Blog

  • इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट २०२६: जागतिक एआय (AI) क्रांतीचे केंद्र म्हणून भारताचा उदय

    इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट २०२६: जागतिक एआय (AI) क्रांतीचे केंद्र म्हणून भारताचा उदय 

    मानवी संस्कृतीच्या वाटचालीत तंत्रज्ञान जेव्हा केवळ प्रगतीचे साधन न राहता सामाजिक परिवर्तनाचा कणा बनते, तेव्हा खऱ्या अर्थाने नव्या युगाची सुरुवात होते. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे १६ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली ‘इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट’ हा असाच एक ऐतिहासिक टप्पा ठरत आहे. ‘ग्लोबल साऊथ’ (जागतिक दक्षिण) मधील देशांनी आयोजित केलेली ही पहिलीच मोठी जागतिक शिखर परिषद असून, तिने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या समिटने केवळ तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेवर चर्चा न करता, त्याच्या प्रत्यक्ष ‘प्रभावावर’ (Impact) लक्ष केंद्रित करून भारताला एआय क्षेत्रातील जागतिक धोरणकर्ता म्हणून प्रस्थापित केले आहे.

    ‘मानव’ (MANAV) व्हिजन: एआय(AI) चे मानवीकरण

    भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआय (AI) तंत्रज्ञानाला मशीन-केंद्रित चौकटीतून बाहेर काढून ‘मानव-केंद्रित’ बनवण्यासाठी ‘MANAV’ (मानव) हे पाच कलमी सूत्र जगासमोर मांडले:

    १. M (Moral – नैतिक): एआय (AI) प्रणाली पूर्णपणे नैतिक आणि मानवी मूल्यांच्या चौकटीत असणे आवश्यक आहे.

    २. A (Accountable – उत्तरदायी): तंत्रज्ञानाचा वापर करताना त्याचे प्रशासन पारदर्शक आणि उत्तरदायी असले पाहिजे.

    ३. N (National Sovereignty राष्ट्रीय सार्वभौमत्व): प्रत्येक देशाचा आणि नागरिकाचा त्यांच्या स्वतःच्या डेटावर अधिकार असावा, ज्यामुळे ‘डिजिटल वसाहतवाद’ टाळता येईल.

    ४. A (Accessible – सुलभता): एआय (AI) वर काही मोजक्या कॉर्पोरेट संस्थांची मक्तेदारी नसावी; ते समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे.

    ५. V (Valid – वैधता): एआय मॉडेल्स (AI Models) हे कायदेशीररित्या वैध, विश्वसनीय आणि पडताळणीयोग्य असावेत.

    पंतप्रधानांनी एआय (AI)ची तुलना ‘जीपीएस’ (GPS) शी केली; ज्याप्रमाणे जीपीएस रस्ता दाखवते, पण जाण्याची दिशा चालक ठरवतो, तसेच एआय (AI) चे नियंत्रण नेहमी मानवाच्या हातात राहिले पाहिजे. ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ (सर्वांचे कल्याण आणि सर्वांचा आनंद) हाच भारतासाठी एआय (AI) च्या प्रगतीचा बेंचमार्क असेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

    जागतिक दिग्गजांचा भारतावर विश्वास

    या परिषदेत जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रमुखांनी उपस्थित राहून भारताच्या वाढत्या तांत्रिक सामर्थ्याचे कौतुक केले:

    सुंदर पिचाई (Google): पिचाई यांनी ‘इंडिया-अमेरिका कनेक्ट’ या नवीन उपक्रमाची घोषणा केली, ज्यांतर्गत भारत, अमेरिका आणि दक्षिण गोलार्धातील देशांना जोडण्यासाठी नवीन सब-सी (समुद्राखालून) केबल मार्ग तयार केले जातील. यामुळे एआय (AI) डेटा ट्रान्सफरची गती प्रचंड वाढेल. तसेच, भारतीयांच्या कौशल्य विकासासाठी ‘Google AI Professional Certificate’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रमही त्यांनी लाँच केला.

    सॅम ऑल्टमन (OpenAI): ऑल्टमन यांनी नमूद केले की, भारताकडे ‘फुल-स्टॅक एआय (AI) लीडर’ बनण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिभा, धोरणे आणि उत्साह आहे. ओपन-एआय (OpenAI) भारतात आपली व्याप्ती वाढवण्यासाठी भारत सरकारसोबत नवीन भागीदारी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    इमॅन्युएल मॅक्रॉन (फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष): मॅक्रॉन यांनी भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचे (UPI, आधार) कौतुक केले आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी सोशल मीडियावर कडक निर्बंध लादण्याचे आवाहन केले.

    एन. चंद्रशेखरन (टाटा सन्स):  चंद्रशेखरन यांनी एआय (AI) ची तुलना वाफेचे इंजिन, वीज आणि इंटरनेटशी केली. आयटी उद्योगासाठी एआय (AI) हा अडथळा नसून सर्वात मोठी संधी असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

    नंदन निलेकणी (Infosys): निलेकणी यांनी डिप्लॉयमेंट गॅप (Deployment Gap) ही मुख्य अडचण असल्याचे सांगितले. एआय (AI)चा वापर करून जुन्या प्रणालींचे आधुनिकीकरण (Modernization) करणे आता आर्थिकदृष्ट्या अधिक सुलभ झाले आहे, असे त्यांनी नमूद केले.

    तात्विक पाया: तीन सूत्रे आणि सात चक्रं


    तीन सूत्रे

    या शिखर परिषदेची संपूर्ण रचना भारताच्या प्राचीन ज्ञानाला आधुनिक विज्ञानाशी जोडणाऱ्या संकल्पनांवर आधारित आहे. ही परिषद लोक (People), ग्रह (Planet) आणि प्रगती (Progress) या तीन मूलभूत सूत्रांवर उभी आहे.

    या सूत्रांच्या अंमलबजावणीसाठी सात तांत्रिक चक्रं:

    सुरक्षित आणि विश्वासार्ह एआय (AI):

    एआय (AI) सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह असावा यासाठी मजबूत नियम आणि तंत्रज्ञान आवश्यक आहे, जे सर्व देशांना एआय (AI) नियंत्रणात सहभागी होण्यास मदत करतील.

    ह्युमन कॅपिटल (मानव भांडवल):

    एआय (AI) मुळे नोकऱ्या आणि कौशल्ये बदलत आहेत, म्हणून लोकांना नवीन कौशल्ये शिकवून रोजगार संधी समानपणे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

    विज्ञान:

    एआय (AI) विज्ञान संशोधनात मोठी मदत करत आहे आणि त्याचा वापर करून जागतिक स्तरावर सहकार्य व पारदर्शक संशोधनाला चालना देणे हे उद्दिष्ट आहे.

    अनुकूलता, नवीन कल्पकता आणि कार्यक्षमता:

    एआय (AI) मुळे ऊर्जा आणि पर्यावरणावर परिणाम होतो, म्हणून कमी संसाधनात कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक एआय (AI) प्रणाली विकसित करणे महत्त्वाचे आहे.

    सामाजिक सक्षमीकरणासाठी समावेश:

    एआय (AI) सर्व लोकांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित करावा, जेणेकरून सर्व समाजघटकांना त्याचा फायदा मिळेल.

    एआय (AI) संसाधनांचे लोकशाहीकरण:

    एआयसाठी आवश्यक संगणकीय आणि डेटा संसाधने सर्व देशांना परवडणारी आणि उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे.

    आर्थिक प्रगती आणि सामाजिक कल्याण:

    एआय (AI) चा वापर करून अर्थव्यवस्था वाढवणे आणि लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सेवा आणि नवोन्मेषाला चालना देणे महत्त्वाचे आहे.

    स्वदेशी एआय: ‘भारतजेन’ आणि सार्वभौम मॉडेल्स

    इंडिया-एआय मिशन (India AI mission) अंतर्गत भारत स्वतःचे Sovereign AI (सार्वभौम एआय) विकसित करण्यावर भर देत आहे.

    भारतजेन (BharatGen): हा जगातील पहिला सरकारी अर्थसहाय्यित बहुभाषिक एआय (AI) उपक्रम आहे, जो भारताच्या सर्व २२ भाषांना सपोर्ट करतो. हे मॉडेल केवळ भाषांतर करत नाहीत, तर भारतीय संस्कृती आणि स्थानिक संदर्भांचा विचार करून उत्तरे देतात.

    सर्वम एआय (Sarvam AI): या स्टार्टअपचे ‘Sarvam-1’ आणि ‘Bulbul V3’ सारखी मॉडेल्स भारतीय भाषांमधील टेक्स्ट-टू-स्पीच आणि व्हिजन प्रणालीमध्ये क्रांती घडवून आणत आहेत.

    सामाजिक परिणाम आणि जागतिक आव्हाने

    परिषदेचा मुख्य भर एआय (AI) ला सर्वसामान्यांच्या जीवनात आणण्यावर होता. ‘एआय फॉर ऑल’ (AI for ALL), ‘एआय बाय हर’ (AI by HER), आणि ‘युवा-एआय’ (YUVAi) या तीन प्रमुख जागतिक आव्हानांद्वारे (Challenges) सामाजिक परिणाम घडवणाऱ्या स्टार्टअप्स (Startups)ना गौरवण्यात आले. आरोग्य, कृषी, हवामान बदल आणि समावेशकता या क्षेत्रातील १० विजेत्यांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

    सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात नेटवर्क-आधारित ओळख शोधण्याचे तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले, जे नागरिकांना ऑनलाइन फसवणूक आणि ‘डिजिटल अरेस्ट’ सारख्या गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी गेम-चेंजर ठरेल.

    ‘इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ ही केवळ एक तांत्रिक परिषद नाही, तर ती भारताच्या तांत्रिक आत्मविश्वासाचा आविष्कार आहे. या परिषदेने सिद्ध केले की भारत आता केवळ तंत्रज्ञानाचा वापरकर्ता राहिलेला नाही, तर तो जगाला दिशा देणारा निर्माता बनला आहे. सुरक्षित, विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक एआयच्या माध्यमातून भारत केवळ स्वतःचाच नव्हे, तर संपूर्ण जागतिक दक्षिणचा विकास सुनिश्चित करत आहे. ही परिषद ‘विकसित भारत @ २०४७’ या स्वप्नाच्या दिशेने टाकलेले एक निर्णायक पाऊल आहे.

  • छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्थकारण

    छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्थकारण

    छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले की आपल्या डोळ्यांसमोर पराक्रम, स्वराज्य आणि शौर्य उभे राहते. मात्र त्यांच्या कार्याचा सर्वात भक्कम आणि दीर्घकालीन परिणाम ज्यामुळे स्वराज्य टिकले, तो म्हणजे त्यांचे सुजाण आणि दूरदृष्टीपूर्ण अर्थकारण. शिवाजी महाराजांची अर्थनीति ही केवळ महसूल गोळा करण्यापुरती मर्यादित नव्हती; ती शेतकरी, व्यापारी, कारागीर, सैनिक आणि सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून उभारलेली सर्वसमावेशक व्यवस्था होती.

    १. कृषीप्रधान पण लोकाभिमुख अर्थव्यवस्था

    शिवाजी महाराजांच्या काळात शेती हा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत होता. “शेतकरी सुखी तर राज्य सुखी” या तत्त्वावर आखलेली त्यांची शेतीविषयक धोरणे ही त्यांच्या अर्थकारणाची कणा होती. त्याकाळी फक्त लागवडीखालील जमिनीवरच सारा आकारला जाई, जमिनीची प्रत व उत्पादनक्षमतेनुसार महसूल निश्चित केला जाई, दुष्काळ किंवा संकटात करसवलती दिल्या जात व पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी प्रोत्साहन दिले जाई. शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज, बियाणे, बैल, अगदी गायी खरेदीसाठीही आर्थिक मदत दिली जात असे. वसुली करताना तगादा न लावता टप्प्याटप्याने परतफेड करण्याची सूचना होती. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी न होता स्वाभिमानाने जगू शकला.

    २. शेती आणि सैन्य यांचा समतोल

    शिवाजी महाराजांनी साधारणपणे प्रत्येक शेतकरी कुटुंबातील एक व्यक्ती सैन्यात घेतली. त्यामुळे कुटुंबाला शेती व नोकरी या दोन्ही मार्गांनी उत्पन्न मिळत असे. एखादा शेतकरी कर्ता असल्यास त्याला शेतीच्या हंगामात विशेष रजा दिली जाई.
    सैनिकांना शेतीची हानी होणार नाही याची कडक सूचना होती. छावण्या उजाड माळरानावर उभाराव्यात, शेतात हत्ती-घोडे नेऊ नयेत, रात्री दिवा विझवून झोपावे—अशा सूचनांतून महाराजांची लोककल्याणाची संवेदनशीलता दिसून येते.

    ३. स्थानिक उद्योगांना संरक्षण

    स्वराज्याची अर्थव्यवस्था ही केवळ कृषीप्रधान नव्हती; ती उद्योग आणि व्यापाराभिमुख होती. शिवाजी महाराजांनी स्थानिक लघुउद्योगांना मोठे प्रोत्साहन दिले. परकीय मीठावर अधिक कर व कोकणच्या मीठावर शून्य निर्यातकर ठेवण्याचे धोरण महाराजांनी केले, स्थानिक कारागिरांना पोषक वातावरण दिले. स्वदेशी उद्योगांचे संरक्षण करून त्यांनी आर्थिक स्वावलंबन साधले.

    ४. व्यापारी धोरण आणि सागरी अर्थव्यवस्था

    छत्रपती शिवाजी महाराजांची व्यापारी धोरणे अत्यंत प्रगत होती. त्यांनी दाभोळ, कल्याण, भिवंडी, वेंगुर्ला यांसारखी व्यापारी केंद्रे विकसित केली.
    समुद्रमार्गे व्यापाराचे महत्त्व ओळखून त्यांनी आरमार उभारले. कल्याण-भिवंडी येथे जहाजबांधणी कारखाने सुरू केले. स्थानिक कोळी व भंडारी समाजाला प्रशिक्षण देऊन रोजगारनिर्मिती केली.
    सिंधुदुर्ग, खांदेरी-उंदेरी यांसारखे जलदुर्ग उभारून दर्यावर नियंत्रण मिळवले. व्यापाऱ्यांकडून संरक्षणकर घेतला. त्यामुळे समुद्रमार्गेही स्वराज्यात नियमित उत्पन्न येत राहिले. या सागरी व्यापार, सागरी आरमार व सागरी दुर्गांच्या व्यवस्थेमुळे शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे आदर्श मानले जाते. 

    ५. लूट आणि आर्थिक शिस्त

    स्वराज्यातील उत्पन्नाचा एक भाग लुटीतूनही येत असे; परंतु ती लूट केवळ श्रीमंत व्यापाऱ्यांवर केंद्रित असे. स्त्रिया व मुलांना स्पर्श न करण्याचे कठोर आदेश होते. लुटीतील माल सरदारांना वाटण्याची जुनी पद्धत बंद करून संपूर्ण माल खजिन्यात जमा केला जाई. त्याचे ऑडिट केले जाई. सरदार व सैनिक पगारी असल्याने त्यांना स्वतंत्र हिस्सा देण्यात येत नसे. ही पद्धत आर्थिक पारदर्शकतेचे उत्तम उदाहरण आहे.

    ६. पगारी प्रशासन आणि वतनदारीला नकार

    त्या काळात बहुतांश राज्यांत वतनदारी-जहागीरदारी पद्धत होती, पण शिवाजी महाराजांनी ही पद्धत नाकारली आणि वेतनदारी पद्धत स्वीकारली. महाराजांनी सैनिक, सरदार, अष्टप्रधान मंडळ पगारी ठेवले. प्रत्येकाला नियमित वेतन दिले व प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवण्याचा नियम केला. यामुळे प्रशासनावर केंद्रीय नियंत्रण राहिले आणि भ्रष्टाचाराला आळा बसला.

    ७. कररचना आणि न्याय्य महसूल

    शिवाजी महाराजांची कररचना पुरोगामी होती. कर उत्पन्न क्षमतेनुसार आकारले जाई. सरसकट सर्वांकडून समान कर आकारला जात नसे. राज्याभिषेकाच्या खर्चासाठी “सिंहासन पट्टी” हा तात्पुरता कर लावण्यात आला. खर्चाची तूट भरून निघाल्यानंतर तो बंद करण्यात आला. ही आर्थिक जबाबदारी आणि पारदर्शकतेची जाणीव दर्शवणारी बाब आहे.

    ८. चलन व वित्तीय व्यवस्था

    राज्याभिषेकानंतर “शिवराई होन” हे स्वतंत्र नाणे प्रचलित केले. हुंडी, ठेवी, वित्तपुरवठा अशा बँकिंगसदृश व्यवहारांची व्यवस्था अस्तित्वात होती. म्हणजेच स्वराज्याची अर्थव्यवस्था ही केवळ पारंपरिक नव्हे तर संघटित आर्थिक प्रणाली होती.

    ९. खर्चातील संयम आणि प्राधान्य

    शिवाजी महाराजांनी चैनीवर खर्च केला नाही. नाच-गाणे, मद्यपान यांसारख्या गोष्टींना राज्यात स्थान नव्हते. प्रत्येक रुपया लष्करी बळकटी, किल्ले, शेती, व्यापार आणि लोककल्याणासाठी वापरला जात होता. मोगलांसारख्या बलाढ्य सत्तेशी लढण्यासाठी आर्थिक शिस्त आवश्यक होती—आणि ती त्यांनी काटेकोरपणे पाळली.

    १०. लोककेंद्रित आणि न्यायाधिष्ठित अर्थनीती 

    शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी सिंहासनाजवळ तराजूचे प्रतीक ठेवण्यात आले होते. तो न्यायाचा आणि समतेचा द्योतक होता. त्यांची अर्थनीती ही शेतकरी उत्पादकता वाढवणे, स्थानिक उद्योगांना संरक्षण, तरुणांना रोजगार, व्यापारवृद्धी आणि आर्थिक समता या तत्त्वांवर आधारित होती, असे दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्थकारण हे केवळ महसूल गोळा करण्याची प्रणाली नव्हती, तर एक लोकाभिमुख, समतोल आणि स्वावलंबी आर्थिक मॉडेल होते. त्यामुळेच महाराजांचे, स्वराज्याचे अर्थकारण आजच्या काळातही अभ्यासण्यासारखे आहे.

    त्यांनी उभारलेले स्वराज्य हे न्याय, आर्थिक शिस्त, व्यापारवृद्धी, शेतीसंवर्धन आणि सामाजिक समतेवर आधारित होते. म्हणूनच त्यांचे स्वराज्य हे केवळ राजकीय नव्हे तर आर्थिक दृष्ट्याही परिपूर्ण राष्ट्राचे उदाहरण ठरते. छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्थकारण आपल्याला शिकवते—राज्याची खरी ताकद केवळ तलवारीत नसते; ती न्याय्य आणि लोकाभिमुख अर्थव्यवस्थेत असते.

    छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!

    तुमच्या मते, शिवाजी महाराजांच्या अर्थव्यवस्थेतील तुम्हाला भावलेला मुद्दा कोणता? खाली कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हा ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा! 

  • Microsoft ते Lenskart:पियुष बन्सल यांचा प्रेरणादायी प्रवास

    Microsoft ते Lenskart:पियुष बन्सल यांचा प्रेरणादायी प्रवास

    प्रत्येक मोठ्या स्वप्नामागे धैर्य, मेहनत आणि जिद्द दडलेली असते. अशीच सुरुवात आहे एका तरुणाच्या प्रवासाची. त्या तरुणाचं नाव आहे Lenskart चे संस्थापक पियुष बन्सल. जगभरात करिअरचे असंख्य दालने उघडी असताना आणि आरामदायी आयुष्याच्या अनंत शक्यता समोर असताना, पियुष यांनी मात्र अमेरिकेतील उच्च पगाराची, सुरक्षित नोकरी मागे सोडून भारतात परतण्याचं धाडस केलं. स्वतःच्या देशात काहीतरी अर्थपूर्ण उभारण्याच्या स्वप्नावर, जोखीम घेण्याच्या धैर्यावर आणि प्रबळ इच्छाशक्तीवर त्यांनी आपल्या स्वप्नांची बीजं पेरली आणि त्यातूनच जन्म झाला पुढे “Lenskart” या तब्बल ७२,000 कोटींच्या सामर्थ्यशाली कंपनीचा.

    सामान्य माणसाला कमी किमतीत उत्तम दर्जाची दृष्टी सेवा मिळावी हा उद्देश घेऊन सुरू झालेला हा प्रवास भारतीय उद्योजकतेला नवी दिशा देणारा ठरला आहे. २०२५ हे वर्ष त्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरलं असून Lenskart ने आपला IPO लाँच केला आहे. ‘शार्क टँक इंडिया’मधील शार्क म्हणून पियुष बन्सल यांचं व्यक्तिमत्त्व आज लाखो युवकांसाठी प्रेरणेचं प्रतीक बनलं आहे. संघर्ष, चिकाटी, अपयशांवर मात आणि पुन्हा उभं राहण्याची क्षमता,या सर्वांचा मिलाफ म्हणजे पियुष बन्सल यांचा आतापर्यंतचा जीवनप्रवास. या लेखातून त्यांच्या या प्रेरणादायी वाटचालीवर एक नजर टाकूया…

    सुरुवातीचं आयुष्य 

    पियुष बन्सल यांचा जन्म २६ एप्रिल १९८५ रोजी बलकिशन आणि किरण बन्सल यांच्या कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांच्यात नवीन काहीतरी शिकण्याची आणि स्वतःला सतत घडवत राहण्याची वृत्ती होती. इतर मुलं खेळण्यात रमली असताना, पियुष कॉल सेंटरमध्ये काम करू लागले. तिथे ते ग्राहकांच्या तक्रारी ऐकत आणि त्यांच्या समस्या समजून घेत. या अनुभवातून त्यांना ग्राहकांचा स्वभाव आणि त्यांची गरज ओळखणं किती महत्त्वाचं आहे, हे समजलं.

    त्यांच्या प्रामाणिकपणा आणि जिद्दीने प्रभावित होऊन एका वरिष्ठ व्यक्तीने त्यांना कोडिंग शिकण्याची संधी दिली. हीच ती वेळ होती ज्या क्षणापासून त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली. कोडिंगने त्यांच्यासमोर नव्या शक्यता उघडल्या आणि त्यांनी आपल्या पुढच्या प्रवासाची सुरुवात केली.

    उच्च शिक्षण आणि Microsoft मधील भूमिका

    पियुष बन्सल यांनी आपले उच्च शिक्षण कॅनडाच्या मॉन्ट्रियल येथील McGill University मधून इंजिनीअरिंगमध्ये पूर्ण केलं. शिक्षणानंतर त्यांना अमेरिकेत Microsoft मध्ये नोकरी मिळाली, जिथे २००७ मध्ये ते प्रोग्राम मॅनेजर झाले,असं पद, ज्याचं स्वप्न हजारो तरुण पाहतात. या पदामुळे त्यांना मोठ्या कंपनीत काम करण्याचा अनुभव, स्थिर भविष्य आणि परदेशातील आयुष्य जगण्याची संधी मिळाली. अनेक लोकांसाठी हे यशाचं प्रतीक असतं, पण पियुषच्या मनात काहीतरी कमी असल्याची जाणीव सतत होत होती.

    मोठं पद, सुरक्षित भविष्य असूनही त्यांना जाणवत होतं की त्यांच्यात स्वतःचं काहीतरी निर्माण करण्याची ओढ आहे. हीच ओढ आणि आत्मविश्वास त्यांना परत भारताकडे घेऊन आले, इथे त्यांनी स्वतःचं मार्ग तयार करून नव्या संधी शोधायला सुरुवात केली.

    पहिला प्रयत्न अपयशी

    भारत परतल्यावर २००७ मध्ये पियुष बन्सल यांनी SearchMyCampus.com नावाचे स्टार्टअप सुरू केलं. हे प्लॅटफॉर्म मुख्यतः विद्यार्थ्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलं गेलं होतं. सुरुवातीला १५,००० विद्यार्थी जोडले गेले, टीम वाढली आणि अनेक संधी दिसू लागल्या. विद्यार्थ्यांना उपयुक्त असलेला हा उपक्रम त्यांना खूप उत्साही बनवत होता, पण व्यवसायाची वाढ अपेक्षेनुसार होत नव्हती.

    lenskart

    दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर, या स्टार्टअपला बंद करावं लागलं. हे अपयश पियुषसाठी धक्का देणारं होतं, पण त्यांनी हार मानली नाही. उलट, या अनुभवाने त्यांना अधिक सजग आणि समजूतदार बनवले. अपयशातून शिकण्याची संधी त्याला मिळाली आणि पुढील प्रवासासाठी तो अधिक ठाम आणि तयार झाला.

    Flyrr ते Lenskart पर्यंत 

    २००९ मध्ये पियुष बन्सल यांनी Flyrr नावाचा ऑनलाइन आयवेअर व्यवसाय सुरू केला. काही काळ हा उपक्रम चालला, पण नंतर तो बंद करावा लागला. या अनुभवात त्यांना एक महत्त्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे भारतामध्ये चष्म्याची विक्री अजूनही व्यवस्थितरित्या होत नव्हती. देशात ५ कोटींहून अधिक लोकांना चष्म्याची गरज होती, पण व्यवस्थापनाचा अभाव, महाग किंमती आणि कमी दर्जाची सेवा यामुळे त्यांची ही गरज पूर्ण होत नव्हती.

    त्याचबरोबर जवळपास १८ कोटी लोक चष्मा न वापरता राहत होते. या समस्येवर बघताना पियुषने ही संधी म्हणून पाहण्यास सुरुवात केली. त्यांना जाणवले की ही फक्त समस्या नाही, तर भारतातील आयवेअर उद्योगात एक मोठी आणि भव्य संधी आहे, जिथे चांगली सेवा आणि दर्जेदार उत्पादन देऊन लाखो लोकांच्या गरजा पूर्ण करता येऊ शकतात.

    Lenskart च्या क्रांतीचा उदय

    डिसेंबर २०१० मध्ये पियुष बन्सल, अमित चौधरी आणि २०११ मध्ये सुमीत कापाही यांनी एकत्र येऊन Valyoo Technologies अंर्गत Lenskart ची स्थापना केली. सुरुवातीच्या काही महिन्यांत अनेक अडचणी आल्या, जवळपास २०% प्रोडक्ट्स परत येणे, ग्राहकांना योग्य नंबर न मिळणे, फिटिंगमध्ये त्रुटी, आणि डिलिव्हरी नुकसान होणे. या काळात पियुष एकाचवेळी WatchKart, JewelsKart, BagsKart हे तीन उपक्रमही सांभाळत होते, पण त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे ,सगळं थांबवून फक्त Lenskart वर लक्ष देण्यास सुरुवात केली. या निर्णयानंतरच Lenskart चा खरा प्रवास सुरू झाला.

    २०१३ मध्ये Lenskart ने भारतीयांसाठी एक क्रांतिकारी सेवा सुरू केली, फ्री होम आय चेकअप. या सेवेत प्रशिक्षित तंत्रज्ञ थेट घरपोच येऊन काही मिनिटांतच नंबर तपासणी करायचे, ज्यामुळे लाखो लोकांपर्यंत सहज पद्धतीने सेवा पोहोचली. ही सेवा ग्राहकांसाठी नव्या अनुभवाची सुरुवात ठरली आणि त्यांना घरबसल्या चष्मे मिळण्याची सुविधा मिळाली.

    फक्त एका वर्षातच Lenskart ने मोठ्या गतीने प्रगती केली. १०,००० हून अधिक घरभेटी, दररोज १,००० ऑर्डर्स, आणि व्यवसाय १०० कोटींच्या उंबरठ्यावर पोहोचला. या नव्या मॉडेलमुळे भारतीय eyewear बाजारात Lenskart ची ओळख क्रांतिकारी बनली आणि पियुष यांच्या धाडसी निर्णयाचे फळ दिसू लागले.

    यशाच्या शिखरावर

    Lenskart ने भारतात पहिल्यांदाच ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मार्गांनी चष्मा खरेदीचा अनोखा फॉर्म्युला आणला. त्यांनी 3D Try-On तंत्रज्ञान, ४८ तासांत डिलिव्हरी, अत्याधुनिक उत्पादन सुविधा, तसेच ऑफलाइन स्टोअर्स आणि ऑनलाइन ऑर्डर या संकल्पनेतून ग्राहकांचा अनुभवच बदलला. २०१७ पर्यंत रोज ३०,००० पेक्षा जास्त लेन्सेस तयार होत होत्या आणि २०१८ मध्ये रेव्हेन्यू ४६० कोटींवर पोहोचला.

    २०१९ मध्ये SoftBank Vision Fund ने Lenskart मध्ये $275 million अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली आणि कंपनी एका झटक्यात युनिकॉर्न बनली. भारतभर २,२०० स्टोअर्स उघडल्या, त्यातील निम्मी स्टोअर्स फक्त ७ महिन्यांत प्रॉफिटेबल ठरल्या. २०२४ पर्यंत रेव्हेन्यू ५,४२८ कोटींवर पोहोचला. हे आकडे Lenskart च्या अद्भुत आणि प्रभावी वाढीचं स्पष्ट उदाहरण आहेत.

    २०२५  वर्ष ऐतिहासिक 

    २०२५ वर्ष Lenskart साठी ऐतिहासिक ठरलं. ४ नोव्हेंबरला त्यांनी IPO लाँच केला, ज्याची रक्कम ७,२७८.०२ कोटी होती आणि त्याला २८.२६ पट ओव्हरसब्स्क्रिप्शन मिळालं, हे आकडे खरंच थक्क करणारे होते. त्यानंतर १० नोव्हेंबरला स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग झाली आणि कंपनीचे मूल्यांकन थेट ७२,००० कोटी वर पोहोचले. १२ वर्षांच्या अथक संघर्षाचं हे Lenskart साठी सुवर्णफळ ठरलं.

    मित्रांनो, स्वप्न जर मनापासून असेल आणि त्याला पूर्ण करण्याची इच्छाशक्ती आपल्यात असेल, तर वाट आपोआप उजळत जाते. Lenskart फक्त एक ब्रँड नाही, तर तो भारतीयांना त्यांच्या दृष्टिकोनाशी जोडणारा एक दुवा आहे, आणि पियुष बन्सल हे त्या दृष्टिकोनाला तेज देणारे दीपस्तंभ आहेत.

  • संघर्षातून उभा राहिलेला भारताचा शिक्षणदीपस्तंभ: ‘फिजिक्सवाला’-  Physics Wallah

    संघर्षातून उभा राहिलेला भारताचा शिक्षणदीपस्तंभ: ‘फिजिक्सवाला’- Physics Wallah

    अलख पांडे यांची प्रेरणादायी शैक्षणिक क्रांती

    देशातील मोठ्या उद्योगपती, अभिनेते, डॉक्टर किंवा राजकारण्यांच्या संपत्तीबद्दल आपण नेहमी ऐकतो. पण एका सामान्य शिक्षकाने अब्जोंची कंपनी उभी करून देशभरातील विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवला, ही प्रेरणादायी गोष्ट आहे ‘फिजिक्सवाला’चे संस्थापक अलख पांडे यांची. अतिशय साधारण परिस्थितीतून आलेल्या या तरुणाने आपल्या जिद्दीने, सातत्यपूर्ण मेहनतीने आणि अनोख्या शिकवण्याच्या शैलीने लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकला. एडटेक क्षेत्रात त्यांचं नाव आज सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं आहे.

    कधीकाळी अभिनेता होण्याचं स्वप्न पाहणारा, कधी वर्गात उभा राहून विद्यार्थ्यांना शिकवणारा, तर कधी यूट्यूबवर मोफत शिकवून विद्यार्थ्यांचा मित्र बनणारा हा मुलगा पुढे एका प्रचंड साम्राज्याचा सहसंस्थापक बनेल, हे कोणालाही वाटलं नव्हतं. त्यांची जिवंत, मजेदार आणि समजण्यास सोपी शिकवण्याची पद्धत विद्यार्थ्यांच्या हृदयात स्थान मिळवत गेली आणि हळूहळूच त्यांचा अब्जावधींच्या ‘युनिकॉर्न’ कंपनीपर्यंतचा रोमांचक प्रवास सुरु झाला.

    आजच्या लेखात आपण अलख पांडे यांच्या एका साध्या शिक्षकापासून देशातील सर्वात मोठ्या एडटेक युनिकॉर्नपैकी एक घडवणाऱ्या त्यांच्या क्रांतिकारक प्रवासावर एक नजर टाकणार आहोत.

    बालपणातील संघर्ष आणि स्वप्नांची उंच भरारी

    अलख पांडे यांना लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. पथनाट्ये, शालेय सादरीकरणे,या सगळ्यात भाग घेत त्यांनी कला जगतातील दारं उघडून पाहिली. पण घरची कठीण परिस्थिती त्यांना वेगळ्या मार्गावर घेऊन गेली. आठवीत असतानाच त्यांनी ट्युशन घेण्यास सुरुवात केली. चौथीच्या विद्यार्थ्यांना शिकवणारा हा मुलगा पुढे नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांचा विश्वासू शिक्षक आणि मार्गदर्शक बनेल, याची कल्पना कदाचित कोणालाही नव्हती.

    घरची आर्थिक अवस्था इतकी कठीण होती की अलख आणि त्यांच्या बहिणीच्या शिक्षणासाठी आई-वडिलांना स्वतःचं घरदेखील विकावं लागलं. पण अडचणींनी त्यांची पावलं थांबवली नाहीत,उलट त्यांच्या जिद्दीला आणखी धार मिळाली. दहावीत ९१% आणि बारावीत ९३.५% गुण मिळवत त्यांनी HBTI, कानपूर येथे बी.टेकमध्ये प्रवेश घेतला. शिक्षणासाठीचं हे पाऊल पुढे त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे नवी दिशा देणार होतं आणि इथूनच त्यांच्या पुढच्या महत्वाच्या प्रवासाची खरी सुरुवात झाली.

    एका छोट्या खोलीतून उभा राहिलेला ‘फिजिक्सवाला’

    बी.टेक करत असतानाच अलख पांडे यांनी आपल्या क्लासरूममधील शिकवणीचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यास सुरुवात केली. त्यांच्या शिकवण्याची शैली पूर्णपणे वेगळी आणि आकर्षक होती,अवघड संकल्पना अगदी सोप्या भाषेत उलगडून सांगणं, मजेदार ॲक्शन आणि ऊर्जेनं भरलेलं प्रेझेंटेशन. विद्यार्थ्यांना हवी असलेली तीच पद्धत अलख यांनी दिली, आणि त्यामुळे त्यांचे व्हिडिओ झपाट्याने लोकप्रिय होऊ लागले. थोड्याच काळात व्ह्यूज वाढले, सबस्क्राइबर्सची संख्या उंचावली आणि एक साधा शिक्षक यूट्यूबवरील ‘स्टार टीचर’ म्हणून ओळख मिळवू लागला.

    २०१७ मध्ये प्रयागराजमधील एका छोट्याशा खोलीत अत्यंत मर्यादित साधनांनी त्यांनी ‘फिजिक्सवाला’ची पायाभरणी केली. एक बोर्ड, एक कॅमेरा आणि प्रचंड इच्छाशक्ती,इतक्याच गोष्टींवर आधारलेलं हे छोटसं स्वप्न पुढे लाखो विद्यार्थ्यांचा आधार ठरलं आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवू लागलं.

    कोरोना काळात मिळाली अभूतपूर्व लोकप्रियता

    तीन वर्षे विनामूल्य व्हिडिओ देणाऱ्या अलख पांडे यांनी करोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या अडचणी ओळखून स्वतःचं ॲप सुरू केलं. अत्यंत कमी फी मध्ये त्यांनी JEE आणि NEET ची कोचिंग उपलब्ध करून दिली. महागड्या कोचिंग संस्थांच्या स्पर्धेतही विद्यार्थ्यांसाठीची त्यांची खरी तळमळ, त्यांचं ज्ञान आणि विश्वासार्हता यामुळे ‘फिजिक्सवाला’ वेगाने लोकप्रिय होऊ लागलं. देशभरातील हजारो विद्यार्थ्यांनी या ॲपचा आधार घेत आपल्या शैक्षणिक प्रवासाची वाटचाल सुरू केली.

    या काळात अलख सरांचे व्हिडिओ विद्यार्थ्यांना केवळ समजण्यास सोपेच नव्हते, तर मजेशीर, उत्साही आणि प्रेरणादायीही वाटू लागले. त्यांच्या शिकवण्याची शैली तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण करू लागली, आणि त्यांचे क्लासेस विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा व आत्मविश्वासाचा स्रोत बनले. कोरोनाकाळात मिळालेल्या या प्रचंड लोकप्रियतेने त्यांच्या कामाला नवा वेग दिला, आणि यानंतर विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्यांनी घेतलेला प्रत्येक पुढचा पाऊल ठाम, प्रभावी आणि न थांबणारा ठरला.

    मोठ्या ऑफर्स नाकारून स्वतःचा मार्ग निवडणारा शिक्षक

    लोकप्रियता वाढत असताना अलख पांडे यांच्या कामाची दखल मोठ्या एडटेक कंपन्यांनी घ्यायला सुरुवात केली. अनअकॅडमीने त्यांना तब्बल ४० कोटींचे वार्षिक पॅकेज ऑफर केले होते. इतकंच नाही, तर त्यांच्या ‘फिजिक्सवाला’मधील १०% हिस्सा ७५ कोटींना खरेदी करण्याची मोठी ऑफरही देण्यात आली. कोणत्याही तरुणासाठी ही स्वप्नवत संधी असू शकली असती, पण अलख यांच्या मनात वेगळंच ध्येय होतं.

    त्यांच्यासाठी पैसा नव्हता तर विद्यार्थ्यांचं भविष्य, शिक्षणाचा प्रसार आणि त्यांच्या मूल्यांची जपणूक अधिक महत्त्वाची होती. म्हणूनच त्यांनी या दोन्ही आकर्षक ऑफर्स ठामपणे नाकारल्या. स्वतःचा मार्ग, स्वतःची ओळख आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, परवडणारे शिक्षण हेच त्यांचं ध्येय राहिलं. आणि याच निर्णयाने ‘फिजिक्सवाला’ला पुढे एका ऐतिहासिक उंचीवर पोहोचवण्याची ताकद दिली.

    भारतातील  पहिली ‘डिजिटल-फर्स्ट’ एडटेक युनिकॉर्न  कंपनी 

    २०२० मध्ये ‘फिजिक्सवाला’ची कंपनी नोंदणीकृत झाली आणि त्याचा प्रगतीचा वेग झपाट्याने वाढू लागला. IIT BHU पदवीधर आणि अलख पांडे यांचे सहकारी प्रतीक माहेश्वरी व्यवस्थापन सांभाळू लागले, तर अलख पांडे पूर्णपणे शिक्षणात गुंतले. आज फिजिक्सवालाकडे ५००+ शिक्षक, १००+ टेक एक्स्पर्ट्स, १०९ शहरांतील १९८ सेंटर्स, ९९ मिलियन यूट्यूब सबस्क्राइबर्स आणि २,८८७ कोटींचे वार्षिक उत्पन्न आहे. या मेहनतीमुळे फिजिक्सवाला आज १.१ बिलियन डॉलर नेटवर्थ असलेली युनिकॉर्न कंपनी बनली आणि भारतीय एडटेक क्षेत्रात ही एक ऐतिहासिक पायरी ठरली आहे.

    फिजिक्सवाला IPO ही भारतीय एडटेकसाठी एक ऐतिहासिक क्षण मानली जाते. पहिली ‘डिजिटल-फर्स्ट’ एडटेक कंपनी म्हणून IPO घेणे म्हणजे शिक्षकांपासून स्टार्टअप्सपर्यंत सर्वांसाठी प्रेरणेची नवी दारे उघडण्यासारखं आहे. फिजिक्सवालाने सिद्ध केले की लहान शहरांतील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळू शकते, शिक्षकांनाही मान, सन्मान आणि योग्य कमाई मिळू शकते, आणि भारत जागतिक स्तरावर एडटेक क्रांतीचे नेतृत्व करू शकतो.

    मित्रांनो, अलख पांडे यांचा प्रवास म्हणजे संघर्ष, स्वप्नं आणि कठोर परिश्रमांनी विणलेलं एक प्रेरणादायी गीत आहे, जिथे एका मुलाने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याला आशेचा उजेड दिला. आज ते केवळ एक  शिक्षक नाहीत, तर भारताच्या नव्या शिक्षणयुगाचे दीपस्तंभ बनले आहेत. त्यांची कहाणी हे सांगते की शिक्षणाच्या पायावर उभं राहिलेलं स्वप्न कधीही अपयशी ठरत नाही, आणि जिद्द, सातत्य आणि मनापासून केलेल्या प्रयत्नांमुळे कोणतीही मर्यादा पार करता येते.

    आणखीन वाचा:

  • अपमानाचे उत्तर ‘यशाने’ दिलं! सुधीर जाटिया आणि ‘सफारी’ ब्रँडचा प्रेरणादायी प्रवास

    अपमानाचे उत्तर ‘यशाने’ दिलं! सुधीर जाटिया आणि ‘सफारी’ ब्रँडचा प्रेरणादायी प्रवास

    यशाचा ‘सफारी’ पॅटर्न: हार न मानता अपयशालाच ताकद बनवणाऱ्या सुधीर जाटियांची गोष्ट.

    यश हे कधीच एका रात्रीत मिळत नाही. त्यामागे सातत्यपूर्ण मेहनत, स्वतःवरचा ठाम विश्वास, प्रचंड जिद्द आणि अपयशातून शिकण्याची तयारी लागते. अनेक लोक अडचणी आल्या की थांबतात, पण काही मोजकेच लोक अपयशालाच आपली ताकद बनवून पुढे जातात आणि खऱ्या अर्थाने यश मिळवतात. अशा लोकांचा प्रवास नेहमीच प्रेरणा देणारा असतो.

    कधी कधी यशाची खरी सुरुवात अपमान, दुर्लक्ष आणि नाकारण्यातून होते. अशाच एका प्रेरणादायी प्रवासाचं नाव आहे,  सुधीर जाटिया. अत्यंत साध्या सुरुवातीपासून ते आज करोडोंची कंपनी उभारण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. आजच्या लेखात आपण त्यांच्या व्यवसायिक प्रवासावर एक नजर टाकणार आहोत.

    करिअरची सुरुवात 

    वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी सुधीर जाटिया यांनी VIP Industries मध्ये Aristocrat (Value Luggage) या विभागात ट्रेनी म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्या काळात अनेकांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास नव्हता. मात्र त्यांनी हार न मानता मेहनत, बारकाईने निरीक्षण करण्याची सवय आणि बाजाराची सखोल समज विकसित केली.

    या गुणांच्या जोरावर त्यांनी हळूहळू स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि सर्व शंका चुकीच्या ठरवल्या. अवघ्या १२ वर्षांत ते VIP Industries चे Vice President (VP) बनले. ट्रेनीपासून VP पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा त्यांच्या मेहनतीचा आणि जिद्दीचा खरा पुरावा आहे.

    ब्रँडिंगचा मास्टरस्ट्रोक

    सुधीर जाटिया यांनी VIP Industries च्या ब्रँडिंगमध्ये मोठा आणि धाडसी बदल केला. त्यांनी कंपनीचं संपूर्ण पोर्टफोलिओ नव्यानं मांडून प्रत्येक ब्रँडची वेगळी ओळख ठरवली. VIP ब्रँडला त्यांनी प्रीमियम आणि बिझनेस-क्लास सेगमेंटमध्ये स्थान दिलं, ज्यामुळे तो दर्जेदार आणि विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळखला जाऊ लागला.

    त्याच वेळी Aristocrat ब्रँडला तरुण पिढीसाठी परवडणारा, मजबूत आणि व्हॅल्यू-फॉर-मनी ब्रँड म्हणून सादर करण्यात आलं. या स्पष्ट रणनीतीचा थेट परिणाम कंपनीच्या आर्थिक कामगिरीवर दिसून आला आणि २०१० पर्यंत VIP Industries ही कंपनी १० कोटींच्या तोट्यातून बाहेर येत थेट ५६ कोटींच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नफ्यापर्यंत पोहोचली.

    safari bag 1

    टर्निंग पॉइंट 

    इतकं मोठं यश मिळवूनही २०१० साली व्यवस्थापनाने नवीन Lead VP नेमला आणि सुधीर जाटिया हळूहळू निर्णयप्रक्रियेतून बाजूला केलं. हा प्रसंग कुणालाही खचवणारा ठरला असता, कारण इतक्या मेहनतीनंतरही दुर्लक्ष होणं वेदनादायक असतं.

    पण सुधीर यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतःशीच एक ठाम निर्णय घेतला की उत्तर शब्दांनी नाही, तर यशातून द्यायचं. त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय त्यांच्या आयुष्यातील खरा वळणबिंदू ठरला.

    Safari ची निवड 

    २०११ मध्ये Safari ही एक लिस्टेड लगेज कंपनी होती, मात्र तिचा वार्षिक नफा केवळ २.६५ कोटींच्या मर्यादेत अडकलेला होता. VIP ला खऱ्या अर्थाने टक्कर देण्यासाठी Safari हाच योग्य ब्रँड आहे, हे सुधीर जाटिया यांनी अचूक ओळखलं. सप्टेंबर २०११ मध्ये त्यांनी २९ कोटींची गुंतवणूक करत Safari मध्ये ४१.३४% भागीदारी मिळवली आणि कंपनीच्या मालकीत प्रवेश केला.

    Safari मध्ये पाऊल टाकताच सुधीर यांनी ग्राहककेंद्री धोरण राबवलं. त्यांचा पहिला निर्णयच धक्कादायक होता तो म्हणजे वॉरंटीमध्ये आलेल्या बॅग दुरुस्त न करता थेट नवीन बॅग देण्याचा आदेश. यामुळे डिझाईन आणि उत्पादन टीमवर गुणवत्तेबाबत प्रचंड दबाव आला. त्याचबरोबर त्यांनी मटेरियल, टिकाऊपणा आणि उत्पादन प्रक्रियेवर पुन्हा लक्ष केंद्रित केलं आणि “Quality First” ही फक्त टॅगलाईन न राहता कंपनीची संस्कृती बनली. विक्री वाढवण्यासाठी त्यांनी Big Bazaar, Reliance Trends, Spencer’s यांसारख्या रिटेल चॅनेल्ससोबत भागीदारी केली आणि Amazon व Flipkart वर जाणारा भारतातील पहिला लगेज ब्रँड म्हणून Safari ने आपली वेगळी ओळख निर्माण केली. याच टप्प्यावरून Safari च्या यशाची खरी सुरुवात झाली.

    झपाट्याने वाढ आणि स्पर्धेत आघाडी

    २०१५ पर्यंत Safari ची विक्री १५० कोटींवर पोहोचली होती, ज्यातील सुमारे ३०% विक्री ई-कॉमर्समधून होत होती. २०१६ मध्ये Genius आणि Magnum या ब्रँड्सचे अधिग्रहण करून Safari ने शालेय बॅग्स आणि बजेट लगेज सेगमेंटमध्ये आपला विस्तार केला. या झपाट्याने होत असलेल्या वाढीमुळे VIP आणि Samsonite सारखे दिग्गज ब्रँडही सावध झाले.

    VIP ने aspirational branding वर भर दिला, Samsonite ने पूर्णपणे ऑफलाइन नेटवर्कवर विश्वास ठेवला, तर Safari ने स्टायलिश जाहिराती, मोठ्या रिटेल स्टोअर्स आणि मजबूत ई-कॉमर्स या तिन्हींचा प्रभावी मेळ साधला. या स्मार्ट रणनीतीचा परिणाम असा झाला की २०१९ पर्यंत Safari ची विक्री ६०० कोटींवर पोहोचली आणि Samsonite ला मागे टाकत Safari भारतातील नंबर २ लगेज कंपनी बनली. COVID-19 च्या कठीण काळातही Safari ने १००% ऑर्डर्स पूर्ण करून आपली विश्वासार्हता आणि ताकद सिद्ध केली.

    यशाच्या शिखरावर 

    २०२३ पर्यंत VIP Industries ची मार्केट कॅप ८,४७६ कोटी होती, तर Safari ची विक्री १,२१२ कोटींवर पोहोचली. कंपनीची एकूण मार्केट व्हॅल्यूएशन ९,२७३ कोटी झाली आणि सुधीर जाटिया यांचं “उत्तर” सगळ्यांनाच दिसून आलं.

    आज Safari ची स्थिती आणखी मजबूत आहे . विक्री १,८०० कोटी, नफा १८५.५७ कोटी, ८०० हुन अधिक  प्रॉडक्ट्स आणि ९,३०० टचपॉइंट्ससह. कंपनीची मार्केट व्हॅल्यूएशन आता १०,७३४ कोटींवर पोहचलं आहे आणि Safari आज भारतातील सर्वात वेगाने वाढणारी लगेज कंपनी म्हणून ओळखली जाते.

    आणखीन वाचा:

  • दोन मित्रांची जिद्द आणि ६०,००० कोटींचे साम्राज्य! – Success Story of Razorpay

    दोन मित्रांची जिद्द आणि ६०,००० कोटींचे साम्राज्य! – Success Story of Razorpay

    नमस्कार! आज आपण अशा एका कंपनीबद्दल बोलणार आहोत, जिचा वापर तुम्ही दररोज करता, पण कदाचित तुम्हाला तिचं नाव माहीत नसेल. तुम्ही जेव्हा झोमॅटोवर ऑर्डर देता किंवा नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन घेता, तेव्हा पडद्यामागे जे काम करतं, ते म्हणजे Razorpay.

    तुम्ही-आम्ही जेव्हा दुकानात स्कॅन करतो, ते झालं ‘B2C’ पेमेंट. पण एखाद्या स्टार्टअपला किंवा छोट्या बिझनेसला जेव्हा हजारो ग्राहकांकडून पैसे घ्यायचे असतात, तेव्हा त्यांना लागतो तो पेमेंट गेटवे. २०१४ च्या आसपास, जर तुम्हाला एखादा छोटा ऑनलाईन बिझनेस सुरू करायचा असेल आणि ग्राहकांकडून पैसे घ्यायचे असतील, तर ती एक डोकेदुखी होती. बँकांच्या चकरा मारणं, शेकडो कागदपत्रं आणि ‘पेमेंट गेटवे’ सुरू व्हायला कित्येक आठवडे लागायचे. हर्षिल आणि शशांकला स्वतःच्या एका प्रोजेक्टसाठी पेमेंट गेटवे हवा होता, पण त्यांना तो मिळाला नाही. तिथेच त्यांना समजलं— समस्या मोठी आहे, म्हणजे संधीही मोठी आहे!

    आयआयटी रुरकीतून बाहेर पडलेल्या हर्षिल माथुर आणि शशांक कुमार यांनी ही समस्या सोडवायची ठरवलं. सुरुवातीला या दोन मित्रांना जवळपास १०० बँकांनी नकार दिला. कोणालाच या दोन मुलांच्या आयडियावर विश्वास नव्हता. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी एक असा प्लॅटफॉर्म बनवला जो इतका साधा होता की, अवघ्या काही तासांत कोणताही छोटा बिझनेस डिजिटल पेमेंट स्वीकारायला सुरुवात करू शकत होता. जिथे बँकांचे फॉर्म भरण्यात आठवडे जायचे, तिथे Razorpay ने एका दिवसात काम केलं.

    Razorpay ने काय केलं? त्यांनी तंत्रज्ञान इतकं सोपं केलं की कोडिंग न येणारा माणूसही त्यांच्या सेवा वापरू लागला. त्यांनी ‘कमी फी’ आणि ‘फास्ट सर्व्हिस’वर भर दिला. जेव्हा छोटे व्यावसायिक Razorpay कडे वळले, तेव्हा मोठ्या कंपन्यांनाही त्यांचं महत्त्व कळलं. जेव्हा नोटाबंदी झाली आणि डिजिटल इंडियाची लाट आली, तेव्हा Razorpay आधीच तयार होतं.

    Success Story of Razorpay 3

    आज झोमॅटो, स्विगीपासून ते तुमच्या गल्लीतल्या स्टार्टअपपर्यंत सगळेजण Razorpay वापरत आहेत. आज ते फक्त पेमेंट्स नाही, तर बिझनेस बँकिंग आणि पेरोलमध्येही नंबर १ आहेत. ८ लाखांहून अधिक व्यवसाय आज Razorpay मुळे आपला धंदा ऑनलाईन चालवत आहेत. ही कंपनी आता फक्त भारतात नाही, तर जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत आहे. २०२५ पर्यंत या कंपनीचं मूल्य चक्क ७.५ अब्ज डॉलर्स (सुमारे ६०,००० कोटी रुपये) इतकं झालंय!

    Razorpay ची ही कहाणी आपल्याला शिकवते की— “मैदानात कितीही मोठे खेळाडू असले, तरी जर तुमच्याकडे लोकांच्या समस्या सोडवणारी एखादी साधी पण प्रभावी आयडिया असेल, तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही!”

    Success Story of Razorpay 2

    तुम्ही तुमच्या बिझनेससाठी कोणतं पेमेंट गेटवे वापरता? कमेंट्समध्ये सांगा! आणि अशाच दमदार बिझनेस स्टोरीजसाठी नवी अर्थक्रांती’ला फॉलो नक्की करा.

  • २०२६ मध्ये यशस्वी होण्यासाठी या ७ सवयी माहित असायलाच हव्यात.

    २०२६ मध्ये यशस्वी होण्यासाठी या ७ सवयी माहित असायलाच हव्यात.

    सकाळी लवकर उठणे 

    लवकर उठणे ही यशस्वी जीवनाची पहिली पायरी मानली जाते. सकाळची वेळ अत्यंत शांत, स्वच्छ आणि सकारात्मक असते. या वेळी आपले मन अधिक एकाग्र असते आणि विचार स्पष्ट होतात. २०२६ मध्ये लवकर उठण्याचा संकल्प केल्यास आपल्याला दिवसासाठी योग्य नियोजन करता येते. सकाळी उठल्यानंतर थोडा वेळ स्वतःसाठी दिल्यास आत्मपरीक्षण, वाचन किंवा शांत विचार करण्याची सवय लागते. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि मानसिक ताजेपणा टिकून राहतो. उशिरा उठल्यामुळे घाई, ताणतणाव आणि कामातील गोंधळ वाढतो, तर लवकर उठल्यामुळे वेळेचे योग्य व्यवस्थापन करता येते.

    यशस्वी व्यक्तींच्या जीवनाकडे पाहिले तर त्यांच्या दिनचर्येत लवकर उठणे ही एक महत्त्वाची सवय दिसून येते. म्हणूनच २०२६ मध्ये आळस सोडून लवकर उठण्याचा संकल्प केल्यास जीवनात सकारात्मक बदल नक्कीच घडून येईल.

    नियमीत व्यायामाची सवय . 

    निरोगी शरीराशिवाय यशस्वी जीवनाची कल्पनाही करता येत नाही. आजच्या डिजिटल युगात आपण शारीरिक हालचाली कमी करत चाललो आहोत, ज्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. २०२६ मध्ये नियमित व्यायाम किंवा जिमला जाण्याचा संकल्प केल्यास शरीर तंदुरुस्त राहील आणि मनही उत्साही बनेल. व्यायामामुळे शरीराची ताकद वाढते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि आत्मविश्वास निर्माण होतो. तसेच व्यायामामुळे तणाव कमी होतो आणि मन प्रसन्न राहते. रोज थोडा वेळ व्यायामासाठी दिल्यास शिस्त आणि सातत्याची सवय लागते. जिम असो किंवा घरच्या घरी केलेला व्यायाम, महत्त्व नियमिततेला आहे. चांगले आरोग्य आपल्याला कामात अधिक लक्ष देण्यास मदत करते. त्यामुळे २०२६ हे वर्ष आरोग्यदायी बनवण्यासाठी व्यायामाला जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचा संकल्प करणे अत्यंत आवश्यक आहे.

     मानसिक शांतता जपण्याचा संकल्प

    आजच्या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या जीवनात मानसिक शांतता हरवत चालली आहे. सततचा ताण, अपेक्षा आणि अपयश यामुळे मन अस्थिर होते. म्हणूनच २०२६ मध्ये मानसिक शांतता जपण्याचा संकल्प करणे फार महत्त्वाचे आहे. शांत मन असल्यास योग्य निर्णय घेता येतात आणि अडचणींना सामोरे जाण्याची ताकद मिळते. ध्यान, श्वसनाचे व्यायाम, शांत संगीत ऐकणे किंवा निसर्गात वेळ घालवणे यामुळे मनाला शांती मिळते. स्वतःशी संवाद साधण्याची सवय लावल्यास आपल्याला स्वतःची खरी ओळख होते. मानसिक शांतता म्हणजे समस्यांपासून पळ काढणे नव्हे, तर त्यांना सकारात्मक दृष्टीने सामोरे जाणे होय. शांत मनामुळे आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मक विचार दूर होतात. म्हणूनच २०२६ मध्ये स्वतःच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याचा संकल्प केल्यास जीवन अधिक संतुलित आणि आनंदी बनेल.

    २०२६ मध्ये यशस्वी होण्यासाठी या ७ सवयी माहित असायलाच हव्यात. 1

     नवीन कौशल्ये शिकण्याचा संकल्प

    जग वेगाने बदलत आहे आणि त्यासोबत ज्ञान व कौशल्यांची गरजही वाढत आहे. २०२६ मध्ये नवीन कौशल्ये शिकण्याचा संकल्प केल्यास आपण काळाबरोबर पुढे राहू शकतो. Self Development साठी कौशल्यविकास खूप महत्त्वाचा आहे. नवीन स्किल्स शिकल्यामुळे आपली क्षमता वाढते आणि आत्मविश्वासही बळकट होतो. विद्यार्थी असो किंवा काम करणारी व्यक्ती, सतत शिकण्याची वृत्ती ठेवणे आवश्यक आहे. आज ऑनलाइन माध्यमांमुळे शिकण्याच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. दररोज थोडा वेळ शिकण्यासाठी दिल्यास मोठा बदल घडू शकतो. कौशल्ये म्हणजे केवळ नोकरीसाठी उपयुक्त गोष्टी नव्हेत, तर व्यक्तिमत्त्व विकासासाठीही ती आवश्यक असतात. त्यामुळे २०२६ मध्ये स्वतःला अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी नवीन कौशल्ये शिकण्याचा ठाम संकल्प करायला हवा.

     शिस्त पाळण्याचा संकल्प

    शिस्त ही यशाची गुरुकिल्ली मानली जाते. मोठी स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तींसाठी शिस्त असणे अत्यंत आवश्यक आहे. २०२६ मध्ये शिस्त पाळण्याचा संकल्प केल्यास आपले जीवन अधिक सुव्यवस्थित बनेल. वेळेवर उठणे, कामे वेळेत पूर्ण करणे, जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणे यामुळे आत्मविश्वास वाढतो. शिस्त नसल्यास आळस, काम टाळणे आणि अपयश यांचा सामना करावा लागतो. शिस्त म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःसाठी नियम बनवणे. सुरुवातीला शिस्त पाळणे कठीण वाटू शकते, पण हळूहळू ती सवय बनते. शिस्तबद्ध जीवनामुळे आपण उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करू शकतो. म्हणूनच २०२६ हे वर्ष यशस्वी बनवण्यासाठी शिस्तीला आपल्या जीवनाचा पाया बनवण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे.

     नकारात्मक गोष्टी दूर करण्याचा संकल्प

    नकारात्मक विचार, वाईट सवयी आणि चुकीची संगत ही प्रगतीतील मोठी अडथळे आहेत. २०२६ मध्ये अशा नकारात्मक गोष्टी जीवनातून दूर करण्याचा संकल्प करणे अत्यंत आवश्यक आहे. नकारात्मकता माणसाचा आत्मविश्वास कमी करते आणि पुढे जाण्याची ताकद हिरावून घेते. सतत तक्रार करणे, स्वतःवर शंका घेणे आणि अपयशाची भीती बाळगणे हे नकारात्मक विचारांचे उदाहरण आहेत. अशा गोष्टी सोडून सकारात्मक विचारांची सवय लावली पाहिजे. चांगल्या लोकांच्या सहवासात राहिल्यास विचारही सकारात्मक होतात. नकारात्मक गोष्टी दूर केल्यास मन हलके होते आणि ऊर्जा वाढते. म्हणूनच २०२६ मध्ये स्वतःच्या प्रगतीस अडथळा ठरणाऱ्या सर्व नकारात्मक गोष्टींना कायमचे दूर करण्याचा संकल्प करायला हवा.

    २०२६ मध्ये यशस्वी होण्यासाठी या ७ सवयी माहित असायलाच हव्यात

     गरज नसलेल्या गोष्टींना “नाही” म्हणण्याचा संकल्प

    अनेक वेळा आपण इतरांना खुश करण्यासाठी स्वतःच्या गरजा आणि ध्येयांकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे ताणतणाव आणि असमाधान वाढते. २०२६ मध्ये गरज नसलेल्या गोष्टींना “नाही” म्हणण्याचा संकल्प करणे Self Development साठी खूप महत्त्वाचे आहे. “नाही” म्हणणे म्हणजे उद्धटपणा नव्हे, तर स्वतःच्या जीवनाला प्राधान्य देणे होय. प्रत्येक गोष्टीसाठी होकार देणे शक्य नसते. आपल्या वेळेचा, ऊर्जेचा आणि क्षमतेचा योग्य वापर करण्यासाठी मर्यादा ठरवणे आवश्यक आहे. जे आपल्या ध्येयांशी जुळत नाही, अशा गोष्टींना नकार देणे ही आत्मसन्मानाची खूण आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि निर्णयक्षमता मजबूत होते. म्हणूनच २०२६ मध्ये स्वतःसाठी ठाम उभे राहण्याचा आणि गरज नसलेल्या गोष्टींना निर्भयपणे “नाही” म्हणण्याचा संकल्प करायला हवा.

    आणखी वाचा

  • नादच खुळा! सॉफ्टवेअर इंजिनिअरने उभारला ११,२२७ कोटींचा ब्रँड; BlueStone च्या यशाचं नेमकं गुपित काय?

    आजच्या काळात ‘Set Life’ सोडून अनिश्चिततेच्या वाटेवर चालण्याचं धाडस फार कमी लोक करतात. जेव्हा हाताशी IIT दिल्लीची पदवी आणि खिशात Amazon सारख्या जागतिक कंपनीचा कोट्यवधींचा पगार असतो, तेव्हा लोक सहसा स्थिरावण्याचा विचार करतात. पण गौरव सिंग कुशवाहा हे वेगळ्या मातीचे बनले होते. एका साध्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने भारतातील ज्वेलरी मार्केटचा चेहरामोहरा कसा बदलला आणि ११,२२७ कोटींचे साम्राज्य कसे उभे केले? चला जाणून घेऊया BlueStone च्या यशाचं ‘अस्सल’ गुपित!

    करिअरची सुरुवात 

    गौरव सिंग कुशवाहा यांचा प्रवास सुरू झाला IIT दिल्ली मधून. कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केल्यावर त्यांच्यासमोर यशाचे पायघड्या अंथरल्या होत्या. त्यांनी Amazon मध्ये सिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून भारत आणि अमेरिकेत काम केले. पैसा, प्रतिष्ठा आणि सुख सोयी सर्व काही होते. पण त्यांच्या मनात एक स्वप्न सतत धडका मारत होतं – “स्वतःचं काहीतरी निर्माण करायचं!”

    ठरलेल्या चौकटीत राहण्यापेक्षा स्वतःचा नवा रस्ता शोधण्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर दीड वर्षातच त्यांनी सुरक्षित नोकरीला रामराम ठोकला आणि उद्योजकतेच्या मैदानात उडी घेतली.

    पहिलं अपयश: जेव्हा स्वप्नांना ब्रेक लागला

     Amazon मध्ये सुमारे दीड वर्ष काम केल्यानंतर गौरव सिंग कुशवाहा यांनी धाडसी निर्णय घेत नोकरी सोडली आणि “Chapak” नावाचं ऑनलाइन मूव्ही पोर्टल सुरू केलं. 

    तब्बल ४ वर्षे त्यांनी यावर जीवापाड मेहनत घेतली. पण म्हणतात ना, “वेळ आणि काळ” नेहमी आपल्या बाजूने नसतो. त्या काळात स्मार्टफोनचा वापर फारसा नव्हता आणि व्यवसायासाठी ठोस कमाईचं मॉडेल तयार झालं नव्हतं. त्यामुळे Chapak अपेक्षेप्रमाणे वाढू शकला नाही.

    पण गौरव खचले नाहीत. या अपयशाने त्यांना एक मौल्यवान धडा दिला: फक्त कल्पना चांगली असणं पुरेसं नसतं, तर योग्य वेळ, योग्य बाजारपेठ आणि लोकांची खरी गरज ओळखणं तितकंच महत्त्वाचं असतं.

    समस्येतून संधीचा शोध

    या अपयशाच्या काळात गौरव सिंग कुशवाहा यांनी बाजाराकडे नव्या नजरेने पाहायला सुरुवात केली. त्यांना जाणवलं की भारतातील ज्वेलरी मार्केट प्रचंड मोठं आहे, तरीही त्याचा अगदी कमी भाग ऑनलाइन उपलब्ध आहे. Flipkart आणि Amazonसारखे प्लॅटफॉर्म असूनही फाइन ज्वेलरीची विक्री जवळजवळ पूर्णपणे ऑफलाइनच होत होती. 

    ज्वेलरी खरेदी ही केवळ वस्तू खरेदी नसून ती विश्वासावर आधारित प्रक्रिया होती. मर्यादित डिझाइन्स, किमती आणि शुद्धतेबाबत स्पष्ट माहिती नसणं, तसेच ग्राहकांना योग्य मार्गदर्शन न मिळणं या मोठ्या अडचणी होत्या. ह्याच समस्या ओळखून गौरव यांनी त्यावर उपाय शोधण्याचं ठरवलं आणि इथूनच एका नव्या संधीची बीजं रोवली गेली. 

    ChatGPT Image Jan 12 2026 11 27 41 AM

    BlueStone चा जन्म

    ऑनलाइन शॉपिंगची लाट येत असताना सोन्या-चांदीचे दागिने ऑनलाइन का विकले जाऊ नयेत? याच प्रश्नातून२०११ साली गौरव यांनी विद्या यांना सहसंस्थापक म्हणून सोबत घेतलं आणि BlueStone या ऑनलाइन ज्वेलरी ब्रँडची सुरुवात केली. हा ब्रँड डिझाइनला प्राधान्य देणारा आणि तंत्रज्ञानावर आधारित होता. “Blue” म्हणजे विश्वास आणि “Stone” म्हणजे कारागिरी, या दोन मूल्यांवर BlueStone उभा राहिला. 

    ऑनलाइन ज्वेलरी खरेदी ही संकल्पनाच नवीन असल्याने सुरुवातीपासूनच हा प्रवास आव्हानात्मक होता. ग्राहकांचा विश्वास जिंकणं हे BlueStone समोरचं सर्वात मोठं आव्हान होतं.  सुरुवातीला लोकांच्या मनात भीती होती – “ऑनलाइन सोनं कसं काय घ्यायचं?” ही भीती घालवण्यासाठी गौरव यांनी भन्नाट आयडिया वापरल्या:

    • Try at Home: दागिने विकत घेण्यापूर्वी घरी बसून ट्राय करण्याची सोय.
    • पारदर्शकता: प्रत्येक दागिन्याचं कॅरेट वजन, शुद्धता आणि हॉलमार्क सर्टिफिकेटची पूर्ण माहिती.
    • Customization: ग्राहकांच्या आवडीनुसार दागिने बनवून मिळण्याची सोय.

    यामुळे BlueStone वरचा लोकांचा विश्वास वाढला आणि ऑर्डरचा ओघ सुरू झाला

    गुंतवणूक आणि वेगवान वाढ

    BlueStone ने इन्व्हेंटरी-लाइट आणि ऑर्डर-वर-निर्मिती मॉडेल स्वीकारलं, ज्यामुळे खर्च कमी राहिला आणि व्यवसाय सहज वाढू लागला. सुरुवातीला Accel, Kalaari आणि Saama कडून ६० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, आणि २०१५ पर्यंत महसूल ८० कोटी रुपये झाला. नंतर Accel, IvyCap आणि रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली १०० कोटी रुपये अधिक गुंतवले गेले. एका वर्षातच कंपनी दरमहा ७,००० ऑर्डर्स पूर्ण करू लागली, ज्यात सरासरी विक्री २५,००० रुपये होती.

    ऑनलाइन ते ऑफलाइन प्रवास

    गौरव यांना लक्षात आलं की ज्वेलरी मार्केटमधला ऑनलाइन हिस्सा फक्त 0.५% आहे. मोठ्या प्रमाणावर वाढीसाठी ऑफलाइन स्टोअर्स उघडणे आवश्यक होते. त्यामुळे २०१८ मध्ये दिल्लीच्या Pacific Mall मध्ये पहिलं फिजिकल स्टोअर उघडलं. २०१९ पर्यंत BlueStone कडे २० स्टोअर्स झाले आणि महसूल ५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. रोमँटिक-मुव्ही थीमवर आधारित LoveLike कॅम्पेनमुळे Millennials आणि Gen Z मध्ये ब्रँड खूप लोकप्रिय झाला. पाहता पाहता स्टोअर्सची संख्या १७५ च्या पार गेली.

    आणखीन वाचा:

  • श्रीमंत होण्याचं सीक्रेट: आर्थिक स्वातंत्र्याकडे नेणारी पहिली ५ पावलं

    श्रीमंत होण्याचं सीक्रेट: आर्थिक स्वातंत्र्याकडे नेणारी पहिली ५ पावलं

    करिअरच्या सुरुवातीलाच बना ‘मनी-स्मार्ट’ आणि आपल्या स्वप्नांना द्या आर्थिक बळाची जोड!

    आजची तरुण पिढी महत्त्वाकांक्षी आहे. एक चांगली नोकरी, उत्तम जीवनशैली, स्वतःचे घर, देश-विदेशात फिरण्याची स्वप्ने आणि आवडत्या गोष्टींवर खर्च करण्याचे स्वातंत्र्य, हे सर्व प्रत्येकालाच हवं असतं. पण अनेकदा पहिलं वेतन हातात आल्याच्या आनंदात, आपण आर्थिक नियोजनाच्या सर्वांत महत्त्वाच्या पैलूकडे दुर्लक्ष करतो. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे केवळ खूप पैसे कमावणे नव्हे, तर आपल्या पैशावर नियंत्रण मिळवून भविष्यासाठी एक सुरक्षित पाया तयार करणे.

    जर तुम्ही नुकतेच करिअर सुरू केले असेल, तर हीच ती योग्य वेळ आहे जेव्हा तुम्ही काही स्मार्ट आर्थिक सवयी लावून स्वतःच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करू शकता. चला तर मग पाहूया, आर्थिक स्वातंत्र्याकडे नेणारी ही ५ सोपी पण अत्यंत प्रभावी पाऊले.

    १. बचतीची लवकर सुरुवात – वेळेची ताकद ओळखा

    तुम्ही जितक्या लवकर बचत आणि गुंतवणूक सुरू कराल, तितका जास्त फायदा तुम्हाला चक्रवाढ व्याजाच्या जादुई शक्तीमुळे मिळतो. समजा, तुम्ही वयाच्या २२ व्या वर्षी दरमहा ५,००० रुपये गुंतवायला सुरुवात केली आणि तुम्हाला त्यावर वार्षिक १२% परतावा मिळाला. तर वयाच्या ५० व्या वर्षी तुमच्याकडे जवळपास १.४ कोटी रुपये जमा झालेले असतील. पण जर तुमच्या मित्राने हीच सुरुवात वयाच्या ३० व्या वर्षी केली, तर त्याला तितकीच रक्कम जमा करण्यासाठी खूप जास्त मासिक गुंतवणूक करावी लागेल. कारण तुम्ही त्याला वेळेच्या बाबतीत ८ वर्षांची मोठी आघाडी दिली आहे. त्यामुळे, रक्कम लहान असली तरी चालेल, पण सुरुवात लवकर करा.

    २. बजेटिंग ॲप्सचा स्मार्ट वापर – पैशावर नियंत्रण 

    “माझा पगार कुठे जातो, तेच कळत नाही”, हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकले असेलच. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे बजेटिंग. पूर्वी डायरीत जमा खर्च लिहून ठेवला जायचा, पण आजच्या डिजिटल युगात अनेक Budgeting Apps उपलब्ध आहेत. उदा. Good Budget, Pocket Gourd, Monarch Money, Simplifi, इत्यादी. हे ॲप्स तुमच्या बँक खात्याशी लिंक होऊन तुमच्या प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवतात. जसे की, खाण्यापिण्यावर किती खर्च झाला, प्रवासावर किती, मनोरंजनावर किती, इत्यादी. यामुळे तुम्हाला तुमच्या खर्चाच्या सवयी समजतात आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. 

    ChatGPT Image Jan 7 2026 02 58 19 PM

    ३. कर्जाच्या सापळ्यापासून दूर रहा

    आजच्या काळात ‘Buy Now, Pay Later’ आणि क्रेडिट कार्डमुळे कोणतीही महागडी वस्तू घेणे खूप सोपे झाले आहे. पण हीच सोय अनेकदा कर्जाच्या सापळ्यात अडकवते. विशेषतः अशा गोष्टींसाठी कर्ज घेणे टाळा, ज्यांची किंमत वेळेनुसार कमी होते.  उदा. महागडे फोन 

    क्रेडिट कार्ड वापरणे वाईट नाही, पण त्याचा वापर शिस्तीने करायला हवा. प्रत्येक महिन्याला संपूर्ण बिल वेळेवर भरा. केवळ मिनिमम पेमेंट भरण्याच्या सवयीमुळे तुम्ही प्रचंड व्याजाच्या चक्रात अडकू शकता., कर्जाचे हप्ते फेडण्यात अडकलेली व्यक्ती कधीच खऱ्या अर्थाने आर्थिक स्वतंत्र होऊ शकत नाही, हे कायम लक्षात ठेवा. 

    ४. SIP – गुंतवणुकीचा सोपा आणि शिस्तबद्ध मार्ग

    ‘शेअर बाजारात गुंतवणूक करायची तर खूप पैसे लागतात आणि खूप ज्ञानही लागतं’ हा एक मोठा गैरसमज आहे. SIP (Systematic Investment Plan) हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक सोपा आणि शिस्तबद्ध मार्ग आहे.

    SIP द्वारे तुम्ही दर महिन्याला एक निश्चित, लहान रक्कम उदा. ५०० किंवा १००० रू. तुमच्या आवडीच्या म्युच्युअल फंडात गुंतवू शकता. त्यामुळे प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम आपोआप गुंतवली जाते. तुम्हाला दीर्घकाळात चांगला सरासरी परतावा मिळतो.

    ५. आरोग्य विमा – तुमच्या बचतीचे सुरक्षा कवच

    आपण कितीही बचत किंवा गुंतवणूक केली, तरी एक मोठी Medical Emergency आपली अनेक वर्षांची मेहनत क्षणात पाण्यात घालवू शकते. हॉस्पिटलची मोठी बिलं भरण्यासाठी अनेकदा लोकांना आपली गुंतवणूक मोडावी लागते किंवा कर्ज घ्यावे लागते.

    यावर एकच उपाय आहे. तो म्हणजे आरोग्य विमा. तरुण वयात आरोग्य विमा घेतल्यास तो खूप कमी प्रीमियममध्ये मिळतो. हा एक खर्च नसून, तुमच्या आर्थिक नियोजनाचा आणि तुमच्या बचतीचा सर्वात महत्त्वाचा संरक्षक आहे.

    आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे हे एक दिवसाचे काम नाही तर ती एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. वर दिलेली ही पाच पाऊले म्हणजे तुमच्या आर्थिक प्रवासाची एक मजबूत सुरुवात आहे. लवकर बचत करणे, खर्चावर नियंत्रण ठेवणे, कर्जापासून दूर राहणे, शिस्तबद्ध गुंतवणूक करणे आणि आरोग्य विम्याचे संरक्षण घेणे, या सवयी तुम्हाला केवळ आर्थिकदृष्ट्या सुरक्षितच करणार नाहीत, तर तुमच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आवश्यक असलेले स्वातंत्र्य आणि आत्मविश्वासही देतील.

    आणखी वाचा :

  • खाते वाटप म्हणजे काय? हक्क, हरकत आणि जमिनीचा न्याय समजून घ्या

    खाते वाटप म्हणजे काय? हक्क, हरकत आणि जमिनीचा न्याय समजून घ्या

    खाते वाटपाची सुरुवात आणि खाते वाटप म्हणजे काय ?

    ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांसाठी जमीन म्हणजे केवळ मातीची ढिगं नव्हे; ती त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या संघर्षाची, कष्टाची आणि आजी-आजोबांच्या आशीर्वादाची परंपरा असते. घरातील मोठ्यांच्या निधनानंतर किंवा वारसा नोंदीत बदल आवश्यक असताना “खाते वाटप” ही प्रक्रिया कुटुंबाला नव्याने उभी राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. परंतु त्या प्रक्रियेबद्दल योग्य माहिती नसल्यामुळे अनेकांना मनात भीती, शंका आणि प्रश्न असतात. जमीन वाटायची, पण कुणाचा हिस्सा कमी होऊ नये, कुणाला अन्याय होऊ नये, आणि पुढे आपापसात वाद निर्माण होऊ नयेत—याची काळजी प्रत्येकालाच वाटते.

    खाते वाटप म्हणजे फक्त तुकडे करणे नाही, तर प्रत्येक वारसाला त्याचा कायदेशीर हक्क देणे हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे. याचा फायदा असा की, पुढे कर्ज, अनुदान, विक्री किंवा पिकांच्या नोंदी करताना कोणतीही अडचण येत नाही. एकाच सातबारावर राहिलेली जमीन सर्वांच्या एकत्र निर्णयाने योग्य तऱ्हेने विभागली की कुटुंबातील शांतता, विश्वास आणि एकमेकांवरील आदर अधिक दृढ होतो. म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्याने ही प्रक्रिया समजून घेणे आणि वेळेत पूर्ण करणे अत्यंत गरजेचे ठरते.

    खाते वाटपासाठी आवश्यक कागदपत्रे 

    खाते वाटपाची प्रक्रिया सुरू करताना सर्वप्रथम विचारला जाणारा प्रश्न म्हणजे—“कुठली कागदपत्रे लागतात?” कारण कागदपत्रे अपुरी असली, किंवा एखाद्या खातेदाराची संमती नसली, तर प्रक्रिया महिनोंमहिने अडकून बसते. म्हणूनच खातेदारांची संपूर्ण नावे, जमिनीचा गट क्रमांक, क्षेत्रफळ, गाव-तालुका, अद्ययावत 7/12 आणि 8A उतारे ही मूलभूत माहिती आधीच तयार असणे महत्त्वाचे ठरते. जमिनीच्या मूळ मालकांचे निधन झाले असल्यास वारस प्रमाणपत्र अत्यावश्यक मानले जाते, कारण त्यावरूनच कोणाला किती आणि कसा हक्क आहे हे निश्चित होते. ओळखपत्रे जसे आधार, PAN, मतदार ओळखपत्रही प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहेत. सर्वात महत्त्वाचे—”संमतीपत्र”.

    सर्व खातेदारांनी लेखी स्वरूपात वाटणी मान्य केल्याचे पत्र दिले, की संपूर्ण प्रक्रिया अधिक सहज पार पडते. काही वेळा गाव नमुना 2 किंवा जमीन नकाशा देखील लागतो, ज्यामुळे वाटणी कशी करता येईल याचे स्पष्ट चित्र तयार होते. योग्य कागदपत्रे असल्यास खाते वाटप फक्त एक सरकारी प्रक्रिया न राहता, कुटुंबासाठी शांतता आणि समाधानाची दिशा ठरते.

     खाते वाटपाची सविस्तर प्रक्रिया

    खाते वाटपाची प्रक्रिया फक्त कागदोपत्री नसते; ती प्रत्यक्ष तपासणी, मोजणी, पंचनामा आणि कायदेशीर पडताळणी यांच्या एकत्रित प्रवासातून पूर्ण होते. सर्व खातेदारांच्या संमतीनंतर तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला जातो. त्यानंतर तलाठी प्रत्यक्ष जमिनीची पाहणी करण्यासाठी येतो. किती जमीन कुठे आहे? रस्ता आहे का? पाणी, विहीर, कालवा किंवा इतर सुविधा कुणाला किती लागतील—हे सर्व पाहून तो प्राथमिक अहवाल तयार करतो. नंतर मंडळ अधिकारी आणि तलाठी मिळून पंचनामा तयार करतात. हा पंचनामा म्हणजे जमीन किती भागात विभागता येईल याचे प्रामाणिक चित्रण. हा अहवाल तहसीलदाराकडे जातो, जिथे तपासणी, सुनावणी आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम आदेश दिला जातो.

    खाते वाटपाची सुरुवात आणि खाते वाटप म्हणजे काय

    आदेश मिळाल्यावर महसूल विभाग प्रत्येक व्यक्तीच्या नावाने स्वतंत्र 7/12 तयार करतो. ही प्रक्रिया कधी कधी वेळ घेते, पण एकदा पूर्ण झाली की खातेदाराला त्याचा स्पष्ट ताबा, कायदेशीर हक्क आणि स्वतंत्र नोंद मिळते. अनेक कुटुंबांसाठी हा क्षण अत्यंत भावनिक असतो—कारण या कागदात त्यांच्या नात्यांची, मेहनतीची आणि हक्कांची नोंद असते.

    खाते वाटपात वाद झाल्यास काय करावे ? 

    जमीन प्रश्न नाजूक असतो, त्यामुळे अनेक वेळा खाते वाटपात वाद निर्माण होतात. एखाद्याला वाटते की त्याचा हिस्सा कमी झाला; दुसऱ्याला वाटते की त्याला रस्त्याला लागून असलेला भाग मिळायला हवा; तर तिसरा पूर्वी झालेल्या तोंडी कराराचा किंवा शेतीतल्या त्याच्या योगदानाचा दाखला देतो. अशा वेळी तहसीलदार सरळ खाते वाटपाचा आदेश देऊ शकत नाही. अशा वादग्रस्त प्रकरणात तहसीलदार सर्व खातेदारांना नोटीस देऊन सुनावणी घेतो. पुरावे सादर केले जातात—जुने करार, पिकांची नोंद, कुटुंबातील जुने विभागणी दाखले इत्यादी. जर वाद गंभीर असेल, आणि तहसीलदार निर्णय देऊ शकत नसेल, तर प्रकरण नागरी न्यायालयात (Civil Court) पाठवले जाते.

    न्यायालयच नंतर कोणाला किती हिस्सा मिळणार हे ठरवते व त्यानुसार आदेश दिला जातो. कोर्टाचा आदेश हा अंतिम असतो, आणि महसूल विभाग त्या आदेशानुसार खाते वाटप करतो. जरी वाद हा मानसिक थकवा आणणारा असला, तरी योग्य मार्गाने गेले तर न्याय मिळतो. अशा प्रक्रियेत कुटुंबातील विश्वास आणि संवाद खूप महत्त्वाचे ठरतात.

    हरकत नोंदवण्याची प्रक्रिया 

    खाते वाटप सुरू झाल्यावर एखाद्या खातेदाराला आपला हक्क धोक्यात आहे असे वाटल्यास त्याला हरकत नोंदवण्याचा पूर्ण अधिकार असतो. हरकत नोंदवल्यावर ती 7/12 उताऱ्यावर “हरकतदार” अशी नोंद करून दर्शवली जाते. यामुळे प्रक्रिया थांबत नाही, पण ती तपासणीसाठी तहसीलदारांकडे जाते. हरकत लिहिताना आपल्या बाजूचे पुरावे—मोजणी नोंदी, जुने जमीन करार, कुटुंबातील विभागणीची माहिती, तोंडी किंवा लेखी करार—हे सर्व दाखवणे गरजेचे असते. तहसीलदार सुनावणी घेतो, दोन्ही बाजूंचा मुद्दा ऐकतो आणि जमिनीची प्रत्यक्ष स्थिती तपासतो.

    जर हरकत योग्य वाटली तर प्रक्रिया तात्पुरती थांबवली जाते; अन्यथा ती पुढे नेली जाते. परंतु हरकत जास्त गंभीर असेल तर प्रकरण न्यायालयात जातो. ही प्रक्रिया खातेदारांच्या हक्कांचे संरक्षण करते. हरकत देण्याचा उद्देश वाद निर्माण करणे नाही, तर आपला हिस्सा योग्य आणि न्याय्य मिळावा हा असतो. योग्य पुरावे, शांत संवाद आणि कायदेशीर मार्ग वापरल्यास हरकतीचे निराकरण अधिक सोपे होते.

     ऑनलाइन खाते वाटप अर्ज आणि आधुनिक प्रक्रिया 

    आजच्या डिजिटल युगात महाराष्ट्र सरकारने खाते वाटप प्रक्रिया ऑनलाइन करून शेतकऱ्यांचे काम अधिक सोपे केले आहे. आता घरबसल्या aaplesarkar.mahaonline.gov.in या पोर्टलवरून Partition of Land साठी अर्ज करता येतो. खाते तयार करून लॉगिन केल्यावर Revenue Department निवडा आणि “Partition of Land” हा पर्याय वापरा. येथे अर्जदाराची माहिती, खातेदारांची नावे, जमिनीचे तपशील, नकाशा, कागदपत्रांचे स्कॅन अपलोड करणे—हे सर्व काही काही क्लिकमध्ये करता येते.

    खाते वाटपाची सुरुवात आणि खाते वाटप म्हणजे काय 1

    अर्ज सबमिट झाल्यावर तुम्हाला एक Application Number मिळतो ज्याद्वारे अर्जाची स्थिती तुम्ही सतत ऑनलाइन पाहू शकता. यामुळे तहसील कार्यालयात वारंवार जाण्याची गरज राहत नाही आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक होते. अनेक शेतकऱ्यांना ही ऑनलाइन सेवा मदतीचा हात देते, कारण वेळ आणि खर्च दोन्ही वाचतात. शिवाय, डिजिटल पद्धतीने नोंदी सुरक्षित राहतात आणि चुका होण्याची शक्यता कमी होते. प्रशासनाची ही आधुनिक पद्धत ग्रामीण भागातील लोकांना सोयीस्कर आणि आधुनिक शासनाचा अनुभव देते.

    खाते वाटपाचे महत्त्व, फायदे आणि कुटुंबातील एकता

    खाते वाटपाच्या मागे केवळ कायदेशीर प्रक्रिया नसते; ती कुटुंबातील विश्वास, आपुलकी आणि परंपरा उभे ठेवण्याची जबाबदारी असते. वेळेत आणि योग्य पद्धतीने केलेले खाते वाटप कुटुंबातील भविष्यातील वाद टाळते. प्रत्येक भावंडाला, प्रत्येक वारसाला त्याचा हक्क स्पष्ट मिळाला की मनात कोणताही गैरसमज राहत नाही. स्वतंत्र 7/12 मिळाल्यावर शेतकरी कर्ज, अनुदान, बियाणे, खत, विद्युत जोडणी अशा अनेक कामांसाठी स्वावलंबी होतो. विक्री करायची असल्यास अडथळे राहात नाहीत.

    महत्वाचे म्हणजे—कायदेशीर दृष्टीने स्पष्ट ताबा असल्याने भविष्यात कुणीही बाहेरचा व्यक्ती किंवा संस्था जमीन बळकावण्याचा प्रयत्न करू शकत नाही. अनेकवेळा आपण पाहतो की, फक्त एक कागद कमी असल्यामुळे भावंडांमध्ये वर्षानुवर्षे कटुता निर्माण होते. म्हणूनच, जमिनीची वाटणी प्रेमाने, पारदर्शकपणे, सर्वांच्या संमतीने आणि कायदेशीर चौकटीत करणे आवश्यक आहे. जमीन ही पिढ्यांची धरोहर आहे—ती तुकडे करण्यासाठी नाही, तर प्रत्येकाला त्याचा हक्क देऊन कुटुंबाला मजबूत करण्यासाठी असते. खाते वाटप म्हणजे फक्त जमीन विभागणे नव्हे; ते म्हणजे नात्यांची मजबुती आणि भविष्यासाठीची सुरक्षित पायाभरणी. 

    आणखी वाचा