कुटुंबीयांचा पाठिंबा की विरोध ? व उपाय

महाराष्ट्रात जन्माला आलेल्या माणसाने पिढ्यानपिढ्या उद्योग केल्याची उदाहरणे जवळपास नाहीतच. काही वर्षापूर्वीपर्यंत मराठी माणूस हा एकमेकांचे पाय खेचण्यातच धन्यता मानतो असा ठाम समज होता. मात्र आता तो काही प्रमाणात का होईना मोडून निघत आहे. महाराष्ट्राने वारंवार दिग्गज व्यावसायिक दिले आहेत. त्यातील कित्येक व्यावसायिकांची नावे देखील आज आपल्याला माहिती नसतील, पण त्यांचे कर्तृत्व आपण नाकारु शकत […]
लेख ७.२ – बिझनेस प्लॅन कसा तयार करावा?

व्यवसायाचा आत्मा असणारा बिझनेस प्लॅन आता अंतिम टप्प्यात आला आहे. यानंतर भांडवलदारांची/गुंतवणूकदारांची यादी तयार करुन लगेच त्यांना आपला बिझनेस प्लॅन व संपूर्ण प्रकल्प अहवाल (डीपीआर) या दोन प्रभावी ब्रम्हास्त्रांनी भांडवल निर्मितीसाठी वेगवान पावले उचलता येतात. काल चार टप्प्यांचा आपण अभ्यास केल्यानंतर आज उरलेल्या सर्व टप्प्यांची प्रक्रिया पाहू या. ५. स्पर्धक – आपण करत असलेल्या उत्पादनांची […]
स्मार्ट गुंतवणूकदार – मनोगत

जगभरातील प्रत्येक माणसाचे आकर्षण व कुणालाही (अगदी तुरळक लोक वगळून) न समजणारे क्षेत्र म्हणजे शेअर बाजार. गुंतवणूकीतून भरपूर पैसा कमावता येतो. खरेदी विक्रीतून सुध्दा प्रचंड कमाई होते, मात्र या आर्थिक साधनाकडे बघण्याचे दृष्टीकोन प्रत्येक व्यक्तीनुरुप बदलतात. काहीजणांचे समज, काहीजणांचे गैरसमज, काहीजणांची भीती, काहीजणांची हाव, काहीजणांचा अतिउतावळेपणा इत्यादी घटकांवर हे शेअर मार्केट हलत असते. जगभरातील आर्थिक […]
बिझनेस प्लॅन कसा तयार करावा?

बिझनेस प्लॅन हा प्रत्येक व्यवसायाचा आत्मा आहे आणि Finance is the blood of organization म्हणजेच पैसा/भांडवल हे संस्थेचे रक्त आहे असे म्हणतात. जसे शरीरात रक्त नसले किंवा त्याचे प्रमाण कमी झाले तर शरीर काम करण्यास असमर्थ ठरते. त्याचप्रमाणे भांडवल/पैसा नसणाऱ्या संस्था सुध्दा कार्य करण्यास असमर्थ ठरतात. म्हणून या पैसारुपी रक्ताचा मुबलक प्रमाणात पुरवठा करण्यासाठी बिझनेस […]
बिझनेस प्लॅन जरुरी आहे का?

जगातील सर्व देशांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की, काही देश प्रगत, काही देश विकसनशील तर काही देश मागास आहेत. त्यांच्या एकूण परिस्थितीचा आढावा घेतला असता काही अनुमान काढण्यात आले ते असे होते. प्रगत देशामध्ये वयाची ४० वर्षे ओलांडलेले नागरिक हे देशातील नवयुवकांना व्यवसायासाठी मदत करतात, तर विकसनशील देशात चाळिशी ओलांडलेले लोक काहीही न करता […]
कार्यक्षेत्र कसे ठरवावे? – व्यवसाय लोकल ठेवायचा कि ग्लोबल करायचा हे कसं ठरवावं.

व्यवसाय करत असताना आपली उत्पादने (वस्तू/सेवा) आपण मार्केटमध्ये कोणकोणत्या ठिकाणी पोहोचवू शकतो? किती वेळेत व किती लवकर पोहोचवू शकतो? ग्राहकांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी ती उत्पादने वेळेत त्यांच्या हातात मिळतील का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आपल्या व्यवसायाचे कार्यक्षेत्र ठरविण्यासाठी मदत करतात. आपले कार्यक्षेत्र ठरवल्यामुळे आपले ग्राहक व आपण यामध्ये एक नातेसंबंध तयार होत असतो. ग्राहकाच्या […]
उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी

उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी खालील १० गोष्टी लक्षात ठेवा. १. आर्थिक सुरक्षिततेची योजना तयार करा. २. पुढे कोणती पावले उचलायची आहेत याची माहिती मिळवा. ३. अशी बिझनेस आयडिया शोधून काढा जी यशस्वी होईल. ४. चांगल्या मार्गदर्शक किंवा सल्लागाराची मदत घ्या ५. यशस्वी होण्यासाठी ध्येयधोरणे आखा. ६. आत्मविश्वास वाढवा. ७. चांगले सहकारी तयार करा. ८. भविष्यातील […]
व्यवसाय कोणता ?- व्यवसाय करायचा म्हणजे स्वतःची फॅक्टरी पाहिजे, दुकान पाहिजे या कल्पना आता मागे पडत चालल्या आहेत.

आतापर्यंत जगात जेवढे व्यवसाय सुरु झाले आहेत. त्यापैकी बहुतांशी व्यवसाय हे माणसांचा वेळ, श्रम व पैसा या तिन्हीपैकी एक किंवा अधिक गोष्टीची बचत करतात म्हणून ते व्यवसाय चालू असतात. मोबाईल आले त्यामुळे लोकांना पत्राद्वारे संपर्क करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत बचत झाली. वाहतुकीच्या साधनामुळे लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारे श्रम वाचले. याबरोबरच या तीन गोष्टींची […]
व्यवसाय विषयक सल्ला उठसुठ कोणालाही विचारू नका अशाच लोकांचा सल्ला घ्या, जे त्याची योग्य उत्तरे देतील

व्यवसाय करण्यासाठी ज्ञान, माहिती, अनुभव, भांडवल, मनुष्यबळ, यंत्रे व तंत्रज्ञान या गोष्टी लागतातच. या सर्व गोष्टीबरोबर लागणारी एक सर्वात महत्त्वाची व न दिसणारी गोष्ट म्हणजे व्यवसायासाठीची मानसिकता ही होय. व्यवसाय करण्याची वृत्ती किंवा मानसिकता ही स्वतःमध्ये असावी लागते किंवा ती नसली, तर स्वतःहून निर्माण करावी लागते. बाहेरुन पुरवठा करण्याची ही गोष्ट नाही. व्यवसाय करण्याची मानसिकता […]
व्यवसायाच्या वाटेवर चालताना – सुरुवात करण्यापूर्वी काय?

व्यवसायाचे गमभन (ABCD) माहित नसलेले, पण व्यवसाय करण्याची इच्छा असणारे शेकडो तरुण असे काही प्रश्न विचारतात, “मला व्यवसाय करायची इच्छा आहे, तुम्ही मला कोणता व्यवसाय करावा हे सुचवा?”, “माझ्यासाठी कोणता व्यवसाय योग्य राहील?”, “सध्या कोणता व्यवसाय केला, तर चांगला फायदा होतो?”, “कमीत कमी भांडवलात सुरु होणारा कोणता व्यवसाय मी करु?”, “जोखीम (रिस्क) कमी असणारा व्यवसाय […]
व्यवसायाच्या वाटेवर चालताना – प्रस्तावना

महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यात फिरुन माहिती घेतल्यानंतर, वेगवेगळ्या ठिकाणच्या तरुणांकडून त्यांच्याशी चर्चा केल्यावर, तसेच विविध ठिकाणच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय व इतर सर्व प्रकारच्या परिस्थितीचा चिकित्सक अभ्यास केल्यावर सदर लेखमालिका सुरु करत आहोत. तरुणांच्या मनात उठणारे प्रश्नांचे वादळ, प्रत्यक्ष कामाला सुरवात केल्यावर येणाऱ्या अडचणी व अडचणींबरोबरची हतबलता, त्यावर उपाय न शोधता येणे, नोकरी करावा की व्यवसाय? असा […]
व्यवसाय की नोकरी ? – शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी कि व्यवसाय

वयाची १८-२२ वर्षे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी का व्यवसाय करावा हा कोड्यात टाकणारा प्रश्न सर्व तरुणांना पडत असतो. कारण आईवडिलांवर अवलंबून राहण्याचे सोडून स्वतःच्या कर्तृत्त्वाने जगात आपला ठसा उमटवण्याचे हे वय असते. उमेद असते, आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी हवे ते करण्याची तयारी असते. पण आपल्याला काय हवे हे मात्र समजत नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरुन एक […]
अनाथांची यशोदा म्हणजेच सिंधुताई सपकाळ

विदर्भातल्या वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे जन्मलेली ही एक सावित्रीची लेक. नको असताना मुलगी झाली, म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. (चिंधी म्हणजे कापडाचा फाटलेला तुकडा). शिक्षण जेमेतेम, मराठी चौथी, चिंधीचा विवाह वयाच्या ९व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरीशी झाला. घरी प्रचंड सासुरवास होता.. ढोरासारखी मेहनत करावी लागे. अठराव्या वर्षापर्यंत चिंधीची तीन बाळंतपणं झाली. ती […]
४. शिक्षण – समज व गैरसमज

* इंग्रजी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. ती लिहता वाचता बोलता आली पाहिजे त्याबद्दल कोणतेही दुमत नाही. मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलेली मुलेच यशस्वी होतात. हा फार मोठा गैरसमज समाजात वाढत चालला आहे. ऐपत नसताना नर्सरी, ज्युनिअर-सिनियर केजी प्रवेश घेण्यासाठी लाखो रुपये भरुन नावाजलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घ्यायचा. तीन चार वर्षाच्या […]
३.१ शिकण्याच्या पध्दती

कालची गोष्ट पुढे चालू ठेऊ या. जंगलातील पशुपक्ष्यांच्या शाळेत सर्वांना एकसारखे विषय होते. त्यात पास होणे गरजेचे सुध्दा होते. ही शाळा चालू राहिली. बदकाला चांगले पोहता येत होते मात्र जमिनीवरुन धावताना त्याची चांगलीच दमछाक व्हायची. माशाची अवस्था तर अजून बिकट झाली. पाण्याबाहेर पडल्यावर त्याला श्वास घेणे शक्य होईना. पाण्याबाहेरच्या विषयात तर तो पूर्णपणे नापास झाला. […]
तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…

जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…’ “We become like the average of the five people we spend the most time with.” आपण ज्या लोकांसोबत सर्वाधिक […]
यश मिळवण्यासाठी कल्पकता व डोकं शांत पाहिजे

importance-of-creativity-and-a-calm-mind-in-success
३. शिकण्याच्या पध्दती

भारतीय शिक्षणव्यवस्थेचे विभाजन साधारणतः दोन पर्वात केले जाते. त्यातील पहिला भाग म्हणजे विद्यार्थी गुरुच्या सानिध्यात राहून आपले शिक्षण पूर्ण करत असे, या पध्दतीला गुरुकूल शिक्षण पध्दती म्हणत असत. ती सध्या बऱ्याच अंशी लोप पावली आहे. काही ठिकाणी ती नुसतीच नावालाच शिल्लक आहे. दुसरी पध्दती म्हणजे आता सध्याची चालू असणारी शिक्षणपध्दती होय. त्यात तुम्ही, आम्ही व […]
अगोदर भरपूर पाय पसरा, नंतर अंथरूण गोळा करा

मित्रहो आपल्या मराठी भाषेत असे अनेक जुनाट विचार व म्हणी आहेत, ज्या आज भंगारात काढण्याची गरज आहे. उदा. अंथरूण पाहून पाय पसरावे, कर्ज काढू नये, समुद्र पार करणे पाप आहे असे अनेक बुरसटलेले विचार व म्हणी आहेत. अशा विचारांचा पगडा गेली कित्येक वर्षे समाजावर आहे. कायतर म्हणे; पैसे व्याजाने लावू नये, नाहीतर कुटुंबाचे बरेवाईट होते […]
२.1 कल ओळखण्याची कला

कल ओळखण्याची गरज काय आहे? याबाबतची माहिती आपण पाहिली. त्यावर अजून थोडे जाणून घेणे गरजेचे आहे. काही लोकांना आयुष्याच्या सूरवातीला असणाऱ्या उपजत क्षमतांची जाणीव झाली. त्यांनी त्यावर काम केले व त्यांना त्या-त्या क्षेत्रात यशस्वी होता आले. काही लोकांना त्यांच्या क्षमताबाबत आयुष्याच्या अगदी शेवटी लक्षात आले, त्यांच्या उपजत क्षमतावर त्यानी काम केले व त्यात त्यांची ओळख […]