भारतीय फुटबॉलचा नायक : सुनील छेत्री Real Life Story of Football Legend Sunil Chhetri

फूटबॉलच मैदान,तायवान विरुद्ध सामना भारताने ५-० ने जिंकलाय, मात्र जिंकायचा आनंद कमी आणि राग जास्त आहे. हा राग याचा की, आम्ही देशासाठी खेळतोय आणि कोणी बघायला का येत नाही? याच रागात एक ट्विट होतं आणि ते ट्विट एवढं वायरल होतं की ते २०१८सालचं गोल्डन ट्विट ठरतं. यानंतर, जेव्हा भारताचा केनिया सोबत सामना होतो, तेव्हा मैदान […]
अंध असूनही वयाच्या २३व्या वर्षी उभी केली ५०० कोटींची कंपनी

तुम्ही राजकुमार राव अभिनित “श्रीकांत” हा चित्रपट पाहिलाय का? जर आतापर्यंत पाहिला नसेल, तर आमच्या मते एकदा नक्की बघावा. तुम्ही विचार करत असाल की, आम्ही अचानक चित्रपटाबद्दल का बोलायला लागलो? चित्रपटाचं प्रमोशन करतोय का? नाही, मग आम्ही राजकुमार राव यांचे चाहते आहोत का? तर नाही. हा चित्रपट तुम्ही या कारणासाठी बघितला पाहिजे की ही कथा […]
भारताचा इलोन मस्क: भाविश अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास | Bhavish Aggarwal: The Inspiring Story of Ola Founder

तुम्ही प्रवासासाठी गाडी शोधत असता, पण गाड्यांची उपलब्धता कमी असते आणि तुम्हाला घाई सुद्धा असते,अशा वेळेला तुम्ही काय करता? तर तेव्हा तुम्ही मोबाईलवर ओला किंवा उबर सारख्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांच्या ऍप्सचा उपयोग करून सहज गाडी बुक करता. पण तुम्ही कधी विचार केलाय का की हे एवढं आरामदायी समाधान कुणाच्या कल्पकतेमुळे शक्य झालं? आज आपण त्याच व्यक्तीचा […]
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती:

सलग 17 वेळा अपयश 18 व्या वेळा यश! शेअरचॅट चे सीईओ अंकुश सचदेव यांची यशोगाथा… लेहरो से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती. हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील या ओळी मनाला प्रेरणा देणाऱ्या आहेत. जीवनात यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करणं किती महत्वाचं आहे हे या ओळींमधून स्पष्ट होतं. अंकुश सचदेवा […]
अंतः अस्ति प्रारंभः

“अंतः अस्ति प्रारंभः” हा एक महत्वाचा आणि तात्त्विक विचार आहे जो आपल्याला जीवनातील विविध घटनांचा आणि स्थितींचा, वर्तमान परिस्थितीचा विचार करायला लावतो. या विचाराचा अर्थ असा आहे की, जिथे एक गोष्ट संपली आहे असे आपल्याला वाटते, तिथूनच दुसऱ्या गोष्टीची नवीन सुरुवात होते. जीवनात होणारा प्रत्येक अंत काहीतरी नवीन बदलाची सुरुवात घडवतो. संभाव्य परिवर्तनाची चाहूल देतो.
रुबाबदार आयुष्य जगा : आरोग्यसंपन्न जगा

रोगांचा अभाव म्हणजे आरोग्य का? नक्कीच नाही, सर्वांगीण दृष्ट्या जगण्याचा राखलेला समतोल हे खरं निरोगी आरोग्य… काल झोपताना त्याने उद्याच्या दिवसात करावयाच्या सर्व कामांची यादी केली, ती त्याची नेहमीची सवयच होती. पण नेहमीप्रमाणे व्यायामासाठी वेगळा वेळ काढायचं त्याच्याकडून राहूनच गेलं. खरंच आपण आपल्या आरोग्याला किती साधारण स्थान दिलंय नाही का? खरंच आपल्या आयुष्यात आरोग्याचं महत्व […]
यशस्वी जीवनाचा मूलमंत्र; चिकाटी आणि सातत्य

Practice makes a man perfect, सरावाने माणूस परिपूर्ण बनतो. वरील सुविचाराप्रमाणे कोणत्याही कामात किंवा गोष्टीत परिपूर्णता मिळविण्यासाठी सातत्य आणि सराव या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रारंभिक गोष्टी आहेत. सातत्यपूर्ण प्रयत्नांशिवाय जीवनात कोणतीही गोष्ट साध्य करता येऊ शकत नाही. एखाद्या कामाला सुरुवात केल्यावर आपण लगेच त्यात Mastery मिळवतो असे नाही. त्यासाठी कष्टाचा यज्ञ पेटवावा लागतो. प्रयत्नांची पराकाष्ठा […]
ऑलिम्पिक गाजवणारा बीडचा शिलेदार : अविनाश साबळे

सध्या भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये पॅरिस ऑलिंपिकची जोरदार चर्चा आहे. गाव खेड्यातल्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत यावर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला किती पदके मिळणार याचे अंदाज बांधले जात आहेत आणि याच ऑलिंपिकमध्ये 3000 मीटर Steeplechase च्या फायनलपर्यंत पोहचलेला पहिला भारतीय खेळाडू अविनाश साबळे या ध्येयवेड्या महाराष्ट्रपुत्राची संघर्षकथा आज आपण पाहणार आहोत. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा गावातील एका साधारण शेतकरी […]
पुरेशी झोप घे रे पाखरा!

शीर्षक वाचून थोडा धक्का लागल्यासारखं वाटू शकतं कारण लहानपणापासून आपल्याला शिकवलं गेलंय की, स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपेचा त्याग करावा लागतो, ध्येयवेड्या व्यक्ती कधीच जास्त झोप घेत नाहीत आणि त्या नेहमी तत्पर असतात. पण वास्तविकता अशी आहे की पुरेशी झोप न घेणं आपल्या शरीरासाठी खूपच घातक ठरू शकतं. शरीराच्या योग्य कार्यासाठी आणि मानसिक संतुलनासाठी पुरेशी झोप […]
संख्येने कमी मात्र अब्जाधीशांमध्ये अव्वल; काय आहे पारशी समाजाची गोष्ट?

भारतातील व्यापारी समाज म्हटलं की हमखास आपल्यासमोर टाटा, गोदरेज, वाडिया अशी अनेक नावं समोर येतात. डोक्यावर टोपी आणि अंगात दिमाखदार सूट घातलेली पारशी लोकं पहिली की हा समाज जन्मजात श्रीमंत असल्याची खात्री पटते. आश्चर्याची बाब म्हणजे या समाजात लाखभर रुपये दर महिना कमावणाऱ्या माणसाला गरीब म्हटलं जातं. पारशी लोकं मुळातच व्यावहारिक ज्ञान अंगीकृत करून जन्म […]
हुशारात हुशार माणसाचं सुद्धा डोकं बधिर करणारा ‘ट्रॉली डिलेमा’

दररोजच्या बोलण्यात आपण एका शब्दाचा अगदी प्रकर्षाने उपयोग करत असतो, तो म्हणजे महत्व. “तुला माझी किंमत नाहीये!” असं वाक्य आपल्याकडून अगदी सहजपणे बोललं जातं; मात्र या वाक्यामागे अनेक भावना देखील गुंतलेल्या असतात आणि म्हणूनच मनाच्या हळव्या कोपऱ्यातून निघालेलं हे वाक्य खरोखर वजनदार ठरतं. मात्र कधी विचार केलात का ‘किंमत किंवा व्हॅल्यू’ म्हणजे काय? दुकानात गेल्यानंतर […]
तुझ्या स्वप्नांचा विसर पडू देऊ नकोस…’, बायकोच्या या शब्दांनी त्याला बनवले जगप्रसिद्ध सिने-दिग्दर्शक

Oscar Champion
स्पर्धेत टिकायचं असेल, तर काय करावं लागेल?

रोज क्षणा क्षणाला आपली स्पर्धा सुरू असते. कधी इतरांबरोबर तर कधी स्वतःशीच. पण, प्रत्येक वेळी आपण जिंकूच असे नाही. कधी कधी पराभवही होत असतो. खचून न जाता प्रत्येक क्षणाला सामोरे जाण्यात जास्त यश असते. ‘अपयश ही यशाची पहिली पायरी असते’ याप्रमाणे आपले करिअर सुरू असते. आपण यशाचीच अपेक्षा जास्त ठेवत असतो आणि कधी कधी एखाद्या […]
स्टीव्ह जॉब्सचे प्रचंड गाजलेले प्रेरणादायी भाषण मराठीत…!!

स्टीव्ह जॉब्सनी २००५ साली स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात केलेले भाषण प्रचंड गाजले. हे भाषण म्हणजे त्यांच्या प्रेरणादायी आयुष्याचा गोषवारा आहे… त्याचा केलेला मराठी अनुवाद… जगातल्या सर्वोत्तम गणल्या जाणाऱ्या महाविद्यालयांपैकी एक अशा महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात तुमच्यासोबत बोलायची संधी मला मिळते आहे, हा मी माझा बहुमान समजतो. मी महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण करू शकलो नाही. आता सत्य […]
सततची टीका आणि मानसिक त्रासाला वैतागलेल्या उद्योजकांसाठी…

गेल्या आठवड्यात प्रताप भेटला. पाठीवर Sack, हातात फोल्डर आणि गळ्यात टाय. चांगला रुबाबदार दिसत होता, पण चेहऱ्यावर हरवल्याचे भाव होते. मी अगदी समोर जाऊन उभा राहिलो तरी लक्ष नव्हतं. थोड बोलणं झाल्यावर लक्षात आले, की त्याने स्वतःचा कुरियरचा व्यवसाय बंद करून एका फायनान्स कंपनीत सल्लागार म्हणून नोकरी धरली आहे. खूप दु:खी वाटत होता. हताश झाला […]
‘ज्या शेतात आई शेतमजूर म्हणून काम करत होती, ती शेती मी विकत घेतली’ : उद्योजक अशोक खाडे

घरची प्रचंड गरिबी. बुद्धिमत्ता हेच भांडवल. पेड (ता. तासगाव, जि. सांगली) येथे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या युवकाने मोठ्या भावाच्या मदतीने मुंबईची वाट धरली. “जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट’ हे ब्रीद घेऊन व्यवसायात शिरलेले अशोक खाडे यांच्या “फॅमिली’चा विस्तार आज साडेचार हजार कर्मचारी आणि सुमारे साडेपाचशे कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या “दास ऑफशोअर’ […]
ज्या माणसाला कष्टाची सवय लागलेली असते, अशी माणसे कधीच अयशस्वी होत नाहीत.

यश हे प्रयत्नानेच मिळवावे लागते. गेलेली वेळ पुन्हा मिळवता येत नाही. साक्षर असलेल्या महाराष्ट्रातील लोकांजवळ आत्मविश्वासाचा अभाव आहे. फक्त थडग्यातील दफन केलेल्या व स्वर्गवासी झालेल्या माणसांनाच समस्या नसतात, बाकी प्रत्येकालाच समस्या असतात. आयुष्यात विविधता आणता येते ती यशस्वी माणसांनाच. यशामागे परिश्रम आहेत, प्रचंड असा आत्मविश्वास आहे. बिल गेट्सच्या बाबतीत त्याच्या शिक्षकांनी सांगितले होते की, हा […]
अडचणी, अडथळे सर्वांनाच येतात, पण ते पार करण्याची ताकद आपण स्वत:हून निर्माण केली पाहिजे.

प्रत्येकाच्या आयुष्यात एकवेळ तरी अशी येते, की तो प्रवासाला निघताना स्टॅंडवर किंवा स्टेशनवर पोचतो अन् एक किंवा दोन मिनिटांसाठी गाडी चुकते. चूक बसची किंवा ट्रेनची नसते. ती पकडण्यासाठी आपण एक-दोन मिनिटे उशिरा पोचतो. अशाच रीतीने एखादे वेळी आलेली संधीदेखील आपण गमावतो. दोष संधीचा नसतो. आपल्या नियोजनाचा, प्रयत्नांचा असतो. आयुष्य एखाद्या कादंबरीसारखं आहे. रोजचा एक दिवस […]
एका रात्रीत मिळणारे यश मिळवण्यासाठी किती वेळ लागतो?

एका रात्रीत पार्सल पोहोचवण्याची कल्पना प्रत्यक्षात यायला फेडेक्सच्या फ्रेड स्मिथला प्रत्यक्षात ११ वर्ष लागली. १९६२ साली फ्रेड स्मिथने त्याच्या अर्थशास्त्राच्या तासाला ‘रात्रीत पार्सल पाठवण्याची सेवा’ या विषयावर एक निबंध लिहिला होता. त्याची कल्पना ही होती की, त्याची कंपनी जगाच्या कोणत्याही भागामधून लहानातील लहान वस्तू जगाच्या कोणत्याही भागामध्ये पोहोचवेल. त्याच्या शिक्षकांनी ‘कल्पना नाविन्यपूर्ण आहे आणि चांगल्या […]
स्वतःच स्वतःचे नायक बना

एक उद्योजक म्हणून तुम्हाला मिळालेला आजवरचा सर्वात वाईट सल्ला कोणता होता? माझ्यासाठी तो होता, “स्वतः स्वतःचे बॉस बना. Be Your Own Boss.” मी हा विचार माझ्या विशीत ऐकला होता आणि त्यानंतर स्वतःचा ‘बॉस’ बनण्यात मी बरीच वर्षे घालवली. माझ्यासाठी तो अत्यंत वाईट काळ होता. मालक-कर्मचारी यांच्यातला संवाद मी स्वतःशीच करायचो. मी कुठे चुकतोय, कुठे कमी […]