Magicpin Success Story: लाखोंची नोकरी सोडून उभारली भारतातील तिसऱ्या क्रमांकाची फूड डिलिव्हरी कंपनी

झोमॅटो आणि स्विग्गी या दोन प्रमुख फूड डिलिव्हरी अॅप्सनंतर, भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे फूड डिलिव्हरी अॅप म्हणजे मॅजिकपिन. प्रचंड स्पर्धा असलेल्या या क्षेत्रात मॅजिकपिनने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, तुम्हाला मॅजिकपिनच्या यशामागे असलेल्या व्यक्तीविषयी माहिती आहे का? ती व्यक्ती म्हणजे अंशू शर्मा. त्यांची दूरदृष्टी, धडाडी, आणि कठोर परिश्रम यांनी मॅजिकपिनला यशाच्या शिखरावर […]
मेरी ई-शॉप मीशो भारताच्या प्रमुख रीसेलिंग ॲपचा प्रवास

वर्ष २०१५. दोन तरुण आयआयटी दिल्लीचे विद्यार्थी, विदित आत्रे आणि संजीव बर्नवाल, यांच्या मनात एक विचार घोळत होता काहीतरी असामान्य करायचं, जे फक्त त्यांच्यासाठी नाही, तर असंख्य लोकांच्या जीवनात बदल घडवू शकेल. मोठ्या मल्टी-नॅशनल कंपन्यांमध्ये आकर्षक नोकऱ्या असतानाही, या दोघांनी स्वतःच्या ध्येयाने प्रेरित होऊन त्या नोकऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक असा प्लॅटफॉर्म उभारायचा ठरवलं […]
Digital Marketing: सध्याच्या डिजिटल युगात या क्षेत्राला प्रचंड मागणी आहे.

“बोलणाऱ्याचे हुलगेही विकले जातात आणि न बोलणाऱ्याचे गहूही विकले जात नाही.” ही जुनी म्हण आजच्या स्पर्धेच्या युगात अधिकच प्रकर्षाने जाणवते. पूर्वीच्या काळी व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी वर्तमानपत्रे, रेडिओ किंवा टेलिव्हिजन हेच मर्यादित पर्याय होते. परंतु, गेल्या दशकात इंटरनेटने जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. आज प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन आहे आणि जगातील प्रत्येक व्यवहार आता डिजिटल स्क्रीनवर […]
Natu Caterers Success Story: नोकरदार ते उद्योजक असा अरुण नातू यांचा प्रवास

Natu Caterers Success Story: एक लहान मुलगा ! लहानपणापासून अभ्यासापेक्षा इतर उचापती करण्यात पटाईत, बोलका स्वभाव, सदैव मित्रांच्या घोळक्यात रममाण असणारा पण रक्तात व्यवसाय भिनलेला. म्हणजेच एक रुपयाचे-दोन रुपये-५ रुपये कसे करायचे? ह्याचे अचूक आकलन असणारा एक मुलगा! अभ्यासाची आवड नाही. त्यामुळे शिक्षणात रस नाही. मॅट्रिक झाल्यानंतर कॉलेजात न जाता व्यवसायाची आवड असल्याने त्याने टॅक्सी […]
आईचे दागिने विकून सुरू केलेला व्यवसाय आज १३,००० कोटींचा ब्रँड बनला | Lalitha Jewellery

किरण कुमार हे नाव आज सोन्याच्या दागिन्यांच्या क्षेत्रात आदराने घेतले जाते. त्यांच्या अथक परिश्रमाने आणि दूरदृष्टीने ‘ललिता ज्वेलरी’ हा ब्रँड भारतातील लाखो लोकांच्या विश्वासाला पात्र ठरला आहे. दर्जा, परवडणाऱ्या किमती, आणि उत्कृष्ट डिझाईन्स यामुळे हा ब्रँड आज घरोघरी पोहोचला आहे. मात्र, या यशस्वी प्रवासामागे किरण कुमार यांचा संघर्ष आणि कष्टांची महत्त्वाची भूमिका आहे. हे यश […]
यशस्वी उद्योजक होण्यासाठी १० महत्त्वाचे कानमंत्र -Business Tips 2026

१. प्रबळ इच्छाशक्ती: “पर्पज > प्रॉफिट” (Purpose over Profit) व्यवसाय सुरू करण्यापूर्वी स्वतःला आरशात पाहून एकच प्रश्न विचारा— “मी हे फक्त पैशांसाठी करतोय की मला एखादा ‘प्रॉब्लेम’ सॉल्व्ह करायचा आहे?” २. ‘अॅनालिसिस पॅरालिसिस’ टाळा: अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरु अनेक लोक फक्त ‘परफेक्ट प्लॅन’ बनवण्यात वर्षे घालवतात आणि प्रत्यक्षात काहीच करत नाहीत. कुणीही जन्मतः उद्योजक नसतो! […]
पांढऱ्या कोटातून मातीच्या सेवेपर्यंत: ७५,००० ची नोकरी सोडून काव्या ढोबळेने उभा केला ‘लाखोंचा’ कृषी ब्रँड! कोण आहे काव्या ढोबळे? जाणून घ्या.

अनेकांच्या मनात चांगल्या सरकारी किंवा स्थिर नोकरीबद्दल आकर्षण असते. “जिथे चांगल्या पगाराची आणि सुरक्षित भविष्यातील हमी आहे, ती नोकरी सोडून दुसऱ्या अनिश्चित क्षेत्रात का जावं?” असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, जुन्नर येथील काव्या ढोबळेने हा विचार बाजूला ठेवत, महिन्याला ७५,००० रुपये पगाराची चांगली नोकरी सोडून कृषीपूरक व्यवसायाचा मार्ग स्वीकारला. आज ती केवळ यशस्वीच नाही, तर […]
फक्त २ रुपयांत पाण्याची बाटली; ‘WAHTER’ स्टार्टअपची जाहिरात विश्वात क्रांती महागाईच्या काळात दिलासा!

आजच्या वेगवान जगात पाण्याची गरज ही अन्नाइतकीच महत्त्वाची आहे. बाहेर पडल्यावर तहान लागली की आपण सहजपणे जवळच्या दुकानात जातो आणि १०, १५ किंवा २० रुपयांना पाण्याची बाटली विकत घेतो. रेल्वे स्टेशन, बस स्टँड किंवा हायवेवर तर हे दर कधीकधी त्याहीपेक्षा जास्त असतात. पण विचार करा, जर तुम्हाला अर्धा लिटरची (५०० मिली) शुद्ध पाण्याची बाटली अवघ्या […]
Microsoft ते Lenskart:पियुष बन्सल यांचा प्रेरणादायी प्रवास

प्रत्येक मोठ्या स्वप्नामागे धैर्य, मेहनत आणि जिद्द दडलेली असते. अशीच सुरुवात आहे एका तरुणाच्या प्रवासाची. त्या तरुणाचं नाव आहे Lenskart चे संस्थापक पियुष बन्सल. जगभरात करिअरचे असंख्य दालने उघडी असताना आणि आरामदायी आयुष्याच्या अनंत शक्यता समोर असताना, पियुष यांनी मात्र अमेरिकेतील उच्च पगाराची, सुरक्षित नोकरी मागे सोडून भारतात परतण्याचं धाडस केलं. स्वतःच्या देशात काहीतरी अर्थपूर्ण […]
संघर्षातून उभा राहिलेला भारताचा शिक्षणदीपस्तंभ: ‘फिजिक्सवाला’- Physics Wallah

अलख पांडे यांची प्रेरणादायी शैक्षणिक क्रांती देशातील मोठ्या उद्योगपती, अभिनेते, डॉक्टर किंवा राजकारण्यांच्या संपत्तीबद्दल आपण नेहमी ऐकतो. पण एका सामान्य शिक्षकाने अब्जोंची कंपनी उभी करून देशभरातील विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवला, ही प्रेरणादायी गोष्ट आहे ‘फिजिक्सवाला’चे संस्थापक अलख पांडे यांची. अतिशय साधारण परिस्थितीतून आलेल्या या तरुणाने आपल्या जिद्दीने, सातत्यपूर्ण मेहनतीने आणि अनोख्या शिकवण्याच्या शैलीने लाखो विद्यार्थ्यांचा […]
अपमानाचे उत्तर ‘यशाने’ दिलं! सुधीर जाटिया आणि ‘सफारी’ ब्रँडचा प्रेरणादायी प्रवास

यशाचा ‘सफारी’ पॅटर्न: हार न मानता अपयशालाच ताकद बनवणाऱ्या सुधीर जाटियांची गोष्ट. यश हे कधीच एका रात्रीत मिळत नाही. त्यामागे सातत्यपूर्ण मेहनत, स्वतःवरचा ठाम विश्वास, प्रचंड जिद्द आणि अपयशातून शिकण्याची तयारी लागते. अनेक लोक अडचणी आल्या की थांबतात, पण काही मोजकेच लोक अपयशालाच आपली ताकद बनवून पुढे जातात आणि खऱ्या अर्थाने यश मिळवतात. अशा लोकांचा […]
नादच खुळा! सॉफ्टवेअर इंजिनिअरने उभारला ११,२२७ कोटींचा ब्रँड; BlueStone च्या यशाचं नेमकं गुपित काय?
आजच्या काळात ‘Set Life’ सोडून अनिश्चिततेच्या वाटेवर चालण्याचं धाडस फार कमी लोक करतात. जेव्हा हाताशी IIT दिल्लीची पदवी आणि खिशात Amazon सारख्या जागतिक कंपनीचा कोट्यवधींचा पगार असतो, तेव्हा लोक सहसा स्थिरावण्याचा विचार करतात. पण गौरव सिंग कुशवाहा हे वेगळ्या मातीचे बनले होते. एका साध्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने भारतातील ज्वेलरी मार्केटचा चेहरामोहरा कसा बदलला आणि ११,२२७ कोटींचे […]
श्वेत क्रांतीचा शिल्पकार: डॉ. वर्गीस कुरियन आणि अमूलची यशोगाथा – Amul Success Story

डॉ. वर्गीस कुरियन यांची ओळख आणि सुरुवात डॉ. वर्गीस कुरियन हे आधुनिक भारताच्या कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२१ रोजी केरळ राज्यात झाला. त्यांनी भौतिकशास्त्र आणि अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेतले होते आणि त्यांना मूळतः शासकीय सेवेत काम करण्याची इच्छा नव्हती. मात्र, नियतीने त्यांना गुजरातमधील आनंद या छोट्या शहरात […]
जगातील सर्वात Futuristic टेक्नॉलॉजीमध्ये क्रांती घडवणारा Visionary उद्योजक – Elon Musk

Elon Musk – आजचे जग वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञान, विज्ञान आणि मानवाच्या कल्पनाशक्तीला नवे आयाम मिळत आहेत. अशा काळात Elon Musk हे नाव फक्त एक उद्योगपती म्हणून नाही, तर भविष्यातील मानवजातीसाठी स्वप्न पाहणारा एक visionary म्हणून ओळखले जाते. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला हा मुलगा लहानपणापासूनच वेगळा विचार करणारा होता. त्याला पैसा कमवण्यापेक्षा समस्या सोडवण्यात जास्त रस […]
डब्बावाल्यांची 130 वर्षांची यात्रा – Mumbai Cha Dabbawala

मुंबईच्या प्रचंड गोंगाटात, लोकलच्या धडधडत्या रुळांवरून दररोज लाखो स्वप्नं धावत असतात आणि त्या स्वप्नांच्या पोटात उबदार घरच्या जेवणाचा सुगंध पोहोचवण्याचं काम गेली शंभर वर्षे एक निष्ठावान हातांची फौज करत आली आहे… मुंबईचे डब्बावाले. हे फक्त डबे वाहून नेणारे कामगार नाहीत; ते शहराच्या अर्थव्यवस्थेचे शांत, न दिसणारे कणा आहेत. दररोज २ लाखांहून अधिक डबे वेळेवर पोहोचवून […]
दोन अपयशांनंतर उभा केलेला भारतातील सर्वात वेगाने वाढणारा होम-सोल्यूशन्स ब्रँड: Wakefit

Wakefit बद्दल जाणून घ्या. भारतामध्ये स्टार्टअप्सची मोठी लाट आली तेव्हा काही उद्योजकांनी प्रचंड यश मिळवलं, तर काहींची स्वप्नं अपयशामुळे कोलमडली. पण अपयशाचा स्वीकार करून पुन्हा उभं राहणं, स्वतःचा उद्योग उभारणं आणि लाखो ग्राहकांचा विश्वास मिळवणं,ही गोष्ट प्रत्येकाला जमत नाही. अशा मोजक्याच धैर्यवान उद्योजकांपैकी एक नाव म्हणजे चैतन्य रामलिंगेगौडा. मध्यमवर्गीय घरात वाढलेला हा तरुण, शिक्षण पूर्ण […]
सरकारकडून देशवासियांना दिवाळी गिफ्ट 22 सप्टेंबरपासून ‘हे’ नवीन GST दर लागू होणार

सर्वसामान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय – जीवनावश्यक वस्तूंवर GST कपात देशातील सर्वसामान्यांसाठी केंद्र सरकारकडून दिलासा देणारा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंवरील जीएसटी (GST) दर कमी होणार आहेत. या निर्णयामुळे थेट ग्राहकांना फायदा होईल आणि घरगुती बजेटला थोडा दिलासा मिळेल. ही करकपात काही निवडक वस्तूंवर मर्यादित नसून रोजच्या जीवनात लागणाऱ्या […]
Giorgio Armani : स्वप्नाला आकार देणारा कलाकार

इटली देशातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अब्जाधीश ब्रँड मालक जॉर्जिओ अरमानी यांचे दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांची अरमानी ही कंपनी गुच्ची आणि प्राडा नंतर इटलीतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा फॅशन समूह मानला जातो. या ब्रँडखाली शेकडो स्टोअर्स आणि 10 अब्जाहून अधिक डॉलर्सची वार्षिक उलाढाल आहे. मिलानच्या रेडी-टू-विअर फॅशनमध्ये […]
सेकंड हँड गाड्यांचं मार्केट बदलणाऱ्या CARS24 च्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी

आज टेक्नॉलॉजी आणि इंटरनेट मुळे वेगाने बदलणाऱ्या जगात, सगळं काही ऑनलाइन होत चाललं आहे. मग गाड्यांची खरेदी-विक्री कशी मागे राहील? पूर्वी वापरलेली गाडी विकायची म्हणजे डीलरकडे चकरा माराव्या लागायच्या, योग्य किंमत मिळेल की नाही याची चिंता, कागदपत्रांचं ओझं… पण या सगळ्याला पूर्णविराम देणारं एक नाव म्हणजे ‘CARS24’. या कंपनीने वापरलेल्या गाड्यांची खरेदी-विक्री सहज, सोपी आणि […]
PORTER: तीन मित्रांनी प्रत्येकी २ लाखांच्या गुंवतणुकीत सुरु केलेला व्यवसाय आज ३००० कोटींवर पोहोचलाय

सामान्य वाटणाऱ्या एखाद्या अडचणीतून जर योग्य वेळी कल्पकता आणि धाडस दाखवलं, तर मोठ्यातली मोठी समस्या देखील संधीमध्ये बदलू शकते. Porter या स्टार्टअपच्या यशोगाथेतून हे स्पष्ट होतं. IIT मधून शिक्षण घेतलेला आणि JP Morgan सारख्या नावाजलेल्या कंपनीत काम करणारा एक तरुण, एक छोटी पण सतत जाणवणारी अडचण ओळखतो आणि त्यातून भारतातील एक आघाडीचं इंट्रासिटी लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म […]