नवी अर्थक्रांती

Category: उद्योजकता

  • अपमानाचे उत्तर ‘यशाने’ दिलं! सुधीर जाटिया आणि ‘सफारी’ ब्रँडचा प्रेरणादायी प्रवास

    अपमानाचे उत्तर ‘यशाने’ दिलं! सुधीर जाटिया आणि ‘सफारी’ ब्रँडचा प्रेरणादायी प्रवास

    यशाचा ‘सफारी’ पॅटर्न: हार न मानता अपयशालाच ताकद बनवणाऱ्या सुधीर जाटियांची गोष्ट.

    यश हे कधीच एका रात्रीत मिळत नाही. त्यामागे सातत्यपूर्ण मेहनत, स्वतःवरचा ठाम विश्वास, प्रचंड जिद्द आणि अपयशातून शिकण्याची तयारी लागते. अनेक लोक अडचणी आल्या की थांबतात, पण काही मोजकेच लोक अपयशालाच आपली ताकद बनवून पुढे जातात आणि खऱ्या अर्थाने यश मिळवतात. अशा लोकांचा प्रवास नेहमीच प्रेरणा देणारा असतो.

    कधी कधी यशाची खरी सुरुवात अपमान, दुर्लक्ष आणि नाकारण्यातून होते. अशाच एका प्रेरणादायी प्रवासाचं नाव आहे,  सुधीर जाटिया. अत्यंत साध्या सुरुवातीपासून ते आज करोडोंची कंपनी उभारण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. आजच्या लेखात आपण त्यांच्या व्यवसायिक प्रवासावर एक नजर टाकणार आहोत.

    करिअरची सुरुवात 

    वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी सुधीर जाटिया यांनी VIP Industries मध्ये Aristocrat (Value Luggage) या विभागात ट्रेनी म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्या काळात अनेकांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास नव्हता. मात्र त्यांनी हार न मानता मेहनत, बारकाईने निरीक्षण करण्याची सवय आणि बाजाराची सखोल समज विकसित केली.

    या गुणांच्या जोरावर त्यांनी हळूहळू स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि सर्व शंका चुकीच्या ठरवल्या. अवघ्या १२ वर्षांत ते VIP Industries चे Vice President (VP) बनले. ट्रेनीपासून VP पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा त्यांच्या मेहनतीचा आणि जिद्दीचा खरा पुरावा आहे.

    ब्रँडिंगचा मास्टरस्ट्रोक

    सुधीर जाटिया यांनी VIP Industries च्या ब्रँडिंगमध्ये मोठा आणि धाडसी बदल केला. त्यांनी कंपनीचं संपूर्ण पोर्टफोलिओ नव्यानं मांडून प्रत्येक ब्रँडची वेगळी ओळख ठरवली. VIP ब्रँडला त्यांनी प्रीमियम आणि बिझनेस-क्लास सेगमेंटमध्ये स्थान दिलं, ज्यामुळे तो दर्जेदार आणि विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळखला जाऊ लागला.

    त्याच वेळी Aristocrat ब्रँडला तरुण पिढीसाठी परवडणारा, मजबूत आणि व्हॅल्यू-फॉर-मनी ब्रँड म्हणून सादर करण्यात आलं. या स्पष्ट रणनीतीचा थेट परिणाम कंपनीच्या आर्थिक कामगिरीवर दिसून आला आणि २०१० पर्यंत VIP Industries ही कंपनी १० कोटींच्या तोट्यातून बाहेर येत थेट ५६ कोटींच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नफ्यापर्यंत पोहोचली.

    टर्निंग पॉइंट 

    इतकं मोठं यश मिळवूनही २०१० साली व्यवस्थापनाने नवीन Lead VP नेमला आणि सुधीर जाटिया हळूहळू निर्णयप्रक्रियेतून बाजूला केलं. हा प्रसंग कुणालाही खचवणारा ठरला असता, कारण इतक्या मेहनतीनंतरही दुर्लक्ष होणं वेदनादायक असतं.

    पण सुधीर यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतःशीच एक ठाम निर्णय घेतला की उत्तर शब्दांनी नाही, तर यशातून द्यायचं. त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय त्यांच्या आयुष्यातील खरा वळणबिंदू ठरला.

    Safari ची निवड 

    २०११ मध्ये Safari ही एक लिस्टेड लगेज कंपनी होती, मात्र तिचा वार्षिक नफा केवळ २.६५ कोटींच्या मर्यादेत अडकलेला होता. VIP ला खऱ्या अर्थाने टक्कर देण्यासाठी Safari हाच योग्य ब्रँड आहे, हे सुधीर जाटिया यांनी अचूक ओळखलं. सप्टेंबर २०११ मध्ये त्यांनी २९ कोटींची गुंतवणूक करत Safari मध्ये ४१.३४% भागीदारी मिळवली आणि कंपनीच्या मालकीत प्रवेश केला.

    Safari मध्ये पाऊल टाकताच सुधीर यांनी ग्राहककेंद्री धोरण राबवलं. त्यांचा पहिला निर्णयच धक्कादायक होता तो म्हणजे वॉरंटीमध्ये आलेल्या बॅग दुरुस्त न करता थेट नवीन बॅग देण्याचा आदेश. यामुळे डिझाईन आणि उत्पादन टीमवर गुणवत्तेबाबत प्रचंड दबाव आला. त्याचबरोबर त्यांनी मटेरियल, टिकाऊपणा आणि उत्पादन प्रक्रियेवर पुन्हा लक्ष केंद्रित केलं आणि “Quality First” ही फक्त टॅगलाईन न राहता कंपनीची संस्कृती बनली. विक्री वाढवण्यासाठी त्यांनी Big Bazaar, Reliance Trends, Spencer’s यांसारख्या रिटेल चॅनेल्ससोबत भागीदारी केली आणि Amazon व Flipkart वर जाणारा भारतातील पहिला लगेज ब्रँड म्हणून Safari ने आपली वेगळी ओळख निर्माण केली. याच टप्प्यावरून Safari च्या यशाची खरी सुरुवात झाली.

    झपाट्याने वाढ आणि स्पर्धेत आघाडी

    २०१५ पर्यंत Safari ची विक्री १५० कोटींवर पोहोचली होती, ज्यातील सुमारे ३०% विक्री ई-कॉमर्समधून होत होती. २०१६ मध्ये Genius आणि Magnum या ब्रँड्सचे अधिग्रहण करून Safari ने शालेय बॅग्स आणि बजेट लगेज सेगमेंटमध्ये आपला विस्तार केला. या झपाट्याने होत असलेल्या वाढीमुळे VIP आणि Samsonite सारखे दिग्गज ब्रँडही सावध झाले.

    VIP ने aspirational branding वर भर दिला, Samsonite ने पूर्णपणे ऑफलाइन नेटवर्कवर विश्वास ठेवला, तर Safari ने स्टायलिश जाहिराती, मोठ्या रिटेल स्टोअर्स आणि मजबूत ई-कॉमर्स या तिन्हींचा प्रभावी मेळ साधला. या स्मार्ट रणनीतीचा परिणाम असा झाला की २०१९ पर्यंत Safari ची विक्री ६०० कोटींवर पोहोचली आणि Samsonite ला मागे टाकत Safari भारतातील नंबर २ लगेज कंपनी बनली. COVID-19 च्या कठीण काळातही Safari ने १००% ऑर्डर्स पूर्ण करून आपली विश्वासार्हता आणि ताकद सिद्ध केली.

    यशाच्या शिखरावर 

    २०२३ पर्यंत VIP Industries ची मार्केट कॅप ८,४७६ कोटी होती, तर Safari ची विक्री १,२१२ कोटींवर पोहोचली. कंपनीची एकूण मार्केट व्हॅल्यूएशन ९,२७३ कोटी झाली आणि सुधीर जाटिया यांचं “उत्तर” सगळ्यांनाच दिसून आलं.

    आज Safari ची स्थिती आणखी मजबूत आहे . विक्री १,८०० कोटी, नफा १८५.५७ कोटी, ८०० हुन अधिक  प्रॉडक्ट्स आणि ९,३०० टचपॉइंट्ससह. कंपनीची मार्केट व्हॅल्यूएशन आता १०,७३४ कोटींवर पोहचलं आहे आणि Safari आज भारतातील सर्वात वेगाने वाढणारी लगेज कंपनी म्हणून ओळखली जाते.

    आणखीन वाचा:

  • नादच खुळा! सॉफ्टवेअर इंजिनिअरने उभारला ११,२२७ कोटींचा ब्रँड; BlueStone च्या यशाचं नेमकं गुपित काय?

    आजच्या काळात ‘Set Life’ सोडून अनिश्चिततेच्या वाटेवर चालण्याचं धाडस फार कमी लोक करतात. जेव्हा हाताशी IIT दिल्लीची पदवी आणि खिशात Amazon सारख्या जागतिक कंपनीचा कोट्यवधींचा पगार असतो, तेव्हा लोक सहसा स्थिरावण्याचा विचार करतात. पण गौरव सिंग कुशवाहा हे वेगळ्या मातीचे बनले होते. एका साध्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने भारतातील ज्वेलरी मार्केटचा चेहरामोहरा कसा बदलला आणि ११,२२७ कोटींचे साम्राज्य कसे उभे केले? चला जाणून घेऊया BlueStone च्या यशाचं ‘अस्सल’ गुपित!

    करिअरची सुरुवात 

    गौरव सिंग कुशवाहा यांचा प्रवास सुरू झाला IIT दिल्ली मधून. कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केल्यावर त्यांच्यासमोर यशाचे पायघड्या अंथरल्या होत्या. त्यांनी Amazon मध्ये सिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून भारत आणि अमेरिकेत काम केले. पैसा, प्रतिष्ठा आणि सुख सोयी सर्व काही होते. पण त्यांच्या मनात एक स्वप्न सतत धडका मारत होतं – “स्वतःचं काहीतरी निर्माण करायचं!”

    ठरलेल्या चौकटीत राहण्यापेक्षा स्वतःचा नवा रस्ता शोधण्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर दीड वर्षातच त्यांनी सुरक्षित नोकरीला रामराम ठोकला आणि उद्योजकतेच्या मैदानात उडी घेतली.

    पहिलं अपयश: जेव्हा स्वप्नांना ब्रेक लागला

     Amazon मध्ये सुमारे दीड वर्ष काम केल्यानंतर गौरव सिंग कुशवाहा यांनी धाडसी निर्णय घेत नोकरी सोडली आणि “Chapak” नावाचं ऑनलाइन मूव्ही पोर्टल सुरू केलं. 

    तब्बल ४ वर्षे त्यांनी यावर जीवापाड मेहनत घेतली. पण म्हणतात ना, “वेळ आणि काळ” नेहमी आपल्या बाजूने नसतो. त्या काळात स्मार्टफोनचा वापर फारसा नव्हता आणि व्यवसायासाठी ठोस कमाईचं मॉडेल तयार झालं नव्हतं. त्यामुळे Chapak अपेक्षेप्रमाणे वाढू शकला नाही.

    पण गौरव खचले नाहीत. या अपयशाने त्यांना एक मौल्यवान धडा दिला: फक्त कल्पना चांगली असणं पुरेसं नसतं, तर योग्य वेळ, योग्य बाजारपेठ आणि लोकांची खरी गरज ओळखणं तितकंच महत्त्वाचं असतं.

    समस्येतून संधीचा शोध

    या अपयशाच्या काळात गौरव सिंग कुशवाहा यांनी बाजाराकडे नव्या नजरेने पाहायला सुरुवात केली. त्यांना जाणवलं की भारतातील ज्वेलरी मार्केट प्रचंड मोठं आहे, तरीही त्याचा अगदी कमी भाग ऑनलाइन उपलब्ध आहे. Flipkart आणि Amazonसारखे प्लॅटफॉर्म असूनही फाइन ज्वेलरीची विक्री जवळजवळ पूर्णपणे ऑफलाइनच होत होती. 

    ज्वेलरी खरेदी ही केवळ वस्तू खरेदी नसून ती विश्वासावर आधारित प्रक्रिया होती. मर्यादित डिझाइन्स, किमती आणि शुद्धतेबाबत स्पष्ट माहिती नसणं, तसेच ग्राहकांना योग्य मार्गदर्शन न मिळणं या मोठ्या अडचणी होत्या. ह्याच समस्या ओळखून गौरव यांनी त्यावर उपाय शोधण्याचं ठरवलं आणि इथूनच एका नव्या संधीची बीजं रोवली गेली. 

    BlueStone चा जन्म

    ऑनलाइन शॉपिंगची लाट येत असताना सोन्या-चांदीचे दागिने ऑनलाइन का विकले जाऊ नयेत? याच प्रश्नातून२०११ साली गौरव यांनी विद्या यांना सहसंस्थापक म्हणून सोबत घेतलं आणि BlueStone या ऑनलाइन ज्वेलरी ब्रँडची सुरुवात केली. हा ब्रँड डिझाइनला प्राधान्य देणारा आणि तंत्रज्ञानावर आधारित होता. “Blue” म्हणजे विश्वास आणि “Stone” म्हणजे कारागिरी, या दोन मूल्यांवर BlueStone उभा राहिला. 

    ऑनलाइन ज्वेलरी खरेदी ही संकल्पनाच नवीन असल्याने सुरुवातीपासूनच हा प्रवास आव्हानात्मक होता. ग्राहकांचा विश्वास जिंकणं हे BlueStone समोरचं सर्वात मोठं आव्हान होतं.  सुरुवातीला लोकांच्या मनात भीती होती – “ऑनलाइन सोनं कसं काय घ्यायचं?” ही भीती घालवण्यासाठी गौरव यांनी भन्नाट आयडिया वापरल्या:

    • Try at Home: दागिने विकत घेण्यापूर्वी घरी बसून ट्राय करण्याची सोय.
    • पारदर्शकता: प्रत्येक दागिन्याचं कॅरेट वजन, शुद्धता आणि हॉलमार्क सर्टिफिकेटची पूर्ण माहिती.
    • Customization: ग्राहकांच्या आवडीनुसार दागिने बनवून मिळण्याची सोय.

    यामुळे BlueStone वरचा लोकांचा विश्वास वाढला आणि ऑर्डरचा ओघ सुरू झाला

    गुंतवणूक आणि वेगवान वाढ

    BlueStone ने इन्व्हेंटरी-लाइट आणि ऑर्डर-वर-निर्मिती मॉडेल स्वीकारलं, ज्यामुळे खर्च कमी राहिला आणि व्यवसाय सहज वाढू लागला. सुरुवातीला Accel, Kalaari आणि Saama कडून ६० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, आणि २०१५ पर्यंत महसूल ८० कोटी रुपये झाला. नंतर Accel, IvyCap आणि रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली १०० कोटी रुपये अधिक गुंतवले गेले. एका वर्षातच कंपनी दरमहा ७,००० ऑर्डर्स पूर्ण करू लागली, ज्यात सरासरी विक्री २५,००० रुपये होती.

    ऑनलाइन ते ऑफलाइन प्रवास

    गौरव यांना लक्षात आलं की ज्वेलरी मार्केटमधला ऑनलाइन हिस्सा फक्त 0.५% आहे. मोठ्या प्रमाणावर वाढीसाठी ऑफलाइन स्टोअर्स उघडणे आवश्यक होते. त्यामुळे २०१८ मध्ये दिल्लीच्या Pacific Mall मध्ये पहिलं फिजिकल स्टोअर उघडलं. २०१९ पर्यंत BlueStone कडे २० स्टोअर्स झाले आणि महसूल ५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. रोमँटिक-मुव्ही थीमवर आधारित LoveLike कॅम्पेनमुळे Millennials आणि Gen Z मध्ये ब्रँड खूप लोकप्रिय झाला. पाहता पाहता स्टोअर्सची संख्या १७५ च्या पार गेली.

    आणखीन वाचा:

  • श्वेत क्रांतीचा शिल्पकार: डॉ. वर्गीस कुरियन आणि अमूलची यशोगाथा – Amul Success Story

    श्वेत क्रांतीचा शिल्पकार: डॉ. वर्गीस कुरियन आणि अमूलची यशोगाथा – Amul Success Story

    डॉ. वर्गीस कुरियन यांची ओळख आणि सुरुवात

    डॉ. वर्गीस कुरियन हे आधुनिक भारताच्या कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२१ रोजी केरळ राज्यात झाला. त्यांनी भौतिकशास्त्र आणि अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेतले होते आणि त्यांना मूळतः शासकीय सेवेत काम करण्याची इच्छा नव्हती. मात्र, नियतीने त्यांना गुजरातमधील आनंद या छोट्या शहरात आणले आणि येथूनच भारतीय दुग्धक्रांतीचा इतिहास घडू लागला. त्या काळात भारत दूध उत्पादनात खूप मागे होता आणि शेतकरी खासगी व्यापाऱ्यांच्या शोषणाला बळी पडत होते. दूध उत्पादकांना योग्य दर मिळत नव्हता आणि ग्रामीण अर्थव्यवस्था कमकुवत होती. अशा परिस्थितीत डॉ. कुरियन यांनी शेतकऱ्यांच्या मालकीची, शेतकऱ्यांसाठी चालवली जाणारी सहकारी संस्था उभारण्याचा विचार मांडला. त्यांचा ठाम विश्वास होता की जर शेतकऱ्यांना निर्णयप्रक्रियेत सामील केले, तर ते स्वतःचे जीवनमान सुधारू शकतात. हीच विचारधारा पुढे अमूल आणि श्वेत क्रांतीचा पाया ठरली. 

    अमूलची स्थापना आणि सहकारी चळवळ

    १९४६ साली गुजरातमधील कैरा जिल्ह्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ स्थापन केला, ज्यालाच पुढे “अमूल” म्हणून ओळख मिळाली. डॉ. वर्गीस कुरियन यांनी या संघटनेचे तांत्रिक आणि व्यवस्थापकीय नेतृत्व स्वीकारले. अमूलची सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे “शेतकरी हा मालक” ही संकल्पना. दूध थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करून प्रक्रिया केली जाऊ लागली आणि नफा मध्यस्थांकडे न जाता थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू लागला. यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळाला. अमूलने आधुनिक दुग्धप्रक्रिया तंत्रज्ञान, थंड साखळी व्यवस्था आणि गुणवत्तेवर आधारित उत्पादन पद्धती स्वीकारल्या. बटर, चीज, दूध पावडर यांसारखी उत्पादने तयार होऊ लागली. अमूलचा यशस्वी सहकारी मॉडेल पाहून संपूर्ण देशात अशाच संघटनांची उभारणी होण्यास सुरुवात झाली. यामुळे सहकारी चळवळ एक राष्ट्रीय आंदोलन बनली. 

    श्वेत क्रांती आणि ऑपरेशन फ्लड

    डॉ. वर्गीस कुरियन यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या दुग्ध चळवळीला राष्ट्रीय स्तरावर ऑपरेशन फ्लड या नावाने ओळख मिळाली. हे जगातील सर्वात मोठे कृषी विकास कार्यक्रमांपैकी एक मानले जाते. १९७० साली सुरू झालेल्या या योजनेचा उद्देश भारताला दूध उत्पादनात स्वयंपूर्ण बनवणे हा होता. ऑपरेशन फ्लडमुळे ग्रामीण भागातील लाखो शेतकरी थेट शहरी बाजारपेठांशी जोडले गेले. दूध संकलन केंद्रे, प्रक्रिया केंद्रे आणि वाहतूक व्यवस्था उभारली गेली. यामुळे दूध वाया जाण्याचे प्रमाण कमी झाले आणि ग्राहकांना दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थ मिळू लागले. या क्रांतीमुळे भारत काही दशकांतच जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला. श्वेत क्रांतीने केवळ उत्पादन वाढवले नाही, तर ग्रामीण रोजगार, महिलांचा सहभाग आणि आर्थिक स्थैर्य यांनाही चालना दिली. डॉ. कुरियन यांची ही कामगिरी केवळ कृषी क्षेत्रापुरती मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन ठरली.

    शेतकरी, महिला आणि ग्रामीण विकास

    श्वेत क्रांतीचा सर्वात मोठा फायदा ग्रामीण शेतकऱ्यांना झाला. डॉ. वर्गीस कुरियन यांनी दुग्धव्यवसायाला केवळ उद्योग न मानता ग्रामीण विकासाचे साधन मानले. अमूलच्या सहकारी संस्थांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढला. अनेक महिलांना पहिल्यांदाच स्वतःचे उत्पन्न मिळू लागले आणि त्यांचा सामाजिक दर्जा उंचावला. दूध विक्रीतून मिळणारे नियमित उत्पन्न शिक्षण, आरोग्य आणि पोषणासाठी वापरले जाऊ लागले. यामुळे ग्रामीण जीवनमानात मोठा बदल झाला. लहान आणि सीमांत शेतकऱ्यांनाही या व्यवस्थेत समान संधी मिळाली. कोणताही भेदभाव न करता दूध गुणवत्तेनुसार दर दिले जाऊ लागले. या व्यवस्थेने शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवले आणि गाव पातळीवर नेतृत्व विकसित केले. डॉ. कुरियन यांचा ठाम विश्वास होता की खरी विकास प्रक्रिया तळागाळापासून सुरू झाली पाहिजे. त्यांची ही दृष्टी आजही भारताच्या ग्रामीण विकास धोरणांसाठी प्रेरणादायी आहे.

    डॉ. वर्गीस कुरियन यांचे कार्य केवळ भारतापुरते मर्यादित राहिले नाही. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी मान्यता मिळाली. त्यांनी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB) ची स्थापना करून दुग्धविकासाला संस्थात्मक स्वरूप दिले. त्यांच्या नेतृत्वशैलीत प्रामाणिकपणा, शिस्त आणि शेतकऱ्यांप्रती निष्ठा दिसून येते. त्यांनी कधीही बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावाला बळी न पडता देशहित आणि शेतकरीहिताला प्राधान्य दिले. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे भारताचे सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आले. अनेक देशांनी भारतीय दुग्ध सहकारी मॉडेलचा अभ्यास करून ते आपल्या देशात राबवले. डॉ. कुरियन हे केवळ प्रशासक नव्हते, तर दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी दाखवून दिले की योग्य व्यवस्थापन आणि प्रामाणिक उद्देश असतील, तर कोणतेही राष्ट्र आत्मनिर्भर होऊ शकते.

    डॉ. वर्गीस कुरियन यांचे २०१२ साली निधन झाले, पण त्यांचे विचार आणि कार्य आजही जिवंत आहेत. अमूल हा आज भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रँडपैकी एक आहे आणि लाखो शेतकऱ्यांचे जीवन त्याच्याशी जोडलेले आहे. श्वेत क्रांतीमुळे भारताची अन्नसुरक्षा मजबूत झाली आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला स्थैर्य मिळाले. आजही “शेतकऱ्यांच्या मालकीचा उद्योग” ही संकल्पना अनेक नव्या स्टार्टअप्स आणि सहकारी संस्थांसाठी आदर्श ठरत आहे. डॉ. कुरियन यांचा वारसा आपल्याला सामाजिक जबाबदारी, स्वदेशी विचार आणि आत्मनिर्भरतेचे महत्त्व शिकवतो. त्यांनी दाखवलेला मार्ग केवळ दूध उत्पादनापुरता मर्यादित न राहता इतर कृषी क्षेत्रांनाही लागू पडतो. त्यामुळेच त्यांना भारताला दूध उत्पादक देश बनवणारा श्वेत क्रांतीचा जनक असे सन्मानाने संबोधले जाते. त्यांचे जीवन हे सेवाभाव, नेतृत्व आणि परिवर्तनाची प्रेरणादायी कथा आहे.

    आणखीन वाचा:

  • जगातील सर्वात Futuristic टेक्नॉलॉजीमध्ये क्रांती घडवणारा Visionary उद्योजक – Elon Musk

    जगातील सर्वात Futuristic टेक्नॉलॉजीमध्ये क्रांती घडवणारा Visionary उद्योजक – Elon Musk

    Elon Musk – आजचे जग वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञान, विज्ञान आणि मानवाच्या कल्पनाशक्तीला नवे आयाम मिळत आहेत. अशा काळात Elon Musk हे नाव फक्त एक उद्योगपती म्हणून नाही, तर भविष्यातील मानवजातीसाठी स्वप्न पाहणारा एक visionary म्हणून ओळखले जाते. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला हा मुलगा लहानपणापासूनच वेगळा विचार करणारा होता. त्याला पैसा कमवण्यापेक्षा समस्या सोडवण्यात जास्त रस होता. “मानवजातीचं भवितव्य अधिक सुरक्षित आणि प्रगत कसं होईल?” हा प्रश्न त्याला सतत पडायचा. Elon Musk याने कधीही सोपा मार्ग निवडला नाही. अपयश, टीका, आर्थिक अडचणी या सगळ्यांचा सामना करूनही तो मागे हटला नाही. त्याच्या मते, भविष्यासाठी मोठी स्वप्न पाहणं आणि ती सत्यात उतरवण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देणं, हाच खरा यशाचा मार्ग आहे. Tesla आणि SpaceX या कंपन्या फक्त व्यवसाय नाहीत, तर मानवजातीच्या भविष्यासाठी केलेले प्रयत्न आहेत. म्हणूनच Elon Musk ला जगातील सर्वात futuristic टेक्नॉलॉजीमध्ये क्रांती घडवणारा visionary उद्योजक म्हटलं जातं.

    Tesla ही कंपनी सुरू करताना Elon Musk चा उद्देश फक्त इलेक्ट्रिक कार बनवणं नव्हता. त्याला पृथ्वीचं पर्यावरण वाचवायचं होतं. वाढतं प्रदूषण, पेट्रोल-डिझेलवरचं अवलंबित्व आणि हवामान बदल यामुळे मानवजातीला मोठा धोका निर्माण झाला आहे, हे त्याला लवकर समजलं. Tesla ने इलेक्ट्रिक वाहनांना फक्त पर्यावरणपूरक नाही, तर आकर्षक, शक्तिशाली आणि आधुनिक बनवलं. आज Tesla कार्स वेग, सेफ्टी आणि टेक्नॉलॉजीसाठी ओळखल्या जातात. Autopilot, AI-based driving, over-the-air software updates यामुळे गाड्या “स्मार्ट” झाल्या. Tesla मुळे जगभरातील मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांना इलेक्ट्रिक वाहनांकडे वळावं लागलं. ही एक मोठी क्रांती होती. Elon Musk ने दाखवून दिलं की पर्यावरणाचं रक्षण करतानाही प्रगती करता येते. Tesla हा केवळ एक ब्रँड नाही, तर स्वच्छ आणि शाश्वत भविष्याकडे नेणारा एक मार्ग आहे. ही दृष्टी म्हणजेच futuristic thinking.

    SpaceX ही Elon Musk ची अजून एक धाडसी कल्पना आहे. “मानवाने पृथ्वीच्या पलीकडे जायला हवं” हा विचार त्याच्या मनात खोलवर रुजलेला आहे. पूर्वी अंतराळ प्रवास म्हणजे फक्त सरकारांचा आणि प्रचंड खर्चाचा विषय होता. पण SpaceX ने हे चित्र बदलून टाकलं. Reusable rockets ही कल्पना प्रत्यक्षात आणून Elon Musk ने अंतराळ प्रवासाचा खर्च खूप कमी केला. Falcon 9 आणि Falcon Heavy या रॉकेट्सने इतिहास घडवला. NASA सोबत काम करून SpaceX ने अंतराळवीरांना सुरक्षितपणे International Space Station वर पाठवलं. हे अमेरिका साठी मोठं यश होतं. याहूनही महत्त्वाचं म्हणजे, Mars वर मानव वसाहत बसवण्याचं स्वप्न Elon Musk आजही पाहतो आहे. अनेकांना हे अशक्य वाटतं, पण इतिहास सांगतो की जे लोक अशक्य गोष्टींची स्वप्न पाहतात, तेच जग बदलतात. SpaceX मानवजातीला “multi-planetary species” बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.

    Elon Musk च्या यशामागे केवळ बुद्धिमत्ता नाही, तर अपार मेहनत आणि अपयशातून शिकण्याची तयारी आहे. Tesla आणि SpaceX दोन्ही कंपन्या अनेक वेळा अपयशाच्या उंबरठ्यावर उभ्या होत्या. रॉकेट्स अपयशी ठरले, Tesla ला आर्थिक संकटांचा सामना करावा लागला, पण Elon Musk कधीही हार मानली नाही. तो स्वतः सांगतो की, अनेक वेळा त्याने स्वतःचं सगळं भांडवल या कंपन्यांमध्ये गुंतवलं होतं. झोप कमी, ताण जास्त, पण ध्येय स्पष्ट. त्याच्या मते, “जर तुम्हाला एखादी गोष्ट खरंच महत्त्वाची वाटत असेल, तर अपयश आलं तरी ती करायलाच हवी.” हीच वृत्ती त्याला इतरांपेक्षा वेगळं बनवते. तो फक्त CEO नाही, तर engineer, problem-solver आणि dreamer आहे. Elon Musk चं आयुष्य हे सांगतं की यश म्हणजे सोपं नसतं, पण प्रयत्न सोडणं हेच खरं अपयश असतं.

    Elon Musk हा फक्त उद्योगपती नाही, तर भविष्यातील समाजाची दिशा ठरवणारा विचारवंत आहे. Artificial Intelligence, Renewable Energy, Space Exploration याबद्दल त्याची मतं स्पष्ट आहेत. AI चा योग्य वापर झाला तर मानवजातीसाठी तो वरदान ठरू शकतो, पण चुकीचा वापर धोकादायक ठरू शकतो, याची जाणीव तो सतत करून देतो. Solar energy आणि battery storage द्वारे ऊर्जा क्षेत्रात बदल घडवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्याला असं जग हवं आहे जिथे तंत्रज्ञान माणसाच्या फायद्यासाठी काम करेल. पैसा, प्रसिद्धी यापेक्षा मोठं ध्येय त्याच्यासाठी मानवजातीचं अस्तित्व आणि प्रगती आहे. म्हणूनच त्याचे निर्णय अनेक वेळा धाडसी आणि वेगळे असतात. तो लोकांच्या टीकेला घाबरत नाही, कारण त्याचं लक्ष वर्तमानापेक्षा भविष्यावर असतं.

    Elon Musk च्या प्रवासातून तरुणांसाठी खूप मोठी प्रेरणा मिळते. सामान्य कुटुंबातून आलेला हा मुलगा आज जग बदलणाऱ्या कल्पनांचा नेता आहे. त्याने दाखवून दिलं की डिग्री, पैसा किंवा परिस्थितीपेक्षा विचारांची उंची महत्त्वाची असते. मोठं स्वप्न पाहणं आणि त्यासाठी कठोर परिश्रम करणं, हेच यशाचं गमक आहे. अपयश आलं तरी स्वतःवर विश्वास ठेवणं, सतत शिकत राहणं आणि बदल स्वीकारणं, हे गुण आजच्या पिढीने आत्मसात केले पाहिजेत. Elon Musk चं आयुष्य सांगतं की “Impossible” हा शब्द फक्त शब्दकोशात असतो, माणसाच्या इच्छाशक्तीत नाही. त्याची कहाणी लाखो तरुणांना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकवते.

    एकूणच, Elon Musk हा आधुनिक काळातील एक अद्वितीय visionary उद्योजक आहे. Tesla आणि SpaceX या कंपन्यांद्वारे त्याने भविष्यातील तंत्रज्ञानाची दिशा बदलली आहे. पर्यावरण रक्षण, स्वच्छ ऊर्जा, सुरक्षित वाहतूक आणि अंतराळ संशोधन या क्षेत्रांत त्याने घडवलेली क्रांती जगासाठी मार्गदर्शक ठरत आहे. तो परिपूर्ण नाही, त्याच्यावर टीकाही होते, पण त्याचा प्रभाव नाकारता येत नाही. Elon Musk आपल्याला हे शिकवतो की जर तुमचं ध्येय मानवतेच्या भल्यासाठी असेल, तर अडचणी तुम्हाला थांबवू शकत नाहीत. भविष्य घडवणारे लोक तेच असतात जे आज वेगळा विचार करायला धजावतात. म्हणूनच Elon Musk हा खरंच जगातील सर्वात futuristic टेक्नॉलॉजीमध्ये क्रांती घडवणारा visionary उद्योजक आहे.

  • डब्बावाल्यांची 130 वर्षांची यात्रा – Mumbai Cha Dabbawala

    डब्बावाल्यांची 130 वर्षांची यात्रा – Mumbai Cha Dabbawala

    मुंबईच्या प्रचंड गोंगाटात, लोकलच्या धडधडत्या रुळांवरून दररोज लाखो स्वप्नं धावत असतात आणि त्या स्वप्नांच्या पोटात उबदार घरच्या जेवणाचा सुगंध पोहोचवण्याचं काम गेली शंभर वर्षे एक निष्ठावान हातांची फौज करत आली आहे… मुंबईचे डब्बावाले. हे फक्त डबे वाहून नेणारे कामगार नाहीत; ते शहराच्या अर्थव्यवस्थेचे शांत, न दिसणारे कणा आहेत. दररोज २ लाखांहून अधिक डबे वेळेवर पोहोचवून ते केवळ कुटुंबांना जोडत नाहीत, तर मुंबईच्या गतीमान कामकाजाला स्थिर ठेवण्यातही महत्त्वाची भूमिका निभावतात.

    घरच्या ताज्या, पोषक जेवणाने कामगारांचे आरोग्य टिकून राहते, उत्पादकता वाढते आणि महागड्या बाहेरच्या अन्नावरील खर्च टळतो, हे सर्व एक अशा व्यवस्थापन प्रणालीमुळे, जी जगातल्या मोठ्या कंपन्यांना देखील चकित करते. त्यांच्या सायकलींचा घंटानाद हा मुंबईच्या अर्थचक्रातील एक भावनिक पण अत्यावश्यक स्पंदन आहे. मुंबईच्या डब्बावाल्यांची ही सेवा साध्या गरजेपासून निर्माण झाली. 

    घरातील आईच्या हातच्या जेवणाची ऊब, पत्नीच्या उठसुट भरल्या डब्यातील प्रेम, आणि लांब पल्ल्याच्या प्रवासात थकलेल्या कामगारांच्या पोटातील भूक. सुमारे १८९० च्या सुमारास, मुंबईतील कारखान्यात काम करणाऱ्या लोकांना घरून डबा घेऊन जाणे शक्य नसल्याने काही साध्या, मेहनती माणसांनी हे काम हळूहळू हाती घेतले. पगाराच्या चेकवर नव्हे, तर लोकांच्या विश्वासावर उभा राहिलेला हा व्यवसाय सुरुवातीला खूप छोटा होत. 

     तेव्हा ना मोठी बाजारपेठ होती, ना आर्थिक पाठबळ फक्त दोन वेळच्या जेवणाचा खर्च भागवावा एवढेच उत्पन्न, आणि त्यातही कधी कधी दिवस फाटका जायचा. पण तरीही ते रोज चालत, सायकलवरून, उन्हात-वार्‍यात, पावसात फक्त एका भावनेने काम करत राहिले: घरचे जेवण वेळेवर पोहोचले पाहिजे. हळूहळू मुंबई वाढू लागली. लाखोंनी नोकऱ्या सुरू केल्या,

    Mumbai Dabbawala

    ऑफिसांच्या इमारती उभ्या राहू लागल्या आणि शहराच्या नकाशात रोज नवी स्वप्नं जमिनीला टेकू लागली. या वाढत्या शहराला घरच्या जेवणाची ओढ आणखी वाढली. आणि तेव्हा डब्बावाल्यांची सेवा एका छोट्या गरजेपासून शहराच्या आर्थिक शिरेच्या रक्तप्रवाहासारखी बनली. जिथे आधी मोजके डबे होते, तिथे आता हजारो झाले; जिथे आधी काही कुटुंबांचे पोट चालत होते,

    तिथे आता हजारोंचा उदरनिर्वाह सुरक्षित झाला. त्यांच्या सेवेच्या नियमिततेने ऑफिसमधील उत्पादकता वाढली, महागड्या हॉटेल-खर्चावर अंकुश बसला आणि शहराच्या कामगारांना घरची ताकद मिळाली. आज ही सेवा लाखो रुपयांचा दैनंदिन आर्थिक प्रवाह सांभाळते आणि एक शतकापेक्षा अधिक काळानंतरही ती तितक्याच निष्ठेने चालते आहे कारण तिची मुळे पैशात नसून, प्रेमात, विश्वासात आणि भारतीय जीवनशैलीच्या उबदार मानवीपणात आहेत.

    मुंबईचे डब्बावाले फक्त “जेवण वाहक” नाहीत हे एक आर्थिक जीवनरेषेचे प्रतीक आहेत ज्याचा वार्षिक उलाढाल ७० ते ८० कोटी रुपयांच्या दरम्यान आहे सुमारे ५,००० डब्बावाले सामन्याने प्रतिदिन २ लाख डबे वितरीत करतात. प्रत्येक महिन्याला त्यांच्या ग्राहकांकडून अत्यंत कमी शुल्क घेतले जाते  काही रिपोर्ट्सनुसार हे ६०० ते १,२०० रुपये दरमहा आहेत.

    या सेवेमुळे हजारो डब्बावाल्यांना रोजगार मिळतो. त्यांच्या कष्टावर अवलंबून असलेल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह या छोट्या-मोठ्या आर्थिक व्यवहारातून सुरू राहतो. बऱ्याच डब्बावाल्यांचे मासिक कमाईचे प्रमाण दरम्यान ₹14,000 ते ₹20,000 पर्यंत आहे.ज्याच्या आधारावर हे स्पष्ट होते की, ही फक्त एक लोकल सेवा नाही, तर शाश्वत आणि आत्मनिर्भर आर्थिक यंत्रणा आहे.

    या आर्थिक मॉडेलमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर अगदी कमी आहे पण तरीही हे यशस्वी आहे. त्यांचे कमी खर्चाचे, पण उच्च विश्वासार्हतेचे लॉजिस्टिक नेटवर्क हेच त्यांचे बल आहे. डब्बावाल्यांच्या या मेहनतीने मुंबईच्या बहुतेक कार्पोरेट ऑफिसेसमध्ये काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना आत्मीयता आणि खाऊच्या विश्वासाचा अनुभव मिळतो, तर त्यांच्यामुळे शहरातील अर्थचक्राला एक मजबूत पाया मिळतो.

    परंतु, हे सर्वकाही नेहमी तसंच राहील असे नाही .कोविडनंतर त्यांच्या मागणीमध्ये मोठा घसरण झाल्याची माहिती आहे, ज्यामुळे आर्थिक तणाव वाढला आहे. त्यामुळे ही शाश्वत आर्थिक व्यवस्था टिकवण्यासाठी त्यांच्या समाजाचा, शहराचा आणि उद्योजकांचा पाठिंबा अति आवश्यक आहे.

    आज मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांतून डब्बावाला जाताना दिसला की, तो केवळ एक डबा वाहून नेत नाही—तो एका कुटुंबाची काळजी, घरातील उबदारपणा आणि शहराच्या धडधडत्या जीवनाला शांत ठेवणारा आधार वाहून नेतो. प्रत्येक डब्याबरोबर तो आईचे प्रेम, पत्नीचे ममत्व, मुलांच्या भविष्याची चिंता आणि घरातील आदर या सर्व भावनांना आपल्या खांद्यावर घेतो.

     त्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबात एक कुटुंब सुरक्षित राहतं आणि त्याच्या चुकामुकाविना चालणाऱ्या सेवेमुळे लाखो लोकांचा दिवस नियमानं, स्वस्थतेनं आणि समाधानानं सुरू होतो. या सर्व प्रवासात डब्बावाला नावाचा हा साधा माणूस शहराच्या अर्थचक्राचा अदृश्य नायक बनतो. 

    ज्याला ना मोठ्या कंपन्यांची जाहिरात मिळते, ना सरकारची मोठी मदत, तरीही तो आपल्या प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने देशाला व्यवस्थापनाचे सर्वोत्तम उदाहरण दाखवतो. बदलत्या काळात तंत्रज्ञानाने जग वेगाने बदललं, परंतु डब्बावाल्यांची नाती, मूल्यं आणि मानवी स्पर्शावर आधारित सेवा आजही तितकीच जिवंत आहे. म्हणूनच ही सेवा फक्त शहराची गरज नाही, तर भारतीय संस्कृतीतील “मानवीपणा” आणि “शिस्त” या दोन मूल्यांचा जिवंत पुरावा आहे. 

    आजचा काळ वेगाने बदलत आहे—ऑफिसचे वर्क फ्रॉम होम मॉडेल, डिजिटल फूड डिलिव्हरी अॅप्स, आणि शहराच्या बदलत्या जीवनशैलीमुळे डब्बावाल्यांच्या पारंपरिक सेवेसमोर नवी आव्हाने उभी राहत आहेत. कोविडनंतर त्यांच्या ग्राहकसंख्येत घट झाली, अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आणि त्यांची जुनी साखळी पुन्हा उभी करण्यात कठीण संघर्ष करावा लागत आहे. 

    Mumbai Dabbawala

    पण तरीही, या सर्व आव्हानांतही त्यांचा आत्मविश्वास ढळलेला नाही. कारण डब्बावाल्यांची सेवा फक्त व्यवहार नाही, तर लोकांच्या मनाशी जोडलेली नाळ आहे. आता गरज आहे ती आधुनिक तंत्रज्ञानाशी त्यांना जोडण्याची, नवीन पिढीला या व्यवस्थेचं मूल्य समजावून सांगण्याची आणि त्यांच्यासाठी सरकार व उद्योग क्षेत्राने अधिक स्थिरता निर्माण करण्याची. भविष्यात जर या सेवेने डिजिटल साधनांचा वापर केला, 

    तर ती आणखी मजबूत होऊ शकेल आणि बदलत्या बाजारात स्वतःचं स्थान अधिक दृढ करू शकेल. मुंबईचे डब्बावाले हे शहराच्या गति, संस्कृती आणि मानवी मूल्यांचे प्रतीक आहेत. त्यांची सेवा टिकून राहणं म्हणजे शहराच्या हृदयाची धडधड कायम जिवंत ठेवणं. म्हणूनच, या निष्ठावान व्यवस्थेचं संरक्षण करणे, त्यांना आवश्यक पाठबळ देणे आणि त्यांच्या मेहनतीचा सन्मान करणे ही प्रत्येक मुंबईकराची आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.

    आणखीन वाचा:

  • दोन अपयशांनंतर उभा केलेला भारतातील सर्वात वेगाने वाढणारा होम-सोल्यूशन्स ब्रँड: Wakefit

    दोन अपयशांनंतर उभा केलेला भारतातील सर्वात वेगाने वाढणारा होम-सोल्यूशन्स ब्रँड: Wakefit

    Wakefit बद्दल जाणून घ्या.

    भारतामध्ये स्टार्टअप्सची मोठी लाट आली तेव्हा काही उद्योजकांनी प्रचंड यश मिळवलं, तर काहींची स्वप्नं अपयशामुळे कोलमडली. पण अपयशाचा स्वीकार करून पुन्हा उभं राहणं, स्वतःचा उद्योग उभारणं आणि लाखो ग्राहकांचा विश्वास मिळवणं,ही गोष्ट प्रत्येकाला जमत नाही. अशा मोजक्याच धैर्यवान उद्योजकांपैकी एक नाव म्हणजे चैतन्य रामलिंगेगौडा. मध्यमवर्गीय घरात वाढलेला हा तरुण, शिक्षण पूर्ण करून मोठ्या करिअरच्या संधींच्या उंबरठ्यावर असताना काहीतरी वेगळं करण्याच्या स्वप्नाने प्रेरित झाला. पण त्याचे सुरुवातीचे दोन स्टार्टअप्स अपयशी ठरले आणि त्याला पुन्हा नव्याने विचार करावा लागला.

    याच टप्प्यावर चैतन्य यांनी हार न मानता, स्वतःच्या चुका समजून घेतल्या आणि लोकांच्या खऱ्या गरजा ओळखण्यावर लक्ष केंद्रित केलं. चिकाटी, सातत्य, ग्राहकांचा सखोल अभ्यास आणि अखंड मेहनत यांच्या बळावर त्यांनी Wakefit ला करोडोंची कंपनी बनवलं. आजच्या या लेखात आपण अपयशातून शिकत यशाकडे वाटचाल कशी केली, याचा त्यांच्या प्रेरणादायी प्रवासावर एक नजर टाकूया.

    कर्नाटकातील मध्यमवर्गीय घरातून ISB पर्यंतचा प्रवास

    चैतन्य रामलिंगेगौडा यांचा जन्म कर्नाटकमधील एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. मेहनत, शिक्षण आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या संस्कारात वाढलेल्या चैतन्य यांनी लहानपणापासूनच अभ्यासात सातत्य राखलं. त्यामुळेच त्यांनी VTU मधून कॉम्प्युटर सायन्स हे शिक्षण घेतलं आणि नंतर भारतातील प्रतिष्ठित संस्थेत मानल्या जाणाऱ्या ISB हैदराबादमधून MBA पूर्ण करून कुटुंबाचा अभिमान वाढवला. त्यांच्या शैक्षणिक प्रवासात बुद्धिमत्ता, मेहनत आणि स्वतःला सिद्ध करण्याची ओढ स्पष्ट दिसत होती.

    पण अभ्यासात यश मिळूनही खऱ्या आयुष्याचा प्रवास इथेच थांबला नाही. उच्च शिक्षणानंतर चैतन्य यांच्या आयुष्यात अनेक बदल घडवणाऱ्या घटनांची सुरुवात झाली. मोठ्या नोकरीच्या संधी उपलब्ध असूनही, त्यांनी काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न मनात जपलं. आयुष्यात जोखीम घेण्याचा निर्णय घेत त्यांनी उद्योजकतेची दिशा पकडली. 

    पहिले दोन स्टार्टअप्स अपयशी 

    चैतन्य रामलिंगेगौडा यांनी उद्योजकतेत पहिले पाऊल टाकलं ते TwolyMadlyDeeply या डेटिंग मीटअप ॲपद्वारे. ॲपची कल्पना नाविन्यपूर्ण होती आणि उत्पादन देखील चांगलं होतं. पण व्यवसाय वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असणारा मॉनेटायझेशनचा मार्ग त्यांना सापडला नाही. वापरकर्त्यांची संख्या वाढत असतानाही आर्थिक स्थैर्य मिळू शकत नव्हतं, आणि शेवटी हा उपक्रम बंद करण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला. यानंतर त्यांनी मीडिया क्षेत्रात दुसऱ्या स्टार्टअपची सुरुवात केली, पण इथेही अपेक्षित प्रोडक्ट-मार्केट फिट साधता आलं नाही. लोकांना नक्की काय हवं आहे आणि ते कशासाठी पैसे मोजायला तयार आहेत हे समजून घेणं त्यांच्या दृष्टीने अजूनही एक महत्त्वाचं आव्हान होतं.

    सलग दोन अपयश कोणालाही खचवू शकतात, अनेक जण या टप्प्यावर धैर्य सोडून परत नोकरीच्या मार्गावर वळले असते. पण चैतन्य यांची वृत्ती वेगळी होती. त्यांनी अपयशाकडे अडथळा म्हणून पाहिलं नाही, तर शिकण्याची संधी म्हणून घेतलं. कुठे चूक झाली?, ग्राहकांच्या खऱ्या समस्या काय आहेत?, लोक काय शोधत आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्यांनी अधिक अभ्यास केला.

    समस्या शोधली – Wakefit  ची सुरुवात 

    Wakefit ची सुरुवात एका रोजच्या पण महत्त्वाच्या समस्येपासून झाली. एकदा चैतन्य यांचा मित्र अंकित सतत पाठीच्या दुखण्याची तक्रार करत होता. उपाय शोधताना दोघांना लक्षात आलं की बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक गाद्या महाग आहेत, त्यांचा दर्जा समाधानकारक नाही आणि ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. महागड्या गाद्या घेतल्या तरी आराम मिळत नाही, हमी फक्त कागदोपत्री असते आणि ग्राहक कोणावरही विश्वास ठेवू शकत नाहीत,हीच खरी समस्या होती. तेव्हा चैतन्य आणि अंकित यांनी ठरवलं की मॅट्रेस उद्योगच बदलायचा. फक्त बोलून न थांबता, त्यांनी स्वतःची १३ लाखांची बचत जमा करून Hosur–Mysore औद्योगिक पट्ट्यात एक छोटंसं फोम कटिंग आणि मॅट्रेस असेंब्ली युनिट सुरू केलं. आणि याच ठिकाणी मार्च २०१६ मध्ये Wakefit चा जन्म झाला.

    सुरुवातीचे दिवस अतिशय कठीण होते. वर्कफोर्स जवळजवळ नसल्यामुळे दोघांनाच सर्व कामं हाताळावी लागत होती. चैतन्य दिवसभर फोमची गुणवत्ता, डेन्सिटी आणि मटेरियल तपासत, तर रात्री ते स्वतःच ग्राहकांच्या घरी गाद्या पोहोचवत. ग्राहकांचा विश्वास मिळवणं सर्वात महत्त्वाचं असल्याचं जाणून त्यांनी भारतात पहिल्यांदाच १००-night free trial सुरू केलं,ग्राहकांनी गादी १०० रात्री वापरून पाहावी, न पसंत पडली तर परत करावी, कोणताही प्रश्न नाही. तक्रारी असोत, विलंब असो किंवा फोन कॉल्स,सगळं चैतन्य स्वतः सांभाळत होते. हळूहळू ही पारदर्शकता, मेहनत आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन लोकांच्या मनाला भिडला. आणि इथूनच Wakefit च्या उल्लेखनीय यशाची खरी सुरुवात झाली.

    माऊथ मार्केटिंग मुळे व्यवसायात प्रचंड वाढ 

    Wakefit च्या वेगवान वाढीमागील मुख्य कारण म्हणजे त्यांचं डायरेक्ट-टू-कन्स्युमर (D2C) मॉडेल. या मॉडेलमध्ये उत्पादक आणि ग्राहक यांच्यामध्ये कोणतेही दलाल किंवा दुकानदार नसतात. त्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला आणि ग्राहकांना बाजारातील इतर ब्रँड्सपेक्षा ४० % स्वस्त आणि दर्जेदार उत्पादने मिळू लागली. समाधानी ग्राहकांनी Wakefit बद्दल इतरांनाही सांगितल्याने माऊथ मार्केटिंग वाढत गेलं. परिणामी, २०१८ मध्ये Wakefit चा महसूल तब्बल ८० कोटींवर पोहोचला. ही वाढ इतकी उल्लेखनीय होती की Sleepwell आणि Kurlon सारखे मोठे ब्रँडदेखील या नव्या स्पर्धकाकडे लक्ष देऊ लागले.

    याच वर्षात Wakefit ला मोठा टप्पा गाठता आला, कारण Sequoia Surge या प्रतिष्ठित गुंतवणूकदाराने कंपनीत ६५ कोटींची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीच्या जोरावर Wakefit ने सोनीपत आणि होसूर येथे मोठी आणि आधुनिक उत्पादन केंद्रे उभारली. उत्पादन क्षमता वाढली, सेवा अधिक वेगवान झाली आणि ग्राहकांचा विश्वास आणखी मजबूत झाला. २०१९ पर्यंत कंपनीचा महसूल जवळजवळ १९७ कोटींवर पोहोचला आणि Wakefit देशातील सर्वात जलद वाढणाऱ्या ब्रँड्सपैकी एक बनला.

    यशाच्या शिखरावर 

    Wakefit ने फक्त गाद्यांपुरतं मर्यादित न राहता सोफा, बेड, वॉर्डरोब, स्टडी टेबल अशा घरासाठी आवश्यक असलेल्या अनेक प्रॉडक्ट्सची निर्मिती सुरू केली. दर्जेदार आणि परवडणारी उत्पादने दिल्यामुळे कंपनीचा महसूल ४०० कोटींच्या पुढे गेला. त्यांनी भारतातील पहिला Sleep Research Lab सुरू केला आणि त्यांच्या मार्केटिंग मोहिमा देशभरात वायरल झाल्या.

    Wakefit ची ताकद म्हणजे गुणवत्ता आणि सततचा नवोन्मेष. दररोज ५०० पेक्षा जास्त गाद्या तयार होतात आणि महिन्याला जवळपास ९,००० गाद्या ग्राहकांकडे पोहोचतात. त्यांच्या फोमला आंतरराष्ट्रीय Certi-PUR आणि Greenguard प्रमाणपत्रे आहेत. भारतातील मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या पाठीच्या वेदना आणि झोपेच्या समस्यांवर उपाय म्हणून त्यांनी वैज्ञानिक तंत्रज्ञान वापरून अधिक आरामदायी आणि आरोग्यदायी मॅट्रेस तयार केल्या.

    २०२१ ते २०२४ या कालावधीत Wakefit ने झपाट्याने प्रगती केली. २०२१ मध्ये कंपनीचं मूल्यांकन ३८०  दशलक्ष अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचलं. २०२२ मध्ये महसूल ८२० कोटींवर गेला आणि Investcorp कडून २०० कोटींची गुंतवणूक मिळाली. २०२४ मध्ये Wakefit ने १००० कोटी महसूल, ६५ कोटी नफा आणि २ मिलियनहून अधिक ग्राहकांची नवी उंची गाठली. आज Wakefit देशभर ५ उत्पादन केंद्रे आणि ९८ स्टोअर्ससह भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ब्रँड्सपैकी एक आहे.

    मित्रांनो, चैतन्य आणि अंकित यांनी अपयश आल्यावरही हार मानली नाही. ग्राहकांच्या गरजा समजून घेणं, गुणवत्ता कधीही न घसरू देणं आणि सतत सुधारत राहणं,या तत्त्वांमुळेच Wakefit आज इतक्या मोठ्या उंचीवर पोहोचला आहे. एका साध्या समस्येतून उगम पावलेली कल्पना आज उपाय बनली, उपायातून ब्रँड तयार झाला आणि तोच ब्रँड आता भारतातील १००० कोटींपेक्षा मोठी कंपनी बनला. Wakefit ही फक्त कंपनी नाही, तर तरुण उद्योजकांसाठी जिद्द, सातत्य आणि शिकण्याची प्रेरणा देणारी एक जिवंत उदाहरण आहे की अपयश हा शेवट नसून, मोठ्या यशाची सुरुवात असते.

    आणखीन वाचा:

  • नवीन लेबर कोड्समुळे मिळणार दीर्घकालीन सुरक्षा -New Labour Laws In India 2025

    नवीन लेबर कोड्समुळे मिळणार दीर्घकालीन सुरक्षा -New Labour Laws In India 2025

    कामाचे तास, वेतन आणि सुरक्षितता – जाणून घ्या नवीन लेबर कोड्सची संपूर्ण माहिती

    केंद्र सरकारने २१ नोव्हेंबरपासून देशभर नवीन लेबर कोड्स लागू करण्यास सुरुवात केली असून, त्यामुळे विविध क्षेत्रांतील लाखो कामगारांना मोठा फायदा होणार आहे. गिग वर्कर, कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी तसेच आयटी आणि मीडिया क्षेत्रातील प्रोफेशनल्स, या सर्वांसाठी हे कायदे महत्त्वाचे ठरणार आहेत. या नवीन कोड्सचा मुख्य उद्देश म्हणजे कामगारांचे हक्क अधिक मजबूत करणं, त्यांच्या कामाच्या वातावरणात पारदर्शकता आणणं आणि सुरक्षितता वाढवणं.अनेक वर्षांपासून बदलांची प्रतीक्षा करणाऱ्या कामगारांसाठी हे नवे नियम दीर्घकालीन संरक्षण देणारे ठरणार आहेत.

    खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने या बदलांबद्दल माहिती ठेवणं खूप आवश्यक आहे, कारण या नव्या बदलामुळे वेतनरचना, कामाचे तास, सुट्ट्या, सामाजिक सुरक्षा, निवृत्ती लाभ आणि कंपनीची जबाबदारी अशा अनेक गोष्टींमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. हे नियम लागू झाल्यानंतर कर्मचारी आणि नियोक्ता दोघांचेही कामकाज अधिक स्पष्ट व नियमबद्ध होणार आहे. त्यामुळे आपल्या हक्कांची योग्य जाणीव ठेवण्यासाठी आणि उपलब्ध फायद्यांचा लाभ घेण्यासाठी हे नवीन लेबर कोड्स नेमके काय आहेत आणि ते तुमच्या नोकरीवर कसा परिणाम करतील, हे आपण आजच्या लेखात समजून घेऊया.

     कामाचे तास आणि ओव्हरटाईमचे नवे नियम

    कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना योग्य मोबदला मिळावा म्हणून सरकारने कामाचे तास आणि ओव्हरटाईमसंबंधी नवीन नियम लागू केले आहेत. आता ओव्हरटाईमसाठी किमान वेतनाच्या दुप्पट रक्कम देणं अनिवार्य करण्यात आलं आहे. तसंच ओव्हरटाईम करणं हे पूर्णपणे ऐच्छिक असेल.  कोणत्याही कामगारावर त्यासाठी जबरदस्ती केली जाऊ शकत नाही. याशिवाय, प्रत्येक राज्य सरकारला त्यांच्या परिस्थितीनुसार ओव्हरटाईमची कमाल मर्यादा ठरवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

    कामगारांना अधिक सुविधा मिळाव्यात म्हणून सुट्ट्या आणि वेतनासाठी लागणाऱ्या आवश्यक कामकाजाच्या दिवसांमध्येही बदल करण्यात आला आहे. पूर्वी २४० दिवस काम करण्याची अट होती, ती आता १८० दिवसांवर आणण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांना सुट्या मिळवणं आणि इतर लाभ घेणं अधिक सोयीचं होणार आहे.

    ESI योजनेचा विस्तार

    ESI म्हणजे Employee State Insurance योजना आता अधिक व्यापक स्वरूपात लागू केली जात आहे. आधी केवळ काही विशिष्ट उद्योगांपुरती मर्यादित असलेली ही योजना आता दुकाने, बागायत उद्योग, छोटे व मोठे कारखाने अशा अनेक क्षेत्रांतील कर्मचार्‍यांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अधिक कामगारांना कमी खर्चात आरोग्य संरक्षणाचा फायदा मिळू शकेल.

    या योजनेत कामगारांना वैद्यकीय विमा, मातृत्व लाभ आणि अपंगत्व संरक्षण यांसारखे महत्त्वाचे फायदे दिले जातात. ESI योजनेंतर्गत येणाऱ्या सुविधांमुळे कामगारांना सरकारी आरोग्य सेवा अधिक सोयीस्कर आणि  परवडणारी ठरणार असून, त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची अधिक चांगली काळजी घेतली जाईल.

    मीडिया व डिजिटल कर्मचाऱ्यांसाठी औपचारिक नियुक्ती पत्र

    मीडिया आणि डिजिटल क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आता औपचारिक नियुक्ती पत्र देणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यात OTT प्लॅटफॉर्मवरील कर्मचारी, पत्रकार, डिजिटल संपादक आणि कंटेंट क्रिएटर्स यांचा समावेश होतो. यामुळे या क्षेत्रातील कामकाज अधिक नियमबद्ध आणि पारदर्शक होण्यास मदत होईल.

    नियुक्ती पत्रामुळे कामाचे तास, जबाबदाऱ्या आणि वेतन यांचा स्पष्ट तपशील कर्मचाऱ्यांना मिळेल. यामुळे त्यांच्या हक्कांची खात्री वाढेल आणि कार्यस्थळावरील सुरक्षितता व स्थैर्य अधिक मजबूत होईल.

    ग्रॅच्युइटीच्या नियमात बदल 

    ग्रॅच्युइटीसंबंधीच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला असून, यामुळे लाखो कामगारांना थेट फायदा होणार आहे. पूर्वी ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी कंपनीत सलग पाच वर्षे काम केलेलं असणं आवश्यक होतं. मात्र, नवीन नियमांनुसार आता फक्त एक वर्षाची सेवा पूर्ण केली तरी कर्मचारी ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरेल. याशिवाय, काही कॉन्ट्रॅक्ट कामगारांनाही या योजनेत समाविष्ट करण्यात आलं आहे, जे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा बदल ठरतो.

    या सुधारित नियमामुळे कंपनीत कमी कालावधी नोकरी करणाऱ्या कर्मचार्‍यांनाही आर्थिक लाभ मिळू शकेल. पूर्वी कमी कालावधी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा लाभ मिळत नसल्याने त्यांना मोठं नुकसान होत असायचं, परंतु आता ही अडचण दूर झाली आहे. एकूणच, कमी कालावधीची नोकरी असली तरीही आर्थिक सुरक्षा मिळण्याचा मार्ग उघडल्यामुळे हा बदल कामगारांसाठी अत्यंत फायद्याचा ठरणार आहे.

     नियुक्ती पत्र अनिवार्य

    नवीन नियमांनुसार, आता प्रत्येक कंपनीने कर्मचाऱ्याला नोकरी स्वीकारताना औपचारिक नियुक्ती पत्र देणं बंधनकारक केले आहे. यापूर्वी अनेक ठिकाणी तोंडी बोलणं किंवा अनौपचारिक करारांवर भर दिला जात होता, परंतु आता प्रत्येक कर्मचारीला जॉइनिंगवेळी त्याच्या नोकरीची संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात मिळणार आहे. त्यामुळे नोकरीची प्रक्रिया अधिक अधिकृत आणि व्यवस्थित होणार आहे.

    नियुक्ती पत्रामध्ये पगार, कामाचे तास, कामाचे स्वरूप आणि जबाबदाऱ्या यासंबंधी सर्व तपशील स्पष्टपणे नमूद केले जातात. यामुळे भविष्यातील गैरसमज, वाद किंवा चुकीच्या अपेक्षा टाळता येतात. कर्मचारी आणि नियोक्ता दोघांमध्येही विश्वास वाढतो आणि कामकाज अधिक पारदर्शक व नियमबद्ध होते. एकूणच, हा बदल रोजगार प्रक्रियेला अधिक सुरक्षित आणि स्पष्ट बनवतो.

    वेळेवर पगार देणं बंधनकारक

    नवीन लेबर कोडनुसार आता सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देणं अनिवार्य करण्यात आले आहे. जर पगार उशिरा दिला गेला, तर नियोक्त्यांवर दंड आकारला जाऊ शकतो. यामुळे कामगारांच्या पगाराची सुरक्षितता वाढेल आणि त्यांच्या आर्थिक हक्कांचे संरक्षण होईल. तसेच, कामाच्या ठिकाणी अपघाताची व्याख्या देखील विस्तृत केली आहे. घरून कामावर जाताना किंवा कामावरून घरी परतताना झालेला अपघात देखील रोजगारसंबंधित मानला जाईल आणि अशा वेळी कामगाराला सर्व लाभ, भरपाई आणि विमा मिळणार आहे.

    याशिवाय, केंद्र सरकारने देशभरासाठी एकसमान किमान वेतन दर निश्चित केला आहे. याचा अर्थ कोणतेही राज्य यापेक्षा कमी वेतन ठरवू शकणार नाही. या बदलामुळे देशभरातील सर्व कामगारांना न्याय्य आणि एकसमान वेतन मिळेल, ज्यामुळे आर्थिक असमानता कमी होईल आणि कामगारांचे अधिकार अधिक मजबूत होतील.

    IT, ITES, निर्यात आणि वस्त्रोद्योगातील कर्मचाऱ्यांसाठी नियम

    IT, ITES, निर्यात आणि वस्त्रोद्योगातील कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम लागू झाले आहेत. या क्षेत्रातील प्रत्येक कर्मचाऱ्याला पगार महिन्याच्या ७ तारखेपर्यंत मिळणं अनिवार्य आहे. जर पगार उशिरा दिला गेला, तर कंपनीवर कारवाई केली जाऊ शकते. हे नियम खास करून आयटी आणि निर्यात क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करतात आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करतात.

    याशिवाय, ४० वर्षांवरील कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी करणं बंधनकारक केलं आहे. तपासणीचा सर्व खर्च कंपनी उचलेल. यामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित राहील, वेळेवर रोगांचे निदान होईल आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या टाळता येतील. एकूणच, हा बदल कामगारांसाठी आर्थिक आणि आरोग्यदृष्टीने दोन्ही दृष्ट्या फायदेशीर आहे.

    मित्रांनो, नवीन लेबर कोडमुळे देशातील कामगारांच्या अनेक वर्षांच्या समस्या आणि अडचणी लक्षात घेऊन मोठे बदल करण्यात आले आहेत. या सुधारित कायद्यांमुळे वेतनाची सुरक्षितता, आरोग्य संरक्षण, कामकाजातील पारदर्शकता आणि कर्मचारी हक्क अधिक मजबूत होतील. नियम लागू झाल्यानंतर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि कामाचे वातावरण अधिक सुरक्षित व सुव्यवस्थित बनेल.

    आणखी वाचा

  • सरकारकडून देशवासियांना दिवाळी गिफ्ट 22 सप्टेंबरपासून ‘हे’ नवीन GST दर लागू होणार

    सरकारकडून देशवासियांना दिवाळी गिफ्ट 22 सप्टेंबरपासून ‘हे’ नवीन GST दर लागू होणार

    सर्वसामान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय – जीवनावश्यक वस्तूंवर GST कपात

    देशातील सर्वसामान्यांसाठी केंद्र सरकारकडून दिलासा देणारा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंवरील जीएसटी (GST) दर कमी होणार आहेत. या निर्णयामुळे थेट ग्राहकांना फायदा होईल आणि घरगुती बजेटला थोडा दिलासा मिळेल. 

    ही करकपात काही निवडक वस्तूंवर मर्यादित नसून रोजच्या जीवनात लागणाऱ्या अनेक वस्तूंवर लागू होणार आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंपासून ते घरगुती वापराच्या सामानापर्यंत बरीच उत्पादने आता कमी किमतीत मिळतील. थोडक्यात, या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना दररोजच्या खरेदीत बचत करता येणार आहे. आता नेमक्या कोणत्या वस्तूंवर किती टक्के करकपात झाली आहे आणि त्याचा थेट फायदा ग्राहकांना कसा होणार आहे, हे आपण या लेखात समजून घेऊया.

    दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर दिलासा

    सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर दिलासा देण्यासाठी सरकारने जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी मोठ्या प्रमाणात कमी केला आहे. याआधी १२% ते १८% जीएसटी भरावा लागणाऱ्या अनेक वस्तूंवर आता फक्त ५% जीएसटी लागू होणार आहे. 

    या यादीत केसांचे तेल, शॅम्पू, टूथपेस्ट, टूथब्रश, टॉयलेट सोप, शेव्हिंग क्रीम यांसारख्या वस्तूंवरचा कर १८% वरून ५% झाला आहे. तसेच लोणी, तूप, चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थ, प्री-पॅकेज नमकीन, भुजिया, मिश्रण, भांडी, बाळांच्या बाटल्या, नॅपकिन्स, क्लिनिकल डायपर यांसारख्या वस्तूंवरचा जीएसटी १२% ऐवजी आता फक्त ५% भरावा लागेल. शिलाई मशीन व त्याचे सुटे भाग यांनाही या दरकपातीचा लाभ मिळणार आहे.

     शेतकरी आणि शेती व्यवसायासाठी फायदा

    शेतकरी आणि शेती व्यवसायासाठीही सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. शेतीसाठी लागणाऱ्या अनेक साधनांवरील आणि उपकरणांवरील जीएसटी आता कमी करण्यात आला आहे. यामुळे शेतीचा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे.

    या यादीत ट्रॅक्टर टायर्स आणि सुटे भाग यांवरील कर १८% वरून ५% करण्यात आला आहे, तर ट्रॅक्टरवरचा जीएसटी १२% ऐवजी फक्त ५% आकारला जाणार आहे. याशिवाय जैव-कीटकनाशके, सूक्ष्म पोषक घटक, ठिबक सिंचन प्रणाली, स्प्रिंकलर तसेच माती तयार करणे, लागवड, कापणी आणि मळणीसाठी लागणाऱ्या यंत्रांवरही जीएसटी १२% वरून ५% इतका कमी झाला आहे. 

    आरोग्यसेवा क्षेत्रात मोठा दिलासा

    आरोग्यसेवा क्षेत्रातही सरकारने मोठ्या प्रमाणात कर कपात केली आहे. लोकांच्या आरोग्याशी थेट संबंधित अनेक वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे औषधोपचार आणि आरोग्य तपासणीसाठी लागणारा खर्च कमी होणार आहे. सर्वात मोठा फायदा म्हणजे वैयक्तिक आरोग्य व जीवन विमा आता १८% वरून थेट शून्य टक्के म्हणजेच पूर्णपणे करमुक्त करण्यात आला आहे.

    याशिवाय थर्मोमीटरवरील कर १८% वरून ५%, वैद्यकीय दर्जाचा ऑक्सिजन, निदानासाठी लागणारी सर्व किट, ग्लूकोमीटर व चाचणी पट्ट्या आणि डोळ्यांच्या तपासणीसाठी लागणारा चष्मा यांवरील कर १२% वरून ५% इतका करण्यात आला आहे. या निर्णयामुळे उपचार आणि आरोग्य तपासणीसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू सर्वसामान्यांना अधिक परवडतील. 

    परवडणाऱ्या दरात मोटारगाड्या

    वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवरील जीएसटीत मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मोटारगाड्या आणि इतर वाहने आता परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार असून ग्राहकांना थेट फायदा होईल. आधी २८% जीएसटी (GST) आकारला जाणाऱ्या वाहनांवर आता फक्त १८% जीएसटी (GST) लागू होणार आहे.

    या यादीत पेट्रोल, पेट्रोल-हायब्रिड, एलपीजी आणि सीएनजी कार (१२०० सीसी आणि ४००० मिमी पेक्षा कमी), डिझेल आणि डिझेल-हायब्रिड कार (१५०० सीसी आणि ४००० मिमी पेक्षा कमी), तीन चाकी वाहने, ३५० सीसी पर्यंतच्या मोटारसायकली तसेच मालवाहतूक मोटारगाड्या यांचा समावेश आहे. यामुळे वाहन खरेदीचा खर्च कमी होऊन सामान्य नागरिकांना वाहतुकीच्या सोयी अधिक सुलभ होणार आहेत.

    शिक्षण क्षेत्रात करमुक्ती 

    शिक्षण क्षेत्रालाही सरकारने मोठा दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या अनेक शैक्षणिक वस्तूंवरील जीएसटी पूर्णपणे हटवण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षणासाठी लागणारे साहित्य अधिक स्वस्त आणि परवडणारे होणार आहे.

    या यादीत नकाशे, चार्ट, पेन्सिल, शार्पनर, रंगीत खडू, व्यायाम पुस्तके, वह्या यांवरील १२% जीएसटी हटवून शून्य टक्के करण्यात आला आहे. तर खोडरबरवरील ५% करही रद्द करून ती वस्तू पूर्णपणे करमुक्त केली आहे. यामुळे शालेय साहित्य खरेदीत विद्यार्थ्यांना आणि पालकांना थेट बचत होणार आहे.

     इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बचत

    सामान्य कुटुंबाच्या घरगुती खर्चात मोठा वाटा असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरही सरकारने जीएसटी कपात जाहीर केली आहे. दैनंदिन जीवन अधिक सोयीस्कर करणारी मोठी घरगुती उपकरणे आता पूर्वीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. याआधी २८% जीएसटी लागू असलेल्या उपकरणांवर आता फक्त १८% जीएसटी (GST) आकारला जाणार आहे. 

    या यादीत एअर कंडिशनर, ३२ इंचांपेक्षा मोठे टेलिव्हिजन, मॉनिटर, प्रोजेक्टर आणि डिश वॉशिंग मशीन यांचा समावेश आहे. अशा प्रकारची उपकरणे आधी महागडी वाटत असली तरी करकपातीनंतर ती तुलनेने परवडणारी ठरणार आहेत. या निर्णयामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना घरात आवश्यक असलेल्या आधुनिक सुविधा आणणे सोपे होईल आणि बाजारातील विक्रीलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

    आणखी वाचा

  • Giorgio Armani : स्वप्नाला आकार देणारा कलाकार

    Giorgio Armani : स्वप्नाला आकार देणारा कलाकार

    इटली देशातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अब्जाधीश ब्रँड मालक जॉर्जिओ अरमानी यांचे दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांची अरमानी ही कंपनी गुच्ची आणि प्राडा नंतर इटलीतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा फॅशन समूह मानला जातो. या ब्रँडखाली शेकडो स्टोअर्स आणि 10 अब्जाहून अधिक डॉलर्सची वार्षिक उलाढाल आहे. मिलानच्या रेडी-टू-विअर फॅशनमध्ये अग्रणी ठरलेले अरमानी यांनी ‘अनस्ट्रक्चर्ड लुक्स’ द्वारे फॅशनमध्ये क्रांती घडवून आणली होती. ते इटालियन शैली आणि शालीनतेचे मूर्तिमंत स्वरूप होते.

    मिलानच्या रस्त्यावरून चालणाऱ्या एका साध्या मुलाने कधी कल्पनाही केली नव्हती की, एक दिवस तो जगभरातल्या फॅशनविश्वाला नवं रूप देईल. वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडलेला हा तरुण, थोडे दिवस सैन्यात आणि मग एका दुकानातल्या शोकेस सजवण्यात रमला. परंतु त्याच्या डोळ्यात मात्र कपड्यांच्या पलीकडचं स्वप्न होतं. अखेर सर्जियो गॅलोटी या मित्रासोबत १९७५ च्या दशकात त्याने स्वतःचा ब्रँड उभारला.

    पुढे काळ बदलत गेला आणि त्यांचे कष्ट आणि कल्पकता सतत वाढत राहिले. त्यांनी एम्पोरियो अरमानी, अरमानी ज्युनियर आणि एएक्स अरमानी एक्सचेंज यांसारख्या नव्या श्रेणींमधून जागतिक स्तरावर आपला ब्रँड विस्तारला. त्याचबरोबर सौंदर्यप्रसाधने, परफ्यूम तसेच होम फर्निशिंग क्षेत्रातही त्यांनी आपले स्थान निर्माण केले. हॉलीवूडमधील १९८० साली प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर गिगोला चित्रपटासाठी रिचर्ड गियरची वॉर्डरोब डिझाईन तयार करताच जगाने त्यांच्या नावाकडे गंभीरपणे पाहायला सुरुवात केली. चित्रपट उद्योगाशी असलेल्या या संबंधामुळे त्यांचे नाव आणि ब्रँड मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांसमोर आले. अरामानींनी शंभराहून अधिक चित्रपटांसाठी पोशाख डिझाइन केले.


    त्यानंतर जॉर्जिओ अरमानी (Giorgio Armani) फॅशनच्याही पलीकडे गेली. फॅशनच्या पलीकडे जाऊन त्यांनी हॉटेल्स, क्रीडा आणि संगीत क्षेत्रातही पाऊल ठेवले. दुबईतील अरमानी हॉटेल, ऑलिंपिक व विविध व्यावसायिक क्रीडा संघांसाठी गणवेश डिझाइन, तसेच एम्पोरियो अरमानी कॅफे संगीत संकलनांचे क्युरेशन हे त्याचे काही उल्लेखनीय उपक्रम ठरले. त्यांच्या नावावर उभं राहिलेलं साम्राज्य म्हणजे फक्त कपड्यांचं नव्हे, तर आज ते शालीनतेचं प्रतिक आहे.

    आज त्यांच्या जाण्याने जग शोकाकुल आहे, पण त्यांनी विणलेली शैली अजूनही जिवंत आहे. “खरा डिझायनर तोच, जो स्वप्नांना कृतीतून प्रत्यक्षात घडवतो“ हे त्यांनी जगाला दाखवून दिले. शून्यातून विश्व उभे करण्याचा त्यांचा प्रवास आज सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे.


    जॉर्जिओ अरमानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

    आणखी वाचा :

  • सेकंड हँड गाड्यांचं मार्केट बदलणाऱ्या CARS24 च्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी

    सेकंड हँड गाड्यांचं मार्केट बदलणाऱ्या CARS24 च्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी

    आज टेक्नॉलॉजी आणि इंटरनेट मुळे वेगाने बदलणाऱ्या जगात, सगळं काही ऑनलाइन होत चाललं आहे. मग गाड्यांची खरेदी-विक्री कशी मागे राहील? पूर्वी वापरलेली गाडी विकायची म्हणजे डीलरकडे चकरा माराव्या लागायच्या, योग्य किंमत मिळेल की नाही याची चिंता, कागदपत्रांचं ओझं… पण या सगळ्याला पूर्णविराम देणारं एक नाव म्हणजे ‘CARS24’. या कंपनीने वापरलेल्या गाड्यांची खरेदी-विक्री सहज, सोपी आणि विश्वासार्ह करून दिली आहे.

    मात्र या यशामागे आहे एका छोट्या शहरातील तरुणाची मोठी स्वप्नं, अपयशातून शिकण्याची तयारी आणि अपार मेहनत. तो तरुण म्हणजे CARS24 चे संस्थापक आणि CEO विक्रम चोप्रा. छोट्याशा शहरातुन आलेल्या विक्रम यांचं स्वप्न होतं काहीतरी स्वतःचा व्यवसाय उभारायचं. हे स्वप्न पूर्ण करताना त्यांना अनेक अडथळे आले, अपयशं आली, पण त्यांनी हार न मानता पुन्हा नव्याने सुरुवात केली. आजच्या लेखात आपण या जिद्दी तरुणाचा प्रेरणादायक प्रवास पाहणार आहोत.

    सुरुवातीचं आयुष्य 

    उत्तर प्रदेशातील रायबरेली या छोट्या शहरात विक्रम चोप्रा यांचा जन्म झाला. ते एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात मोठे झाले. लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार असलेल्या विक्रम यांनी IIT बॉम्बेमधून बी.टेक आणि एम.टेक पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून MBA केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी McKinsey आणि Sequoia Capital सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलं आणि तिथे चांगला अनुभव मिळवला.

    पण मोठ्या पगाराच्या नोकरी असूनही त्यांच्या मनात सतत एक विचार चालू होता तो म्हणजे “स्वतःचं काहीतरी वेगळं करायचं आहे.” हीच कल्पना मनात ठेऊन त्यांनी नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयामुळे त्यांचा उद्योजकतेचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.

    पहिला प्रयत्न अपयशी

    विक्रम चोप्रा यांनी FabFurnish नावाचं ऑनलाईन फर्निचर विक्रीचं स्टार्टअप सुरू करून व्यवसाय क्षेत्रात पहिले पाऊल टाकलं. तीन वर्षं मेहनत करूनही हा व्यवसाय अपेक्षेप्रमाणे चालला नाही. त्यांच्या वाट्याला अपयश आलं .पण विक्रम खचले नाहीत. त्यांनी या अपयशातून शिकण्याचा मार्ग स्वीकारला आणि नव्याने विचार करायला सुरुवात केली.

    एकदा स्वतःची गाडी विकताना विक्रम चोप्रा यांना जाणवलं की भारतात सेकंड हॅन्ड गाडी विकणं खूपच कठीण आणि गुंतागुंतीचं आहे. एजंट्स, पेपरवर्क, योग्य किंमत मिळवणं आणि वेळेची अडचण. या अनुभवातूनच त्यांच्या मनात एक कल्पना उमटली ती म्हणजे अशी एक सुविधा तयार करावी जी गाडी खरेदी-विक्रीची प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि टेकनॉलॉजीवर आधारित करेल. आणि याच विचारातून जन्म झाला CARS24 या डिजिटल प्लॅटफॉर्मचा ,ज्याने भारतात वापरलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीला एक विश्वासार्ह नाव दिलं.

    CARS24 या स्टार्टअपची सुरुवात

    २०१५ साली विक्रम चोप्रा यांनी मेहुल अग्रवाल, गजेंद्र जांगिड आणि रुचित अग्रवाल या आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून Chttps://www.cars24.com/new-cars/ARS24 या स्टार्टअपची स्थापना केली. वापरलेल्या गाड्या विकणं ही भारतात एक कठीण आणि वेळखाऊ प्रक्रिया होती. हे लक्षात घेऊन त्यांनी C2B (Customer to Business) मॉडेलवर आधारित एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केलं, जिथे सामान्य ग्राहक आपल्या गाड्या थेट कंपनीकडे विकू शकतो आणि कंपनी त्या गाड्या तपासून विश्वासार्ह डीलर्सना पुढे विकते. यामुळे ग्राहकांना योग्य किंमत, आणि डीलर्सना खात्रीशीर गाड्या मिळतात यामुळे दोघांचाही वेळ, पैसा आणि त्रास वाचतो.

    सुरुवातीला लोकांचा विश्वास मिळवणं हे मोठं आव्हान होतं. पण CARS24 ने या आपल्या खरेदी विकीरच्या प्रक्रियेला पारदर्शक आणि सहज करण्यासाठी डिजिटल पेमेंट, मोफत RC ट्रान्सफर, एआय आधारित किंमत मूल्यांकन आणि ऑनलाइन डीलिंगसारख्या सुविधा दिल्या. पहिल्याच भेटीत गाडी विकण्याचं आश्वासन आणि कागदपत्रांचं सुलभ व्यवस्थापन यामुळे ग्राहकांचा हळूहळू विश्वास बसू लागला आणि तिथूनच CARS24 ने यशाच्या दिशेने वाटचाल सुरू केली.

    फंडिंग आणि झपाट्याने झालेली वाढ

    CARS24 ने सुरुवातीपासूनच गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं. २०१५ मध्ये SAIF Partners आणि Accel कडून तब्बल ३२ कोटींचं फंडिंग मिळालं. त्यानंतर २०१८ मध्ये Sequoia Capital ने मोठी उडी घेत ३४० कोटींची गुंतवणूक केली. यामुळे कंपनीचं व्हॅल्यूएशन थेट १७४० कोटींवर पोहोचलं. या फंडिंगमुळे CARS24 ला तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यास, सेवा सुधारण्यास आणि अधिक शहरांमध्ये विस्तार करण्यास मदत झाली.

    विक्रम चोप्रा आणि त्यांच्या टीमने एक महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे महेंद्रसिंग धोनीला त्यांनी कंपनीचा  ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवलं. त्याच्या विश्वासार्ह प्रतिमेमुळे ब्रँडची ओळख घराघरात पोहोचली. “एक भेटीत गाडी विकण्याची प्रक्रिया” ही CARS24 ची खासियत बनली. त्यामुळे OLX, Droom, Mahindra First Choice यांसारख्या मोठ्या स्पर्धकांमध्येही CARS24 ने स्वतःचं वेगळं आणि विश्वासार्ह स्थान निर्माण केलं.

    युनिकॉर्न स्टार्टअप

    CARS24 ने २०२० मध्ये मोठा टप्पा गाठला. डीएसटी ग्लोबल कडून १५१० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाल्यानंतर कंपनीचं पोस्ट-मनी व्हॅल्यूएशन १ अब्ज डॉलरवर पोहोचलं आणि CARS24 ही भारतातील युज्ड कार क्षेत्रातील पहिली युनिकॉर्न कंपनी ठरली. सुरुवातीला फक्त ३२ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळालेल्या या स्टार्टअपने सिकोइया कॅपिटल, एक्झॉर सिड्स, डीएसटी ग्लोबल यांसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करत हजारो कोटींची गुंतवणूक मिळवली.

    समोर आलेल्या यशाने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या सेवा फक्त कारपुरती मर्यादित न ठेवता, बाईक्स, कमर्शियल व्हेइकल्स, फायनान्सिंग, विमा यामध्येही विस्तार केला.२०२४ मध्ये कंपनीचं मूल्यांकन वाढून ३.२३ अब्ज डॉलर (सुमारे २५,००० कोटी रुपये) इतकं झालं आणि आज CARS24 हे नाव भारतातील युज्ड गाड्यांच्या क्षेत्रात एक भक्कम ओळख बनून उभं आहे.

    यशाच्या शिखरावर


    CARS24 ही आज भारतातील सर्वात मोठी युज्ड कार खरेदी-विक्रीची ऑनलाईन कंपनी बनली आहे. २०० हून अधिक शहरांमध्ये ही सेवा सुरू असून, दर महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त गाड्यांचे व्यवहार येथे होतात. १.५ कोटींहून अधिक लोकांनी त्यांचं अ‍ॅप डाउनलोड केलं आहे. वापरलेल्या गाड्यांच्या बाजारात ६५% पेक्षा जास्त मार्केट शेअर CARS24 च्या नावावर असून, हा त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेचा आणि यशाचा दाखला आहे.

    या यशामागे आहे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. कंपनीने AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाद्वारे गाडीच्या किमतीचं अचूक मूल्यांकन शक्य केलं आहे, ज्यामुळे व्यवहार अधिक पारदर्शक झाले. ग्राहकांना केवळ गाडी विकणे किंवा खरेदी करणेच नव्हे, तर फायनान्स आणि विमा या सेवा देखील एका क्लिकवर मिळतात. कारण CARS24 आता स्वतःची NBFC म्हणजेच बँकेशिवाय आर्थिक सेवा देणारी संस्था आहे. ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन, सहज प्रक्रिया आणि विश्वासार्ह सेवा  हाच त्यांच्या यशाचा खरा मंत्र आहे.

    मित्रांनो, विक्रम चोप्रा यांची प्रेरणादायी कहाणी आपल्याला हे शिकवते की अपयश ही यशाकडे नेणारी पहिली पायरी असते. योग्य कल्पना, सातत्याने केलेली मेहनत आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकते. मोठं स्वप्न आणि ठाम निर्धार असेल, तर CARS24 सारखी युनिकॉर्न कंपनी उभी राहू शकते  आणि त्या वाटचालीत तुमचंही नाव असू शकतं!