Category: लेख

  • IPO म्हणजे काय? | IPO कसे काम करते?

    IPO म्हणजे काय? | IPO कसे काम करते?

    IPO. या टर्मबाबत तुम्ही याआधीही खूप वेळा ऐकलं असेल. लवकरच या कंपनीचा IPO येणार आहे, प्रत्येक share ची price एवढी असणार आहे, IPO या तारखेपासून सुरु होऊन या तारखेला संपणार आहे अशा काही चर्चा तुमच्या मार्केट किंग मित्रांमध्ये रंगत असतील. पण तुम्हाला कधी वाटलं का की आपल्यालाही या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती हवी? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. चला तर मग सुरुवात करूया!

    IPO म्हणजे काय

    IPO चा full form होतो initial public offering. नाव ऐकूनच तुम्हाला याबाबत थोडीफार कल्पना आली असेलच. तर initial public offering ही एक अशी process आहे ज्यामध्ये एखादी मोठी कंपनी शेअर market मध्ये पहिल्यांदाच त्यांचे शेअर विक्रीसाठी काढते. अजून थोडं सोप्या पद्धतीने बघायचं झालं, तर कंपनी त्यांच्या बिझनेसचा विस्तार करण्यासाठी shares च्या माध्यमातून funding गोळा करते. यामध्ये फायदा दोघांचाही होतो म्हणजे कंपनीला पैसे मिळतातच, पण त्यासोबत तुम्हालाही त्या कंपनीचे shares मिळतात म्हणजे तुम्हीसुद्धा काही टक्के का होईना त्या कंपनीचे मालक झालेले असता.

    कोणत्याही यशस्वी उद्योजकाला त्याचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी भांडवलाची गरज असते आणि म्हणून तो वेळोवेळी कर्ज काढून, भागीदार जोडून किंवा मार्केट मध्ये शेअर्स विकून व्यवसायासाठी भांडवल उभे करत असतो. आज जगातील कोणतीही मोठी कंपनी बघा, त्यांच्या उत्पादन आणि सेवांच्या बळावर जगावर अधिराज्य गाजवत असतील; पण यामध्ये सर्वात मोठा वाटा अशा असंख्य हातांचा आहे, ज्यांनी या कंपन्या लहान होत्या तेव्हा त्यांच्यावर विश्वास दाखवून त्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली. उदाहरणच घ्यायचं झालं तर, १९९३ साली इन्फोसिसमध्ये

    केलेल्या १०००० रुपयांच्या गुंतवणुकीचे आज करोडो रुपये झाले, पण जेव्हा इन्फोसिस लहान कंपनी होती तेव्हा त्या कंपनीवर विश्वास ठेवून पैसे गुंतवणारे तुमच्या माझ्यासारखे छोटे-मोठे गुंतवणूकदारच.

    IPO लॉन्च करण्याची कारणं :-

    – एखाद्या कंपनीला आपलं काम वाढवायचं असेल तर त्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी ते आयपीओ लॉन्च करतात.

    – एखाद्या कंपनीने जर आधी Debt म्हणजे कर्ज घेतलेले असेल तर त्यांना ते कर्ज फेडण्यासाठी आयपीओ लॉन्च करतात.

    – काही जुन्या गुंतवणूकदारांना कंपनीतून बाहेर पडायचं असेल तर मग त्यासाठी कंपनी आयपीओ लॉन्च करते.

    IPO कशा पद्धतीने काम करतो?

    कोणतीही कंपनी तिचा IPO मार्केटमध्ये आणण्यापूर्वी private असते. या कंपनीमध्ये मग काही early investors असतात जसं की; founders, family, मित्र परिवार किंवा angel investors वगैरे. आपल्या कंपनीचा IPO मार्केटमध्ये आणणं ही खरं तर एक खूप मोठी गोष्ट असते. IPO मुळं कंपनीला जास्तीत जास्त पैसे उभारण्याची संधी मिळते. Private कंपनीपासून ती एक public कंपनी बनते. आयपीओचा कालावधी साधारणत: ४ दिवसांचा असतो. म्हणजे या ४ दिवसात या कंपनीचे शेअर्स विकत घेता येतात. त्यानंतर आयपीओ बंद होतो. मग गुंतवणूकदारांना शेअर्सचं वाटप केलं जातं. ह्या वाटप केलेल्या शेअर्सची, कंपनीची मार्केटमध्ये नोंदणी होते. त्याला ‘लिस्टिंग’ असं म्हणतात. या सर्व प्रक्रियेनंतर हे शेअर्स, गुंतवणूकदार मार्केटमध्ये हवे तेव्हा विकू शकतात.

    आयपीओशी संबंधित महत्त्वाचे दिवस कोणते आहेत. 

    Opening Date: खऱ्या गुंतवणुकदारांसाठी आयपीओ विक्रीसाठी खुला करण्यात येतो.

    Closing Date : त्या दिवसापर्यंत गुंतवणुकदार आयपीओसाठी अर्ज करु शकतात.

    Allotment Date : जेव्हा शेअर वाटपाची माहिती मिळते.

    Refund Date : जर तुम्हाला आयपीओमध्ये शेअर्सचे वाटप झाले नसेल, तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळल्यानंतर खात्यात अनब्लॉक केले जाते.

    Credit of Shares Date : जेव्हा तुम्हाला वाटप झालेले शेअर्स तुमच्या डिमॅट खात्यात जमा होतात.

    Listing Date : जेव्हा एखादी कंपनी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होते आणि इतर गुंतवणूकदारांप्रमाणे शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सुरु करतात

    आयपीओची किंमत दोन पद्धतीने ठरवली जाते. एक फिक्स्ड प्राइस म्हणजेच निश्चित किंमत. आणि दुसरी म्हणजे बुक बिल्डिंग पद्धत. पहिल्या पद्धतीत कंपनी selling साठी काढलेल्या शेअरची किंमत आधीच ठरवते. त्यामुळे शेअर किती रुपयांना मिळणार आहे हे गुंतवणूकदारांना समजतं. त्यानंतर गुंतवणूकदार या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची की नाही याचा निर्णय घेऊ शकतात. दुसऱ्या म्हणजे बुक बिल्डिंग पद्धतीत शेअर्सचा price band ठरवला जातो.  या price band मध्ये गुंतवणूकदारांना बोली लावावी लागते. म्हणजे कंपनीने जर ३०० ते ३५० रुपये असा price band ठरवला असेल, तर गुंतवणूकदारांना या किमती दरम्यान बोली लावता येते. इश्यू उघडताना कंपनी शेअरची किंमत fix करते म्हणजे त्या भावाने शेअर्सची विक्री करते. आता IPO चा main मुद्दा म्हणजे यात तुम्हाला एक, दोन shares घेता येत नाहीत. तुम्हाला shares हे लॉटमध्येच घ्यावे लागतात. उदा. जर एखाद्या आयपीओच्या एका लाॅटमध्ये १५ शेअर्स आहेत, तर गुंतवणूकदाराला कमीत कमी १५ शेअर्ससाठी बोली लावावीच लागते म्हणजे १ लाॅट खरेदी करणं compulsory आहे. त्यानंतर मग तुम्हाला १५ च्या पटीतच बोली लावावी लागते. 

    तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण IPO म्हणजे काय तो कशा पद्धतीने काम करतो, IPO लॉन्च करण्यामागची कारणं हे सगळं पाहिलं hope so तुम्हाला या लेखातून काहीतरी मदत नक्कीच झाली असेल. बाकी लेख आवडला तर आत्ताच त्याला like करा आणि जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • पैशाचे नियोजन (Financial Planning) : 7 महत्वाचे टप्पे

    पैशाचे नियोजन (Financial Planning) : 7 महत्वाचे टप्पे

    पैसा हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्या जीवनातील बऱ्याचशा गोष्टीवर पैशांचा प्रभाव पडतो, मग तो कमी असला तरी किंवा जास्त असला तरी. या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा विचार हा व्हायलाच हवा, म्हणून या लेखामध्ये आपण पैशाविषयी बोलूया…( Financial Planning )

    पैशाचं योग्य (Financial Planning) नियोजन करण्यासाठी आपण काही महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला किचकट वाटणारं पैशाचं नियोजन जरा सोपं होऊन जाईल.

    १. उत्त्पन्न : पैशाचं नियोजन करताना पहिला मुद्दा आहे तुमचं उत्पन्न!  तुम्ही नोकरदार असा की व्यावसायिक, बेरोजगार असा किंवा गृहिणी, तुमचे उत्पन्नाचे स्रोत कोणते आहेत आणि ते तुम्ही कसे वाढवू शकता जेणेकरून तुमच्याकडे येणारा पैसा वाढेल याचा तुम्हाला सर्वात आधी विचार करावा लागेल.

    २. खर्च : दुसरा आणि महत्वाचा मुद्दा असा की तुमचा पैसा खर्च कुठे आणि कसा होतो याची नोंद तुम्ही रोजच्या रोज ठेवायला हवी. बचतीचा मार्ग न स्वीकारता जर तुम्ही वारेमाप पैसा खर्च करत असाल, तर त्याचा तुमच्या आर्थिक भविष्यावर नक्कीच परिणाम होऊ शकतो.

    ३. बचत : आपला तिसरा मुद्दा आहे बचत. आप कितना कमाते हो पेक्षा आप कितना बचाते हो हे सध्या जास्त महत्वाचं झालंय ! बचत करण्यासाठी अतिरिक्त खर्च टाळणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे बचत करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढा.

    ४. गुंतवणूक : पैसा वाढवल्याने वाढतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे आपला चौथा मुद्दा आहे गुंतवणूक ! बचत केलेल्या पैशाची विभागणी करा आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. प्रसिद्ध गुंतवणूकदार Warren Buffett यांचा एक फेमस quote आहे  “If you don’t find a way to make money while you sleep, you will work until you die” म्हणजे जर तुम्हाला झोपेत पैसे कमवण्याचा मार्ग सापडला नाही, तर तुम्हाला मरेपर्यंत कामच करत राहावं लागेल.

    ५. कर्ज : आपला पुढचा मुद्दा आहे कर्ज! तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे नेहमी पुरेसा पैसा असेलच असे नाही. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गाने कर्ज घेणे आणि ते सुद्धा सोयीस्कर अटींसह हे खूप गरजेचं आहे.

    ६. अर्थसंकल्प : जसा देशाचा अर्थसंकल्प असतो तसा देशातील प्रत्येक नागरिकानेसुद्धा आपला स्वतःचा वैयक्तिक अर्थसंकल्प बनवला पाहिजे. अर्थसंकल्प बनवल्यामुळे आपल्या पैशांचे सुयोग्य नियोजन करण्यास मदत होते. यात तुमचे उत्पन्न, खर्च, कर्ज आणि गुंतवणूक अशा सर्व गोष्टींचा ताळेबंद असायला हवा.

    ७. सातत्य : शेवटचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सातत्य! आपल्याकडे आर्थिक नियोजनात कधीच सातत्य आढळत नाही. त्यामुळे वरील सर्व गोष्टींमध्ये तुम्ही कितपत सातत्य राखता यावर तुमचे आर्थिक भविष्य अवलंबून असेल.

    आणखी वाचा

  • संधी मिळत जाईल, तिचा फायदा घेत जा !

    संधी मिळत जाईल, तिचा फायदा घेत जा !

    मंदिरात पुजारी म्हणून तरी काम मिळेल या आशेने तो तेथे आला होता. त्यादिवशी बरेच इतर पुजारीसुद्धा तिथे जमा झाले होते. सर्वांनाच धर्माचे उत्तम ज्ञान होते. संचालक मंडळाला त्यातून एकाची निवड करणे अवघड वाटत होते. अनेकजण पुजारी म्हणून उत्तम होते. शेवटी संचालक मंडळातील एकाने असे सुचवले की ज्याला सर्वात चांगली घंटा वाजवता येईल त्यालाच मंदिराचा पुजारी म्हणून नियुक्त केले जाईल. त्यानुसार सर्व पुजाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली. पद्मनाभला नीट घंटा वाजवता न आल्याने त्याची निवड झाली नाही. तो मनात थोडा निराश झाला, त्याचा तिथे अपेक्षाभंग झाला होता. आता काय करावे? तो मंदिराबाहेर बसून विचार करू लागला. तेवढ्यात त्याला एक कल्पना सुचली. मंदिरासमोर खूप मोकळी जागा होती.

    त्याने संचालक मंडळाची परवानगी घेऊन समोर एक चहाची टपरी सुरू केली. मंदिरात भेट द्यायला येणारे भक्तगण ग्रामस्थ तिथे जाऊन चहा प्यायचे. हळूहळू ते मंदिर प्रसिध्द होऊ लागले तशी मंदिरास भेट देणाऱ्या भक्तांची संख्या वाढू लागली. खूप दूरगावातून लोक यायला लागले. तसा पद्मनाभचा चहाचा व्यवसायही वाढला. तेव्हा लोकांनी त्याला सुचवले की, तुझा चहा तर उत्तम आहे. पण तुझ्या टपरीवर जर तू अल्पोपहाराचे पदार्थ ठेवलेस तर बरे होईल. पद्मनाभला ते पटले. कारण आसपास त्या ठिकाणी अल्पोपहाराची सोय कुठेच नव्हती. पद्मनाभने लवकरच अल्पोपहाराचे उपवासाचे पदार्थ विकायला सुरुवात केली. आता त्यांचा व्यवसाय चांगला चालू लागला. त्याच्या टपरीजवळ एक शेड बांधून टेबल खुर्च्या लावून सर्वांसाठी बसण्याचीही सोय केली. पुढे भक्तांची, पर्यटकांची संख्या अजून वाढत गेली. पुढे भक्तांच्या आग्रहावरून त्याने जेवणाची थाळी विकायला सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्याची आर्थिक स्थिती सुधारू लागली. त्याला गावातही मान मिळू लागला. आता त्याचे रेस्टॉरंट झाले.

