नवी अर्थक्रांती

Blog

  • कॉम्प्युटर तुम्हाला देत असलेले ‘हे’ आजार माहीत आहेत का?

    कॉम्प्युटर तुम्हाला देत असलेले ‘हे’ आजार माहीत आहेत का?

    >> डोकेदुखी

    कम्प्युटर आणि लॅपटॉपसारखे इलेक्ट्रॉनिक उपकरण डोकेदुखीचं आणि मायग्रेनचं मोठं कारण ठरतात. त्यामुळे जर तुम्ही खूप जास्त वेळ कम्प्युटरवर काम करत असाल तर तुम्हाला डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या होऊ शकते. असे मानले जाते की, कम्प्युटरच्या स्क्रीनचा प्रकाश, पॅटर्न आणि चित्रांमुळे व्यक्तीच्या आरोग्यावर सर्वात जास्त वाईट प्रभाव पडतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना डोकेदुखीची समस्या होते.

    >> मांसपेशींमध्ये समस्या

    एका रिसर्चमध्ये असं आढळलं आहे की, फार जास्त वेळ खुर्चीवर बसून कम्प्युटर काम करत राहिल्याने मांसपेशी थकतात. त्यामुळे मांसपेशींमध्ये वेदना होण्याची समस्या उत्पन्न होते. त्यासोबतच पाय, छाती, खांदे आणि हात सुन्न होतात. कम्प्युटरवर अनेक तास सतत बसून राहिल्याने हे एक मोठं नुकसान होतं.

    computer-related-health-problems-you-should-know-about

    >> डोळ्यांसाठी घातक

    कम्प्युटरवर काम करतेवेळी सतत स्क्रीनकडे बघत राहणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी घातक आहे. अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासात असं आढळलं की, फार जास्त वेळ स्क्रीनसमोर बसल्याने डोळ्यांना थकवा, खाज, डोळ्यातून पाणी येणे आणि डोळ्यांना जड वाटणे या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी अकाली कमजोर होते. खासकरुन लहान मुलांच्या डोळ्यांवर याचा फार वाईट प्रभाव पडतो.

    computer-related-health-problems-you-should-know-about

    >> तणाव वाढतो

    फार जास्त वेळ लॅपटॉप किंवा कम्प्युटर स्क्रीनवर काम करणे तणाव वाढण्याचं मोठं कारण आहे. तासंतास कम्प्युटरवर काम केल्याने व्यक्तीच्या एकाग्रतेत कमतरता येते. त्यांना सतत २४ तास हलकी डोकेदुखी होत राहते. नंतर अशी स्थिती येते की, व्यक्ती गंभीर स्ट्रेस, डिप्रेशन आणि वेगवेगळ्या मानसिक समस्यांनी ग्रस्त होतो.

    computer-related-health-problems-you-should-know-about

    >> वजन वाढतं

    लॅपटॉप, कम्प्युटर, टॅबलेट आणि स्मार्टफोनचा वापर जास्त वेळ करणे आजकाल लोकांच्या जीवनशैलीचा भाग झालं आहे. मात्र कम्प्युटरचा अधिक वापर करणारे जवळपास ३० टक्के लोक वेगाने वजन वाढण्याच्या समस्येचे शिकार होत आहेत. अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की, कम्प्युटरचा अधिक वापर सर्वच वयोगटातील लोकांच्या, खासकरुन लहान मुला-मुलींच्या सुस्त आणि आळशी होण्याचं कारण आहे. त्यानंतर त्यांचं वजन वाढण्याची शक्यता अधिक वाढते. तसेच डायबिटीज आणि हृदयरोगांचाही धोका वाढतो.

    computer-related-health-problems-you-should-know-about

    Source : ऑनलाइन लोकमत

  • व्यवसायाच्या वाटेवर चालताना – प्रस्तावना

    व्यवसायाच्या वाटेवर चालताना – प्रस्तावना

    या प्रश्नात मुख्य प्रवाहाबाहेरच्या इतर काही प्रश्नांचीदेखील भर पडत असते. ते प्रश्न म्हणजे, शिक्षणासाठी आयुष्याची २०-२२ वर्षे घालवल्यानंतर ऐन उमेदीच्या काळात पैसा कमावण्यासाठी घरुन येणारा दबाव किंवा मजबूरी, पाठीमागच्या पिढीने करुन ठेवलेले कर्ज (मग ते आपल्या शिक्षणासाठी असो की अजून कोणत्या कारणाने) कसे फेडायचे? त्यानंतर समाजातील काही लोक विचारतात लग्न कधी करणार? लग्न केले तर वाढणाऱ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन लग्नाआधीच व्यवसाय स्थिरस्थावर करण्यासाठीची धावपळ व कमीअधिक महत्त्वाचे अजून काही प्रश्न सोडवता सोडवता कोणता प्रश्न कधी सोडवायचा? हाही एक नवीन प्रश्न.

    उत्तर देणारे कुणी नसते. आपल्या वाट्याला येते मग गळचेपी. पाठीमागची पिढी नव्या वाटेवरुन चालायला विरोध करते, तर आपल्या सोबत असणारी नवी पिढी अनुभवाअभावी व थोड्याशा अधीरपणामुळे काही ठिकाणी चुकते. ह्या चुका टाळता याव्यात म्हणून करता येणाऱ्या उपाययोजना या लेखमालिकेच्या माध्यमातून प्रकशित करू ज्या व्यवसायाच्या वाटेवर चालताना मार्गदर्शक ठरतील.

    👇 अनुक्रमणिका

    👉 भाग १ – मानसिकता व पूर्वतयारी

    १. व्यवसाय की नोकरी?
    २. व्यवसायच का?
    ३. सुरुवात करण्यापूर्वी काय?
    ४. मानसिकता
    ५. व्यवसाय कोणता?
    ६. कार्यक्षेत्र कसे ठरवावे?
    ७. बिझनेस प्लॅन जरुरी आहे का?
    ८. कुटूंबातील व्यक्तींचा पाठिंबा की विरोध? व उपाय
    ९. अनुभवाची गरज आहे का?

    👉 भाग २ – प्रत्यक्ष सुरुवात, भांडवली उभारणी व सरकारी परवानग्या

    १०. कशी करावी सुरवात?
    ११. व्यवसायासाठी किती भांडवल लागेल? व्यवसाय प्रकारानुसार
    १२. भांडवल कसे उभे करावे?
    १३. भांडवल उभे करताना तारण नसल्यास काय?
    १४. भांडवलासाठी घेतलेले पैसे कसे परत करणार?
    १५. कोणत्या परवानग्या लागतील? व्यवसाय प्रकारानुसार
    १६. सरकारी परवानग्यांचा होणारा फायदा काय?
    १७. कशा मिळवाव्यात परवानग्या?

    👉 भाग ३ – उत्पादने, मार्केटिंग व प्रत्यक्ष नफा

    १८. उत्पादन करण्यापूर्वी काय तयारी करावी?
    १९. प्रत्यक्ष उत्पादन कसे करावे?
    २०. आकर्षक मांडणी व लागल्यास पॅकेजिंग कसे करावे?
    २१. मार्केटिंगसाठी लागणारे सोपे उपाय
    २२. सेल्स करताना घ्यावयाची काळजी
    २३. अडचणीच्या काळात व्यवसायात टिकून कसे रहावे?
    २४. नेहमी उत्साहात काम करण्याची कला
    २५. प्रत्यक्ष नफा मिळवण्याची प्रक्रिया

    👉 भाग ४ – करप्रणाली, व्यवसाय वृध्दी व ब्रँड बनवणे

    २६. भरावे लागणारे कर व त्याचे फायदे तोटे
    २७. व्यवसाय वृध्दीची गरज
    २८. व्यवसाय वृध्दीसाठी उचलावी लागणारी पावले
    २९. ब्रँडचे महत्त्व व गरज
    ३०. ब्रँड निर्मितीचे मार्ग व यशस्वी उद्योग चिरकाल टिकवताना
    ३१. व्यवसायातील स्पर्धा व त्यातून निर्माण होणारे अडथळे
    ३२. व्यवसायातील स्पर्धा व त्यात टिकून राहण्याची कला

  • व्यवसाय की नोकरी ? – शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी कि व्यवसाय

    व्यवसाय की नोकरी ? – शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी कि व्यवसाय

    महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरुन एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर पुढे काय करणार, नोकरी की व्यवसाय? ह्या प्रश्नाला मिळालेली काही उत्तरे.

    आता वरील तीनही प्रकारच्या तरुणांच्या मताचे विश्लेषण करु या. पहिल्या प्रकारात एकतर त्या तरुणाला नोकरीच करायची असते, मात्र व्यवसाय न करण्याची काही कारणे तो पुढे करत असतो. नोकरीची सुरुवातसुध्दा अगदी तुटपुंज्या उत्त्पन्नावर होते. मग पुढे त्या उत्त्पन्नात फार वेगाने वाढ होते असेही काही नाही. असे तरुण जीवनभर Rat Race मध्ये अडकून पडतात. नोकरी, पगार, घर, घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण, आरोग्य असे नेहमीचे प्रश्न सोडवतच आयुष्य पुढे सरकत असते. त्यात फार उल्लेखनीय असे काही घडत नाही. पण ह्या चक्रात अडकलेला माणूस सहजी बाहेर पडत नाही. हा निर्णय घेण्याची काही कारणे आहेत त्यामध्ये जोखीम घेण्याचे धाडस नसणे, इच्छाशक्तीचा अभाव व न्यूनगंड ही काही महत्त्वाची कारणे आहेत. ह्यावर थोड्याफार प्रयत्नांनी मात करता येते.

    दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तींना काही काळ नोकरी करुन भांडवल उभे करायचे असते. काही प्रमाणात उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावायचा असतो. ह्या व्यक्तींना कमी प्रमाणात जोखीम घ्यायची असते. हेही थोड्याफार फरकाने पहिल्या प्रकारच्या व्यक्तीसारखी सुरुवात करतात. मग पगार, संसाराचे प्रश्न व कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे Rat Race मध्ये अडकतात व बाहेर पडायची इच्छा असूनही बाहेर पडत नाहीत व पहिल्या प्रकारच्या व्यक्तीप्रमाणे ह्यांचे पण आयुष्य फिरत राहते. स्वतः पैसे कमावणे हा भांडवल उभे करण्याचा केवळ एकमेव मार्ग नाही. इतर अनेक मार्गांनी भांडवल उभे करता येते. भांडवल निर्मितीचे इतर मार्ग पुढे आपण पाहणार आहोत. भांडवला उभारणीच्या इतर पर्यायांनी जीवनात वेगाने पुढे जाण्याचा मार्ग सापडेल.

    तिसऱ्या प्रकारचे तरुण हे काहीसे ठाम पण द्विधा मनस्थितीत असतात. ह्या तरुणांना अधिक खोलात जाऊन प्रश्न विचारले तेव्हा समजले की काहीतरी व्यवसाय करायचा म्हणजे कोणता व्यवसाय करावा? याचा पुसटसा अंदाजही यांनी बाधलेला नसतो. इच्छाशक्ती असते मात्र दिशा घ्यायला वेळ लागतो. सांगणारेही कुणी नसतात. मग स्वतःच्या अंदाजावर पुढे जाण्याचा प्रयत्न चालू होतो. हे तरुण खूप काही करण्याची उमेद ठेवतात. पुढे जाऊन त्यांना हवे ते करुनही दाखवतात.

    मी काही जणांना “पाहिजे तेवढे भांडवल देतो, तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहात?” असा प्रश्न विचारला की मग त्यांच्याकडे काही उत्तर नसते. भांडवल, मनुष्यबळ, प्रशिक्षण याचा पुरवठा बाहेरुन करता येतो. त्याचे असंख्य मार्गसुध्दा आहेत. मात्र व्यवसाय करण्यासाठी लागणारी वृत्ती स्वतःतच असायला हवी किंवा तिची जोपासना स्वतःहून करायला हवी. मग व्यवसाय यशाच्या शिखरावर नेता येईल.

    नोकरी करताना उत्पन्नाच्या, खर्चाच्या मर्यादा पडतात. याउलट व्यवसायामध्ये २४ तास झोकून देऊन काम करता येते. शेकडो माणसांना काम देता येते. ती माणसे तुमच्यासाठी काम करत असतात. सुरुवातीची काही वर्षे संघर्ष केला, की मनाप्रमाणे उत्पन्न व पाहिजे तेवढा वेळ व्यवसायातून प्राप्त करता येतो. उत्पन्नात होणारी वाढ ही बांबूच्या रोपट्याप्रमाणे वेगाने होत असते. मनसोक्त जगण्याचा, स्वतःच्या स्वप्नांसाठी काम करण्याचा आनंद घेत व्यवसाय करणे हे नोकरीपेक्षा सरसच.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती


    आणखी वाचा

  • १५ जानेवारी, भारतीय लष्कर दिन (आर्मी डे) निमित्त देश सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांना सलाम !!!

    १५ जानेवारी, भारतीय लष्कर दिन (आर्मी डे) निमित्त देश सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांना सलाम !!!

    आजच्याच दिवशी १९४९ साली पहिले भारतीय लष्करप्रमुख म्हणून जनरल के. एम. करिअप्पा यांनी सूत्रं हाती घेतली होती.

    km-cariappa - Army Day

    एक ऐतिहासिक दिवस म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ – स्वातंत्र्यलढय़ात यशस्वी होऊन भारत स्वतंत्र झाला. भारत सरकारच्या विनंतीवरून ब्रिटिश लष्करातील काही उच्च अधिकारी आपल्या लष्करात काही वर्षे आणखी राहण्यास तयार झाले. फिल्डमार्शल क्लोड औकीनलेक यांची सर्वोच्च सेनापती म्हणून नियुक्ती झाली; तर जनरल सर रोब लोकहार्ट कमांडर इन चीफ बनले. १ जानेवारी १९४८ रोजी जनरल सर रॉबर्ट रॉय बुचर यांनी कमांडर इन चीफ म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांचा कार्यकाल एका वर्षानंतर समाप्त व्हायची वेळ जेव्हा आली, तेव्हा भारत सरकारने हा निर्णय घेतला, की आता भारतीय सेनेचा मुख्य – कमांडर इन चीफ भारतीयच असेल..

    लष्कर दिन म्हणजे आपला देश आणि त्यातील लोकांच्या रक्षणार्थ आपले जीवन सर्मपित करणार्या वीर सैनिकांना एक खर्या अर्थाने वाहिलेली श्रद्धांजली आहे. नवी दिल्ली येथील इंडिया गेटवरील अमर जवान ज्योतीजवळ शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहून समारंभास सुरुवात होते. लष्कराची तांत्रिक प्रगती आणि भारतीय लष्कराकडे उपलब्ध असलेली शस्त्रसामग्री, वाहने – हत्यारे, हेलिकॉप्टरची कर्तबगारी आणि शत्रूवर हल्ल्याची प्रात्यक्षिक दृश्ये, तसेच सैनिकी कवायत दर वर्षी दिल्ली छावणी येथील आर्मी परेड मैदानावर आयोजित केली जाते. प्रजासत्ताक दिनी होत असलेल्या सैन्याच्या कवायतीची ही रंगीत तालीमच मानली जाते..

    Amar Jawan Jyoti - Army Day

    फौजी बँडच्या तालावर सैनिकांच्या तुकड्या शिस्तशीरपणे आगेकूच करीत जातात, ते दृश्य पाहण्यासारखे असते. जमीन आणि आकाशात आपल्या दुर्दम्य साहसाचा परिचय करून देणारा भारतीय लष्कराचा शो प्रत्यक्ष पाहणे हासुद्धा एक रोमांचकारी अनुभव असतो. जय हिंदच्या जयघोषाने आसमंत निनादून टाकत कार्यक्रमाची सांगता होते. देशात अन्यत्रही लष्कराच्या प्रमुख ठिकाणी १५ जानेवारीला लष्करी कवायतीचे आयोजन केले जाते. आपल्या देशातील जनतेला सेनेची तयारी आणि उत्साह पाहण्याची चांगली संधी यामुळे मिळते. तसेच युवकांना यामुळे देशाकरिता काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते..

    Army Day

    भारतीय लष्कर जगातील सशक्त आणि मजबूत सैन्यापैकी एक आहे. भारतीय लष्कर आपल्या निडर आणि साहसी वृत्तीसाठी प्रसिद्ध आहे. इतिहासात भारतीय सेना म्हणजे एक गौरवास्पद शौर्यगाथाच आहे. सेना राजकारणापासून दूर असते आणि फक्त अंतर्गत व बाह्य धोक्यांपासून आपले रक्षण करते. भारतीय सेनेचा प्रत्येक भारतीयाला गर्व वाटतो. जेव्हा जेव्हा भारतीय सीमेवर आक्रमणे झाली, तेव्हा तेव्हा भारतीय सेनेने अतिशय उत्साही प्रतिकार करून देशाला यशस्वी केले आहे. खरं तर या प्रकारच्या सर्मपित आणि शिस्तशीर सैनिकांचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे आणि अशा लष्कराचा एक भाग बनून देशाची सेवा करायला मिळाली, तर तो आमचा सर्वोच्च सन्मान ठरला पाहिजे.

  • पेपर आणि दूध विकून २२ लाख लोकांना नोकरी देणारी ‘वॉलमार्ट’ उभी करणारे ‘सॅम वॉल्टन’

    पेपर आणि दूध विकून २२ लाख लोकांना नोकरी देणारी ‘वॉलमार्ट’ उभी करणारे ‘सॅम वॉल्टन’

    वॉलमार्टचा विषय काढायचं कारण म्हणजे, बरोबर 106 वर्षांपूर्वी 29 मार्च 1918 रोजी अमेरिकेच्या ओक्लाहोमा शहरात walmart च्या संस्थापकाचा जन्म अमेरिकेतल्या एका गरीब शेतकरी घरामध्ये झाला. त्यांच्या जन्मदात्यांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती, पण या संघर्षावर मात करुन त्यांनी वॉलमार्टचं महाकाय साम्राज्य उभं केलं. हे साम्राज्य उभं करणाऱ्या त्या व्यक्तीचं नाव आहे सॅम वॉल्टन.

    The Story of Sam Walton

    जवळजवळ 10-15 वर्ष दुकान अगदी चांगलेले. दुकानासाठी घेतलेले कर्ज देखील सॅमने केव्हाच चुकते केले. या दुकानाच्या प्रगतीमुळे सॅमची घरची परिस्थिती एकूणच पालटली. मात्र काही वर्षांनंतर सॅमला ते दुकान त्याच्या पूर्वीच्या मालकाला परत द्यावे लागले. आत्ता त्याला पुन्हा नवी सुरुवात करायची होती.

    मोठ्या शहरात राहणाऱ्या लोकांना नियमित शॉपिंग करण्यात रस नव्हता. उलट छोट्या शहरात किंवा दुर्गम गावांमध्ये राहणारी मंडळी नियमितपणे शहरांमध्ये येऊन आपल्याला आवश्यक अशा सामानांची खरेदी करतात. हे सॅम यांच्या लक्षात आलं. त्यामुळे केवळ मोठ्या शहरांपुरतं मर्यादीत राहण्याचा त्यांचा निर्णय चुकीचा आहे हे सॅम वॉल्टन यांना जाणवले. त्यानंतर वॉल्टन यांनी आपले धोरण बदलले. आता त्यांनी विकसित होत असलेल्या छोट्या गावांवर आपलं लक्ष्य केंद्रीत केलं.

    या गावात वॉल्टन यांनी मोठे-मोठे दुकानं उघडण्याचा सपाटा लावला. सॅम वॉल्टन यांनी आता आपल्या व्यापाराचा सर्व पोत बदलला होता. त्यांनी दुकानात घरामध्ये रोज लागणारी प्रत्येक वस्तू ठेवण्यास सुरुवात केली. त्याची किंमतही बाजारभावापेक्षा कमी ठेवली. ग्राहकांना एकाच छताखाली सर्व वस्तू कमी किंमतीमध्ये वॉल्टन देऊ लागले. वॉल्टन यांचा हा निर्णय म्हणजे आत्महत्या आहे. असं त्यांच्या सहकारी आणि मित्रांना वाटत असे. तसा इशाराही त्यांनी वॉल्टन यांना दिला होता. पण वॉल्टन यांना यांच्या डोळ्यांना यशस्वी व्यवसायाचं चित्र स्पष्ट दिसत होतं. यामुळे रिटेल विश्वात क्रांती होईल असा त्यांना ठाम विश्वास होता. त्यानंतरच्या काळात त्यांचा हा विश्वास खरा ठरला.

    The Story of Sam Walton
    Sam Walton

    तर मित्रांनो, Walton यांनी Walmart खेड्यात देखील उभे केले. आजही आपण पाहतो की गावातील लोकांना बाजारासाठी, अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी शहरात जावं लागतं आणि walton यांनी लोकांचा हाच प्रॉब्लेम ओळखून छोट्या छोट्या गावात देखील walmart चे छोटे छोटे स्टोअर उभे केले. लोकांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या. या बिझनेस आयडियाने संपूर्ण अमेरिकेत Walmartचे जाळे विणले. आज Wallmart चा Turnover 611 Billion Dollars इतका आहे. फक्त इतकंच नाही, तर गुगलवर साधं Richest family in the World? असा प्रश्न केला तरी एका क्षणात Walton Family चं नाव पहिलं येतं.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • पेट्रोल पंपावर काम ते देशातील सर्वात मोठ्या कंपनीचा मालक

    पेट्रोल पंपावर काम ते देशातील सर्वात मोठ्या कंपनीचा मालक

    The Rise of Dhirubhai Ambani: A Story of Hard Work and Determination
    धीरूभाई अंबानी यांचा जन्म २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातमधील चोरवाड या गावी झाला. त्यांचे संपूर्ण नाव धीरजलाल हिराचंद अंबानी.
    त्यांचे वडील हे एक प्राथमिक शिक्षक होते तर आई गृहिणी होती.
    Dhirubhai Ambani: The Man Who Built Reliance
    घरची परिस्थिती बेताची होती.त्यामुळे लहान वयातच धीरूभाई गिरनार पर्वताजवळ पर्यटकांना भजी विकायचे.
    शाळेत जेमतेम असणारे धीरूभाई यांचं शिक्षण १० वी पर्यंतच झालं.
    Dhirubhai Ambani: The Man Who Built Reliance
    वयाच्या १६ व्या वर्षी धीरूभाई आपले जेष्ठ बंधू रमणीकभाई यांच्यासोबत एडनला गेले आणि तेथे ते एका पेट्रोल पंपावर महिना ३०० रुपये पगारावर नोकरी करू लागले. मेहनत आणि हुशारीच्या जोरावर अवघ्या २ वर्षांत ते मॅनेजर पदापर्यंत पोहोचले.
    Dhirubhai Ambani: The Man Who Built Reliance
    पण स्वतःचा व्यवसाय करण्याची तळमळ त्यांना शांत बसू देईना. येमेनमध्ये स्वातंत्र्यलढ्याची चळवळ सुरु झाल्यावर ते भारतात परत आले.
    त्यांनी चुलत भावासोबत भागीदारीमध्ये पॉलिएस्टर धागे आणि भारतीय मसाले आयात निर्यातीचा व्यवसाय चालू केला.
    Dhirubhai Ambani: From a Petrol Pump Attendant to the Owner of India's Largest Company
    बचतीचे ५० हजार रुपये गुंतवणूक करून मुंबईतल्या मस्जिद बंदर या ठिकाणी “रिलायन्स कमर्शिअल कॉर्पोरेशन”ची
    सुरुवात झाली, तीही ३५० चौ. फूटच्या खोलीमध्ये. ज्यामध्ये २ टेबल, ३ खुर्च्या आणि एक टेलिफोन होता. हे होतं धीरूभाईंचं पहिलं ऑफिस.
    Dhirubhai Ambani: From a Petrol Pump Attendant to the Owner of India's Largest Company
    आयुष्यात नेहमी जोखीम घेत व्यवसाय करणाऱ्या धीरूभाईंनी कापड उद्योगातील सगळे बारकावे शिकत, १९६६ साली अहमदाबादच्या नरोडा येथे एका मिलची सुरुवात केली, जिथे कपडे बनवण्यासाठी पॉलिस्टर धाग्याचा उपयोग व्हायचा. तिथं तयार होणाऱ्या कापडाला त्यांनी विमल नाव दिलं, जे त्यांच्या मोठ्या भावाच्या मुलाचं होतं.
    Dhirubhai Ambani: From a Petrol Pump Attendant to the Owner of India's Largest Company
    पाहता पाहता विमलचा डंका संपूर्ण भारतात वाजू लागला. १९७७ मध्ये धीरूभाईंनी आपल्या कंपनीचे शेअर्स सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला
    आणि त्या वेळी ५८,००० हून अधिक गुंतवणूकदारांनी त्या शेअर्सची खरेदी केली.
    Dhirubhai Ambani: From a Petrol Pump Attendant to the Owner of India's Largest Company
    यानंतर त्यांनी रिलायन्स कंपनीचा विस्तार वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केला. रिफायनरी, पेट्रोलियम, टेलीकम्युनिकेशन यांसारख्या क्षेत्रात रिलायन्स आपलं नाव कमवत गेली. रिलायन्स कमर्शिअल कॉर्पोरेशन म्हणून सुरु झालेली कंपनी पुढे रिलायन्स टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड आणि आता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अशी नावं धारण करत प्रगती करत आली.
    Dhirubhai Ambani: From a Petrol Pump Attendant to the Owner of India's Largest Company
    ६ जुलै २००२ साली रोजी धीरूभाई अंबानी यांचा मृत्यू झाला. ‘नेहमी मोठी स्वप्नं पहा’ असं सांगणारे धीरूभाई आजही लाखो गरीब आणि
    कमी शिक्षण घेतलेल्या तरुणांना प्रेरित करतात.
  • Coca Cola ची सुरुवात कशी झाली?

    Coca Cola ची सुरुवात कशी झाली?

    The Rise and Fall of Coca-Cola: A Case Study in Business Success
    डॉक्टर जॉन पेंबरटन हे अमेरिकेच्या सैन्यामध्ये कर्नल होते. सिव्हिल वॉर दरम्यान सेवा बजावत असताना ते जखमी झाले आणि
    त्याच दरम्यान त्यांना मर्फिन या ड्रग्जचे व्यसन लागले.
    The Rise and Fall of Coca-Cola: A Case Study in Business Success
    खूप वर्षानंतर त्यांनी आपलं व्यसन सोडायचं ठरवलं आणि तेव्हा मर्फिन ड्रग्जच्या जागी आपल्याला दुसरं काय घेता येईल याचा विचार करू लागले. पेंबरटन हे रसायन शास्त्रज्ञसुद्धा होते. त्यामुळे त्यांनी काही घटकांचा प्रयोग करायचं ठरवलं.
    How Coca-Cola Became the Most Popular Soft Drink in the World
    त्यांनी कोला नट्स आणि कोकाची पाने एकत्र करून मिश्रण तयार केलं. त्यात अजून काही घटक घालून एक सिरप बनवलं आणि त्यामध्ये कार्बोनेटचं पाणी मिसळलं. त्यांनी तयार केलेल्या पेयामध्ये अल्कोहोल असल्यामुळे कायद्याच्या चौकटीत ते बसत नव्हतं. म्हणून पेंबरटन आपले पेय रजिस्टर करू शकले नाहीत
    How Coca-Cola Became the Most Popular Soft Drink in the World
    पण नंतर त्याच फॉर्म्युलामध्ये काही बदल करून त्यांनी अल्कोहोल विरहित पेय तयार केलं १८८६ मध्ये पेंबरटन यांनी आपले पेय औषधांच्या दुकानांमध्ये विकायला चालू केलं. ते पेय विकताना सांगू लागले की यामुळे अपचनाचा त्रास, डोकेदुखी, मर्फिनचे व्यसन कमी व्हायला मदत होते
    The Story of Coca-Cola: The Creation of a Cultural Phenomenon
    यामुळे त्यांचं हे पेय लोकप्रिय होऊ लागलं. नंतर त्यांचे पार्टनर फ्रँक रॉबिन्सन यांनी Cocakola असं नाव सुचवलं, परंतु पेंबरटन यांनी नाव अधिक आकर्षक दिसण्यासाठी kola मधील K काढून तिथं C ठेऊन Cola केलं आणि तयार झाली ती Coca-cola.
    The Story of Coca-Cola: The Creation of a Cultural Phenomenon
    ही मूळ रेसिपी अजूनही रहस्य आहे. असं म्हटलं जातं की, ही रेसिपी एका वेळेस कोका-कोलाच्या फक्त दोन कर्मचाऱ्यांना माहिती असते आणि
    त्यांचा मृत्यू झाल्यानंतरच ती पुढच्या कर्मचाऱ्याला सांगितली जाते.
    The Story of Coca-Cola: The Creation of a Cultural Phenomenon
    स्वतः बनवलेली नावीन्यपूर्ण उत्पादने, मार्केटिंगचे नवनवीन तंत्र, कौशल्य यामुळे अल्पावधीत Coca-cola एक मोठी कंपनी म्हणून उदयाला आली. आज Coca-Colaचे स्वतःचे पाचशेपेक्षा जास्त ब्रँड असून ३५०० पेक्षा जास्त प्रोडक्टस आहेत. कंपनीचे बाजारमूल्य 278 अब्ज डॉलर्स आहे
    The History of Coca-Cola: From a Secret Recipe to a Global Icon
    पहिल्या वर्षी कोका-कोलाच्या फक्त २५ बॉटल्स विकल्या गेल्या होत्या. सध्या कोका-कोला जगातील जवळपास २०० देशांमध्ये
    विकले जाते व रोज सुमारे १९० कोटी लोक कोका-कोलाचे पेय पितात.
  • संगणकाला जन्म देणारे चार्ल्स बॅबेज

    संगणकाला जन्म देणारे चार्ल्स बॅबेज

    the-man-who-invented-the-computer-charles-babbage
    आज ज्या संगणकामुळे आपलं आयुष्य सुखकर झालं त्या संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेज यांनी लावला. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १७९१ला लंडनमध्ये झाला.
    the-man-who-invented-the-computer-charles-babbage
    लहानपणासूनच गणितात अत्यंत हुशार असणारे चाल्स बॅबेज हे एक गणितज्ञ, तत्त्वज्ञ, संशोधक आणि मेकॅनिकल इंजिनिअर होते. त्यांनी १८१२-१३ मध्ये गणितीय समीकरणे सोडवणारे कॅल्क्युलेटर बनवले होते.
    Charles Babbage's Contributions to Computing
    आपले गणितीय ज्ञान वापरून चाल्स बॅबेज यांनी एक मशीन बनवलं जे मोठमोठी गणित कमी वेळात सोडवत होतं. १८२२ मध्ये तयार झालेल्या या मशीनचं नाव बॅबेज यांनी डिफरन्स इंजिन असं ठेवलं, पण आणखी संशोधन करण्यासाठी पैसे कमी पडल्यामुळे त्यांना हे काम अर्ध्यातच सोडावं लागलं.
    Charles Babbage's Contributions to Computing
    पुढं आणखी संशोधन करत त्यांनी याच मशीनच पुढचं व्हर्जन १८४२ मध्ये बनवलं. ज्याचं नाव त्यांनी अनॅलिटीकल इंजिन असं ठेवलं. या मशीनचं वैशिष्ट्य म्हणजे याला इनपुट दिल्यानंतर, त्याच्यावर प्रोसेसिंग करत आणि दिलेल्या माहितीची प्रिंट काढत, ती माहिती स्टोअरसुद्धा करत होते.
    Charles Babbage's Contributions to Computing
    हेच अनॅलिटीकल इंजिन म्हणजे जगातला पहिला संगणक. हे यंत्र पुर्णपणे मॅकॅनिकल असून त्यात कोणत्याही प्रकारचा विद्युतपुरवठा वापरला गेला नव्हता. असे असले तरी आधुनिक संगणकाचे सर्व मुलभूत घटक त्यात समाविष्ट होते.
    Charles Babbage's Contributions to Computing
    या अनॅलिटीकल इंजिनचा आकार एका खोलीएवढा होता,
    तर याचं वजन अनेक पटीने जास्त होतं.
    हे इंजिन वाफेवर चालणार होतं. चार्ल्स बॅबेज यांना हे इंजिन बनवण्यासाठी ब्रिटिश सरकारने फंडिंग केलं होतं.
    Charles Babbage's Contributions to Computing
    चार्लस बॅबेज यांनी तयार केलेले Analytical Engine हाच आधुनिक संगणकाचा पाया आहे असे म्हटले जाते. म्हणूनच चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचा जनक म्हणतात.
    Charles Babbage's Contributions to Computing
    असे हे व्यक्तिमत्त्व १८ ऑक्टोबर १८७१ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले. त्यांचा अर्धा मेंदू The Hunterian Museum इथे व अर्धा
    Science Museum, London इथे जतन करून ठेवलेला आहे.
  • Asian Paints ची सुरुवात कशी झाली

    Asian Paints ची सुरुवात कशी झाली

    The Rise of Asian Paints: A Case Study in Business Success
    तो काळ होता १९४२ चा, जेव्हा भारतातील पेंट्स इंडस्ट्री मध्ये फक्त काही परदेशी कंपन्या होत्या आणि भारतीय अशी शालिमार पेंट्स होती.
    The Rise of Asian Paints: A Case Study in Business Success
    त्यावेळी दुसरं महायुद्ध चालू होतं, ज्यामुळे भारताने बाहेरील देशांकडून रंगाची आयात पूर्णपणे थांबवली होती. आणि हीच संधी होती भारतीय रंग उद्योगांना वर येण्याची.
    The Rise of Asian Paints: A Case Study in Business Success
    ही संधी ओळखून चंपकलाल चोकसी या व्यापाऱ्याने वयाच्या २० व्या वर्षी आपल्या तीन मित्रांच्या साथीने १९४२ साली मुंबईमधील गिरगावात एका गॅरेजमध्ये Asian Paints ची सुरुवात केली.
    The Rise of Asian Paints: A Case Study in Business Success
    तो काळ असा होता जेव्हा सगळे पेंट उद्योग औद्योगिक पेंट्स विभागावर लक्ष केंद्रित करत होते आणि ही संधी चोकसी यांच्या सारख्या चाणाक्ष माणसाच्या लक्षात आली.
    The Rise of Asian Paints: A Case Study in Business Success
    भारतामध्ये सजावटीच्या किरकोळ पेंट विभागात वाढण्याची प्रचंड संधी आहे ही संधी चोकसी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी
    किरकोळ सजावटीच्या क्षेत्रात शाश्वत असणारी व्यवसायाची वाट निवडली.
    The Rise of Asian Paints: A Case Study in Business Success
    त्यांनी आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावले. त्यांना अशा बाजारात आपले स्थान मिळवायचे होते, जिथे मूठभर व्यापाऱ्यांनी संपूर्ण भारताचा बाजार नियंत्रित केला होता.
    How Asian Paints Became One of the Largest Paint Companies in the World
    त्यानंतर त्यांनी मार्केटिंगसाठी बरेच वेगवेगळे प्रयोग केले जे ग्राहकांना आवडू लागले. ज्यामुळे १९५२ मध्ये त्यांनी २३ करोडचा टर्नओव्हर साध्य केला.
    How Asian Paints Became One of the Largest Paint Companies in the World
    आणि पुढे १९६७ मध्ये Asian Paints ही भारतातील क्रमांक १ ची पेंट्स उत्पादक कंपनी बनली आणि आपल्या गुणवत्तेमुळे तसेच अचूक हेरलेल्या संधीमुळे आजही Asian Paints आपले पहिले स्थान टिकवून आहे.
    How Asian Paints Became One of the Largest Paint Companies in the World
    आज एशियन पेंट्स भारतातील सर्वात मोठी तर आशियातील तिसरी मोठी पेंट कंपनी आहे. कंपनीची उलाढाल २० हजार कोटींपेक्षा जास्त असून ७६०० हून अधिक कर्मचारी कंपनीत काम करतात.
  • बारावीत नापास झालेला मुलगा बनला आयपीएस अधिकारी IPS Manoj Kumar Sharma

    बारावीत नापास झालेला मुलगा बनला आयपीएस अधिकारी IPS Manoj Kumar Sharma

    इतिहासात अश्या अनेक प्रेरणादायी कथा आहेत ज्या इच्छाशक्तीच्या जोरावर अजरामर झाल्या.

    9 वी, 10 वी, 11 वी तिन्ही इयत्तेत कॉपी करून काटावर पास होऊन बारावीत नापास झालेल्या मुलाला तुम्ही काय म्हणाल? अर्थातच टपोरी, वाया गेलेला, बिनकामी; पण जर मी म्हणाले, की तोच बारावीत नापास झालेला मुलगा जर पोलिस आधिकारी बनला तर? तुमचा विश्वास बसणार आहे का? पण हे खरंय!

    आम्ही सांगतोय, त्या आयपीएस अधिकाऱ्याबद्दल ज्याने गडचिरोलीत नक्षलवाद्यांना पाणी पाजलं. तो डॅशिंग अधिकारी म्हणजे आयपीएस मनोज कुमार शर्मा. 12 वी मध्ये केवळ हिंदी सोडून बाकी सगळ्या विषयात नापास झालेले मनोज कुमार परिस्थितीशी झगडत अखेर आयपीएस बनले ते केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर. नुकताच त्यांच्या संघर्षपूर्ण आयुष्यावर आधारित “12th फेल” हा सिनेमासुद्धा प्रदर्शित झाला.

    मुलाखती वेळी त्यांची थोडी कच्ची-पक्की इंग्रजी पाहून मुलाखत घेणाऱ्यांनी त्यांना विचारलं, ‘अरे तुला तर इंग्रजीच येत नाही, तर तू काम कसं करणार?’ त्यावर मनोज कुमार म्हणाले, भाषेचा आणि कामाचा काय संबंध, त्यावर ते मुलाखत घेणारे म्हणाले, ‘अरे तुला जर इंग्रजी बोलताच येत नसेल, तर लोकांचे प्रश्न तू कसे सोडवशील?’ त्यावर मनोज कुमार म्हणाले, ‘सर तुम्ही मला जर प्लॅस्टिकच्या ग्लासमधून पाणी दिलं, पण मी जर म्हटलं की, मला प्लॅस्टिकच्या ग्लासमधून नको काचेच्याच ग्लासमधून पाणी द्या. तर तुम्ही काय कराल? अर्थातच तुम्ही म्हणाल की, ग्लास कुठलाही असो, पण पाणी तेच आहे ना. मग काचेचा ग्लास असला काय किंवा प्लॅस्टिकचा असला काय. त्याची चव बदलणार नाहीच. अगदी तसंच माझी भाषा कोणतीही असो, त्याने माझ्या कामावर काय फरक पडणार आहे? मला जरी इंग्रजी अस्खलित बोलता येत नसले, तरी माझे काम मी सक्षमपणे व जबाबदारीने करू शकेन. यावर माझा विश्वास आहे” त्यांच्या या उत्तराने सर्वजण प्रभावित झाले आणि मनोज कुमार यांची निवड झाली.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा