रोज क्षणा क्षणाला आपली स्पर्धा सुरू असते. कधी इतरांबरोबर तर कधी स्वतःशीच. पण, प्रत्येक वेळी आपण जिंकूच असे नाही. कधी कधी पराभवही होत असतो. खचून न जाता प्रत्येक क्षणाला सामोरे जाण्यात जास्त यश असते. ‘अपयश ही यशाची पहिली पायरी असते’ याप्रमाणे आपले करिअर सुरू असते. आपण यशाचीच अपेक्षा जास्त ठेवत असतो आणि कधी कधी एखाद्या गोष्टीत मागे पडतो. आता हे मागे पडायचे नसेल, तर काही टीप्स
कामात परफेक्शन हवे
नेहमी आपण स्वतःला सगळ्यांपेक्षा खूप स्मार्ट समजत असतो. आपले शिक्षण सगळ्यांपेक्षा जास्त आहे, असं मानत असतो. जोपर्यंत आपण एखाद्या कामात परफेक्शन आणत नाही तोपर्यंत आपण स्वतःला स्मार्ट समजू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक कामावेळी ओव्हर कॉन्फिडन्स ठेवणे आपल्या नोकरीस घातक असू शकते.
प्रामाणिकपणा
नोकरीच्या ठिकाणी प्रमाणिकपणा असणे अत्यंत महत्त्वाचे असते. कामा संदर्भात नुसतीच आश्वासन नका देऊ, ती पूर्ण करा. कामाचे आश्वसन देऊन ते काम वेळच्या वेळी पूर्ण करून दाखवल्यास बॉसच्या आपल्याबद्दलची चांगली प्रतिमा निर्माण होते. नेहमी आपली बॉसच्या मनात चांगली प्रतिमा उमटवण्यासाठी प्रामाणिकपण गरजेचा असतो.
स्वतःला ठेवा अपडेट
काही वेळा आपण ज्या ठिकाणी काम करतो त्याच ठिकाणी कायस्वरूपी राहण्याचा विचार करत असतो. जरी हा विचार स्वतःला योग्य वाटत असला तरी तो आपल्या करिअरच्या दृष्टीने नुकसानकारक आहे. कारण एकाच जागी काम करत राहिलो तर नवीन गोष्टी कधी शिकता येणार नाही. सध्याच्या जगात स्वतःला अपडेट ठेवणे खूप महत्त्वाचे ठरत आहे.
आत्मविश्वास
आत्मविश्वास बाळगणे महत्त्वाचे ठरते. भले आपण कितीही पदव्या घेतल्या असो, कामाचा कितीही अनुभव असला आणि आपल्यात आत्मविश्वासच नसेल तर पदवीचा, अनुभवाचा काहीही उपयोग नाही. जे कोणते काम हाती घेणार आहोत ते काम पूर्ण करण्याचा आत्मविश्वासा आपल्यात असला पाहिजे. जर आत्मविश्वास नसेल तर, चांगले करिअर घडवता येणार नाही. न्युनंगड कधी बाळगू नये. स्वतःला कधी कोणत्या गोष्टीत कमी समजु नये.
जो जिद्दीने स्वप्नांच्या दिशेने झेप घेतो, त्याला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. आपल्यापुढे अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांनी खडतर प्रवास, कठोर परिश्रम करून अगदी काही वर्षांतच आपलं भलंमोठं साम्राज्य उभं केलं आहे. यामध्ये झेरोधा स्टॉक ब्रोकिंग स्टार्टअपचाही समावेश आहे. झेरोधा हे स्टार्टअप नितीन कामथ आणि निखिल कामथ या दोन भावांनी सुरू केलं आहे.
यशाचे शिखर गाठणाऱ्या या स्टार्टअपचे सहसंस्थापक नितीन कामथ यांनी सोमवारी (दि. २६ फेब्रुवारी) धक्कादायक खुलासा केला. त्यांनी सांगितले की, सहा आठवड्यांपूर्वी त्यांना स्ट्रोकचा सामना करावा लागला होता. कामथ यांनी ही माहिती त्यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून दिली. चला तर, नितीन कामथ यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.
झेरोधा (Zerodha) या स्टार्टअपने ही भारतात ऑनलाईन ट्रेडिंगला लोकप्रिय बनवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. नितीन कामथ यांनी त्यांचा भाऊ निखिलला सोबतीला घेत झेरोधाची स्थापना केली होती. नितीन लाखो युवा उद्योजकांचे प्रेरणास्थान आहेत.
किती वर्षांचे आहेत झेरोधाचे संस्थापक?
नितीन कामथ (Nithin Kamat) यांचा जन्म ५ ऑक्टोबर, १९७९ रोजी कर्नाटकाच्या शिमोगा येथे झाला. ४५ वर्षीय नितीन यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये बीईची पदवी घेतली आहे. २००८ मध्ये त्यांनी सीमा पाटील यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. विशेष म्हणजे, सीमा या झेरोधामध्ये क्वालिटी चीफ आहेत. या दाम्पत्याला एक मुलगाही आहे. त्यांची संपत्ती ही जवळपास २.७ अब्ज डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार, 22,526 कोटी रुपये आहे. क्रिकेट आणि फुटबॉलची प्रचंड आवड असलेले नितीन हे Rainmatter नावाच्या एका व्हेंचर कॅपिटल फर्मचेही सह-संस्थापक आहेत.
काय म्हणाले नितीन?
ट्विटरचा वापर कोण करत नाही? अर्थातच सर्वजण करतात. नितीनही एक सक्रिय ट्विटर युजर आहेत. ते नेहमी आपले विचार आणि अनुभव लोकांसोबत शेअर करत असतात. विशेष म्हणजे, जेव्हा त्यांना स्ट्रोक आला, तेव्हा त्यांनी याची माहिती देण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला होता. त्यांनी ट्वीट करत म्हटले होते की, “जवळपास सहा आठवड्यांपूर्वी मला अचानक हलका स्ट्रोक आला होता. यामागील कारण, वडिलांचे निधन, व्यवस्थित झोप पूर्ण न होणे, थकवा, शरीरातील पाण्याची कमतरता आणि जास्त काम करणे, यापैकी काहीही असू शकते.”
कशी झाली सुरुवात?
नितीन यांनी २०००च्या दशकाच्या सुरुवातीला एक ट्रेडर म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. एक वेळ अशी होती जेव्हा नितीन यांना कॉल सेंटरमध्ये ८ हजार रुपयांच्या मासिक वेतनावर काम करावे लागत होते. त्यावेळी नितीन फक्त १७ वर्षांचे होते. ही त्यांची पहिलीच नोकरी होती. नितीन यांनी त्यांच्या याच पगारासह स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू केली होती. सुरुवातीला एक वर्ष त्यांनी स्टॉक मार्केटला गांभीर्याने घेतले नव्हते. मात्र, नंतर त्यांना कळून चुकले की, यामधून चांगला नफा मिळवला जाऊ शकतो.
नितीन यांनी २००१ ते २००५ पर्यंत कॉल सेंटरमध्ये काम केले. सन २००५मध्ये त्यांनी आपला एक सल्लागार व्यवसाय सुरू केला. काही वेळानंतर जेव्हा NSEने मोफत ट्रेडिंग प्लॅटफॉर्म लाँच केला, तेव्हा नितीन यांना झेरोधा सुरू करण्याची कल्पना सुचली. कामथ बंधूंनी कोणत्याही फंडिंगशिवाय स्वत:च्या जोरावर २०१० साली बंगळुरूत झेरोधाची सुरुवात केली होती. २०१६ पर्यंत कंपनीच्या ग्राहकांची संख्या ७० हजार एवढी होती. मात्र, डिसेंबर २०१५मध्ये कंपनीने झिरो ब्रोकरेज इक्विटी इन्व्हेस्टिंग सुरुवात केली. त्यानंतर कंपनीच्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली.
मागील वर्षी मिळाली कोट्यवधींची भरपाई
नितीन आणि निखिल यांना मागील वर्षी म्हणजेच आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये १९५.४ कोटी रुपयांची भरपाई मिळाली होती. यादरम्यान दोन्ही भावांना प्रत्येकी ७२ कोटी रुपयांचा वार्षिक पगार मिळाला. म्हणजेच दोन्ही भावांना दर महिन्याला ६ कोटी रुपये पगार मिळाला.
कंपनीचा फायदा
झेरोधा या कंपनीच्या मागील आर्थिक वर्षातील उत्पन्न हे ३८.५ टक्क्यांच्या वाढीसह ६८७५ कोटी रुपये राहिले होते. हेच उत्पन्न २०२२च्या आर्थिक वर्षात ४,९६४ कोटी रुपये होते. यादरम्यान कंपनीचा नेट प्रॉफिटही ३९% वाढून २९०७ कोटी रुपयांवर पोहोचला. आर्थिक वर्ष २०२२मध्ये हे उत्पन्न २०९४ कोटी रुपये होते. कंपनीचे मूल्य पाहायचे झाले, तर तब्बल ३०००० कोटी रुपये आहे. हा नफा वार्षिक नफ्यापेक्षा जवळपास १० पटींनी जास्त आहे. स्टार्टअप कंपन्यांमध्ये कामथ बंधूंची संपत्ती ही सर्वाधिक आहे.
झेरोधाची गणना देशातील सर्वात मोठ्या डिस्काऊंट ब्रोकर्समध्ये होते. यामुळे कंपनीचे १ कोटींपेक्षा जास्त सक्रिय सबस्क्रायबर्स आहेत. कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ही १५०० पेक्षा जास्त आहे.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात पैसा कमावणे हा सर्वांपुढील यक्षप्रश्न राहिला आहे. पैसा कुणाला नको आहे. सर्वांनाच तो पाहिजे. लवकर पैसे कमावण्यासाठी लोक व्यवसाय करण्याचा सल्ला देतात. मात्र, व्यवसाय करणे आणि त्यात यश मिळवणे, हे वाटते तितके सोपे काम मुळीच नाही. यामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. जेव्हाही व्यवसाय किंवा त्याच्याशी संबंधित दिग्गजांची चर्चा होते, तेव्हा त्यात मुकेश अंबानी यांचं नाव आल्याशिवाय राहत नाही. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामील असलेले मुकेश अंबानी यांना आज कोणत्याही परिचयाची गरज नाहीये.
मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मालक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज ही तीच कंपनी आहे, जिने प्रत्येकाला फोन वापरण्याची सवय लावली होती. ही रिलायन्स कंपनी आज भारतातील सर्वाधिक मूल्य असणारी कंपनीही आहे. विशेष म्हणजे, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही १११ बिलियन डॉलर्स एवढी आहे. एवढं मोठं साम्राज्य, कोट्यवधी-अब्जो रुपये एका दिवसात किंवा एका रात्रीत कमावले जात नाहीत. यामागे त्यांचे वडील स्वर्गीय धीरूभाई अंबानी यांची कठोर मेहनत राहिली आहे. त्यांच्यानंतर मुकेश अंबानी यांनी आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे चालवत यशाच्या शिखरावर पोहोचवला आहे. तसं पाहिलं, तर मुकेश अंबानींना हा व्यवसाय वारशात मिळाला आहे, पण त्यांनीही आपलं डोकं लावून आणि कठोर मेहनत घेऊन एक वेगळी ओळख बनवली आहे. त्यामुळे आज आपण या लेखातून यशस्वी बनण्याच्या त्यांच्या ५ नियमांविषयी जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्हीही बिझनेस किंग बनू शकता.
यशस्वी बनण्यासाठी मुकेश अंबानींचे ५ नियम (Mukesh Ambani’s 5 rules to success)
१. धैर्यवान बना
मुकेश अंबानी यांनी यशस्वी बनण्यासाठी सांगितलेला पहिला नियम म्हणजे धैर्यवान बना. व्यवसायात किंवा जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात धैर्याशिवाय कोणीही मोठे यश मिळवले नाहीये. अर्थातच, तुम्ही एखादी मोठी गोष्ट करायला जाता, तेव्हा तुम्हाला थोडी भीती वाटते. मात्र, तुमच्यात दडलेला नायक शोधण्यासाठी तुम्हाला भीतीवर विजय मिळवावाच लागेल. धैर्याने, आत्मविश्वासाने कोणत्याही संकटावर मात करू शकता.
२. समस्या शोधा आणि त्यावर तोडगा काढा
अंबानींचा दुसरा नियम असा की, एक उद्योजक म्हणून, तुम्हाला ज्या समस्येचे निराकरण करायचे आहे ती शोधणे खूप महत्वाचे आहे. अंबानी सांगतात, ममला युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (UDCT) मध्ये प्रोफेसर शर्मा मिळाल्याने मी धन्य झालो. ते नेहमी म्हणायचे की, मी तुम्हाला समस्यांची यादी देणार नाही. तुम्ही जाऊन कोणत्याही गोष्टीवर काम करू शकता. तुम्हाला एखादी समस्या सापडेल आणि मग तुम्हाला सापडलेल्या समस्येच्या आणि त्यावर शोधलेल्या निराकरणाच्या गुणवत्तेवर मी तुम्हाला ग्रेड देईन. त्यामुळे उद्योजकाला हेच नियम लागू होतात की, तो समस्या सोडवत नाही, तर तो प्रथम समस्या शोधतो. एकदा तुम्हाला समस्या सापडली की, तुम्ही ती सोडवता.
३. कठोर मेहनत करा
अंबानी म्हणतात, तुमचे धावण्याचे शूज घाला, परंतु लक्षात ठेवा की, वैयक्तिक आणि व्यावसायिक यश हे स्प्रिंट (Sprint) नसून एक मॅरेथॉन आहे. आपण एका गतिमान जगात राहत असल्याने भाग्यवान आहोत, जिथे काहीही शक्य आहे. मात्र, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, असे रातोरात यश मिळत नाही. तुम्हाला समर्पित व्हावे लागेल. एकल मनाने राहावे लागेल आणि कठोर परिश्रम करावे लागेल. यातील कोणत्याच गोष्टीला पर्याय नाही. तसेच, हेही लक्षात ठेवा की, जीवनाच्या या मॅरेथॉनमध्ये आपले ध्येय साध्य करणे महत्वाचे आहे.
४. उच्च उद्देशाची सेवा करा
वडील धीरूभाई अंबानी यांनी १०० डॉलर्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड सुरू केल्याचे मुकेश अंबानी सांगतात. ते म्हणतात, १९८० मध्ये जेव्हा मी व्यवसाय जॉईन केला, तेव्हा कंपनीचे बाजारमूल्य हे ३० किंवा ४० दशलक्ष डॉलर्स होते. पुढच्या ३० वर्षात, या देशाने दिलेल्या संधींमुळे आम्हाला भारतासाठी संपत्ती निर्माण करता आली.
माझ्या वडिलांचा मोठा विश्वास होता की, कोणताही व्यवसाय ज्याचा एकमेव उद्देश पैसा कमविणे हा आहे तो करणे योग्य नाही. खरं तर, व्यवसाय हा एक मोठा सामाजिक हेतू पूर्ण केला पाहिजे. रिलायन्सने आपले सर्व पैसे भांडवली बाजारातून आणि वैयक्तिक लहान भागधारकांकडून उभे केले, म्हणून आम्ही सामान्य भारतीयांपैकी फक्त रिलायन्समध्ये गुंतवणूक करून दहा लाख करोडपती निर्माण केले आहेत आणि हीच देशासाठी संपत्ती निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. संधी निर्माण झाली की संपत्ती ही येतेच.
५. अपयश स्वीकारा
अंबानी असेही म्हणतात की, अपयश हे सामान्य असते. सर्व यश पाहून, माझ्या स्वतःच्या बाबतीतही लोक हे पाहत नाहीत की, यशस्वी होण्यापूर्वी मी किती वेळा अयशस्वी झालो आहे. तुम्ही यशस्वी होण्यापासून एक पाऊल दूर आहात. त्यामुळे अपयशाने कधीही निराश होऊ नका. त्याच्याकडून शिका, पण हार मानू नका.
वाचक मित्रांनो, तुम्हाला या लेखातील कोणता नियम सर्वात जास्त आवडला, हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. याव्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणत्या व्यक्तींच्या टिप्स वाचायला आवडतील, या कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा.
रिझर्व्ह बँकेसह वित्तीय क्षेत्रातील नियामकांनी अनधिकृत कर्ज प्रदात्या ॲपचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणखी उपाययोजना करण्यास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी सूचित केले. या फसव्या ‘लोन ॲप’नी अनेक भोळ्या कर्जदारांना जाळ्यात फासून त्यांची लुबाडणूक केली आहे. अनेकांना प्रचंड त्रास सहन करावा लागल्याच्या या प्रकरणाची अर्थमंत्र्यांनी या निमित्ताने दखल घेतली.
येथे आयोजित वित्तीय स्थिरता आणि विकास परिषदेच्या (एफएसडीसी) २८ व्या बैठकीपुढे बोलताना, सीतारामन यांनी नियामकांना सतत जागरुक राहण्यास आणि देशांतर्गत आणि जागतिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, आर्थिक स्थिरतेला जोखीम ठरणाऱ्या संभाव्य घटकांना शोधून ते पटलावर आणण्यासाठी दक्ष आणि सक्रिय राहण्यास सांगितले.
वित्तीय क्षेत्रातील वेगवेगळ्या नियामकांना भेडसावणारे सामाईक मुद्दे, ज्यामध्ये एकसमान केवायसी मानदंड निर्धारित करणे, संपूर्ण वित्तीय क्षेत्रातील केवायसी नोंदींची आंतर-उपयोगिता आणि केवायसी प्रक्रियेचे सरलीकरण आणि डिजिटलीकरण यांचा देखील चर्चेत समावेश होती. ऑनलाइन ॲप्सद्वारे अनधिकृत कर्ज देण्याचे हानिकारक प्रभाव रोखणे आणि त्यांचा पुढील प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करणे हा त्यापैकीच एक चर्चेचा मुद्दा होता.
सरकारने डिसेंबरमध्ये संसदेला दिलेल्या माहितीप्रमाणे, गूगलने एप्रिल २०२१ ते जुलै २०२२ या कालावधीत प्ले स्टोअरवरून तब्बल २,५०० फसव्या कर्ज प्रदात्या ॲप काढून टाकली आहेत. वित्तीय क्षेत्रातील नियामकांनी सक्रिय राहणे, सतत दक्ष राहून सायबर सुरक्षा तैनात ठेवणे आणि भारताच्या वित्तीय व्यवस्थेतील अशा कोणत्याही त्रुटी-उणीवा कमी करण्यासाठी योग्य आणि वेळेवर कारवाई करणे हे उद्दिष्ट असायला हवे, असे अर्थमंत्र्यांनी सूचित केले.
रिझर्व्ह बँख गव्हर्नर शक्तीकांत दास, सेबी अध्यक्षा माधबी पुरी बुच, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे (इर्डा) अध्यक्ष देबाशिष पांडा, दिवाळखोरी आणि नादारी बोर्डाचे अध्यक्ष रवी मित्तल, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष दीपक मोहंती आणि इंटरनॅशनल फायनान्शिअल सर्व्हिसेस सेंटर्स अथॉरिटीचे (आयएफएससी) अध्यक्ष के. राजारामन हे या बैठकीला उपस्थित होते. यांच्याशिवाय, केंद्रीय वित्त सचिव टी व्ही सोमनाथन, आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ, वित्तीय सेवा विभागाचे सचिव विवेक जोशी आणि महसूल सचिव संजय मल्होत्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.
या बचत योजनांबाबत बदलले नियम, गु्ंतवणूकदारांनो काळजी घ्या; ३१ मार्चपर्यंत ‘ही’ कामे केली नाहीत तर दंड द्यावा लागेल
दरवर्षी आर्थिक योजनांमध्ये मोठे बदल होत असतात. या वर्षीसाठी विविध लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF, सुकन्या समृद्धी योजना आणि NPS च्या गुंतवणूकदारांना दंडासह इतर नुकसान होऊ शकते. या कोणत्याही योजनेत तुमची गंतवणूक असल्यास ही काम करुन घेणे तुमचे देखील यापैकी कोणत्याही योजनेत खाते असल्यास ३१ मार्चपर्यंत ही कामे करुन घेणे गरजेचे आहे.
या आर्थिक वर्षात अजुनही खात्यात पैसे जमा केले नाहीत तर नुकसान होऊ शकते, तुमच्याकडे खाते सुरू ठेवण्यासाठी फक्त ३१ मार्चपर्यंत वेळ आहे. तुम्ही किमान वार्षिक ठेव चुकवल्यास, तुमचे खाते गोठवले जाऊ शकते. तसेच, तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
PPF, NPS आणि सुकन्या समृद्धी योजनेत किमान ठेव ठेवण्याची अंतिम तारीख प्रत्येक आर्थिक वर्षाची ३१ मार्च आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ही तारीख ३१ मार्च २०२४ आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी नियम २०१९ नुसार, PPF खातेधारकांना प्रत्येक आर्थिक वर्षात खात्यात किमान ५०० रुपये जमा करणे आवश्यक आहे. किमान रक्कम जमा न केल्यास पीपीएफ खाते बंद केले जाईल.
