शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा…! स्टोरी दोन जगज्जेत्यांची

आत्महत्त्याच करू का? एरवी जगून तरी काय करू हेच कळत नाहीए़ त्यापेक्षा जावं आहे-नाही ते सारं सोडून – विचार भयाण होता. वेळच तशी होती. समोर आयुष्याचा सारा काळोखच दिसत होता. एवढं मोठं यश मिळवल्याचा आनंद क्षणिक वाटला. पण ते सारं मागं सोडणं कठीण वाटत होतं. निराशेनं ग्रासलेल्या, तिशीही न गाठलेल्या या तरुणानं आत्महत्त्येचा विचार केला. […]
स्टीव्ह जॉब्सचे प्रचंड गाजलेले प्रेरणादायी भाषण मराठीत…!!

स्टीव्ह जॉब्सनी २००५ साली स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात केलेले भाषण प्रचंड गाजले. हे भाषण म्हणजे त्यांच्या प्रेरणादायी आयुष्याचा गोषवारा आहे… त्याचा केलेला मराठी अनुवाद… जगातल्या सर्वोत्तम गणल्या जाणाऱ्या महाविद्यालयांपैकी एक अशा महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात तुमच्यासोबत बोलायची संधी मला मिळते आहे, हा मी माझा बहुमान समजतो. मी महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण करू शकलो नाही. आता सत्य […]
शिक्षण अर्धवट राहिलं, पण स्वप्नं पूर्ण केली! देशातील पहिला केबल टीव्ही चॅनेल सुरु करणाऱ्या सुभाष चंद्रांची कहाणी

हरयाणातील आदमपूर मंडी गावातील एका तरुणाचं स्वप्नं होतं- इंजिनिअर बनायचं. पण त्याची झेप काही इंटरपुढे गेली नाही. बरं झालं तो इंजिनिअर झाला नाही ते. नाहीतर कुठेतरी पाच पंचवीस हजाराची नोकरी करून पगाराच्या दिवसाची वाट बघत बसला असता. आज त्याच्या कंपन्यामध्ये हजारो लोक काम करताहेत आणि त्याच्या सर्व कंपन्यांचं बाजारमूल्य आहे तब्बल ४२ हजार कोटी. १९९२ […]
सततची टीका आणि मानसिक त्रासाला वैतागलेल्या उद्योजकांसाठी…

गेल्या आठवड्यात प्रताप भेटला. पाठीवर Sack, हातात फोल्डर आणि गळ्यात टाय. चांगला रुबाबदार दिसत होता, पण चेहऱ्यावर हरवल्याचे भाव होते. मी अगदी समोर जाऊन उभा राहिलो तरी लक्ष नव्हतं. थोड बोलणं झाल्यावर लक्षात आले, की त्याने स्वतःचा कुरियरचा व्यवसाय बंद करून एका फायनान्स कंपनीत सल्लागार म्हणून नोकरी धरली आहे. खूप दु:खी वाटत होता. हताश झाला […]
‘ज्या शेतात आई शेतमजूर म्हणून काम करत होती, ती शेती मी विकत घेतली’ : उद्योजक अशोक खाडे

घरची प्रचंड गरिबी. बुद्धिमत्ता हेच भांडवल. पेड (ता. तासगाव, जि. सांगली) येथे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या युवकाने मोठ्या भावाच्या मदतीने मुंबईची वाट धरली. “जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट’ हे ब्रीद घेऊन व्यवसायात शिरलेले अशोक खाडे यांच्या “फॅमिली’चा विस्तार आज साडेचार हजार कर्मचारी आणि सुमारे साडेपाचशे कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या “दास ऑफशोअर’ […]
अडचणी, अडथळे सर्वांनाच येतात, पण ते पार करण्याची ताकद आपण स्वत:हून निर्माण केली पाहिजे.

प्रत्येकाच्या आयुष्यात एकवेळ तरी अशी येते, की तो प्रवासाला निघताना स्टॅंडवर किंवा स्टेशनवर पोचतो अन् एक किंवा दोन मिनिटांसाठी गाडी चुकते. चूक बसची किंवा ट्रेनची नसते. ती पकडण्यासाठी आपण एक-दोन मिनिटे उशिरा पोचतो. अशाच रीतीने एखादे वेळी आलेली संधीदेखील आपण गमावतो. दोष संधीचा नसतो. आपल्या नियोजनाचा, प्रयत्नांचा असतो. आयुष्य एखाद्या कादंबरीसारखं आहे. रोजचा एक दिवस […]
सर आयझॅक न्यूटन, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारे थोर शास्त्रज्ञ यांची जयंती

सर आयझॅक न्यूटन : (४ जानेवारी १६४३ – ३१ मार्च १७२७) सुप्रसिद्ध इंग्रज शास्त्रज्ञ, गणित, गतिकी (प्रेरणांच्या संदर्भात गतीचा अभ्यास करणारे शास्त्र), खगोलीय यामिकी, ज्योतिषशास्त्र आणि प्रकाशकी या बहुविध विज्ञान शाखांमध्ये अतिशय मोलाची भार टाकणाऱ्या या शास्त्रज्ञांचे नाव विज्ञानाच्या इतिहासात अजरामर झाले आहे. त्यांचा जन्म वुल्झथॉर्प (लिंकनशर) येथे झाला. त्यांच्या जन्माच्या दोन महिने अगोदरच त्यांचे […]
भारतीय उद्योगजगताचे दोन मानबिंदू धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा यांचा आज जन्मदिन!!!

भारतीय अर्थव्यवस्था आणि उद्योगक्षेत्राला नवी झळाळी प्राप्त करून देणारे दोन उद्योगपती कै. धीरूभाई अंबानी यांचा आज जन्मदिन, तर श्री. रतन टाटा यांचे आज वाढदिवस. रतन टाटा आज ८६ वर्षांचे झाले. धीरूभाईंचे 6 जुलै 2002 रोजी निधन झाले. ते हयात असते, तर आज ते ९१ वर्षांचे झाले असते. भारतातील पहिले नामांकित उद्योगपती सर जमशेटजी टाटा यांच्या […]
यु-ट्युब सुरु करण्याचा हेतू ऐकून आश्चर्यचकित व्हाल

युट्यूब हा सर्वांच्याच परिचयाचा प्लॅटफॉर्म. दिवसभरात आपल्यापर्यंत जी काही माहिती पोहोचते, त्यामध्ये युट्युबचा वाटा मोठा आहे. कित्येक व्यक्तींना युट्युबच्या माध्यमातून ओळख मिळाली. सप्टेंबर २०२३ च्या रिपोर्टनुसार युट्युबवर ११४ मिलियन (११.४ कोटी) ॲक्टिव्ह युट्युब चॅनल्स आहेत आणि १०० हून अधिक देशांमधील २.६ बिलियन (२६० कोटी) पेक्षा जास्त लोकांकडे यु-ट्युब आहे, डेली युजर्सच्या बाबतीत बोलायचं झालं, तर […]
तुमचा स्टार्टअप सुरु करण्याच्या ७ सर्वात सोप्प्या पायऱ्या

Startup in India
आपला लहानातला लहान निर्णय एकतर आपले आयुष्य बदलू शकतो किंवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो.

होरेशीओ नेल्सन. इंग्लंडचा प्रसिद्ध सेनापती नेल्सन म्हणायचा, ‘ज्यावेळी लढायचे की नाही या द्विधा मनस्थितीत मी असतो, त्या प्रत्येक वेळी मी लढण्याचाच निर्णय घेतो.’ जर्मनीचा सेनापती फोन मोल्तके सुद्धा आधी परिस्थितीचा अंदाज घ्यायचा आणि पटकन निर्णय घ्यायचा, मग भलेही घेतलेला निर्णय बरोबर असो किंवा चुकीचा. तो आपल्या निर्णयावर ठाम असायचा आणि आपण घेतलेला निर्णय बरोबर कसा […]
तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…

जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…’ “We become like the average of the five people we spend the most time with.” आपण ज्या लोकांसोबत सर्वाधिक […]
अगोदर भरपूर पाय पसरा, नंतर अंथरूण गोळा करा

मित्रहो आपल्या मराठी भाषेत असे अनेक जुनाट विचार व म्हणी आहेत, ज्या आज भंगारात काढण्याची गरज आहे. उदा. अंथरूण पाहून पाय पसरावे, कर्ज काढू नये, समुद्र पार करणे पाप आहे असे अनेक बुरसटलेले विचार व म्हणी आहेत. अशा विचारांचा पगडा गेली कित्येक वर्षे समाजावर आहे. कायतर म्हणे; पैसे व्याजाने लावू नये, नाहीतर कुटुंबाचे बरेवाईट होते […]
‘दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल

माणूस जगत असतो तो ऑक्सिजनवर. जशी त्याला ऑक्सिजनची गरज असते तशीच आनंदमयी जीवन जगण्यासाठी त्याला प्रेरणेची गरज भासत असते. तो जगत असताना त्याच्या हातून अनेक चांगल्या-वाईट गोष्टी घडत असतात. माणसाच्या हातून एखादे ठराविक कार्य कसे काय घडते? अर्थातच त्याला मिळालेल्या प्रेरणेमुळे. माणसाच्या कृतीला आणि जाणीवेला ज्यामुळे प्रोत्साहन मिळते त्यालाच प्रेरणा असे म्हणतात. हल्ली Social Media […]
सगळं संपलं असं कधीच होत नसतं! – मोटिव्हेशनल स्टोरी

ही गोष्ट आहे दोन मित्रांची आणि त्यांच्या मैत्रीची. त्यांच्या मैत्रीची सुरुवात एका हॉस्पिटलमध्ये होते. दोघे एकाच वॉर्डमध्ये असतात. त्यातील एक मित्र असतो रामलाल नावाचा, त्याला पॅरालिसिस झालेला असतो. बिचाऱ्याचे संपूर्ण शरीर अधू झाल्यामुळे तो चालू-फिरू शकत नव्हता. दुसरा जयसिंग. तो बाहेरून तरी धडधाकट वाटायचा. तो रोज त्या खाटेवरच पडून राहिलेल्या रामलालला खिडकीबाहेरील जग दाखवत असे. […]
परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करा

आपल्याला श्रीकृष्णाचे जीवनचरित्र तर माहितीच आहे.त्याच्या जन्माच्या आधीपासूनच त्याला मारण्यासाठीचे षडयंत्र चालू होते, मात्र तरीही तो त्यातून वाचला. त्यानंतर देखील त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक स्तरावर त्याला मारण्यासाठी अनेक युक्त्या लढवण्यात आल्या. मात्र त्यांना भूल देत तो प्रत्येक संकटातून बाहेर पडला. न डगमगता त्याने प्रत्येक संकटाविरुद्ध प्रतिकार केला. अर्थात तो परमेश्वर होता, पण संकटांविरुद्ध लढण्याचा तो गुण […]
स्वयंनिर्मित कोट्याधीशांची 5 यशाची रहस्ये

जगात एकूण 800 कोटी लोक आहेत. यातील फक्त 1 कोटी 40 लाख लोक हे कोट्याधीश आहेत. एका सर्वेक्षणानुसार 90% कोट्याधीश असे आहेत जे स्वतःच्या बळावर यशस्वी झाले आहेत. ज्यांच्याकडे कुठलीही वडिलोपार्जित संपत्ती नाही. शून्यातून स्वतःचे साम्राज्य उभे करणे ही काही सोप्पी गोष्ट नाही, पण मग ही अवघड गोष्ट त्यांनी पूर्ण कशी केली. त्यांच्याकडे अशा कोणत्या […]
स्वप्नं बघा, ती पूर्ण होतात!

स्वप्नं ती नव्हे जी झोपेत पडतात, स्वप्नं ती जी तुम्हाला झोपूच देत नाहीत असे डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम म्हणायचे. स्वप्नं म्हणजे काय? जर तुम्ही शब्दकोशात याचा अर्थ शोधलात, तर तुम्हाला उत्तर मिळेल, ‘एखादी इच्छित गोष्ट मिळविण्याचा ध्यास, ध्येय, महत्वाकांक्षा’. थोडक्यात एखादी अशक्य वाटणारी, तरीही मिळवता येईल अशी मोठी इच्छा. स्वप्नं सारेच बघतात. मोठी स्वप्नं […]