उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की मुलांना, पालकांना वेध लागतात फिरण्याचे! यातले काहीजण मोठमोठे पॅकेज घेऊन मग परदेशात सुट्टी एन्जॉय करतात, तर काहीजण आपल्या देशातच केरळ, कर्नाटक, गोवा यांसारख्या वेगवेगळ्या राज्यांना भेट देतात. आता या दोन्ही गोष्टी करण्यात काही चुकीचं नाहीये, पण आपण ज्या महाराष्ट्रात राहतो त्यातल्या महा सौंदर्याचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर फिरणं आम्हाला तरी पटत नाही बुवा! महाराष्ट्र म्हटलं की कोकण हे नेहमीच प्रत्येकासाठी सुट्टीचं परफेक्ट डेस्टिनेशन असतं. तिथले वळणदार रस्ते, उंच डोंगर आणि घनदाट झाडी यामुळे भर उन्हातही कोकण हवाहवासा वाटतो.
महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. मुंबईपासून ते वेंगुर्ल्यापर्यंत पसरलेल्या या किनाऱ्यावर पर्यटकांना खिळवून ठेवणारी अनेक ठिकाणं आहेत. कोल्हापूरपासून जवळ असलेले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे म्हणजे “तळकोकण”. या तळकोकणात अनेक छोटी-छोटी गावं आहेत आणि यातलंच एक रमणीय गाव म्हणजे “जांभरूण”. चारही बाजूंनी डोंगरानं घेरलेल्या या गावात बारा महिने खळखळणारी नदी वाहत असते. इथल्या डोंगर उतारावर भाताची खाचरं, माळ, फणस, आंबा, सुपारीच्या झाडांची गर्दी पाहायला मिळते. याच झाडांच्या गर्दीतून पाझरणारी रसाळ कोकणी, लक्ष वेधून घेणारी टुमदार घरं आणि जिव्हाळा जपणारी इथली माणसं असं एकूणच ओसंडून वाहणारं निसर्गसौंदर्य या गावाला लाभलंय.
जांभरूणमध्ये आजही २४ तास डोंगरांचं पाणी पाटाने झऱ्यातून वाहतं. या गावाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गावात ४०० ते ५०० वर्ष जुनी खासगी मालकीची मंदिरं आहेत, जी अजूनही शाबूत असलेली पाहायला मिळतात. ही मंदिरं, घरं यांना दगडी पायवाटेने जोडलेलं आहे. यांना इथं “पाखाड्या” म्हटलं जातं. या पाखाड्यांना दोन्ही बाजूंनी रानफुलांनी सजवलेलं आहे. अशा कितीतरी पाखाड्या, मोठी झाडं, मंदिरं असा नैसर्गिक सांस्कृतिक वारसा लाभलेलं हे गाव आहे.
पुणे ते जांभरूण हे अंतर ३१४ किमी आहे. पुणे, कोकरूड, मल्कापूर, अंबाघाट, निवळी गणपतीपुळे रोडने कोतवडे फाट्यावरून डावीकडे वळून जांभरूणला जातं येतं. रत्नागिरीहून हे अंतर साधारण २४ किमी इतकं आहे. गावाजवळ येताच निसर्गाचं वैभव बघून तुमची गावाबद्दलची उत्सुकता आणखी वाढेल. सतत खळखणाऱ्या नदीचा, पाटबंधाऱ्यांचा आवाज या ठिकाणी अनुभवायला मिळेल.
तुम्हालाही जर रोजच्या गर्दीतून बाहेर पडून चार क्षण नैसर्गिक शांततेत घालवायचे असतील, तर “जांभरूण” शिवाय दुसरा चांगला पर्याय कोणता असू शकतो?
आयफोनचा जन्मदाता स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांची ओळख मी तुम्हाला करून देण्याची गरज नाही. महान उद्योजक प्रचलित नियम follow करत नाहीत. ते स्वतःचे वेगळे असे ‘Thumb Rules’ बनवतात.
हे नियम परिस्थितीनुसार बदलता येतात. म्हणजेच ते लवचिक असतात. हे नियम तुम्हाला कुठल्याही चौकटीत अडकवून ठेवत नाहीत, तर योग्य दिशा दर्शवतात, तुम्हाला प्रेरित करतात.मोठ्या कंपन्याच्या वाढीसाठी लागणारी कल्पकता, संस्कृती, बुद्धिमत्ता, संघटन आणि विश्वास या गोष्टींसाठी हेच ‘Thumb Rules’ अनुसरले जातात. व्यवसायात यशस्वी होण्यासाठीचे स्टीव्ह जॉब्स यांचे १० नियम आपण पाहणार आहोत.
नियम १ : गुणवत्तेचा मापदंड निर्माण करा. काही लोकांना अशा वातावरणाची सवयच नसते, जिथे सर्वोत्कृष्टतेची अपेक्षा केली जाते. जर तुम्ही अशाच वातावरणात राहिलात तर तुम्हाला उत्कृष्ट काम करायची सवयच राहणार नाही. त्यामुळे तुम्ही ज्या लोकांसोबत काम करता ते लोक खरंच तुम्हाला वर नेतायेत का याचा विचार करा.
नियम २ : ‘डिजाईन’ हा शब्द म्हटल्यावर डोळ्यासमोर येतो तो एखाद्या गोष्टीचा appearance. पण ‘डिजाईन’ म्हणजे केवळ वस्तू कशी आहे किंवा ती कशी दिसते एवढेच नसून, ती वस्तू कशी काम करते हे सुद्धा आहे.
नियम ३ : तुम्ही कोणतेही काम करत असा ते काम सर्वोत्कृष्ट व्हावे यासाठी गरजेची असते ती एकाग्रता आणि साधेपणा. साध्या सरळ गोष्टीसुद्धा अवघड असू शकतात. तुमच्या विचारांमध्ये सुस्पष्टता येण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, पण त्याची गरज असते. एकदा का तुम्ही हे साध्य केलं की, तुम्ही मोठे पर्वतसुद्धा हलवू शकता.
नियम ४ : जीवनात कुठल्याही टप्प्यावर महत्वाचे असते ते म्हणजे एकीचे बळ. जी गोष्ट एकट्याने साध्य होत नाही ती सगळे सोबत असल्यावर चटकन होते. हेच तत्त्व जर आपण व्यवसायात वापरल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. पण त्यासाठी तुम्हाला फक्त काही चांगल्या सहकाऱ्यांची गरज असते.
नियम ५ : काहीतरी नवीन शोधताना तुमच्या हातून चुका होऊ शकतात. चुका झाल्यातर होऊ द्या. चुका होतायेत म्हणजे तुम्ही काहीतरी नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करताय. झालेल्या चुकांचा स्वीकार करा त्यात कशी सुधारणा करता येईल याचा विचार करा.
नियम ६ : तुम्ही जे काम करताय त्यावर तुमचं प्रेम आहे की नाही यावर अवलंबून असत की तुम्हाला त्या कामात यश मिळेल की नाही. आणि जर अजूनही तुम्हाला अशी गोष्ट मिळाली नसेल, तर खोज जारी रखें।
नियम ७ : जॉब्स म्हणतात मागील ३३ वर्षे रोज सकाळी मी आरशासमोर उभा राहून स्वतःला विचारतो, ‘जर आजचा दिवस माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल, तर आज मी जे करतो आहे, तेच करायला मला आवडेल का?’ जेव्हा बरेच दिवस या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी मिळतं, मी समजून जातो, काहीतरी बदलायची गरज आहे.
नियम ८ : तुमच्याकडे वेळ फार कमी आहे, तेव्हा दुसऱ्या कोणाचेतरी आयुष्य जगणे सोडून द्या. तुम्हाला हा नियम छोटा वाटला असेल पण हा नियम परत एकदा ऐका मग तुमच्या लक्षात येईल की याचा अर्थ किती मोठा आहे.
नियम ९ : लोकांना असं बऱ्याच वेळा वाटत असत की तुमच यश हे तुम्हाला एका रात्रीत मिळालं आहे. पण जर तुम्ही नीट पाहिलंत, तर तुमच्या लक्षात येईल की; एका रात्रीत मिळालेलं यश हे खरतर एका रात्रीत मिळालेलंचं नसतं. त्या यशासाठी अनेक रात्री या जागून काढाव्या लागलेल्या असतात.
नियम १० : (Steve Jobs) जॉब्स यांचा सर्वात famous quote म्हणजे ‘स्टे हंग्री, स्टे फुलीश’ – भुकेलेले राहा, वेडे रहा!
जेव्हा तुम्ही कोणत्याही जटील नियमांचं पुस्तक बाजूला टाकून असे स्वतःचे नियम लिहिता, तेव्हा तुम्ही तुमची मार्गदर्शक तत्व लिहित असता आणि हीच तत्व तुमच्यासाठी एखाद्या होकायंत्रासारखी दिशादर्शकाचं काम करतात.
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘जीवनात व व्यवसायात ब्रेकचा वापर करावा’ करायची सुरुवात ?
गाडी वेगाने कशामुळे धावते? असा प्रश्न एका व्याख्यानात श्रोत्यांना केला, तेव्हा अनेकांनी इंजिन, पेट्रोल, ॲक्सलरेटर, चाक अशी उत्तरे दिली. ही उत्तरं बरोबर आहेत. परंतु मित्रहो थोडा वेळ विचार करा, जर समजा गाडीला ब्रेकच नसता, तर तुम्हाला गाडी खूप लांब चालविता आली असती का? तर नाही. वेगावर नियंत्रण ठेवता येण्यामुळेच जगातील कोणतीही गोष्ट किंवा वाहन चालते. ज्या गोष्टीला थांबण्यासाठी ब्रेक नाही अशा गोष्टी वादळाप्रमाणे सुसाट जातात व धडकून नष्ट होतात. जशी आकाशातून पडलेली उल्का किंवा नियंत्रण हरवून बसलेलं एखादं विमान. गोष्टी थांबल्या आणि योग्य ठिकाणी थांबल्या तर फायद्याच्या असतात.
ज्या गाडीला ब्रेक नाही अशी गाडी कितीही मोठ्या ब्रॅंडची असो, तिचे इंजिन कितीही चांगले असो त्याचा उपयोग नाही. गाडीचा ब्रेक हा चांगल्यासाठीच असतो. स्त्याला असणारे स्पीड ब्रेकर हे चांगल्यासाठीच असतात. शाळेला/ऑफिसला रविवारी सुट्टी चांगल्यासाठीच असते. दिवाळी. ख्रिसमस, उन्हाळीसुट्टी चांगल्यासाठीच असते. पाश्चात्य देशात शनिवारी व रविवारी लोक अगदी कडक सुट्टी घेतात, अगदी मोबाईलसुध्दा बंद असतात. त्यामुळेच त्यांची कार्यक्षमतासुद्धा अधिक आहे.
व्यवसाय करत असताना कधी किती वेगाने जायचं, कधी ब्रेक मारून थांबायचं हे कळायला हवं. सीसीडी ब्रॅंड आपल्या कॅफेच्या शाखा धडाधड उघडत गेला. पण वेगाने पुढे जायच्या नशेत आपल्या हातून काय चुका होत आहेत याचा अंदाज न आल्याने एक दिवस याच करोडोंची उलाढाल करणाऱ्या ब्रॅंडच्या मालकाला आत्महत्या करायची वेळ आली. थांबल्याने, हळूहळू चालल्याने फरक पडत नाही. फक्त कधी थांबायचं, कुठे थांबायचं आणि किती वेळ थांबायचं याचं विजडम जवळ हवं…
तुम्ही असा ब्रेक घेता का? तुमचा अनुभव कसा होता? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
तुमचं ध्येय नेहमी लक्षात राहावं यासाठी तुम्ही अशी काही आयडिया वापरत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
Procrastination टाळण्यासाठी हा २ मिनिटांचा नियम पाळाच!
Proocrrraaasssttttiiiinnnaaattttiiooon हा शब्द मुळातच इतका रटाळवाना आहे की हा शब्द ऐकूनच आपण कामं उद्यावर ढकलतो. पण कामं उद्यावर ढकलून देण्याची ही सवय आपल्या बऱ्याच जणांना खूप त्रासदायक ठरते. रोज सकाळी उठून व्यायाम करणं असो किंवा रात्री झोपताना निदान १५ मिनिटे पुस्तक वाचन असो प्रत्येक गोष्ट आपण “आजच्या दिवस जाऊ दे यार! उद्यापासून करू” असं करण्यातच घालवतो. असे अनेक उद्या जात राहतात आणि याचा शेवट होतो तो स्वतःलाच दोष देण्यात. इतकी छोटी सवय आपण स्वतःला लावू शकलो नाही? इतकं छोटं काम आपण करू शकलो नाही? स्वतःला दोष देणाऱ्या प्रश्नांची list मग पुढे वाढतच जाते.
पण मग यावर करणार काय? प्रत्येक प्रश्नाला जसं उत्तर असतं तसं याही प्रश्नाला उत्तर असेलच की! चला मग शोधूया या उत्तराला!
आधुनिक युगातील 5 महान dancers and choreographers मध्ये Twyla Tharp यांची गणना केली जाते. 1992 मध्ये त्यांना ‘मॅकआर्थर फेलोशिप’ देण्यात आली जी फक्त त्याच लोकांना देण्यात येते ज्यांनी आपल्या क्षेत्रात खूप मोठं काम केलं. Twyla यांनी आपल्या career चा बराचसा काळ जगभर फिरण्यात आणि आपली कला सादर करण्यात घालवला. त्या त्यांच्या या यशाचे श्रेय देतात रोजच्या जगण्यातील छोट्या छोट्या सवयींना.
Dancing सोबतच Twyla यांना लिखाणाची सुद्धा आवड आहे त्यांनी आत्तापर्यंत बरीचशी पुस्तकं लिहिली आणि यातलं सर्वात गाजलेलं पुस्तक म्हणजे “The Creative Habit” या पुस्तकात त्या लिहितात की: “मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवसाची सुरुवात एका सवयीने करते. सकाळी 5.30 ला उठून मी माझे वर्कआउटचे कपडे, लेग वॉर्मर्स, स्वेट शर्ट आणि टोपी घालते.
मॅनहॅटनमधील माझ्या घरातून बाहेर पडते, टॅक्सी बोलावते आणि जिममध्ये जाऊन तिथे दोन तास workout करते.” आता यात गंमत म्हणजे Twyla ह्या या जिममध्ये जाऊन तिथे दोन तास workout करायला सवय नाही मानत तर त्यांच्या मते खरी सवय आहे रोज घरातून बाहेर पडणं आणि बाहेर पडल्यावर जिमला जाण्यासाठी taxi बोलावणं.” मित्रांनो तुम्ही आम्ही विचार केला की असं वाटत ही एक खूप छोटी गोष्ट आहे पण ही छोटी गोष्टच रोज रोज केल्याने सवय बनून जाते और “अगर एक बार आदत पड़ गयी तो चाहकर भी उसे छोड़ना मुश्क़िल हो जाता है”
आता समजा Twyla यांना Taxi पकडण्यासाठी ३ किलोमीटर चालत जावं लागलं असतं किंवा आपल्याला आज कोणते कपडे घालायचे आहेत याचा विचार करत बसावा लागला असता तर बहुतेक त्या ती taxi पकडूच शकल्या नसत्या कारण सकाळी उठल्या उठल्या ३ किलोमीटर चालणं अवघड आहे. त्यामुळे कोणतीही सवय लावताना ती सुरु करतानाची process ही खूप simple असली पाहिजे. या गोष्टीला आपल्या रोजच्या जीवनात उतरवण्यासाठी आपण पाहूया २ मिनिटांचा नियम.
आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की सुरुवात ही नेहमी सोपी झाली पाहिजे. जेव्हा आपण कोणतीही सवय लावायचा किंवा काही बदल करण्याचा विचार करतो तेव्हा आधी आपण खूप excited असतो; कधी एकदा काम करायला घेतो आणि कधी ते संपवतो असं होतं आपल्याला! हे किती दिवस टिकतं तर फक्त १ दिवस. मग दुसरा दिवस उजाडतो आणि परत आपलं रोजचं जगणं सुरु होतं. पण याच गोष्टी टाळण्यासाठी महत्त्वाचा ठरतो तो २ मिनिटांचा नियम हा नियम काय आहे तर “कोणतीही नवी सवय सुरु करण्यासाठी ती सवय २ मिनिटांत पूर्ण करून झाली पाहिजे” नाही समजलं ना ? सांगतो!
समजा तुम्हाला रोज रात्री झोपायच्या आधी पुस्तक वाचण्याची सवय लावायची आहे. आता तुम्हाला २ मिनिटांचा नियम माहिती आहे तर तुम्ही काय करणार आधी सवय लावणार फक्त १ पान वाचण्याची. दोन मिनिटांत एक पान वाचून झालं की तुम्ही ते पुस्तक ठेऊन द्यायचं. बघा तुमचं target achieve झालं. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी तुम्ही हीच process follow करणार पाचव्या दिवशी तुम्हाला वाटेल की यार आज १ पान वाचण्यापेक्षा आपण २ पानं वाचूया. मग हळूहळू तुम्ही २ पानावरून ३ पानावर, ३ पानावरून ४ वर, ४ वरून पाच, सहा, दहा, वीस, तीस वर जाल आणि पहा आता तुम्हाला पुस्तक वाचनाची सवय लागलीये.
अशाच पद्धतीने तुम्हाला जर रोज जॉगिंग करायची आहे तर तुम्हाला आधी रोज shoes घालण्याची सवय लागली पाहिजे, तुम्हाला जर योगा करायचा असेल तर रोज Yoga Mat अंथरण्याची सवय लागली पाहिजे, जर अभ्यास करायचा असेल तर आधी पुस्तक उघडण्याची सवय लागली पाहिजे. कारण की या सगळ्या सवयी लावणं खूप छोटं काम आहे… पण जेव्हा या छोट्या सवयी लागतील तेव्हाच मोठे बदल घडायला सुरुवात होईल.
जगात असे अनेकजण असतात जे आपल्या कृतीमुळे इतरांच्या लक्षात राहतात. आपल्या सर्वांना कसाब माहितीच आहे, ज्याने शेकडो निष्पाप लोकांचे प्राण घेतले. आणि करकरे, कामटे, साळसकर देखील माहिती आहेत, ज्यांनी अनेक लोकांचे प्राण वाचवले. त्यांचंच नाव अभिमानाने घेतले जातं जे परोपकारी वृत्तीने काम करतात. ना की, कारणं देत फिरतात, किंवा लोकांच्या वाईटाचं काम करतात.
उर्दूमध्ये एक वाक्य आहे, “खुदा भी अपने रहमतों की उस पर बरसात करता हैं, जो जरूरतमंद की मदत के लिए आगे बढ़ता हैं”
मित्रांनो आपल्याला हा सुंदर मानव जन्म मिळाला आहे आणि या जन्मात जर आपण दुसऱ्याच्या उपयोगाला नाही आलो, तर मग सगळंच व्यर्थ आहे. आज मी तुम्हाला जो प्रसंग सांगणार आहे तो आहे, १५ एप्रिल १९१२ रोजीचा. उत्तर अटलांटिक महासागरातला. टायटॅनिक जहाजाच्या विनाशकारी सागरी अपघाताचा.
२,२२४ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांबरोबर निघालेल्या या बलाढ्य जहाजात १४ एप्रिलच्या मध्यरात्री अनेकांचा आक्रोश ऐकू येऊ लागला. हृदय पिळवटून टाकणाऱ्या किंकाळ्यांनी मन सुन्न झालं होतं. मात्र कोणतीच दैवी शक्ती टायटॅनिकला वाचवू शकत नव्हती. ज्यावेळी टायटॅनिक बुडत होतं, तेव्हा तीन जहाजे त्याच्या जवळपास होती. सॅम्पसन, कॅलिफोर्निया, कार्पेथिया.
सॅम्पसन टायटॅनिकपासून केवळ 7 किलोमीटर अंतरावर होते. त्या जहाजातील लोकांनी धोका दर्शविण्यासाठी टायटॅनिकवरून आकाशात उडवलेल्या दारूगोळ्यांना पाहिले, परंतु ते जहाज बेकायदेशीरपणे सीलची शिकार करत होते. जर टायटॅनिकच्या मदतीला गेलो, तर आपण पकडले जावू या विचाराने ते टायटॅनिकच्या उलट दिशेने निघून गेले. ते टायटॅनिकच्या गरजेला धावले नाहीत, कारण त्यांनी केलेल्या पापाच्या विचारात ते गढून गेले होते.
दुसरे जहाज कॅलिफोर्निया नावाचे होते. हे जहाज टायटॅनिक पासून केवळ १४ किलोमीटर अंतरावर होते. पण ते चोहोबाजूंनी हिमनगात वेढलेले होते. जहाजाच्या कॅप्टनने सुद्धा धोक्याचा इशारा बघितला, पण परिस्थिती अनुकूल नाही. आपणच हिमनगात अडकलोय. म्हणून त्याने परत जाण्याचा निर्णय घेतला आणि तो झोपी गेला.
“परिस्थिती योग्य नाही म्हणून मदत करू शकलो नाही” असं सांगण म्हणजे कारणं देणं, जबाबदारी झटकणं. असेल त्या परिस्थितीत स्वतःवरील संकटांशी दोन हात करून आपण इतरांना मदत केली, तरच ती निस्वार्थी भावनेने केलेली मदत म्हणता येईल.
तर तिसरं जहाज होतं कार्पेथिया. जे टायटॅनिकपासून तब्बल 58 किलोमीटर दूर दक्षिण दिशेने धावत होतं. त्यांनी रेडिओवर टायटनिक वरील हलकल्लोळ, रडणे, मदतीचा आक्रोश ऐकला. मन हेलावून टाकणारा तो आवाज ऐकून जहाजाच्या कॅप्टनने गुडघे टेकून ईश्वरचरणी प्रार्थना केली आणि मग पूर्ण वेगाने सभोवतालच्या पसरलेल्या हिमनगातून मार्ग काढत कार्पेथिया टायटॅनिकजवळ पोहोचले आणि त्या भयानक परिस्थितीत सुद्धा प्रयत्नांची शर्थ करून तब्बल ७०५ जणांचे प्राण वाचवून त्या प्रवाशांना कार्पेथियाने जणू नवा जन्मच दिला. त्यामुळे आपण कोणत्या जहाजाचा गुण अंगीकृत करायचा, ते आधी ओळखा आणि मग त्यानुसार पाऊलं टाका.
आपल्याला त्या चिमणीची गोष्ट माहितीच आहे, जिने जंगलात आग लागल्यावर कशाचीही पर्वा न करता, आपल्या छोट्याश्या चोचीतून कित्येक मैल अंतरावरून चोचीत पाणी नेऊन आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. रस्त्यात तिला हत्ती भेटला. हत्ती तिला म्हणाला, “अगं, चिऊताई तुझ्या चोचीतल्या त्या एवढ्याश्या पाण्याने जंगल विझणार आहे का? कशाला उगाच धावपळ करतेस, सोड ते प्रयत्न.” त्यावर ती चिऊताई म्हणाली, “माझ्या प्रयत्नांनी जंगलातील आग विझेल की नाही माहित नाही, पण जेव्हा-केव्हा या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नसून आग विझवणाऱ्यांमध्ये असेल आणि तेच माझ्यासाठी पुरेसं आहे.”
मित्रांनो, समाजात असे अनेकजण आहेत, जे दुःखी आहेत. त्यांचे तुम्ही अश्रू पुसा, ज्यांना मदतीची गरज आहे, अशांसाठी तुम्ही कर्णाचा ‘आहे ते देण्याचा’ गुण अंगी बाणवून घ्या. अडथळे आणि जबाबदारी टाळण्यासाठी कारणं नेहमी असतील, परंतु जी लोकं ती बाजूला सारून पुढे जातात, ती नेहमी जगाच्या हृदयात स्थान मिळवतात.
जर आपण पाण्यात मीठ टाकले तर ते पाणी खारट बनते, मात्र जर त्याच पाण्यात साखर टाकली तर? तर मात्र ते पाणी गोड बनते. नमस्कार, मित्रांनो च्या आजच्या भागात आपले स्वागत आहे तर आज बोलूया संगतीविषयी.
वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. एक दरोडेखोर परमेश्वराच्या नामस्मरणामुळे ऋषी बनला. इतकंच नाही तर त्याने रामायणदेखील लिहीले. त्याचं कारण म्हणजे संगत. माणसाला शिक्षण हे केवळ शाळा-कॉलेजमधून मिळत नाही, तर आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीतून, सहवासातील माणसांच्या अनुकरणातून तो शिकत असतो.
जेव्हा आकाशातून पावसाचा थेंब जमिनीवर येतो तेव्हा तो स्वच्छ आणि निखळ असतो. तोच थेंब जर घाणीच्या पाण्यात पडला, तर त्याला घाणीचे स्वरूप प्राप्त होते आणि जर समुद्रातील शिंपल्यात पडला, तर मात्र त्यातून मोती तयार होतो. संगतीचा परिणाम किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला दिसून येते. शुद्ध, सात्त्विक वृत्तीच्या माणसांच्या सान्निध्यात राहिल्यावर आपल्यावरही त्या चांगल्या संस्काराचा प्रभाव पडतो, पण सध्याच्या युगात चांगल्या गोष्टी कोणत्या आणि वाईट कोणत्या हेच ठरविणे अवघड झाले आहे. संस्कारांचा अभ्यास देणाऱ्या मठामध्येदेखील नको ते धंदे केले जातात.
आपला जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात नसतं, मात्र आपण कोणाच्या संगतीत रहावं हे आपल्या हातात असतं. आपल्या नकळत आपण दुसऱ्यांचे शब्द, त्यांच्या लकबी आत्मसात करत असतो. त्यातल्या त्यात वाईट गोष्टी लगेच आत्मसात होतात.
आपण 4- 5 वर्षाच्या मुलाचं उदाहरण घेवूया. अपशब्द किंवा शिव्या लहान मुलांना शिकवाव्या लागत नाही. कुठून तरी ऐकून ते लगेच शिकतात, आणि प्रसंगी पद्धतशीरपणे त्याचा प्रयोगही करतात. मात्र तेच चांगले श्लोक, विचार त्यांना शिकवावे लागतात, नव्हे तर घोकून घ्यावे लागतात. मात्र ऐनवेळी त्यांना ते सुचतीलच, आठवतील असे नाही. म्हणून तर शालेय जीवनात आपली अधोगती दिसू लागली, की शिक्षिका आपल्या रोजनिशीत शेरा लिहून देतात, ‘आपल्या पाल्याची संगत बदला.’ हा नियम शाळेपुरताच मर्यादित नाही, तर आयुष्यभरासाठीचा आहे.
आपल्या महाभारत आणि रामायणातील व्यक्तिरेखाही खूप काही शिकवून जातात. रामायणातील कैकयीच्या व्यक्तिरेखेत अनेक नकारात्मक छटा दिसतात. कैकयीने आपला पुत्र भरतासाठी, रामाला वनवासाला पाठवले, पण तुम्हाला माहिती आहे का? कैकयी आधी अशी नव्हती. ती रामावर अतिशय प्रेम करायची, भरतापेक्षाही जास्त लाड ती रामाचे करायची, मात्र तीच्या मंथरा नावाच्या दासीमूळे कैकयीचे विचार पालटले. मंथरेने तिचे कुत्सित विचार कैकयीच्या डोक्यात भरले आणि कैकयी तिच्यासारखा विचार करू लागली, केवळ मंथरेच्या सांगण्यामुळेच कैकयीने रामाला वनवासाला पाठविले. कैकयीलाही सगळे वाईटच दिसू लागले. अशी मंथरा प्रवृत्ती केवळ कैकयीच्याच नाही, तर आपल्याही अवती भोवती वावरत असते. तिला वेळीच ओळखून पळवून लावले पाहिजे. कलियुगात मंथरेची रूपे अनेक आहेत. त्यामुळे तिला चार हात लांबच ठेवाल तरच उत्तम!
दुसरे उदाहरण सर्वांच्या लाडक्या कृष्णाचे, महाभारतातील युद्धावेळी दुर्योधन आणि अर्जुन श्रीकृष्णाजवळ युद्धासाठी मदत मागण्यासाठी जातात. त्यावेळी कृष्ण विचारतो, तुम्हाला मी हवा आहे की माझे सैन्य ? दुर्योधन लगेचच सैन्य मागतो आणि अर्जुन खुद्द कृष्णाला मागतो. आणि त्यानंतरचा परिणाम तुम्हाला ज्ञात आहेच. आपण या कालियुगातले अर्जुन आहोत, मात्र अजून आपल्याला श्रीकृष्णाचा शोध घेता आला नाही. आपल्याबरोबर कृष्णासारखी व्यक्ती असायला हवी. जी आपले विचार बदलून चांगल्या कामासाठी आपल्याला प्रवृत्त करेल. या दलदलीच्या युगात वावरत असताना डोळसपणे पहा की, आपण नेमके कोणाच्या सहवासात आहोत? मंथरेच्या की श्रीकृष्णाच्या ? कारण संगत माणसाला घडवत असते.
तुम्हाला आजचा चा लेख कसा वाटला हे कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि नवी अर्थक्रांतीच्या चॅनेलला आताच subscribe करा.
जगातील सर्वात महान वैज्ञानिक कोण असं म्हटल्यावर आपल्याला आठवतात ते; अल्बर्ट आईनस्टाईन, आयझॅक न्यूटन, हेन्री फोर्ड, थॉमस एडिसन, पण यातील अजून एक नाव ज्याने संपूर्ण पृथ्वीला प्रकाशाने सजविले, ज्याच्या नावाने अनेक वैज्ञानिकांना पुरस्कृत केले जाते, ज्याचे शोध हे आइन्स्टाईन आणि एडिसन यांच्या तोडीस तोड आणि तितकेच महत्वाचे होते… कोण होता तो?
पावसाळ्याचे दिवस होते. आकाशात वीजा कडाडत होत्या. सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. ऑस्ट्रिया-हंगेरी सीमेवरच्या लिका नावाच्या भागातील स्मिजन गावातील एका गर्भवती आईला गरोदारपणाच्या कळा सहन होत नव्हत्या. प्रसूतीची वेळ झाली होती. अखेरीस दाईच्या सहाय्याने आईने बाळाला जन्म दिला. बाळ जन्मल्यावर दाई म्हणाली की “एवढ्या घनघोर अंधारात जन्मेलेल्या या बाळाच्या आयुष्यात पण अंधार असेल का?” त्यावर आईने उत्तर दिले, “नाही हे बाळ संपूर्ण जगाला प्रकाशमान करेल.” १० जुलै १८५६ या दिवशी त्या वेळच्या ऑस्ट्रियामध्ये म्हणजे आजच्या क्रोएशियात जन्मलेल्या त्या बाळाचे नाव होते निकोला टेस्ला.
लहानपणी त्याची तब्येत अतिशय नाजूक असे. लहान असताना त्याला प्रकाश तसेच वेगवेगळ्या आकृत्यांचे भास व्हायचे. त्यामुळं त्याला बऱ्याच वेळा हे कळत नसे की आपण जे पाहतो आहे, ते खरं आहे की खोटं! कुठलीही गोष्ट एकदा पहिली की त्याच्या डोक्यात फिट्ट बसायची. त्याला जेव्हा एखादी आकृती दिसायची, तेव्हा ती त्याच्या पूर्णपणे स्मरणात रहायची. ती आकृती कागदावर काढायची सुद्धा त्याला कधी गरज पडली नाही. शिक्षकांनी दिलेली गणितं मुलं उतरवून घेईपर्यंत निकोलाने ती मनातच सोडवूनसुद्धा टाकलेली असायची! वयाच्या नवव्या वर्षी टेस्लानं उडणाऱ्या माश्यांच्या हालचालींमधून मिळणाऱ्या ऊर्जेच्या जोरावर चालणारी विजेची मोटार बनवली.
त्याचे वडील हे चर्चमध्ये धर्मगुरू होते आणि आपल्या मुलानेसुद्धा आपल्यासारखेच काम करावे असं त्यांना वाटायचं. पण मुलाचा विज्ञान आणि गणिताकडे असलेला कल पाहून त्यांनी निकोलाला इलेक्ट्रीकल Engineering ला प्रवेश घेण्यासाठी संमती दिली. गणित आणि विज्ञानात अत्यंत हुशार असलेल्या निकोलाने १८७५ मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेऊन ९ परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. कॉलेजमध्ये असताना टेस्ला फाटे ३ वाजता अभ्यासाला बसायचा आणि रात्री ११ वाजेपर्यंत त्याचा अभ्यास अखंड सुरु असायचा. झोपेत वेळ वाया जाऊ नये म्हणून तो फक्त ४ तास झोपायचा.
१८७५ला पॉलिटेक्नीकच्या द्वितीय वर्षाला असताना, अतिहुशारपणामुळे एका शिक्षकांसोबत त्याचे मतभेद झाले आणि त्या वर्षी तो नापास झाला. त्यातच त्याला जुगार खेळायची सवय लागली. अभ्यास झाला नाही आणि तो फायनल परीक्षेत नापास झाला. त्यामुळे तो त्यांचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण करू शकल नाही. एवढंच नाही तर त्यांने त्यांच्या कुटुंबियांशी आणि मित्रांशी असलेले संपर्क पूर्णपणे तोडले. १८८१ मध्ये टेलिग्राफ कंपनीमध्ये काम करून अनेक संप्रेषणात सुधारणा केली. टेलीफोन इम्प्लिफायरची नव्याने रचना केली, मात्र त्यावर स्वतःचे पेटंट घेतले नाही.
घडल्या प्रसंगातून स्वतःला सावरत, इकडे-तिकडे काम केल्यानंतर, त्याला एडिसन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. एडिसन यांनी त्याला त्यांनी बनविलेला डायरेक्ट करंट जनरेटर (DC Generator) जास्त प्रभावी करून द्यायचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी त्याला सांगितले की, “जर तो या कामात यशस्वी झाला, तर त्याला ५० हजार डॉलर बक्षीस म्हणून मिळतील.” मिळणारे बक्षीस ही त्याच्यासाठी खूप मोठी रक्कम होती, म्हणून त्याने ते आव्हान स्वीकारले आणि तो कामाला लागला. दिवस रात्र एक करून, १८-१८ तास काम करून त्याने डायरेक्ट करंट जनरेटर अधिक प्रभावी करून दाखविला. एडिसन यांना हवे तसे बदल त्याने करून दाखवले. परंतु एडिसन यांनी आपला शब्द पाळला नाही. आणि पैसे द्यायला नकार दिला. झालेल्या अपमानामुळे त्याने एडिसनची कंपनी सोडली. त्यानंतर मग त्या दोघांमधील कलह संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरला.
त्यानंतर टेस्ला यांचा काही काळ खूप खडतर गेला. पैसे नसल्याने त्यांनी काही दिवस खड्डे खणण्याचे काम केले. त्यात त्यांना दिवसाला २ डॉलर्स मिळायचे. पण काही दिवसांनंतर त्यांचे नशीब पुन्हा उजळणार होते, कारण १८८७ मध्ये टेस्ला यांनी Induction Motor चा शोध लावला, जी AC म्हणजेच Alternating Current System वर काम करायची. ही मोटर इतकी शक्तिशाली होती की Electric मार्केटमध्ये आघाडीवर असलेले उद्योगपती जॉर्ज वेस्टिंगहाऊस यांचं लक्ष त्याकडे गेलं. टेस्ला यांनी जॉर्ज वेस्टिंगहाऊस यांच्यासोबत Alternating Current सिस्टीमवर चालणारी ही मोटर जगासमोर ठेवली. मात्र त्याही वेळी एडिसन यांनी त्याचा विरोध केला, कारण त्यावेळी संपूर्ण अमेरिकेत एडिसन यांची DC म्हणजेच Direct Current System कार्यरत होती. एडिसन टेस्ला वाद इतक्या विकोपाला गेला होता, की जेव्हा रेडियोच्या शोधामुळे मार्कोनी आणि टेस्ला यांच्यात भयंकर वाद निर्माण झाले त्यावेळी एडिसनने मार्कोनीला पाठिंबा दिला.
टेस्ला यांनी केवळ Alternating Current System चाच शोध नाही लावला तर, त्याचबरोबर Electric Motor, पहिले Hydro Electric Power Station, Radio, Wireless Communication, Remote Control, Magnetic Power, रडारचा शोध लावला. तसेच 1895 मध्ये X-Ray Technologyवर प्रभुत्व मिळवून त्यात नवनवीन शोध लावले. ते फक्त संशोधक नव्हते, तर ते खूप चांगले वाचक होते. ते सबक्रोएशियन, झेक, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, हंगेरियन, इटालियन आणि लॅटिन अशा आठ भाषांमध्ये पारंगत होते.
संशोधनाचे अनेक यशस्वी प्रयोग पार पाडले असताना काही संशोधनामध्ये त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि त्यामुळे ते नैराश्याला बळी पडले. १८९३ साली टेस्लानी वायरलेस कम्युनिकेशन संदर्भात आपलं काम सुरू केलं, पण दोनच वर्षानी १८९५ साली त्यांच्या प्रयोगशाळेला आग लागून त्या सगळी उपकरणांची राख झाली. अनेक वर्षे एकटेच राहिल्यामुळे निकोला टेस्ला नैराश्येच्या आणखी गर्तेत ढकलले गेले. त्यांच्या जीवनातील शेवटचा १० वर्षांचा काळ सुद्धा त्यांनी एकट्यानेच एका हॉटेलमध्ये काढला. टेस्लांच्या नावे सुमारे ७०० पेटंट्स असूनसुद्धा ते शेवटपर्यंत कफल्लकच राहिले. जगातील सर्वात हुशार अशा या वैज्ञानिकावर अखेरच्या दिवसात कर्ज झाले होते.
शेवटी वयाच्या ८६व्या वर्षी आर्थिकदृष्ट्या पूर्ण बेजार झालेले निकोला टेस्ला न्यूयॉर्कच्या एका हॉटेलात 7 जानेवारी 1943 च्या रात्री झोपेतच कधी जग सोडून गेले हे सकाळपर्यंत कुणाला समजलं सुद्धा नाही! एडिसन, फॅरडे, मार्कोनी, आईनस्टाईन यांना जिवंतपणी जी प्रसिद्धी, जो मानसन्मान मिळाला तो टेस्ला यांना दुर्दैवाने मिळू शकला नाही. नाही म्हणायला या अवलियाच्या कामाची पोचपावती म्हणून, त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्ताने टाइम मासिकाने त्यांना front page वर स्थान दिले. यावेळी त्यांना ७० हून अधिक वैज्ञानिकांकडून कौतुकास्पद पत्रं आली. त्यावेळी त्यात आईनस्टाईन यांचेही पत्र होते. पण आज त्यांचा सन्मान म्हणून अमेरिकेमध्ये १० जुलै हा टेस्ला दिन म्हणून साजरा केला जातो. क्रोएशियातील १३०हून अधिक रस्त्यांना निकोला टेस्ला हे नाव दिले आहे. चंद्रावरील एका २६ किलोमीटर व्यासाच्या विवराला टेस्ला नाव देण्यात आले आहे. टेस्ला या इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीचं नाव सुद्धा त्यांच्या नावावरुनच ठेवलं आहे. मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये निर्माण झालेल्या एक लघुग्रहाचे नाव 2244 टेस्ला ठेवण्यात आले आहे आणि सर्बियाच्या १०० दिनारच्या नोटेवर टेस्ला यांचे चित्र आहे.
टेस्ला यांची आई म्हणाली होती की, “हे बाळ संपूर्ण जगाला प्रकाशमान करेल” आणि तिचं हे वाक्य टेस्ला यांनी आपल्या कर्तुत्त्वाने सार्थ ठरवलं. आता जेव्हा जेव्हा तुम्ही घरात लाईट सुरु करण्यासाठी स्विच वापराल तेव्हा तुम्हाला टेस्लाची आठवण नक्की येईल.
जीवनात सफलता मिळवायची असेल, तर आपल्याकडे आत्मविश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे. माणसाला जगण्यासाठी जसा ऑक्सीजन लागलो, माशाला जगण्यासाठी जशी पाण्याची गरज लागते. तसेच माणसाला स्वाभिमानाने जगायचे असेल, तर आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. मात्र बऱ्याच जणांकडे हा विश्वास नसतो. तो कसा मिळवायचा ते आजच्या गोष्टीत पाहूयात.
गोदावरीच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याश्या, सुख समृद्धीने भरलेल्या गावात सगळेजण अगदी आनंदाने नांदत होते. त्या गावात एक धनाढ्य सावकार होता. धनाजीराव त्याचं नाव. सावकार म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो गावकऱ्यांकडून पैसे बळकवणारा, त्यांना गुलाम म्हणून वागवणारा, त्यांचा छळ करणारा, मात्र धनाजीराव तसा नव्हता. तो गावकऱ्यांवर खूप प्रेम करायचा आणि गावातील लोक देखील त्याला खूप मानायचे. असेच एकदा गावात मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम होता. गाव अगदी गजबजून गेले होते. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते.
गोदावरीकाठी गावातील काही लहान मुलं पकडापकडीचा खेळ खेळत होती. त्यात त्या सावकाराचा मुलगा देखील होता. खेळ ऐन रंगात आला असतानाच काठाजवळून धावताना अचानक तो नदीत पडला. सगळीकडे एकच गोंधळ सुरू झाला. हा हा म्हणता अख्खा गाव नदीकाठी जमा झाला. धनाजीराव आणि त्याची बायको देखील तिथे आली. तिचा आक्रोश सुरु झाला. धनाजीरावचा ‘माझ्या मुलाला कोणीतरी वाचवा रे!’ म्हणून आरडाओरडा करत होता. त्याची ती अवस्था सर्वांचं काळीज पिळवटून टाकत होती. मात्र कोणीच त्या लहानग्याला वाचवायला पुढे गेलं नाही. सगळ्यांनी बघ्याची भूमिका घेतली. काहींना तर पोहता येत असून देखील ते नदीत उतरले नाहीत. त्या गर्दीत एक जलतरणपटू देखील होता. त्याच नाव होतं विकास. मात्र सगळे इतके घाबरले होते, की त्यांच्याकडे बघून विकासचे मन नदीत उतरण्यासाठी धजावत नव्हते.
तितक्यात अचानक कोणीतरी त्याला पाठीमागून नदीत ढकललं. नदीकाठचा गोंधळ अचानक शांत झाला. कोणाला काहीच तर्क लावता येईना. नदीत पडलेला विकास तर पूर्णपणे भांबावून गेला होता, पण काही वेळाने विकास देखील त्या प्रवाहात दिसेनासा झाला. विकास ठीक असेल ना? पाटलाचा पोरगा जिवंत असेल ना? असे असंख्य प्रश्न गावकऱ्यांसमोर होते. आणि काही वेळाने पाण्यात एक हालचाल जाणवली. विकास एका हाताने पाण्याला दूर सारत दुसऱ्या हातात पाटलाच्या मुलाला घेवुन नदीकाठी आला. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. धनाजीरावाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. विकासने मुलाला वाचवलं म्हणून संपूर्ण गाव त्याची शाही मिरवणूक काढत होतं. मात्र त्या तरुणाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हच होतं, त्याला कळत नव्हतं की आपल्याला नदीत कोणी ढकललं.
त्याची नजर शोध घेत होती त्या व्यक्तीचा. मिरवणूक संपली. तो तरुण आपल्या घरी निघाला आणि अचानक रस्त्यात एक 70-80 वर्षाचे आर्मी रिटायर्ड माने आजोबा त्याच्या समोर आले. ते म्हणाले तू सकाळपासून ज्याला शोधतोय तो मीच आहे. त्याला काहीच कळेना. तो माने आजोबांना विचारतो, “तुम्ही मला पाण्यात का ढकललं? त्यावर ते म्हणाले, अरे मला माहीत होतं तुला उत्तम पोहता येतं ते. आणि त्याक्षणी तुझ्या मनात जो गोंधळ चालू होता, तोही मी ओळखला होता. तुझ्यात त्याला वाचवण्याची क्षमता होती मात्र धाडस नव्हतं. मला माहिती होतं जर मी तुला पाण्यात ढकलंल तर 100 टक्के तू स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करणार आणि त्याबरोबरच त्या लेकराला देखील वाचवणार. फक्त गरज होती एका हलक्याश्या धक्क्याची. आणि ते मी केलं. पुढे माने आजोबा विकासला म्हणाले: लेकरा तुला आयुष्यात खूप पुढे जायचं असेल, तर असा स्वतःवरचा विश्वास हरवून बसू नकोस. प्रत्येकवेळी तुला कोणीतरी यशाचा रस्ता दाखवेलच असं नाही. तो तुझा तुलाच शोधावा लागेल.
बऱ्याचदा आपल्याला ही गोष्ट येईल का, आपण ते करू शकतो का असे स्वतःच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. कधी कधी आपण स्वतःवरचा विश्वासच गमावून बसतो. मात्र आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात जे पावलोपावली आपल्याला प्रोत्साहित करत असतात, मार्गदर्शन करत असतात. मित्रांनो तुम्ही जर बघ्याची भूमिका घेवून आयुष्य जगलात, तर कधीच तुमचं कौतुक होणार नाही, असं काहीतरी करा की ज्यामुळे यशस्वी लोकांच्या यादीत तुमचं नाव येईल. मात्र तिथपर्यंत पोहोचण्यासाठी विचारवंताच्या सहवासात राहिलं पाहिजे, स्वतःचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. आपलं रूप, आपली बुद्धी, आपला रंग या गोष्टी आपण जन्मत:च घेऊन येतो. परंतु आत्मविश्वास हा आपल्याला विकसित करावा लागतो आणि प्रत्येकाने तो केलाच पाहिजे.
तुम्हाला आजचा Sunday Motivation चा लेख कसा वाटला हे कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि Sunday Motivation साठी नवी अर्थक्रांतीच्या चॅनेलला आताच subscribe करा.
शाळेत असताना मराठीच्या पेपरमध्ये 5 मार्कांसाठी व्याकरणाचे काही प्रश्न दिलेले असायचे. वर्तमानकाळाचे भविष्यकाळात रूपांतर करा किंवा भविष्यकाळाचे भूतकाळात, वर्तमानकाळात रूपांतर करा. प्रश्नपत्रिकेतला काळ उत्तरपत्रिकेत बदलता येऊ शकतो, मात्र वास्तविक जीवनातला काळ ना पुढे नेता येतो, ना मागे आणता येतो.
प्रत्येकालाच आपण का जगतोय आणि कशासाठी जगतोय हे प्रश्न पडलेच पाहिजेत, कारण त्यामुळेच आपल्याला आपल्या जीवनाचे मर्म कळू शकते. आपलं नशीब बदलण्याची धमक प्रत्येकामध्ये असते, मात्र त्यासाठी तुमच्या मनात प्रचंड इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. एका महाकाय पर्वताच्या टोकावर एक 40-50 वर्षाचा सद्गृहस्थ पर्वत सर करण्याच्या उद्देशाने जातो. थंडी, वारा, ऊन, पाऊस कश्या-कश्याचीही पर्वा न करता तो तो पर्वत पार करतो आणि काही दिवसानंतर सुखरूप पायथ्याशी येतो. पायथ्याशी असलेले सर्वजण अचंबित होतात. ते म्हणतात, “अरे तुला माहीत नाही का या पर्वतावर कोणीच जावू शकत नाही, मग तू कसं काय गेलास.” त्यावर तो गृहस्थ म्हणतो, मला ही गोष्ट माहीतच नव्हती आणि म्हणून मी गेलो. आणि बघा यशस्वी झालो. आयुष्यात यश मिळवत असताना जशी प्रोत्साहन देणारी माणसं असतात, तशीच निरुत्साहित करणारी लोकंदेखील असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर पुढे गेलं पाहिजे. ओम शांती ओम सिनेमात शाहरूख खानचा एक फेमस डायलॉग आहे, ‘अगर आप किसी चीज को पुरी शिद्दत से चाहते हो, तो पूरी कायनात उसे आपसे मिलाने की साजिश मे जुड जाती है.”
प्रत्येकामध्ये आपले आयुष्य बदलून टाकण्याचे सामर्थ्य असते, फक्त त्याला याची जाणीव नसते. गाडीला ५ गियर असतात, जर योग्यवेळी योग्य गियर टाकला तरच गाडी वेगाने पळू शकते. बाकीचे 4 गियर असूनसुद्धा आपण जर पहिल्याच गियरवर गाडी चालवत असू, तर निश्चितच गाडी पुढे जाऊ शकणार नाही. बऱ्याचदा आपल्या बाबतीतही तसेच होते. घोड्याप्रमाणे झापडं लावून तुम्ही काम केलं, तर नक्कीच तुम्हीसुद्धा तुमचे ध्येय गाठू शकाल, कारण शेवटी यश किंवा अपयश हे केवळ आपल्याच हातात असतं.
रेसकोर्सवर घोड्यांच्या तबेल्यात काम करणाऱ्या एका मजुराचा रॉबर्ट नावाचा एक मुलगा असतो. त्याची नववीची परीक्षा चालू असते. एकेदिवशी वर्गशिक्षिका अचानक वर्गात येतात आणि सगळ्या विद्यार्थ्यांना उद्देशून त्या म्हणतात, “मुलांनो “माझे स्वप्न” या विषयावर निबंध लिहा. निबंध मनापासून आणि तुमच्या खऱ्या-खुऱ्या स्वप्नावर लिहा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, याच निबंधावर तुमचा यावर्षीचा निकाल अवलंबून आहे. त्यामुळे निबंध व्यवस्थित आणि विचार करून लिहा. सगळे जण अगदी मन लावून निबंध लिहीत असतात. पेपर जमा करण्याची वेळ येते. घंटा वाजते, पेपर जमा करून सगळे आनंदाने घरी जातात. काही दिवसांनी निकालाचा दिवस येतो. सगळे विद्यार्थी वर्गात उपस्थित असतात. सगळ्यांच्या मनाला धाकधूक लागलेली असते, मला मार्क चांगले पडले असतील ना? मी पास झालो असेल ना? असे अनेक प्रश्न मनात डोकावत असतात. मात्र केवळ रॉबर्टच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकत असतं, कारण आपण निबंध चांगला लिहिलाय त्यामुळे आपण पास होणारच याचा त्याला विश्वास असतो. सगळ्यांचा रिजल्ट जाहीर होतो. वर्गातली सगळी मुलं पास होतात, मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्याला स्वतावर विश्वास असतो, तो रॉबर्ट नापास होतो. ज्या चेहऱ्यावर हास्य खुललेलं होतं, तो चेहरा अचानक चिंताग्रस्त होतो. त्याला काहीच कळत नाही.
तो तडक शिक्षिकेच्या केबिनमध्ये जातो आणि त्यांना म्हणतो, ‘मॅडम, कदाचित तुम्ही माझा पेपर व्यवस्थित तपासला नसेल, कृपया तुम्ही परत चेक करता का? बहुदा चुकून तुम्ही….”
शिक्षिका त्याला मध्येच थांबवत म्हणतात. “अरे चुकून नाही मी पेपर बघूनच तुला नापास केलं. अरे वेड्या तू निबंध काय लिहिलास, तुझं तुला तरी माहिती आहे का? मी रेसकोर्सचा मालक बनेल. २००-३०० घोडे माझ्याकडे असतील, अनेक कामगार माझ्या हाताखाली असतील, मी करोडपती बनेल. अरे हे शक्य आहे का? माणसाने झेपतील अशी स्वप्न बघावी. हे बघ अजूनही वेळ गेली नाही. तू तुझा निबंध बदल, दुसरा निबंध लिहून दे. मी रिजल्ट बदलते.”
त्यावर रॉबर्ट म्हणाला, “नाही मॅडम, तुम्ही तुमच्या खऱ्या स्वप्नावर निबंध लिहायला सांगितला होता, मी तो लिहिलाय आणि मी माझ्या स्वप्नावर ठाम आहे, मी माझे स्वप्न पूर्ण करणारच.”
त्यावर बाई म्हणाल्या, “ठीके, आता तूच ठरव निबंध बदलून पुढच्या वर्गात जायचं की, इथेच बसायचं ते.”
त्यावर रॉबर्ट तो रिजल्ट घेतो आणि रागारागाने निघून जातो.
काही वर्षांनी त्याच शिक्षिका एका मोठ्या रेसकोर्सवर विद्यार्थ्यांची सहल घेऊन जातात. रेसकोर्सचा तरुण मालक अगदी आदराने त्यांचे स्वागत करतो. स्वतः पूर्ण रेसकोर्स त्यांना फिरून दाखवतो आणि त्यांना दुपारच्या जेवणासाठी देखील आग्रह करतो. त्याने केलेला तो कळकळीचा आग्रह त्या शिक्षिका स्वीकारतात आणि विद्यार्थ्यांना घेऊन डायनिंग हॉलमध्ये जातात. त्या हॉलच्या एका भिंतीवर एक फ्रेम अडकवलेली असते. कुतुहलाने त्या शिक्षिका त्या फ्रेमजवळ जातात. त्यात फ्रेमकडे बघतात आणि आश्चर्याने म्हणतात, “अरे या सर्टिफिकेटवर तर माझीच स्वाक्षरी आहे. कोणाचं सर्टिफिकेट आहे हे? रॉबर्ट! अरे हा तर माझाच विद्यार्थी! तुमच्या इथे काम करतो का तो? जरा बोलवा त्याला.”
त्यावर रेसकोर्सचा तो तरुण, उमदा मालक त्यांच्यासमोर जातो आणि म्हणतो मॅडम मीच तो तुमचा विद्यार्थी, रॉबर्ट. मॅडम शॉक झाल्या. त्यावर रॉबर्ट म्हणाला मॅडम, “त्यावेळी जर मी तुमचं ऐकून स्वप्न बदललं असतं, तर कदाचित शाळेच्या परीक्षेत पास झालो असतो; मात्र जीवनाच्या परीक्षेत नापास झालो असतो.”
मित्रांनो, तुम्हाला खरंच एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर स्वस्थ बसू नका. त्यामुळे ध्येयासाठी झपाटून जा. जर तुम्हाला अगदी मनापासून आणि तीव्रतेने वाटत असेल की, ही गोष्ट मला मिळवायचीच आहे आहे, तर नक्कीच ती तुम्ही मिळवाल.”
Sunday Motivation – जर्सी नंबर दहा. योगायोग असेल, पण हा दहा नंबर आपल्याकडे होता क्रिकेटच्या देवाचा. जर्सीवर १० दिसलं की सचिन आठवतो आपल्याला. सचिन तेंडुलकर सारखाच हा दहा नंबर आणखी एकाच्या बाबतीत फेमस आहे. लिओनेल मेस्सी. हा योगायोग असला तरी दोघांच्याही चाहत्यांची संख्या कोट्यावधींच्या घरात. वागणंही सारखंच. मितभाषी. संयत. आणि खेळही तसाच अफलातून!
एक बॅटनं बोलणारा, दुसरा पायांची जादू दाखवणारा. सचिन मैदानात असेपर्यंत टीम इंडियाच्या विजयाची खात्री. तसंच मेस्सीचं.
1. Self Believe
वयाच्या पाचव्या वर्षापासून मेस्सीची फुटबॉलशी नाळ जुळली. त्याला दोन भाऊ अन् एक बहीण. भावांसोबत तो फुटबॉलचा आनंद लुटायचा. आपल्या मोठ्या भावांचे फुटबॉल सामने पाहायला तो जायचा. वडील जॉर्ज मेस्सी आणि आई सेली हे त्याला एकदा त्याच्या भावाच्या क्लबमध्ये सराव दाखवायला घेऊन गेले. तेव्हा मेस्सी होता पाच वर्षांचा. त्याला तिथं ‘लहान बाळ’ म्हणूनच ट्रीट केलं जात होतं. पण त्या वयातही जवळ असलेल्या फुटबॉलशी मोठ्या खुबीनं तो खेळत होता. हीच गोष्ट एका प्रशिक्षकानं पाहिली अन् त्याला मेस्सीतलं अनोखं रूप दिसलं. त्यांनी त्याला मैदानात उतरायला सांगितलं. मेस्सीचा खेळ पाहून प्रशिक्षकही अवाक् व्हायचे. तीन-चार खेळाडूंचे अडथळे तो तेव्हापासूनच सहज पार करायचा. अर्जेंटिनामध्ये असल्यापासून त्याने या खेळात आपली जादू दाखवायला सुरुवात केली होती. एकापाठोपाठ एक स्पर्धा तो आपल्या गोलने गाजवत होता. अशातच १० वर्षाचा असताना त्याला एक आजार झाला. तो होता ‘ग्रोथ हार्मोन’ कमी असण्याचा. या आजारात शरीराची वाढ पूर्णपणे थांबते. डॉक्टरांनी सांगितलं की हा आजार बरा होण्यासाठी त्याला तीन वर्षं एक injection दर महिन्याला घ्यावं लागेल ज्याची किंमत होती 900 dollar म्हणजे आजचे जवळपास ७० ते ७५,०००. मेस्सीचे वडील जॉर्ज हे स्टील फॅक्टरीत कामगार होते, तर आई पार्ट टाईम काम करायची. दर महिन्याला एवढे पैसे खर्च करण्याची त्यांची परिस्थीती नव्हती. वडिलांच्या कंपनीकडून विमाखर्च मिळायचा, पण तो केवळ दोन वर्ष पुरेल एवढाच होता़ मेस्सी त्या काळात ‘नेवेल्स ओल्ड बॉईज’ नावाच्या क्लबकडून खेळायचा. वडिलांनी आर्थिक मदतीसाठी नेवेल्स क्लबकडे विनंती करून पाहिली, पण प्रतिसाद मिळाला नाही. एका क्लबच्या मालकानं आधार देण्याचा प्रयत्न केला, पण त्या काळात देशात मंदी आली. त्या क्लब मालकाचा धंदा डबघाईस आला अन् त्यानंही मदत बंद केली. मेस्सीचे उपचार बंद झाले. पण त्याच्या घरच्यांनी प्रयत्न थांबवले नाही. बार्सिलोनाच्या कॅटालोनिया भागात त्यांचे नातेवाईक होते. त्यांनी तिथे प्रयत्न केले.
अखेर स्पेनमध्ये बार्सिलोना क्लबचा आधार मिळाला, पण अडथळ्यांशी स्पर्धा नसेल तर तो मेस्सीचा प्रवास कसला. बार्सिलोना क्लबच्या संचालक मंडळाने एवढ्या लहान खेळाडूशी करार करण्यास नकार दिला, पण चार्ली रेक्सश नावाचे संचालक मेस्सीसाठी अडून बसले. त्यांना मेस्सी हवाच होता. त्यांना मेस्सीवर उपचार होणं गरजेचं वाटत होतं. शेवटी पेपर नॅपकिनवर करार करून १३ वर्षांच्या लिओनेल मेस्सीचा La masia मध्ये प्रवेश झाला. सुरुवातीला या बाहेरून आलेल्या मुलाचा छळ team manager पासून ते त्याच्यासोबत असलेल्या इतर प्रत्येक मुलाने केला. ही मुलं मेस्सीला खेळता खेळता मुद्दामहून लाथा मारायचे, त्याच्याकडे ball pass करायचे नाहीत, तर कधी कधी छोट्या चुकांमुळे खूप ओरडायचे. Messi खूप शांत राहिला लागला अनेकांना सुरुवातीला वाटलं की हा मुलगा बहुतेक मूक असावा म्हणजे याला बोलता येत नसावं. हा काळ Messi साठी खूप कठीण होता. त्याचं कुटुंब हे Argentina मध्ये होतं, तर तो त्याच्या वडिलांसोबत स्पेन मध्ये रहायचा.
दोन वर्षांपूर्वी मेस्सीला जेव्हा हा आजार झाल्याचं समजलं तेव्हा जागतिक स्तरावर football खेळण्याचं त्याचं स्वप्न अधुरंच राहील असं प्रत्येकाला वाटायला लागलं होतं, पण फक्त एका व्यक्तीला सोडून आणि ती म्हणजे त्याची आज्जी. Leo ची प्रत्येक match पाहणाऱ्या आज्जीला leo वर खूप भरोसा होता. पण याच काळात आज्जीचं निधन झालं अन leo ला दुसरा झटका बसला. पण जाता जाता आज्जी Leo साठी एक महत्त्वाचं काम करून गेली आणि ते म्हणजे तिने leo च्या आत्मविश्वासाला जागृत केलं. ती सतत Leo ला सांगायची की तू special आहेस एक दिवस खूप मोठा खेळाडू बनशील. ज्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो त्या गोष्टी आपल्या सोबत घडायला लागतात. १३ वर्षाचा मेस्सी जेव्हा Barcelona क्लब मध्ये दाखल झाला तेव्हा तिथे आलेल्या कोणत्याच संकटाला तो घाबरला नाही. कारण त्याचा स्वतःच्या क्षमतेवर, स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास होता. आज्जीने आपल्यामध्ये जागवलेल्या विश्वासाबद्दल मेस्सी हा तिच्याबद्दल कायम ऋणी राहिला. शतक झळकावल्यानंतर सचिन तेंडुलकर आकाशाकडे बघतो, बॅट आणि हेल्मेट हाती घेऊन वर पाहून वडिलांना अभिवादन करतो. तसंच मेस्सीचंही. गोल मारल्याच्या आनंदानंतर मेस्सीही वर पाहतो. प्रत्येक गोलनंतर त्याला त्याची आजी आठवत असते. प्रत्येक गोल तो तिलाच समर्पित करतो.
2. Desire to Always Get Better
एका interview मध्ये messi ला विचारलं गेलं की, “तुझ्या मध्ये अशी काय गोष्ट आहे की जी तुला जगातील सर्वात महान खेळाडू बनवते?” त्यावर Messi ने शांतपणे उत्तर दिले, “My Desire to Always Get Better.” मला सतत असं वाटतं की मी कालच्यापेक्षा आज जास्त चांगल्या पद्धतीने खेळू शकतो.
3. Give your 100%
जेव्हा Messi ला विचारण्यात आलं की, “तू football खेळणाऱ्या young players ला काय advice देशील?” तर Messi म्हणतो, “जर तुम्हाला काहीतरी अफाट करायचं असेल, तर प्रत्येक क्षणाचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे कारण की संधी ही एकदाच येते आणि त्यावेळी जर तुम्ही तुमचे 100% दिले नाहीत, तर त्या संधीची माती व्हायला फार वेळ लागत नाही. Messi पुढे म्हणतो. ‘जेव्हा केव्हा मी मैदानावर असतो तेव्हा मला कोणत्याच प्रकारचा doubt नसतो, कारण प्रत्येक वेळेस मी माझे 100% देत असतो.’ कोणतीही अफाट गोष्ट करण्यासाठी commitment गरजेची असते. ही commitment तुम्ही स्वतःला देता की इतरांना देता यावर गोष्टी बदलत नाहीत, तर ही commitment तुम्ही स्वतः कशा पद्धतीने पाळता यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात.
4. Chase the dreams
Messi म्हणतो मी कधीच पैसा मिळवण्यासाठी खेळलो नाही, मी खेळलो ते फक्त माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. जर मला या खेळातून पैसे मिळाले नसते, तर कदाचित मी आज फुकट खेळलो असतो आणि आनंदात राहिलो असतो. त्यामुळं पैशाचा, प्रसिद्धीचा पाठलाग करू नका, नेहमी तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा, बाकी सगळ्या गोष्टी आपोआपच तुमच्यामागे येतील.
मेस्सीने आपल्या कारकिर्दीत football मधले जेवढे शक्य आहे तेवढे सगळे cups, awards जिंकले. फक्त एक cup सोडून आणि तो म्हणजे World Cup. जगातल्या प्रत्येक खेळाडूला हेवा वाटावा अशी बहारदार कारकीर्द घडवणाऱ्या मेस्सीलाही याच गोष्टीचं शल्य होतं. ३५ वर्षाचा मेस्सी यंदा आपला शेवटचा World Cup खेळत होता. तो खेळत असलेल्या Argentina टीमची सुरुवात काहीशी खराब झाली, पण हळूहळू टीमने आपली कामगिरी उंचावली. पुढे सरकणाऱ्या World Cup सोबतच Messi सुद्धा आपल्या स्वप्नाकडे एक एक पाऊल टाकत होता. १८ डिसेंबर २०२२ कतार मध्ये रंगलेल्या या स्पर्धेचा अखेरचा दिवस उजाडला. 120 मिनिटांपेक्षा जास्त चाललेल्या या match मध्ये Argentina चा Goalkeeper असलेल्या Martínez ने penalty shootout मधला goal अडवला आणि जगभरातल्या क्रीडाप्रेमींच्या डोळ्यातले आनंदाश्रू अनावर झाले. Argentina जिंकली. Messi जिंकला. Football जिंकले. आणि स्वप्न सत्यात उतरले.
तुम्हाला आजचा Sunday Motivation चा लेख कसा वाटला हे कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि Sunday Motivation साठी नवी अर्थक्रांतीच्या चॅनेलला आताच subscribe करा.