Category: प्रेरणादायी

  • ना घरच्यांचा आधार, ना समाजाची मदत तरीही उभा केला करोडोंचा व्यवसाय…

    ना घरच्यांचा आधार, ना समाजाची मदत तरीही उभा केला करोडोंचा व्यवसाय… 

    आपण भारतीय म्हणून एकत्रितपणे जगात भारताचा झेंडा फडकावण्याच्या तयारीत आहोत आणि म्हणूनच इथे आपापसात असलेल्या स्पर्धेला जागा नाही. भातातील अनेक महिला सध्या उद्योजकतेच्या मार्गावर यशस्वीपणे मार्गक्रमण करीत आहेत, पैकी झिवामेच्या सर्वेसर्वा म्हणजेच रिचा कर यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. रिचा कर या केवळ यशस्वी उद्योजिका आहेत म्हणून त्यांचा प्रवास जाणून घ्यावा का? नाही! रिचा यांनी सुरु केलेला व्यवसाय कोणत्या क्षेत्रातील आहे, हा प्रवास खडतर का होता, त्यांनी किती खस्ता खाल्ल्या आहेत हे समजून घेण्यासाठी त्यांचा प्रवास जाणून घेतला पाहिजे. 

    रिचा कर: बालपण आणि शिक्षण

    रिचा कर यांचा जन्म १७ जुलै १९८० रोजी झारखंडमधल्या जमशेदपूर या शहरात झाला. इतर मध्यमवर्गीय घरांप्रमाणेच रिचा यांचे वडील नोकरी करायचे, तर आई घर सांभाळत असे, मात्र तरीही हे कुटुंब शिक्षणाचे महत्व जाणून होतं आणि रिचावर देखील हेच संस्कार करण्यात आले. परिणामी लहानपणापासूनच रिचाला शिक्षणाप्रती आदर वाटायचा आणि म्हणूनच त्यांनी BITS पिलानीमधून पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यावर रिचा यांनी अभियांत्रिकी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर ऍनालिस्ट (Software Analyst) म्हणून कामाला सुरूवात केली. नोकरी पत्करली असली तरीही नेहमीच त्यांच्या मनात Out of the Box जाऊन नाव कमावण्याची इच्छा होती. इतरांप्रमाणे ९ ते ६ काम करून खुश होणाऱ्यांपैकी त्या नव्हत्या आणि म्हणूनच नोकरीसोबत त्यांनी NMIMS मधून MBAची पदवी मिळवली. ही पदवी मिळवल्यानंतर अपेक्षित अनुभव देखील मिळवला. व्यवसाय म्हणजे काय? व्यवसाय कसा करावा? व्यवसाय करताना कोणते धोके येऊ शकतात? अशी बरीच महत्वाची माहिती मिळवून जन्म झाला तो झिवामेचा (Zivame)

    झिवामेचा खडतर प्रवास:

    झिवामेचा प्रवास इतरांपेक्षा खडतर का? कारण झिवामे हा ब्रँड महिलांसाठी बनणाऱ्या अंडरगार्मेंन्ट्सची (Undergarments) ऑनलाईन विक्री करतो. समाज कितीही बदलला असला तरीही काही बदल जोपर्यंत प्रत्येक माणूस मनापासून  समजून आणि उमजून करत नाही तोपर्यंत समाज बदलणार नाही. अंडरगार्मेंन्ट्स म्हटलं की, उगाच शरमेने आपण त्याबद्दल बोलायचे बंद होतो आणि विशेषकरून महिलांच्या अंडरगार्मेंन्ट्स बद्दल कुठेही चर्चा केली जात नाही. अशा प्रकारच्या सामाजिक चौकटीत रिचा यांनी मात्र सर्व बंधनं तोडून पुढे जाण्याचा विचार पक्का केला होता. 

    २००० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय आज आहे २६०००० कोटींची कंपनी 1 1

    व्यवसाय म्हटलं की किती पैसे गुंतवले जाणार? गुंतवलेली रक्कम परत मिळेल का? व्यवसाय यशस्वी होईल का? असे प्रश्न उपस्थित केले जातात मात्र रिचा कर यांनी सुरु केलेल्या व्यवसायासमोर असलेली प्रश्नपत्रिका वेगळीच होती. समाजाने या व्यवसायावर प्रश्नचिन्ह उभं करण्याआधीच त्यांच्या घरून आणि दुर्दैवाने त्यांच्या आईकडूनच सर्वात अगोदर या व्यवसायाला नावं ठेवण्यात आली. “मी काय माझी मुलगी ब्रा विकते असं सांगायचं का?” असं म्हणत त्यांनी मुलीच्या स्वप्नांना बळ द्यायच्या जागी उलटं मागे खेचलं. मुलगी समाजाच्या चौकटीबाहेर जात काही तरी वेगळं करू पाहतेय यासाठी तिचं कौतुक करण्याच्या जागी आईकडून लोकं काय बोलतील यावरच जोर देण्यात आला. कुठल्याही मुलीसाठी तिची आई ही आधारस्तंभ असते. असं म्हणतात दोन महिलांचं आपापसात कधीही पटत नाही, मात्र या उक्तीला फोल ठरवणारं एकमेव नातं असतं ते म्हणजे  आई आणि मुलीचं नातं. रिचा कर यांची आईच त्यांच्या विरोधात उभी असल्याने व्यवसायाच्या सुरुवातीलाच त्यांच्यासमोर कष्टांचा डोंगर उभा ठाकला होता. 

    घरातील अडचणी बाजूला सारायचं म्हटलं, तर उंबरठ्याबाहेर देखील अडचणींची भली मोठी रांग लागली होती. भारतात त्यावेळी महिलांच्या अंडरगारमेंट्ससाठी अशाप्रकारचं ऑनलाईन पोर्टल (Online Portal) असू शकतं अशी कल्पना सुद्धा जन्माला आली नव्हती. एकतर या कपड्यांची खरेदी करताना महिला बऱ्यापैकी दुकानात सुद्धा शरमतात आणि या परिस्थितीत अशा कपड्यांची ऑनलाईन विक्री होत असल्याची बातमी अनेकांच्या पचनी पडत नव्हती. महिलांसाठी अंडरगारमेंट्सची खरेदी सोपी व्हावी आणि समाजातील ही  पोकळी भरून निघावी म्हणून रिचा प्रयत्न करीत होत्या. अडचणी भले अनेक होत्या तरीही दृढ आत्मविश्वासाच्या जोरावर रिचा कर यांनी २५ ऑगस्ट २०११ पासून झिवामेच्या नावाने इ-कॉमर्स (E-Commerce) प्लॅटफॉर्मवरून व्यवसाय सुरु केला. 

    झिवामेने गाठलेली उंची:

    सुरुवातीला ज्या व्यवसायाला अनेकांकडून हिणवण्यात आलं किंवा उपेक्षा करण्यात आली तोच व्यवसाय आज दरवर्षी नवीन शिखरं काबीज करतोय. रिचा कर यांच्या व्यवसायाची उलाढाल आज  जवळपास २७० कोटी रुपयांच्या घरात आहे. भारतातील प्रत्येक पिनकोडवर डिलिव्हरी देण्यात हा व्यवसाय सक्षम आहे आणि दर दिवशी या प्लॅटफॉर्मला भेट देणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढतेय. झिवामेकडून अत्ताच्या घडीला ५००० लॉन्जरी स्टाईल (Lingerie Styles), ५० ब्रँड आणि १००० विविध साईझेस उपलब्ध आहेत. 

    एवढंच नाही तर झिवामेमध्ये लवकरच महिलांसाठीचे कपडे, फिटनेस वेअर आणि स्लीपवेअर समाविष्ट करण्यात येणार आहे. .जो व्यवसाय कधी एकेकेकाळी समाजाच्या चौकटीत बसत नव्हता आज त्याच व्यवसायाचा ग्राहकववर्ग या समाजाचा भाग आहे आणि म्हणून  ग्राहकांच्या  मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या रिचा यांचा अभिमान वाटतो. 

    आपली मुलगी किंवा सून जो व्यवसाय करू पाहतेय त्यामुळे आपण समजत तोंड दाखवू शकणार नाही अशा विचारसरणीच्या वातावरणातून उमलू पाहणाऱ्या रिचा इतरांना कायम प्रेरणा देत राहतील. परिवाराचा किंवा समाजतील कोणाचाही आधार नसताना रिचा यांनी केवळ स्वतःच्या मेहनत आणि जिद्धीच्या बळावर अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक गरजेसाठी वेळप्रसंगी त्यांनी स्वतःची जमापुंजी पणाला लावली होती. वर्ष २०१५-१६ मध्ये त्यांना ५४ कोटी रुपयांचं नुकसान सोसावं लागलं होतं तरीही त्या खचून गेल्या नाही. अशा कठीण काळात सुद्धा केवळ ग्राहकांवर विश्वास ठेऊन त्या नेहमी पुढे जात राहिल्या. रिचा त्यांच्या आत्तापर्यंतच्या व्यवसायाबद्ल बोलताना सांगतात की, “ आपण जर का एखादी चांगली गोष्ट करत असू, तर कुणालाही काहीही सिद्ध करून दाखवण्याची गरज नसते. तुम्ही प्रयत्न करत राहा आणि नंतर तुमच्या योग्यतेची साक्ष स्वतः देव देईल.” वर्ष २०१७ मध्ये रिचा कर यांनी कंपनीमधून CEO पदाचा राजीनामा दिला, मात्र तरीही त्या कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या सदस्या आहेत आणि त्यांची नेट वर्थ ७४९ रुपयांच्या आसपास आहे. कंपनीच्या आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये घडलेला सर्वात मोठा बदल म्हणजे वर्ष २०२० मध्ये रिलायन्स रिटेलकडून झिवामेचा ताबा मिळवण्यात आला होता. 

    आणखीन वाचा:

  • यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो: There is no shortcut to success.

    यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो: There is no shortcut to success.

    घरबसल्या लाखो-करोडो कमवा, तुमचे पैसे दुप्पट करा, नेटवर्क मार्केटिंग मधून करोडपती व्हा अशा अनेक फसव्या जाहिराती दररोज वर्तमानपत्रांमध्ये झळकत असतात. अशा झटपट आणि क्षणात श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी तरुण वर्ग फसतो आणि बळी पडतो. शेवटी अपयश आणि निराशा वाट्याला येते. मला कोणीतरी गॉडफादर भेटेल, श्रीमंत बनण्याची एखादी मोठी संधी चालून येईल किंवा देवाचा साक्षात्कार होईल अशी आपण अपेक्षा धरुन बसतो. अचानक राजयोग येऊन माझ्या आयुष्याला एका दिवसात कलाटणी मिळेल, माझं आयुष्य बदलून जाईल असं बहुतेकांना वाटत असतं. प्रयत्न, चिकाटी, परिश्रम, कष्ट, संघर्ष करण्याऐवजी सगळं सहज व्हावं, सहज मिळावं असं वाटत असतं. मात्र यशाला शॉर्टकट नसतो आणि शॉर्टकटने मिळालेलं यश हे शाश्वत देखील नसतं. अचानक एखादी संधी चालून येईल किंवा कोणीतरी आपल्या मदतीला येईल अशी आशा वाटणे हे स्वतःच्याच नाकर्तेपणाचे सर्वात मोठे लक्षण आहे. 

    जेव्हा आपला स्वतःचा स्वतःच्याच सामर्थ्यावर विश्वास नसतो तेव्हा अशा प्रकारच्या निरर्थक अपेक्षा आपण धरून राहतो. मित्रांनो तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचे आहे, जे कोणते ध्येय साध्य करायचे आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःला रणांगणात उतरावं लागेल, स्वतः झगडावं लागेल. आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाचं काही ना काही कारण आहे, ते कारण आपल्याला शोधायचंय आणि त्या कारणाच्या पूर्ततेसाठी काम करायचंय. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो त्यासाठी मेहनतीचा यज्ञ प्रत्येकाला पेटवावाच लागतो. शॉर्टकटने मिळालेल्या यशानं तुम्ही जितके लवकर वर जाता, तितक्याच लवकर तुम्ही खाली देखील येता. थ्री इडीयट्स मध्ये आमिर खानने म्हटल्याप्रमाणे “सक्सेस के पीछे मत भागो, मेहनत इतनी करो की सक्सेस खुद आपके पीछे आयेगी.

    Shortcut आणि Smartwork मध्ये काय फरक आहे?

    1. Shortcut :

    •    हे काम जलद पूर्ण करण्यासाठी वापरलेले छोटे मार्ग किंवा तात्काळ उपाय असतात.
    •    शॉर्टकट कधी कधी गुणवत्ता किंवा दीर्घकालीन परिणामांवर परिणाम करू शकतो.
    •   शॉर्टकटमध्ये फक्त काम पटकन संपवणे हे उद्दिष्ट असते, त्यामागे ठराविक उद्दिष्ट किंवा हेतू नसतो.

       उदाहरण: प्रोजेक्टमध्ये आवश्यक माहिती न वाचता थेट निष्कर्ष लिहिणे.

    2. Smart Work :

    •    हे काम चांगल्या पद्धतीने आणि नियोजनबद्ध मार्गाने कमी वेळात पूर्ण करण्याचे तंत्र आहे.
    •    स्मार्ट वर्कमध्ये तंत्रज्ञान आणि कौशल्य वापरून कामाचे नियोजन केले जाते.
    •    दीर्घकालीन यश आणि गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते.

    Shortcut वापरल्याने फक्त तात्पुरते फायदे मिळतात, तर Smart Work दीर्घकालीन आणि शाश्वत यशाकडे नेते.

    There is no shortcut to success.

    Smart Work म्हणजे काय?

    Smart Work म्हणजे कमी वेळेत अधिक परिणाम साधणे. मेहनत कमी पण ती मेहनत योग्य दिशेने करणे महत्त्वाचे आहे. शॉर्टकट घेताना विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. 

    Smart Work कसे करावे?

    कामाचे प्राधान्य ठरवा: सर्वात महत्त्वाचे काम आधी पूर्ण करा, त्याला सुरुवातीला प्राधान्य द्या.

    तंत्रज्ञानाचा वापर करा: तंत्रज्ञानाचा वापर करून कामे सोपी करा. उदा. ऑटोमेशन साधने.

    वेळेचे नियोजन: कामाचे छोटे भाग करा आणि त्यासाठी वेळेची मर्यादा ठरवा.

    काम सोपवा: आवश्यकतेनुसार इतरांना काम सोपवा.

    नवीन कौशल्ये शिकत रहा: नवीन तंत्र आणि पद्धती शिकून स्वतःला कायम अपडेट ठेवा

    यामुळे तुम्ही शॉर्टकट घेत असतानाही अधिक परिणामकारकपणे आणि हुशारीने काम करू शकाल.

    यश मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी :

    धैर्य आणि सातत्य: प्रत्येक टप्प्यावर मेहनत आणि सातत्य ठेवणे.

    योग्य नियोजन: कोणतेही काम व्यवस्थित योजना बनवून करणे.

    समर्पण: यशासाठी तुमच्याकडे ठाम ध्येय असणे आणि त्यासाठी निरंतर प्रयत्न करणे.

    शिकण्याची तयारी: चुका झाल्यावर त्यातून शिकणे आणि स्वतःला सुधारण्याची तयारी ठेवणे.

    आणखी वाचा :

  • भारतीय फुटबॉलचा नायक : सुनील छेत्री Real Life Story of Football Legend Sunil Chhetri

    भारतीय फुटबॉलचा नायक : सुनील छेत्री Real Life Story of Football Legend Sunil Chhetri

    यानंतर, जेव्हा भारताचा केनिया सोबत सामना होतो, तेव्हा मैदान हजारो प्रेक्षकांनी गच्च भरलेलं असतं आणि ‘इंडिया इंडियाचा’ जयघोष देत असतं.ते ट्विट होतं नुकत्याच निवृत्ती घेतलेल्या भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीचं. 

    आज आपण याच  “कॅप्टन फॅनटेस्टीक” चा  प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. सुनील छेत्रीचा जन्म ३ ऑगस्ट १९८४ रोजी सिकंदराबाद येथे झाला. लहानपणापासूनच मैदानी खेळांकडे आकर्षण असलेल्या सुनीलने  सुरुवातीला स्पोर्ट कोट्यातून चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा म्हणून हौसेखातर फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली, परंतु फुटबॉलने त्याच्या हृदयात घर केलं आणि मग पुढे त्यानेही स्वतःला या खेळात झोकून घेतलं.

    त्याने आपल्या करिअरची सुरुवात २००२ मध्ये कोलकत्याच्या मोहन  बागान क्लबपासून  केली आणि पुढे आपल्या मेहनतीच्या बळावर 2005 साली पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारतीय संघात पदार्पण केलं. त्याच्या खेळातील कौशल्यांमध्ये कमालीची स्पष्टता होती. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे लवकरच तो  संघातील एक प्रमुख खेळाडू बनला. सुनीलच्या प्रतिभेने भारताला नेहरू कप, SAFF चॅम्पियनशिप, AFC चॅलेंज कपसह अनेक विजय मिळवून दिले. सातत्याने गोल करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे तो जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय गोल स्कोररपैकी एक ठरला.

    F0RpWi8aIAAQ9BT
  • अंध असूनही वयाच्या २३व्या वर्षी उभी केली ५०० कोटींची कंपनी

    अंध असूनही वयाच्या २३व्या वर्षी उभी केली ५०० कोटींची कंपनी

    तो श्रीकांत, ज्याने त्याच्यावर होणाऱ्या भेदभावाविरुद्ध इथल्या सरकारला कोर्टात उभं केलं, तो श्रीकांत ज्याने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना वचन दिलं की, तो देशाचा पहिला अंध राष्ट्रपती बनून दाखवेल, तो श्रीकांत ज्याची चिकाटी आणि जिद्द पाहून रतन टाटा आणि देशातील मोठमोठ्या उद्योजकांनी त्याची पाठ थोपाटली आणि तोच श्रीकांत ज्याने असं कर्तृत्व गाजवलं की, त्याच्या आयुष्यावर चित्रपट सुद्धा आला. त्याने  हे खरं करुन दाखवलं की, स्वप्न पाहण्यासाठी डोळ्यांची गरज नाही, स्वत:वरील विश्वास तुम्हाला तुमचंय इप्सित गाठून देऊ शकतो. आज, नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून त्याच्या या प्रेरणादायी प्रवासावर एक नजर फिरवूया. 

    जन्मजात संघर्ष

    श्रीकांत बोल्ला याचा जन्म 7 जुलै 1991 रोजी आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम जवळील सीतारामपुरम येथे झाला. श्रीकांत जन्मतःच अंध होता, ज्यामुळे त्याच्या जीवनाला सुरुवातीपासूनच आव्हानात्मक वळण मिळाले. त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल होतं. वडील दामोदरराव आणि आई वेंकटम्मा हे साधारण शेती करणारे जोडपं, ज्यांचे महिन्याचं  उत्पन्न केवळ १६०० रुपये होतं. त्यामुळे लहानपणीच त्यांना गरिबीचा सामना करावा लागला. परिस्थिती आधीच हलाखीची होती आणि त्यात अंध मुलाच्या जन्मामुळे त्यांच्या कुटुंबावर अधिकच निराशा पसरली.

    Srikanth Bolla Education 2024 05 0eaebd9d52503763ca585db10d960f22

    गावातील काही लोकांनी सल्ला दिला की , “याला मारून टाका, नाहीतर आयुष्यभर दुःख सहन करावं लागेल. हा मुलगा कामाचा नाही; जन्मतः अंध असणं हे पाप आहे.” परंतु, श्रीकांतच्या आई-वडिलांनी कोणत्याही कथित शुभचिंतकाचं न ऐकता आपल्या मुलाला मोठं केलं. त्यांना विश्वास होता की, एक दिवस हा मुलगा चमत्कार करून दाखवेल.

    सुरुवातीला, वडिलांनी त्याला शेतीची कामे शिकवायचा प्रयत्न केला, पण अंधत्वामुळे त्याला ती कामे करता येत नव्हती. त्यामुळे वडिलांना वाटले की, त्याने शाळेत जाऊन अभ्यास करून नाव कमवावे. त्यानुसार, त्याला शाळेत दाखल करण्यात आले. त्यानेसुद्धा जिद्दीने शिक्षण घेतले. दिसत नसल्यामुळे, तो लहानपणी भावांच्या मदतीने शाळेत जात असे. शाळेतही त्याला नेहमी शेवटच्या बाकावर बसावे लागे. ही सगळी अवहेलना सहन करताना त्याला प्रचंड वाईट वाटत असे. सततच्या अवहेलनांमुळे एकदा त्याने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, वडिलांनी त्याला सांगितले की, शिक्षणाच्या माध्यमातूनच तुझे आयुष्य बदलू शकते. हे ऐकल्यानंतर श्रीकांतने कधीही मागे वळून पाहिले नाही. सगळं सहन करत, प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर त्याने शिक्षण पूर्ण केलं.

    शिक्षण मिळावं म्हणून सरकारला खेचलं कोर्टात 

    श्रीकांतला अंध मुलांच्या शाळेत टाकण्यात आलं. ही शाळा त्यांच्या गावापासून साधारणतः 400 किमी दूर होती, त्यामुळे त्याला  हैदराबादमध्ये जावं लागलं. त्याने हार न मानता मन लावून अभ्यास केला, परिणामी त्याला इयत्ता 10वीमध्ये 96 टक्के आणि 12 वीमध्ये 98 टक्के मार्क्स मिळवले. या गुणांच्या आधारे त्याने  पुढील शिक्षण विज्ञान शाखेत घेण्याचा निर्णय घेतला.

    तरीही, त्याला  विविध महाविद्यालयांमधून प्रवेश मिळवण्यात अडथळे आले, कारण त्या काळात अंध विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शाखेतून शिक्षण घेण्याची व्यवस्था अस्तित्वात नव्हती. पण श्रीकांतची ठाम इच्छा आणि जिद्द त्याला यशस्वी होण्यासाठी प्रेरित करत होती. त्याने आपल्या हक्कासाठी सरकारविरुद्ध कोर्टात केस दाखल केली आणि थेट सरकारलाच कोर्टात खेचलं. हा खटला सुमारे सहा महिने चालला आणि त्यात श्रीकांतला विजय मिळाला. त्यानंतर, त्याने विज्ञान शाखेत प्रवेश मिळवला आणि  विज्ञान शाखेतून अभ्यास करणारा  पहिला  दृष्टीहीन विद्यार्थी बनला. तेव्हा दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शाखेतील पुस्तकं उपलब्ध नव्हती, त्यामुळे श्रीकांतने त्यावर तोडगा काढला. त्याने  विज्ञान शाखेच्या पुस्तकांचे ऑडिओ व्हर्जन तयार करून अभ्यास सुरू केला. श्रीकांतचा हा संघर्ष आणि त्याच्या धाडसाने केवळ स्वतःच्या जीवनातच नव्हे, तर अंध विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या क्षेत्रातही एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.

    All you need to know about Srikanth Bolla

    भारतात उच्चशिक्षण मिळालं नाही म्हणून गाठली थेट अमेरिका

    श्रीकांतने १२ वी नंतर आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अप्लाय केलं. त्यांने देशातील विविध आयआयटी आणि आयआयएम्समध्ये पात्रता परीक्षेचा अर्ज भरला. परंतु, हॉल तिकीट येण्याऐवजी त्याला एक पत्र प्राप्त झालं, ज्यात स्पष्टपणे सांगितलं गेलं की, ‘तुम्ही अंध आहात म्हणून तुम्ही परीक्षेला बसू शकत नाही’. हे ऐकून श्रीकांतला खूप वाईट वाटलं, पण त्याने या अडचणीला नकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी ठामपणे सांगितलं की, ‘आयआयटी मला स्वीकारत नाही, तर मलाही आयआयटीची गरज नाही.’

    आयआयटीने त्याला नाकारलं, पण त्याच्या डोळ्यांत इंजिनिअर होण्याचं स्वप्न अजूनही होतं. त्या नकारानंतर, श्रीकांतने अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच एमआयटी आणि इंग्लंडच्या केंब्रिजमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला आणि चमत्कारिकरित्या, त्याला एमआयटीमध्ये प्रवेश मिळाला. त्यालाच मॅनेजमेंट सायन्समध्ये शिकण्यासाठी स्कॉलरशिपदेखील मिळाली, ज्यामुळे तो एमआयटीमध्ये शिकणारा पहिला आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी बनला. एमआयटी ही अमेरिकेमधील एक अत्यंत प्रतिष्ठित तांत्रिक संस्था आहे.

    श्रीकांतने दिलेल्या संधीचा उत्कृष्ट उपयोग केला आणि एमआयटीमध्ये अत्यंत मेहनतीने अभ्यास केला. अखेर, तो  एमआयटीमधून उत्तीर्ण होणारा पहिला आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी ठरला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला अमेरिकेतील अनेक कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळू लागल्या, पण श्रीकांतने अमेरिकेत काम करण्यासाठी नकार दिला. कारण त्याला आपल्या देशासाठी आणि देशातील लोकांसाठी काहीतरी करायचं होतं.

    असा सुरु केला यशाचा प्रवास 

    वर म्हटल्याप्रामाणे त्याला देशातील अंध, गरीब आणि दुर्बल लोकांसाठी काहीतरी चांगलं करायचं होतं आणि म्हणूनच तो शिक्षण पूर्ण करून मायदेशी परतला. आपल्या कामात गुंतल्यावरच श्रीकांतच्या कार्याची खरी गती सुरू झाली.

    1008738 srikanth bolla

    2012 मध्ये, श्रीकांतने भारतात “बोलंट इंडस्ट्रीज” नावाची ग्राहक खाद्य पॅकेजिंग कंपनी स्थापन केली. या कंपनीत पाने आणि कागदापासून पर्यावरणपूरक म्हणजेच इको-फ्रेंडली पॅकेजिंग तयार केली जाते. सुरुवातीला एकाच ठिकाणाहून सुरू झालेल्या या कंपनीने आज 7 युनिट्स उभारली आहेत. 2012 पासून कंपनीने मासिक 20% दराने वाढ नोंदवली आहे. कंपनीची वार्षिक उलाढाल 200 कोटींवर पोहोचली असून, तिचं मूल्य सुमारे 400 कोटींहून अधिक आहे.

    श्रीकांतच्या कंपनीने अशा प्रकारची प्रगती केली आहे की, 2021 मध्ये फोर्ब्सने त्याला “30 अंडर 30 एशिया” यादीत स्थान दिले. या यादीत स्थान मिळवणारे व्यावसायिक 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात आणि आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करत असतात. श्रीकांतने आपल्या कार्याने एक नवा मानक निर्माण केला आहे आणि त्याची प्रेरणादायक कथा आजच्या युवांसाठी एक आदर्श ठरली आहे.

    श्रीकांतच्या आयुष्यात एक असा टप्पा आला की, त्याला आपल्या व्यवसायासाठी निधी मिळवण्यात अडचणी येत होत्या. या कठीण परिस्थितीत, भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी श्रीकांतच्या कंपनीत 1.3 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीमुळे श्रीकांतच्या व्यवसायात लक्षणीय वाढ झाली. टाटा यांच्यासोबतच सतीश रेड्डी, एसपी रेड्डी, श्रीनी राजू, चलमला सेट्टी आणि रवी मंथ यांच्याही गुंतवणुकीचा फायदा श्रीकांतच्या कंपनीला झाला.

    आज श्रीकांतच्या कंपनीत 1500 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, ज्यात बहुसंख्य कर्मचारी दिव्यांग आहेत. श्रीकांतने आपल्या सहकाऱ्यांसह 8 जणांच्या टीमसह कंपनीची स्थापना केली होती, ज्यामध्ये बेरोजगार आणि अंध व्यक्तींना रोजगार दिला गेला. व्यवसायाच्या वाढीमुळे अन्य लोकांनाही रोजगार मिळाला. 

    पुरस्कार आणि मानसन्मान 

    श्रीकांतला त्याच्या यशाबद्दल त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये प्रतिष्ठित युवा सेवा पुरस्कार मिळाला जो समाजातील युवा वर्गासाठी असामान्य कार्यासाठी प्रदान केला जातो. या व्यतिरिक्त तेलुगु फाइन आर्ट्स सोसायटीचा युवा उत्कृष्टता पुरस्कार, तसेच त्याच्या उद्योजकीय क्षमतांना लक्षात घेऊन २०१५ साली युवा उद्योजक पुरस्कार दिला गेला. 2018 साली समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी बिझनेस लाइन यंग चेंज मेकर पुरस्कार दिला गेला,शिवाय, श्रीकांत भारताच्या अंध क्रिकेट संघातही खेळला आहे, जे त्याच्या विविध अंगभूत गुणांचं द्योतक आहे.

    त्याच्या आयुष्याचा एक प्रसंग येथे विशेष नमूद करावासा वाटतो. तो म्हणजे साल 2006 मध्ये त्या वेळचे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी ‘लीड इंडिया 2020’ सुरू केले, ज्यात तरुणांना मार्गदर्शन करून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याची संधी दिली गेली. श्रीकांतही त्या निवडक तरुणांमध्ये होता. कलाम सर सर्व मुलांशी संवाद साधत होते आणि त्यांना विचारले की, तुम्ही भविष्यात काय करणार आहात? त्या मुलांनी दिलेल्या उत्तरांमध्ये, नववीत शिकणाऱ्या श्रीकांतचे उत्तर राष्ट्रपतींना विशेष लक्षात राहिले. श्रीकांतने सांगितले की तो देशाचा पहिला अंध राष्ट्रपती बनू इच्छितो. श्रीकांतच्या या उत्तरात असणाऱ्या आत्मविश्वासामुळे कलाम सर प्रभावित झाले आणि त्यांनी त्याची प्रशंसा केली.

    Srikant Bolla 6

    श्रीकांतची कहाणी ही खरंच प्रेरणादायी आहे. त्याच्या जीवनातील संघर्ष आणि त्यावर मात करत त्यांनी केलेली प्रगती, आपल्यासाठी एक मोठा धडा आहे. श्रीकांतचे आयुष्य हे एक प्रेरणास्त्रोत आहे, ज्यातून आपल्याला शिकायला मिळते की कोणत्याही परिस्थितीत हार मानू नये आणि नेहमीच आपल्या ध्येयाच्या दिशेने धैर्याने आणि आत्मविश्वासाने वाटचाल करावी.

    आणखी वाचा

  • भारताचा इलोन मस्क: भाविश अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास | Bhavish Aggarwal: The Inspiring Story of Ola Founder

    भारताचा इलोन मस्क: भाविश अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास | Bhavish Aggarwal: The Inspiring Story of Ola Founder

    Bhavishaggarwal

    भाविश अग्रवाल यांचा जन्म 28 ऑगस्ट 1985 रोजी पंजाबमधील लुधियाना येथे झाला. बालपणापासूनच ते अतिशय बुद्धिमान आणि मेहनती होते. त्यांचे आई वडील हे दोघेही पेशाने डॉक्टर आहेत. वडील हे ऑर्थोपेडिक सर्जन तर आई ह्या पॅथोलॉजिस्ट आहेत. आयआयटी मुंबई येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी. टेक. पूर्ण केल्यानंतर भाविश यांनी  2007 मध्ये मायक्रोसॉफ्ट रिसर्च इंडिया येथे रिसर्च इंटर्न म्हणून आपल्या कॉर्पोरेट प्रवासाची सुरुवात केली. येथे त्यांनी टेक्नॉलॉजीवर आधारित विविध प्रकल्पांमध्ये काम केले. 

    मायक्रोसॉफ्ट रिसर्चमध्ये ते विविध टेक्नॉलॉजीवर संशोधन करत होते आणि या शोधाच्या प्रक्रियेतच त्यांना दोन पेटंट्स मिळाले, परंतु 9 ते 5 च्या सुरक्षित नोकरीत त्यांना समाधान मिळत नव्हतं. त्यांच्या मनात स्वतःच्या व्यवसायाची तळमळ निर्माण झाली होती. उद्योजक होण्याची त्यांची तीव्र इच्छा होती, पण सुरक्षित नोकरीमुळे ते अडकले होते. 

    त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे 2008 मध्ये मायक्रोसॉफ्टने त्यांना सहाय्यक संशोधक म्हणून नियुक्त केले. दोन वर्षांहून अधिक काळ मायक्रोसॉफ्टमध्ये काम करताना भाविशला एक उद्योजक म्हणून काहीतरी नवीन करण्याची ओढ लागली होती.

    मनात कसा आला ‘ओला’ सुरु करण्याचा विचार?

    भाविश अग्रवाल  सांगतात की ओला (Ola) ची सुरुवात त्यांच्या एका प्रवासाच्या वैयक्तिक वाईट अनुभवातून झाली. एकदा त्यांनी बेंगळुरूहून बंदीपूरला जाण्यासाठी एक कार बुक केली होती. मात्र, त्या प्रवासाचा अनुभव खूपच निराशाजनक होता. प्रवासाच्या दरम्यान अर्ध्या रस्त्यातच ड्रायव्हरने अतिरिक्त पैसे मागायला सुरुवात केली, शिवाय त्याचं वागणं आणि बोलणं अत्यंत उद्धट होतं. या गैरवर्तणुकीमुळे त्रासून भाविश यांना रस्त्यातच गाडी सोडावी लागली आणि उर्वरित प्रवास बसने करावा लागला.

    बसमधून प्रवास करताना भाविश यांच्या मनात वारंवार विचार येत होता की, अशा वाईट सेवेमुळे प्रवाशांचे  किती हाल होत असतील. त्यांना जाणवलं की त्यांच्या सारखे अनेक लोक असतील, ज्यांना दर्जेदार कॅब सेवा मिळत नाहीये. आणि त्याच वेळी त्यांच्या मनात एक कल्पना आली की, एक आपण अशी सेवा सुरू करावी जी लोकांना गुणवत्तापूर्ण, विश्वासार्ह आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा देईल.

    ओलाची सुरुवात आणि सुरुवातीचा संघर्ष

    कल्पकता आणि कौशल्य यांचा व्यवस्थित समन्वय साधला, तर नवनिर्मितीचा चमत्कार घडतोच! भाविश अग्रवाल यांनी हेच सिद्ध करून दाखवलं आहे. त्यांनी आपल्या दूरदृष्टी आणि धडपडीच्या जोरावर ओला कॅब्सची कल्पना प्रत्यक्षात आणली. व्यवसायात येणाऱ्या अडथळ्यांना त्यांनी संधीमध्ये बदललं आणि आपल्या जिद्दीने एक नवीन यशस्वी प्रवासाला सुरुवात केली.

    कॅब सेवा क्षेत्रातील सर्व कमतरता समजून घेतल्यानंतर, भाविश यांनी उत्तम ग्राहकांना उत्तम अनुभव आणि परवडणाऱ्या किमतींसह एक कॅब एग्रीगेटर कंपनी सुरू करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी जोधपूरमधील आणखी एक आयआयटीयन मित्र अंकित भाटी यांना सोबत घेतले. 3 डिसेंबर 2010 रोजी मुंबईत त्यांनी एकत्रितपणे ‘ओलाट्रिप्स डॉट कॉम’ वेबसाइट लॉन्च केली, ज्यामध्ये ग्राहक बाह्य प्रवासासाठी कार बुक करू शकत होते.

    सुरुवातीला, भाविश आणि अंकित यांच्याकडे या कल्पनेत गुंतवणूक करण्यासाठी फारशी आर्थिक क्षमता नव्हती आणि कोणत्याही गुंतवणूकदाराकडून आधारही मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या बचतीमधूनच ऑनलाइन ऍप्लिकेशन विकसित करण्यास सुरुवात केली. जून 2012 मध्ये, Olacabs ने एक मोबाईल ॲप लाँच केले. ओला ऍप लाँच झाल्यानंतर त्यांना ‘टायगर ग्लोबल मॅनेजमेंट’ कडून 5 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक मिळाली, तसेच अनुपम मित्तल आणि स्नॅपडीलचे कुणाल बहल यांच्याकडूनही निधी उभारला. सुरुवातीच्या वर्षांत, कॅब बुकिंग फर्मचे वापरकर्ते फोन कॉलद्वारे कॅब बुक करत होते. नंतर ॲप आल्यानंतर त्याचा वापर वाढण्यास सुरुवात झाली.

    पण प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता, भाविश अग्रवाल यांना भारतीय बाजारपेठेत ओला सादर करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एकदा नाही, तर प्रत्येक वेळी जेव्हा त्यांनी काहीतरी नवीन आणले किंवा नवीन बाजारपेठेकडे पाऊल टाकले, तेव्हा त्यांना संघर्ष करावा लागला.

    प्रारंभीच्या काळात, रेडिओ ट्रॅफिक सर्व्हिसेस आणि फास्टट्रॅकसारख्या स्थानिक मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करणे ओलासाठी अवघड होते, परंतु यामुळे भाविश थांबले नाहीत. या अडचणींनी त्यांना वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास आणि अनोख्या, पण समस्येचे निराकरण करणाऱ्या उपायांकडे पाहण्यास प्रवृत्त केले. याच वेळी ओलाने ऑल इंडिया परमिट असलेल्या ड्रायव्हर्सना कामावर घेण्यास सुरुवात केली आणि इंटरसिटी प्रवास सुविधा सुरू केली.

    ओलाचा यशस्वी प्रवास

    भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वात ओला आज भारतातील एक अग्रगण्य स्टार्टअप म्हणून उभी राहिली आहे. त्यांनी स्वतः नवीन कार विकत न घेता ड्रायव्हर्सना जोडण्यावर भर दिला, ज्यामुळे अनेक ड्रायव्हर्सना रोजगार मिळाला. त्यांनी ओला सेवेला एका अ‍ॅपद्वारे इंटरनेटशी जोडले, ज्यामुळे लोकांना राईड बुकिंगची सुविधा मिळाली. भाविश यांनी काही प्रसंगी स्वतः ओला ड्रायव्हर बनूनही सेवा दिली आहे.

    ओला कॅब सर्व्हिसची खासियत म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. हे अ‍ॅप लोकांना त्यांच्या राईडसाठी सर्व आवश्यक माहिती देते, ज्यात रेटिंग्स, रिव्ह्यूज आणि क्वालिटी चेकिंगसाठी सुविधा आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवरूनच सर्व काही नियंत्रित करता येते.

    भाविश यांची दूरदृष्टी आणि सेवा गुणवत्ता यामुळे ओलाचा व्यवसाय झपाट्याने वाढला. त्यांनी कमी दरात उत्कृष्ट सेवा देण्याचा विचार केला आणि 2013-14 मध्ये ओलाचा टर्नओव्हर सुमारे 418.25 कोटी रुपयांचा होता. आज, 75 हून अधिक शहरांमध्ये 1.75 लाखांपेक्षा अधिक लोक रोज ओला वापरतात. भाविश यांच्याकडे ओलामध्ये 6.7% हिस्सेदारी आहे, ज्यामुळे त्यांची नेट वर्थ महत्त्वाची ठरते. ओलाचे सध्याचे मूल्यांकन $4.8 बिलियन डॉलर्सपेक्षा (40000 कोटी रुपये) जास्त आहे, जे तिच्या यशाची साक्ष देते.

    2017 मध्ये, भाविश यांनी ओला इलेक्ट्रिकची स्थापना केली, जी इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि बाईक्स तयार करते. या व्यवसायाची वाढही लक्षणीय आहे.

    ऑक्टोबर 2023 मध्ये, ओला इलेक्ट्रिकने टेमासेक आणि भारतीय स्टेट बँकेकडून 3,200 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली. यामुळे त्यांच्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील विस्ताराला गती मिळाली. भाविश अग्रवाल यांनी दोन कंपन्या उभारल्या, ज्यांचे मूल्यांकन 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे आणि यामुळे त्यांच्या दूरदृष्टीची आणि नेतृत्वाच्या कौशल्याची झलक दिसते.

    cf70dda1 1e47 401d bb65 1f9b2b90affb Aggarwal

    भारतातील पहिले स्वदेशी  AI-प्लॅटफॉर्मकृत्रिम’ केलं लॉन्च 

    भाविश अग्रवाल यांनी 15 डिसेंबर 2023 रोजी भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) प्लॅटफॉर्म ‘कृत्रिम’ लाँच केले. हे प्लॅटफॉर्म सुमारे 22 भारतीय भाषा समजू शकते आणि सध्या ओपन एआयच्या चॅट जीपीटी तसेच गुगलच्या जेमिनीशी स्पर्धा करत आहे .

    लाँचिंग कार्यक्रमादरम्यान, अग्रवाल यांनी AI चॅटबॉटचे प्रात्यक्षिक दाखवले, जो चॅट जीपीटी आणि जेमिनीसारखचं प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम आहे. हा चॅटबॉट कवितांपासून कथांपर्यंत विविध प्रकारची सामग्री तयार करू शकतो. ‘कृत्रिम’ हे प्लॅटफॉर्म 22 भारतीय भाषा समजू शकते आणि 10 भाषांमध्ये मजकूर तयार करण्याची क्षमता ठेवते. कंपनीच्या मते, हे भारताचे पहिले पूर्ण-स्टॅक AI आहे, जे स्थानिक भारतीय ज्ञान, भाषा आणि डेटावर आधारित आहे. अग्रवाल यांनी हे साधन सर्वांसाठी उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.

    मानसन्मान आणि पुरस्कार  

    भाविश हे भारतातील सर्वात तरुण आणि श्रीमंत उद्योजकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. कठोर कॉर्पोरेट जीवनशैलीच्या पलीकडे, त्यांना सायकलिंग, स्क्वॅश खेळणे, आणि फोटोग्राफीची आवड आहे. ते एक लोकप्रिय फोटोब्लॉग देखील चालवतात, जिथे ते त्यांच्या छायाचित्रांद्वारे स्वतःचे विचार मांडतात.

    2013 मध्ये भाविश आणि Ola ला दक्षिण आशियाच्या mBillionth पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हा पुरुस्कार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्कृष्टता दर्शवणाऱ्या स्टार्टअप्सना दिला जातो, त्याच वर्षी, Internet and Mobile Association of India (IAMAI) द्वारे Ola ला वर्षातील सर्वोत्कृष्ट स्टार्टअप म्हणून गौरवण्यात आले. 2017 मध्ये, द इकॉनॉमिक टाइम्सने भाविश अग्रवाल यांना त्यांच्या नेतृत्वाच्या कौशल्यासाठी ET सर्वोत्कृष्ट आणि तेजस्वी पुरस्काराने सन्मानित केले.

    या व्यतिरिक्त भाविश उत्तम गुंतवणूकदार, व्याख्याते आणि उत्तम छायाचित्रकार सुद्धा आहेत. ते नवीन उद्योजकांना नेहमीच प्रोत्साहन देत असतात. त्यांनी बऱ्याच नवीन स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. ज्यात ओव्हा, कार्किनोस ऑफ बिझनेस, सुपरसूट, टॉर्क मोटर्स, हॅशलर्न अशी काही उदाहरणं देता येतील. उद्योगात  आणि समाजसेवेतील त्यांच्या यशाव्यतिरिक्त, भाविश एक वक्ते आणि लेखक म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी अनेक मंचांवर आपल्या विचारांचे आदानप्रदान केले आहे आणि उद्योजकतेबद्दल अगणित लेख लिहिले आहेत.

    आज, भाविश आपल्या नवीन उपक्रमाच्या दिशेने लक्ष केंद्रित करत आहेत. आपल्या साहसी मनासह, त्यांनी अक्षय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान बदल आणि वाढत्या ऊर्जेच्या गरजा या जगासमोरील सर्वांत महत्त्वाच्या आव्हानांपैकी आहेत आणि भाविश या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय विकसित करण्याबद्दल वचनबद्ध आहेत. भाविश म्हणतात, “मला विश्वास आहे की अक्षयऊर्जा ही भविष्याची गरज आहे आणि या क्षेत्रात भरीव योगदान देणे हे माझे ध्येय आहे. 

    आणखी वाचा

  • कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती:

    कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती:

    सलग 17 वेळा अपयश 18 व्या वेळा यश! शेअरचॅट चे सीईओ अंकुश सचदेव यांची यशोगाथा…

    हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील या ओळी मनाला प्रेरणा देणाऱ्या आहेत. जीवनात यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करणं किती महत्वाचं आहे हे या ओळींमधून स्पष्ट होतं. अंकुश सचदेवा यांच्या यशाची कहाणी या ओळींचा उत्तम उदाहरण आहे. त्यांनी एक नाही, दोन नाही, तर तब्बल 17 वेळा अपयश पचवून त्यांच्या इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाने सोशल मीडिया क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केलं आहे.

     प्रारंभिक जीवन आणि शिक्षण 

    अंकुश सचदेवांचा जन्म आग्रा, उत्तर प्रदेश येथे झाला. त्याची आई सरकारी रुग्णालयात काम करत होती आणि वडील व्यापारी होते. त्यांनी आपली प्रारंभिक शिक्षण आग्रा येथील स्थानिक शाळेत घेतले. लहानपणीच त्यांना तंत्रज्ञान आणि नवउद्यमशीलतेची आवड होती. त्यांनी उच्च शिक्षणासाठी आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश घेतला आणि तेथून अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. आयआयटी कानपूरमधील शिक्षणाने त्यांना तंत्रज्ञान आणि नवउद्यमशीलतेची गोडी लावली. आयआयटीमधील शिक्षणानंतर अंकुशने त्यांच्या करियरची सुरुवात करण्यासाठी आपली कल्पकता आणि मेहनत एकत्र केली.

    करियरची सुरुवात आणि अडथळे 

    आयआयटी कानपूरमधून संगणक विज्ञानात (computer science) बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीची पदवी घेतल्यानंतर, आणि तब्बल 17 वेळा वेगवेगळ्या स्टार्टअपमध्ये अपयशी झाल्यानंतर अंकुशने आपल्या दोन मित्रांसह, भानु प्रताप सिंह आणि फरिद अहसान यांच्या सहकार्याने 2015 साली ShareChat ची स्थापना केली. तत्पूर्वी त्यांनी मे ते जुलै 2014 पर्यंत मायक्रोसॉफ्टमध्ये इंटर्न म्हणून काम केले. Sharechat स्थापन तर झाले. मात्र हा प्रवास सोपा अजिबात नव्हता. समोर अनेक आव्हानं होती. अडचणी होत्या. ज्यात आर्थिक अडचणी, तांत्रिक समस्या आणि विविध इतर आव्हानं समाविष्ट होती. तसेच सुरवातीला वापरकर्त्यांचा प्रतिसाद मिळवणे हे सर्व खूप आव्हानात्मक होते. मात्र त्यांनी कधीच हार मानली नाही. त्यांच्या मेहनत, समर्पण आणि दृढ संकल्पामुळे त्यांनी शेअरचॅटच्या यशाचा मार्ग तयार केला.

    ShareChat चा उद्देश भारतीय भाषांमध्ये वापरकर्त्यांना एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रदान करणे होता, जो त्यांच्या भाषिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करतो. या प्लॅटफॉर्ममुळे भारतीय भाषांना एक नवा आयाम मिळाला आणि विविध भाषिक समुदायांना एकत्र येण्याचे साधन मिळाले. त्यांनी हे व्यासपीठ एकूण १५ भारतीय स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिले. ज्यात मराठी, गुजराथी, हिंदी, मल्याळम, पंजाबी, तेलगू, तामिळ, ओरिया, कन्नड, आसामी, हरियानवी, राजस्थानी, भोजपुरी आणि इंग्रजी यांचा समावेश आहे.

    l81720230509180205

    सुरुवातीच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कमाईपेक्षा अधिक युजर्स वाढीकडे लक्ष केंद्रित केले. जो मुलगा कधीकाळी त्याच्या कॉलेजमध्ये प्लेसमेंटसाठीही बसला नाही त्याने सहकाऱ्यांसोबत मिळून आपल्या दृढ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर बघता बघता 40 हजार कोटींची कंपनी उभी केली, हे खरंच “धडपडणार्‍यांच्या हाती यश येतेच” या उक्तीला सिद्ध करणारे कार्य ठरले.

     सफलता आणि विस्तार

    ShareChat यशस्वी झाल्यानंतर, अंकुशने Moj नावाचा एक शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म लाँच केला. TikTok बंद झाल्यानंतर, Moj ने भारतीय बाजारपेठेत जलद गतीने आपले स्थान निर्माण केले. या प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांना छोट्या व्हिडिओज तयार करणे आणि शेअर करणे शक्य झाले. Moj ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली आणि ती आज एक अत्यंत लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म बनली आहे.

    ShareChat आणि Moj ने भारतातील डिजिटल कंटेंट कंझम्पशन मध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. ShareChat चे 160 दशलक्ष पेक्षा जास्त मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत.

    अंकुश सचदेवा आणि त्यांची टीम नेहमीच नवीन फिचर्स आणि तंत्रज्ञान वापरण्यावर जोर देतात, ज्यामुळे ShareChat आणि Moj वापरकर्त्यांचा अनुभव सतत सुधारत असतो.

    व्हिजन आणि नेतृत्व 

    अंकुश सचदेवांचे व्हिजन भारताच्या लहान शहरांतील आणि ग्रामीण भागांतील लोकांना डिजिटल दुनियेचे दरवाजे उघडणे आहे. त्यांचे ध्येय आहे की, प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या भाषेतून आणि संस्कृतीतून ऑनलाईन सामग्रीचा उपभोग घेण्याची संधी मिळावी. त्यांनी त्यांच्या टीमसोबत मिळून सातत्याने नवविचार  केले आहेत आणि भारतीय टेक्नोलॉजी उद्योगात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, ShareChat आणि Moj हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स सतत सुधारत आहेत आणि वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करत आहेत.

    Unicorn All Profiles Jul12 10

    गुंतवणूक आणि जागतिक विस्तार 

    अंकुशला SAIF Partners, DCM श्रीराम, ट्विटर (एक्स), Lightspeed India Partners, Venture Highway, India Quotient आणि Hero MotoCorp सारख्या प्रमुख गुंतवणूकदारांकडून महत्त्वपूर्ण पाठिंबा मिळाला. शेअरचॅटने अखेरीस $40 दशलक्ष उभे केले. 2021 मध्ये, ShareChat ने गुंतवणूकदारांना आकर्षित करून $400 दशलक्ष जमा केले आणि 2022 मध्ये, टाइम्स ग्रुप, Google आणि Temasek Holdings कडून $300 दशलक्ष जमा केले.

    ShareChatने अनेक जागतिक बाजारपेठांमध्ये विस्तार केला आहे, ज्यामध्ये अमेरिका, युरोप आणि इतर देशांचा समावेश आहे. कंपनीने महत्त्वपूर्ण गुंतवणूक मिळवली, या निधीचा उपयोग प्लॅटफॉर्मच्या वैशिष्ट्यांची सुधारणा आणि वापरकर्त्यांच्या अनुभवाला अधिक आकर्षक बनवण्यासाठी केला जात आहे.

    व्यक्तिगत जीवन 

    अंकुश एक साधारण आणि विनम्र व्यक्तिमत्वाचे धनी आहेत. त्यांना नवीन तंत्रज्ञानात रस आहे आणि ते भारतीय भाषांच्या प्रचार-प्रसारासाठीही काम करीत आहेत. त्यांनी त्यांच्या यशाचं श्रेय त्यांच्या टीमला आणि भारतीय वापरकर्त्यांना दिलं आहे. ते त्यांच्या कौटुंबिक जीवनातही तितकेच समर्पित आहेत. 

    अंकुश सचदेवा यांचा ‘फोर्ब्स’ कडून देखील सन्मान झाला आहे. ‘फोर्ब्स इंडिया 30 अंडर 30’ च्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला होता. ही यादी अशा तरुण उद्योजकांची ओळख करून देते ज्यांनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

    आणखीन वाचा:

  • अंतः अस्ति प्रारंभः

    अंतः अस्ति प्रारंभः

    या विचाराचा अर्थ असादेखील होतो की जीवनातील प्रत्येक घटनेचा एक प्रवास असतो – एक सुरूवात, एक मध्यवर्ती काळ आणि एक शेवट. परंतु हा शेवट म्हणजे अंतिम नाही, अंत नाही. तर तो एका नवीन प्रवासाचा प्रारंभ असतो. प्रत्येक संकट, आव्हान, किंवा पराभव यामध्येही नवीन काहीतरी शिकण्याची आणि अनुभवांची सुरुवात असू शकते.

    image 10

    आपण हे देखील लक्षात घेतले पाहिजे की जीवनातील अपयशाच्या क्षणांना “अंत” म्हणून पाहणे हा मर्यादित दृष्टिकोन असू शकतो. यामुळेच “अंतः अस्ति प्रारंभः” हा विचार आपल्याला नेहमीच पुढे पाहण्याची प्रेरणा देतो. आपण कोणत्याही स्थितीला अंत म्हणून पाहू नये, तर त्या क्षणाचे एक नवे पाऊल म्हणून स्वागत करावे.

    या विचारामध्ये एक पारदर्शकता आहे. जी आपल्याला शिकवते की, प्रत्येक घटना, अनुभव आणि घडामोडी जीवनाच्या एका मोठ्या प्रवाहाचा भाग आहेत. आयुष्य म्हणजेच सतत चालणारी एक यात्रा आहे, ज्यात प्रत्येक अंत आणि प्रारंभ ह्या एका साखळीतील दोन वेगवेगळ्या कड्या आहेत. शेवट हीच सुरुवात या विचारधारेचं अजून एक महत्वाचं अंग म्हणजे परिवर्तन आणि पुनर्जन्म. जीवनातल्या एखाद्या घटनेचा शेवट म्हणजे संपणं नाही, तर त्यातून काहीतरी नवीन उगम पावण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, एखादी नोकरी, नातं किंवा जीवनातील एखादा टप्पा संपतो तेव्हा सुरुवातीला खूप दु:ख होतं, पण त्यातून नवीन संधी आणि अनुभव येतात.

    या विचारधारेला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर, आपण आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक शेवटाला एक नवीन संधी म्हणून स्वीकारू शकतो. त्यामुळे, बदल घडवून आणण्याची आणि स्वतःला नव्याने घडवण्याची प्रेरणा मिळू शकते. यामुळे आपल्याला संकटं आणि आव्हानं यांच्याशी अधिक आत्मविश्वासाने सामना करता येतो.

    शेवटी, अंतः अस्ति प्रारंभ: हाच विचार आपल्याला आत्मविश्वासाने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून जीवन जगायला शिकवतो. त्यामुळे, कोणत्याही घटनेच्या किंवा स्थितीच्या अंताचा विचार करताना, त्यातून काय नवीन सुरू होऊ शकते, याचा विचार करावा आणि नव्या अध्यायाचं शांत मनाने आणि जोमाने स्वागत करावे. पडणं हे कधीच अपयश नसतं, तर खरं अपयश हे पडून राहण्यात असतं.

    शेवट हीच सुरुवात:

    जेव्हा सगळं संपलंय असं आपल्याला वाटतं तेव्हा ती खरी सकारात्मक विचार करण्याची आणि नवीन सुरुवात करण्याची वेळ असते. या विचारधारेला अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर, आपण आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक शेवटाला एक नवीन संधी म्हणून स्वीकारलं पाहीजे. त्यामुळे, बदल घडवून आणण्याची आणि स्वतःला नव्याने घडविण्याची प्रेरणा मिळू शकते. यामुळे आपल्याला संकटं आणि आव्हानं यांचा अधिक आत्मविश्वासाने आणि निडरपणे सामना करता येईल.  

    image 12

    नव्याने सुरुवात करा: 

    जीवनात कसेही प्रसंग आले, काहीही घडलं, सगळं संपलं असं वाटू लागलं की, स्वत:च्या मनाला सांगायचं की इथून होय इथूनच मला परत माझी नवीन सुरुवात करायची आहे. झालेल्या चुका लक्षात ठेऊन त्यात इष्ट बदल करून मला पुन्हा अचूकतेकडे नव्याने धावायचं आहे. उशिरा का होईना केलेली सुरुवात ही कधीच न केलेल्या सुरुवातीपेक्षा कधीही श्रेष्ठ आहे. त्यामुळं सुरुवात करायला कधीही घाबरू नका.  सगळं संपलं तरी त्यात आशेचा नवा किरण शोधा. तोच किरण तुमच्या जीवनात यशाचा प्रकाश घेऊन येईल. पुन्हा सुरुवात केल्याने व्यक्तीला आशा आणि प्रेरणा मिळते. 

    1. स्वत:वर विश्वास

    2. सकारात्मकता 

    3. ध्येय ठरविणे 

    4. आवश्यक तयारी 

    5. To Do List

    6. कामाचं विश्लेषण 

    7. प्रत्यक्ष कृती  

  • रुबाबदार आयुष्य जगा : आरोग्यसंपन्न जगा

    रुबाबदार आयुष्य जगा : आरोग्यसंपन्न जगा

    काल झोपताना त्याने उद्याच्या दिवसात करावयाच्या सर्व कामांची यादी केली, ती त्याची नेहमीची सवयच होती. पण नेहमीप्रमाणे व्यायामासाठी वेगळा वेळ काढायचं त्याच्याकडून राहूनच गेलं. खरंच आपण आपल्या आरोग्याला किती साधारण स्थान दिलंय नाही का? खरंच आपल्या आयुष्यात आरोग्याचं महत्व तितकं साधारण आहे का? गांभीर्याने स्वतःला प्रश्न विचारला तर नाही हेच उत्तर येईल. मुळात आरोग्याशिवाय माणसाला काय करणं शक्य आहे हाच सर्वात मोठा कळीचा मुद्दा आहे. 

    चार दिवानांचं घर जरी आपल्याकडे असलं; पण मणक्यात गॅप असला, तर चटईवर झोपायला लागतं. दहा साखर कारखान्यांचे Shares आपल्याकडे असतील; पण डायबिटीस असेल, तर तो डॉक्टर चमचाभर सुद्धा साखर खाऊ देत नाही. घरी हरभऱ्याची एकरभर शेती आहे; पण ते चणे खायला तोंडात दातच नसतील, तर करणार काय? तोंडासमोर पंचपक्वानांची मेजवानी आहे, पण पचनसंस्थाच जर काम करत नसेल, तर कोणाला दुःख सांगणार…

    Ayurvedic header

    बोध हाच की चांगलं आरोग्य नसणं हे दात नसलेल्या वाघासारखं आहे. अर्थहीन. तरुणपणी पैसा कमावण्यासाठी आपण शरीराची ओढाताण करतो आणि म्हातारपण आलं की हेच शरीर जपण्यासाठी कमावलेलं धन खर्च करतो. मेहनत करू नका असं अजिबात म्हणायचं नाहीये, पण या कष्टमय प्रवासात शरीराशी मात्र कधीच तडजोड करू नका, कारण हे शरीर जर आपल्यावर रुसलं, तर समोर असणारं स्वर्गसुख देखील व्यर्थ ठरतं. आपल्या शरीरातील अवयवांची जर किंमत काढायला आपण गेलो, तर ती शेकडो कोटींच्या घरात जाईल. खिशात जर पाचशेच्या चार नोटा असल्या, तर आपण किती वेळा चाचपडून पाहतो, मग एवढी कोट्यावधींची शरीररुपी संपत्ती आपल्याजवळ असताना आपण त्याची किती काळजी घेतो. खूप कमी, खरच खूप कमी. का? कारण ते मोबदल्याशिवाय मिळालंय. या शरीरासाठी आपण कोणते पैसे मोजले नाहीत. आपल्या आई-वडिलांना आपण त्याचं भाडंही देत नाही. म्हणजे फुकटच मिळालेली चीजवस्तू. साधं एक उदाहरण पाहा. आपण आपला चष्मा जास्त जपतो, की डोळे जास्त जपतो? 90% वाचकांचे उत्तर चष्मा हेच असेल. तो चष्मा ठेवायचं खोकं वेगळं, त्याला पुसण्याचा रुमाल वेगळा. ती काच स्वच्छ करायला liquid वेगळं. आणि त्या चष्म्याच्या कितीतरी पटीने महाग असणारे आपले डोळे. त्यांचं काय… ॐ दुर्लक्षाय नमः फक्त एकदा ओल्या पाण्याचा हात फिरवला, की झाले आमचे डोळे स्वच्छ. किती मोठी शोकांतिका. पण याच शोकांतिकेवर वेळ जायच्या आधी विचार व्हायला हवा. आपल्या आरोग्यासाठी आपणच जागं व्हायला हवं. चांगल्या करिअरसाठी जसे आपण झगडतो ती धडपड चांगल्या आरोग्यासाठी देखील व्हायलाच हवी. उत्तम आरोग्याला आपण जर अलंकार मानत असू, तर त्या अलंकाराची बडदास्त देखील आपणच ठेवायला हवी ना!

    Health insurance

    सुदृढ शरीराच्या महत्त्वावर रामदास स्वामी फार सुंदर म्हणतात

    “शक्तीने पावती सुखे | शक्ती नसता विटंबना ||

    शक्तीने नेटका प्राणी | वैभव भोगता दिसे ||”

    आणखी वाचा

  • यशस्वी जीवनाचा मूलमंत्र; चिकाटी आणि सातत्य

    यशस्वी जीवनाचा मूलमंत्र; चिकाटी आणि सातत्य 

    एखादं लहान मूल जेव्हा जन्माला येतं, तेव्हा ते लगेच चालायला शिकत नाही. अनेकदा चालण्याच्या प्रयत्नात ते धडपडतं, पण पडल्यावरदेखील ते चालणं सोडत नाही. सरतेशेवटी त्याच्या प्रयत्नांना यश मिळतं आणि ते मूल चालायला शिकतं. त्या लहान मुलाला कोणी चालण्याचे धडे दिलेले असतात का? तर नाही. ते स्वतःच शिकतं आणि प्रयत्न करायला लागतं. सांगायचं काय, ‘तर केलं तर नक्की होतं.’ process खूप महत्वाची आहे. त्या process मध्ये टिकून राहणं त्याहून जास्त महत्वाचं. जो थांबणार त्याचा शेवट निर्विवाद आहे आणि जो टिकून राहणार, त्याचं यश सुद्धा हमखासच. टिकून राहणं आणि करत राहणं एवढीच समज घ्यायची. आयुष्याचा प्रवास, यशाचा प्रवास हा कमी अधिक प्रमाणात सारखाच. वेगळं काय तर प्रवासाचे टप्पे आणि येणारे थांबे. फक्त करत राहायचं आणि लढत राहायचं. 

    image

    कोणत्याही कामात सातत्य ठेवण्याची काही महत्त्वाचे कारणे आहेत :

    प्रगती: सतत प्रयत्न केल्याने आपण हळूहळू, परंतु निश्चितच प्रगती करतो. सातत्यामुळे आपल्याला आपल्या कामात सुधारणा दिसून येतात. आपणच आपल्यात बदल अनुभवतो. 

    निपुणता: सातत्याने एकाच कामात गुंतलेले राहिल्यास त्या क्षेत्रात निपुणता आणि कौशल्य वाढते. त्या कामाचं सुयोग्य तंत्र आपल्या लक्षात येते आणि ते काम आपल्या अंगवळणी पडतं.

    आत्मविश्वास: नियमितपणे प्रयत्न केल्याने आत्मविश्वास वाढतो, कारण यशाची शक्यता वाढते आणि आपण आपली क्षमता ओळखतो. ते काम आपण करू शकतो हा विश्वास आपल्याला वाटतो.

    अनुकूलता: सातत्याने काम केल्याने मन आणि शरीर त्या कामाशी अनुकूल होते, ज्यामुळे कामात वेग येतो आणि कार्यक्षमतेत वाढ होते. कामाचा वेग आणि अचूकता अधिकाधिक वाढते.

    लक्ष्य प्राप्ती: सातत्यामुळे आपण आपल्या ठरवलेल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याची शक्यता अधिक असते. आपल्याला आपलं ध्येय अधिकाधिक जवळ दिसू लागतं. त्या ध्येयप्राप्तीची खात्री वाटू लागते.  

    समयसूचकता : नियमितपणे आणि सातत्याने काम केल्याने वेळेत काम पूर्ण करण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे इतर कामांसाठी वेळ उपलब्ध होतो. आपण स्वत: आपली personal life आणि corporate life मध्ये प्रामाणिक आणि punctual राहायला लागतो. 

    कौशल्य विकास : सातत्यामुळे आपण आपले कौशल्यं आणि तंत्र अधिकाधिक सुधारू शकतो. नियमित सराव आणि प्रयत्न केल्याने कोणत्याही गोष्टीत निपुणता मिळते.

    ध्यान आणि एकाग्रता : सातत्यामुळे आपल्या कामावर लक्ष केंद्रित राहते. मन एकाग्र होते. यामुळे विचलित न होता आपले उद्दिष्ट साध्य करण्याची क्षमता विकसित होते.

    स्वयंशिस्त: सातत्याने काम केल्याने आपल्यात स्वयंशिस्त येते, काटेकोरपणा येतो. जी फक्त कोणतेही उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच नाही, तर आपले जीवन अधिक अनुशासित आणि परिणामकारक बनविण्यासाठी आवश्यक आहे.

    आत्मसंतोष: सातत्याने प्रयत्न करून जेव्हा आपण आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचतो, तेव्हा त्यातून मिळणारी आत्मसंतोषता आणि अतीव आनंद खूप महत्त्वाचा असते.

    image 1

    सातत्य ठेवल्यामुळे होणारे फायदे खालीलप्रमाणे : 

    आव्हानं ओळखण्याची क्षमता: सातत्याने काम करत राहिल्याने कोणत्या ठिकाणी अडचणी येतात किंवा समस्या उद्भवतात, हे ओळखणे सोपे होते. यामुळे त्या समस्यांवर उपाय शोधणे व त्या सोडविणे अधिक सोपे होते.

    दृढ इच्छाशक्ती: सातत्याने प्रयत्न करत राहिल्यामुळे इच्छाशक्ती मजबूत होते, जे अडचणींचा सामना करण्यासाठी महत्त्वाचे असते.

    संयम आणि सहनशीलता: सातत्य हे संयम आणि सहनशीलता वाढवते. यामुळे आपल्याला तात्काळ यश न मिळाल्यास निराश न होता पुढे जाण्याची प्रेरणा मिळते.

    शारीरिक व मानसिक आरोग्य: नियमित व्यायाम किंवा योगासारख्या सातत्याने केलेल्या गोष्टींमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते.

    विश्वासार्हता: सातत्यामुळे आपली विश्वासार्हता वाढते. इतर लोक आपल्यावर विश्वास ठेवतात आणि आपली जबाबदारी स्वीकारतात.

    दीर्घकालीन यश: सातत्य हे दीर्घकालीन यशाचा पाया बनते. सातत्याने मेहनत घेतल्यास आपण आपल्या क्षेत्रात दीर्घकालीन यश मिळवू शकतो.

    कुटुंब व समाजातील नाते: सातत्याने दिलेला वेळ आणि प्रयत्न कुटुंब व सामाजिक नात्यांना बळकटी देतो. नियमित संवाद आणि सहभागामुळे नाते अधिक घनिष्ट होते.

    चांगल्या सवयींची निर्मिती: सातत्याने काहीतरी करत राहिल्यामुळे चांगल्या सवयी निर्माण होतात, ज्या आपले जीवन सुधारण्यात मदत करतात.

    आणखीन वाचा

  • ऑलिम्पिक गाजवणारा बीडचा शिलेदार : अविनाश साबळे

    ऑलिम्पिक गाजवणारा बीडचा शिलेदार : अविनाश साबळे

    बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा गावातील एका साधारण शेतकरी कुटुंबात  १३ सप्टेंबर १९९४ ला जन्मलेल्या अविनाशची घरची परिस्थिती तशी जेमतेमच. त्याचे आई वडील वीटभट्टी कामगार होते. आईवडिलांचा संघर्ष आणि घरातील दारिद्र्य उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या अविनाशची स्वप्नं मात्र छोटी नव्हती. सुरुवातीच्या काळात त्याच्याकडे प्राथमिक सुविधा नसताना, त्याने विविध खेळांमध्ये भाग घेतला. अविनाशला लहानपणापासून धावण्याचा सराव होता. घरापासून शाळा लांब असल्याने तो धावत शाळेमध्ये जायचा.  ग्रामीण भागात संसाधनांची कमतरता असताना, अविनाशने मातीच्या रस्त्यावर आणि साध्या साधनांवर प्रशिक्षण घेतले. त्याच्या पदरी कित्येक वेळा निराशा आणि अपयश आले; पण त्याचा आत्मविश्वास आणि चिकाटीने त्याला कायम पुढे जाण्यासाठी प्रेरित केले. 

    अविनाशने आपल्या शालेय जीवनात धावण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्यात यशही मिळवले. १२ वी झाल्यानंतर तो भारतीय लष्करामध्ये भरती झाला. तिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आणि धावण्यासाठीप्रोत्साहित केले. २०१८ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अविनाशने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्य पदक जिंकले. त्यानंतर २०१९ साली जागतिक क्रीडा स्पर्धेत त्यांनी नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. 

    गरीब परिस्थितीचे चटके सोसत त्याने आज बीड ते पॅरिस ऑलिम्पिक असा संघर्षमय प्रवास पूर्ण केला. फायनलमध्ये पदक जरी मिळाले नसले तरी कोणत्याही प्रकारची खेळाची पार्श्वभूमी नसताना अविनाशने घेतलेली एवढी मोठी झेप ही निःसंशय कौतुकास्पद आहे. 

    मंजिल उन्हीं को मिलती है;
    जिनके सपनो में जान होती है; 
    पंख से कुछ नहीं होता; 
    हौंसलों से ही उड़ान होती है।

    जय हिंद

    आणखी वाचा: