Category: लेख

  • स्टार्टअपच्या अनिश्चिततेला सामोरे जाण्याचे 5 मार्ग

    स्टार्टअपच्या अनिश्चिततेला सामोरे जाण्याचे 5 मार्ग

    व्यावसायिक जीवनशैलीतील जोखीम पूर्णपणे स्वीकारण्यासाठी तुम्हाला निश्चितता सोडावी लागेल. ही जीवनशैली रोलर-कोस्टर सारखी असेल. तार्किकदृष्ट्या, हे जाणून घेणे सोपे आहे. पण भावनिकदृष्ट्या पाहिल्यास, उद्योजकाच्या आयुष्यात खूप चढ-उतार येतात. तणाव, निराशा येते आणि प्रेरणा कमी होते आणि हे होणे अपरिहार्य आहे.

    म्हणूनच स्टार्टअपच्या अनिश्चिततेला सामोरे जाण्याचे 5 मार्ग खाली आहेत:

    1. सकाळचा नित्यक्रम नेटाने पाळा 

    सकाळची दिनचर्या सुरू करण्याचे अनेक मार्ग आहेत. एक स्थिर आणि रोज नित्याने करता येण्याजोगी दिनचर्या असणे महत्त्वाचे आहे. ही दिनचर्या तुमचे मन केंद्रित करते आणि तुम्हाला तुमच्या दिवसासाठी आनंदी राहण्यास मदत करते. ज्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय व्यवस्थापित करू शकता आणि तुम्हाला हवे ते करू शकता. जेव्हा व्यवसाय स्वतःचा असतो तेव्हा कोणीही तुमचा बॉस नाही आणि कोणीही तुम्हाला काय करावे हे सांगत नाही. त्यामुळे दिवसाची सुरवात पूर्णक्षमतेने करणे हे उत्पादनक्षम ते पूर्णपणे गोंधळलेल्या दिवसांचे मिश्रण हाताळण्यास मदत करते. यामुळे तुम्ही स्वत:ला थोडी स्थिरता देऊ शकता. मनाच्या त्या शांत स्टेज वर पोहचण्यासाठी ध्यानाची गरज आहे.

    Habits For Successful Businessman

    2. उच्च कार्यक्षमता असलेल्या पुस्तकांसाठी वेळ काढा

    Habits For Successful Businessman

    3. तुमच्या आठवड्याचं कामकाज शेड्युल करा

    ऑफिस जॉब करता असताना आठवड्याचं कामकाज शेड्युल केलेलं असतं. कंपनीतील प्रत्येकजण एका किंवा दुसर्‍या मीटिंगसाठी तुमचा वेळ मागत असताना दिसतो. निरर्थक बैठका हे देखील काही लोकांचे नोकर्‍या सोडण्याचे कारण आहे. तुमची स्वतःची स्टार्टअप असल्यावर या निरर्थक मिटिंग संपून जातील. यामुळे कॅलेंडर कसे भरायचे हे तुमच्या हातात असेल. रविवारची संध्याकाळ हि तुमच्या आठवड्याच्या मिटिंग ठरवण्यासाठी असावी. आठवड्याभरात दररोज मोठ्या कामांचे  नियोजन करा. अशा प्रकारे काम केल्यास तुम्ही नेहमी जागरूक असता की तुम्ही कशावर काम केले पाहिजे आणि तुम्ही ट्रॅकवर रहता.

     Habits For Successful Businessman

    4. व्यायामशाळेत जा

    हा खरोखर एक अत्यंत असा योग्य सकाळच्या नित्यक्रमाचा भाग आहे आणि त्याचे फायदे भरपूर आहेत. व्यायामामुळे चिंता आणि तणाव दूर होण्यास मदत होते. तुमच्या व्यवसायातील निराशा दूर करण्याचा यापेक्षा चांगला मार्ग नाही. तुम्ही दररोज व्यायाम केल्यावर तुमचे शरीर आणि मन अधिक आरामशीर होईल. जेव्हा उद्योजक होण्याच्या तणावाचा प्रश्न येतो तेव्हा व्यायाम हि एक गरज आहे. यामुळे तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहता.

     Habits For Successful Businessman

    5. कृतज्ञ व्हा

    कृतज्ञता ही एक चांगली गोष्ट आहे. कृतज्ञतेची भावना हि नेहमी माणसाला नम्र ठेवते. तसेच व्यवसाय वाढत असताना होणाऱ्या वेदना, मनाची चलबिचल यावर आराम मिळवण्याचा सर्वात जलद मार्ग आहे. कृतज्ञतेमुळे शंका आणि अनिश्चितता वेदनांमधून जात असताना किंवा काही चुकीचे होत आहे असे दिसते तेव्हा अनेक गोष्टीतून मार्ग निघतो.

    कृतज्ञता माणसाला प्रगतीच्या नव्या मार्गाला घेऊन जाते. कृतज्ञतेमुळे अनेक माणसे जोडली जातात. ज्याचा तुमच्या व्यवसायामध्ये खूप फायदा होतो. त्यामुळं मानसिक तणावापासून लांब राहून माणसं जोडण्यासाठी नेहमी कृतज्ञ असावं.

     Habits For Successful Businessman

    आणखी वाचा

  • 7 चुका ज्या तुम्ही तुमच्या स्टार्टअपमध्ये टाळल्या पाहिजेत

    7 चुका ज्या तुम्ही तुमच्या स्टार्टअपमध्ये टाळल्या पाहिजेत

    उद्योजक हे फक्त नाव एखाद्याला यशस्वी बनवते असे नाही, तर एखादी व्यक्ती त्याचा व्यवसाय कसा चालवतो यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. “उद्योजक” ही पदवी धारण केल्याने एखाद्याच्या खिशात डॉलरची भर पडत नाही. तुमच्याकडून जे आवश्यक आहे ते तुम्ही न केल्यास, तुम्ही व्यवसायाच्या जगात यशस्वी होणे जवळजवळ अशक्य होईल.

    1. कुटुंबातील अकुशल सदस्य किंवा मित्राला कामावर घेऊ नका

    “यशस्वी नोकरीचे रहस्य हे आहे: ज्या लोकांना जग बदलायचे आहे त्यांना शोधा.” – मार्क बेनिऑफ

    2. तुमच्या व्यवसायाकडे कधीही बँक म्हणून पाहू नका

    7-mistakes-to-avoid-in-startup-business

    यशस्वी उद्योजक ते आहेत जे त्यांच्या व्यवसायाला किंवा उपक्रमाकडे बँक म्हणून नव्हे तर समस्या सोडवण्याचे माध्यम म्हणून पाहतात. ते सहसा ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याच्या दृष्टीकोनातून एक किंवा दुसरी समस्या सोडवण्याच्या मार्गांचा विचार करतात. यातून पैसे कसा काढायचा याचा नाही. त्यामुळेच ते त्यांच्या कारकिर्दीची यशोगाथा बनवू शकतात.

    यशस्वी उद्योजक बनण्याची आकांक्षा बाळगणार्‍या व्यक्तीने समस्या सोडवण्याचे एक माध्यम म्हणून व्यवसाय उपक्रमाकडे पाहणे आवश्यक आहे. ही मानसिकता उद्योजकाच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणते.

    3. आवश्यक असेल तेव्हा प्रश्न विचारा

    Mistakes- avoid-in-startup-business

    जेव्हा एखादी समस्या उद्भवते तेव्हा खांदे उचलण्याऐवजी किंवा असुरक्षितता दर्शविण्यास घाबरण्याऐवजी, यशस्वी होण्याची आकांक्षा बाळगणारा उद्योजक हा त्याच्या आधी घडलेल्या उद्योजकांना प्रश्न विचारतो. अर्थात, या लोकांनी भूतकाळात अशाच चुका केल्या असतात, धडा घेतलेला असतो आणि आता ते यातून पुढे आलेले असतात.

    कन्फ्यूशियसच्या मते, “ज्याने प्रश्न विचारला तो एक मिनिटासाठी मूर्ख आहे, जो माणूस विचारत नाही तो आयुष्यभरासाठी मूर्ख आहे.” प्रत्येक व्यवसाय मालकासाठी सुवर्ण नियम लक्षात ठेवा: “स्वतःला तुमच्या ग्राहकांच्या जागी ठेवा. तुम्ही ग्राहकांना खूप वेळ वाट पाहायला लावल्यास, त्यांना जवळचे स्टोअर सापडेलच. पण एकदा गेलेला ग्राहक पुन्हा येणार नाही.”

    4. तुम्ही जे देऊ शकत नाही, त्याचे वचन देऊ नका

    7-mistakes-to-avoid-in-startup-business

    जेव्हा ग्राहकांना कळते की तुम्ही विश्वासार्ह नाही, तेव्हा ते तुमच्याकडून खरेदी करण्यासाठी परत येत नाहीत. ग्राहकांचा विश्वास हाच तुमच्या व्यवसायाचा पाया आहे. तुम्ही जर ग्राहकांना सांगितलेली एखादी गोष्ट पूर्ण करू शकला नाहीत, तर ते पुन्हा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. त्यांना पाहिजे ती वस्तू देण्यासाठी भरपूर व्यावसायिक आहेत. यामुळे ग्राहकाशी वचनबद्ध होताना तेच वचन द्या, जे तुम्ही पूर्ण करू शकाल.

    5. मार्केटिंगकडे दुर्लक्ष करणे:

    तुमच्या उत्पादनाबद्दल किंवा सेवेबद्दल लोकांना माहिती नसेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. प्रभावी मार्केटिंग योजनेचा विकास करा आणि तुमच्या लक्ष्यित प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्केटिंग चॅनेल वापरा. मार्केटिंगवर पैसा खर्च करताना कंजूषपणा करू नका. उलट त्यातून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचून विक्री कशी वाढवता येईल याकडे लक्ष असू द्या..

    6. व्यवसायाच्या संधींसाठी बाजार संशोधन आणि शोध कधीही थांबवू नका

    7-mistakes-to-avoid-in-startup-business

    सततच्या जीवघेण्या स्पर्धेच्या तोंडावर, यशस्वी होण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या उद्योजकाने कल्पना किंवा व्यवसायाच्या संधींसाठी बाजार संशोधन आणि शोध कधीही थांबवू नये. कारण ज्या क्षणी तो हे करायचा थांबतो, त्याची उत्पादने किंवा व्यवसाय करण्याची पद्धत ही जुनी फॅशन बनते. त्यामुळे सतत नवीन गोष्टींचा पाठपुरावा करत चला.

    आपल्या स्पर्धकांची उत्पादने आणि जाहिराती पाहून, एक व्यावसायिकाने आपण कोठे कमी पडतो हे पाहून त्या जागा भरल्या पाहिजेत. नवीन व्यवसाय कल्पना अंमलात आणणे किंवा सध्याच्या कल्पनांमध्ये सुधारणा करणे, हे आजच्या वेगवान व्यवसायाच्या वातावरणात उद्योजकांच्या यशासाठी अत्यंत महत्वाचे आहे.

    7. तुमच्या व्यवसायाच्या विकासासाठी महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टी करणे टाळा

    mistakes-to-avoid-in-startup-

    एक उद्योजक ज्याला, त्याला काय हवं आहे हे माहित आहे, तो ध्येय साध्य करण्यासाठी उद्दिष्टांची मालिका सेट करतो. एकाच वेळी बर्‍याच गोष्टींमध्ये गुंतणे ही व्यावसायिक जगामधील एक त्रुटी आहे. ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, व्यावसायिकाने तेच केले पाहिजे जे त्याच्यासाठी महत्वाचे आहे.

    त्याच्या व्यवसायाच्या अस्तित्वाच्या आणि विकासाच्या अनुषंगाने महत्वाच्या नसलेल्या गोष्टी त्याने करू नयेत म्हणून, त्याने त्याची उद्दिष्टे लिहून ठेवली पाहिजेत आणि त्याला प्रथम, द्वितीय, तृतीय, अशा कोणत्या क्रमाने काम करायचे आहे ते ठरवले पाहिजे. उद्योजक एलोन मस्क म्हणाले, “जेव्हा लोकांना लक्ष्य काय आहे आणि का हे माहित असते तेव्हा ते अधिक चांगले कार्य करतात.” जर तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर फक्त वरील सूचनांचे पालन करा.

    आणखी वाचा

  • आपला लहानातला लहान निर्णय एकतर आपले आयुष्य बदलू शकतो किंवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो.

    आपला लहानातला लहान निर्णय एकतर आपले आयुष्य बदलू शकतो किंवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो.

    प्रत्येकाला आपल्या जीवनात विविध प्रसंगांना सामोरे जावे लागत असतं. मग ते प्रसंग आनंदाचे, दुःखाचे, धैर्याचे, भीतीचे, जबाबदारीचे कोणतेही असू शकतात. या सर्व प्रसंगाचे अस्तित्व म्हणजेच माणसाचे जीवन होय. अपेक्षित यश मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे निर्णयक्षमता. जरी आपण आत्मविश्वासाला यशाची गुरुकिल्ली म्हटलं, तरी निर्णयक्षमता हेच यशाचं रहस्य असतं. जेव्हा आपण एखादी कृती करण्याचा निर्णय घेऊ तेव्हाच ती पूर्णतेच्या दिशेने आपली वाटचाल सुरु होईल.. नाहीतर जर तुम्ही निर्णयच नसेल घेतला तर यश अपयश लांबच्या गोष्टी.  

    मंडळी, तुम्ही जर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे या उक्तीनुसार काम करत गेला ना, तरंच तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करू शकता. सिद्धार्थने जर आई-वडिलांनी सांगितल्याप्रमाणे गृहस्थाश्रमाचाच मार्ग अवलंबला असता, तर तो युगप्रवर्तक गौतम बुद्ध कधीच बनला नसता. आपला एखादा लहानातला लहान निर्णय एकतर आपले आयुष्य बदलू शकतो किंवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. जसे महाभारतातील दोन वेगवेगळ्या निर्णयांची आपण अजूनही चर्चा करतो. एक योग्य निर्णय म्हणजे अर्जुनाने कृष्णाला आपल्या पक्षात घेणे आणि दूसरा अयोग्य निर्णय दुर्योधनाने कृष्णाकडे सैन्याची मागणी करणे. एकाच परिस्थितीतील या दोन निर्णयांनी एकाचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले तर दुसऱ्याचे समृद्ध.

    आणखी वाचा

  • कमी भांडवलात जास्त टर्नओव्हर कसा करायचा?

    कमी भांडवलात जास्त टर्नओव्हर कसा करायचा?

    tips-for-increasing-turnover-with-low-capital

    आणखी वाचा

  • कॅश क्रंचमुळे तुमचा व्यवसाय संपतोय का?

    कॅश क्रंचमुळे तुमचा व्यवसाय संपतोय का?

    कॅश क्रंचचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे बुध्दी चालायची बंद होते. सगळे लोक पैसे मागत असतात व तुम्हाला मालक असूनही तोंड चुकवून पळावे लागते. कर्मचाऱ्यांना पगार वेळेत न दिल्याने कंपनी बुडणार आहे, अशा अफवा पसरतात, कंपनीचे एकूण वातावरण खूप वाईट होते व बरेच चांगले कर्मचारी नोकरी सोडून जातात. चेक बाऊन्स झाल्याने बिझनेस मार्केटमधून उठला, असा समज होतो.

    १. विक्रेत्यांशी चर्चा करा

    तुमच्याकडे किती पैसे आणि कधी येणार आहेत यावर कदाचित तुमचे नियंत्रण नसेल, परंतु तुमच्याकडून जाणाऱ्या पैशांवर तुम्ही नक्कीच नियंत्रण करू शकता. विक्रेत्यांना/पुरवठादारांना काही कालावधीसाठी थांबवता येईल का ते बघा किंवा एकदम सर्व पैसे देण्याऐवजी टप्प्याटप्याने पैसे देणं हा सुद्धा चांगला मार्ग आहे. बरेच व्यावसायिक आपल्या विक्रेत्यांशी बोलायला कचरतात. त्यांना वाटते की, आपली ‘इज्जत’ कमी होईल किंवा समोरची व्यक्ती कमी पैसे घ्यायला तयारच होणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या. विक्रेते/पुरवठादार सुद्धा तुमच्यासारखेच व्यावसायिक असतात. त्यांनीसुद्धा अशा परिस्थितीचा सामना केलेला असतो. त्यामुळे ते तुमची अडचण समजू शकतात.

    तसेच त्यांनासुद्धा आपला ग्राहक (तुम्ही) टिकवायचा असतो. जर तुमच्यासोबतचा त्यांचा अनुभव चांगला असेल तर ते नक्कीच तुमची मदत करतील. जेणेकरून दोघांचा फायदा होईल. त्यामुळे किती पैसे येणार आहेत याचा अंदाज घ्या. एकूण किती पैसे द्यावे लागणार आहेत? त्यात कुणाला तातडीने द्यावे लागतील? कुणाला काही कालवधीसाठी थांबवू शकतो? त्यांना फोन करा, चर्चा करा. आणि त्यानुसार नियोजन करा.

    २. अनावश्यक खर्च लांबणीवर टाका

    ‘कडकी’ चालू असताना आपला खर्च कुठे होतोय याचा बारीक विचार करा. त्यातील काही खर्च लांबणीवर टाकता येतात का किंवा पूर्णपणे काढून टाकता येतात का ते पाहा. तात्पुरत्या स्वरूपात, तुम्ही मालाचा आठवड्याला/महिन्याला जो स्टॉक भरून ठेवता तो कमी भरणं हा सुद्धा चांगला पर्याय आहे. जेवढा खर्च कमी कराल तेवढे जास्त पैसे तुमच्याजवळ खर्चासाठी उपलब्ध होतील.

    ३. निरुपयोगी गोष्टी विकून टाका

    समजा एखादे नवीन उत्पादन करण्यासाठी एखादी मशीन दोन वर्षांपूर्वी तुम्ही विकत घेतली होती. पण तुमचे नियोजन फसले. ती मशीन तुमच्या कार्यालयात तशीच पडून आहे. ती विकू शकता का? कदाचित तुमच्याबाबतीत मशीन नसेल, एखादा कंप्यूटर, गाडी किंवा इतर काहीही असू शकते. जे तुम्ही विकू शकता. अशा गोष्टींचा अंदाज घ्या. त्यांची किंमत ठरवा. ऑनलाईन किंवा ऑफलाईन विक्रीस ठेवा. विकताना जास्त आढेवेढे न घेता व्यवहार शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला लगेचच पैसा उपलब्ध होईल. 

    ४. पेमेंटवर सूट द्या.

    आपल्याच पैशांसाठी वाट बघत बसणं जिकिरीचं असतं. अशावेळी तुमच्या सर्व ग्राहकांशी संपर्क साधा आणि पेमेंट बाबत विचारा. काहींची मुदत संपायला (नूतनीकरण) अजून वेळ असेल. अशा लोकांना थोडीफार सूट (विशेष लाभ) देऊ शकता. त्यांना परिस्थितीची कल्पना द्या. ‘जर तुम्ही मुदतपूर्तीच्या आधी पेमेंट केलं, तर तुम्हाला सूट मिळेल’ असं सांगून बघा. अर्थात, सूट देताना कमीत कमी द्या. मुख्य उद्दिष्ट आपल्याला लागणारे पैसे उभे करणं हे असावं. अशाच प्रकारे सर्व ग्राहकांशी बोलून घ्या. कदाचित तुम्हाला आश्चर्यचकित करून टाकणारे परिणाम मिळतील आणि तुमची पैशांची चिंता मिटेल.

    ५. फ्लॅश सेल सुरु करा

    तुमच्याकडे तुमच्या ग्राहकांचा डेटाबेस असेलच. त्यांचे फोन नंबर, ईमेल आयडी असतील. कदाचित त्या ग्राहकांनी कोणत्या वस्तू किंवा सेवा आधी वापरल्या आहेत याची सुद्धा माहिती असेल. याच ग्राहकांसाठी तुमच्या सर्वात लोकप्रिय वस्तू/सेवांवर एखादी ऑफर सुरु करा. किंमत आकर्षक ठेवा. फक्त डिस्काउंट देऊ नका. ऑफर अशी असली पाहिजे की, लोकांचं लक्ष आकर्षून घेईल आणि त्यांना खरेदी करायला भाग पाडेल.

    तसेच ही ऑफर मर्यादित वेळेसाठीच ठेवा, कदाचित ४८ तास किंवा पुढील ५ दिवस. त्यानंतर ही ऑफर कधीच असणार नाही असं सांगा. ही माहिती देणारा संदेश तुमच्या सर्व ग्राहकांना आणि संभाव्य ग्राहकांना बल्क ईमेल/मेसेज करा. फक्त एकच ईमेल पाठवून थांबू नका. अनेक लोक रोज ईमेल बघत नाहीत. त्यामुळे तुम्ही नियमितपणे ईमेल/मेसेज पाठवून वेळ संपत चालल्याची आठवण करून दिली पाहिजे. तुमची सेल्स आणि मार्केटिंग टीम सुद्धा व्यक्तिशः फोन करून जास्तीत जास्त बिझनेस मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात.  

    ६. वस्तू/सेवांच्या किंमतीवर पुनर्विचार करा

    किंमत वाढवणे हा सुद्धा व्यवसायाचा एक भाग आहे. आणि जेव्हा तुम्ही आर्थिक अडचणीत असाल, तेव्हा या पर्यायाचा नक्कीच विचार करू शकता. अर्थात वस्तूंचे/सेवांचे दर वाढवण्याआधी पूर्ण विचार करा. तुमचा एकूण खर्च किती आहे? त्याबदल्यात तुम्ही किती रक्कम आकारत आहात? तुम्ही दर वाढवून बराच कालावधी झाला आहे का? तुमच्या प्रतिस्पर्ध्यांशी तुलना करता तुमचे दर कसे आहेत? दर वाढवणे हा कॅश क्रंच मधून बाहेर निघण्याचा एक मार्ग आहे. परंतु, नियोजनबद्धपणे वाढवले पाहिजेत. नाहीतर हा पर्याय अंगलट आला तर, आहेत ते ग्राहक सुद्धा तुम्हाला सोडून जातील.    

    ७. कर्मचारी कमी करा, पगार लांबवा

    हा सर्वात शेवटचा पर्याय असला पाहिजे. कनिष्ठ/नवीन कर्मचाऱ्यांपेक्षा तुलनेनं वरिष्ठ/जुने कर्मचारी कंपनीची परिस्थिती समजून घेऊ शकतात. पुढे अडचण येणार आहे, असे लक्षात येताच आपल्या मुख्य सहकाऱ्यांशी चर्चा करा. यातून बाहेर पडण्यासाठी वर दिलेले पर्याय वापरून काय करता येईल याची योजना बनवा. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांचे सहकार्य मागा.

    शेवटी, एवढं सगळं करूनही समस्या सुटली नाही, तर सर्वांचे पगार करण्याइतपत पैसे कंपनीजवळ नसतील. त्यामुळे परिस्थिती सुधारेपर्यंत पगार मिळू शकणार नाही, असे सांगा. अर्थात कुठल्याही कर्मचाऱ्याला हे आवडणार नाही. परंतु अनेक कर्मचाऱ्यांनी सुद्धा कंपनीच्या वाढीसाठी भरपूर मेहनत घेतलेली असते. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहात, ते तुमची साथ देऊ शकतात. अगदीच गरज पडली तर काही कर्मचारी कामावरून कमी करा.

  • तुम्ही भंगार म्हणून जे फेकून देता, त्यातून ‘तो’ महिन्याला  लाखो रुपये कमावतो – प्रमोद सुसरे

    तुम्ही भंगार म्हणून जे फेकून देता, त्यातून ‘तो’ महिन्याला लाखो रुपये कमावतो – प्रमोद सुसरे

    वडील वीटभट्टीवर कामाला. घरी एकरभर शेती आणि त्यावर चालणारे कुटुंब. प्रमोद दहावीपर्यंत शिकला, अभ्यासात जेमतेमच हुशार होता. समोर ध्येय काही नव्हते, पण दहावीला चांगले मार्क मिळाले आणि सायन्सला प्रवेश मिळाला. बारावीला मार्क कमी मिळाले, पण नशिबाने सीईटीच्या मार्कांच्या जोरावर प्रमोदने इंजीनियरिंगला ऍडमिशन घ्यायचं ठरलं. पण त्यासाठी फी भरायला पैसे नव्हते. प्रमोदला डिप्लोमाला टाकले गेले.

    कुटुंबाला मदत होईल म्हणून तो शिकता शिकता पार्ट टाईम जॉब करू लागला. महिना 8000 रुपये पगार त्याला मिळत होता. त्यात फी आणि इतर खर्च भागवून तो घरी देखील पैसे पाठवत होता. तिथे त्याच्या क्रिएटिव्ह आयडियाचा फायदा त्याच्या मॅनेजरला होत होता आणि प्रमोदला मिळत होता, तो तुटपुंजा पगार. मनात खूप वेळा विचार आला, की नोकरी सोडून व्यवसाय चालू करावा, पण घर प्रमोदच्या पगारावर चालायचं. यामुळे तो हे धाडस करू शकत नव्हता. माणूस कशाचेही सोंग आणू शकतो, पण पैशाचे सोंग कधीही आणता येत नाही. शेवटी त्याने निर्णय घेतला, नोकरी करत करत व्यवसाय करायचा.

    मग काय, प्रमोदने स्वस्त किंमतीत काही टायर आणि ड्रम विकत घेतले आणि ड्रिल मशीनसह उर्वरित वस्तू सेकंड हँडच्या दुकानातून मिळवून काम सुरू केले. ऑफिसमधून आल्यावर दररोज चार ते पाच तास फर्निचर बनवू लागला.

    एक ऑर्डर ५० हजार ते एक लाखपर्यंत उत्पन्न देते. आतापर्यंत त्याने २० हुन अधिक हॉटेल्स आणि कॅफेसाठी फर्निचर बनवले आहे. पुणे, मुंबई, सातारा, नाशिक, सांगली इतकंच नव्हे, तर चेन्नई, हैदराबाद, गुजरात, दिल्ली इथपर्यंत प्रमोदच्या ऑर्डर पोचल्या आहेत. मार्च २०२१ मध्ये त्याने पहिली इंटरनॅशनल ऑर्डर मिळवली, साऊथ आफ्रिकेहून. तीही तितक्याच सचोटीने पूर्ण केली. आज तो अमेरिकेसारख्या देशामध्ये देखील आपला व्यवसाय पसरवण्याची स्वप्न बघत आहे. त्यासाठी प्रयत्न करत आहे.

    हा लेख व्हिडिओमध्ये पहा
  • होंडा कंपनी उभी करणारा मेकॅनिक – सोइचिरो होंडा

    होंडा कंपनी उभी करणारा मेकॅनिक – सोइचिरो होंडा

    एका लोहाराचा मुलगा ते होंडा मोटर्सचा मालक होण्यासाठी केलेला संघर्ष

    नमस्कार! नवी अर्थक्रांतीमध्ये आपलं स्वागत आहे… स्टार्टअप आणि उद्योग क्षेत्रातील रंजक आणि उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. तेव्हा चॅनेल आत्ताच सबस्क्राइब करा.

    सोइचिरो होंडा यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९०६ मध्ये जपान मधील शिजूओका भागातील कोमयो गावात झाला. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. त्यांचे वडील गिहेई होंडा लोहार होते, तसंच त्यांचं एक सायकल रिपेअरिंगचं दुकान होतं. लहान सोइचिरो आपल्या वडिलांना कामात मदत करायचे. लहान लहान यंत्रांवर प्रेम करणाऱ्या सोइचिरोंचं अभ्यासात काय मन लागेना. त्यांनी आपलं शिक्षण अर्धवट सोडलं आणि टोकियो गाठलं. तिथं ते ‘आर्ट शोकाई’नावाच्या कंपनीत मेकॅनिक म्हणून रुजू झाले, पण ते वयाने सगळ्यात लहान असल्यामुळे त्यांना मेकॅनिकचं काम सोडून इतर छोटीमोठी कामं द्यायचे. यावर सोइचिरोंनी मालकाला विनंती केली आणि मेकॅनिकचं काम द्यायला लावलं. त्यांचं मशीनवरच प्रेम पाहून मालकानं सोइचिरोंना दुसऱ्या शाखेत पाठवलं. त्या शाखेत रेसिंग कार तयार केल्या जात होत्या. सोइचिरो तिथं मन लावून काम करु लागले. शोकाई कंपनीनं जपान कार चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता आणि त्या स्पर्धेत अगदी अनपेक्षितरित्या कंपनीची कार पहिली आली. सोइचिरो त्या पहिल्या आलेल्या कारचे मेकॅनिक होते. यामुळे खुश होऊन कंपनीने एका शाखेची जबाबदारी या २१ वर्षीय पोराच्या खांद्यावर दिली. २० व्या वर्षी होंडा यांना सैन्यदलात नोकरीसाठी बोलावण्यात आलं होतं; परंतु रंगांधळेपणामुळे त्यांना डावलण्यात आलं.

    The Story of Soichiro Honda

    सोइचिरो रेसिंग स्पर्धेतसुद्धा भाग घ्यायचे. ७ जून १९३६ रोजी एका रेसमध्ये होंडा यांचा अपघात झाला. त्यात ते किरकोळ जखमी झाले; परंतु त्यांचा लहान भाऊ गंभीर जखमी झाला. ऑक्टोबरमध्ये त्यांनी आणखी एका रेसमध्ये भाग घेतला. मात्र, वडील रागावल्याने आणि पत्नी नाराज झाल्यामुळे त्यांनी रेसिंगची आवड सोडली.

    काम करत असताना सोइचिरोंच्या लक्षात आलं की गाडीसाठी लागणाऱ्या पिस्टनला खूप मागणी आहे,. पण ते बनवणाऱ्या कंपन्या कमी. त्यांनी आपल्या मालकाला ही गोष्ट बोलून दाखवली आणि सुचवलं ही आपणही पिस्टन बनवू. पण मालकाने त्यांना साफ नकार दिला. यावर आता आपण स्वतःच पिस्टन बनवू म्हणत त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल गाव गाठलं. त्यांनी ‘तोकाई सेकी’ नावाची कंपनी उभी केली. या कंपनीनं पिस्टन रिंग बनवून त्या टोयोटा कंपनीला चाचणीसाठी दिल्या. पण त्यांनी पाठवलेल्या ५० रिंग पैकी फक्त ३ रिंग टोयोटा कंपनीच्या चाचण्या पास करू शकल्या. हे होत त्यांच्या आयुष्यातलं पहिलं अपयश.

    दोन वर्षांत त्यांनी आपल्या कामाच्या गुणवत्तेत सुधार करून अधिक उत्कृष्ट पिस्टन रिंग बनवल्या. कंपनी बऱ्यापैकी काम करत होती, तोच दुसरं जागतिक महायुद्ध सुरु झालं आणि यात अमेरिकेने जपानवर टाकलेल्या B२९ बॉम्बमध्ये सोइचिरोंची कंपनी उध्वस्त झाली. हा त्यांना बसलेला दुसरा तडाखा.

    युद्ध संपल्यानंतर त्यांनी आपल्या कंपनीचे जळालेले अवशेष साडेचार लाख येनना विकले आणि परत नव्या जोमानं कंपनी उभी केली. तिचंही काम चांगलं चालू होतं. तोच जपानमध्ये मोठा भूकंप झाला आणि त्यांची कंपनी जमीनदोस्त झाली. दैवाने त्यांची तिसऱ्यांदा परीक्षा बघितली. एक वेळ तर अशी होती की, सोइचिरोंकडे फक्त एका दिवसाचं पेट्रोल भरण्याइतकेच पैसे शिल्लक होते.

    मित्रहो सामान्य माणूस इतक्या अपयशानंतर खचून जातो. प्रयत्न सोडून देतो, पण हे सोइचिरो होंडा होते. ते अपयशाचं भांडवल करत बसले नाहीत. ‘हे माझ्याच सोबत का झालं’ म्हणून त्याला गोंजारत बसले नाहीत. इतक्यांदा पडून देखील ते पुन्हा उभे राहिले. नव्या जोमाने कामाला लागले. दोन वर्षांनंतर ते चांगल्या गुणवत्तेच्या पिस्टन रिंगचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात आणि ‘टोयोटा’ व ‘नाकाजिमा एअरक्राफ्ट’ सारख्या कंपन्यांना त्यांचा पुरवठा करण्यात यशस्वी झाले.

    The Story of Soichiro Honda

    हळूहळू जपानची अर्थव्यवस्था सुधारू लागली. तसंच सोइचिरोंनी चारचाकी गाड्या बनवण्याच्या क्षेत्रात देखील पाय ठेवला. सोइचिरो नेहमी आपल्या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत. अशा या प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या अवलियाने ५ ऑगस्ट १९९१ रोजी जगाचा निरोप घेतला. सर्वसामान्यांना परवडेल अशी गाडी तयार करून लाखो मध्यमवर्गीयांची स्वप्न पूर्ण करणारे सोइचिरो होंडा आपल्याला हेच सांगतात की “जब तक न सफल हो, नींद-चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ कर मत भागो तुम। कुछ किये बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।”…

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • ‘दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल

    ‘दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल

    हल्ली Social Media वर तुम्हाला इतके सारे  Motivational Speaker पाहायला मिळतील की विचारायची सोय नाही. YouTube वर साधं Motivation हा शब्द जरी टाइप केला तरी संदीप महेश्वरी, विवेक बिंद्रा, प्रिया कुमार, गौर गोपाल दास अशा कित्येक Motivational Speakers चे Channels ओपन होतील. ते आपल्याला नेहमी प्रेरणा देत असतात. त्यांच्या बोलण्यातून आपल्या रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींपासून ते जीवनातील अध्यात्माच्या, ध्यानाच्या अनेक गोष्टींपर्यंतची प्रेरणा मिळते. प्रेरणा ही अग्निसारखी असते. तिला जर इंधन पुरवलं नाही तर ती विझून जाते. ‘मला यशस्वी व्हायचंय, मला पैसा कमवायचाय’ या जिद्दीतूनच प्रेरणेचा जन्म होत असतो. जर तुमच्यात जिद्दच नसेल तर इंधन नसलेल्या वाहनाप्रमाणे तुमच्या यशाची गाडी धक्के खात खात धीम्या गतीने चालेल.

    एका वाक्यात प्रेरणा म्हणजे काय सांगायचं झालं, तर प्रेरणा ही आपल्या आयुष्याला गती देणारी एक शक्ती आहे. ती तुम्हाला कोणाच्या बोलण्यातून मिळेल, वाचनातून मिळेल किंवा कृतीतून मिळेल. आमच्या घराशेजारी पाटील कुटुंबीय राहत होते. त्यांचा तुषार नावाचा मुलगा चांगल्या कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत होता. नम्र आणि इतरांप्रती नेहमी आदराची भावना बाळगणारा तुषार सगळ्यांच्याच आवडीचा होता. मात्र त्याचा भाऊ मंगेश व्यसनी आणि व्याभिचारी होता. दारू, सिगारेट, गांजाचं त्याला व्यसन होतं. तो आपल्या बायकोला देखील भरपूर मारायचा. एके दिवशी असंच त्याला कोणीतरी विचारलं. का रे तु असा वागतोस, दारू पिऊन का मारझोड करत असतोस? त्यावर मंगेश म्हणाला, “लहानपणी माझे बाबा दारू पिऊन आईला खूप मारायचे. रोज दारू पिऊन शिवीगाळ करायचे. त्याच वातावरणात मी वाढलो आणि मला देखील त्यांच्यासारखीच सवय लागली. कामाच्या आळसामुळे माझी ही अशी माझ्या वडिलांसारखीच अवस्था झाली.”

    कुसुमाग्रजांच्या कणा कवितेतील तरुण. इतक्या मोठ्या संकटात देखील तो गुरुजींकडे पैसे नाही, तर पाठीवर एक प्रेरणेची थाप मागत होता. मित्रांनो हे जे प्रोत्साहन आहे ना, तेच नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा मिळवून देत असतं. लहानपणी शाळेत गुणगौरव सोहळा असायचा. शालेय परीक्षा, खेळ, संगीत, नृत्य, वादन अशा प्रत्येक क्षेत्रात अव्वल असलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिलं जायचं. साहाजिकच त्यामुळे मुलांच्यात अजून चांगलं काम करण्याची ऊर्जा निर्माण व्हायची. आयुष्यात एकतरी अशी व्यक्ती असावी जी तुम्हाला नेहमी प्रेरणा देईल. नवीन काहीतरी करण्याचं बळ देईल आणि जर कोणी नसेलच तर बाह्य प्रेरणा मिळविण्यापेक्षा तुम्हीच स्वतःला प्रेरणा देऊन तुमच्यातील अंतर्गत प्रेरणेचा दरवाजा खुला करा. तुमच्यातील अंतर्गत प्रेरणेला बळ देऊन तिला भरभक्कम बनवा.

    आणखी वाचा

  • हॅकर्सपासून वाचायचं​य? मग या टिप्स करा फॉलो!

    हॅकर्सपासून वाचायचं​य? मग या टिप्स करा फॉलो!

    फेसबुक! जगातलं सर्वात लोकप्रिय समाज माध्यम. जगभरातील कोट्यावधी लोक या प्लॅटफॉर्मवर आहेत. आपल्यासारखे सर्वचजण मित्रांशी आणि कुटुंबीयांशी डिजिटली कनेक्ट राहण्यासाठी फेसबुकचा वापर करतात, पण एवढ्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर अकाउंट हॅक होण्याची शक्यतासुद्धा तेवढीच जास्त आहे. वर सांगितल्याप्रमाणे आपण दिवसेंदिवस या समाज माध्यमांना वैयक्तिक माहिती पुरवतच असतो. कितीतरी खाजगी गोष्टी आपल्या या अकाउंटवरच असतात. त्यामुळे तुमचं फेसबुक अकाउंट सिक्युअर करणं हे खूप महत्त्वाचं आहे. काही सोप्या सिक्युरिटी टिप्सना फॉलो करुन तुम्ही तुमचे फेसबुक अकाउंट अधिक सुरक्षित ठेवू शकता. त्या टिप्स कोणकोणत्या आहेत जाणून घेऊया.

    मजबूत आणि युनिक पासवर्ड वापरा:-

    Unknown Accounts वरून friend request accept करू नका:-

    आपण सगळीकडे ऐकतो, पाहतो की अनोळखी लिंक ओपन करायच्या नाहीत, अगदी त्याचप्रमाणे तुम्ही ओळखत नसलेल्या लोकांच्या friend request देखील स्वीकारू नका, अशी शिफारस खुद्द फेसबुककडूनच केली जाते. Facebook च्या एका सर्व्हेनुसार असं लक्षात आलंय की जर तुम्ही Unknown Accounts वरून friend request accept करत असाल, तर तुमचं खातं हॅक होण्याची शक्यता जास्त असते

    संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नका :-

    Account सुरक्षित ठेवताना घ्यायच्या काळजीमधील दुसरी टिप म्हणजे फेसबुक युजर्सनी त्यांना मिळालेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. विशेषत: जर तुम्हाला माहीत नसलेल्या लोकांद्वारे ही लिंक आली असेल किंवा एखाद्या अनोळखी ग्रुपमध्ये रँडमली कोणी टाकली असेल तर अजिबात लिंक ओपन करु नका. अशावेळी त्या लिंकवर क्लिक करण्यामुळे तुमचं अकाउंट हॅक होऊ शकतं.

     protect yourself From hackers

    Two-factor authentication (2FA) active करा:-

    2FA हा फेसबुकवर असणारा ऑप्शन active करणं account सुरक्षेसाठी फार गरजेचं आहे. हे सुरु करण्यासाठी फेसबुकच्या सेटिंगमधील सिक्युरिटी ऑप्शनमध्ये तुम्हाला जावं लागेल. हे करत असताना तुम्हाला तुमचा registered Mail ID आणि Contact Number verify करावा लागेल. तर या option मुळे तुम्ही Facebook वर registered नसलेल्या डिव्हाइसवरून लॉग इन करताना तुम्हाला तुमच्या ओळखीचं व्हेरिफिकेशन करावं लागेल. यामुळे जर कधी दुसऱ्या कोणी लॉग-इन करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला त्याचं notification सुद्धा येईल.

  • शेतकऱ्यांसाठी सरकारच्या टॉप 8 बेवसाईट्स

    शेतकऱ्यांसाठी सरकारच्या टॉप 8 बेवसाईट्स

    1. माती आरोग्य कार्ड योजना

    मातीचं आरोग्य तपासून पीक घेण्यासाठी शासनाकडून सॉईल हेल्थ कार्ड ही योजना सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कार्ड मिळवण्यासाठी जवळच्या सेतू किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध असेल अशा ठिकाणी जाऊन www.soilhealth.dac.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर या पोर्टलमध्ये आपले स्वतःचे खाते तयार करावे लागते. या कार्डअंतर्गत त्या भागातील प्रयोगशाळेत मातीचे आरोग्य तपासले जाते. त्यावरुन संबंधित शेतातील मातीत कोणते पीक चांगले येऊ शकेल, त्याला पोषक औषधे आणि त्यांचे प्रमाण कसे असावे, याची माहिती मिळवता येते. या सुविधेमुळे शेतकरी आपल्या शेतीला पोषक असे पिक घेऊ शकतात. या संकेतस्थळावर मराठी भाषेसह एकूण 22 भाषांचा पर्याय उपलब्ध आहे.

    2. शेतकरी पोर्टल

    3. मेरा किसान पोर्टल

    हे एक मोबाईल किसान पोर्टल म्हणून परिचित आहे. www.mkisan.gov.in या वेबसाईटवर शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध प्रकारची माहिती मिळवता येते. त्यासाठी अगोदर या संकेतस्थळाचा सदस्य होणं आवश्यक आहे. त्यानंतर शेतकरी थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. तसेच मोबाईल सेवेद्वारे एसएमएसद्वारेही माहिती मिळवू शकतात. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्हीही भाषांचा पर्याय या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

    4. पंतप्रधान पीक विमा योजना

    शेतकऱ्यांवर विम्याचे कवच असावे यासाठी सरकारने ही योजना सुरु केली. या योजनेतर्गत प्रत्येक पिकावर विमा पद्धत उपलब्ध आहे. www.agri-insurance.gov.in या वेबसाईटवर मेंबर होणं गरजेचे आहे. त्यानंतर विम्यासाठी ऑनलाईन अर्जही करता येतो. स्वत:शी संबंधित सर्व माहिती भरल्यानंतर हिंदी भाषेत पुढील पर्याय उपलब्ध आहेत.

    5. पंतप्रधान कृषी विकास योजना

    शेतकरी पावसावर अवलंबून असतो. मात्र हे अवलंबित्व कमी करुन प्रत्येक शेतात पाणी पोहचवण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली. शेतात पाणी साठवणे, सिंचन आणि जलसंधारणाचे विविध पर्याय www.pmksy.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सोबतच शासनाच्या या उपक्रमांतर्गत येणाऱ्या सर्व योजनांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

    6. राष्ट्रीय शेती बाजार

    शेतकऱ्यांना त्यांचा माल आवडत्या बाजारात विकता यावा किंवा ग्राहकांना कोणत्या मालाचा बाजारबाव काय आहे याची घरबसल्या माहिती घेता यावी या उद्देशाने राष्ट्रीय शेती बाजार या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. agmarknet.dac.gov.in या संकेतस्थळावर जाऊन शेती मालाचा सध्याचा बाजारभाव तसेच ग्राहकांनाही ऑनलाईन बाजारभाव पाहता यावा याविषयीचे पर्याय उपलब्ध आहेत. पीक निवडून राज्य, जिल्हा, तालुका आणि जवळची बाजारपेठ निवडणे असे पर्याय या संकेतस्थळावर आहेत.

    7. ई-राष्ट्रीय शेती बाजार

    राष्ट्रीय शेती बाजार या योजनेप्रमाणेच शेतीमाल विक्री किंवा बाजारात शेतीमाल येण्याची वेळ, बाजारभाव आणि खरेदी विक्री यांची माहिती www.enam.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सध्या या संकेतस्थळावर देशभरातील काही मुख्य बाजारपेठांचा समावेश केला आहे. त्या बाजारपेठेमध्ये सध्या कोणत्या शेतीमालाला काय बाजारभाव मिळत आहे, हे पाहता येते. सोबतच ग्राहकांना देखील या संकेतस्थळाद्वारे खरेदी करण्यासाठी बाजारभावाविषयी खात्रीशीर माहिती मिळवता येते.

    8. राष्ट्रीय यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान पोर्टल

    शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीची कास धरायला लावणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. www.farmech.dac.gov.in या वेबसाईटला भेट दिल्यानंतर शेतीत आधुनिकीकरण कसं आणावं याबाबत सर्व माहिती उपलब्ध आहे. कोणत्या पिकासाठी कोणत्या यंत्राचा कसा वापर करावा ते या वेबसाईटवर व्हिडीओसह उपलब्ध आहे. यामुळे आधुनिक पद्धतीने शेती करणं सोप आहे…