Author: naviarthkranti

  • Jio AirFiber Plans: जियोच्या एअर फायबरची प्रतीक्षा अखेर संपली. मिळणार अनलिमिटेड डेटा आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्स

    Jio AirFiber Plans: जियोच्या एअर फायबरची प्रतीक्षा अखेर संपली. मिळणार अनलिमिटेड डेटा आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्स

    रिलायन्स जिओने नुकतीच गणेश चतुर्थीच्या दिवशी आपली नवीन ब्रॉडबँड सेवा ‘AirFiber’ लाँच केली आहे. या नवीन ब्रॉडबँड सेवेअंतर्गत Jio ने ग्राहकांसाठी अनेक आकर्षक योजना आणल्या आहेत. 500 हून अधिक चॅनेल्स, अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सला ऍक्सेस आणि अनलिमिटेड डेटा युसेज अशा अनेक आकर्षक सेवा ग्राहकांच्या खिशाला परवडतील अशा वेगवेगळ्या प्लॅन्समध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.    

    वायरलेस राउटर आणि वेगवेगळे प्लॅन्स

    Jio AirFiber हे Jio च्या ‘True 5G’ सर्व्हिसचे  Fixed Wireless Access (FWA) सोल्युशन आहे. हे मुळात प्लग-एन-प्ले 5G वायरलेस राउटर आहे. Reliance Jio ने Jio AirFiber साठी 6 टॅरिफ प्लॅन जाहीर केले आहेत. जे ग्राहकांना वेगवेगळे फायदे आणि सुविधा देतात. Jio AirFiber सध्या भारतातील अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि पुणे या 8 शहरांमध्ये सुरू आहे. येत्या काही दिवसात यात आणखी काही शहरे जोडली जाऊ शकतात.

    Jio AirFiber अंतर्गत येणाऱ्या सेवा

    Jio AirFiber ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी,
    550 पेक्षा जास्त टीव्ही चॅनेल, 
    4 पेक्षा जास्त ओटीटी ॲप्स आणि स्मार्ट होम सर्व्हिसेस.
     
    Jio AirFiber इन्स्टॉलेशन फी 1,000 रुपये आहे. पण वार्षिक प्लॅन घेणाऱ्यांसाठी 1 हजार रुपये फी माफ असेल. रिलायन्स जिओने जाहीर केल्याप्रमाणे 6 योजनांपैकी कोणत्याही प्लॅनसाठी युजर्स  6 महिने किंवा 12 महिन्यांची नोंदणी करू शकतात. ही ऑफर सर्व नवीन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. प्रत्येक प्लॅनमधील ऑफर आणि इंटरनेटचा स्पीड हा वेगवेगळा असणार आहे. Jio AirFiber योजना 1Gbps पर्यंत स्पीड देतात. युजर्स 30Mbps, 100Mbps, 150Mbps, 300Mbps, 500Mbps आणि 1Gbps प्लॅनमधून निवड करू शकतील.

    योजना 

    599 रुपयांची प्लान

    कालावधी           :   30 दिवस
    Speed              :   30 एमबीपीएस
    डेटा                   :   अनलिमिटेड 
    व्हॉईस कॉल       :   फ्री
    OTT                  :   14 OTT ॲप्स
    मागणीनुसार 550+ टीव्ही चॅनेल उपलब्ध  

    899 रुपयांचा प्लान

    कालावधी                  : 30 दिवस
    Speed                     : 100 Mbps
    डेटा                          : अनलिमिटेड 
    व्हॉईस कॉल              : फ्री
    OTT                         : 14 OTTॲप्स + Disney+ Hotstar, Sony Liv, JioCinema Premium
    मागणीनुसार 550+ टीव्ही चॅनेल उपलब्ध  

    1199 रुपयांचा प्लॅन

    कालावधी                   : 30 दिवस
    Speed                      : 100 Mbps
    डेटा                           : अनलिमिटेड
    व्हॉईस कॉल              : फ्री
    OTT                          : 14 OTT ॲप्स + Netflix, Amazon Prime, JioCinema Premium
    मागणीनुसार 550+ टीव्ही चॅनेल

    Jio AirFiber Max Rs. 1499 चा प्लान

    कालावधी                    :  30 दिवस
    Speed                       :  300 Mbps
    डेटा                            :  अनलिमिटेड
    व्हॉईस कॉल                :  फ्री
    OTT: 14 OTT ॲप्स + Netflix, Amazon Prime, JioCinema Premium
    मागणीनुसार 550+ टीव्ही चॅनेल

    Jio AirFiber Max Rs 2499 चा प्लान

    कालावधी                 :  30  दिवस
    Speed                    :   500 Mbps
    डेटा                         :   अनलिमिटेड
    व्हॉईस कॉल             : फ्री
    OTT: 14 OTT ॲप्स + Netflix, Amazon Prime, JioCinema Premium
    मागणीनुसार 550+ टीव्ही चॅनेल

    Jio AirFiber Max Rs 3999 चा प्लान

    कालावधी              :  30 दिवस
    Speed                 :  1 Gbps
    डेटा                      :  अनलिमिटेड
    व्हॉईस कॉल          : फ्री  
    OTT: 14 OTTॲप्स + Netflix, Amazon Prime, JioCinema Premium
    मागणीनुसार 550+ टीव्ही चॅनेल

  • Success Story: एका भांडणानं बनवली कोट्यावधींची संपत्ती, वाचा ‘ओला’ कॅब मालकाची प्रेरक कथा

    Success Story: एका भांडणानं बनवली कोट्यावधींची संपत्ती, वाचा ‘ओला’ कॅब मालकाची प्रेरक कथा

    कामानिमित्त प्रवास करायचा तर ऑटो किंवा टॅक्सीने फिरणं आलंच. त्यातच रिक्शा आणि टॅक्सीने प्रवास करायचा तर खासकरून रिक्शा टॅक्सी चालक आणि प्रवासी यांच्यातली भांडणं आपण दररोज ऐकत असतो किंवा वाचत असतो. कधी आपल्याही वाट्याला असे प्रसंग येतात. आपलंही त्यावेळेस डोकं फिरतं, मात्र काही काळ गेला की आपण शांत होतो आणि मग इतरांना त्याचा कसा त्रास होतोय हे वाचतो आणि सोडून देतो. मात्र एका व्यक्तीने त्याला आलेल्या वाईट अनुभवातून योग्य तो धडा घेतला आणि त्यापासून प्रेरणा घेत त्याने चक्क कोट्यावधी रुपयांचं साम्राज्य उभं केलं. ऐकून थोडं विचित्र वाटेल मात्र आयआयटी पदवीधर भावेश अग्रवाल यांचा हा अनुभव तुम्हालाही इंटरेस्टिंग वाटेल.


    अनेकदा टॅक्सीचालक आपल्याला मनमानी भाडं सांगतात. आपण नाईलाज म्हणून ते भाडं देण्यासाठी तयारही होतो. आयआयटी पदवीधर भावेश अग्रवाल आपल्या कामानिमित्त असाच एकदा प्रवास करत असताना टॅक्सीचालकाशी त्यांचं भांडण झालं. भांडणाचं  प्रमुख कारण म्हणजे तो टॅक्सीचालक त्यांच्याकडून जादा भाड्याची मागणी करत होता. 


    मात्र हे भांडण झाल्यावर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं नाही तर देशात लो बजेट फेअर कॅब सर्व्हीसची किती नितांत गरज आहे हे त्यांनी ओळखलं. घरी आल्यावर त्यांनी आपला प्लान कुटुंबाला सांगितला. मात्र ‘आयटीत भरघोस पगाराची नोकरी असताना हे काय मध्येच?’ अशी कुटुंबाची भूमिका होती. भावेश मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी आपली योजना पूर्णत्वास न्यायची असा चंग बांधला. त्यांना त्यांच्या या बिझनेस प्लानमध्ये त्यांचा मित्र अंकीत भाटी यांची साथ मिळाली आणि मग काय, या दोघांनी मिळून बंगळूरूत ‘ओला’ या टॅक्सी व्यवसायाची सुरूवात केली.


    त्यांनी कायम एक खूणगाठ मनाशी पक्की केली होती की काहीही झालं तरीही प्रवाशांना सर्वोच्च सेवा उपलब्ध करून द्यायची. लो फेअर कॅब सर्व्हिसची मुहूर्तमेढ तिथेच रोवली गेली आणि देशात प्रवाशांना आरामदायी आणि खिशाला परवडणारी अशी ‘ओला’ सेवा मिळाली. आज आपल्यापैकी प्रत्येकानं किमान एकदा तरी स्मार्टफोनवरून ही कॅब बुक करून त्याचा आनंद घेतला असेलच.

    किती आहे ओला कॅबचं नेटवर्थ?

    ओलैा कॅबच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झाल्यास हा आकडा आजमितीला 4.8 अब्ज डॉलर्स म्हणजेच 39 हजार 832 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.याशिवाय आता कंपनीने ओला इलेक्ट्रिकल्सच्या नावाने सुरू केलेल्या इ टू व्हिलरलाही पसंती मिळतेय. आज याही कंपनीचं नेटवर्थ साधारणपणे 2 हजार 400 कोटी रुपयांच्या घरात पोहोचलं आहे.

  • ०२. पैशाची गरज व श्रीमंतीकडे वाटचाल

    ०२. पैशाची गरज व श्रीमंतीकडे वाटचाल

    पैसा बहुत कुछ है लेकीन सबकुछ नही है,
    बहुत कुछ पाने के लिए सबकुछ करना मत,
    खरीददार चाहे कितना भी बडा क्यो न हो, बिकाऊ बनना मत,
    दिमाग चाहे दिल न चाहे वह चीज करना मत |

    पैसा खुदा तो नही, लेकिन खुदा से कम भी तो नही |

    तुमच्याकडे कोणत्याही स्वरुपातले पैसेच नसतील तर…? अशी कल्पना करुन बघा. खिशात पैसे नाहीत. बँकेत पैसे नाहीत. घरात पैसे नाहीत. तुम्ही कुणाला उसने पैसे दिलेले नाहीत किंवा तुम्ही कुणाकडे उसने पैसे मागू सुध्दा शकत नाही. अशा प्रसंगी तुम्ही काय कराल? पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. घरात आहेत त्या जगण्यायोग्य वस्तूंचा साठा संपत चाललाय. एके दिवशी तो संपून गेला. आता काय करणार? पैशाविना जीवन म्हणजे जिवंतपणी मृत्यू अनुभवण्यासारखी अवस्था होय.

    बऱ्याचवेळा पैशाबाबत अनेक गैरसमज पाळले जातात. पैसा हा आध्यात्मिक मार्गातील अडथळा आहे हा एक त्यातला मुख्य गैरसमज आहे. मात्र ज्यांनी संपूर्ण जगाला आपल्या आध्यात्माची ओळख करुन देऊन प्रभावीत केले ते विवेकानंद सांगतात की, उपाशीपोटी धर्म शिकवला जाऊ शकत नाही. त्यांनी पैशाचे महत्त्व नमूद केले आहे. पैसा आध्यात्मातील अडथळा आहे असे म्हणणाऱ्या लोकांच्या मनावर ताबा नसतो. त्यामुळे ते पैशाला बदनाम करतात. पैशाने अनेक चांगली कामे केली जाऊ शकतात. उत्तम शिक्षणासाठी शिक्षणसंस्था सुरु करण्यासाठी, चांगले रस्ते तयार करण्यासाठी, पुस्तके विकत घेण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी, चांगले व उबदार कपडे खरेदी करण्यासाठी, आपली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी, लोकांना सुखसोयी चांगल्या मिळवण्यासाठी, दवाखाने व आरोग्य केंद्रांसाठी, व्यायामशाळा उभारण्यासाठी, चांगली शेती पीकवण्यासाठी, संशोधनासाठी, खेळाडूंसाठी, मैदानांसाठी, सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी अगदी कशाचेही नाव घ्या. ती प्रत्येक गोष्ट साकारण्यासाठी पैसा लागतो. पैशाविना काहीच करता येत नाही.

    the-need-for-money-and-the-journey-to-wealth

    मग आपल्याला बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की, जे लोक पैशाने अमुक गोष्टी खरेदी करता येतील मात्र तमुक गोष्ट खरेदी करता येणार नाहीत याची मोठी यादी सांगत असतात त्यांचे काय? उदाहरण द्यायचे झाल्यास पैशाने पुस्तके खरेदी करता येतील ज्ञान नाही. पैशाने चांगले अंथरुन खरेदी करता येईल, झोप नाही. अशा वाक्यांचा भडीमार करणाऱ्या व्यक्तींनी हे समजून घेणे गरजेचे आहे की, पुस्तके खरेदी करणे ही पैशाने साध्य होणारी कृती आहे ते पैशाचे काम आहे. ती पुस्तके वाचणे हे तुमचे काम आहे, पैशाचे नाही. त्यासाठी पैशाला कशाला दोष देता? तो दोष तुमचा आहे. अंथरुन विकत घेणे ही पैशाने साध्य होणारी कृती आहे. झोप लागणे न लागणे ही तुमच्या कर्मावर किंवा मानसिक शांतीवर अवलंबवून आहे. पैशावर नाही.

    पैशाने माणूस बिघडतो वगैरे या गोष्टीत काहीही तथ्य नाही. तसे असते तर सगळी गरीब माणसे चांगली असती किंवा सगळी श्रीमंत माणसे वाईट असली असती. ज्याची वृत्ती वाईट आहे ती माणसे वाईट वागणार. मग त्यांच्याकडे पैसे आहेत किंवा नाहीत याने काही फरक पडत नाही. ज्यांची वृत्ती विधायक आहे ती माणसे चांगलीच वागणार. तो संस्काराचा भाग आहे. त्यांच्याकडे पैसा असला किंवा नसला तरी काही फरक पडत नाही. काहीवेळा पैशामुळे आपापली वृत्ती प्रकट करायला वाव मिळतो. चांगल्या माणसांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आला तर त्या समाजाची भरभराट होते. कारण चांगली माणसे पैसा आल्यावर शिक्षणसंस्था, दवाखाने, चांगले रस्ते, संस्कार केंद्रे अशा विधायक गोष्टी सुरु करतील. याउलट वाईट माणसांकडे पैसा आला तर त्या समाजाची अधोगती होते. कारण विध्वंसक माणसे जुगार, दारुचे अड्डे सुरु करतील.

    आणखी वाचा

  • ०१. फरक गरीबी व श्रीमंतीतला

    ०१. फरक गरीबी व श्रीमंतीतला

    the-gap-between-the-rich-and-the-poor

    शतकानुशतके माणसामाणसात संपत्तीच्या मोजमापानुसार फरक करण्यात आला आहे. राजा व रंक, सावकार व फकीर, गरीब व श्रीमंत अशी थेट विभागणी होत आलेली आहे. जगाच्या अगदी सर्व कोपऱ्यात हीच व्यवस्था आहे. मानवात व इतर सजीवात अनेक फरक असले तरीही संपत्ती निर्माण करणे, तिची गुंतवणूक करणे, त्या संपत्तीत वाढ करणे ही माणसांनी तयार केलेली व्यवस्था आहे. ती निसर्गात इतर कोणत्याही घटकात नाही. प्रत्येकाला पैसा हवा आहे. भौतिक व आरामदायी सुखसुविधा पाहिजे आहेत. त्यामुळे प्रत्येकजण गरीबीतून श्रीमंतीकडे किंवा श्रीमंतीकडून अधिक श्रीमंतीकडे वाटचाल करत असतो. म्हणजे काय तर, आता आहे त्या स्थितीतून वरच्या स्थितीत जाण्याचा प्रयत्न करत असतो. आता गरीबी व श्रीमंतीत मुख्य फरक कोणता हा प्रश्न आपल्याला पडतोच.

    गरीबी व श्रीमंतीत अजून काही फरक आहेत. माणसाला गरीब होण्यासाठी कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत. श्रीमंत असणाऱ्या (कोणत्याही बाबतीत) माणसाने त्याचे कार्य सोडले तो आपोआप गरीबीकडे प्रवास करु लागतो. गरीबी ही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर हातमिळवणी करण्यासाठी आतुरलेली असते. ती आपल्याला सतत तिच्याकडे ओढत असते. तिच्या दिशेने वाहवत जायचे की नाही ही निवड प्रत्येक माणसाला स्वतःहून करावी लागते. गरीब होण्याचा प्रवास अत्यंत सोपा आहे. काहीही न करता गरीब होता येते. गरीबी आल्यावर मात्र तिथे टिकून राहण्यासाठी सुध्दा संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष जीवघेणा ठरतो. हा संघर्ष अतिशय जीवघेणा असतो, इतका की यातून वर उठण्यासाठी कमालीचे कष्ट करावे लागतात. हा संघर्ष सोडून दिला की माणसाचे जगणे संपून जाण्याची दाट शक्यता निर्माण होते. एखाद्या मजूराने आठ दिवस काम केले नाही तर त्याच्या जगण्याचे वांधे व्हायला वेळ लागत नाही. मात्र ज्याने पैशाने पैसा कमावायची कला साध्य केली आहे, अशा एखाद्या श्रीमंत माणसाने आठ दिवस काम केले नाही, तर त्याच्या जगण्याचे वांधे होणार नाहीत.

    the-gap-between-the-rich-and-the-poor

    श्रीमंती ही अतिशय प्रयत्नानंतर, युक्तीने, बुध्दीचा वापर करुन किंवा वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक करुन प्राप्त करता येते. श्रीमंतीला आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावरती बोलवता येते. ती स्वतःहून चालून आपल्याकडे येत नाही. आपल्याला ती यावी म्हणून प्रयत्न करावे लागतात. तिला प्रसन्न करावे लागते, मगच ती आपल्याकडे येते. आल्यावर सुध्दा तिला टिकवून राहण्यासाठी सतर्क राहावे लागते. माणूस तिच्या बाबतीत गाफील झाला की ती त्याच्याकडे पाठ फिरवून निघून जाते. ती आली की बऱ्याच चांगल्या गोष्टी घेऊन येते. त्या चांगल्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. वाईट गोष्टींना शिरकाव करु दिला की, तिचा उलट्या दिशेने प्रवास सुरु होतो. म्हणून अशा प्रयत्न प्राप्त केलेल्या श्रीमंतीला किंवा आता ती नसेल तर प्रयत्नांनी प्राप्त कराव्या लागणाऱ्या, टिकवून ठेवण्यासाठी, तिच्यात वाढ करण्यासाठी काय करावे? आता नसलेली श्रीमंती प्राप्त कशी करावी? गरीबीला निरोप कसा द्यावा? या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखमालिकेत असतील तेव्हा पैशाची गरज व श्रीमंतीकडे वाटचाल या विषयावर पुढील लेखात जाणून घेऊ.

    आणखी वाचा