Tag: motivation

  • शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा…! स्टोरी दोन जगज्जेत्यांची

    शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा…! स्टोरी दोन जगज्जेत्यांची

    निराशेनं ग्रासलेल्या, तिशीही न गाठलेल्या या तरुणानं आत्महत्त्येचा विचार केला. याच नैराश्यात त्याला दारूचं व्यसन लागलं. दारू पिऊन आपण जीवघेण्या वेगानं गाडी दामटतोय, याचंही भान त्याला राहत नव्हतं. अशाच गुन्ह्यांमध्ये त्याला दोनदा पकडलं गेलं. शिवाय त्याच्या अंमली पदार्थ घेत असलेल्या फोटोनं जगाला हादरवून सोडलं. आत्महत्त्येचा विचार डोक्यात सारखा भिरभिरत होता, पण त्याचं नशीब थोर म्हणून मित्र भले मिळाले होते. त्या मित्रांनी त्याची आत्मनाशाची वाट अडवून धरली. आणि मग तो परतला परतला आणि पुन्हा त्याच तडफेनं त्यानं अनेक विक्रम केले. तो तरुण म्हणजे अमेरिकेचा महान जलतरणपटू मायकेल फेल्प्स. 

    phelps medals

    किराणा दुकानात बसणं, फावल्या वेळात क्रिकेट एके क्रिकेट खेळणं. आयुष्याचं ध्येय काय? तर वकार युनुससारखी बॉलिंग जमायला हवी. पाकिस्तान ही त्याची फेव्हरिट क्रिकेट टीम. अन् फास्ट बॉलर व्हायचं हे स्वप्न. सचिन तेंडुलकर अन् ख्रिस गेल हे दोघे आवडते क्रिकेटपटू. गल्लीतल्या क्रिकेट टीममध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर खेळायचा अन् फास्ट बॉलिंग करायचा. फुटबॉलही त्याचा जीव की प्राण. आजही त्याला कोणी जर फुटबॉलची ऑफर केली, तर तो नाही म्हणू शकणार नाही. पण तो बनला धावपटू. सगळ्या आवडी बाजूला ठेवून वेगळ्याच क्षेत्रात करिअर घडवलं. तेही इतक्या टोकाचं की तो जगातला सर्वांत वेगवान धावपटू बनला. हा धावपटू म्हणजे नेहमी नवे विक्रम प्रस्थापित करणारा जमैकाचा उसैन बोल्ट.

    Usain Bolt

    २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ठरवलेली यशाची शिखरं सहज सर केल्यानंतर फेल्प्स आणि बोल्ट या दोघांनी स्पर्धात्मक खेळांतून निवृत्ती जाहीर केली. फेल्प्सनं अनेक देशांपेक्षा अधिक सुवर्णपदकं एकट्याच्या नावावर करून घेतली, तर बोल्टनं धावण्याच्या मैदानावर असे काही आकडे गाठून ठेवले आहेत, की ते कीर्तिमान मोडायचे तर दुसरा बोल्टच व्हावं लागेल. 

    अमेरिकेतल्या बाल्टीमोर शहरात जन्मलेला फेल्प्स हे घरातलं शेंडेफळ. त्याला दोन मोठ्या बहिणी. आई हेडमास्तर अन् वडील निवृत्त पोलीस. त्याच्या दोन्ही बहिणी जलतरणात मास्टर होत्या. त्यांना पाहून सातव्या वर्षीपासून फेल्प्स पाण्यात उतरला. पोहायला शिकला. रोज आपल्या बहिणींचा सराव पाहूनच मोठा झाला. आपल्या बहिणींपेक्षा अधिक चांगलं पोहता आलं पाहिजे हेच त्याचं सुरुवातीचं ध्येय होतं  

    phelps family

    खरं तर त्याला पाण्यात उडी मारल्यानंतर त्यात जास्त वेळ चेहरा ठेवायला आवडत नाही. नाका-तोंडात पाणी जाण्याची त्याला भीती वाटे. त्यामुळं सराव करतानाही तोंड पाण्यात कमीत कमी वेळ ठेवण्याचा त्याचा शिरस्ता असे. पाहता पाहता तो पोहण्यात इतका पारंगत झाला, की त्यानं दहाव्या वर्षीच एक राष्ट्रीय विक्रम नोंदवून ठेवला. त्याच वर्षी त्याला बॉब बाउमन नावाचे प्रशिक्षक मिळाले अन् त्याच्या स्विमिंगच्या करिअरला कलाटणी मिळाली. तेच त्याचे आवडते प्रशिक्षक बनले. ‘‘त्यांच्याशिवाय मी पाण्यातच उतरणार नाही’’, असं आजही फेल्प्स म्हणतो. बॉब त्याला सॉलिटरी मॅन म्हणतात. एकाकी माणूस. त्यांच्या मते या पोराचं एकच ध्येय असतं. पाण्यात उतरल्यावर शक्य तितक्या लवकर अंतर पार करायचं. 

    वडिलांनी त्याच्या आईशी घटस्फोट घेतल्यानंतर फेल्प्स एकटा पडला. त्याला कुटुंबात राहणंही शक्य वाटेनासं झालेलं. तेव्हा प्रशिक्षक बॉबनं त्याला वडीलकीचा आधार दिला. बॉबनंच त्याला मोठं केलं. त्यांच्या प्रशिक्षणाच्या जोरावर ‘फ्लाइंग फिश’ बनलेला फेल्प्स एक-एक सुवर्णपदकांवर नाव कोरत गेला. त्यानं स्वत:च्या नावावर एवढी ऑलिम्पिक पदकं नोंदवून ठेवली आहेत की अनेक देशांच्या अख्ख्या ऑलिम्पिक संघांनाही त्याला गाठणं मुश्कील व्हावं! 

    खरं तर या यशाच्या उन्मादात सुरुवातीच्या काळात फेल्प्स वाहवत गेला. कधी-कधी तो भरघोस दारू ढोसायचा. तसाच गाडी दामटायचा. पोलिसांनी त्याला २००४ साली असंच ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या अपराधापोटी पकडलं. त्यावेळी तो दोषीही ठरला आणि १८ महिन्यांची शिक्षा झाली. शिवाय २५० डॉलरचा दंडही भरावा लागला. शिवाय मदर्स अगेन्स्ट ड्रंक ड्रायव्हिंगच्या शिबिरात सक्तीच्या समाजसेवेसाठी जावं लागलं. 

    त्यानंतर पाच वर्षांनी फेल्प्सचा एक फोटो व्हायरल झाला. त्या फोटोत तो अंमली पदार्थ घेताना दिसत होता. हा फोटो खोटा-बनावट असल्याचं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं होतं, पण तो खरा असल्याचं आणि एका पार्टीत घेतला गेल्याचं त्यानं कबूल केलं. या फोटोचा मोठा फटका फेल्प्सला बसला. केलॉग्ज नावाच्या कंपनीनं त्याचं प्रायोजकत्व काढून घेतलं; शिवाय अमेरिकेच्या स्विमिंग संघटनेनं फेल्प्सवर तीन महिन्यांची बंदीही घातली. असाच अनुभव २०१४ साली आला होता. फेल्प्सला अटक झाली होती. कारण पुन्हा त्यानं अंमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवलं होतं. पुन्हा एकदा सहा महिन्यांची बंदी त्याच्यावर ओढवली.

    michael phelps dui takes responsibility twitter response pp sl

    याच काळात त्याला नैराश्यानं ग्रासलं  इतकं की तो आत्महत्त्येचाही विचार करत होता. आता काहीच शिल्लक राहिलं नाही, कमबॅक करणं शक्य नाही, अशा नकारार्थी विचारांनी त्याला घेरलं होतं. यातून बाहेर पडण्यासाठी फेल्प्सला मित्रांनी मदत केली. सहा महिने मेडिटेशन करायला लावलं. त्यातून तो बाहेर पडला. माणूस बनला. पुन्हा नव्या जोशानं पाण्यात उतरला. २०१६च्या  ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचे नवे टोक गाठून त्यानं थांबायचं ठरवलं. तेव्हा तो एक लेकराचा बाप बनला होता आणि त्याचा चांगला सांभाळ करायचा त्यानं ठरवलंय.

    दुसरीकडे उसैन बोल्टनंही तेव्हाच आपण निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं. फेल्प्सनंतर एका वर्षानं जन्मलेला बोल्ट लोकप्रियतेच्या तेवढ्याच उंचीवर आहे, जेवढ्या उंचीवर फेल्प्स. खरं तर बोल्ट जन्मला तो प्रदेश जंगलाचा. जमैकातलं शेरवूड कंटेंट हे त्याचं जुळं शहर. त्याला एक बहीण अन् एक भाऊ. त्याच्या वडिलांचे ग्रामीण भागात छोटं किराणा दुकान होतं. बोल्टला क्रिकेटची जास्त आवड होती. सचिन तेंडुलकर, ख्रिस गेलचा तो चाहता होता आणि वकार युनुससारखी बॉलिंग त्याला करायची होती. पण ज्या शाळेत तो गेला तिथं त्याला धावण्याची संधी मिळाली आणि तो त्यात पहिला आला. करिअरला कलाटणी मिळण्यासाठी एवढी स्पर्धा पुरेशी ठरली. 

    90789023 bolt mills getty

    त्यानंतर तो कधीच थांबला नाही. त्याचा सराव एवढा अवघड असतो की सर्वसामान्यांनी त्याचा विचारही करू नये. तो जेव्हा धावतो तेव्हाच त्याच्या अंगातील क्षमता दिसून येते. सारे धावपटू काही मीटरवर मागे असताना हा फिनिशिंग लाइनला पोहोचलेला असतो आणि बाजूला हसून बघत असतो.

    घरातला लाडका होता आणि घरचे म्हणतील तसं ऐकायचा. त्यामुळं त्याला फारशा वाईट सवयी लागल्या नाहीत, असं म्हणतात. पण त्याच्यावर कायमच डोपिंगचा आरोप होत आला आहे. जेव्हा जेव्हा त्यानं विक्रम प्रस्थापित केला, तेव्हा तेव्हा त्यानं उत्तेजकं घेतल्याचे आरोप झाले आहेत. पण त्यानं तो अजिबात डगमगला नाही. कारण ‘‘ज्या गावीच जायचे नाही त्याबाबत विचार तरी कशाला करायचा’’, असं तो म्हणतो. त्याचे प्रशिक्षक ग्लेन मिल्सही अशा उत्तेजकांच्या विरोधात होते. त्यांनी डोपिंग चाचणी करणाऱ्यांनाही आव्हान दिलं होतं. बोल्टच्या सगळ्या टेस्ट तुम्ही घेऊ शकता, तो उत्तेजकं घेत नसल्याचंच सिद्ध होईल, असं ग्लेन यांनी एकदा म्हटलंही होतं.  

    ऑलिम्पिकच्या आधी बोल्टच्या चार चाचण्या झाल्या आणि ज्या पदार्थांवर बॅन आहे असे कोणतेही उत्तेजक पदार्थ त्याच्या शरीरात आढळले नाहीत. आम्ही मेहनत करतो. ती पण जिवापाड. अशा गोष्टींवर अवलंबून राहत नाही. तुम्ही कोणत्याही क्षणी आमची चाचणी घ्या, असं बोल्टने स्पष्ट केलं होतं. डोपिंगच्या चुकीच्या बातम्यांमुळे बोल्टला आपला प्रायोजकही गमवावा लागला. पण त्याला फारसा फरक पडला नाही. कारण बाकी प्रायोजक रांगेत उभे होतेच. 

    105841628 Bolt winning gold SPORT trans NvBQzQNjv4BqjmpNrzJ7bQ M5ql9FqM8zg8pFnagAdV9PX4GGZogPvM

    बोल्ट आणि फेल्प्स हे दोघे आता खेळताना दिसत नाहीत. धावण्याच्या शर्यतीत बोल्टला पाहता येणार नाही आणि फेल्प्स डाइव्ह मारतानाचा क्षण आपल्याला टिपता येणार नाही. पण, या दोघांनी आपापल्या क्षेत्रात गाठलेली शिखरं पार करणं हेच पुढील पिढीसाठी आव्हान असेल.

