नवी अर्थक्रांती

वडिलांना आपल्या मुलांकडून अशी संधी हवी असते, ज्यामुळे त्यांना आनंदाश्रू अनावर व्हावेत!

जसे मुकेश अंबानींच्या बाबतीत घडले!

आपण वडिलांना रडवण्याऐवजी, त्यांना न रडवण्याची एक प्रथाच पाडली आहे! जसे ते वडील होतात, तसे त्यांचे अश्रू आटवून टाकले जातात. त्यांना सांगितले जाते, “तुम्ही दगड व्हा. तुम्ही एक छप्पर बना. तुम्ही एक भिंत बना. आयुष्यभर तटस्थ राहा!”

आणि ते तसेच बनूनही राहतात.

जेव्हा मूल पडते, तेव्हा आई धावत जाते, पण वडील मात्र उभे राहून म्हणतात, “उठ, काहीही झाले नाहीये.” आतून त्यांचे हृदय थरथरत असते, पण ते ते बाहेर दाखवत नाहीत.

आपण वडिलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची फार कमी संधी दिली आहे.

वडील मुलाची फी भरतात, प्रसंगी ओरडतात, शांत राहतात, रात्रीच्या वेळी मुलाच्या विखुरलेल्या चपला नीट लावून ठेवतात, मुलीच्या लग्नासाठी कोणालाही न कळू देता कर्ज काढतात. त्यांचे प्रेम कधीही गाजावाजा करत नाही.

आपल्या समाजात वडील म्हणजे शांत राहणारे व्यक्तिमत्त्व बनले आहेत. आईच्या तक्रारींच्या वेळी ते मुलाला उपदेश देतात… स्वतःच्या चिंता मनात दाबून ठेवून ते कठोर बनून राहतात. इतके की, जर कधी वडिलांनी मुलाला घट्ट मिठी मारली, तर तो मुलगाही घाबरून जातो.
म्हणूनच, जेव्हा ते वृद्ध होतात, तेव्हा त्यांच्याकडे सांगण्यासारखे खूप काही असते, पण ऐकणारे कोणीही नसते. मुले मोठी होतात, समजूतदार होतात; आणि वडील मात्र पुन्हा लहान मुलासारखे बनतात.

आणि मग एक दिवस असा येतो…

जेव्हा मुलगा त्यांच्यासमोर उभा राहतो—त्याच्याच उंचीचा, त्याच्यासारखाच गंभीर. तेव्हा वडिलांना जाणवते—आता मी त्याला सांभाळू शकत नाही, उलट आता मलाच त्याची काळजी घेण्याची गरज आहे.

आणि मग ते रडतात… अगदी मुकेश अंबानींसारखे!

रडणे म्हणजे कमकुवतपणा नव्हे, तर तो एक ‘विराम’ आहे—आयुष्यभर निभावलेल्या जबाबदाऱ्यांतून मिळालेला एक छोटासा विराम. त्या अश्रूंतून ते जणू सांगत असतात—”बाळा, मी तुला मोठे केले, पण तू मला खऱ्या अर्थाने मोठे जगणे दिले आहेस. आजपासून तू ‘वडील’ आहेस आणि मी तुझे ‘मूल’ आहे.”

जेव्हा वडिलांच्या नशिबात असे अश्रू येतात, तेव्हा समजावे की त्यांचे आयुष्य पूर्ण झाले आहे.

कारण, वडिलांचे रडणे हे या जगातील सर्वात पवित्र दृश्य असते. आईचे रडणे जगाला माहीत असते, पण वडिलांचे रडणे फक्त त्यांच्या मुलालाच माहीत असते.

आणि जेव्हा मुलाचे अश्रू वडिलांच्या अश्रूंसारखे होतात… तेव्हा तो मुल खऱ्या अर्थाने वडिलांइतकाच जबाबदार बनतो.

हे नाते असेच पुढे सुरू राहते ❤️

Credit: © टिशा अग्रवाल पत्रकार

Jio IPO लिस्टिंग च्या आधी अंबानी फॅमिली मधील प्रत्येक सदस्य ने केलेले भाषण नक्की वेळ काढून ऐका

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *