नवी अर्थक्रांती

Blog

  • भारत ठरला किमयागार, दिला लाखो अमेरिकन लोकांना रोजगार!

    भारत ठरला किमयागार, दिला लाखो अमेरिकन लोकांना रोजगार!

    असे म्हंटले जाते २१ वे शतक हे भारताचे आहे. भारताने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात घेतलेली झेप, स्वदेशीचा मोठ्या प्रमाणात केलेला स्वीकार आणि नवउद्योजकांना भारताने दिलेली चालना या सर्व धोरणांमुळे भारतात आणि भारताबाहेर, भारतीयांची झेप वाढलेली आहे. आजपर्यंत अनेक कारणांसाठी अनेक देशांवर अवलंबून असलेल्या भारताने आता मात्र धाडसी निर्णय घ्यायला सुरवात केली आहे.

    सध्या भारतीय कंपन्या वेगवेगळ्या देशांमध्ये आपली गुंतवणूक वाढवताना आपल्याला दिसत आहेत आणि भारत सरकार त्यांना शक्य ते सर्व सहकार्य करत आहेत. इतकेच नाही नुकतेच भारतात सुरु झालेले ॲपलचे स्टोअर. याआधीच ॲपलने प्रयत्न सुरु केले होते पण भारताच्या बदललेल्या पॉलिसीज ज्यामध्ये भारता बाहेरून भारतात येणाऱ्या कंपन्यांना त्याचे प्रॉडक्टची काही प्रमाणात निर्मिती भारतात करणे बंधनकारक आहे. या पॉलिसीमळे भारतात औद्योगिकरण वेगाने वाढत आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते आहे. भारतीय व्यावसायिकांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे.

    भारतातून एक्स्पोर्ट होणाऱ्या वस्तू आणि पदार्थांना आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जास्त प्राधान्य मिळेल. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रांमध्ये वाढती मागणी पाहून इतर लहान राष्ट्रांमध्ये भारतीय वस्तूंची मागणी अजून वाढू शकते. भारतात तयार होणाऱ्या कच्च्या मालाचे उत्त्पन्न नक्कीच वाढू शकते. त्यासोबतच तंत्रज्ञानाची देवाणघेवाणही मोठ्या प्रमाणात होऊ शकते.

    एका अहवालानुसार १६३ मोठ्या कंपन्यांनी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत या कंपन्यांनी सीएसआरवर १८.५ कोटी डॉलर्स खर्च केले आहेत. अमेरिकेतील विविध संशोधन आणि विकास प्रकल्पांवरही कंपन्यांनी १ अब्ज डॉलरचा निधी दिला आहे. या सगळ्यामुळे अमेरिकेशी भारताचे संबंध अजून जास्त दृढ होणार आहेत. अनेक भारतीय नागरिक अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात IT क्षेत्रात काम करत आहेत त्यांसाठी आंतरराष्ट्रीय संबंध अजून मजबूत होणे फायद्याचे ठरणार आहेत.

    एका आकडेवारीनुसार टेक्सास २०,९०६, न्यूयॉर्क १९,१६२, न्यूजर्सी १७,७१३,  वॉशिंग्टन १४,५२५, फ्लोरिडा १४,४१८, कॅलिफोर्निया १४,३३४, जॉर्जिया १३,९४५, ओहायो १२,१८८, मोंटाना ९,६०३, इलिनॉएस ८,४५४ इतक्या मोठ्या प्रमाणात नोकर भरती झालेली आढळते. अमेरिकेतील भारतीय राजदूत तरनजित सिंह संधू यांनी वॉशिंग्टनमध्ये एका कार्यक्रमात या अहवालाचे प्रकाशन केले. ज्याला भारतीय कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • अती विचाराच्या रोगापासून दूर राहा

    अती विचाराच्या रोगापासून दूर राहा

    एक पालक त्यांच्या ३२ वर्षीय अविवाहित पदवीधर मुलीला घेऊन एक सायकॉलॉजिस्टला भेटायला गेले. कुटुंब सुशिक्षित मध्यमवर्गीय होतं; पण अतिविचारामुळे मुलीचं नोकरी, व्यवसायाचं सोडा, पण लग्नाचं वयसुद्धा निघून गेलं होतं. त्या सायकॉलॉजिस्टनं त्यांना विचारलं की, ‘इतके वर्ष का नाही आलात भेटायला?’ तर म्हणाले, ‘आम्ही विचार करत होतो जाऊया की नको.’

    ज्यांना कुणाला असा ओव्हर थींकिंगचा प्रॉब्लेम आहे, तो लवकर ओळखा, कारण हा पूर्ण आयुष्य बरबाद करणारा खतरनाक विषाणू आहे. याचे सर्वात पहिले लक्षण म्हणजे कोणत्याही गोष्टीला फाटे फोडणे, इतरांना मत विचारणे व त्यावर पुन्हा विचार करणे, नकारात्मक गोष्टींवर जास्त विचार करणे. याचे दुष्परिणाम म्हणजे कोणत्याही अंतिम निर्णयापर्यंत न पोहचणे, त्यामुळे कोणतीही ॲक्शन न घेणे, गोष्टी उगीचच अवघड करणे, सतत भीतीच्या भावनेत राहणे, आत्मविश्वास कमी कमी होत जाणे, डिप्रेशन वाढणे, शारीरिक थकवा वाढणे व हे अती व सतत काही महिने होत राहिल्यास जीवन निरुत्साही होऊन मनोरुग्ण होण्याचीही शक्यता असते.

    ज्याला आयुष्यात उद्योजक व्हायचे आहे, यशस्वी व्हायचे आहे, श्रीमंत व्हायचे आहे, त्याने अतिविचाराच्या रोगापासून दूर रहावे. जे काही करायचं आहे, त्याचा थोडा विचार करा, निर्णय घ्या, झटपट कामाला लागा. हातात काम असेल, तर विचार करायला वेळ मिळत नाही. विचार करत बसला की, हाताला काहीही मिळत नाही, मग आयुष्यभर सुशिक्षित बेकार ही पदवी कायम राहते. त्यामुळे अतिविचार करणे टाळा. काय ते लवकर निर्णय घ्या, ठरवा आणि कामाला लागा. स्वत:चे व इतरांचे डोके खाऊ नका. नाहीतर आयुष्यभर बेकारी व अविवाहितपणा तुमच्या नशिबी नक्कीच आहे. म्हणून रतन टाटा म्हणतात, ‘निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणे, हे सुध्दा कधीकधी अधिक बरोबर ठरते. मी आधी निर्णय घेतो, मग तो खरा ठरवतो.’

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • जीभेवर साखर, डोक्यावर बर्फ, मेंदूत आयडिया, हातात काम

    जीभेवर साखर, डोक्यावर बर्फ, मेंदूत आयडिया, हातात काम

    पहिलं जीभेवर साखर :

    सतत गोड बोलणे, मृदुभाषा, आलेल्यांचे हसतमुखाने स्वागत, चहापान वगैरे इत्यादींमुळे माणसाचे संपर्क वाढतात, संबंध सलोख्याचे बनतात. गोड, मृदु व समजूतदारपणे बोलणार्‍याबरोबर ग्राहकांना व्यवहार करावासा वाटतो. गोड बोलणार्‍या दुकानदाराचे दुकान इतरांपेक्षा निश्चित अधिक चालते. गुड मॉर्निंग, हॅप्पी न्यू ईयर, हॅप्पी बर्थडे, अभिनंदन असे प्रशंसेचे उद्गार काढण्यास किंवा तसा एखादा व्हॉटसअप मेसेज पाठवण्यास काय तोटा होतो? मग गोड बोलण्याची सवय लावून घ्या ना! सतत उद्धट भाषा, शिवीगाळ, वादविवाद, चिडचिड अशा प्रकारच्या वागण्याने माणूस कधीही जीवनात पुढे जाऊ शकत नाही.

    दुसरी डोक्यावर बर्फ :

    उद्योग तर सोडा, पण आता सर्वसामान्य जीवनसुध्दा प्रचंड तणावाचे झाले आहे. आयुष्यात येणार्‍या ताणतणावाच्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी व त्यातून मार्ग काढण्यासाठी डोके अतिशय शांत असणे महत्वाचे आहे. मोबाईल तापला की हँग होतो, तसे डोके गरम झाले की बुध्दी चालत नाही आणि बुध्दी चालायची बंद झाली झाली की सगळं संपलं. तेव्हा डोक्यावर बर्फ ठेवूनच जीवनात व व्यवसायात वावरले पाहिजे, तरच तुमची आयुष्यात प्रगती होत जाईल. तापट स्वभावाच्या माणसाचा काही दिवसात सत्यानाश होऊन तो शेवटी मागे पडून गरिबीच्या खाईत लोटला जातो.

    तिसरी मेंदूत आयडिया :

    आयुष्यात श्रीमंत होण्यासाठी केवळ पारंपारिक पध्दतीने जगणे आता कालबाह्य झाले आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी सतत नवीन नवीन आयडियांचा विचार केला पाहिजे. कोणत्या प्रोडक्ट, सेवांमध्ये चांगला फायदा आहे, भविष्यात कोणत्या जागांचे भाव वाढतील, मार्केटिंग करताना काय करावे म्हणजे फायदा वाढेल, कोणत्या व्यक्तीशी संपर्क कुठे व कसा साधावा म्हणजे आपणास फायदा होईल, कोणत्या कंपनीची एजन्सी घ्यावी म्हणजे फायदा होईल, ई-कॉमर्स, इंटरनेटच्या माध्यमातून काय करता येईल का? असे मेंदूत सतत आयडियांचे मंथन सुरू पाहिजे.

    चौथी हातात काम :

    श्रीमंत होणार्‍या व प्रचंड यशस्वी होणार्‍या व्यक्तीचे एक वैशिष्ट्य म्हणजे सकाळी ६ वाजता उठल्यापासून ते रात्री १२ वाजता झोपेपर्यंत त्यांच्या हाताला काही-ना-काही काम असते. आपला व्यवसाय, व्यवहाराचा व्यापच येवढा पाहिजे, की तुम्हाला सतत काम असले पाहिजे. प्रत्येक यशस्वी उद्योजक एकाच वेळी १० हून अधिक वेगवेगळे व्यवसाय सांभाळतात. हातात काम नसणे म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या मृत व्यक्तीचे लक्षण आहे. ज्यांच्या हाताला आज काम नाही म्हणजे, तो लवकरच मार्केट बाहेर पडून होऊन मागे पडेल. काम नसेल तर काम शोधून काढले पाहिजे :

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • कंजूषपणामुळे व्यवसायात होतं मोठं नुकसान

    कंजूषपणामुळे व्यवसायात होतं मोठं नुकसान

    एका गावात एक जनरल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर होते. गेली ३ ते ४ वर्ष त्यांचा व्यवसाय नीट चालत नव्हता. रोजचे पेशंट ५० ते ६० वरुन फक्त २० ते २५ वर आले होते. त्यांचे वय ५०च्या पुढे होतं. तसं म्हणावं, तर ते मागच्या पिढीचे डॉक्टर. त्यांच्या आजूबाजूला नवीन डॉक्टरांचे दवाखाने सुरू झाले होते, त्यांचे दवाखाने चालायला लागले, पण यांचा धंदा कमी झाला होता. आजूबाजूच्या इतर डॉक्टरांचे क्लिनिक पाहिलं तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येत होती, ती म्हणजे हे महाशय नको तेवढे कंजूष होते. तपासणीचा टेबल, बसण्याचं बाकडं, खुर्च्या त्याच २० ते ३० वर्षापूर्वीच्या. रिसेप्शनिस्टसुध्दा एकदम लो प्रोफाईल. त्यांना धड चांगल्याप्रकारे संवादही साधता येत नव्हता. त्या बऱ्याच वेळी घरच्या कामानिमित्त गैरहजर असत. कमी पगारात काम करते म्हणून त्याच रिसेप्शनिस्टला ठेवलं होतं. क्लिनिकमध्ये पेपर नाही, की पाणी पिण्याची सोय नाही, आरोग्याशी संबंधित माहिती देणारे पोस्टरही नाहीत.

    क्लिनिकमध्ये एखादी एखादी तपासणीची आधुनिक मशीन आणलीत तरी फरक पडतो. साधा ॲप्रन स्वत: व रिसेप्शनिस्टला वापरायला दिला तरी फरक पडतो. औषध ठेवण्याचा चांगला रॅक, बाहेर चांगली पोस्टर्स, चांगले इंटेरिअर करून क्लिनिकला जाणारा डॉक्टर समाजाच्या दृष्टीने हुशार असतो, प्रत्यक्षात कदाचित वेगळंही असू शकतं. पण तो व्यवसायाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे व्यवसायाची जागा अधिक आकर्षक कशी दिसेल याचा विचार करा आणि तसे बदल करा. 

    हा लेख विडीयो मध्ये पहा

  • एकेकाळी फुकट वाटूनही न खपणारा कोका-कोला आज १९३ देशांत विकला जातोय.

    एकेकाळी फुकट वाटूनही न खपणारा कोका-कोला आज १९३ देशांत विकला जातोय.

    प्रत्येक गोष्टीला एक इतिहास असतो. एकदा सुरू झालेली गोष्ट लगेच यश मिळवते असे नाही त्यासाठी संयम, कठीण परिश्रम आणि अपयश पचविण्याची ताकद असणे महत्वाचे असते.

    आणि त्यांनी एसा ग्रिग्स कॅडलर यांना केवळ 2300 डॉलर ने कंपनीचे सगळे हक्क विकले.

    आणि त्यांनंतर  एसा ग्रिग्स कॅडलर यांनी कोका कोलाची रेसीपी बदलली. कोकेन काढून त्यांनी त्यात साखरेचे प्रमाण वाढविले. आणि त्याचवेळी बाजारात कोका कोलाचा प्रतिस्पर्धी तयार झाला. तो म्हणजे पेप्सी. कोका कोलच्या मागून आलेला पेप्सी ब्रॅंड देखील लोकांच्या पसंतीस उतरला.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • भाग १ – शिकण्याचे मुलभूत घटक – शिक्षणाचे महत्त्व

    भाग १ – शिकण्याचे मुलभूत घटक – शिक्षणाचे महत्त्व

    एखाद्या माणसाकडे एकूण किती कौशल्ये आहेत त्यावर त्याचे जीवनशाळेतील शिक्षण ठरते. एकाच व्यक्तीला पोहायला येते, दुचाकी-चारचाकी चालवता येते, उत्तम स्वयंपाक बनवता येतो, चांगले भाषण देता येते, संगणक चालवता येतो, त्याचे आरोग्य उत्तम आहे अशी जेवढी जास्त कौशल्ये प्राप्त असतील तेवढा तो जास्त यशस्वी होण्याच्या शक्यता निर्माण होतात. त्याने मिळवलेली कौशल्ये सध्या काम करत असलेल्या क्षेत्राशी संबंधित असल्यास अत्युत्तम ठरते. आपल्याला ज्या गोष्टी येत नाहीत. त्या गोष्टी साध्य करुन घेण्याची कला हा सुध्दा शिक्षणाचाच एक भाग आहे. 

    The Importance of Education

    माणसाला चारित्र्य घडवणारे, बुध्दीचा विकास करणारे, स्वतःच्या पायावर उभा करणारे शिक्षण आपल्याला हवे आहे. माणसाला माणूस बनवणारे शिक्षण आपल्याला हवे आहे. खऱ्या अर्थाने जीवन समृध्द बनवणारे शिक्षण आपल्याला हवे आहे. म्हणजे काय? तर जीवनातील आपल्याला आवश्यक त्या सर्व गोष्टी साध्य करण्याची गरज शिक्षणातून पूर्ण झाली पाहिजे. सामाजिक, आर्थिक, आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, समाधान, आनंद, भौतिक गरजा, मनःशांती व नातेसंबंध या सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात प्राप्त करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. 

    समजा एखाद्याने खूप सारा पैसा कमावण्यात आयुष्य खर्च केले व त्या नादात आरोग्याची हानी करुन घेतली तसेच कुटुंबातील व्यक्तींसाठी सुध्दा वेळ दिला नाही. तर त्याच्या आयुष्यातील एक बाजू पूर्ण करण्याच्या नादात दुसरी बाजू अपूर्णच राहून गेली किंवा एखाद्याने खूप सगळी माहिती गोळा करण्यात आयुष्य व्यतीत केले त्यावर काम करुन ती माहिती अस्तित्वात आणण्यासाठी त्याच्याकडे वेळ शिल्लक राहिला नाही, तर त्या माणसाची सुध्दा आयुष्याची एक बाजू अपूर्णच राहून गेली. एखाद्या विद्वानाने आयुष्यात खूप काही विद्या प्राप्त केली. त्या नादात त्याने आयुष्यातील इतर गोष्टीकडे दुर्लक्ष केले. कमालीच्या आर्थिक दारिद्र्याचा सामना करत आयुष्य कंठित केले. एखाद्या पैलवानाने आयुष्यात खूपच चांगले आरोग्य कमावले मात्र व्यवहार चातुर्य आत्मसात करण्यात अपयशी ठरला त्याच्या सुध्दा आयुष्यात एक गोष्ट अपूर्णच राहिली. बराक ओबामांनी दोनवेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद भूषविले. राष्ट्राच्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी कुटुंबासाठी सुध्दा वेळ दिला. 

    एका माणसाने आयुष्य भर फार पैसा कमावला व प्रचंड काटकसर करत त्या पैशाचा आनंद न घेताच मरुन गेला. तर दुसऱ्या एका माणसाने आयुष्यभर जेवढा पैसा कमावला तेवढा तो उधळला, नको तसा खर्च केला व म्हातारपणी कर्जबाजारी व आर्थिक हाल करत जगला. त्याउलट एका माणसाने पैसाही कमावला, आवश्यकतेनुसार त्याचा वापर केला, त्याचे नियोजन व बचत सुध्दा केली. त्याचे आयुष्य समाधानात पूर्ण झाले. आयुष्यात सर्व गोष्टीचा सुवर्ममध्य साधण्याचे तारतम्य शिक्षणातून प्राप्त होते.

    The Importance of Education
  • आर्थिक चुकांचा आढावा आणि नवसंकल्प

    आर्थिक चुकांचा आढावा आणि नवसंकल्प

    त्याचप्रमाणे नव्या वर्षी आपल्याकडील रोखता प्रवाह असा ठेवू ज्यामुळे आयकर कमी लागेल. आपण अधिक गुंतवणूक करू शकू असा संकल्प करूया, ज्या योगे येणारे वर्ष भरभराटीचे जाईल. बाजाराचा कल सातत्याने बदलत असतो. आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नात प्रतिवर्षी वाढ होत असते.

    हातात खेळत असणाऱ्या पैशांनुसार आपल्या इच्छा, गरजा आणि अपेक्षाही बदलत असतात. करविषयक नियमही थोडेफार बदलत दरवर्षी असतात, त्याचप्रमाणे गुंतवणूकीच्या नव्या संधी उपलब्ध होत असतात. डिसेंबर हा महिना असा आहे जेथे शांतपणे थोडं थांबून निरोप देत असलेल्या वर्षाचा आपण आढावा घेऊ शकतो. केलेल्या आर्थिक चुकांचे विश्लेषण करू शकतो. नवीन वर्ष किंवा त्या पुढील काळासाठीचे घेय्य निश्चित करू शकतो.

    पूर्वी केलेले संकल्प ठरवलेली उद्दिष्ट योग्य आहेत की त्यात बदल करावा, याकडे त्रयस्थ नजरेने पाहू शकतो. सर्वसाधारणपणे बाजाराची दिशा कशी आहे, ती आपल्या मानसिकतेस अनुकूल आहे की प्रतिकूल, यात जोखीम कशी आणि किती याचा विचार करून पुढील वर्षातील गुंतवणूक संधी कोणत्या असतील याचा अंदाज बांधता येईल. त्या क्षेत्रात आपली गुंतवणूक वाढवता येईल का, ते ठरवता येईल. जिथे काहीतरी अभ्यास करून अंदाज बांधावा लागतो तेथे चुका होणं अगदी साहजिकच आहे पण त्या कमीत कमी कशा होतील, एकाच प्रकारच्या चुका वारंवार होत असतील तर त्या टाळता कशा येतील, यावर आपली प्रगती होऊ शकते. यादृष्टीने गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या सर्वसाधारण चुकांचा आणि त्यावरील उपाययोजनांचा एक धावता आढावा घेऊयात-

    ★ कोणत्याही उद्दिष्टाशिवाय केलेली गुंतवणूक:

    अनेकदा कोणतेही धेय्य न ठेवता गुंतवणूक केली जाते, यात आपलेच नुकसान होण्याची शक्यता जास्त असते कारण अशी गुंतवणूक ही त्या वेळेची बाजारातील स्थिती लक्षात घेऊन म्हणजेच अल्पकालीन स्थितीचा लक्ष्यात घेऊन केलेली असते. ती गरजेला आपल्याला उपयोगी पडेलच याची खात्री देता येत नाही कारण उद्दिष्टचं नसल्याने नेमकी किती गुंतवणूक किती काळासाठी आणि कुठे करायची याचा विचारच केलेला नसतो. गुंतवणूक ही जाणीवपूर्वक त्यातील धोका स्वीकारून त्यातून मिळणारा परतावा हा इतर धोकारहित योजनांत मिळत असलेल्या परताव्याहून अधिक असावा या हेतूनेच केलेली असते, हेच त्यामागील प्राथमिक तत्व आपण विसरून जातो. आपलं उद्दिष्ट हे,

    S M A R T म्हणजेच-

    Specific निश्चित,

    Measurable मोजता येणारे,

    Achievable शक्य असणारे,

    Relevant संबंधित,

    Time-bound विशिष्ट कालमर्यादेत

    असावं असं गुंतवणूक तज्ञांचं मत आहे. म्हणजे नेमकं काय आहे समजून घेऊनच मागील गुंतवणूकीचा आढावा घ्यावा आणि नवीन वर्षात गुंतवणूक करण्याचा विचार करावा. याच दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या सर्वसाधारण चुका आणि त्यावरील उपाययोजनांचा विचार करूयात-

    ★ आपत्कालीन खर्चाची तरतूद नसणे:

    प्रत्येकाच्या जीवनात काहींना काही संकटे येत असतात यावर मात करण्यासाठी काहीतरी योजना असावी लागते. या वर्षात अशी काही संकटं आपल्यावर आली का, तेव्हा आपण काय केलंत, तेव्हा आपल्याकडे पुरेशी तरतूद होती का,आठवून पहा कोणती संकटं आली ती? नोकरी गेली, कुणीतरी गंभीर आजारी पडलं, गाडी बिघडली ती दुरुस्त करण्यासाठी मोठा खर्च करावा लागला. घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू एकापाठोपाठ एक बिघडल्याने नवीन घ्याव्या लागल्या. हे आपण टाळू शकत नाही यासाठी पुरेशी तरतूद नसेल तर उधार उसनवार करावी लागते, कर्ज घ्यावं लागतं, मालमत्ता विकावी लागते. यामुळे आपल्या आर्थिक परिस्थितीत प्रगती होण्याऐवजी आपण दोन पावलं मागे जातो कदाचित क्रेडिट कार्डसारख्या महाग कर्जाच्या सापळ्यात अडकतो. असा काही प्रसंग आपल्यावर आला का? यासाठी आपला किमान घरखर्च 12 महिने चालेल असा आपत्कालीन फंड आपल्याकडे हवा. तो नसल्यास असा फंड कसा निर्माण करता येईल या दृष्टीने नववर्षाचा विचार करावा.

    ★ निवृत्ती नियोजनासाठी लवकरात लवकर तरतूद करण्याची आवश्यकता न वाटणं:

    आपण जसे आयुष्य आज जगत आहोत तसेच आयुष्य आपल्या निवृत्तीनंतर याच जीवनशैलीच्या जवळपास असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठी लवकरात लवकर गुंतवणूक करावी लागते ही गुंतवणूक आपण जितक्या लवकर (शक्यतो उत्पन्न मिळवायला लागल्यावर दोन महिन्यात आणि उत्पन्नाच्या दहा टक्के) करू तेवढी कमीतकमी करावी लागते आणि त्याच्या चक्रवाढीचा फायदा आपल्याला मिळतो. हे करण्यासाठी जेवढा विलंब तेवढी गुंतवणूक रक्कम वाढवावी लागते.

    ★ आयकर कायद्याच्या संबंधित चुका:

    अनेकदा आयकर, अग्रीमकर आयकर विवरणपत्र वेळेवर न भरणं यामुळे आपल्याला दंड भरावा लागतो काही सवलती सोडून द्याव्या लागतात. कर वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणी धावपळ केल्यास त्याचा आर्थिक ताण पडू शकतो. तेव्हा यासाठीची निश्चित योजना बनवून ठेवावी.

    ★ आपल्या गुंतवणूक संचाचा आढावा न घेणे:

    गुंतवणूक संचाचा वेळोवेळी आढावा घेऊन तो आपल्या घोरणानुसार अपेक्षित परतावा देत आहे की नाही ते पाहून त्यात योग्य ते बदल करणं हे उत्तम गुंतवणूकदाराचं लक्षण आहे. जर एखादी गुंतवणूक अपेक्षित परतावा देत नसेल तर थोडाफार तोटा सहन करून त्यातून वेळीच बाहेर पडणे आवश्यक असतं. असा आढावा वर्षातून किमान दोनदा तरी घ्यावा.

    ★ महाग कर्जाचा बोजा कमी न करणे:

    गृहकर्जाचा अपवाद सोडल्यास कोणतेही कर्ज लवकरात लवकर फेडणे कधीही चांगले. अनेकदा गुंतवणूक करण्याच्या नादात महाग कर्ज फेडलं जात नाही. कर्ज काढून गुंतवणूक करणं हे आर्थिक मागासलेपणाचं लक्षण आहे यामुळे व्याजाचा बोजा तर वाढतोच पण गुंतवणूकीतून अपेक्षित परतावा न मिळाल्यास दुहेरी नुकसान होतं. जेव्हा गुंतवणूकीतून व्याज देऊन अधिक परतावा मिळवण्याची हमखास खात्री असल्यास असे धाडस करावे, शक्यतो अशी नसती उठाठेव करू नये.

    ★ जीवनविमा, मेडिक्लेमकडे दुर्लक्ष करणं:

    आयुष्य अशाश्वत असल्याने कुटुंबातील कमावती व्यक्ती मरण पावल्यास पूर्ण आर्थिक घडी विस्कटते त्यासाठी जीवनविमा असतो. सातत्याने वाढणाऱ्या वैद्यकीय खर्चामुळे घरातील एखाद्या सदस्यास एखाद्या गंभीर आजाराशी सामना करायला लागल्यास मोठा आर्थिक फटका बसतो. जीवनविमा आणि आरोग्यविमा यासाठी करावा लागणारा खर्च त्यात असलेल्या जोखमीची किंमत समजावी. पुरेशा रकमेचा विमा घेऊन त्याचे वेळेवर नूतनीकरण करावे.

    ©उदय पिंगळे

    अर्थ अभ्यासक

    (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते आणि मध्यवर्ती कार्यकारी मंडळाचे सदस्य असून महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक समजावी)

    आणखी वाचा

  • जे तराजू चालवतील, तेच संपत्ती कमवतील

    जे तराजू चालवतील, तेच संपत्ती कमवतील

    इतिहास काय सांगतो, ‘जे तलवारी चालवतील, ते तलवारीने मरतील, जे डोकं चालवतील, ते जगावर राज्य करतील; तसेच जे तराजू चालवतील, ते संपत्ती कमवतील.’ मित्रहो, आजही तेच दिसतंय. पुस्तकं वाचणारे बुद्धीवादी सरकारमध्ये आहेत, तराजूवाले त्यांना पैसे पुरवतात आणि तलवारीची भाषा करणारे अजून मोर्चे व आंदोलन करत आहेत. यात मराठी माणूस कुठे आहे याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. तराजूवाले, आज देशातील उद्योग क्षेत्रात मुख्यतः यांचेच वर्चस्व दिसून येते, कारण हे लोक पिढ्यानपिढ्या उद्योग क्षेत्रात आहेत. स्वतःचा उद्योग कसा यशस्वी करायचा, याचाच विचार ते करतात आणि परिणामी ते यशस्वी होतात. त्यांची मुलेदेखील याच क्षेत्रात येताना दिसतात. हे पिढ्यानपिढ्या चालू राहणार. यात मराठी माणसे आहेत ती केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकी.

    आजकाल सोशल मीडियावर आपण शिवाजी महाराजांबद्दल पोस्ट टाकून आपण मराठी असल्याचे अभिमानाने सांगतो. स्वतःला त्यांचे वारस समजतो; परंतु शिवरायांनी नुसती तलवार नाही चालवली, तर बुध्दी चालवली. त्यांचे राजकीय डावपेच आणि गनिमी काव्यापुढे त्यांचे सर्व शत्रू हतबल झाले होते हे विसरू नका. केवळ आपली बुध्दी व दूरदृष्टीच्या साहाय्याने त्यांनी इतिहास घडवला. आजही त्यांना मॅनेजमेंट गुरु म्हणून संबोधले जाते. हा इतिहासाचा भाग आतातरी मराठी तरुणांना समजेल का? अनेकांच्या व्हॉटसअप प्रोफाईलवर तलवारीचा फोटो असतो, तेव्हा असे वाटते की अजून यांच्या डोक्यात तलवारच आहे. त्यांच्या डोक्यात बुध्दी आणि पैसा यावा हीच शिवरायांचरणी प्रार्थना.

    आज तलवारीपेक्षा पैशाची धार जास्त आहे. ज्याच्याजवळ पैसा त्याचीच जास्त पॉवर. यामध्ये बहुतांशी उद्योजक आहेत. आज मराठी तरुणांनी देखील उद्योग क्षेत्रात उतरणे गरजेचे झाले आहे. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर यश मिळवण्यासाठी केलात, तर तुमचेच भले होईल. आपल्याकडे एक म्हण आहे, “उद्योगीला महापूर, आळश्याला गंगा दूर.”

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता

    फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता

    गरुडाचे जीवनमान ७० वर्षांचे असते, परंतु तो जेव्हा ४०वर्षांचा होतो, तेव्हा त्याला एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो.त्या अवस्थेत त्याच्या शरीराचे 3 महत्वाचे अवयव निष्प्रभ होऊ लागलेले असतात, पंजे लांब आणि लवचिक होतात ज्यामुळे शिकार पकडता येत नाही. चोच पुढील बाजूला वळते, ज्यामुळे भोजन करता येत नाही. पंख जड होतात व छातीस चिकटल्यामूळे पूर्णपणे उघडत नाहीत, त्यामुळे गरुडभरारी सीमित करतात. अन्न शोधणे, सावज पकडणे, अन्न खाणे या तिन्ही क्रिया त्याच्यासाठी अवघड बनून जातात. अशावेळी त्याच्याकडे तीन पर्याय असतात. एक तर प्राण त्याग करणे आणि दुसरा आपली प्रवृत्ती सोडून गिधाडाप्रमाणे मृत अन्नावर गुजराण करणे आणि तिसरा पर्याय असतो आकाशाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून स्वतःला पुनर्स्थापित करणे!

    १५० दिवसाचा त्रास आणि प्रतिक्षेनंतर त्याला मिळते त्याची गरुडभरारी, यानंतर तो 30 वर्षे जगतो, ताकदीने आणि अभिमानाने!

    याच प्रकारे मानवाच्या आत्मविश्वास, सक्रियता आणि कल्पनाशक्ती या तिन्ही शक्ती दुर्बल होऊ लागतात. तेव्हा आपणही भूतकाळात अडकलेल्या बंधक अस्तित्वाचा त्याग करून कल्पनेची मुक्त उड्डाणे घेतली पाहिजेत!

    150 दिवस नाही, 60 दिवस द्या स्वतःला पुनरुज्जीवित करण्यासाठी! जे शरीराला मनाला चिकटलेले आहे, ते तोडताना आणि उचकटून काढताना यातना तर होणारच! पण त्यानंतर जी उड्डाणं असतील ती उंच, अनुभवी आणि अनंताकडे झेपावणारी असतील!

    दररोज काही चिंतन करत रहा, तुम्ही असे एकमेव व्यक्ती आहेत, जे स्वतःला परिपूर्ण ओळखता आणि तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता, गरज आहे ती लहान लहान गोष्टीतून बदलाची सुरुवात करण्याची.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • करिअरची झेप अंतराळापर्यंत

    करिअरची झेप अंतराळापर्यंत

    12वी झाली आता पुढे काय करू हा सगळ्या विद्यार्थ्यांचा ठरलेला प्रश्न. पण तुम्हाला जर विज्ञानात रस असेल, तर आजच्या लेखातून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेल.

    आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे माणूस भूगर्भापासून ते अंतराळातील कृष्ण-विवरांपर्यंत प्रत्येक गोष्टीत नावीन्य आणि नवीन काहीतरी शोध लावण्यात, संशोधन करण्यात तरबेज झाला आहे. या तंत्रज्ञानामुळेच करिअरचे नव-नवे पर्याय निर्माण झाले आहेत. त्यातीलच एक पर्याय म्हणजे Career In Space Science. तुम्हाला जर अंतराळ विश्वात रमायला आवडत असेल, तर तुम्ही स्पेस सायन्समध्ये उत्तम करिअर करू शकता.

    पूर्वीसारख्या अंतराळ विज्ञानात आता केवळ खगोलशास्त्रज्ञ आणि अंतराळवीर बनणं फक्त एवढ्याच संधी उपलब्ध नाहीत, तर स्पेस इंजिनीअरिंग, स्पेस रिसर्च, स्पेस लॉ, स्पेस टुरिझम, स्पेस टेक्नोलॉजी असे अनेक पर्याय आहेत.


    Astronomers

    खगोलशास्त्रज्ञ: विज्ञानाच्या दृष्टीने अवकाश अजूनही कधीही न सुटणारे कोडे आहे. अनेक देशांचे शास्त्रज्ञ अवकाशाचा शोध घेण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. खगोलशास्त्रामध्ये सूर्यमाला, तारे, आकाशगंगा, ग्रह इत्यादींचा समावेश होतो. हे शास्त्रज्ञ जमिनीवरून संशोधन करून तिथे घडणाऱ्या विविध घटना जाणून घेत असतात, त्यावर अभ्यास करत असतात.


    Astronauts

    अंतराळवीर : अंतराळवीरांबद्दल जवळपास सर्वांनाच माहिती असते, हे असे लोक असतात जे अंतराळात फिरून आपली स्वप्ने पूर्ण करतात. स्पेस स्टेशनवर राहून संशोधन करणे हे त्यांचे काम असते. कल्पना चावला, सुनीता विल्यम असे अंतराळवीर आणि त्याची अभिमानास्पद कार्य आपल्याला माहितीच आहेत. तुम्ही देखील स्पेस सायन्समध्ये करिअर करून अंतराळवीर बनू शकता.


    Space Engineer

    स्पेस इंजिनीअरिंग : आता इंजिनीअर म्हणून तुम्ही केवळ आयटी कंपन्यांमध्येच काम करू शकता असे नाही, तर तुम्ही अंतराळाचा देखील वेध घेऊ शकता. अंतराळ मोहिमेशी संबंधित सर्व उपकरणं डिझाइन करणे हे स्पेस इंजिनिअरचे मुख्य काम असते. एरोस्पेस, रोबोटिक्स, मटेरियल सायन्स, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग तसेच मेकॅनिकल आणि टेलिकॉम इंजिनीअरिंग अशा अनेक क्षेत्रातील इंजिनीअर्स स्पेसमध्ये काम करु शकतात. 


    Space Technology

    स्पेस टेक्नॉलॉजी: यामध्ये मुख्यतः सॅटेलाइट, स्पेस स्टेशन, स्पेसक्राफ्ट, स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर, अंतराळ युद्धात गुंतलेली विविध उपकरणे, इक्विपमेंट डिझाईन करण्याचे काम केले जाते. 


    Space Research

    स्पेस रिसर्च: विज्ञान म्हटलं की शोध, संशोधन हे आलेच आणि अंतराळ हे असे क्षेत्र आहे, ज्यामध्ये संशोधकाला वेगवेगळ्या गोष्टी अभ्यासता येतात. अवकाश संशोधनात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग असतो. जसे – खगोलभौतिकशास्त्रज्ञ, खगोलजीवशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, जैवरसायनशास्त्रज्ञ, जैवभौतिकशास्त्रज्ञ. आणि हे सर्वजण आपापल्या पद्धतीनुसार अंतराळातील गोष्टींवर काम करत असतात.


    Space Law

    स्पेस लॉ: स्पेस लॉ हा अंतराळ अंतर्गत क्षेत्राशी संबंधित कायदा आहे. यामध्ये देश आणि कंपन्यांमधील करार, संधी, अधिवेशनं आणि संघटना यांच्या नियमांची माहिती मिळते. आजच्या काळात अवकाशात माणसाने ज्याप्रकारे विस्तार केला आहे, ते पाहता स्पेस लॉ करिअरचा चांगला पर्याय ठरू शकतो.


    Space Tourism

    स्पेस टुरिझम: कोणाला अवकाशात फिरायला आवडणार नाही. 2030 पर्यंत अंतराळवीरच नाही, तर तुम्ही आम्ही देखील अंतराळ सफर करू शकतो अशी घोषणा ईस्त्रोने केली आहे. त्यामुळे भारत स्पेस टुरिझम मॉडेलवर जोरदार काम करत आहे. यामध्ये व्हर्जिन गॅलेक्टिक, ब्लू ओरिजिन, ओरियन, स्पेसएक्स, ओरियन स्पॅन आणि बोईंग यांसारख्या खासगी विदेशी कंपन्या या क्षेत्रात खूप पुढे गेल्या आहेत. त्यामुळे स्पेस टुरिझम क्षेत्र तुमच्या करिअरसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतं.

    मग कशी वाटली आजची माहिती? कमेन्ट बॉक्समध्ये नक्की कळवा…