Tag: लेखमालिका

  • परिस्थिती कशी का असेना निर्णयक्षमता महत्त्वाची!

    परिस्थिती कशी का असेना निर्णयक्षमता महत्त्वाची!  

    घरची स्थिती मध्यमवर्गीय. वडील छोटेसे किराणा दुकान चालवायचे. थोडी शेती, त्यात वय वाढत चाललेले, घरच्यांना काळजी वाटू लागली व नातेवाईकांमधीलच एका दहावी नापास झालेल्या मुलीशी फारसा विचार न करता त्याचे लग्न लावून दिले आणि किराणा दुकान इथून पुढे तूच चालव म्हणून वडिलांनी सांगितले.

    त्यामुळे आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याला खूप मोठे महत्व आहे. एकदा गेलेली वेळ परत येत नाही व वेळेनुसार अनेक संधी निघून जातात व शेवटी हताश होण्याशिवाय पर्याय नसतो. लोकांना भेटा, नवनवीन गोष्टी वाचा, podcast ऐका, मोठ्या लोकांचे interviews पहा त्यातून जेवढं शिकता येईल तेवढं शिका. निर्णय घेण्यास वेग द्या व स्वतःला सुनील होण्यापासून वाचवा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • रोज ५ किमी चाला, ५ पाने वाचा व श्रीमंत व्हा!

    रोज ५ किमी चाला, ५ पाने वाचा व श्रीमंत व्हा!

    जगभरात श्रीमंत व्यक्तींच्या आचरणाचे अध्ययन करण्यात आले, त्यात असे लक्षात आले की, जवळपास सर्व श्रीमंत आणि यशस्वी व्यक्ती नियमित वाचन करतात, तर गरीब लोक टीव्ही पाहतात व मोबाईलवर टाईमपास करतात. एखाद्या पुस्तकाच्या वाचनाने, त्यातील एखाद्या घटनेने आयुष्यात मोठी प्रेरणा मिळून आपले जीवन बदलू शकते. विविध विषयांची चांगली पुस्तके आपल्याला जगण्याची नवी दिशा दाखवतात. आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम करतात.

    ग्रंथ आमुचे साथी… ग्रंथ आमुच्या हाती…

    ग्रंथ उजळती अज्ञानाच्या… अंधाराच्या राती…

    या ग्रंथांच्या तेजामधुनी, जन्मा येते क्रांती,

    ग्रंथ शिकविती माणुसकी अन ग्रंथ शिकविती शांती

    निराश जीवा धीर धरूनी पुढे घेऊनी जाती…

    वाचन करणाऱ्या माणसाची कल्पनाशक्ती विकसित होते व तो नवनवीन गोष्टी शिकत राहतो. तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करणारे, तुम्हाला प्रेरणा देणारे, तुम्हाला क्रिएटिव्ह थिंकिंगला (कल्पक विचारशक्ती) चालना देणारे माहितीपूर्ण वाचन करा. राजकीय चिखलफेक, अपघात, बलात्कार, खून मारामाऱ्या, भ्रष्टाचार, आंदोलने, मोर्चे, खंडणी, आत्महत्या अशा संबधी बातम्या व माहिती देणारे वाचन करू नये, त्यामुळे तुमचे मन व विचारही कलुषित होतात.

    रोज ५ किमी चालण्याने रक्तदाब, हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते. रोज चालायची सवय मेंदूसाठी फायदेशीर ठरते. चालण्यामुळे ताणतणाव कमी होतो. मुडही फ्रेश राहतो. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.

    त्यामुळे आयुष्यात श्रीमंत व निरोगी होण्यासाठी माणसाने रोज किमान ५ किमी चालावे, किमान ५ पाने वाचावी व पाच वाक्ये लिहावीत आणि मोबाईल व टीव्ही यांचा गरजेपुरताच वापर करून त्यापासून दूर व्हावे, मग बघा श्रीमंती तुमच्या घरी कशी आपोआप चालत येईल.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • व्यापाराची त्रिसूत्री : चतुराई, मेहनत, नीती

    व्यापाराची त्रिसूत्री : चतुराई, मेहनत, नीती

    व्यापार हा चतुराईने होत असतो. तुमच्याकडे खूप भांडवल, खूप हुशारी आहे, तुम्ही खूप मेहनती आहात, तरीही व्यापारात यशस्वी होण्यासाठी चतुराई खूप महत्वाची आहे. फक्त मेहनतीनेच व्यापार होत असता, तर काबाडकष्ट करणारे सर्वजण व्यापारी व श्रीमंत झाले असते. चतुराई म्हणजे योग्य वेळी, योग्य निर्णय घेण्याची कला… योग्य व्यक्ती, संस्थांशी संवादाची कला… कधी थांबायचे, कधी माघार घ्यायची, कधी व कसे आक्रमक व्हायचे? कधी बचत करायची, कधी खर्च करायचा याचे तारतम्य. मार्केटची हवा ओळखून आपला बिझनेस चालविणे होय.

    नीती म्हणजे तुमचा व्यवसाय करण्याच्या पध्दतीमुळे मार्केटमध्ये तुमचा एक प्रकारचा नावलौकिक तयार होतो. तुमची व्यापार करण्याची हातोटी, व्यवहार करण्यातील प्रामाणिकपणा, ग्राहकांना विक्री पश्चात सेवा, योग्य ब्रँड व व्यक्तीबरोबर नेटवर्क यामुळे ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात त्यात तुमचे नाव व ब्रॅंड तयार होतो व व्यवसाय मोठा होतो. याचा मूलभूत पाया व तयारी तुमच्या नीतीपासून तयार होते. तुमच्या कर्मचाऱ्यांशी तुम्ही प्रोफेशनल वागत असाल तर अधिक चांगले लोक तुम्हाला येऊन मिळतील. तुम्ही पुरवठादारांची देणी वेळेत देणार असाल, तर अधिक क्रेडिट मिळते व मोठी पत तयार होते.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • जीवनात व व्यवसायात ब्रेकचा वापर करावा

    जीवनात व व्यवसायात ब्रेकचा वापर करावा  

    गाडी वेगाने कशामुळे धावते? असा प्रश्न एका व्याख्यानात श्रोत्यांना केला, तेव्हा अनेकांनी इंजिन, पेट्रोल, ॲक्सलरेटर, चाक अशी उत्तरे दिली. ही उत्तरं बरोबर आहेत. परंतु मित्रहो थोडा वेळ विचार करा, जर समजा गाडीला ब्रेकच नसता, तर तुम्हाला गाडी खूप लांब चालविता आली असती का? तर नाही. वेगावर नियंत्रण ठेवता येण्यामुळेच जगातील कोणतीही गोष्ट किंवा वाहन चालते. ज्या गोष्टीला थांबण्यासाठी ब्रेक नाही अशा गोष्टी वादळाप्रमाणे सुसाट जातात व धडकून नष्ट होतात. जशी आकाशातून पडलेली उल्का किंवा नियंत्रण हरवून बसलेलं एखादं विमान. गोष्टी थांबल्या आणि योग्य ठिकाणी थांबल्या तर फायद्याच्या असतात.

    व्यवसाय करत असताना कधी किती वेगाने जायचं, कधी ब्रेक मारून थांबायचं हे कळायला हवं. सीसीडी ब्रॅंड आपल्या कॅफेच्या शाखा धडाधड उघडत गेला. पण वेगाने पुढे जायच्या नशेत आपल्या हातून काय चुका होत आहेत याचा अंदाज न आल्याने एक दिवस याच करोडोंची उलाढाल करणाऱ्या ब्रॅंडच्या मालकाला आत्महत्या करायची वेळ आली. थांबल्याने, हळूहळू चालल्याने फरक पडत नाही. फक्त कधी थांबायचं, कुठे थांबायचं आणि किती वेळ थांबायचं याचं विजडम जवळ हवं…  

    तुम्ही असा ब्रेक घेता का? तुमचा अनुभव कसा होता? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • फ्रँचायझीचे फायदे | Benefits of Franchise Business

    फ्रँचायझीचे फायदे | Benefits of Franchise Business

    Benefits of Franchise Business – हल्ली फ्रँचायझीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. चहा पासून ते सलूनपर्यंत सगळे व्यवसाय फ्रँचायझी मॉडेलवर चालत आहेट. स्वतःचा नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या तुलनेत फ्रँचायझी सुरु करणे हे कितीतरी पटीने सुरक्षित आहे. तर आजच्या या व्हिडीओत जाणून घेऊया फ्रँचायझी व्यवसायाचे फायदे. 

    Benefits of Franchise Business 1

    Franchise Business चा पहिला फायदा आहे 

    1. व्यवसाय करताना किमान धोका: –

    स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या तुलनेत फ्रँचायझी सुरु करण्यात असलेली जोखीम कमी असते.  स्वतःच्या नवीन व्यवसायात अपयशाची शक्यताही असते. मात्र फ्रँचायझी प्रकारात त्याचे प्रमाण अत्यल्प असते. नवीन व्यवसाय सुरू करताना बिझनेस मार्गदर्शन घेण्यापासून ते  मार्केटिंग करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी नवीन कराव्या लागतात. परिणामी, फ्रँचायझरच्या सर्व सूचनांनुसार तुम्ही काम केले गेले तर नफा येण्यास जास्त वेळ लागणार नाही. फ्रँचायझीला ज्या मार्गावरून जावे लागते ते फ्रँचायझी मालकाने आधीच पार केलेले असते त्यामुळे  त्याला उत्पन्न मिळण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच फ्रँचायझी व्यवसायात तुमच्या स्वतःच्या व्यवसायापेक्षा तुलनेने खूप कमी धोका असतो.  

    २. प्रशिक्षण :

    एक चांगला फ्रँचायझर नवीन फ्रँचायझीसाठी प्रशिक्षण देतो. हे सहसा त्या फ्रँचायझरच्या मुख्यालयात किंवा फ्रँचायझीच्या ठिकाणी केले जाते. यामुळे व्यवसायातील सर्व पैलूंसाठी एक परिपूर्ण प्रशिक्षण मिळते व फ्रँचायझी व्यवसायास योग्य दिशा व मार्गदर्शन मिळते.

    ३.  खरेदी व जाहिरात :

    व्यावसायिक मोठ्या ब्रँडची सर्वच उत्पादने आणि सेवा घेण्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात असे नाही किंवा मोठ्या स्केलवर जाहिरात करू शकत नाहीत. परंतु फ्रँचायझी व्यवसायात फ्रँचायझी धारकास फ्रँचायझरची बाजारपेठेतील परचेसिंग पावर व त्यांचे मार्केटिंग तंत्र बहुतेक वेळा शिकवले जाते. फ्रँचायझर ब्रँड्स त्यांच्या फ्रँचायझीना जाहिरात साहाय्य व मार्गदर्शनही करतात, याचा त्यांना फायदा होतो. शिवाय फ्रँचायझींची संख्या वाढत गेल्यास आपोआप ग्राहकांमध्ये जागरूकता वाढत जाते व त्यांना माहिती मिळत जाते. हा जाहिरातीसाठी सर्वात मोठा फायदा असतो. एकमेकांपासून जवळ असलेल्या फ्रँचायझी एकत्रितपणेसुध्दा जाहिरात करून खर्च कमी करू शकतात.

    4. बिझनेस सिनर्जी :

    जे फ्रँचायझी विकत घेतात, ते त्या फ्रँचायझर कंपनीचा हिस्सा बनतात. त्यांच्या ब्रँड परिवाराचा हिस्सा बनतात, जिथे सर्वजण व्यवसाय वृध्दीसाठी एक कार्य करत असतात. बऱ्याचदा फ्रँचायझर त्यांच्या फ्रँचायझी धारकांकडून मिळणाऱ्या सर्व सूचनांचा व नवीन कल्पनांचासुध्दा विचार करतात व ते आपल्या योजनांमध्ये व इतर फ्रँचायझीसोबत शेअर करतात.

    ४. सल्ला, संशोधन आणि विकास: 

    फ्रँचायझींना त्यांच्या व्यावसायिक अडचणींना सामोरे जाताना बरेच परिश्रम घ्यावे लागत असतात, त्यावेळी त्यांना फ्रेंचायझरकडून मदत होत असते आणि फ्रँचायझरच्या प्रतिनिधीकडून  सर्व व्यावसायिक घटकांबद्दल आवश्यक मदत पुरवली जाते. फ्रँचायझींसाठी नवीन उत्पादने/सेवा उपलब्ध करून देण्यासाठी फ्रँचायझर सतत संशोधन व विकासयोजना बनवत असतात. त्याचाही लाभ फ्रँचायझींना होत असतो.

    Benefits of Franchise Business 1 1

    कमीत कमी भांडवलामध्ये मोठ्या ब्रँडचे मालक बनविणाऱ्या या फ्रँचायझी मॉडेल मध्ये ग्राहकांची विश्वसनीयता सहज प्राप्त होते, नफ्यामधील मोठा हिस्सा फ्रँचायझीला प्राप्त होतो. व्यावसायिकांसाठी लागणाऱ्या परवानग्याही  ब्रॅंडकडूनच मिळतात. फ्रँचायझी फ्रेंचायझरला कमी खर्चात नवीन व्यवसाय क्षेत्रात प्रवेश करण्यास सक्षम करते.  व्यवसाय कार्याचा विस्तार करण्याचा हा तुलनेने जलद मार्ग आहे.  फ्रँचायझींचा वापर फ्रँचायझरद्वारे उत्पादित किंवा पुरवलेल्या वस्तू आणि सेवांसाठी आउटलेट म्हणून केला जाऊ शकतो. हे उत्पादन आणि खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्था प्रदान करते. 

    आजची माहिती फ्रँचायझीचे फायदे | Benefits of Franchise Business कशी वाटली ही कमेन्टमध्ये नक्की कळवा. लेख आवडल्यास लाइक आणि शेअर करा. आणि नवी अर्थक्रांतीच्या you tube चॅनलला आताच subscribe करा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • What is a Franchise Model? | फ्रँचायझी मॉडेल म्हणजे काय?

    What is a Franchise Model? | फ्रँचायझी मॉडेल म्हणजे काय?

    फ्रँचायझी ही काही नवीन संकल्पना नाही. खरंतर ही मध्ययुगीन काळापासून चालत आलेली delivery system आहे. जुन्या काळात जमिनीचे मालक त्यांची जमीन शेतकऱ्यांना किंवा मजुरांना शिकारीसाठी, शेतीसाठी किंवा गुरे चरण्यासाठी देत असत. त्यासाठी काही अटी व नियम घालून दिलेले असत. आधुनिक फ्रँचायझिंगची सुरुवात १७३१ साली बेंजामिन फ्रँकलिन आणि थॉमस व्हाईटमार्श यांच्यातील प्रिंटिंग सेवांसाठी झालेल्या फ्रँचायझीच्या डीलने झाल्याचे मानण्यात येते.

    आज हजारो उद्योगांत आणि क्षेत्रांत लाखो फ्रँचायझी काम करत आहेत. फ्रँचायझी या क्षेत्राने आजवर कोट्यावधी लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे आणि अब्जावधी डॉलर्सची उलाढाल या क्षेत्रात होत आहे. या क्षेत्रामुळे अर्थव्यवस्थेला मजबुती मिळाली असून financial stability च्या शोधात असणाऱ्यांसाठी किफायतशीर पर्याय उपलब्ध करून दिला आहे. पण फ्रँचायझी म्हणजे नक्की काय? फ्रँचायझीचे काय प्रकार आहेत? ही व्यवस्था कशी चालते?

    फ्रँचायझी हा व्यवसायाचा असा प्रकार आहे, ज्यात एक व्यक्ती म्हणजेच फ्रँचायझी; फ्रँचायझरचे ब्रॅंडिंग, ट्रेडमार्क आणि बिझनेस मॉडेल वापरून व्यवसाय चालवत असतो. या प्रकारामध्ये फ्रँचायझी आणि फ्रँचायझर यांच्यात कायदेशीर आणि व्यावसायिक करार झालेला असतो. म्हणजेच फ्रँचायझीला फ्रँचायझरचे नाव आणि इतर व्यवस्था वापरण्याची रीतसर परवानगी मिळालेली असते.

    फ्रँचायझरचे बिझनेस मॉडेल वापरण्याच्या म्हणजेच वस्तू विकण्याच्या किंवा सेवा प्रदान करण्याच्या तसेच training, guidance या गोष्टींच्या बदल्यात फ्रँचायझरला फ्रँचायझी फी द्यावी लागते. फ्रँचायझीला ठरवून दिलेल्या अटी व नियम मान्य असल्याच्या करारावर स्वाक्षऱ्या कराव्या लागतात. प्रत्येक फ्रँचायझी ही कंपनीची एक स्वतंत्र शाखा म्हणून काम करते.

    आता पाहूया फ्रँचायझर आणि फ्रँचायझी यांच्यातील संबंध

    फ्रँचायझर म्हणजे मूळ कंपनी जी आपल्या कंपनीच्या वस्तू किंवा सेवा विकण्याचे अधिकार प्रदान करते. फ्रँचायझरने स्वतःचा व्यवसाय, ब्रँड आणि त्याची कार्यप्रणाली विकसित केलेली असते. फ्रँचायझी देण्याचे निश्चित झाल्यावर फ्रँचायझर त्यांच्या कंपनीचे बिझनेस मॉडेल वापरण्याचे अधिकार समोरच्याला देतात.

    तर फ्रँचायझी म्हणजे अशी व्यक्ती जी आधी नमूद केलेल्या वस्तू किंवा सेवा विकण्याचे अधिकार विकत घेते. जरी फ्रँचायझी आधीच चांगल्या प्रकारे चालू असलेला व्यवसाय विकत घेत असतील, तरीसुद्धा मार्केटमध्ये विश्वास संपादन करण्यासाठी, हुशार माणसे निवडण्यासाठी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतली पाहिजे. फ्रँचायझी/फ्रँचायझर यांचे संबंध परस्पर आदर, समजूतदारपणा, सहकार्य यांवर आधारित असले पाहिजेत, कारण त्यातच दोघांचाही फायदा आहे.

    फ्रँचायझीला फ्रँचायझरकडून कोणत्या गोष्टी मिळतात

    १) फ्रँचायझी डिस्क्लोजर डॉक्युमेंट (FDD)

    जेव्हा फ्रँचायझी विकत घेण्यासाठी आपण उत्सुकता दर्शवतो, तेव्हा फ्रँचायझर त्यांचे ‘फ्रँचायझी डिस्क्लोजर डॉक्युमेंट’ (FDD) आपल्यासमोर ठेवतात. व्यवसायाची एकूण उलाढाल, कर्ज, उत्त्पन्न, वेगवेगळे शुल्क, फ्रँचायझीच्या जबाबदाऱ्या यांची विस्तृत माहिती FDD मध्ये नमूद केलेली असते.

    २) Financing options

    उत्सुक आणि प्रामाणिक व्यक्तींना काही फ्रँचायझर वित्तपुरवठ्याचे पर्याय उपलब्ध करून देतात. जसे की, कर्ज मिळवण्यास मदत करणे किंवा पैसे भरण्याचे सुलभ पर्याय उपलब्ध करून देणे.

    ३) Training and operational guidance

    फ्रँचायझरकडून फ्रँचायझीला एक मॅन्युअल सुद्धा मिळते, ज्यामध्ये संपूर्ण काम कसे चालते याबाबत माहिती दिलेली असते. तसेच व्यक्तिशः किंवा ऑनलाईन प्रशिक्षणसुद्धा अनेक फ्रँचायझर देतात. मॅन्युअलमध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, गुणवत्ता मानके, व्यवस्थापन प्रणाली, त्यांची जबाबदारी आणि इतर बारीकसारीक तपशील असतो. Training हे कंपनीच्या main office मध्ये, personally, online पद्धतीनेसुद्धा दिले जाते.

