Author: naviarthkranti

  • उद्योगात स्थिर होण्यासाठी लागतात १ हजार दिवस

    उद्योगात स्थिर होण्यासाठी लागतात १ हजार दिवस

    सर्वसाधारण नोकरी करण्याचीच ज्या कुटुंबात प्रथा आहे, त्या कुटुंबातील कोणीही व्यवसायात आला तर लोकांना वाटते की, आता लगेच पैसा मिळायला हवा. पण नोकरी म्हणजे, बे एके बे. पगाराचा कालावधी एक महिन्याचा असतो. महिना झाल्यावरच ठराविक रक्कम हातात येते. तर उद्योग म्हणजे; बे दुणे चार, चार दुणे आठ… पण व्यवसायाचा कालावधी हा किमान १ हजार दिवसांचा असतो. अर्थात व्यक्तिपरत्वे, व्यवसायपरत्वे हा कालावधी कमी अधिक होऊ शकतो.

    जसे स्त्री एका मुलाला जन्म देण्यासाठी नऊ महिने घेते, पण नऊ स्त्रिया मिळून एका महिन्यात एका मुलाला जन्म देऊ शकत नाहीत. तसेच एखाद्या माणसाला, नवउद्योजकाला उद्योग समजण्यासाठी, मार्केटमधील सर्व प्रक्रिया, तेजी मंदी, खरेदी, विक्री, जाहिरात, मॅनेजमेंट इत्यादी व्यवसायाच्या सर्व खाचाखोचा समजून त्याला व्यवसायात तरबेज होण्यासाठी किमान ३ वर्षे लागतात, मग तुमच्याकडे कितीही भांडवल असू द्या.

    तुमच्याकडे जरी २० लाखांचे भांडवल असले तर ते टप्याटप्प्याने गुंतवत जा. सर्व भांडवल एकदम गुंतवले, तर अनुभवाविना नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. प्रथम ५ लाख गुंतवा. पहिले सहा महिने व्यवसाय करा व शिका. नंतर पुढचे पाच लाख गुंतवा. असे हळूहळू भांडवल वाढवत जा व व्यवसायात तीन वर्षात चांगल्या प्रकारे जम बसवा. नाहीतर एकदम गुंतवाल अन उत्पन्न नाही आल्यावर स्वतःचा खर्च, बँकेचे हप्ते याचे टेन्शन यायला लागेल व व्यवसाय सोडून पैशाच्या जुळवाजुळवीत वेळ जाऊन फ्लॉप शो होईल. परंतु तुम्ही टप्पाटप्प्याने २० लाख गुंतवले तर तुम्हाला अनुभव येईल, मार्केटचा अंदाज येईल, बऱ्याच नवीन गोष्टी शिकता येईल. त्यामुळे रिस्क कमी होईल. तीन वर्षात तुमची चांगली बॅलन्सशीट तयार होऊन कोणतीही बँक २५ ते ३० लाख नवीन भांडवलही देईल. तेव्हा व्यावसायिक बंधूनी १००० दिवस हा कालावधी लक्षात ठेवावा व त्यानुसार मार्गक्रमण करावे. नाहीतर आरंभशूर खूप असतात व ते दोन तीन महिन्यात यशाची अपेक्षा करतात आणि अपयशी झाल्यावर स्वतःच्या अपयशाचे खापर व्यवसायावर आणि इंडस्ट्रीवर फोडतात. त्यामुळे समाजात व्यवसायाविषयी नकारात्मक वातावरण तयार होते व नवीन व्यावसायिक तयार होत नाहीत. तुम्ही असे करू नका.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

  • आयुष्यात सुपर सक्सेस कसे मिळवावे ?

    आयुष्यात सुपर सक्सेस कसे मिळवावे ?

    १) गोल सेट करा व बाकी कचरा फेका :

    ज्याच्या आयुष्यात ध्येय नाही, तो मनुष्यप्राणी नाही. आपले ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्यासाठी वचनबध्द व्हा, ते पूर्ण झाल्याशिवाय मागे हटू नका. ज्यातून काही लाभ होत नाही अशा अनावश्यक गोष्टींचा त्याग करा.

    २) दैनंदिन सवयी विकसित करा :

    ३) यश व्हीज्युअलाईझ करा :

    यशस्वी व्यक्ती स्वतःचे ध्येय सतत डोळ्यासमोर जिवंत ठेवून काम करतात. जेव्हा आपण आपले ध्येय व्हीज्युअलाईझ करतो, तेव्हा नवीन कौशल्ये आत्मसात करणे व चांगल्या सवयी स्वत:ला लावणे या गोष्टी सहजपणे होतात. आपले ध्येय दृष्यमान करणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा, ते व्हीज्युअलाईझ करा व पुढे चला. यशाचा मार्ग सापडत जाईल सर्व यशस्वी व्यक्ती यशाच्या व्हीज्युअलायझेशनचे महत्व जाणतात. प्रत्यक्ष काम करण्याअगोदर त्यांच्या यशाकडे जाण्याचा रोडमॅप हा त्यांच्या दृष्यमानतेच्या रूपात तयारच असतो. ती योग्यरित्या वापरली तर अत्यंत प्रभावी आहे. जर तुमच्या मनात तुम्ही तुमच्या ध्येयाचे व यशाचे चित्रच तयार केले नसेल तर तुमची अवस्था आंधळ्या माणसासारखी होईल. तुम्हाला यशाची संधी कधीच मिळणार नाही.

    ४) नेटवर्क विकसित करा :

    समविचारी लोकांच्या संपर्कात राहून स्वतःचे एक नेटवर्क विकसित करा. यशस्वी होण्यासाठी तुमच्या सभोवती यशस्वी लोकांचे नेटवर्क असणे आवश्यक आहे. यशस्वी व्यक्ती आपला बराच वेळ कॉन्फरन्स, मिटींग्ज, बिझनेस क्लब, इव्हेंटस, सेमिनार्स याद्वारे आपले नेटवर्क विकसित करतात. तर काही वेळा फक्त एक कॉफी पुरेशी असते. अ कप ऑफ कॉफी कॅन चेंज युअर लाईफ.

    ५) लवकर सुरुवात करा :

    उपयोगी व कौशल्याभिमुख शिक्षण घ्या, कमी वेळेत पूर्ण होणारे व कमी शिक्षण घ्या. आपल्या उमेदीचा बराच काळ शिक्षणात व स्पर्धा परीक्षा देण्यात जातो व वय निघून गेल्यावर नोकरी शोधत बसतात. वाया गेलेल्या वेळेचे महत्व वेळ निघून गेल्यावर कळते. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घ्या व कामाला लागा नाहीतर पश्चाताप करण्याची पाळी येईल.

    ६) जागा ठिकाण बदला :

    चौकटीबाहेर पडा, वेगवेगळ्या ठिकाणी जा. तेथील परिस्थितीचे निरीक्षण करा व संधी ओळखा. जगात शिकण्यासारखे बरेच काही असते. प्रवासामुळे अनेक संकल्पना, संधी सुचतात. त्याचा आपल्या ध्येयपूर्तीसाठी उपयोग होतो, तेव्हा प्रवासाची आवड असावी.

    ७) माईंड रीड करा :

    कोणत्याही ध्येयाच्या मागे जाताना यशस्वी व्हायचे असेल तर आपले मन अत्यंत खंबीर व संतुलित असावे लागते. त्यासाठी स्वतःच्या मनाचा सतत मागोवा घेणे आवश्यक आहे. आपले मन क्लिअर असेल तरच आपली निर्णयक्षमता प्रभावी ठरते. आपल्या ध्येयावर विश्वास असणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्याचे मनातून विश्लेषण झाले पाहिजे त्यासाठी मन संतुलित असणे आवश्यक असते.

    ८) स्वतःशी प्रामाणिक रहा :

    जर तुम्हाला स्वत:ची ओळख बनवायची असेल, स्वत:ला ओळखायचे असेल तर स्वतःशी प्रामाणिक रहा. त्यामुळे योग्य निर्णयक्षमता वाढीस लागेल. जे लोक स्वतःशी प्रामाणिक नसतात, त्यांचे करिअर, वैयक्तिक जीवन, प्रतिष्ठा यामध्ये संतुलन नसते. त्यामुळे यश प्राप्तीचे सर्व मार्ग बंद झालेले असतात.

    ९) डिसीप्लीन मेंटेन करा :

    शिस्त हा आपले ध्येय व ध्येयपूर्ती म्हणजेच यश यामधला पूल आहे. आपले आचार, विचार, वर्तन, संभाषण, संबध, कौटुंबिक व व्यवसायिक जीवन या सर्वात शिस्त हवीच. जे लोक यशाच्या उच्च शिखरावर पोहचले आहेत त्यांनी आयुष्यात शिस्तीला अति महत्व दिले आहे. शिस्तबद्धता हा यशस्वी व श्रीमंत व्यक्तींमधला सर्वोत्तम गुण आहे, शिस्तीमुळे इच्छाशक्ती वाढते व ध्येय गाठण्यास मदत होते.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

  • परिस्थिती कशी का असेना निर्णयक्षमता महत्त्वाची!  

    परिस्थिती कशी का असेना निर्णयक्षमता महत्त्वाची!  

    घरची स्थिती मध्यमवर्गीय. वडील छोटेसे किराणा दुकान चालवायचे. थोडी शेती, त्यात वय वाढत चाललेले, घरच्यांना काळजी वाटू लागली व नातेवाईकांमधीलच एका दहावी नापास झालेल्या मुलीशी फारसा विचार न करता त्याचे लग्न लावून दिले आणि किराणा दुकान इथून पुढे तूच चालव म्हणून वडिलांनी सांगितले.

    त्यामुळे आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याला खूप मोठे महत्व आहे. एकदा गेलेली वेळ परत येत नाही व वेळेनुसार अनेक संधी निघून जातात व शेवटी हताश होण्याशिवाय पर्याय नसतो. लोकांना भेटा, नवनवीन गोष्टी वाचा, podcast ऐका, मोठ्या लोकांचे interviews पहा त्यातून जेवढं शिकता येईल तेवढं शिका. निर्णय घेण्यास वेग द्या व स्वतःला सुनील होण्यापासून वाचवा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • रोज ५ किमी चाला, ५ पाने वाचा व श्रीमंत व्हा!

    रोज ५ किमी चाला, ५ पाने वाचा व श्रीमंत व्हा!

    जगभरात श्रीमंत व्यक्तींच्या आचरणाचे अध्ययन करण्यात आले, त्यात असे लक्षात आले की, जवळपास सर्व श्रीमंत आणि यशस्वी व्यक्ती नियमित वाचन करतात, तर गरीब लोक टीव्ही पाहतात व मोबाईलवर टाईमपास करतात. एखाद्या पुस्तकाच्या वाचनाने, त्यातील एखाद्या घटनेने आयुष्यात मोठी प्रेरणा मिळून आपले जीवन बदलू शकते. विविध विषयांची चांगली पुस्तके आपल्याला जगण्याची नवी दिशा दाखवतात. आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम करतात.

    ग्रंथ आमुचे साथी… ग्रंथ आमुच्या हाती…

    ग्रंथ उजळती अज्ञानाच्या… अंधाराच्या राती…

    या ग्रंथांच्या तेजामधुनी, जन्मा येते क्रांती,

    ग्रंथ शिकविती माणुसकी अन ग्रंथ शिकविती शांती

    निराश जीवा धीर धरूनी पुढे घेऊनी जाती…

    वाचन करणाऱ्या माणसाची कल्पनाशक्ती विकसित होते व तो नवनवीन गोष्टी शिकत राहतो. तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करणारे, तुम्हाला प्रेरणा देणारे, तुम्हाला क्रिएटिव्ह थिंकिंगला (कल्पक विचारशक्ती) चालना देणारे माहितीपूर्ण वाचन करा. राजकीय चिखलफेक, अपघात, बलात्कार, खून मारामाऱ्या, भ्रष्टाचार, आंदोलने, मोर्चे, खंडणी, आत्महत्या अशा संबधी बातम्या व माहिती देणारे वाचन करू नये, त्यामुळे तुमचे मन व विचारही कलुषित होतात.

    रोज ५ किमी चालण्याने रक्तदाब, हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते. रोज चालायची सवय मेंदूसाठी फायदेशीर ठरते. चालण्यामुळे ताणतणाव कमी होतो. मुडही फ्रेश राहतो. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.

    त्यामुळे आयुष्यात श्रीमंत व निरोगी होण्यासाठी माणसाने रोज किमान ५ किमी चालावे, किमान ५ पाने वाचावी व पाच वाक्ये लिहावीत आणि मोबाईल व टीव्ही यांचा गरजेपुरताच वापर करून त्यापासून दूर व्हावे, मग बघा श्रीमंती तुमच्या घरी कशी आपोआप चालत येईल.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • व्यापाराची त्रिसूत्री : चतुराई, मेहनत, नीती

    व्यापाराची त्रिसूत्री : चतुराई, मेहनत, नीती

    व्यापार हा चतुराईने होत असतो. तुमच्याकडे खूप भांडवल, खूप हुशारी आहे, तुम्ही खूप मेहनती आहात, तरीही व्यापारात यशस्वी होण्यासाठी चतुराई खूप महत्वाची आहे. फक्त मेहनतीनेच व्यापार होत असता, तर काबाडकष्ट करणारे सर्वजण व्यापारी व श्रीमंत झाले असते. चतुराई म्हणजे योग्य वेळी, योग्य निर्णय घेण्याची कला… योग्य व्यक्ती, संस्थांशी संवादाची कला… कधी थांबायचे, कधी माघार घ्यायची, कधी व कसे आक्रमक व्हायचे? कधी बचत करायची, कधी खर्च करायचा याचे तारतम्य. मार्केटची हवा ओळखून आपला बिझनेस चालविणे होय.

    नीती म्हणजे तुमचा व्यवसाय करण्याच्या पध्दतीमुळे मार्केटमध्ये तुमचा एक प्रकारचा नावलौकिक तयार होतो. तुमची व्यापार करण्याची हातोटी, व्यवहार करण्यातील प्रामाणिकपणा, ग्राहकांना विक्री पश्चात सेवा, योग्य ब्रँड व व्यक्तीबरोबर नेटवर्क यामुळे ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात त्यात तुमचे नाव व ब्रॅंड तयार होतो व व्यवसाय मोठा होतो. याचा मूलभूत पाया व तयारी तुमच्या नीतीपासून तयार होते. तुमच्या कर्मचाऱ्यांशी तुम्ही प्रोफेशनल वागत असाल तर अधिक चांगले लोक तुम्हाला येऊन मिळतील. तुम्ही पुरवठादारांची देणी वेळेत देणार असाल, तर अधिक क्रेडिट मिळते व मोठी पत तयार होते.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • ध्यानाने होत आहे रे आधी केलेच पाहिजे!

    ध्यानाने होत आहे रे आधी केलेच पाहिजे!

    “वर्तमानात जगा, भूतकाळाचा किंवा भविष्यकाळाचा जास्त विचार करू नका”, हे वाक्य तुम्ही याआधीही खूप वेळा ऐकलं असेल. पण अतिविचार करणं आपल्या इतकं अंगवळणी पडलेलं असतं की हजार वेळा वाचून सुद्धा हे वाक्य आपल्याला आपल्या रोजच्या जगण्यात उतरवता येत नाही. तुम्ही कधी एखाद्या लहान मुलाचं बारीक निरीक्षण केलंय का? जर केलं असेल तर एक गोष्ट नक्कीच तुमच्या लक्षात आली असेल; ती गोष्ट म्हणजे लहान मुलांच्या मनात फक्त आज असतो.

    1. दृष्टीकोनात सुधार

    अतिविचार तुम्हाला कधीच शांत आणि आनंदी आयुष्य जगू देत नाहीत. दररोजच्या ध्यानामुळे दुःख, राग, भीती या गोष्टींतून बाहेर यायला आणि पर्यायाने वास्तवाची जाणीव व्हायला मदत होते.

    2. नकारात्मक विचार कमी करण्यासाठी मदत

    बऱ्याचदा, आपण आपल्या आयुष्यातील गोंधळांना जबाबदार असणारे दोष कुणा दुसऱ्यांवर लादण्याच्या प्रयत्नात असतो. काही झाले तरी, दुसऱ्या कुणाकडे बोट दाखवले की अडचणींचा सामना करणे सोपे वाटते. दुसऱ्यांमध्ये दोष पाहणे आणि बोट दाखवणे यांसारख्या नकारात्मक वृत्तींना बाजूला करायला ध्यान मदत करते.

    3. मनातील कचरा साफ होतो

    अतिविचार हे तुमचं मन तुम्हाला खात असल्याचं लक्षण आहे. तुमच्या अस्वस्थतेच्या मुळाशी जाऊन त्याच्याशी दोन हात करा. ध्यानामुळे मनातील कचरा साफ होण्यासाठी मदत होते. तुमच्या डोक्यातील विचारांना व्यवस्थित मांडणं, योग्य विचारांना प्राधान्यक्रम देणं आणि संपूर्णपणे व्यवस्थित विश्लेषण करणं या गोष्टीसुद्धा ध्यानाने शक्य होतात.

    4. आसक्तींपासून मुक्तता

    अतिविचार हे तुमच्या – तुमचे शब्द, कृती, कल्पना आणि विचार यांच्याबद्दलच्या – आसक्तीचे प्रकट रुप आहे. आपण लोक आणि नात्यांना इतके चिकटून बसलेले असतो. त्यामुळे इतकी मतं व कारणं तयार होतात, आणि मग आपण अती टीका करायला लागतो किंवा अति चिकित्सक होतो. ध्यानामुळे आसक्ती आणि अतिविचारांच्या गोंधळातून बाहेर पडायला मदत होते.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • दांडेली अभयारण्य: कर्नाटकातील नैसर्गिक सौंदर्याचा खजिना

    दांडेली अभयारण्य: कर्नाटकातील नैसर्गिक सौंदर्याचा खजिना

    उत्तर कर्नाटकात स्थित असलेलं दांडेली म्हणजे कर्नाटकातील सर्वात मोठं दुसऱ्या क्रमांकाचं अभयारण्य. फारच कमी माणसांची वर्दळ, स्वच्छ प्रदूषणमुक्त हवा, हिरवागार निसर्ग, लहान लहान कौलारू घर, लहानश्या टपऱ्या आणि एखाद-दुसरं हॉटेल अशा वातावरणात असलेलं दांडेली. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गर्द झाडीच्या झुलत्या कमानी पाहिल्या की, वाटतं दांडेली जणूकाही आपल्या स्वागतासाठीच नटलेली आहे. त्या गर्द झाडीची शहरी लोकांना भीती वाटू शकते पण तिथली स्वच्छ हवा, पक्षांचा मंत्रमुग्ध करून टाकणारा किलबिलाट, काळी नदीचा शांत प्रवाह एकूणच सगळं वातावरण पाहिलं की दोन – तीन दिवस तरी तिथून मुक्काम हलवावा नाही वाटत.

    पुण्याहून दांडेलीचा रस्ता जवळपास 442 किलोमीटरचा आहे. पुणे- सातारा हायवेने कोल्हापूर मधून बेळगाव वरुन 2 तासात तुम्ही दांडेलीला पोहोचू शकता. पुण्याहून 8 – 8.30 तासांचा प्रवास करून जरी थकवा आला असेल तरी तिथल्या शांत वातावरणाने हा थकवा अगदी चुटकीसरशी निघून जातो.

    आणखी वाचा

  • व्यवसायाच्या शुभारंभापासून तो मोठे होईपर्यंत जी प्रोसेस आपण राबवतो ती आपल्या व्यवसायचे भविष्य ठरवते.

    व्यवसायाच्या शुभारंभापासून तो मोठे होईपर्यंत जी प्रोसेस आपण राबवतो ती आपल्या व्यवसायचे भविष्य ठरवते.

    आता व्यवसाय किंवा बिझनेस म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्प्या भाषेत सांगायचं, तर आपण एखादी वस्तू किंवा सेवा तिच्या खरेदीच्या किंवा निर्मिती मूल्यापेक्षा जास्त किंमतीने बाजारात विकतो आणि त्यातून नफा मिळवतो तेव्हा या व्यवहाराला बिझनेस म्हणजे व्यवसाय असं म्हणतात. पूर्वीच्या काळी चलन म्हणून वस्तूंचा वापर व्हायचा. अजूनही काही गावांमध्ये अशी पद्धत आहे कि वस्तूच्या मोबदल्यात वस्तू दिली जाते. मग प्रश्न हा पडतो आपल्या आजूबाजूला इतके लोक व्यवसाय करताना दिसत असतात, त्यातले काही यशस्वी असतात आणि तर काहींचा व्यवसाय ठराविक काळापुरताच सुरु राहून नंतर बंद पडतो. असं का होत असेल? तर एक म्हणीमध्ये याचं सार लपलेले आहे, ते म्हणजे, ‘शेतात काय पिकतं, यापेक्षा बाजारात काय विकलं जातं’ हे महत्वाचं  आहे. व्यवसाय म्हणून आपण ज्या गोष्टीचा किंवा प्रॉडक्टचा विचार करतो त्याचा आणि सध्याच्या बाजारात त्याची किती गरज आहे हा विचार फार महत्वाचा आहे.

    या सर्व गोष्टींची तयारी झाल्यानंतर त्यासोबतच किंबहुना त्याआधीपासूनच विचार करावी अशी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निधी किंवा भांडवल. यामध्ये विचार करताना आपल्या व्यवसायाला किती पैसे आवश्यक आहेत हे तर महत्वाचे आहेच; पण त्यासोबतच व्यवसायातून नफा मिळेपर्यंत व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्यासाठी आवश्यक अतिरिक्त निधी आपल्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय असतात ते म्हणजे, आपण गुंतवणूकदारांकडून भांडवल घेऊ शकतो किंवा सरळ आपण बँकमधून कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो. नवीन उद्योजकांसाठी सरकारने उद्योजकता वाढीस लागावी यासाठी अनेक योजना देखील आणल्या आहेत आपण त्याचासुद्धा वापर करू शकतो.

    या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर तुम्ही तुमचा लहान-मोठा बिझनेस नक्कीच सुरु करु शकता, पण तो पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी तुमच्याजवळ काही उत्तम सवयी असणे गरजेचे आहे. आता या नेमक्या सवयी कोणत्या? अगदी थोडक्यात सांगायचं तर धाडस, आत्मविश्वास, रिस्क घेण्याची तयारी, दूरदृष्टी, संयम, कष्ट, जिद्, मेहनत, सातत्य आणि चिकाटी. हो हे शब्द बोलायला जितके सोपे वाटतात तितकीच हे सर्व अमलात आणण्यासाठी खूप मोठी मानसिक तयारी असणे गरजेचे आहे. ही मानसिक तयारी तेव्हाच असू शकते, जेव्हा तुम्ही खूप जास्त महत्त्वाकांक्षी असता आणि तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सर्व प्रकारे तयार असता.

    आपण एक गोष्ट नेहमी ऐकतो की यश मिळवणे जितके अवघड आहे, त्यापेक्षा यश टिकवणे जास्त अवघड असते. हे समीकरण व्यवसायाला सुद्धा लागू होते. व्यवसाय सुरु करणे जितके अवघड आहे, त्यापेक्षा सातत्याने तो चालवणे आणि त्याचा सर्वदूर प्रसार करणे अवघड आहे. अवघड असले, तरी अशक्य आजिबात नाही आणि हो शेवटी एवढं नक्की सांगता येईल की अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. जसा प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा त्याची पद्धत वेगळी अगदी तसेच प्रत्येकाचा अनुभव वेगळा आणि त्यातून आलेले शहाणपण हे त्याहून वेगळे. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेऊन पूर्व तयारी आणि पूर्ण तयारी करून नक्कीच आपण आपल्या स्वप्नातील व्यवसायच्या क्षेत्रात मैलाचा दगड पार करू शकू.

  • तीर्थन व्हॅली : याहून सुंदर अजून काय?

    तीर्थन व्हॅली : याहून सुंदर अजून काय?

    जिभी

    हिमाचल प्रदेशच्या तीर्थन व्हॅलीमधील एक निसर्गरम्य गाव म्हणजे जिभी. इथल्या वॉटरफॉलचं सौंदर्य काही औरच असतं. डोंगरांमधून खळखळत खाली येणारं पाणी मनाला एक वेगळीच शांतता देऊन जातं. सोबतच्या पक्षांचा चिवचिवाटही या आनंदात भर घालतो.

    जलोरी पास आणि सिरोलसार लेक

    इथल्या आकर्षणामध्ये ही दोन ठिकाणंसुद्धा महत्त्वाची आहेत. फक्त ठिकाणंच नाही तर इथपर्यंत पोहोचण्याचे रस्तेही तितकेच मनमोहक आहेत. रस्त्यावर बर्फाची चादर अंथरलेली असल्याचा भास या ठिकाणी जाताना होतो. मध्यभागी गोठलेला तलाव आणि चारही बाजूंनी बर्फच बर्फ. उंचावर असलेलं मंदिर. इथे एकदा आल्यानंतर तुमचा वेळ कसा जाईल याचा अंदाजही येणार नाही.

    चैहणी गाव

    तीर्थन व्हॅलीतील आणखी एक छोटसं गाव म्हणजे चैहणी. यालाच चैहणी कोठी सुद्धा म्हणतात. इथे एक कोठी आहे. लाकडांपासून तयार केलेली ही कोठी १५०० वर्ष जुनी आहे. इथे कुल्लूचे राजा राणा ढाढिया राहत होते. १५ मजल्यांची ही इमारत १९०५ मध्ये आलेल्या भूकंपात १० मजलीच शिल्लक राहिली आहे. या कोठीतच शृंगा ऋषींचं भंडारही आहे. या कोठीपासूनच साधारण एक किमीच्या अंतरावर शृंगा ऋषींचं मंदीर आहे.   

    तीर्थन व्हॅलीला केव्हा जाणार?

    तीर्थन व्हॅलीला भेट देण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे मार्च ते जून. यावेळी वातावरण फारच चांगलं असतं. जास्त थंडीही नसते. त्यासोबतच वेगवेगळ्या थरारक खेळांचाही तुम्ही इथे आनंद घेऊ शकता. उन्हाळ्यात जलोरी पास आणि हिमालयन नॅशनल पार्कची ट्रेकिंग सुद्धा करू शकता.

    कसे जाल?

    आणखी वाचा

  • स्वित्झर्लंडची मजा भारतात घ्यायचीये? मग या ठिकाणी जायलाच पाहिजे!

    स्वित्झर्लंडची मजा भारतात घ्यायचीये? मग या ठिकाणी जायलाच पाहिजे!

    मित्रांनो आपल्याला माहितीच आहे हिमाचल प्रदेश हे आपल्याकडचं असं ठिकाण आहे जे लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत प्रत्येकालाच आकर्षित करत आलंय. इथलं निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक इथं येत असतात. इथं वेगवेगळे फेमस टूरिस्ट स्पॉट्ससुद्धा आहेत. रोजच्या गर्दीपासून दूर जाऊन शांत ठिकाणी निसर्गसौंदर्य अनुभवायला आपल्या प्रत्येकालाच आवडतं आणि अशाच शांततेचा जर तुम्हालाही अनुभव घ्यायचा असेल, तर हिमाचल प्रदेशातल्या खजियारला तुम्ही नक्कीच भेट द्यायला हवी. “मिनी स्वित्झर्लंड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खजियारला अलौकिक निसर्गसौंदर्य लाभलं आहे.

    khajjiar-tourism

    खजियारच्या या मखमली प्रदेशात एका बाजूला बाराव्या शतकातील लाकडातील कोरीव कारागिरीचं “खज्जिनाग मंदिर” असून, त्याच्या गर्भगृहात नागदेवतेची मूर्ती आहे. १६व्या शतकात राजा बलभद्र बर्मनने येथे पांडवांच्या लाकडातील मूर्ती उभारल्या. राजा पृथ्वीसिंग यांची धार्मिक प्रवृत्तीची दाई “बाल्टू” ने १७ व्या शतकात या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. “मिनी स्वित्झर्लंड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खजियारमध्ये तुम्ही adventure ही करू शकता. इथं तुम्ही Paragliding पासून ते Horse Riding पर्यंत अनेक वेगवेगळ्या activities करू शकता. एवढचं नाही तर खजियारमध्ये तुम्ही trekking चाही अनुभव घेऊ शकता. या ठिकाणी राहण्यासाठी अनेक गेस्ट हाउसही आहेत. इथं तुमच्या राहण्याची उत्तम सोय होऊ शकते.

    खजियारला जाणार कसं?

    आणखी वाचा