नवी अर्थक्रांती

Fake Loan App ओळखायचे कसे?


फेक App कसं ओळखाल?

Loan App वर विश्वास ठेवण्याआधी हे तपासा!

  • कमी कागदपत्रांत लगेच कर्ज देण्याचं आश्वासन
  • कर्ज मिळण्याआधीच पैसे भरण्याची मागणी
  • कर्ज देणाऱ्या बँक किंवा NBFC ची माहिती नसणं
  • व्याज आणि इतर शुल्क स्पष्ट न सांगणं
  • लगेच कर्ज घेण्यासाठी दबाव आणणं

अशी लक्षणं दिसली तर सावध व्हा!


Lender ची खात्री करा

कर्ज कोण देतंय, हे आधी तपासा!

  • कर्ज देणारी संस्था RBI च्या नियमांनुसार काम करते का पाहा.
  • RBI च्या DLA Directory मध्ये App ची माहिती तपासा.
  • बँक किंवा NBFC च्या अधिकृत वेबसाइटवरून खात्री करा.
  • फक्त RBI चा लोगो दिसतो म्हणून App वर विश्वास ठेवू नका.

KFS आणि APR तपासा

कर्ज घेण्याआधी या दोन गोष्टी समजून घ्या!

KFS: कर्जाची रक्कम, EMI, व्याजदर आणि इतर शुल्क यांची माहिती देणारा दस्तऐवज.

APR: व्याज आणि इतर शुल्क मिळून कर्जाचा वर्षभराचा खर्च किती होतो, हे यातून समजतं.

फक्त व्याजदर न पाहता कर्जाचा एकूण खर्च तपासा.


Mobile Permissions तपासा

काही संशयास्पद Apps या गोष्टींची परवानगी मागतात:

  • Contacts आणि Call Logs
  • Photos आणि Files
  • इतर वैयक्तिक माहिती

गरज नसताना अशी परवानगी मागणाऱ्या Apps पासून सावध राहा.


कर्ज घेताना या चुका टाळा!

  • कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यातच जमा झाली पाहिजे.
  • परतफेड अधिकृत बँक किंवा NBFC च्या खात्यातच करा.
  • अनोळखी UPI किंवा वैयक्तिक खात्यावर पैसे पाठवू नका.
  • OTP आणि UPI PIN कोणालाही सांगू नका.
  • कर्ज मिळण्याआधी पैसे भरण्याची मागणी झाल्यास सावध राहा.

फसवणूक झाल्यास काय कराल?

फसवणूक झाल्यास लगेच तक्रार करा!

  1. त्वरित तुमच्या बँकेला कळवा.
  2. 1930 या सायबर हेल्पलाइनवर फोन करा.
  3. www.cybercrime.gov.in वर तक्रार करा.
  4. व्यवहाराचे स्क्रीनशॉट आणि Transaction ID जतन करा.

कर्ज घेण्याआधी App नव्हे, तर कर्ज देणारी संस्था आणि कर्जाच्या अटी तपासा.

ही माहिती लगेच तुमच्या मित्राला शेअर करा!

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *