Author: naviarthkranti

  • सुरुवात किराणा मालाच्या दुकानापासून ते जगातील सर्वात मोठ्या मोबाईल कंपनीपर्यंत…

    सुरुवात किराणा मालाच्या दुकानापासून ते जगातील सर्वात मोठ्या मोबाईल कंपनीपर्यंत…

    सुरुवात : १९३८ साली ली बियांग चल नावाच्या माणसाने दक्षिण कोरियामध्ये ‘सॅमसंग’ या नावाने किराणा मालाचे दुकान सुरू केले.

    पहिला बदल : १९४० साली किराणा दुकानांमध्ये सुरु झालेल्या प्रचंड स्पर्धेमूळे त्याने किराणा मालाचे दुकान बंद करून नूडल्स बनवण्याच्या व विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात केली.

    दुसरा बदल : १९५० साली कोरिअन युद्धामुळे व्यवसाय बुडाला. त्यानंतर सॅमसंगने नूडल्सचे उत्पादन बंद करून साखरेचे उत्पादन करायला सुरुवात केली. स्वतःचा साखर कारखाना सुरु केला.                                                                     

    तिसरा बदल : युद्धसमाप्तीनंतर १९५४ साली सॅमसंगने साखरेचे उत्पादन बंद केले व गरम कपडे बनवण्यासाठी लागणारे लोकरीचे कापड बनवणारी कोरियातील सर्वात मोठी कापड गिरणी सुरू केली.

    चौथा बदल : जसजसा कोरिया विकसित होत गेला, वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी १९५६ साली सॅमसंगने कापड गिरणी बंद करून इन्शुरन्स व सिक्युरिटीज विकायच्या व्यवसायाला सुरुवात केली.

    पाचवा बदल : १९६० साली सॅमसंगने इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात प्रवेश केला व ‘ब्लॅक ऍन्ड व्हाईट’ टेलिव्हिजन सेट्स बनवायला सुरुवात केली.

    सहावा बदल : १९८० साली सॅमसंगने टेलिकॉमच्या क्षेत्रात प्रवेश केला व व टेलिफोन स्विच बोर्ड आणि फॅक्स सिस्टिम्स बनवायला सुरुवात केली.

    सातवा बदल : १९८७ साली सॅमसंग कंपनीचा संस्थापक ली याचा मृत्यू झाला. त्यामूळे कंपनीचे विभाजन चार वेगवेगळ्या व स्वतंत्र कंपन्यांमध्ये झाले. डिपार्टमेन्टल स्टोअर्स, केमिकल्स व लॉजिस्टिक्स, पेपर/टेलिकॉम व इलेक्ट्रॉनिक्स असे चार स्वतंत्र विभाग झाले.

    आठवा बदल : त्याच साली सॅमसंगने जागतिक स्तरावर सेमिकंडक्टर प्लॅन्ट्समध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली.

    नववा बदल : १९९० साली सॅमसंगने जागतिक स्तरावरची गुंतवणूक बंद करून रिअल इस्टेटच्या क्षेत्रात प्रवेश केला. मलेशियामधले पेट्रॉनास टॉवर्स तसेच तैवानमधील तैपेई १०१ आणि दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतींचे बांधकाम सॅमसंगने केले.

    दहावा बदल : १९९३ साली मोठी मंदी आली. आशियन बाजारात मोठी मंदी होती. सॅमसंगला पण याचा मोठा फटका बसला. त्यावेळी लीचा मुलगा ली कून ही याने कंपनीचा सीईओ म्हणून सूत्रे हातात घेतली होती. त्याने कंपनीचे डाऊनसायझींग करायला, कंपनीच्या उपकंपन्या म्हणजेच सबसिडिअरीज विकायला व उरलेल्या कंपन्यांचे एकत्रीकरण करायला सुरुवात केली.

    अकरावा बदल : इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरींग व केमिकल विभागांचे एकत्रीकरण केल्यामुळे सॅमसंग ही जगातील मेमरी चिप्सचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी बनली.                                                                                                    

    बारावा बदल : मेमरी चिप्सच्या व्यवसायात खूप स्पर्धा निर्माण झाल्यामुळे १९९५ साली सॅमसंगने ‘लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले’च्या क्षेत्रात प्रवेश केला व केवळ १० वर्षातच ‘फ्लॅट स्क्रीन टेलिव्हिजन’ बनवणारी जगातील सगळ्यात मोठी कंपनी बनली.

    तेरावा बदल : २०१० साली लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेच्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाल्याने सॅमसंग कंपनीने पुढील १० वर्षांच्या वाटचालीचे धोरण ठरवले व स्मार्टफोनच्या क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्याचे ठरवले. त्याचवेळी आयफोनसाठी लागणारे अनेक महत्वाचे सुटे भागसुद्धा सॅमसंग पुरवत होती.

    आज 2024 सालामध्ये सॅमसंग ही मोबाइल फोन व स्मार्टफोन बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. आज सॅमसंगच्या स्मार्टफोनची विक्री आयफोनच्या विक्रीच्या दुपटीहून अधिक आहे.

    एवढे सगळे बदल होऊनही एक गोष्ट मात्र बदलली नाही, ती कोणती? जेव्हा लीने कंपनी सुरु केली होती त्याने कंपनीला नावे दिले होते, ‘सॅमसंग’ कोरियन भाषेत याचा अर्थ होतो ‘तीन तारे’. लीसाठी हे तीन तारे म्हणजे ‘भव्य, असंख्य व शक्तिशाली’ आणि हे तारे अनादी, अनंत असतात. त्याचं ध्येय हेच होतं की कंपनीचा प्रमुख म्हणून तो ज्या कुठल्या क्षेत्रात काम करेल तिथे कंपनीचा स्वतःचा ठसा उमटवायचा.

    याच धोरणामुळे आज सॅमसंगची विक्री २५० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे व दक्षिण कोरियाच्या एकूण निर्यातीमध्ये सॅमसंगचा वाटा एक पंचमांश ईतका आहे.

    तुमच्या व्यवसायात काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नसतील तेव्हा असा वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न तुम्ही किती वेळा केला आहे? तुमचा व्यवसाय बदलण्याचं सर्वात मोठं कारण काय आहे?

    या प्रचंड वेगाने बदलणाऱ्या जगात, सॅमसंगचे उदाहरण घ्या. मोठे उद्दिष्ट ठेवा. त्यासाठी दीर्घकालीन योजना बनवा आणि छोटे छोटे परिणाम साधण्याचा प्रयत्न करा आणि वेळ पडेल तेव्हा व्यवसाय बदलण्याचं धाडस अंगात असू द्या. योग्य वेळी बदल करत रहा, कधी ना कधीतरी तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल.

  • व्यवसायाच्या वाटेवर चालताना – अनुभवाची गरज आहे का?

    व्यवसायाच्या वाटेवर चालताना – अनुभवाची गरज आहे का?

    जगातले सर्वात मोठे Amusement Park वॉल्टला बनवायचे होते. त्यासाठी लागणारी अब्जावधीची संपत्ती वॉल्टने उभी केली व जगात त्याआधी कधीच झाले नाही ते घडवण्याचा प्रकल्प सुरु केला. त्याचा भाऊ रे डिस्ने त्याच्यासोबत होता. या प्रकल्पाचे काम चालू असतानाच वॉल्ट डिस्नेला या जगाचा निरोप घ्यावा लागला.

    रे डिस्नेने या प्रकल्पाचे काम पुढे चालू ठेवले. जगप्रसिध्द Disneyland तयार केले. तेव्हा पत्रकारांनी रे डिस्नेला एक प्रश्न विचारला तो म्हणजे, “हा प्रकल्प पूर्ण झालेला पाहायला वॉल्ट असायला हवा होता असे तुम्हाला वाटत नाही का?” त्यावेळी रे डिस्नेने पत्रकाराला दिलेले उत्तर हे आजच्या लेखाचे उत्तर आहे. रे या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाला, “मित्रहो, वॉल्टने हा प्रकल्प पूर्ण झालेला कित्येक वेळा पाहिला आहे. आज आपण जे पहात आहोत; ते वॉल्टने कित्येक वेळा पाहिले म्हणून हे साकारले.”

    खरोखरच डिस्नेलँडने पर्यटन व्यवसायातले सगळे विक्रम मोडून काढले. व्यवसाय करताना उद्योजक जे स्वप्न पाहतो, ते साकारण्यासाठी प्रयत्न करतो, तोच खरा अनुभव असतो. अनुभव हा विकत मिळत नाही किंवा तो इतरांकडून उसणवारही घेता येत नाही. तो मिळवावा लागतो. तो प्रत्यक्ष काम केल्यानेच मिळतो. अबांनींसारखे उद्योजकही त्यांच्या मुलांना त्यांचा अनुभव देऊ शकत नाहीत. ते फक्त मार्गदर्शन करु शकतात. त्यांच्या मुलांनाही अनुभव घ्यावाच लागतो.

    ठराविक कामाचा अनुभव घ्यायचा झाल्यास काही मार्ग अजून आहेत. त्यामध्ये वाण्याचा मुलगा दुकानात बसून आर्थिक व्यवहार त्याच्या सवयीचे करुन घेतो. वाण्याची गिऱ्हाईकांशी बोलण्याची कला आत्मसात करुन घेतो. मारवाडी, गुजराती माणसाला या गोष्टींचे निरीक्षण करण्याची व त्याचे आकलन करण्याची संधी घरातच मिळत असते. हा अनुभवाचाच भाग असतो, संपूर्ण अनुभव नव्हे. आता ज्याला हे वातावरण मिळत नाही. अशा आपल्यासारख्या मराठी माणसाला हा अंशत: अनुभव मिळवण्याचे काही मार्ग आहेत त्यावर एक नजर टाकूयात. या मार्गाचा अवलंब केल्यास आपण वर वर्णन केलेल्या मुलांपेक्षा काहीशा जास्त वेगाने तेवढाच अनुभव कमी वेळात प्राप्त करुन घेऊ शकतो.

    Youtube वर अशा अनेक उद्योजकांनी केलेली भाषण उपलब्ध आहेत, ती लक्षपूर्वक ऐकणे व त्यातील महत्वाच्या नोंदी करुन ठेवणे. काही भाषणं डाऊनलोड करून मोबाईलमध्ये घेऊन येताजाता प्रवास करताना ऐकल्यासही नवे अनुभव सहज घेता येतात. प्रत्येक उद्योजकांनी हे अनुभव मिळवण्यासाठी वाचावे असे एक पुस्तक म्हणजे – How I raised Myself from Failure to Success in Selling. हे पुस्तक फ्रँक बैटगर यांनी लिहलेले असून याची मराठी आवृत्ती (मी अपयशाच्या खाईतून यशोशिखरावर कसे पोहोचलो?) गोयल प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. याच बरोबर भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC of India) मध्ये एकदोन वर्षे काम करणेसुध्दा फायदेशीर ठरेल. कारण इथे कामाच्या वेळेची मर्यादा नसते व उत्तम उत्पन्न (चांगले पैसे) मिळते. आपल्याला व्यवसाय शिकण्यासाठी वेळ मिळतो.

    अनुभव घेण्याचा अजून एक मार्ग म्हणजे तुम्ही जो व्यवसाय करणार आहात त्या व्यवसायातील यशस्वी माणसाचा सहाय्यक (Assistant/Helper/Driver) म्हणून वर्षभर काम करणे हा होय. या माणसांचा सहवास लाभेल असे कोणतेही काम तुम्ही स्वीकारा. एका वर्षाने तुम्हाला जी अनुभवाची शिदोरी मिळेल ती एमबीए केलेल्या तरुणाहून सरसच असेल. या सर्व पध्दतीतून अनुभवसंपन्न झाल्यावर आपण प्रत्यक्ष व्यवसाय सुरु करण्याची प्रक्रिया सुरु करत आहोत.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती
  • एका रात्रीत मिळणारे यश मिळवण्यासाठी किती वेळ लागतो?

    एका रात्रीत मिळणारे यश मिळवण्यासाठी किती वेळ लागतो?

    एका रात्रीत पार्सल पोहोचवण्याची कल्पना प्रत्यक्षात यायला फेडेक्सच्या फ्रेड स्मिथला प्रत्यक्षात ११ वर्ष लागली.

    पण फ्रेडने हा विचार सोडून दिला नाही. त्याला आपल्या या कल्पनेवर विश्वास होता. फ्रेडला जेव्हा जहाजावर व्हिएतनामला पाठवण्यात आलं, त्याने तिथे अमेरिकन हवाई दलाच्या पुरवठा सेवेचा (logistics) अभ्यास केला. १९७० मध्ये जेव्हा तो परत आला त्याने Ark Aviation Sales नावाची विमान दुरुस्त करणारी एक कंपनी विकत घेतली आणि जुन्या विमानांचा वापर करायला सुरुवात केली.

    The Truth About Overnight Success FedEx founder Fred Smith

    १९७३ पर्यंत म्हणजे पुढच्या तीन वर्षात त्याने हवाई दलाच्या पुरवठा सेवेची पद्धत ‘फाल्कन-२०’ या प्रकारच्या १४ विमानांचा ताफा तयार करून जशीच्या तशी अंमलात आणली आणि त्याची कल्पना पहिल्यांदा नाकारली गेल्याच्या अकरा वर्षानंतर फ्रेडने पहिलं पार्सल पाठवलं.

    त्यानंतर एके दिवशी त्याचा सहकारी रॉजर फ्रॉकने त्याला पैसे कुठून आणले असे विचारले. त्यावर त्याने उत्तर दिले, “जनरल डायनामिक्स कंपनीबरोबरची आपली मिटिंग फिस्कटली. आपलं मोठं नुकसान झालं. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत सोमवारपर्यंत पैसे उभे करावे लागणार होते, म्हणून मी विमानाने लास वेगासला गेलो आणि तिथे २७ हजार डॉलर्स जिंकलो.” 

    रॉजर म्हणाला, “म्हणजे तू आपल्याकडे उरलेले शेवटचे ५ हजार डॉलर्स घेऊन गेलास. तू असं कसं करु शकतो?”

    आपले खांदे उडवत तो म्हणाला, “काय फरक पडला असता? पैशांशिवाय आपण विमानात इंधन सुद्धा भरू शकत नाही. या पैशांनी काही दिवस तरी आपलं काम सुरु राहील.”

    The Truth About Overnight Success FedEx founder Fred Smith

    फेडेक्सला त्यानंतरसुद्धा अनेकदा आर्थिक संकटांचा सामना करावा लागला, पण फ्रेडने मोठ्या धीराने आणि हिंमतीने सर्व संकटातून मार्ग काढत वाटचाल सुरूच ठेवली. आज चाळीस वर्षानंतर, फेडेक्स जगातील सर्वात मोठ्या कुरियर कंपन्यांपैकी एक आहे. २०१८ मध्ये फेडेक्सचे वार्षिक उत्पन्न ६५.४५ अब्ज डॉलर्स होते. फ्रेडची ही कंपनी वर्षाला अब्जावधी पार्सल पाठवते आणि फ्रेडची स्वतःची जवळपास ५.४ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

  • भारताच्या ट्रॅक्टर क्वीन मल्लिका श्रीनिवासन यांचा जीवनप्रवास

    भारताच्या ट्रॅक्टर क्वीन मल्लिका श्रीनिवासन यांचा जीवनप्रवास

    Mallika Srinivasan: India's Tractor Queen
    मल्लिका श्रीनिवासन या देशातील दुसरी व जगातील तिसरी सर्वात मोठी एक्सपोर्टर TAFE (ट्रॅक्टर अँड फार्म इक्विपमेंट) च्या सीईओ आहेत.

    Mallika Srinivasan: India's Tractor Queen
    त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1959 रोजी मद्रास येथे झाला. मद्रास युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी व्हॉर्टन स्कूल पेनसिल्व्हेनिया येथून एमबीए पूर्ण केलं.

    त्यानंतर त्या वडिलांना व्यवसायात मदत करू लागल्या. त्याच्या कारकिर्दीत कंपनीने ट्रॅक्टर उत्पादनात खूप प्रगती केली आणि टर्न ओव्हर 160 करोड डॉलरच्या घरात गेला. आज कंपनी ट्रॅक्टर, फार्म मशिनरी, डिझेल इंजिन, जनरेटर, अभियांत्रिकी प्लास्टिक, हायड्रोलिक पंप आणि सिलिंडर, वृक्षारोपण यासारख्या क्षेत्रात अग्रेसर आहे.

    The rise of Mallika Srinivasan: From a family business to a global leader
    मल्लिका श्रीनिवासन यांनी भारतीय उद्योग महासंघ, भारतीय विदेश व्यापार संस्था यांसारख्या संस्थेमध्ये विविध पदे भूषविली आहेत. फोर्ब्स इंडिया ने वूमन लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. तसेच फोर्ब्स अशिया टॉप 50 अशिया पॉवर बिझनेसवुमन पैकी एक म्हणून त्यांचा गौरव केला गेला आहे. तर भारत सरकारकडून 2014 मध्ये त्यांना पद्मश्री मिळाला.
    The rise of Mallika Srinivasan: From a family business to a global leader
    इतकेच नाही तर कार्पोरेशन AGCO यु एस ए च्या मंडळात त्या सदस्य आहेत. तर युएस इंडिया बिझनेस कौन्सिलच्या जागतिक संचालक मंडळावर देखील त्या सदस्य आहेत.
    How Mallika Srinivasan transformed TAFE into a global powerhouse
    दूरदृष्टी, व्यवसायातील संधी, कार्यक्षमता या अंगच्या गुणांबरोबरच ट्रॅक्टर क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे त्यांना आज “ट्रॅक्टर क्वीन ” म्हणून ओळखले जाते.
  • शेव आणि फरसाण विकून 9 हजार करोडची कंपनी उभी केली

    शेव आणि फरसाण विकून 9 हजार करोडची कंपनी उभी केली

    how-haldiram-became-a-global-snack-giant
    गंगाभीषण तथा हल्दिराम अगरवाल यांचा जन्म राजस्थानमधील बिकानेर येथे मारवाडी कुटुंबात झाला. फार लहान वयात ते आपल्या कुटुंबाच्याच व्यवसायात दाखल झाले. या कुटुंबाचा बिकानेरमधील भुजिया बाजार येथे भुजिया (तिखट शेव) बनवण्याचा छोटासा व्यवसाय होता.
    how-haldiram-became-a-global-snack-giant
    त्यांचे लग्न चंपादेवींशी झाले होते. सुरुवातीला ते काकूच्या रेसिपीनुसार भुजिया बनवून विकत असत. परंतु नंतर काही कौटुंबिक वादामुळे त्यांनी पत्नीसह घर सोडले.
    Haldiram: A Marwari success story
    त्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीने घरीच बनवलेल्या मूग डाळ नमकीनची रस्त्यावर विक्री सुरू केली. केली. १९४६ मध्ये हल्दीराम यांनी बिकानेरमध्ये आपले पहिले दुकान सुरू केले. तेथे त्यांनी आपली आधीची भुजिया अजून बारीक करून डुंगर सेव या नावाने विकायला सुरुवात केली. हे नाव बिकानेरचे राजा डुंगर सिंग यांच्या नावावरून ठेवले होते.
    Haldiram: A Marwari success story
    १९४०-५०च्या दरम्यान दर आठवड्याला शंभर ते दोनशे किलो भुजिया विकली जाऊ लागली. हल्दिरामच्या या लोकप्रियतेमुळे सुरुवातीला दोन पैसे किलोने मिळणारी भुजिया २५ पैसे किलो इतकी महागली.
    Haldiram: A Marwari success story
    एकदा ते लग्नाच्या निमित्ताने कोलकात्याला गेले असताना सोबत नातेवाईकांसाठी ही भुजिया शेव घेऊन गेले. या नातेवाईकांनी त्यांना थेट कोलकात्याला दुकान सुरू करण्याचा हट्ट धरला. त्यांनी पण तो मान्य केला आणि तिथे शाखा सुरू झाली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपणही आपली शाखा इतरत्र उघडू शकतो.
    Haldiram: The snack giant that changed the way Indians eat
    पुढे शिवकिसन आणि मनोहरलाल हे कर्तबगार नातू हाताशी आल्यावर दिल्ली, नागपूर, नोएडा इथे हा व्यवसाय वाढत गेला. २००३ साली अमेरिकेत त्यांनी आपले प्रॉडक्ट्स पाठविण्यास सुरुवात केली. एकेक करत तब्बल ८० देशांमध्ये त्यांचे प्रॉडक्ट्स विकले जाऊ लागले.
    Haldiram: The snack giant that changed the way Indians eat
    भुजियाच्या जोडीला मिठाई, फरसाण, दुधापासून बनवलेली उत्पादनं विकायला त्यांनी सुरुवात केली. पुणे, नागपूर, नोएडा, कोलकाता आणि दिल्ली येथे कंपनीची स्वतःची रेस्टॉरंट्स देखील आहेत.
    Haldiram: The snack giant that changed the way Indians eat
    कंपनीची आजची उलाढाल ७००० कोटींहून अधिक असून शेवेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज तब्बल ४०० प्रॉडक्ट्सपर्यंत पोहोचला आहे. २०१७ मध्ये इतर सर्व मोठ्या ब्रँड्सना मागे टाकून हल्दीराम भारतातील सर्वात मोठा स्नॅक्स ब्रँड बनला.
  • वॉरेन बफेट यांची कथा

    वॉरेन बफेट यांची कथा

    How Warren Buffett Became the World's Richest Man

    वयाच्या २० व्या वर्षी वॉरेन यांनी कोलंबिया बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश घेतला. जिथे श्री. बेंजामिन ग्रॅहम शिकवत होते. मूल्य गुंतवणूक सिद्धांतासाठी त्यांना ओळखले जाते. जगातील सर्वात महान गुरुकडून आपल्याला शिकायला मिळावे ही वॉरेनची इच्छा होती.

    वॉरेन बेंजामिन यांची सर्व कामे कोणत्याही मोबदल्याशिवाय करू लागले. त्यांचा प्रामाणिकपणा बघून श्री. बेंजामिन प्रभावित झाले. सुट्टीच्या दिवशी ते वॉरेनला त्यांची गुंतवणुकीची कामे करायला सांगत. १९५१ साली बेंजामिन यांनी GEICO या वाहन विमा कंपनीत अभ्यास करण्यासाठी पाठवले. स्वतः बेंजामिन त्या कंपनीच्या प्रतिनिधी मंडळावर होते. तो शनिवारचा दिवस होता. कार्यालयाच्या दरवाज्यावर ते बराच वेळ थापा मारत राहिले. शेवटी द्वारपालाने दरवाजा उघडला आणि त्यांना थेट कंपनीचे प्रमुख लोरीमोर डेव्हिडसन यांच्याकडे पाठवले. त्या दिवशी ते एकटेच कार्यालयात आलेले होते.

    त्या दिवशी या दोघांच्यात पाच तास चर्चा झाली. बफेट यांच्यावर त्यांचा फार प्रभाव पडला. वॉरेननी जवळच्या कमाईतून कंपनीचे नऊ हजार डॉलर्सचे शेअर विकत घेण्याची तयारी दर्शवली. या गोष्टीने प्रभावित झालेल्या बेंजामिन यांनी GEICO कंपनीचे ५० टक्के शेअर ७.२० लाख डॉलर्स देऊन विकत घेतले.

    Warren Buffett's Advice for Success: How to Achieve Your Financial Goals

    बफेट पुढची सहा वर्षं १९५७ पर्यंत बेंजामिन यांच्याकडेच शिकत होते. स्वतःची वेगळी गुंतवणूक कंपनी काढण्याइतपत ज्ञान त्यांना मिळाले होते. बेंजामिन यांच्या एका डॉक्टर गुंतवणूकदाराला त्यांच्या नव्या कंपनीसाठी भागीदारीत १० हजार डॉलर्स  गुंतवू शकणारे १० डॉक्टर्स शोधण्यास सांगितले. या प्रस्तावास अकरा डॉक्टर्सनी होकार दिला.

    पुढची पाच वर्षं बफेट आपल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या मित्रमंडळींना कंपनीची शिफारस करायला सांगत होते. १९६२ मध्ये १.०५ लाख डॉलर्सच्या भागीदारीतून सुरु झालेला हा व्यवसाय ७० लाख डॉलर्सवर पोहोचला. बफेट यांनी स्वतःजवळचे १० लाख डॉलर्स डेम्पस्टर मिल या कंपनीत गुंतवले. ज्यामुळे कंपनीच्या कारभारात सुधारणा झाली आणि फक्त दोन वर्षात  कंपनीने २३ लाख डॉलर्सची कमाई केली.

    १९६२ मध्येच बफेट यांना अशीच अजून एक लॉटरी लागली. एका घोटाळ्यामुळे अमेरिकन एक्स्प्रेसचे शेअर्स ६५ डॉलर वरून ३५ डॉलर पर्यंत घसरले होते.  बाकीचे सर्व लोक मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत शेअर विकत होते. त्यावेळी बफेट यांनी स्वतःच्या संपत्तीचा ४० टक्के हिस्सा १३ लाख डॉलर्स अमेरिकन एक्स्प्रेसमध्ये गुंतवले. पुढच्या दोन वर्षात त्या शेअर्सची किंमत तिपटीने वाढली आणि भागीदारांनी २० लाख डॉलर्स कमावले.

    त्यानंतर चार वर्षांनी मरणासन्न अवस्थेतील एक कापड कंपनी, ‘बर्कशायर हाथवे’ त्यांनी विकत घेतली. त्यावेळची आठवण सांगताना बफेट म्हणतात, “आम्ही एका भयानक बिझनेस मध्ये हात घातला होता. मी त्याला ‘वापरलेल्या सिगारेटचा थोटका’ म्हणतो. तुम्हाला तो खाली पडलेला दिसतो. तो खराब झालेला दिसतो, पण त्यात अजून थोडासा भाग शिल्लक राहिलेला असतो आणि तो तुम्हाला फुकटात मिळतो म्हणून तुम्ही तो उचलता. बर्कशायर विकत घेताना हाच विचार माझ्या मनात होता. ती तिच्या एकूण भांडवलापेक्षा खूप कमी किमतीत विकली जात होती म्हणून मी घेतली. पण ती खूपच वाईट चूक होती”

    ही कंपनी विकत घेतल्यावर बफेट यांनी तिच्या कारभारात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे सगळे प्रयत्न फोल गेले. मग त्यांनी त्यांच्या या ‘चुकीचा’ वापर त्यांचे सर्व गुंतवणूक व्यवहार सांभाळण्यासाठी सुरु केला. कंपनी शेअर बाजारात नोंदणीकृत असल्याने ते आता शेअर बाजारातून पैसे उभे करू शकत होते. GEICO बरोबरचा अनुभव गाठीशी असल्याने विमा कंपन्यांचे महत्त्व ते जाणून होते.

    Warren Buffett's Journey to Success

    १९७९ पर्यंत बफेट यांची एकूण संपत्ती १४ कोटी डॉलर्सवर पोहोचली होती, पण त्यांनी आपल्या पगारात वाढ केली नाही. पूर्वीचाच ५० हजार डॉलर एवढाच पगार घेत राहिले. अजूनही ते आपल्या जुन्या घरातच राहतात, जे त्यांनी १९५८ मध्ये ३१ हजार ५०० डॉलर्सला विकत घेतले होते. पुढे ४० वर्षं बर्कशायर हाथवेचे शेअर चक्रवाढ पद्धतीने जवळपास २२.२ टक्के या दराने वाढतच राहिले आणि आज बफेट यांची संपत्ती ८७.५ अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड आहे.

    काही वर्षांपूर्वीच त्यांनी लोवातील (अमेरिकेतील एक राज्य) जगातील सर्वात मोठ्या पवनऊर्जा प्रकल्पात ३.५ अब्ज डॉलर्स गुंतवण्याची घोषणा केली होती. तसेच त्यांनी आपल्या आपल्या संपत्तीचा ९९ टक्के हिस्सा दान करण्याची प्रतिज्ञा केली आहे. याआधीच २००६ पासून आजपर्यंत त्यांनी जवळपास २१.५ अब्ज डॉलर्सचा निधी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनला दान स्वरुपात दिला आहे. 

    Warren Buffett's Journey to Success

    वॉरेन यांनी गुंतवणूक करताना नेहमी दीर्घकालीन गुंतवणुकीला प्राधान्य दिले. ते नेहमी म्हणतात, “तुम्हाला प्रतिष्ठा कमवायला २० वर्षे लागतात आणि गमवायला फक्त ५ मिनिटे पुरेशी आहेत. तुम्ही जर ही गोष्ट लक्षात ठेवली तर तुम्ही प्रत्येक गोष्ट वेगळ्या प्रकारे कराल” 

    जगातील सर्वात श्रीमंत लोकांकडून तुम्ही कोणते धडे शिकू शकता?

    पैसा कमावण्याआधी तो कसा कमवायचा हे शिकण्यात तुमचा वेळ गुंतवायला तुम्हाला आवडते का?                                     ‘निर्गमन धोरण (Exit Strategy) ऐवजी यशस्वी धोरण (Success Strategy) वर तुम्ही कसे लक्ष केंद्रित करू शकता? ज्यामुळे तुम्हाला कधीही व्यवसाय बंद करण्याची वेळ येणार नाही.

  • कुटुंबीयांचा पाठिंबा की विरोध ?  व उपाय

    कुटुंबीयांचा पाठिंबा की विरोध ? व उपाय

    उद्योगपती वालचंद हिराचंद, लोखंडी नांगरांना जन्म देणारे किर्लोस्कर बंधू, आबासाहेब गरवारे, भारत फोर्जचे बाबा कल्याणी, विकोचे पेंढारकर घराणे, कॅमलिनचे दांडेकर, आयफ्लेक्सचे दीपक घैसास, दास ऑफशोअरचे अशोक खाडे, घोडावत ग्रुपचे संजय घोडावत, व्हीआयपी कपड्यांचे सर्वेसर्वा पाठारे बंधू, सारस्वत बँकेचे एकनाथ ठाकूर, मराठी नाटक व्यवसायाला वेगळा आयाम देणारे विष्णुदास भावे, दाते पंचांग विकणारे दाते, पितांबरीचे प्रभुदेसाई, बीव्हीजीचे हणमंतराव गायकवाड, माने ग्रुपचे रामदास माने, हावरे ग्रुप अशी न संपणारी मराठी व्यावसायिकांची यादी आहे.

    मात्र या सर्व उद्योजकांचा विचार केला तर असे आढळून आले आहे, ते म्हणजे यातील बहुतांश उद्योजक हे पहिल्या पिढीचे उद्योजक आहेत. त्यांना आपला उद्योग वारसा पुढच्या पिढीकडे म्हणाव्या तशा प्रभावी पध्दतीने हस्तांतरीत करता आला नाही व या सर्व उद्योजकांच्या आधीच्या पिढीनेही कधी व्यवसाय केलेला नव्हता. त्यामुळे ओघानेच हे आले की, कोणालाही कुटुंबातून फारसा पाठिंबा मिळाला नव्हता. तरीही या उद्योजकांनी आपला उद्योग मोठा करण्याची स्वप्ने पाहिली. त्यासाठी लागेल ते कष्ट उपसले, आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला व अपेक्षित असणारे यश त्यांना मिळाले. त्यामुळे आपण खचून न जाता या उद्योजकांनी निर्माण केलेल्या वाटांवरून पुढे चालायचे आहे.

    घरातील व्यक्तींचा विरोध कमी करुन त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करण्याचे काही उपाय आपण पाहू या. घरातील व्यक्तींचा विरोध असणाची काही कारणे म्हणजे उत्पन्नाची अनिश्चितता, भांडवल लावण्यासाठी कमी पडणारी क्षमता, अनुभवाचा अभाव ही होत. एकतर तुम्ही भरपूर पैसा कमावून घरी द्यायला लागला की, घरच्यांचा व्यवसायाला असलेला विरोध सहज मावळून जातो. तुम्ही पैसे कमावावेत ही त्यांची माफक अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. आता घरातील सर्वात जिव्हाळ्याच्या व्यक्तीला विश्वासात घेऊन व्यवसाय पूर्ण समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. तुम्ही घरातील या व्यक्तीला तुम्ही व्यवसाय करु शकता ही खात्री पटवून देऊ शकलात, तर व्यवसायासाठी लागणारी मदतसुध्दा घरातल्या व्यक्तींकडून मिळते. जेव्हा तुम्ही घरातील या व्यक्तीचा विश्वास संपादन करता तेव्हा तुम्हाला कोणालाही व्यवसाय पटवून देण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. मग ती व्यक्ती हळूहळू घरातील इतर व्यक्तींना तुमच्या बाजूने करते.

    गुजराती, मारवाडी, पंजाबी व सिंधी कुटुंबामध्ये घरातील वातावरणच व्यवसायासाठी अनुकूल असते. त्यामुळे त्यांना जास्त संघर्ष करावा लागत नाही. म्हणून शक्यतो काहीजणांनी मिळून व्यवसाय चालू केला, तर प्रत्येकाने दुसऱ्याच्या घरात समजावून सांगावे म्हणजे ते पटकन समजून जातात व त्यांना विश्वास बसतो की हा शेजारचा/किंवा कॉलेजमधला मित्र व्यवसाय करतोय म्हणजे तुमच्याबरोबर कोणीतरी आहे व तुम्ही काहीतरी करु शकता.

    आणखी एक महत्त्वाची गोष्ट; कुटुंबातील व्यक्तीचा पाठिंबा असो किंवा विरोध असो आपले पूर्ण लक्ष व्यवसाय मोठा करणे, त्यासाठी लागेल त्या गोष्टी करणे यावरच असले पाहिजे. घरातील लोक तुम्हाला सुरवातीला पाठिंबा देत नसतील, तर कालांतराने का होईना ते तुमच्या बाजूने होतातच. हे सगळीकडे झाले आहे हा इतिहास आहे. परत या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा.

    अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

  • स्वतःच स्वतःचे नायक बना

    स्वतःच स्वतःचे नायक बना

    मी हा विचार माझ्या विशीत ऐकला होता आणि त्यानंतर स्वतःचा ‘बॉस’ बनण्यात मी बरीच वर्षे घालवली. माझ्यासाठी तो अत्यंत वाईट काळ होता. मालक-कर्मचारी यांच्यातला संवाद मी स्वतःशीच करायचो. मी कुठे चुकतोय, कुठे कमी पडतोय या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करायचो.

    पण हा संवाद माझ्या एकट्यापुरता मर्यादित होता.

    पुढे अनेक यशस्वी लोकांना भेटल्यावर माझ्या लक्षात आले की, यापैकी कुणीही स्वतःचा बॉस बनण्याचा प्रयत्न करत नाही आहे. या सगळ्यांना एक गोष्टी पक्की ठाऊक आहे की, इतरांसाठी काम केल्यानेच यश प्राप्त होते. त्यामुळे त्यांनी आपापल्या परीने स्वतःचे बॉस निवडले होते.

    त्यामुळे जर तुम्ही अजूनही स्वतःचा बॉस बनण्याचा प्रयत्न करत असाल, तर ते लगेच सोडून द्या, त्याऐवजी योग्य बॉस शोधण्याचा प्रयत्न करा. चांगले काम करण्याचा प्रयत्न करा. ‘जे करावे लागते’ ते न करता, ‘जे करायला आवडते’ ते करण्याचा प्रयत्न करा. जो कोणता व्यवसाय कराल त्याची क्षितिजे विस्तारताना आपल्यामधील शक्यतांचा, क्षमतांचा वापर करा. स्वतःच स्वतःचे नायक बना…

  • तुमच्या आमच्यासारखा सामान्य व्यक्ती असो किंवा अगदी मुकेश अंबानी, आर्थिक नियोजनाची गरज प्रत्येकाला आहे

    तुमच्या आमच्यासारखा सामान्य व्यक्ती असो किंवा अगदी मुकेश अंबानी, आर्थिक नियोजनाची गरज प्रत्येकाला आहे

    • मुलांच्या शिक्षणासाठी
    • नवीन / मोठे घर घेण्यासाठी
    • मुलीच्या लग्नासाठी
    • स्वतःच्या निवृत्ती नियोजनासाठी

    अशा प्रकारे आर्थिक ध्येय आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर खुणावत असतात. एका बाजूला वाढणारी महागाई, सुधारत चाललेला राहणीमानाचा दर्जा आणि प्रत्येक वस्तू ब्रँडेड हवी अशी मानसिकता; हे सर्व मिळवण्यासाठी आपली धडपड चालू असते. आज शेअर बाजार गुंतवणुकीतील वेगवेगळे पर्याय समोर दिसत असले, तरी या पर्यायाकडे वळण्याआधी स्वतःचे आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. कारण जोपर्यंत किती पैसा आणि कोणत्या आर्थिक ध्येयासाठी, कधी लागणार हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मला किती पैसा गुंतवावा, किती जोखीम घ्यावी हेही कळणार नाही. चला तर मग आज आपण आर्थिक नियोजनाचे महत्व समजून घेऊ.

    why-financial-planning-is-important

    आर्थिक नियोजन म्हणजे नक्की काय?

    आज प्रत्येक व्यक्तीची मग तो तुमच्या माझ्यासारखा सामान्य व्यक्ती असो किंवा मुकेश अंबानी प्रत्येकाला काही ना काही आर्थिक ध्येयं आहेत. आज एखादा व्यक्ती महिन्याला १ लाख रुपये कमवत असेल आणि ४०-५० हजार जर त्याला दर महिन्याला घरखर्चाला लागत असतील तर उरलेली रक्कम बचत आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून पुढील भविष्यातील गरजांसाठी, अडचणीच्या काळातील खर्चासाठी बाजूला ठेवणे अनिवार्य आहे, हो ना? आर्थिक नियोजन म्हणजेच आपल्या भविष्यातील खर्चाचा मागोवा घेणे आणि त्याची तरतूद करणे. आज वाढलेली महागाई, शिक्षण आणि औषधपाण्याचा वाढलेला खर्च त्यामुळे भविष्याबद्दल कमालीची भीती निर्माण झालेली दिसते. या सर्वांतून मार्ग काढण्यासाठी ‘आर्थिक नियोजन’ करून घेणे हाच पर्याय उभा राहतो.

    why-financial-planning-is-important

    आर्थिक नियोजन करताना पुढील मुख्य घटक पहिले जातात

    • सध्याची आर्थिक परिस्थिती
    • भविष्यातील आर्थिक ध्येय
    • गुंतवणुकीत जोखीम घेण्याची क्षमता

    वरील ३ मुख्य घटकांवर बहुतेक गोष्टी अवलंबून आहेत. आर्थिक नियोजनाचे खालील मुख्य भाग आहेत.

    • पैशाचे व्यवस्थापन
    • विमा नियोजन
    • गुंतवणूक नियोजन
    • निवृत्ती नियोजन
    • मालमत्ता हस्तांतरणाचे नियोजन
    why-financial-planning-is-important

    आपण सविस्तरपणे प्रत्येक बाजू समजावून घेऊ, जेणेकरून तुम्हाला स्वतःचे आर्थिक नियोजन करणे सोपे जाईल.

    • पैशाचे व्यवस्थापन – आर्थिक नियोजन करण्याआधी आपल्या पैशाचे व्यवस्थापन आपण कसे करतो हे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. महिन्याला आपण किती कमावतो, किती खर्च करतो, महिन्याच्या खर्चाचे बजेट, वर्षाच्या खर्चाचे बजेट हे सर्व पैशाच्या व्यस्थापनामध्ये केले जाते. जोपर्यंत तुम्ही पैशाच्या व्यवस्थापनाला महत्व देत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमचा आर्थिक स्तर उंचावू शकत नाही.
    • विमा नियोजन – आज जीवन अनिश्चिततेने भरलेले आहे, त्यामुळे कधी कोणते संकट समोर उभे राहील सांगता येत नाही. विमा नियोजनाच्या माध्यमातून आपण आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या विमा कंपन्यांवर सोपवू शकतो. जीवन विमा, आरोग्य विमा, वाहन विमा, घराचा विमा अशा अनेक पद्धतीने आपण आपल्या भोवती एक संरक्षक कवच उभा करू शकतो. भारतीय मानसिकतेत अजूनही विम्यावर होणार खर्च म्हणजे वाया गेलेला खर्च समजला जातो.
    • गुंतवणूक नियोजन – आर्थिक नियोजनातील महत्वाचा टप्पा म्हणजे गुंतवणूक नियोजन. वेगवेगळ्या आर्थिक ध्येयासाठी वेगवेगळे आर्थिक नियोजन करणे म्हणजे गुंतवणूक नियोजन होय. मुलांच्या शिक्षणासाठी, नवीन/मोठे घर घेण्यासाठी, मुलीच्या लग्नासाठी अशा एक ना अनेक ध्येयासाठी योग्य नियोजन गरजेचे आहे.
    • निवृत्ती नियोजन – आपण २५ वर्ष शिकत असतो आणि २५-३० वर्ष नोकरी किंवा धंदा करतो आणि या काळात जी काही शिल्लक बाजूला ठेवली असते त्यातून आपल्याला आपल्या निवृत्ती नंतरच्या काळासाठी नियोजन करायचं असते. निवृत्ती नियोजन ही काळाची गरज आहे; कारण वाढलेली महागाई, कमी होणारे व्याजदर यामुळे आपल्या भविष्यासाठीच्या नियोजनाची सुरुवात आजपासूनच करा.
    • मालमत्ता हस्तांतरणाचे नियोजन – बॉलीवूड सिनेमा असो किंवा आपला मराठी सिनेमा, मालमत्तेसाठी होणारे कौटुंबिक वाद आपण त्यामध्ये पहिले आहेत. आज तसे वाद कदाचित आपल्या घरात होणार नाहीत कारण ते बहुधा काल्पनिक असतात, पण आपण हयात नसताना आपल्या मालमत्ता आपल्या कुटुंबियांच्या नावावर हस्तांतरित होताना त्यांना त्रास होऊ द्यायचा नसेल तर काही तरतुदी आजच कराव्या लागतील; जसे की इच्छापत्र किंवा मृत्यपत्र बनविणे. लक्षात घ्या आज या गोष्टी खूप सहजरित्या करू शकतो, पण पैसा कमावण्यातच आपण इतके अडकलो आहोत की ह्या सर्व गोष्टींकडे पाहायला आपल्याला वेळच नाही.
    why-financial-planning-is-important

    पैशाचे व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजनाचे महत्व ज्याला पटले आणि त्यानुसार स्वतःच्या आर्थिक जीवनाला ज्यांनी योग्य आकार दिला त्यांची आर्थिक ध्येयं दृष्टीक्षेपात येतात कारण एक राजमार्ग त्यांच्यासाठी तयार झालेला असतो. आर्थिक नियोजन नसलेले लोक एक तर बचत करत मन मारून जगत असतात किंवा आलेले पैसे खर्च करून आजचा आनंद घेतात आणि भविष्य भगवान भरोसे सोडतात. या दोघांचा सुवर्णमध्य म्हणजे आपल्या कमाईनुसार खर्च करणे आणि भविष्यासाठी गुंतवणूक करणे आणि त्याचबरोबर स्वतःच्या कमाईचे पर्याय वाढविणे होय.

    आणखी वाचा

  • दहा अशा गोष्टी, ज्यामुळे तुम्ही तिसाव्या वर्षी करोडपती बनू शकता

    दहा अशा गोष्टी, ज्यामुळे तुम्ही तिसाव्या वर्षी करोडपती बनू शकता

    यात न रुचण्यासारखे किंवा वाईट असे काहीच नाही. मी वयाच्या २१व्या वर्षी कॉलेजमधून बाहेर पडलो. जवळचे सर्व पैसे संपले, कर्जबाजारी झालो. तरीही तिसाव्या वर्षी मी करोडपती होतो.

    खाली मी दहा अशा गोष्टी सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही तिसाव्या वर्षी नक्कीच करोडपती बनू शकता.

     १. पैसे वाढवायला शिका                                                                         

    आजच्या आर्थिक जगात जिथे पैसा ही गरजेची गोष्ट बनली आहे. धनसंचय करणे आणि तो वाढवणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामुळे तुमच्याकडे येणारा पैसा सातत्याने वाढत राहायला हवा. सुरुवातीला माझी मिळकत महिना ३००० डॉलर इतकी होती, नऊ वर्षांनी ती महिना २०,००० डॉलर इतकी झाली, त्यामुळे पैशाने पैसे वाढवायला शिका. त्यातून नवीन संधी निर्माण करा.

    २. नुसता दिखावा नको, काम दिसू द्या!

    माझ्या विविध व्यवसायातून आणि गुंतवणुकीतून जेव्हा मला निश्चित पैसे मिळू लागले, तेव्हा मी माझी पहिली लक्झरी कार विकत घेतली. मी करोडपती झालो तरी टोयोटाची साधी गाडीच चालवत होतो. तुमची ओळख तुमच्या नितीमुल्यांवरून, कामावरून व्हायला हवी, तुमच्याकडे असलेल्या भौतिक गोष्टींवरून नाही.  

    ३. गुंतवण्यासाठी बचत करा…

    पैशांची बचत करा, पण फक्त गुंतवण्यासाठी. वाचवलेले पैसे एखाद्या सुरक्षित आणि अशा ठिकाणी गुंतवा जिथून सहजासहजी काढता येणार नाहीत. या पैशांचा वापर कधीही करू नका, अगदी निकडीच्या प्रसंगी सुद्धा. यामुळे वर सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडील पैसा वाढत जाईल.

    ४. तुम्हाला पैसे मिळवून न देणारे कर्ज काढू नका.

    एक नियम बनवा, आपल्याकडे येणारा पैसा वाढवण्यासाठीच कर्ज काढायचे, नाहीतर काहीही उपयोग नाही. मी कारसाठी कर्ज घेतले, कारण मला खात्री होती की त्यामुळे माझी मिळकत वाढेल. श्रीमंत लोक घेतलेल्या कर्जाचा वापर गुंतवणूक आणि कॅशफ्लो वाढवण्यासाठी करतात. गरीब लोक कर्जाचा वापर वस्तू विकत घेण्यासाठी आणि श्रीमंतांना अजून श्रीमंत करण्यासाठी करतात.

    ५. पैशांवर प्रेम करायला शिका.  

    आर्थिक स्वातंत्र्य कुणाला नको असते. आपल्याकडे भरपूर पैसे असावेत अशी सगळ्या लोकांची इच्छा असते, पण पूर्ण त्यांचीच होते, जे तिला प्राधान्य देतात. श्रीमंत होण्यासाठी आणि श्रीमंती टिकण्यासाठी पैशाला अग्रक्रम द्या. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले, तर तो तुमच्याकडे दुर्लक्ष करेल किंवा तुम्हाला सोडून त्याच्याकडे जाईल, जो त्याचे महत्त्व जाणतो.

    ६. पैसा कधीही झोपत नाही.

    पैशाला घड्याळ कळत नाही, वेळापत्रक, सुट्ट्या याचा विचार तो करत नाही, आणि तुम्हीसुद्धा नाही केला पाहिजे. पैसा त्यांच्यावर प्रेम करतो, ज्यांची मेहनतीची तयारी असते. जेव्हा मी २६ वर्षांचा होतो, मी रिटेल स्टोअरमध्ये काम करायचो. आमचं स्टोअर संध्याकाळी ७ ला बंद व्हायचं, पण मी बरेचदा रात्री ११ वाजेपर्यंत तिथे थांबायचो आणि सामान विकायचो. नशीबवान किंवा हुशार माणूस बनण्याचा प्रयत्न कधीही करू नका, तर नेहमी इतरांपेक्षा जास्त मेहनत घ्या.

    ७.  गरीब राहण्यात काहीही अर्थ नाही…

    मी सुद्धा गरीबच होतो आणि ते जीवन खूप निराशाजनक असतं. माझ्याजवळ थोडेफारच पैसे असायचे आणि ते म्हणजे असून नसल्यासारखे होते. त्यामुळे आपण गरीब आहोत ‘ठीक आहे’ असे विचार मनात असतील, तर लगेच काढून टाका. बिल गेट्स म्हणतात, ‘तुम्ही गरीब म्हणून जन्मलात, तर तो तुमचा दोष नाही; पण गरीब म्हणून मराल, तर मात्र तुमचाच दोष आहे.”

    ८. श्रीमंत माणसांचा आदर्श ठेवा.

    आपल्यापैकी बहुतेकजण गरीब किंवा मध्यमवर्गीय असल्यामुळे आपले विचार, आपली स्वप्नं ही जवळच्या इतर लोकांसारखीच मर्यादित असतात. मी नेहमी श्रीमंत लोकांचा अभ्यास करायचो आणि त्यांच्यासारखं वागायचा प्रयत्न करायचो. तुम्ही सुद्धा एखादी आदर्श व्यक्ती निवडा आणि त्यांचे अनुसरण करा. बहुतांश श्रीमंत लोकं ही त्यांच्याजवळील ज्ञान आणि संसाधनं वाटण्याच्या बाबतीत अत्यंत उदार असतात.

    ९. पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावा.

    श्रीमंत होण्यासाठी गुंतवणूक ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या कामातून तुम्हाला जितके पैसे मिळतात, त्यापेक्षा जास्त पैसे गुंतवणूकीतून मिळायला पाहिजेत. जर तुमच्याकडे अतिरिक्त पैसा नसेल, तर तुम्ही कधीही गुंतवणूक करू शकणार नाही. माझी दुसरी कंपनी सुरु करताना मी ५० हजार डॉलर्स गुंतवले. तीच कंपनी मला मागील दहा वर्षांपासून दरमहा ५० हजार डॉलर्स मिळवून देत आहे. मी तिसरी गुंतवणूक रिअल इस्टेटमध्ये केली होती आणि त्यातून मला अजून पैसे मिळतात. गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला अनेक नवीन संधी शोधता येतात. लक्षात ठेवा, ‘पैशाने तुमच्यासाठी काम केले पाहिजे, तुम्ही पैशासाठी नव्हे.’

    १०. नेहमी मोठा विचार करा…

    मी आजवर केलेली सगळ्यात मोठी चूक कुठली असेल, तर मोठा विचार न करणे. माझं तुम्हाला हेच सांगणं आहे की, फक्त करोडपती नाही, तर अब्जाधीश बनण्याचा प्रयत्न करा. या जगात पैशांची कमतरता नाही, तर मोठा विचार करणाऱ्या लोकांची आहे.

    या दहा मार्गांचा अवलंब करा, तुम्ही नक्की श्रीमंत व्हाल. तुमची स्वप्नं खूप मोठी आहेत असं सांगणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा. झटपट श्रीमंत होण्याच्या स्कीम्सच्या नदी लागून नका, नैतिकता ठेवा, प्रयत्न कधीही सोडू नका आणि एकदा का तुम्ही हे ध्येय साध्य केलं की इतरांनाही मदत करा.