Category: लेख

  • दहा अशा गोष्टी, ज्यामुळे तुम्ही तिसाव्या वर्षी करोडपती बनू शकता

    दहा अशा गोष्टी, ज्यामुळे तुम्ही तिसाव्या वर्षी करोडपती बनू शकता

    यात न रुचण्यासारखे किंवा वाईट असे काहीच नाही. मी वयाच्या २१व्या वर्षी कॉलेजमधून बाहेर पडलो. जवळचे सर्व पैसे संपले, कर्जबाजारी झालो. तरीही तिसाव्या वर्षी मी करोडपती होतो.

    खाली मी दहा अशा गोष्टी सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही तिसाव्या वर्षी नक्कीच करोडपती बनू शकता.

     १. पैसे वाढवायला शिका                                                                         

    आजच्या आर्थिक जगात जिथे पैसा ही गरजेची गोष्ट बनली आहे. धनसंचय करणे आणि तो वाढवणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामुळे तुमच्याकडे येणारा पैसा सातत्याने वाढत राहायला हवा. सुरुवातीला माझी मिळकत महिना ३००० डॉलर इतकी होती, नऊ वर्षांनी ती महिना २०,००० डॉलर इतकी झाली, त्यामुळे पैशाने पैसे वाढवायला शिका. त्यातून नवीन संधी निर्माण करा.

    २. नुसता दिखावा नको, काम दिसू द्या!

    माझ्या विविध व्यवसायातून आणि गुंतवणुकीतून जेव्हा मला निश्चित पैसे मिळू लागले, तेव्हा मी माझी पहिली लक्झरी कार विकत घेतली. मी करोडपती झालो तरी टोयोटाची साधी गाडीच चालवत होतो. तुमची ओळख तुमच्या नितीमुल्यांवरून, कामावरून व्हायला हवी, तुमच्याकडे असलेल्या भौतिक गोष्टींवरून नाही.  

    ३. गुंतवण्यासाठी बचत करा…

    पैशांची बचत करा, पण फक्त गुंतवण्यासाठी. वाचवलेले पैसे एखाद्या सुरक्षित आणि अशा ठिकाणी गुंतवा जिथून सहजासहजी काढता येणार नाहीत. या पैशांचा वापर कधीही करू नका, अगदी निकडीच्या प्रसंगी सुद्धा. यामुळे वर सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडील पैसा वाढत जाईल.

    ४. तुम्हाला पैसे मिळवून न देणारे कर्ज काढू नका.

    एक नियम बनवा, आपल्याकडे येणारा पैसा वाढवण्यासाठीच कर्ज काढायचे, नाहीतर काहीही उपयोग नाही. मी कारसाठी कर्ज घेतले, कारण मला खात्री होती की त्यामुळे माझी मिळकत वाढेल. श्रीमंत लोक घेतलेल्या कर्जाचा वापर गुंतवणूक आणि कॅशफ्लो वाढवण्यासाठी करतात. गरीब लोक कर्जाचा वापर वस्तू विकत घेण्यासाठी आणि श्रीमंतांना अजून श्रीमंत करण्यासाठी करतात.

    ५. पैशांवर प्रेम करायला शिका.  

    आर्थिक स्वातंत्र्य कुणाला नको असते. आपल्याकडे भरपूर पैसे असावेत अशी सगळ्या लोकांची इच्छा असते, पण पूर्ण त्यांचीच होते, जे तिला प्राधान्य देतात. श्रीमंत होण्यासाठी आणि श्रीमंती टिकण्यासाठी पैशाला अग्रक्रम द्या. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले, तर तो तुमच्याकडे दुर्लक्ष करेल किंवा तुम्हाला सोडून त्याच्याकडे जाईल, जो त्याचे महत्त्व जाणतो.

    ६. पैसा कधीही झोपत नाही.

    पैशाला घड्याळ कळत नाही, वेळापत्रक, सुट्ट्या याचा विचार तो करत नाही, आणि तुम्हीसुद्धा नाही केला पाहिजे. पैसा त्यांच्यावर प्रेम करतो, ज्यांची मेहनतीची तयारी असते. जेव्हा मी २६ वर्षांचा होतो, मी रिटेल स्टोअरमध्ये काम करायचो. आमचं स्टोअर संध्याकाळी ७ ला बंद व्हायचं, पण मी बरेचदा रात्री ११ वाजेपर्यंत तिथे थांबायचो आणि सामान विकायचो. नशीबवान किंवा हुशार माणूस बनण्याचा प्रयत्न कधीही करू नका, तर नेहमी इतरांपेक्षा जास्त मेहनत घ्या.

    ७.  गरीब राहण्यात काहीही अर्थ नाही…

    मी सुद्धा गरीबच होतो आणि ते जीवन खूप निराशाजनक असतं. माझ्याजवळ थोडेफारच पैसे असायचे आणि ते म्हणजे असून नसल्यासारखे होते. त्यामुळे आपण गरीब आहोत ‘ठीक आहे’ असे विचार मनात असतील, तर लगेच काढून टाका. बिल गेट्स म्हणतात, ‘तुम्ही गरीब म्हणून जन्मलात, तर तो तुमचा दोष नाही; पण गरीब म्हणून मराल, तर मात्र तुमचाच दोष आहे.”

    ८. श्रीमंत माणसांचा आदर्श ठेवा.

    आपल्यापैकी बहुतेकजण गरीब किंवा मध्यमवर्गीय असल्यामुळे आपले विचार, आपली स्वप्नं ही जवळच्या इतर लोकांसारखीच मर्यादित असतात. मी नेहमी श्रीमंत लोकांचा अभ्यास करायचो आणि त्यांच्यासारखं वागायचा प्रयत्न करायचो. तुम्ही सुद्धा एखादी आदर्श व्यक्ती निवडा आणि त्यांचे अनुसरण करा. बहुतांश श्रीमंत लोकं ही त्यांच्याजवळील ज्ञान आणि संसाधनं वाटण्याच्या बाबतीत अत्यंत उदार असतात.

    ९. पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावा.

    श्रीमंत होण्यासाठी गुंतवणूक ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या कामातून तुम्हाला जितके पैसे मिळतात, त्यापेक्षा जास्त पैसे गुंतवणूकीतून मिळायला पाहिजेत. जर तुमच्याकडे अतिरिक्त पैसा नसेल, तर तुम्ही कधीही गुंतवणूक करू शकणार नाही. माझी दुसरी कंपनी सुरु करताना मी ५० हजार डॉलर्स गुंतवले. तीच कंपनी मला मागील दहा वर्षांपासून दरमहा ५० हजार डॉलर्स मिळवून देत आहे. मी तिसरी गुंतवणूक रिअल इस्टेटमध्ये केली होती आणि त्यातून मला अजून पैसे मिळतात. गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला अनेक नवीन संधी शोधता येतात. लक्षात ठेवा, ‘पैशाने तुमच्यासाठी काम केले पाहिजे, तुम्ही पैशासाठी नव्हे.’

    १०. नेहमी मोठा विचार करा…

    मी आजवर केलेली सगळ्यात मोठी चूक कुठली असेल, तर मोठा विचार न करणे. माझं तुम्हाला हेच सांगणं आहे की, फक्त करोडपती नाही, तर अब्जाधीश बनण्याचा प्रयत्न करा. या जगात पैशांची कमतरता नाही, तर मोठा विचार करणाऱ्या लोकांची आहे.

    या दहा मार्गांचा अवलंब करा, तुम्ही नक्की श्रीमंत व्हाल. तुमची स्वप्नं खूप मोठी आहेत असं सांगणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा. झटपट श्रीमंत होण्याच्या स्कीम्सच्या नदी लागून नका, नैतिकता ठेवा, प्रयत्न कधीही सोडू नका आणि एकदा का तुम्ही हे ध्येय साध्य केलं की इतरांनाही मदत करा.

  • अशी करा कारले शेती

    अशी करा कारले शेती

    Step-by-Step Guide to Growing Bitter Gourds

    त्यात जीवनसत्त्वे A, C आणि K, तसेच फायबर आणि पोटॅशियम असते. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. तसेच मधुमेह आणि हृदयरोग यांसारख्या रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करते. हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. कारले  एक बहुगुणी भाजी आहे. ही एक औषधी वनस्पती असल्याने याला भरपूर मागणी आहे 

    हवामान

    कारले लागवडीसाठी उष्ण आणि दमट हवामान आवश्यक आहे. तापमान 20 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. जास्त आर्द्रता आणि पाऊस कारले लागवडीसाठी फायदेशीर असतो. .

    karela-vegetable

    जमीन

    कारले लागवडीसाठी चांगली निचरा होणारी, मध्यम खोलीची आणि सुपीक जमीन आवश्यक आहे. पीएच 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असलेल्या जमिनीत कारले चांगले वाढते.

    लागवड

    कारल्याच्या लागवडीसाठी चांगल्या जातीची निवड करावी जसे की, पुसा दौ मोसमी, अर्का हरित आणि कोईमतुर लांब.   कारल्याची लागवड बियाणे किंवा रोपे लावून केली जाते. बियाणे लावण्यासाठी, 60×60 सें. मी. आकाराचे खड्डे तयार करावेत आणि त्यात 10 ते 15 ग्रॅम बियाणे टाकावेत. रोपे लावण्यासाठी, 60 सें. मी. अंतरावर रोपे लावावीत.

    जोपासणी

    कारले लागवडीसाठी आवश्यक ती जोपासणी खालीलप्रमाणे आहे:

    पाणी: कारले लागवडीसाठी नियमित पाणी देणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात दररोज पाणी द्यावे आणि पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्याकडे लक्ष द्यावे.

    खत: कारले लागवडीसाठी शेणखत, कंपोस्ट किंवा युरिया यासारखे खत देणे आवश्यक आहे.

    तण नियंत्रण: कारले लागवडीत तण नियंत्रण करणे आवश्यक आहे. तण काढून टाकल्यास कारल्याची वाढ चांगली होते.

    रोग आणि कीटक नियंत्रण: कारल्याला अनेक रोग आणि कीटकांचा प्रादुर्भाव होतो. रोग आणि कीटक नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.

    Step-by-Step Guide to Growing Bitter Gourds

    उत्पन्न

    योग्य निगा राखल्यास कारल्याचे  एकरी 20 ते 25 टन उत्पादन मिळते.

    जोपासणीतील काही टिप्स

    कारल्याची लागवड करताना, एका ठिकाणी सलग दोन वर्षे लागवड करू नये.

    कारल्यांची गळती होऊ नये यासाठी तोडताना काळजी घ्यावी.

    कारले तोडताना, लांब काठीचा वापर करून तोडावीत, जेणेकरून वेलीला इजा होणार नाही.

    आणखी वाचा

  • सायकलच्या दुकानात काम करता करता Panasonic सारखी कंपनी उभी केली

    सायकलच्या दुकानात काम करता करता Panasonic सारखी कंपनी उभी केली

    128 वर्षांपूर्वी म्हणजेच 27 नोव्हें. 1894 मध्ये जपानच्या Wakayama प्रांतातील वासा गावात एका सधन शेतकऱ्याच्या पोटी कोनोसुकेचा जन्म झाला. मात्र कोनोसुकेचा जन्म झाला आणि घरची परिस्थितीच पालटली. आर्थिक अडचणींमुळे कोनोसुकेच्या वडिलांकडे जी काही धनदौलत होती ती विकावी लागली. ज्या घराला ऐशो-आरामाची सवय होती त्या घरातील सगळेचजण पोटाची खळगी भागवण्यासाठी काम करू लागले. लहानगा कोनोसुके देखील शाळा सोडून वयाच्या 9 व्या वर्षापासूनच काम करू लागला. ज्या वयात इतर मुले खेळायची, अभ्यास करायची, आपल्या आई-वडिलांकडे खाऊचा हट्ट करायची, त्या वयात हा लहानगा कोनोसुके एका दुकानात काम करून घरच्या आर्थिक परिस्थितीस हातभार लावू लागला.

    सकाळी लवकर उठून दुकानाच्या साफसफाई करून मालकाच्या मुलांना देखील तो सांभाळायचा. इतकं करूनही तो तापट दुकानदार त्याच्याकडून जनावरासारखं काम करून घ्यायचा. आर्थिक परिस्थितीमुळे त्याला ते काम करणं भाग होतं. पण काही दिवसांनी त्या दुकानावर कर्ज झालं आणि त्या मालकाने दुकान बंद केलं. कोनोसुकेचं काम गेलं. जे काही थोडेफार पैसे यायचे तेही आता बंद झाले. काही दिवसांनी त्याला एका सायकल कंपनीत काम मिळालं. त्याकाळात सायकल म्हणजे एक लक्झरी वाहन मानलं जायचं. त्या सायकल इंग्लंडमधून इम्पोर्ट व्हायच्या. कंपनीत सायकल विकण्यासोबत काही मेटल वर्कचं कामही होतं. कोनोसुके तिथे पाच वर्ष काम करून जितक्या टेक्निकल गोष्टी शिकता येतील तितक्या तो शिकला.

    वयाच्या पंधराव्या वर्षी त्याला osaka electric light company ची जाहिरात दिसली. तिथे काही कर्मचाऱ्यांची गरज होती. कोनोसुकेने नोकरीसाठी अर्ज केला. आपल्याला नोकरी मिळेल की नाही या विचारात असतानाच त्याला joining letter आलं, तो आनंदाने भारावून गेला. दुसऱ्याच दिवशी तो कंपनीत दाखल झाला.

    osaka electric light companyत विजेसंबंधित गोष्टींचं शिक्षण त्याला मिळत होतं. तो केवळ काम करुन शांत बसत नव्हता. फावल्या वेळेत electricity ची पुस्तकं देखील वाचू लागला. जितक्या गोष्टी शिकता येत होत्या, त्या सगळ्या तो शिकला. कंपनीत अनेक नवीन नवीन experiment त्याने केले. आपल्या कर्तबगारीच्या जोरावर एक साधा कर्मचारी म्हणून रुजू झालेला कोनोसुके काही वर्षातच टेक्नीकल इंस्पेक्टर पदापर्यंत पोहोचला. त्याच काळात कोनोसुकेने एक improved electric socket बनवलं.ते बॉसला दाखवलं, मात्र ते काही त्याच्या बॉसला पसंद पडलं नाही. हे socket मार्केटमध्ये चालणार नाही असं म्हणून बॉसने ते socket रिजेक्ट केलं. मात्र कोनोसुकेला त्या socket वर पूर्ण विश्वास होता. त्याच विश्वासाच्या जोरावर त्याने osaka कंपनीतील नोकरी सोडली, आणि स्वतःचा व्यवसाय चालू करण्याचा निर्णय घेतला. मात्र 22 वर्षीय कोनोसुकेचा तो निर्णय कोणालाच मान्य नव्हता. नोकरी करून जितके पैसे हातात येतात, तितके तरी स्वतःच्या व्यवसायातून येणार आहेत का? त्यात तुझं पुरेसं शिक्षणही झालेलं नाही, व्यवसायाचा अनुभवही नाही असे म्हणून सगळ्यांनीच त्याला व्यवसाय न करण्याचा सल्ला दिला. 

    कंपनीच्या अपयशामुळे त्या 2 कर्मचाऱ्यांनी देखील तिथली नोकरी सोडली. आता कोनोसुके, त्याची पत्नी आणि मेहुणा असे तिघं मिळून नवनवीन experiment करू लागले. मात्र यात त्याचे खूप पैसे खर्च झाले. इकडे डोक्यावर कर्जाचा भार दिवसेंदिवस वाढतच होता, तर दुसरीकडे प्रत्येक ठिकाणाहून आलेल्या रिजेजेक्शनमुळे तो हतबल झाला होता. पण त्याने हार मानली नाही आणि एक दिवस अचानक त्याला 1000 light socketची पहिली ऑर्डर मिळाली आणि हाच ठरला कोनोसुकेच्या कंपनीचा turning पॉइंट. त्या ऑर्डरनंतर कोनोसुकेचा व्यवसाय वाढत गेला. त्यानंतर त्याने attachment plug आणि two way socket चे invention केलं. यामुळे तर ही कंपनी खूपच फेमस झाली. त्याने कंपनीचं नाव मात्सूशिता इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग वर्क्स ठेवलं. तर कंपनीचे प्रोडक्टस ‘नॅशनल’ या ब्रँड नेमखाली विकले जाऊ लागले. पुढे यात पॅनासॉनिक, कासार, टेक्निक्स ही नावं सुद्धा ऍड झाली.

    याच काळात पॅनासॉनिकच्या ट्रान्झिस्टर रेडिओने जगभरात कमाल केली. श्रीमंतापासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत सगळ्यांच्या घरातून पॅनासॉनिकच्या रेडिओवरची गाणी वाजू लागली. हा रेडिओ जगप्रसिद्ध झाला. कंपनी जगाच्या उद्योगपटलावर स्थिरस्थावर झाली होती. १९५० ते १९७३च्या काळात जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक उत्पादनं बनवणारी कंपनी बनली. जानेवारी १९६१ मध्ये कोनोसुके मात्सुशिता यांनी पॅनासॉनिकच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आणि अध्यक्षपद जावई मासाहारू मात्सुशिता यांच्या हाती सोपवून सल्लागार म्हणून ते कामकाज पाहू लागले. मासाहारू यांनी देखील अगदी मनापासून पॅनासॉनिकला मोठं करण्यासाठी प्रयत्न केले. २००८ साली कंपनीची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवण्यासाठी मात्सूशिताचे नाव बदलून “पॅनासॉनिक कॉर्पोरेशन” करण्यात आले. सध्या कंपनीत २ लाख ८० हजारांपेक्षा देखील अधिक कर्मचारी काम करतात, तर कंपनीची उलाढाल ९ ट्रिलियन येन पेक्षाही जास्त आहे.

    मात्सुशीतांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर ४४ पुस्तकं लिहिली. भविष्यातील राजकारणी आणि उद्योजक घडवण्यासाठी त्यांनी १९७९ साली मात्सुशिता स्कुलची सुद्धा स्थापना केली. त्यांच्या उदात्त कार्यकर्तृत्वाचा सन्मान म्हणून जपानच्या सर्वोच्च पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यात order of the sacred treasure, Order of the Rising Sun, medal with blue ribbon अशा अनेक पुरस्कारांसोबत बेल्जियम, मलेशिया आणि चीनच्या पुरस्कारांचा देखील समावेश आहे. 

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • एक नवीन स्वप्न पाहण्यास तुम्ही कधीही वृद्ध होत नाही

    एक नवीन स्वप्न पाहण्यास तुम्ही कधीही वृद्ध होत नाही

    हा लेख लिहिताना आज मी ३९ वर्षांचा आहे.

    तुमचं वय काय आहे?

    पण खरंच तुमचं वय झालं आहे का? तुमच्या शरीराकडे बघा. या शरीराचं वय ३२ वर्ष नाही. तुमच्या डोक्यावरील केस, त्यांचं वय ३२ वर्ष नाही. तुमचा मेंदू, तुमचं हृदय, तुमचे हात, तुमचे पाय यातील कशाचंच वय झालेलं नाही. ते सगळं ठीक आहे, पण मग ३२ वर्ष वय नक्की कशाचं आहे?सांगतो, पण यापुढे कधीही आपलं वय झालं, आपण म्हातारे झालो असं समजायचं नाही.

    आपल्या शरीरात रोज काहीतरी बदल घडून येत असतात. शरीरातील पेशींची संख्या रोज बदलत असते. आपल्या मेंदूतील विचार रोज बदलत असतात. या बदलांमुळे आयुष्यात खूप मोठा फरक पडतो. तुमच्या मनातील भावभावनासुद्धा कालच्यापेक्षा आज थोड्याफार वेगळ्या असतात.

    याचा अर्थ असाही काढता येईल, की तुमचं वय एक दिवस इतकंही नाही. आयुष्याकडे बघण्याचा हा एक वेगळा दृष्टीकोन मला तुम्हाला द्यायचा आहे.

    आता मी काही प्रश्न विचारतो बघू तुमच्यापैकी किती जणांकडे या प्रश्नांची उत्तरे आहेत. जर आपण आजचा दिवस आयुष्यातील आपला पहिला दिवस असल्याप्रमाणे जगू लागलात, तर काय होईल?

    आज तुम्ही कोणते नवे निर्णय घ्याल?

    • आज कोणती नवीन स्वप्नं पाहण्याचं धाडस तुम्ही कराल?
    • आजपासून तुम्ही कोणत्या नवीन गोष्टी करायला सुरुवात कराल?
    • आजपासून आपलं आयुष्य कसं वेगळ्या पद्धतीने जगायला सुरुवात कराल?

    आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी खालील १० सूचना तुम्हाला उपयोगी पडतील.

    1. आपलं वय हा फक्त एक आकडा आहे. त्याबद्दल फार चिंता करू नका.
    2. आपण सगळेच एक दिवस मरणार आहोत, नंतर आपल्याला पृथ्वीची आठवण येईल, त्यामुळे आजपासूनच जगणे प्रारंभ करा.
    3. आपले ध्येय ठरवा, आपल्या स्वप्नांची निवड करा आणि आजपासूनच त्यांचा पाठलाग सुरु करा.
    4. नवनवीन आणि वेगवेगळ्या प्रकारचे, चांगले कपडे वापरायला सुरुवात करा.
    5. निराशावादी आणि आळशी लोकांपासून दूर राहा. जास्त कार्यक्षम आणि उत्साही व्हा.
    6. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. काय खायला पाहिजे आणि काय नाही याकडे व्यवस्थित लक्ष द्या.
    7. आजपासून चांगले आर्थिक निर्णय घेण्यास प्रारंभ करा.
    8. आपल्याला किती पैसा आणि कधीपर्यंत कमवायचा आहे, याचं नियोजन करा. एक उद्दिष्ट ठरवा आणि आजपासूनच त्यावर काम करायला सुरुवात करा.
    9. मनात स्वतःची एक वेगळी प्रतिमा बनवून ठेवा.
    10. आशावादी बना. आनंदी बना. उत्साही बना. आजपासूनच…

    आता मला सांगा : तुमचं वय काय आहे?

    • हेन्री फोर्ड यांनी प्रसिद्ध ‘मॉडेल टी कार’ बनवली, तेव्हा त्यांचं वय होतं ४५ वर्ष.
    • चार्ल्स डार्विनने ‘मानवी उत्क्रांती’चा सिद्धांत मांडला, तेव्हा त्याचं वय होतं ५० वर्ष.
    • जॉन पेंबरटन यांनी कोका-कोलाचा शोध वयाच्या ५५व्या वर्षी लावला.
    • रे क्रॉकनी मॅकडोनाल्ड विकत घेतली, तेव्हा त्यांचं वय होतं ५९ वर्ष.
    • कर्नल सँडर्स यांनी केफसीची सुरुवात वयाच्या ६२व्या वर्षी केली होती.

    यशस्वी होण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो, त्यामुळे कधीही प्रयत्न सोडू नका

  • ‘स्टार्टअप्स’साठी १२ नियम

    ‘स्टार्टअप्स’साठी १२ नियम

    प्रत्येक कंपनीचे/संस्थेचे स्वत:चे असे काही नियम असतात. भले त्यांनी ते कधी लिहून काढलेले नसतील, त्याबद्दल चर्चा केली नसेल किंवा आपले असे काही नियम आहेत, हे त्यांना जाणवलंसुद्धा नसेल. तरीसुद्धा काही ठराविक नियमांच्या आधारे प्रत्येक व्यवसायाची वाटचाल सुरु असते. असे नियम बनवणं ही कुठल्याही संस्थेसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. स्टार्टअप्ससाठी १२ नियम खालीलप्रमाणे आहेत. यांचा वापर केल्यास आपल्याला निश्चितच फायदा होईल.      

    नियम १ : तुम्ही जे काम करणार आहात, त्यावर तुमचे प्रेम असेल आणि ते यशस्वी करण्यासाठी कुठल्याही संकटाला तोंड द्यायची तुमची असेल, तरंच स्वतःची कंपनी सुरु करा.

    नियम २ : आपण अपयशी होणारच नाही, सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडतील या भ्रमात राहू नका. अपयशाचा स्वीकार करून पुढे जात राहणं, यातूनच व्यवसाय मोठा होतो.

    नियम ३ : तुमचे उत्पादन विकणे आणि व्यवसाय वाढवणे, ही ‘मालक’ म्हणून तुमची प्रमुख जबाबदारी आहे. ती दुसरं कुणीतरी येऊन सांभाळेल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे.

    नियम ४ : पैसा येणं हा कुठल्याही व्यवसायाचा ऑक्सिजन असतो. त्याच्याशिवाय व्यवसाय फार काळ तग धरु शकणार नाही. त्यामुळे यशस्वी व्हायचं असेल, तर या पैशांचं नीट व्यवस्थापन करता आलं पाहिजे.

    नियम ५ : तुमची स्पर्धा कुणाशी आहे हे जाणून घ्या आणि त्यांच्यापेक्षा जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करा.

    नियम ६ : तुमच्या ग्राहकांना तुमच्याशी आणि तुमच्या उत्पादनाशी काहीही घेणंदेणं नसतं. त्यांना फक्त त्यांची समस्या सुटणे महत्त्वाचे असते. त्यामुळे उगाच भावनिक होऊन सहानुभूतीची अपेक्षा ठेवू नका.

    नियम ७ : असे लोक सोबत घ्या, ज्यांना तुमच्यासोबत काम करण्यात आनंद मिळेल. असे नाही, ज्यांच्या सोबत तुम्हाला आनंद मिळतो. ही चुकीची पद्धत आहे.

    नियम ८ : कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा आनंद मिळेल याची काळजी घ्या. जेणेकरून त्यांच्यातला उत्साह कायम राहील.

    नियम ९ : जर तुमच्या कर्मचाऱ्यांना त्यांची प्रगती होत नाही असे वाटू लागले, तर ते तुम्हाला सोडून जातील; ही गोष्ट लक्षात असू द्या.

    नियम १० : जी संस्था काळानुसार बदलू शकते आणि होणाऱ्या बदलांचा लवकर स्वीकार करू शकते, तीच संस्था जास्त काळ अस्तित्वात राहू शकते. सतत आपल्या कामात सुधारणा करणं, हेच दीर्घकालीन यशाचं रहस्य आहे.

    नियम ११ : आपल्या ग्राहकांकडे नेहमी संदर्भ मागा. स्वतःचा व्यवसाय वाढवण्याचा हा सगळ्यात सोपा आणि जलद मार्ग आहे. आणि हो, यासाठी तुम्हाला अधिकचे पैसेसुद्धा खर्च करावे लागत नाहीत.                                        

    नियम १२ : व्यवसाय प्रमुखाची गती, हीच व्यवसायाची गती. तुम्ही तुमच्या व्यवसायाचे प्रमुख आहात हे लक्षात असू द्या. कामात कधीही ढिले पडू नका…

  • भारताला पिनकोड सिस्टिम दिलीय या मराठी माणसाने…जाणून घ्या हा पिनकोड वाचायचा कसा?

    भारताला पिनकोड सिस्टिम दिलीय या मराठी माणसाने…जाणून घ्या हा पिनकोड वाचायचा कसा?

    आता तुम्ही सगळ्यांनी पिनकोड तर पाहिलाच असेल. पाहिलाच असेल काय, कित्येकदा लिहिला पण असेलच की हो. पण कधी विचार केलाय, ही भानगड कशी आणि का अस्तित्वात आली याचा? किंवा याच्या मागं नक्की कुणाचं सुपीक डोकं असेल याचा? ही आयडियाची कल्पना आहे श्रीराम वेलणकर या मराठमोळ्या माणसाची. यांनीच पूर्ण भारताला पिनकोडची देणगी दिलीय बरं…

    पोस्ट आणि टेलीग्राफ खात्यात नोकरीत असताना श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी त्यावर उपाय म्हणून १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली. त्यामुळेच श्रीराम भिकाजी वेलणकर यांना ‘पिनकोड’ प्रणालीचे जनक म्हणतात. या पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झाली हे खरं.

    ■ पिनकोडची रचना अशी आहे.

    पूर्ण देश ९ झोन मध्ये विभागला गेला आहे. यातले ८ झोन हे भौगोलिक विभाग आहेत, तर एक मिलिट्रीसाठी वापरला जातो.

    आता पाहूयात हा पिनकोड वाचायचा कसा..

    यातले पहिले दोन अंक पोस्ट ऑफिस दर्शवतात. म्हणजे यातही हा तक्ता वापरता येईल

    ११ – दिल्ली

    १२ व १३ – हरयाणा

    १४ ते १६ – पंजाब

    १७ – हिमाचल प्रदेश

    १८ ते १९ जम्मू आणि काश्मिर

    २० ते २८ – उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड

    ३० ते ३४ – राजस्थान

    ३६ ते ३९ – गुजरात

    ४० ते ४४ – महाराष्ट्र

    ४५ ते ४९ मध्य प्रदेश आणि छत्तीसगड

    ५० ते ५३ – आंध्र प्रदेश

    ५६ ते ५९ – कर्नाटक

    ६० ते ६४ – तामिळनाडू

    ६७ ते ६९ – केरळ

    ७० ते ७४ – पश्चिम बंगाल

    ५५ ते ७७ – ओरिसा

    ७८ – आसाम

    ७९ – पूर्वांचल

    ८० ते ८५ बिहार आणि झारखंड

    ९० ते ९९ – आर्मी पोस्टल सर्व्हिस

    म्हणजे सहा आकडी पिनकोडमधला पहिला अंक दाखवतो- विभाग, दुसरा अंक- उपविभाग, तिसरा अंक – सॉर्टींग जिल्हा आणि राहिलेले शेवटचे तीन अंक हा त्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर असतो. उदाहरणार्थ ४१३००१ हा सोलापूरचा पिनकोड आहे. यात पहिला अंक दाखवतो- पश्चिम विभाग, त्यानंतर १३ हा पश्चिम विभागातल्या महाराष्ट्रातला एक उपविभाग दाखवतो, ४१३ हा अंक सॉर्टिंग जिल्हा दर्शवतो, तर शेवटचे तीन अंक – ००१ हा सोलापूर जिल्ह्यातल्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर आहे.

    आता पत्रं लिहिणं दुर्मिळ होत चाललं असलं तरी पिनकोड सिस्टिम कधीच इतिहासजमा होणार नाही. ही अशी पद्धत शोधणाऱ्या श्रीराम भिकाजी वेलणकरांना मानाचा मुजरा…!

  • ‘ब्लॅक राईस’ उत्पादनाचा राज्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी.

    ‘ब्लॅक राईस’ उत्पादनाचा राज्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी.

    सर्वसाधारण पारंपरिक भात पिकापासून 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन होते. त्यामुळे अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन वाणांना कृषी विभागाच्या ‘आत्मा’ अंतर्गत ‘ब्लॅक राईस’ लागवडीचा प्रयोग नागपूर जिल्ह्यातील रामटेक, मौदा, उमरेड, कुही, पारशिवनी व कामठी या तालुक्यातील निवडक शेतकरी गटाच्या माध्यमातून पहिल्यांदा 70 एकरामध्ये हा प्रयोग राबविण्यात आला. ‘ब्लॅक राईस’चे बियाणे छत्तीसगड राज्यातून मागविण्यात आले असून सेंद्रीय पद्धतीने भात उत्पादनाचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. या उपक्रमासाठी 10 बचत गटांना बियाण्यासह जैविक खते तसेच सेंद्रीय धानासाठी आवश्यक असणारे निंबोळी अर्कासह इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे या वाणावर किडीचा प्रादुर्भाव नसल्याचे सिद्ध झाले आहे. ‘ब्लॅक राईस’चे उत्पादन 110 दिवसात घेतल्या जात असल्याने दुसऱ्या पिकांसाठी जमीन उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पीक घेणेसुद्धा सहज शक्य झाले आहे. शेतातील धानाचे लोंबी बघता पारंपरिक धानापेक्षा निश्चितच जास्त उत्पादन होईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

    शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून कृषी उत्पादन वाढीसाठी आत्मांतर्गत विविध उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना उत्पादनानंतर चांगला भाव मिळावा, यासाठी विक्री व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. ‘ब्लॅक राईस’च्या भरडणीसाठी सवलतीच्या दरावर राईस मिलसुद्धा देण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी दिली.

    दैनंदिन भोजनात पांढरा, ब्राऊन तांदळाचा वापर नेहमीच करतो. परंतु ‘ब्लॅक राईस’(काळे तांदूळ) विषयीची माहिती नवीन आहे. फार वर्षापूर्वी राजघराण्यातील लोकांसाठी चीनमध्ये ब्लॅक राईस’ची लागवड केली जात होती. त्यामुळे या तांदळाचे नाव Forbidden Rice असे ठेवण्यात आले. या तांदळातील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे युरोप व अमेरिकेपर्यंत याचा प्रसार झाला आणि त्यावर संशोधन होऊन औषधी गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले.

    भारतामध्ये ‘ब्लॅक राईस’ उत्तर-पूर्व राज्यामध्ये पिकविला जातो. स्वास्थ्यवर्धक अनेक गुणधर्म असल्यामुळे याला चांगली मागणी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी 10 बचत गटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच उत्पादनाला सुरुवात केली आहे. यामध्ये फायबर, मिनरल्स (आयर्न व कॉपर) आणि उत्कृष्ट गुणवत्ता असलेले वनस्पतीयुक्त प्रोटीन आहे. या तांदळाच्या बाहेरील आवरणामध्ये सर्वात जास्त Anthocyanin Antioxidant गुणधर्म आहेत. त्यामुळे कॅन्सरसह विविध आजारासाठी हा तांदूळ निश्चितच गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. ‘ब्लॅक राईस’ खाणे आरोग्यवर्धक असल्यामुळे वॉलमार्टसह इतर सुपर बाजारामध्ये सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या काळ्या तांदळाला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे ‘ब्लॅक राईस’ हा पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच वरदान ठरणार असल्याची माहिती ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी सांगितले.

    सेलूच्या बचत गटामार्फत उत्पादन

    कामठी तालुक्यातील सेलू येथील निसर्गराजा सेंद्रीय शेतमाल उत्पादक स्वयंसहाय्यता गटामार्फत दिनकर ठाकरे व अशोक कोकाटे यांनी प्रत्येकी एका एकरात ‘ब्लॅक राईस’ची रोवणी केली होती. पारंपरिक धानाऐवजी काळा तांदूळ कमी दिवसात व कमी खर्चात उत्पादन घेऊन आज चांगले आणि मोठ्या प्रमाणात लोंब्या आल्या आहेत.आता भातपीक कापणीवर आल्यामुळे संपूर्ण शेतात काळ्या लोंब्यांनी बहरले आहे. सेंद्रीय पद्धतीने धानाची लागवड केल्यामुळे रासायनिक खतांवर होणारा खर्चही कमी झाला आहे. कमी दिवसात चांगले उत्पादन होणार असल्याची ग्वाही शेतकऱ्यांनी यावेळी दिली. ‘ब्लॅक राईस’साठी जैविक औषधी खते, निंबोळी अर्क व गांडूळ प्रकल्पसुद्धा कृषी विभागातर्फे उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ‘ब्लॅक राईस’ची बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याचा संकल्पही बचत गटाच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

    – मराठी कृषी जागरण

  • चिंता सोडा! अहंकार सोडा!! रिलॅक्स व्हा!!!

    चिंता सोडा! अहंकार सोडा!! रिलॅक्स व्हा!!!

    ‘टाइम झोन’ आयुष्याच्या शर्यतीत तुम्ही अग्रेसर आहेत की मागे पडलाय? एखाद्याने २२ व्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि पहिला जॉब मिळवण्यासाठी त्याला ५ वर्षे लागली. एखादा २५व्या वर्षी एका मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि वयाच्या ५०व्या वर्षी वारला. एखादा वयाच्या ५०व्या वर्षी मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि ९५ वर्षे जगला. एखाद्याचं लग्न वयाच्या विसाव्या वर्षी झालं, एखाद्याचं ४०व्या वर्षी झालं तर एखादा अजूनही अविवाहित आहे.

    The Power of Relaxation and Humility

    ओबामा ५५व्या वर्षी रिटायर झाला आणि ट्रम्पने ७०व्या वर्षी सुरुवात केली. या जगात प्रत्येक जण आपापल्या ‘टाईमझोन’ मध्ये काम करत असतो.काही लोक आपल्या ‘किती पुढे गेलेत?’ असं वाटत राहतं तर काही लोक आपल्या मागे पडल्यासारखे आपल्याला भासतात. पण खरं सांगू? इथे प्रत्येक जण आपली स्वतःची शर्यत आपल्या स्वतःच्या विशिष्ट ‘टाइमझोन’ मध्ये धावत असतो. जिथे तुम्ही एकटेच पळताय!पुढे जाणाऱ्यांवर जळू नका. मागे पडलेल्यांवर हसू नका. ते त्यांच्या ‘टाइम झोन’ मध्ये आहेत आणि तुम्ही तुमच्या!

    आणखी वाचा

  • कॉम्प्युटर तुम्हाला देत असलेले ‘हे’ आजार माहीत आहेत का?

    कॉम्प्युटर तुम्हाला देत असलेले ‘हे’ आजार माहीत आहेत का?

    >> डोकेदुखी

    कम्प्युटर आणि लॅपटॉपसारखे इलेक्ट्रॉनिक उपकरण डोकेदुखीचं आणि मायग्रेनचं मोठं कारण ठरतात. त्यामुळे जर तुम्ही खूप जास्त वेळ कम्प्युटरवर काम करत असाल तर तुम्हाला डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या होऊ शकते. असे मानले जाते की, कम्प्युटरच्या स्क्रीनचा प्रकाश, पॅटर्न आणि चित्रांमुळे व्यक्तीच्या आरोग्यावर सर्वात जास्त वाईट प्रभाव पडतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना डोकेदुखीची समस्या होते.

    >> मांसपेशींमध्ये समस्या

    एका रिसर्चमध्ये असं आढळलं आहे की, फार जास्त वेळ खुर्चीवर बसून कम्प्युटर काम करत राहिल्याने मांसपेशी थकतात. त्यामुळे मांसपेशींमध्ये वेदना होण्याची समस्या उत्पन्न होते. त्यासोबतच पाय, छाती, खांदे आणि हात सुन्न होतात. कम्प्युटरवर अनेक तास सतत बसून राहिल्याने हे एक मोठं नुकसान होतं.

    computer-related-health-problems-you-should-know-about

    >> डोळ्यांसाठी घातक

    कम्प्युटरवर काम करतेवेळी सतत स्क्रीनकडे बघत राहणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी घातक आहे. अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासात असं आढळलं की, फार जास्त वेळ स्क्रीनसमोर बसल्याने डोळ्यांना थकवा, खाज, डोळ्यातून पाणी येणे आणि डोळ्यांना जड वाटणे या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी अकाली कमजोर होते. खासकरुन लहान मुलांच्या डोळ्यांवर याचा फार वाईट प्रभाव पडतो.

    computer-related-health-problems-you-should-know-about

    >> तणाव वाढतो

    फार जास्त वेळ लॅपटॉप किंवा कम्प्युटर स्क्रीनवर काम करणे तणाव वाढण्याचं मोठं कारण आहे. तासंतास कम्प्युटरवर काम केल्याने व्यक्तीच्या एकाग्रतेत कमतरता येते. त्यांना सतत २४ तास हलकी डोकेदुखी होत राहते. नंतर अशी स्थिती येते की, व्यक्ती गंभीर स्ट्रेस, डिप्रेशन आणि वेगवेगळ्या मानसिक समस्यांनी ग्रस्त होतो.

    computer-related-health-problems-you-should-know-about

    >> वजन वाढतं

    लॅपटॉप, कम्प्युटर, टॅबलेट आणि स्मार्टफोनचा वापर जास्त वेळ करणे आजकाल लोकांच्या जीवनशैलीचा भाग झालं आहे. मात्र कम्प्युटरचा अधिक वापर करणारे जवळपास ३० टक्के लोक वेगाने वजन वाढण्याच्या समस्येचे शिकार होत आहेत. अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की, कम्प्युटरचा अधिक वापर सर्वच वयोगटातील लोकांच्या, खासकरुन लहान मुला-मुलींच्या सुस्त आणि आळशी होण्याचं कारण आहे. त्यानंतर त्यांचं वजन वाढण्याची शक्यता अधिक वाढते. तसेच डायबिटीज आणि हृदयरोगांचाही धोका वाढतो.

    computer-related-health-problems-you-should-know-about

    Source : ऑनलाइन लोकमत

  • पेपर आणि दूध विकून २२ लाख लोकांना नोकरी देणारी ‘वॉलमार्ट’ उभी करणारे ‘सॅम वॉल्टन’

    पेपर आणि दूध विकून २२ लाख लोकांना नोकरी देणारी ‘वॉलमार्ट’ उभी करणारे ‘सॅम वॉल्टन’

    वॉलमार्टचा विषय काढायचं कारण म्हणजे, बरोबर 106 वर्षांपूर्वी 29 मार्च 1918 रोजी अमेरिकेच्या ओक्लाहोमा शहरात walmart च्या संस्थापकाचा जन्म अमेरिकेतल्या एका गरीब शेतकरी घरामध्ये झाला. त्यांच्या जन्मदात्यांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती, पण या संघर्षावर मात करुन त्यांनी वॉलमार्टचं महाकाय साम्राज्य उभं केलं. हे साम्राज्य उभं करणाऱ्या त्या व्यक्तीचं नाव आहे सॅम वॉल्टन.

    The Story of Sam Walton

    जवळजवळ 10-15 वर्ष दुकान अगदी चांगलेले. दुकानासाठी घेतलेले कर्ज देखील सॅमने केव्हाच चुकते केले. या दुकानाच्या प्रगतीमुळे सॅमची घरची परिस्थिती एकूणच पालटली. मात्र काही वर्षांनंतर सॅमला ते दुकान त्याच्या पूर्वीच्या मालकाला परत द्यावे लागले. आत्ता त्याला पुन्हा नवी सुरुवात करायची होती.

    मोठ्या शहरात राहणाऱ्या लोकांना नियमित शॉपिंग करण्यात रस नव्हता. उलट छोट्या शहरात किंवा दुर्गम गावांमध्ये राहणारी मंडळी नियमितपणे शहरांमध्ये येऊन आपल्याला आवश्यक अशा सामानांची खरेदी करतात. हे सॅम यांच्या लक्षात आलं. त्यामुळे केवळ मोठ्या शहरांपुरतं मर्यादीत राहण्याचा त्यांचा निर्णय चुकीचा आहे हे सॅम वॉल्टन यांना जाणवले. त्यानंतर वॉल्टन यांनी आपले धोरण बदलले. आता त्यांनी विकसित होत असलेल्या छोट्या गावांवर आपलं लक्ष्य केंद्रीत केलं.

    या गावात वॉल्टन यांनी मोठे-मोठे दुकानं उघडण्याचा सपाटा लावला. सॅम वॉल्टन यांनी आता आपल्या व्यापाराचा सर्व पोत बदलला होता. त्यांनी दुकानात घरामध्ये रोज लागणारी प्रत्येक वस्तू ठेवण्यास सुरुवात केली. त्याची किंमतही बाजारभावापेक्षा कमी ठेवली. ग्राहकांना एकाच छताखाली सर्व वस्तू कमी किंमतीमध्ये वॉल्टन देऊ लागले. वॉल्टन यांचा हा निर्णय म्हणजे आत्महत्या आहे. असं त्यांच्या सहकारी आणि मित्रांना वाटत असे. तसा इशाराही त्यांनी वॉल्टन यांना दिला होता. पण वॉल्टन यांना यांच्या डोळ्यांना यशस्वी व्यवसायाचं चित्र स्पष्ट दिसत होतं. यामुळे रिटेल विश्वात क्रांती होईल असा त्यांना ठाम विश्वास होता. त्यानंतरच्या काळात त्यांचा हा विश्वास खरा ठरला.

    The Story of Sam Walton
    Sam Walton

    तर मित्रांनो, Walton यांनी Walmart खेड्यात देखील उभे केले. आजही आपण पाहतो की गावातील लोकांना बाजारासाठी, अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी शहरात जावं लागतं आणि walton यांनी लोकांचा हाच प्रॉब्लेम ओळखून छोट्या छोट्या गावात देखील walmart चे छोटे छोटे स्टोअर उभे केले. लोकांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या. या बिझनेस आयडियाने संपूर्ण अमेरिकेत Walmartचे जाळे विणले. आज Wallmart चा Turnover 611 Billion Dollars इतका आहे. फक्त इतकंच नाही, तर गुगलवर साधं Richest family in the World? असा प्रश्न केला तरी एका क्षणात Walton Family चं नाव पहिलं येतं.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा