बँकेमध्ये खाते उघडल्यानंतर बँक आपल्याला बँक अकाउंट, ए टी एम सुविधा , मुदत ठेव योजना, लाॅकर सेवा, कर्ज, इ. सेवा-सुविधा देते.
चेक (धनादेश) ही सुविधादेखील त्यापैकी एक. बँकेने निर्धारित केलेली रक्कम तुमच्या खात्यावर असल्यास बँक तुम्हाला चेकबुक सुविधा देते. वैयक्तिक व्यवहार,कंपनीचे व्यवहार हे चेकद्वारे सोप्या आणि सहज पद्धतीने होतात. चेकद्वारे केलेला व्यवहार हा सुरक्षित असतो.
चेकचे दोन प्रकार असतात.
बेअरर चेक
क्रॉस चेक
बेअरर चेक – बेअरर चेकद्वारे आपण निर्धारित केलेली रक्कम संबंधित बँकेतून काढू शकतो. उदारणार्थ, तुम्हाला अक्षयने ५,000/- रुपयांचा एखाद्या बँकेचा बेअरर चेक दिला. तर तुम्ही ती रक्कम त्या बँकेच्या शाखेत जाऊन काढू शकता.
क्रॉस चेक – क्रॉस चेक हा आपल्या बँक अकाउंटवर जमा करून निर्धारित रक्कम आपण मिळवू शकतो. उदारणार्थ, तुमचे नाव सागर गोते या नावाने कंपनीने तुम्हाला क्रॉस चेक दिला, तर तो चेक तुमच्या बँक अकाउंटवर जमा करावा लागतो, त्यानंतर २ ते ३ दिवसात चेकवरील रक्कम तुमच्या बँक अकाउंटवर जमा होते.
चेक बाउंस म्हणजे काय?
चेक बाउंस झाला म्हणजे नेमके काय ? सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ५,000/- रुपयांचा चेक दिला आणि ती रक्कम तुमच्या बँक खात्यावर जमा झाली नाही. म्हणजे तो चेक बाउंस झाला असे समजावे. चेक बाउंस होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. कधी कधी बँक अकाउंटवर रक्कम नसली, तरी खातेदार चेक देऊन फसवतात. अशावेळी तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. तुम्हाला दिलेला चेक बाउंस झाला, तर तुम्ही कलम १३८,निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायदा, १८८१ द्वारे तुम्ही न्यायालयीन कारवाई करू शकता.
चेक बाउंसची कारणे?
बँक खात्यामध्ये निर्धारित रक्कम नसणे – चेकवर लिहिलेली रक्कम संबधित बँक अकाउंटवर नसल्यास चेक बाउंस होतो. उदाहरणार्थ, अक्षयने संग्रामला ५,000/- रुपयांचा चेक दिला. परंतू अक्षयच्या बँक अकाउंटवर फक्त ४800/- रुपयेच आहेत. चेकवर लिहिलेली रक्कम अक्षयच्या बँक अकाउंटवर नसल्यामुळे संग्रामला दिलेला चेक हा बाउंस होतो.
सहीमधील फरक – चेकवरील सही तपासून बँकेकडून संबंधित व्यक्तीला चेकची रक्कम दिली जाते. खातेदाराच्या चेकवरील सहीमध्ये फरक असेल किंवा चुकीची सही असेल, तर चेक बँकेकडून बाउंस होतो.
चेकवरील ओव्हर रायटिंग – चेकवर ओव्हर रायटिंग किंवा खाडाखोड केली आणि त्या ठिकाणी सही नसली, तर चेक बाउंस होतो.
चेक बाउंस झाल्यावर काय करावे?
चेक बाउंस झाल्यावर पहिल्यांदा ज्या व्यक्तीने आपल्याला चेक दिला आहे, त्या व्यक्तीशी संपर्क साधावा. त्या व्यक्तीला त्यासंदर्भात कल्पना द्यावी. त्या व्यक्ती कडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला किंवा त्याने कबूल केले की चेक चुकून बाउंस झाला आहे. तर त्याला रक्कम देण्यासाठी थोडा वेळ द्यावा. जर चेक देणार्या व्यक्ती काही प्रतिसाद दिला नाही, तर त्यावर तक्रार किंवा कायदेशीर कारवाई करता येवू शकते.
कायदेशीर नोटीस – चेक बाउंस झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत चेक देणार्या व्यक्तीस किंवा कंपनीस कायदेशीर नोटीस द्यावी. ही नोटीस स्वतरू किंवा वकिलामार्फत आपण पाठवू शकतो. कायदेशीर नोटीसपाठवताना आपले नाव, ज्या व्यक्ती किंवा कंपनीने चेक दिला आहे त्याचे नाव, पत्ता, बँकेचे नाव पत्ता, चेक बाउंसचे कारण, इत्यादी बाबी अर्जात नमूद कराव्या. अर्ज स्वतरू संबधित व्यक्तीध्संस्थेला देऊन त्यांना अर्ज मिळाल्याची प्रत (Received Copy) घ्यावी किंवा रजिस्ट्रर पोस्टाने अर्ज पाठवून त्याचा पुरावा स्वतरूकडे ठेवावा. पुढील कारवाईसाठी त्या कागदपत्रांचा उपयोग होतो.
👍 चेक बाबतच्या टिप्स
चेक वटण्याची मुदत सहा महिन्यापेक्षा कमी करता येते.
चेकवर लिहिलेली अक्षरी रक्कमच गृहीत धरली जाते.
चेक क्लिअरिंग प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून चुंबकीय शाई (MICR) वापरण्याची आधुनिक समाशोधन पद्धती अस्तित्वात आली.
खाते बंद असताना धनादेश देणे हा फौजदारी गुन्हा आहे.
न्यूयॉर्कचे एक छोटे उपनगर. बार्बरा अँकरमन आणि मायकेल कार्प हे एक साधं मध्यम वर्गीय जोडपं तिथे राही. छोटी अपार्टमेण्ट. बार्बरा अप्पर वेस्ट साइड मॅनहॅटनमधल्या कॉलहॉन स्कूलमध्ये सायन्स टीचर आणि मायकेल टीव्ही/फिल्म प्रॉडक्शनमध्ये गुंतलेला. या दोघांना दोन मुलं. त्यातला थोरला डेव्हिड लहानपणापासूनच एकलकोंडा. शाळा संपवून घरी आला की उरलेली अख्खी दुपार आणि संध्याकाळ घरात बसून काढी. खेळायला सोडा, मित्रांशी फोनवर बोलायला, टीव्ही पाहायलासुद्धा आपल्या छोट्या बेडरूम बाहेर म्हणून पडत नसे.
हळूहळू बार्बराला काळजी वाटायला लागली. कसं होणार आपल्या या मुलाचं? अमेरिकेत म्हणजे, मुलानं लोटून घेतलेलं त्याच्या बेडरूमचं दार (त्याला न विचारता) उघडून आत शिरणं खुद्द त्याच्या आई-वडिलांसाठीही निषिद्ध! शेवटी एके दिवशी बार्बराने लेकाला विचारलं, ‘हे असे तासनतास आत बसून तू काय करतोस?’ तो म्हणाला, ‘लॅपटॉप!’ तेव्हा तिला काय ते कळलं. डेव्हिड रात्रंदिवस त्याच्या लॅपटॉपमध्ये बुडूनच गेला होता जणू. खरंतर त्याला शाळेत जाणंसुद्धा नको वाटे. लहानपणी बर्थडे गिफ्ट म्हणून मिळालेल्या लॅपटॉपशी एकट्यानं झगडून त्यानं बर्याच गोष्टी स्वत:च आत्मसात केल्या होत्या. जे समजतं आहे, आवडतं आहे, त्याचा हात धरून पुढे जात राहावं असं त्याला वाटू लागलं होतं. शाळेतल्या भाषा, गणित आणि शास्त्राच्या अभ्यासात त्याचा जीव रमेनासा झाला होता. बार्बरा आपल्या लेकावर लक्ष ठेवून होती. टीनएजर झाल्यावर डेव्हिड जरा खुलला. त्याला मुली आवडायला लागल्या. तो त्यांच्याबरोबर बाहेर जाऊ लागला. पण घरी आला की खोलीचं दार बंद! आणि आतला दिवा रात्रभर जळत!
‘टोस्टीटोज’ नावाच्या प्रसिद्ध अमेरिकन बिस्किटांचे पुड्यावर पुडे संपवीत डेव्हिड पहाटेपर्यंत आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनला चिकटलेला असे. बार्बराला आपल्या लेकाची तडफड समजत होती. शेवटी एका सकाळी डेव्हिडनं बार्बराला सांगितलं, ‘मॉम, मला शाळेत जाऊन वेळ वाया नाही घालवायचा. मी उद्यापासून जाणार नाही.’ बार्बरानं विचारलं, ‘मग काय करशील?’ तो म्हणाला, ‘मला आवडतं ते काम करीन.’ आपण आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा निर्णय घेतो आहोत, हे तेव्हा बार्बराला ठाऊक असणं शक्य नव्हतं, पण तिनं आपल्या मुलावर विश्वास टाकायचं ठरवलं. ती म्हणाली, ‘नको जाऊस शाळेत. तू घरीच कर अभ्यास.’ वयाच्या पंधराव्या वर्षी डेव्हिड ड्रॉप-आऊट झाला, आणि त्यानंतर दोनच वर्षांनी बार्बरा आणि मायकेल यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. एकटीनं दोन टीनएजर मुलांच्या संगोपनाची कसरत बार्बरानं हिमतीनं सुरू केली. तोवर डेव्हिड आसपासच्या छोट्या कंपन्यांच्या वेबसाइट्स डिझाइन करून द्यायला लागला होता. तो एकटाच बाहेर जाई, काम मिळवी आणि एकट्यानंच ते पूर्ण करी. तो झपाटून गेल्यासारखा त्याचं स्वप्न जगू लागला होता. एवढंच फक्त की, त्या स्वप्नात ‘शाळा आणि इतर मुलांसारखा अभ्यास’ या गोष्टींना जागा नव्हती. काय चाललं आहे, हे बार्बराला कळत नव्हतं, पण आपला मुलगा इतर मुलांपेक्षा वेगळा आहे आणि इतरांचं अनुकरण करण्यापेक्षा आपण आपला नवा रस्ता शोधण्यात तो बुडालेला आहे, हे तिला ठाऊक होतं. डेव्हिडनं घरी अभ्यास करून शाळेच्या परीक्षा देणं (होम स्कूलिंग) नाकारलं आणि तो छोट्या (इंटरनेट) स्टार्ट अप कंपन्यांमध्ये कामाला जाऊ लागला.
एके दिवशी त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, तो म्हणाला, ‘मी जपानला चाललो.’ ’ बार्बरा म्हणाली, ‘तुझ्या आवडीचं काम आहे ना, जरूर जा!’ साठवलेले सगळे पैसे खर्चून त्यानं टोकियोमध्ये एका खोलीचं आगाऊ भाडं भरून टाकलं आणि सॅक पाठीवर मारून निघाला. हा मुलगा घरूनच काम करत असे, त्यामुळे तो कॅलिफोर्नियात नसून जपानमध्ये आहे, हे तो ज्या कंपनीत काम करत होता, त्यांना तब्बल तीन महिन्यांनी कळलं. भरपूर अनुभव कमावून आणि साठवलेले सगळे पैसे खर्च करून डेव्हिड परत आला, तेव्हा त्याच्या खिशात एकूण पंधरा कंपन्यांच्या ऑफर्स होत्या. त्याचं काम सुरू झालं, बार्बरा सांगते, रोज रात्री घरी येताना हा आमच्या अपार्टमेण्टच्या गेटपासूनच जोरात ओरडायला सुरुवात करी, ‘मॉमऽऽऽ यू नो व्हॉट हॅपण्ड टूडे?????’..मग डिनर टेबलवर त्याची बडबड सुरू होई. तो काय म्हणतो, हे मला काहीही कळत नसे, पण तो त्याच्या आवडीचं काहीतरी करतो आहे, हे दिसत असे त्याच्या चेहर्यावर आणि तेवढं पुरेसं होतं माझ्यासाठी.’ पालकांसाठी इंटरनेटवर मेसेज बोर्ड लाँच करणार्या अर्बनबेबी नावाच्या स्टार्ट अपमध्ये डेव्हिडनं भलतीच चमक दाखवली. त्या बदल्यात पगारासोबत त्याला कंपनीचे काही शेअर्स मिळाले. ही कंपनी टेकओव्हर केली गेली तेव्हा जवळचे शेअर्स विकून डेव्हिडनं पैसा उभा केला आणि आपली स्वत:ची स्वतंत्र कंपनी सुरू केली. त्या कंपनीच्या अनेक प्रॉडक्टमधले नावारूपाला आलेले एक म्हणजे ‘टम्बलर’ ही ब्लॉग्ज होस्ट करणारी साइट! हे चालू होतं तोवर पंचविशी उलटली तरी ग्रॅज्युएशन सोडा, साधं हायस्कूलही पूर्ण न केलेल्या आपल्या मुलाचं बरं चाललं आहे, इतपत खात्री बार्बराला वाटत होती. अन पंधरा दिवसांपूर्वी डेव्हिड आनंदानं उड्या मारत घरी आला आणि ओरडून म्हणाला, ‘मॉमऽऽऽ यू नो, व्हॉट हॅपण्ड टूडे?????’ बातमी होतीच तशी! याहू या बलदंड कंपनीनं डेव्हिडचे टम्बलर हे अत्यंत लोकप्रिय पोर्टल विकत घेण्यासाठी तब्बल १.१ बिलियन अमेरिकन डॉलर्स मोजले होते आणि त्यातले २५0 मिलियन डॉलर्स व्यक्तिगत डेव्हिडच्या खिशात पडले होते !!!!!
ही बातमी जाहीर होताच डेव्हिड आणि त्याची मॉम एकदम प्रकाशात आले. ’आय अँम द प्राऊडेस्ट मॉम टूडे’ – न्यूयॉर्क टाईम्स या वर्तमानपत्राला मुलाखत देताना बार्बराला याहून वेगळं काही सुचतच नव्हतं,’’मी काही केलं नाही त्याच्यासाठी.. फक्त त्याला स्वत:ला जे करायचं होतं ते त्याला करू दिलं. त्याच्या वाटेत आले नाही, हेच काय ते माझे कर्तृत्व – बार्बरा पुन:पुन्हा हेच सांगते आहे सगळ्या प्रसारमाध्यमांना. तिचा डेव्हिड सव्वीसावे वर्ष ओलांडता ओलांडता केवळ मिलेनिअर बनला आहे एवढंच नव्हे, तर त्याच्या व्यावसायिक आयुष्यात त्यानं जगाला थक्क करून टाकणारं यशही मिळवलं आहे.
हे नेमकं कसं झालं, हे बार्बराला अजूनही उमगत नाही….!
कोणत्याही कंपनीच्या आणि उद्योगाच्या विकासात मार्केटिंगचे महत्त्व अत्याधिक असते. मार्केटिंगमुळे लहान अथवा मोठय़ा उद्योगाची वित्तीय स्थिती उत्तम राहू शकते. भारताचा आर्थिक विकास गतिमानतेने होत असून त्यात मार्केटिंग क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. बाजारपेठेतील सद्य प्रवाह आणि गती यांचा अभ्यास मार्केटिंग क्षेत्रात करिअर करणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो. या अभ्यासातूनच त्याला कंपनीच्या वस्तूंची किंवा उत्पादनांची अधिकाधिक विक्री करण्यासाठी कोणती व्यूहनीती आखावी लागेल याचे वस्तुनिष्ठ आराखडे तयार करता येतात. त्यातून नावीन्यपूर्ण तंत्रकौशल्यसुद्धा विकसित होऊ शकतात. त्याचा लाभ विक्रीच्या वाढीस होऊ शकतो.
मार्केटिंग विषयाचा अभ्यास केलेल्या उमेदवारांना प्रकल्प व्यवस्थापक, विक्री व्यवस्थापक, बाजारपेठीय विश्लेषक आदी करिअर संधी उपलब्ध होऊ शकतात. या क्षेत्रात येण्यासाठी मार्केटिंग विषयातील एमबीए ही पदव्युत्तर पदवी किंवा याच विषयातील एक अथवा दोन वर्षे कालावधीचे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट ही पदव्युत्तर पदविका प्राप्त असणे उपयुक्त ठरू शकते. बॅचरल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट किंवा बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन मार्केटिंग मॅनेजमेंट हे अभ्यासक्रमसुद्धा या क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. मार्केटिंग क्षेत्राव्यतिरिक्त ब्रँड मॅनेजमेंट, जाहिरात कम्युनिकेशन या क्षेत्रांतही करिअर करता येऊ शकते.
कोणत्याही कंपनीला अथवा उद्योगाला वित्तीय यश प्राप्त होण्यासाठी प्रतिभावंत मार्केटिंग व्यवस्थापकांची गरज भासते. मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून रुजू झालेला उमेदवार स्वत:च्या परिश्रमाच्या आणि गुणवत्तेच्या बळावर अल्पावधीत मार्केटिंग मॅनेजर अथवा प्रॉडक्ट मॅनेजर या पदापर्यंत पोहोचू शकतो.
एमबीए किंवा दोन वर्षे कालावधीच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही विषयाचे पदवीधर अर्ज करू शकतात. बहुतेक सर्व व्यवस्थापन विषयक अभ्यासक्रमांना लेखी परीक्षा, समूह चर्चा आणि मुलाखत या तीन टप्प्यांद्वारे प्रवेश दिला जातो. नामवंत संस्थेतून एमबीए केलेल्या उमेदवारांना त्यांच्या मनाप्रमाणे कंपनीची अथवा उद्योगाची निवड करता येऊ शकते. काही उमेदवारांची निवड बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, चॅनेल सेल्स एक्झिक्युटिव्ह किंवा मॅनेजर म्हणून होऊ शकते. अन्न प्रक्रिया उत्पादन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये आणि उद्योगांमध्ये मार्केटिंग विषयातील मनुष्यबळाची मोठय़ा प्रमाणावर गरज भासते. या कंपन्या उमेदवारांना उत्तम वेतन, भत्ते व इतर वित्तीय लाभ देतात. माहिती-तंत्रज्ञान उद्योगातील व्यापाराचा वाढ व विस्तार हा मार्केटिंग तज्ज्ञांच्या साहाय्याने केला जातो. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञांना करिअर संधी उपलब्ध होतात. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना सध्या मार्केटिंग व्यवस्थापक अथवा एक्झिक्युटिव्ह या मनुष्यबळाची गरज भासते आहे.
मार्केटिंग व्यवस्थापक अथवा एक्झिक्युटिव्हला ग्राहकांसोबत उत्तम संबंध निर्माण करणे आवश्यक ठरते. त्यामुळे मार्केटिंग कम्युनिकेशन या क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. मार्केटिंग कम्युनिकेशन ही ज्ञानशाखा कला आणि शास्त्र या दोन्हींचा समन्वय साधणारी आहे. या विषयातील तज्ज्ञांना कंपनीच्या वस्तू आणि उत्पादन वाढीसोबत कंपनीचे सकारात्मक ब्रँडिगसुद्धा करावे लागते. त्यासाठी त्याला विविध माध्यमांचा प्रभावीरीत्या उपयोग करून माहितीची देवाणघेवाण करावी लागते. या क्षेत्रातील उमेदवाराला नवनव्या कल्पनांचा सातत्याने वापर करता येणे गरजेचे असते.
मार्केटिंग कम्युनिकेशन या क्षेत्रामुळे कंपनीच्या विकासासाठी आणि वृद्धीसाठी नवी व्यूहनीती अमलात आणणे शक्य झाले आहे. यामुळे कंपनीच्या अथवा उद्योगाच्या संपूर्ण उलाढालीवर आणि प्रगतीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मार्केटिंग कम्युनिकेटरला निश्चित अशा ग्राहकांकडे प्रभावीपणे कंपनीच्या वस्तुनिष्ठ माहितीसह वस्तूंची अथवा उत्पादकांची विक्री वाढेल यासाठी प्रयत्न करावे लागतात. कंपनी आणि उत्पादकांबाबत जाणीवजागृती करणे, जुन्या ग्राहकांचा विश्वास कायम राखणे, नव्या आणि युवा ग्राहकवर्गाला आकर्षति करणे, ग्राहकांच्या मनात कंपनी व उत्पादकांबाबत विश्वास निर्माण करणे, कंपनीची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढवणे आणि त्यास अधिक सक्षम करणे या बाबींवर मार्केटिंग कम्युनिकेटरला लक्ष केंद्रित करावे लागते. नव्या वैश्विक बाजारपेठेत आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या क्षेत्रातील तज्ज्ञांना काम करावे लागते.
हे क्षेत्र बहुज्ञानशाखीय असे झाले असून त्यामध्ये अर्थशास्त्र, वाणिज्य, समाजशास्त्रे, व्यवस्थापन आणि कम्युनिकेशन या विषयांचा समावेश होतो. जाहिरात, विक्री, विपणन, जनसंपर्क, थेट आणि व्यक्तिगत विक्री असे घटक यांत अंतर्भूत झाले असून त्यामुळे कोणत्याही कंपनीच्या वस्तू आणि उत्पादनांना गतिमानतेने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या बाबींचा एकत्रितरीत्या वापर करण्याचे कौशल्य या क्षेत्रातील तज्ज्ञास प्राप्त करावे लागते. या सर्वाच्या प्रभावी एकत्रित वापरातूनच कंपनीच्या वित्तीय वृद्धीस हातभार लागत असल्याचे दिसून आले आहे.
इंदिरा गांधी नॅशनल ट्रायबल युनिव्हर्सिटीचे अभ्यासक्रम
या विद्यापीठाने बारावीनंतरचे पदवीस्तरीय अभ्यासक्रम सुरू केले आहेत : बॅचलर ऑफ व्होकेशन इन सॉफ्टेवअर डेव्हलपमेंट, बॅचलर ऑफ व्होकेशन इन थिएटर, बॅचलर ऑफ व्होकेशन इन स्टेजक्राफ्ट, बॅचलर ऑफ व्होकेशन इन फिल्म प्रॉडक्शन अॅण्ड टेक्नॉलॉजी. या अभ्यासक्रमांना बारावीमधील गुणांवर प्रवेश दिला जातो. कालावधी- चार वर्षे. संकेतस्थळ – www.igntu.ac.in
रोजगाराभिमुख अल्प मुदतीचे अभ्यासक्रम
नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन ही संस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत कार्यरत असून या संस्थेच्या टेक्निकल सर्व्हिसेस सेंटरने रोजगाराभिमुख अल्प मुदतीचे पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत- • मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन अॅडव्हान्स्ड एअर कंडिशिनग. कालावधी- चार महिने. शुल्क- २४ हजार रुपये. या अभ्यासक्रमात एअर कंडिशिनग दुरुस्ती, देखभाल आणि इतर तांत्रिक समस्या दूर करण्याचे कौशल्य शिकवले जाते. अर्हता- मेकॅनिकल किंवा प्रॉडक्शन किंवा इलेक्ट्रिकल या विषयातील बी.ई. किंवा बी.टेक. • मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन रेफ्रिजरेटर अॅण्ड एअर कंडिशिनग. कालावधी- चार महिने. फी- २१ हजार रुपये. या अभ्यासक्रमात एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटर दुरुस्ती, देखभाल आणि इतर तांत्रिक समस्या दूर करण्याचे कौशल्य शिकवले जाते.
अर्हता- मेकॅनिकल किंवा प्रॉडक्शन किंवा इलेक्ट्रिकल या विषयांतील पदविका किंवा आयटीआयमधील मेकॅनिस्ट/ फिटर हा अभ्यासक्रम.
• सर्टिफिकेट कोर्स इन क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्शन (मेकॅनिकल). कालावधी- २ महिने. फी- ६ हजार रुपये. अर्हता- मेकॅनिकल किंवा प्रॉडक्शन किंवा इलेक्ट्रिकल या विषयातील पदविका किंवा आयटीआयमधील मेकॅनिस्ट/ फिटर हा अभ्यासक्रम. • मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्शन (मेकॅनिकल). कालावधी- ४ महिने. फी- २१ हजार रुपये. अर्हता- मेकॅनिकल किंवा प्रॉडक्शन किंवा इलेक्ट्रिकल या विषयातील बी.ई. किंवा बी.टेक. संपर्क- ओखला इन्डस्ट्रियल इस्टेट, फेज-३, न्यू दिल्ली- ११००२०. संकेतस्थळ- www.nsic.co.in ई-मेल- ntscok@nsic.co.in
विद्यापीठ अनुदान आयोगानुसार देशभरात ७४० विद्यापीठे आहेत. जवळपास ७५ संस्थांना इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा प्राप्त आहे. पण जेव्हा जेव्हा जागतिक दर्जा वा कामगिरीचा मुद्दा येतो तेव्हा फक्त आयआयटीपर्यंतच भारतीय शिक्षण संस्थांच्या उत्कृष्टतेला मर्यादित केले जाते. मग जागतिक स्तरावरील सर्वोच्च (टॉप) मानांकनात सामील न झाल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली जाते.
हे खरे आहे की, देशातील शिक्षणाच्या विकासाला अधिक विस्तारावे लागेल. पण गेल्या वर्षात झालेल्या भारतीय शिक्षणाच्या प्रगतीला बेदखलही केले जाऊ शकत नाही. रोचक हे आहे की, जगभरात पहिल्यांदा उघडणारी अनेक विद्यापीठे भारतात आहेत. काही विशेष क्षेत्रांमध्ये विशेष (स्पेशलाइझ्ड) शिक्षणाशी जोडलेल्या संस्थादेखील इथे अस्तित्वात आहेत, ज्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्नरत आहेत.
👍 पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमध्ये
अशातच झालेल्या सरकारी घोषणेनुसार, गुजरातच्या वडोदरा येथे देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात विद्यापीठ एमबीए व एमटेक पदवी प्रदान करील. नंतर रेल्वे ऑपरेशन्समध्ये (अभियान) पदविका व बीटेकची पदवीदेखील इथे उपलब्ध असेल.
काय विशेष : ही संस्था भारताला रेल्वे अभियांत्रिकी व व्यवस्थापनात संशोधन व विकासाच्या जागतिक केंद्रात परिवर्तित करेल.
👍 गुडगावात पहिले संरक्षण विद्यापीठ
संरक्षण क्षेत्रात धोरण बनवणाऱ्या विशेषज्ञांपासून ते परदेशाशी संरक्षण संबंधांवर संशोधनासाठी सुरू होणाऱ्या या देशातील पहिल्या राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाची निर्मिती गुडगावातील बिनौला गावात सुरूही झाली आहे. इथे लष्करी शिक्षणात प्रशिक्षण आणि शोधासाठी ही एक अशा प्रकारचे अनोखे व पहिले शिक्षण संस्थान असेल.
काय विशेष : संरक्षण संशोधनासह युनिव्हर्सिटी डिफेन्स स्टडीज, डिफेन्स मॅनेजमेंट, डिफेन्स सायन्स व टेक्नॉलॉजी क्षेत्रात उच्च शिक्षणाला विकसित करेल.
👍 मणिपुरात राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ
तसे पाहता खेळासाठी देशात अनेक संस्था आहेत. पण आता राष्ट्रीय स्तरावर खेळाच्या विकासासाठी वेगाने प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी बजेट २०१४-१५ मध्ये प्रस्तावित राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना मणिपुरातील थाऊबल जिल्ह्यामध्ये केली जाईल.
काय विशेष : खेळाच्या क्षेत्रात शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावर शिक्षण संस्था असतील. बीपीएड, एमपीएड, फिजिओथेरपी, फिटनेस, क्रीडा व्यवस्थापनाशी संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध होतील.
👍 रोचक तथ्य
२०,००० हून अधिक विद्यार्थ्यांसह बीएचयू आशियातील सर्वात मोठ्या निवासी विद्यापीठांपैकी एक आहे.
७०० हून अधिक विद्यापीठे व ३८,००० महाविद्यालयांसह भारत जगातील सर्वात मोठ्या हायर एज्युकेशन सेक्टर(क्षेत्र) असणाऱ्या देशांपैकी एक आहे.
४० लाखांहून अधिक विद्यार्थी संख्या असणारे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ हे जगातील सर्वात मोठे राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आहे.
भारतात केवळ भाषांनाच समर्पित वा वाहिलेली हून २० अधिक विद्यापीठे आहेत.
👍 जगभरात पहिल्यांदा
गुजरात फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी, फॉरेन्सिक व इन्व्हेस्टिगेटिव्ह सायन्सला समर्पित जगभरातील हे एकमेव विद्यापीठ आहे.
जगातील पहिली होमिओपॅथी युनिव्हर्सिटी जयपुरात (साईपुरा) आहे.
जगातील पहिली किडनी प्रत्यारोपण युनिव्हर्सिटी अहमदाबादेत आहे.
२०१५ मध्ये स्थापन झालेल्या गुजरात युनिव्हर्सिटी ऑफ ट्रान्सप्लांटेशन संपूर्ण विश्वात ट्रान्सप्लांटेशन व अलाइड सायन्सेसचे हे पहिले विद्यापीठ आहे.
देशातील पहिली ट्रान्स डिसिप्लिनरी हेल्थ युनिव्हर्सिटी – इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्स डिसिप्लिनरी हेल्थ सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी बंगळुरूत स्थापन झालेली आहे.
👍 हेदेखील आहे विशेष
रॉयल स्कूल ऑफ माइन्स – लंडनच्या धर्तीवर तयार झालेली इंडियन स्कूल ऑफ माइन्स धनबादला खाण शिक्षणाच्या उद्देशानेच सुरू केले गेले. जे अनेक विभागांसह टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये विकसित झालेले आहे. आंध्र प्रदेशची द्रविड युनिव्हर्सिटी – द्रविड भाषा आणि संस्कृतीच्या विकासासाठी स्थापित केली गेली होती. दोन विभागांसह सुरू झालेले हे विद्यापीठ आता जवळजवळ २० शैक्षणिक विभागांसह विस्तारली आहेत.
👍 देशात प्रथमत:च
रक्षा शक्ती युनिव्हर्सिटी – भारतात अशा प्रकारातले हे पहिलेच विद्यापीठ आहे. जे पोलिस सायन्स व इंटर्नल सिक्युरिटीमध्ये प्रमाणपत्र, पदविका व पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून देते.
हरियाणास्थित नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर देशातील एकमात्र इन्स्टिट्यूट आहे. जे न्यूूरो सायन्समधील संशोधन व शिक्षणासाठी समर्पित आहे.
बीएचयूचे मालवीय सेंटर फॉर पीस रिसर्च भारतीय विद्यापीठाच्या प्रणालीत आपल्या प्रकारातले पहिलेच केंद्र आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी स्टडीज भारताची पहिली एनर्जी युनिव्हर्सिटी आणि आशियातील पहिली आणि एकमात्र ऊर्जा व कोअर सेक्टर विद्यापीठ आहे.
👍 केरळात येणार जेंडर रिसर्च युनिव्हर्सिटी
केरळ सरकार देशातील अशा प्रकारचे पहिले विद्यापीठ कोझिकोडे जिल्ह्यात स्थापन करण्याच्या तयारीत आहे, जे विशेष करून जेंडर(लिंग)शी संबंधित संशोधन अभ्यासासाठी असेल. विद्यापीठाची संकल्पना विदेशी संस्थांच्या नमुन्यानुसार तयार केली जात आहे.
काय आहे विशेष : करिकुलम आणि अभ्यासक्रम पारंपरिकऐवजी आंतरराष्ट्रीय मानकानुसार वा त्यावर आधारित असेल.
👍 झारखंडमध्ये सेंट्रल आयुष युनिव्हर्सिटी
अशातच झालेल्या एका घोषणेच्या अनुसार, रांचीत सेंट्रल आयुष युनिव्हर्सिटीची स्थापना होईल, ज्यात देशी आणि पारंपरिक चिकित्सा पद्धती व औषधी वनस्पतींवर संशोधनाशिवाय पदवी व पदविका अभ्यासक्रम असेल. छत्तीसगडमध्येही आयुष अँड हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटी, छत्तीसगड अस्तित्वात आहे.
काय विशेष : याविषयी संबंधित क्षेत्रातील शिक्षणाला अधिक मजबुती मिळेल.
👍 संशोधन व नवकल्पनांचे शिक्षण
अशातच प्रधानमंत्री कार्यालयात मनुष्यबळ विकास मंत्रालयातून संशोधन व नवकल्पनांसाठी (सर्जनशीलता-नवोन्मेष) १० खासगी स्वायत्त विद्यापीठे स्थापन करण्याच्या योजनेत वेग आणण्यासाठी सांगितले गेले आहे. या प्रकरणी उच्च शिक्षणासाठी जगभरातील खासगी संस्थांचा भारतात येण्याचा मार्ग प्रशस्त होऊ शकेल.
काय विशेष : ही विद्यापीठे संशोधन व नवकल्पनांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करवतील.
वाचक मित्रांनो, तुम्हालाही हा लेख आवडला असेल, तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. तसेच, तुम्हाला आणखी कोणत्या व्यक्तींच्या टिप्स वाचायला आवडतील, या कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा.
बहुतेक लोकांना सरकारला ‘कर‘ अर्थात ‘टॅक्स‘ द्यावयास आवडत नाही. प्रत्येक अर्थसंकल्पाच्या वेळी बहुतेक लोक याच गोष्टी प्रथम तपासताना दिसतात, की ‘कर‘ वाढले की कमी झाले आणि त्यावरच अर्थसंकल्प चांगला का वाईट ते ठरवितात. एखादी लहान मुलगी आइस्क्रीम खात असेल आणि तुम्ही तिला म्हटले की त्या आइस्क्रीममधील 30 टक्के आइस्क्रीम मला दे, तर तिला कसे वाटेल?, तिची भावना काय असेल? अगदी तशीच भावना सरकारने टॅक्स मागितला की बहुतेक प्राप्तिकरदात्यांची होते. ‘मी का म्हणून कर देऊ?‘ या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी ‘कर‘ किती प्रकारचे असतात आणि ते कोण घेते, ते थोडक्यात पाहू.
कर तीन प्रकारच्या संस्था घेतात – महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकार. सध्या आपल्या देशात प्रत्यक्ष कर (डायरेक्ट टॅक्सेस) आणि अप्रत्यक्ष कर (इनडायरेक्ट टॅक्सेस) असे एकूण 25 विवMMMMMMMMMMMMMM प्रकारचे विविध कर आकारले जात आहेत. त्यात प्राप्तिकर, व्यवसाय कर, विक्रीकर, सेवाकर आदींचा समावेश होतो.
👍 का घेतले जातात असे कर ?
विविध विधायक कामांसाठी सरकारकडून कर घेतला जातो. रस्ते बांधणे, लोहमार्ग बनविणे, गोरगरिबांना मोफत आरोग्य सेवा देणे, त्यांना मोफत शिक्षण सुविधा देणे, स्वस्त दरात वीजपुरवठा करणे, अशा पायाभूत सुविधा सरकारला पुरवायच्या असतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, देशाची सुरक्षा अबाधित ठेवणे व भक्कम करणे, यालाही प्राधान्य द्यायचे असते. आज सर्वत्र दहशतवादाचे सावट आहे, त्याचा मुकाबला करण्यासाठी अत्याधुनिक युद्धसामग्री गरजेची असते. त्याची खरेदी करण्यासाठी सरकारकडे पुरेसे पैसे विविध करांमधूनच येत असतात.
👍 आपल्या देशात ‘कर‘ जास्त आहे ?
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी एका गुणोत्तराची (रेशो) आकडेवारी पाहू. देशाचे एकूण करउत्पन्न आणि जीडीपी (देशात एका वर्षात निर्माण झालेल्या वस्तूची व सेवेची एकूण किंमत) यांचे गुणोत्तर (प्रमाण) साधारणपणे 23 असणे आवश्यक आहे. हे प्रमाण एकूण करउत्पन्न भागिले जीडीपी असे मोजले जाते. भारतात फक्त चार टक्के लोकच प्राप्तिकर भरत असल्यामुळे आपल्याकडे हे प्रमाण सध्या फक्त 17.7 इतकेच आहे. सर्व अविकसनशील देशांचे हेच प्रमाण सरासरी 21 आहे आणि ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (ओईसीडी) यांच्या सभासद देशांमध्ये तेच प्रमाण 34 इतके आहे. आखाती देशांत हे प्रमाण 1 ते 2 टक्केच आहे. डेन्मार्कमध्ये हे प्रमाण सर्वांत जास्त म्हणजे 50 आहे. म्हणजेच डेन्मार्कमध्ये ‘कर‘ सर्वांत जास्त आहेत. गंमतीची गोष्ट म्हणजे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणानुसार, डेन्मार्कमधील लोक संपूर्ण जगात सर्वांत आनंदी लोक आहेत. हे विश्लेषण पाहता, आपल्या देशात ‘कर‘ कमी आकारला जातो आणि कमी लोकांना आकारला जातो, असेच उत्तर येते.
तात्पर्य, विविध करांना नाके न मुरडता ‘कर‘ या विषयाचा सरकारच्या म्हणजेच देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातूनसुद्धा विचार करणे योग्य ठरते.
भारतीय शेअरबाजारातील व्यवहाराची सौदापूर्ती आता T+1 या पद्धतीने जानेवारी 2023 पासून होत आहे म्हणजेच खरेदी केले असल्यास शेअर्स किंवा विक्री केली असल्यास पैसे यांची देवाणघेवाण ब्रोकरच्या खात्यात दुसऱ्या कामकाज दिवशी होईल आणि त्याच दिवशी ग्राहकाला शेअर्स किंवा पैसे मिळतील. यापूर्वी हे व्यवहार T+2 असे म्हणजे व्यवहार झाल्यावर कामकाजाच्या दोन दिवसानंतर होत असत. यात टप्याटप्याने सुधारणा होऊन आज चीन नंतर भारत हा जगातील दुसरा असा देश आहे तेथे शेअरबाजारातील व्यवहाराची सौदापूर्ती T+1 पद्धतीने होत आहे. जगभरात अन्य देशात अजूनही सौदापूर्ती T+2 किंवा T+3 या पद्धतीने होत आहेत.
अमेरिका आणि जपान हे देश आता याबाबत विचार करीत असून काही देश या वर्षी टप्याटप्याने या चळवळीत सामील होतील. सौदापूर्तीचा कालावधी जितका कमी तेवढी त्यातील जोखीम कमी होते त्यामुळे गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण होते. आपण याबाबत T+0 (म्हणजेत्याच दिवशी) अशी सौदापूर्ती करू शकू आणि भविष्यात तात्काळ(स्पॉट) सौदापूर्ती करू शकू का? याबाबत विचार करीत आहोत. अस झालं तर तात्काळ सौदापूर्ती करणारा भारत हा जगातील पहिला आणि एकमेव देश असेल.
शेअरबाजारामुळे उद्योगांना कमीतकमी खर्चात भांडबल उपलब्ध झाले. गुंतवणूकदारांना भागधारक या नात्याने उद्योगाची मालकी मिळाली. भागधारकाचे उत्तरदायित्व हे त्यानी गुंतवलेल्या रकमेइतकेच मर्यादित असून दुय्यम बाजारात त्यांच्या भांडवल खरेदी विक्रीची संधी प्राप्त झाली आहे. थोडी जोखम स्वीकारून गुंतवणुकीवर कदाचित डिव्हिडंड आणि भाववाढ असे दोन्हीही फायदे मिळू शकल्याने गुंतवणूक करण्याचे नवीन साधन मिळाले. 31 ऑगस्ट 1957 रोजी सिक्युरिटीज काँट्रॅक्ट ऍक्ट या कायद्याने अधिकृतता प्राप्त खाली. यापूर्वी असे व्यवहार केवळ विश्वासाने केले जाऊन पूर्ण केले जात असत. त्यास कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाल्याने एक्सचेंजच्या नियामक मंडळाची जबाबदारी वाढली. भारतात मुंबईसह अनेक प्रादेशिक बाजार अस्तीत्वात आले. या सर्व बाजारांतील नियामक मंडळात दलालांचे वर्चस्व होते, कार्यकारी संचालकांवर दलालांचा दबाव होता बाजाराच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता नव्हती. दलालांची एकाधिकारशाही निर्माण खाली होती. सौदापूर्ती वेळेवर होत नसे त्यामुळे खरेदी केलेले शेअर्स मिळण्यासाठी महिन्याहून अधिक कालावधी लागे. व्यवहारात पारदर्शकता नव्हती अनेक व्यवहार जाहीर केले जात नसत, त्यामुळे योग्य किमतीचा अंदाज बांधणे कठीण जात असे. विक्री करताना कमीतकमी भाव आणि खरेदी करताना सर्वाधिक भाव अशी परिस्थिती जवळपास सन 1990 होती.
देशी आणि विदेशी गुंतवणूकदार भारतीय भांडवल बाजारातकडे आकर्षित होण्यासाठी या सर्व व्यवहारात पारदर्शकता यावी यासाठी सरकारने पुढाकार घेतला. त्यांनी मुंबई शेअरबाजाराचे कंपनीकरण करून त्याचे विश्वस्त मंडळ आणि संचालक मंडळ वेगळे असावे, विश्वस्त मंडळात दलाल असले तरी चालतील परंतु संचालक मंडळात व्यावसायिक व्यवस्थापन अस्तित्वात असले पाहिजे असे सुचवले. त्यास अनुकूल प्रतिसाद न मिळाल्याने राष्ट्रीय शेअरबाजार निर्माण करण्यास सरकारने पुढाकार घेतला.
राष्ट्रीय शेअरबाजाराच्या रूपाने देशातील पहिला आधुनिक इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअरबाजार अस्तित्वात आला. त्याचे व्यवहार चक्र सुरवातीला आठवड्याचे मग तीन दिवसाने नंतर दोन दिवसाने ठराविक कालावधीत अस्तीत्वात आले. असा बाजार अस्तीत्वात येताना भविष्यात एक दिवसात सौदापूर्ती आणि शेवटी तात्काळ सौदापूर्ती असे उद्दिष्ट ठेवले होते. हा बाजार अस्तीत्वात आल्यावर मुंबई शेअरबाजाराने धडा घेऊन आवश्यक ते बदल करून चूक दुरुस्ती केली आणि व्यवसायाचे नवनवे मार्ग शोधत राहिला म्हणून तो टिकून आहे अन्य प्रादेशिक बाजार एकामागोमाग एक बंद पडले कोलकाता स्टॉक एक्सचेंज कागदोपत्री अस्तित्वात आहे पण तेथे कोणतेही व्यवहार होत नाहीत. दरम्यान राष्ट्रीय शेअरबाजाराने उलढालीच्या दृष्टीने सध्या प्रथम क्रमांकावर आणि जगात चौथ्या क्रमांकावर झेप घेतली असून डिरिव्हेटिव्ह व्यवहाराच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर गेला. मुंबई शेअरबाजार आणि राष्ट्रीय शेअरबाजार राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहेत त्यांनीं आता गांधीनगर येथे दिवसभरात 16 ते 22 तास चालू असणारे आंतराष्ट्रीय शेअरबाजारही चालू केले आहेत.
वर म्हटल्याप्रमाणे लवकरच T+0 म्हणजे व्यवहार ज्या दिवशी होईल त्याच दिवशी त्याची सौदापूर्ती होईल आणि भविष्यात तात्काळ सौदापूर्ती होईल या दिशेने बाजार नियामक सेबी काम करीत आहे. त्यांनी यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्व जाहीर करून जनतेकडून त्यांवरील सूचना 12 जानेवारी 2024 पर्यंत मागवल्या होत्या. याबाबत कोणत्या सूचना आल्या आणि त्यावर काय निर्णय झाला हे अद्याप जमजले नसले सध्या ज्या सुलभतेने आपण यूपीआयचा वापर करून आता कुणालाही तात्काळ पैसे पाठवू शकत आहोत त्याचप्रमाणे शेअर्समधील खरेदी विक्रीचे व्यवहार सहज आणि तात्काळ करू शकू असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
सेबीने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार टप्याटप्याने ही पद्धत अस्तीत्वात येईल, सुरुवातीस-
●पहिल्या टप्यात S&P 500 मध्ये असलेल्या शेअर्ससाठी T+0 ही पद्धत वैकल्पिक स्वरूपात उपलब्ध होईल. सुरुवातीस 200 नंतर 200 आणि मग 100 कंपन्यासाठी ही पद्धत उपलब्ध होईल.
●एकाच शेसर्सचे T+1 आणि T+0 असे दोन्ही सेगमेंटचे भाव स्क्रीनवर वेगवेगळे दिसतील.
●या दिवशी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांपर्यत केलेले T+0 चे सर्व व्यवहार त्याच दिवशी दुपारी 4 वाजून 30 मिनिटांपर्यत पूर्ण केले जातील.
●दुपारी दीड नंतर केलेले सर्व व्यवहार T+1 या यासाठी सध्या अस्तीत्वात असलेल्या पद्धतीने होतील.
●सौदापूर्तीचा विचार करता या दोन्ही प्रकारच्या पद्धतीसाठी सध्याच्या जोखीम व्यवस्थापन धोरणात कोणताही बदल केला जाणार नाही.
थोडक्यात,
सुरुवातीला काही शेअर्सच्यासाठी T+0 चे व्यवहार मर्यादित काळासाठी असतील.
यानंतरच्या टप्यात,
●दिवसाचे वेगवेगळे विभाग करून दर भागाचे वेगवेगळे सेटलमेंट होईल त्याची रचना सध्याच्या T2T पद्धती प्रमाणे असेल असे प्रस्तावित आहे.
●यासाठी T+1 मधील सेटलमेंट पद्धतीप्रमाणेच फक्त दुसऱ्या दिवसाऐवजी त्या दिवसाच्या विशिष्ट काळाच्या व्यवहारांची सौदापूर्ती होईल.
●त्याचे दिवसाच्या वेगवेगळ्या भागाचे भाव स्वतंत्र दिसतील.
●यासाठी खरेदीची ऑर्डर देण्यापूर्वी पैसे दिलेले असल्याची त्याचप्रमाणे विक्री ऑर्डर देणाऱ्याच्या खात्यातून ऑर्डर देण्यापूर्वीच शेअर्सची डिलिव्हरी घेतली जाईल.
●क्लिअरिंग कॉर्पोरेशनद्वारे त्याची खात्री करून घेतल्यावरच ऑर्डर पुढे जाईल.
●केवळ लिमिट ऑर्डरच घेतल्या जातील.
●क्लायंट कोड बदलांना परवानगी दिली जाणार नाही.
●ऑर्डर मधील बदल अथवा ऑर्डर पूर्णपणे रद्द करणे एक्सचेंजद्वारे क्लिअरिंग कॉर्पोरेशनला कळवून केले जाईल.
●ही पद्धत सुरळीत झाल्यावर आधी चालू केलेली दीड वाजेपर्यंत केलेले व्यवहार त्याच दिवशी पूर्ण करणाऱ्या कंपन्यांची संख्या कमीकमी करून ती पद्धती बंद केली जाईल.
●त्यानंतर दिवसाचे वेगवेगळे भाग करून त्यातील सौद्यांची पूर्तता पुढील तासाभरात केली जाईल.
आलेल्या दोन्ही प्रकारच्या अनुभवातून आवश्यक सुधारणा करीत यानंतरच्या टप्यात सर्व शेअर्ससाठी-
●असा अँप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) उपलब्ध करून दिला जाईल जो खरेदी करणाऱ्यास पैशाच्या बदल्यात शेअर्स अथवा विक्री करणाऱ्यास शेअर्सच्या बदल्यात पैसे, तात्काळ देऊ शकेल.
यामुळे
●रोख बाजारातील तरलता वाढेल, यामुळे सकारात्मक वाढीची शक्यता आहे.
●सध्या अस्तित्वात असलेले नियमित ब्रोकर्स अत्यंत कमी दलालीवर काम करतात, त्यांच्या व्यवसायाचा काही भाग ग्राहकांच्या निधीवरील व्याजातून येतो त्याच्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने त्यांना आपली व्यवसाय नीती ( bissiness model) तपासावी लागेल.
याचबरोबर
●सध्या अस्तित्वात असलेली T+1 ही पद्धती बंद करण्याचा प्रस्ताव नाही त्यामुळे डे ट्रेडर्स त्याचे व्यवहार त्याच दिवशी करू शकतील.
●यातून काही वाद निर्माण झाल्यास लवादामार्फत सोडवता येतील.
या सर्व भानगडीत काही तांत्रिक प्रश्न उद्भवू शकतात जसे –
●खरेदीदारास तात्काळ व्यवहार करायचा असेल आणि विक्रेत्यास तो दुसऱ्या दिवशी चालणार असेल तर असे व्यवहार होऊ शकणार नाहीत.
●ज्यांना डे ट्रेडिंग करायचं आहे ते T+0 किंवा तात्काळ व्यवहाराकडे जाणारच नाहीत कारण त्यामुळे त्यांच्या खर्चात वाढ होईल.
बाजारात एकाच वेळी एका कंपनीच्या शेअर्सचे T+1, T+0 दीड वाजेपर्यंत आणि / किंवा T+0 दिवसातील वेगवेगळ्या भागाचे आणि स्पॉट सेटलमेंटचे असे अनेक वेगवेगळे भाव दिसतील. हे भाव ओळखून त्यातील फरक समजून घेण्यासाठी गुंतवणूकदार अधिक शिक्षित आणि जागृत असणे जरुरीचे आहे. सेबीच्या म्हणण्यानुसार एकाच शेअर्सच्या वेगवेगळ्या व्यवहार प्रकारातील (segment) भावातील फरकामुळे त्या शेअर्सची प्रत्येक प्रकारातील खरीखुरी किंमत निश्चित होण्यास मदतच होईल. भावातील या फरकामुळे निर्माण होणाऱ्या नव्या गुंतवणूक संधी शोधणाऱ्या बाजारातील साधकांना विविध सेगमेंटमधील भावाच्या फरकाचा लाभ घेता येईल.
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते ही वैयक्तिक मते आहेत)
मुलं ज्या वयात खेळतात-बागडतात आणि शाळेत जात असतात, त्याच वयात मुंबईत राहणाऱ्या एका मुलाने तब्बल १०० कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे. १८ वर्षीय मुलाच्या या कंपनीत २००हून अधिक लोक काम करत आहेत.
आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडत असतात, ज्या खूपच सामान्य असतात. मात्र, त्यातही दूरदृष्टी असणारे व्यक्ती असं काही शोधतात, ज्यामुळे त्यांच्यासोबतच शेकडो लोकांचं भलं झाल्याशिवाय राहत नाही. असंच काहीसं असामान्य काम केलंय तिलक मेहता नावाच्या मुलानं. हा मुलगा इतर कुणी नसून पेपर एन पार्सल या १०० कोटींची उलाढाल करणाऱ्या कंपनीचा संस्थापक आहे. शाळेत जाण्याच्या वयात तिलकने ही कंपनी कशी उभारली, हेच सांगणारा हा लेख.
कुटुंब
आज तिलक मेहताचे वय १८ वर्षे आहे. सन २००६मध्ये गुजरातमध्ये जन्मलेला तिलक पेपर एन पार्सल (Paper N Parcel) या कुरिअर कंपनीचा संस्थापक आहे. तिलकच्या कुटुंबाविषयी जाणून घ्यायचं झालं, तर तिलकचे वडील विशाल मेहता एक लॉजिस्टिक कंपनीशी जोडलेले आहेत. तिलकची आई काजल मेहता या गृहिणी आहेत. तसेच, तिलकला एक बहीणदेखील असून तिचं नाव तन्वी मेहता असं आहे.
कशी सुचली कल्पना?
तिलक मेहता जेव्हा १३ वर्षांचा होता, तेव्हा एकेदिवशी वडिलांच्या थकव्यामुळे त्याला व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवण्याची कल्पना सुचली. तिलक त्याच्या वडिलांना ऑफिसहून घरी परतल्यानंतर जेव्हाही स्टेशनरीचे सामान आणायला सांगायचा, तेव्हा त्याला वाईट वाटायचे. वडिलांचा थकवा पाहून तो सतत त्यांना हे सांगू शकत नव्हता की, त्याला शाळेसाठी स्टेशनरी हवीये. एकदा काय झालं की, तिलक त्याच्या काकांकडे सुट्ट्यांसाठी गेला होता. त्यावेळी घरी परतताना तो त्याची पुस्तके त्यांच्या घरी विसरला. मात्र, काही दिवसांनी परीक्षा सुरू होणार होत्या, त्यामुळे तिलक मेहताला ती पुस्तके हवी होती.
जेव्हा त्याने कुरिअर एजन्सीशी संपर्क साधला, तेव्हा समजले की, पुस्तक कुरिअर करण्यासाठी पुस्तकांच्या किमतीपेक्षा जास्त रुपये खर्च होत आहेत. एवढंच नाही, तर इतके सारे रुपये खर्च करूनही त्याचे पुस्तक एका दिवसात पोहोचले नाही. इथेच तिलकच्या डोक्यात व्यवसायाच्या कल्पनेने जन्म घेतला.
तिलक मेहताने त्याच्या वडिलांसोबत आपल्या व्यवसायाच्या योजनेविषयी चर्चा केली आणि त्याने कुरिअर सर्व्हिस सुरू करण्याची संपूर्ण योजना आखली. वडिलांनी तिलकला पेपर एन पार्सल सुरू करण्यासाठी फंडिंग केलं. त्यानंतर त्याची भेट बँक अधिकारी घनश्याम पारीक यांच्याशी घालून दिली, ज्यांनी तिलकच्या व्यवसायात गुंतवणूक केली.
तिलक मेहताच्या व्यवसायाची कल्पना ऐकून पारीक यांनी बँकेची नोकरी सोडून थेट पेपर एन पार्सल व्यवसाय जॉईन केला. दोघांनी मिळून २०१८मध्ये पेपर एन पार्सल कुरिअर सर्व्हिस सुरू केली. तिलकने आपल्या कंपनीचे नाव पेपर एन पार्सल ठेवले आणि घनश्याम यांना कंपनीचा सीईओ बनवले. १०० कोटींची वार्षिक उलाढाल करणाऱ्या कंपनीत आजघडीला २००हून अधिक लोक काम करतात. तसेच, तिलक मेहता देशातील सर्वात युवा उद्योजक बनला आहे.
कंपनी काय काम करते?
तिलकची कंपनी ही एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, जी शिपिंग आणि लॉजिस्टिकशी संबंधित सेवा देते. ही कंपनी प्रत्येक प्रकारची गरजेची वस्तू, दैनंदिन आयुष्यातील वापरली जाणारी गोष्ट डिलीव्हर करते. तिलकची कंपनी आपल्या मोबाईल ऍपमार्फत लोकांना डोअरस्टेप सेवा देते. कंपनीत २००हून अधिक कर्मचारी तर आहेतच. शिवाय ३००हून जास्त मुंबईचे डब्बेवालेही कंपनीशी जोडले गेले आहेत. या कर्मचाऱ्यांमार्फत कंपनी दरदिवशी हजारो पार्सल डिलीव्हर करते. यासाठी कंपनी ४० ते १८० रुपये आकारते.
सन २०१८मध्ये सुरू झालेल्या तिलकच्या कंपनीने ६ वर्षांच्या कालावधीत यशाचे शिखर गाठले आहे. अशाप्रकारे १८ वर्षांच्या वयातच एवढी मोठी कंपनी उभी केल्यामुळे तिलकला सर्वात यशस्वी युवा उद्योजकाचा दर्जाही मिळाला.
वाचक मित्रांनो, तुम्हीही तिलक मेहताचा हा प्रेरणादायी प्रवास वाचून प्रेरित झाला असाल, तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसेच, हा लेख तुमच्या व्यवसाय सुरू करण्याची इच्छा बाळगणाऱ्या मित्रमैत्रिणींनाही आवर्जून शेअर करा, ज्यामुळे नवीन उद्योजक तयार होण्यासाठी त्यांनाही प्रेरणा मिळेल.
सरंक्षण निधी,धर्मादाय सामाजिक संस्था, शैक्षणिक आणि संशोधन संस्था यांना मदत करणे हे व्यक्तीचे समाजभान जागृत असल्याचे लक्षण आहे. या सामाजिक जाणिवेस जुनी आयकर प्रणाली प्रोत्साहन देत असून अशा संघटना संस्था यांना दिलेल्या देणगीस आयकर कायद्यातील कलम 80 G आणि 80 GGA नुसार काही सवलती देण्यात आल्या आहेत. या सवलती नव्या पद्धतीने करमोजणी करणाऱ्या करदात्यांना लागू नाहीत.
करगणना ही करदात्यांच्या निव्वळ करपात्र उत्पन्नावर केली जाते. 80G नुसार दिलेली देणगी अनेक ठिकाणी 50% तर काही ठिकाणी 100% सवलत मिळते 80 GGA ही सवलत केवळ शैक्षणिक आणि संशोधन करणाऱ्या संस्थेस दिलेल्या देणगीस 100% सवलत मिळते. या दोन्ही सवलती एकूण सामाजित उत्पन्नाच्या (80 G नुसार मिळू शकणारी सवलत वगळून येणारे उत्पन्न) 10% या मर्यादेत सूट मिळते.
याचाच अर्थ असा की,
करदात्यांच्या-
●सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाची बेरीज केली जाईल यात अल्पकालीन दिर्घकालीन भांडवली नफा मिळवला जाईल याशिवाय त्यात जे उत्पन्न करपात्र नाही तेही मिळवले जाईल.
●त्यातून 80G अथवा 80 GGA खाली मिळू शकणारी वजावट वगळून अन्य वजावटी घेतल्या जातील.
●आता जे उत्पन्न मिळाले ते करदात्याचे सामाजित उत्पन्न समजले जाईल त्याच्यातून जास्तीत जास्त 10% या मर्यादेत देणगी वजा केली जाईल.
करपात्र उत्पन्न काढताना,
सामाजित उत्पन्नातून करपात्र नसलेले उत्पन्न, कायद्याने मिळणाऱ्या सर्व वाजावटी पात्र देणगीच्या वजावटीसह घेतल्यास निव्वळ करपात्र उत्पन्न मिळेल.
80 G आणि 80 GGA नुसार सवलत मिळण्यासाठी आवश्यक गोष्टी
●₹2000/-हून अधिक देणगी रोख दिली असेल तर सूट मिळत नाही. याहून अधिक रकमेची देणगी चेक, डिमांड ड्राफ किंवा ऑनलाइन पद्धतीनेच द्यावी.
●दिलेल्या देणगीच्या पावतीवर देणगीदाराचे नाव, पॅन, रक्कम आणि देणगी कोणत्या पद्धतीने दिली याचा उल्लेख असावा.
●याच पावतीवर देणगी स्वीकारणाऱ्या निधी किंवा संस्थेचा नोंदणी क्रमांक, वैधता, संस्थेचा पॅन आणि सूट पात्रता टक्केवारी यांचा उल्लेख असावा.
●अलीकडेच विवरणपत्र भरताना देणगी संदर्भ क्रमांक मागितला जातो तो आहे की नाही ते पाहावे.
●देणगी स्वीकारणारी संस्था स्वदेशी असावी.
यासंदर्भात विचारले जाणारे सर्वसाधारण प्रश्न आणि त्याची उत्तरे-
★देणगीस असलेल्या सवलतीचा लाभ आपला मालक आपल्याला देऊ शकेल का?
~देणगी थेट करदात्यांच्या पगारातून कापून थेट देण्यात आली असेल तर त्याचा लाभ मालक देऊ शकतो.
★विवरणपत्र सादर करताना देणगी पावती देण्याची गरज आहे का?
~ आता विवरणपत्र कागद विरहित पद्धतीने सादर केली जात असल्याने देणगी पावती देण्याची गरज नाही. मोजणी करणे किंवा आयकर खात्याने देणगीचा तपशील मागितला तरच पावतीची गरज लागेल.
★देणगीची पावती विशिष्ठ नमुन्यातच असावी असे काही आहे का?
~ नाही, देणगी देणारा आणि स्वीकारणारा यांची वर दिल्याप्रमाणे सर्व माहिती आणि संदर्भ क्रमांक पावतीमध्ये असायला हवा.
★जर मालकाने सर्वांची एकत्रित देणगी दिली असेल तर पावती कशी असावी?
~अशा परिस्थितीत कंपनी लेटर हेडवर जबाबदार व्यक्तीने दिलेले पत्र आणि सर्वाचा वेगळा एकत्रित तपशील पुरेसा आहे.
★देणगीवर मिळणारा कर सवलतीचा लाभ सर्व प्रकारच्या उत्पन्नातून घेता येतो का?
हो, विहित मर्यादेत पगार, पेन्शन, व्याज, घरभाडे भांडवली नफा अन्य उत्पन्न या सर्वांसाठी या करसवलतीचा लाभ घेता येतो.
★अनिवासी भारतीय या सवलतीचा लाभ घेऊ शकतात का?
~हो, अनिवासी भारतीय त्याच्या भारतातील उत्पन्नावर हा लाभ घेण्यास पात्र आहेत.
★विवरणपत्र भरून झाले आणि ते खात्याकडून मान्य केले गेले आहे परंतु माझ्याकडून देणगीचा लाभ घेण्याचे राहून गेले अशा प्रसंगी हा लाभ मला कसा मिळवता येईल?
~विवरणपत्र दुरुस्ती करण्याची मुदत उलटून गेली नसेल तर सुधारित विवरणपत्र सादर करून हा लाभ मिळवता येईल.
★देणगीचे वर्गीकरण आणि खात्री कशी करता येईल?
~देणगीची पूर्ण सवलत अथवा 50% सवलत आहे त्याची माहिती आणि खात्री संस्थेचे नाव आणि पॅन याचा वापर करून आयकर विभागाच्या संकेतस्थळास भेट देऊन मिळवता येईल.
★पैश्याव्यतिरिक्त अन्य पद्धतीने दिलेल्या देणगीस सूट मिळते का?
~नाही फक्त पैशाच्या स्वरूपातील मदतीसच ही सवलत मिळते. आपण कपडे, धान्य, वस्तू स्वरूपात मदत करू शकत असलो तरी त्यास अथवा 2 हजार रुपयांहून अधिक रोख स्वरूपातील मदतीस ही सवलत उपलब्ध नाही.
★व्यक्तिशिवाय अन्य कोणास या सवलतीचा लाभ मिळतो का?
~हिंदू अविभाज्य कुटुंब, कंपनी, भागीदारी व्यवसाय यांची गणना कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम स्वतंत्र व्यक्तीत होते त्यांनाही 80 G खाली लाभ घेता येतो.
★काही न्यास आहेत उदा सेव द चाईल्ड, अक्षयपात्र यांना केलेल्या मदतीस ही सवलत मिळते का? एनजिओस देणगी देऊन मला कर कसा वाचवता येईल?
~नमूद केलेल्या न्यासाना 50% सवलत आहे अन्य संस्था, न्यास, निधी, एनजिओ याबाबत आयकर विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन सवलत मिळते की नाही, मिळत असल्यास किती मिळते? याची माहिती मिळवता येईल
आणि त्याप्रमाणे सवलत मिळेल.
अनेक संस्था ट्रस्ट बहुमोल सामाजिक कार्य करीत असतात. त्यांना कार्यकर्ते, मदतनीस आणि पैसे यांची चणचण भासते. अनेक अडचणींना तोंड त्यावे लागते तरी त्या निष्ठेने आपली कार्ये करीत असतात. आपण त्यात आपला प्रत्यक्ष सहभाग देऊ शकत नसलो तरी मदत नक्कीच करू शकतो. ही मदत वस्तुरूपात अथवा पैशात कशीही करता येऊ शकते. केवळ आयकरात सवलत मिळवावी असा या मागे हेतू नसेल अथवा नसावा असे मला वाटते. केवळ पैशांच्या स्वरूपातील मदतीस आयकर सवलत मिळते अशी सवलत मिळून काही कर वाचल्यास त्यात भर टाकून अधिक मदत करावी आणि आपली सहवेदना आणि समाजभान जागृत ठेवावे.
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक समजावीत)
1 मार्च 2024 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत.
फेसबुक… हे नाव आपण ऐकले किंवा पाहिल्यानंतर आपल्याला सर्वात पहिलं दिसतं, ते म्हणजे फोटो, व्हिडिओ, मीम्स आणि असं बरंच काही. लहानांपासून ते म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी फेसबुक हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. ही झाली फेसबुकची एक बाजू. मात्र, याची दुसरी बाजूही आपण समजून घेतली पाहिजे. ती म्हणजे, फेसबुक हे फक्त मनोरंजनाचे किंवा वेळ घालवण्याचे माध्यम नाहीये. खरं तर, फेसबुक लघु उद्योजकांपासून ते वर्षाकाठी हजारो कोटींचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकासाठी महत्त्वाचं आहे.
अनेकांनी फक्त फेसबुकचा वापर करून आपला व्यवसाय शिखरावर नेऊन ठेवला आहे. परंतु अनेक व्यावसायिक असे आहेत, ज्यांनी आपल्या व्यवसायासाठी अद्याप फेसबुकचा वापर सुरूच केला नाहीये. मात्र, त्यांनी जर फेसबुकचा वापर केला, तर त्यांच्या व्यवसायात वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. आजचा हा लेख, त्या लोकांसाठी आहे, ज्यांना आपल्या व्यवसाय अनेक पटींनी वाढवायचा आहे. चला तर, फेसबुकचा वापर करून तुम्ही तुमच्या व्यवसायाला ‘चार चांद’ कशाप्रकारे लावू शकता, हे जाणून घेऊयात…
प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर तुमचा व्यवसाय लहान आहे की मोठा, याने काहीही फरक पडत नाही. प्रत्येक व्यवसाय फेसबुक बिझनेस पेजेसचा फायदा घेऊ शकतो. फेसबुक हे राजकीय तक्रारी, मजेशीर मीम्स, दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यापेक्षा खूप काही आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायाचे फेसबुक पेज तयार करता, तेव्हा तुम्ही सध्याचे आणि भविष्यातील कस्टमर (ग्राहक) शोधताना तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स सुधारू शकता. व्यवसायासाठी फेसबुकचा वापर करणे खूपच सोपे आहे. योग्य स्ट्रॅटेजी (रणनीती) वापरून तुम्ही तुमचा व्यवसाय वेगाने वाढवू शकता.
फेसबुक बिझनेस पेजची ताकद
सर्वसाधारणपणे अनेक युजर्स हे दिवसातून एकदा का होईना फेसबुकवर फेरफटका मारतच असतात. दैनंदिन आयुष्यात काय घडतंय, याच्याशी जोडले राहण्यासाठी ते दिवसातून एकदा तरी फेसबुक स्क्रोल करतातच. फेसबुक युजर्सला त्यांच्या मित्र आणि कुटुंबाशी जोडलेले राहायचे असते. तसेच, जगात घडणाऱ्या गोष्टींमधून काही ना काही शिकायचे असते. तसेच, त्यांच्या आवडत्या ब्रँड आणि बिझनेससोबत जोडले राहायचे असते. जर तुम्ही तुमच्या व्यवसायाशी संबंधित काही अनाऊन्समेंट (घोषणा) केल्या असतील, तर त्यादेखील त्यांना जाणून घ्यायच्या असतात.
चला तर, फेसबुक बिझनेस पेजचे मोठे फायदे काय आहेत? हे आपण जाणून घेऊयात…
व्यवसायासाठी फेसबुक बिझनेस पेज वापरण्याचे फायदे
१. ऑनलाईन प्रेझेन्स सुधारणे २. डायरेक्ट कस्टमर एंगेजमेंट ३. किफायतशीर मार्केटिंग ४. ऍनालिटिक्स आणि इनसाइट्स ५. जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रवेश मिळतो
१. ऑनलाईन प्रेझेन्स सुधारणे
प्रत्येक व्यवसायासाठी फेसबुक पेज असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, फक्त फेसबुक पेज असणे गरजेचे नाही, तर तुम्ही त्यावर दरदिवशी काही ना काही पोस्ट केले पाहिजे. जेणेकरून, तुमच्या ग्राहकांना तुमच्या व्यवसायाशी जोडले जावेसे वाटेल. तुम्ही तुमच्या फेसबुक पेजवर काय पोस्ट करत आहात, हे त्यांना जाणून घ्यायचे असते. तसेच, त्या पोस्टवर कमेंट करून तुम्ही त्याला रिप्लाय (प्रतिसाद) द्यावा असेही त्यांना वाटत असते. अशात, जर ग्राहक तुमच्या पेजवर आले आणि त्यांना कोणतीही पोस्ट दिसली नाही, तर ते तुमच्या पेजला रामरामही ठोकू शकतात. त्यामुळे तुम्ही सातत्याने तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स (ऑनलाईन उपस्थिती) सुधरवणे खूपच गरजेचे आहे.
२. डायरेक्ट कस्टमर एंगेजमेंट
डायरेक्ट एंगेजमेंट हा एक फेसबुक बिझनेस पेजचा सर्वात मोठा फायदा आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हे इंटरॅक्शन्स सोपे व्हावे या अर्थाने डिझाईन केलेले असतात. विशेष म्हणजे, हे वैयक्तिक आणि बिझनेस या दोन्हींच्या बाबतीत लागू होते. त्यामुळे तुमच्या संभाव्य ग्राहकांना तुमच्याशी जोडून घेण्यासाठी त्यांच्याशी संबंध वाढवा. तुम्ही फक्त तुमच्या ग्राहकांना कमेंट आणि डायरेक्ट मेसेज करू शकत नाहीत, तर तुम्ही त्यांच्यासोबत तुमची मूल्ये, कौशल्य आणि कामाशी संबंधित आकडेवारीही शेअर करू शकता. नियमितपणे टार्गेटेड बातम्यांच्या फीडमध्ये दिसून तुम्ही तुमची कंपनी कशामुळे वेगळी बनते ते हायलाईट करू शकता.
३. किफायतशीर मार्केटिंग
आता अनेकांना वाटत असेल की, फेसबुक बिझनेस पेज सुरू करायचं म्हणजे, त्यासाठी कितीतरी रुपये खर्च करावे लागत असणार. मात्र, हा तुमचा गैरसमज आहे. फेसबुक बिझनेस पेज तयार करण्यासाठी एकही रुपया खर्च करावा लागत नाही. ही सुविधा मोफत आहे. मात्र, तुम्ही तिथे तुमच्या मार्केटिंग बजेटवर पैसे खर्च करू शकता. तुमच्या बिझनेस पेजची फॉलोईंग वाढवण्यासाठी आणि सोशल मीडिया स्ट्रॅटेजी कशी विकसित करायची, हे शिकत असताना फेसबुक जाहिरातीचाही विचार करा.
फेसबुक जाहिरातींद्वारे, तुम्ही फक्त तेव्हाच पैसे भरता, जेव्हा लोक तुमची जाहिरात पाहतात किंवा त्यावर क्लिक करतात. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचे आहे, हे ठरवले की, हे मार्केटिंग सर्वात किफायतशीर ठरते. त्यामुळेच आपल्या टार्गेट मार्केटचा विचार करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही फेसबुक जाहिरात टार्गेटिंगसाठी सर्वात आवश्यक असलेल्या डेमॉग्राफिक्सचा अभ्यास करा.
४. ऍनालिटिक्स आणि इनसाइट्स
तुम्ही एकदा फेसबुक बिझनेस पेज सुरू कसे करायचे हे शिकलात, की तुम्हाला प्रभावी अशा इनसाइट्स डॅशबोर्डचा ऍक्सेस मिळेल. तुमच्या साइटला भेट देणाऱ्या आणि तुमच्या पोस्टशी संवाद साधणाऱ्या लोकांचा ट्रेंड तुम्हाला दाखवण्यासाठी फेसबुक तुमच्यापुढे आकडेवारी आणून देते. याद्वारे तुम्ही तुमच्या जाहिरातींवर क्लिक करणाऱ्यांची संख्यादेखील पाहू शकता.
व्यवसायासाठी फेसबुक वापरण्याचा तुमचा दृष्टीकोन सुधारल्यामुळे हे उपयुक्त आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात कोणत्या गोष्टींची सुधारणा केली जाऊ शकते याबद्दल रियल-टाईम इनसाइट्स मिळतील. शेवटी, सोशल मीडिया मार्केटिंग योजना, सर्व मार्केटिंग स्ट्रॅटेजीप्रमाणे, आपण कालांतराने शिकत असताना बदलू शकता.
५. जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रवेश मिळतो
तुम्हाला रंजक बाब सांगतो. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण फेसबुकवर तब्बल तीनश कोटींहून अधिक लोकांचे अकाऊंट्स आहेत. तुमच्या टार्गेट प्रेक्षकांसाठी किंवा त्यांच्यापैकी काहींसाठी तुमच्या ब्रँडशी प्रथमच फेसबुकद्वारे ओळख करून देणे शक्य आहे. याला वर्ड-ऑफ-माऊथ मार्केटिंग म्हणून ओळखले जाते. बरेच लोक पैसे देऊन करणाऱ्या जाहिरातींपेक्षा मित्र, कुटुंब आणि अगदी अनोळखी लोकांच्या शिफारशींवर अधिक विश्वास ठेवतात. सोशल मीडियाच्या शब्दात सांगायचं झालं तर, वर्ड ऑफ माऊथ किंवा माऊथ पब्लिसिटी. म्हणजेच युजरच्या फेसबुक फीड किंवा इनबॉक्समध्ये शेअर्स, कमेंट्स, फॉलो इ. जेव्हा तुम्ही तुमच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये फेसबुकचा वापर करता, तेव्हा तुम्हाला या ऑरगॅनिक आउटरीचचा फायदा होतो.
अशाप्रकारे, फेसबुकचा वापर करून तुम्ही रुळावरून खाली उतरलेल्या तुमच्या व्यवसायाची गाडी पुन्हा रुळावर आणू शकता.
सोशल मीडियाच्या जगात वावरणाऱ्या मित्रमंडळींनो, तुम्हाला हा लेख कसा वाटला, हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच, तुमच्या कोणत्या मित्र-मैत्रिणींना त्यांच्या व्यवसायासाठी हा लेख फायदेशीर ठरू शकतो, असे वाटत असेल, तर त्यांनाही हा लेख नक्की शेअर करा. आणि हो, इतर कोणत्या विषयांवर लेख वाचायला आवडतील, हेदेखील कमेंट करून नक्की सांगा.
सध्या महागाई झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत पैसा कमवणे, हा सर्वांसाठी कळीचा मुद्दा बनला आहे. त्यामुळे अनेकदा असे पसरवले जात आहे की, श्रीमंत बनायचे असेल, तर तुमचं स्वतःचं काहीतरी करा. बिझनेस करा, रिस्क घ्या. मात्र, सर्वांसाठी रिस्क घेणे शक्य होत नाही. जॉब करणाऱ्यांची काहीतरी मजबुरी असते. मग जेव्हा तुम्ही जॉब करत असाल, तर तुम्ही श्रीमंत बनू शकत नाही का? तर हे चुकीचं आहे. तुम्ही जॉब करूनही श्रीमंत बनू शकता. चला तर, आपण जाणून घेऊयात की, तुमचा एका ठराविक पगार असेल, तर तुम्ही चांगल्या आर्थिक नियोजनाद्वारे खरोखरच श्रीमंत बनू शकता. यासोबतच आपण तुमचा पगार जर कमी असेल, तर तो वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, याविषयीही जाणून घेऊयात…
आर्थिक नियोजन
आपण या लेखातून जॉब करणारा व्यक्ती कशाप्रकारे योग्य आर्थिक नियोजनाद्वारे श्रीमंत कसा बनू शकतो, हे पाहूयात. आज तुमचा पगार कमी जरी असला, तरीही तुम्ही स्वत:ला धन्यवाद द्या की, तुम्ही या काळात जन्माला आलात. कारण, आज तुम्ही कुठल्या कॉलेजमधून आलात, त्याचे महत्त्व कमी झाले आहे. तुमची पदवी काय आहे, त्याचे महत्त्व कमी झाले आहे. एवढंच काय, तर तुमचे मार्क्स किती आहेत, याचेही महत्त्व कमी झाले आहे. आजपासून १०-१५ वर्षांपूर्वी या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरत होत्या. मात्र, आता त्यांचा एवढा फरक पडत नाही. आता फक्त एकच गोष्ट गरजेची आहे, ते म्हणजे तुम्ही कोणत्या एका गोष्टीमध्ये चांगले आहात. तसेच, जर तुम्ही एखाद्या गोष्टीत चांगले नसलात, पण तुम्हाला त्यात रस असेल; तर तुम्ही मोफत इंटरनेटच्या वापराने त्यात चांगले होऊ शकता. मग ते काहीही असू शकते. ग्राफिक्स डिझायनिंग असू शकते, वेब डेव्हलपमेंट असू शकते किंवा कंटेंट रायटिंगदेखील असू शकते.
तुम्ही कोणत्यातरी एका गोष्टीत स्वतःला एक चांगली व्यक्ती बनवू शकला, तर कोणतीही कंपनी तुम्हाला जॉब देईल, जिथे तुमचा पगार २० हजार किंवा त्याहून अधिक असेल. तर अशा परिस्थितीत आम्ही जे आर्थिक नियोजन तुम्हाला सांगत आहोत, ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.
जर तुमचा पगार २० हजार रुपये किंवा त्याहून अधिक असेल, तर तुम्ही कोट्याधीश कसे बनू शकता? यासाठी काही नियम आहेत. एक असा की, ५०, ३० आणि २० नियम. या नियमानुसार, तुमचा जो काही पगार आहे, त्यातील ५० टक्के पगार तुम्ही गरजांवर खर्च करू शकता. जसे की, वीज बिल, पेट्रोल, फोन बिल, खान-पान आणि घराचे भाडे. त्यानंतर ३० टक्के पगार तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींवर खर्च करू शकता. जसे की, चांगले कपडे घ्यायचे आहेत, पार्टी करायची आहे, कुठे फिरायला जायचे आहे, मूव्हीला जायचं आहे. यानंतर पुढचा भाग येतो २० टक्के पगार, जी आहे बचत. तुम्हाला तुमच्या पगारातील कमीत कमी २० टक्के पैशांची बचत करायची आहे. त्यानंतर याच पैशांची गुंतवणूक करायची आहे. चला तर, आपण याची आकडेमोड करून पाहूयात.
तुमचा पगार फक्त २० हजार असला, तरीही हा हिशोब वैध आहे. आपण २० हजार रुपयांविषयी बोलत आहोत, तर तुम्हाला यापैकी किती रुपयांची बचत करायची आहे, तर २० टक्के. तुम्ही जर यापेक्षा जास्तीची बचत करू शकला, तर अति उत्तम. २० टक्के रक्कम तुम्ही बचत करत आहात, तर ती रक्कम होते ४ हजार रुपये. आता ४ हजार रुपयांची तुम्ही बचत करत आहात किंवा तुमचं ते ध्येय आहे. आता आपण पाहूयात की, तुम्ही जे ४ हजार रुपये बचत करत आहात, त्यातून तुम्ही काय कराल. पहिला नियम होता ५०-३०-२० आता आपण दुसरा नियम पाहूयात, जो गुंतवणुकीचा आहे. त्यानुसार तुम्हाला त्या ४ हजार रुपयांची गुंतवणूक करायची आहे.
यासाठी तुम्ही जीवन विमा घेऊ शकता. तुम्ही जर तरुण असाल, २७ ते ३० पेक्षा कमी वयाचे, तर तुम्हाला १ कोटी रुपयांचा विमा मिळेल. हा तुम्हाला साधारण ५०० रुपये प्रति महिना हिशोबाने मिळेल. आता ४ हजारातील ५०० रुपये गेले, तेव्हा तुम्ही साधारण विमा नाही, तर टर्म प्लॅन घ्याल आणि काही गोष्टींची काळजी घ्या. जसे की, कुटुंबातील सर्वांचा जीवन विमा घ्यायचा नाहीये. जे कमावते लोक आहेत किंवा तुम्ही कमावते आहात, तर तुमचा विमा घ्या. कोणत्याही स्कीममध्ये अडकून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका.
दुसरी पायरी म्हणजे, आरोग्य विमा. हा विमा सर्वांचा घ्यायचा आहे. कारण, आजारी कुणीही पडू शकतो. त्यामुळे यासाठी जवळपास ५०० रुपयात तुमचा आरोग्य विमाही मिळेल. आता ४ हजारांपैकी १ हजार रुपये तुमच्या जीवन आणि आरोग्य विम्यासाठी खर्च झाले. सर्वप्रथम ही दोन कामे केली पाहिजेत.
आपत्कालीन निधी
आता पुढची पायरी म्हणजे आपत्कालीन निधी. आजकाल फ्रीलान्सिंग सुरू आहे. मात्र, त्याचाही काही भरोसा नाहीये. कधी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाते. कधी व्यवसाय ठप्प पडतो, किंवा लॉकडाऊनची स्थिती उद्भवते. कोणतीही आपत्कालीन स्थिती उभी राहते. मात्र, खर्च हा सुरूच असतो. त्यामुळे त्याची आधी तयारी करायची. त्यानंतर गुंतवणुकीचा विचार करायचा.
जर तुमच्या घरात एकटे कमावते असाल, तर तुमच्याकडे सहा महिन्यांचा आपत्कालीन निधी असावा. तसेच, जर तुमच्या घरात दोन कमावते लोक असतील, तर तुमच्याकडे तीन महिन्याचा आपत्कालीन निधी असावा. आता तीन महिन्यांचा आपत्कालीन निधी समजून घेऊयात. तुमचा पगार २० हजार आहे, तर आपण ५०-३०-२० नियमानुसार ५० टक्के रुपये तुमच्या गरजांसाठी आहेत, त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. तुमची नोकरी जरी गेली, तरीही तुम्ही तो खर्च दुर्लक्षित करू शकणार नाहीत. म्हणजेच महिन्याचा १० हजार रुपये हा असा खर्च आहे, जो तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेच. त्यामुळे तुम्ही जर घरातील दुसरे कमावते व्यक्ती असाल, तर तुमचा आपत्कालीन निधी कमीत कमी तुमच्या गरजांपेक्षा तीन पट असला पाहिजे. तसेच, घरातील प्रथम कमावते व्यक्ती असाल, तर आपत्कालीन निधी तुमच्या गरजांपेक्षा सहा पट असला पाहिजे. म्हणजेच तुमच्या महिन्याच्या गरजांवरील खर्च १० हजार रुपये आहे, तर तुमचा आपत्कालीन निधी हा कमीत कमी ३० हजार रुपयांचा असावा. जास्त असेल, तर उत्तमच.
आता हे ३० हजार रुपये कसे येणार हे पाहूयात. तुमच्या बचतीतील ४ हजार रुपये जे होते, त्यातील १ हजार महिना तर विम्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील. उरलेल्या ३ हजार रुपयांतून तुम्ही आताच गुंतवणुकीला सुरुवात करू नका. तुम्हाला १० महिन्यांसाठी ते ३-३ हजार रुपये जोडून बचत खात्यात आधी ३० हजार रुपये जमा केले पाहिजेत. तसेच, तुम्ही पे ऑटो स्विच ऑन करा. जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही पैसे खर्च कराल, तर एफडी करा, जी रक्कम काढता येऊ शकेल. अशाप्रकारे तुम्ही १० महिन्यांपर्यंत ३-३ हजार रुपये जमा करून आपत्कालीन निधी तयार करू शकता. हे तुम्ही कामाला लागल्यानंतर पहिल्या १० महिन्यात करावे लागणार आहे.
जीवन विमा तुम्हाला सर्वप्रथम घ्यायचा आहे. कारण, जितक्या तरुण वयात तुम्ही हा विमा घ्याल, तेवढा तुम्हाला प्रीमियम (हप्ता) कमी भरावा लागेल. तर या झाल्या तीन महत्त्वाच्या पायऱ्या. तुम्ही तुमचा जीवन आणि आरोग्य विमा घेतला. तुमचा आपत्कालीन निधी बनवला. आता ११ महिन्यानंतर तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता.
गुंतवणूक
अनेकजण काय करतात की, पहिल्या महिन्यापासूनच गुंतवणूक सुरू करतात. तसे करायचे नाही. जेव्हा ११ महिने होतील, तेव्हा गुंतवणूक सुरू करा. तुमच्याकडे आता ३ हजार रुपये आहेत, तुम्हाला स्टॉक्समध्ये, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवायचे आहेत, तर आता तुम्ही गुंतवू शकता. म्युच्युअल फंड्समध्ये अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास १२-१५ टक्के परतावा सहज मिळवू शकता. यासाठी एखाद्या अनुभवी आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता.
आपण अद्याप एक गोष्टीचा हिशोब केलाच नाही, तो म्हणजे तुमचा पगार कायम २० हजार असणार नाहीये. कधी ना कधी तुमचा पगार वाढणार आहे. तुम्ही नेहमी एवढीच गुंतवणूक करणार नाहीयेत. नक्कीच त्यात वाढ कराल. त्यामुळे जेव्हा तुम्ही जास्त गुंतवणूक कराल, तेव्हा तुम्हाला जास्त पैसे लागतील आणि त्यावर जास्त परतावा मिळेल. जसे तुम्ही सध्या ३००० रुपयांची गुंतवणूक करत आहात, पण पुढच्या वर्षी त्यात १५ टक्के वाढवाल. म्हणजेच पुढच्या वर्षी तुम्ही ३ हजार नाही, तर जवळपास ३५०० हजार रुपये गुंतवाल. त्यानंतर पुन्हा तुम्ही १५ टक्के वाढवाल. आता एक प्रश्न असाही आहे की, कुणाचा पगार दरवर्षी १५ टक्के वाढतो. जर महागाईचा दर ६.७ टक्के वाढला आणि तुमचा पगार १० टक्क्यांनी वाढला, तर तुमच्या पगाराच्या २० टक्के रक्कम गुंतवत आहात आणि त्यात तुम्ही १० टक्क्यांच्या वाढ केली, पण इतर ८० टक्के खर्च तुमचा गरजा आणि इतर गोष्टींसाठी ६ टक्क्यांनीच वाढला, तरी ४ टक्के तुम्ही गुंतवू शकाल.
आपण हे एका उदाहरणाद्वारे समजूया. समजा तुमचा पगार २० हजार आहे. आपण ५/६ टक्क्यांची महागाई पकडली, तर हिशोब सोपा होईल. आता ५ टक्के मानूया आणि तुमचा पगार १० टक्क्यांनी वाढला, तर पगार झाला २२ हजार. आधी तुमचा पगार २० हजार होता, तेव्हा तुमच्या गरजा आणि इतर गोष्टींसाठी ५०+३० म्हणजेच ८० टक्के म्हणजेच २० हजार पगाराच्या ८० टक्के रक्कम होते १६ हजार. आता तुमच्या मागील वर्षीच्या गरजा आणि इतर गोष्टींवरील खर्च १६ हजार होता. आता महागाई ५ टक्के वाढली आहे असे समजू. जे काम तुमचे आधी १६ हजारात व्हायचे, त्यावर आता ५ टक्के आणखी खर्च होत आहे, तेव्हा तुमचे ८०० रुपये आणखी खर्च होत आहेत, तेव्हा मागील वर्षी जे काम १६ हजारात व्हायचे, त्यासाठी आता १६८०० रुपये मोजावे लागत आहेत. तुमचा पगार २ हजारांनी वाढला आहे, ज्यातील ८०० रुपये महागाईमुळे खर्च झाले, तरीही तुमच्याकडे १२०० रुपये आहेत.
आता हे समजून घेऊयात की, २० टक्के नियम हा आहे की, २० टक्के तुम्हाला आणखी गुंतवायचे आहेत. जेव्हा तुम्ही २० हजार कमवत होता, तेव्हा त्यातून ४ हजार रुपये बचत करायचा. आता तुम्ही २२ हजार कमवत आहात, तर त्याचे २० टक्के होतात ४४००.
तुम्ही ४ हजार रुपये बचत करण्यापासून सुरुवात केली होती. त्यातील १ हजार रुपये विम्यासाठी गेले आणि ३ हजार रुपये उरले आणि तुम्ही प्रत्येक महिन्यात गुंतवणूक करू लागला. जर तुम्ही आता २०-२५ वर्षांचे असाल, तर ४०-४५ वर्षांचे होईपर्यंत २० वर्षांत तुम्ही दर वर्षी ३ हजारांपासून सुरू केलेली गुंतवणूक १५ टक्क्यांनी वाढवत असाल, तर तुम्हाला १२ किंवा १३ टक्क्यांच्या हिशोबाने ४० वयापर्यंत १ कोटी रुपये जमा होतील. म्हणजेच तुम्ही चाळिशीपर्यंत कोट्याधीश बनाल. २० वर्षांनंतर तुमच्याकडे १ कोटी असतील आणि तुम्ही आणखी ५-६ वर्षे थांबलात, तर तुमच्याकडे ५० वयापर्यंत २ कोटी रुपये येतील. यात दोन प्रश्न उद्भवू शकतात, त्यातील एक असा की, दोन कोटी जरी असले, तरीही तेव्हा यांचे मूल्य किती असेल.
हेही आपण पाहूयात. आजपासून २५-३० वर्षांनंतरही २ कोटी रुपयांचे मूल्य जर ५-६ टक्के महागाई पकडली, तरीही तुमच्याकडे त्यावेळी आजच्या हिशोबाने ६५-७० लाख रुपये असतील. एवढ्या पैशात तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. आणखी एक गोष्ट अशी की, तुमचे लग्न झालेले असेल. त्यामुळे तुमचा पार्टनरही कमावता असेल. त्यामुळे दोघेही कमावते असल्यामुळे खर्च वाढणार नाही. अनेक खर्च सामान्य असतात. घरखर्च तेवढा वाढणार नाही. तुमची बचत जास्त होऊ शकते. कधी पगारात १० टक्क्यांची वाढ मिळेल, कधी २० टक्क्यांची, तर कधी ३० टक्क्यांची. या गोष्टींचा हिशोबही आपण अद्याप केला नाही. त्यानंतर एक शेवटचा प्रश्न असा की, ५० वर्षांच्या वयात श्रीमंतीचा काय फायदा.
तर हे आपण एकदम वर्स्ट केसमध्ये पाहिलं आहे. मात्र, जर तुमच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळाला. जर तुम्ही जास्त गुंतवणूक केली, तर होऊ शकतं की, तुम्ही ३५-४० वयात श्रीमंत होऊ शकाल. त्यामुळे तेव्हा तुम्ही या पैशांचा मनासारखा वापर करू शकाल.
तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच, तुमच्या जॉब करणाऱ्या मित्रमंडळींनाही हे आर्टिकल नक्की शेअर करा.