खाते बंद झाल्यानंतर कर्ज आणि आंशिक पैसे काढण्याची सुविधा सुरू होणार नाही. खाते पूर्णपणे बंद केल्याशिवाय तुम्ही तुमच्या नावावर दुसरे खाते उघडू शकणार नाही. बंद केलेले पीपीएफ खाते पुन्हा उघडता येते, पण यासाठी तुम्हाला दरवर्षी ५० रुपये दंड भरावा लागेल. दंडासोबतच व्यक्तीला वार्षिक किमान ठेव म्हणून ५०० रुपये देखील जमा करावे लागतील. किमान ठेव न भरल्यामुळे खाते बंद झाल्यास, ते पुन्हा उघडण्यासाठी तुम्हाला दरवर्षी ५५० रुपये द्यावे लागतील.
सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठीची योजना आहे. मुलींच्या करिअरसाठी आणि लग्नासाठी पैशाची व्यवस्था करण्यासाठी एक चांगला पर्याय मानला जातो. जर तुमचे सुकन्या समृद्धी योजनेत खाते असेल तर तुम्हाला दरवर्षी किमान २५० रुपये जमा करावे लागतील. जर तुम्ही हे पैसे जमा केले नाहीत तर खाते डिफॉल्ट मानले जाते. खाते पुन्हा उघडण्यासाठी वर्षाला ५० रुपये दंड भरावा लागेल. तसेच, दरवर्षी किमान २५० रुपये जमा करावे लागतील.
जर तुम्ही आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये जुन्या कर प्रणालीमध्ये कर भरण्याचा विचार करत असाल, तर PPF आणि सुकन्या सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास कर वाचवण्याची संधी मिळते. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, PPF आणि सुकन्यामधील गुंतवणुकीवर १.५ लाख रुपयांपर्यंतची वजावट उपलब्ध आहे. 80C अंतर्गत कपातीचा लाभ घेऊन कर ओझे कमी करण्यासाठी, ३१ मार्च २०२४ पर्यंत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. प्रत्येक आर्थिक वर्षासाठी कर बचत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे. तुम्ही या तारखेपर्यंत गुंतवणूक न केल्यास, तुम्ही त्या आर्थिक वर्षात कपातीचा दावा करू शकणार नाही.
तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर कमेंटमध्ये Yes असे लिहा. तसेच, तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवर लेख वाचायला आवडतील, हेदेखील कमेंट करून सांगायला विसरू नका. तुमच्या मित्रमंडळींनाही हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.
तब्बल १४० कोटींहून अधिक भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब घडली आहे. मंगळवारी (दि. २७ फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ येथील इस्रोच्या ३ मुख्य तांत्रिक विभागांचं उद्घाटन केले. तसेच, त्यांनी गगनयान मोहिमेतील ४ अंतराळवीरांची नावे आख्ख्या जगापुढे जाहीर केली. हे चौघेही भारतीय हवाई दलाचे चाचणी वैमानिक (Test Pilot) आहेत. यामुळे हा कोट्यवधी भारतीयांसाठी गर्वाचा क्षण आहे.
#ISRO reveals the identities of the four astronaut designates for #Gaganyaan's first crewed mission! 👨🚀
• Group Captain Prashanth BalaKrishnan Nair • Group Captain Ajit Krishnan • Group Captain Angad Prathap • Wing Commander Shubhansku Shukla
गगनयान मोहिमेअंतर्गत भारताचे अंतराळवीर स्वतःच्या बळावर अवकाशात पाठवले जाणार आहेत. यामध्ये तब्बल ६ टन वजनाचे अवकाश यान अवकाशात पाठवले जाणार आहे. या यानाची क्षमता ४ अंतराळवीर सामावतील इतकी असणार आहे. विशेष म्हणजे, हे यान पृथ्वीपासून तब्बल ४०० किमी अंतरावर ३ दिवस प्रदक्षिणा घालेल, असे गगनयान मोहिमेचे नियोजन असेल.
अशात या मोहिमेची जबाबदारी असणाऱ्या चार अंतराळवीरांची नावेही समोर आली आहेत. त्यात ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप, ग्रुप कॅप्टन अजित कृष्ण आणि विंग कमांडर शुभांशू शुक्ला यांचा समावेश आहे. हे चारही वैमानिक बंगळुरू येथील अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. इतकंच नव्हे, तर रशियात या चौघांनीही काही काळ अंतराळवीरासाठी आणि अवकाश प्रवासासाठी आवश्यक असलेले प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या चारही वैमानिकांना ऍस्ट्रोनॉट विंग्स (अंतराळवीर पंख) देऊन जगापुढे सादर केले. तसेच, त्यांना पुढील तयारीसाठी शुभेच्छाही दिल्या.
Indian astronauts training video in Russia and India for the past 2 years for Gaganyaan mission. @isropic.twitter.com/k2BdFiTDoN
या चारही वैमानिकांबाबत महत्त्वाची बाब अशी की, त्यांनी देशातील सर्व प्रकारची लढाऊ विमाने उडवली आहेत. या चौघांनीही प्रत्येक प्रकारच्या लढाऊ विमानांची सखोल माहिती आत्मसात केली आहे. त्यांनी विमानांची वैशिष्ट्ये आणि कमतरता यांचा बारकाईने अभ्यास करून त्यांचे ज्ञान समृद्ध केले आहे. त्यामुळे या चौघांची गगनयान अंतराळवीर प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
राकेश शर्मा भारताचे पहिले अंतराळवीर
यापूर्वी एप्रिल १९८४ मध्ये राकेश शर्मा हे तत्कालिन सोव्हिएत रशियाच्या Soyuz-11 या यानातून अवकाश भ्रमंती करत भारताचे पहिले अंतराळवीर बनले होते. त्यानंतर कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांच्यासह काही भारतीय वंशाच्या नागरिकांनी इतर देशांचे प्रतिनिधित्व करत अंतराळवीर म्हणून अवकाश वारी केली होती.
मात्र, आतापर्यंत भारताला स्वत:च्या बळावर भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवता आला नव्हता. त्यामुळे आता देशाचे चारही अंतराळवीर पुढील वर्षी म्हणजेच २०२५च्या अखेरीस किंवा २०२६ च्या सुरुवातीला गगनयान मोहिमेतून अवकाश वारी करतील.
विशेष म्हणजे, स्वत:च्या बळावर अवकाशात अंतराळवीर पाठवणारा भारत हा चौथा देश ठरेल. भारतापूर्वी रशिया, अमेरिका आणि चीन यांनीही स्वबळावर अंतराळवीर अवकाशात पाठवले आहेत. लक्षवेधी बाब अशी की, युरोपियन स्पेस एजन्सी, जपान आणि कॅनडा यांसारख्या देशांना अशी कामगिरी अजूनही जमलेली नाहीये.
व्यवसाय करायचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मित्रांनो, असे अनेक बिझनेस स्टार्टअप आहेत, जे सध्याच्या बाजारात मोठ्या आव्हानांचा सामना करताना दिसत आहेत. मात्र, जर तुम्ही स्वतःचा स्टार्टअप लाँच करण्याचा विचार करत असाल किंवा आधीपासून या प्रक्रियेत उडी घेतली असेल, तर तुम्ही एक किंवा त्याहून अधिक कॉमन (Common) स्टार्टअप समस्या अनुभवल्या असतील. खरं तर, आज आम्ही तुम्हाला अशा ७ कॉमन स्टार्टअप चुका सांगणार आहोत, ज्यांच्यावर तोडगा काढला जाऊ शकतो. चला तर, वेळ न घालवता जाणून घेऊयात…
१. पात्र उमेदवार
हे जग वेगाने पुढे जात आहे. जगात अनेक लोक आहेत आणि त्यांच्यासाठी कधीही न संपणारे इंटरनेट कनेक्शनही आहे. अशात तुम्हाला वाटते की, नवीन स्टार्टअपमध्ये काम करण्यासाठी आपल्याला पात्र उमेदवार सापडतील. मात्र, दुर्दैवाने असे नसते. पात्र उमेदवार शोधणे हे तितकेच आव्हानात्मक असू शकते. तसेच, तुम्हाला पात्र उमेदवार जरी मिळाला, तरीही त्याच्या कामाची पद्धत, त्याची मूल्ये आणि इतर गोष्टी आवडतीलच असे होत नाही.
त्यामुळे नवीन स्टार्टअप आणि प्रस्थापित व्यवसायांसह पात्र उमेदवारांना जोडण्यासाठी चांगला ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या जॉब पोर्टल साइट्सचा वापर केल्याने तुम्ही फक्त आवश्यक पात्रता असलेल्यांचीच मुलाखत घेत आहात, याची खात्री करू शकता. इंटरनेट तुमच्या निवडी कमी करण्यासाठी अनेक उत्तम साधने ऑफर करत असताना तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवू नका.
२. एचआर आणि पगार
स्टार्टअप सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात एचआर विभाग आणि त्याचे सर्व पैलू हाताळणे, यामुळे संपूर्ण स्टार्टअप प्रक्रियेत अतिरिक्त ताण आणि चिंता वाढवू शकते. त्यामुळे, तुमच्याकडे जे काही आहे ते पुरेसे आहे. तुमच्यासाठी फक्त तुमच्या ब्रँडची प्रतिमा आणि मूल्यांवर काम करणे, नवीन कर्मचारी नियुक्त करणे, दुकान सुरू करणे आणि आपल्या ग्राहकांचा शोध घेणे, हे महत्त्वाचे आहे. तुम्हाला शेवटची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे एचआर विभाग स्थापन करणे.
हा अधिकचा ताण टाळण्यासाठी, काही व्यवसाय एचआर विभाग हाताळण्यासाठी पीईओ (Professional Employer Organization) सेवा निवडतात. जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी सर्वोत्तम PEO कंपन्यांपैकी एक निवडता, तेव्हा तुमच्या सर्व HR संबंधी गरजांची काळजी घेतली जाते. यामुळे होतं असं की, तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित करू शकता.
३. वाढती स्पर्धा
सध्याच्या जगात प्रचंड स्पर्धा वाढली आहे. यामागील कारण फक्त एकच आहे. ते म्हणजे वेब. वेब पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात लोकांना जोडत असल्याने स्पर्धा वाढली आहे. नवीन व्यवसायांना त्यांच्या उद्योगांमध्ये अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते, ज्यामध्ये सारखाच व्यवसाय करणारे सुस्थापित व्यावसायिक आधीच मोठ्या संख्येने ग्राहकांचे नेतृत्व करतात. तसेच, आपली प्रतिष्ठाही निर्माण करतात. अनेकदा काही व्यवसाय मालक या आव्हानामुळे भारावून जातात, परंतु याकडे वाईट गोष्ट म्हणून पाहण्याऐवजी, वाढ होण्याची संधी म्हणून पाहा. स्पर्धेचा अभ्यास केल्याने, बाजार आणि तुमच्या भावी ग्राहकांबद्दल महत्त्वाची माहिती मिळू शकते.
४. मार्केटिंगसाठी कष्ट न घेणे
मार्केटिंग हा तुमच्या व्यवसायाच्या आत्मा आहे. कारण, यामुळेच नवीन ग्राहक तुमच्या स्टोअर किंवा वेबसाइटवर येतात. तसेच, तुमच्या ब्रँडची दृश्यमानता (Visibility) वाढवते आणि तुम्ही ज्या उद्योगात काम करत आहात, त्या उद्योगाचा एक प्रतिष्ठित भाग म्हणून तुमचा व्यवसाय स्थापित करण्यात मदत करते. अनेक स्टार्टअप्स मार्केटिंगसाठी संघर्ष करतात. कारण, त्यांच्याकडे पेरोलवर कोणीही नसते, ज्यामुळे त्यांना कळेल की, ते काय करत आहेत. मार्केटिंग किंवा SEO तज्ञ हा नवीन व्यवसायाचा व्यावहारिकदृष्ट्या एक आवश्यक घटक आहे. कारण, चांगल्या मार्केटिंगशिवाय, आपल्या उत्कृष्ट उत्पादनांबद्दल किंवा सेवांबद्दल कोणालाही माहिती होणार नाही.
तुम्ही जर मार्केटिंगमध्ये संघर्ष करत असाल, तर थर्ड पार्टी फर्म किंवा SEO तज्ञ नियुक्त केला पाहिजे. जेणेकरून तुमच्या नवीन व्यवसायाला तुमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत मिळू शकते. तसेच, ते सातत्याने तुमच्याकडे येत राहतील.
५. निधी (फंडिंग)
खरं तर, अनेक व्यवसाय असे असतात, ज्यांना पुरेसा निधी कधीच मिळत नाही, मिळतो का? दररोज किंवा आठवड्याला आपल्याकडे कल्पना येतात, त्यापैकी काहींवर आपण कृती करतो आणि इतर काही बॅकअपमध्ये अशा वेळेसाठी ठेवतो, जेव्हा आपल्याकडे जास्त पैसा, अधिक वेळ किंवा स्पष्टता असते. अनेक स्टार्टअप्सना निधीच्या कमतरतेच्या समस्येचा सामना करावा लागतो आणि काहींना मर्यादित बजेटमुळे काही उत्पादने आणि सेवाही मिळतात.
निधी कधीही पुरेसा पुरवठा करत नाही, परंतु स्टार्टअप आणि स्थापित व्यवसायांसाठी बरेच पर्याय असतात. नवीन स्टार्टअपसाठी एंजेल गुंतवणूकदार, बँक कर्ज आणि नेहमीच लोकप्रिय क्राऊड-फंडिंग यांसारखे काही पर्याय आहेत. गुंतवणूकीसाठी पैसे कर्ज म्हणून घेण्यापूर्वी किंवा स्वीकारण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या निधीच्या अटींची चांगली जाणीव आहे, याची खात्री जरूर करा.
६. वेळेचे खराब नियोजन
नवीन व्यवसाय जेव्हाही सुरू करतात, तेव्हा व्यवसाय मालक एक सामान्य चूक नक्कीच करतात. ती म्हणजे, त्यांना वाटते की, ते संपूर्ण व्यवसाय स्वत: व्यवस्थापित करू शकतात. आपल्या वैयक्तिक दृष्टिकोनातून इतरांवर विश्वास ठेवणे, अर्थातच कठीण काम आहे. तुमच्या व्यवसायाचे यश हे थेट तुमच्या वैयक्तिक यशाशी जोडलेले असते. वस्तुस्थिती अशी आहे की, प्रत्येकजण चांगला व्यवस्थापक नसतो. काही लोक जरी कल्पना, वित्त किंवा मार्केटिंगमध्ये उत्कृष्ट असले, तरीही व्यवसाय व्यवस्थापित करू शकत नाहीत. तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या व्यवस्थापनाशी संघर्ष होत असल्यास, तुम्हाला तो चालवण्यात मदत करण्यासाठी कोणालातरी कामावर घेणे, यात कसलीही लाज नाही. याव्यतिरिक्त तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखत असलेल्या व्यक्तीला, ज्याला व्यवस्थापन प्रक्रियेसाठी योग्य कौशल्ये माहिती आहेत, अशा व्यक्तीला व्यावसायिक भागीदार बनवण्यात कोणतीही अडचण नाही.
७. संवाद
नवीन स्टार्टअप म्हणजे एका कॉर्पोरेट छताखाली काम करणारी पूर्णपणे नवीन टीम असू शकते. अगदी उत्तम परिस्थितीतही संवाद आव्हानात्मक बनू शकतो. नवीन लोकांशी जुळवून घेणे प्रत्येकासाठी सोपे नसते, परंतु व्यवसायाच्या निरंतर यशासाठी तुमच्या सहकाऱ्यांमध्ये योग्य संवाद असणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाइन चॅट रूमसह एक संघ व्यवस्थापन प्लॅटफॉर्म सेट करा, जेणेकरून व्यवसायातील प्रत्येकजण सहजपणे एकमेकांशी संपर्क साधू शकेल, फायली शेअर करू शकेल आणि त्यातूनच कामांचे वाटपही करू शकेल.
तर मित्रांनो, आता व्यवसायात उतरताना किंवा उतरला असाल, तर तुम्ही या समस्या ओळखून त्यावर तोडगा काढू शकता.
तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर कमेंटमध्ये Yes असे लिहा. तसेच, तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवर लेख वाचायला आवडतील, हेदेखील कमेंट करून सांगायला विसरू नका. तुमच्या मित्रमंडळींनाही हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.
असं म्हणतात की अहंकार ही अध:पतनाची पहिली पायरी असते. असाच काहीसा अहंकार ChatGPT टूल बनवणाऱ्या सॅम अल्टमॅन यांनी दाखवला होता. त्यांनी म्हटलं होतं की, जर भारताने ChatGPT सारखं टूल बनवलं, तर ते निश्चितच अपयशी ठरेल. मात्र, आता भारतीयांसाठी आनंदाची बाब समोर येत आहे.
पुढील महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये ChatGPT ला टक्कर देण्यासाठी देसी AI टूल हनुमान (Hanooman) लाँच केले जाणार आहे. त्यामुळे Hanooman ChatGPT शी जोरदार टक्कर असेल. कारण, ChatGPT प्रीमिअम सेवांसाठी जास्त पैसे चार्ज करते, तर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले रिलायन्स ग्रूपचे चेअरमन मुकेश अंबानी ही सेवा स्वस्त दरात किंवा मोफतही उपलब्ध करून देऊ शकतात.
काय आहे ‘हनुमान’ AI मॉडेल?
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि आयआयटी मुंबई सोबत इतर ७ आघाडीच्या इंजिनीअरिंग संस्थांच्या प्रयत्नातून एक देसी AI मॉडेल बनवण्यात आले आहे. या AI मॉडेलचे नाव हनुमान ठेवण्यात आले आहे. BharatGPT संस्थेच्या लोकांनी मुंबईतील एका तंत्रज्ञान संम्मेलनात हनुमान AI लँग्वेज मॉडेल सादर केले. हनुमान AI मॉडेलची सेवा पुढील महिन्यापासून सुरू होईल.
यादरम्यान एक बाईक मेकॅनिकला AI मॉडेलसह तमिळ भाषेत प्रश्न विचारताना दाखवले गेले. तसेच, एका बँकरला AI बॉटसोबत हिंदी भाषेत संवाद साधताना पाहिले गेले. यासोबतच एका डेव्हलपरने AI मॉडेलच्या मदतीने कम्प्यूटर कोडही लिहिला.
का आहे खास?
हनुमान AI मॉडेल ११ स्थानिक भाषांमध्ये काम करण्यास सक्षम असेल. हनुमान AI मॉडेल, शासन, आरोग्य, शिक्षण आणि वित्त सेवांसारख्या प्रमुख 4 क्षेत्रांना प्राथमिकता देऊन आपल्या सेवा पुरवेल. हे मॉडेल शासन, मॉडेल आरोग्य, शिक्षण आणि वित्त यांसारख्या क्षेत्रांसाठी डिझाईन केले गेले आहे. जर हे मॉडेल यशस्वी ठरले, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात रिलायन्स मोठा प्लेअर म्हणून समोर येईल. हनुमान AI मॉडेल (Hanooman AI Model) भारतीय धर्मग्रंथापासून प्रेरित आहे. जिओकडून इतर अनेक AI मॉडेल जसे की, जिओ ब्रेनवरही काम सुरू आहे.
LLM आहे तरी काय?
हनुमान AI मॉडेल स्पीच टू टेक्स्ट यासारख्या युजर फ्रेंडली सेवा देईल. हे एक मोठे लँग्वेज मॉडेल किंवा LLM (Large Language Model) सिस्टीम आहे, जी मोठ्या प्रमाणात डेटाचा वापर करून शिकते आणि नैसर्गिक साऊंड रिस्पॉन्स जनरेट करते. असे मॉडेल जनरेटिव्ह AI चा वापर करतात, जी एक नवीन प्रकारची आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. भारताचे हे मॉडेल आगामी काळात OpenAI च्या ChatGPT ला टक्कर देईल.
हे मॉडेल यशस्वी झाले, तर हे AI तंत्रज्ञान विकसित करण्याच्या शर्यतीत भारताचा मार्ग मोकळा करेल. मागील वर्षीच्या एका कार्यक्रमादरम्यान रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी एका कार्यक्रमादरम्यान IIT Bombay सोबत एका प्रोजेक्टवर सन २०१४ पासून काम करण्याची माहिती दिली होती. त्यांनी म्हटले होते की, जिओ २.० सोबत BharatGPT चीही सुरुवात केली जाईल. अशाप्रकारे, सर्वांनाच या मॉडेलची आतुरता लागली आहे.
तुम्हाला हा लेख कसा वाटला, हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच, तुम्हाला लेख आवडला असेल, तर तमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका. याव्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर लेख वाचायला आवडेल, हेही नक्की कळवा.
आत्महत्त्याच करू का? एरवी जगून तरी काय करू हेच कळत नाहीए़ त्यापेक्षा जावं आहे-नाही ते सारं सोडून – विचार भयाण होता. वेळच तशी होती. समोर आयुष्याचा सारा काळोखच दिसत होता. एवढं मोठं यश मिळवल्याचा आनंद क्षणिक वाटला. पण ते सारं मागं सोडणं कठीण वाटत होतं.
निराशेनं ग्रासलेल्या, तिशीही न गाठलेल्या या तरुणानं आत्महत्त्येचा विचार केला. याच नैराश्यात त्याला दारूचं व्यसन लागलं. दारू पिऊन आपण जीवघेण्या वेगानं गाडी दामटतोय, याचंही भान त्याला राहत नव्हतं. अशाच गुन्ह्यांमध्ये त्याला दोनदा पकडलं गेलं. शिवाय त्याच्या अंमली पदार्थ घेत असलेल्या फोटोनं जगाला हादरवून सोडलं. आत्महत्त्येचा विचार डोक्यात सारखा भिरभिरत होता, पण त्याचं नशीब थोर म्हणून मित्र भले मिळाले होते. त्या मित्रांनी त्याची आत्मनाशाची वाट अडवून धरली. आणि मग तो परतला परतला आणि पुन्हा त्याच तडफेनं त्यानं अनेक विक्रम केले. तो तरुण म्हणजे अमेरिकेचा महान जलतरणपटू मायकेल फेल्प्स.
किराणा दुकानात बसणं, फावल्या वेळात क्रिकेट एके क्रिकेट खेळणं. आयुष्याचं ध्येय काय? तर वकार युनुससारखी बॉलिंग जमायला हवी. पाकिस्तान ही त्याची फेव्हरिट क्रिकेट टीम. अन् फास्ट बॉलर व्हायचं हे स्वप्न. सचिन तेंडुलकर अन् ख्रिस गेल हे दोघे आवडते क्रिकेटपटू. गल्लीतल्या क्रिकेट टीममध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर खेळायचा अन् फास्ट बॉलिंग करायचा. फुटबॉलही त्याचा जीव की प्राण. आजही त्याला कोणी जर फुटबॉलची ऑफर केली, तर तो नाही म्हणू शकणार नाही. पण तो बनला धावपटू. सगळ्या आवडी बाजूला ठेवून वेगळ्याच क्षेत्रात करिअर घडवलं. तेही इतक्या टोकाचं की तो जगातला सर्वांत वेगवान धावपटू बनला. हा धावपटू म्हणजे नेहमी नवे विक्रम प्रस्थापित करणारा जमैकाचा उसैन बोल्ट.
२०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ठरवलेली यशाची शिखरं सहज सर केल्यानंतर फेल्प्स आणि बोल्ट या दोघांनी स्पर्धात्मक खेळांतून निवृत्ती जाहीर केली. फेल्प्सनं अनेक देशांपेक्षा अधिक सुवर्णपदकं एकट्याच्या नावावर करून घेतली, तर बोल्टनं धावण्याच्या मैदानावर असे काही आकडे गाठून ठेवले आहेत, की ते कीर्तिमान मोडायचे तर दुसरा बोल्टच व्हावं लागेल.
अमेरिकेतल्या बाल्टीमोर शहरात जन्मलेला फेल्प्स हे घरातलं शेंडेफळ. त्याला दोन मोठ्या बहिणी. आई हेडमास्तर अन् वडील निवृत्त पोलीस. त्याच्या दोन्ही बहिणी जलतरणात मास्टर होत्या. त्यांना पाहून सातव्या वर्षीपासून फेल्प्स पाण्यात उतरला. पोहायला शिकला. रोज आपल्या बहिणींचा सराव पाहूनच मोठा झाला. आपल्या बहिणींपेक्षा अधिक चांगलं पोहता आलं पाहिजे हेच त्याचं सुरुवातीचं ध्येय होतं
खरं तर त्याला पाण्यात उडी मारल्यानंतर त्यात जास्त वेळ चेहरा ठेवायला आवडत नाही. नाका-तोंडात पाणी जाण्याची त्याला भीती वाटे. त्यामुळं सराव करतानाही तोंड पाण्यात कमीत कमी वेळ ठेवण्याचा त्याचा शिरस्ता असे. पाहता पाहता तो पोहण्यात इतका पारंगत झाला, की त्यानं दहाव्या वर्षीच एक राष्ट्रीय विक्रम नोंदवून ठेवला. त्याच वर्षी त्याला बॉब बाउमन नावाचे प्रशिक्षक मिळाले अन् त्याच्या स्विमिंगच्या करिअरला कलाटणी मिळाली. तेच त्याचे आवडते प्रशिक्षक बनले. ‘‘त्यांच्याशिवाय मी पाण्यातच उतरणार नाही’’, असं आजही फेल्प्स म्हणतो. बॉब त्याला सॉलिटरी मॅन म्हणतात. एकाकी माणूस. त्यांच्या मते या पोराचं एकच ध्येय असतं. पाण्यात उतरल्यावर शक्य तितक्या लवकर अंतर पार करायचं.
वडिलांनी त्याच्या आईशी घटस्फोट घेतल्यानंतर फेल्प्स एकटा पडला. त्याला कुटुंबात राहणंही शक्य वाटेनासं झालेलं. तेव्हा प्रशिक्षक बॉबनं त्याला वडीलकीचा आधार दिला. बॉबनंच त्याला मोठं केलं. त्यांच्या प्रशिक्षणाच्या जोरावर ‘फ्लाइंग फिश’ बनलेला फेल्प्स एक-एक सुवर्णपदकांवर नाव कोरत गेला. त्यानं स्वत:च्या नावावर एवढी ऑलिम्पिक पदकं नोंदवून ठेवली आहेत की अनेक देशांच्या अख्ख्या ऑलिम्पिक संघांनाही त्याला गाठणं मुश्कील व्हावं!
खरं तर या यशाच्या उन्मादात सुरुवातीच्या काळात फेल्प्स वाहवत गेला. कधी-कधी तो भरघोस दारू ढोसायचा. तसाच गाडी दामटायचा. पोलिसांनी त्याला २००४ साली असंच ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या अपराधापोटी पकडलं. त्यावेळी तो दोषीही ठरला आणि १८ महिन्यांची शिक्षा झाली. शिवाय २५० डॉलरचा दंडही भरावा लागला. शिवाय मदर्स अगेन्स्ट ड्रंक ड्रायव्हिंगच्या शिबिरात सक्तीच्या समाजसेवेसाठी जावं लागलं.
