बिझनेस सुरु करायचा म्हटलं की, अनेक गोष्टींची माहिती असणं एका व्यावसायिकासाठी गरजेचं असतं, ज्यामुळे एखादा व्यवसाय यशस्वी करता येईल. स्टार्टअप विश्व या सिरीजमध्ये स्टार्टअप विश्वातल्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आपण समजून घेत असतो. तर आज आपण पाहणार आहोत Bootstrapping बद्दल.
आत्तापर्यंत आपण angel investor, acquihire, acquisition, alpha आणि beta testing अश्या अनेक टर्म्स पहिल्या. याचे व्हिडिओस जर तुम्ही पाहिले नसतील, तर या सगळ्या व्हिडिओजच्या लिंक आम्ही description मध्ये देतोय. तुम्ही ते पाहू शकता.
तर आता येऊया Bootstrapping कडे. एखादा व्यवसाय उभा करण्यासाठी फक्त बिझनेसची आयडिया असून चालत नाही, तर खिशात पैसापण असावा लागतो. बिझनेस उभारण्यापासून ते प्रॉडक्ट तयार होईपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी पैशांची प्रचंड गरज असते. पैशाच्या याच गरजेला स्वखर्चातून पूर्ण करण्याचा एक मार्ग म्हणजे Bootstrapping.
सोप्या शब्दांत सांगायचं तर Bootstrapping म्हणजे व्यवसाय सुरु करण्यासाठी बाहेरुन पैसे न घेता स्वतःचेच पैसे वापरणे आणि जे पैसे व्यवसायातून मिळतील, त्याचा बिझनेस ग्रोथसाठी पुनर्वापर करणे. Bootstrapping ला Self Finance असे देखील म्हणतात. बऱ्याचदा आपल्याकडे एवढे पैसे असतात की त्यातून एखादा छोटासा व्यवसाय उभा राहू शकतो. ते पैसे आपण सेव्हिंग करून ठेवलेले असतात.
बिझनेससाठी सुरुवातीला अशा वेळी आपण त्या पैशांचा वापर करू शकतो. जेव्हा आपण बँकेतून लोन घेतो, त्यावेळी तेथे हप्ते भरावे लागतात, अँजेल इन्व्हेस्टरला शेअर्स द्यावे लागतात, पण Bootstrapping मध्ये कोणावरच अवलंबून राहण्याची गरज नसते. कारण तिथे तुमचे स्वतःचे पैसे असतात. यामुळे तुम्हाला हफ्ते फेडावे लागत नाहीत किंवा मिळणारा नफा इतरांसोबत शेअर करावा लागत नाही.
शेवटी एक लक्षात ठेवा तुमच्या व्यवसायाला Bootstrapping करत असताना त्यातल्या जोखमीबद्दल नेहमी जागरूक रहा. कारण यात रिस्क सुद्धा तितकीच असते, कारण जर तुमचं व्यवसाय चालला नाही तर तुम्ही तुमची सगळी कमाई गमावून बसता. झोहो, झेरोधा ही बूटस्ट्रॅपिंग, इंटर्न शाला, जगप्रसिद्ध Spanx कंपनी आणि Mailchimp ही ईमेल सॉफ्टवेअर कंपनी ही बूटस्ट्रॅपिंगची उत्तम उदाहरणं आहेत.
नवी अर्थक्रांतीच्या स्टार्टअप विश्व या नव्याकोऱ्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. या सिरीजमध्ये स्टार्टअप विश्वातल्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आपण समजून घेत असतो. तर आजची आपली टर्म आहे अल्फा टेस्टिंग. चला तर मग सुरुवात करूया.
प्रत्येक कंपनीला आपण निर्माण केलेले product हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे आणि त्यांना ते आवडावे असं वाटत असतं. बर्याच कंपन्या या त्यांच्या product च्या पहिल्या sale वरून ते product किती जणांना आवडलं हे ठरवतात, तर इतर कंपन्या या Acceptance Testing चा मार्ग निवडतात. Alpha Testing हा Acceptance Testing चाच एक भाग आहे.
Alpha Testing मध्ये कंपनीने बनविलेले product हे मार्केटमध्ये विकण्याआधी तिथल्या कर्मचाऱ्यांना testing साठी दिले जाते. ज्यामुळे product मधले pros आणि cons सहजरित्या समजतात आणि त्यावर काम करायलासुद्धा वेळ मिळतो. Alpha Testing ला काही लोक usability testing सुद्धा म्हणतात. जेव्हा तुम्ही एखाद्या product चे Alpha Testing करता, तेव्हा ते product हे पूर्णपणे तयार झालेले असते; पण त्यातल्या ज्या काही छोट्या छोट्या चुका आहेत त्याचा तोटा end users ला होऊ नये म्हणून ही test अत्यंत गरजेची असते. Product मध्ये असलेल्या छोट्या छोट्या त्रुटींचा परिणाम हा product च्या sale वर होत असतो. कमीत कमी त्रुटी असलेले product जेव्हा कंपनी market मध्ये लाँच करते तेव्हाच त्याचा जास्तीत जास्त खप होण्याची शक्यता असते. Product चं alpha version ग्राहकांसाठी कधीच नसतं. त्यामुळे ते कधीही market मध्ये लाँच केलं जात नाही.
Alpha Testing मध्ये Testing Team ला ते प्रॉडक्ट जसं बनवलं गेलं पाहिजे होतं, तसंच झालंय का हे सुद्धा बघणं गरजेचं असतं. यासाठी कधी कधी कंपनीमध्ये त्या त्या क्षेत्रातील experts ला सुद्धा बोलावलं जातं. जेणेकरून product मध्ये कमीत कमी त्रुटी राहतील.
Beta Testing
आता वळूया Beta Testing कडे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, बीटा टेस्टिंग म्हणजे नेमकं काय? तर अल्फा टेस्टिंग नंतरची स्टेप म्हणजे बीटा टेस्टिंग. ज्यावेळी तुमच्या एखाद्या सर्व्हिसची किंवा प्रॉडक्टची अल्फा टेस्टिंग यशस्वी होते. त्यानंतर तुमचे प्रॉडक्ट बीटा टेस्टिंगसाठी पाठवले जाते. तुमच्या प्रॉडक्टचा अभिप्राय मिळविणे हाच त्यामागचा मुख्य उद्देश असतो.
बीटा टेस्टिंगला फील्ड टेस्टिंग असेही म्हणतात.
कोणतंही प्रॉडक्ट थेट मार्केटमध्ये लाँच करणं थोडं रिस्की असतं. ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये येण्याआधी पहिल्यांदा काही लोकांकडे वापरण्यासाठी पाठवले जाते. त्यामुळे त्यांच्याकडून येणाऱ्या सुचनांनुसार तुमच्या प्रॉडक्टमध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करता येतात. बीटा टेस्टिंगमुळे आपल्याला कस्टमरचा फीडबॅक मिळतो. त्यामुळे प्रॉडक्टची क्वालिटी सुधारण्यासाठी मदत होऊ शकते.
Alpha Testing मध्ये कंपनीतले कर्मचारीच प्रॉडक्ट टेस्टिंग करतात, तर Beta Testing मध्ये बाहेरचे टेस्टर्स प्रॉडक्ट टेस्टिंग करतात. आपण ज्यावेळी एखादे अॅप्लिकेशन वापरत असतो, त्यावेळी आपल्याला त्यांचा फीडबॅकसाठी मेसेज येतो. आपल्याला आलेल्या अनुभवानुसार आपण तो फीडबॅक देत असतो आणि तो फीडबॅक वाचून कंपनी त्यात बदल करत असते.
शेवटी काय Alpha Testing आणि Beta Testing चा मूळ उद्देश एवढाच आहे की शेवटच्या ग्राहकापर्यंत पोहचणारं प्रॉडक्ट हे flawless म्हणजेच दोषविरहित असावं.
आज आपण सर्वजण कारमधून फिरतो, परंतु 100 वर्षांपूर्वी केवळ अति श्रीमंत लोकच कार वापरू शकत असत. पण एक व्यक्ती होती जिने ऑटोमोबाईल उद्योगात क्रांती घडवून आणली आणि कार सामान्य लोकांच्या दारापर्यंत पोचवली. स्वतःच्या हिंमतीवर गरिबांना चारचाकी गाडीचं स्वप्न दाखवून ते सत्यात उतरवणाऱ्या त्या अवलियाचं नाव आहे हेन्री फोर्ड…
३० जून १८६३ रोजी अमेरिकेतील मिशिगनमध्ये एका छोट्या शहरात हेन्री फोर्ड यांचा जन्म झाला. एका शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेल्या हेन्रीला ४ भावंडं. घरची परिस्थिती बेताची. शेतातून मिळेल तेवढंच उत्पन्न. अमेरिकेतला तो काळ असा होता जेव्हा शेती ही पूर्णपणे कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने केली जात होती. दिवसभर शेतात काम करणं लहानग्या हेन्रीला पसंत नव्हतं. भावंडांसोबत शाळेत जाणारा हेन्री ८ व्या ग्रेड पर्यंत शिकला. शालेय शिक्षणात जास्त रस नसणाऱ्या हेन्रीने माध्यमिक शिक्षण काय केलं नाही. बुक किपींगचा एक कोर्स करायला त्यानं ऍडमिशन घेतलं.
Young Henry Ford
१२ वर्षाच्या हेन्रीला त्याच्या वडिलांनी हातात घालायचं घड्याळ भेट दिलं… हेन्रीने ते घड्याळ खोललं आणि परत जोडलं. जगातली पहिली आधुनिक कार तयार करण्याची हीच होती पहिली पायरी… जिथं त्याच्या वयाची मुलं मैदानात खेळ खेळायची तिथं हेन्री आसपासच्या घरातली बिघडलेली घड्याळ दुरुस्त करायचा.
त्या काळात वाहतुकीसाठी घोडागाडीच वापरली जायची. मग ती सामानाची असो किंवा माणसांची. शेतात वडिलांना मदत करत असताना हेन्रीने पहिल्यांदा एक असं मशीन पाहिलं, जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चक्क घोड्याशिवाय जात होतं. पाण्याच्या वाफेवर चालणारं, शेतात वापरलं जाणारं हे मशीन म्हणजे हेन्रीसाठी आश्चर्य होतं. समोर दिसणारं हे मशीन म्हणजे हेन्रीचा हेन्री फोर्ड होण्यासाठी एक निमित्त आहे हे बहुतेक काळ ओळखून होता. मशीनवर प्रेम कणाऱ्या हेन्रीने तेव्हाच ठरवलं कि आपण देखील अशी गाडी बनवायची जी घोड्यांशिवाय चालेल.
वयाच्या १६ व्या वर्षी हेन्री यांच्या आईच निधन झालं. आईवर अतिशय प्रेम करणारे हेन्री आतून तुटले होते. आईच्या निधनानंतर वडिलांनी त्यांना सांगितलं कि तू आता शेतात कामाला सुरवात कर, पण शेतीच्या कामात अजिबात रस नसणाऱ्या हेन्रीने सरळ घर सोडून पळून जाण्याचा मार्ग स्वीकारला.
हेन्री यांनी सरळ अमेरिकेतील डेट्रॉईट शहर गाठलं. अनेक उद्योगधंदे जिथं जन्माला येत होते असं डेट्रॉईट शहर म्हणजे हेन्री सारख्या होतकरूंसाठी संधीच भांडारच होत.
घोड्याशिवाय चालणारी ती वाफेवरची गाडी काही हेन्रीच्या डोक्यातून जात नव्हती. डेट्रोईट मध्ये गेल्यावर त्यांनी स्टिम इंजिन बनवणाऱ्या एका कंपनीमध्ये नोकरी स्वीकारली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं कि स्टीमवर चालणारी ही गाडी खूपच जड आहे. जर आपल्याला सर्वसामान्य वापरतील अशी गाडी बनवायची असेल, तर वाफेवर चालणारं इंजिन वापरून काहीच उपयोग नाही. कारण हे इतकं तापतं कि ते रोजच्या वापरात येऊच शकणार नाही.
सर्वसामान्यांना वापरता येणारी गाडी बनवण्याचे त्यांचे प्रयत्न चालूच होते. स्टीम इंजिनला पर्याय शोधताना त्यांच्या वाचनात जर्मन इंजिनर निकोलस ऑटो यांनी बनवलेलं गॅस इंजिन आलं. युरोपात थोड्या फार प्रमाणात वापरलं जाणार हे इंजिन अमेरिकेसाठी मात्र नवीन होतं.
१८८६ मध्ये आपल्या प्रयत्नातून त्यांनी गॅस इंजिन वापरून एक गाडी बनवली जिला त्यांनी Ford Quadricycle असं नाव दिल. गाडीचा पहिला डेमो जेव्हा त्यांना द्यायचा होता तेव्हा बाहेर खूप पाऊस पडत होता. पण आपल्या प्रयत्नांना सफल झालेलं त्यांना पाहायचं होतं. पावसाची पर्वा न करता रात्रीच्या वेळी त्यांनी आपली गाडी बाहेर काढली.
पुढं १८९६ मध्ये हेन्री फोर्ड यांची भेट थॉमस एडिसन यांच्या सोबत झाली. हेन्री यांनी केलेलं काम त्यांना खूप आवडलं. त्यांच्या या संशोधनावर एडिसन खुश झाले. यातुन प्रेरणा घेऊन हेन्री फोर्ड यांनी आपल्या नोकरीचा राजीमाना दिला आणि त्यांनी १८९९ मध्ये स्वतःची Detroit Automobile Company स्थापन केली. पण यातून तयार होणाऱ्या गाड्या कमी दर्जाच्या आणि जास्त महाग होत्या. त्यामुळं १९०१ मध्ये हेन्रीनी ती कंपनी बंद केली.
Thomas Edison & Henry Ford
पुढे डेट्रॉईट ऑटोमोबाईल कंपनीतील त्याचे सहकारी मर्फी आणि इतर भागीदारांसोबत 30 नोव्हेंबर 1901 रोजी हेन्री फोर्ड कंपनीची स्थापना केली. पण तिथं देखील इतर सहकाऱ्यांसोबत मतभेद झाल्याने आपलं नाव असणारी ती कंपनी त्यांनी सोडून दिली.
सलग २ वेळा आलेलं अपयश, जवळची संपत चालली बचत अशा परिस्थितीत हार न मानता फोर्ड यांनी गुंतवणूकदार असणारे माल्कन यांच्या सोबत १६ जून १९०३ रोजी फोर्ड मोटार कंपनी चालू केली.
कंपनी तर चालू झाली पण ती लोकांपर्यंत पोहचणार कशी? यासाठी फोर्ड यांनी अमेरिकेत भरल्या जाणाऱ्या कार रेसिंग स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी मॉडेल ९९९ हे कार रेसिंग मॉडेल तयार केलं. ही रेस जिंकून त्याचं हे मॉडेल तर हिट ठरलंच सोबत कंपनीचं नावसुद्धा झालं.
त्या काळच्या चारचाकी गाड्या इतक्या महाग होत्या की श्रीमंत सुद्धा त्या घेताना विचार करत होते. अश्या या काळात हेन्री फोर्ड यांनी सर्वसामान्यांना परवडेल अशी चारचाकी गाडी बनवण्याचे प्रयत्न काही त्रुटी असल्यामुळे फेल गेले. पण १९०८ मध्ये त्यांनी बनवलेल्या मॉडेल-T ने मात्र जगाला वेड लावलं. फक्त काळ्या आणि डार्क ब्लु रंगात येणारी गाडी हळू हळू फक्त काळ्या रंगात मिळू लागली. या गाडय़ांचे स्टिरिंग व्हील डावीकडे होते. गाडी चालवायला सोपी होती आणि दुरुस्त सुद्धा लवकर होत असे.
Henry Ford Model-T
पहिल्या वर्षी कंपनीने १७०८ गाड्या विकल्या. गाडीची किंमत होती ९०० डॉलर. १९१४ मध्ये या गाडीच्या सेलने २,५०,००० चा टप्पा ओलांडला. पुढे गाडीची किंमत ३६० डॉलर्स वर आल्यावर तर गाडीचा सेल ४,७०,००० पर्यंत गेला. खऱ्या अर्थानं हेन्री फोर्ड यांची ही मॉडेल T गाडी म्हणजे विसाव्या शतकातली सगळ्यात सेन्सेशनल गाडी ठरली. एक वेळ तर अशी आली कि जिथं नजर जाईल तिथं फक्त हीच काळी गाडी दिसायची.
सर्वोत्तम ज्ञान असणारे कर्मचारी आपल्या कंपनीत असले पाहिजेत म्हणून त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी दिवसाला ५ डॉलर पगार घोषित केला. जिथं दिवसाला २ डॉलर पगार मिळायचा तिथं इतका पगार म्हणजे कर्मचारांसाठी सोनंच होत. कामाचे दिवस आठवड्याचे ५ च करून त्यांनी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कशी वाढेल याकड लक्ष दिलं.
सतत येणाऱ्या अपयशाला नमवत प्रत्येक समस्येतून नवीन संधी निर्माण करणारे हेन्री फोर्ड खऱ्या अर्थाने आधुनिक गाड्यांचे जनक आहेत. १०८ वर्षाची फोर्ड मोटार कंपनी ही अनेक चढ उतारानंतर आज ऑटोमोबाइल क्षेत्रातील एक नामवंत कंपनी आहे.
आपल्या आईवर अतिशय प्रेम करणाऱ्या हेन्री फोर्ड याना तितकीच प्रेमळ आणि त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणारी पत्नी त्यांना लाभली… तीच नाव होत क्लारा. आधुनिक युगातील चारचाकी गाड्यांमध्ये क्रांती करणाऱ्या या अवलियाने ७ एप्रिल १९४७ रोजी आपल्या पत्नीच्या खांद्यावर जीव सोडला.
चारचाकी गाडी हा श्रीमंती थाट न राहता सामान्य माणसाच्या आवाक्यातील व्हावे यासाठी फोर्ड यांनी अथक प्रयत्न केले. तुम्ही कोणत्या परिस्थितीत जन्माला आलात हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगता आणि परिस्थिती कशी बदलता हे महत्वाचं असतं. शेतकऱ्याच्या या मुलानं ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती घडवून याच ज्वलंत उदाहरण आपल्यापुढं ठेवलं आहे.
तर ही होती हेन्री फोर्ड यांची जीवन कहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा.यासारख्याच अनेक उद्योजकांच्या जीवनकथा ऐकून प्रेरणा घेण्यासाठी चॅनेलला आताच सबस्क्राईब करा.
भारताला शेतीमध्ये प्रगत बनविण्यासाठी केंद्रसरकार आणि राज्यसरकार नेहमीच नवीन काहीतरी योजना घेऊन येत असते. त्यातीलच एक योजना म्हणजे KCC अर्थात किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजना. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना 20 लाख कोटी रुपयांचं कर्ज वाटप करणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या योजनेचा लाभ शेतीसोबतच, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील घेता येणार आहे.
चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल:
भारतातील सर्व शेतकरी ज्यांचे वय 18 ते 70 वर्षाच्या दरम्यान आहे ते या योजनेस पात्र ठरू शकतात. या योजनेअंतर्गत मागील वर्षापेक्षा जास्त कर्जाचा आणि कमी व्याजदराचा फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. तुमच्या जवळच्या बँकेत जमिनीची कागदपत्रे तसेच कर्ज मिळवण्यासाठी जमिनीचा नकाशा, पटवारी कागदपत्रे, बँक पासबुक, पॅनकार्ड, आधार कार्ड आदी कागदपत्रे भरणे बंधनकारक आहे. HDFC बँक, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा या बँकांद्वारे किसान क्रेडिट कार्ड बँकांद्वारे ऑफर केले जाते.
तुम्ही KCC Bank Loan कशा कशासाठी घेऊ शकता?
1. KCC Bank Loan शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी घेऊ शकतो.
2. किटकनाशके, खते, बियाणे खरेदीसाठी आणि कृषी यंत्रं घेण्यासाठी कर्ज घेऊ शकता.
3. काढणीनंतरचा खर्च भागवण्यासाठी शेतकरी हे कर्ज घेऊ शकतात.
4. कृषी मालमत्तेच्या देखभालीसाठी तसेच आपला माल विकण्यासाठी देखील या कर्जाचा वापर केला जाऊ शकतो.
5. तसेच मत्स्यपालन करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांच्या खरेदीसाठी.
6. कुक्कुटपालन करण्यासाठी मेंढ्या, ससे, शेळ्या, डुकर यांच्या पालनपोषणासाठी लागणाऱ्या खाद्य खरेदीसाठी
7. दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वतःचे शेड उभारण्यासाठी किंवा भाडेतत्वावर शेड घेण्यासाठी देखील या कर्जाची मदत होऊ शकते.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमीत कमी 50 हजारांपासून ते जास्तीतजास्त 3 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. १.६० लाख रुपयां पर्यंतच्या कर्जासाठी कोणतंही तारण लागत नाही. यासोबतच शेतकऱ्यांना पिकांचा विमाही काढता येऊ शकतो. हे कर्ज 4% व्याजदराने घेता येऊ शकते. पण जसजशी तुमची कर्जाची रक्कम वाढेल तसे त्यावरचे व्याज देखील वाढू शकते. शेतकऱ्यांना बँकांकडून नियमित दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या उच्च व्याजदरातून KCC Bank Loan अंतर्गत सूट दिली जाते.
मात्र मिळालेल्या या कर्जाची परतफेड केव्हा करायची?
तर ज्या पिकासाठी तुमचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे, त्या पिकाच्या अपेक्षित कापणी आणि एकूण उत्पादन येण्याच्या कालावधीनुसार बँक मुदतीचा कालावधी ठरवत असते. सामान्यतः प्रत्येक बँकेत 5 वर्षांचा कालावधी हा परतफेड करण्यायोग्य कालावधी असतो.
सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना घेऊन येत असते, मात्र बऱ्याचशा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्याच नसतात. त्या योजना नवी अर्थक्रांती तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. त्यामुळे अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी नवी अर्थक्रांती वेबसाईटला नियमित भेट द्या.
आजकाल मोठ-मोठे पदवीधर, सुशिक्षित वर्गातील लोक नोकरीपेक्षा शेती करण्यास जास्त प्राधान्य देत आहेत. उत्तम पद्धतीची आधुनिक शेती करून चांगलीच कमाई देखील कमवत आहेत. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत अशाच एका आधुनिक पिकाबद्दल बेबी कॉर्न या पिकाबद्दल.
कॉर्न मंच्युरीयन, चिली, पकोडे, कॉर्न मसाला असे बेबी कॉर्नचे सगळेच पदार्थ प्रत्येकाच्याच आवडीचे असतात. त्यामुळे बेबी कॉर्नची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अगदी आपल्या घरापासून ते 5 स्टार हॉटेल्स, पिझ्झा, पास्ता चेन आणि छोट्या-मोठ्या रेस्टॉरंटमध्ये देखील कॉर्नला मोठ्या प्रमाणात मागणी असते.
तांदूळ आणि गहू या पिकांनंतर मका हे भारतातील सर्वात जास्त लागवडीचे पीक म्हणून ओळखले जाते. याच मक्याच्या अपरिपक्व कोंबांना बेबी कॉर्न असे म्हणतात. लागवडीनंतर दोन महिन्यांच्या आताच बेबी कॉर्न तयार होतात. बेबी कॉर्नमध्ये कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वं असतात. म्हणून आरोग्याच्या दृष्टीने ते खूप फायद्याचे मानले जाते, पण केवळ आरोग्याच्याच दृष्टीने नव्हे, तर आर्थिकदृष्ट्या विचार केला तर यातून खूप फायदा मिळू शकतो. एका एकरात बेबी कॉर्नच्या लागवडीसाठी जवळपास 15 हजार रुपये खर्च येऊ शकतो. फक्त 15 हजारांच्या गुंतवणुकीतून एकरी चार ते सहा क्विंटल उत्पादन घेऊन तुम्ही लाखोंची कमाई करू शकता. याचे उत्पादन तुम्ही वर्षातून केवळ एकदाच नाही तर 4 वेळा घेऊ शकता. फक्त इतकेच नव्हे तर तुम्हाला यातून दुप्पट नफा मिळवता येऊ शकतो. म्हणजे बेबी कॉर्नच्या कापणीनंतर त्याचा जो उर्वरित भाग असतो, तो जनावरांसाठी चारा म्हणून वापरता येऊ शकतो. शेतकरी त्याचा हिरवा चारा म्हणूनही वापर करू शकतात किंवा कापून सुकवल्यानंतर सुकी पेंडही बनवता येतो. मक्याचे खाद्य हे जनावरांसाठी अतिशय पौष्टिक मानले जाते. त्याचा चारा जनावरांना दिल्याने त्यांची दूध उत्पादन क्षमताही वाढते.
फायदेमंद शेतीसाठी बेबी कॉर्न हा एक अगदी उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात बेबीकॉर्नचे उत्पादन घ्यायचे असेल मात्र तुम्हाला पैशांचा प्रश्न भेडसावत असेल, तर शासनाकडून तुम्हाला कर्ज मिळू शकते. भारत सरकार मका आणि बेबी कॉर्नच्या लागवडीसंदर्भात शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतकरी कर्ज उपलब्ध करून देते. याच्या सहाय्याने तुम्ही बेबी कॉर्नची शेती करून लाखोंनी पैसे कमवू शकता.
अशा या बेबी कॉर्न लागवडचीमाहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. हा लेख जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि नवी अर्थक्रांतीच्या यू ट्यूब चॅनलला आत्ताच subscribe करा.
कोणतीही गोष्ट करताना आपण एक रफ प्लॅन बनवत असतो. आपण आखलेल्या प्लॅननुसार आपण दिवसभरातील कामकाज करत असतो. काही वेळेस तुम्ही केलेल्या प्लॅननुसार गोष्टी घडतात, तर काही वेळेस त्या घडत नाहीत, मात्र तरीही आपण प्लॅन हा बनवतोच. हे झाले आपल्या रोजच्या दिवसाचे. मात्र ज्यावेळी आपल्याला एखादा बिझनेस चालू करायचा असतो, त्यावेळी आपण आपल्याला वाटलं म्हणून कोणताही बिझनेस चालू नाही करू शकत ना! याचसाठी सर्वात महत्वाचे आहे ते Business Planning.
Business Plan ची सरळ सोपी व्याख्या म्हणजे असे document ज्यात कंपनीची उद्दिष्टे आणि ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठीच्या योजनांचा तपशील असतो. तुमचं उत्पादन बाजारात कोणत्या पद्धतीने येणार, ते कोणत्या ग्राहकाला आकर्षित करणार आहे, तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धीला कशी मात देणार, तुमच्या व्यवसायाचं बाजारमूल्य किती असणार, Business च्या बाबतीतला तुमचा दृष्टीकोन काय आहे यांसारख्या अनेक गोष्टींची मांडणी बिझनेस मॉडेलमध्ये असते. भविष्यामध्ये जशी परिस्थिती आणि गरज बदलते, त्यानुसार बिझनेस प्लॅन देखील बदलत असतो.
आता Business Plan करणं का गरजेचं आहे ते पाहूया.
पहिला मुद्दा म्हणजे कोणत्याही बिझनेसमध्ये गुंतवणूक करण्याआधी इन्वेस्टर कंपनीचा बिजनेस प्लॅन बघतात. तो प्लॅन जर त्यांना convincing वाटला तरच ते तुमच्या business मध्ये गुंतवणूक करतात. तर दुसरा मुद्दा आहे लोनसंदर्भात. जर तुम्हाला तुमच्या business development साठी बँकेतून लोन घ्यायचे असेल तर बँकेला आधी हे सांगणं गरजेचं असत की तुम्हाला ते लोन कशासाठी पाहिजे आहे? तुम्ही मिळणाऱ्या पैशांचा वापर कशा पद्धतीने करणार आहात. जर तुमच्याकडे business plan असेल तर या सर्व गोष्टी explain करण तुम्हाला सोप्पं जातं.
तिसरा मुद्दा म्हणजे चांगले Employee मिळवण्यासाठी देखील बिझनेस प्लॅनचा उपयोग होतो. बरेच employee हे त्या ज्या कंपनीत काम करण्यासाठी इच्छुक आहेत त्या कंपनीचे future goals काय आहेत आणि ते आपल्या future goals ला पोषक आहेत का हे तपासतात. या सगळ्याचे तपशील त्यांना बिजनेस प्लॅनमध्ये मिळतात.
बिझनेस करताना अनेक अडचणी येतात आणि बिझनेस प्लॅनमुळे तुम्हाला आधीच त्याची तयारी करता येते.
आता वळूयात बिझनेस प्लॅनच्या प्रकाराकडे
बिजनेस प्लॅनचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे Simple Business Plan आणि दुसरा प्रकार आहे Detailed Project Report (DPR)
तर जाणून घेऊयात Simple Business Plan बद्दल
या बिजनेस प्लॅन मध्ये Short मध्ये एक-दोन पानांत किंवा ८-१० स्लाईडच्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व माहिती सांगितलेली असते. या प्रकारचा Business प्लॅन बऱ्यापैकी वापरला जातो. या plan मध्ये मार्केटची समस्या, तुम्ही त्यावर देत असलेले उपाय, तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस, तुमचे स्पर्धक आणि तुमची वैशिष्ट्ये, मार्केटिंग, ब्रॅंडिंग आणि सेल्स प्लॅन, व्यवसायाची उलाढाल, खर्च व नफा यांची अंदाजे गणितं हे सगळे महत्त्वाचे मुद्दे येतात.
आता जाणून घेऊयात Detailed Project Report बद्दल
हा बिझनेस प्लॅन एकदम Detail मध्ये लिहिलेला असतो. हा कधीकधी 25 ते 30 पानांचा देखील असू शकतो. यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक वर्षे मागदर्शन होत राहते, कारण यामध्ये सर्व माहिती एकदम Detail मध्ये लिहिलेली असते. बँका आणि Investor व्यवसायला Loan देण्याआधी किंवा Business मध्ये Investment करण्याआधी या बिझनेस प्लॅनची मागणी करतात. या मध्ये वर Simple Business Plan मध्ये नमूद केलेले सर्वच मुद्दे येतात. फरक फक्त इतकाच की वर हेच मुद्दे अत्यंत कमी शब्दांत येतात, तर यात सविस्तर येतात.
वरील दोन्ही Business प्लॅनमध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार अनेक गोष्टी अजून Add करू शकता किंवा यातील काही गोष्टी कमी देखील करू शकता.
Business Model म्हणजे तुमची कंपनी पैसे कसे कमावणार आहे याची योजना. सर्वसाधारणपणे कोणत्याही Business Model मध्ये चार गोष्टी स्पष्ट केल्या जातात. त्या म्हणजे:-
१. कंपनी कोणत्या उत्पादनाची किंवा सेवांची विक्री करेल
२. त्या उत्पादनाचे किंवा सेवेचे मार्केटिंग कसे करायचे
३. कंपनीला कोणत्या प्रकारच्या खर्चाला सामोरे जावे लागेल
४. कंपनीला जास्तीत जास्त नफा कसा मिळेल
आता पाहूया Business Model चे प्रकार आणि काही उदाहरणे : –
वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्यवसाय असल्यामुळे, Business Model च्या प्रकारांची यादी सतत बदलत असते. आज आपण सर्वसाधारणपणे वापरले जाणारे 12 business model options पाहणार आहेत, जे सर्व Business साठी इम्प्लिमेंट केले जाऊ शकतात.
Manufacturer mode
पहिला प्रकार आहे Manufacturer model. Manufacturer कच्च्या मालाचे रूपांतर उत्पादनांमध्ये करतो. त्यानंतर, तो ती उत्पादने distributors, retailers किंवा थेट consumers ला विकतो. या Business Model ला फर्निचरपासून ते pharmaceuticals पर्यंत सगळे follow करतात, मग त्या कंपन्या कितीही मोठ्या असोत वा छोट्या.
Distribution model
उत्पादित वस्तू बाजारात नेण्यासाठी distributor म्हणून काम करणारी कंपनी जबाबदार असते. नफा मिळविण्यासाठी distributors मोठ्या प्रमाणात product खरेदी करतात आणि retailers ते विकत घेऊन पुढे जास्त किंमतीला विकतात.
Retailer model
Business Model चा तिसरा प्रकार आहे Retailer model. Retailer म्हणजेच किरकोळ विक्रेता हा supply chain मधला शेवटचा दुवा असतो. Retailer हे manufacturers किंवा distributors कडून वस्तू खरेदी करतात आणि नंतर ग्राहकांना त्या किंमतीला विकतात, ज्यामुळे त्यांचा खर्च आणि नफा दोन्ही वसूल होतील.
Fee-for-service model
हा Business Model चा चौथा प्रकार आहे. नावावरून तुम्हाला हे काय प्रकरण आहे ते लक्षात आलेलंच असेल. यामध्ये कोणताहीBusiness विशिष्ट सेवेसाठी निश्चित शुल्क आकारतो. या मॉडेलवर सेट केलेला Business हा additional clients साठी extra काम करून किंवा service rate वाढवून त्याची कमाई वाढवू शकतो.
Subscription model
सध्या बऱ्याच ठिकाणी use केलं जाणारं model म्हणजे Subscription model. हे Business Model जास्त वेळा ई-कॉमर्स व्यवसायांसाठी लागू केले जाते. चालू असलेल्या सेवेसाठी कस्टमर हा दर महिन्याला, सहा महिन्याला किंवा वर्षाला payment करत राहतो.
Bundling model
या Business Model मध्ये कंपन्या दोन किंवा अधिक product एकच unit म्हणून एकत्र विकतात. अनेकदा ते product स्वतंत्रपणे विकले तर त्याचे शुल्क हे जास्त असते. या प्रकारच्या बिझनेस मॉडेलमुळे कंपन्यांना त्यांच्या product ची विक्री मोठ्या प्रमाणात करायला मदत होते तसेच इतर वेळेस जास्त विक्री न होणारे product सुद्धा यामुळे विकले जातात.
Franchise model
एखाद्या established business ची Franchise घेणं आता common झालंय. फ्रँचायझर किंवा मूळ मालक फ्रँचायझीसोबत काम करतात आणि त्यांना financing, marketing आणि other business operations मध्ये मदत करतात. जेणेकरून त्यांच्या business ची अजून development होईल. चहापासून ते Pizza पर्यंत सगळे business हे या मॉडेल प्रमाणे काम करतात.
शेतकऱ्याने उदरनिर्वाहासाठी किंवा जोड-धंदा म्हणून स्वतःच्या सुपीक जागेत बी-बियाणे पेरून केलेला व्यवसाय म्हणजे शेती होय. कोणतही पीक पिकवायचं म्हटलं की, पहिले शेतीची मशागत, नांगरणी, कोळपणी असे बरेच टप्पे पार करावे लागतात. आज आपण ऐषोरामात जीवन जगतो, चांगलं-चुंगलं खातो. त्यामागे शेतकरी राजाचे बरेच कष्ट, त्यांची मेहनत असते. मात्र हल्ली एसआरटी तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्याच्या मेहनतीला थोडा आराम मिळाला आहे. पण नेमकं हे एसआरटी तंत्र काय आहे? याबद्दल अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही, त्यामुळे बरेचजण पारंपरिक शेतीतच अडकले आहेत. चला तर जाणून घेऊ एसआरटी टेक्नॉलॉजीबद्दल.
एसआरटी म्हणजेच सगुणा राईस तंत्र. या तंत्रज्ञानालाच विनामशागतीची किंवा शून्य मशागतीची शेती असं देखील म्हणतात. विनामशागतीची शेती हे शेती करण्याचं असं तंत्र आहे ज्यात नांगरणी, निंदणी, वखरणी, कोळपणी असं काहीही यात करावं लागत नाही. याउलट पारंपरिक शेती पद्धतीत जमिनीची नांगरणी किंवा पूर्वमशागतीची कामे केली जातात. कोकण आणि विदर्भातील भात शेतीत हे नवे तंत्र वापरले जाते.
या पद्धतीने शेती करण्यासाठी पाहिल्यांदा गादीवाफे तयार करावे लागतात. गादिवाफे म्हणजे २० सेमी उंची, १ मीटर रुंद व उताराप्रमाणे लांबी ठेऊन वाफे बनवावले जातात. दोन्ही गादी वाफ्यांत ६० सेमी ते ७५ सेमी. रुंदीच्या सऱ्या पाडून त्यात पाणी सोडले जाते. गादीवाफे तयार करण्यासाठी सुरवातीला एकदाच नांगरणी करावी लागते. वाफे तयार केल्यावर त्यावर पीक टोकन पद्धतीने पेरले जाते. पाऊस जास्त झाला तर मारलेल्या चरांवाटे पाण्याचा निचरा करता येतो आणि जर पाऊस कमी झाला तर वाफ्यांमध्ये पाणी साठवलं जातं आणि किमान 8 ते 10 दिवस ते पाणी तग धरून राहतं. आता प्रश्न उभा राहतो तो मशागतीचा. शेतीतील मशागत करण्यासाठी गडी लोक दिवसाला 350 ते 400 रुपये घेतात.
पीक म्हटलं की तण हे आलंच. शेतातील तणांचा नायनाट करण्यासाठी तणनाशकांचा वापर करावा लागतो. कृषी विद्यापीठानं शिफारस केलेल्या तणनाशकांचा उपयोग करून तणाचा बिमोड करता येतो. त्याबरोबरच पिकांच्या काढणीचीही एक विशेष पद्धत आहे. पारंपरिक शेतीत आपण बऱ्याच वेळी पीक उपटून काढतो, मात्र यामध्ये कोणतही पीक हे कापावच लागतं.
पिकाचे मूळ जिथे आहे तिथे कुजले तर आपल्या जमिनीतला कर्ब वाढतो. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव कार्यरत होऊन माती जिवंत होण्यास मदत होते. होणारं बाष्पीभवन ते थांबवून ठेवतं. म्हणून एसआरटी तंत्रज्ञानात पीक मुळासकट काढले जात नाही. सेंद्रिय खत, कर्ब जमिनीत तयार होण्यास मदत होते आणि मुळाच्या शोषणाद्वारे हवा जमिनीत जाते आणि गादीवाफा भूसभुशीत राहतो. एकदा तयार केलेला गादीवाफा किमान १५ ते २० वर्ष टिकतो. गादीवाफा निर्मितीवेळी एकदाच शेणखताचा वापर करतात. या पद्धतीत खर्चात आणि कष्टात दोन्हीत बचत होते. ही पद्धत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वापरतात, कारण त्यावेळी मोठ्या प्रमाणात वाफ्यांमध्ये पाणी साठवता येते.
विनामशागतीच्या शेतीचे फायदे काय आहेत?
तर…..
मातीची धूप कमी होण्यास मदत होते. तसेच जमिनीचा पोत कडक होण्यापासून बचाव होतो. गेल्या तीन वर्षाच्या अभ्यासाच्या निकषानुसार विनामशागत शेतीमुळे 80% जमिनीची धूप थांबली आहे. कापलेले पीक आणि तणांची मुळं जमिनीत कुजल्याने निर्माण होणाऱ्या पोकळीत हवा खेळती राहते.
गादीवाफ्यात जसजसे सेंद्रिय घटक वाढतील, त्या प्रमाणात गांडुळांची संख्या वाढते आणि त्याचा शेतीला फायदाच होतो. आपण विना-मशगतीच्या शेती कशी करतात त्याचे फायदे काय आहेत? हे सगळं आपण पाहिलं, पण तुम्हाला माहिती आहे का याची सुरुवात कशी झाली? नव्वदच्या दशकात शेतीतज्ञ प्रताप चिपळूणकर यांनी नांगरणीविणा शेती होऊ शकते हा विचार मांडला.
त्यानंतर कोकणातील कृषीभूषण शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी भात शेतीत विनानांगरणीच्या शेतीचं तंत्र अंमलात आणलं. त्यांनी आपल्या शेतात हा प्रयोग चालू केला. त्यावेळी चिखलणी न करता त्यांनी गादीवाफे तयार केले, भाताचे टोकन तयार केले, टोकन केलेल्या भाताचं पीक चांगलं येतं असं त्यांच्या लक्षात आलं. 2014 ते 15 च्या दरम्यान या तंत्रज्ञानात चांगले रिजल्ट्स आल्यावर कृषी विभागानं हे तंत्र राज्यभर विस्तारण्यासाठी सुरुवात केली.
अशा या एसआरटी टेक्नॉलॉजीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. हा लेख जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि नवी अर्थक्रांतीच्या यू ट्यूब चॅनलला आत्ताच subscribe करा.
आपल्या शेतात सुंदर सुंदर मोती, त्या मोत्यांना असलेली वाढती मागणी आणि त्यातून मिळणारे भरमसाठ पैसे, वा..! तुम्ही थोड्याच दिवसात लखपती होऊ शकता. हो हो पण जरा थांबा. कसंय स्वप्न बघायला काहीच लागत नाही ओ, मात्र ती स्वप्नं पूर्ण करायला खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यात तुम्ही मोत्यांची शेती करणार म्हटल्यावर मेहनतीशिवाय पर्यायच नाही.
पहिल्यांदा आपण पाहूया ही शेती कशी केली जाते? त्यातून कसा फायदा मिळतो? याचं मार्केटिंग कसं केलं जातं?
मोत्यांची शेती हा मत्स्यपालन प्रकाराचाच भाग आहे. यामध्ये ऑयस्टर पाळले जातात. ऑयस्टर म्हणजेच कालवे. हा शिंपल्यांचाच एक प्रकार असतो. कोकण्यात या कालव्यांची मस्त झणझणीत चटणी किंवा कालवं मसाला बनवलं जातं, त्याची चव आहा अप्रतिम. त्यात ते मस्त चुलीवर बनवलं असेल, तर मग काही विषयच नाही. स्वर्ग सुख! एकदा तुम्ही हे कालवं मसाला खाऊनच बघा. sorry sorry मी चुकून जरा मेजवानी परिपूर्ण किचन मध्ये घुसतिये… तर आपला मुद्दा आहे शेतीचा. हा तर, हे जे ऑयस्टर असतात म्हणजेच काल. ते गोळा करून त्यावर शस्त्रक्रिया करून, रोपन करून मग मोती गोळा केले जातात.
ही शेती करण्यासाठी 20*30 आकाराचा तलाव लागू शकतो. त्याची खोली 5-6 फुट खोल असावी लागते. तलाव उभा करण्यास जर पुरेशी जागा किंवा आर्थिक सोय नसेल, तर तुम्ही घरच्या घरी एक टाकी बनवून मोत्यांची शेती करू शकता. टॅंकच्या किंवा तलावाच्या अवतीभवती हिरवळ कायम राखण्यासाठी तुम्ही झाडं किंवा वेली लावू शकता. टॅंकमध्ये काही दिवस ऑयस्टर ठेवल्यानंतर त्याची शस्त्रक्रिया केली जाते. ऑयस्टर शस्त्रक्रिया 15 दिवसांनी केली जाते.
शस्त्रक्रियेअंतर्गत, देवाच्या किंवा फुलांच्या पानांच्या साध्या किंवा डिझाइनर मण्यासारख्या आकृत्या प्रत्येक ऑयस्टरमध्ये घातल्या जातात, 4 ते 6 मिली व्यासाचा. त्याची दोन्ही आवरणे हळुवार पद्धतीने उघडून त्यात त्यात बिया सोडल्या जातात आणि शिंपले बंद केले जातात. या ज्या बिया असतात, त्या जंगली वनस्पती पासून बनवल्या जातात. यासाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता किंवा जवळच्या कृषी-केंद्रातून देखील माहिती मिळवू शकता.
हे ऑयस्टर नंतर नायलॉनच्या पिशव्यांमध्ये ठेवले जातात आणि बांबू किंवा पीव्हीसी पाईपमध्ये टांगल्या जातात आणि एक मीटर खोलीवर तलावामध्ये सोडल्या जातात. या ऑयस्टरचे खाद्य म्हणजे शेवाळ आणि जनावरांची विष्ठा. दीड, दोन वर्षं तलावात शेवाळ आणि जनावरांची विष्ठा टाकली, तर दोन वर्षानंतर शिंपल्यातील मोती परिपक्व झालेले असतात. यामध्ये सर्वात कठीण आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे. बीज तयार करून त्याचे रोपण करणे. त्यामुळे हे करताना योग्य मार्गदर्शन घेवूनच करावे.
एका शिंपल्यात दोन मोती तयार होतात हे, दोन मोती तयार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातील साधारण 70 रुपये खर्च करावे लागतात आणि त्या 70 रुपयांचे 2 वर्षानंतर तुम्हाला 3 ते 4 हजार रुपये मिळू शकतात. एका हंगामात तुम्हाला एका टॅंक मध्ये कमीत कमी 5000 मोती मिळू शकतात. त्या 5000 पैकी समजा 4000 मोती वाचले, तर तुम्हाला त्याचे साधारण ६० लाख रुपये मिळू शकतात. मात्र ही सगळी प्रक्रिया काळजीपूर्वक केली पाहिजे.
कुठेही चूक झाल्यास शिंपल्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊन नुकसान होऊ शकते. त्यामुळे या व्यवसायात मोठी जोखीम देखील असते. मात्र एकदा का तुम्हाला या शेतीची संपूर्ण टेक्निक समजली की मग तुम्ही मालामालच!
मोती तयार झाले की. दूसरा मुद्दा येतो तो विक्रीचा. सुरत, अहमदाबाद, हैदराबाद, मुंबई या शहरांमध्ये मोत्यांची मोठी बाजारपेठ आहे. मोत्यांची गुणवत्ता उच्चप्रतीची असल्यास त्याला बाराशे रुपये कॅरेट इतकी किंमत मिळते.
तुम्हाला वाटत असेल हे खूप रिस्की काम आहे, पण घाबरू नका, अशा बऱ्याच संस्था आहेत, ज्या या शेतीचं प्रशिक्षण देतात तसेच प्रत्येक जिल्ह्यात कृषी केंद्रं असतात, तिथे तुम्हाला उपयुक्त माहिती मिळू शकते आणि कसंय ना जो पर्यंत आयुष्यात risk नाही, तोपर्यंत मजा नाही. काय म्हणता? पटतंय ना!
नवी अर्थक्रांतीच्या स्टार्टअपची या नव्याकोऱ्या सिरीजमध्ये पून्हा एकदा तुमचं स्वागत आहे. स्टार्टअप जगतात असे शब्द जे सर्रास वापरले जातात, पण त्यांचा अर्थ अनेकांना माहिती नसतो. अशाच शब्दांचा अर्थ सोप्या भाषेत या सिरीजमध्य आम्ही तुम्हाला समजावून सांगत असतो.
तर आजचा शब्द आहे (ॲक्वीजिशन)
Acquisition चा साधासोपा अर्थ म्हणजे अधिग्रहण किंवा संपादन करणे.
जर एखादी कंपनी दुसऱ्या एखाद्या कंपनीचा पूर्णपणे किंवा अर्धा किंवा त्यापेक्षा जास्त हिस्सा खरेदी करत असेल, तर त्या प्रक्रियेला Acquisition म्हणतात. ती कंपनी आधीच्याच नावाने आपले काम करत असते. acquisition मध्ये त्या कंपनीचे नाव बदलत नाही, फक्त काही टक्के शेअर्स हे त्यांचे होतात. जरी A या कंपनीने B हि कंपनी खरेदी केली, तरीही त्या दोघांचीही ओळख कमी होत नाही. या टर्ममध्ये दोन्हीही कंपन्यांचे फायदे हे होतातच.
एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीत विलिन होण्यामागे किंवा एखाद्या कंपनीने दुसऱ्या कंपनीचे अधिग्रहण करण्यामागे अनेक उद्देश असू शकतात, जसे की – बाजारहिस्सा एकत्र करणे, फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड इंटिग्रेशन, भौगोलिक अस्तित्व मिळवणे किंवा ग्राहकसंख्या विस्तारणे. साधारणतः एकमेकांत विलीन होणाऱ्या कंपन्यांची क्षमता यामुळे दुप्पट होते. ॲक्वीजिशन दोन प्रकारचे फ्रेंडली म्हणजेच मैत्रीपूर्ण किंवा होस्टाईल म्हणजेच शत्रुतापूर्ण. नुकतीच अदानी समूहाने एका न्यूज चॅनेल विकत घेतला. तो होस्टाईल ॲक्वीजिशनचाच एक प्रकार होता.
आता, तुम्ही म्हणाल, यात फायदा कसा काय? तर आपण लहान असताना एक गोष्ट ऐकली आहे
की, एका माणसाला चार मूलं असतात, तो प्रत्येकाला एक लहान काठी देतो, आणि ती मोडायला सांगतो सगळे जण लगेचच ती काठी मोडतात मग तो प्रत्येकाला एक-एक अशी लाकडाची मोठी मोळी देतो. आणि ती मोडायला सांगतो मात्र ती कोणालाच मोडता येत नाही.ती मूलं थोडा विचार करतात, चौघे एकत्र येतात आणि मग चौघे मिळून लाकडची मोळी सहज मोडतात. हेच ते एकीचे बळ. जर कोणत्याही गोष्टीत एकी असेल तर काहीच अशक्य नाही. हीच एकी आपल्याला acquisition मध्येही पाहायला मिळते. जर अनेक कंपन्या सारख्याच सेवा पुरवत असतील तर तिथे स्पर्धा निर्माण होते. मात्र जर त्याच 2 कंपन्या एकत्र आल्या तर तेथील स्पर्धक संख्या कमी होते. इतकंच नाही तर कंपनीची ग्राहक संख्या देखील वाढते आणि तुमचा ब्रॅंड आणखी स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते.
हे सगळं जरी खरं असलं, Acquisitionचा हेतू साध्य करणं फार अवघड काम आहे. एका रिपोर्टनुसार जगातील ५० टक्के कंपन्यांची Acquisitions फेल झाल्याचं दिसतं.