नवी अर्थक्रांती

Blog

  • क्रेडिट कार्डबाबत आरबीआय’ची मोठी अपडेट! ग्राहक आता त्यांना हवे ते पेमेंट नेटवर्क निवडू शकणार

    क्रेडिट कार्डबाबत आरबीआय’ची मोठी अपडेट! ग्राहक आता त्यांना हवे ते पेमेंट नेटवर्क निवडू शकणार

    भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना एका पेक्षा अधिक कार्ड नेटवर्क निवडण्याचा पर्याय देण्याचे निर्देश दिले आहेत. क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँका आणि बिगर बँकांना ग्राहकांना एकाधिक कार्ड नेटवर्कमधून निवडण्याचा पर्याय द्यावा लागणार आहे. कार्ड जारी करताना हा पर्याय दिला जाईल.

    आरबीआयने म्हटले आहे की, ‘कार्ड नेटवर्कशी असा कोणताही करार करू नये ज्यामुळे त्यांना इतरांच्या सेवांचा लाभ घेण्यापासून वंचित रहावे लागले, यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अधिकृत कार्ड नेटवर्कची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये American Express Banking Corp, Diners Club International Ltd, MasterCard Asia/Pacific Pte, National Payments Corporation of India-Rupay आणि Visa Worldwide Pte यांचा समावेश आहे. या मार्गदर्शक तत्त्वांद्वारे, आरबीआय क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या आणि वापरणाऱ्या ग्राहकांसाठी अधिक पर्यायांची खात्री करू देण्याचा प्रयत्न करत आहे. आरबीआयच्या मते, काही कार्ड नेटवर्क आणि जारीकर्त्यांमधील करार ग्राहकांच्या पर्यायांवर मर्यादा घालत आहेत.

    आरबीआयने दिले निर्देश

    कार्ड जारीकर्त्यांना करारनामा करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना इतर कार्ड नेटवर्कच्या सेवांचा लाभ घेता येत नव्हता. आता कार्ड जारी करणाऱ्यांना कार्ड जारी करताना पात्र ग्राहकांना एकाधिक कार्ड नेटवर्कमधून निवडण्याचा पर्याय द्यावा लागेल. आता क्रेडिट कार्ड असणाऱ्यांना त्यांचे ते कार्ड अपडेट करत असताना त्यांना हा नवीन पर्याय दिसणार आहे.

    कार्डची सेवा पुरवणाऱ्या काही व्यवस्था पाहिल्यानंतर आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. कार्ड नेटवर्कमधून निवड करताना ग्राहकांना निवडीच्या उपलब्धतेसाठी या व्यवस्था अनुकूल नाहीत. हे नियम त्या क्रेडिट कार्ड जारीकर्त्यांना लागू होणार नाहीत, ज्यांच्या जारी केलेल्या सक्रिय कार्डांची संख्या १० लाखांहून कमी आहे.

  • महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल (मैत्री)

    महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल (मैत्री)

    महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल (मैत्री) ही सुविधा महाराष्ट्र सरकार द्वारा सुरु केली गेली आहे. ही सुविधा महाराष्ट्र राज्य पुरतीच मर्यादित केली गेली आहे . या सुविधेच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने मैत्री (महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल) पोर्टल विकसित केले आहे . सहजपणे व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल (मैत्री) ची सुरवात केली आहे . व्यवसायाशी संबंधित गुंतवणूक संबंधित माहिती, मार्गदर्शन या सारख्या समस्या दूर करण्यासाठी एक सिंगल विंडो कार्यक्रम सुरु केला आहे. मैत्री मध्ये एका ठिकाणी १६ सरकारी विभाग आणि ४४ सेवा उपलब्ध आहे. या पोर्टल द्वारे आवेदक परवाना, प्रमाणपत्र ऑनलाइन पोर्टल च्या मदतीने कोणताही आराखडा मंजूर करू शकतो. १६ सरकारी विभागांना पासून नोडल अधिकारी सेवा उपलब्ध आहेत विशेषज्ञ सेवा व इतर सुविधा उपलब्ध आहेत.

    मैत्री काय आहे?

    महाराष्ट्र शासनाने मैत्री (महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल) पोर्टल विकसित केले आहे. सहजपणे व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल (MAHARASHTRA INDUSTRY, TRADE AND INVESTMENT FACILITATION CELL – MAITRI) ची सुरवात केली आहे . व्यवसायाशी संबंधित गुंतवणूक संबंधित माहिती, मार्गदर्शन या सारख्या समस्या दूर करण्यासाठी एक सिंगल विंडो कार्यक्रम सुरु केला आहे. मैत्री मध्ये एका ठिकाणी १६ सरकारी विभाग आणि ४४ सेवा उपलब्ध आहे. या पोर्टल द्वारे आवेदक परवाना, प्रमाणपत्र ऑनलाइन पोर्टल च्या मदतीने कोणताही आराखडा मंजूर करू शकतो. १६ सरकारी विभागांना पासून नोडल अधिकारी सेवा उपलब्ध आहेत विशेषज्ञ सेवा व इतर सुविधा उपलब्ध आहेत.

    महाराष्ट्र मैत्री ऑनलाइन पोर्टल मार्फत येणारी एकूण खाती

    1. उद्योग विभागा
    2. उद्योग संचालनालय (DOI)
    3. महसूल विभाग
    4. नगर विकास विभाग (UDD)
    5. उद्योग संचालनालय
    6. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)
    7. पाटबंधारे विभाग
    8. पर्यावरण विभागाच्या
    9. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय (डिश)
    10. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ)
    11. महाराष्ट्र अग्निशमन सेवा
    12. विक्री कर विभाग
    13. सार्वजनिक बांधकाम विभाग (सध्याचे मुंबई)
    14. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ मर्यादित (महावितरण)
    15. बाष्पक संचालनालय
    16. कामगार विभाग

    महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल (मैत्री) ची वैशिष्ट्ये:

    • सहजपणे व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल (मैत्री) ची सुरवात केली आहे
    • व्यवसायाशी संबंधित गुंतवणूक संबंधित माहिती, मार्गदर्शन या सारख्या समस्या दूर करण्यासाठी एक सिंगल विंडो कार्यक्रम सुरु केला आहे
    • मैत्री मध्ये एका ठिकाणी १६ सरकारी विभाग आणि ४४ सेवा उपलब्ध आहे
    • या पोर्टल द्वारे आवेदक परवाना, प्रमाणपत्र ऑनलाइन पोर्टल च्या मदतीने कोणताही आराखडा मंजूर करू शकतो
    • १६ सरकारी विभागांना पासून नोडल अधिकारी सेवा उपलब्ध आहेत
    • विशेषज्ञ सेवा व इतर सुविधा उपलब्ध आहेत

    मैत्री पोर्टलच्या विविध सेवांसाठी अर्ज कसा करावा:

    1. फक्त महाराष्ट्र उद्योग, व्यापार भेट आणि गुंतवणूक सुविधा सेल (मैत्री) च्या अधिकृत साइटला भेट द्या : https://maitri.mahaonline.gov.in/Home/home
    2. लॉगिन करा वर क्लिक करा https://maitri.mahaonline.gov.in/
    3. आपण नवीन वापरकर्ता असल्यास नोंदणी लिंकवर क्लिक करा आणि सर्व आवश्यक माहिती भरा
    4. यशस्वी नोंदणी झाल्या नंतर, वापरकरत्याला लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळेल
    5. त्यानंतर वापरकर्ता मैत्री पोर्टल महाराष्ट्र सरकार अंतर्गत येणाऱ्या विविध सेवांसाठी अर्ज करू शकतो

    संपर्काची माहिती:

    1. c / o. महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ (MSSIDC), ‘Krupanidhi’ बिल्डिंग, ९, वालचंद शेठ मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४०००३८
    2. ९१-२२-२२६२२३६२ / २२६२ २३२२
    3. ifcincharge@mahaebiz.com

    संदर्भ तपशील:

    1. महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल (मैत्री) अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी: https://maitri.mahaonline.gov.in/Home/home
    2. महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल (मैत्री) चे पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी इथे भेट द्या: https://maitri.mahaonline.gov.in/PDF/MAITRI%२०_Brochure.pdf
    3. मैत्री पोर्ट्ल चे पीडीफ: https://maitri.mahaonline.gov.in/PDF/Doing_Business_in_Maharashtra_२०१६.pdf
  • २५ हजार रुपयांत सुरु होणारे १०० व्यवसाय

    २५ हजार रुपयांत सुरु होणारे १०० व्यवसाय

    व्यवसायात यायचं तर भांडवल हवे म्हणून अनेक तरुण मागे हटतात, पण त्यांच्याच हातात मी २० हजाराचा मोबाईल पाहतो. मेहनत करण्याची तयारी असणाऱ्यांसाठी १०० व्यवसाय सुचवत आहे. मी मोठ्या खानदानातला, मी उच्चशिक्षित, मी आता व्यवसाय कसा करू म्हणणाऱ्या व घरचं फुकट खाऊन फिरणाऱ्यांसाठी या संकल्पना नाहीत.

    1. चहाची गाडी
    2. डोसा सेंटर
    3. सँडविच गाडी
    4. कट फ्रुट व्यवसाय
    5. भाजीपाला विक्री
    6. फळविक्री
    7. ओली व सुकी भेळ
    8. कडबा कुट्टी
    9. मसाला ताक
    10. कागदी/कापडी पिशव्या
    11. पेस्टकंट्रोल
    12. बॉडी मसाज/फिजिओथेरपी
    13. पार्सल बिर्याणी सेंटर
    14. मटका कुल्फी
    15. सोसायटी भाजीपाला केंद्र
    16. होम अप्लायसेन्स रिपेअरिंग
    17. एसी मेंटेनन्स
    18. कॉम्प्युटर सेंटर
    19. ओला/उबेर टॅक्सी
    20. टुरिस्ट गाईड
    21. होम पेंटिंग
    22. इंटिरिअर डिझाईन
    23. कन्सल्टंसी
    24. वॉलपेपर डिझाईन
    25. कटपीस गारमेंट सेंटर
    26. पोहा, उपमा नाश्ता सेंटर
    27. फ्रुटज्यूस गाडी
    28. मसाला दूध गाडी
    29. प्लंबिंग
    30. इलेक्ट्रिशियन
    31. पेपर एजन्सी
    32. स्क्रॅप मर्चंट
    33. गार्डनिंग लँडस्केपिंग
    34. प्रायव्हेट ट्युशन
    35. वेब डिझायनिंग
    36. स्पोर्टस कोचिंग
    37. फिटनेस ट्रेनिंग
    38. कंटेन्ट रायटिंग
    39. रिव्ह्यू रायटिंग
    40. सायकल रिपेअरिंग
    41. फुलविक्री
    42. जिलेबी गाडी
    43. इस्त्रीचे दुकान
    44. हाऊसकीपिंग
    45. नारळ पाणी
    46. इडली सेंटर
    47. तयार इडली पीठ व चटणी
    48. ट्रॅव्हल एजंट
    49. पार्टी फूड ऑर्डर
    50. बर्थडे इव्हेंट मॅनेजमेंट
    51. नॅचरोपॅथी सेवा
    52. योगा ट्रेनर
    53. ड्रेस डिझायनिंग
    54. चायनीज सेंटर
    55. बेबी सेटिंग
    56. ओल्ड एज केअर
    57. डॉक्यूमेंटेशन सेवा
    58. करिअर कन्सल्टंट
    59. फ्रीलान्स प्रोग्रॅमर
    60. कार वॉशिंग
    61. अकाउंटिंग सेवा
    62. इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट
    63. स्वीटकॉर्न/ मक्याचे कणीस विक्री
    64. पूजापाठ
    65. चहा होलसेल पुरविणे
    66. भजी, वडापाव विक्री
    67. स्पीच थेरपी
    68. सायकॉलॉजी कौन्सिलर
    69. सोसायटी मेंटेनन्स
    70. व्हॉईसओव्हर सेवा
    71. युट्यूब मार्केटिंग
    72. सोशल मीडिया मार्केटिंग
    73. एसईओ, एसईएम मार्केटिंग सेवा
    74. टिफिन सर्व्हिस
    75. रिअल इस्टेट कन्सल्टिंग
    76. बनपाव मस्कापाव केंद्र
    77. पिझ्झा सेंटर
    78. ऊसाचा रस गाडी
    79. लिंबू सरबत
    80. कुल्फी, आईसक्रीम
    81. पुस्तके विक्री
    82. पॉपकॉर्न
    83. घरगुती मेणबत्ती
    84. वेटलॉस ज्यूस सेंटर
    85. ब्युटी पार्लर घरपोच सेवा
    86. ट्रान्सलेशन सेवा
    87. टायपिंग सेवा
    88. इंटरनेट रिसर्च सेवा
    89. लोन सेवा
    90. इन्शुरन्स व्यवसाय सेवा
    91. डेटा मायनिंग
    92. वृक्ष छाटणी सेवा
    93. गोमूत्र संकलन
    94. प्रबोधनपर व्याख्यान सेवा
    95. भजन सेवा
    96. धार्मिक कार्य सेवा
    97. कॅटरिंग
    98. ग्राफिक डिझाईन
    99. घरगुती ट्युशन
    100. मोबाईल रिपेअरिंग इत्यादी शेकडो व्यवसाय आहेत.

    कोणतीही सुरुवात छोटीच असते. महाकाय वडाच्या झाडाची बी राईएवढीच असते. आज चहा विकणारा उद्या स्टार हॉटेलचा मालक असेल, न घाबरता छोटी सुरुवात करा व व्यावसायिक व्हा. एमए, बीएड करून बिनपगारी काम करून संस्थाचालकांची धुणी धुण्यापेक्षा व बीई करून पुण्या-मुंबईत १० हजाराच्या पगाराची भीक मागण्यापेक्षा स्वाभिमानाने स्वतःचा व्यवसाय सुरु करा.

  • भारतीयांसाठी 5 भन्नाट स्मॉल बिझनेस आयडिया, चौथा बिझनेस सर्वात भारी

    भारतीयांसाठी 5 भन्नाट स्मॉल बिझनेस आयडिया, चौथा बिझनेस सर्वात भारी

    उद्योजक बनण्याचं स्वप्न बाळगणारे अनेकजण संघर्ष करताना दिसतात. पण आपल्याकडे घरबसल्या करता येतील अशा अनेक आयडिया आहेत, ज्यातून आपण प्रचंड नफा मिळवू शकतो.

    आम्ही आज कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवून देणारी ५ लहान बिझनेस आयडिया सांगणार आहोत. त्या कोणत्या आयडिया आहेत, जाणून घेऊयात…

    १. सुक्या मेव्याचा व्यवसाय

    सुका मेवा म्हणजेच ड्राय फ्रूट्स शरीरासाठी फायदेशीर असतो. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या घरात सुका मेवा ठेवतो म्हणजे ठेवतोच. सुका मेवा हा लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतो. सुक्या मेव्याच्या आरोग्यासाठी वाढत्या फायद्यांमुळे भारतात सुक्या फळांची विक्री घाऊक, घरगुती, किरकोळ आणि ऑनलाइन मार्केटच्या स्वरूपात होत आहे.

    भारतीय मिठायांमध्ये सुका मेवा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत विशेषतः सणांच्या काळात मिठाईत भेसळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत भेसळयुक्त मिठाई घेण्यापेक्षा सुका मेवा घेण्यास लोक पसंती दर्शवतात. त्यामुळे सुक्या मेव्याची विक्रीही दिवसेंदिवस वाढत आहे.

    अशात हा स्टार्टअप सुरू करून कोणीही पैसे कमवू शकतो. आजकाल सणासुदीला, लग्नसमारंभात सुका मेवाही भेट म्हणून दिला जातो. तुमच्याकडे जागेची उपलब्धता, तुमची भांडवल क्षमता आणि व्यवसायाचे स्वरूप याप्रमाणे तुम्ही तुमचा ड्रायफ्रूट व्यवसाय खालीलप्रमाणे सुरु करू शकता:

    • घरगुती विक्री
    • ऑनलाइन विक्री
    • किरकोळ विक्री

    सामान्यतः डेअरी, बेकिंग उद्योग, मिठाई, सण आणि शुभ समारंभाच्या प्रसंगी पॅकेज केलेल्या भेटवस्तू म्हणून सुकामेवा मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. अंदाजे 15,000 ते 25,000 रुपयांच्या कमी गुंतवणुकीत सुक्या मेव्यांची विक्री घरबसल्या करता येते. या सुकामेव्याच्या विक्रीतून दरमहा 20000 ते 30000 रुपयांइतका नफा मिळू शकतो.

    तुमच्या सुक्या मेव्यासाठी मिठाईची दुकाने, बेकिंगची दुकाने, केटरिंग सेवा, डेअरी आणि मिठाई, ऑनलाइन किराणा दुकाने आणि कॉस्मेटिक उद्योग, ही लक्ष्यित ग्राहकांची काही उदाहरणे आहेत.

    २. स्टेशनरी शॉप

    आपण सर्वजण जाणता की, आजकाल लोकांमध्ये शिक्षणाबाबत बरीच जागृती झाली आहे. तसेच, आता बहुतांश मुले-मुली शिक्षण घेण्यासाठी शाळा-कॉलेजमध्ये जात आहेत. तुम्ही या संधीचा फायदा घेऊन तुमच्या परिसरात अगदी कमी गुंतवणुकीत स्टेशनरीचे दुकान सुरू करू शकता आणि हे स्टेशनरी स्टोअर कुठेही सहज चालू शकते. जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत पैसे कमवायचे असतील, तर तुम्ही स्टेशनरीचे दुकान सुरू करू शकता.

    आजकाल शाळा, महाविद्यालये किंवा कोचिंग सेंटर्स सगळीकडेच पाहायला मिळतात. अशा वेळी मोठी मागणी असलेले स्टेशनरीचे दुकान आपण सुरू करू शकतो. आजच्या काळात, शाळा किंवा कार्यालयीन स्टेशनरीला जास्त मागणी आहे. विशेष म्हणजे, काही बाजारपेठा अशा आहेत, ज्या कधीही बंद होणार नाहीत. त्यात स्टेशनरीचाही समावेश आहे.

    लॅपटॉप, टॅबलेट आणि मोबाईलच्या जमान्यातही शाळा, कॉलेज आणि ऑफिसमध्ये पेपर आणि पेनचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. रेझ्युमे आणि ग्रीटिंग कार्ड्स आजही जुन्या पद्धतीच्या पद्धतीने कागदावर छापण्यास प्राधान्य दिले जाते. तसेच, फक्त नोटबुक, कागदपत्रे, पेन याशिवाय स्टेशनरीमध्ये बरेच काही आहे.

    जर तुम्ही कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असाल, तर स्टेशनरीचे दुकान सुरू करणे तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरू शकते. स्टेशनरीचे दुकान कसे सुरू करावे याबद्दल काही सूचना देत आहोत.

    स्टेशनरी शॉप सुरू करताना विक्री करायच्या असलेल्या गोष्टींची यादी करा.

    • डिंक, कात्री, टेप, स्टेपलर आणि गिफ्ट रॅपर यांसारखी स्टेशनरी ठेवा.
    • व्हाईटबोर्ड, खोडरबर, क्रेयॉन, पेन, पेन्सिल, शार्पनर, कंपास बॉक्स, पेंट्स, नोटबुक, ग्लोब्सपासून सुरू होणारे शालेय साहित्य.
    • ऑफिस स्टेशनरी सामान जसे की, कार्यालयीन कामासाठी लागणारे व्हाईट पेपर्स, हायलायटर पेन, फोल्डर्स, लिफाफे, ऑर्गनायझर्स, स्टेपलर, मार्कर, फाइल्स, नोटपॅड्स, व्हाईटनर, रबर स्टॅम्प आणि कव्हर.
    • सर्व प्रकारचे चारकोल, वॉटर पेंट्स, स्टेन्सिल इत्यादी.
    • शाईचा बॉक्स, संगणक सॉफ्टवेअर आणि प्रिंटर, हेडफोन, टोनर.
    • रिबन, ग्लिटर, बटणे, मणी, आणि लोकर यांसारखा हस्तकला पुरवठा.
    • पार्टी साहित्य जसे की, रंगीत कागदाचे छोटे तुकडे, फुगे, मुकुट, मुखवटे, स्ट्रीमर आणि मेणबत्त्या.

    तुम्हाला कोणत्या वस्तू विकायच्या आहेत याची कल्पना आल्यावर, एक पोर्टफोलिओ तयार करा आणि तुमच्या स्थानिक भागात जाहिरात करा. हे तुमच्या संभाव्य ग्राहकांना प्रत्यक्ष भेट देण्यापूर्वी स्टोअरमध्ये काय आहे याची कल्पना देण्यात मदत करते.

    ठिकाण- भारतातील इतर लहान व्यवसाय कल्पनांप्रमाणे, तुम्ही दुकान सुरू करण्यापूर्वी तुम्हाला बाजाराचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचे स्टेशनरी स्टोअर मॉलमध्ये किंवा एखाद्या शाळा-कॉलेजच्या किंवा सरकारी कार्यालयाच्या परिसरात उघडू शकता. ज्यामुळे तुमची विक्री होण्याची शक्यता वाढते. स्टेशनरीचे दुकान हे प्रवेशयोग्य असावे, अर्ध-निवासी भागात स्थित आणि तुमचे संभाव्य ग्राहक असण्याची शक्यता असलेल्या लोकांसाठी दिसेल अशा ठिकाणी असावे.

    इतर कोणत्याही लहान स्टोअर किंवा दुकानाप्रमाणे, तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी निधीची आवश्यकता असते. तुमच्या बजेटमध्ये स्टोअरच्या जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार, वीजबिल, वाहतूक, पुरवठा, साठा आणि विविध खर्चांचा समावेश करणे आवश्यक आहे.

    आजच्या पिढीमध्ये, बहुतेक लोक ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देतात. त्यामुळे तुमची माहिती सांगण्यासाठी तुमचे ऑनलाइन स्टेशनरी स्टोअर तयार करा. जसे की, तुमच्या वस्तूंच्या किंमती, मिशन, उद्दिष्टे, तुमचे स्थान, तुमच्या स्टोअरबद्दल, तुम्ही विकू इच्छित असलेल्या वस्तू, मालकी आणि बरेच काही. इतर कोणत्याही छोट्या दुकानाप्रमाणे तुमच्या दुकानाची नोंदणी करा. एकतर एकमेव मालकी, भागीदारी किंवा LLC. आवश्यक स्टेशनरी स्टोअर परवाने आणि व्यापार नोंदणी जसे की, दुकान आणि आस्थापना कायदा परवाना मिळवा. GST सारख्या करांसाठी नोंदणी करा, PAN आणि TAN साठी अर्ज करा.

    या स्टेशनरी व्यवसायातून तुम्ही महिन्याकाठी ४०००० ते ५०००० रुपयांपर्यंतचा नफा कमवू शकता.

    ३. सॅनिटरी पॅड (नॅपकिन) बनवण्याचा व्यवसाय

    महिला त्यांच्या मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी पॅड वापरतात. भारतीय बाजारपेठेत महिलांच्या स्वच्छतेशी संबंधित अनेक प्रकारचे सॅनिटरी पॅड आणि उत्पादने उपलब्ध आहेत. त्यामुळे जर तुम्ही सॅनिटरी पॅड बनवायला सुरुवात केलीत, तर तुम्हाला कमी वेळात भरपूर नफा मिळू शकतो. ज्यांना कमी गुंतवणुकीत लघु-व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी ही भारतातील सर्वोत्तम लघु व्यवसाय कल्पनांपैकी एक आहे.

    सॅनिटरी पॅड बनवणे सुरू करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही सॅनिटरी पॅड बनवण्याचे प्रशिक्षण घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला या प्रकल्पासाठी योग्य स्ट्रॅटेजी बनवावी लागेल आणि बाजारात सॅनिटरी पॅड नॅपकिन्सची किती मागणी आहे हे समजून घ्या. त्यानंतर, तुम्ही सर्व कच्चा माल आणि आवश्यक मशीन्सची यादी तयार करा आणि तुमचे बजेट सेट करा.

    तुम्ही निधी उभारण्याचा विचार करत असाल, तर प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि स्टार्टअप इंडिया, स्टँड-अप इंडिया, PMEGP अशा कर्ज योजना आहेत, जिथे तुम्ही संपर्क साधू शकता. तसेच, तुमच्या स्टार्टअपसाठी कर्ज मिळवू शकता. या कर्ज योजना तुम्हाला राष्ट्रीयीकृत बँकांकडून अनुदानासह 10 लाख ते 1 कोटींपर्यंत कर्ज घेण्याची परवानगी देतात.

    ४. टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय

    उद्योजक बनायचं ठरवलेल्या तरुणांनो, तुम्ही भारतात कमी गुंतवणुकीसह लघु- प्रकल्प सुरू करण्याचा शोध घेत असाल, तर प्रचंड मागणी असणारा अजून एक व्यवसाय आहे. आजच्या काळात तरुणांना/तरुणींना नवनवीन डिझाइन्स आणि रंगीबेरंगी प्रिंटेड टी-शर्ट्स घालायला आवडतात. तुम्हाला छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही कमी गुंतवणुकीत टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय सुरू करू शकता आणि पैसे कमवू शकता.

    टी-शर्ट प्रिंटिंग हा एक लोकप्रिय व्यवसाय बनला आहे. विशेषत: सुरू करण्यासाठी तुलनेने कमी गुंतवणूकीचा व्यवसाय शोधू पाहणाऱ्या उद्योजकांसाठी. तुम्ही प्रिंटेड टी-शर्ट ऑनलाइन विकल्यास सुरुवातीला तुम्हाला कोणत्याही परवान्याची गरज लागत नाही. किंवा तुम्ही साधं शॉप ऍक्ट काढूनसुद्धा सुरुवात करू शकता.

    टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय सुरू कसा कराल?

    • दर्जेदार सामग्रीसाठी विश्वसनीय उत्पादक किंवा पुरवठादाराशी टाय-अप करा
    • लक्ष आकर्षित करण्यासाठी एक निश (Niche) प्रकार निवडा
    • तुमचे टी-शर्ट मॉकअप करा
    • तुमच्या डिझाईन्स तयार करा

    टी-शर्ट प्रिंटिंग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे

    • स्क्रीन प्रिंटिंग
    • उष्णता हस्तांतरण (Heat transfer)
    • डायरेक्ट-टू-गारमेंट (DTG) इत्यादी

    5. टिफिन सर्व्हिस व्यवसाय

    अनेकजण कामासाठी, शिक्षणासाठी आपल्या कुटुंबापासून दूर दुसऱ्या शहरात राहायला जातात. अशावेळी त्यांच्या जेवणाची समस्या उद्भवते. दररोज बाहेरचे अन्न खाल्ल्याने तब्येतही चांगली राहत नाही. अशा परिस्थितीत आजच्या काळात टिफिन सेवेचा व्यवसाय खूप विकसित होत आहे. जर तुम्ही एक महिला असाल किंवा तुम्हाला घरी कमी गुंतवणुकीचा कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल, तर अशा परिस्थितीत टिफिन सेवा व्यवसाय तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो.

    हा व्यवसाय अनेक प्रकारचा असू शकतो, जसे की टिफिन देण्यासाठी लोकांच्या घरी जाणे, ग्राहकांना तुमच्या ठिकाणी बोलावणे आणि त्यांना घरासारखे जेवण देणे.

    हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जवळपास २० ते ३० हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तसेच, तुम्ही जर दररोज ५० लोकांना दोन वेळचे जेवण देत असाल, तर तुमचा खर्च वगळून तुम्ही महिन्याला ७० हजार ते ८० रुपयांची कमाई करू शकता.

    अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या वेगवेगळे व्यवसाय करू शकता.

    आणखी वाचा

  • इलॉन मस्कच्या ‘या’ 5 टिप्स ठरतील तुमच्याच फायद्याच्या, शेवटचा सल्ला सर्वात महत्त्वाचा

    इलॉन मस्कच्या ‘या’ 5 टिप्स ठरतील तुमच्याच फायद्याच्या, शेवटचा सल्ला सर्वात महत्त्वाचा

    मस्क हा PayPal, Tesla Motors, आणि SpaceX यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा संस्थापक आहे. मस्क त्याच्या नाविण्यपूर्ण विचारासाठी आणि जोखीम पत्करण्याच्या स्वभावासाठी ओळखला जातो. ज्या व्यक्तीच्या घरी श्रीमंती नांदते अशा मस्कला अनेकदा व्यवसाय चालवण्याबाबत सल्ला विचारला जातो. तेव्हा या लेखातून आपण त्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी सांगितलेल्या ५ महत्त्वाच्या टिप्स कोणत्या आहेत, हे पाहूयात…

    इलॉन मस्कने व्यवसाय सुरू करण्यासाठी सांगितलेल्या ५ टिप्स (Elon Musk’s 5 Best Tips for Running a Business)

    १. तुमच्या कामाप्रती कायम उत्साही राहा

    धनाढ्य इलॉन मस्क (Elon Musk) याच्या मते यशस्वी होण्यासाठी तुम्ही जे काही करत आहात, त्याच्याबद्दल कायम उत्साही असलं पाहिजे. तो म्हणतो, “लोकांनी तेच केलं पाहिजे, ज्याची त्यांना आवड आहे. यामुळे त्यांना इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त आनंद मिळेल.”

    worlds-richest-person-elon-musks-5-best-tips-for-running-a-business

    २. जोखीम पत्करा

    इलॉन मस्क असेही सांगतो की, तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल आणि तुमच्या बँक अकाऊंटमध्ये भर घालायची असेल, तर तुम्ही जोखीम पत्करण्यासाठी तयार असला पाहिजेत. २०१२ सालच्या एका मुलाखतीत मस्क म्हणाला होता की, “प्रत्येकजण एकाच साच्यात बसण्याचा प्रयत्न करत आहे. कारण, जोखीम घेण्याविरूद्ध एक प्रचंड पूर्वाग्रह आहे.” मस्कचा असाही विश्वास आहे की, कोणतीच जोखीम न घेणे, ही सर्वात मोठी जोखीम आहे. विशेषत: अशा जगात जे सातत्याने बदलत आहे. अपयशी ठरण्याची हमी एकमेव स्ट्रॅटेजी देते, ती म्हणजे जोखीम न घेणे.

    worlds-richest-person-elon-musks-5-best-tips-for-running-a-business

    ३. कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा

    इलॉन मस्क हा त्याच्या कामाच्या नैतिकतेसाठी ओळखला जातो. मस्क म्हणतो की, “चिकाटी ही खूप महत्वाची आहे. जोपर्यंत तुम्हाला हार मानायला भाग पाडले जात नाही, तोपर्यंत तुम्ही हार मानू नका.” मस्कचा विश्वास आहे की, यशस्वी होण्यासाठी लोकांना ‘जीवतोड काम’ करावे लागेल. इतरांपेक्षा जास्त मेहनत केल्याने तुमच्या यशाची शक्यता वाढेल.

    worlds-richest-person-elon-musks-5-best-tips-for-running-a-business

    मस्क असेही म्हणतो की, “एकसारख्या कामासाठी जर इतर लोक आठवड्याचे ४० तास कामात घालवत असतील आणि त्याच वेळी तुम्ही आठवड्याचे १०० तास काम करत असाल, तर तुम्हाला माहिती आहे की, त्यांना जी गोष्ट साध्य करण्यासाठी जिथे वर्ष लागतं, ते तुम्ही अवघ्या ४ महिन्यात कराल.” त्यामुळे तुम्ही कठोर परिश्रमासाठी तयार असले पाहिजे. तसेच, तुमचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागेल.

    ४. कायम चिकाटी ठेवा

    इलॉन मस्क आज जगातील दुसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. इथपर्यंत पोहोचण्याच्या त्याचा मार्ग सोपा नव्हता. त्याच्याकडेही अपयशाचा मोठा वाटा होता, पण त्याने चिकाटी दाखवली आणि हार मानली नाही. मस्कने स्थापन केलेल्या Zip2 आणि PayPal या दोन्ही कंपन्यांमधून बाहेर पडल्यानंतर २००८च्या मंदीच्या लाटेत त्याची Tesla आणि SpaceX या दोन्ही कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होत्या. त्यामुळे अनेकांना वाटले की, आता मस्क पुन्हा एकदा अपयशाच्या खाईत लोटला जाईल. पण मस्कने त्याच्या आधीच्या चुकांमधून धडा घेतला आणि आज तो जगातली श्रीमंत व्यक्तींच्या मांडीला मांडी लावून बसला आहे. अशाप्रकारे कोणीही स्वतःचे आर्थिक टप्पे गाठण्यासाठी आणि प्रेरणा शोधण्यासाठी त्याच्या अनुभवातून शिकू शकतो.

    worlds-richest-person-elon-musks-5-best-tips-for-running-a-business

    ५. स्वतःमध्ये गुंतवणूक करत राहा

    इलॉन मस्क याचा एकच सर्वोत्तम सल्ला कोणता असेल, तर तो हा की, “तुम्ही गोष्टी चांगल्या प्रकारे कशा करता येतील याचा सतत विचार करा आणि स्वतःला प्रश्न विचारा.” वयाच्या अवघ्या ८ वर्षापर्यंत मस्क हा दिवसाला तब्बल १० तास वाचन करत होता. त्याची पुस्तक वाचण्याची आवड इतकी प्रचंड होती की, लायब्ररीत वाचण्यासाठी त्याच्याकडील पुस्तके संपली म्हणून त्याने संपूर्ण एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका वाचण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या वयात, मस्क सातत्याने काहीतरी शिकण्यावर आणि स्वत:मध्ये गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित करायचा. त्याने स्वतःला प्रोग्राम करायला शिकवले आणि वयाच्या १२ व्या वर्षी त्याने 500 डॉलर्समध्ये व्हिडिओ गेम लिहिली आणि विकली देखील. पुढे मस्कने पेनिल्व्हेनिया विद्यापीठातून भौतिकशास्त्र आणि अर्थशास्त्रात दुहेरी पदवी घेतली. मस्कने सतत स्वत:मध्ये आणि त्याच्या स्वप्नांमध्ये गुंतवणूक केली. आज पाहा मस्कने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

    worlds-richest-person-elon-musks-5-best-tips-for-running-a-business

    मस्क हा आपल्या काळातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक आहे. मस्कने अनेक व्यवसाय शून्यातून उभे केले आहेत. तसेच, आपली राहण्याची आणि काम करण्याची पद्धत बदलण्यात मदत केली आहे. मस्कचा सल्ला कोणत्याही व्यवसायात लागू केला जाऊ शकतो.

    तुम्ही जर मस्कच्या या टिप्सचे पालन केले, तर तुम्हालाही यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

    आणखी वाचा

  • एकदम फिट झिरोधाच्या मालकाला ह्रदयविकाराचा झटका, काय आहेत यापासून स्वतःला वाचवण्याचे उपाय? डॉक्टर म्हणतात.

    एकदम फिट झिरोधाच्या मालकाला ह्रदयविकाराचा झटका, काय आहेत यापासून स्वतःला वाचवण्याचे उपाय? डॉक्टर म्हणतात.

    अश्नीर ग्रोव्हरचा सल्ला

    शार्क टँकचा माजी परीक्षक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) याने नितीन कामथ (Nithin Kamath) यांना आपल्या तब्येतीची काळजी आणि ब्रेक घेण्यास सांगितले आहे. त्याने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत म्हटले की, “यार, काळजी घे. असे होऊ शकते की, तुझ्यावर तुझ्या वडिलांच्या निधनाचा मोठा परिणाम झाला आहे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्यावरही खूप परिणाम झाला होता. एक दिवस मी पडलो होतो. एक ब्रेक घेऊन टाक.”

    डॉक्टर काय सांगतात?

    डॉक्टर मनन वोरा यांनी त्यांच्या लिंक्डइन अकाऊंटवरून नितीन यांच्या स्ट्रोकविषयी भाष्य केले. ते म्हणतात की, एक डॉक्टर म्हणून हे संकेत देते की, १८ ते ५५ वयातील व्यक्तींमध्ये ही प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. तसेच, त्यांनी हा स्ट्रोक येण्यामागील शक्यताही सांगितल्या आहेत. जेणेकरून तुम्ही त्याची काळजी घेऊ शकता.

    १. तीव्र ताण

    भारतात अति-तणावाचे वातावरण असणे हे सामान्य आहे, परंतु कॉर्टिसॉलसारखे भारदस्त तणाव संप्रेरक रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकतात. तसेच, जळजळ होण्यास हातभार लावू शकतात, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.

    २. झोपेची कमतरता

    सतत झोप न लागल्यामुळे सामान्य हार्मोनल संतुलन बिघडू शकते. तसेच, रक्तदाबही वाढू शकतो, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य आणि स्ट्रोकचा धोका संभवतो.

    ३. भावनिक आघात

    नितीन यांनी अलीकडेच त्यांचे वडील गमावले होते, ज्यामुळे कदाचित ते कामावर परत जाण्यापूर्वी या गोष्टीतून सावरले नसतील. अचानक भावनिक धक्का किंवा तणाव देखील हृदयविकाराच्या झटक्यास कारणीभूत ठरू शकतो.

    ४. अतिविचार

    व्यायाम करणे सामान्यतः फायदेशीर असले, तरीही जास्त व्यायाम करणे आणि स्वतःवर मर्यादेपेक्षा जास्त जोर देणे, यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर ताण येऊ शकतो. यामुळेच स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

    ५. पाण्याची कमतरता (Dehydration)

    पाण्याच्या कमतरतेमुळे तुमचे रक्त घट्ट होते आणि तुमच्या रक्तवाहिन्या संकुचित होतात, ज्यामुळे तुमच्या हृदयावर कालांतराने ताण येऊ शकतो.

    डॉक्टर वोरा पुढे सांगतात की, नितीन यांच्यासोबत जे घडलं, ते कुणासोबतही घडू शकतं, परंतु लक्षणं लक्षात घेऊन आणि लगेच कृती करून तुम्ही तात्काळ बरे होऊ शकता. त्यामुळे तुम्ही स्ट्रोकची लक्षणे FAST या शब्दाद्वारे समजू शकता.

    F: Face dropping (झुकलेला चेहरा)
    A: Arm weakness (हाताला कमजोरी जाणवणे)
    S: Speech difficulty (बोलताना अडचण होणे)
    T: Time to call 102 (१०२ या क्रमांकावर कॉल करणे)

  • श्रीमंती ज्याच्या घरी नांदते, ते बर्नार्ड अरनॉल्ट आहेत तरी कोण? एलोन मस्क अन् बिल गेट्सलाही टाकलंय मागे

    श्रीमंती ज्याच्या घरी नांदते, ते बर्नार्ड अरनॉल्ट आहेत तरी कोण? एलोन मस्क अन् बिल गेट्सलाही टाकलंय मागे

    कोण आहेत बर्नार्ड अरनॉल्ट?

    सध्या फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही २२८ अब्ज डॉलर्स इतकी आहे. आज बर्नार्ड अरनॉल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या मांडीला मांडी लावून बसतात. एलोन मस्क (२०२ अब्ज डॉलर्स) आणि जेफ बेझोस (१९८ अब्ज डॉलर्स) हेदेखील बर्नार्ड यांच्या खाली असून अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. लक्झरी गुड्स क्षेत्रातील त्यांचे सम्राज्य जगभरात पसरलेले आहे. लुई व्हिटॉन, डिओर, फेंडी, टॅग ह्यूअर, बल्गरी आणि जिव्हान्ची सारख्या प्रसिद्ध लक्झरी ब्रँड त्यांच्या मालकीचे आहेत. ८० वर्षांच्या वयातही बर्नार्ड अविरत काम करत आहेत आणि नवीन उंची गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.

    केव्हा बनले होते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती?

    बर्नार्ड अरनॉल्ट यांनी यापूर्वी डिसेंबर २०१९, जानेवारी २०२०, मे २०२१ आणि जानेवारी २०२४ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान मिळवला होता.

    कधी केली होती कारकीर्दीची सुरुवात?

    इंजिनियरिंग पदवी घेतल्यानंतर बर्नार्ड यांनी वडिलांच्या बांधकाम व्यवसायात काम करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांची महत्त्वाकांक्षा त्यांना अधिक काहीतरी करण्यास प्रवृत्त करत होती. फॅशन क्षेत्राची त्यांना मोठी आवड होती. त्यात यशस्वी होण्याची त्यांना खात्री होती. १९७१ साली बर्नार्ड यांनी फॅशन क्षेत्रात पदार्पण केले. तसेच, स्वतःची कंपनी स्थापन केली. क्रिएटिव्हिटी आणि व्यवसायिक कौशल्य यांच्या मिश्रणामुळे बर्नार्ड यांची कंपनी झपाट्याने यशस्वी झाली. अनेक प्रसिद्ध फॅशन ब्रँड त्याच्या एलव्हीएमएच (LVMH) कंपनीच्या स्वामित्वाखाली आले आणि बर्नार्ड जगातील सर्वात शक्तिशाली फॅशन सम्राट बनले.

    टिफनी अँड कंपनीही केली खरेदी

    जानेवारी २०२१मध्ये बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या एलव्हीएमएच कंपनीने अमेरिकन ज्वेलरी कंपनी टिफनी अँड कंपनीही १५.८ अब्ज डॉलर्समध्ये खरेदी केली होती. ही कोणताही लक्झरी ब्रँड खरेदी करण्याची आतापर्यंतची सर्वात मोठी डील ठरली होती.

    द टर्मिनेटर नावाने झालेले प्रसिद्ध

    सन १९८५मध्ये फ्रान्सच्या सरकारने बर्नार्ड यांनी दिवाळखोरीत निघालेली टेक्सटाईल कंपनी बुसॉक खरेदी केली होती. त्यानंतर दोन वर्षांच्या आतच त्यांनी कंपनीतील ९ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले होते. त्यानंतर त्यांनी याच्या डिओर ब्रँड वगळून अधिकतर संपत्ती विकली. तेव्हापासून बर्नार्ड अरनॉल्ट यांना ‘द टर्मिनेटर’ म्हटले जाऊ लागले.

    आणखी वाचा

  • बिल गेट्स यांना चहा पाजून जगाचे लक्ष वेधणारा Dolly Chaiwala आहे तरी कोण? जगात रंगलीय चर्चा

    बिल गेट्स यांना चहा पाजून जगाचे लक्ष वेधणारा Dolly Chaiwala आहे तरी कोण? जगात रंगलीय चर्चा

    ‘डॉली चायवाला’ (Dolly Chaiwala) हा बहाद्दर त्याच्या चहा बनवण्याच्या अनोख्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या स्टॉलचे नाव ‘डॉली की टपरी’ (Dolly Ki Tapri) असे आहे. याच नावाने त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अनेक भारतीयांसोबतच परदेशी व्यक्तीही डॉली चायवालासोबत व्लॉग बनवताना दिसतात. मात्र, यावेळी त्याच्या चर्चेत येण्याचं कारण जरा वेगळं आहे.

    डॉली चायवाला याने कुठल्याही साध्या सुध्या नाही, तर चक्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामील असलेले अब्जपती आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांना चहा पाजला आहे. “वन चाय प्लीज” म्हणत बिल गेट्स ‘डॉली की टपरी’वर चहा पिण्यासाठी हजर झाले होते आणि डॉलीचा चहा पिऊन तेदेखील त्याचे दीवाने झाले. खुद्द बिल गेट्स यांनी हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्ही भारतात प्रत्येक ठिकाणी इनोव्हेशन पाहू शकता. अगदी साधा चहा बनवतानाही.”

    आता हा व्हिडिओ जगभरात आगीसारखा व्हायरल होत आहे. या व्हिडिओला ६ कोटींहून अधिक व्ह्यूज आणि ४५ लाखांहून अधिक लाईक्सही मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे, ११ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओवर कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

    कोण आहे डॉली चायवाला?

    माध्यमांतील वृत्तांनुसार, डॉली चायवाला नागपूरच्या सदर भागातील वीसीए स्टेडिअमजवळ ‘डॉली की टपरी’ नावाने चहाचा स्टॉल चालवतो. डॉली चायवाला सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे. नागपूरमध्ये लोक दूरहून या प्रसिद्ध चहावाल्याच्या स्टॉलवर चहा पिण्यासाठी हजेरी लावतात. डॉली चायवाल्याविषयी बोलायचं झालंं, तर त्याचा सोशल मीडियावर मोठा वावर आहे. तो आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलने चहा विकून सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. त्याचे इंस्टाग्रामवर १० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

    डॉली चायवाला एवढा प्रसिद्ध आहे तरी का?

    चहाच्या दुनियेत डॉली चायवाला हे नाव आता छोटे राहिले नाहीये. त्याच्या अनोख्या पेहरावासोबतच त्याच्या चहा देण्याच्या टेक्निकमुळे त्याची तुलना चक्क आयकॉनिक, दिग्गज हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपशी केली जाते. त्याच्या ट्रेंडी सेटअप आणि चहा बनवण्याच्या आकर्षक पद्धतीमुळे तो एक सेन्सेशन बनला आहे. स्टायलिश ग्लासेसमध्ये चहा देण्यापासून ते सिगारेट आणि टॉफी क्रिएटिव्ह पद्धतीने देण्यापर्यंत, डॉलीची टपरी नेहमीच चहाच्या शौकिनांनी गजबजलेली असते.

    लोकांच्या प्रतिक्रिया

    जेव्हा डॉली चायवाल्याचा बिल गेट्स यांच्यासोबतचा व्हिडिओ जसा व्हायरल झाला, तसा अनेक लोकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेनासा झाला. अनेकांनी व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या की, “मला वाटते की, हे एआय जनरेटेड आहे.” एकाने असेही म्हटले की, “हा डीपफेक आहे का?” दुसऱ्या एकाने कमेंट करत म्हटले की, “सर, तुमचे बिल ५६७८९० डॉलर्स इतके झाले.” आणखी एकाने कमेंट केली की, “डॉली चायवाला नाही, तर इंडियन जॅक स्पॅरो.”

    बिल गेट्स यांचा भारत दौरा

    खरं तर, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी २८ फेब्रुवारी रोजी हैदराबादमध्ये मायक्रोसॉफ्टच्या भारत विकास केंद्राचा दौरा केला होता. याच ठिकाणी हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ शूट करण्यासाठी डॉली चायवाल्याला बोलावण्यात आले होते. डॉलीचा भाऊ शैलेश याने माध्यमांशी बोलताना या गोष्टीचा खुलासा केला. शैलेशनुसार, डॉलीला कोलॅबरेशन व्हिडिओ शूट करण्यासाठी बिल गेट्स यांच्या ऑफिसकडून बोलावण्यात आले होते. शैलेशने हा संपूर्ण नागपूरसाठी गौरवाचा क्षण असल्याचे सांगितले.

  • तुझ्या स्वप्नांचा विसर पडू देऊ नकोस…’, बायकोच्या या शब्दांनी त्याला बनवले जगप्रसिद्ध सिने-दिग्दर्शक

    तुझ्या स्वप्नांचा विसर पडू देऊ नकोस…’, बायकोच्या या शब्दांनी त्याला बनवले जगप्रसिद्ध सिने-दिग्दर्शक

    नोकरी मध्ये बॉस आपली ठासत आहे हे कळत असून पण नोकरी टिकवण्यासाठी धडपड करणारा मध्यमवर्गीय माणूस पण रोज संघर्ष करीतच असतो. पण कधी कधी हा संघर्ष खुप लांबतो. इतका लांबतो की आता याला शेवटच नाही अस वाटायला लागत. खुप लोक अशावेळेस Give Up करतात. आणि आयुष्यभर ‘काश …’ च मधुन टोचणी देणार फिलिंग घेऊन जगतात. काही लोक मात्र याला अपवाद असतात. ते टिकून राहतात, लढतात आणि जिंकतात पण. अशीच एक हृदयस्पर्शी संघर्षाची कथा आहे आंग ली ची. इंग्रजी चित्रपट पाहणाऱ्या लोकांसाठी हे नाव अपरिचित नाही. Brokeback Mountain, नुकताच येउन गेलेला आणि गाजलेला life of pie असे अनेक चित्रपट आंग ली ने दिग्दर्शित केले आहेत. आज जगातल्या आघाडीच्या दिग्दर्शकांमध्ये त्याचा समावेश होतो. पण इथपर्यंत मजल मारण्यासाठी त्याने जो भावनिक, आर्थिक संघर्ष केला त्याची हि कुठलाही आव न आणणारी, melodramatic नसणारी पण हृदयस्पर्शी कहाणी त्याच्याच शब्दात :

    १९७८ मध्ये मी Illinois University मध्ये चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेण्याचा निर्णय पक्का केला. माझ्या वडिलांचा या माझ्या निर्णयाला तीव्र विरोध होता. त्यांनी माझ्या तोंडावर काही आकडेवारी फेकून मारली.: ‘दरवर्षी तुझ्यासारखे ५०००० लोक हे असल कुचकामी शिक्षण घेऊन कॉलेजच्या बाहेर पडतात आणि त्यांच्यासाठी नोकऱ्या किती असतात, तर फक्त २००. ‘तरी त्यांचा हा सल्ला ठोकरून मी अमेरिकेला जाणाऱ्या विमानात बसलो. पण त्यामुळे पिता – पुत्राच्या नात्याला कधीही न भरून येणारा तडा गेला. पुढच्या दोन दशकात आम्ही शंभरहून कमी वाक्य एकमेकांशी बोललो असू.

    पण जेव्हा मी माझ शिक्षण संपवून बाहेर पडलो तेव्हा माझ्या वडिलांनी व्यक्त केलेली भीती कीती खरी होती हे मला पदोपदी जाणवायला लागलं. एक चिनी वंशाचा माणूस hollywood मध्ये काहीतरी करून दाखवेल असे कुणालापण वाटत नव्हतं. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतरची पुढची सहा वर्ष ही कधीही संपणार नाही असे वाटणाऱ्या अनिश्चिततेने भरलेली होती. या सहा वर्षांमधला बहुतांश वेळ मी अनेक दिग्दर्शक व संकलक यांचा सहायक म्हणून छोटी मोठी किरकोळ काम करण्यात व्यतीत केला. सगळ्यात वेदनादायक भाग हा मी लिहिलेलं स्क्रिप्ट घेऊन निर्मात्यांचे उंबरठे झिजवणे हा होता. त्याकाळात मला साधारणतः ३० निर्मात्यांकडून नकार मिळाला.

    त्याच वर्षी मी ३० वर्षाचा झालो. एक जुनी चिनी म्हण आहे : तिशीत माणूस त्याच्या स्वतःच्या पायावर ठाम उभा असतो अशा अर्थाची. पण मी तर अजूनही धड स्वतःच्या प्राथमिक गरजा पूर्ण करू शकत नव्हतो. या अशा पडत्या काळात माझ्यासमोर फार कमी पर्याय शिल्लक होते. एक तर काही घडेपर्यंत वाट बघत बसायचं अथवा चित्रपट बनवण्याचं माझ स्वप्न सोडून द्याच.

    या अनिश्चिततेच्या अंधाराने भरलेल्या काळात मला माझ्या बायकोने पाठबळ दिल. तिने तिची पदवी जीवशास्त्र या विषयातून घेतली होती आणि ती एका प्रयोगशाळेत नोकरी करत होती. पण तिच्या नोकरीमधून मिळणारे उत्पन्न आम्हाला पुरेल एवढे नव्हते. त्याचकाळात आम्हाला एक पुत्ररत्न झाले आणि आमच्या जबाबदाऱ्या अजून वाढल्या. घरात मी पैसे आणू शकत नाही या अपराधी भावनेतून मी घरकामांची जबाबदारी घ्यायला सुरुवात केली. जेव्हा बायको कामावर जायची तेव्हा मी स्वयंपाक , साफसफाई आणि आमच्या मुलाच संगोपन अशी काम करत असे. फावल्या वेळात वाचन आणि संहिता लेखन चालूच होते. रात्रीच जेवण बनवून झाल की मी आमच्या मुलाला, घेऊन घरासमोरच्या पायऱ्यांवर बसून राही. मी माझ्या बायकोची आणि तो त्याच्या आईची वाट बघत.

    हे असलं आयुष्य कुठल्याही पुरुषासाठी मानहानीकारकच. माझ्या सासू सासऱ्यांना हे डाचत असावं. त्यांनी माझ्या बायकोला काही पैसे देऊ केले. त्यांच्या मते मी या भांडवलातून एखाद चायनीज हॉटेल सुरु करावं जेणेकरून माझं स्वतःच काही उत्पन्न सुरु होईल. माझ्या बायकोने हे पैसे घ्यायला इन्कार केला. जेव्हा मला याबद्दल कळल तेव्हा मी सुन्न झालो. अनेक रात्री जागून काढल्यावर शेवटी मी निर्णयाप्रत आलो : माझं चित्रपट बनवण्याचं स्वप्न हे पूर्ण होणार नाही. सत्याला सामोरे जाण्याची वेळ आली आहे

    जड अंत:करणाने मी जवळच्या एका कॉलेज मध्ये मी Computer Course ला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्यावर मी निराशेच्या गर्तेत बुडून गेलो. माझ्या बायकोला हा माझ्या स्वभावातला फरक जाणवला. कॉम्प्यूटर क्लासचं वेळापत्रक तिने माझ्या बॅगमध्ये पाहिलं. त्या रात्री ती काहीच बोलली नाही.

    दुसऱ्या दिवशी ती तिच्या कामाला जायला निघाली. मी सुन्नपणे बसून होतो. ती घराबाहेर पडली. पण अचानक तिच्या मनात काय आल कुणास ठाऊक. घराबाहेरच्या पायऱ्यांवर असताना ती पुन्हा वळली आणि एवढंच म्हणाली, “आंग , तुझ्या स्वप्नांचा विसर पडू देऊ नकोस.” तिच्या या एका वाक्याने जादूची कांडी फिरली. निराशेच्या गर्तेत गटांगळ्या खाणारं माझ स्वप्न पुन्हा जिवंत झालं. त्याचा पुनर्जन्म झाला.

    मी ते कॉम्प्यूटर क्लासचं वेळापत्रक बॅगमधून बाहेर काढलं. त्याचे हळूहळू बारीक बारीक तुकडे केले आणि कचऱ्याच्या डब्यात ते फेकून दिले.

    अर्थातच एका रात्रीत परिस्थिती बदलली नाही. पण काही दिवसांनी मला माझ्या स्क्रिप्ट साठी finance मिळाला. मी माझ्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. नंतर माझ्या कामाला काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार पण मिळाले. नंतर माझ्या बायकोने माझ्याशी बोलताना कबुली दिली,’ मला नेहमीच असा विश्वास होता की तुझा जन्म हा चित्रपट बनवण्यासाठीच झाला आहे. संगणक क्षेत्रात आधीच खूप लोक काम करत आहेत आणि त्यांना तुझी गरजपण नव्हती.”

    (http://whatshihsaid.com/2013/02/26/ang-lee-a-never-ending-dream/) मुळ लेख इथे आहे.

    Source : http://www.misalpav.com/node/27124

    आणखी वाचा

  • स्पर्धेत टिकायचं असेल, तर काय करावं लागेल?

    स्पर्धेत टिकायचं असेल, तर काय करावं लागेल?

    कामात परफेक्शन हवे

    नेहमी आपण स्वतःला सगळ्यांपेक्षा खूप स्मार्ट समजत असतो. आपले शिक्षण सगळ्यांपेक्षा जास्त आहे, असं मानत असतो. जोपर्यंत आपण एखाद्या कामात परफेक्शन आणत नाही तोपर्यंत आपण स्वतःला स्मार्ट समजू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक कामावेळी ओव्हर कॉन्फिडन्स ठेवणे आपल्या नोकरीस घातक असू शकते.

    tips-to-staying-competitive-in-the-market

    प्रामाणिकपणा

    नोकरीच्या ठिकाणी प्रमाणिकपणा असणे अत्यंत महत्त्वाचे असते. कामा संदर्भात नुसतीच आश्वासन नका देऊ, ती पूर्ण करा. कामाचे आश्वसन देऊन ते काम वेळच्या वेळी पूर्ण करून दाखवल्यास बॉसच्या आपल्याबद्दलची चांगली प्रतिमा निर्माण होते. नेहमी आपली बॉसच्या मनात चांगली प्रतिमा उमटवण्यासाठी प्रामाणिकपण गरजेचा असतो.

    tips-to-staying-competitive-in-the-market

    स्वतःला ठेवा अपडेट

    काही वेळा आपण ज्या ठिकाणी काम करतो त्याच ठिकाणी कायस्वरूपी राहण्याचा विचार करत असतो. जरी हा विचार स्वतःला योग्य वाटत असला तरी तो आपल्या करिअरच्या दृष्टीने नुकसानकारक आहे. कारण एकाच जागी काम करत राहिलो तर नवीन गोष्टी कधी शिकता येणार नाही. सध्याच्या जगात स्वतःला अपडेट ठेवणे खूप महत्त्वाचे ठरत आहे.

    tips-to-staying-competitive-in-the-market

    आत्मविश्वास

    आत्मविश्वास बाळगणे महत्त्वाचे ठरते. भले आपण कितीही पदव्या घेतल्या असो, कामाचा कितीही अनुभव असला आणि आपल्यात आत्मविश्वासच नसेल तर पदवीचा, अनुभवाचा काहीही उपयोग नाही. जे कोणते काम हाती घेणार आहोत ते काम पूर्ण करण्याचा आत्मविश्वासा आपल्यात असला पाहिजे. जर आत्मविश्वास नसेल तर, चांगले करिअर घडवता येणार नाही. न्युनंगड कधी बाळगू नये. स्वतःला कधी कोणत्या गोष्टीत कमी समजु नये.

    tips-to-staying-competitive-in-the-market

    आणखी वाचा