Author: naviarthkranti

  • भांडवल कसे उभे करावे ?

    भांडवल कसे उभे करावे ?

    भांडवल नसणे (३६६ मते)
    मार्गदर्शन नसणे (२१३ मते)
    कुटुंबातील व्यक्तीचा पाठिंबा नसणे (१२७ मते)
    मार्केटिंग न करता येणे (९३ मते)
    मानसिकता व यशाबाबत साशंकता (५५ मते)
    सरकारी अडथळे (४१ मते)
    चुकीचे निर्णय (२८ मते)

    म्हणजेच भांडवल नसणे ही समस्या सर्वाधिक उद्योजकांना जाणवत असल्याचे निदर्शनास आले आहे. तुम्हाला हवे तेवढे भांडवल मिळाले तर काय करणार? असा प्रश्न स्वतःला विचारा. तुमच्याकडे तुम्ही जो बिझनेस करणार आहात त्याचा बिझनेस प्लॅन बनविलेला आहे का? त्या व्यवसायासाठी कराव्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी करायला तुम्ही तयार आहात का? त्याची तुम्हाला पूर्ण माहिती आहे का? तुमच्याकडे या प्रश्नांची उत्तरे असली, तर लगेच तुम्हाला भांडवलदार उपलब्ध आहेत. नसतील तर आपण त्याची तयारी करुन घेऊ.

    भांडवल उभारणीचे काही पर्याय :

    📌 बँका – बँकेसाठी सर्वात महत्त्वाची माणसे असतात ती म्हणजे कर्जदार. ठेवीदारापेक्षा बँकांना कर्जदाराची गरज जास्त असते; कारण बँका चालवण्यासाठी लागणारा पैसा हा कर्जदाराकडून मिळालेल्या व्याजातूनच मिळत असतो. त्यामुळे बँका कर्ज देण्यासाठी उद्योजकांचा शोध घेत असतात. मात्र त्यांना कर्जाची रक्कम व व्याज योग्य वेळी आपण परत करु शकतो, या गोष्टीची खात्री पटवून देणे गरजेचे असते. एकदा आपण बँकेला कर्ज फेडण्याची खात्री पटवून देऊ शकलो की,० बँक आपल्याला लागेल एवढे कर्ज उपलब्ध करुन देते. आपणही आपला व्यवसाय अधिक जोमाने वाढवण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन ती पार पाडून व्यवसायाच्या वेगवान वृध्दीची गुरुकिल्ली प्राप्त करु शकतो.

    📌 HNI, NRI – एचएनआय म्हणजे High Networth Individual. काही भरपूर संपत्ती कमावलेली माणसे आपल्या समाजात असतात. त्यांना आपले पैसे काही नवीन व्यवसाय करणाऱ्या होतकरु तरुणांना मदत म्हणून द्यायचे असतात. यापैकी काही एचएनआय हे भागीदारी (Partnership) मागतात, तर काही लोकांना खात्रीशीर (fixed return) पैसे परत हवे असतात. ह्या लोकांपर्यंत आपली व्यवसायाची संकल्पना पोहोचवणे गरजेचे असते. अशा लोकांचे संपर्क क्रमांक, ईमेल असल्यास त्यांना आपला बिझनेस प्लॅन पाठवावा व नंतर त्यांना आपण बिझनेस प्लॅन पाठवल्याची व त्यांना तो पोहोचला असल्याची खात्री करुन घ्यावी.

    भारताबाहेर राहणारे अनिवासी भारतीय म्हणजेच NRI (Non Resident Indian) या लोकांकडे बऱ्यापैकी पैसे असतात. त्यांना भारताविषयी आस्था असते. ती व्यक्त करण्यासाठी व त्यातून ते गुंतवणूक करण्यास तयार असतात. त्यातून येणारी मिळकत ही रिटायरमेन्ट साठी वापरता यावी म्हणून जमा करुन ठेवतात; म्हणून हे पैसे दीर्घ कालावधीसाठी वापरता येतात. फक्त प्रत्येक प्रकारच्या गुंतवणूकदाराचे पैसे इमानेइतबारे परत करावेत. कारण आपल्याला वेळोवेळी व्यवसायवाढीसाठी लागणारे पैसे ते देऊ करतात, त्यामुळे वेळच्यावेळी परत पैसे दिल्यामुळे त्यांचा आपल्यावर विश्वास बसतो.

    📌 अँजेल इन्व्हेस्टर्स : अँजेल इन्व्हेस्टर्स म्हणजे अशी लोकं ज्यांच्याकडे भरपूर पैसे असतात आणि ते सुरुवातीच्या काळात नवउद्योजकांना पतपुरवठा करत असतात. त्याबदल्यात त्यांना कंपनीत भागीदारी द्यावी लागते. केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या लोकांचं नेटवर्क खूप मोठं असतं. त्याचा फायदा करून घेता येतो. दुसरा फायदा म्हणजे, जसे कर्ज घेतले की दुसऱ्या महिन्यापासून हप्ते सुरु होतात, तसं इथे होत नाही. इन्वेस्टर्सनी दिलेले पैसे परत करण्याची गरज नसते, कारण त्या बदल्यात तुम्ही कंपनीचे शेअर्स त्यांना विकलेले असतात. त्यामुळे व्यवसाय वाढला तर त्यांचा फायदा होतो आणि बुडाला तर त्यांचे पैसेही बुडतात.

    📌 *क्राउड फंडिंग – *आजूबाजूच्या सामान्य माणसांकडून कमी प्रमाणात व जास्तीत जास्त लोकांकडून पैसा उभा करुन मोठे भांडवल उभे करता येते. ५०० लोकांकडून १००० रुपये प्रत्येकी एक वर्षासाठी कर्जाऊ घेतल्यास ५ लाख रुपये सहज उभे करता येतात. आपला प्रस्ताव हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येतो. बल्क एसएमएस, सोशल मिडीया व बल्क ईमेल या माध्यमातून आपण हे जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवू शकतो. उत्पादने बाजारात आणण्यापूर्वी आगाऊ नोंदणी करणे हाही एक भांडवलनिर्मितीचा मार्ग आहे. काही वर्षापूर्वी रिलायन्स कंपनीने ५०० रुपयात मोबाईल देण्याची घोषणा करुन आगाऊ नोंदणी (Advance Booking) करुन लाखो रुपयांचे भांडवल उभे केले होते व नंतर काही महिन्यांनी ग्राहकांना मोबाईल दिले. टेस्ला इलेक्ट्रिक कारसाठी सुद्धा हाच मार्ग वापरला गेला आहे.

    मुक्त अर्थव्यवस्थेमुळे थेट परकीय गुंतवणूक हाही भांडवलनिर्मितीचा पर्याय उपलब्ध आहे. आपण जेवढी अधिक कल्पकता वापरु तेवढे अधिक पर्याय आपण स्वतःच निर्माण करु शकतो व त्यातून हवे तेवढे भांडवल उभे करता येते. त्यासाठी अतिशय उत्तम असा बिझनेस प्लॅन आपल्याकडे तयार असायला हवा.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती
  • जाणून घ्या मटकी शेतीविषयी संपूर्ण माहिती

    जाणून घ्या मटकी शेतीविषयी संपूर्ण माहिती

    आवश्यक हवामान 

    आवश्यक जमीन 

    मटकी शेतीसाठी मध्यम ते हलकी, सुपीक, चांगली निचऱ्याची आणि थोडीशी अम्लीय जमीन योग्य आहे. pH 6.5 ते 7.0 च्या दरम्यान असावे.

    How to Grow Matki

    अशी करा लागवड

    मटकीची लागवड उन्हाळ्यात केली जाते. बीजांची पेरणी सरी-वरंबे पद्धतीने केली जाते. पेरणीचं अंतर 30 x 30 सेंटीमीटर किंवा 45 x 45 सेंटीमीटर ठेवावे.

    कशी करावी जोपासणी

    मटकीची जोपासणी खालीलप्रमाणे केली जाते:

    खरीप: पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी पहिली खुरपणी करावी. नंतर 15 ते 20 दिवसांच्या अंतराने दोन-तीन खुरपणी करावी.

    पाणी व्यवस्थापन: मटकीला मध्यम पाणी लागते. पेरणीनंतर सुरुवातीला दररोज पाणी द्यावे. नंतर 7 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

    खत व्यवस्थापन: मटकीला खताची गरज कमी असते. पेरणीपूर्वी जमिनीत शेणखत किंवा कंपोस्ट खत घालावे.

    रोग आणि कीड नियंत्रण: मटकीला तांबेरा रोग आणि बोंडकी कीड यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या रोग आणि कीड नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.

    कापणी

    मटकीची कापणी 5 ते 6 महिन्यांनी केली जाते. कापणीनंतर मटकिला कोरडे करून साठवले जाते.

    इतके मिळेल उत्पादन

    योग्य निगा राखल्यास मटकीची प्रति हेक्टरी 10 ते 12 टन उत्पादन मिळते.

    मटकीच्या जाती

    मटकीच्या अनेक जाती आहेत. काही प्रमुख जाती खालीलप्रमाणे आहेत:

    राजा मटकी, कांदे मटकी, काळी मटकी, सातपुडा मटकी, विदर्भ मटकी

    या जातींमध्ये रोग आणि कीड प्रतिरोधक क्षमता चांगली असते. तसेच, या जातींमध्ये उत्पादन क्षमता देखील चांगली असते.

  • इंग्रजांच्या घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या

    इंग्रजांच्या घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या

    कोण होता कोण हा तरुण? तो कोणी क्रांतिकारक नव्हता, की स्वातंत्र्यसेनानी नव्हता. तो होता सांगलीतील तासगावातला भालचंद्र गरवारे अर्थातच आबासाहेब गरवारे.

    गरवारे म्हटलं की आठवतं ते पुण्यातलं गरवारे कॉलेज आणि गरवारे चौक. यापलीकडे आपल्याला काय माहितीये? मित्रांनो पुण्यातल्या या कॉलेजला गरवारे नाव का दिलं गेलं? ते कॉलेज आबासाहेबांनी उभं केलं का? तर नाही. त्या कॉलेजचे संस्थापक आबासाहेब गरवारे नव्हते, मग का बरं गरवारे नाव दिलं गेलं असेल? जे जाणून घेण्यासाठी आपल्याला शंभर वर्ष मागं जावं लागेल.

    वयाच्या 17 व्या वर्षी  गिरगावमध्ये डेक्कन मोटार एजन्सीची स्थापना करून तो जुन्या गाड्या खरेदी-विक्री करणारा एजंट बनला. सोबतच तो स्पेअर पार्ट, टायरची वगैरे विक्री करू लागला. थोड्याच दिवसात या व्यवसायात त्याचा चांगलाच जम बसला. त्याच्या गोडाऊनमध्ये आता गाड्यांना जागा नव्हती. सर्वसामान्य माणसापासून ते मुंबईतल्या राजे-रजवाड्यांपर्यंत सगळेजण डेक्कन मोटार एजन्सीमधून गाड्या घेऊ लागले. मुंबईत गाडी घ्यायचं म्हटलं की, प्रत्येकाच्या ओठांवर फक्त एकच नाव डेक्कन मोटार एजन्सी. एजन्सीचा नावलौकिक वाढला होता. त्यासोबतच भालचंद्र गरवारे मुंबईचे आबासाहेब म्हणून ओळखले जाऊ लागले. आबासाहेबांना पत, प्रतिष्ठा मिळू लागली. खिशात एक रुपयाही नसताना मुंबईत आलेला भालचंद्र आता आबासाहेब झाला होता. ब्रिटिशदेखील आबासाहेबांकडूनच गाड्या विकत घेऊ लागले. 

    आबासाहेबांनी केवळ गाड्यांचाच व्यवसाय केला नाही, तर त्यांनी प्लॅस्टिक बनविणारे कारखाने देखील विकत घेतले. ज्याकाळात भारतीयांना प्लॅस्टिक म्हणजे काय? हे देखील माहीत नव्हतं, अशा काळात आबासाहेबांनी भारतात प्लॅस्टिक बटणं, नायलॉन यार्न, प्लॅस्टिक इंजेक्‍शन मोल्डिंग, ब्लो मोल्डिंग, नायलॉन ब्रिस्टल्स, फिशिंग नेट अशी प्लॅस्टिकची अनेक उत्पादने घेऊन गरवारे मोटर्स, गरवारे प्लॅस्टिक, गरवारे वॉल रोप्स, गरवारे  नायलॉन्स, गरवारे पेंट्स, गरवारे फिलामेंट कॉर्पोरेशन अशा अनेक कंपन्यांची उभारणी केली. या व्यापारात त्यांनी भरपूर पैसा कमविला. ज्या गोऱ्यांनी भारतीयांचे जिणे हराम करून सोडले होते. त्या गोऱ्यांची नाचक्की करायचं हे आबासाहेबांनी आधीच ठरवलं होतं. लंडनमध्ये असताना बकिंगहॅम पॅलेसमध्ये जाऊन प्रिन्स ऑफ वेल्सची,  इंग्लंडच्या राजपुत्राचीच गाडी विकत घेतली. ती गाडी आणि त्यावर एक गोरा शोफर ठेऊन ते ताठ मानेने लंडनमध्ये फिरू लागले.

    जे ब्रिटिश भारतीयांना गुलाम म्हणून वागवत होते, त्याच ब्रिटीशांना आबासाहेबांनी त्यांच्यात घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून आपल्या पदरी ठेवून एक स्वाभिमानी, यशस्वी, देशप्रेमी मराठी उद्योजक बनण्याचा मान मिळविला होता. आबासाहेबांनी केवळ उद्योगच केला नाही, तर आपल्या कर्तुत्वाने ब्रिटीशांना तोंडात बोटं घालायला लावली. आबासाहेबांनी केवळ व्यापारच नाही केला तर शैक्षणिक, सामाजिक संस्थांना देखील सढळ हाताने मदत केली. भारत स्वतंत्र झाल्यावर 1959 साली त्यांची मुंबईचे शेरीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली. शेरीफ म्हणजे नगरपाल. आबासाहेबांनी पुणे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला चांगलीच आर्थिक मदत केली आणि त्यामुळेच संस्थेने कॉलेज आणि हायस्कूलला 1945 साली आबासाहेब गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल अशी नावे दिली. मुंबई university च्या अंतर्गत त्यांनी सांगलीत मुलींसाठी महाविद्यालय सुरू केले,

    त्यांच्या याच कार्यकर्तुत्वामुळे त्यांना आर्थिक अभ्यास संस्थेतर्फे उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच 1971 मध्ये त्यांना भारत सरकारच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सांगलीतील एका खेड्यातल्या मुलाचा गॅरेजमध्ये काम करण्यापासून ते पद्मभूषण पुरस्कार मिळवण्यापर्यंतच प्रवास खरच विस्मयकारक होता. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं आपण यशवंतराव चव्हाणांच्या अतुलनीय कामाबद्दल अनेकदा म्हणतो, पण मित्रांनो हा भालचंद्र नामक सह्याद्री देखील हिमालयाच्या प्रत्येक अडिअडचणीत धावून गेला होता हे देखील विसरून चालणार नाही. त्यांच्या विचारांची ज्योत आज प्रत्येकाने आपल्या मनात निरंतर तेवत ठेवली पाहिजे.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

    आणखी वाचा

  • व्यवसायासाठी किती भांडवल लागेल?

    व्यवसायासाठी किती भांडवल लागेल?

    हुशार व कल्पक उद्योजक अगदी कमी भांडवलात उत्तम प्रतीच्या सेवा व उत्तम प्रकारची गुणवत्ता असणारी उत्पादने बाजारात आणत असतो किंवा काही उद्योजक अगदी मुबलक प्रमाणात भांडवल उद्योगात गुंतवतात. ग्राहकांकडून ते हक्काने मागून घेतात व ग्राहकही स्वखुशीने त्या उत्पादनांची किंमत त्या उद्योजकाला देत असतात. उदाहरण द्यायचे झाल्यास मॅकडोनाल्ड ही कंपनी १०-१२ रुपयाला मिळणारा वडापाव (बर्गर) २७ रुपायांना विकते. त्याची उत्पादन किंमत अगदी २-३ रुपये इतकी कमी आहे, तरीही ग्राहक ती किंमत स्वखुशीने देतात.

    आपल्या व्यवसायाचे एक कार्यालय मुख्य शहरात असावे. एकापेक्षा अधिक शहरात व्यवसाय करु इच्छिणाऱ्या उद्योजकांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या शहरात एक एक कार्यालय चालू करावे. म्हणजे ६ उद्योजक एकत्र आले व त्या सहाही उद्योगांना नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे व मुंबई या ६ ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी प्रत्येकी ६-६ कार्यालये चालू करणे आवश्यक आहे. येथे ३६ कार्यालये सुरु करण्याऐवजी फक्त सहाच कार्यालये सुरु करावीत. प्रत्येकाने एक-एक कार्यालय सांभाळावे, म्हणजे प्रत्येकाच्या सहा शाखा होतील; मात्र खर्च एकाच कार्यालयाच्या खर्चाएवढा असेल.

    को-वर्किंग स्पेस हा एक खूप चांगला प्रकार आहे. Innov8, WeWork, 91Springboard, Awfis, Smartworks, Kafnu, myHQ अशा अनेक कंपन्या ही सुविधा पुरवतात. यामध्ये एका मोठ्या जागेत अनेक छोटे छोटे डेस्क बनवलेले असतात. इथे चहा-कॉफी, वायफाय, ऑफिस चेअर, डेस्क अशा सर्व सुविधा मिळतात. नाममात्र शुल्क देऊन यापैकी एक डेस्क तुम्ही घेऊ शकता आणि तिथून काम सुरु करू शकता. एखादी मिटिंग करायची असेल तर त्यासाठी वेगळी मिटिंग रूम असते. अनेक नवउद्योजक एकाच ठिकाणी त्यांच्या आयडियाजवर काम करत असतात त्याचा सुद्धा नेटवर्किंगसाठी फायदा होतो.

    Virtual Office (व्हर्च्युअल ऑफिस) ही संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. हे एक अशा प्रकारचे ऑफिस असते ज्यामध्ये जगभरातल्या सर्व मुख्य शहरात तुम्ही तुमचे कार्यालय अगदी कमी खर्चात सुरु करु शकता. उदा. मुंबईत नरीमन पॉईंट किंवा बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स सारख्या महागड्या ठिकाणी एक ऑफिस भाड्याने घ्यायचे झाल्यास दरमहा ६० हजार रुपये ते २ लाख रुपये भाडे लागते. त्याऐवजी virtual office चे भाडे हे केवळ ६-१० हजार एवढेच असते. Virtual office मध्ये असिस्टंटचा पगार देण्याची गरज नाही, फोनबिल व वीजबिल भरण्याची गरज नाही; तरीही या पत्यावर आलेली पत्रे व डॉक्युमेंट तुम्हाला मिळतात. तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर मिळतो. तो उचलण्यासाठी व फोन वर झालेल्या चर्चेच्या नोंदी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक यंत्रणा काम करत असते. ६-१० हजारात हे सर्व मिळत असते. इतर कोणतीही छुपी किंमत द्यावी लागत नाही. याचा फायदा नवीन ऑर्डर मिळवण्यासाठी होतो, समोरच्या व्यक्तीवर तुमचा चांगला प्रभाव पडतो.

    अशा कितीतरी गोष्टी आपल्याला ‘जुगाड’ या तत्त्वाचा वापर करुन कमी भांडवलात निर्माण करता येतात. आपली विचार करण्याची पध्दत थोडीशी बदलून फार काही साधता येते. अर्थात हे सर्व सुरुवातीच्या टप्प्यात करायचे आहे, त्यानंतर जसजसा व्यवसाय वाढत जाईल, तसतशा ह्या जुगाड केलेल्या गोष्टी बदलून गुणवत्ता असलेल्या (Standard) स्वरुपात स्थापित करणे चांगले. यामध्ये कुणालाही फसवण्याचा उद्देश नसावा. समोरुन जर विचारणा करण्यात आली, तर स्पष्ट शब्दात आपण केलेली तजवीज त्यांना सांगणे हितावह असते. विश्वास टिकवण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जर विचारले नाही तर आपणहून सांगणे गरजेचे नाही.

    जयहिंद!!!

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

    आणखी वाचा

  • आठवी नापास ते हजारो कोटींचा मालक. सीबीआय, रिलायन्स चालतात याच्या इशाऱ्यावर- त्रिशनित अरोरा

    आठवी नापास ते हजारो कोटींचा मालक. सीबीआय, रिलायन्स चालतात याच्या इशाऱ्यावर- त्रिशनित अरोरा

    ३० वर्षीय त्रिशनित उद्योजक, एका कंपनीचा मालक आणि लेखक आहे.  त्याची ‘हॅकर टॉक’ आणि ‘हॅकिंग विथ स्मार्टफोन’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 2017 मध्ये त्याचे नाव ‘50 Most Influential Young Indians’ या  GQ मासिकाच्या यादीत नोंदवले गेले. ‘Fortune India’ च्या अंडर 40 यादीत सुद्धा त्याचे नाव आहे. एवढंच काय तर पुढे जाऊन फोर्ब्सच्या प्रतिष्ठित ‘30 अंडर 30’ यादीत सुद्धा त्याने स्थान मिळवले. TAC Security या कंपनीचा तो संस्थापक आहे. ही कंपनी सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करते. विविध कॉर्पोरेट कंपन्या आणि त्यांच्या सायबर सुरक्षेमधील त्रुटी शोधून मार्गदर्शन करणे हे या कंपनीचे मुख्य काम आहे.

    एथिकल हॅकींग म्हणजे नेटवर्क, सिस्टीम इन्फ्रास्ट्रक्चरची सुरक्षा इव्हॅल्युएट करणे. म्हणजे कोणत्याही कंपनीची, संस्थेची सायबर सुरक्षा भेदली जाऊ नये यावर हे हॅकर्स लक्ष ठेवतात. तसेच डेटा चोरी, व्हायरस घुसविणे अशा प्रकारांपासूनही संरक्षण देतात. त्रिशनित भारतीय गुप्तचर संस्था सीबीआय, रिलायन्स, अमूल, पंजाब पोलिस, गुजरात पोलिस, एवन सायकल्स यासारख्या सुमारे ५०० कंपन्यांना ही सेवा त्याच्या कंपनीच्या माध्यमातून देतो आहे. रिपोर्ट्स नुसार दिग्दर्शक सुनील बोहरा त्रिशनितच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यावर काम करत आहेत. हा चित्रपट हंसल मेहतांद्वारा दिग्दर्शित केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. या लेखाच्या माध्यमातून त्रिशनित चा संपूर्ण प्रवास आपण जाणून घेणार आहोत.

    अशी झाली हॅकिंगची सुरुवात

    त्रिशनितचा जन्म 2 नोव्हेंबर 1993 रोजी पंजाबमधील लुधियाना मध्ये झाला. शालेय जीवनापासूनच त्याला संगणकाची आवड होती. तेव्हा त्याला स्वत:चा वैयत्तिक संगणक हवा होता, परंतु मध्यमवर्गीय घरात सहसा एकाच संगणक असतो जो सर्वांच्या कामासाठी वापरला जातो. त्रिशनितचे कुटुंब याला अपवाद नव्हते. त्याला संगणक आणि त्याच्या एकूणच कार्यप्रणाली बद्दल खूप उत्सुकता होती. एकेदिवशी त्याने घरातील संगणकाच्या वायर्स काढून त्याचे निरीक्षण करायला सुरुवात केली. त्याने निर्माण केलेल्या या गोंधळामुळे घरी मॅकॅनिक बोलवावा लागला. त्याच्या दुरुस्तीच्या प्रक्रियेचे त्रिशनितने बारीक निरीक्षण केले आणि त्याचा त्याला पुढे जाऊन फायदा झाला. 

    आठवीत नापास झाल्यावर त्याचे मित्रही त्याची चेष्टा करू लागले तेव्हा त्याने शाळा सोडली व बाहेरून बारावीची परिक्षा दिली. एकीकडे एथिकल हॅकींग सुरू होतेच. वयाच्या २१ व्या वर्षी त्याने कंपनी स्थापन केली व अवघ्या दोन वर्षात त्याच्या कंपनीकडे ५०० हून अधिक क्लायंट आले. TAC Security कंपनी सुरु केली तेव्हा तो केवळ 19 वर्षांचा होता.  आश्चर्याची बाब म्हणजे त्यावेळी त्रिशनितच्या आई-वडिलांनी सुद्धा त्याला या गोष्टीसाठी पूर्ण पाठिंबा दिला होता. त्याने सुरुवातीला संगणक दुरुस्त करणे आणि हार्डवेअर दुरुस्त करणे अशी कामे केली.  त्याला 19 व्या वर्षी तब्बल 60,000 रुपयांचा चेक मिळाला. पुढे जाऊन हेच पैसे त्याने आपल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वापरले. जेवढे काही साठवले होते तेवढ्या सर्वच बचतीचा उपयोग कंपनी उभा करण्यासाठी केला गेला असे त्रिशनित सांगतो. 

    TAC सिक्युरिटी सध्या जगभरातील ग्राहकांसह आंतरराष्ट्रीय ख्यातीची सायबर सुरक्षा प्रदान करणारी कंपनी आहे. या कंपनीची सध्याला भारतात 4 आणि दुबईमध्ये 1 अशी 5 कार्यालये आहेत. देशातील प्रमुख कायदे अंमलबजावणी संस्थांसह, TAC सिक्युरिटीचे ग्राहक म्हणून रिलायन्स आणि अमूल देखील आहेत. शिवाय, विविध सध्याच्या डिजिटल व्यवहारांचा कणा असलेली UPI प्रणाली, या तरुण टेक प्रतिभावंताच्या देखरेखीखाली तयार करण्यात आली आहे. त्रिशनित आता त्याचा व्यवसायाची उलाढाल ८ हजार कोटींवर नेण्याची आशा बाळगून आहे.

  • व्यवसायाच्या वाटेवर चालताना – कशी करावी सुरुवात?

    व्यवसायाच्या वाटेवर चालताना – कशी करावी सुरुवात?

    आता ही सर्व उत्तरे सोडून व्यवसायाची सुरुवात कशी करता येईल याचे योग्य व सोपे असे उत्तर शोधून काढूया. नोकरी सोडून व्यवसाय करायचे ठरले. दुसऱ्या लेखाकांत व्यवसाय करण्याचे फायदे पाहिले. सुरुवात करण्याआधी काय करावे व मानसिकता कशी असावी याबाबत जाणून घेतले. कोणता व्यवसाय करावा व त्या व्यवसायाचे कार्यक्षेत्र कसे निवडावे हेही आपण ठरवले. बिझनेस प्लॅनची गरज जाणून घेतली. त्यातील महत्त्वाचे मुद्दे पाहिले. घरातील व्यक्ती पाठिंबा मिळवण्याची प्रक्रिया जाणून घेतली. अनुभवाबद्दल जाणून घेतले. हे सगळे केलेल्या व्यक्तीला व्यवसायाच्या सुरुवातीला करायच्या गोष्टींचा अंदाज आलेला असतो.

    व्यवसाय करण्यासाठी लागणारे भांडवल किती व ते कसे मिळवावे? भांडवल उभारणी करत असताना तारण नसल्यास काय करावे? भांडवल उभारणीचे पैसे परत कसे करावे? सरकारी परवानग्या कोणत्या व त्या कशा मिळवाव्यात? या परवानग्यांचा होणारा फायदा कोणता? या प्रश्नांची उत्तरे शोधणे बाकी असते. त्याआधी आपली उत्पादने (वस्तू/सेवा) निर्मितीसाठी लागणारी यंत्रे, अवजारे, मनुष्यबळ व जागा या सारख्या गोष्टी कुठे मिळतील याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे असते. म्हणजे भांडवल उभारणीनंतर आपला उद्योगाचा मार्ग सुकर होतो. व्यवसायाची वाढ अतिशय वेगाने होते

    तुम्ही भांडवल उभारणी करण्यासाठी लागणारे पैसे मिळवण्यासाठी पाठवलेला प्रत्येक ईमेल हा लेटरहेड वरच असावा. लेटरहेडचे एक module तुमच्या लॅपटॉपमध्ये जतन करुन ठेवलेले असावे. त्यामुळे आपण पाठवलेला प्रत्येक व्यवसाय प्रस्ताव गांभीर्याने वाचला जाण्याची शक्यता वाढते. तुम्ही कार्यालय/ऑफिस घेऊ शकत नसाल, तर घरचा पत्ता हा कार्यालयाचा पत्ता म्हणून प्रत्येक ठिकाणी वापरा. व्यवसायाचे फेसबुक पेज तयार करावे, त्यासाठी एकही रुपयाचा खर्च नाही, मात्र हजारो लोकांपर्यत व्यवसाय पोहोचवण्यास त्याची मदत होते.

    आपल्या व्यवसायात भागीदार घेणार की नाही? हा प्रश्न सोडवणे गरजेचे ठरते. भागीदार घेणार असल्यास त्याचे व तुमचे काम काय असेल? याची विभागणी करणे किफायतशीर ठरेल. एकाच व्यक्तीने सर्व काम करणे म्हणजे व्यवसायाला मिळालेली गती कमी करण्यासारखे ठरते. त्यामुळे व्यवसायाच्या प्रमुखाने स्वतःचा काही काळ रिकामा ठेवला पाहिजे, जेणेकरुन व्यवसाय वृध्दीसाठी इतर प्रयत्न करता येतील.

    लागणारी यंत्रे घेतलीच पाहिजेत किंवा नाही याचा विचार तुमच्या मूळ भांडवलाचा अंदाज घेऊन केला पाहिजे. फार कमी भांडवल असल्यास काही कामे outsourcing करणे हितावह ठरते. त्यामुळे जागा व पैशाची बचत, तर होतेच शिवाय आपल्याला थोडासा वेळही मिळतो.

    व्यवसाय करु इच्छिणारी काही हुशार माणसे आपल्या सोबत असल्यास त्यांच्याकडून आपण बनवलेली प्रत्येक गोष्ट तपासून घेतली पाहिजे व त्यात अपेक्षित असणारे बदल केले पाहिजेत. ही हुशार माणसे तुम्हाला कायमस्वरुपी मार्गदर्शकाच्या भूमिकेत भेटत असतात. त्यांचा आदर करणे व त्यांची मर्जी राखणे ही आपली प्राथमिकता असावी. मग काही कायदेविषयक, तर काही अर्थविषयक, काही लोकसंपर्क दांडगा असलेली अशी प्रत्येक प्रकारची माणसे तुमच्याकडे असली पाहिजेत. त्यांना पगार देऊन कामाला ठेवणे आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यात परवडण्यासारखे नसले, तरी अशा माणसांचे संपर्क आपल्या मोबाईलमध्ये कायम जतन करुन ठेवलेले असल्यास आपल्याला हवे तेवढे काम तेवढाच मोबदला देऊन करुन घेणे उत्तम ठरते.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

    आणखी वाचा

  • BFA – कला क्षेत्रात करिअर करण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय

    BFA – कला क्षेत्रात करिअर करण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय

    बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स हे शब्दाचे पूर्ण रूप आहे. बीएफए प्रोग्राम हा तीन ते चार वर्षांचा पदवीपूर्व कार्यक्रम आहे, यामध्येही विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. ललित कलांमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स, ॲनिमेशन, व्हिज्युअल, परफॉर्मिंग आर्ट्स असे कोर्सेस आहेत. बऱ्याच वेळा BFA ला व्हिज्युअल आर्ट्स असेही संबोधले जाते. बीएफए अभ्यासक्रमाची ऑफर देणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश हा गुणवत्तेवर तसेच प्रवेश परीक्षांवर आधारित असतो.

    Why a BFA Is the Best Choice for Your Arts Career

    BFA कोर्स का निवडावा?

    इतर पारंपारिक अभ्यासक्रमांप्रमाणेच, बीएफए अभ्यासक्रम तुम्हाला कला, सौंदर्यशास्त्र, मातीची भांडी आणि मातीची भांडी बनवणे इत्यादी नवीन युगातील विषयांची ओळख करून देतो. बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स पदवीनंतर करिअरच्या  वैविध्यपूर्ण शक्यता आहेत आणि विचारात घेण्यासाठी अनेक जॉब प्रोफाइल आहेत. बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स प्रोग्रामचे पदवीधर फ्रीलान्स डिझायनर, लेखक किंवा शिक्षक म्हणून करिअर करू शकतात. स्वातंत्र्य आणि उत्तम कमाईच्या क्षमतेमुळे आजकाल फ्रीलान्स व्यवसाय लोकप्रिय आहे.

    How to Get a BFA and Start Your Career in the Arts

    BFA कोर्स कोणी करावा?

    ज्या उमेदवारांमध्ये एखादा कलाकार लपलेला असतो ते सहसा ललित कला अभ्यासक्रम निवडतात. ललित कला अभ्यासक्रम हा सहसा विद्यार्थी ज्यांच्यात एक कलाकार दडलेला असतो ते घेतात. तथापि, ज्या उमेदवारांची सर्जनशीलता उत्तम आहे आणि व्हिज्युअल किंवा परफॉर्मिंग आर्ट्सची प्रवृत्ती आहे ते बीएफए कोर्ससाठी योग्य आहेत. विद्यार्थ्यांना मनोरंजन क्षेत्र, वृत्तसंस्था, विपणन कंपन्या, प्रकाशने, कला संग्रहालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नोकऱ्या मिळू शकतात.

    BFA चे फायदे

    या अभ्यासक्रमाचे पदवीधर त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वत:साठी नवीन मार्ग उघडतात. ललित कलांची पदवी त्यांना परफॉर्मिंग, ललित किंवा व्हिज्युअल आर्ट्समधील व्यावसायिक करिअरसाठी तयार करू शकते. सर्जनशील आणि कलात्मक असलेले विद्यार्थी हा अभ्यासक्रम शिकू शकतात. ते त्यांच्या बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स पदवीचा भाग म्हणून फोटोग्राफी, व्हिज्युअल आर्ट, पेंटिंग, मिश्र माध्यम, सिनेमॅटोग्राफी आणि डिजिटल चित्रण यांचा अभ्यास करू शकतात. ते अनेक क्षेत्रात रोजगार शोधू शकतात आणि त्यांच्या करिअरची व्याप्ती वाढवू शकतात. तसेच, BFA त्यांना अनुभवाच्या शिडीवर चढत असताना त्यांची वेतनश्रेणी वाढवण्यास मदत करते. BFA पदवीधर INR 5 लाख ते  सरासरी INR 25  लाखांपर्यंत पगार मिळवू शकतात.

    Bachelor Of Fine Arts

    BFA साठी पात्रता निकष

    सर्व उमेदवार, ज्यांनी मान्यताप्राप्त मंडळातून कोणत्याही स्ट्रीममधून बारावी उत्तीर्ण केली आहे, ते बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स हा कोर्स निवडू शकतात. यासाठी सामान्यतः इतर कोणतेही निश्चित निकष नसतात, परंतु काही विद्यापीठे/महाविद्यालये  किमान टक्केवारीची अट ठेऊ  शकतात  जी सामान्यत: 50 – 60% असते. ज्या उमेदवारांना बीएफए अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी 12 वी मध्ये आवश्यक मार्क्स मिळणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त, प्रवेशाच्या वेळी काहीवेळा अशा उमेदवारांना प्राधान्य दिले जाते, ज्यांनी इयत्ता 12 मध्ये कला/ ह्यूमॅनिटीजचा अभ्यास केला आहे आणि ज्यांना ललित कला विषयाचे काही मूलभूत ज्ञान आहे ज्याचा ते पाठपुरावा करू इच्छित आहेत.

    आणखी वाचा

  • युध्दात जमीनदोस्त झालेल्या दुकानाच्या एका कोपऱ्यात कंपनी सुरु करणारे ‘सोनी’चे संस्थापक अकिओ मोरीता

    युध्दात जमीनदोस्त झालेल्या दुकानाच्या एका कोपऱ्यात कंपनी सुरु करणारे ‘सोनी’चे संस्थापक अकिओ मोरीता

    वाचा सोनी या जगप्रसिद्ध कंपनीची प्रेरणादायी कहाणी

    Sony Co-Founder Akio Morita's Birthday

    अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला तेव्हा अकिओ मोरीता फक्त २४ वर्षांचा होता. १९४६ रोजी त्याने मसारू ईबुकासोबत अणुबॉम्ब स्फोटात बेचिराख झालेल्या एका दुकानाच्या कोपऱ्यात एक कंपनी सुरु केली. हीच भविष्यातील ‘सोनी कॉर्पोरेशन’ची सुरुवात होती. २००० साली या कंपनीची उलाढाल ६३०८ कोटी डॉलर्सची होती तर त्यात १८९७०० माणसे काम करत होती. पण या सर्वांहून गाजला तो म्हणजे अकिओ मोरीताचा वॉकमन. गंमत म्हणजे जेव्हा अकिओ मोरीता आणि ईबुका यांनी तरुण पिढीला आवडेल असा वॉकमन बनवायला घेतला तेव्हा मोरीता साठीला तर ईबुका सत्तरीला टेकला होता. जेव्हा वॉकमन ची कल्पना त्यांनी त्यांच्या कंपनीसमोर मांडली तेव्हा कंपनीतील सर्वांनी विरोध केला होता, चक्क वेड्यात काढले होते.

    Sony Co-Founder Akio Morita's Birthday
    Sony Co-Founder Akio Morita's Birthday

    या दोघांतील ईबुका हा तंत्रज्ञानात बाप माणूस होता तर मोरीता ग्रेट सेल्समन होता. IBM च्या सेल्समनबद्दल असं म्हटलं जायचं की हे लोक एस्कीमो लोकांनाही फ्रिज विकून दाखवतील. अकिओ तितकाच सामर्थ्यवान विक्रेता होता. सुरुवातीला त्यांनी सुरु केलेल्या कंपनीचं नाव होतं ‘टोकियो त्सुशीन कोग्यो काबुशिकी काईशा‘ म्हणजे ‘टोकियो टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग कंपनी’. पुढे याचीच ‘सोनी कॉर्पोरेशन’ बनली. जेव्हा कंपनी सुरु केली तेव्हा फक्त एका छोट्याशा खोलीत अनेक लोक काम करत असत. सामान ठेवायलाही जागा नसे. सगळी मंडळी रात्री कंपनीचा मुख्य दरवाजा बंद केल्यावर फायर एक्झिटच्या दरवाजाने ये-जा करत, त्यामुळे त्यांना कित्येक वेळा पोलीस चोर समजून पकडत.

    Akio Morita, Sony Legend, Birthday Celebration

    सुरुवातीला त्यांना कामाच्या मोबदल्यात तांदूळ मिळे, कारण त्यावेळी दुसर्‍या महायुध्दातील पराभवामुळे जपान संपुर्णपणे उध्वस्त झालेल्या अवस्थेत होता. युद्धानंतर तांदूळ खूपच दुर्मिळ आणि महाग झाला होता. पुढे कंपनी वाढल्यावर तिचं वेगळं नाव ठेवायचं ठरवलं, तेव्हा आख्खी डिक्शनरी चाळून त्यांच्या लक्षात आलं की लॅटिनमध्ये सोनस म्हणजे ध्वनी,आणि अमेरिकेत ‘सॉनी’ हा शब्द तरुण हुशार मुलांसाठी वापरला जाई. मग या दोन्हीचा वापर करून ‘सोनी’ या शब्दाचा उगम झाला आणि ‘सोनी कॉर्पोरेशन’चा जन्म झाला. फक्त टोकीयो पुरते त्यांचे अस्तित्व जरी असले तरी त्यांची स्वप्नं फार मोठी होती.त्यांच्या महत्त्वाकांक्षा सात समुद्रापलीकडच्या होत्या. आता सोनीने टेप, रेडिओ अगदी लहान आकाराचे म्हणजे खिशात मावतील असे रेडिओ बनवण्यास सुरुवात केली, पण गंमत म्हणजे त्यांची उपकरणे खिशात बसेनात म्हणून चक्क मोठे खिसे असलेले शर्टही बनवून विकायला सुरु केले होते.

    Akio Morita, Sony Legend, Birthday Celebration

    सोनीचे मालाच्या दर्जावर खूपच बारीक लक्ष असे. पण त्याकाळी जपानी मालाच्या दर्जाची चेष्टा सुरु असल्याने मोरीता त्यांच्या मालावर ‘मेड इन जपान’ असं बारीक अक्षरात लिहित. कारण त्यादरम्यान ‘Made in Japan’ चा अर्थ असा होता की ‘स्वस्त व तकलादू उत्पादने’ परंतु अकियो मोरिता आणि मसुरु इबुकाचे ‘भव्य ध्येय’ होते की ‘जगातील जपानची प्रतिमा बदलणे.’ सोनीला जापनीज उत्पादनं निकृष्ट दर्जाची असतात ही जगातील प्रतिमा बदलुन ‘जापनीज उत्पादने म्हणजे उत्कृष्ट दर्जा’ अशी करायची होती. एकदा अमेरिकेतील बोलावा नावाच्या कंपनीने सोनीकडून १ लाख ट्रांझीस्टर बनवण्याची ऑर्डर दिली. ही ऑर्डर म्हणजे त्याकाळच्या दहा वर्षांच्या ऑर्डरइतकी मोठी होती. त्यांची एकच अट होती की सोनीने त्यावर सोनीचे नाव न टाकता बोलावाचे टाकावे. अकिओला इतका प्रचंड पैसा दिसत असूनही त्या मिटिंगमधून चक्क निघून गेला. पण नंतर ‘सोनी’ ही कंपनी बोलावाच्या ३० पटीने मोठी कंपनी झाली. आज कॅसेट्स, सीडीज, टीव्ही,टेप, डिस्कमन, वॉकमन, फ्लॉपी डिस्क, व्हिडिओ कॅमेरा,हँडीकॅम, सोनी एंटरटेनमेन्ट असा वाढलेला पसारा म्हणजे अकिओ मोरीता आणि ईबुकाचे प्रयत्न होय. त्यांचं भव्य ध्येय त्यांना जागतीक पातळीवर आपली विशेष छाप पाडण्यासाठी कारणीभूत ठरलं. प्रचंड शिस्त, सतत नाविन्यपुर्ण नवनिर्मिती, आणि बिनधास्तपणे जोखिम घेत ‘सोनी’ने प्रगती केली आहे.

    साभार :- अच्युत गोडबोले

  • व्यवसायच का ? – नोकरदार आणि व्यावसायिक यातील फरक

    व्यवसायच का ? – नोकरदार आणि व्यावसायिक यातील फरक

    एके दिवशी कंपनीच्या मॅनेजरला (व्यवस्थापकाला) समोसावाल्याची खिल्ली उडवण्याची लहर आली. मॅनेजरने विचारले, “मित्रा तू तुझे हे समोश्याचे दुकान खूप चांगल्या प्रकारे चालवत आहेस. पण तू तुझा अमूल्य वेळ व हुशारी समोसे तळण्यात वाया घालवत आहेस, असे तुला कधीच वाटत नाही का? जरा विचार करुन बघ, जर तू सुध्दा माझ्यासारखा एखाद्या कंपनीत काम करत असता, तर कुठपर्यंत प्रगती करु शकला असता? कदाचित तू देखील माझ्यासारखाच मॅनेजर झाला असता.”

    या प्रश्नावर थोडासा विचार करुन शांतपणे हसत समोसावाल्याने उत्तर दिले, “साहेब माझे हे काम तुमच्यापेक्षा कैकपटीने चांगले आहे. १० वर्षांपूर्वी मी डोक्यावर टोपली घेऊन दारोदार फिरुन समोसे विकायचो. तेव्हा तुम्ही प्रथम नोकरीला लागला असाल. १० वर्षापूर्वी मला समोसे विकून दर महिन्याला एक हजार रुपये मिळायचे, तेव्हा तुमचा पगार १० हजार रुपये होता. १० वर्षात दोघांनी खूप कष्ट केले, मेहनत घेतली. तुम्ही सुपरवायझर पासून मॅनेजर पदापर्यंत मजल मारली व मी टोपली घेऊन फिरणारा समोसावाला ते एक स्थिरस्थावर दुकानदार असा प्रवास केला. आज तुमचा पगार ५० हजार रुपये आहे, तर मी महिन्याला दोन लाख रुपये कमावतो.”

    मॅनेजर साहेब ऐकत होते, “याउलट तुमचा मुलगा Direct (थेट) तुमच्या पदावर जाऊ शकत नाही. त्याला परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. त्याच्या मेहनतीचा फायदा या कंपनीच्या मालकाच्या मुलांना होईल. तो आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तुमच्या एवढाच किंवा फार तर दोन पावले पुढे जाईल, तर माझा मुलगा माझ्या फार पुढे निघून जाईल. तर साहेब आता सांगा, कुणाचा वेळ व हुशारी वाया जात आहे?” मॅनेजर साहेबांनी २ समोश्याचे २० रु. दिले व निरुत्तर होऊन निघून गेले.

    हा प्रसंग व्यवसाय का केला पाहिजे हे शिकवून जातो. तुमच्यानंतरही तुमचा वारसा केवळ मुलांनाच नाही, तर समाजाला, काम करणाऱ्या लोकांना व कितीतरी घटकांना मिळत असतो. जमशेदजी टाटांनी १८६८ मध्ये मुहूर्तमेढ रोवलेला टाटा समूह आज १५० वर्षांनीही यशस्वी घौडदौड करतो आहे. एडिसनने १८९२ मध्ये सुरू केलेली जनरल इलेक्ट्रिक कंपनी आज एडिसन नंतरही काम करत आहे. कोणतीही संकल्पना, विचार किंवा संस्था (मग तो व्यवसाय असो, सामाजिक संस्था असो की देश) ही तिला जन्म देणाऱ्या व्यक्तीहून फार मोठी असते. तिला जन्म देणाऱ्या मेंदूचा नाश झाला तरी ती वाढतच राहते. चिरकाल टिकते. फक्त सुरुवातीच्या टप्प्यात आपण तिची काळजी घ्यायची असते. एकदा ती स्वतःच्या ताकदीवर उभी राहिली, की आपले काम पूर्ण होते. व्यवसायामध्ये हा कालावधी सरासरी तीन वर्षाचा आहे. काही ठिकाणी तो कमीअधिक होऊ शकतो. नाउमेद होता हा व्यवसाय स्वतःच्या ताकदीवर उभा राहिपर्यंत कसा पुढे नेता येईल? यासाठी कोणती मानसिकता लागेल? या वर पुढील लेखात जाणून घेऊ.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

    आणखी वाचा

  • स्टार्टअप वाढीचे टप्पे…

    स्टार्टअप वाढीचे टप्पे…

    पहिला टप्पा : स्टार्टअप! (शून्य – ५० हजार डॉलर्स)

    जगभरात दरवर्षी सुमारे १० कोटी नवीन व्यवसाय सुरु होतात. दुर्दैवाने त्यातील ८० टक्के व्यवसाय ३ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकत नाहीत.

    दुसरा टप्पा : लघुउद्योग (५० हजार ते ३ लाख डॉलर्स)

    तुम्ही व्यवसाय सुरु केला आणि तो चांगला चालू लागला, तुम्हाला ग्राहक मिळू लागले, नवी उत्पादने तुम्ही बाजारात आणू लागलात. हा तुमचा संघर्षाचा काळ असतो. काहीजण आपला व्यवसाय स्वतःपुरता मर्यादित करून घेतात., तर काहीजण यातून पुढे जाऊन स्वतःची एक टीम बनवतात.

    तिसरा टप्पा :  यशस्वी व्यवसाय (३ लाख – २० लाख डॉलर्स)

    आजवरचा तुमचा संघर्ष, तुमची मेहनत फळाला आली. आता तुमचा व्यवसाय एका शाश्वत गतीने चालू लागला आहे. आता तुम्ही तुमचे लक्ष तुमची टीम वाढवण्यावर द्यायला हवे. स्वतःसाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. तुमचा व्यवसाय आता तुमच्याशिवाय चालू लागला आहे. हे तुमच्या मेहनतीचे फळ आहे. आता आराम करायचा, फिरायचं, मौजमजा करायची, की आपला व्यवसाय पुढच्या टप्प्यावर न्यायचा?

    जगातील पंधरा कोटी व्यवसायांपैकी ४ टक्क्यांहून कमी व्यवसाय ५ कोटी रुपयांपर्यंत आपला महसूल वाढवतात, तसेच ४ टक्क्यांहून कमी व्यवसाय १० वर्षांपेक्षा जास्त काळ टिकतात. 

    चौथा टप्पा : लघु व मध्यम उद्योग (२० लाख – १ कोटी डॉलर्स)

    तुम्ही जसजसा व्यवसायाचा पसारा वाढवत जाता, नवनवीन आव्हाने तुमच्यासमोर उभी राहतात. या टप्प्यावर व्यवसायाचे नियोजन, व्यवस्था, बुद्धिमत्ता आणि प्रशिक्षण या गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासते आणि तुम्ही पुन्हा एकदा संघर्षमय अशा दुसऱ्या टप्प्यात जाता.

    पाचवा टप्पा : मध्यम आणि मोठे उद्योग (१ कोटी – ५ कोटी डॉलर्स)

    आता तुमचा व्यवसाय एवढा मोठा झालेला आहे, की तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रावर आणि जगावर प्रभाव पाडत आहात. तुमच्या व्यवसायाची एक वेगळी ओळख जगभर निर्माण झालेली आहे.

    ‘जुगार आणि विचार करून घेतलेली जोखीम यात फरक असतो.’ – एडमंड एच. नॉर्थ

    हजारातील एक-दोन व्यवसाय ५ कोटी डॉलर्सचा टप्पा पार करून पुढे जातात. पण आजच्या जमान्यात तुम्ही भविष्यातील योग्य संधी ओळखल्या आणि नियोजनबद्ध पद्धतीने त्यावर काम केले, तर तुम्ही पूर्वी कधी नव्हे त्यापेक्षा जास्त वेगाने बाजारपेठ काबीज करू शकता. त्यामुळे आपले कामाची दिशा ठरवा, ध्येय निश्चिती करा आणि प्रवासाचा आनंद घ्या!!! आणि जर तुमचा व्यवसाय अयशस्वी ठरला तर? काळजी करू नका, पुन्हा सुरुवात करा…