नवी अर्थक्रांती

Category: उभारी देणारं असं काही

  • सततची टीका आणि मानसिक त्रासाला वैतागलेल्या उद्योजकांसाठी…

    सततची टीका आणि मानसिक त्रासाला वैतागलेल्या उद्योजकांसाठी…

    व्यवसाय का बंद केला विचारले तर म्हणाला, त्याच्या बरोबरचे मित्र चिडवतात. डिप्लोमा इंजिनियर असूनही कुरिअर चालवतो. वेळ पडली तर स्वतः डिलिव्हरी करत हिंडतो. मामा तर म्हणाला, “चांगली नोकरी करायची सोडून लोकांची दारं पुजत फिरतो. भिकेचे डोहाळे लागलेत याला.” आई काही बोलत नाही, पण नुसती रडत असते. मी व्यवसाय नाही, तर काही गुन्हा करतोय असे सगळे वागत होते. व्यवसायाच्या सुरुवातीच्या दिवसात कमावलेले सगळे पैसे पुन्हा व्यवसायातच पुन्हा गुंतवावे लागतात, पण हे सांगून कुणालाही कळत नव्हते. शेवटी बंद केले सगळं आणि सरळ ही नोकरी धरली. पण इथेही लक्ष लागत नाही. नुसती घुसमट होतेय. हे सगळ बोलताना अगदी गुदमरला होता तो. मी थोडा वेळ त्याची सांत्वना केली व निरोप घेतला. त्या रात्री मलाही झोप आली नाही. प्रताप सारखे असे अनेक युवक असतील. स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपडत असतील.

    मोठ्ठा उद्योजक व्हायचे ध्येय उरी बाळगून प्रामाणिक प्रयत्न करत असतील. पण जवळच्या लोकांच्या टीका, उद्योगात सतत मिळणारे rejections आणि मानसिक त्रासाला वैतागून स्वतःचे स्वप्न विसरून समाजाला मान्य असणाऱ्या सरळ रस्त्याने आयुष्य जगायला लागत असतील.

    तसं टीका आणि नकार हे उद्योजकांसाठी काही नवी बाब नाही. अगदी प्रत्येक उद्योजकाला याला सामोरे जावे लागते, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. आणि अनेक उद्योजकांनी, व्यावसायिकांनी याला सामोरे जाण्याचे मार्ग ही शोधले आहेत. पण नवीन उद्योजकांना ते माहित नसतात आणि मग प्रताप सारखा अनेकांचा बळी जातो. प्रतापला टीकांना आणि नकाराला सामोरे कसे जावे सांगायचे होते, पण त्या वेळी तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि ते ठिकाणही नव्हते. वेळही निघून गेली होती. मला एका गोष्टीची खात्री मात्र आहे. प्रताप नोकरी जास्त दिवस करू शकणार नाही. त्याच्यातला उद्योजक पुन्हा उफाळून येईल आणि पुन्हा तो स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करेल. पण बराच वेळ आणि संधी या प्रवासात वाया जाईल. उद्योग, व्यवसाय करु पाहणाऱ्या अनेक प्रतापांचे नुकसान होऊ नये म्हणून हा एक छोटासा प्रयत्न.

    १. टीकेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला.

    उद्योजक मित्रांनो शेजारील चित्रात कोणाला जख्ख म्हातारी दिसत असेल, तर कुणाला २० वर्षाची तरुणी. चित्र एकच आहे, पण आपण त्या चित्राकडे कसे पाहतो त्यावर आपल्याला काय बोध होतो ते ठरते. याचाच अर्थ असाही होतो की, आपण जे पाहतो ऐकतो, त्याचा आपण कसा अर्थ लावतो, त्यावर त्या घटनेचा आपल्यावर काय परिणाम होईल हे ठरते. उद्योग करत असताना आपल्यावर टीका करणारे बहुतेक आपले आप्तेष्ट किंवा मित्रपरिवारांपैकी असतात. या व्यक्ती जेव्हा तुमच्या स्थितीकडे पाहतात, तेव्हा ते बाहेरून स्थितीकडे पाहत असतात. तुमची आणि त्यांची परिस्थिती कडे पाहण्याची दिशा परस्पर विरोधी असल्याने, बाहेरून आत पाहणाऱ्यांना जे दिसते आणि तुम्ही ज्याठिकाणी उभे राहून पाहता तिथून तुम्हाला दिसणारे दृश्य (Vision ) यात बराच फरक असतो. आणि खरं म्हणजे तुमच्या स्वप्नाबद्दल सर्वात महत्वाच मत जर कुणाचं असेल, तर ते फक्त तुमचाच असू शकतं.

    इतरांच्या नकारार्थी टिप्पण्या ह्या त्यांच्या मर्यादांचे प्रतिबिंब असते, तुमच्या नव्हे. दुसरा महत्वाचा भाग असा की टीका टिप्पणी करणाऱ्यांचा हेतू काय आहे हे ही जाणून घेणे गरजेचे आहे. कुणी तुमच्यावरील अति लोभामुळे आणि काळजीपोटी बोलत असेल, तर कुणी तुमच्याबद्दल असणाऱ्या मत्सरामुळे बोलत असेल. इंग्रजीत एक नवीन शब्द आला आहे Frenimy म्हणजेच मित्राच्या रूपातील वैरी. दोन्हीही परिस्थितीत जर टीका टिप्पणीला घाबरून अथवा वैतागून, जर तुम्ही चुकीचे पाऊल उचलले, तर एक तर आप्तेष्टांचे व स्वतःचे नुकसान कराल किंवा वैऱ्याला अपेक्षित कृती कराल.

    २. तुम्ही परिपूर्ण (perfect) नाही याची जाणीव बाळगा.

    “Nobody is perfect, if you think you are perfect then you are Nobody”

    प्रत्येक व्यक्ती मध्ये दोष असतात त्या प्रमाणे तुमचेही काही दोष असू शकतात. स्वप्नवेडे होऊन मार्गक्रमण करताना स्वतःच्या दोषांकडे दुर्लक्ष होण्याची दाट शक्यता असते. अशावेळेला आपल्यावर होणाऱ्या टीका आणि rejections आपणास आपल्या दोषांची जाणीव करून देऊ शकतात. थोडेसे सिंहावलोकन (Introspection) केल्यास आपणास हे दोष जाणवतात आणि एकदा जाणीव झाली की ते सुधारणे सोपे होते. त्यामुळे टीकांना नकारार्थी घेण्याऐवजी त्यातून सुधारण्याचे धडे शिकणे अधिक फायदेशीर ठरेल. बऱ्याचदा टीकांच्या रुपात आलेल्या सुधारणेच्या सूचना परिस्थितीमुळे लगेच अंगीकारणे शक्य नसते. पण आपणास या सुधारणा करायच्या आहेत हा विचार मनात ठेऊन केलेला प्रवास जास्त यशस्वी ठरतो.

    ३. सगळ्याच गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नसतात.

    अनेकदा सिलेक्टिव्ह लिसनिंग चा वापर अनेक यशस्वी लोकं करतात. याचाच अर्थ आपणास उपयुक्त गोष्टी ऐकणे वर त्यावर अंमलबजावणी करणे आणि ज्या गोष्टी नको असतील त्यांना ऐकणे पण दुर्लक्षित करणे. या युक्तीचा वापर केल्याने आपण स्वतःला निराशेपासून तर वाचवतोच पण अनेक वेळा वादही टाळता येतात. निराशेत अथवा वादावादीत वाय जाणारा वेळ व शक्ती वाचते. अनेकदा एखादी टीका अथवा नकार आपणाला मिळाली की आपण लगेच त्यावर प्रतिक्रिया देतो अथवा तसा सातत्याने प्रयत्न करतो. अनेक अशा परिस्थिती असतात ज्यांचे उपाय काही वेळ जाऊ दिल्यास आपोआपच होतो.

    मित्रांनो या जगात काही वेगळं करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना नेहमीच टीकांना आणि नकारांना सामोरे जावे लागले.

    जे. के. रोलिंग, हॅरी पॉटरची सुप्रसिद्ध लेखिकेला पहिले पुस्तक प्रकाशित होण्याआधी १२ वेळा नाकारला सामोरे जावे लागले. संत ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना अनेक टीका सहन करतच जगाला ज्ञानेश्वरी द्यावी लागली. संत तुकारामांची गाथा इंद्रायणीत बुडवली गेली. त्यामुळे टीकांना आणि नकारांना घाबरून जाऊ नका. जागरूकपणे जर या टीकांचा स्वीकार करून सुधार घडवले, तर तुमचे स्वप्न सत्यात उतरवणे शक्य आहे

    तुमच्या स्वप्नांसाठी हार्दिक शुभेच्छा

    आणखी वाचा

  • ज्या माणसाला कष्टाची सवय लागलेली असते, अशी माणसे कधीच अयशस्वी होत नाहीत.

    ज्या माणसाला कष्टाची सवय लागलेली असते, अशी माणसे कधीच अयशस्वी होत नाहीत.

    यशामागे परिश्रम आहेत, प्रचंड असा आत्मविश्वास आहे. बिल गेट्सच्या बाबतीत त्याच्या शिक्षकांनी सांगितले होते की, हा मुलगा यशस्वी होणार नाही; परंतु याच बिल गेट्सने संगणकामध्ये क्रांती घडवून आणून अब्जावधी रुपये कमावले.

    Bill Gates Success Comes Through Effort

    कर्नल सँडर्स हा उत्कृष्ट स्वयंपाकी होता. आपल्या 65 व्या वाढदिवशी त्याने मित्रांसाठी कोंबडीचे जेवण केले. मित्राने खुश होऊन त्यास एखादे हॉटेल काढ असा सल्ला दिला. याच कर्नल सँडर्सने 299 ठिकाणी नकार पचवला. 300व्या ठिकाणी त्यास चिकन बनवण्याचे काम मिळाले. ते काम मिळताच अडीच वर्षात सँडर्सने 86 देशांत 13,000 हॉटेल्स काढली. त्याची रोजची कमाई 27 लाख डॉलर्स आहे.

    सुनीता पंडेर नावाची युवती 30 वेगवेगळ्या प्रकारची विमाने चालवायला शिकली. पॅराशूटमधून जंपिंग केले. नासाच्या परीक्षेत नापास झाली; पण तिने जीव दिला नाही.

    यशाच्या पाठी लागणाऱ्या माणसाच्या पाठी पैसा आपोआप येतो. ज्या माणसाला कष्टाची सवय लागलेली असते, अशी माणसे कधीच अयशस्वी होत नाहीत. यशस्वी होण्यासाठी तुमच्या आजूबाजूला जी सामान्य माणसे जे काही करतात ते करायचे टाळा, म्हणजे तुम्ही असामान्य व्हाल. ज्ञान हे कोणत्याही वयात घेता येते. कौशल्य आणणे हे तुमच्या हातात आहे. सवयी बदलल्या की तुम्ही कोणीतरी बनू शकाल. कृती करताना तुम्ही-आम्ही सबबी सांगतो, परमेश्वराने तुम्हाला मन, बुद्धी, आयुष्य दिलेले आहे, तेव्हा तुम्ही किडामुंगीसारखे का जगता? आपण यशस्वी होऊ शकत नाही, असे आपल्या मनावर बिंबवलेले असते. त्यामुळे मानसिकदृष्ट्या असलेले अपंगत्व फेकून द्या.

    जेसिका कॉक्स नावाच्या मुलीला दोन्ही हात नव्हते; परंतु ती निराश झाली नाही. तिने आपल्या वडिलांजवळ विमान चालवण्याचा हट्ट धरला आणि विशेष म्हणजे ती पायाने विमान चालवते.

    Success Comes Through Effort

    स्वप्न पाहणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वप्न वास्तवात आणणे हे तुमचे कर्तव्य आहे. जबरदस्त आत्मविश्वासामुळे अपंग माणसेही जीवनात यशस्वी होतात. तुमचे आयुष्य तुम्हीच बदलू शकता.

  • एका रात्रीत मिळणारे यश मिळवण्यासाठी किती वेळ लागतो?

    एका रात्रीत मिळणारे यश मिळवण्यासाठी किती वेळ लागतो?

    एका रात्रीत पार्सल पोहोचवण्याची कल्पना प्रत्यक्षात यायला फेडेक्सच्या फ्रेड स्मिथला प्रत्यक्षात ११ वर्ष लागली.

    पण फ्रेडने हा विचार सोडून दिला नाही. त्याला आपल्या या कल्पनेवर विश्वास होता. फ्रेडला जेव्हा जहाजावर व्हिएतनामला पाठवण्यात आलं, त्याने तिथे अमेरिकन हवाई दलाच्या पुरवठा सेवेचा (logistics) अभ्यास केला. १९७० मध्ये जेव्हा तो परत आला त्याने Ark Aviation Sales नावाची विमान दुरुस्त करणारी एक कंपनी विकत घेतली आणि जुन्या विमानांचा वापर करायला सुरुवात केली.

    The Truth About Overnight Success FedEx founder Fred Smith

    १९७३ पर्यंत म्हणजे पुढच्या तीन वर्षात त्याने हवाई दलाच्या पुरवठा सेवेची पद्धत ‘फाल्कन-२०’ या प्रकारच्या १४ विमानांचा ताफा तयार करून जशीच्या तशी अंमलात आणली आणि त्याची कल्पना पहिल्यांदा नाकारली गेल्याच्या अकरा वर्षानंतर फ्रेडने पहिलं पार्सल पाठवलं.

    त्यानंतर एके दिवशी त्याचा सहकारी रॉजर फ्रॉकने त्याला पैसे कुठून आणले असे विचारले. त्यावर त्याने उत्तर दिले, “जनरल डायनामिक्स कंपनीबरोबरची आपली मिटिंग फिस्कटली. आपलं मोठं नुकसान झालं. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत सोमवारपर्यंत पैसे उभे करावे लागणार होते, म्हणून मी विमानाने लास वेगासला गेलो आणि तिथे २७ हजार डॉलर्स जिंकलो.” 

    रॉजर म्हणाला, “म्हणजे तू आपल्याकडे उरलेले शेवटचे ५ हजार डॉलर्स घेऊन गेलास. तू असं कसं करु शकतो?”

    आपले खांदे उडवत तो म्हणाला, “काय फरक पडला असता? पैशांशिवाय आपण विमानात इंधन सुद्धा भरू शकत नाही. या पैशांनी काही दिवस तरी आपलं काम सुरु राहील.”

    The Truth About Overnight Success FedEx founder Fred Smith

    फेडेक्सला त्यानंतरसुद्धा अनेकदा आर्थिक संकटांचा सामना करावा लागला, पण फ्रेडने मोठ्या धीराने आणि हिंमतीने सर्व संकटातून मार्ग काढत वाटचाल सुरूच ठेवली. आज चाळीस वर्षानंतर, फेडेक्स जगातील सर्वात मोठ्या कुरियर कंपन्यांपैकी एक आहे. २०१८ मध्ये फेडेक्सचे वार्षिक उत्पन्न ६५.४५ अब्ज डॉलर्स होते. फ्रेडची ही कंपनी वर्षाला अब्जावधी पार्सल पाठवते आणि फ्रेडची स्वतःची जवळपास ५.४ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

  • सगळं संपलं असं कधीच होत नसतं! – मोटिव्हेशनल स्टोरी

    सगळं संपलं असं कधीच होत नसतं! – मोटिव्हेशनल स्टोरी

    निळेशार आकाश, त्या आकाशातून विहार करणारे पक्षी, उंच-उंच हिरवीगार झाडे, खाली बागेत बागडणारी मुले, बाहेरचा सुंदर निसर्ग तो त्याच्या डोळ्यासमोर उभा करायचा. त्याला देखील खूप छान वाटायचं जयसिंग इतकं सुंदर वर्णन करायचा की रामलाल वाटायचं की, कधी एकदा मी बाहेर पडून माझ्या डोळ्यांनी हे सुंदर जग पाहतो. असेच बरेच दिवस या दोघांचे हे वर्णनात्मक खेळ चालू होते. आणि एक दिवस अचानक सका-सकाळी रामलाल पाहतो तर काय? जयसिंग रूममध्ये नव्हताच. रामलालला वाटलं, बहुतेक त्याला डिस्चार्ज मिळाला असेल, पण ‘मग त्याने रात्री मला सांगितलं कसं नाही?’ आता मला बाहेरचं जग कोण दाखवेल? आता बाहेर काय चाललंय ते मी कसं बघू?

    आणि एक दिवस शरीरातील संपूर्ण ताकद एकवटून त्याने हातापायची हालचाल केली. हळूहळू कॉटवरुन पाय खाली ठेवण्याचा प्रयत्न केला. रामलाल रोज खिडकीबाहेर काय चालू आहे हे पाहण्यासाठी धडपडत होता आणि एकदिवस त्याच्या प्रयत्नांना यश आले, संपूर्ण ताकदीनिशी तो दोन्ही पायांवर उभा राहिला. धडपडला आणि समोरच्या कॉटवर जाऊन आदळला. पण पुन्हा उभा राहिला आणि अखेर तो खिडकीजवळ गेला. खिडकीतून बाहेर पाहतो तर काय! जयसिंग सांगत होता त्यातील काहीच तिथे नव्हते. तो नर्सला जोरजोरात हाका मारू लागला. नर्स धावत-पळत आली. ‘नर्स इथं खाली मोठं गार्डन होतं, उंच मोठी-मोठी झाडे होती, कुठं गेलं सगळं, इथे तर आत्ता काहीच दिसतं नाही. २ महिन्यातच सगळं गायब कसं झालं.’ त्यावर नर्स म्हणाली, ‘साहेब मी इथे १० वर्ष झालं काम करतीये आणि राहायला पण इथं जवळच आहे. माझ्या बघण्यात तरी इथं जवळपास कुठेच गार्डन नाही. गार्डन तर सोडा, इथं जास्त झाडेदेखील नाहीत. पहा ना, सगळ्या बिल्डिंगच दिसतायेत.’

    त्यावर रामलालला प्रश्न पडतो, मग जयसिंग एवढे दिवस माझ्याशी खोटं का बोलला असेल. पण काही वेळाने रामलालच्या लक्षात येतं, जयसिंगच्या त्या बोलण्यामुळेच मी माझ्या पायांवर उभा राहू शकलो. माझ्यात उभं राहण्याचं बळ आलं ते जयसिंगमुळेच.

    मित्रांनो आपल्या वाणीत इतकी ताकद असते ना की, त्यामुळे अशक्यप्राय गोष्टीदेखील शक्य होतात. त्यामुळे कधीकधी कोणाबद्दल पॉझिटिव्ह बोललं किंवा कोणाचं कौतुक केलं तरी काही बिघडत नाही. फक्त संक्रांतीच्या दिवशीच गोड बोलायचं असतं असं काही नाही. एकेक लोक असतात, जे नेहमी negative विचार करतात negative बोलत असतात. आपल्या बोलण्याने जास्त काही फरक नाही पडणार मान्य आहे, मात्र समोरच्या व्यक्तीच्या पाठीवर एक कौतुकाची थाप देखील पुरेशी असते.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा