Category: उद्योजकता

  • OYO Success Story in Marathi: रितेश अग्रवाल यांच्या यशाचा प्रवास

    OYO Success Story in Marathi: रितेश अग्रवाल यांच्या यशाचा प्रवास

    OYO Success Story in Marathi: दिल्लीच्या कडकडत्या थंडीत, खिशात फक्त तीस रुपये घेऊन रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणाऱ्या एका अठरा वर्षांच्या मुलाने कधी विचार केला असेल का, की तो एक दिवस जगातील सर्वात तरुण अब्जाधीशांपैकी एक होईल? ही कहाणी आहे ओयो (OYO) चे संस्थापक आणि सीईओ रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal) यांची. आज २०२६ (2026) मध्ये ओयोचा हा विस्तार केवळ एका स्टार्टअपची यशोगाथा नसून, भारतीय उद्योजकतेच्या जागतिक भरारीचे ते एक जिवंत प्रतीक ठरले आहे.

    सुरुवातीचा संघर्ष: सिम कार्ड ते स्वप्नांचा शोध

    १९९३ (1993) मध्ये ओडिसाच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रितेशचे मन कधीच पुस्तकी ज्ञानात रमले नाही. घरच्यांना वाटत होते की त्यांनी इंजिनिअर व्हावे, पण रितेशला स्वतःचे काहीतरी वेगळे करायचे होते. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी शाळा सोडली आणि नशीब आजमावण्यासाठी दिल्ली गाठली. दिल्लीत राहणे सोपे नव्हते; सुरुवातीला त्यांनी पोटापाण्यासाठी सिम कार्ड विकण्याचेही काम केले. पण त्यांचे लक्ष नेहमीच ‘काहीतरी मोठे’ करण्यावर होते. खिशात पैसे नसतानाही त्यांचा निश्चय इतका मजबूत होता की त्यांना परिस्थिती हरवू शकली नाही.

    ओयोची (OYO) मूळ कल्पना: प्रवासातील गैरसोय आणि संधी

    जेव्हा एकदा रितेश डेहराडून आणि मसुरीच्या सहलीवर गेले, तेव्हा त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली – भारतात हॉटेल मिळवणे सोपे आहे, पण ‘स्वस्त आणि खात्रीशीर’ हॉटेल मिळवणे कठीण आहे. कधी खोली अस्वच्छ असते, तर कधी वाय-फाय नसते. या समस्येतूनच त्यांनी ‘ओरवेल स्टेज’ (Oravel Stays) ची स्थापना केली. पुढे २०१३ (2013) मध्ये त्यांनी प्रसिद्ध ‘थिल फेलोशिप’ (Thiel Fellowship) जिंकली, ज्यामध्ये त्यांना सुमारे ७८ (78) लाख रुपयांची स्कॉलरशिप मिळाली. या भांडवलातून त्यांनी ओरवेलचे रूपांतर ‘OYO Rooms’ मध्ये केले.

    २०२६ मधील ओयो: तोट्यातून नफ्याकडे जाणारी ‘मनी मशीन’

    २०२४ (2024) पर्यंत ओयो ही तोट्यात चालणारी कंपनी मानली जात होती, परंतु २०२५-२६ (2025-26) हे वर्ष कंपनीसाठी ‘टर्नअराउंड’ वर्ष ठरले आहे.

    विक्रमी नफा: ताज्या आर्थिक आकडेवारीनुसार, ओयोने आर्थिक वर्ष २०२५ (FY25) मध्ये ६२३ (623) कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. मार्च २०२६ (March 2026) च्या अहवालानुसार हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

    जागतिक विस्तार: आज ओयोचा विस्तार ८० (80) देशांतील आठशेपेक्षा जास्त शहरांमध्ये झाला आहे. कंपनीकडे आता ४३,००० (43,000) हून अधिक मालमत्ता (Properties) आहेत.

    मोटेल ६ (Motel 6) चे अधिग्रहण: रितेश अग्रवाल यांनी नुकतेच अमेरिकेतील प्रसिद्ध ‘Motel 6’ साखळीचे ४,३०० (4,300) कोटी रुपयांना अधिग्रहण करून जागतिक स्तरावर आपली पकड अधिक घट्ट केली आहे.

    रितेश अग्रवाल: शार्क टँक आणि गुंतवणूकदार

    २०२६ (2026) मध्ये रितेश केवळ ओयोचे मालक राहिलेले नाहीत, तर ते एक प्रबळ गुंतवणूकदार म्हणून उदयास आले आहेत. ‘शार्क टँक इंडिया’ (Shark Tank India) च्या माध्यमातून त्यांनी अनेक एआय (AI) आणि पर्यावरणपूरक (Sustainability) स्टार्टअप्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. मार्च २०२६ (March 2026) पर्यंत त्यांची एकूण संपत्ती सुमारे १६,००० (16,000) कोटी रुपये इतकी अंदाजित आहे. वयाच्या अवघ्या २४ (24) व्या वर्षी ते भारतातील अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले होते.

    बहुप्रतीक्षित आयपीओ (IPO) ची प्रतीक्षा

    गुंतवणूकदारांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे ओयोचा आयपीओ. मार्च २०२६ (March 2026) च्या ताज्या अपडेट्सनुसार, ओयोच्या मूळ कंपनीने (Prism) सुमारे ६,६५० (6,650) कोटी रुपये उभारण्यासाठी सेबीकडे (SEBI) गोपनीय कागदपत्रे दाखल केली आहेत. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, या आयपीओमुळे ओयोचे बाजार मूल्य (Valuation) सात ते आठ अब्ज डॉलर्सच्या घरात जाऊ शकते.

    आव्हाने आणि भविष्यातील धोरण

    ओयोचा प्रवास फुलांच्या पायघड्यांचा नव्हता. मध्यंतरी हॉटेल मालकांचे वाद आणि कायदेशीर प्रकरणांमुळे कंपनीच्या प्रतिमेला धक्का बसला होता. मात्र, २०२६ (2026) मध्ये रितेश यांनी ‘प्रिझम’ (Prism) या नवीन ब्रँड ओळखीतून तंत्रज्ञान आणि ग्राहकांचा विश्वास पुन्हा मिळवण्यावर भर दिला आहे. आता ओयो केवळ हॉटेल बुकिंग ॲप राहिलेले नसून, ते एक ‘फुल-स्टॅक टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म’ बनले आहे.

    यशासाठी फक्त जिद्द हवी!

    रितेश अग्रवाल यांचा प्रवास आपल्याला सांगतो की, तुमची सुरुवात कितीही लहान असली तरी तुमचे विचार आणि निश्चय (संकल्प) मोठे असले पाहिजेत. सिम कार्ड विकणारा मुलगा ते १६,००० (16,000) कोटींच्या कंपनीचा मालक, हा प्रवास प्रत्येक भारतीय तरुणाला प्रेरणा देणारा आहे. जर तुमच्याकडे स्पष्ट व्हिजन आणि मेहनत करण्याची तयारी असेल, तर यशाची शिखरे गाठणे अशक्य नाही.

    तुम्हाला रितेश अग्रवाल यांचा कोणता गुण सर्वात जास्त आवडतो? ओयोचा आयपीओ आल्यावर तुम्ही त्यात गुंतवणूक करणार का? कमेंट्समध्ये तुमची मते नक्की कळवा! अशाच नवनवीन प्रेरणादायी यशोगाथा आणि बिझनेस अपडेट्ससाठी आमच्या वेबसाइटला पुन्हा भेट द्यायला विसरू नका!

  • असा उभा राहिला KFC उद्योगसमूह

    असा उभा राहिला KFC उद्योगसमूह 

     प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात एकदा तरी चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितीचा सामना करावा लागतो. प्रत्येक जण आपापल्या परीने याचा सामना करत असतो, काही जण परिस्थितीसमोर हतबल होऊन हार मानतात तर तेच काहीजण त्यावर मात करून स्वतःला सिद्ध करतात. वयाची साठी आली की लोक आपण करत असलेल्या कामातून निवृत्ती घेतात आणि उर्वरित आयुष्य आरामात घालवतात, मित्रांनो अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हटलं जातं ; पण आज आपण ज्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, त्या व्यक्तीने आयुष्यात अपयश हे एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल 1009 वेळा पाहिलं आहे, पण तरीसुद्धा आज ती व्यक्ती यशाचं परमोच्च शिखर गाठून आपल्या सर्वांसाठी आदर्श ठरली आहे. ज्यांनी इतर लोकांच्या निवृत्तीच्या वयात स्वतःची नवीन सुरुवात केली आणि ती सुरुवात यशस्वी करूनही दाखवली. त्या व्यक्तीचे नाव आहे, कर्नल हारलँड सॅंडर म्हणजेच KFC या सर्वात मोठ्या फास्टफूड उद्योगसमूहाचे निर्माते. त्यांचीच आज जयंती आणि त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश. 

    अनेकवेळा नोकरी मध्ये त्यांची निराशा झाली. पत्नीदेखील सोडून गेली. आर्मीमधूनही त्यांची हकालपट्टी झाली. त्यांनी सुरू केलेल्या हॉटेललादेखील आग लागली. निवृत्तीनंतर त्यांना फक्त 105 डॉलर्स मिळाले. पण या सर्व अडचणी त्यांच्या कर्तुत्वाच्या आड कधीच आल्या नाहीत. 

     हारलँड सॅंडर यांचा जन्म 9 सप्टेंबर 1890 मध्ये अमेरिकेमध्ये झाला. भावंडांमध्ये हारलँड सर्वात मोठे. त्यांचे आईवडील शेतकरी होते. पाच वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही हारलँड यांच्या आईवर येऊन पडली. त्यावेळी त्यांच्या आईने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी करायला सुरुवात केली. आई नोकरीला जात असल्यामुळे लहान भावंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी   हारलँड यांच्यावर असायची ते स्वतः त्यांच्यासाठी आणि त्यांच्या भावंडांसाठी जेवण बनवायचे,  तेव्हाच त्यांना कुकिंगची आवड लागली. ते कायम नवनवीन रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करायचे. 

     हारलँड बारा वर्षाचे असताना त्यांच्या आईने दुसरे लग्न केले परंतु दुसऱ्या वडिलांसोबत त्यांचे पटत नसल्याने ते शेतात येऊन राहू लागले आणि शेती करू लागले. सातवीला असताना हारलँड यांनी शिक्षण सोडून दिले व ते त्यांच्या काकांकडे राहायला गेले, त्यावेळी त्यांचे काका एका कारच्या कंपनीत नोकरीला होते. काकांनी  हारलँड यांना कंडक्टर म्हणून नोकरी मिळवून दिली. 

    आर्मी, इन्शुरन्स, कायदा, हॉटेल शेफ, टायरचे दुकान, बोट चालवणे  अशा विविध क्षेत्रात त्यांनी काम केले ; परंतु एकाही नोकरीमध्ये त्यांना स्थिरता लाभली नाही, या काळात एक मुलगी असताना त्यांची पत्नी देखील त्यांना त्यांच्या अस्थिर आयुष्यामुळे सोडून गेली. नंतर त्यांनी पेट्रोल पंपावर काम करायला सुरुवात केली, तेथे काम करत असताना लोकं जेव्हा त्यांना बसची वाट पाहताना दिसली तेव्हा ती संधी ओळखून हारलँड यांनी तेथे छोटे हॉटेल सुरू केले. केंटुकीच्या गव्हर्नरला हारलँड यांची Fried Chicken हा पदार्थ इतका आवडला की त्यांनी हारलँड यांच्यावर खुश होऊन त्यांना “कर्नल” पदवी दिली. रस्त्याच्या कामामुळे नंतर त्यांचं हे हॉटेल देखील बंद झालं.

    हॉटेल बंद झाल्यावर हारलॅंड यांना पुन्हा नोकरी करावी लागली. वयाच्या 60व्या वर्षी निवृत्त झाल्यावर त्यांना सरकारकडून फक्त 105 डॉलरचा चेक मिळाला. अशावेळी त्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा देखील विचार आला. पण तेव्हा देखील अजूनही सगळं संपलं नाही आपण काहीतरी करू शकतो ही हिम्मत त्यांच्यामध्ये होती.

    निवृत्तीच्या वेळी मिळालेले 105 डॉलर आणि प्रेशर कुकर घेऊन हारलँड सॅंडर त्यांच्या Fried Chickenच्या रेसिपीसाठी Business Partnar शोधू लागले. तब्बल 1009 हॉटेल व्यवसायिकांनी त्यांच्यासोबत बिझनेस पार्टनरशिप नाकारली. अनेकदा पदरी फक्त अपयश पडलं.  अखेरीस केंटुकीच्या एका मोठ्या हॉटेल व्यवसायिकाने त्यांची फ्रेंचाईजी स्वीकारली. तेव्हापासून त्यांच्या दुकानाचे नाव Kentucky Fried Chicken म्हणजेच KFC असे ठेवण्यात आले. बघता बघता त्यांच्या या Unique रेसिपीला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अतिशय कमी कालावधीत KFC च्या 600 Franchise पूर्ण झाल्या. 1964 मध्ये वयाच्या 73व्या वर्षी हारलँड यांनी जॉन ब्राऊन यांना KFC 2 मिलियन डॉलर म्हणजेच 14 कोटी रुपयांना  विकली. त्यातील अर्धी संपत्ती त्यांनी दान करून टाकली. आज रोजी 200 हून अधिक देशात KFC चे 18000 हून अधिक रेस्टॉरंट्स आहेत. KFC ची आज वर्षाला अब्जावधींमध्ये उलाढाल होते. आज KFC ही जगातील सर्वात मोठी फास्ट फूड Chain आहे.

    KFC चे संस्थापक कर्नल हारलँड सॅंडर त्यांच्या यशाचं हेच रहस्य सांगतात की,

    मला संकटे जिंकून देत नाहीत आणि मीही हार म्हणायला तयार नाही

    तुम्ही आत्ता जे करत आहात त्यात आवड निर्माण करा

    अथवा तुम्हाला जे आवडते ते करा

  • Top 5 Business – गृहिणींसाठी टॉप 5 व्यवसाय

    Top 5 Business – गृहिणींसाठी टॉप 5 व्यवसाय

    पूर्वीच्या काळात फक्त चूल आणि मूल आणि वंश विस्तारासाठी वापरलं जाणारं साधन, एवढीच स्त्रियांची ओळख होती. कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत, अर्थार्जनात सहसा स्त्रियांचा वाटा नसायचा. त्यांचं काम फक्त घर आणि मुलं सांभाळणं इथपर्यंतच मर्यादित.

    पण काळ बदलला तसे लोकांचे विचारही बदलले. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या सारख्या काही स्त्रिया मुलींसाठी लढल्या आणि चित्र बदलत गेलं. समाज साक्षर होत गेला आणि मुलींनीही स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी सोडल्या नाहीत. 

    पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियाही व्यवसायात उतरू लागल्या..आणि यशस्वी देखील झाल्या… 

    आजही अनेक गृहिणींना स्वतःचं काहीतरी करावं, व्यवसाय सुरू करावा, अशी इच्छा असते पण योग्य मार्गदर्शनाची कमतरता भासते..

    घरातील खर्चाला आपल्या परीने हातभार लावावा आणि स्वतःही आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावे, अशी अनेक गृहिणींची इच्छा असते. अश्यावेळी आपल्या छंदाचे, आवडीचे रुपांतर आपण घरगुती म्हणजेच घरबसल्या करता येणाऱ्या व्यवसायात करू शकतो. यामुळे आवड जपल्याचे, छंद पूर्ण करण्याचे समाधान मिळेल, शिवाय यातून अर्थार्जन सुद्धा होईल.

    आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण असे 5 व्यवसाय पाहणार आहोत ..जे कोणतीही गृहिणी अगदी कमी भांडवलात आणि घरबसल्या सुरू करू शकते.

    1. फूड डिलिव्हरी व्यवसाय : 

    आजच्या धावपळीच्या युगात घरगुती जेवणाचे महत्त्व वाढले आहे. तुम्ही स्थानिक ग्राहकांसाठी घरगुती जेवण तयार करून ते डिलिव्हरी करू शकता. बऱ्यापैकी मुलं – मुली शिक्षणासाठी, नोकरीसाठी आपलं घर सोडून बाहेर राहत असतात. अशा वेळी त्यांना रोजचं बाहेर खाणं खिशाला आणि आरोग्याच्या दृष्टीनेही परवडत नाही, ही गरज ओळखून तुम्ही घरगुती मेस किंवा टिफिन सर्विस सुरू करू शकता, यासाठी तुम्हाला तुमच्या पाककृतींचा एक मेन्यू तयार करावा लागेल आणि  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून तसेच Mouth Publicity करून त्याची जाहिरात करावी लागेल.

    आवश्यकता :

    • स्वच्छता आणि सुरक्षिततेचा विचार
    • चविष्ट आणि रुचकर जेवण 
    • सर्वसामान्यांना परवडणारे दर 

    2. हँडमेड प्रोडक्ट्स : 

    घरगुती आणि हाताने बनवलेल्या वस्तूंकडे लोकांचा कल वाढत आहे. जर तुम्हाला हस्तकला आवडत असेल किंवा तुमच्यात ते कौशल्य असेल तर तुम्ही हँडमेड प्रोडक्ट्स तयार करून त्याची विक्री करू शकता. सोप्या दागिन्यांपासून ते सजावटीच्या वस्तूंपर्यंत, या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. तुम्ही विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म उदा. Etsy, Instagram, Meesho  वर तुमच्या उत्पादनाची विक्री करू शकता.

    आवश्यकता :

    •  कलात्मकता
    • चांगल्या मार्केटिंग कौशल्यांचा वापर
    • वेळेवर सेवा

    3. टयूशन्स : 

    जर तुम्ही शिकलेले असाल आणि  तुम्हाला एखादी संकल्पना दुसऱ्याला सोप्या पद्धतीने आणि समजेल अश्या भाषेत समजावून सांगता येत असेल, तर तुम्ही तुमच्या ज्ञानाचा वापर करून ऑनलाइन ट्यूटर म्हणून काम करू शकता. विविध विषयांमध्ये तुम्हाला शिकवण्याची आवड असेल, तर तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरू शकता. तसेच घरगुती शिकवणी देखील घेऊ शकता. 

    आवश्यकता :

    • विषयाची योग्य माहिती
    • शिकवण्याची हातोटी 
    • ऑनलाईन टयूशन्स साठी मोबाईल किंवा लॅपटॉप, इंटरनेट कनेक्शन 

    4. डे केअर सेवा :

    शहरी भागात डे केअर सेंटर किंवा पाळणाघरे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. ज्या महिलांना लहान मुलांची आवड आहे, त्यांच्यासाठी पाळणाघर किंवा डे केअर हा एक उत्तम  व्यवसाय ठरू शकतो. नोकरदार महिला आपल्या मुलांना घरासारखे वातावरण मिळावे आणि प्रेमाने तसेच आवश्यक ती  काळजी घेऊन त्यांची  मुले सांभाळली जातील अश्या पाळणाघरांना प्राधान्य देताना दिसतात. त्यामुळे घरच्या घरी करता येणारा हा व्यवसाय फायदेशीर आहे.

    घरातच थोडी रिकामी, मोकळी हवा येणारी जागा असेल तर तेथेच हा व्यवसाय सुरु करता येतो. महिलांमध्ये मुळातच वात्सल्य हा गुण असतो. त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या मुलांचा तुम्ही प्रेमाने सांभाळ करता असे एकदा दिसून आले की तुमच्या डे केअर ची जाहिरात या मुलांच्या पालकांकडूनच मोठ्या प्रमाणावर केली जाते. 

    आवश्यकता : 

    • जास्त संख्येने मुले असतील तर कुटुंबियांची मदत लागेल किंवा मदतनीस ठेवावी लागते. 
    • तसेच जेथे मुले आहेत तेथील जागेची स्वच्छता, शांतता, मुलांच्या खाण्यापिण्याची चोख व्यवस्था ठेवणे आवश्यक असते. 
    • मुलांना खेळण्यासाठी पुरेशी खेळणी, त्यांना झोपाविण्यासाठी योग्य व्यवस्था हवी. थोडे भांडवल घालून अशी व्यवस्था करता येते.

    5. Freelance लिखाण :

    जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल, तुमच्यात लेखन कौशल्य असेल आणि एखाद्या विषयाची मांडणी आकर्षकपणे करण्याची हातोटी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही Freelance लेखक म्हणून काम करू शकता. तुम्ही ब्लॉग पोस्ट, लेख किंवा कॉपीराइटिंगसारख्या विविध प्रकारचे लिखाण करू शकता. अनेक कंपन्या आणि वेबसाईट्स‌ त्यांच्यासाठी Freelance लेखक शोधत असतात. 

    आजकाल  ई कॉमर्स व्यवसाय प्रचंड वेगाने वाढतो आहे. त्यासाठी थोडक्यात, आकर्षक स्वरुपात, सहज सोपा, व्यवसायाची माहिती करून देणारा मजकूर लिहून देणे असे या कामाचे स्वरूप आहे. व्यवसायात स्पर्धा वाढल्याने स्पर्धकापेक्षा आपली उत्पादने अधिक चांगली कशी हे ग्राहकांवर ठसविण्यासाठी अश्या मजकुराची आवश्यकता असते.

    याशिवाय स्वतःची Blogging Website सुरू करून देखील तुम्ही त्यावर लिखाण करू शकता.

     आवश्यकता :

    • आवड 
    • उत्कृष्ट लिखाण कौशल्य
    • मार्केटिंगच्या साधनांची माहिती
    • वेळेचं व्यवस्थापन
    • असे अनेक व्यवसाय गृहिणींना करता येऊ शकतात. ठरवलं तर सर्व शक्य आहे. 
    • इच्छाशक्ती, योग्य व्यक्तींचे सल्ले आणि कुटुंबाला विश्वासात घेऊन  तुम्हीही तुमच्या पायावर खंबीरपणे उभे राहू शकता…..
    • आता वेळ आली आहे एका गृहिणीची ताकद समाजाला दाखवून देण्याची..

  • Magicpin Success Story: लाखोंची नोकरी सोडून उभारली भारतातील तिसऱ्या क्रमांकाची फूड डिलिव्हरी कंपनी

    Magicpin Success Story: लाखोंची नोकरी सोडून उभारली भारतातील तिसऱ्या क्रमांकाची फूड डिलिव्हरी कंपनी

    झोमॅटो आणि स्विग्गी या दोन प्रमुख फूड डिलिव्हरी अ‍ॅप्सनंतर, भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे फूड डिलिव्हरी अ‍ॅप म्हणजे मॅजिकपिन. प्रचंड स्पर्धा असलेल्या या क्षेत्रात मॅजिकपिनने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, तुम्हाला मॅजिकपिनच्या यशामागे असलेल्या व्यक्तीविषयी माहिती आहे का? ती व्यक्ती म्हणजे अंशू शर्मा. त्यांची दूरदृष्टी, धडाडी, आणि कठोर परिश्रम यांनी मॅजिकपिनला यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे.

    अतिशय साध्या सुरुवातीपासून त्यांनी आपल्या यशाचा मार्ग स्वतः घडवला. त्यांना माहित होते की चिकाटी, मेहनत आणि जिद्दीशिवाय यश मिळत नाही. त्यांच्या धाडसाने आणि अथक मेहनतीने मॅजिकपिनला आज या प्रतिष्ठित स्थानी पोहोचवले आहे.

    या लेखात आपण अंशू शर्मा यांचा जीवनप्रवास, त्यांचे संघर्ष, आणि मॅजिकपिनची स्थापना कशी झाली याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

    प्रारंभिक जीवन 

    अंशू शर्मा यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांची विशेष खासियत म्हणजे नव्या गोष्टी शोधण्याचा ध्यास आणि त्यातून मोठा परिणाम साधण्याची जिद्द. आयआयटी दिल्लीमधून संगणक विज्ञानाची पदवी, आयआयएम अहमदाबादमधून एमबीए, आणि Bain & Company सारख्या जगप्रसिद्ध कन्सल्टिंग फर्ममध्ये नोकरी मिळवणे ही अनेकांसाठी यशस्वी कारकीर्दीची परिसीमा असते. मात्र, अंशू यांची महत्त्वाकांक्षा यापेक्षा वेगळी होती. त्यांना स्वतःचे अस्तित्व निर्माण करून नवनवीन समस्यांचे समाधान शोधायचे होते आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून मोठा प्रभाव पाडायचा होता.

    २००९  साली त्यांनी Lightspeed Venture Partners या प्रसिद्ध व्हेंचर कॅपिटल फर्ममध्ये काम करण्याची संधी मिळवली, जिथे ते भारतातील दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या रूपात सहभागी झाले. येथे त्यांनी नऊ वेगवेगळ्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणुकीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि त्यांचा स्टार्टअप्सशी निगडित यशस्वी प्रवास सुरू झाला.

    याच काळात त्यांना भारतीय रिटेल क्षेत्रातील स्थानिक व्यापाऱ्यांसमोरील एका मोठ्या समस्येची जाणीव झाली.  ग्राहकांना आकर्षित करून त्यांना दीर्घकाळ टिकवून ठेवणे ही व्यापाऱ्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक बाब होती.या समस्येवर उपाय शोधण्याचा दृढ निश्चय अंशू यांनी केला. त्यांनी आपल्या अनुभवाचा, कौशल्याचा आणि दूरदृष्टीचा उपयग करून रिटेल क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपाययोजना राबवण्यासाठी पावले उचलली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे भारतीय स्टार्टअप्सच्या क्षेत्राला नवी दिशा मिळाली, आणि स्थानिक व्यवसायांसाठी प्रगतीचा मार्ग खुला झाला.

    मॅजिकपिनची स्थापना 

    सर्व काही सुरळीत चालले असतानाही अंशू यांच्या मनात एक मोठं स्वप्न होतं. सामान्यतः जेव्हा लोक सुरक्षित नोकरीचा विचार करतात, तेव्हा अंशू यांनी २०१५ मध्ये नोकरीचा  त्याग करून आपल्या कल्पनांना आकार देण्यासाठी मॅजिकपिन या फूड आणि फॅशन डिलिव्हरी कंपनीची स्थापना केली. अंशू यांना दृढ विश्वास होता की ग्राहकांच्या अनुभवावर आधारित स्मार्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने फूड डिलिव्हरीच्या संकल्पनेस एक नवीन पातळीवर घेऊन जाता येऊ शकतं . मॅजिकपिन लवकरच एक अत्याधुनिक आणि लोकप्रिय फूड डिलिव्हरी अ‍ॅप बनलं.

    अंशू यांच्या नेतृत्वाखाली मॅजिकपिनने एक वेगळं व्यवसाय मॉडेल विकसित केलं, ज्यात ग्राहकांना त्यांच्या खरेदी बिलांचे फोटो अपलोड करून पॉइंट्स कमावण्याची संधी मिळते. या पॉइंट्सला नंतर विविध ऑफर्स आणि आकर्षक डिस्काउंट्समध्ये बदलता येतं. हे त्याचं खास वैशिष्ट्य होतं, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या खरेदी अनुभव अधिक फायदेशीर आणि मजेशीर बनवता आले.

    मॅजिकपिनने फूड डिलिव्हरीच्या पारंपरिक मॉडेलला एक वेगळा आणि नवीन आकार दिला. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्राहकांना स्थानिक रेस्टॉरंट्स, स्टोअर्स आणि फॅशन आउटलेट्सवर आकर्षक डील्स मिळतात . यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंट्स किंवा ब्रँड्स अधिक सोयीस्कर, किफायतशीर आणि फायदेशीर पद्धतीने शोधता येतात. मॅजिकपिन हे असे एक ठिकाण बनलं आहे,जिथं ग्राहकांना त्यांच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ऑफर्स आणि डील्स उपलब्ध होतात, ज्यामुळे त्यांचा अनुभव अधिक समाधानकारक होतो.

    याशिवाय, अ‍ॅपवर सहज नेव्हिगेशन आणि  आंतरिक डिझाइनमुळे ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय ऑर्डर प्लेस करणं शक्य होतं. मॅजिकपिनचे वापरकर्ते ते सहज वापरू शकतात आणि त्यांना उपलब्ध असलेल्या अनेक प्रकारच्या ऑफर्स आणि डिस्काउंट्सचा लाभ घेता येतो. 

    संघर्ष ते विस्तार

    सुरुवातीला मॅजिकपिनला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. तांत्रिक समस्यांपासून ते खोट्या बिलांच्या समस्यांपर्यंत, तसेच व्यापाऱ्यांना  पैसे देण्यास तयार करणे यासारख्या अनेक अडचणी होत्या. या सर्व समस्यांचा सामना करत मॅजिकपिनने मेहनतीने उपाय शोधले आणि ग्राहकांच्या खरेदीची माहिती व्यापाऱ्यांना दिली, ज्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये विश्वास निर्माण झाला. यामुळे, मॅजिकपिनने आपला व्यवसाय मजबूत केला आणि एक सामाजिक मीडिया प्लॅटफॉर्म तयार केला, ज्यावर स्थानिक इव्हेंट्स, ब्रँड्स, आणि ऑफर्स शोधता येऊ लागल्या. यामुळे कंपनीला एका वर्षातच ७  पट वाढ साधता आली. २०१६ पर्यंत मॅजिकपिनकडे ३०,००० व्यापारी, १ दशलक्ष ग्राहक, आणि २५६  कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते.

    मॅजिकपिनने दिग्गज गुंतवणूकदारांकडून जसे की Lightspeed आणि Vy Capital यांच्याकडून निधी उभारला आणि आपली सेवा विविध क्षेत्रांमध्ये वाढवली. सलून्स, रेस्टॉरंट्स, आणि स्पा यांसारख्या व्यवसायांसोबत, त्यांनी McDonald’s आणि Taco Bell यांसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सशी भागीदारी केली, ज्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांचा चांगलाच जम बसला . कोविड-१९ च्या काळातही, मॅजिकपिनने आपला धोरणात्मक दृष्टिकोन कायम ठेवला आणि व्यवसाय वाढवला. त्यांनी ५० शहरांमध्ये ४५ मिनिटांत फार्मसी डिलिव्हरी सेवा सुरू केली आणि दररोज ३ लाखांहून अधिक व्यवहार पूर्ण केले, ज्यामुळे त्यांचा बाजारात अधिक प्रभाव वाढला.

    यशाच्या शिखरावर 

    नोव्हेंबर २०२१ मध्ये झोमॅटोने मॅजिकपिनमध्ये ४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली, ज्यामुळे कंपनीचे मूल्य २४२३ कोटी रुपयांवर पोहोचले. हे कंपनीसाठी एक  मोठे टर्निंग पॉइंट ठरले आणि मॅजिकपिनचा प्रवास पुढे वेगाने सुरू झाला. आज, मॅजिकपिन ८००० कोटी रुपयांहून अधिक व्यवहार हाताळत आहे, आणि त्यांच्या प्रभावी कार्यप्रणालीमुळे ते भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे फूड डिलिव्हरी अ‍ॅप बनले आहे.

    अंशू शर्मा यांची कहाणी म्हणजे केवळ एक व्यवसायिक यशोगाथा  नाही, तर एक प्रेरणादायी प्रवास आहे. त्यांनी लाखोंची नोकरी सोडून भारतीय रिटेल क्षेत्राला नवी दिशा दिली. त्यांच्या दूरदृष्टी आणि कष्टामुळे मॅजिकपिन हे भारतीय स्टार्टअप्समधील एक यशस्वी आणि प्रभावशाली नाव बनले आहे. २५०० कोटी रुपयांची कंपनी उभारणे हि छोटी गोष्ट नाही, आणि त्यासाठी अंशु शर्मा यांचा  दृढ निश्चय, कष्ट आणि मानसिकता महत्त्वाची ठरली.

    मित्रांनो अंशू शर्मांच्या या प्रवासावरून  हे सिद्ध होतं की, दूरदृष्टी, मेहनत आणि नाविन्यामुळे कोणत्याही अडचणीवर मात करून काहीही साधता येऊ शकते. अंशू शर्मा यांचे नेतृत्व, धाडस आणि परिश्रम हेच मॅजिकपिनच्या यशाचे मुख्य कारण ठरले. खरंच, अंशू यांच्या “मॅजिक-पिन”ने इतिहास घडवला आहे!

    आणखीन वाचा:

  • मेरी ई-शॉप मीशो भारताच्या प्रमुख रीसेलिंग ॲपचा प्रवास

    मेरी ई-शॉप मीशो भारताच्या प्रमुख रीसेलिंग ॲपचा प्रवास

    वर्ष २०१५. दोन तरुण आयआयटी दिल्लीचे विद्यार्थी, विदित आत्रे आणि संजीव बर्नवाल, यांच्या मनात एक विचार घोळत होता काहीतरी असामान्य करायचं, जे फक्त त्यांच्यासाठी नाही, तर असंख्य लोकांच्या जीवनात बदल घडवू शकेल. मोठ्या मल्टी-नॅशनल कंपन्यांमध्ये आकर्षक नोकऱ्या असतानाही, या दोघांनी स्वतःच्या ध्येयाने प्रेरित होऊन त्या नोकऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक असा प्लॅटफॉर्म उभारायचा ठरवलं ज्यामुळे लहान व्यापाऱ्यांना, विशेषत: महिलांना, आर्थिक स्वावलंबन आणि व्यवसायिक यश मिळवता येईल. त्या वेळी डिजिटल इंडिया आणि सोशल मीडिया हळूहळू लोकांच्या जीवनाचा भाग बनत होते, पण ई-कॉमर्सची कल्पना अजूनही अनेकांच्या आवाक्याबाहेर होती

    अशा वेळेला या दोन मित्रांनी या क्षेत्रातील संधी ओळखून तिचं   सोनं करतं   ‘मीशो (Meesho)’ची स्थापना केली,जिथे प्रत्येक व्यक्ती अगदी शून्य खर्चात आपला व्यवसाय सुरू करू शकतो. ‘मीशो (Meesho)’ म्हणजेच  ‘मेरी ई-शॉप’ हे अल्पावधीतच  प्रसिद्ध झालं, आणि आपल्या अनोख्या मॉडेलमुळे लोकांना घरबसल्या आपली उत्पादने विकण्याची संधी दिली. आज नवी अर्थंक्रांतीच्या माध्यमातून आपण मिशो च्या या प्रवासावर एक नजर फिरवूया

     सुरुवात आणि यशस्वी प्रवास

    सुरूवातीला , विदित आणि संजीव यांनी ‘फॅशनियर’ नावाच्या कंपनीची सुरुवात केली होती,  ज्या प्रमाणे झोमॅटो आणि स्विगी फूड इंडस्ट्री मध्ये सेवा देत होते अगदी त्याचप्रमाणे  ते फॅशन उद्योगासाठी सेवा देत होते. पण हा प्रयोग तितकासा यशस्वी ठरला नाही. तेव्हा त्यांनी आपले विचार  बदलून ‘मीशो (Meesho)’ची संकल्पना मांडली. ‘फॅशनियर’च्या अपयशामुळे ते  शिकले की, बाजारपेठेच्या वास्तविक गरजांचा सखोल अभ्यास करूनच काहीतरी प्रभावी तयार करायला हवे.

    एकदा विदित आणि संजीव कोरमंगला(बंगळूर) येथील स्थानिक बाजारपेठेतील एका दुकानदाराकडे गेले. तिथे त्या दुकानदाराने त्याच्या व्यवसायात वापरत असलेल्या एका खास ट्रिकची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, तो 

    आधीपासूनच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, जसे की फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सवर, आपली उत्पादने ‘ऑनलाइन’ विकत आहे. त्या ठिकाणी तो वारंवार आपल्या उत्पादनांचे फोटो ‘अपलोड’ करतो. या प्रक्रियेत, दुकानदार ऑर्डर घेतो, त्याचा एक कामगार वस्तू डिलिव्हरी करतो आणि ग्राहकांकडून रोख रक्कम घेतो.

    इतक्या साध्या आणि प्रभावी कल्पनेने विदित आणि संजीव खूप प्रेरित झाले. या कल्पनेवर विचार करून त्यांनी आपल्या ‘सॉफ्टवेअर’मध्ये आवश्यक ते बदल केले आणि त्यानंतर त्यांच्या व्यवसायाला एक नवीन दिशा मिळाली. अशाप्रकारे ‘मीशो (Meesho)’ची स्थापना झाली ‘मीशो (Meesho)’ची सुरुवात अशा वेळी झाली होती, जेव्हा सोशल ई-कॉमर्सची संकल्पना नुकतीच रुजत होती. विदित आणि संजीव यांनी त्यांच्या अनुभवांमधून शिकत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून पुनर्विक्री मॉडेल तयार केले, ज्याने लाखो लोकांना आपला व्यापार सुरू करण्याची आणि वाढवण्याची संधी दिली.

    २०१६ मध्ये, ‘वाय कॉम्बिनेटर’ या स्टार्टअप्सना सहाय्य देणाऱ्या प्रसिद्ध संस्थेने ‘मीशो (Meesho)’ची निवड केली, ज्यामुळे ‘मीशो (Meesho)’ला जागतिक स्तरावर ओळख मिळाली. यानंतर ‘मीशो (Meesho)’ने आपला विस्तार केला आणि केवळ पाच वर्षांत ‘युनिकॉर्न क्लब’मध्ये सामील होऊन साडेसात हजार कोटी रुपये मुल्यांकनाचा टप्पा गाठला. ‘मीशो (Meesho)’ने जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले, आणि ‘सॉफ्ट बँक व्हिजन फंड’, ‘फेसबुक’, ‘शुनवेई कॅपिटल’ यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांकडून निधी उभारला. 

     विस्तार आणि भविष्याच्या  संधी

    मीशो (Meesho) च्या पुनर्विक्री मॉडेलमुळे लोकांना सहजपणे उत्पादनांचे विक्री आणि वितरण करण्याची संधी मिळाली. येथे कोणत्याही विक्रेत्याला त्याचा  उत्पादन ‘फेसबुक’, ‘व्हॉट्सअ‍ॅप’, आणि ‘इन्स्टाग्राम’वर शेअर करता येतं, मीशो (Meesho)’ थेट उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवते, ज्यामुळे प्रत्येकाला नफा होतो,पुरवठादाराचा  माल विकला जातो, पुनर्विक्रेत्याला नफा मिळतो, आणि ‘मीशो (Meesho)’ला त्याचे कमिशन मिळते.

    आज, ‘मीशो (Meesho)’कडे १.७ कोटींहून अधिक पुनर्विक्रेते आहेत. ‘मीशो (Meesho)’ने लहान आणि मध्यम शहरांमध्ये विशेष लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामुळे ई-कॉमर्सच्या क्षेत्रात एक मोठी क्रांती घडली आहे. ‘मीशो (Meesho)’ने दोन हजारांपेक्षा जास्त छोट्या-मध्यम शहरांना सेवा दिलेली आहे, ज्यामुळे भारतातील छोट्या व्यापारांना एक नवा मंच मिळाला आहे.

    भविष्यात मीशो (Meesho) आपल्या ‘यूजर फर्स्ट’ नीतीतून  ‘मीशो (Meesho) मॉल’ ची सुरुवात करून एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकणार आहे. हा  त्यांचा विस्तार भारतीय जनतेच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम असेल . ‘मीशो (Meesho) मॉल’ ब्रँडेड वस्तूंसह उत्पादनांचे मुबलक प्रमाण  सादर करेल, त्यांचा  उद्देश भारतीय ग्राहकांसाठी खरेदीचा अनुभव अधिक उत्तम बनवणे आहे.

    विदित आत्रे यांचे मत आहे की, भारतातील स्मार्टफोन वापरणाऱ्या ५० कोटी लोकसंख्येपैकी केवळ १ कोटी लोक ऑनलाइन खरेदी करतात, याचा अर्थ अजूनही एक मोठी संधी उपलब्ध आहे. ‘मीशो (Meesho)’ने या संधीचा लाभ घेत, अनेक छोटे व्यापारी, विशेषत: महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून दिले आहे

    मीशो (Meesho)’ची कहाणी केवळ दोन तरुण उद्योजकांच्या यशाची नाही, तर ती हजारो, लाखो लहान व्यापारी आणि महिलांच्या सक्षमीकरणाची गोष्ट आहे. विदित आत्रे आणि संजीव बर्नवाल यांनी त्यांच्या धाडसाने आणि नवनिर्माणाच्या इच्छाशक्तीने ‘मीशो (Meesho)’सारख्या सोशल ई-कॉमर्स  प्लॅटफॉर्मची स्थापना केली. ‘मीशो (Meesho)’ने हे सिद्ध केले आहे की, योग्य संधी उपलब्ध करून दिल्यास, कोणताही व्यक्ती किंवा व्यवसाय मोठं यश मिळवू शकतो. त्यांच्या या यशस्वी प्रवासाने आणि ‘मीशो (Meesho)’च्या वाढत्या लोकप्रियतेने हे दाखवून दिलं आहे की, स्वप्न आणि ध्येयांच्या मागे धावणारे  माणसं , कितीही मोठ्या गोष्टी साध्य करू शकतात .

    मीशो (Meesho)ची कहाणी म्हणजे संधी ओळखणं, आव्हानं पेलणं, आणि जिद्दीने यशाच्या दिशेने वाटचाल करणं याचं प्रतीक आहे. ‘मीशो (Meesho)’ने केवळ ई-कॉमर्सच्या क्षेत्रात नाही तर आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेनेही एक नवा अध्याय लिहिला आहे. त्यामुळे, ‘मीशो (Meesho)’ ची प्रेरणादायी कहाणी  प्रत्येक उद्योजकाला आणि स्वप्नाळू व्यक्तीला पुढे जाण्यासाठी प्रेरित करते.

  • Digital Marketing: सध्याच्या डिजिटल युगात या क्षेत्राला प्रचंड मागणी आहे.

    Digital Marketing: सध्याच्या डिजिटल युगात या क्षेत्राला प्रचंड मागणी आहे.

    “बोलणाऱ्याचे हुलगेही विकले जातात आणि न बोलणाऱ्याचे गहूही विकले जात नाही.” ही जुनी म्हण आजच्या स्पर्धेच्या युगात अधिकच प्रकर्षाने जाणवते. पूर्वीच्या काळी व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी वर्तमानपत्रे, रेडिओ किंवा टेलिव्हिजन हेच मर्यादित पर्याय होते. परंतु, गेल्या दशकात इंटरनेटने जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. आज प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन आहे आणि जगातील प्रत्येक व्यवहार आता डिजिटल स्क्रीनवर येऊन थांबला आहे. या बदलत्या जीवनशैलीतूनच जन्माला आली एक प्रभावी संकल्पना – डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing).

    डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय? (What is Digital Marketing?)

    डिजिटल मार्केटिंग, ज्याला आपण ऑनलाइन मार्केटिंग (Online Marketing) म्हणूनही ओळखतो, ही इंटरनेटच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची एक प्रगत कला आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, इंटरनेट आणि डिजिटल साधनांचा (स्मार्टफोन, लॅपटॉप, सोशल मीडिया) वापर करून आपल्या उत्पादनांची किंवा सेवांची जाहिरात करणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग.

    पारंपारिक मार्केटिंग (Traditional Marketing) मध्ये व्यावसायिक ग्राहकांकडे जात असे, पण डिजिटल मार्केटिंगमध्ये ग्राहक स्वतः आपल्या गरजांनुसार इंटरनेटवर शोध घेत व्यावसायिकांपर्यंत पोहोचतात. यात वेबसाईट (Website), सर्च इंजिन (Search Engine), सोशल मीडिया (Social Media), ईमेल (Email) आणि मोबाईल ॲप्स (Mobile Apps) यांसारख्या विविध चॅनेलचा वापर केला जातो.

    डिजिटल मार्केटिंगची मुख्य अंगे (Core Elements of Digital Marketing)

    डिजिटल मार्केटिंग हे केवळ फेसबुकवर पोस्ट टाकण्यापुरते मर्यादित नाही. यात अनेक तांत्रिक बाबींचा समावेश होतो:

    • सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (Search Engine Optimization – SEO): गुगलवर जेव्हा कोणी काही शोधते, तेव्हा तुमची वेबसाईट पहिल्या पानावर दिसण्यासाठी केलेले तांत्रिक बदल म्हणजे SEO.
    • सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing – SMM): फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन आणि यूट्यूबच्या माध्यमातून ब्रँडची जागरूकता (Brand Awareness) निर्माण करणे.
    • पे-पर-क्लिक (Pay-Per-Click – PPC): गुगल किंवा इतर प्लॅटफॉर्मवर जाहिराती दाखवून त्वरित रिझल्ट (Results) मिळवणे.
    • कंटेंट मार्केटिंग (Content Marketing): ब्लॉग, व्हिडिओ आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून ग्राहकांना माहिती देऊन त्यांचा विश्वास संपादन करणे.

    आजच्या युगात डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व (Importance of Digital Marketing)

    कोणत्याही व्यवसायाला आजच्या काळात डिजिटल मार्केटिंगकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. त्याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

    १. जागतिक विस्तार (Global Reach):

    पूर्वी एखादा छोटा व्यावसायिक फक्त आपल्या परिसरातील ग्राहकांना सेवा देऊ शकत होता. परंतु, डिजिटल मार्केटिंगमुळे आता कोल्हापुरातील उद्योजक अमेरिकेतील ग्राहकाला आपली उत्पादने सहज विकू शकतो. इंटरनेटने भौगोलिक मर्यादा पूर्णपणे नष्ट केल्या आहेत.

    २. खर्च-प्रभावीता (Cost-Effective):

    टीव्हीवर ३० सेकंदाची जाहिरात देण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. त्या तुलनेत सोशल मीडिया किंवा ईमेल मार्केटिंग अत्यंत कमी खर्चात सुरू करता येते. लहान स्टार्टअप्ससाठी (Startups) हे एक वरदान आहे.

    ३. टार्गेटेड मार्केटिंग (Targeted Marketing / Audience Targeting):

    डिजिटल मार्केटिंगचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही तुमची जाहिरात नेमकी कोणाला दाखवायची हे ठरवू शकता. उदाहरणार्थ, जर तुमचा केकचा व्यवसाय असेल, तर तुम्ही तुमची जाहिरात फक्त तुमच्या शहरातील १८ ते ३५ वयोगटातील आणि ‘Foodies’ असलेल्या लोकांनाच दाखवू शकता. यामुळे पैशांचा अपव्यय टाळता येतो.

    ४. रिअल-टाइम रिझल्ट्स (Real-Time Results / Analytics):

    पारंपारिक जाहिरात किती लोकांनी पाहिली हे मोजणे कठीण असते. पण डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्हाला डॅशबोर्डवर लगेच कळते की तुमची जाहिरात किती लोकांनी पाहिली, त्यावर किती जणांनी क्लिक केले आणि किती लोकांनी खरेदी केली. या डेटाच्या (Data Analysis) आधारे तुम्ही तुमची रणनीती बदलू शकता.

    डिजिटल मार्केटिंगचे दूरगामी फायदे (Benefits of Digital Marketing)

    डिजिटल मार्केटिंग केवळ विक्री वाढवण्यासाठी नाही, तर एक ‘ब्रँड’ (Brand) तयार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.

    रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट (Return on Investment – ROI): इतर कोणत्याही मार्केटिंग माध्यमाच्या तुलनेत डिजिटल मार्केटिंगमध्ये गुंतवलेल्या पैशांवर मिळणारा परतावा जास्त असतो. कारण येथे आपण केवळ संभाव्य ग्राहकांवरच (Potential Customers) लक्ष केंद्रित करतो.

    ब्रँड जागरूकता (Brand Awareness): सातत्याने सोशल मीडिया वर दिसल्यामुळे लोकांच्या मनात तुमच्या ब्रँडबद्दल विश्वास निर्माण होतो. लोक जेव्हा गुगलवर तुमच्या ब्रँडचे नाव शोधतात, तेव्हा तुमची विश्वासार्हता वाढते.

    ऑटोमेशन आणि कार्यक्षमता (Marketing Automation & Efficiency): चॅटबॉट्स (Chatbots) आणि ईमेल ऑटोमेशन (Email Automation) मुळे तुम्ही झोपलेले असतानाही तुमचा व्यवसाय ग्राहकांशी संवाद साधू शकतो आणि ऑर्डर घेऊ शकतो. यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि कार्यक्षमता वाढते.

    थेट संवाद आणि फीडबॅक (Direct Engagement & Feedback): सोशल मीडियाद्वारे ग्राहक थेट आपल्या उत्पादनावर कमेंट किंवा रिव्ह्यू (Reviews) देऊ शकतात. हा फीडबॅक आपल्याला आपली सेवा सुधारण्यास मदत करतो, ज्यामुळे ग्राहक संबंध अधिक दृढ होतात.

    Digital Marketing आणि Artificial Intelligence (AI) (AI in Digital Marketing)

    आजच्या काळात Digital Marketing आणि Artificial Intelligence (AI) यांचे नाते अतूट झाले आहे. AI मुळे मार्केटिंग आता केवळ जाहिरात न राहता ती वैयक्तिक (Personalized) सेवा बनली आहे. चॅटबॉट्स (Chatbots) ग्राहकांच्या शंकांचे २४/७ निरसन करतात, तर ‘Predictive Analysis’ द्वारे ग्राहकाला भविष्यात काय हवे आहे, याचा अंदाज व्यावसायिक आधीच लावू शकतात. AI मुळे मजकूर लिहिणे (Content Creation), ग्राफिक्स बनवणे आणि मोठ्या डेटाचे विश्लेषण (Data Analysis) करणे सेकंदात शक्य झाले आहे. गुगल आणि फेसबुकचे अल्गोरिदम AI वापरून तुमची जाहिरात योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवतात, ज्यामुळे जाहिरातीचा खर्च (Ad Spend) कमी होतो आणि ‘Return on Investment’ (ROI) वाढतो. थोडक्यात, डिजिटल मार्केटिंगमध्ये AI चा वापर करणे ही आता काळाची गरज असून, यामुळे व्यवसायाची अचूकता आणि वेग प्रचंड वाढला आहे.

    Digital Marketing आणि Artificial Intelligence AI AI in Digital Marketing

    भविष्यातील व्यवसायाचा आधार (Future of Business)

    डिजिटल मार्केटिंग ही आता एक चैन नसून ती काळाची गरज बनली आहे. लहान असो वा मोठा, प्रत्येक व्यवसायाला टिकून राहण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावाच लागेल. तंत्रज्ञानाच्या या प्रवाहात जो व्यावसायिक स्वतःला अपडेट (Update) ठेवेल, तोच या स्पर्धेच्या युगात टिकेल. डिजिटल मार्केटिंग म्हणजे केवळ तंत्रज्ञान नाही, तर ती ग्राहकांशी नाते जोडण्याची एक नवी डिजिटल पद्धत आहे.

    तुम्हाला तुमचा व्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्मवर (Digital Platforms) न्यायचा आहे का? डिजिटल मार्केटिंगच्या या महासागरात स्वतःची नौका कशी वल्हवायची आणि प्रगती कशी साधायची, याबद्दल अधिक सखोल माहिती आणि स्ट्रॅटेजीज (Strategies) मिळवण्यासाठी, व्यवसायातील अशाच तांत्रिक आणि वास्तववादी अपडेट्ससाठी आमच्या वेबसाईटला बुकमार्क (Bookmark) करा आणि पुन्हा नक्की भेट द्या!

  • Natu Caterers Success Story: नोकरदार ते उद्योजक असा अरुण नातू यांचा प्रवास

    Natu Caterers Success Story: नोकरदार ते उद्योजक असा अरुण नातू यांचा प्रवास

    Natu Caterers Success Story: एक लहान मुलगा ! लहानपणापासून अभ्यासापेक्षा इतर उचापती करण्यात पटाईत, बोलका स्वभाव, सदैव मित्रांच्या घोळक्यात रममाण असणारा पण रक्तात व्यवसाय भिनलेला. म्हणजेच एक रुपयाचे-दोन रुपये-५ रुपये कसे करायचे? ह्याचे अचूक आकलन असणारा एक मुलगा! अभ्यासाची आवड नाही. त्यामुळे शिक्षणात रस नाही. मॅट्रिक झाल्यानंतर कॉलेजात न जाता व्यवसायाची आवड असल्याने त्याने टॅक्सी व टूरिस्ट कारचा व्यवसाय सुरु केला. व्यवसायात फायदा होत होता..

    पण त्याच्या वडिलांनी एकदा सहजच म्हटले, “तुझी व्यवसायाची आवड मी समजू शकतो पण ही टूरिस्ट लाईन, ड्रायव्हरची लाईन मला पसंत नाही, मला आवडत नाही. माझ्या मुलाने हा व्यवसाय करावा हे माझ्या मनाला पटत नाही.” त्या मुलाने वडिलांचे म्हणणे ऐकले. वडिलांच्या ओळखीने त्या तरुणाला क्रॉम्पटन ग्रीव्हज कंपनीमध्ये नोकरी लागली. त्यानंतर कंपनीतर्फेच त्याला नाशिकला पाठवण्यात आले. त्या तरुणाला नाशिक मनापासून आवडले. ज्याचा ‘व्यवसाय’ हाच आत्मा होता त्या तरुणाने चक्क २२ वर्षे नोकरी केली. पत्नीने सुरु केलेल्या छोटेखानी व्यवसायामध्ये विद्यार्थ्यांची जेवणाच्या डब्याची सोय त्याने नोकरी सांभाळून १० वर्षे केली. त्यात प्रचंड मेहनत केली. श्रमांना हार न मानणाऱ्या ह्या गृहस्थाने पत्नीच्या संपूर्ण सहकायनि व्यवसायाचा वेलू दरवर्षी वाढवत उंचीवर नेला. सन २००० मध्ये अशी स्थिती आली की नोकरीमध्ये ३६५ दिवसांमध्ये १२० ते १३० दिवस बिनपगारी रजा होऊ लागली. ह्या गृहस्थाचे भाग्य जोरावर ! खरेपणाने वागणाऱ्याला परमेश्वराकडून नेहमीच बक्षीस मिळत असते फक्त ते बक्षीस कधी व किती मिळणार हे पृथ्वीतलावरील प्राणीमात्राला कळत नाही.

    ह्या गृहस्थाच्या मनात आले, आता बस.. नोकरी सोडावी.. ज्या कंपनीने २०-२२ वर्षे सांभाळले तिथे आता कामाला न्याय देणे शक्य होत नाही. अन् नेमकी तेव्हाच कंपनीची व्ही.आर.एस. स्कीम म्हणजेच स्वेच्छा निवृत्तीची योजना आली. व्ही.आर.एस.साठी पहिला फॉर्म ह्या गृहस्थाचा ! काहीही आर्थिक नुकसान न होता नोकरीमध्ये निवृत्ती.. अन् पुढील १५ वर्षांत व्यवसायाच्या वृक्षाचा अक्षरशः वटवृक्षासारखा विस्तार झाला. ते गृहस्थ म्हणजे नाशिकमधील प्रसिद्ध नातू कॅटरर्सचे श्री. अरुण नातू. ज्यांच्याकडे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ३ लहान मोठ्या हॉल्स्मधील कॅटरिंगची पूर्ण मोनोपॉली आहे. तसेच प्रसाद मंगल कार्यालय, इंद्रप्रस्थ हॉल, सोमेश्वर लॉन्स येथील कॅटरिंग पॅनेलवर नातू आहेत. तेथे ‘नातू कॅटरर्स’ला लोकांची सर्वाधिक पसंती ! हीच आहे, नातू कॅटरर्सची ओळख.. ग्राहकांच्या चवीची तृप्ती । 

    प्रारंभिक जीवन :  

    ठाणे येथे वास्तव्यास असलेले श्री. महादेव नातू व सौ. शैलजा नातू या दांपत्याला दोन मुलगे – मोठा अनिल व धाकटा अरुण ! अरुणचे लहानपणापासून शालेय अभ्यासापेक्षा इतर उचापतींकडे अधिक लक्ष, तसाच त्याचा स्वभाव त्याच्या आईसारखाच बोलका ! जनसंपर्काची प्रचंड आवड ! १९७० च्या दरम्यान अरुणच्या वडिलांनी मुलुंड पूर्वेला एक ब्लॉक घेतला व नातू कुटुंब मुलुंड येथे राहावयास गेले. मुलुंडला नातू कुटुंब ज्या सोसायटीमध्ये राहत होते तेथील ४० ब्लॉक्सपैकी ३८ कुटुंब गुजराती तर फक्त २ कुटुंब मराठी त्यातील एक म्हणजे नातू कुटुंब !  अरुणचे अनेक मित्र गुजराती होते. अन् गुजराती  समाजामध्ये ९८% मंडळी व्यावसायिक तर २% मंडळी नोकरी पेशातील ! त्यांच्यामध्ये व्यवसाय पिढ्यानपिढ्या परंपरागत आलेला. मुलांना लहानपणापासूनच व्यवसायाचे बाळकडू मिळालेले असते.

    ह्या गुजराती  मित्रांकडून अरुण व्यवसाय म्हणजेच एक रुपयाचे दोन रुपये, एक रुपयाचे पाच रुपये कसे करायचे हे गणित शिकला. त्याला स्वतःला शिक्षणात अजिबात रस नसल्याने इयत्ता आठवी, नववीपासूनच अरुण अनेक वस्तूंची खरेदी विक्री करु लागला. अरुण नफ्याचे प्रमाण कमी ठेवत असल्याने त्याच्या सर्व वस्तूंची विनासायास विक्री होत असे.  आठवी-नववीतला विद्यार्थी असलेला अरुण कुठल्या जबाबदारीने है काम करीत नव्हता. एकतर व्यवसायाची उपजत आवड आणि मुख्य म्हणजे मिळालेल्या पैशांतून मौजमजा करणे, त्यामध्ये सिनेमा पाहणे, हॉटेलमध्ये जाणे, जनसंपर्काची आवड असल्याने मित्रांना स्वपैशाने खाऊ घालणे हेच उद्योग ! २-३ वर्ष अरुणने नवीन रिक्षा भाड्याने आणून चालवणे हा व्यवसाय केला. त्यामध्ये रोजचा १० रु. फायदा होऊ लागला. 

    व्यवसायाची सुरुवात :

    अरुणने मॅट्रिकनंतर टॅक्सी व टूरिस्ट कारचा व्यवसाय करण्याचे ठरवले. लायसन्स नसतानाही अरुण गाडी चालवत असत ह्याचा पुरावा पर्मनंट लायसन्सच्या परीक्षेच्या वेळेस तेथील अधिकाऱ्यांना आला. त्याचे असे झाले. अधिकारी परीक्षा घेत असताना त्यांनी अरुणला वरळी येथील एका चढावरती अचानक गाडी थांबवून. मग पुढे जाण्यास सांगितले तेव्हा अरुणने सराईत ड्रायव्हरप्रमाणे गाडी एक इंचही मागे न येऊ देता गाडी पुढे नेली. तेव्हा त्या अधिकाऱ्याच्या तात्काळ लक्षात आले की कायमस्वरुपी लायसन्स नसताना हा पठ्ठया सर्वत्र गाडी चालवत असावा. तसे विचारल्यानंतर अरुणने सुद्धा खरे खरे उत्तर दिले. माझा टॅक्सी- टूरिस्टचा व्यवसाय २ वर्षांपासून आहे. मी अनेकवेळा गाडी चालवली आहे. त्या अधिकाऱ्याने मंद स्मित करीत अरुणला कायमस्वरुपी लायसन्स दिले. असा हा अरुण खरे बोलणारा, मन निर्णय देईल त्याप्रमाणे वागणारा, स्वच्छतेचा पुरस्कर्ता, मित्रांसाठी जिवाला जीव देणारा पण तितकाच कठोर व स्पष्ट बोलणारा !

    एकदा अरुणच्या वडिलांनी त्याला सांगितले, “अरुण, तुझ्या आतापर्यंतच्या उचापतींना मी कधी आडकाठी घेतली नाही किंवा तुझ्या कुठल्याही गोष्टींना मी कधी विरोध केला नाही. पण तू तुझा हा टूरिस्ट व टॅक्सी ड्रायव्हरचा व्यवसाय बंद करावास. ही टूरिस्ट लाईन मला पसंत नाही. ह्या व्यवसायात दारु, जुगार अशी व्यसने लागण्याची शक्यता जास्त असते.  मी माझ्या ओळखीने तुला चांगली नोकरी मिळवून देतो.” वडिलांचे हे कळकळीचे सांगणे ऐकून अरुणच्या मनात ठसले की एक भल्यासाठीच सांगतो आहे. यामध्ये कुठेही नाही, आग्रहाचा बाऊ नाही. अरुणने टूरिस्ट टॅक्सीचा व्यवसाय बंद केला.

    वडिलांनी शब्द दिल्याप्रमाणे आपल्या मित्राच्या साहाय्याने अरुणला क्रॉम्प्टन ग्रीव्हज्सारख्या प्रसिद्ध कंपनीत नोकरी मिळवून दिली. १९७८मध्ये अरुण क्रॉम्पटनच्या फॅक्टरीमध्ये जाऊ लागला. १९८० च्या दरम्यान क्रॉम्प्टनने फॅक्टरीमधील स्टाफला नाशिक १४ मे १९८० मध्ये अरुण नाशिकला रवाना झाले. 

    वैवाहिक जीवन : 

    ७ जून १९८४ रोजी अरुणचे कल्पना खरे हिच्याशी लग्न झाले व १९८५ मध्ये अरुण व कल्पना यांना मुलगा झाला.. एक मध्यमवर्गीय समाधानी कुटुंब । आर्थिक संपन्नतेची स्वप्ने अरुण पाहत असला तरी त्यासाठी विशेष प्रयत्न असे नव्हते. मुलगा झाल्यानंतर मात्र अरुण व त्यांच्या पत्नीला वाटले की मुलाच्या वाढीच्या दृष्टीने, संस्कारांच्या दृष्टीने सिडको वसाहतीमधील वास्तव्य योग्य नव्हे. सिडकोच्या ब्लॉकचे पैसे अरुणच्या पगारातून वजा होत असत. १९९० पर्यंत सिडकोचा ब्लॉक अरुणच्या नावावर जणू झाला होता. १९९० मध्ये अरुण यांनी नाशिकच्या महात्मा नगर भागामध्ये ६१० चौ. फुटांचा २ बेडरुम हॉल किचनचा ब्लॉक घेतला. त्यासाठी त्यांनी H.D.F.C. बँकेकडून कर्ज घेतले. ब्लॉकमध्ये राहावयास आल्यानंतर अरुण समाधानाने म्हणतात, “स्वतःचा ब्लॉक होणे.. म्हणजेच ‘ही माझी वास्तू आहे’ असे सांगण्यात एक वेगळाच आनंद असतो. तसेच १९८७ पर्यंत मी सायकलने प्रवास करीत असे. १९८७ मध्ये मी पहिली बजाज सुपर स्कूटर घेतली. त्याहीवेळेस माझ्या स्कूटरला पहिली किक मारली तेव्हा वेगळाच आनंद झाला. १९८७ मध्ये अरुण यांच्या सौभाग्यवतीला अंबड येथील ग्लॅक्सो कंपनीमधील पॅकिंग डिपार्टमेंटमध्ये नोकरी लागली. कुटुंबाच्या डबल इन्कममुळे अरुण यांची आर्थिक परिस्थिती खूप सुधारली.

    १९९० मध्ये अरुण यांनी ब्लॉक घेतल्यानंतर त्यांच्या वडिलांना— महादेवपंतांना खरा आनंद झाला.. मुलगा मार्गी लागला.. चांगला कुटुंबवत्सल झाला. त्याने टूरिस्ट लाईन सोडली म्हणून हे दिवस मी पाहू शकलो ह्याचे त्यांनी समाधान मानले. पण त्या कर्तव्यदक्ष पित्याला हे माहीत नव्हते की हाच माझा मुलगा अरुण उद्योजक होणार आहे. करोडोंचे व्यवहार करणार आहे व नाशिकमध्ये एक ‘सन्माननीय व्यक्ती’ म्हणून वावरणार आहे.

    सौ. कल्पना यांना नोकरी लागल्यानंतर आर्थिक विवंचना मिटली असली तरी ‘बालसंगोपन’ हा मोठा प्रश्न आ वासून उभा राहिला. त्यावेळेस अरुण कायम सेकंड शिफ्ट घेऊ लागले. म्हणजेच दुपारी ३.३० ते रात्री ११.३०! दुपारी ३ ते रात्री ७ वाजेपर्यंत मुलाला पाळणाघरात ठेवावे लागले. ह्या अशा दिनचर्येमुळे पती पत्नींचे ओट्यावरती ठेवलेल्या चिठ्यांद्वारे संभाषण.. त्यामध्ये अनेक वेळा गैरसमज होत. मग शाब्दिक वादावादी व्हायची. मुलावर संस्कार करण्यास, त्याचा अभ्यास घेण्यास कोणालाच वेळ नाही. परत महादेवपंतांनी स्पष्ट सांगितले की ही तुमची जीवनशैली मला मान्य नाही. सूनबाईंनी नोकरी सोडावी. मुलांना आईचेच संस्कार हवेत. मनाच्या दोलायमान स्थितीत नातू दांपत्य असताना ७ जुलै १९९० रोजी कल्पना यांना कन्यारत्न झाले. काही महिने ह्या छोट्या बाळाला ग्लॅक्सोच्या फ्रेशमध्ये ठेवून पाहिले पण तरीही दोघांना वाटू लागले की कल्पनाच्या नोकरीबाबत ठाम निर्णय घेणे गरजेचे आहे. डिसेंबर १९९० मध्ये सौ. कल्पना यांनी नोकरी सोडली. 

    केटरिंग व्यवसायात पाऊल : 

    १९९४ मध्ये मुलगी ४ वर्षांची झाली. बालवाडीत जाऊ लागली तेव्हा सौ कल्पनाच्या मनात आले. “काहीतरी करु या का? पण ‘काहीतरी’ या प्रश्नाला उत्तर सुचत will power म्हणजेच आंतरिक इच्छा प्रबळ असली की समोरून येणाऱ्या संधी त्या व्यक्तीला खुणावतात. भोसला मिलिटरी स्कूलमधील आमटे मॅडम नातू परिवाराच्या परिचित होत्या. त्या तिथे मोठ्या पदावर होत्या, एकदा सहज त्या सौ. कल्पनाला म्हणाल्या, “भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारात विद्यार्थ्यांसाठी खाद्यपदार्थांचे काऊंटर लावता येतील का? ज्या विद्यार्थ्यांना घरून डबे आणणे जमत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी पोळीभाजी, दही भात किंवा नाश्ता म्हणून इडली, सँडविच, बटाटावडा असे प्रकार ठेवावेत. सौ. कल्पनाताईंना हा प्रस्ताव आवडला. कारण महात्मानगर पासून भोसला मिलिटरी स्कूल हे अंतर फक्त १० मिनिटे ! सौ. कल्पनाताईंनी अरुण यांच्याशी चर्चा करून हे काम स्वीकारले, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला मिळू लागला. अरुण स्वतःची नोकरी सांभाळून पत्नीला व्यवसायात मदत करीत. अगदी भाज्या खरेदीपासून भाज्या चिरण्यापर्यंत अरुण पत्नीला मदत करु लागले. एकदा शाळेतील २५ शिक्षकांची ट्रीप जाणार होती.

    शिक्षकांनी २५ जेवणाच्या डब्यांची फर्माइश केली. खरं म्हणजे ही फर्माईश हाच व्यवसायाचा श्रीगणेशा ठरला ! ह्या २५ शिक्षकांना जेवणाचे डबे म्हणजेच खाद्यपदार्थांची चव इतकी आवडली की त्यांच्याकडून त्यांच्या घरच्या समारंभाच्या ऑर्डर्स सौ. कल्पनाताईंना मिळू लागल्या. जेवणाची पार्सल्स, हळदीकुंकू, बारसे, केळवण, डोहाळ जेवण, वाढदिवस अनेक छोटे छोटे कार्यक्रम.. भरपूर ऑर्डर्स वाढल्या. ५ वर्षात व्यवसाय इतका वाढला की मदतीला ४ बायका येऊ लागल्या. अर्थातच महात्मानगर येथील राहत्या घरातून सर्व कामे करणे कठीण झाले. अरुण व सौ. कल्पना यांनी एकत्रितपणे निर्णय घेतला व जवळच असलेल्या डिसोझा कॉलनीमध्ये एक २ रुम किचन ब्लॉक विकत घेतला व तिथे केटरिंगचे काम सुरु झाले. पदार्थांची चव ग्राहकांची संख्या वाढवत होती. ग्राहकांना हसतमुखाने सामोरे जाण्याचे काम अरुण नातू यांचे ! ग्राहकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी त्यांचे सकारात्मक उत्तर तयार असे.

    ज्यांना यश मिळत नाही ते नेहमी नशिबाला दोष देऊन मोकळे होतात व स्वतःवर ‘अपयशी’ हा शिक्का मारतात, पण खरे म्हणजे त्यांच्या प्रयत्नांची दिशा चुकलेली असते. कुणाचेही नशीब खरे किंवा खोटे नसते. डोक्यावर बर्फ व जिभेवर खडीसाखर ठेवून वागले तर ग्राहकांच्या सर्व आक्षेपांना, प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देता येतात. श्री. अरुण नातू यांना हे सूत्र चांगलेच अवगत असल्याने त्यांना ग्राहकांची कमतरता कधीच जाणवली नाही.

    सन २००० पर्यंत ‘नातू कॅटरर्स’च्या छोट्या-मोठ्या अशा भरपूर ऑर्डर्स वाढल्या. नातू कॅटरर्सच्या पदार्थांची, भोजनाची चव खवय्ये मंडळींच्या जिभेवर इतकी रेंगाळू लागली की नाशिकमध्ये मंगल कार्यालयांमध्ये पॅनेलमध्ये ‘नातू केटरर्स’ आहेत का ? अशी लोकांची विचारणा होऊ लागली. आणि नातू केटरर्स ग्राहकांच्या हक्काचा केटरिंग ब्रॅंड बनला. 

    आणखीन वाचा:

  • आईचे दागिने विकून सुरू केलेला व्यवसाय आज १३,००० कोटींचा ब्रँड बनला | Lalitha Jewellery

    आईचे दागिने विकून सुरू केलेला व्यवसाय आज १३,००० कोटींचा ब्रँड बनला | Lalitha Jewellery

    किरण कुमार हे नाव आज सोन्याच्या दागिन्यांच्या क्षेत्रात आदराने घेतले जाते. त्यांच्या अथक परिश्रमाने आणि दूरदृष्टीने ‘ललिता ज्वेलरी’ हा ब्रँड भारतातील लाखो लोकांच्या विश्वासाला पात्र ठरला आहे. दर्जा, परवडणाऱ्या किमती, आणि उत्कृष्ट डिझाईन्स यामुळे हा ब्रँड आज घरोघरी पोहोचला आहे. मात्र, या यशस्वी प्रवासामागे किरण कुमार यांचा संघर्ष आणि कष्टांची महत्त्वाची भूमिका आहे. हे यश एका रात्रीत मिळालेलं नाही. अत्यंत गरिबीतून प्रवास सुरू करणाऱ्या किरण कुमार यांनी कष्ट, अपयशांचा सामना आणि सतत शिकण्याच्या वृत्तीने हे साम्राज्य उभं केलं आहे. त्यांचा संघर्षमय प्रवास हा आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

    आज या लेखात आपण त्यांच्या जीवनप्रवासाचा आणि ‘ललिता ज्वेलरी’ च्या यशामागील प्रवासाचा आढावा घेणार आहोत.

    प्रारंभिक जीवन आणि आव्हाने

    किरण कुमार यांचा जन्म १९६० च्या दशकात आंध्र प्रदेशातील नेल्लोर शहरात एका सामान्य कुटुंबात झाला. ते आपल्या आईवडिलांचे आठवे अपत्य होते. त्यांचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या मजबूतीने स्थिर नव्हतं. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय सोनारांसाठी खाती लिहिण्याचा होता, पण त्या व्यवसायातून फारसा नफा मिळत नव्हता. त्यामुळे कुटुंबाला कायमच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. लहानपणीच त्यांनी गरिबीचं कठोर आणि दाहक सत्य अनुभवलं, आणि हाच अनुभव पुढे त्यांच्या आयुष्यात एक मोठं धाडस आणि प्रेरणा बनला.

    शालेय शिक्षणात त्यांना विशेष रस नव्हता. अनेक वेळा त्यांना काय शिकवलं जात आहे, हेच कळत नव्हतं. आणि यामुळे प्रगती करण्यात अडचणी येत होत्या. एकदा त्यांचे शिक्षक चेष्टा करत म्हणाले होते, “तू जर तोंडपाठ अक्षर बोलू शकलास, तर आम्ही तुला पास करू.” ही गोष्ट त्यांच्या मनाला लागली आणि त्यातून त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ लागला. पण त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत, जीवनातील संघर्षांकडे आपलं लक्ष केंद्रित केलं आणि अखेर आपला मार्ग शोधला.

    सुरुवातीचा संघर्ष आणि यशाचा पाया

    किरण कुमार यांचा संघर्ष वयाच्या १५ व्या वर्षीच सुरू झाला, जेव्हा त्यांनी आपल्या आईच्या चार सोन्याच्या बांगड्या विकून ज्वेलरी व्यवसायात पाऊल ठेवलं. इतर मुलं शिक्षण घेत असताना, कुमार कुटुंबाच्या पालनहार बनण्यासाठी काम करत होते. त्यांनी कुशल कारागिरांकडून दागिन्यांची निर्मिती शिकली आणि ग्राहकांच्या आवडी-निवडी समजून घेतल्या. ते ज्वेलरीच्या दुकानात ३०-४० रुपयांच्या कमी पगारावर काम करू लागले. हळूहळू, व्यवसायाच्या गुपितांचा अभ्यास करून ते या क्षेत्रात उतरले. 

    १९८३ मध्ये त्यांनी चेन्नईत ‘ललिता ज्वेलरी’चे पहिले शोरूम उघडलं, जे त्यांच्या जीवनातील महत्त्वाचं पाऊल ठरलं. ‘ललिता ज्वेलरी’ने गुणवत्ता, परवडणारे दर आणि पारदर्शकतेचे तत्त्वं पालन करत ग्राहकांचं लक्ष वेधून घेतलं. कमी भांडवल असूनही, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर व्यवसाय वाढवला.

    मात्र,तत्कालीन गोल्ड कंट्रोल ऑर्डरच्या अंमलबजावणीमुळे आभूषण उद्योगावर मोठा परिणाम झाला आणि त्यांचे कुटुंब आर्थिक अडचणीत आलं. त्या कठीण काळातील आठवणी अजूनही त्यांच्या मनात आहेत. परंतु त्यांच्या कष्टांमुळे आणि धैर्यामुळे सगळं सुरळीत होऊन व्यवसायात वाढ झाली. सुरुवातीला  दक्षिण भारतातील महिलांना लक्ष करून त्यांनी तिरुपती, चेन्नई आणि हैदराबादमध्ये शोरूम उघडलं. त्यांच्या ब्रँडचे मुख्य आकर्षण म्हणजे कमी मेकिंग चार्जेस आणि उच्च दर्जाचे दागिने आहेत.

    कठीण प्रसंगातून उभा राहिलेला ब्रँड

    १९९९ साली मोठ्या अडचणींना सामोरे जात असलेल्या ‘ललिता ज्वेलरी’च्या संपूर्ण जबाबदारीचा भार कुमार यांनी आपल्या खांद्यावर घेतला. त्यांनी ग्राहक-केंद्रित धोरणं राबवत कंपनीला नवीन दिशा दिली आणि विस्ताराला गती दिली. यामुळे ललिता ज्वेलरीने भारताबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली ओळख निर्माण केली. ग्राहकांचा विश्वास हा ब्रँडच्या यशाचा मुख्य आधार ठरला.

    सध्या ललिता ज्वेलरीच्या भारतभर ५३ शाखा असून, ३२,००० हून अधिक कर्मचारी काम करतात. कंपनीची वार्षिक उलाढाल १३००० कोटींवर पोहोचली आहे. मुंबई, कोलकाता, केरल आणि कोईतुंबर मधील  डिझायनर्स ग्राहकांच्या बजेटनुसार हलक्या वजनाचे, पारंपरिक आणि आधुनिक डिझाईन्स तयार करतात. गुणवत्ता आणि विश्वासाच्या जोरावर ललिता ज्वेलरी आज यशस्वीपणे पुढे वाटचाल करत आहे.

    मित्रांनो,ललिता ज्वेलरीची यशोगाथा ग्राहकांच्या विश्वासाने आणि गुणवत्तेच्या वचनबद्धतेने लिहिली गेली आहे. कंपनीने नेहमीच ग्राहक-केंद्रित धोरणे राबवून त्यांच्या अपेक्षांना प्राधान्य दिले आहे. पारंपरिक आणि आधुनिक डिझाईन्सच्या माध्यमातून ग्राहकांचे स्वप्न साकार करताना त्यांनी सर्व स्तरांवर आपली ओळख मजबूत केली आहे.

    ललिता ज्वेलरी आज केवळ दागिन्यांची कंपनी नसून, विश्वासाचा एक बुलंद ब्रँड बनला आहे. लाखो समाधानी ग्राहक आणि हजारो कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांमुळे कंपनीने यशाच्या उंच शिखरावर पोहोचण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे.

    भारतीय बाजारपेठेत आपली ठसा उमटवल्यानंतर, ललिता ज्वेलरीने आंतरराष्ट्रीय स्तरावरही गुणवत्ता आणि विश्वासाच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे.त्यांचा प्रवास असाच अविरतपणे सुरू राहो अशी सदिच्छा आणि उज्ज्वल भविष्यासाठी नवी अर्थक्रांतीकडून मनःपूर्वक शुभेच्छा!

  • यशस्वी उद्योजक होण्यासाठी १० महत्त्वाचे कानमंत्र -Business Tips 2026

    यशस्वी उद्योजक होण्यासाठी १० महत्त्वाचे कानमंत्र -Business Tips 2026

    १. प्रबळ इच्छाशक्ती: “पर्पज > प्रॉफिट” (Purpose over Profit)

    व्यवसाय सुरू करण्यापूर्वी स्वतःला आरशात पाहून एकच प्रश्न विचारा— “मी हे फक्त पैशांसाठी करतोय की मला एखादा ‘प्रॉब्लेम’ सॉल्व्ह करायचा आहे?”

    • माइंडसेट शिफ्ट: जर तुमचं उत्तर फक्त’ पैसा’ असेल, तर पहिल्याच मोठ्या संकटात तुम्ही हार मानाल. व्यवसायासाठीचं ‘मोटिव्हेशन’ बाहेरच्या जगात नाही, तर तुमच्या आतल्या ‘Why’ (का?) मध्ये असतं.
    • जेव्हा तुमच्याकडे एक भक्कम ध्येय (Purpose) असतं, तेव्हा रात्रीच्या जागरणांचा किंवा सततच्या तणावाचा त्रास होत नाही. तुमची कल्पनाशक्ती आणि ती सत्यात उतरवण्याची अफाट ओढ हेच तुमच्या यशाचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे.

    २. ‘अ‍ॅनालिसिस पॅरालिसिस’ टाळा: अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरु

    अनेक लोक फक्त ‘परफेक्ट प्लॅन’ बनवण्यात वर्षे घालवतात आणि प्रत्यक्षात काहीच करत नाहीत. कुणीही जन्मतः उद्योजक नसतो!

    • ऍक्शन घ्या: व्यवसायात काय करायचं आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ‘काय टाळायचं’, हे कौशल्य फक्त मैदानात उतरल्यावरच समजतं.
    • रतन टाटा नेहमी म्हणतात तसं— ‘मी आधी निर्णय घेतो आणि मग ते योग्य ठरवून दाखवतो.’ ‘Fail Fast, Learn Faster’ हे २०२६ चे बिझनेस मॉडेल आहे.

    ३. ‘अबंडन्स माइंडसेट’: ईर्ष्या नको, सहकार्य आणि महत्त्वाकांक्षा वाढवा

    कोणत्याही प्रकारचा राग, हेवा किंवा ईर्ष्या हा व्यवसायासाठी कॅन्सरसारखा असतो. तो तुमची ऊर्जा चुकीच्या ठिकाणी खर्च करतो.

    • स्पर्धक नव्हे, शिक्षक: कोणाची तरी प्रगती पाहून ‘मलाही तिथे पोहोचायचं आहे’ ही सकारात्मक महत्त्वाकांक्षा बाळगा. पण कुणाचे पाय खेचून स्वतःची उंची वाढवण्याचा प्रयत्न करू नका.
    • नेटवर्किंग: आजच्या काळात तुमचे ‘कॉम्पिटिटर्स’ उद्याचे तुमचे ‘कोलॅबोरेटर्स’ (सहकारी) असू शकतात. यशस्वी लोकांकडे ‘आदर्श’ म्हणून पाहा आणि त्यांच्या चुकांमधून फुकटात धडे शिका.

    ४. ‘द व्हॅली ऑफ डेथ’ आणि १००० दिवसांचा संयम

    आज रात्री व्यवसाय सुरू केला आणि उद्या सकाळी तुम्ही करोडपती झालात, असं फक्त चित्रपटात होतं! कोणताही व्यवसाय स्थिर होण्यासाठी किमान १००० दिवसांचा (३ वर्षांचा) ‘ग्रेस पिरियड’ घेतो.

    • बांबूच्या झाडाचा नियम: चिनी बांबू सुरुवातीची काही वर्षे फक्त जमिनीखाली आपली मुळे घट्ट करत असतो, वर काहीच दिसत नाही. पण एकदा का मुळे रुजली, की तो काही आठवड्यांतच ९० फुटांपर्यंत वाढतो.
    • वास्तवाचे भान: सुरुवातीचा काळ हा ‘सर्वायव्हल’ (अस्तित्व टिकवण्याचा) असतो. हा ३ वर्षांचा संयम ज्याच्याकडे आहे, तोच उद्योजकतेच्या शर्यतीत टिकतो.

    ५. शून्य ‘इगो’: सदैव ‘लाईफलाँग लर्नर’ राहा

    “मला माझ्या इंडस्ट्रीतलं सगळं माहित आहे” हा विचार म्हणजे व्यवसायाच्या विनाशाची सुरुवात.

    • कस्टमर आणि टीमचा आवाज ऐका: एका प्रसिद्ध टूथपेस्ट कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्याने ‘टूथपेस्टचे छिद्र मोठे करा’ हा सल्ला दिला, ज्यामुळे कंपनीचा खप रातोरात वाढला. कल्पनेला पदाची किंवा वयाची मर्यादा नसते.
    • तंत्रज्ञानाची कास: AI, ऑटोमेशन आणि बदलणाऱ्या ग्राहकांच्या सवयी यांबद्दल नेहमी अपडेटेड राहा. जो शिकणं थांबवतो, तो संपतो. कायम एका जिज्ञासू विद्यार्थ्याची भूमिका घ्या.

    ६. मार्केट इंटेलिजन्स: डेटा-ड्रिव्हन पूर्वतयारी

    कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ‘मार्केट रिसर्च’ हा तुमच्या रणनीतीचा कणा असला पाहिजे. ‘मला वाटतं की हे चालेल’ या भ्रमातून बाहेर पडा आणि ‘डेटा काय सांगतोय?’ यावर फोकस करा.

    • ३ प्रश्न स्वतःला विचारा: 

    १. माझ्या ग्राहकांचा सर्वात मोठा ‘Pain Point’ (समस्या) काय आहे? 

    २. माझे स्पर्धक कुठे चुकत आहेत जे मी सुधारू शकतो? 

    ३. कस्टमर ॲक्विझिशन (ग्राहक मिळवण्याचा) माझा खर्च किती असणार आहे?

    • नियम: पूर्वतयारी आणि डेटाशिवाय मार्केटच्या युद्धात उतरणे म्हणजे स्वतःहून पराभवाला निमंत्रण देणे होय.

    ७. कागदी पदवीपेक्षा ‘स्ट्रीट स्मार्टनेस’ आणि ‘एक्झिक्युशन’

    बिल गेट्सनी म्हटल्याप्रमाणे, एकेकाळचे वर्गातील टॉपर्स आज त्यांच्याकडे काम करतात. यशस्वी उद्योजक होण्यासाठी तुमच्याकडे उच्च शिक्षणाची पदवी असण्याची अजिबात गरज नाही.

    • स्किल्स ओव्हर डिग्री: तुम्हाला फक्त तुमच्या ग्राहकांची सायकॉलॉजी समजणं, ‘कॅश फ्लो’ (पैशांचा ओघ) मॅनेज करणं आणि टीमकडून काम करून घेण्याचं ‘व्यावहारिक ज्ञान’ (Street Smartness) असणं गरजेचं आहे. आयडिया कुणाकडेही असते, पण ती ‘एक्झिक्युट’ (अंमलात आणणे) करणाराच खरा राजा ठरतो!

    ८. ‘मी मालक आहे’ हा माज सोडा: कष्टाची लाज नसावी

    “मी तर सीईओ आहे, मी हे लहान काम का करू?” हा अहंकार असेल, तर आजच व्यवसाय करण्याचा विचार सोडून द्या.

    • सर्व्हंट लीडरशिप (Servant Leadership): खरा आणि यशस्वी उद्योजक तोच असतो जो वेळ पडल्यास ग्राहकांशी थेट फोनवर बोलतो, बॉक्स पॅक करतो किंवा ऑफिसमध्ये झाडू मारायलाही मागे-पुढे पाहत नाही.
    • फायदा: जेव्हा तुम्ही ग्राऊंड लेव्हलचे काम करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या व्यवसायातील खऱ्या त्रुटी आणि आव्हाने समजतात. तुमच्या टीमलाही तुमच्याकडून प्रेरणा मिळते.

    ९. ‘पिव्होट’ (Pivot) करायला शिका: प्लॅन A फसला? प्लॅन B तयार ठेवा!

    व्यवसायात तुम्ही ठरवल्याप्रमाणे सर्व काही घडेलच असे नाही. अपयश येणारच! पण जर एखादा प्लॅन वर्कआउट झाला नाही, तर तो व्यवसाय बंद करून पळून जाणे हा उपाय नाही.

    • लवचिकता (Agility): जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी सुरुवात एका प्रॉडक्टने केली होती आणि आज ते दुसरंच काहीतरी विकत आहेत (उदा. YouTube आधी एक डेटिंग साईट होती!).
    • आत्मविश्लेषण: काय चुकलं आणि मार्केटला नक्की काय हवंय? याचा अभ्यास करा आणि आपला मार्ग बदला (Pivot). हजारो संधी वाट पाहत आहेत.

    १०. अपयशाकडे ‘फीडबॅक’ आणि ‘डेटा’ म्हणून पाहा!

    आयुष्यात आणि व्यवसायात आव्हाने येतीलच. काही वेळा तुम्ही जबरदस्त जिंकाल, तर काही वेळा भयानक हराल.

    • पराभवाचे सेलिब्रेशन: अपयश ही वाईट गोष्ट नाही, तो फक्त एक ‘डेटा’ आहे जो सांगतो की ‘हा मार्ग चुकीचा आहे’. पराजय स्वीकारा, त्यातून शिका आणि दुप्पट वेगाने परत या.
    • निंदकांचे घर असावे शेजारी: नवीन प्रयत्न करणाऱ्यांना नेहमीच लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागते. लोक चेष्टा करतील, नावे ठेवतील, पण त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. तुमचा ‘रिझल्ट’ हाच त्यांचा सर्वात मोठा ‘रिप्लाय’ असेल!

    🔥 तुमचा सर्वात आवडता कानमंत्र कोणता? खाली कंमेंट करून सांगा! 

    (ही पोस्ट सेव्ह करायला विसरू नका आणि तुमच्या त्या मित्रासोबत नक्की शेअर करा ज्याला स्वतःचा बिझनेस उभा करायचा आहे!)

  • पांढऱ्या कोटातून मातीच्या सेवेपर्यंत: ७५,००० ची नोकरी सोडून काव्या ढोबळेने उभा केला ‘लाखोंचा’ कृषी ब्रँड! कोण आहे काव्या ढोबळे? जाणून घ्या.

    पांढऱ्या कोटातून मातीच्या सेवेपर्यंत: ७५,००० ची नोकरी सोडून काव्या ढोबळेने उभा केला ‘लाखोंचा’ कृषी ब्रँड! कोण आहे काव्या ढोबळे? जाणून घ्या.

    अनेकांच्या मनात चांगल्या सरकारी किंवा स्थिर नोकरीबद्दल आकर्षण असते. “जिथे चांगल्या पगाराची आणि सुरक्षित भविष्यातील हमी आहे, ती नोकरी सोडून दुसऱ्या अनिश्चित क्षेत्रात का जावं?” असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, जुन्नर येथील काव्या ढोबळेने हा विचार बाजूला ठेवत, महिन्याला ७५,००० रुपये पगाराची चांगली नोकरी सोडून कृषीपूरक व्यवसायाचा मार्ग स्वीकारला. आज ती केवळ यशस्वीच नाही, तर दर महिन्याला लाखो रुपये कमवत आहे, आणि तिची कहाणी अनेकांसाठी आदर्श ठरली आहे.

    काव्याच्या यशात एक महत्त्वाचा संदेश आहे. तो म्हणजे जर स्वतःवर विश्वास ठेवला आणि कठोर मेहनत केली, तर कोणतीही अडचण पार करता येते. मात्र, स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कधी कधी, “आपलं स्वप्न पूर्ण होईल का?” या शंकेतूनही काही जण जातात. पण हेही सत्य आहे की, अनेक व्यक्ती अपयशांवर मात करून उशिरा का होईना, यश मिळवतात. काव्यानेही हे सिद्ध करून दाखवलं आहे.

    या लेखात आपण काव्याच्या जीवनातील संघर्ष, तिचं यश आणि त्यामागील मेहनतीचा प्रवास याविषयी जाणून घेणार आहोत.

    शेतीची आवड आणि प्रेरणा

    काव्याला लहानपणापासून शेतीची आवड होती. मात्र, त्या वेळी शेतीत करिअर करण्याची शक्यता धूसर वाटत होती. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. तिने जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीमध्ये पदविका पूर्ण केली आणि मुंबईतील सायन हॉस्पिटल येथे काम करण्यास सुरुवात केली.

    सायन हॉस्पिटलमध्ये काम करत असताना तिला जाणवलं की रासायनिक शेती व त्यातून मिळणारे खाद्यपदार्थ मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम करतात. तिच्या या जाणिवेला कोरोनाच्या महामारीने अधिक धार दिली. कोरोना काळात रुग्णांची सेवा करताना आणि स्वतः कोरोना पॉझिटिव्ह होऊन गंभीर आरोग्य संकटातून जात असताना तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. महामारीमुळे झालेली हानी आणि मृत्यू पाहून तिला प्रकर्षाने जाणवलं की, मानवाच्या आरोग्यासाठी शुद्ध खाद्य हाच योग्य मार्ग आहे.आणि त्यासाठी सेंद्रिय शेती महत्वाची आहे. 

     तिने ठरवलं की नोकरी सोडून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे वळायचं. शेतीत उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिने सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास केला.

    कृषी क्षेत्रातील नवा प्रयोग आणि व्यवसायाला सुरुवात 

    २०२२ हे वर्ष काव्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा ठरलं. तिने नोकरी सोडून शेती क्षेत्रात काम करण्याचा धाडसी निर्णय घेतला, जो अनेकांसाठी अचंबित करणारा होता. मात्र, तिचा निर्धार पक्का होता आणि पतीची साथ मजबूत होती.दोघांनी त्यांच्या पुण्यातील जुन्नर येथे असलेल्या पाच गुंठे शेतीतून गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्याचं ठरवलं. शेतकऱ्यांशी संवाद साधत रासायनिक खतांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर त्यांनी जागरूकता निर्माण केली आणि स्वतः गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग सुरू केला.

    ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांनी एका शेतकऱ्याकडून एक किलो गांडुळे खरेदी करून छोट्या खोलीत खत निर्मितीला सुरुवात केली. ऑक्टोबरमध्ये तयार झालेलं पहिलं खत पाहून काव्याचा आत्मविश्वास वाढला. मार्च २०२३ मध्ये त्यांनी “कृषी काव्या” या ब्रँडच्या अंतर्गत व्यावसायिक विक्री सुरू केली. त्यांच्या उच्च गुणवत्तेमुळे मोठ्या प्रमाणात खताला मागणी वाढली. एका शेतकऱ्याने ५० हजार रुपयांचं खत खरेदी केलं, तर एका संस्थेनं २००० किलो गांडुळे खरेदी केली, ज्यामुळे तिला मोठं आर्थिक यशही मिळालं. 

    पांढऱ्या कोटातून मातीच्या सेवेपर्यंत ७५,००० ची नोकरी सोडून काव्या ढोबळेने उभा केला 'लाखोंचा' कृषी ब्रँड! कोण आहे काव्या ढोबळे जाणून घ्या.

    या यशाच्या जोरावर काव्या ने जैविक शेती आणि गांडूळ खत निर्मितीचा प्रसार अधिक व्यापक करण्यासाठी एक यूट्यूब चॅनल सुरू केलं. त्यात तिने शेतकऱ्यांना प्रगत शेती पद्धतींची माहिती देणारे व्हिडिओ तयार केले आणि इतर शेतकऱ्यांचे यशोगाथाही शेअर केल्या.अल्पावधीत तिच्या “कृषी काव्या” ब्रँडने जैविक शेतीसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलं.

    वर्षाला 24 लाख रुपये कमाई

    काव्या चा गांडूळ खत तयार करण्याचा व्यवसाय २०२३-२४  या आर्थिक वर्षात प्रचंड यशस्वी ठरला. तिने या वर्षात  जवळपास २४ लाख रुपयांची उलाढाल केली आहे आणि पुढील वर्षासाठी ५० लाख रुपयांचे ध्येय ठरवले आहे. तिच्या यशाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे शेतकऱ्यांना खत निर्मितीचे प्रशिक्षण देणे. काव्याने शेतकऱ्यांना गांडूळ खत तयार करण्याची तंत्रे शिकवण्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन केले, ज्यामुळे २०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या प्रक्रियेची माहिती मिळाली.

    त्याचबरोबर, काव्या रासायनिक मुक्त शेतीच्या तत्त्वज्ञानावर जनजागृती करत आहे. तिच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना जैविक शेतीची महत्त्वाची माहिती मिळत आहे आणि ते आपल्या पारंपरिक पद्धतींमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. काव्याचे हे काम शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविणारे ठरले आहे, कारण ती त्यांना अधिक शाश्वत आणि आरोग्यदायी शेती करण्यासाठी प्रेरित करत आहे.

    मित्रांनो, काव्या ची कहाणी खरोखरच अत्यंत प्रेरणादायक आहे.सरकारी नोकरी सोडून कृषी क्षेत्रात पाऊल ठेवणे आणि यशस्वी होऊन दाखवणे हि साधी गोष्ट मुळीच नाही त्यासाठी प्रचंड जिद्द आणि इछशक्ती लागते .तिचा हा प्रवास संघर्ष आणि समर्पणाचा आहे. तिने आपला ठाम निर्णय घेतला आणि अनेक अडचणींवर मात करत शेती व्यवसायात मोठे यश मिळवले. तिच्या या यशात  फक्त आर्थिक लाभ नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचा महत्त्वाचा भाग आहे. काव्याची कथा आपणास शिकवते की, कठोर निर्णय आणि मेहनतीचा परिणाम लवकरच मोठ्या यशात बदलू शकतो.

    आणखी वाचा