Category: उद्योजकता

  • उद्योजक व्हायचे असेल तर…

    उद्योजक व्हायचे असेल तर…

    आपण जेव्हा एखादे काम स्वीकारतो किंवा एखादी नोकरी स्वीकारतो तेव्हा आपणास त्या कामाचे जे पैसे मिळतात ते हवे असतात म्हणून आपण ते काम किंवा नोकरी स्वीकारतो. पण त्यामुळे आनंदी होतोच असे नाही. केवळ जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पैशासाठी आपण ती नोकरी स्वीकारतो. आणि आपले त्या कामात लक्ष लागत नसल्यामुळे दु:खी कष्टी होतो. तसेच एखादा व्यवसाय किंवा उद्योग करावयाचा असेल तर आपल्याला तो व्यवसाय/उद्योग आवडतो का? ह्या प्रश्नाचा विचार सुरुवातीला करणे आवश्यक आहे. “I am the Boss of Myself” असे ज्याला वाटते तोच उद्योजक होऊ शकतो. ९ ते ५ काम करणारी मंडळी, त्यांची मानसिकता अगदी वेगळी असते. ते धाडसी निर्णय घेऊ शकत नाहीत. ते उद्योगात यशस्वी होऊ शकत नाहीत.

    How to Be a Successful Entrepreneur

    व्यवसाय करण्यासाठी सिद्ध असलेल्या व्यावसायिकाने हे लक्षात घ्यावयास हवे की त्याला मार्केटिंग येणे आवश्यक आहे. मार्केटिंग हे शास्त्र नव्हे. त्यासाठी उपजत शहाणपण आणि अनुभव गाठीशी असावा लागतो. आपल्याबाबत लोकांना माहिती हवी. आपण विकणाऱ्या वस्तूची चांगली माहिती हवी. तुम्ही स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकले पाहिजे. तुम्हाला लोकांनी सहज ओळखले पाहिजे. इतरांच्या तुलनेत तुम्ही तुमची चमक दाखवली पाहिजे. अगदी तुम्हाला एस्कीमोलाही फ्रीज विकता आले पाहिजे किंवा केस नसणाऱ्याला कंगवा विकता आला पाहिजे. आपण जी वस्तू विकणार आहोत त्यात नाविन्य हवे. शक्यतो त्यासारखी दुसरी वस्तू बाजारात नसावी. नाविन्य आणि वेगळेपणा फार महत्वाचा आहे. तोच खरा व्यावसायिक/उद्योजक जो नाविन्यपूर्ण वस्तूंची निर्मिती करून त्यासाठी बाजार निर्माण करतो. उदा. स्टीव्ह जॉब्स. I-POD बाजारात आणला. लोकांना त्याची आवश्यकता होती का? तर नाही. तरीही लोकांना ती वस्तू हवी हवीशी वाटते आणि त्यातून पैसा कमविता येतो. नवीन ग्राहक निर्माण करणे व त्यासाठी बाजारपेठ निर्माण करणे हे फार महत्वाचे असते.

    स्टीव्ह जॉब्स यशस्वी झाले त्याचे कारण त्यांनी नव्या वस्तू बाजारात आणल्या. लोकांना त्या हव्या हव्याशा वाटल्या. तुमची सेवा, ह्याबद्दल लोकांना विश्वास वाटायला हवा. जो हे करतो तो खरा व्यावसायिक/ निर्माता. त्या वस्तूची नुसती विक्रीच झाली पाहिजे असे नाही तर त्यामुळे समाज जीवनावर त्याचा प्रभाव पडला पाहिजे. त्यामुळे सामान्य माणसाचे आयुष्य बदलले पाहिजे.
    तुम्ही तुमची बाजारपेठ तयार केली पाहिजे. टिकवून ठेवली पाहिजे. तुमच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा तुम्ही उठून दिसणे आवश्यक आहे बिल गेट्स हे उत्तम विक्रेते आहेत. स्पर्धा ही महत्वाची असतेच. पण स्पर्धेत तुमचे लक्षणीय असणे महत्वाचे असते. स्पर्धा ही असणारच. स्पर्धेला टक्कर देत पुढे गेले पाहिजे. जे खूप लढाऊ असतात त्यांच्या मागेच यश धावत येते.

    How to Be a Successful Entrepreneur

    कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या नव्या पिढीच्या व्यावसायिकाकडे पाहिले असता हे सहज लक्षात येते की त्यांच्याकडे योग्य ते भांडवल नसते. त्यांच्याकडे नव्या नव्या कल्पना असतात, इच्छाशक्ती असते ,उत्साह असतो. ह्या नव्या कल्पनाशक्तीमुळेच ते वेगळे दिसून येतात. आपल्या डोक्यात एकाच वेळी अनेक कल्पना असतात. अनेक कल्पनांची गिरणी चालू असते. जेव्हा वेळ योग्य असते, जमीन सुपीक असते तेव्हा कल्पनेला उगवण्याची म्हणजे फुलण्याची संधी मिळते. आपले मन स्वप्नाळू हवे. विचारक्षमता तीव्र हवी आणि कामाचे योग्य नियोजन हवे. तरच कल्पना प्रत्यक्षात उतरू शकते. आर गोपीनाथ ह्यांनी सर्वात स्वस्त हवाई प्रवास ही कल्पना पुढे आणली व एक नवा प्रयोग यशस्वी करून दाखविला. आज सामान्य माणसांना हवाई प्रवास शक्य झाला आहे .

    बहुतेक व्यवसाय अयशस्वी होतात त्याचे प्रमुख कारण म्हणजे व्यावसायिकांचा अहंगंड. दोन सहकारी व्यावसायिकांचा अहंगंड त्यांना अयशस्वी करतो. आयुष्यातील जगण्याचा अनुभव महत्वाचा असतो.

    सर्वच माणसं स्वप्नं बघतात. सगळ्यांची स्वप्नं सारखी नसतात. काही व्यक्ती फक्त रात्री झोपेत असतानाच स्वप्नं बघतात व सकाळी त्या स्वप्नांना आठवून त्यांचा विचार करतात किंवा विसरून जातात. पण ज्या व्यक्ती फक्त दिवसाच स्वप्नं बघतात त्या खूप वेगळ्या असतात. त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीचा पाठलाग करावयाचा असतो. ते त्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करतात. मेहनत घेतात. ही ध्यास असलेली माणसेच खऱ्या अर्थाने यशस्वी होताना दिसतात. अशी स्वप्नं बघणे आणि प्रयत्नशील राहणे हे खऱ्या व्यावसायिकालाच जमते. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या माणसाचे काम करणारा धीरुभाई अंबानीसारखा साधा माणूस पुढे जगातील एका मोठ्या पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीचा मालक कसा झाला हे समजून घेतले पाहिजे. महाविद्यालयीन शिक्षण सोडून स्वतःचे छोटे उद्योग उभे करणारे बिल गेट्स किंवा स्टीव्ह जॉब्स स्वतःचे औद्योगिक साम्राज्य कसे उभे करू शकले हे शिकले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. THINK BIG AND START SMALL, हे सूत्र महत्वाचे.

    How to Be a Successful Entrepreneur

    तुम्ही तुमच्यापेक्षा हुशार व्यक्तींना तुमच्या व्यवसायात सहकारी म्हणून घेतले पाहिजे. तुमच्यापेक्षा कमी हुशार व्यक्तींना घ्याल, तर तुम्ही ज्यांचे नेतृत्व करणार आहात ते खुजे असल्यामुळे तुमचे नेतृत्व खुजेच असेल. तुमच्या कंपनीत जर जास्त कर्तृत्ववान माणसे असतील तर तुमची कंपनी उंचावर जाईल. नारायण मूर्तींना हे सहज जमले म्हणून त्यांचे नेतृत्व वादातीत आहे. तुमचे नेतृत्व निगर्वी हवे. त्यामुळेच रतन टाटा यशस्वी झाले. त्यांनी Nano कारचे स्वप्न पाहिले. ते प्रत्यक्षात उतरवून दाखविले. त्यामुळे सगळ्या कंपन्यांनी छोट्या कार बाजारात आणल्या. हा बदल घडून आणला तो Nano कारने. वेगळी अशी नवी वस्तू बाजारात आणणे हे महत्वाचे असते. नवी वस्तू पण सर्वात स्वस्त असा विचार त्यांनी दिला आणि सारे कार उद्योजक त्याच्या मागे धावत गेले कारण त्यांना नव्या बाजाराची जाणीव झाली.

    तुमची इच्छाशक्ती, तुमची आत्यंतिक आवड, तुमची निर्मिती क्षमता, तुमची ध्येयपूर्ती किंवा स्वप्नपूर्ती यासाठी चाललेली धडपड, त्यासाठी तुमचे झोकून देणे, हेच तुमच्या यशस्वी होण्याचे खरे भांडवल आहे. तुमची विचार क्षमता व कल्पनाशक्ती हे महत्वाचे भांडवल आहे. निवडलेला व्यवसाय हे माध्यम आणि तुमचे कर्म हाच खरा मार्ग आहे. ज्या व्यक्ती ह्याचा सतत पाठलाग करतात त्यांच्यासाठी परमेश्वरही त्यांच्या पाठीशी उभा राहतो. जे नैसर्गिकदृष्ट्या अनुचित व पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे ते आर्थिक दृष्ट्या फार नुकसानीचे असते हे ही त्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

    तुम्ही उडप्याचे हॉटेल पाहिले आहे काय? ते चालविणे महाकठीण काम आहे, हे माहित आहे का? ते हॉटेल चालविणे म्हणजे रोज तुमच्या मुलीचा लग्न समारंभ घडवून आणण्याइतके कठीण आहे. उद्योजक होणे असेच कठीण आहे असे गोपीनाथ ह्यांचे मत पटण्यासारखे आहे.

    नुसते ध्येय समोर ठेऊन जगणे किंवा मार्ग क्रमणे महत्वाचे नाही. त्यासाठी आपणास दूरदृष्टी असावयास हवी. खरी दूरदृष्टी असते तीच माणसे व्यवसायात यशस्वी होतात. हेन्री फोर्ड , वॉल्ट डिस्ने, स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स यांनी उद्योगाला सुरुवात केली पण अनेकदा ते अयशस्वी झाले, पण त्यांना दूरदृष्टी होती. काय करावयाचे की ज्यामुळे बदल घडून येतील ह्याची त्यांना स्पष्ट जाणीव होती. अशीच मंडळी काहीतरी भव्य दिव्य करून दाखवितात. उद्योजकाला उद्योग उभारण्यासाठी दूरदृष्टी असावी लागते, नजीकच्या काळापेक्षा भावी काळात उद्योग कसा वाढेल ह्याचा विचार महत्वाचा असतो. नजीकच्या काळातील समस्या सोडवताना दूरच्या काळातील विचार तेवढाच महत्वाचा असतो.हे ज्यांना जमते तेच यशस्वी होतात.

    व्यावसायिक म्हणजे तो माणूस, जो संपत्तीची निर्मिती करतो. नवी वस्तू, नवा गिऱ्हाईक, नवी सेवा, नवा ग्राहक. नवे असणे, उपयुक्त असणे व ग्राहकाला हवेहवेसे वाटणे, हे ज्याला सहज जमते तो खरा व्यावसायिक. नवी कल्पना, नवी वस्तू पण कमी पैशात निर्मिती, नवी सहज उपलब्ध होणारी सेवा ह्या त्रि-सूत्रीवर व्यवसाय अवलंबून असतो. स्टीव्ह जॉब्सने I-POD ची निर्मिती करून क्रांतीकारक बदल घडवून आणला. बिल गेट्सनी नवी क्रांती घडवून आणली अर्थात त्यासाठीचे आवश्यक असलेले मनुष्यबळ त्यांनी उभे केले.

    How to Be a Successful Entrepreneur

    थॉमस एडिसनने विद्युत दिव्याचा नुसता शोधच लावला नाही, तर निर्मिती करून जगाला विद्युतमय केले. सॅम वॉल्टनचे उदाहरण घ्या. “प्रत्येक दिवशी कमी किमतीत” ह्या संकल्पनेवर त्यांनी नवी बाजारपेठ उभी केली आणि खूप संपत्ती उभी केली. अंबानींनी “सारी दुनिया मुठ्ठीमे” अशी घोषणा देऊन सामान्य माणसाना मोबाईल विकला. ही सर्व उदाहरणे हे दर्शवितात की उद्योजक हा महाविद्यालयात व्यवस्थापकीय शिक्षण घेऊन तयार होत नाही. त्यासाठी त्याला तशी आतून उर्मी असावी लागते. त्यासाठी आपण खूप बुद्धिमान असले पाहिजे असे नाही, परंतु आजूबाजूचे सर्व जाणून घेण्यासाठी उत्सुक असले पाहिजे. तेच महत्वाचे ज्ञान आत्मसात करता आले पाहिजे .

    बहुतेक धंदे किंवा व्यवसाय अगदी सुरुवातीच्या काळातच बंद पडतात. जेव्हा सहकारी एकमेकाला पूरक नसतात किंवा त्यांची विचार करण्याची पद्धती सारखी नसते व काम करण्याचे मार्ग भिन्न असतात तेव्हा व्यवसाय बंद पडतात. पूरक सहकारी निवडणे फार महत्वाचे असते . तरच तणाव मुक्त व्यवसाय करता येतो. दोन किंवा दोन पेक्षा अधिक पार्टनर असतील तर कोणातरी एकाचे नेतृत्व मान्य करून व्यवसाय करता आला पाहिजे. दोन दोन नेतृत्व असतील तर व्यवसाय चालू शकत नाही. एका जहाजाला दोन कप्तान असू शकत नाहीत.

    बरेच जण व्यवसाय/उद्योग सुरु करतांना म्हणतात, “मला नवा व्यवसाय सुरु करावयाचा आहे. माझ्या वरिष्ठांना त्याची काहीच कल्पना नाही. जर व्यवसाय यशस्वी होण्याची चिन्हे दिसली तरच मी नोकरीचा राजीनामा देईल.” असा विचार करणारे लोक उद्योजक होऊ शकत नाहीत. तुम्हाला जर खरे उद्योजक व्हायचे असेल, तर हे लक्षात ठेवा की तुम्हाला स्वतःला झोकून देता आले पाहिजे. अर्थात त्यासाठी हालअपेष्टा सहन करण्याची तयारी हवी.

    तुम्ही तुमच्या जागेचे भाडे वेळेवर देऊ शकणार नाहीत. कर्मचार्यांना पगार देताना तुमची तारांबळ होईल. बायकोला साडी घेण्यासाठी तुमच्याजवळ पैसे नसतील. मुलांची महागडी शिक्षण फी भरण्यासाठी त्रास होईल. अशा असंख्य अडचणीना तोंड द्यावे लागेल. ह्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी नवे मार्ग शोधावे लागतील. ते सहज जमते, प्रयत्न करावे लागतात . पण त्यासाठी तुमची झोप उडालेली असेल, असे जेव्हा घडेल तेव्हाच तुम्ही तावूनसुलाखून निघाल. निसर्ग जसा अडचणी निर्माण करतो तसाच अडचणीवर मात करण्यासाठी मेंदूला चालनाशक्ती देतो. त्या शक्तीचा उपयोग करता आला पाहिजे.

    नवा उद्योग किंवा व्यवसाय उभा करतांना अडचणीचा डोंगर उभा राहणारच. त्या अडचणीवर मात करतानाच तुम्ही घडत जाल. नदीचा गुणधर्म वाहणे आणि समुद्राकडे धावणे. तुम्ही नदीसारखे असाल तर दगड धोंड्यावर मात करून वाहत राहणार व शेवटी समुद्राला मिळणार म्हणजेच यशस्वी होणार. यशाचा समुद्र तुमची वाट पाहत असेल हे लक्षात ठेवा. तुमच्यामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती हवी. प्रचंड उत्साह हवा. मग यशाची शिखरे तुमचीच.

    How to Be a Successful Entrepreneur

    सगळ्या लढाया ह्या प्रथम मनाच्या अवकाशात लढल्या जातात. हे लक्षात असू देणे महत्वाचे आहे. आपल्याला आजूबाजूच्या सिमीत अवकाशाची कल्पना असलेली बरी. जेव्हा आपण निर्णय घेत नाही, तेव्हाच आपण अपयशाच्या दिशेने वाटचाल करतो. हे ही लक्षात असू द्यावे.

    धंदा करावयाचा असतो तो “नफा ” मिळवण्यासाठी. “नफा” हा धंदा करणाऱ्यासाठी पवित्र मंत्र आहे. ते मान्य नसेल तर ह्यात पडू नका. नफा असेल तरच धंदा जगेल. तोटा कमी करणे ही धंद्याची पहिली पायरी. सतत तोटाच होत असेल, तर धंदा बंद करणे ही महत्वाची दुसरी पायरी. आपल्याला यश मिळू लागले की लोक आपल्याला जेवायला या असे आमंत्रण देतात. तेव्हा हे लक्षात असू द्यावे की कोणीही, कधीही फुकट जेवायला बोलवीत नसते. लोकांना ओळखता आले पाहिजे.

    कोणतीही गोष्ट पूर्ण करावयाची असेल, तर सर्वात प्रथम त्यासाठी कोणत्या दिवसापर्यंत पूर्ण करावयाची हे निश्चित करा. मनामध्ये तो दिवस पक्का करा. हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे. डेडलाईन महत्वाची असते . तरच गोष्टी साध्य होतील. व्यवस्थापकीय शिक्षण ठीक. पण जे शिकवले जाते ते सारेच उपयोगी पडते असे नाही. प्रत्यक्ष व्यावसायिक जीवनात वेगळेच मार्ग निवडावे लागतो. नुसत्या पुस्तकी शिक्षणाचा फारसा उपयोग होत नाही.

    becoming-an-entrepreneur-the-essential-skills-you-need-to-succeed

    अंटार्टिका मोहिमेसाठी एक जाहिरात देण्यात आली होती. ती अशी ….
    “अतिशय धोकादायक मोहिमेसाठी माणसे हवीत. अर्ज करा. खूप कमी पगार, मरणाची थंडी असलेला प्रदेश, सहा सहा महिने रात्रीचे काम, सतत अडचणीशी सामना, निसर्गाशी युद्ध, जिवंत परत येण्याची कमी शक्यता परंतु यशस्वी झालात तर जागतिक सन्मान नक्कीच .”
    HAZARDOUS JOURNEY : ANTARCTICA

  • यशस्वी उद्योजक होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे गुण

    यशस्वी उद्योजक होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे गुण

    १) डोमेन एक्सपर्ट :

    उद्योजक हा आपल्या क्षेत्रातील डोमेन एक्सपर्ट असला पाहिजे. तो ज्या क्षेत्रात व्यवसाय करतो त्या क्षेत्राची माहिती त्याला हवी. त्या क्षेत्रातील ज्ञानी म्हणून त्याची मार्केटमध्ये ओळख हवी. तेव्हाच तो आपल्या क्षेत्रातला एक आघाडीचा व्यावसायिक मानला जाईल.

    २) अस्वस्थ :

    यशस्वी व्यावसायिक हा कधीही एका ठिकाणी स्वस्थ बसत नाही, काही ना काही व्यावसायिक कुरापती चालू असतातच. स्वस्थ बसेल तो उद्योजक कसला? यशस्वी उद्योजक वर्षाचे ३६५ दिवस, २४ तास सतत व्यस्त व अस्वस्थ असतो. तो सतत असमाधानी असतो, त्याला अजून पुढे जायचे असते.

    ३) रीचेबल :

    हा आपले लोक व व्यवसायासंबधी जे कोणी आहेत, त्यांच्यासाठी नेहमी रीचेबल असतो, फोनद्वारे, इमेलद्वारे, व्हॉटसअपने व प्रत्यक्ष भेटण्यासाठी. हा कोणत्याही व्यवसायिकांचा अत्यंत महत्वाचा गुण आहे, व्यावसायिक अधिक मोठा असल्यास त्याचे पी. ए. व पी. आर. ओ. असतात.

    07343ea4 7cf1 478c 8837 876bb9a2b7e4

    ४) प्रवासी :

    यशस्वी व्यावसायिक हा प्रवासी असतो. तो जेव्हा संधी मिळेल, तेव्हा देश विदेशात प्रवास करत असतो. प्रवासामुळे आपणास अनेक संधी, कल्पना सुचतात. त्याचा आपल्या व्यवसाय वाढीसाठी खूप उपयोग होतो, तेव्हा प्रवासाची आवड असावी.

    ५) शिस्तशीर :

    तो खूप शिस्तशीर असतो. त्याच्या जीवनात व व्यवसायात अस्ताव्यस्तपणा नसतो. सर्व काही जिथल्या तिथे असते, मग ते ऑफिस असो, घर असो, गाडी असो किंवा इतर कोणतीही गोष्टी. व्यवस्थितपणा हा खूप महत्वाचा गुण आहे.

    ६) व्यवहार कौशल्यता :

    कोणत्या गोष्टीला किती पैसे द्यायचे? कोणामागे किती वेळ घालवायचा? पैसे कोठे वाचवायचे व कोठे खर्च करायचे? इत्यादी व्यवहारात चाणाक्षपणा असायला हवा.

    ७) निर्लज्जपणा व बिनधास्त :

    व्यावसायिक आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी, तो लोकांना सांगण्यासाठी अत्यंत निर्लज्ज व बिनधास्त असावा. माझा एक व्यावसायिक मित्र त्याच्या नवीन उत्पादनाबद्दल स्मशानात माहिती देत होता. तेव्हा प्रसंग कोणताही असो, आपल्या व्यवसायाबद्दल निर्लज्जपणे काम करा.

    bd7f5bb8 66a9 46f7 a971 6d254695ffbd

    ८) अर्थिक साक्षरता :

    पैसा, गुंतवणूक, अर्थसहाय्य, कर्ज, सबसिडी, कर, शेअर्स, खेळते भांडवल, अकाउंटिंग, फायनान्स इत्यादी सर्वांबद्दल चांगली माहिती ही उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे.

    ९) अत्यंत आवड :

    व्यवसाय व उद्योग हा नोकरीसारखा नसतो. ती थोडावेळ लागली म्हणून करण्याची गोष्ट नव्हे, ती एक स्वत:हून स्वीकारलेली जीवनपद्धती असते. तुम्हाला उद्योगाच्या जीवनपद्धतीची अत्यंत आवड असावी.

    १०) गंभीर :

    यशस्वी व्यावसायिक आपले काम, उत्पादन, उद्योग इत्यादी सर्व गोष्टीबद्दल अत्यंत गंभीर असतो, त्याला थोडादेखील हलगर्जीपणा चालत नाही.

    ११) प्लॅनिंग :

    तो अत्यंत चांगला प्लॅनर असतो, तो स्वतःच स्वतःच्या जीवनाचा आर्किटेक्ट असतो. प्लॅनिंग हे शास्त्र आहे, ते शिकून घेऊन आपण तसे गुण डेव्हलप केले पाहिजेत.

    १२) विपणन तज्ञ :

    त्याला मार्केटिंग व जाहिरात क्षेत्रातील चांगले ज्ञान असते. मार्केटिंग व जाहिरात हा त्याचा अंगभूत गुण झालेला असतो. मार्केटिंग हा कोणत्याही व्यावसायिकासाठी अत्यंत महत्वाचा गुण आहे.

    १३) सकारात्मक :

    त्याचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक असतो. नाही हा शब्द त्याच्या शब्दकोशात नसतोच. जसे ‘दुनिया उम्मीद से चलती है’, तसे उद्योग उद्योजकाच्या सकारात्मक गुणावर चालतो.

    १४) तंत्रज्ञानी :

    आजच्या युगात टेक्नॉलॉजीची माहिती असणे अनिवार्य झाले आहे, आपल्या व्यवसायासाठी व प्रगतीसाठी लागणाऱ्या टेक्नॉलॉजीची त्याला चांगली माहिती असते.

    १५) विश्वासार्हता :

    त्याची खूप मोठी विश्वासार्हता मार्केटमध्ये असते. त्याच्या शब्दाला खूप मोठा मान व भरोसा असतो. केवळ शब्दावर कोट्यावधीचा माल उधार मिळतो. तेव्हा स्वत:च्या शब्दाला मोठी किंमत निर्माण केली पाहिजे.

    2d44ce49 4334 465c 9fa2 b1c71f5fc1dd

    १६) सहभागी :

    हा समाजातील, व्यवसायातील बऱ्याच संघटना, मित्र, कुटुंबे यांच्याशी संबंधित व सहभागी असतो. तो एकटा राहत नाही. तो जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कार्यक्रमांत आवर्जून सहभागी होतो.

    १७) ग्राहक जाणकार :

    हा व्यवसायाचा की-पॉईंट आहे. जो आपल्या ग्राहकांना, श्रोत्यांना चांगला जाणतो. त्यांना केव्हा काय हवं आहे, ते तो जाणतो व अत्यंत यशस्वी होतो. हा गुण अनुभवाने व अभ्यासाने डेव्हलप होतो.

    १८) स्वतःमध्ये गुंतवणूक :

    व्यायाम, अभ्यास, ट्रेंनिग, तंत्रज्ञान इत्यादी शिकण्यामुळे स्वतःचा वेळ व पैसा कारणी लागतो व स्वत:चे व्यक्तिमत्व सतत प्रगल्भ बनवत राहतो.

    १९) हॉलीडे मॅन :

    स्वत:चे जीवन व कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी वर्षातून काही दिवस सुट्टी घेवून फिरायला जातो. कामाचा ताण कमी करून तो मन फ्रेश करून परत येतो. तेव्हा थोडा थोडा हॉलीडे ब्रेक हा गरजेचा गुण आहे.

    २०) डेलीगेशन :

    काम सोपवण्याचे कौशल्य त्याच्याकडे असते, कोणाला कोणते काम सांगायचे व कसे करून घ्यायचे हे त्याला माहीत असते. यालाच ‘आर्ट ऑफ डेलीगेशन’ म्हणतात.

    २१) सातत्य :

    कोणतेही काम, उत्पादन, व्यवसाय यात कमालीचे सातत्य असते. एखादे काम उत्साहाने कित्येक वर्षे, दशके तो चालवतो, वाढवतो. तेव्हा सातत्य हा मोठा गुण यशस्वी उद्योजकांत दिसून येतो.

    २२) दूरदृष्टी :

    त्याला पुढील ५, १०, २० वर्षांनंतरच्या गोष्टीचा सेन्स असतो. आज काय करावे, म्हणजे पुढील काही वर्षात आपल्याला फायदा होईल, याचा सेन्स त्याला असतो व तसे तो निर्णय आजच घेतो. यालाच दूरदृष्टी म्हणतात.

    d0e0a5e6 bcd8 4759 b923 38c56d639b34

    २३) मोटीव्हेटर :

    तो खूप चांगला मोटीव्हेटर असतो. तो लोकांना, कर्मचाऱ्यांना, मित्रांना सतत प्रेरणा देत असतो. त्याला बघितल्यावर आजूबाजूच्या लोकांना उत्साह येतो. त्याच्या डोळ्यात एकप्रकारचे तेज असते.

    २४) स्वप्नाळू :

    तो सतत स्वप्नं पाहतो. स्वप्नं पाहणे व ती सत्यात उतरवणे हा जणू काही त्याचा छंद असतो. आज सायकलवरून फिरणारा उद्योजक कारची स्वप्नं बघतो व पुढील २-३ वर्षात तो कारने फिरतो. तेव्हा स्वप्नं पहा.

    २५) खवय्या :

    हा खूप चांगला खवय्या असतो. चांगले चांगले पदार्थ शोधणे, ते खाणे याचा तो शौकीन असतो. त्याला नेहमी आवडीचे व चटकदार खाण्याची सवय असते.

    २६) रिस्क टेकर :

    रिस्क घेण्याची तयारी नेहमी असावी लागते. खूप विचार करणारा, घाबरणारा व्यक्ती कधीही उद्योजक होऊ शकत नाही. तेव्हा रिस्क टेकिंग हा खूप महत्वाचा गुण असावा लागतो.

    ddb5c97f 8a84 4492 95f6 9c0b3b029230

    २७) दुर्दम्य आत्मविश्वास :

    आपल्या कामावर, उत्पादनावर, व्यवसायात व स्वतःवर अत्यंत दुर्दम्य आत्मविश्वास असतो. कोणत्याही परिस्थितीत आपली योजना व उद्योग यशस्वी होणारच असा त्यांचा कमालीचा विश्वास असतो.

    २८) स्वीकारणारा :

    नवीन येणाऱ्या गरजेच्या गोष्टी तो परत शिकतो व स्वीकारतो. त्यासाठी स्वत:च्या विचारसरणीत पटकन बदल करतो. तो जगाबरोबर ताबडतोब स्वतःला बदलतो व अपडेट राहतो.

    २८) संवादक :

    याचे कम्युनिकेशन स्किल खूप चांगले असते. आपले म्हणणे दुसऱ्याला कसे पटवून सांगायचे, आपले काम कसे काढून घ्यायचे हे यांना चांगले माहित असते. तेव्हा चांगला संवादक असणे हा महत्वाचा गुण आवश्यक आहे. मग संवाद फोनद्वारे असो, इमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष.

    ३०) सेल्फ आणि फास्ट स्टार्टर :

    एखादी गोष्ट करायची ठरवल्यानंतर ती स्वतः व पटकन सुरुवात करतो. तो विचार करण्यात, ठरविण्यात फारसा वेळ घालवत नाही. फटाफट सुरुवात करणे हा त्याचा गुण आहे, त्याला फास्ट मुव्हर म्हणतात. बाकीचे लोक काय करायचे व कसे करायचे याचा विचार करतात, तेवढ्या वेळेत उद्योजक काम सुरू करून बराच पुढे निघून गेलेला असतो.

    आणखी वाचा

  • छोट्याश्या खेड्यात राहणारा शेतकऱ्याचा मुलगा ते लॅम्बोर्गिनी कंपनीचा मालक

    छोट्याश्या खेड्यात राहणारा शेतकऱ्याचा मुलगा ते लॅम्बोर्गिनी कंपनीचा मालक

    साल १९१६. इटली तेव्हा अनेक समस्यांमधून जात होती. आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक असे हरतऱ्हेचे बदल हा देश उघड्या डोळ्यांनी पाहत होता. काही लोक रोजच्या जेवणासाठी तडफडत होते तर काही जीवनासाठी. या दरीमध्ये आणखी एक वर्ग होता ज्याला ना या बदलांमुळं फरक पडायचा ना कोणाच्या मरणामुळं. रोज उठायचं, शेतात जाऊन कष्ट करायचे आणि आपलं पोट भरायचं असंच आयुष्य तो वर्षानुवर्ष जगत होता. अशी अनेक कुटुंब होती आणि यातल्याच एका कुटुंबात जन्म झाला फेरुशिओचा.

    लहानपणापासून हा मुलगा आपल्या वडिलांना शेतामध्ये मदत करायचा. ‘जसं आपल्या बापानी आपल्याला शेतीचा वारसदार बनवलं, तसंच आपण पण याच्या नावावर अख्खी जमीन करायची असं त्याच्या वडिलांनी ठरवलं.’ पण शेती इकायची नसते राखायची असते हे काही छोट्या फेरुशिओला माहिती नव्हतं. त्याला नाद होता tractor चा. खराब झालेल्या tractor चे part दुरुस्त करण्यात हा पठ्ठ्या तासन् तास घालवायचा. शेवटी त्याच्या वडिलांना ज्याची भीती वाटत होती तेच झालं. फेरुशिओ मोठा झाला आणि त्याने शेती न करण्याचा निर्णय घेतला. या छोट्या गावात आता जास्त वेळ न अडकता आपण आपल्या आवडत्या क्षेत्रात काहीतरी शिक्षण घेतलं पाहिजे असं त्याला वाटलं आणि Bologna (बोलोन्या) च्या Technical college मध्ये तो दाखल झाला. Graduation झाल्यावर त्याला लगेच जॉब मिळाला, पण इटलीत चाललेल्या सततच्या युद्धामुळे तो काही फार काळ टिकू शकला नाही. त्यातच फेरुशिओला Royal Italian Air Force मध्ये जबरदस्तीने दाखल करण्यात आलं, पण पोराला गाड्यांबाबत बरंचसं ज्ञान आहे हे कळल्यानंतर त्याला तिथं जास्त वेळ न ठेवता Greek च्या Rhode Island ला पाठवण्यात आलं; कशासाठी, तर Army चे जे काही tractors, trucks होते त्यांच्या maintenance करायला. युद्ध संपल्यावर सैन्याच्या सगळ्या तुकड्या तिथून गेल्या, पण फेरुशिओ मात्र गेला नाही. त्यानं तिथली Citenzship घेतली आणि तिथंच छोटसं mechanical workshop उघडलं. दोन वर्षांनी म्हणजे १९४५ साली मित्र राष्ट्रांनी पुन्हा या Island वर कब्जा केला. अन दिसेल त्याला तुरुंगात टाकायला सुरुवात केली. यात फेरुशिओचा सुद्धा नंबर लागला. पण यावेळीसुद्धा त्याला तारलं ते त्याच्या mechanical skills नी. वर्षभर त्यानं तिथल्या गाड्या repair केल्या. 1946 मध्ये त्याला तुरुंगातून सोडून त्याच्या मायदेशी म्हणजेच इटलीला पाठवलं गेलं.

    main qimg 87e5b8c35dbc26480b6ed29d1e91b87d lq

    जॉब गेला होता आता पुढं काय करावं हा प्रश्न त्याच्यासमोर होता. मध्येमध्ये तो काही गाड्यांची कामं वगैरे करायचा पण fix असं काही ठरत नव्हतं. याच काळात त्यानं एक गोष्ट observe केली ती म्हणजे इटलीची एकूण आर्थिक परिस्थिती इतकी ढासळली होती की त्यामुळं शेतकऱ्यांना tractor घेण्यासाठीसुद्धा पैसे नव्हते. आपण या शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं त्याला वाटलं. दुसरीकडंक petrol, diesel च्या किंमती वाढत होत्या. त्यामुळे महागाई वाढली. देशाचा आर्थिक कारभार काही प्रमाणात का होईना सुरळीत होईल या आशेने इटालियन सरकारने एक निर्णय घेतला; Military ची काही वाहने विकण्याचा. झालं फेरुशिओला सोन्यासारखी संधी चालत आली होती. यातली बरीचशी वाहनं त्यानं विकत घेतली. या वाहनांपासून tractor बनवण्याचा त्याच्या डोक्यात होतं. यासाठी त्याने “British Morris Engine” विकत घेतलं. या इंजिनला modify करून त्यांना आपल्या tractor मध्ये use करायचं ठरवलं.

    Engine ready होतं, design वर काम चालू होतं. दिवस जात होते तसा तसा फेरुशिओ आपल्या स्वप्नाकडं एक एक पाऊल टाकत होता. ३ फेब्रुवारी १९४८ शेवटी तो दिवस उजाडला, Lamborghini चा पहिला tractor साकार झाला होता. खिशाला परवडणाऱ्या किमतीमुळे म्हणा किंवा त्यासाठी लागणाऱ्या छोट्या जागेसाठी म्हणा हा tractor लोकांना चांगलाच आवडला. पहिल्या slot मधले सगळे tractors sold out झाले. फेरुशिओने परत British Morris Engine विकत घेतले, पण यावेळेस quantity होती एक हजार. दिवसेंदिवस फेरुशिओच्या यशाचा आलेख वरवरच जात होता. एवढं सगळं असूनही त्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. Tractor चा sale होतोय, तो लोकांना आवडतोय हे चांगलंचय, पण यातलं engine आपलं नाही याची हुरहुर त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.

    Ferruccio Lamborghini and his Tractors

    त्यानं ठरवलं आता tractor धावणार, तर आपल्याच engine ने. म्हणजे सलमान खान म्हणतो तसं, “एक बार जो मैंने कमिटमेंट करदी, तो फिर में अपने आप की भी नहीं सुनता!” असंच काहीतरी. आणि खरंच ठरवल्याप्रमाणे त्यानं स्वतःचं engine तयार केलं होतं. आता त्याला imported British Morris Engine वापरण्याची गरज नव्हती. दुधात साखर म्हणून कि काय त्याच सुमारास सरकारने सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक घोषणा केलेली की, इथून पुढे प्रत्येक शेतकऱ्याला tractor खरेदीवर loan मिळेल. फक्त तो tractor “Made in Italy” असावा. या काळात Lamborghini चे इतके tractor sale झाले की फेरुशिओ इटलीतला सर्वात श्रीमंत माणूस बनला.

    l018000 1542385606

    इटालियन Cars त्यावेळी जगभरातल्या रस्त्यांवर धावत होत्या. Fiat, Maserati, Ferrari एक से बढकर एक कंपन्या. Celebrities’ पासून मोठमोठ्या businessman पर्यंत सर्वांनाच या cars नी भुरळ घातली होती. फेरुशिओ सुद्धा याला अपवाद नव्हते. वेगवेगळ्या brands च्या cars त्यांच्या collection मध्ये होत्या. यातली सगळ्यात महागडी आणि luxurious car म्हणजे “Ferrari 250 GT”. Ferrari त्यावेळी सगळ्यात नावाजलेली कंपनी होती

    सगळ्यांनी या Ferrari ला अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. Ferrari 250 GT ने तर विक्रीचे सगळे record break केले होते. फेरुशिओंनी सुद्धा ही car घेतली, पण त्यांना तिच्यात विशेष असं काही वाटलं नाही. या कारचा driving experience किमतीच्या मनाने खूपच वाईट आहे असं त्यांना वाटायला लागलं. दुसरा एक problem म्हणजे तिच्या clutch plate सारख्या खराब व्हायच्या.  एकदा mechanic त्या plates बदलत असताना फेरुशिओंचं लक्ष त्या plates कडं गेलं आणि त्यांना धक्काच बसला. या so called luxurious, expensive, high performance कार मध्ये त्याच Clutch plates वापरल्या जात होत्या, ज्या Lamborghini च्या tractor मध्ये वापरल्या जायच्या. फेरुशिओंनी त्या गाडीत दुसऱ्या plates टाकल्या आणि तडक निघाले Ferrari चे मालक Enzo Ferrari यांना भेटायला. Enzo नी Ferrari ला शून्यातून उभं केलं होतं. प्रचंड यशामुळे थोडासा प्रकारचा अहंकार त्यांना झाला होता. आपण जर आपल्या problem विषयी Enzo ना सांगितलं, तर कदाचित ते आपल्या गाड्यांमध्ये सुधारणा करतील असं फेरुशिओना वाटत होतं. पण Enzoचे पाय जमिनीवर नव्हतेच. त्यामुळं उलट ते फेरुशिओंवर संतापले. “Clutch हा माझ्या गाडीचा problem नाहीये. तुलाच Ferrari drive करायला जमत नाही.” एवढंच नाही, ते पुढं म्हणाले, “तू tractor बनवतोय तर तेवढच कर, कार कशी बनवायची हे मला माहितीये, ते मी बरोबर करतो.”

    171016 LAMBO COVER
    lm002 HEADER
    Lamborghini Miura

    “माणूस जेव्हा यशाच्या शिखरावर असतो, तेव्हा अशा काही घटना घडतात की, निरंतर मिळणारं यश एकदम क्षणिक वाटू लागतं”. फेरुशिओंच्या आयुष्यातही असंच काहीसं झालं. Car सोबत tractor चा बिझनेसही एकदम जोरदार चालला होता, पण अचानक tractor ची एक मोठ्ठी order cancel झाली. त्यामुळं कित्येक ready tractors तसेच पडून राहिले. त्यांच्यासमोर पर्यायच नव्हता. नाईलाजाने पूर्ण कंपनीचं आपल्या competitor ला विकून टाकली. जी tractor ची गत झाली, तीच Cars ची झाली. त्यातलेही 51% त्यांना विकावे लागले. पुढं काही वर्षात Oil Crisis, तेलाचा तुटवडा झाला. कार manufacture करणं सुद्धा शक्य नव्हतं. त्यामुळं फेरुशिओंनी उरलेले 49% सुद्धा विकून टाकले. आता फेरुशिओंकडे काहीच नव्हतं. Automobile Industry तून पूर्णपणे बाहेर पडल्यावर त्यांनी एक wine making चा business सुद्धा केला.

    Screenshot 2023 12 17 171344

    झाली संपली गोष्ट! काय झालं गोष्ट चांगली नाही वाटली? पुढं Lamborghini चं काय झालं हे जाणून घ्यायचंय? Hmm ठीके… पाहूया पुढं काय झालं ते! १९७० मध्ये “SAME” या group ने Lamborghini Tractor कंपनी विकत घेतली. दहा वर्षांनी १९८० साली Lamborghini Automobiles म्हणजेच Car कंपनी मीम्रन बंधूंनी विकत घेतली. पण त्यांनासुद्धा कंपनीला तारता आलं नाही आणि पुढच्या सात वर्षात ही कंपनी “Chrysler” कडे गेली. तो काळच असा होता की car विक्रीचं प्रमाण खूप कमी झालं होतं. शेवटी Chrysler लाही loss झाला आणि त्यामुळं त्यांनी ही कंपनी विकली “Volkswagen” ला. Volkswagen कडे आधीच Audi, Bentley, Skoda अशा कंपन्या होत्या आणि आता त्यात भर पडली Lamborghini ची. Design मध्ये असणारे changes, performance मध्ये असणारे changes Volkswagen ने व्यवस्थितरित्या हेरले. आणि त्याचमुळे Lamborghini जगभरातले रस्ते काबीज करण्यासाठी सज्ज झाली. पुन्हा एकदा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

  • तुम्ही धंदा कोणता करता याला महत्त्व नाही, तो कसा करता याला महत्त्व आहे!

    तुम्ही धंदा कोणता करता याला महत्त्व नाही, तो कसा करता याला महत्त्व आहे!

    3ae475db c4e4 4d82 8a9b fbd21c3617c2

    बाकीचे लोक रडतखडत किंवा अगदी नुकसानीत देखील व्यवसाय करीत असतात. धंदा तोच असतो, प्रॉडक्‍ट तेच असते, मार्केट तेच असते, तितकाच वेळ सर्वांकडे असतो. काही वेळेला तर भांडवल देखील कमी असते, तरी पण मोजके लोक चांगला धंदा करतात व बाकीचे रडतखडत किंवा कसा तरी धंदा चालवत असतात. मग दोघांमध्ये फरक काय आहे ? फरक आहे तो ऍटिट्यूडचा म्हणजे वृत्तीचा. एकाचे धंद्यावर प्रेम असते, तर दुसरा करावा लागतो म्हणून किंवा आता दुसरे काय करू म्हणून धंदा करीत असतो.

    याच वृत्तीवर – “ऍटिट्यूड‘वर एक तत्त्व लागू होते. त्याला “पॅरेटोज लॉ‘ म्हणतात किंवा “80/20‘ म्हणतात. एकाच मार्केटमध्ये 20 टक्के उद्योजक मिळून 80 टक्के धंदा करतात. उदा. शंभरातील वीस व्यापारी. एकूण धंदा समजा शंभर कोटींचा असेल, तर ऐंशी कोटींचा धंदा ते करतात. उरलेले ऐंशी, वीस कोटींच्या धंद्यात मारामारी करतात, हे तत्त्व सगळीकडे लागू होते, कारखानदारीत, व्यापारात, पेठेत, रोडवर, डॉक्‍टर, वकील व इतर व्यवसायात. त्याचे प्रमाण कमी-अधिक असू शकते. अगदी नोकऱ्या मिळण्यामध्ये देखील म्हणजे काहींना अजीर्ण होईल इतके मिळते व काहींना उपाशी राहावे लागते. असे का होते, तर त्याला वृत्तीच कारणीभूत असते.

    81943686 1110 4a52 85f2 5387df832cdc

    तुमचे जर तुमच्या व्यवसायावर प्रेम असेल, तर निश्‍चितच तुम्ही चांगला धंदा करू शकता. प्रेम कशाला म्हणतात, तर ज्याला कधी एकदा सकाळ होते व मी माझ्या उद्योगात जाऊन रमतो असे वाटते. जो कधीही आपल्या धंद्याबद्दल रडत बसत नाही, आपला धंदा वाईट आहे असे म्हणत नाही. धंद्यावर प्रेम असले की त्याला उत्साह असतो, जोश असतो, नवे विचार मनात येतात. अडचणी जरूर येतात; पण त्याला न घाबरता तो तोंड देतो, खचून तर निश्‍चितच जात नाही. उलट जोमाने कामाला लागतो.

    ज्यांचे धंद्यावर प्रेम असते, ती संस्था-कंपनी अगदी नोकरापासून मालकापर्यंत उत्तम काम करते व अर्थातच भरपूर नफा कमविते. एकदा का आपल्याला आपला धंदा मनापासून आवडतो म्हटले, की आपोआपच त्याला लागणाऱ्या योग्य गोष्टी घडतात. तुमचा स्टाफ, कामगार, ग्राहक, बॅंका, शेअरहोल्डर, आजूबाजूचा समाज सर्व जण खूष राहतात. कित्येक वेळेला, धंद्यामध्ये मागून आलेले लोक पुढे जातात, मोठे होतात. कारण अगोदरपासून त्या व्यवसायात असलेले लोक गाफील राहतात. धंदा ज्याप्रमाणे करायला पाहिजे, त्याप्रमाणे ते करीत नाहीत, योग्य बदल करीत नाहीत. निश्‍चितच कोठे तरी धंद्यावरचे प्रेम कमी झालेले असते. अलीकडे तर हे फार पाहायला मिळते.

    aae958d1 7a6e 461a ac20 9de7a242beac

    प्रत्येकाला दुसऱ्याचा धंदा चांगला वाटतो. तिथूनच गडबड सुरू होते. अनेक वेळेला मालकाचे वय झालेले असते, उत्साह कमी झालेला असतो, नवीन पिढी व्यवसायात येणार नसते; मग प्रेम कमी व्हायला लागते. धंदा तोच, पण आवड कमी झाल्यावर निश्‍चितच धंदा कमी व्हायला सुरू होतो. त्यामुळे जो उत्साही आहे, ज्याला आपला धंदा आवडतो, त्यालाच संधी दिसते. त्याच्या मनाची दारे कायम उघडी असतात व तेथेच लक्ष्मी येते.

    आज हवाच खराब आहे‘, “खूप कॉम्पिटीशन वाढली आहे‘, “पूर्वीसारखे मार्जिन राहिलेले नाही‘, “धंद्यात दम नाही‘, “सरकारची पॉलिसी बरोबर नाही‘, “जागतिक मंदी आहे‘, “पाऊसच पडलेला नाही‘.. अशी कारणे बऱ्याचदा ऐकू येतात. ते अगदी खरेही असेल; पण नुसती चर्चा करून काय होते, बोलून काय होते? अशी वाक्‍ये रोज पावलो-पावली ऐकायला मिळतात. एकतर आपल्याला आपला व्यवसाय चिकाटीने करायचा असेल, तर अशी वाक्‍ये बोलूच नाहीत व तसे बोलणाऱ्यांपासून चार हात लांब राहावे. कारण त्यांना फक्त रडायला खांदा हवा असतो.

    – अनामिक

  • जिद्दीला सलाम! 50 लाखांचे लोन घेऊन शून्यातून हजारो कोटींचे साम्राज्य उभे करणारा बहाद्दर, रंजक स्टोरी वाचाच

    जिद्दीला सलाम! 50 लाखांचे लोन घेऊन शून्यातून हजारो कोटींचे साम्राज्य उभे करणारा बहाद्दर, रंजक स्टोरी वाचाच

    शून्यातून भलंमोठं साम्राज्य निर्माण करण्याची धमक आपल्याकडे असायला पाहिजे. अशीच धमक टीएस कल्याणरमन यांच्यात होती. त्यामुळेच त्यांची आज फक्त भारतातच नाही, तर जगात ख्याती पसरली आहे. एक काळ होता, जेव्हा त्यांनी कर्ज काढून स्वतःचं ज्वेलरी शॉप सुरू केले होते. मात्र, आज तोच एक प्रचंड मोठा ब्रँड बनला आहे. आज त्यांचे ज्वेलरी दुकानं एका शहरापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण देशात पाहायला मिळत आहेत.

    आम्ही ज्या ज्वेलर्सबद्दल बोलत आहोत, ते इतर कोणी नसून कल्याण ज्वेलर्स (Kalyan Jewellers) आहे. कल्याण ज्वेलर्स हे नाव, गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्वांनीच ऐकले असेल. कल्याण ज्वेलर्सचे संस्थापक टीएस कल्याणरमण (TS Kalyanraman) यांची एवढं मोठं साम्राज्य उभं करण्याची कहाणी वेगळी आणि प्रेरणा देणारी आहे. कल्याणरमण यांनी शून्यातून सुरुवात करून यशाचे शिखर गाठले आहे. चला तर, त्यांच्या रंजक प्रवासाविषयी जाणून घेऊयात.

    व्यापारी कुटुंबात जन्म

    अब्जपती लोकांच्या पंक्तीत विराजमान झालेल्या टीएस कल्याणरमण यांचा जन्म भारत देश स्वतंत्र होण्याच्या चार महिन्यांपूर्वी म्हणजेच २३ एप्रिल १९४७ रोजी केरळच्या त्रिशूर येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांना व्यवसायाचे बाळकडू बालपणीपासूनच मिळाले होते. त्यांचे वडील टीआर सीतारामय्या कपड्याचे व्यापारी होते. तसेच, कल्याणरमण यांचे आजोबा हे पुजारी होते. मात्र, नंतर त्यांनी व्यवसायात उडी घेतली होती. रंजक बाब अशी की, कल्याणरमण हे अवघ्या १२ वर्षांच्या वयातच आपल्या वडिलांसोबत त्यांच्या दुकानात मदतीसाठी जायचे. तिथेच त्यांनी व्यवसायाची बाराखडी शिकली होती. मात्र, शालेय शिक्षणही तितकेच गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी केरळच्या श्री केरळ वर्मा कॉलेजात ऍडमिशन घेतले आणि याच कॉलेजमधून कॉमर्समध्ये पदवी घेतली.

    fortuneindia 2019 06 b523d2e3 7da9 442d bebc 5eb82ea28cb6 KJ 407 Fin copy 1

    कर्ज घेऊन सुरू केला व्यवसाय

    हा व्यवसाय ५ भावांमध्ये विभागला होता. त्यांना ज्वेलरी शॉप्सने भरलेल्या त्रिशूरच्या मार्केटमध्ये कपड्यांचे दुकान मिळाले होते. मात्र, आजूबाजूच्या दुकानांपासून प्रेरित होऊन त्यांनी आपल्या पारंपारिक कौटुंबिक व्यवसायातून काढता पाय घेतला. गाठीशी २५ लाखांची बचत होती; मात्र, ज्वेलरी शॉप सुरू करण्यासाठी एवढे रुपये पुरेसे नव्हते. त्यासाठी त्यांनी बँकेकडून ५० लाख रुपयांचे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्याकडे ७५ लाख रुपये जमा झाले होते. याच रक्कमेतून त्यांनी त्रिशूरमध्ये १९९३साली एक ज्वेलरी शॉप सुरू केले. हीच ती कंपनी, जिला आज संपूर्ण जग कल्याण ज्वेलर्स म्हणून ओळखते.

    The inspiring story of T.S. Kalyanaraman

    एकदम सोपी होती आयडिया

    आपल्या व्यवसायात पारदर्शकता ठेवण्यासाठी त्यांनी शक्कल लढवली. जुन्या पारंपरिक बुकलेट्सचा वापर न करता त्यांनी ग्राहकांसाठी जी ज्वेलरी दुकानात ठेवली होती, त्यासोबत त्यांची मूळ किंमतही लावली. कल्याणरमन यांनी व्यवसायात उतरण्यापूर्वी ज्वेलरीची जी दुकानं पाहिली होती, ती खूपच छोट्याशा जागेत असल्याचे त्यांनी हेरले होते. यामुळे आपले वेगळेपण सिद्ध करायचे तर आपण व्यवसायात उतरताना, आपले दुकानही तितकेच प्रशस्त असायला हवे, हे त्यांनी ठरवले. त्यांनी सुरुवातीला तब्बल ४००० स्क्वेअर फूट जागेवर मोठे दुकान सुरू केले. ज्यामुळे लोकांना ज्वेलरी खरेदी करताना रियल-टाईम अनुभव मिळेल. विशेष म्हणजे, त्यांनी लढवलेली ही शक्कल यशस्वी ठरली.

    पहिल्या वर्षाच्या अखेरपर्यंत कल्याण ज्वेलर्सने ३० लाख रुपयांचा सेल केला होता. त्यांच्या दुकानात लोकांना प्रीमिअम अनुभव घेता येत होता. कारण, त्यांनी एसी, स्वच्छ टॉयलेट्स आणि पार्किंगच्या सुविधाही उपलब्ध केल्या होत्या. यानंतर त्यांनी पल्लकड येथे आणखी एक ४००० स्क्वेअर फूटाचे दुकान सुरू केले. मात्र, यावेळी त्यांना एक गोष्ट शिकायला मिळाली, जी त्यांना यापूर्वी माहितीदेखील नव्हती. खरं तर, त्रिशूर आणि पल्लकडमधील ५६ किमीच्या परिघातही दागिन्यांची वेगळी बाजारपेठ होती. म्हणून, त्यांनी हायपर-लोकल टचवर लक्ष केंद्रित केले आणि पल्लकडमधील आपले ज्वेलरी शॉप यशस्वी करून दाखवले.

    How T.S. Kalyanaraman built a jewelry giant

    दशकभरात सुरू केली ३२ दुकाने

    सन १९९८मध्ये कोयम्बतूर बाँब ब्लास्ट झाला आणि त्यांना आपला व्यवसाय पल्लकडच्या सीमेजवळील शहरात शिफ्ट करावा लागला. कल्याणरमण यांना वाढती मागणी हाताळण्यासाठी राज्यात अनेक दुकाने सुरू करायची होती. २०१२ साल उजाडताच त्यांनी केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा येथे दागिण्यांची ३२ दुकाने सुरू केली. पाहता पाहता कल्याण ज्वेलर्स दक्षिण भारतातील स्टार ब्रँड तयार झाला.

    दक्षिण भारताबाहेर विस्तारला व्यवसाय

    बीआयएस प्रमाणपत्रासह १०० टक्के प्युअर सोने विकणारा पहिला ब्रँड असणाऱ्या कल्याण ज्वेलर्सने दक्षिण भारताबाहेरही आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. यासाठी त्यांनी २०१२मध्ये अहमदाबाद येथे आपले दागिण्यांचे दुकान सुरू केले. यावेळी त्यांनी मोठा डाव खेळला. त्यांनी ‘माझे सोने, माझा हक्क’ (My Gold, My Right) या कँपेनसह महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना आपला ब्रँड अँबेसेडर बनवले.

    How T.S. Kalyanaraman built a jewelry giant

    कँपेनमुळे बनला ५ हजार कोटींचा ब्रँड


    अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या या कँपेनमुळे कल्याण ज्वेलर्स ५ हजार कोटी रुपयांचा ब्रँड बनला. एवढंच नाही, तर तब्बल ९० कोटी मार्केटिंग बजेटसह बॉलीवूड इंडस्ट्री गाजवणाऱ्या अभिनेत्री कॅटरिना कैफ, ऐश्वर्या राय बच्चन आणि इतर सेलिब्रिटींसोबत करार केला. यानंतर कल्याणरमणजींनी पहिल्यांदा देशाबाहेर झेप घेतली. त्यांनी २०१३ मध्ये यूएईमध्ये फक्त एकाच दिवसात आपली ६ दुकाने सुरू केली.

    कल्याण ज्वेलर्सने हायपर लोकल दृष्टिकोन ठेवत आणि वेगवेगळ्या प्रसंगांसाठी वेगवेगळ्या ज्वेलरीही लाँच केल्या आहेत. त्यात मुहुरत या वेडिंग ज्वेलरी आणि अनोखी, झिया, तेजस्वी या डायमंड ज्वेलरींचा समावेश आहे. यामुळे त्यांच्या प्रगतीत वेगाने वाढ होत आहे. 2020पर्यंत कल्याण ज्वेलर्सने आपला व्यवसाय 140 दुकानांपर्यंत नेला आणि तब्बल १० हजार कोटी रुपयांची कंपनी बनण्याचा बहुमानही मिळवला.

    शेअर मार्केटमध्ये प्रवेश

    कल्याण ज्वेलर्स कंपनीचा IPO २६ मार्च, २०२१मध्ये NSE आणि BSE लिस्ट झाला. ही कंपनीची सर्वात मोठी भरारी ठरली. स्टॉक मार्केटला लिस्ट झाल्यानंतर कल्याण ज्वेलर्सने टाटासारख्या बलाढ्य पाठबळ असलेल्या टायटन आणि पीसी ज्वेलर्सलाही टक्कर दिली. सध्या कल्याण ज्वेलर्सच्या शेअरची किंमत 339 रुपयांपेक्षा जास्त आहे.

    कल्याण ज्वेलर्सचे बाजारमूल्य

    आज घडीला टीएस कल्याणरमण हे भारतातील सर्वात श्रीमंत ज्वेलर मानले जातात. कल्याण ज्वेलर्सने मागील वर्षी ४३२ कोटींच्या नफ्यासह १४०७१ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला होता. विशेष म्हणजे, कल्याण ज्वेलर्स हा ब्रँड किती मोठा आहे याचा अंदाज त्यांच्या एकूण दुकानांच्या संख्येवरूनच येतो. सध्या संपूर्ण भारत आणि यूएईत कल्याण ज्वेलर्सचे तब्बल २०० पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत.

    How T.S. Kalyanaraman built a jewelry giant

    या लेखाचा शेवट करताना टीएस कल्याणरमण यांच्याविषयी आणखी एक खास गोष्ट सांगावीशी वाटते. ती अशी की, वयाची सत्तरी (७३) पार करूनही कल्याणरमण आजही दर महिन्याला कोणत्याही १५ ग्राहकांना फोन करतात. तसेच, त्यांच्याकडून आपल्या दागिन्यांविषयी प्रतिक्रिया जाणून घेतात. यावरूनच समजते की, कल्याणरमण हे ग्राहकांशी आणि आपल्या व्यवसायाशी किती प्रामाणिक आहेत.

  • फोटोग्राफी क्षेत्रातला पहिला कॅमेरा बनवणारा अवलिया – जॉर्ज इस्टमन

    फोटोग्राफी क्षेत्रातला पहिला कॅमेरा बनवणारा अवलिया – जॉर्ज इस्टमन

    नवी अर्थक्रांतीच्या बिझनेस महारथी या मलिकतेतील आजच्या लेखात जाणून घेऊया कॅमेऱ्याच्या निर्मात्याबद्दल.

    कॅमेऱ्याला जन्म देणाऱ्या जॉर्ज इस्टमन यांचा जन्म मारिया किलबार्न आणि वॉशिंग्टन इस्टमन यांच्या पोटी 12 जुलै 1854 रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला. गरिबीमुळे पोटाला चिमटा काढून इस्टमनच कुटुंब जगत होते. दोन मोठ्या बहिणींनंतर जॉर्ज सर्वात लहान. आपण आणि आपलं कुटुंब इतकंच काय ते त्याचं जग होतं. तो सहा वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. पहिलीतल्या त्या अल्लड जॉर्जला वडिलांची छत्रछाया लाभलीच नाही. त्याच्या आईनेच त्या तिघा भावंडांना मातापित्याचे प्रेम दिले. वडील वारल्यामुळे घर चालवण्यासाठी त्याची आई काही छोटीमोठी काम करून घरचा खर्च भागवत होती.

    काही वर्षांनी जॉर्जच्या मोठ्या बहिणीचे निधन झाले आणि जॉर्जच्या कुटुंबावर पुन्हा आभाळ कोसळले. जॉर्ज न्यूयार्क मधील एका छोट्याश्या शाळेत शिकत होता, मात्र घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे वयाच्या 16 व्या वर्षी त्याला शाळा सोडावी लागली. त्यानंतर त्याने काही वर्ष फोटोग्राफीचे काम केले. नंतर 1877 मध्ये न्यूयार्कमधील रोचेस्टर शहरात त्याला बँकेत क्लार्क म्हणून नोकरी मिळाली. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याला नोकरी करणं भाग होतं. त्याच्या नोकरीमुळे हळू हळू घरात पैसे येऊ लागले.   

    तीन वर्षांच्या सततच्या प्रयत्नानंतर अखेरीस त्यांना 1880 साली यश आले. कॅमेऱ्यासाठीच्या ग्लास तयार करून त्यांनी प्लेट बनविण्याचं मशीन सुरू केलं आणि पेटंट मिळवलं. त्यांच्या प्लेट्सनी बाजारात धुमाकूळ घातला. इस्टमन यांचे पहिले प्रॉडक्ट अनेकांच्या पसंतीस उतरले. मात्र ते एवढ्यावरच स्वस्थ बसले नाहीत, तर त्यांनी आपल्या संशोधनात आणखी नाविन्यता आणायचे ठरवले. जड काचेच्या प्लेटपेक्षा हलक्या आणि लवचिक कागदी प्लेटचा वापर कसा करता येईल याच्या प्रयत्नांत ते लागले. मात्र पेपर हे जरी सोयीस्कर माध्यम असले तरीही ते योग्य नव्हते. लोकांना आकर्षित करण्यासाठी इस्टमन यांनी स्वतःचा कॅमेरा बनवायचे ठरवले आणि 1888 साली जगात जॉर्ज इस्टमन यांच्या नव्या रोलफिल्म कॅमेऱ्याने पूर्ण विश्वावर राज करायला सुरुवात केली. 

    Words Frist Camera

    कोडॅक रोलफिल्मच्या अभूतपूर्ण यशानंतर 1892 साली इस्टमन फोटोग्राफीचे अगोदरचे नाव बदलून इस्टमन कोडॅक असे झाले. कोडॅकची ख्याती जगभरात झाली. लंडनमध्ये कोडॅकचे मोठमोठे बॅनर लागले. वर्तमानपत्र, मासिके, डिस्प्ले बोर्ड, पत्रके सगळीकडे कोडॅकच दिसू लागले.  या अभूतपूर्व यशानंतर जॉर्ज यांनी मागे वळून पहिलेच नाही. फोटोग्राफीचे कॅमेरे, फिल्म, रसायने करण्यात त्याने स्वतःला झोकून दिलं. अनेक तऱ्हेचे कॅमेरे त्याने लोकांसमोर ‘आणले. सर्वसामान्य लोकांना वापरता येणारा व पुढे अतिशय लोकप्रिय झालेला ब्राऊनी कॅमेरा, फोल्डिंग कोडॅक कॅमेरा, पॉकेट कोडॅक कॅमेरा, होम मूव्ही कॅमेरा, सिने कोडॅक मोशन पिक्चर कॅमेरा, एक्स-रे फिल्म व त्याकरिता लागणारा कॅमेरा, युद्धात वापरता येणारा एरियल फोटोग्राफी करणारा कॅमेरा, खगोलशास्त्रात अंतराळात निरीक्षण करणारा कॅमेरा असे अनेक तऱ्हे तऱ्हेचे कॅमेरे कोडॅक कंपनीने बाजारात आणले, या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने भरपूर पैसा मिळविला व अमेरिकेतल्या श्रीमंत व्यक्तीच्या पंक्तीत इस्टमनचं नाव गेलं.

    इस्टमन हे परोपकारी वृत्तीचे होते 1919 साली त्यांनी आपल्या उत्पन्नातला एक तृतीयांश हिस्सा म्हणजे दहा कोटी डॉलर्स त्यांनी कामगारांना वाटले.

    जो केवळ पैसे मिळविण्यासाठी आयुष्यभर काम करत असतो तो पक्का व्यावसायिक असतो, मात्र इस्टमन यांनी जे काही केलं ते फोटोग्राफीच्या प्रेमाखातर. तुम्ही तुमच्या ध्येयाच्या मागे लागा, ज्ञान मिळविण्याच्या मागे लागा, पैसा आपोआपच तुमच्या मागे येईल हे वाक्य त्यांनी सार्थ करून दाखवलं.

    वयाच्या 77 वर्षी 14 मार्च 1932 साली आपल्या काही खास मित्रांना त्यांनी आपल्या बंगल्यावर बोलावलं. आपल्या संपत्तीचा बहुतांशी हिस्सा रॉचेस्टर युनिव्हर्सिटीला देणगी म्हणून दिला. मृत्युपत्राच्या कागदपत्रांवर सही करून ते वरच्या मजल्यावरील आपल्या खोलीत गेले व पिस्तुलाने आपल्या छातीत गोळी मारून घेतली. एकच वाक्य लिहिलेली चिठ्ठी मागे ठेवली. त्यात त्यांनी लिहिले होते कि, ‘मला जे काही करता येणं शक्य झालं, ते मी केलं. आता मी कशाला थांबू?’

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

    आणखी वाचा

  • Small Business Marketing Strategy: तुमच्या बिझनेसला ‘असे’ करा सुपर बुस्ट

    Small Business Marketing Strategy: तुमच्या बिझनेसला ‘असे’ करा सुपर बुस्ट

    सर्वत्र प्रत्येकजण लक्ष वेधण्यासाठी स्पर्धा करत असल्याचे चित्र आहे. अशात, या गर्दीत आपला पाय भक्कमपणे रोवून उभे राहणे कठीण आहे. मात्र, तुम्ही स्वतः मार्केटिंग करत असाल किंवा तुमच्याकडे मार्केटिंग विभाग असेल, तर काही धोरणे (स्ट्रॅटेजी) तुमच्या ब्रँडच्या जागरूकतेसाठी दृश्यमानता वाढवू शकतात. चला तर, लघु व्यवसाय मार्केटिंग स्ट्रॅटेजी पुढील 7 मुद्द्यांच्या आधारे जाणून घेऊयात…

    १. प्रेक्षकांना कसे लक्ष्य करायचे?

    जेव्हाही छोट्या व्यवसायाचे मार्केटिंग करण्याचा विचार येतो, तेव्हा योग्य प्रेक्षकांना लक्ष्य करणे जास्त गरजेचे असते. तुमच्या आदर्श ग्राहकावर लक्ष केंद्रित करणारी रणनीती विकसित करून, तुम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकता. या गोष्टी करण्यासाठी पुढील टिप्स पाहू शकता.

    Small Business Marketing Strategy
    • तुमचे टार्गेट मार्केट जाणून घ्या
      – तुमचा निश (ठरावीक लक्ष्य गट) स्पष्ट करा
      – तुमच्याशी स्पर्धा करणाऱ्या कंपनीचे संशोधन करा
      – सखोल लोकसंख्याशास्त्रीय (In-Depth demographic) डेटा वापरा
      – तुमच्या प्रेक्षकांचे वर्गीकरण करा
      – तुमचा मार्केटिंग संदेश तयार करा
      – ऑफलाईन मार्केटिंग करण्यास विसरू नका

    २. कोल्ड ई-मेल मार्केटिंगचा फायदा घ्या

    छोट्या व्यवसायाच्या मार्केटिंगमध्ये कोल्ड ई-मेलिंग हे सर्वात प्रभावी धोरणांपैकी एक आहे. संभाव्य ग्राहकासह कनेक्ट करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. संभाव्य ग्राहक जे कदाचित तुमच्या व्यवसायाशी परिचित नसतील. तुमच्या लहान व्यवसायाचे मार्केटिंग करण्यासाठी कोल्ड ई-मेल वापरण्यासाठी काही टिप्स-

    Small Business Marketing Strategy

    संभाव्य ग्राहकांची यादी तयार करा

    – तुम्हाला ज्या कंपन्यांना लक्ष्य करायचे आहे त्यांचे संशोधन करा आणि निर्णय घेणारे कोण आहेत ते शोधा.
    – वैयक्तिकृत ई-मेलचा ड्राफ्ट तयार करा, जो तुमच्या व्यवसायाची ओळख करून देतो आणि तुमच्या उत्पादनांसाठी किंवा सेवांसाठी संपर्क योग्य असेल असे तुम्हाला का वाटते, हे स्पष्ट करते.
    – ई-मेल पाठवा आणि आवश्यक असल्यास फोन कॉलसह पाठपुरावा करा.
    – आपल्या परिणामांचा मागोवा ठेवा आणि आवश्यकतेनुसार आपली रणनीती समायोजित करा.

    ३. तुमच्या व्यवसायाची ऑनलाईन जाहिरात करा

    तुमच्या व्यवसायाची जाहिरात करताना, तुम्ही अनेक वेगवेगळी धोरणे वापरू शकता. मात्र, ही सर्व धोरणे तुमच्या व्यवसायासाठी प्रभावी ठरणार नाहीत. तुमच्या छोट्या व्यवसायासाठी सर्वोत्तम डिजिटल मार्केटिंग धोरण शोधण्यासाठी, तुम्हाला काही संशोधन करावे लागेल आणि काही भिन्न युक्त्या वापरून पाहाव्या लागतील.

    Small Business Marketing Strategy

    सर्वात लोकप्रिय ऑनलाईन मार्केटिंग डावपेचांपैकी एक म्हणजे सोशल मीडिया जाहिरात. यामध्ये तुमच्या व्यवसायाचा प्रचार करण्यासाठी Facebook, Twitter आणि LinkedIn यांसारख्या प्लॅटफॉर्म्सचा वापर करू शकता. तुम्ही विशिष्ट टार्गेट ऑडियन्सला लक्ष्य करणाऱ्या जाहिराती तयार करू शकता किंवा तुम्ही तुमच्या सोशल मीडिया ॲप्सवर तुमच्या व्यवसायाबद्दल पोस्ट करू शकता. अनेकजण हल्ली मोबाईलचा वापर करतात, तेव्हा सोशल मीडिया पोस्ट किंवा गुगल जाहिरातींचा वापर करून तुमच्या ब्रँडचा प्रचार करणे ही चांगली मार्केटिंग आयडिया ठरू शकते.

    ४. ब्रँड जागरूकता निर्माण करण्यासाठी इन्फ्लुएन्सरचा वापर करा

    तुमच्या छोट्या व्यवसायाचे मार्केटिंग करायचे असेल, तर तुम्हाला इन्फ्लुएन्सर्सकडे दुर्लक्ष करणे परवडणार नाही. इन्फ्लुएन्सर्स अशा प्रभावशाली व्यक्ती आहेत, ज्यांचे भरमसाठ फॉलोअर्स आहेत. इन्फ्लुएन्सर्स त्यांच्या चाहत्यांची मते बदलू शकतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झाल्यास, जर एखादा इन्फ्लुएन्सर तुमच्या उत्पादनाचा किंवा सेवेचा प्रचार करत असेल, तर त्याचे चाहतेही तुमच्या उत्पादनाची दखल घेतील.

    Influencer Marketing

    ५. स्थानिक व्यवसायाशी जोडले जा

    तुमच्या छोट्या व्यवसायाचे मार्केटिंग करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे स्थानिक व्यवसायांशी जोडणे. तुम्ही तुमच्या क्षेत्रातील इतर व्यवसायांसह भागीदारी करता, तेव्हा तुम्ही संसाधने शेअर करू शकता आणि एकमेकांना तुमच्या ग्राहक बेसमध्ये प्रोत्साहन देऊ शकता. तुम्ही मार्केटिंग उपक्रम आणि इव्हेंटमध्ये देखील सहयोग (कोलॅबरेट) करू शकता.

    स्थानिक व्यवसायांशी कनेक्ट होण्यासाठी, तुमच्या समुदायातील इतर व्यवसाय मालकांशी नेटवर्किंग करून सुरुवात करा. बिझनेस इव्हेंटला उपस्थित राहा आणि ऑनलाइन मंच तसेच गटांमध्ये सामील व्हा, जे स्थानिक व्यवसाय कोलॅबरेशनवर लक्ष केंद्रित करतात. तुम्ही स्थानिक व्यवसायांपर्यंत थेट पोहोचू शकता आणि कोलॅबरेट करण्याची ऑफर देऊ शकता.

    How to Supercharge Your Small Business Marketing Strategy

    ६. इन्सेन्टिव्ह आणि सवलती ऑफर करा

    इन्सेन्टिव्ह आणि सवलती या तुमच्या उत्पादने किंवा सेवांवरील टक्केवारी किंवा खरेदीसह मोफत आयटमच्या स्वरूपात असू शकते. तुम्ही लॉयल्टी प्रोग्राम देखील देऊ शकता, जे सतत संरक्षणासाठी ग्राहकांना बक्षीसे देतात. तुम्ही ऑफर करण्यासाठी ज्या कोणत्याही सवलती निवडाल, तुमच्या ग्राहकांना ते मौल्यवान वाटेल याची खात्री करा.

    Offer incentives and discounts

    ७. एसईओ (SEO) मध्ये गुंतवणूक करा

    लोकांच्या आवडीची आणखी एक ऑनलाईन मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) होय. यामध्ये तुमची वेबसाइट ऑप्टिमाइझ करणे समाविष्ट आहे, जेणेकरून ती सर्च इंजिन परिणाम पृष्ठांवर वरच्या स्थानी दिसेल. SEO मध्ये गुंतवणूक करून, तुम्ही सर्च रिझल्ट्समध्ये तुमच्या वेबसाइटची रँकिंग सुधारू शकता आणि अधिक लोकांना आकर्षित करू शकता.

    Search Engine Optimization
  • इंग्रजांच्या घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या

    इंग्रजांच्या घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या

    कोण होता कोण हा तरुण? तो कोणी क्रांतिकारक नव्हता, की स्वातंत्र्यसेनानी नव्हता. तो होता सांगलीतील तासगावातला भालचंद्र गरवारे अर्थातच आबासाहेब गरवारे.

    गरवारे म्हटलं की आठवतं ते पुण्यातलं गरवारे कॉलेज आणि गरवारे चौक. यापलीकडे आपल्याला काय माहितीये? मित्रांनो पुण्यातल्या या कॉलेजला गरवारे नाव का दिलं गेलं? ते कॉलेज आबासाहेबांनी उभं केलं का? तर नाही. त्या कॉलेजचे संस्थापक आबासाहेब गरवारे नव्हते, मग का बरं गरवारे नाव दिलं गेलं असेल? जे जाणून घेण्यासाठी आपल्याला शंभर वर्ष मागं जावं लागेल.

    वयाच्या 17 व्या वर्षी  गिरगावमध्ये डेक्कन मोटार एजन्सीची स्थापना करून तो जुन्या गाड्या खरेदी-विक्री करणारा एजंट बनला. सोबतच तो स्पेअर पार्ट, टायरची वगैरे विक्री करू लागला. थोड्याच दिवसात या व्यवसायात त्याचा चांगलाच जम बसला. त्याच्या गोडाऊनमध्ये आता गाड्यांना जागा नव्हती. सर्वसामान्य माणसापासून ते मुंबईतल्या राजे-रजवाड्यांपर्यंत सगळेजण डेक्कन मोटार एजन्सीमधून गाड्या घेऊ लागले. मुंबईत गाडी घ्यायचं म्हटलं की, प्रत्येकाच्या ओठांवर फक्त एकच नाव डेक्कन मोटार एजन्सी. एजन्सीचा नावलौकिक वाढला होता. त्यासोबतच भालचंद्र गरवारे मुंबईचे आबासाहेब म्हणून ओळखले जाऊ लागले. आबासाहेबांना पत, प्रतिष्ठा मिळू लागली. खिशात एक रुपयाही नसताना मुंबईत आलेला भालचंद्र आता आबासाहेब झाला होता. ब्रिटिशदेखील आबासाहेबांकडूनच गाड्या विकत घेऊ लागले. 

    आबासाहेबांनी केवळ गाड्यांचाच व्यवसाय केला नाही, तर त्यांनी प्लॅस्टिक बनविणारे कारखाने देखील विकत घेतले. ज्याकाळात भारतीयांना प्लॅस्टिक म्हणजे काय? हे देखील माहीत नव्हतं, अशा काळात आबासाहेबांनी भारतात प्लॅस्टिक बटणं, नायलॉन यार्न, प्लॅस्टिक इंजेक्‍शन मोल्डिंग, ब्लो मोल्डिंग, नायलॉन ब्रिस्टल्स, फिशिंग नेट अशी प्लॅस्टिकची अनेक उत्पादने घेऊन गरवारे मोटर्स, गरवारे प्लॅस्टिक, गरवारे वॉल रोप्स, गरवारे  नायलॉन्स, गरवारे पेंट्स, गरवारे फिलामेंट कॉर्पोरेशन अशा अनेक कंपन्यांची उभारणी केली. या व्यापारात त्यांनी भरपूर पैसा कमविला. ज्या गोऱ्यांनी भारतीयांचे जिणे हराम करून सोडले होते. त्या गोऱ्यांची नाचक्की करायचं हे आबासाहेबांनी आधीच ठरवलं होतं. लंडनमध्ये असताना बकिंगहॅम पॅलेसमध्ये जाऊन प्रिन्स ऑफ वेल्सची,  इंग्लंडच्या राजपुत्राचीच गाडी विकत घेतली. ती गाडी आणि त्यावर एक गोरा शोफर ठेऊन ते ताठ मानेने लंडनमध्ये फिरू लागले.

    जे ब्रिटिश भारतीयांना गुलाम म्हणून वागवत होते, त्याच ब्रिटीशांना आबासाहेबांनी त्यांच्यात घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून आपल्या पदरी ठेवून एक स्वाभिमानी, यशस्वी, देशप्रेमी मराठी उद्योजक बनण्याचा मान मिळविला होता. आबासाहेबांनी केवळ उद्योगच केला नाही, तर आपल्या कर्तुत्वाने ब्रिटीशांना तोंडात बोटं घालायला लावली. आबासाहेबांनी केवळ व्यापारच नाही केला तर शैक्षणिक, सामाजिक संस्थांना देखील सढळ हाताने मदत केली. भारत स्वतंत्र झाल्यावर 1959 साली त्यांची मुंबईचे शेरीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली. शेरीफ म्हणजे नगरपाल. आबासाहेबांनी पुणे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला चांगलीच आर्थिक मदत केली आणि त्यामुळेच संस्थेने कॉलेज आणि हायस्कूलला 1945 साली आबासाहेब गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल अशी नावे दिली. मुंबई university च्या अंतर्गत त्यांनी सांगलीत मुलींसाठी महाविद्यालय सुरू केले,

    त्यांच्या याच कार्यकर्तुत्वामुळे त्यांना आर्थिक अभ्यास संस्थेतर्फे उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच 1971 मध्ये त्यांना भारत सरकारच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सांगलीतील एका खेड्यातल्या मुलाचा गॅरेजमध्ये काम करण्यापासून ते पद्मभूषण पुरस्कार मिळवण्यापर्यंतच प्रवास खरच विस्मयकारक होता. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं आपण यशवंतराव चव्हाणांच्या अतुलनीय कामाबद्दल अनेकदा म्हणतो, पण मित्रांनो हा भालचंद्र नामक सह्याद्री देखील हिमालयाच्या प्रत्येक अडिअडचणीत धावून गेला होता हे देखील विसरून चालणार नाही. त्यांच्या विचारांची ज्योत आज प्रत्येकाने आपल्या मनात निरंतर तेवत ठेवली पाहिजे.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

    आणखी वाचा

  • युध्दात जमीनदोस्त झालेल्या दुकानाच्या एका कोपऱ्यात कंपनी सुरु करणारे ‘सोनी’चे संस्थापक अकिओ मोरीता

    युध्दात जमीनदोस्त झालेल्या दुकानाच्या एका कोपऱ्यात कंपनी सुरु करणारे ‘सोनी’चे संस्थापक अकिओ मोरीता

    वाचा सोनी या जगप्रसिद्ध कंपनीची प्रेरणादायी कहाणी

    Sony Co-Founder Akio Morita's Birthday

    अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला तेव्हा अकिओ मोरीता फक्त २४ वर्षांचा होता. १९४६ रोजी त्याने मसारू ईबुकासोबत अणुबॉम्ब स्फोटात बेचिराख झालेल्या एका दुकानाच्या कोपऱ्यात एक कंपनी सुरु केली. हीच भविष्यातील ‘सोनी कॉर्पोरेशन’ची सुरुवात होती. २००० साली या कंपनीची उलाढाल ६३०८ कोटी डॉलर्सची होती तर त्यात १८९७०० माणसे काम करत होती. पण या सर्वांहून गाजला तो म्हणजे अकिओ मोरीताचा वॉकमन. गंमत म्हणजे जेव्हा अकिओ मोरीता आणि ईबुका यांनी तरुण पिढीला आवडेल असा वॉकमन बनवायला घेतला तेव्हा मोरीता साठीला तर ईबुका सत्तरीला टेकला होता. जेव्हा वॉकमन ची कल्पना त्यांनी त्यांच्या कंपनीसमोर मांडली तेव्हा कंपनीतील सर्वांनी विरोध केला होता, चक्क वेड्यात काढले होते.

    Sony Co-Founder Akio Morita's Birthday
    Sony Co-Founder Akio Morita's Birthday

    या दोघांतील ईबुका हा तंत्रज्ञानात बाप माणूस होता तर मोरीता ग्रेट सेल्समन होता. IBM च्या सेल्समनबद्दल असं म्हटलं जायचं की हे लोक एस्कीमो लोकांनाही फ्रिज विकून दाखवतील. अकिओ तितकाच सामर्थ्यवान विक्रेता होता. सुरुवातीला त्यांनी सुरु केलेल्या कंपनीचं नाव होतं ‘टोकियो त्सुशीन कोग्यो काबुशिकी काईशा‘ म्हणजे ‘टोकियो टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग कंपनी’. पुढे याचीच ‘सोनी कॉर्पोरेशन’ बनली. जेव्हा कंपनी सुरु केली तेव्हा फक्त एका छोट्याशा खोलीत अनेक लोक काम करत असत. सामान ठेवायलाही जागा नसे. सगळी मंडळी रात्री कंपनीचा मुख्य दरवाजा बंद केल्यावर फायर एक्झिटच्या दरवाजाने ये-जा करत, त्यामुळे त्यांना कित्येक वेळा पोलीस चोर समजून पकडत.

    Akio Morita, Sony Legend, Birthday Celebration

    सुरुवातीला त्यांना कामाच्या मोबदल्यात तांदूळ मिळे, कारण त्यावेळी दुसर्‍या महायुध्दातील पराभवामुळे जपान संपुर्णपणे उध्वस्त झालेल्या अवस्थेत होता. युद्धानंतर तांदूळ खूपच दुर्मिळ आणि महाग झाला होता. पुढे कंपनी वाढल्यावर तिचं वेगळं नाव ठेवायचं ठरवलं, तेव्हा आख्खी डिक्शनरी चाळून त्यांच्या लक्षात आलं की लॅटिनमध्ये सोनस म्हणजे ध्वनी,आणि अमेरिकेत ‘सॉनी’ हा शब्द तरुण हुशार मुलांसाठी वापरला जाई. मग या दोन्हीचा वापर करून ‘सोनी’ या शब्दाचा उगम झाला आणि ‘सोनी कॉर्पोरेशन’चा जन्म झाला. फक्त टोकीयो पुरते त्यांचे अस्तित्व जरी असले तरी त्यांची स्वप्नं फार मोठी होती.त्यांच्या महत्त्वाकांक्षा सात समुद्रापलीकडच्या होत्या. आता सोनीने टेप, रेडिओ अगदी लहान आकाराचे म्हणजे खिशात मावतील असे रेडिओ बनवण्यास सुरुवात केली, पण गंमत म्हणजे त्यांची उपकरणे खिशात बसेनात म्हणून चक्क मोठे खिसे असलेले शर्टही बनवून विकायला सुरु केले होते.

    Akio Morita, Sony Legend, Birthday Celebration

    सोनीचे मालाच्या दर्जावर खूपच बारीक लक्ष असे. पण त्याकाळी जपानी मालाच्या दर्जाची चेष्टा सुरु असल्याने मोरीता त्यांच्या मालावर ‘मेड इन जपान’ असं बारीक अक्षरात लिहित. कारण त्यादरम्यान ‘Made in Japan’ चा अर्थ असा होता की ‘स्वस्त व तकलादू उत्पादने’ परंतु अकियो मोरिता आणि मसुरु इबुकाचे ‘भव्य ध्येय’ होते की ‘जगातील जपानची प्रतिमा बदलणे.’ सोनीला जापनीज उत्पादनं निकृष्ट दर्जाची असतात ही जगातील प्रतिमा बदलुन ‘जापनीज उत्पादने म्हणजे उत्कृष्ट दर्जा’ अशी करायची होती. एकदा अमेरिकेतील बोलावा नावाच्या कंपनीने सोनीकडून १ लाख ट्रांझीस्टर बनवण्याची ऑर्डर दिली. ही ऑर्डर म्हणजे त्याकाळच्या दहा वर्षांच्या ऑर्डरइतकी मोठी होती. त्यांची एकच अट होती की सोनीने त्यावर सोनीचे नाव न टाकता बोलावाचे टाकावे. अकिओला इतका प्रचंड पैसा दिसत असूनही त्या मिटिंगमधून चक्क निघून गेला. पण नंतर ‘सोनी’ ही कंपनी बोलावाच्या ३० पटीने मोठी कंपनी झाली. आज कॅसेट्स, सीडीज, टीव्ही,टेप, डिस्कमन, वॉकमन, फ्लॉपी डिस्क, व्हिडिओ कॅमेरा,हँडीकॅम, सोनी एंटरटेनमेन्ट असा वाढलेला पसारा म्हणजे अकिओ मोरीता आणि ईबुकाचे प्रयत्न होय. त्यांचं भव्य ध्येय त्यांना जागतीक पातळीवर आपली विशेष छाप पाडण्यासाठी कारणीभूत ठरलं. प्रचंड शिस्त, सतत नाविन्यपुर्ण नवनिर्मिती, आणि बिनधास्तपणे जोखिम घेत ‘सोनी’ने प्रगती केली आहे.

    साभार :- अच्युत गोडबोले

  • सुरुवात किराणा मालाच्या दुकानापासून ते जगातील सर्वात मोठ्या मोबाईल कंपनीपर्यंत…

    सुरुवात किराणा मालाच्या दुकानापासून ते जगातील सर्वात मोठ्या मोबाईल कंपनीपर्यंत…

    सुरुवात : १९३८ साली ली बियांग चल नावाच्या माणसाने दक्षिण कोरियामध्ये ‘सॅमसंग’ या नावाने किराणा मालाचे दुकान सुरू केले.

    पहिला बदल : १९४० साली किराणा दुकानांमध्ये सुरु झालेल्या प्रचंड स्पर्धेमूळे त्याने किराणा मालाचे दुकान बंद करून नूडल्स बनवण्याच्या व विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात केली.

    दुसरा बदल : १९५० साली कोरिअन युद्धामुळे व्यवसाय बुडाला. त्यानंतर सॅमसंगने नूडल्सचे उत्पादन बंद करून साखरेचे उत्पादन करायला सुरुवात केली. स्वतःचा साखर कारखाना सुरु केला.                                                                     

    तिसरा बदल : युद्धसमाप्तीनंतर १९५४ साली सॅमसंगने साखरेचे उत्पादन बंद केले व गरम कपडे बनवण्यासाठी लागणारे लोकरीचे कापड बनवणारी कोरियातील सर्वात मोठी कापड गिरणी सुरू केली.

    चौथा बदल : जसजसा कोरिया विकसित होत गेला, वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी १९५६ साली सॅमसंगने कापड गिरणी बंद करून इन्शुरन्स व सिक्युरिटीज विकायच्या व्यवसायाला सुरुवात केली.

    पाचवा बदल : १९६० साली सॅमसंगने इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात प्रवेश केला व ‘ब्लॅक ऍन्ड व्हाईट’ टेलिव्हिजन सेट्स बनवायला सुरुवात केली.

    सहावा बदल : १९८० साली सॅमसंगने टेलिकॉमच्या क्षेत्रात प्रवेश केला व व टेलिफोन स्विच बोर्ड आणि फॅक्स सिस्टिम्स बनवायला सुरुवात केली.

    सातवा बदल : १९८७ साली सॅमसंग कंपनीचा संस्थापक ली याचा मृत्यू झाला. त्यामूळे कंपनीचे विभाजन चार वेगवेगळ्या व स्वतंत्र कंपन्यांमध्ये झाले. डिपार्टमेन्टल स्टोअर्स, केमिकल्स व लॉजिस्टिक्स, पेपर/टेलिकॉम व इलेक्ट्रॉनिक्स असे चार स्वतंत्र विभाग झाले.

    आठवा बदल : त्याच साली सॅमसंगने जागतिक स्तरावर सेमिकंडक्टर प्लॅन्ट्समध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली.

    नववा बदल : १९९० साली सॅमसंगने जागतिक स्तरावरची गुंतवणूक बंद करून रिअल इस्टेटच्या क्षेत्रात प्रवेश केला. मलेशियामधले पेट्रॉनास टॉवर्स तसेच तैवानमधील तैपेई १०१ आणि दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतींचे बांधकाम सॅमसंगने केले.

    दहावा बदल : १९९३ साली मोठी मंदी आली. आशियन बाजारात मोठी मंदी होती. सॅमसंगला पण याचा मोठा फटका बसला. त्यावेळी लीचा मुलगा ली कून ही याने कंपनीचा सीईओ म्हणून सूत्रे हातात घेतली होती. त्याने कंपनीचे डाऊनसायझींग करायला, कंपनीच्या उपकंपन्या म्हणजेच सबसिडिअरीज विकायला व उरलेल्या कंपन्यांचे एकत्रीकरण करायला सुरुवात केली.

    अकरावा बदल : इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरींग व केमिकल विभागांचे एकत्रीकरण केल्यामुळे सॅमसंग ही जगातील मेमरी चिप्सचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी बनली.                                                                                                    

    बारावा बदल : मेमरी चिप्सच्या व्यवसायात खूप स्पर्धा निर्माण झाल्यामुळे १९९५ साली सॅमसंगने ‘लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले’च्या क्षेत्रात प्रवेश केला व केवळ १० वर्षातच ‘फ्लॅट स्क्रीन टेलिव्हिजन’ बनवणारी जगातील सगळ्यात मोठी कंपनी बनली.

    तेरावा बदल : २०१० साली लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेच्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाल्याने सॅमसंग कंपनीने पुढील १० वर्षांच्या वाटचालीचे धोरण ठरवले व स्मार्टफोनच्या क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्याचे ठरवले. त्याचवेळी आयफोनसाठी लागणारे अनेक महत्वाचे सुटे भागसुद्धा सॅमसंग पुरवत होती.

    आज 2024 सालामध्ये सॅमसंग ही मोबाइल फोन व स्मार्टफोन बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. आज सॅमसंगच्या स्मार्टफोनची विक्री आयफोनच्या विक्रीच्या दुपटीहून अधिक आहे.

    एवढे सगळे बदल होऊनही एक गोष्ट मात्र बदलली नाही, ती कोणती? जेव्हा लीने कंपनी सुरु केली होती त्याने कंपनीला नावे दिले होते, ‘सॅमसंग’ कोरियन भाषेत याचा अर्थ होतो ‘तीन तारे’. लीसाठी हे तीन तारे म्हणजे ‘भव्य, असंख्य व शक्तिशाली’ आणि हे तारे अनादी, अनंत असतात. त्याचं ध्येय हेच होतं की कंपनीचा प्रमुख म्हणून तो ज्या कुठल्या क्षेत्रात काम करेल तिथे कंपनीचा स्वतःचा ठसा उमटवायचा.

    याच धोरणामुळे आज सॅमसंगची विक्री २५० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे व दक्षिण कोरियाच्या एकूण निर्यातीमध्ये सॅमसंगचा वाटा एक पंचमांश ईतका आहे.

    तुमच्या व्यवसायात काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नसतील तेव्हा असा वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न तुम्ही किती वेळा केला आहे? तुमचा व्यवसाय बदलण्याचं सर्वात मोठं कारण काय आहे?

    या प्रचंड वेगाने बदलणाऱ्या जगात, सॅमसंगचे उदाहरण घ्या. मोठे उद्दिष्ट ठेवा. त्यासाठी दीर्घकालीन योजना बनवा आणि छोटे छोटे परिणाम साधण्याचा प्रयत्न करा आणि वेळ पडेल तेव्हा व्यवसाय बदलण्याचं धाडस अंगात असू द्या. योग्य वेळी बदल करत रहा, कधी ना कधीतरी तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल.