Tag: business

  • Equity म्हणजे काय? 10 मिनिटात समजून घ्या

    Equity म्हणजे काय? 10 मिनिटात समजून घ्या

    मित्रांनो Equity हा शब्द अनेकवेळा ऐकला असेल कारण Business मध्ये या Equity भोवती बऱ्याच गोष्टी फिरत असतात. आपण सुद्धा या इक्विटी बद्दल अनेकवेळा ऐकत असतो, पण इक्विटी म्हणजे नेमकं काय हे खूप कमी जणांना माहीत असतं. तर आजच्या लेखामध्ये जाणून घेऊया या Equity बद्दल.

    Equity म्हणजे काय?

    आपल्या मराठी भाषेत Equity ला एक सुंदर शब्द आहे तो म्हणजे ‘समभाग’. बघा या एका शब्दावरूनच लगेच समजतं की याचा अर्थ काय असू शकतो ते. आता ज्यांना ज्यांना या शब्दावरूनच समजलं असेल की Equity म्हणजे काय त्यांच्यासाठी टाळ्या! पण ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी हा लेख.

    Equity

    तर एकदम साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इक्विटी म्हणजे भागीदारी किंवा तुमचा हिस्सा. जर तुम्ही एखाद्या कंपनीत पैसे गुंतवले असतील आणि तुम्ही त्या कंपनीचे काही शेअर्स खरेदी केले असतील तर याचा अर्थ असा की त्या कंपनीमध्ये तुमची हिस्सेदारी किंवा मालकी आहे म्हणजेच इक्विटी आहे. Owner Point Of View ने बघायचं झाल्यास जेव्हा तुम्ही एखादा Business चालू करता तेव्हा त्यात तुमची 100% इक्विटी असते. कारण तेव्हा त्याची नुकतीच सुरुवात झालेली असते. पण जस जसा हा Business Grow करायला लागतो तस तसा तुम्हाला यात जास्त पैसा Invest करावा लागतो. जेव्हा तुमच्याकडे असलेला सर्व पैसा संपतो तेव्हा तुम्ही बँकेतून किंवा इतर कोणाकडून तो घेता आणि इतरांकडून घेतलेल्या याच पैशाला डेबिट(Debt) असं म्हणतात.

    Equity आणि Debt मधला फरक

    Equity आणि Debt ची Defination आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आली असेलच. आता आपण त्याचं उदाहरण पाहूया. समजा तुम्हाला हॉटेल Business सुरू करायचा आहे. Business सुरु करण्यासाठी तुम्हाला 10 लाख रुपयांची आवश्यकता आहे पण तुमच्याकडे फक्त 6 लाख रुपये आहेत. त्यामुळे अशा स्थितीत तुम्ही विचार केला की, उरलेल्या ४ लाख रुपयांसाठी एखाद्या Investor कडून पैसे घ्यावेत. अशा प्रकारे तुम्ही स्वतः ६ लाख रुपये गुंतवले आणि Investor कडून ४ लाख घेतले. तर आता तुम्हाला एकूण 10 लाख रुपये मिळाले आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमचा हॉटेल Business सुरू करू शकता.

    Differences between Debt & Equity

    या उदाहरणात तुम्ही पाहिलं की तुमच्या Business ला सुरु करण्यासाठी एकूण 10 लाख रुपये लागले पण यात तुम्ही फक्त 6 लाख रुपये गुंतवले. या ६ लाख रुपयांना आपण Equity म्हणतो. याचा अर्थ तुम्ही एकूण पैशाच्या 60 टक्के (10 लाखाचे 60% = 6 लाख) पैसे गुंतवले आहेत. त्यामुळं असं म्हणता येईल की तुम्ही या हॉटेलचे 60% मालक आहात म्हणजेच Business मधील तुमची इक्विटी 60% आहे आणि 40% इक्विटी ही त्या investor ची आहे. याचाच अर्थ तुमच्यावर 40% Liability आहे.  जेव्हा आपण  Equity आणि Liability दोन्ही जोडतो तेव्हा त्याला Assets म्हणतात. थोडक्यात काय तर जे आपल्या मालकीचं ते म्हणजे Assets आणि जे दुसऱ्याला द्यावं लागतं ते Liability.  आपण पाहिलेल्या उदाहरणात 10 लाख रुपये ही तुमची एकूण मालमत्ता आहे म्हणजेच Equity + Liability = Assets  मग  Equity = काय होईल तर Assets – Liability.

    Equity चे प्रकार :-

    1.Normal Equity Shares

    समजा एक कंपनी आहे चंगू मंगू Limited. समजायला काय जातंय! हा तर या कंपनीचे संपूर्ण Shares आहेत 10 लाखाचे. जर तुम्ही चंगू मंगू Limited या कंपनीचे एक लाख Shares विकत घेतले तर या चंगू मंगू Limited कंपनीमध्ये तुमची Equity ही दहा टक्के असेल. म्हणजे तुम्ही या कंपनीचे दहा टक्के हिस्सेदार किंवा मालक असाल. याचप्रमाणे तुम्ही जर का चंगू मंगू Limited या कंपनीचे 10,000 Shares विकत घेत असाल तर या कंपनीमध्ये तुमची मालकी फक्त एक टक्का असेल. अशाच प्रकारे तुम्ही कोणत्याही एखाद्या कंपनीचे जेवढे जास्त किंवा जेवढे कमी Share घेतात त्या प्रमाणे तुमचा मालकी हक्क जास्त किंवा कमी होतो. आता या प्रकारात जर तुम्ही Invest केलेली कंपनी Profit मध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा Profit होईल आणि जर कंपनी Loss मध्ये गेली तर तुम्हाला सुद्धा Loss च होईल.

    Types Of Equity

    आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे तर दुसरा प्रकार आहे

    2. Preference Equity Shares

    समजा जेव्हा मी एखादा Business सुरु केला होता तेव्हा असे काही लोक होते ज्यांनी माझ्या या Business मध्ये पैसे Invest केले होते. तर याच लोकांना मी एक Preference देतो म्हणजे जरी मला या Business मधून Profit झाला किंवा Loss झाला तरी मी त्यांना त्यांचे पैसे Return देणारच म्हणजे इतर लोकांपेक्षा मी या लोकांना एक प्रकारचा Preference दिलेला आहे.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • LTV म्हणजे काय? आणि ती कशी calculate करावी?

    LTV म्हणजे काय? आणि ती कशी calculate करावी?

    जेव्हा एखादा नवीन Customer तुमच्याकडे येतो, तेव्हा तो किती दिवस टिकेल, तो किती value generate करून देणार आहे, हे तुम्हाला माहितेय का? नाही ना? हा लेख वाचल्यावर सांगता येईल. चला सुरुवात करूया. तर आजची आपली टर्म आहे LTV. 

    LTV म्हणजे काय?

    LTV चा full form आहे Life Time Value. काहीजण याला CLTV सुद्धा म्हणतात म्हणजेच Customer LifeTime Value, तर आधी म्हटल्याप्रमाणे एखादा नवीन Customer तुम्हाला किती value generate करून देणार आहे; हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर तुम्हाला त्या customer ची LTV calculate करणं गरजेचं आहे.

    LTV का calculate केली पाहिजे?

    तुमचा Business कितीही मोठा असो किंवा कितीही लहान असो त्यासाठी LTV काढणं हे खूप खूप गरजेचं असतं. कारण एखादा customer तुमच्यासाठी किती revenue generate करतो हे जर तुम्हाला समजलं, तर तुम्ही तुमच्या next business strategies व्यवस्थित implement करू शकता. भविष्यात कमीत कमी पैशांत तुम्ही customer acquire करु शकता, म्हणजे तुमची Customer Acquisition Cost सुद्धा कमी होईल. आता Customer Acquisition Cost म्हणजे काय? हे माहिती आहे का…? विसरलात ना! आम्ही आधीच त्यावर detail मध्ये लेख बनवलेला आहे, तर इन-शॉर्ट Customer Acquisition Cost आणि Customer LifeTime Value ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणा हवं तर. म्हणजे एक जर कमी-जास्त झाली, तर तिचा दुसऱ्यावर परिणाम होतो. त्यामुळं तुमची LTV ही नेहमी CAC पेक्षा जास्त हवी.

    Life Time Value कशी calculate केली जाते?

    LTV का calculate केली पाहिजे हे तुम्हाला समजलं असेलंच. आता ती कशी calculate केली जाते हे समजून घेण्यासाठी आपण Netflix चं उदाहारण पाहूया. तर Netflix चा जो Monthly Plan आहे तो २०० रुपयांचा आहे असं आपण समजू आणि एखादा customer Netflix चं subscription साधारण १२ महिन्यांसाठी घेत असेल.

    तर LTV = Total Amount Customer Pays X Average Customer Life म्हणजे 200 X 12 = Rs. 2400/-

    तर Netflix ची LTV आली Rs. 2400/-. म्हणजे एक customer त्याच्या life time मध्ये Neflix ला Rs. 2400/ मिळवून देतो.

    LTV वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे?

    Quality Service द्या –

    तुम्ही तुमच्या customer ला जेवढी चांगली service द्याल तेवढे दिवस तो तुमच्याकडे टिकेल.

    Average Order Value वाढवा

    एखाद्या customer ला तुमच्याकडे रोजच्यापेक्षा जास्त खर्च करायला लावा. जसं की जर तुमचं छोटं हॉटेल असेल आणि एखादा customer तुमच्याकडे नाष्टा करण्यासाठी आला, तर तुम्ही त्याला चहा पिण्यासाठीसुद्धा convince केलं पाहिजे. कारण तुमच्या प्रॉडक्टवर जेवढा त्याचा खर्च वाढेल, तेवढी तुमची LTV वाढेल.

    Subscription based service द्या –

    तुमच्या बिझनेसमध्ये subscription based service model आणता येतंय का ते पहा. कारण यामध्ये फायदा दोघांचाही होतो. एक म्हणजे तुम्हाला एकदम महिन्याभराचे, वर्षभराचे पैसे मिळतात. दुसरं म्हणजे जर एखादा customer तुमच्याकडे वर्षभरासाठी आहे हे तुम्हाला माहिती असेल, तर तुम्ही त्याला discount सुद्धा देऊ शकता. ज्याचा फायदा त्या customer ला सुद्धा होतो. Amazon, Netflix यांसारखे OTT platforms तेच तर करतात.

    Customer Retention वर भर द्या –

    Customer Retention म्हणजे काय तर एखाद्या customer ला तुम्ही तुमच्याकडे किती काळ टिकवून ठेवता याचा rate. वेगवेगळ्या offers, discounts, rewards देऊन तुम्ही हा rate वाढवू शकता.

    तर मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण LTV म्हणजे काय? LTV का calculate केली पाहिजे? ती कशी calculate केली जाते? ती वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर आत्ताच like करा आणि तुमच्या बिझनेस करणाऱ्या मित्रांना शेअर करा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • Business Plan: तुमच्या व्यवसायाची यशाची गुरुकिल्ली

    Business Plan: तुमच्या व्यवसायाची यशाची गुरुकिल्ली

    BUSINESS PLAN

    कोणतीही गोष्ट करताना आपण एक रफ प्लॅन बनवत असतो. आपण आखलेल्या प्लॅननुसार आपण दिवसभरातील कामकाज करत असतो. काही वेळेस तुम्ही केलेल्या प्लॅननुसार गोष्टी घडतात, तर काही वेळेस त्या घडत नाहीत, मात्र तरीही आपण प्लॅन हा बनवतोच. हे झाले आपल्या रोजच्या दिवसाचे. मात्र ज्यावेळी आपल्याला एखादा बिझनेस चालू करायचा असतो, त्यावेळी आपण आपल्याला वाटलं म्हणून कोणताही बिझनेस चालू नाही करू शकत ना! याचसाठी सर्वात महत्वाचे आहे ते Business Planning.

    Business Plan ची सरळ सोपी व्याख्या म्हणजे असे document ज्यात कंपनीची उद्दिष्टे आणि ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठीच्या योजनांचा तपशील असतो. तुमचं उत्पादन बाजारात कोणत्या पद्धतीने येणार, ते कोणत्या ग्राहकाला आकर्षित करणार आहे, तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धीला कशी मात देणार, तुमच्या व्यवसायाचं बाजारमूल्य किती असणार, Business च्या बाबतीतला तुमचा दृष्टीकोन काय आहे यांसारख्या अनेक गोष्टींची मांडणी बिझनेस मॉडेलमध्ये असते. भविष्यामध्ये जशी परिस्थिती आणि गरज बदलते, त्यानुसार बिझनेस प्लॅन देखील बदलत असतो.

    आता Business Plan करणं का गरजेचं आहे ते पाहूया.

    पहिला मुद्दा म्हणजे कोणत्याही बिझनेसमध्ये गुंतवणूक करण्याआधी इन्वेस्टर कंपनीचा बिजनेस प्लॅन बघतात. तो प्लॅन जर त्यांना convincing वाटला तरच ते तुमच्या business मध्ये गुंतवणूक करतात. तर दुसरा मुद्दा आहे लोनसंदर्भात. जर तुम्हाला तुमच्या business development साठी बँकेतून लोन घ्यायचे असेल तर बँकेला आधी हे सांगणं गरजेचं असत की तुम्हाला ते लोन कशासाठी पाहिजे आहे? तुम्ही मिळणाऱ्या पैशांचा वापर कशा पद्धतीने करणार आहात. जर तुमच्याकडे business plan असेल तर या सर्व गोष्टी explain करण तुम्हाला सोप्पं जातं.

    तिसरा मुद्दा म्हणजे चांगले Employee मिळवण्यासाठी देखील बिझनेस प्लॅनचा उपयोग होतो. बरेच employee हे त्या ज्या कंपनीत काम करण्यासाठी इच्छुक आहेत त्या कंपनीचे future goals काय आहेत आणि ते आपल्या future goals ला पोषक आहेत का हे तपासतात. या सगळ्याचे तपशील त्यांना बिजनेस प्लॅनमध्ये मिळतात.

    बिझनेस करताना अनेक अडचणी येतात आणि बिझनेस प्लॅनमुळे तुम्हाला आधीच त्याची तयारी करता येते.

    आता वळूयात बिझनेस प्लॅनच्या प्रकाराकडे

    बिजनेस प्लॅनचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे Simple Business Plan आणि दुसरा प्रकार आहे Detailed Project Report (DPR)

    तर जाणून घेऊयात Simple Business Plan बद्दल

    या बिजनेस प्लॅन मध्ये Short मध्ये एक-दोन पानांत किंवा ८-१० स्लाईडच्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व माहिती सांगितलेली असते. या प्रकारचा Business प्लॅन बऱ्यापैकी वापरला जातो. या plan मध्ये मार्केटची समस्या, तुम्ही त्यावर देत असलेले उपाय, तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस, तुमचे स्पर्धक आणि तुमची वैशिष्ट्ये, मार्केटिंग, ब्रॅंडिंग आणि सेल्स प्लॅन, व्यवसायाची उलाढाल, खर्च व नफा यांची अंदाजे गणितं हे सगळे महत्त्वाचे मुद्दे येतात.

    आता जाणून घेऊयात Detailed Project Report बद्दल

    हा बिझनेस प्लॅन एकदम Detail मध्ये लिहिलेला असतो. हा कधीकधी 25 ते 30 पानांचा देखील असू शकतो. यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक वर्षे मागदर्शन होत राहते, कारण यामध्ये सर्व माहिती एकदम Detail मध्ये लिहिलेली असते. बँका आणि Investor व्यवसायला Loan देण्याआधी किंवा Business मध्ये Investment करण्याआधी या बिझनेस प्लॅनची मागणी करतात. या मध्ये वर Simple Business Plan मध्ये नमूद केलेले सर्वच मुद्दे येतात. फरक फक्त इतकाच की वर हेच मुद्दे अत्यंत कमी शब्दांत येतात, तर यात सविस्तर येतात.

    वरील दोन्ही Business प्लॅनमध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार अनेक गोष्टी अजून Add करू शकता किंवा यातील काही गोष्टी कमी देखील करू शकता.

  • उद्योग महाराष्ट्राचे : प्रस्तावना

    उद्योग महाराष्ट्राचे : प्रस्तावना

    👍 महाराष्ट्राचा इतिहास

    महाराष्ट्र राज्याला भूगोल आहे आणि इतिहाससुद्धा! गौरवशाली इतिहासाची परंपरा आपणास प्राचीन कालखंडात दिसते. मध्ययुगात सर्व भारतभर परकीय आक्रमणाचे ढग दाटून आलेले होते. या नैराश्यपूर्ण मळभावर विजयनगरचे साम्राज्य आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे अपवाद आपणास दिसून येतात. मराठी सत्तेच्या पतनानंतर इंग्रजांचा अंमल महाराष्ट्रावर सुरू झाला. इंग्रजांविरुद्धच्या संघर्षात आद्य क्रांतिकारकांपासून ते सर्वसामान्य माणसांपर्यंत अनेकांनी बलिदान केले आणि हा देश स्वतंत्र झाला. १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाल्यावर महाराष्ट्राला पुन्हा एकदा भाषिक राज्यासाठी लढा द्यावा लागला. १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले. अर्थात बेळगाव वगळून! १९६० ते आजतागायत स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

    d618ae35 53f7 410b 8a0d 23ac74e98f42.jpg

    👍 महाराष्ट्र भौगोलिक स्थान व क्षेत्रफळ :


    दिनांक १ मे, १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना झाली.
    महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ. कि. मी. इतके आहे.

    विस्तार – महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम जास्तीत जास्त लांबी ८०० कि. मी. आणि उत्तर-दक्षिण जास्तीत जास्त लांबी ७०० कि.मी. आहे.

    क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा राजस्थान, मध्यप्रदेशनंतर भारतात तिसरा क्रमांक लागतो. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी (३२,८७,२६३ चौ. कि.मी.) ९.३६ % इतका हिस्सा महाराष्ट्राने व्यापला आहे.

    महाराष्ट्राच्या वायव्येस-गुजरात राज्य, दादरा व नगर हवेली , उत्तरेला -मध्य प्रदेश, पूर्वेस – छत्तीसगढ, आग्नेयेस – तेलंगणा, दक्षिणेस – कर्नाटक आणि अगदी दक्षिणेस – गोवा राज्य आहे. राज्याच्या पश्चिम सीमेलगत अरबी महासागर पसरलेला आहे.

    👍 महाराष्ट्रातील उद्योग:

    औद्योगिकीकरणाच्या क्षेत्रात महाराष्ट्र हे आजही देशातील अव्वल राज्य म्हणून गणले जाते. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात कृषी-औद्योगिक रचनेचा पाया घातला. राज्यातील वातावरण उद्योगवाढीला पोषक राहील, याची काळजी यशवंतरावांनी सुरुवातीपासून घेतली.

    मुबंई हे भारतातील प्रमुख औद्योगिक-आर्थिक केंद्र मानले जाते. राज्याचा विकास होण्याकरिता पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. यादृष्टीने महाराष्ट्रातील विविध औद्योगिक विकास महामंडळे, मुंबई हे आंतरराष्ट्रीय बंदर, वाहतूक व संदेशवहनाच्या अत्याधुनिक सुविधा, वित्तीय संस्था व महामंडळे, पाणी, वीज, रस्ते आदी सुविधा, मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर यांसारखी औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची शहरे राज्याच्या औद्योगिक विकासामधे मोलाचा वाटा उचलत आहेत. महाराष्ट्राचा जीएसडीपी २५.३५ लाख कोटी (३८० अब्ज डॉलर्स) आहे. ऑगस्ट १९९१ ते नोव्हेंबर, २०१६ या कालावधीत ११,३७,७८३ कोटी रु. गुंतवणुकीच्या एकूण १९,४३७ उद्योगांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. देशाच्या एकूण औद्योगिक गुंतवणूकीमध्ये महाराष्ट्राचा वाटा १०% असून त्यामधून देशातील एकूण रोजगार उपलब्धतेच्या १५% रोजगार प्राप्त होतो. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा २३% आहे. (या विभागातील आकडेवारी ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी : २०१६ -१७ नुसार अद्ययावत करण्यात आली आहे.)

    👍 महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांचे प्रकार :


    १. कृषी उत्पादनांवर आधारित उद्योग – यामध्ये कापड उद्योग, साखर उद्योग, तेलगिरण्या, तंबाखू प्रक्रिया, डाळ मील, वाईन, रबर उद्योग यांसारख्या उद्योगांचा समावेश होतो.
    २. खनिज उत्पादनांवर आधारित उद्योग – यामध्ये लोह पोलाद उद्योग, सिमेंट उद्योग, खनिज तेल शुद्धीकरण केंद्र, यंत्रोद्योग यांचा समावेश होतो.
    ३. वन उत्पादनांवर आधारित उद्योग – लाकूड कापण्याच्या गिरण्या, कागद कारखाने, आगपेट्यांचे कारखाने, औषधे निर्मिती, खेळांचे साहित्य, फर्निचर निर्मिती उद्योग यांचा समावेश होतो.
    ४. प्राणिज उत्पादनांवर आधारित उद्योग – यामध्ये कातडी उद्योग, लोकरी कापडाच्या गिरण्या, रेशीम उद्योग, दुग्धजन्य पदार्थ उद्योग यांचा समावेश होतो.

    त्याच बरोबरीने बांधकाम उद्योग, पर्यटन उद्योग, सेवा क्षेत्र, वाहन उद्योग, प्रकाशन व मुद्रण उद्योग, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, करमणूक उद्योग हे सर्व उद्योग जोमाने वाढत आहेत.

    देशातील औद्योगिक गुंतवणुकीतील महाराष्ट्राचे अग्रस्थान कायम राखणे, राज्यातील औद्योगिकदृष्टया मागास भागांत गुंतवणुकीचा वेग कायम राखणे, नवीन गुंतवणूक वाढवण्यास चालना देणे, रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करणे, ही उद्दिष्टे कशी पूर्ण करायची, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना आपण पुढील लेखांमध्ये बघणार आहोत. धन्यवाद

  • चॉकलेट गोळ्या विकून सगळ्यात मोठा तेलाचा व्यापारी बनलेल्या ‘जगातील पहिला अब्जाधीश माणूस’

    चॉकलेट गोळ्या विकून सगळ्यात मोठा तेलाचा व्यापारी बनलेल्या ‘जगातील पहिला अब्जाधीश माणूस’

    जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचा जन्म १८३९ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे झाला. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या रॉकफेलर यांना लहानपणापासूनच घर चालवण्यासाठी काम करावं लागत होतं. त्यांच्या वडिलांचा औषधं विकण्याचा व्यवसाय होता; पण त्यात त्यांचा जम बसत नव्हता. त्यामुळं त्यांना अनेक शहरात फिरावं लागत होतं.

    अखेरीस १८५४ मध्ये हे कुटुंब ओहिओ इथं येऊन स्थिरावले. जॉन यांना आपलं शालेय शिक्षण पूर्ण करायचं होत, पण परिस्थितीमुळं त्यांना ते करता आलं नाही. पोट भरण्यासाठी हाताला काम पाहिजे म्हणून त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी बुक किपिंगचा एक कोर्स केला आणि एका कंपनीमध्ये बुक किपर म्हणून रुजू झाले. लहानपानपासूनच त्यांना दानधर्म करायची भारी आवड होती. तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं कि आपण जितक कमावू त्याच्यातील १०% उत्पन्न हे दान करायचं.

    download

    २६ सप्टेंबर या दिवशी त्यांना नोकरी मिळाली होती, म्हणून ते हा दिवस “जॉब डे” म्हणून साजरा करत. सुरुवातील प्रतिमहिना १६ डॉलर्स आणि नंतर ३१ डॉलर्स प्रतिमहिना पगारावर दोन वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करायच ठरवलं. त्यांनी बँकेतून लोन घेऊन, आपल्या सहकाऱ्यांसोबत स्वतःची कंपनी चालु केली. ही कंपनी धान्य खरेदी विक्री करायचं काम करत होती. अमेरिकेतील १८५७च्या मंदीच्या काळातसुद्धा रॉकफेलर यांचा व्यवसाय जोमात चालू होता.

    त्याच दरम्यान, म्हणजे १८५० ते १८६० मध्ये चालू झालं ते “पेनसिल्वनिया ऑईल रश”. पेनसिल्वनियामध्ये तेलाच्या खाणी सापडल्या. त्यामुळे सगळे व्यापारी तेल खणण्याच्या व्यवसायाकडे वळले. पण तेल खाणकाम व्यवसाय बऱ्यापैकी नशिबावर अवलंबून असल्याने त्या मार्गाने न जाता रॉकफेलर यांनी तेल शुद्धीकरणाचे कारखाने चालू केले. आणि यातूनच जन्म झाला तो “स्टँडर्ड ऑइल”चा. चोवीस वर्षीय रॉकफेलर यांच्यासाठी हा खरा टर्निंग पॉइंट होता आणि अमेरिकेसाठीसुद्धा.

    Pithole oil tanks AOGHS e1638111035588

    रॉकफेलर यांचा रिफायनरी व्यवसाय उत्तरोत्तर वाढत होता. यातून मिळणारा नफाही तितकाच मोठा होता, पण प्रश्न होता तो ट्रान्सपोर्टचा. या काळात रेल्वे इंडस्ट्री ही काही ठराविक लोकांच्या अधिपत्याखाली होती. त्यांच्या मर्जीशिवाय वाहतूक करणे शक्य नव्हते, यावेळी व्यवहार चातुर्य वापरून रॉकफेलर यांनी या लोकांसोबत बोलणी करून फक्त स्टॅंडर्ड ऑइल कंपनीसाठीच कमी दरात वाहतूक करण्याची परवानगी मिळवली. यामुळे स्टँडर्ड ऑइलचे केरोसीन हे सर्वात कमी किमतीला लोकांना उपलब्ध झालं.

    त्यानंतर त्यांनी ऑइल हे पाईपलाईनद्वारे कसं ट्रान्सपोर्ट केलं जाऊ शकतं हे पाहिलं. पाइपमधून ऑईल ट्रान्सपोर्ट करण्याचा हा जगातील पहिलाच प्रयोग होता. तेलाचं शुद्धीकरण करताना खूप तेल वाया जात होतं. यावेळी रॉकफेलर यांनी एक कमिटी बसवून वाया गेलेल्या तेलापासून पासून काय बनवता येईल हे पाहिलं आणि तेव्हा जन्माला आलं ते tar म्हणजेच डांबर, पेट्रोलियम जेली आणि पॅराफीन वॅक्स.

    Overview oil pipeline Standard Oil Company and
    Pipeline of Standard Oil, Img. Source : Britannica

    Horizontal Integration पद्धतीचा वापर करून छोट्या आणि डबघाईला जाणाऱ्या सगळ्या कंपन्या takeover करत रॉकफेलर आपला व्यापार वाढवत होते. त्यांचा टेकओव्हरचा वेग इतका होता की दर महिन्याला ३-४ कंपन्या विकत घ्यायचे. आलेला सगळा नफा पुन्हा व्यवसाय वाढवण्यासाठी वापरत होते. याचा परिणाम असा झाला की, १८९०च्या दशकात अमेरिकेतील ९०% ऑइल रिफायनरी या फक्त स्टँडर्ड ऑईल कंपनीच्या होत्या; तर अमेरिकेत पुरवठा होणाऱ्या एकूण केरोसीनपैकी ९८ टक्के केरोसीन हे स्टँडर्ड ऑइल विकत होतं.

    अशाप्रकारे स्टॅंडर्ड ऑइलची अमेरिकेत मक्तेदारी तयार होत होती. ती इतकी झाली की, स्टँडर्ड ऑइल अंतर्गत वीस हजार तेलाच्या विहिरी, ४००० ट्रान्सपोर्ट पाईपलाईन, तर जवळपास एक लाख कामगार काम करत होते.

    १९०२साली इडा डारबेल या महिलेने स्टॅंडर्ड ऑइलवर काही लेख लिहिले. त्याच पुढे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालं. यात तिने असा आरोप केला होता की, स्टँडर्ड ऑइलने अनेक कंपन्या जबदस्तीने विकत घेतल्या आहेत. यानंतर काही पत्रकारांनी सुद्धा रॉकफेलर यांच्यावर अनेक आरोप केले.

    अखेरीस या मक्तेदारीला आळा घालण्यासाठी अमेरिका सरकारने “शेअरमन अँटी ट्रस्ट ऍक्ट” पारित केला. यामुळे स्टँडर्ड ऑइल ३४ वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभागली गेली. विभाजनानंतरही या कंपन्या प्रगती करत होत्या. पुढे या कंपन्या एकमेकात विलीन होत एकत्र येत गेल्या. या कंपन्या आजही अमेरिकन तेल उद्योगाचा गाभा आहेत. अमेरिकेतील शेवरॉन, एक्सॉन मोबिल, ब्रिटिश पेट्रोलियम, मॅरेथॉन पेट्रोलियम या कंपन्या त्याचाच एक भाग आहेत.

    EYErhiXXQAIE8tY

    १८९३ मध्ये त्यांची भेट स्वामी विवेकानंद यांच्यासोबत झाली. स्वामी विवेकानंदांकडून त्यांनी दानधर्म करण्याबाबत चर्चा केली. पुढे १८९५ नंतर रॉकफेलर यांनी रिटायरमेंट घेतली आणि आपले उर्वरित आयुष्य दानधर्म करण्यात घालवले. त्यांनी युनिवर्सिटी ऑफ शिकागो उभारण्यात मदत केली. १९०९ मध्ये चालू झालेल्या रॉकफेलर सॅनिटरी कमिशनने अमेरिकेतून हुकवर्म हा रोग समूळ नष्ट होण्यासाठी प्रयत्न केले आणि पुढच्या वीस वर्षात त्यांनी आपले लक्ष्य साध्य देखील केले. रॉकफेलर फाउंडेशनमार्फत त्यांनी रिसर्च अँड डेव्हलपमेंटला प्रोत्साहन दिलं. अशा अनेक सामाजिक कार्यांसाठी लक्षावधी डॉलर्स रॉकफेलर यांनी दान केले.

    १९१६ साली ते आधुनिक जगातील पहिले अब्जाधीश बनले. अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या २ टक्के इतकी एकट्या रॉकफेलर यांची संपत्ती होती. आजच्या मूल्यानुसार हा आकडा ४८० अब्ज डॉलर्स म्हणजे ३५ लाख कोटींहून अधिक होतो. म्हणजे सध्या जगात सर्वात श्रीमंत असलेल्या एलोन मस्कहुन दुपटीने अधिक.

    Screenshot 2023 12 19 105646

    पुढे त्यांनी स्टील उद्योग क्षेत्रात सुद्धा शिरकाव केला. पण लवकरच स्टील उद्योग सम्राट अँड्र्यू कार्नेगी यांनी ती कंपनी विकत घेतली आणि यामुळे युनायटेड स्टील जगातील सर्वात मोठी कंपनी बनली. पुढील लेखात आपण याच युनायटेड स्टीलचे संस्थापक अँड्र्यू कार्नेगी यांचा जीवनप्रवास जाणून घेणार आहोत.

    रॉकफेलर यांच्या दोन महत्त्वाच्या इच्छा होत्या, त्यापैकी एक म्हणजे १ लाख डॉलर्स कमावणे आणि दुसरे होते शंभर वर्षे जगणे. त्यातली पहिली इच्छा त्यांनी पूर्ण केली, पण दुसरी मात्र होता होता राहिली. वयाच्या ९७व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गरीब म्हणून जन्माला आलो तरी गरीब म्हणून मरणार नाही, हेच रॉकफेलर आपल्याला शिकवून जातात.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

    आणखी वाचा