    फेल्प्स ३०० कोटींचा धनी

    मायकेल फेल्प्स भलेही यशाच्या शिखरावर असेल आणि त्यानं मिळवलेल्या सुवर्णपदकांची संख्या विक्रमी असेल, पण त्याची कमाई एखाद्या स्टार फुटबॉलपटूपेक्षा कमीच आहे. 

    ख्रिस्तियानो रोनाल्डोची मँचेस्टर युनायटेड संघात असण्याची फी ६०० कोटी रुपयेहोती आणि फेल्प्सचं प्रायोजकांमधून मिळणारं उत्पन्न ३०० कोटी. कधीकधी वर्षाला दुप्पट कमाई दाखवणारे आकडेही आहेत. पण ते सारे जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न आहे़ त्यातून जाणारा कर आणि इतर खर्च वगळता फेल्प्सला ३०० कोटींच्या आसपास समाधान मानावं लागतं.

    बोल्ट ४०० कोटींचा मालक

    फेल्प्सपेक्षा बोल्टची कमाई अधिक आहे. सुवर्णपदकं कमी जिंकूनही बोल्टला मिळणाऱ्या जाहिरातदार कंपन्यांचे काँट्रॅक्ट अधिक आहेत. प्युमासारखी कंपनी बोल्टसाठी जवळपास ९० लाख डॉलर खर्च करते. दरवर्षी तो १३० कोटी रुपयांची कमाई करतो आणि सध्या त्याच्याकडे सुमारे ४०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

    REU 663757

    दानशूर विक्रमवीर

    बोल्ट आणि फेल्प्स या दोघांनीही स्वत:च्या नावाच्या सामाजिक संस्था सुरू केल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून दोन्ही खेळाडू अनेक गरजू लोकांना मदत करत असतात़ खेळाडू घडविणाऱ्या संस्था असो वा शिक्षण संस्था असो, साऱ्यांना सढळ हाताने मदत करण्यास हे दोन्ही खेळाडू मागेपुढे पाहत नाहीत.

    बोल्ट ज्या शाळेत शिकला ती शाळा चांगली व्हावी यासाठी त्यानं पुढाकार घेतला होता. ज्या शहरात तो राहायचा तिथं खेळाचं मैदान त्यानं तयार केलंय आणि तिथं सगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात. आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे त्यानं लाखो डॉलर्सची मदत केली आहे. 

    फेल्प्सही याबाबतीत मागे नाही. फेल्प्सची संस्था अर्थातच पाण्यासाठी काम करतेय. स्विमिंग आर्मी तयार व्हावी असं त्याचं स्वप्न आहे. अमेरिकेत असलेल्या सध्याच्या अत्याधुनिक स्विमिंगच्या सुविधांपेक्षाही अधिक चांगल्या सुविधा तो होतकरू जलतरणपटूंना देऊ इच्छितो आणि त्यासाठी कामही करतो.

    – पवन देशपांडे, लोकमत मुख्य उपसंपादक

    आणखी वाचा

  • स्टीव्ह जॉब्सचे प्रचंड गाजलेले प्रेरणादायी भाषण मराठीत…!!

    स्टीव्ह जॉब्सचे प्रचंड गाजलेले प्रेरणादायी भाषण मराठीत…!!

    जगातल्या सर्वोत्तम गणल्या जाणाऱ्या महाविद्यालयांपैकी एक अशा महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात तुमच्यासोबत बोलायची संधी मला मिळते आहे, हा मी माझा बहुमान समजतो. मी महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण करू शकलो नाही. आता सत्य सांगायला हरकत नाही, पण महाविद्यालयीन दीक्षांत समारंभ इतक्या जवळून मी पहिल्यांदा पाहतो आहे.

    steve-jobs-inspirational-speech-marathi-2

    आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील तीन गोष्टी सांगणार आहे, बस्स. काही प्रचंड कहाणी नाही. फक्त तीन छोट्या गोष्टी

    पहिली गोष्ट आहे ठिपके जुळवण्याच्या संदर्भातली… मी रीड कॉलेजमधून सहा महिन्यांतच बाहेर पडलो होतो, पण त्या आधी मी जवळपास १८ महिने कॉलेजमध्येच ड्रॉप इन म्हणून घुटमळत होतो. मग मी बाहेर पडलो तरी का? 

    याची सुरुवात खरं तर माझ्या जन्माच्या आधीपासूनची आहे. माझी आई ही एक तरुण, अविवाहित महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती. आणि तिने मला दत्तक द्यायचे ठरवले. तिची फार इच्छा की, मी पदवीधर पालकांकडे दत्तक म्हणून जावे, त्यामुळे अखेर एका वकील दाम्पत्याची त्याकरिता निवड झाली. सारे कसे सुरळीत चालू होते आणि अचानक माझ्या जन्माच्या वेळी त्या दोघांनी ठरवले की त्यांना मुलगी हवी आहे. त्यामुळे वेटिंग लिस्टवर असलेल्या माझ्या आई-बाबांना रात्री अचानक फोन गेला की, ‘‘मुलगा झालाय. तुमची अजूनही त्याला स्वीकारण्याची तयारी आहे का?’’ ते म्हणाले, ‘‘अर्थातच.’’ अर्थात, नंतर माझ्या आईला कळले की माझ्या दत्तक आईने पदवी पूर्ण केली नव्हती आणि वडिलांनी तर शाळेच्या पुढेही मजल मारली नव्हती. तिने मग दत्तक कागदपत्रे साईन करायला नकार दिला. मग मला ‘महाविद्यालयीन शिक्षणापासून दूर ठेवले जाणार नाही’ या आश्वासनावरच तिने कागदांवर सह्या केल्या.

    १७ वर्षांनंतर मी खरंच कॉलेजला गेलो. मूर्खासारखे मी स्टॅन्फोर्डसारखे महागडे कॉलेज निवडले आणि माझ्या दत्तक पालकांची मध्यमवर्गीय कमाई माझ्या शिक्षणावरच खर्च होऊ लागली. सहा महिन्यांतच त्याची किंमत मला उमगेनाशी झाली. माझ्या आयुष्यात मला काय करायचे आहे याची सुतराम कल्पना नव्हती आणि कॉलेजचे शिक्षण मला याचे उत्तर शोधण्यात मदत करत नव्हते आणि मी इथे आईबाबांची आयुष्यभराची कमाई उडवण्यात गुंतलो होतो. म्हणून मी कॉलेजमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि सुस्कारा सोडला. अर्थात, त्या वेळी हा छातीत धडकी भरवणारा निर्णय होता. पण आता वाटते की कदाचित हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला निर्णय असेल. हा निर्णय पक्का झाल्याक्षणीच मी ज्या वर्गाबाबतीत उत्साही नव्हतो, तिथे जाणे बंद करून टाकले आणि ज्या वर्गामध्ये मला जाण्यात रस होता त्या वर्गाना नियमितपणे जाऊ लागलो.

    Young-steve-jobs

    हे सगळेच काही स्वप्नवत नव्हते. डोर्म मिळायची नाही, म्हणून मित्रांच्या रूम्सवर जमिनीवर झोपावे लागे. कोकच्या रिकाम्या बाटल्या देऊन मी ५ सेंट्स जमा करत असे आणि त्यातून जेवणाची तजवीज करत असे. दर रविवारी ७ मैल चालत जात असे, ‘हरे राम हरे कृष्ण’चे व्यवस्थित जेवण खायला मिळावे म्हणून. पण मला ते आवडत होते. माझी अंत:प्रेरणा आणि माझे कुतूहल यांनी मला जे काही सापडले, ते पुढे आयुष्यात अनमोल ठरले. आता हेच पाहा ना, रीड कॉलेजमध्ये त्यावेळेला बहुधा सर्वोत्तम असे कॅलिग्राफीचे (सुलेखन) वर्ग चालत. संपूर्ण परिसरात प्रत्येक भित्तीपत्रकावर, इतकेच काय अगदी खणांवरदेखील सुंदर कॅलिग्राफी केलेली आढळे. मी तसाही ड्रॉप आऊट होतो आणि मला हे कसे करतात हे जाणून घ्यायचे होते, त्यातच मला माझे नियमित वर्ग करणे जरूरीचे राहिले नव्हते. कॅलिग्राफीच्या वर्गात मी सेरिफ आणि सान्स सेरिफ फॉण्ट्सविषयी शिकलो. त्याच्याच बरोबर दोन अक्षरांमध्ये कीती जागा असावी, अक्षरे सुशोभित कशी करावी याचेही ज्ञान मिळत होते. ते सारेच फार सुंदर, ऐतिहासिक आणि कलात्मकरीत्या हळुवार होते. कदाचित शास्त्राच्या चिमटीत पकडण्यापलीकडले… मी त्याने भारावून गेलो…

    या सगळ्याचा माझ्या आयुष्यात दुरान्वयानेही काही प्रत्यक्ष लाभ होईल असं मला स्वप्नातही वाटलं नसतं. पण दहा वर्षांनंतर जेव्हा आम्ही पहिला मॅकीन्टोश कम्प्युटर बनवत होतो, हा सगळा काळ माझ्या मदतीला आला. आम्ही त्या सगळ्याचा वापर मॅकीन्टोशमध्ये केला. सुंदर टायपोग्राफी असलेला तो पहिला कम्प्युटर होता. जर मी महाविद्यालयातून त्या विषयांच्या जंजाळातून बाहेर पडलो नसतो, तर मॅकीन्टोशमध्ये विविध टाईप फेसेस आणि प्रमाणबद्ध फॉन्ट्स दिसले नसते आणि विंडोजवाल्यांनी जर मॅकीन्टोश जसाच्या तसा कॉपी केला नसता, तर आज जगातल्या कुठल्याच पीसीवर ते दिसले नसते. मी महाविद्यालयातून बाहेर पडलो नसतो, तर या कॅलिग्राफीच्या वर्गात कसा पोहोचलो असतो; आणि अर्थात, आज पीसीवर जे सुंदर टाइप फॉन्ट्स दिसतात ते कसे दिसले असते… ‘कनेक्ट द डॉट्स’ अर्थात हे ठिपके जोडणे… आज १० वर्षांनंतर मागे वळून बघताना सोप्पे जाते. तेव्हा हे कळत नव्हते.

    पुन्हा. हे ठिपके तुम्ही भविष्यात बघून नाही जोडू शकत. ते फक्त मागे वळून बघताना जोडलेले दिसतात. म्हणूनच ते पुढे जाऊन जोडले जातील, यावर विश्वास ठेवावा लागतो. तुम्हाला कशावर तरी विश्वास ठेवावाच लागतो. तुमचे मन, आतला आवाज, भाग्य, नशीब, कर्म. काहीतरी. या विचार पद्धतीने मला कधीच दगा दिलेला नाही आणि त्यामुळेच माझ्या आयुष्यात बराच बदल घडलेला आहे. 

    माझी दुसरी गोष्ट आहे प्रेम आणि तोट्याविषयी.

    मी फार नशीबवान आहे. मला काय करायला आवडते हे मला फार आधीच उमगले होते. मी २० वर्षांचा असतानाच मी आणि वोझने (स्टीव्ह वॉझनियाक) मिळून घरच्या गॅरेजमध्ये ॲपल कम्प्युटर्सची सुरुवात केली. आम्ही खूप मेहनत केली. दहा वर्षांत गॅरेजमधल्या आम्हा दोघांपासून सुरू झालेली ॲपल २ बिलियन डॉलर्स आणि ४००० कामगारांची कंपनी झाली होती. आम्ही वर्षभरापूर्वीच आमचे सर्वोत्तम काम बाजारात आणले होते. मॅकीन्टोश कम्प्युटर! मी तेव्हा फक्त ३० वर्षांचा होतो. आणि अचानक मी माझ्या कंपनीतून हाकलला गेलो. तुम्ही स्वत: स्थापन केलेल्या कंपनीतून तुम्ही स्वत: हाकलले कसे जाऊ शकता? खरं सांगायचं झालं तर जसं ॲपल वाढत होतं, त्याच्याबरोबर मला गुणी वाटणाऱ्या काही मंडळींना मी नोकरीवर ठेवले. काही वर्षे ठीक गेली, पण नंतर आमच्या दृष्टिकोनात फरक पडू लागले. अखेर भांडणे झालीच… बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी पण त्यांचीच पाठराखण केली. साहिजकच वयाच्या तिसाव्या वर्षी मी अक्षरश: हाकलला गेलो… आणि तेही अतिशय सार्वजनिक पद्धतीने… माझ्या आयुष्याचा जो केंद्रबिंदू होता, तोच गायब झाला. मी उद्ध्वस्त झालो.

    काही महिने नक्की काय करावे हेच सुचेना. मला जणू माझ्या आधीच्या कार्यकुशल उद्योजकांचा विश्वासघात केल्यासारखे वाटत राही. जणू आधी धावणाऱ्याने माझ्या हातात दिलेले निशाण मी पाडून बसलो होतो. मी डेव्हिड पेकार्ड, बोब नोईस यांना भेटलो. आणि अशा पद्धतीने घोळ घातल्याबद्दल त्यांची माफी मागितली. मी एक मोठे सार्वजनिक अपयश बनलो होतो आणि सिलिकॉन व्हॅलीतून पळून जाण्याचे विचार मनात घोळू लागले होते, पण हळूहळू एक गोष्ट जाणवायला लागली. माझे अजूनही माझ्या कामावर प्रेम होते… ॲपलमधल्या घटनांनी त्यात तीळभरही फरक पडला नव्हता. मला नाकारण्यात आले होते… पण माझे प्रेम संपले नव्हते.. म्हणूनच, मी पुन्हा सुरुवात करण्याचा निश्चय केला.

    तेव्हा तसे वाटले नसेल कदाचित, पण ॲपलमधून हाकलले जाणे ही माझ्या आयुष्यातली सर्वाधिक चांगली घटना ठरली. यशस्वी असण्याचे सगळे दडपण गळून पडले. त्याची जागा एखाद्या नवोदिताच्या खांद्यावर असलेल्या हलकेपणाने घेतली. कशाचीही खात्री नव्हती. याच स्थितीमुळे मी माझ्या आयुष्यातल्या सर्वाधिक सृजनात्मक कालखंडात प्रवेश केला.

    त्यानंतरच्या ५ वर्षांत मी ‘नेक्स्ट’ नावाची कंपनी स्थापन केली, ‘पिक्सार’ नावाची दुसरी कंपनीही उभारली आणि एका अशा भन्नाट स्त्रीच्या मी प्रेमात पडलो जिच्याशी मी लग्न केले. ‘पिक्सार’ने जगातली पहिली ॲनिमेटेड फिल्म ‘टॉय स्टोरी’ बनवली आणि आज ती जगातली पहिल्या क्रमांकाची ॲनिमेशन कंपनी आहे. गंमत म्हणजे, पुढे ‘नेक्स्ट’पण ‘ॲपल’ने विकत घेतली. आणि आम्ही ‘नेक्स्ट’मध्ये बनवलेले तंत्रज्ञान आज ‘ॲपल’च्या कामाला येते आहे. आणि ‘ॲपल’च्या यशाला ते कारणीभूत ठरते आहे.

    मला खात्री आहे की मी जर ‘ॲपल’मधून हाकलला गेलो नसतो, तर हे कधीच घडले नसते. औषधाची चव घेणे कठीण असते, पण रुग्णाला त्याचीच गरज असते. कधी आयुष्याने डोक्यात दगड घातलाच, तर निराश होऊ नका. मला खात्री आहे की जर माझे माझ्या कामावर प्रेम नसते, तर मी अशा पद्धतीने काम करत राहू शकलो नसतो. आपले प्रेम कशावर आहे याचा शोध घेत राहा. हे केवळ तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते तुमच्या कार्यक्षेत्रातही. तुमच्या आयुष्यातला एक मोठा भाग तुम्ही काम करण्यात व्यतीत करणार आहात, आणि उत्तम काम करण्याकरिता तुम्ही जे करताय त्यावर तुमचे प्रेम असणे आवश्यक आहे. जर ते तुम्हाला अजून सापडले नसेल, तर मग शोधात राहा. स्वत:ची समजूत घालून नका घेऊ. हृदयाच्या इतर गोष्टीप्रमाणेच जेव्हा तुम्हाला ते सापडेल, तेव्हा ते तुम्हाला आपोआप जाणवेल आणि एखाद्या सुंदर नात्याप्रमाणे वर्षे जशी सरकत जातील, तसतसा तुमचा त्यातला रस वाढतच राहील. म्हणून म्हणतो. शोधत राहा. स्वत:ची समजूत घालून नका घेऊ.

    माझी तिसरी गोष्ट मृत्यूविषयी आहे.

    मी १७ वर्षांचा होतो तेव्हा एक वाक्य वाचले होते. ‘जर तुम्ही रोज आपले आयुष्य आजचा दिवस शेवटचा असं समजून घालवलात, तर कमीत कमी एक दिवस तुमची समजूत खरी ठरेल.’ या वाक्याने माझ्यावर खूप परिणाम केला होता. तेव्हापासून जवळपास ३३ वर्षे मी रोज सकाळी उठतो आणि आरशात पाहून स्वत:ला विचारतो- ‘‘जर आज मला मरण यायचे असेल, तर आज जे मी करतो आहे तेच मला करायला आवडेल का?’ जर माझे उत्तर बरेच दिवस ‘नाही’ असेल, तर मला कळते की काहीतरी बदल करायची गरज आहे.

    मला लवकरात लवकर कधीही मृत्यू येऊ शकतो ही कल्पना मला माझ्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेताना खूप कामाला येते. कारण आपल्या बाह्य अपेक्षा, सारा अहंकार, लाज किंवा अपयशाची भीती हे सारं सारं मरणाच्या भीतीमध्ये नष्ट होतं. आणि जे महत्त्वाचं आहे, तेवढंच उरतं. तुम्ही मरणार आहात हे लक्षात ठेवणे म्हणजे तुम्ही काहीतरी गमावू शकता या भीतीपासून मुक्ती असं मी समजतो. तुम्ही आधीच इतके नागवे झालेले असता, की हृदयाचं सोडून दुसऱ्या कुणाचं ऐकण्याचं तुम्हाला कारणच राहत नाही.

    Steve Jobs' Cancer Treatment

    साधारण वर्षांपूर्वी मला कॅन्सर असल्याचे निदान झाले. सकाळी ७.३० वाजता माझा स्कॅन झाला आणि स्वादुपिंडापाशी मला भला मोठा ट्युमर असल्याचे स्पष्ट झाले. मला स्वादुपिंड शरीरात कुठे असते हेही ठाऊक नव्हते. डॉक्टर म्हणाले हा जवळपास असाध्य अशा स्वरूपाचा कॅन्सर आहे आणि मी काही सहा महिन्यांपेक्षा जास्त जगणार नाही. डॉक्टरने मला घरी जाऊन साऱ्या गोष्टींची आवराआवर करायला सांगितले, म्हणजे दुसऱ्या शब्दात तो मला मृत्यूसाठी तयार राहायला फर्मावत होता. याचाच दुसरा अर्थ म्हणजे पुढच्या दहा वर्षांत तुम्ही आपल्या मुलांना ज्या चार युक्तीच्या गोष्टी सांगणार होता, त्या सांगायला आता तुमच्याकडे फक्त सहा महिने आहेत. याचाच दुसरा अर्थ म्हणजे सगळी बटणं लावून तयार राहा. निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. त्या निदानासोबत मी एक दिवस घालवला. त्या दिवशी संध्याकाळी माझी बायोप्सी झाली. त्यांनी माझ्या घशावाटे आणि पोटातून आतड्यात एन्डोस्कोप घुसवला, माझ्या स्वादुपिंडात सुई खुपसून त्यांनी तिथल्या पेशी काढल्या. मला अर्थात भूल दिली होती, पण माझी पत्नी म्हणाली की, जेव्हा डॉक्टर्सनी त्या पेशी सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्या, तेव्हा ते आनंदाने रडू लागले. माझा कॅन्सर अतिशय दुर्मिळ असला, तरी शस्त्रक्रियेने तो बरा करता येण्यासारखा होता. माझ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि मी आता ठणठणीत बरा आहे.

    ही माझी मृत्यूशी झालेली सर्वात जवळची आणि बहुधा अजून दोन दशक तरी टिकेल अशी ओळख. आत्ता मी याविषयी एवढ्या अधिकारवाणीने बोलतो आहे, त्याचं कारण या एका उपयुक्त कल्पनेचं या अशा ओळखीत झालेलं रूपांतर.

    मरण कुणालाच नको असतं. अगदी ज्यांना स्वर्ग हवा असतो त्यांचीही त्याकरिता मरण्याची तयारी नसते. तरीही मरण हे आपल्या सगळ्यांना एकत्र करणारच आहे. कोणालाही ते चुकलेले नाही. आणि हे खरंच अगदी बरोबर आहे, कारण मरण हा जीवनाचा सर्वात छान शोध आहे. तो जीवनातल्या बदलाचा शिल्पकार आहे. तोच जुन्याला दूर करून नव्याची वाट मोकळी करतो. आज, कदाचित तुम्ही चर्चेत आहात, पण उद्या तुम्ही हळूहळू म्हातारे व्हाल आणि दूर सारले जाल. नाट्यमय वाटले, तरी हेच सत्य आहे.

    तुमच्याकडे अगदी मर्यादित वेळ आहे, म्हणूनच दुसऱ्या कोणाचं आयुष्य जगत तो फुकट घालवू नका. दुसऱ्यांच्या विचारावर आधारलेल्या निष्कर्षांचं जोखड आपल्या आयुष्यावर मिरवू नका. दुसऱ्यांच्या मतांच्या गलबल्यात आपला आतला आवाज दबून जाऊ नये याची काळजी घ्या. आणि सर्वात महत्त्वाचे, आपले हृदय आणि अंत:प्रेरणा यांचं ऐकायचं धाडस सदैव दाखवा. त्यांना जवळपास नेहमीच तुम्हाला काय बनायचे आहे, याची कल्पना असते. बाकी सगळे दुय्यम आहे.

    जेव्हा मी तरुण होतो त्या वेळी होल अर्थ कॅटलॉग नावाचे मासिक प्रसिद्ध होत असे- जणू आमच्या पिढीचे बायबलच. इथून जवळच मेन्लो पार्क इथे राहणारा स्टेवर्ट ब्रांड नावाचा इसम ते काढत असे आणि त्याने आपल्या कवीप्रवृत्तीने ते मासिक सजवले होते. ही गोष्ट १९६० ची, पर्सनल कम्प्युटर किंवा डेस्कटॉप पब्लिशिंगच्या खूप आधीची. साहजिकच, हे मासिक पूर्णपणे टाईपरायटर, कात्री आणि पॉलोराईड कॅमऱ्याने बनवले जाई. जणू पेपरबॅक फॉर्ममधले गुगल. आणि तेही गुगल येण्याच्या ३५ वर्षे आधी. खूप आदर्शवादी, नेटके आणि नव्या कल्पनांनी भारलेले.

    स्टेवर्ट आणि त्याचे सहकारी भरपूर वर्षे त्या मासिकाचे अंक काढत राहिले आणि जेव्हा त्याचा प्रवास संपला तेव्हा त्यांनी त्याचा शेवटचा अंक काढला. सत्तरीची मध्यान्ह चालू होती आणि मी तुमच्याच वयाचा होतो. त्या शेवटच्या अंकात शेवटच्या पृष्ठावर एक गर्द रानातल्या रस्त्याचे चित्र होते. त्याच्या खाली लिहिले होते. 

    भुकेलेले राहा… वेडे राहा… STAY HUNGRY, STAY FOOLISH

    (मूळ भाषणाची तारीख- १२ जून २००५)
    (शब्दांकन – अमोल कडू)
    १६ एप्रिल २०१० – लोकप्रभा

     

  • शिक्षण अर्धवट राहिलं, पण स्वप्नं पूर्ण केली! देशातील पहिला केबल टीव्ही चॅनेल सुरु करणाऱ्या सुभाष चंद्रांची कहाणी

    शिक्षण अर्धवट राहिलं, पण स्वप्नं पूर्ण केली! देशातील पहिला केबल टीव्ही चॅनेल सुरु करणाऱ्या सुभाष चंद्रांची कहाणी

    The Dropout Who Became a Billionaire: Subhash Chandra's Journey to Success

    हरियानाच्या आदमपूर शहरात, १९५० साली एक सर्वसाधारण व्यापारी कुटुंबात जन्म झाला सुभाष चंद्रा गोयल यांचा. लहानपणापासूनच कौटुंबिक दुकानात हातभार लावत कष्टाचे संस्कार व कौटुंबिक व्यावसायिकतेचे धडे घेतले. सुभाष चंद्रा अर्धवट शिक्षण घेऊन घराबाहेर पडले, तेच मुळी उराशी आणखी एक स्वप्न घेऊन. नोकरी करायची नाही तर काहीतरी उद्योग धंदाच करायचा. त्या दिशेने त्याने पावले टाकायला सुरुवात केली. ऐन तिशीत असताना ते एका पॅकेजिंगच्या औद्योगिक प्रदर्शनाला गेले. तेव्हाच त्यांच्या मनात आपणही पॅकेजिंग कंपनी सुरु करायची असा विचार आला. देशात त्याकाळी ॲल्युमिनिअम ट्यूबची चलती होती. पण भविष्यात ॲल्युमिनिअम नव्हे, तर लॅमीनेटेड ट्यूबची चलती असेल हे हेरून त्यांनी एस्सेल प्रोपॅक नावाने कंपनी सुरु केली. टूथपेस्ट, औषधे, सौंदर्य प्रसाधने, अन्न पदार्थ आणि दैनंदिन वापराच्या वस्तूसाठी आवश्यक अशा पॅकिंगची निर्मिती त्यांनी सुरु केली. आशियातील ती सर्वाधिक मोठी कंपनी तर आहेच, पण जगातली ती दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. 2019 मध्ये द ब्लॅकस्टोन ग्रुपने कर्जबाजारी एस्सेल ग्रुपच्या मालमत्ता विक्रीदरम्यान कंपनीचे अधिग्रहण केले होते आणि ऑक्टोबर २०२० मध्ये कंपनीचे नाव बदलून ईपीएल लिमिटेड असे करण्यात आले.

    The Dropout Who Became a Billionaire: Subhash Chandra's Journey to Success

    परदेशी पर्यटन करताना एका ॲम्युझमेंट पार्कमध्ये फिरताना त्यांना भारतात आशिया खंडातली सर्वात मोठी मनोरंजन नगरी उभारायची कल्पना सुचली आणि मुंबईजवळ त्यांनी ६४ एकर जागेवर १९८८ मध्ये एस्सेल वर्ल्ड उभे केले. नंतर जवळच वॉटर किंग्डमही उभारले. देशातील लाखो लोक त्यांच्या मनोरंजन नगरीला भेट देतात.

    एकदा ते मुंबईच्या दूरदर्शन केंद्रावर आपल्या मित्राला भेटायला गेला. त्या काळात दूरदर्शनवर केवळ संध्याकाळी काही रटाळ कार्यक्रम असायचे. तेव्हाच त्यांना २४ तास चालणारी वाहिनी काढायची कल्पना सुचली. तेव्हा सर्वच अनुभवी लोकांनी त्यांना वेड्यात काढले. कमावलेले सारे काही ते एका फटक्यात गमावणार असाच त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांचा अंदाज होता, पण सुभाष चंद्रांना स्वतःवर विश्वास होता. त्या क्षेत्रातील कोणताही अनुभव गाठीशी नसताना त्यांनी २ ऑक्टोबर १९९२ रोजी झी टीव्ही हे देशातील पहिलं २४ तास चालणारं टीव्ही चॅनेल सुरु केलं. सुरुवातीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, तरीही सुभाष यांनी जिद्द आणि नावीन्यतेने झी टीव्हीला यशस्वी केले. मनोरंजनापासून बातम्यांपर्यंत विविध प्रकारचे कार्यक्रम, प्रादेशिक भाषांमधील वाहिन्या, तसेच आंतरराष्ट्रीय विस्तार यामुळे ‘झी’ लवकरच घराघरात पोहोचली. नंतर त्यांनी २४ तास बातम्या देणारी झी न्यूझ वाहिनी सुरु केली. आणि मग एकामागून एक प्रमुख भाषेतील वाहिन्या काढायचा सपाटाच लावला. सुभाष चंद्राना प्रचंड यश मिळालं. त्यांच्या त्या एका कल्पनेमुळे देशातील लाखो लोकांना रोजगार मिळाला.

    त्यानंतर सुभाष चंद्रांनी ‘प्ले विन’ लॉटरी नावाने ऑनलाइन लॉटरी सुरु केली. तिलाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. नंतर डिश टीवी, सिटी केबल, फन सिनेमा नावाने चित्रपटगृहंही सुरु केली. गोल्ड रिफायानिंग कंपनीही काढली. डीएनए नावाने इंग्रजी वृत्तपत्र सुरु केले. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातही मुसंडी मारली. हे सर्व व्यवसाय एस्सेल ग्रुपच्या नावाखाली एकत्र आणले. त्यांच्या नेतृत्वाखाली हा समूह भारतातील एक प्रमुख मीडिया घराणे बनले.

    The Dropout Who Became a Billionaire: Subhash Chandra's Journey to Success

    ज्या क्षेत्रात पहिले कोणीही नव्हते त्या क्षेत्रात नव्यानेउद्योग उभारून सुभाष चंद्रांनी जगासमोर एक अचंबित करणार आदर्श उभा केला. देशातील २१ राज्यातील ११ लाख गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी एकल विद्यालय फाउंडेशन स्थापना केलीय. दूरचित्रवाणी क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच इतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांचे कार्य गौरवले गेले.

    2019 मध्ये कर्जफेडीच्या समस्येत अडकलेल्या झी एंटरटेनमेंटच्या दोन स्वतंत्र संचालकांनी एस्सेल ग्रुपच्या इतर कंपन्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने झी एंटरटेनमेंटच्या मुदत ठेवीचा वापर केल्याच्या आरोपाखाली सेबीने त्यांच्यावर कारवाई केली होती. आणि त्यांना संचालक मंडळातून बाहेर पडावे लागले.

    आणखी वाचा

  • सततची टीका आणि मानसिक त्रासाला वैतागलेल्या उद्योजकांसाठी…

    सततची टीका आणि मानसिक त्रासाला वैतागलेल्या उद्योजकांसाठी…

    व्यवसाय का बंद केला विचारले तर म्हणाला, त्याच्या बरोबरचे मित्र चिडवतात. डिप्लोमा इंजिनियर असूनही कुरिअर चालवतो. वेळ पडली तर स्वतः डिलिव्हरी करत हिंडतो. मामा तर म्हणाला, “चांगली नोकरी करायची सोडून लोकांची दारं पुजत फिरतो. भिकेचे डोहाळे लागलेत याला.” आई काही बोलत नाही, पण नुसती रडत असते. मी व्यवसाय नाही, तर काही गुन्हा करतोय असे सगळे वागत होते. व्यवसायाच्या सुरुवातीच्या दिवसात कमावलेले सगळे पैसे पुन्हा व्यवसायातच पुन्हा गुंतवावे लागतात, पण हे सांगून कुणालाही कळत नव्हते. शेवटी बंद केले सगळं आणि सरळ ही नोकरी धरली. पण इथेही लक्ष लागत नाही. नुसती घुसमट होतेय. हे सगळ बोलताना अगदी गुदमरला होता तो. मी थोडा वेळ त्याची सांत्वना केली व निरोप घेतला. त्या रात्री मलाही झोप आली नाही. प्रताप सारखे असे अनेक युवक असतील. स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपडत असतील.

    5fea602f 91d0 42f4 8535 de04ed987ef9

    मोठ्ठा उद्योजक व्हायचे ध्येय उरी बाळगून प्रामाणिक प्रयत्न करत असतील. पण जवळच्या लोकांच्या टीका, उद्योगात सतत मिळणारे rejections आणि मानसिक त्रासाला वैतागून स्वतःचे स्वप्न विसरून समाजाला मान्य असणाऱ्या सरळ रस्त्याने आयुष्य जगायला लागत असतील.

    तसं टीका आणि नकार हे उद्योजकांसाठी काही नवी बाब नाही. अगदी प्रत्येक उद्योजकाला याला सामोरे जावे लागते, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. आणि अनेक उद्योजकांनी, व्यावसायिकांनी याला सामोरे जाण्याचे मार्ग ही शोधले आहेत. पण नवीन उद्योजकांना ते माहित नसतात आणि मग प्रताप सारखा अनेकांचा बळी जातो. प्रतापला टीकांना आणि नकाराला सामोरे कसे जावे सांगायचे होते, पण त्या वेळी तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि ते ठिकाणही नव्हते. वेळही निघून गेली होती. मला एका गोष्टीची खात्री मात्र आहे. प्रताप नोकरी जास्त दिवस करू शकणार नाही. त्याच्यातला उद्योजक पुन्हा उफाळून येईल आणि पुन्हा तो स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करेल. पण बराच वेळ आणि संधी या प्रवासात वाया जाईल. उद्योग, व्यवसाय करु पाहणाऱ्या अनेक प्रतापांचे नुकसान होऊ नये म्हणून हा एक छोटासा प्रयत्न.

    १. टीकेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला.

    f1c5b05750bb268f099363284743283d 1

    उद्योजक मित्रांनो शेजारील चित्रात कोणाला जख्ख म्हातारी दिसत असेल, तर कुणाला २० वर्षाची तरुणी. चित्र एकच आहे, पण आपण त्या चित्राकडे कसे पाहतो त्यावर आपल्याला काय बोध होतो ते ठरते. याचाच अर्थ असाही होतो की, आपण जे पाहतो ऐकतो, त्याचा आपण कसा अर्थ लावतो, त्यावर त्या घटनेचा आपल्यावर काय परिणाम होईल हे ठरते. उद्योग करत असताना आपल्यावर टीका करणारे बहुतेक आपले आप्तेष्ट किंवा मित्रपरिवारांपैकी असतात. या व्यक्ती जेव्हा तुमच्या स्थितीकडे पाहतात, तेव्हा ते बाहेरून स्थितीकडे पाहत असतात. तुमची आणि त्यांची परिस्थिती कडे पाहण्याची दिशा परस्पर विरोधी असल्याने, बाहेरून आत पाहणाऱ्यांना जे दिसते आणि तुम्ही ज्याठिकाणी उभे राहून पाहता तिथून तुम्हाला दिसणारे दृश्य (Vision ) यात बराच फरक असतो. आणि खरं म्हणजे तुमच्या स्वप्नाबद्दल सर्वात महत्वाच मत जर कुणाचं असेल, तर ते फक्त तुमचाच असू शकतं.

    इतरांच्या नकारार्थी टिप्पण्या ह्या त्यांच्या मर्यादांचे प्रतिबिंब असते, तुमच्या नव्हे. दुसरा महत्वाचा भाग असा की टीका टिप्पणी करणाऱ्यांचा हेतू काय आहे हे ही जाणून घेणे गरजेचे आहे. कुणी तुमच्यावरील अति लोभामुळे आणि काळजीपोटी बोलत असेल, तर कुणी तुमच्याबद्दल असणाऱ्या मत्सरामुळे बोलत असेल. इंग्रजीत एक नवीन शब्द आला आहे Frenimy म्हणजेच मित्राच्या रूपातील वैरी. दोन्हीही परिस्थितीत जर टीका टिप्पणीला घाबरून अथवा वैतागून, जर तुम्ही चुकीचे पाऊल उचलले, तर एक तर आप्तेष्टांचे व स्वतःचे नुकसान कराल किंवा वैऱ्याला अपेक्षित कृती कराल.

    f16f4603 1cff 41ad 9615 399fdf9077b9

    २. तुम्ही परिपूर्ण (perfect) नाही याची जाणीव बाळगा.

    “Nobody is perfect, if you think you are perfect then you are Nobody”

    प्रत्येक व्यक्ती मध्ये दोष असतात त्या प्रमाणे तुमचेही काही दोष असू शकतात. स्वप्नवेडे होऊन मार्गक्रमण करताना स्वतःच्या दोषांकडे दुर्लक्ष होण्याची दाट शक्यता असते. अशावेळेला आपल्यावर होणाऱ्या टीका आणि rejections आपणास आपल्या दोषांची जाणीव करून देऊ शकतात. थोडेसे सिंहावलोकन (Introspection) केल्यास आपणास हे दोष जाणवतात आणि एकदा जाणीव झाली की ते सुधारणे सोपे होते. त्यामुळे टीकांना नकारार्थी घेण्याऐवजी त्यातून सुधारण्याचे धडे शिकणे अधिक फायदेशीर ठरेल. बऱ्याचदा टीकांच्या रुपात आलेल्या सुधारणेच्या सूचना परिस्थितीमुळे लगेच अंगीकारणे शक्य नसते. पण आपणास या सुधारणा करायच्या आहेत हा विचार मनात ठेऊन केलेला प्रवास जास्त यशस्वी ठरतो.

    24cef172 2a8a 4db0 897b a080429edfa8

    ३. सगळ्याच गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नसतात.

    अनेकदा सिलेक्टिव्ह लिसनिंग चा वापर अनेक यशस्वी लोकं करतात. याचाच अर्थ आपणास उपयुक्त गोष्टी ऐकणे वर त्यावर अंमलबजावणी करणे आणि ज्या गोष्टी नको असतील त्यांना ऐकणे पण दुर्लक्षित करणे. या युक्तीचा वापर केल्याने आपण स्वतःला निराशेपासून तर वाचवतोच पण अनेक वेळा वादही टाळता येतात. निराशेत अथवा वादावादीत वाय जाणारा वेळ व शक्ती वाचते. अनेकदा एखादी टीका अथवा नकार आपणाला मिळाली की आपण लगेच त्यावर प्रतिक्रिया देतो अथवा तसा सातत्याने प्रयत्न करतो. अनेक अशा परिस्थिती असतात ज्यांचे उपाय काही वेळ जाऊ दिल्यास आपोआपच होतो.

    मित्रांनो या जगात काही वेगळं करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना नेहमीच टीकांना आणि नकारांना सामोरे जावे लागले.

    जे. के. रोलिंग, हॅरी पॉटरची सुप्रसिद्ध लेखिकेला पहिले पुस्तक प्रकाशित होण्याआधी १२ वेळा नाकारला सामोरे जावे लागले. संत ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना अनेक टीका सहन करतच जगाला ज्ञानेश्वरी द्यावी लागली. संत तुकारामांची गाथा इंद्रायणीत बुडवली गेली. त्यामुळे टीकांना आणि नकारांना घाबरून जाऊ नका. जागरूकपणे जर या टीकांचा स्वीकार करून सुधार घडवले, तर तुमचे स्वप्न सत्यात उतरवणे शक्य आहे

    तुमच्या स्वप्नांसाठी हार्दिक शुभेच्छा

    आणखी वाचा

  • ‘ज्या शेतात आई शेतमजूर म्हणून काम करत होती, ती शेती मी विकत घेतली’ : उद्योजक अशोक खाडे

    ‘ज्या शेतात आई शेतमजूर म्हणून काम करत होती, ती शेती मी विकत घेतली’ : उद्योजक अशोक खाडे

    वडील चर्मकार. आई, बहीण दुसऱ्याच्या शेतात काम करीत…कधी-कधी आम्हा भांवडांनाही कामाला जावं लागायचं…..आयुष्यानं दिलेल्या चटक्‍यांच्या आठवणी अशोक खाडे सांगत होते…””सातवीपर्यंत पेडला शिक्षण झालं. पुढील शिक्षणासाठी तासगावला बोर्डिंगमध्ये राहायला लागलो. मी शिकावं म्हणून वडील व मोठ्या भावाचा जीव तुटायचा. माझ्या शिक्षणासाठी घरचे किती कष्ट घेतायेत, याची जाणीव असल्यानं रात्र-रात्र झोप लागायची नाही. बोर्डिंगला पोटभरीचं जेवण मिळायचं नाही. पण मोठं व्हायचं स्वप्न असल्यानं कोणतीही तक्रार नव्हती.

    dalit articleLarge v2 1

    सन 1972 ला चांगल्या गुणांनी अकरावी झालो. त्या वर्षी मोठा दुष्काळ पडला. अंगात घालायला कपडेच नाही, तर पायताण कोठून येणार. आम्हाला शिकविणारे देसाई सर कळवळले. त्यांनी शर्ट व पायजमा घेऊन दिला. अकरावीच्या ऐन परीक्षेला पेनची निफ तुटली. जोशी सरांनी अडचण समजून घेत निफ आणून दिली. साठ टक्के गुण पडले. आज माझ्याकडे हजारो रुपयांचा पेन आहे; परंतु अकरावीतील “त्या’ पेनची किंमत कशालाही नाही. आजही माझ्याकडे तो पेन आहे. वडील बोर्डिंगवर आम्हाला भाकरी घेऊन यायचे आणि म्हणायचे, “राजांनो, गरिबी आणि दुष्काळ मी आणला नाही. तुम्ही धीर सोडू नका. माळावर जोपर्यंत पळस आहे तोपर्यंत आपल्याकडे गरिबी आहे, असे समजू नका. खूप शिका.’ वडिलांचे शब्द काळजाला भिडले,” खाडे म्हणाले.

    खाडे कुटुंबीयांनी सन 1975 ला मुंबई गाठली. वैद्यकीय शिक्षण घ्यावे अशी माझी इच्छा होती, असे सांगून खाडे म्हणाले, “”रोजीरोटीसाठी आम्ही तिघेही भाऊ माझगाव डॉकमध्ये नोकरी करायला लागलो. मी डिझाइन विभागात होतो. मोठ्या भावाच्या आग्रहामुळे इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. नोकरी आणि शिक्षण दोन्ही सुरू झाले. सन 1983 मध्ये कंपनीच्याच कामासाठी जर्मनीला जाण्याची संधी मिळाली. नवीन उमेद निर्माण झाली होती. गरिबी तर टोचत होतीच, स्वतःचे काही तरी करायचा ध्यास घेतला. त्यातून सन 1992 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला. अन्य भावांनीसुद्धा राजीनामा दिला. तिघेही एकत्र राहत होतो आणि घरात एक प्रकारचे इंजिनिअरिंगचेच वातावरण होते. गरिबीत आयुष्यभर जगण्यापेक्षा थोडेच आयुष्य जगू; परंतु ते चांगले असेल असा ध्यास घेऊन “दास ऑफशोअर‘ची निर्मिती झाली. मराठी माणूस, त्यातही खाडे आडनाव म्हटल्यावर कोण काम देणार, हा प्रश्‍न होताच. त्यामुळे तिघा भावांच्या नावांची आद्याक्षरे घेऊन (दत्तात्रय, अशोक आणि सुरेश) कंपनीला “दास’ नाव दिले. नावसुद्धा “के. अशोक’ असे सांगायचो. पहिले काम माझगाव डॉकमध्येच मिळाले. मुंबईतील पहिला स्कायवॉक बांधला. मग मागे वळून पाहिले नाही.”

    “दास’ कंपनीने ओएनजीसी, ब्रिटिश गॅस अशा नामवंत कंपन्यांसाठी भरसमुद्रात प्रकल्प बांधणीचे काम केलेय. या समूहाच्या इंजिनिअरिंग, डेअरी, ऍग्रो प्रॉडक्‍ट्‌स, रस्ते बांधणी, उड्डाणपूल अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत सात कंपन्या आहेत. अबुधाबीचे प्रिन्स शेख महमंद बिन खलिफा बिन झायर अल नयन यांच्याबरोबर व्यावसायिक भागीदारी केल्याचे खाडे अभिमानाने सांगतात.

    navbharat times 102749902 1

    वारकरी वृत्तीचे असलेले खाडे यांचा ज्ञानेश्‍वरीवर गाढा विश्‍वास. जमशेठजी टाटा, मदर तेरेसा हे त्यांचे आदर्श. एक रुपयातील एक भाग समाजासाठी, एक भाग देवासाठी, एक भाग कामगारांसाठी आणि उर्वरित भाग स्वतःसाठी अशी त्यांनी उत्पन्नाची वाटणी केलीय. वर्षभर बीएमडब्ल्यूमध्ये फिरणारे खाडे पंढरीची पायी वारी करतात. ज्या चित्रा टॉकीज जवळील झाडाला टेकून वडील गटई काम करत होते, त्या झाडाला समोरून जाताना न चुकता नमस्कार करतात. खाडे यांनी मास्टर इन फिलॉसॉफी पूर्ण केले असून, संत ज्ञानेश्‍वर महाराजांवर पीएचडी करण्याचा विचार आहे.

    “दुसऱ्यांवर केलेले उपकार तळहातावर लिहिण्यापेक्षा तळपायावर लिही, की जे फक्त मातीच वाचू शकते’ हे समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे शब्द खाडे यांनी मनात कोरले आहेत.

    मराठी असल्याचा त्यांना प्रचंड अभिमान आहे. ‘माझ्या कंपनीत चेहऱ्यावर चिंता असलेला एक ही कर्मचारी दिसणार नाही. ज्या शेतात माझी आई शेतमजूर म्हणून काम करत होती, ती शेती मी विकत घेतली आहे. ज्या गावात दगडू चांभाराचा मुलगा अशी ओळख होती, ते गाव आता “आबा’ म्हणून ओळखत आहे. आजही आम्ही भाऊ एकत्र कुटुंब म्हणून राहतो. एकत्र कुटुंबात जी ताकद आहे, ती कशातच नाही. त्या भक्कम आधारामुळेच आम्ही आयुष्यात काही तरी करू शकलो.”

    अशोक खाडेंचा “गुरुमंत्र’
    “जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट’ हे ब्रीद लक्षात ठेवा.
    कष्ट करा. प्रामाणिक कष्टांचे फळ नक्की मिळेल.
    आईवडिलांना, समाजाला कधी विसरू नका.

    आणखी वाचा
  • अडचणी, अडथळे सर्वांनाच येतात, पण ते पार करण्याची ताकद आपण स्वत:हून निर्माण केली पाहिजे.

    अडचणी, अडथळे सर्वांनाच येतात, पण ते पार करण्याची ताकद आपण स्वत:हून निर्माण केली पाहिजे.

    How to Make Your Goals a Reality

    फुलपाखरांना फक्त चौदा दिवसाचं आयुष्य मिळतं, पण तेवढंही आयुष्य ते आनंदानं बागडत वावरतं. म्हणून छोट्या अपयशानं खचून जाऊ नका. धीर सोडू नका. प्रयत्न सोडू नका. त्यासाठी अपयशाची भीती न बाळगता ध्येय निश्‍चित केलं पाहिजे आणि ते पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठलाग केला पाहिजे. तुमचं ध्येय कोणतंही असो, पण ते निश्‍चित हवं, स्पष्ट हवं. ठराविक कालावधीत पूर्ण होणारं हवं. आपण घरी भिंतीवर देवदेवतांचे अथवा आपल्या पूजनीय वडीलधाऱ्या मंडळींचे फोटो लावतो. कशासाठी? त्यातून आपल्याला काय मिळते? ज्या वेळी आपली नजर त्या फोटोकडे जाते, त्या वेळी काही क्षणात एक विशिष्ट सकारात्मक, श्रद्धायुक्त ऊर्जा आपल्या डोळ्यांवाटे आपल्या अंत-करणात उतरते आणि ती आपल्याला प्रेरणा देते. वाईट विचारापासून प्रवृत्त करते. चांगले विचार आपोआपच आपल्या मनात येतात आणि मग कृतीही तशीच होते. अगदी त्याचप्रमाणे, आपले ध्येय एका मोठ्या कागदावर लिहून ते भिंतीवर समोर दिसेल असे लावावे. म्हणजे ते तुम्हाला रोज आठवण करून देईल. मग तुमचे विचार व कृती आपोआपच त्याच दिशेने होईल.

    How to Make Your Goals a Reality

    कुटुंबीयांना सामील करून घ्या –

    कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला आपले कुटुंबीय व हितचिंतकांची मन-पूर्वक साथ हवी, म्हणून तुमच्या ध्येयपूर्तीच्या प्रवासात तुमच्या कुटुंबीयांना व हितचिंतकांना सामील करून घ्या. त्या खडतर प्रवासाचे ते सुद्धा साथीदार व मालक असतात, यशाचे धनी असतात. ध्येयप्राप्तीचा प्रवास बैलगाडीच्या प्रवासासारखा असतो. शेतकरी “ढवळ्या आणि पवळ्या’ या बैलजोडीला गाडीला जुंपतो, हातात कासरे धरून आपण गाडीत बसतो. मागे कुटुंबीय बसतात. गाडी वाटेने खडखडाट करीत करीत जात असते. बैलांना गाडी ओढणे सुखकर होण्यासाठी, शेतकरी चाकात वंगण घालतो, उन्हाचा चटका कमी व्हावा म्हणून बैलांच्या पाठीवर रंगीत, नक्षीदार झूल घालतो, प्रवासाचा शिणवटा कमी व्हावा म्हणून बैलांच्या गळ्यात घुंगरांची माळ घालतो, कुटुंबीयांना सावली मिळावी म्हणून गाडीवर वक्राकार छत घालतो आणि सर्वांचाच प्रवास सुखकर होण्यासाठी एखादं गाणंही म्हणतो व मजल दरमजल करीत इच्छित गावी पोचतो.

    How to Make Your Goals a Reality

    अगदी त्याचप्रमाणे, यशाच्या प्रवासात जिद्द व कष्ट हे दोन बैल असतात. त्यांचे कासरे तुमच्या हातात असतात. या कासरांचा वापर करून दिशा ठरवायची असते. योग्य ठिकाणी वळण घ्यायचे असते. योग्य विचार व आचाराची झूल घालून कुटुंबीयांना प्रेमाचे छत करून चालत राहा, तुमचे इच्छित गाव तुम्हाला सहज भेटेल. गाडीचा रस्ता नेहमीच खडबडीत असतो. तो तसाच असायला हवा. या प्रवासात छोटे मोठे हादरे, धक्के बसतात ते बसायलाच हवेत. कारण गुळगुळीत रस्ता शेवटपर्यंत कधीच नसतो. तो आपल्या इच्छित स्थळापर्यंत नेईलच याची खात्री नसते. म्हणून इच्छित स्थळ जायचे असेल तर रस्ता कसा आहे हे पाहू नका. एकदा इच्छित स्थळी पोचला, की यश हाती येते. पैसा तुमच्या हातात आपोआप येईल व टिकूनही राहील.

    अपयश हीच खरी यशाची पहिली पायरी

    अडचणी, अडथळे सर्वांनाच येतात, पण ते पार करण्याची ताकद आपण स्वत-हून निर्माण केली पाहिजे. नाउमेद, निराश, हताश होऊन चालणार नाही. कारण यांच्याशी सामना करणारी माणसंच यशस्वी होतात. जगातील सर्वच यशस्वी, श्रीमंत माणसं कधी ना कधी, बऱ्याच वेळा अपयशाच्या मार्गातून गेलेली असतात. अपयशातूनच अनुभव मिळतो. अनुभवातून आत्मविश्‍वास निर्माण होतो. आत्मविश्‍वासातून जोम व ताकद मिळते. हाच जोम व ताकद आपल्याला पुढे घेऊन जाते, अपयशच आपल्याला जोमाने पुढे जाण्याची प्रेरणा देते. अंगात नवीन बळ देते, विश्‍वास देते, नम्र बनवते आणि परिस्थितीवर मात करण्याची कला व कौशल्य मिळवून देते. म्हणून अपयशाच्या भीतीने येणाऱ्या परिस्थितीचे बळी पडण्यापेक्षा तिच्यावर मात करून यश व समृद्धी मिळवा.

  • सर आयझॅक न्यूटन, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारे थोर शास्त्रज्ञ यांची जयंती

    सर आयझॅक न्यूटन, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारे थोर शास्त्रज्ञ यांची जयंती

    लहान वयातच त्यांनी लहानशी चक्की (उंदराने चालविलेली), घड्याळे, कंदील यांसारख्या वस्तू बनविल्या होत्या. त्यांना शेतीमध्ये गुंतविण्याच्या दृष्टीने आईने त्यांना शाळेतून काढून शेतावर कामास नेले; परंतु त्यात त्यांचे लक्ष लागेना. मामाच्या व शिक्षकांच्या सल्ल्याने त्यांना १६६० मध्ये परत शाळेत पाठविण्यात आले.

    ते १६६१ मध्ये केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. १६६५ मध्ये बी. ए. पदवी मिळविल्यानंतर दोन वर्षांनी त्यांची ट्रिनिटी कॉलेजचे फेलो म्हणून निवड झाली. जून १६६५ नंतर सु. दीड वर्ष प्लेगच्या साथीमुळे विद्यापीठ बंद राहिल्याने त्या काळात न्यूटन यांना वुल्झथॉर्पमध्ये रहावे लागले. या काळातच त्यांनी त्यांच्या गणित, प्रकाशकी आणि खगोलीय यामिकी या विषयांतील कामगिरीचा पाया घातला.

    Unique Scientist Sir Isaac 202303201238299986 H@@IGHT 445 W@@IDTH 846

    १६६८ मध्ये त्यांनी एम्.ए. ही पदवी संपादन केली. त्यांचे गुरू आयझॅक बॅरो यांनी न्यूटन यांची योग्यता ओळखली होती आणि १६६९ मध्ये जेव्हा बॅरो यांनी केंब्रिज विद्यापीठातील आपल्या गणिताच्या ल्यूकेशिअन प्राध्यापकदाचा राजीनामा दिला तेव्हा वयाच्या केवळ सव्वीसाव्या वर्षी न्यूटन यांची त्या पदावर नेमणूक झाली.

    ल्यूकेशिअन प्राध्यापक म्हणून नियमाप्रमाणे त्यांनी आपल्या व्याख्यानांची हस्तलिखिते विद्यापीठाच्या ग्रंथालयात ठेवली. ही व्याख्याने पुढील विषयांवरील होती : प्रकाशकी (१६७०–७३), अंकगणित व बीजगणित (१६७३–८३), Principia या ग्रंथाचा पहिला भाग (१६८४–८५), सूर्यकुलातील ग्रह, उपग्रह, धूमकेतू व भरती-ओहोटी – द सिस्टिम ऑफ द वर्ल्ड – (१६८७). १६८८ ते १६९६ पर्यंत त्यांनी कोणत्या विषयांवर व्याख्याने दिली त्याची नोंद उपलब्ध नाही. १६८९ मध्ये केंब्रिज विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून संसदेत त्यांची निवड झाली व पुढील वर्षी संसद विसर्जित होईपर्यंत ते त्या पदावर राहिले. १७०१ साली त्यांची संसदेत पुन्हा निवड झाली; परंतु राजकारणात त्यांनी कोणताही महत्त्वाचा भाग घेतला नाही.

    १६९० मध्ये संसद विसर्जित झाल्यावर ते केंब्रिजला परतले व काही काळ यांनी गणितावर संशोधन केले; परंतु १६९२–९४ या काळात निद्रानाश व मानसिक त्रास यांमुळे ते आजारी पडल्याने त्यांच्या कार्यात खंड पडला. केंब्रिजमधील जीवनाचा कंटाळा आल्याने ते तेथून बाहेर पडण्याचा विचार करू लागले. १६९६ मध्ये त्या वेळचे अर्थमंत्री चार्ल्स माँटाग्यू यांनी न्यूटन यांची टाकसाळीमध्ये अधीक्षक (वॉर्डन) म्हणून नेमणूक केली व चार वर्षांनी ते तेथील मुख्याधिकारी झाले. अधीक्षक असतानाच ते केंब्रिज येथील प्राध्यापकपदावरही होते; परंतु मुख्याधिकारी झाल्यावर त्यांनी प्राध्यापकपदाचा राजीनामा दिला आणि ते लंडन येथे स्थायिक झाले व टाकसाळीतच मुख्याधिकारी म्हणून त्यांनी मृत्यूपावेतो काम केले.


    गणितशास्त्रातील न्यूटन यांची महत्त्वाची कामगिरी म्हणजे अवकलन व समाकलन यांचा निर्मिती ही होय. अवकलनांकाला त्यांनी ‘फ्लक्शन’ हे नाव दिले होते. अवकलनांक दर्शविण्याकरिता त्यांनी शिरोबिंदूचा उपयोग केला उदा., dक्ष/dट करिता क्षं. न्यूटन यांनी अवकलनाच्या साहाय्याने वक्राची स्पर्शिका काढण्याची पद्धत निश्चित केली. समाकलन या संकल्पनेची मांडणीही त्यांनी केली होती. समाकलनाचा उपयोग त्यांनी वक्राने वेढलेले क्षेत्रफळ व घन आकृत्यांचे घनफळ मिळविण्याकरिता केला. अवकलन व समाकलन यांना जोडणारे कलनशास्त्रातील मूलभूत प्रमेय त्यांनीच मांडले. सांत अंतर कलन या कलनाच्या दुसऱ्या एका शाखेतही त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली.

    isaac newton
    Isaac Newton

    कलनशास्त्राचा निर्माता कोण यासंबंधी १७०५ च्या सुमारास न्यूटन आणि जर्मन गणितज्ञ जी. डब्ल्यू. लायप्निट्‌स यांच्यात बराच मोठा वाद निर्माण झाला होता. लायप्निट्‌स यांनी कलनशास्त्राची निर्मिती स्वतंत्रपणे केली असेच सध्या मानण्यात येते. लायप्निट्‌स यांचीच कलनशास्त्रातील संकेतन पद्धती पुढे रूढ झाली कलन. बीजगणितात महत्त्वाचे मानले जाणारे द्विपद प्रमेय न्यूटन यांनी १६६५ च्या सुमारास मांडले बीजगणित. समीकरणाच्या असत् मूलांविषयी त्यांनी विवरण केलेले होते. समीकरणाच्या निर्वाहाचे उपसादन पद्धतीने आसन्नीकरण करण्याची (अंदाजी मूल्य काढण्याची) एक पद्धत त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे समीकरण सिद्धांत. न्यूटन यांनी काही अनंत श्रेढी मांडण्यात यश मिळविले होते. विशेषतः ज्या -१ (क्ष) आणि लॉग (१+क्ष) ही फलने श्रेढी स्वरूपात त्यांनीच मांडून दाखविली श्रेढी.


    गतिकीमधील न्यूटन यांचे गतिविषयक नियम पायाभूत मानले जातात यामिकी. या नियमांच्या साह्याने त्यांनी गॅलिलीओ यांचे खाली पडणाऱ्या पदार्थाच्या गतिविषयीचे सिद्धांत पूर्णावस्थेस नेले.

    न्यूटन यांचे सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी मांडलेला गुरुत्वाकर्षणाचा नियम हे होय गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षणाची थोडीशी कल्पना न्यूटन यांच्यापूर्वीच्या शास्त्रज्ञांनाही होती; पण न्यूटन यांनी आपल्या नियमाद्वारे तिला निश्चित स्वरूप दिले. ‘विश्वातील दोन कणांमधील आकर्षण प्रेरणा ही त्यांच्या वस्तुमानांच्या गुणाकाराच्या समप्रमाणात व त्यांच्यातील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते’ हे त्यांनी स्पष्ट केले.

    न्यूटन यांनी आपले गतिनियम पृथ्वीवरील पदार्थांप्रमाणेच अवकाशातील ग्रह, उपग्रह इत्यादींना लागू केले व त्यातून मिळालेली माहिती योहानेस केप्लर यांच्या नियमानुसार खगोलीय यामिकी मिळणाऱ्या माहितीशी जुळणारी होती. यामध्ये बुध या ग्रहाचा मात्र अपवाद होता. ग्रहगतीतील अनियमितपणाचाही त्यांनी अभ्यास केला. न्यूटन यांनी ‘गोलाची त्याच्या बाहेरील वस्तुमानावरची आकर्षण प्रेरणा त्याच्या केंद्रबिंदूमध्ये केंद्रित झालेली आहे असे मानता येते’ हे सिद्ध केले. त्यांचा हा सिद्धांत ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासात फार महत्त्वाचा ठरला आहे.

    प्रकाशकी हा न्यूटन यांच्या खास अभ्यासाचा विषय होता. जर शुभ्र प्रकाशाचा (उदा., सूर्यप्रकाशाचा) किरण एखाद्या अरुंद फटीद्वारे त्रिकोणी लोलकातून जाऊ दिला, तर त्याचे (दृश्य वर्णपटाच्या) निरनिराळ्या रंगांच्या किरणांमध्ये पृथक्करण होते; तसेच या रंगीत किरणांपैकी एकाच रंगाचा किरण दुसऱ्या लोलकातून जाऊ दिल्यास त्याचे आणखी पृथक्करण न होता फक्त प्रणमन (एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करताना दिशेमध्ये होणारा बदल) होते, असे त्यांनी प्रयोगाद्वारे दाखविले. यावरून शुभ्र प्रकाश हा अनेक रंगांच्या किरणांचे मिश्रण असून या किरणांच्या प्रणमनाची क्षमता (प्रणमनांक) निरनिराळी असल्यामुळेच शुभ्र प्रकाशाचे पृथक्करण होते असे त्यांनी सिद्ध केले.

    त्यांनी वर्णविपथनाचा प्रकाशीय व्यूहांतील विपथन अभ्यास केला व त्यांना असे आढळून आले की, एखादी वस्तू शुभ्र प्रकाशाने प्रकाशित केल्यास भिंगामुळे मिळणाऱ्या त्याच्या प्रतिमेची कडा स्पष्टपणे रेखीव न दिसता नेहमी रंगीत दिसते कारण निरनिराळ्या रंगांकरिता भिंगाचे केंद्रांतर भिन्न असते. हा रंगीत प्रतिमा मिळण्याचा दोष टाळून भिंगाचा दूरदर्शक (प्रणमनी दूरदर्शक) तयार करणे शक्य नाही असा निष्कर्ष त्यांनी काढला (हा निष्कर्ष चुकीचा असल्याचे मागाहून दिसून आले) व त्यामुळे त्यांनी वस्तूपासून येणारा प्रकाश ज्यावर प्रथम पडतो तो मुख्य भाग अंतर्वक्र आरसा असलेला दूरदर्शक (परावर्तनी दूरदर्शक) तयार केला. तथापि अन्वस्तीय (पॅराबोलिक) आरसे तयार करण्याची प्रक्रिया पूर्णावस्थेस जाईपर्यंत या दूरदर्शकाचा पूर्णांशाने उपयोग होऊ शकला नाही.

    सध्या अस्तित्वात असलेले सर्व शक्तिशाली दूरदर्शक (उदा., मौंट विल्सन आणि पॅलोमार वेधशाळेतील ५०८ सेंमी. व्यासाचा दूरदर्शक) परावर्तनी प्रकाराचेच आहेत दूरदर्शक. प्रकाश हा दीप्तिमान पदार्थापासून बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म कणांचा बनलेला असतो असा सिद्धांत न्यूटन यांनी मांडला प्रकाश व या सिद्धांताच्या आधारे त्यांनी परावर्तन, प्रणमन इ. प्रकाशीय आविष्कारांचे स्पष्टीकरण मांडले. मोठ्या केंद्रांतराचे बहिर्गोल भिंग व ते ज्यावर ठेवलेले आहे असा सपाट परावर्तक पृष्ठभाग यांच्यामधील हवेच्या पातळ थराचे विशिष्ट रंगाच्या परावर्तित प्रकाशात निरीक्षण केल्यास एका मध्यवर्ती काळ्या ठिपक्याभोवती एकाआड एक प्रकाशमान व काळी अशी वर्तुळाकार कडी दिसतात. या आविष्काराचे न्यूटन यांनी आपल्या प्रकाशाच्या कण सिद्धांताद्वारे स्पष्टीकरण दिले आणि प्रकाशमान कड्याची त्रिज्या व प्रकाशाचा रंग यांचा संबंध दर्शविणारा नियमही त्यांनी मांडला. हा आविष्कार ‘न्यूटन कडी’ या नावाने ओळखण्यात येतो.

    रॉबर्ट हुक यांनी न्यूटन यांच्या कण सिद्धांतावर बरेच आक्षेप घेतले. नंतरच्या काळात क्रिस्तीआन हायगेन्झ, टॉमस यंग व ऑगस्तीन फ्रेनेल यांनी प्रकाशाचा तरंग सिद्धांत विकसित केला. तथापि न्यूटन यांनी हा साधा तरंग सिद्धांत मान्य केला नाही, कारण या सिद्धांताच्या आधारे प्रकाशाचे रेखीय प्रसारण व ध्रुवण (एकाच विशिष्ट प्रतलात होणारे कंपन) या आविष्कारांचे स्पष्टीकरण करता येत नाही असे त्यांचे मत होते.

    दीप्तिमान पदार्थांपासून प्रकाश कणरूपाने बाहेर पडतो व हे कण मग ईथरमधून ईथर -२ जाताना तरंग निर्माण करतात तसेच अनेक प्रकाशीय आविष्कार (उदा., पातळ पटलांचे रंग) तरंग व कण या दोहोंच्या गुणधर्मामुळे निर्माण होतात असा सिद्धांत त्यांनी आपल्या काही सुरुवातीच्या निबंधात व नंतर Opticks (पहिली आवृत्ती १७०४) या आपल्या ग्रंथात मांडला. तथापि एकोणिसाव्या शतकात तरंग सिद्धांतच ग्राह्य मानला जात होता. विसाव्या शतकात अ‍ॅल्बर्ट आइन्स्टाइन यांनी मांडलेली फोटॉनांची संकल्पना व माक्स प्लांक यांच्या पुंज सिद्धांत यामुळे न्यूटन यांचा सिद्धांत अगदीच चुकीचा नव्हता असे दिसून आले आहे.

    ‘थंड होत असलेल्या पदार्थाचा थंड होण्याचा दर हा त्याच्या व भोवतालच्या तापमानात असलेल्या फरकावर अवलंबून असतो’ हा शीतलीकरणाचा नियम न्यूटन यांच्या नावाने ओळखला जातो.

    न्यूटन यांचा Philosophiae Naturalis Principia Mathematica (इं. शी. मॅथेमॅटिकल प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसॉफी) हा प्रख्यात ग्रंथ १६८७ साली प्रथम प्रकाशित झाला. १७०९ साली रॉजर कोट्‌स यांच्या सहकार्यांने दुसरी आवृत्ती तयार करण्यास न्यूटन यानी संमती दिली व ही आवृत्ती १७१६ मध्ये प्रसिद्ध झाली. हेन्‍री पेम्बर्टन यांच्या सहकार्यांने तयार केलेली तिसरी आवृत्ती १७२६ साली प्रकाशित झाली. यानंतरही या ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या व त्यावरील टीकाग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत. या ग्रंथाच्या पहिल्या भागात गतिकीचा गणितीय दृष्टिकोनातून विकास केलेला आहे, तर तिसऱ्या भागात या गणितीय सिद्धांतांचा उपयोग ज्योतिषशास्त्रीय व भौतिक प्रश्न सोडविण्यासाठी केलेला आहे. दुसऱ्या भागात रोधक माध्यमांतील पदार्थांच्या गतीचे विवरण केलेले असून या भागाचा ग्रंथात समावेश करण्याचा विचार न्यूटन यांनी मागाहून केलेला होता, असे आढळून येते. या ग्रंथामुळे न्यूटन यांची कीर्ती सर्वत्र पसरली व सु. २०० वर्षे वैज्ञानिक जगतात या ग्रंथाचे श्रेष्ठत्व अबाधित राहिले.

    आधुनिक विज्ञानाच्या विकासाला या ग्रंथापासूनच सुरुवात झाली असे मानण्यात येते. Opticks हा त्यांचा दुसरा महत्त्वाचा ग्रंथ १७०४ साली प्रथमतः प्रसिद्ध झाला आणि न्यूटन यांच्या आयुष्यातच त्याच्या तीन आवृत्त्या निघाल्या. त्यांचे शास्त्रीय निबंध आय्. बी. कोएन (१९५८–), सॅम्युएल हॉर्सली (५ खंड, १७७९–८५), डी. टी. व्हाइटहेड (२ खंड, १९६७–६८) इ. लेखकांनी एकत्रित स्वरूपात निरनिराळ्या ग्रंथांच्या रूपाने संपादित केलेले आहेत. रॉयल सोसायटीने न्यूटन यांचा पत्रव्यवहार चार खंडांत प्रसिद्ध केलेला आहे (पहिले तीन खंड १९५९–६१, चौथा खंड १९६७).

    न्यूटन १६७२ पासून रॉयल सोसायटीचे सदस्य होते. १७०३ मध्ये ते सोसायटीचे अध्यक्ष झाले व त्यानंतर मृत्यूपावेती दर वर्षी त्यांची या पदावर निवड झाली. पॅरिस येथील सायन्स अ‍ॅकॅडेमीने १६९९ साली त्यांना सन्मान्य सदस्यत्वाचा बहुमान दिला. १७०५ मध्ये अ‍ॅन राणीने त्यांना नाईट (सर) हा किताब दिला. ते लंडन येथे मृत्यू पावले व विशेष सन्मान म्हणून त्यांचे दफन वेस्टमिन्स्टर अ‍ॅबेमध्ये करण्यात आले.

    संदर्भ : 1. Brewster, D. Memoirs of the Life, Writings and Discoveris of Sir Isaac Newton, 2 Vols., Edinburgh, 1855. (Reprinted, New York, 1965).
    2. More, L. T. Isaac Newton : A Biography, New York, 1934.

    लेखक: मो. वि काळीकर / स. ज. ओक / व. ग. भदे
    स्त्रोत – मराठी विश्वकोश, vikaspedia.in

  • भारतीय उद्योगजगताचे दोन मानबिंदू धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा यांचा आज जन्मदिन!!!

    भारतीय उद्योगजगताचे दोन मानबिंदू धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा यांचा आज जन्मदिन!!!

    भारतातील पहिले नामांकित उद्योगपती सर जमशेटजी टाटा यांच्या कुटुंबात दत्तक गेलेले कै. नवल टाटा यांचे ते पुत्र. जे. आर. डी. टाटा यांच्या निधनानंतर रतन टाटा त्यांच्या समुहाचे प्रमुख बनले. 2002 पर्यंत त्यांनी टाटा सन्स या उद्योगसमुहाचे प्रमुखपद सांभाळताना समुहाच्या कक्षा विस्तारून त्या देशाबाहेरही पसरवल्या.

    ‘टेटली’, जग्वार लँड क्रूझर',कोरस’ यासारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कंपन्या त्यांच्याच पुढाकारामुळे भारतीय मालकीच्या बनल्या. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी टाटा समुहाच्या सर्व कंपन्यांच्या प्रमुखपदावरून निवृत्ती स्वीकारली व सायरस मिस्त्री या 41 वर्षांच्या भाच्याकडे सूत्रं सोपवली.

    पण २०१६ मध्ये त्यांनी टाटा समूहात क्रांती घडवून आणली व मिस्त्रींना बाजूला करून ते पुन्हा समुहाचे अध्यक्ष बनले. त्यामुळे उद्योग जगतात निर्माण झालेली खळबळ अद्याप शमलेली नाही.

    dhirubhai-ambani-and-ratan-tata-birhday-special-indian-business-iconic-two-stars-of-indian-industry

    धीरूभाई मात्र केवळ स्वकष्टाने राखेतून निर्माण झालेले उत्तुंग व्यक्तिमत्व होते. गरीब कुटुंबात जन्मलेले धीरूभाई एकेकाळी साड्या विकण्याचे काम करत. त्यातूनच ‘विमल’ हा घराघरात पोहोचलेला साड्यांचा ब्रँड तयार झाला.

    दूर एडनमध्ये एका पेट्रोल पंपावर गाड्यांमध्ये पेट्रोल भरण्याचे काम करणाऱ्या धीरूभाईंनी तेव्हा जगातील सर्वात मोठी पेट्रोकेमिकल कंपनी स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले आणि स्वकष्टाने ते प्रत्यक्षात उतरवण्याचे कर्तृत्व दाखवले. बँका वा अन्य कंपन्यांकडून कर्जें घेऊन उद्योग उभारण्याऐवजी आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या सामान्य गुंतवणूकदारांकडून छोट्या-मोठ्या ठेवी भाग भांडवल म्हणून गोळा करून त्यावर उद्योगांची मांडणी करण्याची अभूतपूर्व कल्पना धीरूभाईंनी राबवली व यशस्वीही केली.

    धीरूभाई व टाटा या दोघांच्याही भोवती वादाची वादळे घोंघावत राहिली. पण दोघानीही त्याची पर्वा न करता आपली वाटचाल चालूच ठेवली. भारतीय अर्थव्यवस्थेवर त्यांनी उमटवलेला ठसा बराच काळ कायम राहील हे नक्की !

    Author : भारतकुमार राऊत

  • यु-ट्युब सुरु करण्याचा हेतू ऐकून आश्चर्यचकित व्हाल

    यु-ट्युब सुरु करण्याचा हेतू ऐकून आश्चर्यचकित व्हाल

    संशोधनानुसार एक युजर यावर सरासरी दररोज 19 मिनिटे वेळ घालवतो. युट्युब ही गुगल पाठोपाठ जगातील दुसरी सर्वात जास्त पाहिली जाणारी साईट आहे. 2020 मध्ये युट्युब शॉर्ट्सची सुरुवात  झाल्यानंतर अगदी थोड्या कालावधीत त्यांची लोकप्रियता वाढू लागली. आता या शॉर्ट्सना सरासरी 30 अब्ज डेली व्ह्यूज मिळतात. युट्युबवर दर मिनिटाला 2,500 पेक्षा जास्त व्हिडिओज अपलोड केले जातात. सध्याला यु -ट्युब वर 800 मिलियन किंवा कदाचित त्याहीपेक्षा जास्त व्हिडिओज असतील. 80 टक्यांहून अधिक लोक यु-ट्युबचा  वापर मनोरंजनासाठी करतात. उर्वरित लोक ते अन्य कारणांसाठी वापरतात. 

    पहिला यु-ट्युबर हा ‘जावेद करीम’ नावाचा व्यक्ती होता ज्याने ‘Me at zoo’ या कॅप्शनसहित त्याने पहिला व्हिडीओ अपलोड केला. पण प्लॅटफॉर्म  सुरु करण्याचा मूळ उद्देश हा नव्हताच. कोणी आणि कशी  केली याची सुरुवात आणि कसा आहे   यु-ट्युबचा प्रवास हेच आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 

     यु-ट्युब ची सुरुवात  –

    the-history-of-youtube-from-startup-to-global-giant
    the-history-of-youtube-from-startup-to-global-giant

    सुरुवातीला वर्षाच्या शेवटी यु ट्युब ला 25 मिलियन व्युज आणि 2,000 अपलोड्स मिळाले. त्यावर अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओज ची विविधता हेच यु – ट्युब हिट होण्याचे पहिले कारण ठरले. सध्या यु-ट्युब वर DIY  ते प्रोफेशनल म्युझिक व्हिडिओज अपलोड केले जातात. यु ट्युब वरती म्युझिक व्हिडिओज जास्त प्रमाणात पाहिले जातात. 13 Nov 2006 रोजी गुगल ने 1.6 बिलियन डॉलर्सना यु- ट्यूब विकत घेतले . 

    काय होता यु-ट्यूबचा मूळ हेतू  

    2016 मध्ये यु-ट्यूब च्या निर्मात्यांपैकी एक असणारे स्टीव्ह चेन यांनी एका परिषदेत सांगितले की युट्युब सुरु करण्याचा  मूळ  उद्देश्य हा नव्हता.खरतर आमही  तिघांनी यु -ट्यूब एक व्हिडिओ साईट म्हणून सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही ते यासाठी सुरु केले की लोक तिथे त्यांना कसा पार्टनर आहे हे सांगून  व्हिडिओ डेटिंग करू शकतील. एवढाच  काय तर  ‘Tune in, hook up’ ही टॅगलाईन  सुद्धा यु-ट्यूब ने वापरली. परंतु निर्मात्यांना जसे लक्षात आले की याने जास्त फायदा होऊ शकत नाही तेव्हा त्यांनी सर्व प्रकारच्या व्हिडिओजना प्लॅटफॉर्म खुला केला आणि त्याने यु-ट्यूब ला प्रचंड फायदा झाला. 

  • तुमचा स्टार्टअप सुरु करण्याच्या ७ सर्वात सोप्प्या पायऱ्या

    तुमचा स्टार्टअप सुरु करण्याच्या ७ सर्वात सोप्प्या पायऱ्या

    तरीसुद्धा, तुम्हाला जीवनात खरोखर काय साध्य करायचे आहे हे स्पष्टपणे ओळखणे आवश्यक आहे. यावरून तुम्ही कोणत्या मार्गावर जावे आणि कोणती पावले उचलावीत याचे स्पष्टीकरण मिळते.

    बिल गेट्स यश मिळवण्याचे रहस्य सांगतात कि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर काम करायला सुरवात करा. ते स्वतः वयाच्या १३व्या वर्षांपासून कॉम्पुटर क्षेत्रात काम करत आहेत आणि ते किती यशस्वी आणि प्रभावशाली झाले आहेत हे आपण पाहतच आहोत. Facebook चे CEO, मार्क झुकेरबर्ग यांनी हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थी असताना त्यांची आताची अब्जावधी डॉलर्सची कंपनी उभी केली. आज फेसबुक हे जगभरातील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनले आहे. वय हा यशाचा निर्णयात्मक घटक नसला तरी आपण पुरेसे मोठे आणि स्थिर होण्यापर्यंत प्रतीक्षा करण्याची गरज नाही.

    जीवनात यश कसे मिळवायचे?

    पहिली पायरी: जीवनातील तुमच्या ध्येयांची स्पष्टता ठेवा

    शीर्षक सगळं स्वतःच स्पष्ट करते. तुम्हाला जीवनात यश मिळवता येण्यासाठी, तुमच्या जीवनातील तुमच्या ध्येयांची स्पष्टता असणे आवश्यक आहे. स्वतःला विचारा, “मला खरोखर काय साध्य करायचे आहे?” तुम्हाला तुमच्या आयुष्यात बर्‍याच गोष्टी साध्य करायच्या असतील, प्रत्येक ध्येयाचा त्याच्या प्राधान्यानुसार क्रम लावा. त्यातील कोणते जवळचे आहे कोणते लांबीचे आहे हे ठरवा आणि त्यानुसार ध्येयात स्पष्टता आणा.

    दुसरी पायरी: प्रेरणा शोधा

    तुमचे ध्येय हे तुमच्यासाठी खरी प्रेरणा असले पाहिजे, काहीवेळा जेव्हा तुमचे उद्दिष्ट पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो किंवा तुम्ही ठरवल्याप्रमाणे काही घडत नाही तेव्हा निराशा येते. अशा वेळी, स्वतःला हे स्मरण करून दिले पाहिजे कि आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायचीय आहेत. त्यामुळे मागे हटण्यापेक्षा आपण काय चुकीचे करत आहोत याचे मूल्यांकन करणे आणि आपल्या चुका सुधारणे हे जास्त संयुक्तिक आहे.

    तिसरी पायरी: टाइमलाइन तयार करा

    वेळ कुणासाठीही थांबत नाही. आपले ध्येय साध्य करण्यासाठी एक टाइमलाइन असणे महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही नियोजित वेळेत चालत राहता आणि सर्वात वाईट परिस्थितीत सुद्धा तुम्ही सकारात्मक गोष्टींकडे पाहता. तुमचे ध्येय कालबद्ध असल्यास, ठरवलेल्या वेळेत ते साध्य करण्यासाठी तुम्ही प्रयत्नानांची पराकाष्टा करता.

    चौथी पायरी: तुम्ही काय करणार आहेत याची योजना बनवा

    हे तुमच्या कृतींशी संबंधित आहे. तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे? त्यासाठी आवश्यक उपाययोजना न करता नियोजन करणे चुकीचे आहे. त्याचप्रमाणे, योजना न करता गोष्टी करणे म्हणजे वेळ आणि पैसे व्यर्थ घालवणे. म्हणूनच, यश मिळविण्यासाठी नियोजनाप्रमाणे कृती करणे तितकेच महत्त्वाचे आहे. तुमची टाइमलाइन वापरून, तुमची अंतिम उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याचे योग्य नियोजन करा.

    पाचवी पायरी: एक आकस्मिक योजना तयार करा

    बदल हा सतत होत असतो. त्यामुळे अपरिहार्य आणि अचानक होणाऱ्या बदलांना सामोर जाण्यासाठी तयार राहा. त्यासाठी तुमच्या योजना आणि उद्दिष्टे लवचिक बनवणे गरजेचं आहे आणि त्यासाठी आकस्मिक योजना (प्लॅन B) असणे देखील महत्त्वाचे आहे, जेणेकरुन गोष्टी नियोजनानुसार होत नसतील तर आपण मार्ग बदलू शकतो. बर्‍याचदा, या आकस्मित नियोजनामुळे आपल्याला खात्री मिळते की, आपले ध्येय साध्य करण्याचा अजून एक मार्ग आहे. यामुळे आपण पुढे होणारे  नुकसान कमी करु शकतो.

    सहावी पायरी: विश्वास ठेवा

    तुम्ही आधीच प्रत्येक पायरीचे काटेकोरपणे पालन केले आहे. आता पुढची पायरी म्हणजे नशीब तुमच्या पाठीशी आहे यावर विश्वास ठेवणे आणि सर्व काही तुमच्या नियोजनानुसार करत राहणे.

    सातवी पायरी: आपल्या जवळच्या चांगल्या गोष्टी नेहमी इतरांना देत चला

    आपल्या जवळच्या चांगल्या गोष्टी नेहमी इतरांना देत राहणे ही चांगली सवय आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समजाचे आपण देणे लागतो ही भावना नेहमी तुम्हाला एक चांगला माणूस बनण्यास मदत करते आणि यामुळे तुमचे शत्रू देखील कमी होतात. लोकांकडून मिळालेल्या सद्भावना नेहमीच आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतात.