एकदा एका दुकानदाराने ज्योतिष्याला विचारले की, “माझे दुकान चालत नाही, काय करू?” ज्योतिषी म्हणाला,”ही घे घोड्याची नाल, फक्त ५००० रुपयांना. दुकानावर लाव, मग बघ. दुकान चांगले चालेल.” दुकानदाराने थोडा विचार केला. नाल घोड्याची आहे मग आपण घोड्यालाच विचारले तर? मग तो घोड्याकडे गेला आणि त्याला विचारले,”तुझी नाल दुकानाला लावल्याने माझे दुकान चालेल का?” घोडा हसला आणि म्हणाला,”अरे बाबा, नाल लावून पैसा मिळत असेल तर मी कशाला दिवसभर टांगा ओढला असता? नाल हे प्रतीक आहे, घोड्यासारखं वेगवे धावत पळत राहण्याचं, काम करण्याचं.
छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही अंधश्रद्धेला थारा दिला नव्हता.” कोणत्याही निष्पाप प्राण्याचा बळी न देता स्वतःची करंगळी कापून मंदीरात स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज… देवावर श्रद्धा असूनही महाराजांनी आपल्या गडकिल्ल्यांना कुठल्याही देवाचे नाव दिले नाही, गणपतीचे सुद्धा नाही… अंधश्रद्धेला कधीच प्रोत्साहन दिले नाही. शिवराय कुठेही लिंबू-मिरच्या बांधत बसले नाहीत, की देव-देवस्की करत बसले नाहीत. ज्या मनुस्मृतीने समुद्र ओलांडू नये असे बंधन घातले होते त्यांच्याविरूद्ध शिवाजी महाराजांनी जाऊन समुद्रात आरमार उभारले… कोणताही गड जिंकल्यावर तिथे कधीच सत्यनारायण घातला नाही… अमावस्या अशुभ मानली जाते. काही नकली लोकांच्या सांगण्यावरून आपण कुठलेही काम अमावस्याला सुरू करत नाही. पण महाराजांच्या लढाया या अमावस्येच्या रात्री व्हायच्या. कारण अंधाराचा फायदा घेण्यासाठी ते बहूतेक मोहिमा अमावस्येला घेत. गनिमी कावा पद्धतीने लढाया करायचे व जिंकायचे. शहाजीराजेंच्या मृत्युनंतर माँसाहेब जिजाऊ सती गेल्या नाहीत. तर त्यांच्या जाण्याने जी मार्गदर्शनाची ऊणीव शिवरायांना भासणार होती, ती भरून काढली. गुरू बनून शिवरायांना मार्गदर्शन देत राहिल्या. महाराजांचा स्वतःवर, स्वतःच्या बुद्धीवर व मनगटावर पूर्ण विश्वास होता… रायगडावर काम घेऊन आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जेवल्याशिवाय परत पाठवायचे नाही, हा नियम….
हे वाचल्याने तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार होणार नाही, परंतु तुमच्या विचारात आणि जीवनात सकारात्मक बदल करू शकतात… मी आशा करतो की हा लेख वाचून समाजात अंधश्रद्धा निर्मूलन होण्यासाठी प्रबोधन होईंल, लोकं अंधश्रद्धा सोडून स्वावलंबी बनतील आणि खऱ्या श्रद्धेतून उघड्या डोळ्याने सत्य पाहतील. मी बऱ्याच लोकांना पहिले आहे की त्यांनी यशासाठी किंवा आपल्या समस्या सोडवण्यासाठी अंधश्रद्धेचा मार्ग अवलंबला आणि बरबाद झाले. असे तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या बाबतीत होऊ नये हीच माझी भावना आहे. त्यामुळे वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात कोणताही मोठा निर्णय घेताना एकट्याने निर्णय घेऊ नका. चर्चा होणे महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांशी चर्चा करा, सल्ला घ्या. तर्कशास्त्र सांगणार्या गोष्टी स्वीकारा आणि आपण स्वतःला व इतरांना दिलेल्या आश्वासनांवर ठाम रहा. देव माझ्यासाठी अस्तित्वात आहे. पण ती माझी श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. बरेचजण नकली ज्योतिष्यांकडे जाऊन फसताना मी पहिले आहे. मी या गोष्टीला विरोध करीत नाही परंतु आपले भविष्य सांगणारे लोकसुद्धा काही मोठे विचारवंत नाहीत, जर त्यांना खरोखर काय घडणार आहे हे माहित असते तर त्यांचे स्वतःचे जीवन वेगळे असते. कोणतीही ग्रहांची हालचाल किंवा स्थिती काय होणार आहे, ते ज्योतिषी ठरवू शकत नाही. आपली स्वतःची उर्जा, आपले विचार आणि आपले व्हाइब आपले जीवन बदलू शेतात. आज बाजारात बरेच लोक अंगठ्या आणि रंगीत खडे विकण्याचे धंदे करतात. पण तुमचे आयुष्य कोणतेही अंगठी किंवा खडा बदलू शकणार नाही, ते तुम्हीच बदलू शकाल. मूळ किंवा आधार नसलेल्या अंधश्रद्धांसाठी बळी पडण्याऐवजी आपल्याला आपल्या जीवनात जी ध्येये आणि लक्ष्ये आहेत त्यासाठी उघड्या डोळ्यांनी लढा देण्याची आवश्यकता आहे. आपल्याला लक्षाधीश व्हायचे आहे, जर आपण कठोर परिश्रम केले तरच..
आपल्या आवडत्या मुलीशी लग्न करण्याची तुमची इच्छा आहे, पण जर तुम्ही तिच्या पाठीशी उभे राहून तिच्यासाठी जगाशी लढा देत असाल तरच… फक्त तुम्हाला तुमच्या प्रेमावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. संकटकाळात, अडचणींत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अपयश आल्यास स्वतःला दोषी समजण्यात आणि एकटेपणात आपला आपल्याच निर्णयावर विश्वास नसतो; म्हणून लोक केवळ ज्योतिष्यांनी सांगितलेल्या भविष्यवाणीवर निर्णय घेतात. भविष्यवाणी क्वचितच खरी ठरते; परंतु या नादात ज्या वाईट गोष्टींमुळे आपल्या मनात भीती निर्माण होते, त्या गोष्टींवरच आपले लक्ष केंद्रित केले जाते. भविष्य सांगणाऱ्या लोकांना आपल्याबद्दल किंवा आपल्या भूतकाळाबद्दल काहीच माहिती नसते. अंधश्रद्धांवर विश्वास ठेवणे थांबवा. लक्षात ठेवा, जगाचा विनाश होणार असा खूप वेळा दावा केला गेला होता, परंतु तसे झाले का कधी? आणि होणारही नाही हे तुम्हाला आणि मलाही माहिती आहे. शहाणपणाने आणि तार्किकदृष्ट्या विचार करा.
Live and let live भगवान महावीरांच्या शिकवणीचा हा खूप महत्वाचा भाग आहे आणि तो पुढे अनेक संताच्या आचरणात व लेखनात सापडतो. संत तुकाराम त्यांच्या शेतामध्ये ज्वारीची राखण करायचे तेव्हा चिमण्यांनी दाणे खाल्यानंतर त्यांना पिण्यासाठी मडकी भरून पाणी शेतात ठेवायचे. तोच मार्ग पुढे मोठ्या कॉर्पोरेट ब्रँडनी अवलंबला. बिल गेट्स यांनी आतापर्यंत ९० अब्ज डॉलरचे दान विविध समाजजोपयोगी उपक्रमांना दिले.
कायद्याने CSR (Corporate Social Responsibility) फायद्याच्या २-३% रक्कम अशा सामाजिक कामासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. पिकावर येणारे पाखरे, चिमण्या, फुलपाखरू इत्यादी १ ते २% धान्य खातील पण त्यामुळे परागीभवन होऊन पिकांचे उत्पन्नही वाढायचे, पण जेव्हापासून कीटकनाशके, फवारणी सुरू झाले व त्याचा अतिरेक झाला. तेव्हा कोणतेच पीक औषध फवारलेशिवाय येईना मग पराग संचयन करणार कोण? कीटकांची संख्या कमी झाली, खर्च वाढू लागला व उत्पन्न घटू लागले. आपण दुसऱ्यांना जगू नाही दिले तर आपण ही जगू शकत नाही हे भगवान महावीर, संत तुकाराम यांनी सांगितले. सगळंच १००% मीच खाणार, माझं एकट्याच राज्य असणार याला दुर्योधन प्रवृत्ती म्हणतात. ज्याने पांडवांना काही गाव तर सोडाच, पण सुईच्या टोकावर इतकी पण जमीन देण्यास नकार दिला त्यामुळेच महाभारत घडले.
मोठी कार कंपनी अनेक लहान उद्योगांना स्पेअर पार्ट बनवायचे कॉंन्ट्रॅक्ट देते. कारण तेथे अनेक कामगारांना काम मिळते व त्यांचीही कामे सोपी होतात. जगात कोणतेही काम, उद्योग सगळं मीच खाणार व सगळं मीच कमविणार या प्रवृत्तीने कधीच मोठा होत नाही व टिकतही नाही. ‘जिओ और जीने दो!’(Live and let live) ही प्रवृत्ती जोपासणारे मोठे होतात. आपल्या सोबत इतरांना, प्राण्यांना, पशूंना, झाडांना सांभाळा. ते तुम्हाला सांभाळतील व तुम्हाला मोठे करतील. मुंबईत ठिकठिकाणी सकाळी दुकान उघडण्या अगोदर कबुतरांना धान्य, गाईला चारा टाकताना अनेक व्यापारी बंधू तुम्हाला दिसतील. हे ‘जिओ और जीने दो!’ या तत्वातूनच येते.
दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर प्रत्येकाला वाटत असते कि लोकांनी आपल्याशी सन्मानपूर्वक वर्तणूक केली पाहिजे, इतरांनी आपल्याला इज्जत, मानसन्मान द्यावा, आपली प्रतिष्ठा निर्माण व्हावी. परंतु त्यासाठी आपणसुद्धा इतरांचा सन्मान केला पाहिजे, इतरांच्याही भावनांची कदर केली पाहिजे. इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल असे वर्तन करू नये. आपण इतरांना सुखी नाही करू शकलो तरी चालेल, परंतु आपल्यामुळे कोणी दुःखी होता काम नये याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे. आपण आणि भोवतालचा समाज यात सुसंवाद असेल तरच सामाजिक संतुलन अबाधित राहील.
अश्मयुगात मानवाने चाकाचा शोध लावला. जसजसा मानवाचा विकास होत गेला तसतसा तो नवीन गोष्टींचा अविष्कार करत गेला. कबुतरापासून ते निरोपाचा खलिता घेऊन निघालेल्या दूतापर्यंत संपर्क-संवादाची अनेक रूपे आपण पाहिली. आता आपला एखादा छोटासा msg सुद्धा काही क्षणात दुसऱ्यांपर्यंत पोहोचतो. पण आधी तसं नव्हतं. तेव्हा घोड्यावरून पत्र पोहोचवली जायची. मग हळूहळू घोडागाडी आली, बैलगाडी आली. त्यातून लोकांनी प्रवास करायला सुरुवात केली. प्रवास चालू होता पण सतत काहीतरी नवीन करण्याची इच्छा माणसाला स्वस्थ बसू देत नव्हती.
आपला प्रवास अजून सोपा आणि सुखकर कसा करता येईल याचे अनेक पर्याय मानव शोधत राहिला. वेगवेगळ्या संशोधकांनी आपल्या कारकिर्दीत प्रवास सुखकर करण्याचे अनेक अविष्कार करून दाखविले. यातल्याच एका आविष्काराची सुरुवात केली ती १८४४ मध्ये जन्मलेल्या जर्मन इंजिनिअर, कार्ल बेंझ यांनी. चला तर मग जाणून घेऊया कार विश्वात ज्यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं, अशा जगप्रसिद्ध कार्ल बेंझ यांच्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल!
“बायको गेली माहेरी आणि झाला गाडीचा जन्म” हे वाक्य कार्ल बेंझ यांच्याविषयी गमतीशीरपणे वापरलं जातं. कार्ल बेंझ यांचा जन्म २५ नोव्हेंबर १८४४ मध्ये जर्मनीतील कार्लसुरहे या शहरात एका लोहार कुटुंबात झाला. वडील Johann George Benz लोहारकाम करायचे, आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती आणि अश्यातच काही वर्षांत न्यूमोनियामुळे वडिलांचा मृत्यू झाला. घरची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवर आली. काबाडकष्ट करून आईने त्यांना शिकवले. आपल्या मुलाला शिक्षणात काहीच कमी पडता कामा नये, इतकंच तिला वाटायचं. लहानपणापासून कार्ल यांना नवीन गोष्टींचं प्रचंड कुतूहल. त्यात काहीतरी नवीन गोष्टींचा शोध घेणे, संशोधन करणे हे आवडीचे काम. शालेय शिक्षणानंतर त्यांनी वयाच्या 19व्या वर्षी 1864 ला मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी कार्लजरुह या यूनिवर्सिटीतून प्राप्त केली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका स्केल फॅक्टरीत draftsman आणि designer म्हणून काम केले. सुरुवातीपासूनच आपल्याला ज्या गोष्टी येत नाहीत त्याच करण्यात त्यांना जास्त रस होता. 1868 ला त्यांनी स्केल फॅक्टरीतलं काम सोडलं आणि ते फॉरझाईमला गेले. तेथे एका ब्रिज बिल्डिंग कंपनीसाठी काही काळ काम केलं. काही वर्षांनी त्यालाही रामराम ठोकून ते vienna च्या लोखंडी बांधकाम कंपनीत काम करू लागले. जवळ जवळ ७-८ वर्ष वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करून त्यांनी आपल्या अभ्यासात आणि अनुभवात भर टाकली. मात्र तरीही त्यांचे दुसरीकडे काम करण्यात मन काही लागेना.
१८७१ मध्ये त्यांनी ऑगस्ट रीटर यांची मेकॅनिकल कंपनी जॉइन केली. मात्र ती कंपनी पहिल्याच वर्षात डबघाईला आली. अशावेळी बेंझ यांनी त्यांची प्रेयसी बर्था रिंगरच्या मदतीने कंपनीला या अडचणीतून बाहेर काढले. बर्थाने लग्नात मिळालेल्या हुंड्यातून कंपनीचे शेअर्स विकत घेतले. २० जुलै १८७२ रोजी कार्ल बेंझने बर्था रिंगरशी लग्न केलं आणि बर्था रिंगरची बर्था बेंझ झाली.
Bertha Benz & Karl Benz
या कंपनीमध्ये त्यांनी नवीन इंजिनाच्या उत्पादनासाठी काम सुरू केले. अधिक दर मिळविण्यासाठी त्यांनी 1878 मध्ये नवीन पेटंटवर काम करण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी टू स्ट्रोक पेट्रोल इंजिन बनविण्यावर फोकस केला, खूप अभ्यासानंतर, परिश्रमानंतर त्यांनी ते इंजिन बनवलं, हे इंजिन बनवताना त्यांना अनेकदा अपयश आलं, मात्र त्यांनी हार मानली नाही. त्यांनी ते इंजिन बनवून पूर्ण केलं आणि त्यांना त्याचं पेटंट मिळाले ते २८ जून १८८० मध्ये.
टू स्ट्रोक इंजिनच्या यशानंतर स्पार्क प्लग, क्लच गियर, वॉटर रेडियटर speed regulation system, spark ignition चा शोध लावून त्यांनी त्याचे पेटंट मिळविले. मात्र समाजात एखादा जर चांगलं काम करत असेल, तर त्याचे पाय ओढणारे अनेक लोक असतात. प्रॉडक्टवरील High product cost मुळे मॅनहाइममधील बँकांनी कार्ल यांना joint stock company बनविण्यास भाग पाडले. या घटनेमुळे कार्ल नाखुश होते कारण इतकं जीव ओतून काम करूनही त्याच्याकडे फक्त पाच टक्के शेअर्स आणि संचालक म्हणून माफक पद शिल्लक होते. आणि सर्वात वाईट म्हणजे, नवीन उत्पादने तयार करताना त्याच्या कल्पनांचा विचार केला जात नव्हता, म्हणूनच कार्ल यांनी एका वर्षानंतर, 1883 मध्ये त्या कॉर्पोरेशनमधून माघार घेतली.
कार्ल यांची लहानपणापासूनची आणखी एक आवड म्हणजे सायकल repairing. ते मॅनहाइममधील मॅक्स रोझ आणि फ्रेडरिक एस्लिंगर यांच्या मालकीच्या सायकल दुरुस्तीच्या दुकानात काम करू लागले. तिघांनी industrial machines चे उत्पादन करणारी एक नवीन कंपनी स्थापन केली जिचं नाव होतं Benz & Cie.
कंपनीचे यश पाहता कार्ल आणखी जोमाने काम करू लागले. त्यावेळी सगळीकडेच carriages म्हणजेच बग्गीचा वापर केला जायचा पण कार्ल यांच्या तल्लख मेंदूत घोडाविरहित गाडी बनविण्याची कल्पना आली. सायकल रिपेअरिंगच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी ऑटोमोबाइल तयार करण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी फोर स्ट्रोक इंजिन, advanced coil ignition अशा अनेक गोष्टी वापरल्या आणि 1885 साली पहिल्या ऑटोमोबाईलची निर्मिती केली ज्याचं नाव होतं “बेंझ पेटंट-मोटरवॅगन”. २९ जानेवारी १८८६ रोजी जर्मनीमध्ये जगातील पहिल्या गाडीचा जन्म झाला. मात्र प्रदर्शनादरम्यान “बेंझ पेटंट-मोटरवॅगन” ची भिंतीशी टक्कर झाली आणि त्याचे हे मॉडेल अयशस्वी ठरले. या मॉडेलमध्ये काही त्रुटी आढळल्या म्हणून कार्लने मोटरवॅगन मॉडेल २ तयार केले, त्यात पहिल्या मॉडेलपेक्षा अनेक चांगले बदल केले. १८८९ मध्ये, त्याने मॉडेल क्रमांक ३ सादर केले, ज्याचे प्रदर्शन पॅरिसमध्ये भरवण्यात आले.
Benz Patent Motorwagen
जरी हे मॉडेल चांगले असले तरीही गाडीतून येणाऱ्या आवाजामुळे सरकारी अधिकारी बेंझ यांच्या गाडीकडे शंकेने पाहू लागले. इतका मोठा शोध लावूनही कार्ल यांनी गाडी बाहेर काढलीच नाही. गाडी सुरक्षित असू शकेल का? इतक्या लांब पल्ल्याचा रस्ता गाडी पार करू शकेल का? अशी भीती त्यांच्या मनात होती. गाडी तयार तर केली, मात्र ती अजून उजेडात आली नव्हती.
आपल्याकडे एक म्हण आह, “प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक ‘स्त्री’ असतेच”, या प्रयोगातदेखील बर्था बेंझ यांनी स्वतःकडचा सगळा पैसा खर्च केला केला होता. गाडीचं पेटंट मिळूनही कार्ल यांनी गाडी बाहेर काढली नव्हती म्हणून बर्था यांची खुप चिडचिड व्हायची. कार्ल यांच्या प्रवासात बर्था बेंज यांचा सहभाग खूप महत्वाचा होता, बर्था यांनी मनाशी पक्के केले की, आता ही गाडी आपणच बाहेर काढायची.
जेव्हा कार्ल बेंझ घरी नव्हते तेव्हा बर्था यांनी एक बेत आखला की, आपल्या मुलांसह गाडीतून प्रवास करायचा आणि ती आपल्या माहेरी निघाली. मॅनहाईम जिथे हे दाम्पत्य राहायचं तिथून फॉरझाईम म्हणजेच बर्था यांचं माहेर जवळपास ९७ किलोमीटर दूर होतं. आत्ता जरी आपल्याला हे अंतर जवळच वाटत असलं, तरी त्याकाळच्या ओबडधोबड रस्त्यावरुन एवढा प्रवास करणे सुद्धा कमी जिकरीचे काम नव्हते. मात्र त्यानी आपला प्रवास चालू ठेवला. बिना घोड्यांची ही गाडी बघून रस्त्यावरचे लोक घाबरू लागले. या आधी कधीच न पाहिलेलं काहीतरी ते पाहत होते. कोणी “चेटकीण आली, चेटकीण” म्हणून हिणवत होतं तर कोणी त्यांच्या अंगावर, त्यांच्या गाडीवर थुंकत होतं. इतकंच नाही तर काही अंतर कापल्यावर गाडीतील इंधन संपलं त्यावेळी मात्र पंचाईत निर्माण झाली. एका गावात जाऊन त्यांनी पेट्रोकेमिकल घेतलं ते वापरून त्यांनी आपला प्रवास सुरु केला, पण पुन्हा काही अंतर गेल्यावर त्या गाडीचा ब्रेक पूर्ण झिजून गेला. त्यावेळी जुगाड करून बर्था यांनी पहिले ब्रेक लायनर तयार केले; असं करत करत त्यांनी अखेर आपलं माहेर गाठलं. काही वेळ विश्रांती घेऊन त्या पुन्हा आपल्या घरी परतल्या. तेव्हा कार्ल यांना बायकोने केलेल्या या धाडसाची माहिती मिळाली आणि त्यांना आपण केलेल्या कामावर विश्वास बसला. बायकोच्या धाडसामुळे बेंझ यांची गाडी प्रकाशात आली. सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे बायको गेली माहेरी आणि झाला गाडीचा जन्म या वाक्याचा जन्म हा असा झाला.
Bertha Benz and the first road trip in history
Benz & Cie आता 50 कर्मचाऱ्यांवरून थेट 430 कर्मचाऱ्यांपर्यंत जाऊन पोहचली आणि अश्या पद्धतीने एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या वर्षांत, बेंझ ही जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी बनली होती. Benz & cie च्या व्यापकतेमुळे 1899 मध्ये फ्रेडरिक फॉन फिशर आणि ज्युलियस गॅन हे कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य बनले आणि बेंज यांची कंपनी joint stock कंपनी बनली. नवीन संचालकांनी शिफारस केली की बेन्झने मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी योग्य असलेली कमी खर्चाची ऑटोमोबाईल तयार करावी. 1894 ते 1902 पर्यंत, बेंझने 1,200 पेक्षा जास्त गाड्यांचे उत्पादन केले, ज्यात वेलोसिपेडचा देखील समावेश होता. नंतरच्या काळात कार्ल बेंझ यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत होत्या. अनेक नवनवीन शोध,संशोधनाचे कार्य ते अविरत करत होते. बेंझने इतिहासातील Internal combustion इंजिनसह पहिला ट्रक डिझाइन केला. इतकंच नाही, तर नेटफेनर बस कंपनीसाठी त्यांनी जगातील पहिली मोटार बसही तयार केली. या अभूतपूर्व कामाची पोचपावती म्हणजे 25 नोव्हेंबर 1914 रोजी त्यांच्या जन्मगावी कार्लजरुह येथे त्यांच्या सत्तराव्या वाढदिवसाच्या उत्सवादरम्यान, कार्ल बेंझ यांना कार्लजरुह विद्यापीठाने मानद डॉक्टरेट प्रदान केली.
1923 मध्ये जर्मनीवर आर्थिक संकट ओढवलं. अनेक business डबघाईला आले. इतरांवर आलेली वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून 28 जून 1926 रोजी Benz & Cie. त्यावेळेस जर्मनीच्या automobile क्षेत्रात नाव कमावलेल्या डेमलर मोटरेन गेसेलशाफ्ट या कंपनीत merge झाली. पुढे या कंपनीने आपले product ‘मर्सिडीज-बेंझ’ या नावाने बाजारात आणले आणि पुढे ते किती प्रसिद्ध झाले हे वेगळं सांगायलाच नको.
Automobile क्षेत्रातल्या या सम्राटाचा प्रवास ४ एप्रिल १९२९ रोजी वयाच्या ७० व्या वर्षी थांबला, पण आपल्या अतुलनीय कामगिरीमुळे त्यांना आजही the father of the car किंवा “father of the automobile industry” म्हणून ओळखले जाते.
तर ही होती कार्ल बेंझ यांची जीवन कहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि हो चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसल्यास लगेच सबस्क्राईबसुद्धा करा.
Pivot – सोमवारची सकाळ, दरवेळेस प्रमाणे सुरेशला याही सोमवारी एका महत्त्वाच्या Meeting साठी जायला उशीर झालेला आहे. सुरेश गाडी काढतो आणि रोजच्या रस्त्याने निघतो, पण जाता जाता अलीकडेच त्याच्या लक्षात येतं की Traffic मुळे आपल्याला पोहचायला खूप वेळ लागेल. काय करावं काही सुचत नसतं. Traffic मध्ये थांबलो तर उशीर होणार हे फिक्स आणि उशिरा पोहचलो, तर डील ब्रेक होणार हे फिक्स! अशा द्विधा मनःस्थितीत असताना सुरेशला अचानक लक्षात येतं की अलीकडूनच एक छोटा रस्ता आहे. ठरवलेल्या रस्त्याने जाण्यापेक्षा इकडून गेलं तर ते जास्त फायद्याचं ठरेल. सुरेश लगेच गाडीचा Reverse Gear टाकतो, शक्य होईल तितक्या लवकर गंतव्य ठिकाणी पोहचतो, Meeting होते आणि शेवटी डील पक्की होते.
स्टार्टअप विश्वच्या लेखात हे काय? असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. जरा धीर धरा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हळूहळू मिळतीलच. मित्रांनो, व्यवसाय आणि आपलं रोजचं जगणं काही वेगवेगळं नाही हे आत्तापर्यंत आपण अनेक लेखांत वेगवेगळ्या उदाहरणांसोबत पाहिलं. आता वरच्या उदाहरणाप्रमाणे सुरेशला एका महत्त्वाच्या कामाच्या वेळेस नेमका अडथळा आला. आपलं काम आता होईल का? या चिंतेत असतानाच त्याने ठरवलेल्या रोजच्या मार्गाने जाण्याऐवजी एक वेगळा मार्ग निवडला आणि शेवटी तो ते काम करण्यात यशस्वी झाला. सुरेशच्या जीवनात जे काही घडलं तेच आता आपण एका स्टार्टअप फाउंडरच्या संदर्भात पाहूया.
एक फाउंडर अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर आपला स्टार्टअप उभा करतो. त्यासाठी लागणारे पैसे, टीम हे सगळं तो व्यवस्थितरीत्या Manage करतो. सगळं होतं कामाला सुरुवात होते, पण पाहिजे तेवढा Profit त्याला त्यातून मिळत नाही. खूप विचार करून शेवटी तो ठरवतो की स्टार्टअपची ही आयडिया Scrap करून आपण एका नव्या कल्पनेवर काम सुरु करूया. ठरवलेल्या गोष्टीतला तोटा लक्षात घेऊन ती गोष्ट सोडून नफा मिळवून देणाऱ्या गोष्टीवर काम सुरु करण्यालाच स्टार्टअप विश्वात Pivot असं म्हणतात.
Pivot हे कोणत्याही बाबतीत असू शकतं म्हणजे दरवेळेस असं नाही की एखादी पूर्ण कल्पनाच बदलणं म्हणजे Pivot करणं. त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत ते कोणकोणते ते पण आपण जरा पाहूया.
Pivot चे प्रकार
Eric Ries या अमेरिकन उद्योजकाने Lean Startup या पुस्तकात Pivot चे दहा प्रकार सांगितले आहेत.
Zoom-in : समजा तुमचं एक Product आहे. त्या Product मध्ये खूप सारे Features आहेत, पण User Reports नुसार तुमच्या लक्षात आलं की, यापैकी एकाच Feature चा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. मग तुम्ही ठरवता की सगळे Feature ठेवण्यापेक्षा फक्त एकाच Feature वर Focus करूया आणि तेच तुमचं Final Product बनतं. याच Process ला Zoom-in Pivot असं म्हणतात.
Zoom-out : Zoom-In Pivot च्या अगदी विरुद्ध Process म्हणजे Zoom-Out Pivot. यात सुरुवातीला तुमच्या Product मध्ये एकच Feature असतं, पण हळू हळू तुम्ही त्यात वेगेवगळे Features Add करता आणि तेच तुमचं Main Product बनतं.
Customer segment pivot : तुमचं Product हे त्या लोकांना आवडतंय ज्यांना तुम्ही Target केलेलंच नाही, मग अशा वेळेस करणार काय? तर तुमचा जो Target Audience आहे तो बदलणं गरजेचं आहे म्हणजे Customer Segment Pivot करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचा Profit वाढेल.
Customer Need Pivot : तुम्ही बनवलेलं तुमचं Dream Product हे Customer ला आवडेलच याची काही Gurantee नसते. आणि Customer ला पाहिजे असलेल्या गोष्टी तुम्ही Provide करत नसाल, तर Profit चा आणि तुमचा कधी संबंधच येणार नाही. मग अशावेळी काय करणार तर Customer च्या गरजेनुसार तुम्ही तुमचं Product बदलू शकता म्हणजेच Customer Need Pivot करू शकता.
Platform Pivot : App ला वेबसाईटमध्ये Convert करणं किंवा याउलट वेबसाईटला App मध्ये Convert करणं या गोष्टी त्यामध्ये येतात. यामध्ये तुम्ही तुमच्या Product चा Platform च Change करत असता.
या महत्त्वाच्या पाच प्रकारांसोबत Pivot चे आणखी काही प्रकार आहेत. जसं की Business Architecture , Value Capture, Engine of Growth, Channel आणि Technology Pivot.
Pivot म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणकोणते? हे आपण पाहिलं. आता ही Term आपण एका उदाहरणाने समजून घेऊया.
Burbn या Location Based Check-in App विषयी तुम्ही कधी ऐकलं आहे का? कसं काय ऐकणार सुरुवातीच्या काळातच त्यांनी Pivot केलं आणि ते Photo-Video Posting, Comments, Like, Share च्या दुनियेत शिरले In Short Social Media Platform म्हणून त्यांची कंपनी उदयास आली सुरुवातीच्या काळातच तोट्यात असणारी ही कंपनी आता अख्ख्या जगभरात Profitable असणाऱ्या कंपन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. ही Profitable कंपनी म्हणजे Instagram. Instagram सारख्या अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांना सुरुवातीच्या काळात अपयशाचा सामना करावा लागला, पण वेळेवर Pivot केल्याने त्या नंतरच्या काळात तितक्याच यशस्वीसुद्धा ठरल्या.
तर मित्रांनो आजचा हा स्टार्टअप विश्वाचा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला Comment मध्ये नक्की सांगा. तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर पोहचवा आणि अशाच माहितीपूर्ण आणि Interesting गोष्टींसाठी नवी अर्थक्रांतीच्या दररोज वेबसाईटला भेट देत चला.
Pitch Deck – मित्रांनो आजपर्यंत आपण स्टार्टअप विश्वाच्या भागात वेगवेगळ्या terms पाहिल्या. यातल्या बराचशा गोष्टी तुमच्यासाठी नवीन असतील किंवा काही आधीपासून माहितीही असतील. जर तुम्ही सुरुवातीपासून ही series पाहत असाल, तर नक्कीच तुमच्या डोक्यात स्टार्टअपची एखादी तरी कल्पना शिजली असेल. काही जणांनी ती प्रत्येक्षात उतरवलीसुद्धा असेल. पण कसंय, कल्पना वगैरे सगळं ठीके ओ! ती कल्पना सत्यात उतरवायला किती पैसे लागतात याचा एकदा हिशोब काढला ना की, वाटतं जाऊ दे… कोणी सांगितलेत एवढे पैसे घालायला? त्यापेक्षा आपलं रोजचं कामच बरंय! पण सगळेच काही असा विचार करत नाहीत बरं का! काहीजण असतात खतरों के खिलाड़ी; रिस्क घ्यायला तयार असतात.
सुरुवातीला स्वतःचे पैसे घालवून, family कडून, मित्रांकडून पैसे घेऊन ते एकदाचा स्टार्टअप सुरु करतात, पण अजून growth करण्यासाठी अजून पैसे हवे असतात; सगळी गडबड होते ती इथं! डायरेक्ट एखाद्याकडे पैसे मागायला गेलं, तर कोणी पैसे देत नाही… तोंडी व्यवहाराला काही व्हॅल्यू नसते. Pitch Deck बद्दल त्यांनी कधी ऐकलेलंच नसतं; ऐकलं असेल तरी त्यात करायचंय काय हे त्यांना माहिती नसतं. तुम्हाला माहितीये का? असेल तर चांगलंच आहे आणि नसेल तर त्याहून चांगलंय; कारण आजचा हा लेख तुमच्यासाठीच आहे. चला मग करूया सुरुवात.
Pitch deck / startup deck / slide deck म्हणजे काय तर तुमच्या कंपनीबद्दलचं असं एक presentation जे तुम्ही investors ला दाखवता. त्या presentation च्या आधारावरच investors ठरवतात की तुमच्या कंपनीत investment करायची का नाही ते. हे ऐकून तुमच्या डोक्यात काही तरी आलं असेल; आलं ना? बरोबर Shark Tank. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या show मध्ये वेगवेगळे founders यायचे आणि तिथल्या Sharks ना त्यांच्या कंपनीबाबत pitch करायचे. मग Sharks ना जर ते सगळे मुद्दे पटले, काही तरी interesting वाटलं तरंच ते त्यात investment करायचे. यासाठी एक साधं, सरळ, Concise Pitch Deck बनवणं हे खूप गरजेचं असतं, कारण याचाच फायदा तुम्हाला Funding raise करण्यासाठी होतो.
जर तुम्हाला तुमच्या स्टार्टअपचं एक जबरदस्त Pitch Deck बनवायचं असेल, तर त्यात कोणकोणत्या गोष्टी आल्या पाहिजे हे आता आपण पाहूया…
Slide 1: Problem
कोणत्याही स्टार्टअपची सुरुवात होते एका problem पासून. म्हणजे लोक त्यांच्या रोजच्या जीवनात काय problems face करतायेत आणि तुम्ही त्या problem कडे कसं पाहताय हे येणार first slide मध्ये. उदाहरणार्थ, लोकांना जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असायचं, तेव्हा त्यांना कधी कधी वेळेवर रिक्षा मिळायच्या तर कधी कधी तासनतास थांबून सुद्धा एकही रिक्षा मिळत नसायची. हा झाला Problem जो लोक face करत होते.
Slide 2: Solution
आता तुम्ही त्या problem वर काय solution देताय हे येणार second slide वर. पहिल्या उदाहरणाला जर continue करायचं ठरवलं, तर यावरचं solution काढलं Ola ने.
Slide 3: Market
तुमच्या या solution ला market मध्ये किती value आहे हे येणार third slide वर. तुमचं जे market आहे त्याची size किती आहे, तुमचा target audience कोणता आहे? या सगळ्या गोष्टी इथं येतील.
Slide 4: Business model
तुमच्या business चं model कसं असणार आहे ते सगळं fourth slide वर येईल. आता Business model म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणकोणते आहेत? हे सगळं आम्ही आधीच एका लेखा मध्ये cover केलेलं आहे. वेळ काढून तो लेख नक्की पहा. अगदी थोडक्यात सांगायचं तर, बिझनेसमध्ये तुम्ही काय विकणार आणि त्यातून पैसे कसे येणार आहेत ते इथं सांगायचं आहे.
Slide 5: Competitive Advantage किंवा USP
आता, तुम्हाला सुचलेली Business Idea ही कदाचित आधीही कोणाला तरी सुचलीच असेल, तशीच सर्व्हिस देणारे किंवा सेम प्रोडक्ट विकणारे हजारो जण मार्केट मध्ये असतील, पण त्यातही ती idea तुम्ही कशा वेगळ्या पद्धतीने मांडणार आहात आणि बाकीच्यांपेक्षा तुम्ही कसे वेगळे आहात हे इथं explain करायचं आहे.
Slide 6: Marketing and sales strategy
कोणत्याही product ला जर मार्केटमध्ये आणायचं असेल, तर त्यासाठी काहीतरी strategy plan करावी लागेल आणि याबद्दल In detail माहिती हवी असेल, तर तुम्हाला आधी Go-to-market strategy चा लेख बघावा लागेल. बघा मग लवकर कशाला वेळ घालवताय?
Slide 7: Team
प्रत्येक startup ला grow करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती team. तुमच्या team मध्ये कोण कोण आहे, त्यांच्या expertise काय आहेत, त्यांचे key roles काय आहेत. हे सगळं येणार या slide मध्ये.
Slide 8: Financials
यामध्ये तुम्हाला तुमच्या startup चा revenue, expenses आणि cash flow असं सगळं explain करायचं आहे. त्याचसोबत तुम्ही याआधी काही fundraising केली आहे का? किंवा त्याबाबत तुमचे future मध्ये काही plans आहेत का? हेसुद्धा सगळं सांगायचं आहे.
Slide 9: Milestones and timeline
याआधी तुमच्या Startup ने काही milestones achieve केले आहेत का? म्हणजे पहिले १०००, १० हजार किंवा लाख product कधी sale झाले, नवीन ऑफिस कधी सुरु झालं वगैरे त्याची timeline काय आहे? हे सगळं येईल या slide वर.
Slide 10 Ask
Finally आता सांगायचं आहे की तुम्हाला किती रुपयांची गरज आहे? ते पैसे कुठे, किती, कसे खर्च होणार आहेत आणि या पैशांच्या बदल्यात तुम्ही इन्व्हेस्टरला किती percent equity देणार आहात.
आपण ज्याप्रमाणे या slides पाहिल्या अगदी त्याचप्रमाणे त्यांचा sequence असावा असा काहीही नियम नाहीये. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याचा sequence change करू शकता किंवा काही points सुद्धा बदलू शकता. बाकी तुम्हाला आजचा आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर लेख like आणि share करा.
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘आपल्या ध्येयाची स्वत:ला सतत आठवण करून द्या…’ करायची सुरवात?
गावाकडून शहरात व्यवसायासाठी आलेल्या जयसिंगने आपला व्यवसाय अजून वाढावा यासाठी बिझिनेस एक्सपर्ट असणाऱ्या कदमांना फोन करून आपल्या कारखान्यावर बोलावलं.
मुंबईतील झोपडपट्टी एरियात, दोन खोल्यात त्याचा कारखाना. एक मोडका टेबल आणि खुर्ची म्हणजे त्याचं ऑफिस. चार पाच महिला, बॉक्स चिकटवणे, पॅकेजिंग करणे यांसारख्या गोष्टी करत होत्या. जयसिंग मूळचा राजस्थानचा. तिकडे तो अशा पद्धतीच्या कारखान्यात काम करायचा. तीन चार वर्षापूर्वी मुंबईत आला आणि ड्रायफ्रूटसाठी लागणाऱ्या डेकोरेटीव्ह पॅकेजिंग बॉक्स निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. जशी गावाकडे दिवाळीला एकमेकांना फराळ देण्याची जशी पद्धत आहे, तशी उच्चवर्गीय लोकांत सण, समारंभ इत्यादीसाठी ड्रायफ्रूट बॉक्स देण्याची पध्दत आहे. तळलेले पदार्थ, गोड बेकरीचे पदार्थ वगैरे देण्याचे आता प्रमाण कमी झालं. आता ड्रायफ्रूट्सना खूप मोठी मागणी आहे. अनेक उच्चभ्रू लोक विवाह समारंभांत किंवा लग्नाच्या पत्रिकेबरोबर ड्रायफ्रुटचा बॉक्स देतात. कॉर्पोरेट कंपन्यांमध्येसुद्धा हीच पध्दत वापरली जाते. हे सारं जयसिंग अगदी अचूक हेरत होता. हीच संधी ओळखून, आपलं शिकलेलं कौशल्य वापरून त्यानं हा व्यवसाय करायचं ठरवलं. पुठ्ठे, थर्माकोल, पेपर, चमकी कागद इत्यादी आकर्षक बाबी वापरून तो आपलं कौशल्य दाखवत होता. या पेपर-क्राफ्ट कलेत निपुण होऊन तो उत्पादन बनवत होता आणि आता त्याला ते बॉक्सेस विदेशात एक्स्पोर्ट करायचे होते म्हणून त्याला मार्गदर्शन हवं होतं.
कारखान्यात आलेल्या कदमांना जयसिंगने आपला तो दोन खोल्यांचा कारखाना दाखवला आणि खुर्चीत बसायला सांगितले. खुर्चीत बसवून ते टेकतात, तोच त्यांच्या पाठीला एक खिळा टोचला. कदम म्हणाले, “अरे जयसिंग, इस कुर्सी में कील है, इसे ठीक करना पड़ेगा किसी से।” त्यावर त्याने जे उत्तर दिले ते थक्क करणारे होते. तो म्हणाला, “हाँ साहब, कील मैंने ही लगवाया है। मैं गांव से कुछ कमाने के लिए मुंबई आया था, वो मुझे हर वक्त याद रहना चाहिए। जब मैं इस कुर्सी पे बैठू, तो वो कील मुझे चुभती है और बताती है, जब तक तू कमायेगा नहीं, तब तक बैठ नहीं सकता। मैं यहाँ आया ही इसी सपने के साथ हूँ की, पाच सालों में कमसे कम एक करोड का धंदा करूंगा, तब तक चैन से नहीं बैठूंगा। ये कील इसीलिए लगायी है कि मुझे आराम से बैठने की आदत न लगे।”
पुढे त्याचे बॉक्सेस एक्सपोर्ट करण्यासंबधीच्या चर्चा सुरू झाल्या. प्रत्येकाने आपल्याला ध्येय गाठायचे आहे याची आठवण प्रत्येक दिवशी व्हावी अशी काहीतरी गोष्ट करावी, जेणेकरून तुमच्या ध्येयाचा तुम्हाला कधीही विसर पडणार नाही. ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत राहाल.
तुमचं ध्येय नेहमी लक्षात राहावं यासाठी तुम्ही अशी काही आयडिया वापरत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, नाहीतर पश्चाताप होईल…’ करायची सुरवात?
काही व्यक्तींमध्ये रिस्क घ्यायची हिंमत नसते. अशी लोकं नेहमी आरामदायक, सुरक्षित व जोखीमरहित पर्यायांचा अवलंब करीत असतात. वैयक्तिक व प्रोफेशनल जीवनात ‘कम्फर्ट झोन’ ही अशा जागा आहे की त्यात अडकलेला माणूस कधीच आव्हांनाना सामोरे जाण्यास मानसिकदृष्ट्या तयार नसतो. त्यामुळे तो कायमच संभाव्य अडचणीबद्दल गाफील राहत असतो.
कम्फर्ट झोनमध्ये अडकलेल्या व्यक्तींचा विकास हा खुंटलेला असतो. कम्फर्ट झोन त्यांना प्रगतीच्या संधीचा फायदा घेण्यापासून रोखत असतो. सतत कम्फर्ट झोनमध्ये राहिल्याने माणूस नवीन आव्हाने पेलण्यास असमर्थ ठरतो किंवा संभाव्य अडचणींबद्दल त्याच्यात जागरूकता निर्माण होत नाही. एक प्रयोग केला गेला होता. एका काचेच्या बरणीत धान्य भरून ठेवले होते. एक उंदीर त्यात सोडला. जेव्हा बरणी पूर्ण भरलेली होती तेव्हा उंदराला वाटले की, आता शांतपणे धान्य खाईन, काही अडचण नाही. त्यामुळे तो तिथेच राहिला व बरणीतील धान्याचा उपभोग घेऊ लागला. असे करता करता एक दिवस सर्व धान्य संपले. आता उंदीर बरणीत एकदम तळाला होता आणि दुर्भाग्य म्हणजे तो आता त्यातून बाहेरही पडू शकत नव्हता. फक्त बाहेर पाहून रडण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
म्हणूनच तरुण वयात नवनवीन आव्हाने स्वीकारा, त्यातून बरेच काही शिकता येईल, परंतु केवळ आरामदायी सुरक्षित वाटणाऱ्या कम्फर्ट झोनमध्ये अडकू नका, कारण ते एक जाळे असते. त्यात दीर्घकाळ अडकाल, तर तुमच्या विकासाचे सर्व दरवाजे बंद होतील व वेळही निघून गेलेली असेल. जेव्हा तुम्ही मनातील भीती व चिंता बाजूला सारून नवीन आव्हानांचा सामना करता, तेव्हा तुमच्या यशस्वी वाटचालीस सुरुवात झालेली असते. दुर्दैवाने बरेच लोक कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यास मानसिकरित्या तयार नसतात. त्यांना आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असते; परंतु नवीन जोखिमा आणि आव्हानांना पेलण्यास ते घाबरत असतात. त्यांना जे सुरक्षित वाटते, त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात. कम्फर्ट झोन ही स्वतःला घातलेली मर्यादा असते; जिथे माणूस जीवनात पुढे जाण्याबाबत साशंक असतो, बऱ्याचदा नवीन आव्हानांबाबत चिंताग्रस्त व नर्व्हस असतो. उदाहरण घ्यायचे तर आपल्या लोकांचे घ्या. उद्योगात जोखीम घ्यावी लागते. त्यामुळे लोकांना उद्योग क्षेत्र असुरक्षित वाटते, परंतु नोकरी हा उत्पन्नाचा शाश्वत व सुरक्षित मार्ग म्हणून नोकरीसाठीच शिकतात. हा झाला कम्फर्ट झोन… मग सांगा आपल्यामध्ये उद्योजक कसे घडणार?
तुम्ही केलात का कधी असा प्रयत्न तुमचा कम्फर्ट झोन सोडण्याचा? केला असाल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
नमस्कार मित्रांनो, स्टार्टअप विश्वाच्या नव्या कोऱ्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो मला सांगा समजा तुम्हाला Market मध्ये एक Product launch करायचं आहे. असं Product की जे लोकांसाठी खूप उपयोगी असेल, असं Product की ज्यामुळे लोकांचं आयुष्य बदलून जाईल,या Product चा Sale इतका जास्त होईल की तुम्ही मालामाल व्हाल! एक मिनिट… पण असेल, जाईल, होईल या सगळ्या भविष्यातल्या गोष्टी झाल्या ना; यापैकी अजून एकही गोष्ट झालेली नाही, हे सगळं तुम्हाला सध्या फक्त वाटतंय. यातल्या गोष्टी खऱ्या ठरण्यासाठी तुम्हाला वर्तमानात यावं लागेल, म्हणजे आधी तुम्हाला तुमचं Product Launch करावं लागेल. तर आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. याच Product बद्दल म्हणजेच Minimal Viable Product बद्दल. चला मग करूया सुरुवात.
What is MVP (Minimal Viable Product)?
MVP किंवा Minimal Viable Product म्हणजे असं एक Basic Product की ज्यामध्ये तुमच्या Final Product मध्ये असणारे सगळे Main Features आहेत, पण ते इतकंही परफेक्ट नाहीये की, ते तुमच्या Final Product शी Compete करू शकेल बर हे समजून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या App चं उदाहरण पाहूया WhatsApp चं! तुम्हाला आठवतंय का जेव्हा WhatsApp launch झालं होतं, तेव्हा त्यात फक्त दोनच Features होते. Text Messaging आणि Voice Messaging. हे ते Features होते जे की Normal Users पर्यंत वापरण्यासाठी आले होते. पण त्याहीआधी WhatsApp ने त्यांचं Minimal Viable Product बनवलं होतं जे की काही लोकांनाच वापरण्यासाठी मिळालं होतं आणि त्या Version मध्ये फक्त एक महत्वाचं feature होतं ते म्हणजे Text Messaging चं! जेव्हा WhatsApp ला समजलं की आपलं हे MVP लोकांना आवडतंय, तेव्हाच त्यांनी यावर आणखी काम करायला सुरुवात केली.
MVP launch करण्यामागची कारणं
Eric Ries या अमेरिकन उद्योजकाने MVP या concept चा शोध लावला. MVP का launch केलं पाहिजे हे सांगण्यासाठी त्यांनी तीन महत्त्वाची कारणं सांगितली.
१. पहिलं कारण म्हणजे MVP मुळे तुमचं जे Dream Product आहे, ते लवकरात लवकर Market मध्ये उतरवता येतं.
२. दुसरं कारण म्हणजे तुम्हाला हे समजतं की Customer तुमच्या Product ला कसं React करतायेत. तुम्हाला जसं वाटलं होतं, तसं ते Actually काही Value Generate करतंय का? हे समजायला मदत होते.
३. तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या वेळेचा आणि पैशाचा खर्च कमी होतो. आता MVP असल्यामुळं साहजिक आहे Final Product च्या Comparison मध्ये याला बनवायला कमी वेळ आणि पैसा खर्च होणार आहे. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू म्हणजे जर तुम्ही एखादं Product मोठ्या Scale वर Launch केलं, पण ते लोकांना आवडलंच नाही तर यात नुकसान कोणाचं आहे? तुमचं! पण जर हेच Product तुम्ही MVP च्या रुपात Launch केलं आणि लोकांना ते नाही आवडलं, तर आधीच्या तुलनेत इथं होणार नुकसान हे खूप कमी आहे. बघा आहे का नाही Double फायदा?
तर मित्रांनो तुम्हाला आजचा स्टार्टअप विश्वाचा लेख कसा वाटला आम्हाला Comment मध्ये नक्की सांगा. MVP प्रमाणेच अनेक Interesting Startup Terms आम्ही याआधीच्या लेखामध्ये सोप्या भाषेत Explain केल्या आहेत. जर खरंच तुम्हाला Startup सुरु करायचा असेल तर या Terms चा फायदा नक्कीच तुम्हाला होईल याची आम्हाला खात्री आहे. बाकी आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच Like करा आणि जास्तीत तुमच्या उद्योजक मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. भेटूया पुढच्या भागात अशाच एका Interesting Term सोबत. तोपर्यंत राम राम.
Agro Tourism – सिमेंटच्या शहरांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे, बेसुमार औद्योगिकरण आणि वाढत जाणारे प्रदूषण यामळे शहरं बकाल होत आहेत. मोठ्या प्रमाणावर गावागावातील लोक शहराकडे नोकरीसाठी येत आहेत. ज्यामुळे शहरांमध्ये गर्दी वाढत आहे. अशावेळी या गर्दीला गरजेचा असतो मोकळा श्वास आणि एक विरंगुळ्याची जागा.
यासाठी प्रत्येक आठवड्याच्या शेवटी म्हणजेच विकेंडला सगळे जात असतात प्रेक्षणीय किंवा रम्य ठिकाणी जिथे आपल्या कुटुंबासोबत त्यांना निवांत वेळ घालवता येईल आणि रोजच्या जेवणापेक्षा छान, वेगळं काहीतरी खाता येईल. लोक हे पर्यटन नेमके कशासाठी करतात. त्यांचं स्वतःचं शहर सोडून, देश सोडून का जातात पर्यटनाला. तर Enjoy करता यावं, कामातून थोडीशी उसंत मिळावी. सुट्टीचा दिवस आनंदात घालता यावा, एक नवीन अनुभव मिळावा म्हणून.
असं म्हणतात “गरज हीच शोधाची जननी” आणि नेमकी हीच गरज ओळखून आपण आपल्या उद्योगाला सुरुवात करू शकतो. कृषी या विषयाचा तुम्हाला गंध असेल किंवा मूळातच शेती हा तुमचा व्यवसाय असेल, तर शेती करत करत किंवा अगदी पूर्णवेळ उद्योग म्हणून “Agro Tourism” म्हणजेच “कृषी पर्यटन” या व्यवसायाकडे बघू शकता.
नेमके हे कृषी पर्यटन म्हणजे काय हे आता आपण पाहणार आहोत. शहरात राहात असताना अनेकांना ग्रामीण जीवनाबद्दल प्रचंड कुतूहल असते. त्यांचे राहणीमान, शेती, शेतीचे व्यवस्थापन, पशुपालन, गावरान भोजन आणि निसर्गरम्य वातावरण याबद्दल प्रचंड आकर्षण असते. धकाधकीच्या जीवनातून एक दिवस हे सर्व याची देही, याची डोळा अनुभवता यावे यासाठी लोक कृषी पर्यटन करतात. हे निव्वळ पर्यटन नाही तर एक प्रकारचे संस्कार आणि सामाजिक जाणिवेचा उपक्रम आहे.
तुम्हाला माहित आहे का की भारतामध्ये Travel आणि Tourism industry ही Service Sector मधील सर्वात मोठ्या Industry पैकी एक आहे. २०१८ साली भारतामध्ये Travel आणि Tourism Industry हि २३४ बिलियन डॉलरची होती. २०१९ मध्ये देशातील एकूण Jobs पैकी ८% Jobs हे या Industry ने देशाला दिले होते. भारतामध्ये दर वर्षी करोडो लोक पर्यटनाला जातात. इतकंच नाही तर अनेकी लोक दरवर्षी बाहेरच्या देशातून भारतामध्ये फिरायला येतात. भारतामध्ये अनेक अशी पर्यटन स्थळं आहेत, ज्यांना करोडो लोक दरवर्षी भेट देतात.
या कृषी पर्यटनामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आपण सामावून घेऊ शकतो? तर त्यासाठी अनेक पर्याय आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय शेती पद्धत आणि तिचे महत्त्व, पशुपालन पद्धत, चुलीवरच्या जेवणाची पद्धत तसेच बैलगाडी, घोडागाडी, घोड्याची सवारी, कुकुटपालन आणि नैसर्गिक साधन संपत्तीची माहिती व महत्त्व अशा गोष्टींचा समावेश होऊ शकतो. यासाठी तुमच्याकडे शेती असणे आवश्यक आहे किंवा शेत जमीन. त्यावर इतर गोष्टी तुम्ही विकसित करू शकता. तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा हा प्रकल्प उभा करणार आहात. त्या ठिकाणी जवळच असलेल्या पर्यटन स्थळांची माहिती घेऊन त्याचाही वापर तुम्ही यासाठी करू शकता.
तुम्ही जर शेतकरी असाल तर शेतीसोबत जोडधंदा म्हणून हा व्यवसाय उभा करू शकता. यासाठी भेट देणाऱ्या लोकांसाठी ठराविक तिकीट रक्कम तसेच ग्रुपसाठी काही खास ग्रुप बुकिंग सवलत आणि विध्यार्थ्यांसाठी किंवा शालेय सहलींसाठी खास ऑफर ठेऊ शकतो. अशापद्धतीने शेती सांभाळत पर्यटन हा उद्योग खास करून शेतकऱ्यांना एक नवी आर्थिक उभारी देऊ शकतो. तसेच या माध्यमातून निसर्ग संवर्धनासाठी आपण जागरूकता निर्माण करू शकतो.
या संकल्पनेविषयी तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.
IPO. या टर्मबाबत तुम्ही याआधीही खूप वेळा ऐकलं असेल. लवकरच या कंपनीचा IPO येणार आहे, प्रत्येक share ची price एवढी असणार आहे, IPO या तारखेपासून सुरु होऊन या तारखेला संपणार आहे अशा काही चर्चा तुमच्या मार्केट किंग मित्रांमध्ये रंगत असतील. पण तुम्हाला कधी वाटलं का की आपल्यालाही या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती हवी? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. चला तर मग सुरुवात करूया!
IPO म्हणजे काय
IPO चा full form होतो initial public offering. नाव ऐकूनच तुम्हाला याबाबत थोडीफार कल्पना आली असेलच. तर initial public offering ही एक अशी process आहे ज्यामध्ये एखादी मोठी कंपनी शेअर market मध्ये पहिल्यांदाच त्यांचे शेअर विक्रीसाठी काढते. अजून थोडं सोप्या पद्धतीने बघायचं झालं, तर कंपनी त्यांच्या बिझनेसचा विस्तार करण्यासाठी shares च्या माध्यमातून funding गोळा करते. यामध्ये फायदा दोघांचाही होतो म्हणजे कंपनीला पैसे मिळतातच, पण त्यासोबत तुम्हालाही त्या कंपनीचे shares मिळतात म्हणजे तुम्हीसुद्धा काही टक्के का होईना त्या कंपनीचे मालक झालेले असता.
कोणत्याही यशस्वी उद्योजकाला त्याचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी भांडवलाची गरज असते आणि म्हणून तो वेळोवेळी कर्ज काढून, भागीदार जोडून किंवा मार्केट मध्ये शेअर्स विकून व्यवसायासाठी भांडवल उभे करत असतो. आज जगातील कोणतीही मोठी कंपनी बघा, त्यांच्या उत्पादन आणि सेवांच्या बळावर जगावर अधिराज्य गाजवत असतील; पण यामध्ये सर्वात मोठा वाटा अशा असंख्य हातांचा आहे, ज्यांनी या कंपन्या लहान होत्या तेव्हा त्यांच्यावर विश्वास दाखवून त्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली. उदाहरणच घ्यायचं झालं तर, १९९३ साली इन्फोसिसमध्ये
केलेल्या १०००० रुपयांच्या गुंतवणुकीचे आज करोडो रुपये झाले, पण जेव्हा इन्फोसिस लहान कंपनी होती तेव्हा त्या कंपनीवर विश्वास ठेवून पैसे गुंतवणारे तुमच्या माझ्यासारखे छोटे-मोठे गुंतवणूकदारच.
IPO लॉन्च करण्याची कारणं :-
– एखाद्या कंपनीला आपलं काम वाढवायचं असेल तर त्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी ते आयपीओ लॉन्च करतात.
– एखाद्या कंपनीने जर आधी Debt म्हणजे कर्ज घेतलेले असेल तर त्यांना ते कर्ज फेडण्यासाठी आयपीओ लॉन्च करतात.
– काही जुन्या गुंतवणूकदारांना कंपनीतून बाहेर पडायचं असेल तर मग त्यासाठी कंपनी आयपीओ लॉन्च करते.
IPO कशा पद्धतीने काम करतो?
कोणतीही कंपनी तिचा IPO मार्केटमध्ये आणण्यापूर्वी private असते. या कंपनीमध्ये मग काही early investors असतात जसं की; founders, family, मित्र परिवार किंवा angel investors वगैरे. आपल्या कंपनीचा IPO मार्केटमध्ये आणणं ही खरं तर एक खूप मोठी गोष्ट असते. IPO मुळं कंपनीला जास्तीत जास्त पैसे उभारण्याची संधी मिळते. Private कंपनीपासून ती एक public कंपनी बनते. आयपीओचा कालावधी साधारणत: ४ दिवसांचा असतो. म्हणजे या ४ दिवसात या कंपनीचे शेअर्स विकत घेता येतात. त्यानंतर आयपीओ बंद होतो. मग गुंतवणूकदारांना शेअर्सचं वाटप केलं जातं. ह्या वाटप केलेल्या शेअर्सची, कंपनीची मार्केटमध्ये नोंदणी होते. त्याला ‘लिस्टिंग’ असं म्हणतात. या सर्व प्रक्रियेनंतर हे शेअर्स, गुंतवणूकदार मार्केटमध्ये हवे तेव्हा विकू शकतात.
आयपीओशी संबंधित महत्त्वाचे दिवस कोणते आहेत.
Opening Date: खऱ्या गुंतवणुकदारांसाठी आयपीओ विक्रीसाठी खुला करण्यात येतो.
Closing Date : त्या दिवसापर्यंत गुंतवणुकदार आयपीओसाठी अर्ज करु शकतात.
Allotment Date : जेव्हा शेअर वाटपाची माहिती मिळते.
Refund Date : जर तुम्हाला आयपीओमध्ये शेअर्सचे वाटप झाले नसेल, तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळल्यानंतर खात्यात अनब्लॉक केले जाते.
Credit of Shares Date : जेव्हा तुम्हाला वाटप झालेले शेअर्स तुमच्या डिमॅट खात्यात जमा होतात.
Listing Date : जेव्हा एखादी कंपनी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होते आणि इतर गुंतवणूकदारांप्रमाणे शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सुरु करतात
आयपीओची किंमत दोन पद्धतीने ठरवली जाते. एक फिक्स्ड प्राइस म्हणजेच निश्चित किंमत. आणि दुसरी म्हणजे बुक बिल्डिंग पद्धत. पहिल्या पद्धतीत कंपनी selling साठी काढलेल्या शेअरची किंमत आधीच ठरवते. त्यामुळे शेअर किती रुपयांना मिळणार आहे हे गुंतवणूकदारांना समजतं. त्यानंतर गुंतवणूकदार या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची की नाही याचा निर्णय घेऊ शकतात. दुसऱ्या म्हणजे बुक बिल्डिंग पद्धतीत शेअर्सचा price band ठरवला जातो. या price band मध्ये गुंतवणूकदारांना बोली लावावी लागते. म्हणजे कंपनीने जर ३०० ते ३५० रुपये असा price band ठरवला असेल, तर गुंतवणूकदारांना या किमती दरम्यान बोली लावता येते. इश्यू उघडताना कंपनी शेअरची किंमत fix करते म्हणजे त्या भावाने शेअर्सची विक्री करते. आता IPO चा main मुद्दा म्हणजे यात तुम्हाला एक, दोन shares घेता येत नाहीत. तुम्हाला shares हे लॉटमध्येच घ्यावे लागतात. उदा. जर एखाद्या आयपीओच्या एका लाॅटमध्ये १५ शेअर्स आहेत, तर गुंतवणूकदाराला कमीत कमी १५ शेअर्ससाठी बोली लावावीच लागते म्हणजे १ लाॅट खरेदी करणं compulsory आहे. त्यानंतर मग तुम्हाला १५ च्या पटीतच बोली लावावी लागते.
तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण IPO म्हणजे काय तो कशा पद्धतीने काम करतो, IPO लॉन्च करण्यामागची कारणं हे सगळं पाहिलं hope so तुम्हाला या लेखातून काहीतरी मदत नक्कीच झाली असेल. बाकी लेख आवडला तर आत्ताच त्याला like करा आणि जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा.