Fake Loan App ओळखायचे कसे?
फेक App कसं ओळखाल?
Loan App वर विश्वास ठेवण्याआधी हे तपासा!
- कमी कागदपत्रांत लगेच कर्ज देण्याचं आश्वासन
- कर्ज मिळण्याआधीच पैसे भरण्याची मागणी
- कर्ज देणाऱ्या बँक किंवा NBFC ची माहिती नसणं
- व्याज आणि इतर शुल्क स्पष्ट न सांगणं
- लगेच कर्ज घेण्यासाठी दबाव आणणं
अशी लक्षणं दिसली तर सावध व्हा!
Lender ची खात्री करा
कर्ज कोण देतंय, हे आधी तपासा!
- कर्ज देणारी संस्था RBI च्या नियमांनुसार काम करते का पाहा.
- RBI च्या DLA Directory मध्ये App ची माहिती तपासा.
- बँक किंवा NBFC च्या अधिकृत वेबसाइटवरून खात्री करा.
- फक्त RBI चा लोगो दिसतो म्हणून App वर विश्वास ठेवू नका.
KFS आणि APR तपासा
कर्ज घेण्याआधी या दोन गोष्टी समजून घ्या!
KFS: कर्जाची रक्कम, EMI, व्याजदर आणि इतर शुल्क यांची माहिती देणारा दस्तऐवज.
APR: व्याज आणि इतर शुल्क मिळून कर्जाचा वर्षभराचा खर्च किती होतो, हे यातून समजतं.
फक्त व्याजदर न पाहता कर्जाचा एकूण खर्च तपासा.
Mobile Permissions तपासा
काही संशयास्पद Apps या गोष्टींची परवानगी मागतात:
- Contacts आणि Call Logs
- Photos आणि Files
- इतर वैयक्तिक माहिती
गरज नसताना अशी परवानगी मागणाऱ्या Apps पासून सावध राहा.
कर्ज घेताना या चुका टाळा!
- कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यातच जमा झाली पाहिजे.
- परतफेड अधिकृत बँक किंवा NBFC च्या खात्यातच करा.
- अनोळखी UPI किंवा वैयक्तिक खात्यावर पैसे पाठवू नका.
- OTP आणि UPI PIN कोणालाही सांगू नका.
- कर्ज मिळण्याआधी पैसे भरण्याची मागणी झाल्यास सावध राहा.
फसवणूक झाल्यास काय कराल?
फसवणूक झाल्यास लगेच तक्रार करा!
- त्वरित तुमच्या बँकेला कळवा.
- 1930 या सायबर हेल्पलाइनवर फोन करा.
- www.cybercrime.gov.in वर तक्रार करा.
- व्यवहाराचे स्क्रीनशॉट आणि Transaction ID जतन करा.
कर्ज घेण्याआधी App नव्हे, तर कर्ज देणारी संस्था आणि कर्जाच्या अटी तपासा.
ही माहिती लगेच तुमच्या मित्राला शेअर करा!
