नवी अर्थक्रांती

महाराष्ट्रात ‘ईव्ही’ घेणाऱ्यांवर सरकारकडून सबसिडीचा पाऊस… टोलही माफ!

जर तुम्ही नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय शोरूममध्ये जाऊ नका! कारण महाराष्ट्र सरकारच्या ‘ईव्ही पॉलिसी २०२५’ मुळे तुमचे लाखो रुपये वाचणार आहेत. टू-व्हीलरपासून ते थेट ट्रॅक्टरपर्यंत भरपूर सबसिडीचा मिळतेय आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे— आता एक्सप्रेसवेवर टोल सुद्धा माफ होणार आहे! चला, ‘नवी अर्थक्रांती’ मध्ये या ईव्ही क्रांतीचं सत्य जाणून घेऊया.

सरकारने २०२५ ते २०३० साठी असा प्लॅन बनवलाय की ज्यामुळे तुम्ही पेट्रोल गाडी घेण्याचा विचारही करणार नाही!

टू-व्हीलर: नवीन इलेक्ट्रिक स्कुटर घेतली, तर १०,००० रुपयांपर्यंत थेट सबसिडी.
ई-कार: जर तुम्ही फॅमिली कार घेतली, तर चक्क १.५ ते २ लाख रुपयांपर्यंत सबसिडी तुमच्या खात्यात जमा होणार!
ई-ट्रॅक्टर आणि हार्वेस्टरवर सुद्धा १.५ लाखांपर्यंत सवलत दिली जात आहे.
सार्वजनिक वाहतूक: ई-बसवर तर तब्बल २० लाखांचा फायदा!

आणि सर्वात महत्त्वाचं… सर्व इलेक्ट्रिक गाड्यांना रोड टॅक्स (Road Tax) आणि रजिस्ट्रेशन फी मधून १००% माफी! म्हणजे गाडी घेताच तुमचे लाखो रुपये वाचले.”

“आतापर्यंत लोक म्हणायचे, ‘ईव्ही घेतली तर लांबच्या प्रवासाचं काय?’ पण आता टेन्शन सोडा! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्ग आता ‘सस्टेनेबल मोबिलिटी कॉरिडॉर’ बनले आहेत. याअंतर्गत दर २५ किमीवर हाय-स्पीड चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. आणि हो, ई-गाड्यांना या प्रमुख एक्सप्रेसवेवर आता टोल माफी मिळण्याचे संकेत आहेत, ज्यामुळे तुमचा प्रवास प्रदूषणमुक्त आणि विनामूल्य होईल!

गाडी चार्ज कुठे करायची? याचं उत्तर आता तुमच्या सोसायट्यांमध्येच मिळेल. कारण नवीन नियमानुसार, प्रत्येक नवीन गृहनिर्माण सोसायटीमध्ये १००% पार्किंग ईव्ही-रेडी असणं आता बंधनकारक आहे. जुन्या बॅटरीचं प्रदूषण होऊ नये म्हणून मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये विशेष ‘रिसायकलिंग हब’ तयार होत आहेत. इतकंच नाही, तर महाराष्ट्रात नवनवीन ईव्ही तंत्रज्ञान विकसित व्हावं म्हणून सरकारने १५ कोटींचा स्वतंत्र R&D फंड देखील मंजूर केलाय!

२०३० पर्यंत महाराष्ट्रात विकल्या जाणाऱ्या किमान ३०% नवीन गाड्या इलेक्ट्रिक असाव्यात, हे सरकारचं टार्गेट आहे. सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला गाडी विकत घेतानाच डीलर तो लाभ मिळवून देतो किंवा मग https://mhevpolicy.in पोर्टलवर अर्ज करून तुम्ही सबसिडी क्लेम करू शकता .

तुमची पुढची गाडी पेट्रोल घेणार की इलेक्ट्रिक? कमेंट्समध्ये तुमचं प्रामाणिक मत नक्की सांगा!

ही माहिती तुमच्या त्या मित्राला पाठवा जो नवीन गाडी घेण्याच्या विचारात आहे. अशाच जबरदस्त अपडेट्ससाठी ‘नवी अर्थक्रांती’ ला आत्ताच फॉलो करा!

आणखी वाचा: