Category: लेख

  • जाणून घेऊयात डिफ्लेशन म्हणजे नक्की काय?

    जाणून घेऊयात डिफ्लेशन म्हणजे नक्की काय?

    1 डिफ्लेशन खालील कारणांमुळे होऊ शकते

    (I) पुरवठा वाढणे: जेव्हा वस्तूंच्या पुरवठ्यात वाढ होते आणि मागणी स्थिर राहते, तेव्हा डिफ्लेशन होऊ शकते. हे उत्पादन तंत्रज्ञानात सुधारणा, नवीन बाजारपेठ उपलब्ध होणे किंवा इतर देशांकडून आयात वाढल्यामुळे होऊ शकते.

    (II) मागणी कमी होणे: जेव्हा लोक कमी खरेदी करतात, तेव्हा मागणी कमी होते आणि डिफ्लेशन होऊ शकते. हे बेरोजगारी वाढणे, वेतन कमी होणे किंवा लोकसंख्या घटल्यामुळे  होऊ शकते.

    (III) पैसे कमी होणे: जेव्हा अर्थव्यवस्थेत खेळणारा पैसा कमी होतो तेव्हा डिफ्लेशन होऊ शकते. हे बँकांचे वाढलेले कर्जदर किंवा सरकारच्या कर वाढवण्यामुळे होऊ शकते.

    2. डिफ्लेशन कसे मोजले जाते

    डिफ्लेशन अनेक आर्थिक मापदंड जसे की Consumer Price Index म्हणजेच CPI च्या आधारे मोजले जाते. CPI दर एका महिन्यांनी प्रकाशित केला जातो. यावरून ठरवले जाते की अर्थव्यवस्थेची अवस्था कशी आहे. 

    3. डिफ्लेशनचे खालील परिणाम होऊ शकतात:

    (I) खरेदीची क्षमता वाढणे: जेव्हा वस्तूंच्या किंमती कमी होतात, तेव्हा लोकांची खरेदीची क्षमता वाढते. त्यामुळे त्यांना अधिक वस्तू खरेदी करता येतात.

    (II) नफा आणि उत्पादन कमी होणे: डिफ्लेशनमुळे उत्पादकांचा नफा कमी होतो आणि त्यामुळे ते उत्पादन कमी करू शकतात. यामुळे बेरोजगारी वाढू शकते.

    (III) कर्जदारांना फायदा: डिफ्लेशनमुळे कर्जदारांना फायदा होतो, कारण त्यांना व्याजाची रक्कम कमी द्यावी लागते.

    (IV) उपभोक्ता खर्चात वाढ: डिफ्लेशनमुळे लोकांना वाटते की भविष्यात वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत. त्यामुळे ते उपभोग खर्च वाढवतात. 

    4. डिफ्लेशन कसे रोखायचे?

    सरकार डिफ्लेशन रोखण्यासाठी खालील उपाययोजना करू शकते:

    (I) पैशाचा पुरवठा वाढवणे: सरकार अर्थव्यवस्थेत पैशाची रक्कम वाढवू शकते. हे करण्यासाठी ते बँकाना कर्ज देणे वाढवू शकतात किंवा कर कमी करू शकतात.

    (II) सरकारी खर्च वाढवणे: सरकारी खर्च वाढवून अर्थव्यवस्थेत मागणी वाढवू शकते. हे करण्यासाठी ते infrastructure प्रकल्पांवर खर्च करू शकतात किंवा सामाजिक सुरक्षा कार्यक्रम वाढवू शकतात.

    (III) व्याजदर कमी करणे: सरकार मध्यवर्ती बँकेला व्याजदर कमी करण्यास सांगू शकते. 

  • जाणून घ्या स्वीटकॉर्न शेतीविषयी संपूर्ण माहिती

    जाणून घ्या स्वीटकॉर्न शेतीविषयी संपूर्ण माहिती

    All-you-need-to-know-about-sweet-corn
    जाणून घ्या स्वीटकॉर्न शेतीविषयी संपूर्ण माहिती

    शेतकरी सातत्यान चांगलं पिक घेण्याचा प्रयत्न करतात परंतु कधीकधी त्यांना हवामानाचा आणि नैसर्गिक आपत्तींचा  सामना करावा लागतो.  अशा वेळी ते आपल्या शेतात हे पिक घेऊन भरघोस नफा कमवू शकतात. आज आपण या लेखाच्या माध्यमातून स्वीटकॉर्न ची शेती कशी करावी या विषयी माहिती घेऊयात. 

    आवश्यक हवामान आणि जमीन – 

    तसे तर  स्वीटकॉर्न  च्या शेतीसाठी कोणतीही जमीन चालते पण पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन जास्त फायदेशीर ठरते. ही एक उष्णकटिबंधीय वनस्पती आहे . या मक्यासाठी मातीची इष्टतम  PH श्रेणी 6.5 -7.5 इतकी आहे . उगवणीसाठी तापमानाची कक्षा 21 ते 32  डिग्री सेल्शियस इतकी आहे .  लागवड करण्याआधी मातीचे परीक्षण करून घ्यावे. स्वीटकॉर्न हे वाढीसाठी पोषकतत्त्वांची मागणी करणारे पिक आहे. या पिकाच्या वाढीसाठी नायट्रोजन ,  २ स्फरस, आणि  शियमची गरज असते. हे पिक खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाऊ शकते.  

    अशी करा लागवड –

    All-you-need-to-know-about-sweet-corn

    स्वीटकॉर्न ची लागवड ही मक्यासारखीच असते. आणि विशेष म्हणजे यामध्ये  मका पूर्ण परिपक्व होण्याआधीच तिची काढणी केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना झटपट नफा मिळवता येतो . चांगले पिक येण्यासाठी जमिनीमध्ये खाते आणि इतर पोषक तत्त्वांचा समावेश करणे गरजेचे आहे. लागवड करताना जमिनीत 20:20:20 हे खत हेक्टरी 100 किलो टाकावे आणि 10 किलो मायक्रोन्यू ३ टाकावेत.

    उन्हाळी हंगामात २-३ उथळ मशागतीची कामे आवश्यक असतात. खोल नांगरणी तण नियंत्रित करण्यासाठी आणि प्रभावी ओलावा संवर्धनासाठी देखील उपयुक्त आहे.

    बियाणे दर:

    All-you-need-to-know-about-sweet-corn

    1. शुद्ध पिकासाठी: 20-25 किलो/हे

    2. चारा मक्यासाठी: 40-50 किलो/हे

    3. सोयाबीनसह आंतरपीक घेण्यासाठी: 10kg/हेक्टर (1:3) किंवा 15 kg/hector (1:2)

    लागवड करताना अंतर 65X20 किंवा 75X20  इतके ठेवावे .

    जोपासणी –

    All-you-need-to-know-about-sweet-corn

    या पिकासाठी 75 ते 80% ओलावा असणारी जमीन उत्तम ठरते . मक्याची दोन वेळा आंतरमशागत आणि दोन वेळा हाताने खुरपणी केली जाते.  पहिल्या वेळेस केलेली आंतरमशागत रोपांमधल्या अर्थिंग साठी फायदेशीर असते. तण काढून टाकण्यासाठी तणनाशके आणि आंतरमशागती यांचा एकत्र वापर महत्त्वाचे तंत्र ठरू शकते. पावसाच्या उपलब्धतेवर सिंचनाचा कालावधी 6 ते 10 दिवस  इतका असतो . 

    परिपक्वतेची चाचणी अशी करा –

    भुसाचे आवरण फिकट तपकिरी रंगाचे होते आणि दाणे बोटांच्या नखेने दाबणे खूप कठीण होते.

    काढणी –

    All-you-need-to-know-about-sweet-corn

    काढणीनंतर एक ते दोन दिवस रोपे शेतात सोडावीत. भुसा काढा आणि दाण्यांना 2-3 दिवस सूर्यप्रकाशात ठेवा. लाठी मारून किंवा हाताने किंवा शक्तीने चालवल्या जाणार्‍या मक्याच्या शेलर्सचा वापर करून शेलिंग करता येते.

     स्वीटकॉर्न  चा दर 140 – 200 रुपये प्रतिकिलो आहे. 

  • भारतीय उद्योगजगताचे दोन मानबिंदू धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा यांचा आज जन्मदिन!!!

    भारतीय उद्योगजगताचे दोन मानबिंदू धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा यांचा आज जन्मदिन!!!

    भारतातील पहिले नामांकित उद्योगपती सर जमशेटजी टाटा यांच्या कुटुंबात दत्तक गेलेले कै. नवल टाटा यांचे ते पुत्र. जे. आर. डी. टाटा यांच्या निधनानंतर रतन टाटा त्यांच्या समुहाचे प्रमुख बनले. 2002 पर्यंत त्यांनी टाटा सन्स या उद्योगसमुहाचे प्रमुखपद सांभाळताना समुहाच्या कक्षा विस्तारून त्या देशाबाहेरही पसरवल्या.

    ‘टेटली’, जग्वार लँड क्रूझर',कोरस’ यासारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कंपन्या त्यांच्याच पुढाकारामुळे भारतीय मालकीच्या बनल्या. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी टाटा समुहाच्या सर्व कंपन्यांच्या प्रमुखपदावरून निवृत्ती स्वीकारली व सायरस मिस्त्री या 41 वर्षांच्या भाच्याकडे सूत्रं सोपवली.

    पण २०१६ मध्ये त्यांनी टाटा समूहात क्रांती घडवून आणली व मिस्त्रींना बाजूला करून ते पुन्हा समुहाचे अध्यक्ष बनले. त्यामुळे उद्योग जगतात निर्माण झालेली खळबळ अद्याप शमलेली नाही.

    dhirubhai-ambani-and-ratan-tata-birhday-special-indian-business-iconic-two-stars-of-indian-industry

    धीरूभाई मात्र केवळ स्वकष्टाने राखेतून निर्माण झालेले उत्तुंग व्यक्तिमत्व होते. गरीब कुटुंबात जन्मलेले धीरूभाई एकेकाळी साड्या विकण्याचे काम करत. त्यातूनच ‘विमल’ हा घराघरात पोहोचलेला साड्यांचा ब्रँड तयार झाला.

    दूर एडनमध्ये एका पेट्रोल पंपावर गाड्यांमध्ये पेट्रोल भरण्याचे काम करणाऱ्या धीरूभाईंनी तेव्हा जगातील सर्वात मोठी पेट्रोकेमिकल कंपनी स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले आणि स्वकष्टाने ते प्रत्यक्षात उतरवण्याचे कर्तृत्व दाखवले. बँका वा अन्य कंपन्यांकडून कर्जें घेऊन उद्योग उभारण्याऐवजी आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या सामान्य गुंतवणूकदारांकडून छोट्या-मोठ्या ठेवी भाग भांडवल म्हणून गोळा करून त्यावर उद्योगांची मांडणी करण्याची अभूतपूर्व कल्पना धीरूभाईंनी राबवली व यशस्वीही केली.

    धीरूभाई व टाटा या दोघांच्याही भोवती वादाची वादळे घोंघावत राहिली. पण दोघानीही त्याची पर्वा न करता आपली वाटचाल चालूच ठेवली. भारतीय अर्थव्यवस्थेवर त्यांनी उमटवलेला ठसा बराच काळ कायम राहील हे नक्की !

    Author : भारतकुमार राऊत

  • यु-ट्युब सुरु करण्याचा हेतू ऐकून आश्चर्यचकित व्हाल

    यु-ट्युब सुरु करण्याचा हेतू ऐकून आश्चर्यचकित व्हाल

    संशोधनानुसार एक युजर यावर सरासरी दररोज 19 मिनिटे वेळ घालवतो. युट्युब ही गुगल पाठोपाठ जगातील दुसरी सर्वात जास्त पाहिली जाणारी साईट आहे. 2020 मध्ये युट्युब शॉर्ट्सची सुरुवात  झाल्यानंतर अगदी थोड्या कालावधीत त्यांची लोकप्रियता वाढू लागली. आता या शॉर्ट्सना सरासरी 30 अब्ज डेली व्ह्यूज मिळतात. युट्युबवर दर मिनिटाला 2,500 पेक्षा जास्त व्हिडिओज अपलोड केले जातात. सध्याला यु -ट्युब वर 800 मिलियन किंवा कदाचित त्याहीपेक्षा जास्त व्हिडिओज असतील. 80 टक्यांहून अधिक लोक यु-ट्युबचा  वापर मनोरंजनासाठी करतात. उर्वरित लोक ते अन्य कारणांसाठी वापरतात. 

    पहिला यु-ट्युबर हा ‘जावेद करीम’ नावाचा व्यक्ती होता ज्याने ‘Me at zoo’ या कॅप्शनसहित त्याने पहिला व्हिडीओ अपलोड केला. पण प्लॅटफॉर्म  सुरु करण्याचा मूळ उद्देश हा नव्हताच. कोणी आणि कशी  केली याची सुरुवात आणि कसा आहे   यु-ट्युबचा प्रवास हेच आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 

     यु-ट्युब ची सुरुवात  –

    the-history-of-youtube-from-startup-to-global-giant
    the-history-of-youtube-from-startup-to-global-giant

    सुरुवातीला वर्षाच्या शेवटी यु ट्युब ला 25 मिलियन व्युज आणि 2,000 अपलोड्स मिळाले. त्यावर अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओज ची विविधता हेच यु – ट्युब हिट होण्याचे पहिले कारण ठरले. सध्या यु-ट्युब वर DIY  ते प्रोफेशनल म्युझिक व्हिडिओज अपलोड केले जातात. यु ट्युब वरती म्युझिक व्हिडिओज जास्त प्रमाणात पाहिले जातात. 13 Nov 2006 रोजी गुगल ने 1.6 बिलियन डॉलर्सना यु- ट्यूब विकत घेतले . 

    काय होता यु-ट्यूबचा मूळ हेतू  

    2016 मध्ये यु-ट्यूब च्या निर्मात्यांपैकी एक असणारे स्टीव्ह चेन यांनी एका परिषदेत सांगितले की युट्युब सुरु करण्याचा  मूळ  उद्देश्य हा नव्हता.खरतर आमही  तिघांनी यु -ट्यूब एक व्हिडिओ साईट म्हणून सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही ते यासाठी सुरु केले की लोक तिथे त्यांना कसा पार्टनर आहे हे सांगून  व्हिडिओ डेटिंग करू शकतील. एवढाच  काय तर  ‘Tune in, hook up’ ही टॅगलाईन  सुद्धा यु-ट्यूब ने वापरली. परंतु निर्मात्यांना जसे लक्षात आले की याने जास्त फायदा होऊ शकत नाही तेव्हा त्यांनी सर्व प्रकारच्या व्हिडिओजना प्लॅटफॉर्म खुला केला आणि त्याने यु-ट्यूब ला प्रचंड फायदा झाला. 

  • जाणून घ्या चंदन शेतीविषयी संपूर्ण माहिती

    जाणून घ्या चंदन शेतीविषयी संपूर्ण माहिती

    चंदन’ या वृक्षाचा वापर होम, हवन, तसेच आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. एवढंच काय तर सौंदर्य प्रसाधानांमध्ये देखील त्याचा वापर वाढला आहे; कारण चंदन चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. त्यामुळे चंदन शेतीतून चांगले उत्पन्न मिळवण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. चंदन शेतीविषयी आपल्या मनात अनेक समज, गैरसमज असतात ते कळण्यास या लेखाच्या माध्यमातून मदत होईल. 

    चंदन लागवड करत असताना सर्वप्रथम हे समजून घ्या की, यासाठी कोणतीही सरकारी परवानगी लागत नाही. पण काही  कायदेशीर बाबी आहेत त्या मात्र वेळोवेळी पूर्ण करून घ्याव्या लागतील. चंदनाची लागवड केल्यावर पहिल्यांदा तलाठ्याकडून सात-बारा वर नोंद करून घ्यावी. जर तुम्ही चंदन लागवड करत असाल तर सरकारकडून तीन टप्प्यात हेक्टरी 45,000 इतके अनुदान मिळेल. शेवटी झाडे तोडताना फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी घ्यावी. अधिक माहिती हवी असल्यास तालुका कृषी अधिकाऱ्याला भेटावे.   

    चंदनाच्या झाडाची उंची 12 -15 मीटर असते आणि घेर 2-2.5 असतो. याची पाने सदाहरित असतात. त्यांचा आकार अंडाकार असतो आणि ते टोकाला निमुळते होत जातात. खोड सुरवातीला लहान असते, तेव्हा ते मऊ असते. जसजसे झाड मोठे होते तसे ते मजबूत आणि उभ्या चीरांचे बनते. चंदनाचे लाकूड कठीण असते. त्यामध्ये तेलाचे प्रमाण 1-6% असते. लाकडाचा बाहेरचा भाग कडक आणि सुगंध रहित असतो, तर आतला भाग पिवळस ते तपकिरी आणि सुगंधी असतो. चंदनाचे बी एकदल प्रकारातील असून ते पिवळसर असते. फळाचा वरचा भाग लुसलुशीत आणि गरयुक्त असून त्यामध्ये बी मिळते. हे बी काढून त्यापासून रोपे तयार केली जातात. 

    रोपे कशी तयार करावीत- 

    लहान रोपे अति सूर्यप्रकाशात किंवा कमी पाण्यामुळे सुकून जातात. त्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. पहिला एक महिना हे बी सुप्तअवस्थेत असल्याने त्यावर पाणी आणि सूर्यप्रकाशाचा परिणाम होत नाही. यासाठी 50 ml जर्मिनेटर, 50 ml प्रिझम, आणि एक लिटर पाण्यात बी भिजवून ठेवावे. असे केल्यास एक महिन्यातच अंकुर दिसायला लागतील. 

    गादी वाफ्यावर बी लागवड पद्धत

    गादीवाफे 2 प्रकारचे केले जातात. ज्या भागात पाऊस जास्त पडतो तेथे उंच गादीवाफे, तर इतर भागात जमिनीला समांतर खणून वाफे बनविले जातात. साधारणपणे वाफे 10 मीटर x 1 मीटर आकाराचे करून 15 सेमी उंची ठेवावी. यामध्ये लाल माती व चाळलेली वाळू 2:1 प्रमाणात घेऊन वाफे बनवावेत. अशा वाफ्यात प्रक्रिया केलेले 4 किलो बी पसरून घेऊन त्यावर 2 सेमी जाडीचा वाळूचा थर देऊन त्यावर वाळलेले गवताचे अच्छादन करावे. वाफ्यास रोज झारीने अथवा स्प्रिंक्लरने पाणी द्यावे. वाफ्यांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीची सोय (शेडनेट 50%) करावी. बी उगविल्यानंतर गवताचे आच्छादन अलगद काढून टाकवे. नर्सरीचे योग्य नियोजन होण्याच्या दृष्टीने बियाणे डिसेंबर-जानेवारीत पेरावे.

    पिशवीत रोपे लावणे

    बी गादीवाफ्यावर पेरल्यानंतर 25 ते 30 दिवसात रोपे उगवण्यास सुरुवात होते. रोपे लगेच पिशवीत लावावीत. अशी रोपे लवकर रूजतात. रोपांवर दर 15 दिवस ते 1 महिन्याच्या अंतराने सप्तामृत 250 मिली 100 लि. पाण्यातून फवारावे. म्हणजे रोपांची निरोगी व जोमाने वाढ होते. साधारणपणे 6 ते 8 आठवड्यानंतर रोपांची सावली काढून टाकावी व रोपांच्या पिशव्या अधूनमधून फिरवत रहाव्यात. जेणेकरून मुळे जमिनीत रूजणार नाहीत. 6 ते 8 महिन्यामध्ये रोपे 25 ते 30 सेमी उंचीची तपकिरी रंगाचे खोड झालेली लागवडी योग्य उपलब्ध होतात. 1 किलो बियांपासून साधारणपणे 2,000 रोपे तयार होतात.

    कधी करावी लागवड

    मान्सून सुरु होताच जुलै-ऑगस्ट महिन्यात या रोपांची लागवड करावी. त्यासाठी मार्च महिन्यात 16×12 अंतरावर 1.5×1.5×1.5 फुटाचे खड्डे खोडून घ्यावेत. या खड्ड्यांमध्ये निंबोळी खत किंवा सेंद्रिय खत टाकावे आणि पहिला पाऊस झाल्यावर रोपे लावावीत. चंदन हा एक अर्धपरजीवी वृक्ष आहे. त्यासाठी आधार म्हणून एक मजबूत झाड असावे. 

    आवश्यक हवामान आणि जमीन

    चंदनाचे झाड 600 ते 1600 मिमी पर्जन्यमान असणाऱ्या क्षेत्रात येते. यासाठी 12-45 डिग्री सेल्शियस तापमान योग्य मानले जाते.  थंड हवामान, मध्यम पर्जन्यमान आणि भरपूर सूर्यप्रकाश या वनस्पतीसाठी पोषक ठरतो. चंदनाच्या झाडासाठी लाल, काळी माती, चिकणमाती, लोहयुक्त वाळूमिश्रीत जमीन पोषक ठरते. जमिनीचा सामू  6.5- 8 च्या दरम्यान असावा.

    जोपासणी

    चंदनाच्या झाडाला पाहिल्या वर्षी आठवड्यातून 2 -3 वेळा पाणी द्यावे. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी आठवड्यातून दोन वेळा पाणी द्यावे. पावसाची कमतरता असल्यास झाडाला पाणी कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी. सध्या चंदनाचा भाव 12000 ते 20,000 रुपये प्रतिकिलो असा आहे.


    आणखी वाचा

  • Yamaha कंपनीची सुरुवात कशी झाली?

    Yamaha कंपनीची सुरुवात कशी झाली?

    तोराकुसू यामाहा. २० मे १८५१ साली जपानमधील वाकायामा येथे त्याचा जन्म झाला. त्याचे वडील किशू राजघराण्यातील ज्योतिषी होते.  प्रत्येक वडिलांच्या आपल्या मुलाप्रती काही ना काही अपेक्षा या असतातच, आपला मुलगा यशस्वी व्हावा. चार चौघात त्याचं नाव व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. अगदी तुमच्या आमच्या आईवडिलांच्याही आपल्याकडून त्याच अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण होण्यासाठी आपल्या परीने ते पुरेपूर प्रयत्न करत असतात. तोराकुसूच्या वडिलांनाही वाटायचे की, आपल्या मुलाने आपल्याप्रमाणेच ज्योतिषी बनावे. लहानपणापासूनच अभ्यासात हुषार आणि नवीन काहीतरी निर्माण करण्याची इच्छा असलेल्या आपल्या मुलाची बौद्धिक क्षमता ओळखून त्याच्या वडिलांनी त्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. १८६८ साली तो नागसाकीला गेला. तिथे एका इंग्रज अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली घड्याळ दुरुस्तीचे शिक्षण त्याने घेतले. पुढे ओसाका या शहरात जाऊन वैद्यकीय उपकरण दुरुस्ती शिकून घेतली. वयाच्या ३५व्या वर्षी हमामात्सू या शहरात तो व्यवसाय सुरु केला. पण शहर लहान असल्यामुळे म्हणावी तेवढी मिळकत होत नव्हती. त्यामुळे जोडीला घड्याळ रिपेअरिंग आणि रिक्षा ड्रायव्हर म्हणूनसुद्धा त्याने काम केले.

    the-story-of-torakusu-yamaha-the-man-who-founded-yamaha
    the-story-of-torakusu-yamaha-the-man-who-founded-yamaha

    १९०२साली तोराकुसू यांना जपान सरकारचा मेडल ऑफ होनर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. १९११ साली शहर नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 8-ऑगस्ट 1916 रोजी वयाच्या ६५व्या वर्षी तोराकुसू यामाहा यांचे निधन झाले. कंपनीला वेगळ्या उंचीवर पोहोचवण्यासाठी तोराकुसू आयुष्यभर झटत राहिले.

    पुढे १९३०-४० च्या दशकात व्यवसाय तेजीत असतानाच दुसऱ्या महायुध्दास प्रारंभ झाला आणि म्युजीकल इन्स्ट्रुमेंट बनवणाऱ्या या कंपनीला आपला व्यवसाय थांबवावा लागला. पण थांबणं यामाहाच्या धोरणांत बसतच नव्हतं. कंपनीने या काळात म्युजीकल इन्स्ट्रुमेंट सोडून शस्त्रास्त्रे बनवायला सुरुवात केली, कारण युद्धामुळे शस्त्रांचा साठा वाढविणे गरजेचे होते. त्यावेळी कंपनीने एअरक्राफ्ट, लढाऊ विमानं, टँक बनवले. कंपनीत त्यावेळेस एकूण तीनशेपेक्षा अधिक कामगार काम करत होते. या कंपनीचे प्रॉडक्ट इतके उत्कृष्ट होते की, विदेशातून देखील मागणी वाढली, अमेरिकेसारखे प्रगत राष्ट्र कंपनीकडून शस्त्रं घेत होते. पुढे युद्ध संपल्यावर शस्त्रात्रांची मागणी कमी होऊ लागली आणि कंपनी पुन्हा तोट्यात गेली. आता कंपनी टिकवून ठेवण्यासाठी काय करावे म्हणून कंपनीने पुन्हा म्युजीकल इन्स्ट्रुमेंट बनविण्यावर भर दिला.

    YAMAHA YA-1 (1955)
    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • शेतकरी दिनाचा इतिहास आणि महत्त्व, चौधरी चरणसिंगांची भूमिका

    शेतकरी दिनाचा इतिहास आणि महत्त्व, चौधरी चरणसिंगांची भूमिका

    शेतकऱ्यांचा प्रत्येक प्रश्न जो केवळ सरकारी कार्यालयातच खितपत पडायचा, त्या प्रश्नाला न्याय चरणसिंह यांनी दिला. ज्या मातीत आपण शेतकऱ्याच्या सहनुभूतीचे नारे लगावतो, त्याला न्याय देण्यासाठी आंदोलने करतो त्याच मातीत पहिल्यांदा चरणसिंह यांनी सामंजस्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले.

    चौधरी चरण सिंह 

    चौधरी चरणसिंह यांचा जन्म उत्तरप्रदेशच्या नुरपूर या गावात 23 डिसेंबर 1902 रोजी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी 1923 मध्ये विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली. शेतीत काम करत करत ते आग्रा विश्वविद्यालयामधून कायद्याचे शिक्षण पूर्ण करून बॅरिस्टर बनले. ते सर्वप्रथम 1937 मध्ये छपरोली येथून उत्तरप्रदेश विधानसभेसाठी निवडून गेले आणि 1946, 1952, 1962 व 1967 मध्ये विधानसभेत आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

    भारत पारतंत्र्यात असताना गांधीवादी विचारांनी प्रेरित होऊन भारताला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी ब्रिटिश सरकारला नामोहरम करण्याच काम चरणसिंह यांनी केलं. ते केवळ सत्याग्रह चळवळीत सहभागी झाले नाहीत, तर प्रत्येकाला चळवळीत सामील करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहिले.

    Exciting part of the story

    १९३० मध्ये मीठाच्या कायद्याच्या उल्लंघनासाठी त्यांना ब्रिटिशांनी ६ महिन्यांसाठी तुरूंगात पाठविले. जेलमधून बाहेर सुटल्यावरही ते शांत बसले नाहीत. त्यांनी ब्रिटिशांविरोधी कारवाया सुरूच ठेवल्या. ब्रिटिशांना भारतातून हकलवून लावण्यासाठी प्रबोधन करू लागले.आणि म्हणूनच ब्रिटिशांनी उत्तरप्रदेशात एक पत्रक जारी केलं. ज्यात सूचना होती की, चरणसिंह जिथे दिसतील तिथे त्यांना मारून टाका.

    १९४७ साली भारत अखेर स्वतंत्र झाला. पण त्यानंतरही भारताला अनेक नवीन आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कृषी क्षेत्राचा प्रश्न. आणि याच क्षेत्रावर गुजराण करणाऱ्या शेतकऱ्याचा प्रश्न चौधरी चरण सिंह यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखल्या.

    उत्तरप्रदेशात कार्यरत असताना त्यांनी अनेकवेळा स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विभागीय कर्जमुक्ती विधेयक, १९३९ तयार करण्यात आणि अंतिम प्रारूप देण्यामध्ये श्री. चरण सिंह यांची महत्वपूर्ण भूमिका होती. त्यांना जमीनदार, तलाठी आणि सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाची कल्पना होती. यासाठी त्यांनी जमीनदारी उन्मूलन बिल-१९५२ हे विधेयक आणले. त्यामुळे शेतकरी अधिकाऱ्यांच्या त्रासातून मुक्त होतील, असा विश्वास त्यांना होता. हे विधेयक येताच अनेक तलाठी आणि अधिकाऱ्यांनी राजीनामे देखील दिले. चौधरी चरण सिंह यांनी ते राजीनामे स्वीकारून नव्याने पदभरती सुरू केली. त्यामध्येही १८ टक्के जागा मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवल्या.

    शेतकर्‍यांच्या भरभराटीसाठी शेतीवर भर देण्यात आला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी देखील ते खूप गंभीर होते. त्यामुळे शेतकरी त्यांना आपले नेते मानत होते. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जमीन धारणा कायदा 1960 बनवला. त्यांनी केवळ शेतीतच उल्लेखनीय कामगिरी केली असे नाही तर महसूल, वैद्यकीय, सार्वजनिक, आरोग्य, न्याय इत्यादी विविध विभागात काम केले. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्डची स्थापना सुद्धा त्यांनीच केली.

    त्यांनी २८ जुलै १९७९ मध्ये देशाचे पाचवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. मात्र, त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यामुळे ते केवळ १४ जानेवारी १९८० पर्यंत म्हणजेच सहा महिनेच पंतप्रधान पदावर कार्यरत होते.

    शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी चरण सिंग यांनी भरीव कामगिरी केली होती. त्याची आठवण म्हणून २००१ साली अटल बिहारी बाजपेयी यांच्या सरकारमध्ये चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला. चौधरी चरण सिंह यांचे २९ मे १९८७ रोजी निधन झाले.

    राज्याच्या मुख्यमंत्री पदापासून ते पंतप्रधानपदापर्यंत त्यांनी केवळ शेतकऱ्याचाच विचार केला. मात्र इतके करूनही आज आपला शेतकरी राजा खुश आहे का हाच प्रश्न पडतो. चौधरी चरणसिंह यांचे शेतकऱ्यांच्या काळजीचे तत्व आज प्रत्येक नेत्याने अवलंबलं असते, तर कदाचित शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न सुटले असते आणि खऱ्या अर्थाने शेतकरी राजा झाला असता. 


  • 12 गोष्टी ज्या तुमच्या स्टार्टअपसाठी ब्रँड प्रतिष्ठा निर्माण करण्यात मदत करतील

    12 गोष्टी ज्या तुमच्या स्टार्टअपसाठी ब्रँड प्रतिष्ठा निर्माण करण्यात मदत करतील

    तुम्ही नुकतीच सुरुवात करत असता, तेव्हा तुमची ब्रँड प्रतिष्ठा एक कोरी स्लेट असते. त्यामुळं तुम्ही त्याला योग्य दिशा देऊ शकता.

    1. तुम्हाला कशासाठी प्रसिद्ध व्हायचे आहे?

    तुम्ही तुमचा व्यवसाय कशासाठी उभा केला आहे? तुम्हाला कोणत्या प्रकारचा ब्रँड तयार करायचा आहे? तुम्हाला आणि तुमच्या ब्रँड ची समाजामध्ये कशी ओळख निर्माण करायची आहे? याचा विचार करण्यासाठी स्वतःला वेळ द्या. जेव्हा तुम्ही स्पष्ट असाल की लोकांनी तुम्हाला कसे पाहिले पाहिजे, तोच तुमच्या व्यवसायाचा चेहरा असेल.

    2. तुमची स्वतःची वेबसाइट तयार करा

    तुमच्या ग्राहकांना तुमची माहिती पाहिजे असल्यास तुमची वेबसाईट सर्वोत्तम मार्ग आहे. तुमची वेबसाईट सर्च इंजिनवर सर्वात पुढे असणे गरजेचे आहे. खराब ऑनलाइन रँकिंग तुमच्या ब्रँडला घातक ठरू शकते. नियमित पणे तुमची वेबसाईट अपडेट ठेवा. सर्च इंजिनच्या विविध टूल्स चा उपयोग करा.

    3. सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करा

    तुम्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरू शकत नाही, परंतु तुमच्या कंपनीचे नाव सर्व प्लॅटफॉर्मवर असले पाहिजे  आणि आवश्यक असल्यास संबंधित डोमेन खरेदी करणे ही नेहमीच चांगले ठरते. तुमचे पेज नेहमी अपडेट ठेवा आणि ब्रँड ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासोबतच ग्राहकांशी संवाद देखील साधा. यामुळे तुमची प्रतिष्ठा लगेच वाढेल असे नाही, तर तुमचे ग्राहक तुमच्या ब्रँडला कसा प्रतिसाद देतात यावर लक्ष ठेवण्यास हे खूप मदत करेल.

    4. ब्लॉगिंग

    ब्लॉगिंग हे तुमच्यासाठी तुमच्या व्यवसायाची माहिती ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी आणखी एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे. तुमच्या व्यवसायाबद्दल नवीन माहिती आणि अपडेट शेअर करण्यासाठी तुमचा ब्लॉग वापरा. तुमच्या वाचकांना कमेंट विभागाचा वापर करण्यास आणि त्यांच्याशी सक्रियपणे संवाद साधण्यासाठी प्रोत्साहित करा.

    5. प्रतिसाद देत रहा

    सोशल मीडियावर असो, ईमेलवर असो किंवा तुमच्या ब्लॉगवरील कमेंट विभाग असो, योग्य वेळी आणि आवर्जून प्रतिसाद द्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे किंवा वेबवर ग्राहकांशी संवाद साधणे हा ग्राहक सेवेचा आणखी एक उत्तम प्रकार आहे, वैयक्तिक स्तरावर तुमच्या ग्राहकांशी कनेक्ट होण्यासाठी हे माध्यम वापरा.

    6. रिव्ह्यू खरेदी करण्याचा मोह झाला?

    खरे सांगायचे तर, अगदी डोनाल्ड ट्रम्पचे ट्विटरवर लाखो बनावट फॉलोअर्स होते. परंतु फक्त प्रसिद्ध होण्याच्या हेतूने असे बनावट फॉलोअर्स बनवणे घटक ठरू शकते. याचा सकारत्मक पेक्षा नकारात्मक परिणाम जास्त पाहायला मिळतो.

    7. ब्रँडची प्रतिष्ठा नियंत्रित ठेवा

    तुम्हाला सकारात्मक रित्या सोशल मीडिया चालवू शकता, पण त्यामध्ये तुमच्या ब्रँडची प्रतिष्ठा लवकरात लवकर नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे. नवीन व्यवसाय म्हणून, तुम्ही कोर्‍या स्लेटने सुरुवात करता. त्याचा फायदा घ्या आणि ब्रँड प्रतिष्ठा व्यवस्थापनासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याकडे लक्ष केंद्रित करा, जे तुम्हाला काही मोठ्या यशासाठी उपयोगी ठरेल.

    8. विश्वास निर्माण करा

    उत्कृष्ट ब्रँड यशस्वी होतात कारण ते गुणवत्ता देतात आणि ग्राहक त्यांच्यावर विश्वास ठेवतात . तुम्ही वितरित करत असलेली गुणवत्ता, तुम्ही पाठवलेले संदेश आणि तुमची ग्राहक सेवा या सर्वांचा परिणाम तुमच्या ग्राहकांचा तुमच्यावर असलेल्या विश्वासावर होतो. तुमच्या ग्राहकांचा विश्वास जिंकण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे पारदर्शकता. तुम्ही चूक केली असेल तरीही तुमचे ग्राहक तुमच्या प्रामाणिकपणा मुळे नेहमी तुमचा आदर करतील.

    9. प्रोएक्टिव्ह पीआरवर लक्ष केंद्रित करा

    जेव्हा तुम्हाला एखादी मोठी घोषणा करायची असेल तेव्हा फक्त प्रेस रिलीझ पाठवणे तितकेसे संयुक्तिक नाही. तुमच्याकडे शेअर करण्यासाठी कंपनीच्या बातम्या नसतील तरीही मोठ्या उद्योग संभाषणांमध्ये सामील व्हा आणि तुम्ही PR वाढवा. तुमच्या व्यवसायाला, तुमच्या कंपनीला सतत प्रकाशझोतात ठेवण्यासाठी PR हि सर्वोत्तम संधी आहे.

    10. तुमची SEO धोरण आणि SERP

    तुमच्या व्यवसायासाठी मजबूत ब्रँड प्रतिष्ठा निर्माण करण्यात आणि कोणत्याही नकारात्मक परिणामांना दूर करण्यात SEO महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पण ते तिथेच थांबत नाही. तुम्हाला तुमच्या SERP वर सतत काम करावे लागेल जेणेकरुन जेव्हा कोणी तुमच्या कंपनीचा शोध घेते तेव्हा त्यांना तुमची माहिती प्रथम सापडते.

    11. टीका कशी हाताळायची ते जाणून घ्या

    नकारात्मक टिप्पण्या किंवा ऑनलाइन टीकेपासून दूर जाऊ नका. नकारात्मक अभिप्राय तुमचा व्यवसाय मजबूत करायला मदत करून तुम्हाला अधिक यशस्वी बनवेल. लोक तुमची ऑनलाइन निंदा करत असल्यास, त्यांना योग्य आणि त्वरीत तुमची बाजू सांगा. त्याकडे लक्ष न देणे हा चुकीचा संकेत आहे. जेव्हा तुम्ही  व्यावहारिक आणि तत्परतेने प्रतिसाद देता, तेव्हा तुम्ही समस्या सोडवत आहात आणि तुमच्या कंपनीला संभाव्य गोंधळापासून वाचवत आहातहे लक्षात ठेवा.

    12. हे कधीही संपणार नाही हे स्वीकारा

    तुमच्या ब्रॅण्डला मिळालेली प्रतिष्ठा सांभाळणे हे केवळ स्टार्टअपसाठी नाही तर कायम स्वरूपी आहे. तुमची आज एक उत्कृष्ट प्रतिष्ठा असेल, सर्च इंजिन परिणाम आणि अल्गोरिदम, ग्राहकांच्या अपेक्षा, त्यांची मते सतत बदलत असतात. तुम्हाला तुमची सकारात्मक ब्रँड प्रतिष्ठा कायम ठेवायची असेल, तर तुम्हाला त्यासाठी नेहमी काम करत राहावे लागेल.

  • तुमचा स्टार्टअप प्रभावशाली व्यक्तींसोबत (इन्फ्लुएन्सर सोबत) कसा सहयोग करू शकतो

    तुमचा स्टार्टअप प्रभावशाली व्यक्तींसोबत (इन्फ्लुएन्सर सोबत) कसा सहयोग करू शकतो

    आजकाल बहुतेक ब्रँड त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रभावशाली व्यक्तींसोबत (influencers) सहयोग करतात. का? कारण या व्यक्तींनी  स्वतःच्या  मागे खूप विश्वास निर्माण केलेला असतो, ते तुमच्या उत्पादनाचा किंवा सेवांचा त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत प्रचार करू शकतात. विशेषत: नवीन आणि आगामी व्यवसायांसाठी हे एक प्रचंड सेल्स -ड्रायव्हिंग धोरण आहे.

    इन्फ्लुएन्सर सोबत सहयोग करणे हे अजूनही तुलनेने नवीन मार्केटिंग धोरण आहे. यात त्रुटीही भरपूर आहेत. स्टार्टअप्सना हे माहित असणे आवश्यक आहे की यांच्यासोबत कशा प्रकारे सहयोग करावा आणि त्यांच्याशी वास्तविक संबंध कसे निर्माण करावे. अन्यथा, त्यांचे मर्यादित बजेट वाया जाण्याची शक्यता जास्त आहे. जर तुम्ही योग्य manager शोधण्यात यशस्वी झालात, तर तुम्हाला यातून मिळणार नफा सुद्धा जास्त असतो.

    १. फॉलोअर्सच्या संख्येपेक्षा एंगेजमेंट अधिक महत्त्वपूर्ण आहे

    2. तुमचे उत्पादन आवडणाऱ्यांकडे लक्ष द्या

    इन्फ्लुएन्सर शोधताना असे शोधा ज्यांना तुमच्या उत्पादनांमध्ये रस आहे. हे करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे तुमचे ग्राहक कोणत्या प्रकारची सोशल चॅनेल अधिक वापरतात हे पाहून ठरवणे. तुमच्या कंपनीचे ग्राहक आणि सोशल मीडिया चॅनेल आधीपासूनच कनेक्ट असल्यास ते शोधणे अधिक सोपे जाते.

    लक्षात ठेवा, तुम्ही कॉलेजमधील लोकप्रिय मुलगी शोधत आहात, दीपिका नाही. आपल्या सर्वांना माहित आहे की  दीपिका काही मिनिटांत कपडे  किंवा तुमचं दुसरं कुठलंही उत्पादन विकू शकते, परंतु बहुतेक ब्रँडसाठी असे मेगास्टार्स परवडणारे नाहीत. म्हणूनच तुमच्या उत्पादनावर प्रेम करणाऱ्या लोकप्रिय व्यक्तींना शोधणे आणि त्यांच्यासोबत सहयोग करणे. तुमच्या समवयस्कांमध्ये तुमची ब्रँड जागरुकता वाढविण्यात मोठी मदत करेल.

    3. त्यांच्या कामगिरीसाठी पैसे द्या, पोस्टसाठी नाही

    इन्फ्लुएन्सर जितका प्रभाव टाकतो त्यावर त्याला पैसे द्या, ना कि तो पोस्ट किती करेल त्यावर. अशा घटनांमध्ये, फक्त पोस्टसाठी पैसे दिले तर इन्फ्लुएन्सर त्यांच्या कल्पनाशक्तीचा आणि सर्जनशीलतेचा पुरेपूर वापर करत नाही. या  मार्केटिंग फॉरमॅटची तुलना पारंपारिक मासिके आणि टीव्ही ऍडशी करता येत असली तरी, इन्फ्लुएन्सरच्या परफॉर्मन्सच्या आधारावर त्यांना पैसे देता येतात.

    प्रत्येक इन्फ्लुएन्सर अशा प्रकारे सहयोग करेलच असे नाही, परंतु असे काही असतात जे अशा प्रकारे सहयोग करतात. त्यांना शोधण्यासाठी तुम्हाला फक्त काही प्रयत्न करावे लागतील. 

    तुमच्या पुढील मार्केटिंग धोरणावर, वर नमूद केलेल्या गोष्टीचा नक्कीच चांगला प्रभाव पडेल. त्याची योग्य अंमलबजावणी करून तुम्ही यशस्वी स्टार्टअप उभा करू शकता.

    सौंदर्य आणि फॅशन कंपन्या इन्फ्लुएन्सरसोबत सहयोग करणाऱ्या पहिल्या कंपन्या असतील पण काळ बदलला आहे. इन्फ्लुएन्सर सोबत मार्केटिंग करुन आज पेड मीडिया आणि इतर बहुतेक ब्रँडनी आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलली आहे.

    तुम्‍हाला तुमचं इन्फ्लुएन्सर कॅम्पेन यशस्‍वी करायचं असल्‍यास, असा इन्फ्लुएन्सर शोधावा लागेल जो तुमच्‍या उत्‍पादनावर मनापासून प्रेम करणारा असेल आणि जनतेची मुक्त संवाद साधणारा असेल.

  • तुमचा स्टार्टअप सुरु करण्याच्या ७ सर्वात सोप्प्या पायऱ्या

    तुमचा स्टार्टअप सुरु करण्याच्या ७ सर्वात सोप्प्या पायऱ्या

    तरीसुद्धा, तुम्हाला जीवनात खरोखर काय साध्य करायचे आहे हे स्पष्टपणे ओळखणे आवश्यक आहे. यावरून तुम्ही कोणत्या मार्गावर जावे आणि कोणती पावले उचलावीत याचे स्पष्टीकरण मिळते.

    बिल गेट्स यश मिळवण्याचे रहस्य सांगतात कि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर काम करायला सुरवात करा. ते स्वतः वयाच्या १३व्या वर्षांपासून कॉम्पुटर क्षेत्रात काम करत आहेत आणि ते किती यशस्वी आणि प्रभावशाली झाले आहेत हे आपण पाहतच आहोत. Facebook चे CEO, मार्क झुकेरबर्ग यांनी हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थी असताना त्यांची आताची अब्जावधी डॉलर्सची कंपनी उभी केली. आज फेसबुक हे जगभरातील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनले आहे. वय हा यशाचा निर्णयात्मक घटक नसला तरी आपण पुरेसे मोठे आणि स्थिर होण्यापर्यंत प्रतीक्षा करण्याची गरज नाही.

    जीवनात यश कसे मिळवायचे?

    पहिली पायरी: जीवनातील तुमच्या ध्येयांची स्पष्टता ठेवा

    शीर्षक सगळं स्वतःच स्पष्ट करते. तुम्हाला जीवनात यश मिळवता येण्यासाठी, तुमच्या जीवनातील तुमच्या ध्येयांची स्पष्टता असणे आवश्यक आहे. स्वतःला विचारा, “मला खरोखर काय साध्य करायचे आहे?” तुम्हाला तुमच्या आयुष्यात बर्‍याच गोष्टी साध्य करायच्या असतील, प्रत्येक ध्येयाचा त्याच्या प्राधान्यानुसार क्रम लावा. त्यातील कोणते जवळचे आहे कोणते लांबीचे आहे हे ठरवा आणि त्यानुसार ध्येयात स्पष्टता आणा.

    दुसरी पायरी: प्रेरणा शोधा

    तुमचे ध्येय हे तुमच्यासाठी खरी प्रेरणा असले पाहिजे, काहीवेळा जेव्हा तुमचे उद्दिष्ट पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो किंवा तुम्ही ठरवल्याप्रमाणे काही घडत नाही तेव्हा निराशा येते. अशा वेळी, स्वतःला हे स्मरण करून दिले पाहिजे कि आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायचीय आहेत. त्यामुळे मागे हटण्यापेक्षा आपण काय चुकीचे करत आहोत याचे मूल्यांकन करणे आणि आपल्या चुका सुधारणे हे जास्त संयुक्तिक आहे.

    तिसरी पायरी: टाइमलाइन तयार करा

    वेळ कुणासाठीही थांबत नाही. आपले ध्येय साध्य करण्यासाठी एक टाइमलाइन असणे महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही नियोजित वेळेत चालत राहता आणि सर्वात वाईट परिस्थितीत सुद्धा तुम्ही सकारात्मक गोष्टींकडे पाहता. तुमचे ध्येय कालबद्ध असल्यास, ठरवलेल्या वेळेत ते साध्य करण्यासाठी तुम्ही प्रयत्नानांची पराकाष्टा करता.

    चौथी पायरी: तुम्ही काय करणार आहेत याची योजना बनवा

    हे तुमच्या कृतींशी संबंधित आहे. तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे? त्यासाठी आवश्यक उपाययोजना न करता नियोजन करणे चुकीचे आहे. त्याचप्रमाणे, योजना न करता गोष्टी करणे म्हणजे वेळ आणि पैसे व्यर्थ घालवणे. म्हणूनच, यश मिळविण्यासाठी नियोजनाप्रमाणे कृती करणे तितकेच महत्त्वाचे आहे. तुमची टाइमलाइन वापरून, तुमची अंतिम उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याचे योग्य नियोजन करा.

    पाचवी पायरी: एक आकस्मिक योजना तयार करा

    बदल हा सतत होत असतो. त्यामुळे अपरिहार्य आणि अचानक होणाऱ्या बदलांना सामोर जाण्यासाठी तयार राहा. त्यासाठी तुमच्या योजना आणि उद्दिष्टे लवचिक बनवणे गरजेचं आहे आणि त्यासाठी आकस्मिक योजना (प्लॅन B) असणे देखील महत्त्वाचे आहे, जेणेकरुन गोष्टी नियोजनानुसार होत नसतील तर आपण मार्ग बदलू शकतो. बर्‍याचदा, या आकस्मित नियोजनामुळे आपल्याला खात्री मिळते की, आपले ध्येय साध्य करण्याचा अजून एक मार्ग आहे. यामुळे आपण पुढे होणारे  नुकसान कमी करु शकतो.

    सहावी पायरी: विश्वास ठेवा

    तुम्ही आधीच प्रत्येक पायरीचे काटेकोरपणे पालन केले आहे. आता पुढची पायरी म्हणजे नशीब तुमच्या पाठीशी आहे यावर विश्वास ठेवणे आणि सर्व काही तुमच्या नियोजनानुसार करत राहणे.

    सातवी पायरी: आपल्या जवळच्या चांगल्या गोष्टी नेहमी इतरांना देत चला

    आपल्या जवळच्या चांगल्या गोष्टी नेहमी इतरांना देत राहणे ही चांगली सवय आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समजाचे आपण देणे लागतो ही भावना नेहमी तुम्हाला एक चांगला माणूस बनण्यास मदत करते आणि यामुळे तुमचे शत्रू देखील कमी होतात. लोकांकडून मिळालेल्या सद्भावना नेहमीच आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतात.