतो.

    Amul – शेतकऱ्यांच्या दुधापासून उभा राहिलेला देशव्यापी ब्रँड

    Amul ची सुरुवात गुजरातमधील Anand येथे झाली. दूध उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र आणून सहकारी पद्धतीवर आधारित व्यवसाय व्यवस्था उभी करण्यात आली.

    Dr. Verghese Kurien यांनी या व्यवस्थेला आधुनिक आणि व्यावसायिक स्वरूप देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दूध संकलनापासून प्रक्रिया, वितरण आणि मार्केटिंगपर्यंत मजबूत व्यवस्था विकसित करण्यात आली.

    पुढे Amul भारतातील सर्वाधिक ओळखल्या जाणाऱ्या दुग्ध ब्रँडपैकी एक बनला.

    Business Lesson: अनेक छोट्या उत्पादकांना एका मजबूत व्यवस्थेत जोडल्यास मोठा व्यवसाय उभा राहू शकतो.

    iD Fresh Food – रोजच्या समस्येतून निर्माण झालेली Business Opportunity

    घरामध्ये इडली आणि डोसा बनवण्यासाठी पीठ तयार करणं अनेकांसाठी वेळखाऊ काम होतं. याच समस्येला व्यवसायाच्या संधीमध्ये बदलण्यावर iD Fresh Food ने लक्ष केंद्रित केलं.

    तयार इडली-डोसा बॅटर उपलब्ध करून ग्राहकांचा वेळ आणि मेहनत वाचवण्याचा सोपा पर्याय कंपनीने दिला. ताजेपणा, गुणवत्ता आणि सोय या गोष्टींवर व्यवसायाची मजबूत ओळख तयार करण्यात आली.

    छोट्या सुरुवातीपासून हा व्यवसाय पुढे अनेक शहरांपर्यंत पोहोचला.

    Business Lesson: ग्राहकांच्या रोजच्या छोट्या समस्यांमध्येही मोठी Business Opportunity लपलेली असू शकते.

    छोट्या शहरात Business सुरू करण्याचे फायदे

    छोट्या शहरात किंवा ग्रामीण भागाच्या जवळ व्यवसाय सुरू करण्याचे अनेक फायदे असू शकतात. मोठ्या शहरांच्या तुलनेत जागा आणि व्यवसाय चालवण्याचा खर्च कमी असण्याची शक्यता असते.

    स्थानिक कच्चा माल सहज उपलब्ध होऊ शकतो आणि त्या भागातील ग्राहकांच्या गरजा अधिक जवळून समजून घेता येतात. स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देऊन स्वतःची टीम तयार करण्याची संधीही मिळू शकते.

    आज इंटरनेट, सोशल मीडिया, ई-कॉमर्स आणि डिजिटल मार्केटिंगमुळे व्यवसाय छोट्या शहरात असला तरी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची मर्यादा राहिलेली नाही.

    मोठा व्यवसाय एका दिवसात तयार होत नाही

    मोठ्या व्यवसायाची सुरुवात अनेकदा एका छोट्या समस्येपासून आणि काही ग्राहकांपासून होते.

    तुमच्या शहरातील किंवा परिसरातील एखादी खरी समस्या शोधा. त्या समस्येवर उपयोगी उपाय तयार करा आणि सुरुवातीला काही ग्राहकांसोबत त्याची चाचणी करा. त्यांचा प्रतिसाद समजून घेऊन उत्पादन किंवा सेवा सतत सुधारत राहा.

    गुणवत्ता, ग्राहकांचा विश्वास आणि सातत्य कायम ठेवता आलं तर छोट्या सुरुवातीचं रूपांतर हळूहळू मोठ्या व्यवसायात होऊ शकतं.

    निष्कर्ष

    Milky Mist, Zoho, Amul आणि iD Fresh Food यांच्या प्रवासातून एक गोष्ट स्पष्ट होते—मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमचं ठिकाण मोठं असण्यापेक्षा तुमची कल्पना, अंमलबजावणी आणि सातत्य मजबूत असणं अधिक महत्त्वाचं आहे.

    आज तुमच्या शहरात दिसणारी एखादी छोटी समस्या उद्याच्या मोठ्या Business Opportunity ची सुरुवात ठरू शकते.

  • बिझनेससाठी भांडवल कुठून व कसं मिळवायचं? हे आहेत ७ पर्याय

    बिझनेससाठी भांडवल कुठून व कसं मिळवायचं? हे आहेत ७ पर्याय

    आजच्या तरुण पिढीला स्वतःचं काहीतरी वेगळं करायचंय, स्वतःचा व्यवसाय सुरू करून मोठं व्हायचंय. अनेकांकडे नाविन्यपूर्ण कल्पना असतात, समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची तळमळ असते आणि मेहनतीची तयारीही असते, पण प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करताना अनेक अडथळे समोर येतात त्यात मार्केटमध्ये टिकून राहण्याची धडपड, स्पर्धा, व्यवस्थापन यासोबतच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे पैशांचा, म्हणजेच फायनान्सिंगचा!

    व्यवसाय सुरू करायचा असेल, वाढवायचा असेल, नवीन कर्मचारी भरती करायची असेल, आधुनिक तंत्रज्ञान विकत घ्यायचं असेल किंवा उत्पादनाची जाहिरात करायची असेल, तर त्यासाठी भांडवल लागणारच. तर मग, या भांडवलाची व्यवस्था कुठून करायची? कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? या लेखात आपण व्यवसायासाठी भांडवल उभारण्याचे विविध मार्ग समजून घेऊया.

    स्वतःची बचत वापरणं (Bootstrapping)

    व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वतःच्या बचतीचा वापर करणं हा सगळ्यात सोपा आणि सहज उपलब्ध पर्याय आहे. यात तुम्ही तुमच्या जमा केलेल्या पैशांतून व्यवसाय सुरू करता. कधी कधी कुटुंबातील सदस्य, जसे की आई-वडील, भाऊ-बहिण किंवा जवळचे नातेवाईकही सुरुवातीला आर्थिक मदत करू शकतात. या पद्धतीला बूटस्ट्रॅपिंग म्हणतात. यामध्ये बाहेरच्या गुंतवणूकदाराची तितकीशी आवश्यकता भासत नाही, त्यामुळे व्यवसायावर तुमचा संपूर्ण हक्क राहतो आणि कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपाशिवाय तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय घेऊ शकता.

    या पद्धतीचा एक मोठा फायदा म्हणजे तुम्हाला कोणत्याही कर्जाचा बोजा नसतो आणि नफा कमावला की तो पूर्णतः तुमचाच असतो. मात्र, यामध्ये एक मोठी अडचण म्हणजे पैशांची मर्यादा. तुमच्याकडे भांडवल कमी असल्यामुळे व्यवसायाची वाढ मर्यादित राहू शकते. मोठ्या संधींचा फायदा घेण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी अतिरिक्त भांडवलाची आवश्यकता भासू शकते.

     एंजल इन्व्हेस्टर्स

    ‘एंजल’ म्हणजे देवदूत, आणि एंजल इन्व्हेस्टर्स हे खरंच तुमच्या व्यवसायासाठी तसंच काम करतात. हे अनुभवी उद्योजक किंवा मोठे गुंतवणूकदार असतात, जे आपल्या वैयक्तिक संपत्तीमधून त्यांना आवडणाऱ्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करतात. तुमच्या कल्पनेवर आणि व्यवसायाच्या भविष्यातील संधींवर विश्वास ठेवून ते तुम्हाला भांडवल देतात. मात्र, त्याबदल्यात ते व्यवसायात काही प्रमाणात भागीदारी (equity) घेतात.

    एंजल इन्व्हेस्टर्स फक्त पैसा देत नाहीत, तर त्यांचा अनुभव, उद्योग क्षेत्रातील ओळखी आणि व्यावसायिक सल्लाही देतात. त्यामुळे तुमच्या स्टार्टअपला योग्य दिशा मिळते आणि व्यवसाय वाढीला गती मिळते. योग्य एंजल इन्व्हेस्टर मिळाल्यास तुमच्या व्यवसायाला केवळ आर्थिक मदतच नाही, तर एक मजबूत आधारसुद्धा मिळतो.

    व्हेंचर कॅपिटल – मोठ्या प्रमाणात गुंतवणूक

    जेव्हा तुमचा व्यवसाय चांगला चालू होतो, ग्राहक वाढतात आणि विक्री होण्यास सुरुवात होते , तेव्हा पुढील विस्तारासाठी जास्त पैशांची गरज लागते. अशावेळी व्हेंचर कॅपिटलिस्ट्स (VC’s) मदतीला येतात. हे मोठ्या कंपन्यांचे फंड असतात, जे भविष्यात भरभराटीला जाणाऱ्या स्टार्टअप्समध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करतात. जर तुमच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची क्षमता असेल, तर हे इन्व्हेस्टर्स तुम्हाला भांडवल देतात.

    व्हेंचर कॅपिटलिस्ट्स फक्त पैसे देत नाहीत, तर व्यवसाय वाढवण्यासाठी महत्त्वाचे सल्लेही देतात. हे सुद्धा तुमच्या कंपनीत भागीदारी घेतात आणि काही निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यामुळे तुमच्या व्यवसायावर काही प्रमाणात त्यांचं नियंत्रण राहतं. तरीही, जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर व्यवसाय वाढवायचा असेल, तर व्हेंचर कॅपिटल हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

    सरकारी योजना आणि अनुदान

    सरकार नव्या स्टार्टअप्सना मदत करण्यासाठी विविध योजना राबवत असतं. यामुळे नवीन उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळतं. Startup India योजनेत सहभागी झाल्यास व्यवसाय नोंदणीवर सवलती, कर सवलत आणि इतर अनेक फायदे मिळतात. Mudra योजना ही लहान व्यवसायांसाठी आहे, जिथे कोणत्याही तारणाशिवाय छोटे कर्ज मिळू शकतं. तसेच, SIDBI (Small Industries Development Bank of India) ही योजना लहान आणि मध्यम उद्योगांसाठी कर्ज आणि आर्थिक सहाय्य देते.

    या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे व्यवस्थित व्यवसाय योजना (Business Plan) आणि अधिकृत नोंदणी असणं गरजेचं आहे. जर सर्व आवश्यक कागदपत्रे आणि अटी पूर्ण केल्या, तर सरकारकडून भांडवल उभारणं तुलनेनं सोपं होतं. योग्य योजनेचा लाभ घेतल्यास तुमचा व्यवसाय वेगाने वाढू शकतो.

    बँकेकडून कर्ज

    व्यवसायासाठी भांडवल उभारण्याचा सर्वात पारंपरिक आणि सहज मार्ग म्हणजे बँकेकडून कर्ज घेणं. जर तुमच्याकडे व्यवस्थित बिझनेस प्लॅन, आधीपासून काही उत्पन्न आणि चांगला क्रेडिट स्कोअर असेल, तर बँका तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि कर्ज देण्यास तयार होतात. हे कर्ज व्यवसाय सुरू करण्यासाठी, विस्तारासाठी किंवा नवीन उपकरणे खरेदीसाठी वापरता येतं.

    लहान आणि मध्यम उद्योगांसाठी MSME (Micro, Small & Medium Enterprises) योजनां अंतर्गत काही विशेष कर्ज सुविधा दिल्या जातात. या योजनांमध्ये तुलनेने कमी व्याजदर आणि सोप्या परतफेडीच्या अटी मिळतात. बँकेकडून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे, व्यवसाय नोंदणी आणि आर्थिक स्थिरता दाखवावी लागते. जर तुमचा व्यवसाय सक्षम असेल आणि विश्वासार्हता असेल, तर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

    How to Raise Funding for Business?

    क्राउडफंडिंग 

    आजच्या डिजिटल युगात व्यवसायासाठी भांडवल उभारण्याचा एक नवीन आणि प्रभावी मार्ग म्हणजे क्राउडफंडिंग. यामध्ये तुम्ही तुमची व्यवसाय कल्पना ऑनलाइन शेअर करता आणि लोकांना त्यात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करता. Kickstarter, Wishberry, Ketto यांसारख्या प्लॅटफॉर्मवर तुमची संकल्पना जर लोकांना उपयुक्त, आकर्षक किंवा भावनिकदृष्ट्या जोडणारी वाटली, तर अनेक जण थोडीथोडी रक्कम देऊनही मोठी मदत करू शकतात.

    क्राउडफंडिंगमुळे मोठ्या गुंतवणूकदारांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होते आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी थोड्या-थोड्या मदतीतून मोठी रक्कम उभारता येते. याशिवाय, लोकांशी थेट संपर्क होतो आणि तुमच्या उत्पादन किंवा सेवेबाबत सुरुवातीपासूनच जागरूकता निर्माण होते. जर तुमची कल्पना इनोव्हेटिव्ह आणि लोकांना आवडणारी असेल, तर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

    इन्क्युबेटर आणि अ‍ॅक्सेलेरेटर प्रोग्रॅम्स

    इन्क्युबेटर आणि अ‍ॅक्सेलेरेटर प्रोग्रॅम्स हे नव्या स्टार्टअपसाठी मार्गदर्शन करणारे विशेष उपक्रम असतात. IIT, IIMसारख्या प्रतिष्ठित संस्थांपासून खासगी कंपन्यांपर्यंत अशा अनेक संस्था या प्रोग्रॅम्स चालवतात. यात स्टार्टअपला व्यवसायाची योग्य दिशा, तंत्रज्ञान, नेटवर्किंग, आणि कधी कधी थोडी गुंतवणूक मिळते. नव्याने व्यवसाय सुरू करत असाल, तर हे प्रोग्रॅम्स तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. यातून मार्केटिंग, व्यवस्थापन, संघटन कौशल्ये आणि निधी उभारणीचं ज्ञान मिळतं.

    व्यवसायासाठी योग्य फायनान्सिंग निवडणं महत्वाचं आहे. काहींसाठी स्वतःची बचत पुरेशी असते, तर काहींना गुंतवणूकदारांची मदत घ्यावी लागते. काहींना बँकेचे कर्ज योग्य वाटते, तर काहींसाठी सरकारी योजना फायदेशीर ठरतात. तुम्ही कोणत्या टप्प्यावर आहात आणि तुम्हाला किती भांडवलाची गरज आहे, यानुसार योग्य पर्याय निवडावा. योग्य निर्णय घेतल्यास तुमच्या स्टार्टअपचा यशाचा मार्ग सुकर होईल.

    सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे ठोस, स्पष्ट आणि विश्वासार्ह व्यवसाय योजना असणं गरजेचं आहे. कोणताही गुंतवणूकदार किंवा बँक कर्ज देण्यापूर्वी तुमच्या व्यवसायाची संकल्पना आणि योजना नीट समजून घेतं. तुमची कल्पना किती व्यवहार्य आहे, त्यातून किती नफा होऊ शकतो आणि ती किती काळ टिकू शकते ,हे सगळं त्यांना जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे व्यववसायाचं उद्दिष्ट, उत्पन्नाचे स्रोत, खर्च, आणि विस्ताराची योजना या सर्व गोष्टी नीट मांडणं गरजेचं आहे. मजबूत व्यवसाय योजना असेल, तर गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकणं सोपं होतं आणि तुमच्या स्टार्टअपला भक्कम आधार मिळतो.

    आणखी वाचा

  • Inspiring Journey of Sagar Gupta | २२ व्या वर्षी ६०० कोटींचा व्यवसाय

    Inspiring Journey of Sagar Gupta | २२ व्या वर्षी ६०० कोटींचा व्यवसाय

    आजकाल बहुतेक तरुण नोकरीच्या शोधात असतात आणि शिक्षण पूर्ण करून चांगल्या पगाराची नोकरी मिळवून आयुष्य सेटल करावं अशी त्यांची इच्छा असते. मात्र काही तरुण या पारंपारिक विचारांना तडा देत पूर्णतः स्वतःच्या हिंमतीवर वाटचाल करण्याचा निर्णय घेतात. ते नवा विचार, नव्या दृष्टिकोनातून कार्य करत, आपल्या कष्टांवर विश्वास ठेवून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवतात. नोएडातील सागर गुप्ता हा याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. त्याने पारंपारिक मार्गापेक्षा वेगळं काही करण्याचा ठरवलं आणि त्यासाठी लागणारी मेहनत, दूरदृष्टी आणि आत्मविश्वास याचा त्याने वापर केला.

    केवळ २२ व्या वर्षी सागरने आपल्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात केली. आपल्या कौशल्यावर आणि दूरदृष्टीवर विश्वास ठेवून, त्याने चार वर्षांच्या कालावधीत आपल्या व्यवसायाला ६०० कोटी रुपयांच्या टर्नओव्हरपर्यंत पोचवलं. त्याचा हा प्रवास सिद्ध करतो की, आपल्या मेहनतीला जर योग्य दिशा मिळाली, तर काहीही शक्य आहे.

    आजच्या लेखात आपण सागर गुप्ताच्या याच प्रेरणादायक प्रवासावर एक नजर टाकणार आहोत.

    सुरुवातीचे दिवस व शिक्षण

    सागर गुप्ताचा जन्म आणि शिक्षण दिल्लीमध्येच झाले. लहानपणापासूनच त्याला शिक्षणात आवड होती. त्याने श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बी.कॉम. केलं. त्याच्या वडिलांची इच्छा होती की, सागर चार्टर्ड अकाउंटंट बनावा. यासाठी त्याने सीए परीक्षेची तयारी सुरू केली आणि कोचिंग घेतलं, परंतु नियतीने त्याच्यासाठी वेगळा मार्ग ठरवला होता.

    सागरला सीए होण्यापेक्षा व्यवसायात अधिक रुची होती. वडिलांचा व्यवसाय असल्यामुळे, शिक्षण घेत असतानाच त्याला उद्योग क्षेत्राची गोडी लागली. 

    सुरुवातीचे दिवस व शिक्षण

    २०१७ मध्ये सागरने आपल्या वडिलांसोबत एलईडी टेलिव्हिजन उत्पादन क्षेत्रात प्रवेश केला. भारतात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होत होती, पण चीनच्या कंपन्यांचं उत्पादन बाजारात वर्चस्व गाजवत होते. अशा स्पर्धात्मक बाजारात आपलं स्थान निर्माण करणं हे एक मोठे आव्हान होतं. सागरने एक धाडसी निर्णय घेतला आणि ‘एक्का इलेक्ट्रॉनिक्स’ ही कंपनी सुरू केली. त्याला ठाऊक होतं की, या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काहीतरी वेगळं आणि उत्तम करावं लागेल.

    सागरच्या कुटुंबात कोणीही मोठा व्यावसायिक नव्हतं, त्यामुळे व्यवसायाच्या तांत्रिक आणि व्यावसायिक बाबतीत त्याला कमी अनुभव होता. पण त्याने मेहनत, योग्य नियोजन, आणि बाजारपेठेचं  बारकाईने निरीक्षण केलं आणि ‘एक्का इलेक्ट्रॉनिक्सला यशाच्या मार्गावर नेलं. अनेक अडचणी येत होत्या, पण सागरने प्रत्येक अडचणीला संधी मानून त्यावर काम केलं.

    त्याला एक मोठं आव्हान होतं, ते म्हणजे चीनच्या उत्पादनांच्या तुलनेत भारतीय उत्पादने महाग होती. चीनच्या कंपन्यांची उत्पादने स्वस्त आणि सहज उपलब्ध होती, तर भारतीय ग्राहकांना स्थानिक उत्पादनांचा स्वीकार करवून घेणं खूप कठीण होतं. पण सागरने ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचा लाभ घेत, उत्पादनांची गुणवत्ता वाढवली आणि विश्वासार्हता निर्माण केली. यामुळे त्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला आणि त्याने भारतीय बाजारपेठेत आपलं स्थान निर्माण केलं.

    एक्का इलेक्ट्रॉनिक्स – विस्तार आणि यश

    आज ‘एक्का इलेक्ट्रॉनिक्स’ कंपनी एलईडी टीव्ही, स्मार्टवॉच, इअरफोन, हेडफोन, वॉशिंग मशीन यासारखी विविध उत्पादने तयार करते. भारतातील १०० हून अधिक व्यावसायिक या कंपनीकडून उत्पादने घेत आहेत. कंपनीने आपली गुणवत्ता, विश्वसनीयता आणि इतर गुणात्मक वैशिष्ट्यांमुळे बाजारात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे.

    कंपनीचे मुख्य उत्पादन केंद्र सोनीपत, हरियाणा येथे स्थित आहे, जिथे १,००० हून अधिक कुशल कामगार आणि अभियंते कार्यरत आहेत. कंपनीत दर महिन्याला लाखाहून अधिक एलईडी टीव्हीचे उत्पादन केले जाते. २०२२-२३ मध्ये कंपनीने ६०० कोटी रुपयांचा महसूल गाठला, जो त्याच्या व्यवसायातील मोठ्या यशाचं प्रतीक आहे.

    Sagar Gupta started Ekkaa Electronics Industries with his father at the age of 22

    सागर आणि त्याच्या वडिलांनी आता नोएडामध्ये १,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करून नवीन उत्पादन सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुरुवातीला ४०० कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत. या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन प्रक्रियेचे सुधारणा केली जाईल. ‘एक्का इलेक्ट्रॉनिक्स’ने देशांतर्गत उत्पादनाला चालना दिली आहे, आणि आज भारतात तयार होणारी उत्पादने जागतिक दर्जाची बनली आहेत. त्यामुळे, त्यांची उत्पादने आता परदेशी कंपन्यांना टक्कर देत आहेत.

    मित्रांनो, सागर गुप्ता याचा प्रवास हा केवळ एक व्यवसायिक यशोगाथा नाही, तर तो अनेक तरुणांसाठी एक प्रेरणा आहे. त्याने सिद्ध केलं आहे की योग्य संधीचा लाभ घेतल्यास आणि कठोर परिश्रम केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येतं.

    आणखी वाचा:

  • तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…

    तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…

    We become like the average of the five people we spend the most time with.” आपण ज्या लोकांसोबत सर्वाधिक वेळ घालवतो, त्यापैकी सरासरी पाच लोकांप्रमाणेच आपणही बनतो.

    power of surrounding positive people

    साधूंनी त्याच्याकडे त्या मडक्याची मागणी केली. तो कुंभार म्हणाला, “महाराज, तुम्हाला हवं असेल, तर चांगलं मडकं घेऊन जा. फुटकं मडकं नेऊन काय फायदा?” ते म्हणाले, “देणार असशील तर हेच दे. नाहीतर चाललो मी!” नाईलाजास्तव त्याने ते मडकं त्यांना देऊन टाकलं. त्या साधूंनी त्या मडक्याला स्वछ धुतल्यानंतर आणून आपल्या मंदिरातील शिवलिंगावर बांधून ठेवलं. परिणामस्वरुप कालपर्यंत कोणा एका कोपऱ्यात खितपत पडलेलं निरुपयोगी ते मडकं आज साधूंच्या सहवासाने, संत समागमाने देवकार्य करू लागलं. देवाच्या सानिध्यात भक्त यायचे तेव्हा त्या शिवशंकरांच्या पिंडीला नमस्कार करताना त्या मडक्यालाही डोकं लावायचे आणि त्यांचं मन प्रसन्न व्हायचं.

    आर्थिक परिस्थिती, काही गोष्टीत कमीपणा, संधीचा अभाव जरी असला तरी तुमच्याकडे जे कौशल्य असेल, त्यानुसार मिळेल ती संधी घेऊन चांगल्या लोकांच्या सहवासात जाण्याचा प्रयत्न करा. जसे परिसाला लोखंड लागले, की त्याचे सोने होते. तसेच तुम्ही ज्यांच्या सहवासात राहता त्यांच्या वागण्याचा, बोलण्याचा तुमच्यावर परिणाम होत असतो. त्यांचे गुण किंवा अवगुण तुमच्यात उतरत असतात. तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत राहिले पाहिजे आणि वाईट लोकांची संगत टाळली पाहिजे.

    संगतीचा परिणाम एकदम थोडक्यात सांगायचा म्हणजे;

    जर तुम्ही ५ हुशार लोकांच्या संगतीत राहाल, तर ६वे हुशार तुम्ही असाल…

    जर तुम्ही ५ यशस्वी लोकांच्या संगतीत राहाल, तर ६वे यशस्वी व्यक्ती तुम्ही असाल…

    जर तुम्ही ५ करोडपती लोकांच्या संगतीत राहाल, तर ६वे करोडपती तुम्ही असाल…

    आणि जर तुम्ही ५ टवाळ लोकांच्या संगतीत राहाल, तर ६वे टवाळखोर तुम्ही असाल…

    आणखी वाचा

  • यश मिळवण्यासाठी कल्पकता व डोकं शांत पाहिजे

    यश मिळवण्यासाठी कल्पकता व डोकं शांत पाहिजे

    चीनमधील एक प्रसिध्द दंतकथा आहे. एक क्रूर सम्राट राजा चुंग लुई, चीनमधील एका मागून एक लहान राज्यं काबिज करतो. ‘तुम्ही मला शरण या, नाहीतर मरणाला सामोरे जा ‘असा त्याचा आदेश असे. काही छोट्या राजांनी लढून प्राण गमावले, तर काही जीवाच्या भीतीने शरण येऊन गुलाम झाले. जेव्हा चुंग लुईचे आक्रमण मींगझु या राणीच्या राज्याच्या सीमेवर येऊ ठेवलं, तेव्हा राणी मिंगझुला काय करावं सुचेना, इतक्या बलाढ्य राजासमोर आपला टिकाव लागणार नाही, तेव्हा आपल राज्य वाचवायचं कसं याची तिला चिंता लागली.

    e4f03370 1689 42f5 91ef cd74870f0c36

    राणी नकाशा घेऊन तंबूत आली. तो गोल गुंडाळलेला होता. तिने तो टेबलावर ठेवला आणि हळूहळू उघडू लागली, राजाची उत्सुकता वाढीस लागली, किती खजिना मिळतोय ह्या विचारानं तो आनंदी झाला होता, पण चाणाक्ष राणीने त्या नकाशात धारधार तलवार लपवून आणली होती, नकाशा उघडताच राणीने तलवार काढली व राजाच्या ध्यानीमनी नसताना त्याचे शीर धडावेगळे करुन त्याचा वध केला. सगळीकडे हाहाकार माजला, सैन्य पळू लागले. राणीच्या सैन्यांनी हल्ला चढवून लुईचे सैन्य पळवून लावले व अशा रीतीने राणी मींगझुने आपले राज्य वाचवले.

    आज मराठी माणसाकडे मोठे भांडवल नाही, खूप चांगले शिक्षण नाही, अनुभव नाही. उद्योग व व्यवसाय करायचा म्हटलं तर बलाढ्य भांडवलदार यांच्याशी स्पर्धा आहे. तेव्हा आपण आपला उद्योग अशा कल्पक आयडिया शोधून शांत डोक्यानं केला पाहिजे. चाणाक्षपणे गनिमी काव्यानं विजय मिळविण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. डोकं शांत ठेवलं, तरंच ते चालेल आणि आयडिया सुचतील.

    आणखी वाचा

  • अगोदर भरपूर पाय पसरा, नंतर अंथरूण गोळा करा

    अगोदर भरपूर पाय पसरा, नंतर अंथरूण गोळा करा 

    आम्ही अनेक उद्योजकांबरोबर काम करतो. खूप संकुचित व लहान विचार करून एखादा व्यवसाय, प्रोडक्ट किंवा कंपनी स्थापन केल्यास ती सुरूही होत नाही व झालीच तर ती खूप मोठी होत नाही. एकाच गावातील दोन शेतकऱ्यांची उदाहरणे सांगते  म्हणजे तुम्हाला समजेल. तुकाराम; लहान विचारसरणीचा २ एकर बागायत जमिनीचा मालक. आपल्या ऐपतीनुसार एक जर्सी गाय विकत घेतो, त्याला लागणारा चारा काही जागेत पिकवतो. गाय रोज १५ ते २० लीटर रोज दूध देते, त्याचे त्याला रोज ४०० रुपये मिळतात. चारा, खाद्य, औषधोपचार याचा रोजचा खर्च २०० रुपये, त्याला शिल्लक राहतात केवळ २०० रुपये, म्हणजे दरमहा ६००० रुपये. तसं बघायला गेलं तर ह्यात फायदा काहीच नाही. तुकारामाने आपल्या श्रमाचा मोबदला जर पकडला, तर ६००० रुपयाचे काहीच शिल्लक राहणार नाहीत. म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरणारा तुकाराम हा तोट्यात व्यवसाय करतो आहे.

    power-of-thinking-big-in-business

    सर्व काम हे यांत्रिक व शास्त्रशुध्द पध्दतीने होत असल्यामुळे कमी मजुरीत व कमी खर्चात काम होते व गायीही जास्त दूध देतात. जास्त दूध असल्याने त्याला १ रुपया जास्त दर मिळतो व खाद्य खरेदी जास्त असल्याने त्याला ५% कमी दराने खाद्य मिळते. एका गायीपासून रोज ५०० रुपयाचे दूध मिळते. १५ गायींचे रोज रुपये ७५००. खाद्य, औषधपाणी, ३ मजूर मिळून रोज ४५०० खर्च होतो. रोज निव्वळ नफा ३००० हजार रुपये. महिना १० ते १२ गाड्या शेणखत निघते. ते रुपये ४ हजार प्रती गाडी याप्रमाणे खपते, त्याचे महिना ३० ते ४० हजार मिळतात. एकूण महिना फायदा रुपये १२,५००० पर्यंत मिळतो.

    आता मला सांगा, तुम्हाला कोणती म्हण मान्य आहे, “अंथरूण पाहून पाय पसरावे” की “आधी भरपूर पाय पसरा, मग अंथरूण गोळा करा?” तेव्हा जुने बुरसटलेले विचार भंगारात घाला, आधुनिक विचारसरणीचा स्वीकार करा.

    आणखी वाचा

  • निर्णयक्षमता नसल्यास खूप मोठे नुकसान होते

    निर्णयक्षमता नसल्यास खूप मोठे नुकसान होते

    सुनील या ग्रामीण भागातील एक तरुण. शाळेत हुशार होता, ७५ ते ८०% गुण मिळवायचा, १२ वी नंतर बीसीए केले. नोकरी करावी का व्यवसाय, का स्पर्धा परीक्षा द्यावी यात गोंधळलेला होता. दरम्यान बीसीए झाल्यानंतर १-२ वर्ष स्पर्धा परीक्षा देऊन पाहिल्या, परत नोकरीसाठी पुण्याला जाऊन आला. नंतर म्हणाला आता काहीतरी उद्योग व्यवसाय करू. कोणता करावा हे शोधण्यात २-३ वर्षे अजून घालवली. कशात काय ठरत नाही.

    घरची स्थिती मध्यमवर्गीय. वडील छोटेसे किराणा दुकान चालवतात. थोडी शेती, त्यात वय वाढत चाललेले, घरच्यांना काळजी वाटू लागली व नातेवाईकांमधीलच एका दहावी नापास झालेल्या मुलीशी फारसा विचार न करता त्याचे लग्न लावून दिले व किराणा दुकान इथून पुढे तूच चालव म्हणून वडिलांनी सांगितले.

    आपण शाळेत इतके हुशार होतो, पण आयुष्यात खूप मागे राहिलो याची खंत त्याच्या मनाला आयुष्यभर लागत असते. त्यामुळे आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याला खूप मोठे महत्व आहे. एकदा गेलेली वेळ परत येत नाही व वेळेनुसार अनेक संधी निघून जातात व शेवटी हताश होण्याशिवाय पर्याय नसतो. लोकांना भेटा, वाचा, निर्णय घेण्यास वेग द्या व आपल्याला सुनील होण्यापासून वाचवा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

  • अ कप ऑफ कॉफी कॅन चेंज द लाईफ

    अ कप ऑफ कॉफी कॅन चेंज द लाईफ

    तुम्हाला बिझनेस करायचा व वाढवायचा आहे, मग मोठी कामे मिळविण्यासाठी क्लायंटना कसे पटवायचे हे जमले पाहिजे. समोरचा माणूस  क्लाईंट असो, सप्लायर असो, कर्मचारी असो किंवा खबऱ्या असो, अशांना पटवायचे असेल, तुम्हाला हवी असणारी माहिती पाहिजे असेल, तर त्यांना एखाद्या चांगल्या ठिकाणी जेवायला निमंत्रण द्या. चांगले थ्रीस्टार, फाईव्ह स्टार हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा, कॅफे किंवा अशा काही ठिकाणी. चांगलं रुचकर जेवण कोणाला आवडत नाही? प्रत्येकजण खाण्यासाठी तर कमवितो. जेवणासाठी एकत्र भेटल्याने संवाद चांगला वाढतो, संबध अधिक चांगले प्रस्थापित होतात.

    आज बिझनेस करण्यासाठी तुमच्यामधले व्यवहार कौशल्य, गट्स महत्वाचे आहेत. तुमचे ऑफिस, फॅक्टरी, कंपनी किती मोठी आहे कोणी विचारत नाही. तुम्हाला डील करता आली पाहिजे, मार्केटिंग जमले पाहिजे.  क्लाईंटबरोबर व्यवहार व संबध प्रस्थापित करता आले पाहिजेत. हे बिझनेस तंत्र तुम्हीही शिकून घ्या आणि आजमावून पाहा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • व्यवहाराला नेकी व पत काय ठेवावी?

    व्यवहाराला नेकी व पत काय ठेवावी?

    शिवचरित्रातील एक गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मोहिमेवर जाण्यासाठी खजिना कमी होता. छत्रपती असूनसुद्धा ते स्वतः सावकाराकडे गेले व म्हणाले मला २ लाख होनांचे कर्ज हवे आहे.

    सावकार म्हणाला, “कर्जदार म्हणून आलात की महाराज म्हणून?” महाराज म्हणाले, “कर्जदार छत्रपती म्हणून आलोय.”

    सावकाराने प्रश्न केला, “तारण काय ठेवणार? कर्ज द्यायचे म्हणजे तारण काहीतरी ठेवले पाहिजे.”

    त्यावर छत्रपती म्हणाले, “हे स्वराज्य तर रयतेचे आहे, मी काय तारण ठेवणार?”

    सावकार म्हणाला, “तारण तर ठेवावेच लागेल.”

    शिवाजी  महाराजांनी शेजारी पडलेली गवताची काडी उचलली त्या सावकाराच्या हातात दिली आणि सांगितलं, “ही माझ्या स्वराज्यातील गवताची काडी आहे. ही तारण म्हणून घे आणि मला दोन लाख होनांचं कर्ज दे.”

    सावकाराने दोन लाख होनांचं कर्ज दिलं आणि ती गवताची काडी तारण म्हणून ठेवून घेतली.

    तेव्हा महाराज म्हणाले, “आम्ही गवताची काडी गहाण ठेवली होती, ती परत करा.”

    सावकाराने तिजोरीत ठेवलेली गवताची काडी बाहेर काढली आणि महाराजांच्या हातावर दिली आणि म्हणाला, “ही घ्या तुमची गवताची काडी”.

    त्यावेळी शेजारी उभा असलेला कोंडाजी महाराजांना म्हणाला, “महाराज, गवताची काडी ती, तीची किंमत काय! घेतली काय आणि न घेतली ती काय.” त्यावर महाराज म्हणाले, “कोंडाजी, ह्या स्वराज्यातील गवताची काडीसुध्दा कुणाकडे गहाण पडता कामा नये.”

    छत्रपतींच्या त्या गोष्टीवरुन व्यवहारातील सचोटीपण व ‘गवताची काडीसुध्दा परत घेतली’ हा पराकोटीचा स्वाभिमान आजच्या मराठी माणसाला शिकण्यासारखा आहे. कर्ज काढणे हा व्यवहाराचा भाग आहे, पण ते वेळेत फेडून आपली पत व स्वाभिमान ठेवणे तितकेच महत्त्वाचे, परंतु भ्रष्ट सहकार सम्राटांनी व उद्योगपतींनी जनतेचे व बँकांचेही पैसे बुडवून स्वतःबरोबर इतरांनासुद्धा व्यावसायिक क्षेत्रात बदनाम केले आहे. आपण मात्र सचोटीने आणि प्रामाणिकपणाने व्यवहार करून आपली पत कायम ठेवावी.

  • जीभेवर साखर, डोक्यावर बर्फ, मेंदूत आयडिया, हातात काम

    जीभेवर साखर, डोक्यावर बर्फ, मेंदूत आयडिया, हातात काम

    पहिलं जीभेवर साखर :

    सतत गोड बोलणे, मृदुभाषा, आलेल्यांचे हसतमुखाने स्वागत, चहापान वगैरे इत्यादींमुळे माणसाचे संपर्क वाढतात, संबंध सलोख्याचे बनतात. गोड, मृदु व समजूतदारपणे बोलणार्‍याबरोबर ग्राहकांना व्यवहार करावासा वाटतो. गोड बोलणार्‍या दुकानदाराचे दुकान इतरांपेक्षा निश्चित अधिक चालते. गुड मॉर्निंग, हॅप्पी न्यू ईयर, हॅप्पी बर्थडे, अभिनंदन असे प्रशंसेचे उद्गार काढण्यास किंवा तसा एखादा व्हॉटसअप मेसेज पाठवण्यास काय तोटा होतो? मग गोड बोलण्याची सवय लावून घ्या ना! सतत उद्धट भाषा, शिवीगाळ, वादविवाद, चिडचिड अशा प्रकारच्या वागण्याने माणूस कधीही जीवनात पुढे जाऊ शकत नाही.

    दुसरी डोक्यावर बर्फ :

    उद्योग तर सोडा, पण आता सर्वसामान्य जीवनसुध्दा प्रचंड तणावाचे झाले आहे. आयुष्यात येणार्‍या ताणतणावाच्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी व त्यातून मार्ग काढण्यासाठी डोके अतिशय शांत असणे महत्वाचे आहे. मोबाईल तापला की हँग होतो, तसे डोके गरम झाले की बुध्दी चालत नाही आणि बुध्दी चालायची बंद झाली झाली की सगळं संपलं. तेव्हा डोक्यावर बर्फ ठेवूनच जीवनात व व्यवसायात वावरले पाहिजे, तरच तुमची आयुष्यात प्रगती होत जाईल. तापट स्वभावाच्या माणसाचा काही दिवसात सत्यानाश होऊन तो शेवटी मागे पडून गरिबीच्या खाईत लोटला जातो.

    तिसरी मेंदूत आयडिया :

    आयुष्यात श्रीमंत होण्यासाठी केवळ पारंपारिक पध्दतीने जगणे आता कालबाह्य झाले आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी सतत नवीन नवीन आयडियांचा विचार केला पाहिजे. कोणत्या प्रोडक्ट, सेवांमध्ये चांगला फायदा आहे, भविष्यात कोणत्या जागांचे भाव वाढतील, मार्केटिंग करताना काय करावे म्हणजे फायदा वाढेल, कोणत्या व्यक्तीशी संपर्क कुठे व कसा साधावा म्हणजे आपणास फायदा होईल, कोणत्या कंपनीची एजन्सी घ्यावी म्हणजे फायदा होईल, ई-कॉमर्स, इंटरनेटच्या माध्यमातून काय करता येईल का? असे मेंदूत सतत आयडियांचे मंथन सुरू पाहिजे.

    चौथी हातात काम :

    श्रीमंत होणार्‍या व प्रचंड यशस्वी होणार्‍या व्यक्तीचे एक वैशिष्ट्य म्हणजे सकाळी ६ वाजता उठल्यापासून ते रात्री १२ वाजता झोपेपर्यंत त्यांच्या हाताला काही-ना-काही काम असते. आपला व्यवसाय, व्यवहाराचा व्यापच येवढा पाहिजे, की तुम्हाला सतत काम असले पाहिजे. प्रत्येक यशस्वी उद्योजक एकाच वेळी १० हून अधिक वेगवेगळे व्यवसाय सांभाळतात. हातात काम नसणे म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या मृत व्यक्तीचे लक्षण आहे. ज्यांच्या हाताला आज काम नाही म्हणजे, तो लवकरच मार्केट बाहेर पडून होऊन मागे पडेल. काम नसेल तर काम शोधून काढले पाहिजे :

    हा लेख विडीयो मध्ये पहा