    पद्मनाभ एक व्यावसायिक बनला होता. एका भक्ताने त्याला सांगितले की इथे बाहेरून येणाऱ्या भक्तांची राहण्याची सोय नाही. पद्मनाभने त्याच्या रेस्टॉरंटचे एका लॉजमध्ये रूपांतर करून भक्त व पर्यटकांच्या राहण्याची सोय केली. त्याचा धंदा जोरात चालू आहे, तो सर्वांना उत्तम सेवा पुरवतो. मंदिराच्या वार्षिक जत्रेस दरवर्षी देणगी देतो. जसजशी मंदिरात येणाऱ्या भक्तांची, पर्यटकांची संख्या वाढते तसतसा त्याचा व्यवसाय वृद्धिंगत होतोय.  एकेकाळचा बेरोजगार पद्मनाभ आज तिथला सर्वात यशस्वी श्रीमंत हॉटेल व्यावसायिक झालाय. पद्मनाभने गावातील इतर बेरोजगार तरुणांना त्याच्याच हॉटेलमध्ये काम दिले आहे. त्यामुळे त्याची समाजात प्रतिष्ठा देखील वाढली. गावातील, तालुक्यातील अनेक नामवंत व्यक्तींची त्याच्या घरी ऊठबस चालू असते. त्याला खूप मान मिळतोय.

    एका व्यक्तीने त्याला त्यांच्या यशाचे गुपित विचारले. पद्मनाभ म्हणाला, “माझ्या यशाचे गुपित मंदिराच्या घंटेत आहे. मला घंटा वाजवता येत नाही म्हणून मी आज श्रीमंत झालोय. जर मला ती घंटा वाजवता आली असती तर मी मंदिरात पुजारी म्हणूनच राहिलो असतो.”

    मित्रांनो, कधीकधी संधी थोडक्यात हुकतात, म्हणून डोक्याला हात लावून बसू नये. डोळे उघडा, आजूबाजूला पहा. बरेच पर्याय, संधी उपलब्ध असतात. पण नोकरीच्या नादात त्या दिसत नाहीत. वेळ निघून गेल्यावर ते लक्षात येते. तेव्हा आपल्याकडे पश्चाताप केल्याशिवाय पर्याय नसतो. पद्मनाभने संधी निर्माण केली व व्यवसाय करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याच्याजवळ काही नव्हते, तरी त्याने छोटासा का होईना, व्यवसाय सुरू केला. पुढे त्याला अनुभव येत गेला, संधी आपोआप दिसू लागल्या. प्रत्येक वेळी त्याने संधीचा फायदा उठवला आणि आज तो त्याच्या व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात यशस्वी श्रीमंत आणि सुखी आहे. म्हणून संधी हुकल्यावर निराश होऊ नका, नैराश्यावर पाय ठेवून पुढे चालत रहा. संधी मिळत जाईल तिचा फायदा घेत जा.

    तुम्हाला आजचा लेख कसा वाटला हे कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि Motivation साठी नवी अर्थक्रांतीच्या चॅनेलला आताच subscribe करा. 

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • सोलापूरच्या या माणसानं देशातील पहिली बोट,  पहिली कार आणि पहिलं विमान बनवणारी कंपनी उभी केली – वालचंद हिराचंद

    सोलापूरच्या या माणसानं देशातील पहिली बोट, पहिली कार आणि पहिलं विमान बनवणारी कंपनी उभी केली – वालचंद हिराचंद

    २३ नोव्हेंबर १८८२ रोजी हिराचंद दोशी व सौ. राजू दोशी यांच्या पोटी वालचंद यांचा जन्म सोलापूरमध्ये झाला. त्यांचे वडील सुती कपड्याचे व्यापारी होते. वालचंद यांचे वालचंदजी १८९९ मध्ये सोलापूरातून मॅट्रिक झाले आणि त्यांनी पुढील शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज व पुणे येथील डेक्कन कॉलेज येथून इतिहास व अर्थशास्त्र या विषयातून पूर्ण केले. त्यानंतर ते वडिलांच्या व्यवसायात आले. वडिलांसोबत कपड्याचा व्यापार करणाऱ्या वालचंद यांच्या लक्षात आलं की, आपलं काय या व्यवसायात मन रमत नाही. त्यांनी स्वत: बांधकाम कंत्राटदार होण्याचा निर्णय घेतला

    Walchand Hirachand Doshi

    तो काळ होता जेव्हा भारत ब्रिटिशांच्या ताब्यात होता आणि या ब्रिटिश भारतात गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी नुकतीच रेल्वेची सुरुवात होती, तर दुसरीकडे उद्योगपटलावर जमशेदजी टाटांसारख्या दिग्गजांचा जन्म होत होता.

    या परिस्थितीत कौटुंबिक व्यवसायात न अडकता वालचंद यांनी रेल्वेमध्ये कारकून असलेले आपले सहकारी लक्ष्मण बळवंत पाठक यांच्यासोबत, पाठक वालचंद प्रायव्हेट लिमिटेड ही कन्स्ट्रक्शन कंपनी चालू केली. संपूर्ण भारतीय असणारी ही कंपनी त्यावेळची गरज होती. त्यामुळं खूप कमी वेळात कंपनीनं जोम धरला.

    कामाचे तसेच कर्मचाऱ्यांचे योग्य व्यवस्थापन, कामे वेळेत पूर्ण करण्याची सचोटी आणि आर्थिक रक्कम उभी करण्याचे सामर्थ्य यामुळं वालचंद यांच्या कंपनीने अल्पावधीतच गोऱ्या सरकारचा विश्वास कमावला. यामुळं झालं असं की, बांधकामाचे मोठमोठे प्रकल्प वालचंद यांच्या कंपनीला मिळू लागले. ‘बार्शी लाईट’ हा सात किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग बांधण्याचं काम त्यांनी अतिशय कुशलतेने आणि वेळेत पूर्ण करून दिले. या त्यांच्या कामाकडे पाहून त्यांना बोरीबंदर ते चिंचपोकळी व पुढे करी रोड ते ठाणे आणि मग ठाणे ते कल्याण या रेल्वेमार्गांच्या चौपदरीकरणाचेही काम मिळाले. ते सुद्धा त्यांनी चोख व वेळेत पूर्ण केले. या त्यांच्या उत्तम आणि वेळेत काम करण्याच्या लौकिकामुळे त्यांना रेल्वेची, सार्वजनिक बांधकाम खात्याची, धरणांची, पुलांची तसेच मुंबई महानगरपालिका इमारत बांधणीची व इतर कामेही मिळाली. अशा प्रकारच्या कार्यपद्धतीमुळे बांधकाम क्षेत्रात त्यांचा पूर्ण जम बसला.

    काही कालवधीनंतर पाठक यांनी कंपनीतून आपली भागीदारी काढून घेतली. मात्र व्यवसायाची वाढती मागणी आणि आपल्या कंपनीचा विस्तार करण्यासाठी १९२० मध्ये वालचंद यांनी आपली ही कंपनी टाटा समूहामध्ये विलीन केली.

    वालचंद यांच्या कंपनीने टाटा समूहासोबत अनेक मोठे प्रकल्प पूर्ण केले. जसे की मुंबई पुण्याला जोडणारा बोर घाटातील रेल्वे बोगदा, तानसापासून मुंबईला पाणी मिळण्यासाठी टाकलेल्या गेलेल्या मोठ्या पाईपलाईन, याशिवाय सिंधू नदीवरील कलबाग पुल, सध्याच्या म्यानमारमधील इरावती नदीवरील पूल हे सुद्धा वालचंद त्यांच्याच नेतृत्वाखाली पूर्ण झाले. १९३५ मध्ये टाटांनी आपला समभाग विकला, यानंतर या कंपनीचं नाव हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी असं ठेवलं गेलं. वालचंद यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी चांगलीच नावारूपाला आली.

    वालचंद यांनी 1908 मध्ये ‘वालचंदनगर इंडस्ट्रीजची’ स्थापना केली. जिथे साखर, साखर कारखाना मशिनरी, प्लास्टिकच्या वस्तू, सिमेंट प्लांट, पेपर, बॉयलर, टर्बाइन अशा अनेक वस्तू बनवल्या जातात.

    SS Loyalty, 5 April 1919

    १९३०-४०च्या दशकात वाहननिर्मिती उद्योग आपला जम बसवत होता. वाहन क्षेत्रातली संधी ओळखत वालचंद यांनी क्रायस्लर कंपनीशी करार केला आणि ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये देखील ते उतरले. १९४५ मध्ये त्यांनी मुंबईजवळ ‘प्रिमिअर ऑटोमोबाईल्स’ ही कंपनी स्थापन केली. मोटारीचे सुटे भाग बनवण्यापासून सुरू झालेल्या या कंपनीने पुढे फियाट या परदेशी कंपनीच्या सहकार्याने देशामध्ये पुढे बरीच वर्षे मोटारींचा पुरवठा केला. आज अजूनही त्यातील काही मोटारी भारताच्या रस्त्यांवर धावत आहेत.

    Premier Padmini

    आपल्या सर्वांचं लहानपण ज्या रावळगाव चॉकलेटने गोड केलं, ते चॉकलेटसुद्धा वालचंद यांचीच देण. १९३३ मध्ये त्यांनी रावळगाव येथे शुगर फॉर्म चालू केलं, तिथंच हे चॉकलेट बनवलं जात होत. सातारा इथलं कूपर इंजिनिअरिंग, कळंब साखर कारखाना यांसारखे अनेक उद्योग वालचंद हिराचंद दोषी यांच्या उद्योगसमूहाने यशस्वी केले.

    ब्रिटिशांचा साम्राज्याखाली असणाऱ्या भारताची आर्थिक गुलामगिरीतून मुक्तता होण्यासाठी त्यांनी हरतऱ्हेने मदत केली. उद्योगासोबतच त्यांनी अनेक सामाजिक कामं देखील केली. भारत स्वतंत्र झाला तेव्हा वालचंद उद्योगसमूह हा देशातील पहिल्या दहा मोठ्या उद्योगांपैकी एक होता. १९४९ मध्ये, त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि १९५० मध्ये व्यवसायातून निवृत्त झाले. ८ एप्रिल १९५३ मध्ये उद्योग क्षेत्रातील या अवलियाने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू लालचंद यांनी त्यांचा व्यवसाय सांभाळला.

    शेठजी अतिशय गुणग्राहक होते, कट्टर राष्ट्रनिष्ठ होते. सचोटी, दर्जा, प्रामाणिकपणा यांमध्ये तडजोड कधीही न केल्याने त्यांना नेहमीच लोकांचा पाठिंबा मिळाला. आपल्या गतिमान व सर्जनशील बुद्धिमत्तेच्या व कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी भारतात एका नव्या औद्योगिक युगाचा प्रारंभ केला. उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याकरिता इंडियन मर्चंट्‌स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांची उभारणी केली.

    वालचंद शेठजींचं कार्य आणि त्यांचा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या औद्योगिक क्षेत्रातील सिंहाचा वाटा नेहमीच आपल्या स्मरणात राहील. खऱ्या अर्थाने वालचंद हिराचंद दोशी यांनी मेक इन इंडिया मॉडेल साकारले असे म्हणायला हरकत नाही.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • Incubator तुमच्या व्यवसायाला वाढण्यास कशी मदत करू शकतात

    Incubator तुमच्या व्यवसायाला वाढण्यास कशी मदत करू शकतात

    Incubator ही term समजून घेण्यासाठी आपण आपल्या घरातलं उदाहरण पाहूया. आता तुम्हीच पहा ना आपल्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी, मोठं करण्यासाठी, निरोगी ठेवण्यासाठी आपले आई वडील किती काळजी घेतात; आपल्याला पाहिजे असलेल्या सगळ्या गोष्टी ते वेळच्या वेळी आपल्याला पुरवतात. हे सगळं कशासाठी? तर आपण मोठ्ठ होऊन काहीतरी चांगलं काम करण्यासाठी.

    सुरुवातीच्या काळात आपली काळजी आपले आई वडील जशी घेतात अगदी त्याचप्रमाणे सुरुवातीच्या काळात तुमच्या स्टार्टअपची काळजी हे या incubator firms घेतात. Incubator म्हणजे काय तर एक अशी firm जी तुमच्या early stage स्टार्टअपला grow करायला मदत करते कुठपर्यंत तर जोपर्यंत तुमच्याकडे sufficient financial, human, आणि physical resources तयार होत नाहीत तोपर्यंत. भारतात असे अनेक incubators आहेत जे छोट्या छोट्या startups ना अशा प्रकारे मदत करतात. काही महिन्यांपूर्वीच म्हणजे 5 November 2022 ला भारतातल्या सर्वात मोठ्या incubator चं inauguration झालं भारतातल्या सर्वात मोठ्या businessman म्हणजेच रतन टाटांच्या हस्ते. हे incubator open करण्यात आलं Telangana च्या राजधानी हैदराबादमध्ये ज्याचं नाव होतं T-Hub.

    Incubator मध्ये include होणाऱ्या गोष्टी

    तर Incubator म्हणजे काय हे आत्तापर्यंत तुम्हाला कळलंच असेल. पण यात नक्की काय काय include केलं जातं हे आता आपण पाहूया.  

    Mentorship – कोणतीही incubator firm तुमच्या स्टार्टअपला एखाद्या experienced mentor सोबत connect करून देते. ज्यामुळं तुम्हाला वेगवेगळ्या topics वर guidance, support, आणि advice मिळायला मदत होते. हे topics सुद्धा वेगवेगळे असू शकतात जसं की business strategy, product development, किंवा fundraising.

    Networking opportunities – बऱ्याचवेळा Incubators वेगवेगळे events, workshops arrange करतात यामुळे तुम्हाला entrepreneurs, industry experts, किंवा investors सोबत Networking करायच्या संधी मिळतात.

    Workspace – कोणताही business सुरु करण्यासाठी काही basic गोष्टी लागतात. ज्या असल्याशिवाय तुमचा business सुरूच होऊ शकत नाही. आणि अशीच एक basic पण तेवढीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे business साठी लागणारी जागा. बऱ्याच startup founders कडं manpower, resources सगळं असतं प्रश्न असतो तो फक्त जागेचा. पण तुम्ही काळजी कशाला करताय? हे Incubators तुम्हाला workspace सुद्धा provide करतील.

    Funding – आता पार workspace देतायेत म्हटल्यावर funding तर देणारंच ना! तर हे incubators तुम्हाला grants, loans, किंवा investments च्या रुपात funding सुद्धा provide करतात.

    Incubator vs Accelerator

    आता तुम्ही म्हणाल या Incubator मध्ये आणि Accelerator मध्ये बरेचसे points same आहेत; यात फरक काय आहे? हा वर वर पाहायला गेलं तर हे दोन्ही same वाटू शकतात. पण या दोन्हीमधला सर्वात मोठा फरक काय तर Accelerator मध्ये त्या startup ला मदत केली जाते जे already well- established आहेत आणि incubator मध्ये तुमच्या स्टार्टअपला मदत मिळते early stage ला. 

    बऱ्याचवेळा incubator firms तुमच्याकडून काहीही पैसे घेत नाही किंवा तुमच्या स्टार्टअपमध्ये काही equity सुद्धा घेत नाही. तर याउलट Accelerator मध्ये तुम्हाला काही पैसे मोजावे लागतात किंवा काही equity तरी द्यावी लागते.

    यातला आणखी एक महत्त्वाचा फरक म्हणजे duration चा. आता जर well- established startups असतील तर साहजिक आहे त्यांना properly grow व्हायला कमी वेळ लागेल त्यामुळं accelerator program हे साधारण १ महिना किंवा फार फार तर ६ महिने चालतात पण incubator हे ६ महिन्यांपासून २ वर्षांपर्यंत चालू शकतात.

     तर मित्रांनो तुम्हाला आजचा आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला comment करून नक्की सांगा.

    जर तुम्हाला तो आवडला असेल तर या लेख ला like आणि share करायचं विसरू नका. तर भेटूया स्टार्टअप विश्वाच्या पुढच्या episode मध्ये.

  • आरोग्य हीच खरी संपत्ती, हे लक्षात ठेवा!

    आरोग्य हीच खरी संपत्ती, हे लक्षात ठेवा!

    उत्तम आरोग्य हे माणसाला मिळलेले वरदान आहे. “आरोग्यम धनसंपदा” हे मूल्य अगदी लहानपणीच आपल्याला शिकवले जात असते. कोणीतरी एक मार्मिक सत्य सांगितले आहे की, माणूस पहिल्यांदा संपत्ती मिळविण्यासाठी आरोग्य खर्ची घालतो. नंतर आरोग्य मिळविण्यासाठी पैसा खर्ची घालतो.

    लहानपणी आपण एका भिकाऱ्याची गोष्ट ऐकली होती. आपल्याकडे काहीच नाही म्हणणाऱ्या भिकाऱ्याला राजाने दहा हजार सुवर्णमुद्रा देवून त्याच्याकडे त्याच्या एका डोळ्याची मागणी केली. त्यावर त्याने नकार दिला. पुन्हा राजाने आणखी दहा हजार सुवर्णमुद्रा देवू करून त्याच्या हाताची मागणी केली. त्यावर देखील भिकाऱ्याने राजाला विरोध केला, कारण त्याला त्याच्या आरोग्याचे महत्त्व पटले होते.

    आपलं शरीर आणि मन ही जगातील एक विलक्षण निर्मिती आहे. त्याचसोबत आपण दररोज इतक्या सगळ्या गोष्टी कशा काय करू शकतो हे देखील एक न उलघडणारं कोडंच आहे. पण दुर्दैवाची गोष्ट ही की माणूस पळत्याच्या मागे धावतो, जे मिळालं आहे त्यात समाधानी न राहता तो भटकतोय नको असलेल्या गोष्टींच्या मागे. सोने, धनदौलत, अफाट प्रॉपर्टी म्हणजे श्रीमंती नव्हे. तर आरोग्य हीच आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असते हे त्याला कळतच नाही. पैसे मिळवताना तब्येत दुर्लक्षित राहून बिघडली तर त्या पैशांचा उपभोग घेता येणार आहे का? कमावलेले पैसे डॉक्टरकडे जातील, हानी होईल ती वेगळीच.

    Health is real wealth

    या आधुनिकीकरणामुळे आपले आयुष्य सुकर आणि वेगवान झाले आहे, पण त्याचे प्रतिकूल परिणाम देखील मानवी आरोग्यावर होतात. हल्ली आपल्याला सगळ्या गोष्टी एकदम पटकन हव्या असतात. या आधुनिकीकरणामुळे दोन पाहुण्यांना आपण स्वतःहून आपल्या आयुष्यात आमंत्रण दिले आहे. ते म्हणजे व्यसन आणि तणाव. कामाचा ताण आणि रोजची धावपळ यामुळे लागलेल्या व्यसनामुळे माणसांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतंय.

    व्यसन म्हणजे फक्त दारू आणि तंबाखूचे सेवन करणे नाही, तर आजकाल मोबाईल, टॅब्लेटसारखी जी आधुनिक गॅजेटस आपण वापरतो ते सुद्धा एक व्यसनच आहे. आपण या गॅजेटसचे गुलाम बनलो आहोत. या स्पर्धेच्या युगात माणूस खूप काही मिळवण्याच्या नादात वर्तमानाचा कमी आणि भविष्याचा जास्तच विचार करतोय. त्यामुळे भविष्याचा विचार करताना वर्तमानातले सुखही गमावून बसतो, यामुळे आरोग्याकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष होते. या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरात आणि मनात हळूहळू विषासारख्या पसरत आहेत आणि आपलं आयुष्य कमी करत आहेत. आपल्याकडे सुदृढ मन आणि निरोगी शरीर नसेल, तर या उच्च तंत्रज्ञानाचा काय उपयोग? या अशा जीवनशैलीमुळे ‘जेवण समोर असूनही नीट जेवता येत नाही आणि डोळ्यावर झोप असूनही झोपता येत नाही’ अशी अवस्था झाली आहे. ध्येयाकडे धावताना आपण आपलं स्वतःचं नुकसान तर करून घेत नाही ना? हे बघणं गरजेचं आहे.

    नेहमी लक्षात ठेवा, चांगलं शरीर आणि आनंदी मन नसेल तर सगळं काही व्यर्थ आहे. पण अजूनही उशीर झालेला नाही. अजूनही तुम्ही माघारी फिरू शकता. स्वतःच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात घ्यायची आता वेळ आलेली आहे. आरोग्य जोपासा, शरीराची आणि मनाची शक्य तितकी काळजी घ्या. यासाठी स्वतःला शिस्त लावून घ्या, रोज व्यायाम करा, मेडिटेशन करा, स्नेहसंबंध जोपासा, हसत-खेळत राहा, प्रत्येक क्षणाचा अनुभव घ्या, सकारात्मक विचार करा. हे सगळं एका दिवसात होणार नाही, त्यासाठी वेळ लागेल. उद्योजक हा हजारोंचा पोशिंदा असतो. त्यामुळे त्याचे आरोग्य उत्तम गरजेचे आहे. यासाठी सर्व उद्योजकांनी तब्येतीची पुरेशी काळजी घेऊन नेहमी सुदृढ राहावे. त्यामुळे सर्वांनी स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या शरीरावर प्रेम करा. आयुष्य एकदाच मिळतं, ते मनसोक्त जगा आणि दुसऱ्यांनाही जगायला शिकवा. तेही उशीर व्हायच्या आधी.

    आणखी वाचा

  • Equity म्हणजे काय? 10 मिनिटात समजून घ्या

    Equity म्हणजे काय? 10 मिनिटात समजून घ्या

    मित्रांनो Equity हा शब्द अनेकवेळा ऐकला असेल कारण Business मध्ये या Equity भोवती बऱ्याच गोष्टी फिरत असतात. आपण सुद्धा या इक्विटी बद्दल अनेकवेळा ऐकत असतो, पण इक्विटी म्हणजे नेमकं काय हे खूप कमी जणांना माहीत असतं. तर आजच्या लेखामध्ये जाणून घेऊया या Equity बद्दल.

    Equity म्हणजे काय?

    आपल्या मराठी भाषेत Equity ला एक सुंदर शब्द आहे तो म्हणजे ‘समभाग’. बघा या एका शब्दावरूनच लगेच समजतं की याचा अर्थ काय असू शकतो ते. आता ज्यांना ज्यांना या शब्दावरूनच समजलं असेल की Equity म्हणजे काय त्यांच्यासाठी टाळ्या! पण ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी हा लेख.

    Equity

    तर एकदम साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इक्विटी म्हणजे भागीदारी किंवा तुमचा हिस्सा. जर तुम्ही एखाद्या कंपनीत पैसे गुंतवले असतील आणि तुम्ही त्या कंपनीचे काही शेअर्स खरेदी केले असतील तर याचा अर्थ असा की त्या कंपनीमध्ये तुमची हिस्सेदारी किंवा मालकी आहे म्हणजेच इक्विटी आहे. Owner Point Of View ने बघायचं झाल्यास जेव्हा तुम्ही एखादा Business चालू करता तेव्हा त्यात तुमची 100% इक्विटी असते. कारण तेव्हा त्याची नुकतीच सुरुवात झालेली असते. पण जस जसा हा Business Grow करायला लागतो तस तसा तुम्हाला यात जास्त पैसा Invest करावा लागतो. जेव्हा तुमच्याकडे असलेला सर्व पैसा संपतो तेव्हा तुम्ही बँकेतून किंवा इतर कोणाकडून तो घेता आणि इतरांकडून घेतलेल्या याच पैशाला डेबिट(Debt) असं म्हणतात.

    Equity आणि Debt मधला फरक

    Equity आणि Debt ची Defination आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आली असेलच. आता आपण त्याचं उदाहरण पाहूया. समजा तुम्हाला हॉटेल Business सुरू करायचा आहे. Business सुरु करण्यासाठी तुम्हाला 10 लाख रुपयांची आवश्यकता आहे पण तुमच्याकडे फक्त 6 लाख रुपये आहेत. त्यामुळे अशा स्थितीत तुम्ही विचार केला की, उरलेल्या ४ लाख रुपयांसाठी एखाद्या Investor कडून पैसे घ्यावेत. अशा प्रकारे तुम्ही स्वतः ६ लाख रुपये गुंतवले आणि Investor कडून ४ लाख घेतले. तर आता तुम्हाला एकूण 10 लाख रुपये मिळाले आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमचा हॉटेल Business सुरू करू शकता.

    Differences between Debt & Equity

    या उदाहरणात तुम्ही पाहिलं की तुमच्या Business ला सुरु करण्यासाठी एकूण 10 लाख रुपये लागले पण यात तुम्ही फक्त 6 लाख रुपये गुंतवले. या ६ लाख रुपयांना आपण Equity म्हणतो. याचा अर्थ तुम्ही एकूण पैशाच्या 60 टक्के (10 लाखाचे 60% = 6 लाख) पैसे गुंतवले आहेत. त्यामुळं असं म्हणता येईल की तुम्ही या हॉटेलचे 60% मालक आहात म्हणजेच Business मधील तुमची इक्विटी 60% आहे आणि 40% इक्विटी ही त्या investor ची आहे. याचाच अर्थ तुमच्यावर 40% Liability आहे.  जेव्हा आपण  Equity आणि Liability दोन्ही जोडतो तेव्हा त्याला Assets म्हणतात. थोडक्यात काय तर जे आपल्या मालकीचं ते म्हणजे Assets आणि जे दुसऱ्याला द्यावं लागतं ते Liability.  आपण पाहिलेल्या उदाहरणात 10 लाख रुपये ही तुमची एकूण मालमत्ता आहे म्हणजेच Equity + Liability = Assets  मग  Equity = काय होईल तर Assets – Liability.

    Equity चे प्रकार :-

    1.Normal Equity Shares

    समजा एक कंपनी आहे चंगू मंगू Limited. समजायला काय जातंय! हा तर या कंपनीचे संपूर्ण Shares आहेत 10 लाखाचे. जर तुम्ही चंगू मंगू Limited या कंपनीचे एक लाख Shares विकत घेतले तर या चंगू मंगू Limited कंपनीमध्ये तुमची Equity ही दहा टक्के असेल. म्हणजे तुम्ही या कंपनीचे दहा टक्के हिस्सेदार किंवा मालक असाल. याचप्रमाणे तुम्ही जर का चंगू मंगू Limited या कंपनीचे 10,000 Shares विकत घेत असाल तर या कंपनीमध्ये तुमची मालकी फक्त एक टक्का असेल. अशाच प्रकारे तुम्ही कोणत्याही एखाद्या कंपनीचे जेवढे जास्त किंवा जेवढे कमी Share घेतात त्या प्रमाणे तुमचा मालकी हक्क जास्त किंवा कमी होतो. आता या प्रकारात जर तुम्ही Invest केलेली कंपनी Profit मध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा Profit होईल आणि जर कंपनी Loss मध्ये गेली तर तुम्हाला सुद्धा Loss च होईल.

    Types Of Equity

    आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे तर दुसरा प्रकार आहे

    2. Preference Equity Shares

    समजा जेव्हा मी एखादा Business सुरु केला होता तेव्हा असे काही लोक होते ज्यांनी माझ्या या Business मध्ये पैसे Invest केले होते. तर याच लोकांना मी एक Preference देतो म्हणजे जरी मला या Business मधून Profit झाला किंवा Loss झाला तरी मी त्यांना त्यांचे पैसे Return देणारच म्हणजे इतर लोकांपेक्षा मी या लोकांना एक प्रकारचा Preference दिलेला आहे.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • स्वप्नं बघा, ती पूर्ण होतात!

    स्वप्नं बघा, ती पूर्ण होतात!

    स्वप्नं ती नव्हे जी झोपेत पडतात, स्वप्नं ती जी तुम्हाला झोपूच देत नाहीत असे डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम म्हणायचे. स्वप्नं म्हणजे काय? जर तुम्ही शब्दकोशात याचा अर्थ शोधलात, तर तुम्हाला उत्तर मिळेल, ‘एखादी इच्छित गोष्ट मिळविण्याचा ध्यास, ध्येय, महत्वाकांक्षा’. थोडक्यात एखादी अशक्य वाटणारी, तरीही मिळवता येईल अशी मोठी इच्छा.

    स्वप्नं सारेच बघतात. मोठी स्वप्नं न बघणारा माणूस शोधूनही सापडणार नाही, पण सगळ्यांचीच स्वप्नं प्रत्यक्षात येत नाहीत. याचे कारण म्हणजे काहीजण स्वप्न बघतात आणि ते साध्य करण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करतात, तर बाकीचे लोक लगेच आपली स्वप्नं लगेच विसरून जातात. पहिल्या प्रकारच्या लोकांमध्ये मोठी स्वप्नं बघायची, ते साध्य करण्याची हिंमत असते. असे लोक इतरांनाही प्रेरित करत असतात.

    सचिन तेंडुलकर, तुमच्या माझ्यासारखाच मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला मुलगा. पण त्याची स्वप्नं आभाळापेक्षाही मोठी होती. जी साकार करणं अशक्यप्राय गोष्ट होती… पण तो निघाला इतिहास घडवण्यासाठी… लहानपणापासूनच क्रिकेटमध्‍ये असलेल्‍या प्रचंड वेडापायी क्रिकेटलाच आपले करिअर करण्‍याचे ठरविले… एकमेव गोष्ट ज्यामुळे तो नेहमी पुढे जात राहिला, ती म्हणजे; त्याची मोठी स्वप्नं, त्याचा दृष्टीकोन, त्याची चिकाटी आणि खेळाविषयी असलेली प्रचंड तळमळ. यामुळे तो क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट बनला. आपल्या असामान्य बॅटिंगनं त्यानं अवघ्या क्रिकेटजगताला वेड लावलं. पण याहूनही महत्त्वाचं म्हणजे लाखो करोडो लोकांना त्यानं स्वप्न बघायला शिकवलं. या पिढीला त्यानं स्वप्नांचा पाठलाग करायला शिकवलं, ज्यांची अशी स्वप्नं बघायची आधी हिंमत सुद्धा होत नव्हती.

    सर रॉजर बॅनिस्टर, चार मिनिटांपेक्षाही कमी वेळात एक मैल अंतर धावणारी जगातील पहिली व्यक्ती. १९५४मध्ये त्यांनी हा कारनामा केला होता. तोपर्यंत चार मिनिटांत एक मैल धावणे ही लोकांना अशक्य गोष्टच वाटत होती. त्यांना वाटायचे मानवी शरीराच्या मर्यादांमुळे कुठलाही माणूस एवढ्या वेगाने पळू शकत नाही. ही अशक्य अशी गोष्ट आहे. पण बॅनिस्टर यांनी सगळ्यांना खोटे ठरवले. त्यांनी स्वतःवर मेहनत घेतली. कठोर परिश्रम केले आणि महत्त्वाचं म्हणजे आपण हे करू शकतो हा विश्वास कायम ठेवला. महान लोकांची हीच तर खासियत असते. ही माणसं म्हणजे त्या मेणबत्तीसारखी असतात, जी स्वतः जळून इतरांचं जीवन प्रकाशमान करत असते. त्यांच्या जीवनात आशेचा आणि प्रेरणेचा नवीन किरण जागवत असते. मग जर ते करू शकतात, तर तुम्हाला का नाही जमणार? जर तुम्ही स्वयंशिस्त, चिकाटी या गोष्टी आत्मसात केल्या, आयुष्यात नवनवीन आव्हानं स्वीकारत गेलात, चालढकल करणे थांबवले, तर तुमची स्वप्नं साकार करण्यापासून तुम्हाला कुणीही थांबवू शकणार नाही. आणि या प्रवासात तुम्ही अनेक लोकांच्या आयुष्यातील असा प्रकाशाचा किरण बनाल, ज्याच्यामुळे अनेकांना यश मिळवण्याच्या मार्गावर चालना मिळते.

    इथे मला ‘टर्बो’ या सिनेमातील एक सुंदर विचार आठवतोय “कुठलंही स्वप्नं खूप मोठं नसतं आणि स्वप्नं पाहणारा लहान नसतो”. मोठी स्वप्नं फक्त तुमच्याच नाही तर इतर अनेकांच्या सकारात्मक बदल घडवून आणत असतात. त्यांना प्रेरित करत असतात.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • यशाचे रहस्य: प्रयत्न करणे कधीही सोडू नका

    यशाचे रहस्य: प्रयत्न करणे कधीही सोडू नका

    असं म्हणतात की, ‘यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो’ आणि व्यवसायाच्या बाबतीत तर हे ‘सोळा आणे सत्य’ आहे. तर मग असा कुठला एक सद्गुण आहे की ज्यामुळे एखादा उद्योजक यशस्वी होऊ शकतो?

    स्टीव्ह जॉब्सचे एक वाक्य आहे, “यशस्वी उद्योजक आणि अयशस्वी उद्योजकांची तुलना करायची झाल्यास, अयशस्वी उद्योजकांच्या अपयशाचे मुख्य कारण म्हणजे प्रयत्नांचा अभाव!”

    आपल्याला उद्योजक व्हायचंय हा निर्णय घेणं एक कठीण काम आहे, पण पटकन यश मिळत नसताना आणि वारंवार अपयशाची चव चाखावी लागत असतानासुद्धा त्याच निर्णयाला चिकटून राहणं हे महाकठीण काम आहे.

    आपल्या आयुष्यात असं अनेकदा होतं कि; आपण काम करत राहतो, पण आपल्याला त्या कामाचं फळ मिळत नाही अगदी असंच उद्योजक म्हणून काम करताना तुम्हाला मेहनत करावी लागू शकते, पण केलेल्या मेहनतीचा मोबदला मिळेल का नाही याची काही खात्री नसते. त्याचबबरोबर अनेक आव्हानं, समाजाचा दबाव हे सुद्धा आहेच. ही ती आव्हाने असतात जी तुम्हाला नाउमेद करतात आणि प्रयत्न सोडायला भाग पाडतात. या अशा अडचणीच्या परिस्थितीतून तर एकच गोष्ट तुम्हाला टिकवून ठेवू शकते आणि ती म्हणजे प्रयत्न, प्रयत्न आणि प्रयत्न!

    या सर्व संकटांच्या छातीवर पाय ठेऊन तुम्ही तुमचे उद्योजकतेचे स्वप्न जपले पाहिजे, थोड्याश्या अपयशाने खचून न जाता प्रयत्न निरंतर चालू ठेवले पाहिजे. याबाबतीत सर्वात सोपं उदाहरण म्हणजे नदीचं! नदी सर्व खडकांतून मार्ग काढत पुढे जात राहते, ती शक्तीमुळे नाही, तर सतत पुढे जाण्याच्या वृत्तीमुळे! खडकांच्या भीतीने नदीने आपला प्रवाह थांबवला तर त्याच नदीचं डबकं व्हायला फार वेळ लागत नाही. त्यामुळं वाहत रहा आणि प्रयत्न करत रहा, कारण एक दिवस यश तुमच्या हातात असेल. 

    हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि नवी अर्थक्रांतीच्या चॅनेलला आताच subscribe करा. 

    आणखी वाचा

  • Comfort Zone मधून बाहेर पडा, नाहीतर पश्चाताप होईल.

    Comfort Zone मधून बाहेर पडा, नाहीतर पश्चाताप होईल.

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे Comfort Zone मधून बाहेर पडा, नाहीतर पश्चाताप होईल…’ करायची सुरवात?

    काही व्यक्तींमध्ये रिस्क घ्यायची हिंमत नसते. अशी लोकं नेहमी आरामदायक, सुरक्षित व जोखीमरहित पर्यायांचा अवलंब करीत असतात. वैयक्तिक व प्रोफेशनल जीवनात ‘कम्फर्ट झोन’ ही अशा जागा आहे की त्यात अडकलेला माणूस कधीच आव्हांनाना सामोरे जाण्यास मानसिकदृष्ट्या तयार नसतो. त्यामुळे तो कायमच संभाव्य अडचणीबद्दल गाफील राहत असतो. Comfort Zone मध्ये अडकलेल्या व्यक्तींचा विकास हा खुंटलेला असतो. Comfort Zone त्यांना प्रगतीच्या संधीचा फायदा घेण्यापासून रोखत असतो. सतत कम्फर्ट झोनमध्ये राहिल्याने माणूस नवीन आव्हाने पेलण्यास असमर्थ ठरतो किंवा संभाव्य अडचणींबद्दल त्याच्यात जागरूकता निर्माण होत नाही.

    एक प्रयोग केला गेला होता. एका काचेच्या बरणीत धान्य भरून ठेवले होते. एक उंदीर त्यात सोडला. जेव्हा बरणी पूर्ण भरलेली होती तेव्हा उंदराला वाटले की, आता शांतपणे धान्य खाईन, काही अडचण नाही. त्यामुळे तो तिथेच राहिला व बरणीतील धान्याचा उपभोग घेऊ लागला. असे करता करता एक दिवस सर्व धान्य संपले. आता उंदीर बरणीत एकदम तळाला होता आणि दुर्भाग्य म्हणजे तो आता त्यातून बाहेरही पडू शकत नव्हता. फक्त बाहेर पाहून रडण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

    म्हणूनच तरुण वयात नवनवीन आव्हाने स्वीकारा, त्यातून बरेच काही शिकता येईल, परंतु केवळ आरामदायी सुरक्षित वाटणाऱ्या कम्फर्ट झोनमध्ये अडकू नका, कारण ते एक जाळे असते. त्यात दीर्घकाळ अडकाल, तर तुमच्या विकासाचे सर्व दरवाजे बंद होतील व वेळही निघून गेलेली असेल. जेव्हा तुम्ही मनातील भीती व चिंता बाजूला सारून नवीन आव्हानांचा सामना करता, तेव्हा तुमच्या यशस्वी वाटचालीस सुरुवात झालेली असते. दुर्दैवाने बरेच लोक कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यास मानसिकरित्या तयार नसतात. त्यांना आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असते; परंतु नवीन जोखिमा आणि आव्हानांना पेलण्यास ते घाबरत असतात. त्यांना जे सुरक्षित वाटते, त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात. कम्फर्ट झोन ही स्वतःला घातलेली मर्यादा असते; जिथे माणूस जीवनात पुढे जाण्याबाबत साशंक असतो, बऱ्याचदा नवीन आव्हानांबाबत चिंताग्रस्त व नर्व्हस असतो. उदाहरण घ्यायचे तर आपल्या लोकांचे घ्या. उद्योगात जोखीम घ्यावी लागते. त्यामुळे लोकांना उद्योग क्षेत्र असुरक्षित वाटते, परंतु नोकरी हा उत्पन्नाचा शाश्वत व सुरक्षित मार्ग म्हणून नोकरीसाठीच शिकतात. हा झाला कम्फर्ट झोन… मग सांगा आपल्यामध्ये उद्योजक कसे घडणार?

    तुम्ही केलात का कधी असा प्रयत्न तुमचा कम्फर्ट झोन सोडण्याचा? केला असाल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

    आणखी वाचा