    EmployeeTraining

    ४) Marketing & Advertising

    फ्रँचायझरने फ्रँचायझीला मार्केटिंग बाबतसुद्धा सहकार्य प्रदान करणे अपेक्षित आहे. मग ते टीव्हीच्या, रेडिओच्या माध्यमातून असो किंवा सोशल मिडिया आणि ईमेलच्या माध्यमातून. सहसा फ्रँचायझर फ्रँचायझीकडून यासाठी लागणारा खर्च वसूल करतात.

    ५) Cooperation म्हणजेच सहकार्य

    फ्रँचायझीने व्यवसायात प्रवेश केला आणि दैनंदिन कामकाज सुरु झाले की, रोज अनेक नवीन प्रश्न, समस्या समोर येत जातात. फ्रँचायझरने कराराची मुदत संपेपर्यंत या समस्या सोडवण्यासाठी फ्रँचायझीला सहकार्य करणे अभिप्रेत आहे. तसेच फ्रँचायझीसुद्धा इतर सहकारी फ्रँचायझींशी संपर्क साधू शकतात. त्यांच्याकडून सल्ला घेऊ शकतात.

    आता वळूया फ्रँचायझींच्या प्रकारांकडे

    फ्रँचायझी बिझनेस मॉडेलचे (Franchise Model) दोन प्रकार आहेत. प्रोडक्ट डिस्ट्रिब्युशन फ्रँचायझी मॉडेल आणि बिझनेस फॉरमॅट फ्रँचायझी मॉडेल

    १) प्रोडक्ट डिस्ट्रिब्युशन फ्रँचायझी मॉडेल (Franchise Model)

    या प्रकारात फ्रँचायझर वस्तू बनवतो आणि फ्रँचायझी ती विकतो. थोडाफार फरक सोडल्यास हा प्रकार सप्लायर-डीलर सारखाच आहे. यातील महत्त्वाचा फरक म्हणजे फ्रँचायझी प्रकारात फ्रँचायझीला फक्त त्याच ब्रँडच्या किंवा उत्पादनाशी निगडित वस्तू विकता येतात, तर सप्लायर डीलर प्रकारात डीलर इतर ब्रँडची उत्पादने सुद्धा विकू शकतो.

    Franchise Model 1 1

    २) बिझनेस फॉरमॅट फ्रँचायझी मॉडेल (Franchise Model)

    हा बहुतांशी वापरला जाणारा प्रकार आहे. यात फ्रँचायझी फ्रँचायझरचे नाव आणि पद्धत वापरून उत्पादने बनवू शकतो आणि त्याच नावाने विकू शकतो. उदाहरणे – केएफसी, मॉन्जिनीस, डॉमिनोज पिझ्झा, इत्यादी.

    Franchise Model 2

    तर आजचा लेख तुम्हाला फ्रँचायझी मॉडेल म्हणजे नक्की काय, फ्रँचायझर आणि फ्रँचायझी म्हणजे काय त्यांच्यातील संबंध कसा आहे आणि फ्रेंचायझिचे नेमके प्रकार कोणकोणते आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळालीच असतील. असेच काही interesting लेख वाचण्यासाठी नवी अर्थक्रांतीच्या you tube चॅनलला आताच subscribe करा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • यशस्वी होण्यासाठी टाईम मॅनेजमेंट (Time management) कसे करावे?

    यशस्वी होण्यासाठी टाईम मॅनेजमेंट (Time management) कसे करावे?

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासुन शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे; यशस्वी होण्यासाठी टाईम मॅनेजमेंट (Time Management) कसे करावे… करायची सुरवात?

    आयुष्य म्हणजे तरी काय? जन्मापासून मृत्यूपर्यंत तुमच्याकडे असणारा वेळच. जो हा वेळ अत्यंत प्रभावीपणे वापरतो, तोच आयुष्यात यशस्वी होतो. आपला वेळ शास्त्रशुध्द पध्दतीने कसा वापरावा, जेणेकरून तुम्ही जीवनात व उद्योगात यशस्वी व्हाल? प्रथम आज, या महिन्यात, या वर्षी, या आयुष्यात तुम्हाला काय करायचं आहे, ते ध्येय निश्चित करा व त्यानुसार टाईम मॅनेजमेंट (Time Management) करा. रोज सकाळी शांतपणे दिवसभराच्या नियोजनासाठी १५ मिनिटे द्या. प्राधान्यक्रमानुसार कामाची यादी बनवा, कामाचे चार भाग बनवा.

    पहिली – अत्यावश्यक व अर्जंट अशी कामे पहिल्यांदा करा;

    दुसरी – महत्वाची पण अर्जंट नाहीत, ती त्यानंतर करा;

    तिसरी – अर्जंट पण महत्वाची नाही, ती त्यानंतर करा;

    चौथी – अर्जंटही नाहीत व महत्वाची नाहीत, ती कामे शेवटी वेळ उरला तर करा.

    दिवस सुरू करताना वहीमध्ये कामाची नोंद करा व दिवस संपताना ती पूर्ण झाल्याची खात्री करा. नाही म्हणायला शिका, प्रत्येक फोन घेतलाच पाहिजे किंवा लगेच घेतला पाहिजे, ईमेल किंवा फेसबुक किंवा व्हॉटसअपवर आलेल्या मेसेजला लगेच रिप्लाय केलाच पाहिजे असे नाही. पहिल्यांदा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. फोन कितीही वाजू दे, अत्यंत महत्वाचा असेल, तरच उचला. ई-मेल, व्हॉटसअपला ठराविक वेळेनंतर रिप्लाय द्या. सकाळी एकदा, दुपारी एकदा, सायंकाळी एकदा असा प्रत्येकी १५ मिनिटांचा वेळ द्या. सर्व कामे स्वतः करण्याचा आग्रह धरू नका कमी महत्वाची, वेळखाऊ कामे इतरांकडून करून घ्या. ज्याचे काम त्याने करावे, वेळेचा व पैशाचा अपव्यय त्यामुळे टळतो.

    आज जीवनातील अनेक लोकांच्या एकाच वेळी संपर्कामुळे डिस्ट्रॅक्शन खूप वाढले आहे, ते कमी करा, त्यामुळे तुमचा वेळ वाचेल. नातेवाईक, मित्र, क्लब इत्यादींचा उगाचच फापट पसारा वाढवू नका. सिलेक्टिव्ह व्हा, ज्याच्यांशी आपले जमते अशांशी सबंध व संपर्क ठेवा, त्यामुळे तुमचे आयुष्यातील वेळ वाचून सुखी, श्रीमंत व समृध्द होत राहाल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतःची काळजी घ्या, वेळेवर उठणे, थोडासा का होईना व्यायाम करणे, वेळेवर योग्य आहार घेणे याकडे लक्ष द्या. किमान आठ तास झोप व्हायला हवी, तरच दिवसभराचे जीवनाचे टाईम मॅनेजमेंट (Time Management) तुम्हाला साधता येईल.

    तुम्ही तुमचे टाइम मॅनेजमेंट (Time Management) कसे करता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेल ला आताच सब्स्क्राइब करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी
  • फुकट वाटा, पण उधार नको

    फुकट वाटा, पण उधार नको

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे फुकट वाटा, पण उधार नको… करायची सुरवात?

    उधारी आणि व्यवसाय याचं नातं वेगळंच आहे. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. उधार द्यायचं नाही, तर धंदा होत नाही आणि उधार दिलं तर वसूल होत नाही. उधारी देऊन नुकसान होण्यापेक्षा धंदा न करता गप्प बसलेलं काय वाईट? लोकांना फुकट वाटायला तुम्ही काय कुबेराचे नातेवाईक आहात का? उधारी देण्याच्या बदल्यात तुम्ही चिंता विकत घेता व चिंता ही चिता समान असते, जी माणसाला हळूहळू मारते. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. आपल्या हक्काचे, कामाचे पैसे दुसऱ्याकडे पडून आहेत, त्याचा वापर आपण करू शकत नाही यापेक्षा वाईट गोष्ट कोणती.   

    उधारीवर बाजारात खूप मजेशीर किस्से आहेत. “उधार एक जबरदस्त जादू है। हम उधार देंगे आज, तो कल आप गायब हो जाओगे।”, “उधार ८० साल के उपरवाले को मिलेगा, वो भी उनके माता पिता को पुछकर।”

    उधार दिल्याचे व्यवसायात फायदे आणि तोटे

    १) डोक्यात नकारात्मक विचार बंद होतात.

    २) तुम्ही सकारात्मक योजना व प्लॅनिंग करू शकता.

    ३) उधार देऊन संबध बिघडण्यापेक्षा उधारी नाकारून बिघडलेले बरे.

    ४) माल नाही खपला तर तो दानधर्म करा, पुण्य तरी मिळेल; पण उधार देऊन डोक्याला नसता ताप नको.

    ५) उधारीतून वाद म्हणजे विकतचे भांडण होऊ शकते.

    ६) उधारीमुळे बुद्धिमान, कौशल्यपूर्ण व्यावसायिक आयुष्यातून बरबाद होतो.

    ७) उधारीपुढे नुकसान झाल्यास तुमचा चांगुलपणा तुम्हालाच भोवतो व जग तुम्हालाच खुळे समजते, तुम्ही फेल बिझनेसमन आहेत असा समज होतो.

    ९) माल नाही खपला तर तो दानधर्म करीन, पुण्य तरी मिळेल पण उधार देऊन डोक्याला नसता ताप नको.

    प्रमाणाबाहेर उधारी म्हणजे व्यवसायाचा सर्वात मोठा शत्रू. “एक रूपयाच्या मार्जिनवर धंदा करेन, पण उधारीवर करणार नाही.” अशी खूणगाठ बांधा. उधारीची वही हा प्रकारच दुकानात ठेऊ नका. नंतर देतो, लिहून ठेवा; तसले काही नको. ‘माल ठेवा, पैसे असतील तेव्हा घेऊन जा.’ कोणाशी कितीही दुश्मनी असली तरी मृत्यूनंतर आपण त्यांच्या कार्यास जातो; पण उधार घेणारा कधीच येत नाही. उधारी माणसात इतके वाईट अंतर निर्माण करते.

    तुम्ही व्यवसाय करत असताना उधारीच्या समस्येला कसे हाताळता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेलला आत्ताच  सब्स्क्राइब करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

  • पैशातून पुन्हा पैसा कसा कमवायचा शिकले पाहिजे

    पैशातून पुन्हा पैसा कसा कमवायचा शिकले पाहिजे

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासुन शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे; पैशातून पुन्हा पैसा कसा कमवायचा शिकलं पाहिजे करायची सुरवात?

    एका गावात एक व्यावसायिक कुटुंब होते. तिघे भाऊ, वडील मिळून इंजिनीअरिंग स्पेअर पार्टस, हॉटेल इत्यादी व्यवसाय करत होते. गेल्या ७ ते ८ वर्षात एक्सपोर्टमधून बराच फायदा कमविला. अंदाजे १ ते ३ कोटी रुपये एका रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये गुंतविले. मुंबईजवळ काही अंतरावर रोडलगत २७ एकर शेतजमीन १८ लाख रुपये एकर दराने विकत घेतली. काही महिने प्रोजेक्टचे नियोजन करीत होते. नंतर त्यांनी ती शेतजमीन एनए करून घेतली. त्यावर व जमिनीतील अंतर्गत रस्ते हेक्टरच्या लेवलने केले, वृक्षारोपण इत्यादीसाठी अंदाजे एकरी सहा लाख खर्च आला. तो त्यांनी बँकेतून कर्ज काढून केला. प्रत्येकी २००० वर्गफुटाने प्लॉट प्रत्येकी १६ लाख दराने विक्रीस आणले व ३ बीएचके बंगलो ४० ते ५० लाख ह्या दरम्यान. अशा अनेक प्रकारच्या प्रॉपर्टीची विक्री त्यांनी सुरू केली. सुरुवातीचे काही प्लॉट खपल्यानंतर थोडे महिने विक्री बंद करून आलेले पैसे खर्च करून सर्व प्लॉटना लहान बाउंड्री हॉल, छोटे वूड हाऊस, आकर्षक एन्ट्रन्स लॉन प्रोजेक्टससाठी बनविली. खूप लहान व १५ गुंठे ओपन जागेत लॉन बनविले. प्रोजेक्ट अंतर्गत खूप छान वृक्ष लागवड केली. प्रोजेक्ट्सचे थ्रीडी प्रझेंटेशन तयार केले, पूर्ण प्रोजेक्ट तयार झाल्यानंतर कसा दिसेल याचा आकर्षक व्हिडीओ बनविला व त्यांची पुणे, मुंबई आणि इतर चांगल्या ठिकाणी जाहिरातबाजी केली. पुढे काही महिन्यात प्रॉपर्टीचे दरही वाढले होते. प्लॉट, बंगलो बघायला येणाऱ्यासाठी आकर्षक वेटिंग रूम, छोटेसे छान ऑफिस, साईटवर माहिती देण्यासाठी एमबीए झालेल्या तरुणाची नियुक्ती केली.

    २७ एकर जमिनीपैकी एनए केल्यानंतर सुमारे २२ एकर जमीन विक्रीस उपलब्ध होती व प्रत्येकी २००० वर्गफुटाचे ४४० प्लॉट विक्रीस तयार होते. म्हणजे तो प्रोजेक्ट म्हणजे ४४० गुणिले २० लाख बरोबर आठ कोटी ऐंशी लाख इतक्या किंमतीचा होता. एनए करणे, अंतर्गत रस्ते, सजावट, बाउंड्री वॉल, गार्डनिंग, फलकहाऊस, प्लॅन, मार्केटिंग, ब्रॅंडिंग, एजंटना देऊ केलेले ५% कमिशन, बँकेचे व्याज, कामगारांचा पगार इत्यादीवर १५ ते २०% खर्च त्यांनी केला होता. पाच ते सहा वर्षात हळूहळू करून सर्व प्लॉट विकले गेले. सुरुवातीचे काही प्लॉट १० लाखाने विकले व परत प्रत्येक सहा महिन्यात किंमत वाढत गेली, शेवटचे ३० ते ३५% प्लॉट २७ लाखाच्या दराने विकले गेले. सरासरी दर १८ लाखाचा राहिला. ज्या शेतकर्‍याने १८ लाख एकरी दर म्हणून जमीन विकली त्याला त्याच जमिनीला दोन गुंठ्याला १८ लाख दर केवळ ५-७ वर्षात होईल असा विचार केला नसेल.

    पैशातून पैसा कमविण्याचे हे एक उदाहरण खूप काही सांगत आहे. जमिनी विकून खायच्या की आपण उद्योजक व्हायचं हे ज्याचे त्याने ठरवावे. जसे कस्तुरीमृगाला माहीत नसते की, आपल्याकडे अत्यंत किंमती कस्तुरी आहे, तसे शेतकर्‍यांनाही माहीत नाही आपल्या जमिनीचे भविष्यातले खरे मोल काय आहे. ज्यांनी जमिनी २० लाख प्रति एकराने विकल्या तेथे आज २० लाख गुंठ्याचा दर आहे व दुर्दैव त्या मुळ जमीन मालकाकडे एक गुंठा तेथे घेण्याची ऐपत नाही. कारण बाटली, गाडी, सोन्याची चेन, राजकारण यातच त्याचे सर्व पैसे संपले.

    पैशाने पैसा वाढवायचं तंत्र तुम्ही कधी अंमलात आणलाय का? आणलं असेल तर तुमच्याकडे असणाऱ्या पैशाचे नियोजन तुम्ही कसं केल? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेल ला आताच सब्स्क्राइब करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

  • काऊंटरवर नेहमी हसतमुखाने बसा

    काऊंटरवर नेहमी हसतमुखाने बसा 

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘काऊंटरवर नेहमी हसतमुखाने बसा…’ करायची सुरवात?

    रामलाल मिठाईवाले ४० वर्षांपूर्वी अंगावरच्या कपड्यावर मुंबईत आले. दुसर्‍याच्या दुकानात हलवाईचे काम करत करत स्वतःचा धंदा सुरू केला. आज मुंबईत ५ दुकाने, ४ फ्लॅट, गाड्या सर्व काही आहे. दोन मुलं त्यांना व्यवसायात हातभार लावतात. काही दिवसांपूर्वी रामलाल याचं दुःखद निधन झालं. सांत्वन सभा पुढील रविवारी होती, त्यांच्या मोठ्या मुलाने व्हॉटसअपवर तसा निरोप सर्वांना दिला. त्यांचा लहान मुलगा काऊंटर सांभाळत होता, ग्राहकांची गर्दी होती. ख्रिसमसमुळे केक, मिठाईला चांगली मागणी होती. थोडी गर्दी कमी झाल्यावर त्यांच्या परिचयाचे एक गृहस्थ दुकानात गेले आणि म्हणाले, “बिपीनभाई पिताजी गुजर गये समजके बहुत दुःख हुआ.” तो म्हणाला; मेहमान मिलने के लिए घर मे आते रहते है, इसलिए बडा भाई घर पे है। ख्रिसमस का सीझन है, तो मै धंदा संभाल रहा हू। क्या करे शो मस्ट गो ऑन! सर जी, वो कंडोलन्स मीटिंग का मेसेज मिला क्या, हमारे समाजभवन मे है।” ते गृहस्थ म्हणाले, “हा मिल गया, चलता हूँ।”. तीन दिवसापूर्वी वडिलांचं निधन झालं, त्याचा परिणाम काऊंटरला अजिबात न जाणवू देता तो व्यवसाय चालवत होता.

    असे म्हणतात ज्या दिवशी तुम्हाला हसता येत नाही त्या दिवशी दुकान उघडू नका. ज्या दुकानदाराच्या चेहऱ्यावर हसू नसते, त्याच्या दुकानात आले की ग्राहकांना जाऊच नये असे वाटते. काऊंटर सेल्सचीसुद्धा एक विशिष्ट सायकॉलॉजी आहे. माल त्याच किंमतीचा, पण चांगल्या सेल्स मॅनेजमेंटमुळे काही दुकाने जोरदार चालतात.

    यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत. मार्केटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा उघडणारे व सगळ्यात शेवटी बंद होणारे दुकान तुमचेच हवे. देवाला सुगंधी अगरबत्ती, दिवा लावूनच काऊंटरची सुरवात करा. मद्यपान, मांसाहार केले असेल तर आंघोळ केल्याशिवाय काऊंटरला येऊ नका. गृहकलह, बायकोबरोबर भांडण, टेन्शन, आजार, तब्येत, कुणाचा मृत्यू किंवा काहीही असेल, तरी कोणत्याही परिस्थितीत त्याचा काऊंटरवर दिखावा व वाच्यता करू नका. खरंच काही अडचण असेल व तुम्हाला त्या दिवशी हसता येत नसेल, तर एकतर दुकान उघडू नका, नाहीतर तुम्ही काऊंटरला बसू नका.

    दुकानाचे सर्व शेल्फ गच्च भरलेले दाखवा व ठेवा. अर्धवट शेल्फ ग्राहकांवर अत्यंत बॅड इंम्प्रेशन टाकतात. नेहमी स्वच्छ कपडे घाला, शक्यतो पांढरे शुभ्र किंवा लाईट कलरचे शर्ट वापरा. काऊंटरवर नेहमी स्वच्छता ठेवा. दुकानातील कामगारसुध्दा नीटनेटके असावेत. गल्ल्यात सुट्टे पैसे नेहमी ठेवा. सुट्टे नसले की उगीच प्रत्येक वेळी इकडे तिकडे पळू नका. ‘छुट्टा लेके आओ’ असे ग्राहकांना म्हणू नका. नाहीतर सुट्टे आणायला जातो आणि मालही तिकडेच खरेदी करतो, तुम्ही वाट पाहत बसणार कधी येतोय म्हणून. अशा लहान लहान गोष्टीचे बारीक लक्ष व नियोजन म्हणजे ‘काऊंटर सेल्स मॅनेजमेंट’ हे लक्षात ठेवा.

    तुमचे काउंटर सांभाळताना तुम्ही या गोष्टी पाळता का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्टीचा विषय आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी