Tag: naviarthkranti

  • १३ व्यवसायांत अपयश, डोक्यावर ८७ लाखांचे कर्ज, पण जिद्दीने उभारला कोट्यवधींचा व्यवसाय!

    १३ व्यवसायांत अपयश, डोक्यावर ८७ लाखांचे कर्ज, पण जिद्दीने उभारला कोट्यवधींचा व्यवसाय!

    यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम जितके महत्त्वाचे असतात, तितकंच महत्त्वाचं असतं संकटांचा जिद्दीने सामना करणं. कोणत्याही व्यवसायात अपयश हे अपरिहार्य असतं, पण जो अपयशाने खचून जात नाही आणि त्याचा धैर्याने सामना करतो तो एक दिवस नक्कीच यश प्राप्त करतो. व्यवसायाच्या वाटचालीत अनेक अडथळे येतात, अनेकदा सर्व काही नियोजनानुसार होत नाही, पण खचून जाण्याऐवजी उभं राहून संघर्ष करणं हेच यशाचं खरं गमक असतं.

    “डोसा क्रश” या फूड स्टार्टअपचे संस्थापक अंचल कुमार चौरसिया हे या गोष्टीचं उत्तम उदाहरण आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी व्यवसायात एक-दोन नव्हे, तर तब्बल १३ वेळा अपयश अनुभवलं. त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाच्या सुरुवातीला अपेक्षित यश मिळाल नाही. पण त्यांचा आत्मविश्वास डगमगला नाही. अपयशाने खचण्याऐवजी त्यांनी त्यातून शिकण्याचा आणि अधिक जोमाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

    आजच्या लेखात आपण अंचल कुमार चौरसिया यांचा हा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. 

    प्रारंभिक जीवन 

    अंचल कुमार चौरसिया यांचा जन्म ११ मे १९९३ रोजी मध्यप्रदेशमधील जबलपूर येथे झाला. त्यांचं बालपण अत्यंत साध्या आणि संस्कारक्षम वातावरणात गेलं. लहानपणापासूनच ते अभ्यासू आणि कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांच्या कुटुंबात आई-वडील आणि दोन बहिणी होत्या. घरातील सर्वांनी शिक्षणाला महत्त्व दिलं, त्यामुळे अंचल यांनीही शिक्षणात चांगली प्रगती केली.

    त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र, त्यांना सुरुवातीपासूनच नोकरी करण्याची इच्छा नव्हती. स्वतःचा व्यवसाय सुरू करून यश मिळवायचं, हे त्यांचे ध्येय होतं. मोठ्या उद्योगपतींच्या यशोगाथांनी त्यांना नेहमीच प्रेरित केलं. त्यामुळे पदवी शिक्षण पूर्ण होताच त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

    अपयशाची कहाणी

    अंचल कुमार यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी २००९ मध्ये आपला पहिला व्यवसाय सुरू केला. मात्र त्यात अपयश आलं. त्यानंतर मोबाईल शॉप्स, पोल्ट्री फार्म यांसारखे अनेक व्यवसाय उभारले. मात्र, प्रत्येक वेळी काही काळाने व्यवसाय अडचणीत येत होत्या आणि त्यांना तो व्यवसाय बंद करावा लागायचा. सतत अपयश पदरी पडत असतानाही त्यांनी धीर सोडला नाही, पण आर्थिक नुकसान वाढत गेलं. अखेर, १३ व्यवसाय अपयशी ठरल्यानंतर त्यांच्यावर ८७ लाख रुपयांचं कर्ज झालं आणि त्यांची संपूर्ण आर्थिक घडी विस्कटली.

    या संघर्षमय काळात त्यांच्या कुटुंबावर आणखी मोठं संकट कोसळलं. ते म्हणजे त्यांच्या बहिणीच्या लग्नाच्या अवघ्या दोन दिवसांनी त्यांच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. या धक्क्याने अंचल कुमार पूर्णतः खचले, पण त्यांच्या आईने त्यांना आधार दिला. आईच्या विश्वासामुळे त्यांनी पुन्हा प्रयत्न सुरू ठेवले आणि अपयशावर मात करण्याचा निर्धार केला. मात्र, दुर्दैवाने वडिलांच्या निधनानंतर अवघ्या सहा महिन्यांत त्यांच्या आईचंही निधन झालं. एकाच वर्षात दोन्ही पालकांना गमावल्यामुळे त्यांचं मानसिक आणि आर्थिक संतुलन पूर्णतः ढासळलं होतं.

    पुन्हा उभारणी आणि मोठे यश

    आधीच कर्जात बुडालेल्या अंचल यांना आता कोणीही कर्ज देण्यास तयार नव्हतं. त्यांनी इंदोर येथे एक कॅफे सुरू केला. पण तिथेही त्यांना यश मिळालं नाही. याआधी १३ व्यवसाय अपयशी ठरले होते, त्यामुळे त्यांच्याकडे गमावण्यास काहीच उरलं नव्हतं.  त्यांनी पुन्हा एकदा मेहनतीने फंड गोळा करण्यास सुरुवात केली. आर्थिक अडचणी, सामाजिक दबाव आणि स्वतःच्या अपयशांचा सामना करताना त्यांच्यातील जिद्द मात्र कायम राहिली. हळूहळू त्यांच्या प्रयत्नांना यश मिळायला लागलं. 

    शेवटी, २३ जुलै २०१९ रोजी त्यांनी जबलपूर येथे “डोसा क्रश” या ब्रँडचं पहिलं आउटलेट सुरू केलं. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याने त्यांचा हा प्रयत्न अत्यंत यशस्वी ठरला. त्यांच्या स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पदार्थांनी ग्राहकांना आकर्षित केलं आणि अल्पावधीतच त्यांचा ब्रँड लोकप्रिय होऊ लागला. केवळ तीन महिन्यांत त्यांनी दुसरं आउटलेट सुरू केलं, आणि त्यानंतर परिस्थिती सुधारत गेली. वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी ३ लाख रुपये प्रति फ्रँचायझी दराने नवीन शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे, त्यांनी “डोसा क्रश” या ब्रँडला नव्या जोमाने बाजारात विस्तारायला सुरुवात केली आणि त्याच्या यशस्वी प्रवासाची सुरुवात झाली.

    डोसा क्रश: एक लोकप्रिय फास्ट फूड ब्रँड

    “डोसा क्रश” ही एक फास्ट फूड फ्रँचायझी आहे, जी पारंपरिक दक्षिण भारतीय पदार्थांना आधुनिक ट्विस्ट देऊन ग्राहकांसमोर सादर करते. या ब्रँडची खासियत म्हणजे दर्जेदार आणि स्वादिष्ट पदार्थ परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करून देणं. त्यामुळे ग्राहकांना उत्तम चव आणि उत्कृष्ट गुणवत्ता एकाच ठिकाणी मिळते. आज “डोसा क्रश” केवळ दक्षिण भारतीय पदार्थांपुरता मर्यादित न राहता, चायनीज, कॉन्टिनेंटल आणि फास्ट फूडमध्येही विस्तारली आहे. 

    नवीन उत्पादने आणि आव्हाने

    डोसा क्रश नेहमीच नाविन्यपूर्ण पदार्थ ग्राहकांसमोर आणत आहे. त्यांनी जैन अमेरिकन डोसा, चीज डोसा, पिझ्झा उत्तप्पम आणि स्प्रिंग रोल डोसा यांसारखे नवे आणि आकर्षक पदार्थ सादर केले आहेत, जे ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहेत.

    कोविड महामारीच्या काळात “डोसा क्रश” च्या अनेक शाखांना स्थलांतर करावं लागलं. मात्र, आधीच अनेक अपयशांचा सामना केलेल्या अंचल कुमार यांच्यासाठी ही परिस्थिती नवीन नव्हती. त्यांनी पुन्हा नव्याने उभारी घेतली आणि व्यवसाय वाढवला. आज छिंदवाडा, सागर, डिंडोरी यांसारख्या मध्य प्रदेशातील शहरांसह त्यांच्या अनेक  ठिकाणी शाखा सुरू आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे आणि ग्राहकांच्या प्रतिसादामुळे आज “डोसा क्रश” चा वार्षिक व्यवसाय १.५ ते २ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

    मित्रांनो, अंचल कुमार चौरसिया यांचा प्रवास सोपा नव्हता. सततच्या अपयशांमुळे आर्थिक अडचणी वाढल्या, मानसिक ताण वाढला, पण त्यांनी परिस्थितीसमोर हार मानण्यापेक्षा आपल्या चुका सुधारण्यावर भर दिला. प्रत्येक अपयशातून शिकत राहिले, नव्या संकल्पना मांडत राहिले आणि अखेर यश संपादित केले. 

    त्यांचा हा प्रवास प्रत्येक तरुण उद्योजकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवलं की अपयश म्हणजे अंत नसतो, तर तो नव्या संधीचा आरंभ असतो. योग्य दिशा, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर कोणताही स्वप्नवत वाटणारा प्रवास यशस्वी होऊ शकतो. 

    आणखी वाचा:

  • महिलांना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणारी ‘लखपती दीदी’ योजना काय आहे?

    महिलांना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणारी ‘लखपती दीदी’ योजना काय आहे? 

    महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा सगळ्या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय यश मिळवलं आहे. मात्र, आजही अनेक महिला आर्थिक मदतीअभावी आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. काहींना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा असतो, तर काहींना कौशल्य विकसित करून स्वावलंबी व्हायचं असतं. पण यासाठी लागणाऱ्या भांडवलाचा अभाव अनेक महिलांसाठी मोठी अडचण ठरतो.

    याच गोष्टीची दखल घेत केंद्र सरकारने ‘लखपती दीदी’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे त्या आपल्या कौशल्यांचा विकास करून अर्थपूर्ण उपजीविकेच्या संधी निर्माण करू शकतात. 

    एकीकडे राज्यात ‘लाडकी बहीण’ योजनेचं कौतुक होत असताना, महिलांना आर्थिक स्वावलंबन देणारी ‘लखपती दीदी’ योजना सुद्धा त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. पण ही योजना नेमकी काय आहे? तिचा लाभ कोण आणि कसा घेऊ शकतो? योजनेचे स्वरूप काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या लेखात जाणून घेऊया…

    ही योजना नेमकी आहे तरी काय?

    ‘लखपती दीदी’ योजना म्हणजे महिलांसाठी स्वावलंबनाची नवी संधी आहे. ही योजना विशेषतः महिला बचत गटांशी जोडलेल्या महिलांसाठी आहे. सुरुवातीला त्यांना विविध कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जातं, जसं की व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी, व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील संधी कशा ओळखायच्या. यामुळे महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्याचं मार्गदर्शन मिळतं.

    प्रशिक्षणानंतर, या महिलांना १ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज दिलं जातं. याचा उपयोग त्या टेलरिंग, डबे बनवणे, किराणा दुकान, शेतीपूरक उद्योग किंवा इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी करू शकतात. या कर्जावर कोणतंही व्याज नसल्यामुळे महिलांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक ताण न येता  स्वतःचा व्यवसाय उभा करता येतो.

    या योजनेचा उद्देश काय आहे?

    ‘लखपती दीदी’ योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हा आहे. केवळ घराची जबाबदारी न निभावता, महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, उत्पन्न वाढवावं आणि आत्मनिर्भर बनावं, असा या योजनेचा हेतू आहे. महिलांनी समाजात आत्मविश्वासाने उभं राहावं आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावं, हा या योजनेमागील सरकारचा मुख्य उद्देश आहे.

    या योजनेद्वारे सरकारने तीन कोटी महिलांना संधी देण्याचा निर्धार केला आहे. व्यवसायाच्या माध्यमातून या महिलांनी दरवर्षी किमान एक लाख किंवा त्याहून अधिक उत्पन्न मिळवून यशस्वी उद्योजिका बनावं,असा प्रयत्न आहे. यामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होईल आणि त्या आपल्या कुटुंबाच्या तसेच देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतील.

    या योजनेत सहभागी होण्यासाठी काय करावं लागतं?

    जर तुम्ही महिला बचत गटाची सदस्य असाल आणि स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असेल, तर ‘लखपती दीदी’ योजना तुमच्यासाठी आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी सरकारकडून प्रथम कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणात व्यवसाय सुरू करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, बाजारपेठेची समज कशी वाढवावी, आणि यशस्वी व्यवसाय कसा चालवावा याबाबत मार्गदर्शन केलं जातं.

    प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, महिलांना आपला उद्योग सुरू करण्यासाठी एक आराखडा (बिझनेस प्लान) तयार करून सरकारकडे अर्ज करावा लागतो. अर्जाची तपासणी झाल्यानंतर, सर्व अटी पूर्ण करणाऱ्या महिलांना ५ लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज दिलं जातं. यासाठी अर्जदार महिला वय १८ ते ५० वर्षांच्या दरम्यान असावी, तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा कमी असावं, आणि घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. तसेच, अर्जदार महिला बचत गटाशी जोडलेली असणं आवश्यक आहे.

    अर्ज करताना काय कागदपत्रं लागतात?

    • आधार कार्ड
    • पॅन कार्ड
    • बँक पासबुक
    • उत्पन्नाचा दाखला
    • पासपोर्ट साइज फोटो
    • मोबाईल नंबर

    या योजनेत महिलांना कोणतेही व्याज न लागणारं कर्ज मिळतं आणि त्यासोबत मोफत कौशल्य प्रशिक्षणही दिलं जातं. त्यामुळे महिलांसाठी ही एक मोठी संधी आहे. सरकारची थेट मदत मिळत असल्यामुळे उद्योजिका होण्याचं त्यांचं स्वप्न आता सहज पूर्ण होऊ शकतं.

    आणखी वाचा :

  • ATM कार्डशिवाय ATM मधून पैसे कसे काढायचे? जाणून घ्या!

    ATM कार्डशिवाय ATM मधून पैसे कसे काढायचे? जाणून घ्या!

    आजच्या डिजिटल युगात प्रत्येक क्षेत्रात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. बँकिंग प्रणालीही याला अपवाद नाही. बँकेत जाण्याची गरज न पडता, मोबाईलद्वारे अगदी सहज बँकिंग करता येते. इंटरनेटच्या मदतीने आपण बिले भरू शकतो, ऑनलाइन शॉपिंग करू शकतो आणि एका क्लिकवर पैसे ट्रान्सफरही करू शकतो. पण, तुम्ही बाहेर असाल आणि अचानक रोख रकमेची गरज भासली, पण तुमच्याकडे ATM कार्ड नसेल, तर काय कराल?

    काळजी करू नका! आता नवीन तंत्रज्ञानामुळे UPI-आधारित कार्डलेस कॅश विथड्रॉल ही सुविधा काही प्रमुख बँकांच्या ATM मध्ये सुरू करण्यात आली आहे. SBI, HDFC, आणि PNB यांसारख्या प्रमुख बँका ही सेवा पुरवत आहेत. या सुविधेच्या मदतीने तुम्ही BHIM, Google Pay, PhonePe, Amazon Pay, Paytm यांसारख्या UPI ॲप्सचा वापर करून सहज पैसे काढू शकता.

    आजच्या लेखात आपण या सुविधेचा वापर कसा करायचा ते सविस्तर समजून घेऊया!

    UPI द्वारे ATM मधून पैसे कसे काढायचे?

    जर तुमच्याकडे ATM कार्ड नसेल आणि तुम्हाला अर्जंट पैसे काढायचे असतील, तर घाबरू नका! UPI-सक्षम ATM चा वापर करून तुम्ही सहज पैसे काढू शकता. फक्त खालील स्टेप्स फॉलो करा. 

    UPI वापरून ATM मधून पैसे काढण्याची प्रक्रिया

    १. जवळच्या UPI सुविधा असलेल्या ATM मध्ये जा.
    २. ATM स्क्रीनवर “UPI Cash Withdrawal” हा पर्याय निवडा.
    ३. काढायची रक्कम टाका (कमाल ₹ ५००० पर्यंत).
    ४. स्क्रीनवर QR कोड दिसेल.
    ५. तुमच्या मोबाईलमधील UPI ॲप उघडा आणि QR कोड स्कॅन करा.
    ६. UPI पिन टाका आणि “Proceed” वर टॅप करा.
    ७. ATM मधून पैसे मिळतील!

    ही प्रक्रिया पूर्णतः सुरक्षित आहे कारण यामध्ये कार्डशिवाय व्यवहार केला जातो, म्हणजेच कोणतेही ATM कार्ड वापरण्याची गरज नाही. तसेच, OTP शिवाय ट्रान्झॅक्शन होत असल्याने फसवणुकीचा धोका कमी होतो. ही पद्धत वेगवान आणि सोपी असल्यामुळे काही सेकंदांतच तुम्हाला हवी ती रक्कम मिळते. त्यामुळे ATM कार्ड हरवले तरी चिंता नाही, UPI ATM द्वारे पैसे काढणे सोपे, सुरक्षित आणि जलद झाले आहे. 

    UPI म्हणजे काय?

    UPI (Unified Payments Interface) म्हणजे डिजिटल पेमेंट करण्याची एक सोपी आणि वेगवान प्रणाली आहे. याच्या मदतीने तुम्ही एका बँक खात्यातून दुसऱ्या बँकेत क्षणात पैसे ट्रान्सफर करू शकता. खास गोष्ट म्हणजे, UPI वापरून तुम्ही QR कोड, मोबाईल नंबर किंवा UPI ID द्वारे सहज व्यवहार करू शकता.

    UPI मुळे पैसे पाठवणे, ऑनलाइन खरेदी करणे आणि कार्डशिवाय ATM मधून पैसे काढणे अगदी सोपे झाले आहे. तुम्ही कुठूनही आणि केव्हाही पेमेंट करू शकता, त्यामुळे रोख पैशांची गरज कमी होते आणि व्यवहार अधिक सुरक्षित आणि सोपे होतात.

    UPI-आधारित कार्डलेस व्यवहाराचे फायदे

    UPI-आधारित कार्डलेस कॅश विथड्रॉल ही डिजिटल बँकिंगमधील मोठी क्रांती आहे. ही सेवा सुरक्षित, सुलभ आणि वेगवान आहे. कार्ड चोरी किंवा फ्रॉडचा कोणताही धोका नाही, कारण यात कोणतेही ATM कार्ड वापरण्याची आवश्यकता नसते. तसेच, OTP शिवाय ट्रान्झॅक्शन पूर्ण करता येत असल्यामुळे प्रक्रिया अधिक सुरक्षित होते. काही सेकंदांत पैसे काढण्याची सुविधा मिळते आणि २४ तास केव्हाही व्यवहार करता येतो, त्यामुळे रोख पैशांची गरज भासली, तरी कोणतीही अडचण येत नाही.

    ही सुविधा वापरून तुम्ही स्मार्ट आणि सुरक्षित बँकिंगचा अनुभव घेऊ शकता. त्यामुळे पुढच्या वेळी ATM कार्ड विसरले तरी काळजी करू नका, तुमच्या मोबाईलमधील UPI ॲप तुमच्या मदतीला येईल!

    आणखी वाचा:

  • Pulse Candy: कोणतीही जाहिरात न करता ३५० कोटींचा टप्पा गाठलेला यशस्वी ब्रँड!

    Pulse Candy: कोणतीही जाहिरात न करता ३५० कोटींचा टप्पा गाठलेला यशस्वी ब्रँड!

    आजच्या काळात कोणताही नवीन ब्रँड मोठा करण्यासाठी जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च होतात. मोठमोठे सेलिब्रिटी, आकर्षक टीव्ही ऍड्स आणि सोशल मीडियावर महागड्या मार्केटिंग मोहिमांचा वापर केला जातो. मात्र, Pulse कँडीने हे सर्व नियम मोडून एक नवा इतिहास रचला. कोणतीही जाहिरात न करता, केवळ आपल्या अनोख्या चवीच्या जोरावर या ब्रँडने ३५० कोटींचा टप्पा ओलांडला.

    ही कँडी २०१५ मध्ये बाजारात आली आणि काही महिन्यांतच ती सर्वाधिक विक्री होणाऱ्या कँडींपैकी एक बनली. तिच्या यशामागे प्रचंड मेहनत, एक अनोखी रणनीती होती, ज्यामुळे या साध्या वाटणाऱ्या कँडीला FMCG (Fast-moving consumer goods) क्षेत्रात सर्वात मोठा ब्रँड बनवलं. चला तर मग, या लेखात आपण Pulse च्या या अद्भुत यशामागची कारणे जाणून घेऊया!

    बाजारातील संधी ओळखून नवा प्रयोग

    २०१५ मध्ये भारताच्या ₹ ८,००० कोटींच्या कँडी मार्केटमध्ये प्रामुख्याने गोडसर कँडीजचा दबदबा होता. मात्र, भारतीय चविष्ट खाद्यसंस्कृती पाहता, आंबट-तिखट चव असलेल्या कँडीची मागणी असू शकते, हे DS ग्रुपने (Rajnigandha आणि Pass Pass फेम) अचूक ओळखलं. लोकांना लहानपणीची आठवण करून देणारी, कैरीवर मीठ-मिरची लावून खाल्ल्याचा स्वाद देणारी कँडी बाजारात नव्हती. याच संधीचा फायदा घेत त्यांनी Pulse कँडी तयार केली. ही कॅंडी चॉकलेट किंवा गोडसर मिठाईसारखी नव्हती, तर भारतीय चवीशी एकरूप झालेली होती. Pulse लाँच होताच ग्राहकांनी ती उचलून धरली. चटकदार चव आणि योग्य किंमत यामुळे लोक स्वतःच या कँडीची जाहिरात करू लागले.

    शून्य जाहिरात खर्च, तरीही अफाट लोकप्रियता!

    Pulse च्या चटपटीत आणि वेगळ्या चवीनं लोकांना लगेचच आकर्षित केलं. एकाने खाल्ल्यानंतर दुसऱ्यालाही खायला दिली, मित्रांनी एकमेकांना सांगितलं, कुटुंबात आणि नातेवाईकांमध्येही चर्चा सुरू झाली. हळूहळू “वर्ड ऑफ माऊथ” हेच Pulse चं सर्वात प्रभावी मार्केटिंग ठरलं. केवळ चवीच्या जोरावर ही कँडी घराघरात पोहोचली आणि भारतीय कँडी मार्केटमध्ये नवा ट्रेंड निर्माण केला.

    टीव्ही ऍड्स, सोशल मीडिया मार्केटिंग, सेलिब्रिटी प्रमोशन यांसारख्या विविध मार्गांचा वापर करून कंपन्या आपली उत्पादने लोकप्रिय करतात. मात्र, Pulse कँडीसाठी कंपनीने जाहिरातीवर एकही रुपया खर्च केला नाही. ना कोणतीही जाहिरात मोहीम राबवली, ना मोठ्या ब्रँड्सप्रमाणे सेलिब्रिटींच्या मदतीनं प्रमोशन केलं. तरीही ही कँडी तुफान गाजली आणि संपूर्ण भारतभर पोहोचली.

    DS ग्रुपची अनोखी मार्केटिंग युक्ती

    DS ग्रुपला मार्केटिंगचं तंत्र चांगलंच ठाऊक होतं. रजनीगंधा आणि पास पाससारख्या यशस्वी उत्पादनांचा अनुभव त्यांच्याकडे होता. त्यांनी ओळखलं की लोकांना Pulse कँडीची चव आवडतेय आणि तिची मागणी वाढतेय. ही उत्सुकता टिकून राहावी आणि कँडीला अधिक महत्त्व मिळावं, म्हणून त्यांनी सुरुवातीला Pulse मर्यादित प्रमाणातच बाजारात आणली.

    Pulse प्रथम केवळ गुजरात आणि राजस्थानमध्ये लाँच करण्यात आली. लोकांनी ही कँडी शोधायला सुरुवात केली. विक्रेत्यांनी स्टॉक मर्यादित ठेवल्यामुळे ती मिळवण्यासाठी स्पर्धा वाढली. त्यामुळे Pulse ही सामान्य कँडी न राहता, एक एक्सक्लुझिव्ह प्रॉडक्ट वाटू लागली. या रणनीतीमुळे कँडीची लोकप्रियता झपाट्याने वाढली आणि Pulse एक मोठा ब्रँड बनला.

    ८ महिन्यांत १०० कोटींची विक्रमी विक्री

    Pulse हा केवळ महिन्यांत १०० कोटींची विक्री करणारा भारतातील सर्वात वेगाने वाढणारा FMCG ब्रँड ठरला. यामागे काही महत्त्वाची कारणे होती. कँडीची किंमत फक्त रु. असल्यामुळे कोणालाही सहज खरेदी करता येत होती. हिरवट-पिवळ्या आकर्षक पॅकेजिंगमुळे ती लगेचच लक्ष वेधून घेत होती. 

    Pulse ची मागणी इतकी वाढली की दुकानांमध्ये ती मिळवण्यासाठी रांगा लागत होत्या. काही किरकोळ विक्रेत्यांनी तर Pulse मिळवण्यासाठी वेटलिस्ट तयार केली होती, तर काहींनी जास्त किमतीला विकायला सुरुवात केली. लोकांमध्ये निर्माण झालेल्या या क्रेझमुळे Pulse कँडीच्या लोकप्रियतेला अधिकच गती मिळाली आणि ती भारतभर गाजली.

    भारतातून परदेशापर्यंत पोहोचलेली Pulse!

    २०१८ पर्यंत Pulse भारतातील २० लाखांहून अधिक दुकानांमध्ये उपलब्ध झाली. प्रवासी भारतीय ही कँडी परदेशात घेऊन जाऊ लागले आणि हळूहळू ती अमेरिका आणि दुबईतही प्रसिद्ध झाली. या लोकप्रियतेला आणखी चालना देण्यासाठी DS ग्रुपने संत्री, अननस आणि पेरू असे नवीन फ्लेवर्स सादर केले. मात्र, कच्चा आंबा हा मूळ फ्लेवर सर्वाधिक विकला गेला.

    २०१९ मध्ये कंपनीने  बाजारात फॅमिली पॅक्स आणि गिफ्ट पॅक्स आणले, ज्यामुळे विक्रीत मोठी वाढ झाली आणि Pulse ने तब्बल ३५० कोटींचा टप्पा पार केला. इतकंच नाही तर, कँडी मार्केटमध्ये ४८% मार्केट शेअर मिळवत Pulse ने नवा विक्रम प्रस्थापित केला. हे यश केवळ उत्कृष्ट चवीमुळे नव्हतं, तर त्यामागे बाजारपेठेचा सखोल अभ्यास आणि योग्य व्यूहरचना होती. ग्राहकांच्या आवडी समजून DS ग्रुपने नेमकी त्याच चवीची कँडी बाजारात आणली आणि इतिहास घडवला. 

    मित्रांनो, Pulse कँडीचे यश हे उत्तम मार्केटिंग आणि ब्रँडिंगचं उदाहरण आहे. योग्य नियोजन, उत्कृष्ट चव आणि प्रभावी वितरण यांच्या जोरावर जाहिरात न करता देखील एखादं उत्पादन मोठं होऊ शकतं, हे Pulse ने सिद्ध केलं आहे. आजही ती बाजारात तितकीच लोकप्रिय असून, नव्या ब्रँड्सच्या स्पर्धेत टिकून आहे.

  • Referrush Success Story: लकवा झाला… पण आज कमवतो रोज दीड लाख रुपये!

    Referrush Success Story: लकवा झाला… पण आज कमवतो रोज दीड लाख रुपये!

    यशाचा मार्ग कधीच सोपा नसतो. त्यात मेहनत, संघर्ष आणि जिद्द असते. प्रत्येकजण या मार्गावर यशस्वी होतोच असं नाही, पण काही जण अपयशाला न जुमानता पुढे जातात आणि स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात. विक्रम पै हे या गोष्टीचं उत्तम उदाहरण आहे.

    बंगळुरूमधील हा तरुण उद्योजक आज ReferRush या प्रसिद्ध ई-कॉमर्स रेफरल सेल्स प्लॅटफॉर्मचा संस्थापक आणि सीईओ आहे. पण त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. गेल्या सहा वर्षांत त्याने पाच व्यवसाय सुरू केले, पण त्यातला एकही यशस्वी झाला नाही. त्यामुळे त्याला तब्बल दोन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावं लागलं. तरीही त्याने हार मानली नाही. प्रत्येक अपयशातून शिकत, जिद्दीने पुढे जात अखेर ReferRush हा यशस्वी व्यवसाय उभारला. आज तो केवळ एक यशस्वी उद्योजक नाही, तर चिकाटी आणि मेहनतीचं उत्तम उदाहरण आहे. या लेखात आपण त्याच्या संघर्षमय प्रवासावर एक नजर टाकूया.  

    सुरुवातीचा संघर्ष आणि सलग अपयश

    बंगळुरूमध्ये जन्मलेल्या विक्रमने शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोठ्या आत्मविश्वासाने आणि उत्साहाने उद्योजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्याची स्वप्नं मोठी होती, यशस्वी होण्याची जिद्दही होती. मात्र, व्यवसायाच्या वाटचालीत अनेक अडथळे आले. अनुभव आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्याने सुरू केलेले एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच व्यवसाय अपयशी ठरले. सततच्या अपयशामुळे मोठं आर्थिक संकट कोसळलं. त्याला जवळपास दोन कोटी रुपयांचं नुकसान झालं. परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत गेली. मित्रांनी दुरावा निर्माण केला, नातेवाईक टीका करू लागले आणि आईचाही त्याच्यावरचा विश्वास कमी झाला. एका क्षणाला परिस्थिती अशी आली की, खिशात फक्त ४,००० रुपये उरले. कर्मचाऱ्यांना पगार देणेही शक्य नव्हते. काही जणांनी त्याची थट्टा केली. “एलन मस्क बनायचा प्रयत्न करतोय का?” असे टोमणे मारले.

    सततच्या तणावाचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर झाला. मानसिक तणावामुळे शरीर साथ सोडू लागलं. अखेर त्याला लकवा झाला आणि त्याचे चालणे, बोलणेही कठीण झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यासारखी वाटू लागली. तो खचला, रडला, पण हार मानली नाही. डोळ्यांतले स्वप्न जिवंत ठेवत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. या कठीण काळात स्वतःशीच लढण्याचा निर्धार केला आणि नव्या उर्जेने पुन्हा उभं राहण्याचा निश्चय केला.

    ReferRush ची स्थापना आणि पहिलं यश

    अनेक अपयशांनंतरही विक्रमने हार मानली नाही. नव्या उमेदीनं त्याने ReferRush या रेफरल मार्केटिंग प्लॅटफॉर्मची सुरुवात केली. सुरुवातीला हा व्यवसायही अपयशी ठरेल, असं अनेकांना वाटत होतं. पण यावेळी विक्रम मागे हटणार नव्हता. ReferRush व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांच्या माध्यमातून नवीन ग्राहक मिळवण्यासाठी मदत करतं. ग्राहक कंपनीच्या उत्पादनांची माहिती इतरांना सांगतात आणि त्याबदल्यात त्यांना कमिशन मिळतं. त्यामुळे कंपन्यांना विश्वासार्ह ग्राहक मिळतात, तर ग्राहकांनाही घरबसल्या कमाईचा पर्याय उपलब्ध होतो. हळूहळू हा व्यवसाय स्थिरावत गेला आणि ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला.

    सुरुवातीला पहिल्या एक लाख रुपयांसाठी तब्बल चार महिने लागले. पण विक्रमने मेहनत आणि जिद्द कायम ठेवली. त्याच्या प्रयत्नांचा परिणाम दिसू लागला आणि आज ReferRush दररोज १.५ लाख रुपये कमवतो. अपयशाच्या काळात खचून न जाता ज्या चिकाटीने विक्रमने प्रयत्न सुरू ठेवले, त्याच जिद्दीमुळे त्याला यशाचा हा टप्पा गाठता आला.

    निखील कामतकडून ReferRush ला फंडिंग – यशाच्या नव्या पर्वाची सुरुवात

    विक्रमच्या अथक मेहनतीला अखेर मोठं यश मिळालं. त्याच्या ReferRush या रेफरल मार्केटिंग स्टार्टअपने उद्योगविश्वात ठसा उमटवायला सुरुवात केली होती. याच प्रवासात, भारतातील नामवंत उद्योजक निखील कामत यांच्या कंपनीने ReferRush ला इनिशिएटिव्ह फंडिंगसाठी निवडलं. तब्बल २,४०० कंपन्यांमधून ReferRush ची निवड होणं हे विक्रमसाठी एका मोठ्या यशाचं प्रतीक होतं. यामुळे केवळ आर्थिक पाठबळच नाही, तर या प्लॅटफॉर्मच्या भविष्यासाठीही एक मजबूत दिशा मिळाली. आता त्याला ठाम विश्वास आहे की, लवकरच प्रत्येक ई-कॉमर्स ब्रँड आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी ReferRush चा वापर करेल.

    विक्रमच्या मते, त्याचा संपूर्ण प्रवास हा शिकण्याचा होता. सुरुवातीची पाच वर्षं त्याने प्रयोग आणि चुका यातून शिकण्यात घालवली. अपयश आलं तरीही आत्मविश्वास कधीही गमावला नाही. व्यवसायात संकटं आली, आर्थिक तोटा सहन करावा लागला, शारीरिक आणि मानसिक त्रासही सोसावा लागला. पण तरीही तो जिद्दीने लढत राहिला. त्याच्या मते, “जर तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण होत असतील, तर तुम्ही तुमचं स्वप्न नक्कीच साकार करू शकता.”

    आज विक्रमच्या संघर्षाची कहाणी हजारो तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अपयशाला घाबरून थांबण्यापेक्षा त्यातून शिकून पुढे जाणं हेच यशाचं खरं रहस्य आहे. विक्रमने ते करून दाखवलं. 

    आणखी वाचा:

  • Railways Book Now Pay Later Scheme | अचानक रेल्वेने प्रवास करायचा आहे, पण तिकीटासाठी पैसे नाहीत? भारतीय रेल्वेची ‘बुक नाऊ, पे लेटर’ योजना मदतीसाठी तयार!

    Railways Book Now Pay Later Scheme | अचानक रेल्वेने प्रवास करायचा आहे, पण तिकीटासाठी पैसे नाहीत? भारतीय रेल्वेची ‘बुक नाऊ, पे लेटर’ योजना मदतीसाठी तयार!

    भारतीय रेल्वे कोट्यवधी प्रवाशांसाठी स्वस्त, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा उत्तम पर्याय आहे. आपण घरापासून लांब राहत असू किंवा अचानक कुठे प्रवास करण्याची गरज भासली, तर रेल्वेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र, काही वेळा तिकीट बुक करताना आपल्याकडे पुरेसे पैसे नसतात आणि त्यामुळे अडचण निर्माण होते.

    पण आता काळजी करण्याची गरज नाही! भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी ‘बुक नाऊ, पे लेटर’ ही नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे आपण तिकीट त्वरित बुक करू शकतो आणि त्यासाठीचे पेमेंट प्रवासानंतर १४ दिवसांच्या आत करू शकतो. म्हणजेच, अचानक प्रवास करावा लागला आणि तिकीटासाठी पुरेसे पैसे हाताशी नसले, तरीही ही योजना मदतीला येते.

    या लेखात जाणून घेऊया की ही योजना नेमकी कशी कार्य करते, कोणाला याचा लाभ मिळू शकतो आणि त्याचे फायदे काय आहेत.

    ‘बुक नाऊ, पे लेटर’ योजनेचा लाभ कसा घ्यावा?

    भारतीय रेल्वेने ही योजना फक्त ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी लागू केली आहे. याचा फायदा घेण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा 

    1. रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी सर्वप्रथम IRCTC वेबसाइट किंवा मोबाईल अ‍ॅपवर लॉगिन करा.

    2. आपल्या प्रवासासाठी योग्य ट्रेन, प्रवाशांची संख्या आणि प्रवासाची तारीख निवडा. त्यानंतर उपलब्ध तिकिटे तपासा आणि तुमच्या सोयीच्या गाडीसाठी तिकीट निवडा.

    3. तिकीट बुक करताना पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे पर्याय दिसतील. त्यापैकी ‘पे लेटर’ हा पर्याय निवडा, ज्यामुळे तुम्हाला तिकीट शुल्क त्वरित न भरता प्रवासानंतर १४ दिवसांच्या आत पैसे भरण्याची सुविधा मिळते.

    4. जर तुम्ही पहिल्यांदाच या सुविधेचा वापर करत असाल, तर EpayLater या प्लॅटफॉर्मवर जाऊन तुमची नोंदणी करा. यासाठी तुमचा मोबाईल नंबर, ई-मेल आणि KYC संबंधित आवश्यक माहिती द्यावी लागेल.

    5. EpayLater वर नोंदणी झाल्यानंतर, तुमच्या IRCTC खात्यातून तिकीट बुकिंग प्रक्रिया पूर्ण करा. तिकीट यशस्वीपणे बुक झाल्यावर तुम्हाला ई-मेल आणि SMS द्वारे त्याचा तपशील मिळेल.

    6. तिकीट बुक केल्यानंतर तुमच्या प्रवासानंतर १४ दिवसांच्या आत EpayLater च्या माध्यमातून पेमेंट करणे आवश्यक आहे. जर दिलेल्या वेळेत पैसे भरले, तर कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही. मात्र, उशीर झाल्यास व्याज किंवा दंड आकारला  जातो.

    ‘बुक नाऊ, पे लेटर’ योजना का उपयुक्त आहे?

    रेल्वे प्रवास करताना अनेकदा अचानक प्रवास करण्याची गरज भासते, पण तिकीट बुक करताना तत्काळ पैसे उपलब्ध नसतात. अशा वेळी ‘बुक नाऊ, पे लेटर’ ही योजना अत्यंत फायदेशीर ठरते. या सुविधेमुळे तिकीट त्वरित बुक करता येते, पण त्याचे पैसे नंतर भरता येतात. त्यामुळे अचानक प्रवासाची वेळ आली तरीही कोणतीही अडचण न येता तुम्ही सहज प्रवास करू शकता.

    प्रवाशांना पैशांची व्यवस्था करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. शिवाय, ही प्रक्रिया अगदी सोपी असून जास्त कागदपत्र लागत नाहीत. फक्त IRCTC च्या EpayLater च्या मदतीने काही मिनिटांत तिकीट बुक करता येते.

    ही योजना वारंवार रेल्वे प्रवास करणारे प्रवासी, विद्यार्थी, नोकरीसाठी प्रवास करणारे नोकरदार आणि व्यावसायिक यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तिकीट बुकिंगच्या वेळी पैशांची कमतरता जाणवत असेल, तर ही सुविधा नक्कीच दिलासा देणारी ठरेल.

    योजनेचे फायदे 

    • तिकीट बुक करताना लगेच पैसे द्यावे लागत नाहीत, त्यामुळे अचानक प्रवास करायचा असल्यास आर्थिक ताण येत नाही.
    • ही सुविधा फक्त ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी उपलब्ध असल्याने तिकीट सहज आणि झटपट मिळते.
    • ठरवलेल्या मुदतीत पैसे भरल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क लागत नाही.
    • मुदतीनंतर पैसे भरल्यास फक्त ३.५% सेवा शुल्क आकारले जाते, त्यामुळे मोठा आर्थिक बोजा पडत नाही.

  • कधी टॉयलेट साफ केला, कधी वडापाव विकला: जाणून घ्या ‘छावा’ दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा संघर्षमय प्रवास

    कधी टॉयलेट साफ केला, कधी वडापाव विकला: जाणून घ्या ‘छावा’ दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा संघर्षमय प्रवास

    सध्या देशभरात “छावा” (Chhaava) या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघर्षमयी जीवन प्रवासावर आधारित आहे, ज्यात महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) यांनी साकारली आहे, तर महाराणी येसूबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मीका मंदाना हिने साकारली आहे, तसेच अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि संतोष जुवेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी सुद्धा आपली भूमिका चोख निभावली आहे. या सर्व कलाकारांच्या अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.

    मात्र, या चित्रपटाच्या यशामध्ये सर्वाधिक कौतुक कोणाचं होत असेल, तर ते म्हणजे चित्रपटाचे मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांचं. कारण पहिल्यांदाच संभाजी महाराजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर इतक्या ताकदीने साकारण्यात आला आहे. उतेकर यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण दिग्दर्शन शैलीत हा चित्रपट वास्तवाशी जुळवून प्रभावीपणे सादर केला आहे, ज्यामुळे या चित्रपटाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

    लक्ष्मण उतेकर हे आज हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक आहेत, पण त्यांचा प्रवास अत्यंत कठीण आणि संघर्षमय होता. एक काळ असा होता की, त्यांना दोन वेळच्या जेवणासाठीही संघर्ष करावा लागला. उदरनिर्वाहासाठी त्यांनी टॉयलेट साफ करण्यापासून ते वडापाव विकण्यापर्यंत अनेक कामे केली. पण त्यांनी कधीही हार मानली नाही. कठोर मेहनत, चिकाटी आणि आपल्या कलेवरील निष्ठेमुळे ते आज यशस्वी दिग्दर्शक बनले आहेत. आजच्या लेखात आपण त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाची सविस्तर माहिती घेऊया.

    प्रारंभिक जीवन आणि संघर्ष

    लक्ष्मण उतेकर यांचा जन्म एका साधारण कुटुंबात झाला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शिक्षणासाठी आवश्यक सुविधा मिळाल्या नाहीत, पण त्यांच्या मनात मोठी स्वप्नं होती. काहीतरी वेगळं करण्याची जिद्द घेऊन त्यांनी लहान वयातच मुंबई गाठली. तिथे ना कुणी ओळखीचं होतं, ना कुठे राहायची सोय. हातात काहीच नव्हतं, पण मेहनतीवर आणि जिद्दीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता.

    पोट भरण्यासाठी त्यांनी एका वडापाव विक्रेत्याकडे लहानसं काम मिळवलं. दिवस-रात्र मेहनत करत असताना त्यांची नजर सतत मोठ्या संधीच्या शोधात होती. त्यांना सिनेसृष्टीत काम करायचं होतं, पण त्यासाठी कुठून सुरुवात करावी, हे माहीत नव्हतं. त्यांनी हार मानली नाही. ते मुंबईत स्टुडिओच्या बाहेर तासन्‌तास उभे राहत, लोकांशी ओळख वाढवायचा प्रयत्न करत आणि योग्य संधी मिळण्याची वाट पाहत होते.

    एके दिवशी अचानक महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची वडापावची हातगाडी जप्त केली आणि त्यांचं उपजीविकेचे एकमेव साधन हिरावलं गेलं. हा त्यांच्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉइंट ठरला. त्या क्षणी त्यांनी ठरवलं की आता मागे फिरायचं नाही. परिस्थिती कितीही कठीण आली तरी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करायचं आणि आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवायचं. उपजीविकेसाठी त्यांनी वेळप्रसंगी सफाईचं काम केलं, पण हार मानली नाही. 

    सिनेमॅटोग्राफीची पहिली पायरी

    या कठीण परिस्थितीतून मार्ग काढत असताना, त्यांना एक दिवस एका वृत्तपत्रात पियूनच्या नोकरीची जाहिरात दिसली. स्टुडिओत काम करण्याची संधी पाहून त्यांनी अर्ज केला आणि त्यांना तिथे नोकरी मिळाली. हीच त्यांची सिनेसृष्टीत पहिली पायरी होती.

    स्टुडिओत काम करत असताना त्यांना चित्रपट निर्मितीविषयी अधिक जाणून घेण्याची संधी मिळाली. तिथेच क्रूची गरज असल्याने त्यांना कॅमेरा अटेंडंट म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी हळूहळू सिनेमॅटोग्राफी शिकण्यास सुरुवात केली. छोट्या जबाबदाऱ्या स्वीकारत, सातत्याने मेहनत घेत आणि शिकत ते पुढे जात राहिले.

    काळाच्या ओघात त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफी केली. इंग्लिश विंग्लिश, हिंदी मीडियम, डीअर जिंदगी आणि 102 नॉट आऊट यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांच्या उत्कृष्ट कार्याची झलक दिसली. त्यांच्या मेहनतीमुळे आणि कुशलतेमुळे त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळू लागली आणि सिनेमॅटोग्राफीच्या क्षेत्रात त्यांचं नाव लौकिकास आलं .

    दिग्दर्शनाची सुरुवात आणि ब्रेकथ्रू

    लक्ष्मण उतेकर यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून चांगलं नाव कमावलं होतं, पण त्यांना दिग्दर्शक होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. त्यांनी मराठीत पहिला चित्रपट दिग्दर्शित केला तो म्हणजे “टपाल”. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगला आवडला आणि त्यांना दिग्दर्शक म्हणून ओळख मिळाली.

    यानंतर त्यांनी “लालबागची राणी” हा दुसरा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटामुळे त्यांच्या दिग्दर्शन कौशल्यावर शिक्कामोर्तब झालं. त्यांच्या कथा सांगण्याच्या अनोख्या शैलीला आणि भावनिक दृश्यांवरील पकडीला प्रेक्षकांची दाद मिळाली.

    बॉलिवूडमध्ये संधी मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील होते आणि अखेर २०१९ मध्ये त्यांना मोठा ब्रेक मिळाला. त्यांनी “लुका छुपी” हा चित्रपट दिग्दर्शित केला. हा चित्रपट लिव्ह-इन रिलेशनशिप या विषयावर हलकाफुलका विनोदी सिनेमा होता. प्रेक्षकांनी तो उचलून धरला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर १२८ कोटींची कमाई केली.

    यानंतर, आता लक्ष्मण उतेकर यांनी “छावा” हा छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडणारा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. भव्य निर्मितीमूल्य, दमदार अभिनय, आणि सुंदर दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय ठरतो आहे.मित्रांनो, लक्ष्मण उतेकर यांचा जीवनप्रवास आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक अडचण, संघर्ष, आणि अपयशाला संधी म्हणून स्वीकारलं आणि त्या सर्वांचा योग्य उपयोग करत, आपली स्वप्नं सत्यात उतरवली. त्यांची मेहनत, चिकाटी आणि अथक परिश्रम यामुळेच ते आज एक प्रतिष्ठित दिग्दर्शक बनले आहेत. त्यांची ही यशोगाथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी, आपल्याला दिलेल्या संधीचा योग्य उपयोग आणि प्रयत्नांमुळे सर्व गोष्टी शक्य होतात.

    आणखी वाचा :

  • जाणून घ्या विमा क्षेत्रातील डिजिटल क्रांतीचे शिल्पकार वरुण दुआ यांचा प्रवास | Acko General Insurance

    जाणून घ्या विमा क्षेत्रातील डिजिटल क्रांतीचे शिल्पकार वरुण दुआ यांचा प्रवास | Acko General Insurance

    यश मिळवायचं असेल; तर जिद्द, मेहनत आणि योग्य दिशा असणं गरजेचं असतं. जिद्द मेहनतीला साथ देते, तेव्हा कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येतं. भारतीय विमा क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवणारे अग्रगण्य युवा उद्योजक वरुण दुआ हे या गोष्ट्टीचं उत्तम उदाहरण आहेत. पारंपरिक विमा क्षेत्रातील जटिल प्रक्रिया सोप्या आणि सुलभ करण्याचं त्यांनी स्वप्न पाहिलं. त्यांच्या दूरदृष्टीमुळे विमा घेण्याची संकल्पना आणि प्रक्रिया संपूर्ण बदलली.

    ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी Acko General Insurance या पूर्णतः डिजिटल विमा कंपनीची स्थापना केली. पारंपरिक विमा कंपन्यांमध्ये अनेक टप्पे, कागदपत्रांची आवश्यकता आणि वेळखाऊ प्रक्रिया असते. याउलट, Acko ने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विमा प्रक्रिया सुलभ केली. ग्राहकांना जलद आणि पारदर्शक सेवा मिळावी यासाठी कंपनीने डिजिटल माध्यमातून थेट विमा पॉलिसी देण्याचा निर्णय घेतला. 

    वरुण दुआ यांचा प्रवास संघर्ष, नाविन्य आणि चिकाटीने भरलेला आहे. त्यांनी कठोर परिश्रम, नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विमा क्षेत्रात नवी क्रांती घडवली. चला, त्यांच्या जीवनप्रवासाचा आणि उद्योजकीय यशाचा आढावा या लेखातून घेऊया.

    प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

    वरुण दुआ यांचा जन्म १९८१ मध्ये दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील चंदर मोहन दुआ हे सरकारी कंपनीत अधिकारी होते, तर आई रश्मी दुआ या सरकारी शाळेच्या प्राचार्या होत्या. शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या या कुटुंबात वरुण यांना लहानपणापासूनच नवीन गोष्टी शिकण्याची आवड होती, ज्यामुळे त्यांचा अभ्यासात चांगला सहभाग असायचा.

    त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील वांद्रे-जुहू परिसरातील शाळेत झालं. पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली आणि त्यानंतर MICA (Mudra Institute of Communications, Ahmedabad) मधून मार्केटिंग आणि कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. या शिक्षणामुळे त्यांना मार्केटिंग आणि ब्रँडिंग यांचं सखोल ज्ञान मिळालं, जे त्यांना पुढे विमा क्षेत्रात नवे प्रयोग करण्यासाठी उपयोगी ठरलं.

    करिअरची सुरुवात

    MICA मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वरुण दुआ यांनी आपल्या करिअरची सुरुवात Leo Burnett या जगप्रसिद्ध जाहिरात कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून केली. त्यांच्या कुटुंबाला नेहमीच त्यांच्यासाठी स्थिर आणि सुरक्षित नोकरी हवी होती, म्हणूनच त्यांनी सुरुवातीला नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मार्केटिंग आणि ब्रँडिंग क्षेत्रातील आपल्या ज्ञानाचा उपयोग करत त्यांनी पुढे टाटा AIG लाइफ इन्शुरन्स आणि फ्रँकलिन टेम्पलटन इन्व्हेस्टमेंट्स यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम केलं. या कंपन्यांमध्ये काम करत असताना त्यांना विमा उद्योगातील कार्यपद्धती, ग्राहकांच्या गरजा आणि उद्योगाच्या मर्यादा यांची सखोल माहिती आणि समज मिळाली.

    या अनुभवातून त्यांना लक्षात आलं की विमा खरेदी प्रक्रिया अत्यंत जटिल, वेळखाऊ आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे ग्राहकांसाठी त्रासदायक आहे. अनेक ग्राहकांना विमा पॉलिसी समजण्यात अडचण येत होती, तर काहींना क्लेम प्रक्रिया खूप वेळ घेणारी आणि कठीण वाटत होती. ही समस्या सोडवण्यासाठी काहीतरी नवीन आणि ग्राहकांसाठी सुरळीत प्रक्रिया निर्माण करणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी परंपरागत विमा उद्योगाला डिजिटल युगाशी जोडण्याचा संकल्प केला आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा दृढ निश्चय केला.

    व्यवसायाची सुरुवात आणि सुरुवातीचा संघर्ष 

    २०१६ मध्ये वरुण दुआ यांनी ACKO General Insurance ची स्थापना केली. ही भारतातील पहिली पूर्णतः डिजिटल विमा कंपनी आहे. “शून्य कमिशन, शून्य कागदपत्रे” या संकल्पनेने सुरू झालेल्या ACKO ने “फुल पैसा वसूल” या मोहिमेच्या माध्यमातून लोकांचं लक्ष वेधून घेतलं.

    ACKO ने विमा क्षेत्रात एक नवा बदल घडवला. पारंपरिक विमा कंपन्यांच्या जटिल आणि वेळखाऊ प्रक्रियांमुळे ग्राहकांना अडचणी येत होत्या. मात्र, ACKO ने डिजिटल आणि सोपी विमा सेवा उपलब्ध करून हे आव्हान सोडवलं. मोठ्या खर्चाशिवाय, त्यांनी परवडणाऱ्या आणि सहज समजणाऱ्या विमा पॉलिसी ग्राहकांसाठी तयार केल्या. AI आणि डेटा-ड्रिव्हन तंत्रज्ञानाचा वापर करून, त्यांनी विमा मंजुरी आणि क्लेम प्रक्रिया जलद आणि पारदर्शक केली.

    ACKO ने ओला, अमेझॉन, रेडबस, बायजूस यांसारख्या मोठ्या ब्रँडसोबत भागीदारी करून विमा सेवा अधिक सोपी केली. त्यांच्या उत्तम ग्राहक सेवेमुळे, ACKO भारतातील युनिकॉर्न कंपन्यांपैकी एक बनली आहे. आज ACKO फक्त वाहन आणि आरोग्य विमाच नाही, तर जीवन विमाही प्रदान करते, त्यामुळे ग्राहकांचा विश्वास आणि कंपनीचा विस्तार सातत्याने वाढत आहे.

    ACKO चा यशस्वी प्रवास

    ACKO ने आपल्या अभिनव दृष्टिकोनामुळे कमी वेळात मोठं यश मिळवलं. २०१८ मध्ये IRDAI कडून अधिकृत परवानगी मिळवल्यानंतर, कंपनीने वेगाने विस्तार केला. २०२१ मध्ये $२५५ मिलियन गुंतवणूक फंड उभारून, त्यांनी डिजिटल विमा क्षेत्रात आपलं स्थान अधिक मजबूत केलं. या यशामुळे २०२४ मध्ये ACKOचे मूल्यांकन $१.१ अब्ज डॉलर्स (सुमारे ९,००० कोटी रुपये) ओलांडले आणि कंपनीने भारतातील टॉप युनिकॉर्न स्टार्टअप्समध्ये स्थान मिळवलं.

    ACKO चे संस्थापक वरुण दुआ यांनी २०२३ मध्ये शार्क टँक इंडिया या प्रसिद्ध रियॅलिटी शोच्या सीझन मध्ये परीक्षक म्हणून सहभाग घेतला. अनेक तरुण उद्योजकांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांना आर्थिक मदतही दिली. त्यांची व्यवसायवाढीतील दूरदृष्टी आणि ग्राहक-केंद्रितता ACKO च्या यशाचा मुख्य आधार आहे.

    आणखीन वाचा:

  • Gmail पैसे कसे कमावते? जाणून घ्या A to Z माहिती.

    Gmail पैसे कसे कमावते? जाणून घ्या A to Z माहिती.

    जीमेल (Gmail) ही गूगलची (Google) अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी ई-मेल सेवा आहे. आज जगभरातील कोट्यवधी लोक जीमेलचा वापर करतात. जीमेलचा वापर आपण प्रत्येक दिवशी, कामाच्या गोष्टी, शालेय प्रोजेक्ट्स किंवा इतर बऱ्याच कारणासाठी करत असतो. आजकालचे मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार सुद्धा जीमेलच्या माध्यमातून होत असतात. गूगलचं व्यवसाय मॉडेल एवढं यशस्वी आहे की, फक्त जीमेलच्या माध्यमातून गूगलला अब्जावधी डॉलर्सचा महसूल मिळतो. मात्र, जीमेल पूर्णतः मोफत असल्यामुळे अनेक लोकांना प्रश्न पडतो की, गूगल जीमेलवरून पैसे कसे कमावते? जर तुम्हाला सुद्धा कधी ही शंका आली असेल आणि याचं उत्तर जाणून घ्यायचं असेल, तर हा लेख वाचा. 

    वापरकर्त्यांची माहिती आणि डेटा अ‍ॅनालिटिक्स

    गूगलचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणजे त्याचा डेटा-आधारित जाहिरात व्यवसाय. जेव्हा वापरकर्ते जीमेल वापरतात, तेव्हा गूगलला त्यांच्या ईमेलमधून काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळते. उदाहरणार्थ, ईमेलचे विषय, ट्रेंडिंग कीवर्ड्स, खरेदी संदर्भ (shopping receipts) आणि उत्पादने किंवा सेवांबद्दल असलेले संवाद याबद्दल माहिती मिळते. ही माहिती गूगलच्या अल्गोरिदमद्वारे संकलित केली जाते आणि त्याचा वापर जाहिरातींचे टार्गेटिंग करण्यासाठी केला जातो.

    उदाहरणार्थ, जर एखादा युजर जीमेलवर फिटनेसबद्दल ईमेल्स मिळवत असेल, तर गूगल त्या युजरला फिटनेस उपकरणे किंवा आहारयुक्त जाहिराती दाखवते. यामुळे जाहिरातदारांना त्यांचे उत्पादन किंवा सेवा योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यास मदत होते आणि गूगलला या जाहिरातींच्या माध्यमातून मोठा महसूल मिळतो.

    जाहिरात उत्पन्न (Google Ads/AdSense) अ‍ॅड्स हे गूगलच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे आणि जीमेल त्यात महत्त्वाचा भाग आहे. जीमेलमध्ये वापरकर्त्यांच्या इनबॉक्समध्ये थेट जाहिराती दाखविल्या जातात. जीमेलमध्ये तीन विभाग असतात. ते म्हणजे  ‘इनबॉक्स, सोशल आणि प्रोमोशनल’. प्रोमोशनल टॅबमध्ये गूगल जाहिराती दाखवते. यामुळे, जीमेल वापरकर्त्यांना त्यांच्या इनबॉक्समध्ये आवश्यक असलेली माहिती मिळवता येते, त्याच वेळी गूगलच्या जाहिराती देखील दाखवल्या जातात. काही वेळा, इनबॉक्समध्ये देखील स्पॉन्सर्ड ईमेल्स येतात, जे विशिष्ट ब्रँडद्वारे पाठवले जातात. गूगल वापरकर्त्यांच्या ईमेलमधील शब्दांवर आधारित संबंधित कंटेक्स्चुअल अ‍ॅड्स (Contextual Ads) दाखवतो. गूगलला या जाहिरातींमधून उत्पन्न मिळते. जाहिरातदार गूगलला त्यांच्या जाहिरातींसाठी पैसे देतात आणि जर एखाद्या युजरने त्या जाहिरातीला क्लिक केले किंवा पाहिले, तर त्याचा महसूल थेट गूगलला मिळतो. यामुळे गूगलची जाहिरात प्रणाली अत्यंत यशस्वी ठरते, कारण ती वापरकर्त्यांच्या ईमेल अनुभवाशी संबंधित असते. जेव्हा जाहिराती वापरकर्त्यांच्या गरजांनुसार आणि आवडीनुसार असतात, तेव्हा त्या अधिक प्रभावी ठरतात आणि गूगलला त्याचबरोबर मोठा लाभ मिळवून देतात.

    गूगल वर्कस्पेस (Google Workspace)

    गूगल वर्कस्पेस हे गूगलचे प्रीमियम सबस्क्रिप्शन मॉडेल आहे, जे व्यवसायांसाठी खास डिझाइन केले आहे. या सेवेमध्ये व्यवसायांना कस्टम डोमेनसह ईमेल वापरण्याची परवानगी दिली जाते. यामध्ये 30 GB किंवा त्यापेक्षा अधिक स्टोरेज, प्रगत सुरक्षा उपाय, आणि गूगल ड्राईव्ह, कॅलेंडर, मीट सारख्या गूगलच्या सेवांचा समावेश आहे. गूगल वर्कस्पेससाठी दर महिन्याला प्रति वापरकर्त्यापासून ६ ते १८ अमेरिकन डॉलर घेतले जातात. हजारो व्यवसाय गूगल वर्कस्पेस वापरतात, ज्यामुळे गूगलला प्रचंड उत्पन्न मिळते.

    स्टोरेज योजना (Google Drive Storage Plans)

    जीमेलसह गूगल वापरकर्त्यांना 15 GB मोफत स्टोरेज पुरवतो, ज्यामध्ये ईमेल, गूगल ड्राईव्ह आणि गूगल फोटोज यांचा समावेश असतो. ज्या वापरकर्त्यांना अधिक स्टोरेज आवश्यक असते, ते गुगलचा पेड स्टोरेज प्लॅन्स खरेदी करतात. गूगलचे स्टोरेज प्लॅन्स 100 GB साठी 130 रुपये प्रति महिना, 200 GB साठी २१० रुपये प्रति महिना आणि 2 TB साठी ६५० रुपये प्रति महिना असे आहेत . यातुन गूगलला दर महिन्याला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो, कारण लाखो वापरकर्ते हे प्लॅन्स वापरत असतात.

     AI आणि मशीन लर्निंगवर आधारित सेवा

    जीमेलमध्ये विविध एआय-आधारित फिचर्स आहेत, जे वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यात मदत करतात. ‘स्मार्ट रिप्लाय’ फिचर ईमेलच्या संदर्भानुसार त्वरित उत्तरांचे सुचवलेले पर्याय देते, ज्यामुळे वेळ वाचतो. ‘ईमेल फिल्टरिंग’ फिचर वापरकर्त्यांना महत्त्वपूर्ण ईमेल्स ओळखण्यास मदत करते, ज्यामुळे इनबॉक्स व्यवस्थापन अधिक सुलभ होते. हे सर्व फिचर्स वापरकर्त्यांचा वेळ वाचवतात आणि कार्यक्षमता वाढवतात, तसेच गूगलला प्रीमियम फिचर्ससाठी ग्राहक आकर्षित करण्यास मदत करतात, ज्यामुळे  त्यांच्या उत्पन्नात सतत वाढ होत असते.

    गूगलने जीमेलच्या माध्यमातून एक यशस्वी व्यावसायिक मॉडेल निर्माण केले आहे. वापरकर्त्यांना मोफत सेवा देऊन आणि त्यावर जाहिराती, डेटा अ‍ॅनालिटिक्स, प्रीमियम सबस्क्रिप्शन आणि स्टोरेज योजनांच्या माध्यमातून महसूल मिळवून गूगलने आपली जागतिक प्रतिष्ठा कायम ठेवली आहे. यामुळे गूगल जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांमध्ये आपले स्थान मजबूत करु शकले आहे. डेटा आधारित व्यवसाय मॉडेलने गूगलला वित्तीय आणि व्यवसायिक यश प्राप्त करण्यास मदत केली आहे, यामुळे गूगल जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांमध्ये आपले स्थान टिकवून आहे.

    आणखी वाचा :

  • पोस्ट ऑफिसच्या 5 सर्वोत्तम बचत योजना: सुरक्षित गुंतवणुकीसाठी उत्कृष्ट पर्याय

    पोस्ट ऑफिसच्या 5 सर्वोत्तम बचत योजना: सुरक्षित गुंतवणुकीसाठी उत्कृष्ट पर्याय

    मित्रांनो, पैशांची बचत आणि गुंतवणूक आपल्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. आपण कामातून कमावलेला पैसा फक्त आजच्याच गरजांसाठी उपयोगी पडत नाही, तर भविष्यातील गरजा आणि अडचणींना तोंड देण्यासाठी सुरक्षित गुंतवणूक करण्याची आवश्यकता असते. गुंतवणूक ही एक जबाबदारी असते ज्यामध्ये आपल्याला दीर्घकालीन स्थैर्य, चांगला परतावा आणि सुरक्षितता यांचा समतोल साधावा लागतो. बऱ्याच जणांना गुंतवणुकीच्या बाबतीत अनेक शंका असतात. पैसा कुठे गुंतवायचा, परतावा किती मिळणार आणि गुंतवणुकीचा धोका किती आहे.

    आपण बऱ्याचदा सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असतो. जिथे आपले पैसे दीर्घकाळ सुरक्षित राहतील आणि त्यावर चांगले व्याज मिळेल. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजना सुरक्षित गुंतवणूक पर्याय ठरतात. पोस्ट ऑफिसच्या या योजना कमी जोखीम असलेल्या असतात आणि सरकारच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे त्या पूर्णपणे सुरक्षित असतात. त्यामुळे तुमच्यासाठी या योजना एक उत्तम पर्याय ठरू शकतात.

    या लेखात आपण पोस्ट ऑफिसच्या पाच प्रमुख योजनांवर नजर टाकूया, ज्या तुमच्या गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय ठरू शकतात.

    1. किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra – KVP)

    किसान विकास पत्र ही एक सुरक्षित आणि आकर्षक गुंतवणूक योजना आहे. या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर तुम्हाला 7.5% वार्षिक व्याज मिळते आणि विशेष म्हणजे 115 महिन्यांनंतर म्हणजेच साधारणपणे 9 वर्षे 7 महिन्यांत तुमची रक्कम दुप्पट होते. ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. 18 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. तसेच, जर एखाद्या अल्पवयीन व्यक्तीला गुंतवणूक करायची असेल, तर त्याच्या पालकांच्या नावावर खाते उघडले जाऊ शकते. किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक केल्याने आपले पैसे दीर्घकाळ सुरक्षित राहतील आणि त्याच वेळी ठरलेला परतावा मिळेल.

    2. नॅशनल सेविंग्ज टाईम डिपॉजिट अकाउंट (National Savings Time Deposit – TD)

    नॅशनल सेविंग्स टाईम डिपॉजिट योजना ही अल्प आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना एक वर्षासाठी 6.9%, दोन वर्षासाठी 7%, तीन वर्षासाठी 7.1% आणि पाच वर्षासाठी 7.5% व्याज मिळते. गुंतवणुकीसाठी किमान रक्कम 1,000 रुपये आहे, जी सामान्य लोकांसाठी अगदी परवडणारी आहे. यामध्ये तुम्ही गुंतवलेले पैसे सहा महिन्यांपूर्वी काढता येणार नाहीत आणि एक वर्षाच्या आत काढल्यास फक्त साध्या बचत खात्याचे व्याज मिळेल. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आणि सुरक्षित परताव्यासाठी ही योजना खूपच फायदेशीर ठरू शकते.

    3. वरिष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizens Savings Scheme – SCSS)

    वरिष्ठ नागरिकांसाठी SCSS योजना विशेषतः उपयुक्त आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी 8.2% व्याज दराने परतावा मिळतो, जो बाजारातील इतर योजनांच्या तुलनेत खूपच आकर्षक आहे. या योजनेत किमान 1,000 रुपये गुंतवून खाते उघडता येते आणि जास्तीत जास्त 30 लाख रुपये गुंतवता येतात. 60 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सर्वात योग्य आहे, तसेच निवृत्ती घेतलेल्या आणि वयाच्या 55 ते 60 वर्षांदरम्यान असलेल्या व्यक्तींनाही ही योजना उपलब्ध आहे. या योजनेचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो, परंतु तो मुदतीनंतर वाढवता येतो. सुरक्षित गुंतवणूक आणि नियमित परताव्याच्या शोधात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरते.

    4. नॅशनल सेविंग्ज सर्टिफिकेट (National Savings Certificate – NSC)

    नॅशनल सेविंग्ज सर्टिफिकेट योजना कमी जोखीम असलेल्या गुंतवणुकीसाठी उपयुक्त आहे. सध्या या योजनेत 7.7% व्याजदर देण्यात येतो. या योजनेत गुंतवलेली रक्कम 5 वर्षांपर्यंत ठेवली जाते, ज्यामुळे तुमच्या गुंतवणुकीसाठी दीर्घकालीन फायद्याचा पर्याय ठरतो. याशिवाय, आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर करसवलत मिळते. कमी जोखीम आणि दीर्घकालीन परतावा देणारी ही योजना सुरक्षित गुंतवणुकीसाठी आदर्श मानली जाते.

    5. पब्लिक प्रॉविडेंट फंड (Public Provident Fund – PPF)

    पब्लिक प्रॉविडेंट फंड ही एक सर्वात लोकप्रिय आणि दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. या योजनेत तुम्ही किमान 500 रुपये गुंतवू शकता, आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये दरवर्षी गुंतवले जाऊ शकतात. 15 वर्षांच्या मुदतीनंतर तुमच्या गुंतवणुकीला 5 वर्षांची वाढ मिळवण्यासाठी संधी दिली जाते. याशिवाय, PPF अंतर्गत तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत करसवलत देखील मिळते. आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही या योजनेतून पैसे काढू शकता किंवा शिल्लक रकमेवर कर्ज घेऊ शकता. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आणि करमुक्त परताव्यासाठी PPF योजना अत्यंत फायदेशीर आहे

    पोस्ट ऑफिसच्या या योजना गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित, लाभदायक आणि दीर्घकालीन परतावा देणाऱ्या आहेत. कमी जोखीम आणि ठरलेला परतावा हवे असल्यास, पोस्ट ऑफिसच्या योजना तुमच्यासाठी योग्य ठरतील. तुमच्या गरजांनुसार योग्य योजना निवडून सुरक्षित गुंतवणूक करा आणि तुमच्या भविष्याच्या आर्थिक स्थैर्यासाठी योग्य पाऊल उचला.

    हे पण वाचा:

  • बचत छोटी – शक्ती मोठी | आजच करा तुमच्या भविष्याची आर्थिक योजना | Plan Your Financial Future Today.

    बचत छोटी – शक्ती मोठी | आजच करा तुमच्या भविष्याची आर्थिक योजना | Plan Your Financial Future Today.

    पैसा कमावणे ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. पैशांशिवाय माणूस जगू शकत नाही. एक चांगले जीवन जगण्यासाठी जवळ मुबलक पैसा असणे खूप गरजेचे आहे. पण पैसे कमावण्यासोबतच पैशांची बचतही तितकीच महत्त्वाची आहे. अनेक लोकांना पैशाची बचत कशी करावी, हे कळत नाही. त्यामुळे अनेकदा अशा लोकांच्या हातून खूप पैसा खर्च होतो.  पण, हे ही बचत काही एका रात्रीत होणार नाही. त्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. 

    तुमची बचत तुमच्या चेहऱ्यावर दिसत असते. भरपूर बचत गाठीशी असल्यामुळे एक वेगळाच आत्मविश्वास तुमच्या चेहऱ्यावर आणि तुमच्या वागण्याबोलण्यातून जाणवत असतो. उत्पन्न जेमतेम असल्याने बचत करू शकत नाही, असा फार मोठा वर्ग आपल्याकडे आहे. हातातोंडाशी गाठ आहे, अशा उत्पन्न गटातील लोकांना बचत करणे कठीण असते, जीवनावश्यक खर्च एका मर्यादेपेक्षा कमी होऊ शकत नाहीत, म्हणून उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे हाच पर्याय योग्य ठरतो.

    कोण किती कमावतो, यापेक्षा त्याच्या कमाईतून किती प्रमाणात बचत करतो, किती अतिरिक्त खर्च करतो यांसारख्या बाबींवर त्या व्यक्तीची दीर्घकालीन संपत्तीची निर्मिती क्षमता आणि त्याचे आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून असते.

    कमी किंवा योग्य तितकाच खर्च करणे हा बचतीचा मूलमंत्र आहे; परंतु बरेच जण बचतीचा विचार करण्यापेक्षा कुठे, कसा आणि किती खर्च करता येईल याच विचारात जास्त असतात.

    खर्च किती, कसा, कुठे आणि का करावा हा व्यक्तीसापेक्ष प्रश्न आहे. तरीही उत्पन्नाच्या तुलनेत आणि बचतीचे व्यवस्थापन ठरवून केल्यास आर्थिक अडचणी येत नाहीत.

     उदाहरण १ :

    निशा आणि पंकजचा रविवार उजाडला तोच मुळी कागद आणि पेन घेऊन. प्रत्येक खोलीत काय फर्निचर करायचं याचा आराखडा दोघांनी मिळून तयार केला. गेल्या कित्येक महिन्यांत दोघांच्या पगारातले थोडे थोडे करत बरेच पैसे त्यांनी त्यांचे घर सजवण्यासाठी साठवले होते.

    उदाहरण २ :

    रोजंदारीच्या कामावर जाणारा रघू आज खुश होता. गावाकडे असणारी त्याची बायको, मुलं लवकरच त्याच्याबरोबर राहण्यासाठी येऊ शकणार होती. कारण आजच तो एक खोली भाड्याने घेण्यासाठी मालकासोबत व्यवहार करून आला होता. रोजच्या कामाचे मिळणारे पैसे अगदी गरजेपुरते थोडे वापरून बाकीचे पैसे त्याने शेठच्या सांगण्यावरून बँकेत साठवले होते.

    निशा-पंकज असोत की रघू असो, रोजच्या दैनंदिन खर्चाशिवाय अधिकचा खर्च ते करू शकत होते. हे त्यांना कसे सहज शक्य झाले? याचे उत्तर म्हणजे त्यांना मिळणाऱ्या कमाईच्या पैशातून काही पैसे त्यांनी वेगळे काढले होते, बचत केली होती. उत्पन्नातील सर्वच्या सर्व पैसे त्यांनी लगेच खर्च केले नव्हते.

    अविचाराने खर्च करणारी, कोणाच्याही साहाय्याशिवाय लढणारी आणि प्रत्येक गोष्टीची घाई करणारी व्यक्ती लवकर लयास जाते.

    साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर मिळालेले सर्वच उत्पन्न उधळून न देता काही रक्कम हाती राखणे महत्वाचे आहे. हातात आले आणि उडवून लावले असे न करता उत्पन्नातून खर्च वजा जाता जी शिल्लक आपल्याकडे उरते ती रक्कम म्हणजे बचत! बचतीचे हे सूत्र कोणत्याही बाबतीत लागू पडते, पैसा असो, वेळ असो, अन्न धान्य असो की पाणी असो, बचत सर्वव्यापी आहे.

    बचतीची सुरुवात कशी करावी : 

    1. तुमच्या खर्चाची नोंद करा

    पैसे वाचवण्याची पहिली पायरी म्हणजे तुमच्या खर्चाची तुम्हाला चांगली जाणीव असणे. लोक पुरेशी बचत करू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे खर्च केल्यानंतर फारसा पैसा शिल्लक राहत नाही. त्यामुळे तुम्ही एका विशिष्ट महिन्यात खर्च केलेल्या प्रत्येक गोष्टीची काळजीपूर्वक नोंद ठेवणे महत्त्वाचे आहे. 

    2. कर्ज नियोजन

    जेव्हा तुमचे उत्पन्न कमी असते तेव्हा कर्ज सामान्यतः अटळ असते. तुमच्यावर एकूण किती कर्ज आहे, ते कर्ज तुम्ही किती दिवसात आणि कसे फेडणार आहात याचा आराखडा तुमच्याकडे आधीच तयार असणे आवश्यक आहे. नियोजन केलेले असेल तर त्या कर्जाचा अतिरिक्त ताण न येता सुलभरित्या तुम्ही त्या कर्जाची परतफेड करू शकाल.

    3. बजेट तयार करा

    तुमचा पैसा कुठे जात आहे हे एकदा तुम्हाला कळले की, तुम्ही तुमच्या पैशांचे वाटप कसे करायचे यावर विचार  करून निर्णय घेऊ शकता. आपण प्रत्येक खर्चाचे काळजीपूर्वक विश्लेषण करणे आवश्यक आहे. घरभाडे, कर्ज यांसारखे निश्चित खर्च आहेतच; पण जेवण, वाहतूक आणि मनोरंजन यांसारख्या खर्चांवर नियंत्रण ठेवता येवू शकते. 

    4. मोठी बचत करण्यासाठी लहान प्रारंभ करा

    तुमच्या करिअरच्या सुरुवातीला तुमचे उत्पन्न फारसे जास्त नसेल. बर्‍याच वेळा, सर्व खर्चानंतर खूप कमी गुंतवणूक करण्यायोग्य रक्कम उरते. तरीही जमेल तेवढी बचत करत जा. तुम्ही केलेली छोटी सुरुवातच तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकते. जसजसे उत्पन्न वाढते तसतसे गुंतवणुकीचे प्रमाण वाढवता येते.

    5. बचतीची उद्दिष्टे सेट करा

    बचत उद्दिष्टे सेट केल्याने प्रारंभ करणे खूप सोपे होते. प्रत्येक ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल हे ठरवून सुरुवात करा.

    काही अल्प-मुदतीची  उद्दिष्टे (ज्याला साधारणत: 1-3 वर्षे लागू शकतात) उदा. नोकरी गमावल्यास किंवा इतर आणीबाणीच्या परिस्थितीत 6 महिने ते एक वर्षाचा खर्च करण्यासाठी आणीबाणी निधी, सुट्टीसाठी पैसे वाचवणे, नवीन खरेदी करण्यासाठी बचत करणे.

    दीर्घकालीन बचत उद्दिष्टे अनेक वर्षे किंवा अगदी दशके लांब असतात आणि त्यात खालील गोष्टींचा समावेश असू शकतो : निवृत्तीसाठी बचत करणे, तुमच्या मुलाच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसे टाकणे, दुसऱ्या घरासाठी बचत करणे किंवा तुमच्या सध्याच्या घराचे नूतनीकरण करणे.

    6. तुमचे प्राधान्यक्रम ठरवा

    तुम्हाला करावयाच्या प्रत्येक गोष्टीची प्राथमिकता ठरवा. कोणती गोष्ट जास्त गरजेची आहे तिला आधी प्राधान्य द्या. कमी आवश्यक असणाऱ्या बाबी नंतर ठेवा. तुमची उद्दिष्टे ठरवा आणि ती कोणत्या क्रमाने तुम्हाला साध्य करायची आहेत याचे नियोजन करा.

    शिक्षण, घर, वृद्धापकाळ अशा कोणत्याही कारणासाठी तुम्हाला पैसा लागणार नसेल तरीसुद्धा निदान तुमच्या आत्मविश्वासासाठी तरी तुम्ही बचत ही केलीच पाहिजे. तुम्ही किती ताठ मानेने चालता याच्याशी तुमच्या बचतीच्या स्थितीचा खूप जास्त संबंध आहे. तुमच्या बचतीच्या स्थितीवरून तुमची समाजातील पत ठरणार हे मात्र नक्की !

    हे पण वाचा:

  • भारतीयांच्या आवडत्या नूडल्स Brand कडून शिकण्यासारखे मार्केटिंगचे धडे…

    भारतीयांच्या आवडत्या नूडल्स Brand कडून शिकण्यासारखे मार्केटिंगचे धडे… 

    कोणताही व्यवसाय म्हटला की, तुम्ही तुमची उत्पादनं लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहचवता आणि ते ग्राहकांना कसं आणि किती आकर्षित करतं याची भूमिका खूप महत्त्वाची असते. चांगल्या मार्केटिंग तंत्राचा वापर करणारी उत्पादनं ग्राहकांना लवकर आकर्षित करतात. आज आपण अशाच एका लोकप्रिय Brand ची Marketing टेक्निक पाहणार आहोत. 

    भारतात मॅगी नूडल्स एक लोकप्रिय आणि सर्वसामान्यांच्या आवडीचा खाद्यपदार्थ आहे. 1980 च्या दशकात भारतीय बाजारात प्रवेश केल्यानंतर, मॅगी नूडल्सचा केवळ एक Brand म्हणून राहण्यापेक्षा, भारतीयांच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनली. त्यांच्या यशाचे रहस्य त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये दडलेले आहे.

    मॅगीने ग्राहकांच्या आवडी लक्षात घेऊन उत्पादनं तयार केली, स्थानिक चवींवर जोर दिला आणि विविधता आणली. त्याचबरोबर, सोशल  मीडिया, इमोशनल मार्केटिंग आणि क्रीडा-सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे ब्रँडची लोकप्रियता वाढवली.

    चला तर मग पाहूया भारतात सर्वात लोकप्रिय असणाऱ्या मॅगी या नूडल्स ब्रँड कडून शिकण्यासारखे काही मार्केटिंगचे धडे :

    1. जाहिरातींमध्ये भावनांचा वापर :

    जेव्हा जेव्हा आपण मॅगी बद्दल बोलतो तेव्हा आपल्या मनात चवदार नूडल्स बनवणाऱ्या आईची प्रतिमा येते. मॅगी हे अनेक वर्षांपासून कौटुंबिक खाद्य म्हणून सादर केले जाते आणि त्यांच्या जाहिरात कॅम्पेनमुळे त्यांना त्यांची ही प्रतिमा टिकवून ठेवण्यास खूप मदत झाली आहे.

    2. लहान आणि अर्थपूर्ण tagline चा वापर :

    कोणत्याही मार्केटिंग मोहिमेत टॅगलाइन्सचा महत्त्वाचा भाग असतो. मॅगी अनेक वर्षांपासून लहान आणि आकर्षक टॅगलाइन वापरत आहे. “स्वाद भी, स्वास्थ्य भी”चे उदाहरण घ्या, ही टॅगलाइन मोठ्या संख्येने ग्राहकांना आकर्षित करू शकते, कारण नूडल्स ही अशी गोष्ट आहे जी लोक खाणे टाळतात कारण ते आरोग्यास चांगलं नाही; परंतु मॅगीच्या या tagline मुळे त्यांचे नूडल्स आरोग्यास चांगले आहेत हे लोकांच्या मनात आपसूकच ठसवले जाते. 

    3. प्रत्येक प्रकारचे मार्केटिंग :

    प्रिंट जाहिराती, होर्डिंगपासून सोशल मीडियापर्यंत, मॅगीच्या जाहिराती सर्वत्र आहेत. मॅगीवरील बंदी हटवल्यानंतर मॅगीने आपली मार्केटींगमधील गुंतवणूक सुमारे 96 टक्क्यांपर्यंत वाढवली. ही साधी गोष्ट नाही. अगदी चित्रपट आणि अनेक टीव्ही शोमध्ये मॅगीचे प्रायोजकत्व दिसून येते. अनेक ब्रँड सहसा मार्केटिंगच्या एका मार्गावर लक्ष केंद्रित करण्याची चूक करतात. जे धोकादायक देखील असू शकते, म्हणून नेहमी शक्य तितक्या विविध प्रकारच्या मार्केटिंगचे प्रकार वापरणं गरजेचं आहे. ज्यामुळे अनेक प्रकारच्या ग्राहकांपर्यंत तुमचे उत्पादन पोहोचण्यास मदत होईल. 

    4. विक्री 

    मॅगीच्या पॅकेटच्या मागील बाजूस एक रेसिपी मॅन्युअल आहे. जेव्हा एखादी व्यक्ती पहिल्यांदा मॅगी बनवते किंवा ती कशी बनवायची हे तिला माहित असतेच असे होत नाही. तेव्हा या पाककृती खूप मदत करतात. पॅकेजिंगमध्ये उत्पादनाबद्दल योग्य ज्ञान देणे हा देखील एक खूप चांगला आणि अर्थपूर्ण धडा आहे. त्याचबरोबर मॅगी २ मिनिटात बनते हे त्यांच्या प्रत्येक जाहिरातीतून ग्राहकांच्या मनावर ठसवलं जातं. खरं बघायला गेलं तर मॅगी बनायला २ मिनिटांपेक्षा जास्तच वेळ लागतो, पण आमची रेसिपी कमी वेळात बनते ही भावना ग्राहकांच्या गळी उतरण्यात कंपनी यशस्वी ठरली आहे.    

    5. सेलिब्रेटींच्या शक्तीला कमी लेखू नका :

    अमिताभ बच्चनपासून ते माधुरी दीक्षितपर्यंत, मॅगीने त्यांच्या जाहिरातींमध्ये भारतातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींचा वापर केला आहे. नूडल्समध्ये नंबर १ ब्रँड बनण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे, कारण भारतातील

    आणखी वाचा

    जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल, तर ती तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा. यामुळे त्यांनाही उपयुक्त माहिती मिळेल.

  • लवकर गुंतवणूक का सुरू करावी? | Why start investing early?

    लवकर गुंतवणूक का सुरू करावी? | Why start investing early?

    तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा अधिक मिळवलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही कसा करावा, योग्य आर्थिक नियोजन करून विविध ध्येय कशी साध्य करावी, तुमच्यावर असलेल्या कर्जाचे, तुम्ही काढलेल्या विम्याचे  व्यवस्थापन कसे करावे, सुयोग्य गुंतवणूक करून तुमच्या बचतीच्या पैशाला कसे कामाला लावावे, ही आर्थिक साक्षरता आत्ताच्या काळासाठी नितांत गरजेची आहे.

    भविष्यात अधिकचा नफा मिळविण्याच्या उद्देशाने वर्तमानात केलेले पैशांचे सुयोग्य व्यवस्थापन म्हणजे गुंतवणूक म्हणता येईल.

    जेव्हा एखादी वस्तू किंवा मालमत्ता कमी किमतीत खरेदी करून ठराविक कालावधीनंतर जास्त किमतीला विकून त्यावर मिळणारा भांडवली नफा हा त्या गुंतवणुकीचा सर्वात महत्त्वाचा फायदा होय. 

    अल्पकालीन गुंतवणूक आणि दीर्घकालीन गुंतवणूक अशा दोन प्रकारात आपल्याला गुंतवणूक करता येते.

    गुंतवणूक ही आपले आर्थिक भवितव्य अधिक आणि लवकर  सुरक्षित करण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग असूनही अनेकजण गुंतवणूक उशिरा सुरु करतात. पहिल्यांदाच नोकरीला लागलेले तरुण भविष्याचे नियोजन करण्याऐवजी आधी आपल्या जीवनशैलीत सुधारणा करताना जास्त आढळून येतात. गुंतवणूक सुरु करण्यास खरंतर उशीर कधीच होत नसतो, पण तरीसुद्धा लवकर गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे असतात. याशिवाय आयुष्यात लवकर गुंतवणूक केल्याने तरुण गुंतवणूकदारांना जास्त बचत करता येते, कारण त्यांच्या Professional Life च्या  सुरुवातीला त्यांच्याकडे खूप कमी जबाबदाऱ्या असतात.  

    आपल्या संस्कृतीमध्ये असं म्हणतात की माणसाने जर १ रुपया कमावला तर त्यातले २५ पैसे खर्च करावेत, २५ पैसे दान करावेत, २५ पैसे मुलांसाठी आणि उरलेले २५ पैसे गुंतवणूक करण्यासाठी वापरावेत. म्हणजेच थोडक्यात आपल्या कमाईचा २५% हिस्सा आपण गुंतवणुकीसाठी वापरायला हवा. गुंतवणूक म्हणजे आपल्या भविष्यकाळाची तरतूद असते. बहुतांश लोक लवकर गुंतवणूक करत नाहीत, कारण आयुष्यात लवकर गुंतवणूक करण्याचे महत्त्व त्यांना ठाऊक नसते ; परंतु लवकर गुंतवणूक करणे नेहमीच आपल्या हिताचे ठरते.

    लवकर म्हणजे नक्की कधी?

    वॉरन बफे म्हणतात की ‘मी वयाच्या ११ व्या वर्षापासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. मी तोपर्यंत माझे आयुष्य वाया घालवत होतो.’

    आपण आपल्या पहिल्या पगारापासून आपली गुंतवणूक सुरू करावी याचा अर्थ कमाई सुरू झाल्यावर साधारणतः २२ ते २५ वयोगटाच्या आसपास आपण गुंतवणूक सुरु करायला हरकत नाही.

    तरुण वयात चांगली कमाई होत असताना योग्य बचत न करता खर्चाची सवय लागल्यास पुढील आयुष्यातील आर्थिक जबाबदाऱ्या निभावणे कठीण होते. त्यापेक्षा शुभस्य शीघ्रम् ! आता गुंतवणूक सुरु करा. आपल्याकडे अजूनही वेळ आहे. त्या वेळेचा कसा वापर करायचा हे आपल्या हातात आहे. लवकर गुंतवणूक केल्यास तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. जर आपण लवकर प्रारंभ केला नसेल तर त्याचे दुःख करत बसण्यापेक्षा आता गुंतवणूक सुरू करा.

     म्हातारपणातही ज्यांच्याकडे पैसा आहे, ते तरुण राहतात. याउलट, आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्यक्ती मात्र तरुणपणातच वृद्ध होतात.

    थोडक्यात काय तर जेव्हा आपण कमवायला सुरुवात करू तेव्हा आपल्या उत्पन्नाचा काही भाग हा आपल्याला झेपेल त्या प्रकारात आपण गुंतवलाच पाहिजे, ज्या गुंतवणूक प्रकाराचा आपल्याला भविष्यात लाभ होईल.

    लवकर गुंतवणूक सुरू करण्याचे विविध फायदे :

    1. संपत्ती : 

     लवकर गुंतवणूक केल्याने तुम्हाला तुमच्या संपत्तीला वेळ देऊन ती वाढवता येते. त्यामुळे तुम्ही भविष्यात मोठ्या रकमेचा स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी फायदा मिळवू शकता. भविष्यातील ध्येयनिश्चिती करू शकता. काय योग्य ? काय अयोग्य? हे ओळखून कुठं गुंतवणूक करायची ? कशी आणि किती करायची हे आर्थिक शहाणपण कमी जबाबदारी असलेल्या वयातच येतं.

    2. कम्पाउंड इंटरेस्ट :

    गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम तुमच्या मूळ गुंतवणुकीच्या व्याजावर व्याज म्हणून वाढते, ज्यामुळे तुम्हाला त्याचा अधिक फायदा होतो.

    3. सहनशीलता : 

    लवकर गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला बाजारातील उतार-चढावांशी सामना करण्यासाठी अधिक वेळ मिळतो आणि तुम्ही अधिक शांतपणे गुंतवणूक करु शकता. संयम ठेवायला शिकता येतं. एक गुंतवणूकदार म्हणून आपली Risk Taking Capacity वाढते. त्या तणावाचं योग्य व्यवस्थापन देखील आपल्याला करता येतं.

    4. आर्थिक स्वातंत्र्य : 

    जेव्हा तुम्ही तुमच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी गुंतवणूक, बचत, आणि इतर आर्थिक योजना आखता, आर्थिक ध्येयनिश्चिती करता,  तेव्हा अप्रत्यक्षपणे तुम्ही तुमच्या जीवनात भविष्यातील आर्थिक संकटांची चिंता कमी करत असता.

    सुरुवातीला कमी गुंतवणूक केल्याने तुम्ही भविष्यात आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकता आणि तुमची दिर्घकालीन उद्दिष्टे साध्य करू शकता.

    5. सातत्यपूर्ण बचत :

    लवकर गुंतवणूक सुरू केल्याने तुम्हाला आर्थिक नियोजनाची आणि बचतीची सवय लागते. आपल्या उत्पन्नाच्या काही रकमेची आपल्याला बचत करायचीच आहे ही सवय लागून जाते.

    यामुळे लवकर गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत, जे तुम्हाला भविष्यात मोठ्या लाभाची, मोठ्या परताव्याची संधी देतात. 

    म्हणून आजच श्रीगणेशा करा तुमच्या गुंतवणुकीचा !

    हे पण वाचा

  • तुमचा CIBIL Score तुमचं आर्थिक भविष्य ठरवतो का? | CIBIL Score म्हणजे काय ? | What is CIBIL Score and its importance

    तुमचा CIBIL Score तुमचं आर्थिक भविष्य ठरवतो का? | CIBIL Score म्हणजे काय ? | What is CIBIL Score and its importance

    CIBIL Score म्हणजे Credit Information Bureau (India) Limited Score होय. हा एक 3-अंकी Score आहे जो 300 ते 900 च्या दरम्यान असतो. हा व्यक्तीच्या क्रेडिटच्या  इतिहासावर आणि कर्जफेडीच्या सवयींवर आधारित असतो. ज्या व्यक्तीचा CIBIL Score जितका जास्त, तितकी त्या व्यक्तीची Credit पात्रता चांगली मानली जाते.

    जर CIBIL 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज देताना अशा व्यक्तीस प्राधान्य देतात. कमी स्कोअर असलेल्यांसाठी कर्ज मिळवणे कठीण होऊ शकते किंवा उच्च व्याजदर भरावा लागू शकतो.

    CIBIL Score चांगला ठेवण्यासाठी वेळेवर कर्जाची परतफेड करणे, क्रेडिट कार्डचा योग्य वापर करणे आणि अधिक कर्ज किंवा क्रेडिटची गरज न ठेवणे हे महत्त्वाचे आहे.

    जास्त Score म्हणजे त्या व्यक्तीची क्रेडिट क्षमता चांगली आहे आणि कमी Score म्हणजे ती व्यक्ती वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड व्यवस्थित आणि वेळेवर करत नाही.

    CIBIL Score ची भूमिका : 

    कर्ज प्रक्रियेत CIBIL Score खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. जर हा Score चांगला असेल, तर कर्ज मंजूर होण्यास शक्यतो कोणतीही अडचण येत नाही; पण जर हा Score कमी असेल तर कर्ज मिळणे कठीण होते. चांगल्या CIBIL Score सह कमी व्याजावर कर्ज मिळण्याचीही शक्यता असते. 300 ते 550 चा CIBIL Score कमकुवत मानला जातो. तर 550 ते 650 सरासरी, 650 ते 750 चांगला आणि 750 ते 900 सर्वोत्तम मानला जातो. 

    CIBIL Scoreची मुख्य भूमिका खालीलप्रमाणे आहे :

    1. कर्ज मंजुरीसाठी महत्त्वाचा आधार: जेव्हा तुम्ही गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा कार कर्जासाठी अर्ज करता, तेव्हा बँक तुमचा CIBIL Score  तपासते. चांगला Score असल्यास कर्ज मंजूर होण्याची शक्यता अधिक असते.

    2. व्याजदर ठरवण्यासाठी: जास्त CIBIL Score असलेल्या व्यक्तींना कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते, कारण बँकांना अशा व्यक्तींवर जास्त विश्वास असतो की, ते वेळेवर परतफेड करतील.

    3. क्रेडिट कार्ड मंजुरी: क्रेडिट कार्ड देणाऱ्या कंपन्या देखील तुमचा CIBIL Score पाहून तुमच्यासाठी योग्य कार्ड मंजूर करतात. चांगला स्कोर असल्यास जास्त क्रेडिट Limit मिळते.

    4. Risk Management: कर्ज देणाऱ्या संस्थांना तुमचा CIBIL Score पाहून ठरवता येते की, तुम्ही त्यांच्या दृष्टीने जोखीम आहात की नाही. कमी Score असणाऱ्या व्यक्तींना कर्ज देणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे त्यांना कर्ज नाकारले जाते किंवा जास्त व्याजदर दिला जातो.

    5. करिअर: काही क्षेत्रांमध्ये, विशेषतः आर्थिक सेवांमध्ये, बहुतांश कंपन्या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांचा CIBIL Score तपासतात. चांगला Credit Score म्हणजे त्या व्यक्तीची आर्थिक शिस्त आणि जबाबदारी दर्शवत असते. 

    6. इतर फायदे: जास्त CIBIL Score असणाऱ्या व्यक्तींना कधी कधी विशेष ऑफर, जास्त क्रेडिट लिमिट किंवा कमी प्रोसेसिंग फी सारखे अनेक फायदे मिळतात.

    1. तुम्ही तुमचा CIBIL Score कसा तपासू शकता: 

    Step 1: CIBIL वेबसाइटला भेट द्या.

    Step 2: मुख्य पानावर ‘Get Your CIBIL Score’ किंवा ‘Free CIBIL Score’ या पर्यायावर क्लिक करा.

    Step 3: तिथे तुम्हाला तुमची व्यक्तिगत माहिती भरावी लागेल, ज्यामध्ये नाव, जन्मतारीख, ईमेल, मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड क्रमांक असतो.

    Step 4: या प्रक्रियेनंतर तुम्हाला तुमचा CIBIL Score दिसेल. सुरुवातीला कदाचित एकदा नोंदणी करावी लागू शकते. काहीवेळा, हे मोफत असते, तर काहीवेळा वार्षिक Subscription

     शुल्क भरावे लागते.

    2. मोबाईल अ‍ॅप्सद्वारे CIBIL Score तपासणे

    तुम्ही विविध अ‍ॅप्स वापरून देखील CIBIL Score तपासू शकता :

    Paytm :

    • Paytm अ‍ॅप उघडा आणि Loans & Credit Cards किंवा CIBIL Score पर्यायावर जा.
    • आपले KYC डिटेल्स किंवा पॅन कार्ड नंबर भरून Score तपासा.

    Bajaj Finserv:

    • Bajaj Finserv अ‍ॅपवर नोंदणी करा.
    • Check your CIBIL Score या पर्यायावर जा आणि पॅन कार्ड आणि इतर माहिती भरून तपासणी करा.

    BankBazaar:

    • BankBazaar अ‍ॅप किंवा वेबसाईटवर जा.
    • CIBIL Score मोफत तपासण्याचा पर्याय निवडा आणि त्यानुसार आपली माहिती भरा.

    बँक किंवा वित्तीय संस्थांमधून बर्‍याच बँका आणि वित्तीय संस्थाही मोफत किंवा सवलतीच्या दरात CIBIL Score तपासण्याची सेवा देतात.

    तुम्ही तुमच्या नेट बँकिंग खात्यात लॉगिन करून देखील काही बँकांच्या सेवा वापरून CIBIL Score तपासू शकता

    उदा.

    • HDFC Bank
    • ICICI Bank
    • SBI (State Bank of India)

    3. विनामूल्य क्रेडिट रिपोर्ट्स मिळवण्यासाठी इतर पर्याय :

    • भारतात, तुम्ही TransUnion CIBIL कडून वर्षातून एकदा मोफत क्रेडिट रिपोर्ट मिळवू शकता. तुम्हाला या अहवालात तुमचा CIBIL Score  तसेच इतर क्रेडिट माहिती दिसेल.
    • CIBIL वेबसाइटवर जा आणि Free Annual Credit Report पर्यायावर क्लिक करा.

    आवश्यक माहिती भरून नोंदणी करा. यानंतर तुम्हाला तुमचा क्रेडिट रिपोर्ट आणि CIBIL Score दिसेल.

    तुमचा CIBIL Score हा तुमच्या आर्थिक स्थैर्याचा आणि जबाबदारपणाचा आरसा आहे. तो फक्त कर्ज मिळवण्यासाठीच महत्त्वाचा नाही, तर तुमची आर्थिक शिस्त आणि विश्वासार्हता याचेही प्रतीक आहे. त्यामुळे नियमितपणे क्रेडिट कार्डच्या देयकांचे वेळेवर पेमेंट, कर्जाचे नियोजनबद्ध पुनर्भरण आणि खर्चाचे शिस्तबद्ध व्यवस्थापन याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. CIBIL स्कोअर चांगला ठेवणे म्हणजे तुमच्या आर्थिक भवितव्यासाठी उत्तम तरतूद करण्यासारखे आहे.

    आणखी वाचा:

  • 2025 मध्ये Google AdSense मधून पैसे कसे कमवायचे? | How to Make Money with Google AdSense in 2025?

    2025 मध्ये Google AdSense मधून पैसे कसे कमवायचे? | How to Make Money with Google AdSense in 2025?

    आजकाल ऑनलाईन अर्निंग करण्यासाठी अनेकजण ब्लॉग किंवा वेबसाईट सुरू करतात, परंतु त्यातून पैसे कसे मिळवायचे हे अनेकांना माहित नसतं. ब्लॉग किंवा वेबसाईटद्वारे पैसे कमवण्याचे बरेच मार्ग आहेत, जसं की; गुगल ॲड्स, ॲफिलिएट मार्केटिंग, जाहिराती, स्पॉन्सरशिप, प्रॉडक्ट्सची विक्री इत्यादी. परंतु या सगळ्यांमध्ये Google AdSense हा एक अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाचा मार्ग. आज आपण या लेखात Google AdSense म्हणजे काय, ते कसं कार्य करतं, AdSense ची मान्यता कशी मिळवायची आणि त्यातून पैसे कसे कमवायचे हे सविस्तरपणे समजून घेऊया

    Google AdSense म्हणजे काय?

    Google AdSense ही एक Google द्वारे चालवली जाणारी जाहिरात सेवा आहे. हा एक Advertise प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये ब्लॉग किंवा वेबसाईटवर विविध स्वरूपाच्या जाहिराती, जसं की इमेज, व्हिडिओ, बॅनर जाहिराती दाखवण्यात येतात. जेव्हा तुमच्या ब्लॉगला Google AdSense चे अप्रूवल मिळतं, तेव्हा तुमच्या कंटेंटशी संबंधित जाहिराती Google तुमच्या वेबसाईटवर दाखवतं. वेबसाईटवर आलेले व्हिजिटर्स जेव्हा जाहिरातींवर क्लिक करतात, तेव्हा तुम्हाला पैसे मिळतात.

    Google AdSense कशाप्रकारे कार्य करते?

    Google AdSense च्या कार्यप्रणालीमध्ये काही महत्त्वाचे टप्पे आहेत. सर्वप्रथम, तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉगला पात्रतेसाठी Google द्वारे एक मूल्यांकन केलं जातं. जर तुमची वेबसाईट पात्र असेल, तर तुम्हाला एक अकाउंट अप्रूव्ह केलं जातं. एकदा अप्रूवल मिळाल्यानंतर, Google तुम्हाला एक कोड प्रदान करतं . हा कोड तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर टाकावा लागतो. या कोडच्या माध्यमातून जाहिराती तुमच्या ब्लॉगवर दिसायला लागतात, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्लिकवर CPC (Cost Per Click) प्रमाणे पैसे कमवू शकता. वेबसाईटवरील ट्रॅफिक जितके जास्त असेल, तितके अधिक पैसे कमवता येतील. त्यामुळे, जाहिरातींवर जेवढे अधिकाधिक व्हिजिटर क्लिक करतात आणि तुमची कमाई वाढते.

    YouTube आणि AdSense

    फक्त ब्लॉगच नाही, तर YouTube चॅनलद्वारे सुद्धा Google AdSense च्या मदतीने कमाई करता येते. तुम्ही जेव्हा तुमच्या YouTube चॅनलवरील व्हिडिओमध्ये जाहिराती दाखवता आणि त्यावर लोक क्लिक करतात, तेव्हा तुम्हाला CPC च्या आधारावर पैसे मिळतात.

    AdSense ची मान्यता कशी मिळवायची?

    AdSense चे अप्रूवल मिळवण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे . तुमच्या वेबसाईटवर जरा युनिक आणि माहितीपूर्ण कंटेंट असणं महत्वाचं आहे. तसेच, तुमच्या वेबसाईटवर Contact Us, About Us, Privacy Policy, Terms & Conditions सारखी पेजेस तयार करणं  आवश्यक आहे. यानंतर Google AdSense च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला एक नवीन खातं तयार करावं लागेल. तुमची वेबसाईट Google च्या अटींनुसार योग्य असल्यास, तुम्हाला अप्रूवल मिळतं आणि जाहिराती वेबसाईटवर दिसायला लागतात. या प्रक्रियेत थोडा वेळ लागू शकतो, पण योग्य पद्धतीने काम केल्यास तुम्हाला यश निश्चित  मिळेल.

    Google AdSense ही ब्लॉग आणि वेबसाईटद्वारे पैसे कमवण्याची एक सोपी व प्रभावी पद्धत आहे. जर तुमच्याकडे ब्लॉग किंवा न्यूज वेबसाईट असेल किंवा तुम्ही जर उत्तम लिहणारे असाल, तर तुम्ही स्वतःची वेबसाईट सुरु करून योग्य पद्धतीने AdSense द्वारे पैसे कमवू शकता.

    Google AdSense मधून किती पैसे कमावता येतात?

    यावर कोणतीही मर्यादा नाही. तुमच्या वेबसाईटवरील ट्रॅफिक आणि जाहिरातींवर क्लिक होण्याच्या प्रमाणावर हे अवलंबून असतं. युनिक कंटेंट, योग्य पेजेस (About Us, Privacy Policy), आणि नियमित ट्रॅफिक मिळणारी वेबसाईट Google AdSense च्या मदतीने तुम्ही ऑनलाईन पैसे कमविण्याच्या प्रवासाची सुरुवात करू शकता.

    मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर लेख वाचायला आवडतील, हे सांगायलाही विसरू नका. 

    आणखी वाचा:

  • Gen Z म्हणजे काय? या लोकांची नोकरी टिकत का नाही?

    Gen Z म्हणजे काय? या लोकांची नोकरी टिकत का नाही?

    जगामध्ये प्रत्येक कालखंडात एकाचवेळी किमान ३-४ पिढ्या आढळून येतात. 21 व्या शतकात १९९५ आणि २०१० दरम्यान जन्माला आलेली पिढी म्हणजे Gen Z. इंटरनेटला ओळखून असणारी पहिली पिढी असे या पिढीला संबोधले तरी काही गैर नाही. या पिढीला ‘डिजिटल नेटिव्ह’ असेही म्हणतात.

    आत्ताचा काळ वेगाने बदलत आहे व त्यानुसार तंत्रज्ञानही. या तंत्रज्ञानाशी मैत्रीपूर्ण नाते असलेली पिढी म्हणजे जनरेशन झेड. ही पिढी म्हणजे १९९५ नंतर जन्मलेली १२ ते १८ वयोगटातील मुले. त्यांची इंटरनेट, मोबाइल, सोशल मीडियाशी खूपच मैत्री आहे. दीर्घकाळ ऑनलाइन असणारी ही पिढी. इतरांच्या तुलनेत तंत्रज्ञान विश्वाच्या अधिक जवळ दिसून येते.

    Gen z पिढीची वैशिष्ट्ये :

    तंत्रज्ञानाचा अंगीकार : 

    Gen Z ची पिढी लहानपणापासूनच स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि इंटरनेटशी जोडलेली आहे. ते डिजिटल युगात वाढलेले असल्यामुळे तंत्रज्ञानाचा चांगला वापर करत आहेत.

    सामाजिक जाणीव :

    या पिढीतील लोक सामाजिक प्रश्नांबद्दलसुद्धा जागरूक असतात. पर्यावरण, समानता, मानसिक आरोग्य यांसारख्या मुद्द्यांबद्दल ही पिढी विचारशील दिसून येते. समाजाबद्दल असलेली आंतरिक ओढ या पिढीमध्ये दिसून येते.

    मल्टी-टास्किंग कौशल्य : 

    या पिढीने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याची सवय लावून घेतली आहे. त्यामुळे ते अभ्यास, करिअर आणि वैयक्तिक जीवन यांचा समतोल साधण्यात यशस्वी झालेले दिसतात.

    स्वतंत्र विचारसरणी : 

    Gen Z स्वतःच्या निर्णयांवर भर देणारी, स्वत:वर विश्वास असणारी, आत्मविश्वासाने भरलेली पिढी आहे. ते स्वतःच्या आवडीनुसार करिअर निवडण्याचे धाडस करत आहेत, ते धाडस यशस्वी करूनही दाखवत आहेत तसेच पारंपारिक नोकऱ्यांच्या ऐवजी फ्रीलान्सिंग आणि स्टार्टअपमध्ये त्यांचे स्वारस्य दाखवत आहेत.

    वैश्विक दृष्टिकोन : 

    सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील विविध संस्कृतींशी जोडले गेल्यामुळे त्यांची विचारसरणी आणि दृष्टिकोन अधिक व्यापक आणि जागतिक झालेला दिसतो.

    अर्थपूर्ण कामे : 

    या पिढीला केवळ पैशासाठी काम करणे आवडत नाही, तर त्यांना त्यांचे काम अर्थपूर्ण आणि सामाजिक बदल घडविणारे असावे असे वाटते.

    निर्णयक्षमता : 

    तंत्रज्ञान आणि माहितीच्या प्रचंड उपलब्धतेमुळे, Gen Z जलद निर्णय घेण्यास सक्षम आहे. ते लवकर माहिती मिळवणे आणि त्यावर प्रक्रिया करून तितक्याच तात्काळ निर्णय घेण्यावर भर देतात.

    व्यक्तिमत्त्व विकास : 

    सोशल मीडियाच्या युगात, स्वतःचे “व्यक्तिमत्त्व” कसे सादर करावे हे Gen Z चांगले जाणते. Instagram, Facebook, LinkedIn यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर स्वतःची ओळख आणि वैयक्तिक ब्रँड विकसित करण्यास ही पिढी अधिक महत्त्व देते.

    विविधतेचा स्वीकार : 

    Gen Z पिढी विविधतेबद्दल अधिक संवेदनशील आहे. जात, लिंग, लैंगिकता आणि सामाजिक स्थिती याबद्दल त्यांची विचारसरणी अधिक समर्पक आणि आधुनिक आहे.

    उद्योजकता : 

    ही पिढी पारंपारिक 9-5 च्या नोकरीपेक्षा उद्योजकतेवर भर देते. अनेक Gen Z युट्युबर, इन्फ्लुएन्सर, फ्रीलान्सर तसेच स्टार्टअप फाउंडर्स आहेत. त्यांना स्वतःचे काहीतरी निर्माण करण्याची आवड आहे.

    मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता : 

    मानसिक आरोग्य हा विषय Gen Z साठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ते ताणतणाव, चिंता आणि मानसिक आजार यांबद्दल खुलेपणाने बोलतात आणि मदत घेण्यासही तत्पर असतात.

    इको-फ्रेंडली दृष्टिकोन : 

    पर्यावरण आणि शाश्वत मूल्ये याबद्दल ही पिढी अधिक जागरूक आहे. ते पर्यावरण रक्षणासाठी शाश्वत उत्पादनांचा वापर, प्लास्टिकचा कमी वापर आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या वापराला प्राधान्य देताना दिसून येतात.

    सतत शिकण्याची वृत्ती : 

    Gen Z पिढीला सतत नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वतःला अद्ययावत ठेवण्याची इच्छा दिसते. ऑनलाईन कोर्सेस, ट्यूटोरियल्स आणि व्हिडिओंच्या माध्यमातून ते नियमितपणे स्वतःला Improve करत आहेत.

    या पिढीची नोकरी टिकत का नाही ?

    Gen Z at Workplace ने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात सांगितले गेले आहे कि Gen Z पिढीतील ४५% तरुण २ वर्षेही नोकरीच्या एका जागी टिकत नाहीत. याला विविध कारणेदेखील आहेत. मुळात, प्रत्येकाची वेगवेगळी कारणे आहेत. तर ५१ टक्के लोकांना नोकरी गमावण्याची भीती आहे. ही चिंता त्यांच्या करिअरच्या संभाव्यतेपर्यंत विस्तारित आहे. कारण 40 टक्के लोकांना नोकरी मिळाल्यानंतरही त्यांच्या पसंतीच्या क्षेत्रात पद कायम ठेवण्याची चिंता आहे.

    या अहवालामध्ये आणखी काही बाबी मांडण्यात आल्या आहेत. अहवालामध्ये असणाऱ्या ७७% तरुणांनी कमर्शिअल ब्रँड तसेच त्यांच्या पदाला जास्त किंमत दिली आहे. तर या ७७% तरुणांमधील ४३% तरुण अनुभव तसेच Improvement आणि Growthच्या संधीला जास्त महत्व देत असतात. अहवालात सादर असलेल्या तरुणांपैकी ७२% तरुण वेतनाच्या रक्कमेपेक्षा Job Satisfaction ला जास्त महत्व देतात, तर ७८% तरुण नोकरी बदलत आहेत कारण त्यांना आणखी पुढे जायचे आहे. HR प्रोफेशन मधील ७१% तरुणांचे असे सांगणे आहे, कि नोकरी बदलण्याचे प्रमुख कारण वेतन हेच आहे. त्यामुळे तरुणाईतील २५% लोक नोकरी बदलताना विशेष लक्ष त्यांच्या पगारावर देतात. अशा लोकांना स्वतःमध्ये राहायला जास्त आवडते. 

    आणखी वाचा:

  • पैशांच्या स्मार्ट व्यवस्थापनाच्या या 10 Master Tricks तुम्हाला माहीत आहेत का?

    पैशांच्या स्मार्ट व्यवस्थापनाच्या या 10 Master Tricks तुम्हाला माहीत आहेत का?

    बहुतेक जणांना असे वाटते, की कमाई चांगली असेल तर आर्थिक नियोजनाची काही गरज नाही; पण पैसा कसा हाताळायचा किंवा गुंतवायचा हे कळत नसेल, तर उद्या हजारांत काय लाखांचे पॅकेज जरी मिळाले तरी ते पुरणार नाही हे वास्तव आहे. मित्रांनो, लक्षात घ्या पैशाचे स्मार्ट व्यवस्थापन जर तुम्ही करणार नसाल तर तुम्हाला तुमच्या भविष्यातील आर्थिक ध्येयांना गुंडाळण्याची वेळ येऊ शकते आणि कर्जाचा मोठा डोंगर तुमच्या पुढे उभा राहू शकतो. यासाठी उत्पन्न कितीही असलं तरी त्या पैशांचे योग्य व्यवस्थापन करता येणे गरजेचे ठरते. 

    आज आपण पैशांच्या स्मार्ट व्यवस्थापनाच्या 10 Master Tricks पाहूया: 

    • महिन्याच्या आणि वार्षिक खर्चाचे अंदाजपत्रक बनवा. त्यामध्ये होणाऱ्या खर्चाची विभागणी वेगवेगळी करा. यातून तुम्हाला आवश्यक गोष्टीवर होणारा खर्च, हॉटेलिंगवर होणारा खर्च, मुलांच्या शिक्षणावर होणारा खर्च याचा अंदाज येईल.
    • तुमच्या गरजा आणि इच्छा यामधला फरक समजून घ्या. बहुतेक जण यामध्ये गल्लत करतात. गरजेनुसार खर्च करा, इच्छेनुसार नको.
    • तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नका. हा एक महत्वाचा नियम आहे. बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये असणारे बहुतेकजण यामध्ये अडकलेले असतात.
    • महिन्याची बिले, कर्जाचे हप्ते वेळेवर भरा. यामुळे तुमची पत सुधारायला मदत होते. ECS (Electronic Clearing Service) मुळे आज बिल भरणे, कर्जाचे हप्ते भरणे खूप सोपे झाले आहे.
    • क्रेडिट कार्डचा योग्य वापर करा. आज बाजारात क्रेडिट धारकांसाठी खूप योजना येतात आणि त्या सापळ्यात अडकणारेही बरेचजण आहेत. क्रेडिट कार्डचे स्मार्ट उपयोगही आहेत ते समजून घेणे गरजेचे आहे.
    • स्मार्ट कर्जं आणि वाईट कर्जं घ्या. स्मार्ट कर्ज म्हणजे अशी कर्ज ज्यामध्ये आपल्याला कर नियोजनास मदत होते आणि स्वस्त दरात उपलब्ध होतात. जसे की गृहकर्ज आणि शैक्षणिक कर्ज यावर कर सवलती असतात, याविरुद्ध वाईट कर्ज म्हणजे अशी कर्जं जी महाग दराने मिळतात उदा. वाहन कर्ज, क्रेडिट कार्ड.
    • तुमच्या अडचणीच्या काळासाठी ३-६ महिन्याच्या खर्चाची तरतूद करून ठेवा. आपल्याला उद्या कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल सांगता येत नाही. नोकरी-धंद्यामध्ये येणाऱ्या चढउताराला सामोरे जाण्यासाठी ही तरतूद खूप महत्त्वाची आहे.
    • तुमचे महिन्याचे बँक, कर्जाचे स्टेटमेंट चेक करत चला. खूपवेळा आपण याकडे न बघताच रद्दीमध्ये टाकतो. जेव्हा तुम्ही ती काळजीपूर्वक पाहता, तेव्हा तुम्हाला त्यातील बारकावे लक्षात येतात.
    • तुमच्या परिवाराला, घरातील मोठ्या मुलांना पैशाचे महत्व, तुम्ही केलेल्या गुंतवणूका समजून सांगा, जेणेकरून भविष्यात या गुंतवणूका त्यांना समजायला वेळ लागणार नाही.
    • आर्थिक नियोजन, विमा, गुंतवणूक यासाठी त्या त्या क्षेत्रातील व्यावसायिक लोकांचा सल्ला घ्या.

    लक्षात घ्या; एक छोटेसे छिद्रही जहाजाला बुडवू शकते, त्यामुळे आपल्या आर्थिक जीवनाला शिस्त आणण्यासाठी पैशाचे स्मार्ट व्यवस्थापन गरजेचे आहे आणि त्याची सुरुवात कमाई सुरू झाल्यापासून करणे गरजेचे आहे. ज्याला पैसा कमावता येतो, त्याला तो सांभाळताही आला पाहिजे आणि वाढवताही आला पाहिजे.

    आणखी वाचा

  • सोशल मीडियामध्ये व्यवसाय संधी | Business Opportunities in Social Media

    सोशल मीडियामध्ये व्यवसाय संधी | Business Opportunities in Social Media

    स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे म्हणजेच स्वयंरोजगाराचे बरेच फायदे आहेत. स्वयंरोजगार ही स्वतःला विकसित करण्याची, नवीन ज्ञान संपादन करण्याची निरंतर प्रक्रिया असते. ही प्रक्रिया तुम्हाला नोकरी करून कधीच आत्मसात होणार नाही. 

    आपण जर सोशल मीडियाचे जाणकार आहात व आपणास काहीतरी नावीन्यपूर्ण असा व्यवसाय करायचा असेल, तर सोशल मीडिया कन्सलटंट हा व्यवसाय एक चांगला पर्याय आहे. 

    सोशल मीडिया कन्सलटंट म्हणजे काय ?

    सोशल मीडिया कन्सलटंट म्हणजे असा एक व्यक्ती जो व्यवसायांना किंवा व्यक्तींना त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर योग्य प्रकारे त्यांचा Presence निर्माण करण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करतो. 

    यामध्ये – 

    • सोशल मीडिया अकाउंट्स तयार करणे
    • पोस्ट्सचे नियोजन करणे
    • टार्गेट ऑडियन्सशी संवाद साधणे
    • ब्रँड प्रमोशन करणे, ट्रॅफिक वाढवणे 
    • व्यवसायाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी रणनीती तयार करणे यांचा समावेश असतो. 

    सोशल मीडिया कन्सलटंटचे मुख्य काम व्यवसायाचे ब्रँडिंग इमेज सुधारण्याचे असते, तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून विक्री किंवा लोकप्रियता वाढवण्याचे असते.

    आज कोणताही व्यावसायिक किंवा कंपनी, मग ती मोठी असो वा लहान त्यांचे ऑनलाईन अस्तित्व वाढवण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळे एक सोशल मीडिया कन्सलटंट म्हणून पार्ट टाईम किंवा फुलटाईममध्ये पैसे कमवण्याची उत्तम संधी आहे, परंतु या व्यवसायात येण्याअगोदर काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.

    सोशल मीडिया कन्सलटंट बनण्यासाठी आवश्यक बाबी : 

    1. सोशल मीडिया कन्सलटंटला प्रत्येक सोशल मीडिया टूलच्या साधक बाधक गोष्टींबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे. हे ज्ञान केवळ फेसबूक किंवा ट्विटरपुरते मर्यादित नसावे. त्यांनी नफा मिळवण्याच्या व व्यवसायाच्या गुंतवणुकीवर परतावा (ROI) देण्याच्या धोरणांमध्येदेखील सर्जनशील असावे. 
    2. एक सोशल मीडिया तज्ज्ञाने योग्य डावपेच आखण्याइतपत विश्लेषणात्मक असावे. तसेच चांगले परिणाम मिळवण्यासाठी त्यामध्ये वेळोवेळी योग्य बदल करण्याचे कौशल्यही आत्मसात करावे.
    3. एक सोशल मीडिया तज्ज्ञाने योग्य डावपेच आखण्याइतपत विश्लेषणात्मक असावे. तसेच चांगले परिणाम मिळवण्यासाठी त्यामध्ये वेळोवेळी योग्य बदल करण्याचे कौशल्यही आत्मसात करावे.
    4. एक सोशल मीडिया सल्लागार म्हणून आपल्या ग्राहकाचा व्यवसाय, त्यांचे संभाव्य ग्राहक, सोशल मीडिया प्रेझेन्स, सध्याची वर्तमान सोशल मीडिया धोरणे व संबंधित इतर माहिती असणे आवश्यक असते. 
    5. ग्राहकाची सोशल मीडिया रणनीती, त्यांच्या कमजोर बाबी व अन्य समस्या निवारणाबद्दल नि:पक्षपाती मत तयार करण्यासाठी सोशल मीडिया सल्लागाराकडे विशेष कौशल्य असावे लागते.
    6.  सोशल मीडियाद्वारे व्यवसायवृध्दीचे धोरण तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले पाहिजे. 
    7. एक सल्लागार म्हणून सोशल मीडियावरील फॉलोअर्सच्या डेटाचे विश्लेषण करता आले पाहिजे. 
    8. सोशल मीडिया सल्लागार हे आपल्या ग्राहकाच्या सोशल मीडिया उपक्रमांमध्ये विविध डावपेच आखत व सतत नवीन प्रयोग करत असतात. त्यामध्ये सोशल मीडियामधील सध्याचे ट्रेंडस व बदलांचे परीक्षण करणे, प्रभावी ऑनलाईन मार्केटिंगचे धोरण बनवताना सोशल मीडिया माध्यमांचा व आपल्या मार्केटिंग ज्ञानाचा प्रभावी वापर करणे या गोष्टींचा समावेश असतो. 
    9. मार्केटिंग योजनांमध्ये विविध तंत्राचा कसा वापर करावा याचे व्यवस्थापन करणे शिकले पाहिजे. 
    10. ग्राहकाच्या फायद्यासाठी त्यांच्या व्यवसायातील सर्वोत्तम योजनांचे मूल्यांकन व त्यांची अंमलबजावणी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सोशल मीडिया सल्लागाराचे असते. 
    11. ऑनसाईट कामकाजाच्या माध्यमातून ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा पुरवणे, त्यांच्या गरजा समजून घेणे हे कौशल्य विकसित करावे लागते. 

    एक परिपूर्ण सोशल मीडिया सल्लागार होण्यासाठी वरील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. 

    सध्याच्या काळात आपल्या व्यवसायास ऑनलाईन अस्तित्व प्रदान करण्यासाठी उद्योजक सोशल मीडियाचा चांगल्यापैकी उपयोग करतात. परिणामी आजच्या काळात अनेक उद्योजक कंपन्याचे ऑनलाईन किंवा सोशल मीडिया Presence प्रभावशाली करण्यासाठी त्यांना सोशल मीडिया सल्लागारांची गरज असते. त्यामुळे सोशल मीडिया सल्लागार म्हणून व्यवसाय करण्यासाठी एक उत्तम संधी आहे. संधीचा फायदा अवश्य घ्या आणि करिअरच्या दृष्टीकोनातून याचा नक्की विचार करा. 

    आणखी वाचा :

  • मुंबईची झोपडपट्टी ते दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय | The richest Indian in Dubai – Rizwan Sajan’s

    मुंबईची झोपडपट्टी ते दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय | The richest Indian in Dubai – Rizwan Sajan’s 

    भारतात अनेक उद्योगपती आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीने एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. काहींच्या हातात वारसा संपत्ती नसली तरी, त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कमावले आहे. अशाच एका यशस्वी उद्योगपतीची गोष्ट आज आम्ही सांगणार आहोत, जो मुंबईतील घाटकोपरच्या झोपडपट्टीत राहत होता आणि छोट्या-छोट्या नोकऱ्या करीत जीवनाची गाडी पुढे नेत होता. आज तो दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीयांमध्ये गणला जातो आणि त्यांचा व्यवसाय केवळ दुबईतच नाही, तर इतर अनेक देशांमध्येही पसरलेला आहे.

    सुरुवातीचे दिवस आणि संघर्ष

    रिझवान साजन यांचा जन्म मुंबईच्या घाटकोपरमधील एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांचं कुटुंब झोपडपट्टीत राहायचे. आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं फार कठीण होत होतं. त्यामुळे, साजन यांनी लहानपणापासूनच कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावण्याचं ठरवलं  होतं. त्यांनी शाळेतील पुस्तकं विकणं, सणासुदीच्या वस्तू विकणं, घरोघरी जाऊन दूध विकणं अशी छोटी छोटी कामं लहानपणीच  करण्यास सुरुवात केली. 

    वयाच्या अवघा १६व्या वर्षीच रिझवान साजन एक मोठा धक्का बसला,त्यांच्या वडिलांचं अचानक निधन झालं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण आर्थिक जबाबदारी साजन यांच्यावर आली आणि याचा परिणाम  म्हणून त्यांना शिक्षण मधूनच सोडावं  लागलं. काही काळ त्यांनी एक छोटा व्यवसाय सुरू केला, ज्यात ते फाईल बॉक्सेस बनवायचे. सुरुवातीला या व्यवसायात थोडंफार  यश मिळाले, पण पुरेसं नव्हतं. 

    कुवेतमध्ये मिळाली सुवर्णसंधी

    रिझवान साजन यांचे काका तेव्हा कुवैतमध्ये नोकरी करत होते, कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी साजन यांनी आपल्या काकांकडे कुवेतमध्ये नोकरीसाठी विचारणा केली. त्यांच्या काकांनी त्यांना एका बांधकाम साहित्याच्या दुकानात नोकरी मिळवून दिली. ही संधी साजन यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण वळण ठरली. त्यांनी या नोकरीत एक विक्रेता म्हणून काम सुरू केलं, आणि त्यांच्या मेहनतीने त्यांना त्या ठिकाणी लवकरच व्यवस्थापकाची पदवी मिळाली. 

    १९९० साली  पुन्हा त्यांच्या  जीवनाला एक  जोरदार  धक्का मिळाला . कुवेतमध्ये भीषण आखाती युद्ध सुरू झालं आणि त्यांना  कुवेत सोडावं लागलं आणि पुन्हा भारतात परतावं  लागलं. परत आल्यावर त्यांनी काही नोकऱ्या करून पहिल्या, पण यश मिळवण्यासाठी त्यांच्या मनात काहीतरी मोठं करण्याची इच्छा होती. काही काळ भारतात राहिल्यानंतर त्यांनी दुबईला जाण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना दुबईत बांधकाम उद्योगात मोठी संधी दिसत होती.

    The richest Indian in Dubai - Rizwan Sajan's 

    दुबईत ‘डॅन्यूब ग्रुप’ची स्थापना 

    १९९३ मध्ये दुबईला गेल्यावर रिझवान साजन यांनी ‘डॅन्यूब’ नावाची ट्रेडिंग फर्म सुरू केली. हि कंपनी कुवेतमधून बांधकाम साहित्य खरेदी करायची  आणि दुबईमध्ये त्याची विक्री करायची. दुबईमध्ये बांधकाम उद्योगाची प्रचंड वाढ होत होती, आणि त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला जोरदार प्रतिसाद मिळाला. साजन यांच्या सर्जनशील स्वभावामुळे  आणि मेहनतीमुळे ‘डॅन्यूब’ ने अवघ्या काही वर्षांतच मोठं यश मिळवलं.

    १९९९ पर्यंत ‘डॅन्यूब’ चा वार्षिक महसूल १६ कोटी रुपये झाला होता, आणि ते १ कोटी रुपयांचा नफा मिळवत होते. पण साजन इथेच थांबले नाहीत. त्यांनी बांधकाम साहित्याबरोबरच गृहसजावट, सॅनिटरीवेअर, इलेक्ट्रिकल उपकरणे यांसारख्या विविध क्षेत्रांत विस्तार केला.

    रिअल इस्टेटमध्ये पाऊल

    २००८ मध्ये जागतिक आर्थिक संकट आलं , पण साजन यांच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही उलट त्यांनी आपला व्यवसाय वाढवण्याचं ठरवलं आणि २०१४ मध्ये ‘डॅन्यूब प्रॉपर्टीज’ नावाची रिअल इस्टेट कंपनी लाँच केली. त्यांचा उद्देश मध्यमवर्गीयांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा होता. ‘डॅन्यूब प्रॉपर्टीज’ ने बाजारात एक क्रांतिकारी योजना आणली — “1% मासिक पेमेंट योजना” या योजनेत खरेदीदारांना घर खरेदीसाठी फक्त 1% रक्कम दरमहा भरण्याची मुभा  होती आणि त्यांना घरमालकीचा हक्क मिळत होता.

    या योजनेने घर खरेदीदारांसाठी घरमालकीचा मार्ग सोपा केला आणि अल्पावधीतच ‘डॅन्यूब प्रॉपर्टीजचं नाव बाजारात लोकप्रिय झालं. या योजनेमुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळाले आणि २०१६ पर्यंत ‘डॅन्यूब’चा वार्षिक महसूल ९००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. साजन यांनी रिअल इस्टेटमध्ये आपले स्थान मजबुत  केलं आणि आज ‘डॅन्यूब ग्रुप’ १६,७०९ कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळवणारी कंपनी आहे. रिझवान साजन यांनी आपल्या अपार मेहनत आणि हुशारीच्या जोरावर ‘डॅन्यूब’ला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं आणि त्यांची उपस्थिती जगभरातील ३० पेक्षा जास्त देशांत आहे.

    रिझवान साजन यांची कहाणी ही एका सामान्य माणसाच्या असामान्य संघर्षाची आणि यशाची कहाणी आहे.

    मुंबईच्या झोपडपट्टीतून सुरु झालेला हा प्रवास दुबईतील यशाच्या शिखरापर्यंत पोहोचला. त्यांनी कठीण परिस्थितीतही हार न मानता स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांच्या जिद्दीने, मेहनतीने बुद्धिमत्तेमुळे ते आज जागतिक स्तरावर यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात . 

    आणखी वाचा

  • यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो: There is no shortcut to success.

    यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो: There is no shortcut to success.

    घरबसल्या लाखो-करोडो कमवा, तुमचे पैसे दुप्पट करा, नेटवर्क मार्केटिंग मधून करोडपती व्हा अशा अनेक फसव्या जाहिराती दररोज वर्तमानपत्रांमध्ये झळकत असतात. अशा झटपट आणि क्षणात श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी तरुण वर्ग फसतो आणि बळी पडतो. शेवटी अपयश आणि निराशा वाट्याला येते. मला कोणीतरी गॉडफादर भेटेल, श्रीमंत बनण्याची एखादी मोठी संधी चालून येईल किंवा देवाचा साक्षात्कार होईल अशी आपण अपेक्षा धरुन बसतो. अचानक राजयोग येऊन माझ्या आयुष्याला एका दिवसात कलाटणी मिळेल, माझं आयुष्य बदलून जाईल असं बहुतेकांना वाटत असतं. प्रयत्न, चिकाटी, परिश्रम, कष्ट, संघर्ष करण्याऐवजी सगळं सहज व्हावं, सहज मिळावं असं वाटत असतं. मात्र यशाला शॉर्टकट नसतो आणि शॉर्टकटने मिळालेलं यश हे शाश्वत देखील नसतं. अचानक एखादी संधी चालून येईल किंवा कोणीतरी आपल्या मदतीला येईल अशी आशा वाटणे हे स्वतःच्याच नाकर्तेपणाचे सर्वात मोठे लक्षण आहे. 

    जेव्हा आपला स्वतःचा स्वतःच्याच सामर्थ्यावर विश्वास नसतो तेव्हा अशा प्रकारच्या निरर्थक अपेक्षा आपण धरून राहतो. मित्रांनो तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचे आहे, जे कोणते ध्येय साध्य करायचे आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःला रणांगणात उतरावं लागेल, स्वतः झगडावं लागेल. आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाचं काही ना काही कारण आहे, ते कारण आपल्याला शोधायचंय आणि त्या कारणाच्या पूर्ततेसाठी काम करायचंय. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो त्यासाठी मेहनतीचा यज्ञ प्रत्येकाला पेटवावाच लागतो. शॉर्टकटने मिळालेल्या यशानं तुम्ही जितके लवकर वर जाता, तितक्याच लवकर तुम्ही खाली देखील येता. थ्री इडीयट्स मध्ये आमिर खानने म्हटल्याप्रमाणे “सक्सेस के पीछे मत भागो, मेहनत इतनी करो की सक्सेस खुद आपके पीछे आयेगी.

    Shortcut आणि Smartwork मध्ये काय फरक आहे?

    1. Shortcut :

    •    हे काम जलद पूर्ण करण्यासाठी वापरलेले छोटे मार्ग किंवा तात्काळ उपाय असतात.
    •    शॉर्टकट कधी कधी गुणवत्ता किंवा दीर्घकालीन परिणामांवर परिणाम करू शकतो.
    •   शॉर्टकटमध्ये फक्त काम पटकन संपवणे हे उद्दिष्ट असते, त्यामागे ठराविक उद्दिष्ट किंवा हेतू नसतो.

       उदाहरण: प्रोजेक्टमध्ये आवश्यक माहिती न वाचता थेट निष्कर्ष लिहिणे.

    2. Smart Work :

    •    हे काम चांगल्या पद्धतीने आणि नियोजनबद्ध मार्गाने कमी वेळात पूर्ण करण्याचे तंत्र आहे.
    •    स्मार्ट वर्कमध्ये तंत्रज्ञान आणि कौशल्य वापरून कामाचे नियोजन केले जाते.
    •    दीर्घकालीन यश आणि गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते.

    Shortcut वापरल्याने फक्त तात्पुरते फायदे मिळतात, तर Smart Work दीर्घकालीन आणि शाश्वत यशाकडे नेते.

    There is no shortcut to success.

    Smart Work म्हणजे काय?

    Smart Work म्हणजे कमी वेळेत अधिक परिणाम साधणे. मेहनत कमी पण ती मेहनत योग्य दिशेने करणे महत्त्वाचे आहे. शॉर्टकट घेताना विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. 

    Smart Work कसे करावे?

    कामाचे प्राधान्य ठरवा: सर्वात महत्त्वाचे काम आधी पूर्ण करा, त्याला सुरुवातीला प्राधान्य द्या.

    तंत्रज्ञानाचा वापर करा: तंत्रज्ञानाचा वापर करून कामे सोपी करा. उदा. ऑटोमेशन साधने.

    वेळेचे नियोजन: कामाचे छोटे भाग करा आणि त्यासाठी वेळेची मर्यादा ठरवा.

    काम सोपवा: आवश्यकतेनुसार इतरांना काम सोपवा.

    नवीन कौशल्ये शिकत रहा: नवीन तंत्र आणि पद्धती शिकून स्वतःला कायम अपडेट ठेवा

    यामुळे तुम्ही शॉर्टकट घेत असतानाही अधिक परिणामकारकपणे आणि हुशारीने काम करू शकाल.

    यश मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी :

    धैर्य आणि सातत्य: प्रत्येक टप्प्यावर मेहनत आणि सातत्य ठेवणे.

    योग्य नियोजन: कोणतेही काम व्यवस्थित योजना बनवून करणे.

    समर्पण: यशासाठी तुमच्याकडे ठाम ध्येय असणे आणि त्यासाठी निरंतर प्रयत्न करणे.

    शिकण्याची तयारी: चुका झाल्यावर त्यातून शिकणे आणि स्वतःला सुधारण्याची तयारी ठेवणे.

    आणखी वाचा :