भारताला अंतराळात घेऊन जाणारे शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. विक्रम साराभाई…

आधुनिक जगात चमत्काराचे दुसरे नाव आहे विज्ञान, कारण केवळ विज्ञानाच्या जोरावर पृथ्वीवर वावरणारा माणूस थेट चंद्रावर जाऊन पोहोचला आहे. विज्ञानाच्या मदतीने अशक्य गोष्ट देखील शक्य करणं सहज शक्य आहे असं म्हटलं तरीही ते वावगं ठरणार नाही. भारतीय विज्ञान शास्त्राचा इतिहास बराच जुना आणि गाढा आहे, मात्र कालांतराने आपण हा धनाचा पेटारा कधी उघडून बघितलाच नाही […]