त्यानंतर पाच वर्षांनी फेल्प्सचा एक फोटो व्हायरल झाला. त्या फोटोत तो अंमली पदार्थ घेताना दिसत होता. हा फोटो खोटा-बनावट असल्याचं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं होतं, पण तो खरा असल्याचं आणि एका पार्टीत घेतला गेल्याचं त्यानं कबूल केलं. या फोटोचा मोठा फटका फेल्प्सला बसला. केलॉग्ज नावाच्या कंपनीनं त्याचं प्रायोजकत्व काढून घेतलं; शिवाय अमेरिकेच्या स्विमिंग संघटनेनं फेल्प्सवर तीन महिन्यांची बंदीही घातली. असाच अनुभव २०१४ साली आला होता. फेल्प्सला अटक झाली होती. कारण पुन्हा त्यानं अंमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवलं होतं. पुन्हा एकदा सहा महिन्यांची बंदी त्याच्यावर ओढवली.
याच काळात त्याला नैराश्यानं ग्रासलं इतकं की तो आत्महत्त्येचाही विचार करत होता. आता काहीच शिल्लक राहिलं नाही, कमबॅक करणं शक्य नाही, अशा नकारार्थी विचारांनी त्याला घेरलं होतं. यातून बाहेर पडण्यासाठी फेल्प्सला मित्रांनी मदत केली. सहा महिने मेडिटेशन करायला लावलं. त्यातून तो बाहेर पडला. माणूस बनला. पुन्हा नव्या जोशानं पाण्यात उतरला. २०१६च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचे नवे टोक गाठून त्यानं थांबायचं ठरवलं. तेव्हा तो एक लेकराचा बाप बनला होता आणि त्याचा चांगला सांभाळ करायचा त्यानं ठरवलंय.
दुसरीकडे उसैन बोल्टनंही तेव्हाच आपण निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं. फेल्प्सनंतर एका वर्षानं जन्मलेला बोल्ट लोकप्रियतेच्या तेवढ्याच उंचीवर आहे, जेवढ्या उंचीवर फेल्प्स. खरं तर बोल्ट जन्मला तो प्रदेश जंगलाचा. जमैकातलं शेरवूड कंटेंट हे त्याचं जुळं शहर. त्याला एक बहीण अन् एक भाऊ. त्याच्या वडिलांचे ग्रामीण भागात छोटं किराणा दुकान होतं. बोल्टला क्रिकेटची जास्त आवड होती. सचिन तेंडुलकर, ख्रिस गेलचा तो चाहता होता आणि वकार युनुससारखी बॉलिंग त्याला करायची होती. पण ज्या शाळेत तो गेला तिथं त्याला धावण्याची संधी मिळाली आणि तो त्यात पहिला आला. करिअरला कलाटणी मिळण्यासाठी एवढी स्पर्धा पुरेशी ठरली.
त्यानंतर तो कधीच थांबला नाही. त्याचा सराव एवढा अवघड असतो की सर्वसामान्यांनी त्याचा विचारही करू नये. तो जेव्हा धावतो तेव्हाच त्याच्या अंगातील क्षमता दिसून येते. सारे धावपटू काही मीटरवर मागे असताना हा फिनिशिंग लाइनला पोहोचलेला असतो आणि बाजूला हसून बघत असतो.
घरातला लाडका होता आणि घरचे म्हणतील तसं ऐकायचा. त्यामुळं त्याला फारशा वाईट सवयी लागल्या नाहीत, असं म्हणतात. पण त्याच्यावर कायमच डोपिंगचा आरोप होत आला आहे. जेव्हा जेव्हा त्यानं विक्रम प्रस्थापित केला, तेव्हा तेव्हा त्यानं उत्तेजकं घेतल्याचे आरोप झाले आहेत. पण त्यानं तो अजिबात डगमगला नाही. कारण ‘‘ज्या गावीच जायचे नाही त्याबाबत विचार तरी कशाला करायचा’’, असं तो म्हणतो. त्याचे प्रशिक्षक ग्लेन मिल्सही अशा उत्तेजकांच्या विरोधात होते. त्यांनी डोपिंग चाचणी करणाऱ्यांनाही आव्हान दिलं होतं. बोल्टच्या सगळ्या टेस्ट तुम्ही घेऊ शकता, तो उत्तेजकं घेत नसल्याचंच सिद्ध होईल, असं ग्लेन यांनी एकदा म्हटलंही होतं.
ऑलिम्पिकच्या आधी बोल्टच्या चार चाचण्या झाल्या आणि ज्या पदार्थांवर बॅन आहे असे कोणतेही उत्तेजक पदार्थ त्याच्या शरीरात आढळले नाहीत. आम्ही मेहनत करतो. ती पण जिवापाड. अशा गोष्टींवर अवलंबून राहत नाही. तुम्ही कोणत्याही क्षणी आमची चाचणी घ्या, असं बोल्टने स्पष्ट केलं होतं. डोपिंगच्या चुकीच्या बातम्यांमुळे बोल्टला आपला प्रायोजकही गमवावा लागला. पण त्याला फारसा फरक पडला नाही. कारण बाकी प्रायोजक रांगेत उभे होतेच.
बोल्ट आणि फेल्प्स हे दोघे आता खेळताना दिसत नाहीत. धावण्याच्या शर्यतीत बोल्टला पाहता येणार नाही आणि फेल्प्स डाइव्ह मारतानाचा क्षण आपल्याला टिपता येणार नाही. पण, या दोघांनी आपापल्या क्षेत्रात गाठलेली शिखरं पार करणं हेच पुढील पिढीसाठी आव्हान असेल.
फेल्प्स ३०० कोटींचा धनी
मायकेल फेल्प्स भलेही यशाच्या शिखरावर असेल आणि त्यानं मिळवलेल्या सुवर्णपदकांची संख्या विक्रमी असेल, पण त्याची कमाई एखाद्या स्टार फुटबॉलपटूपेक्षा कमीच आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डोची मँचेस्टर युनायटेड संघात असण्याची फी ६०० कोटी रुपयेहोती आणि फेल्प्सचं प्रायोजकांमधून मिळणारं उत्पन्न ३०० कोटी. कधीकधी वर्षाला दुप्पट कमाई दाखवणारे आकडेही आहेत. पण ते सारे जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न आहे़ त्यातून जाणारा कर आणि इतर खर्च वगळता फेल्प्सला ३०० कोटींच्या आसपास समाधान मानावं लागतं.
बोल्ट ४०० कोटींचा मालक
फेल्प्सपेक्षा बोल्टची कमाई अधिक आहे. सुवर्णपदकं कमी जिंकूनही बोल्टला मिळणाऱ्या जाहिरातदार कंपन्यांचे काँट्रॅक्ट अधिक आहेत. प्युमासारखी कंपनी बोल्टसाठी जवळपास ९० लाख डॉलर खर्च करते. दरवर्षी तो १३० कोटी रुपयांची कमाई करतो आणि सध्या त्याच्याकडे सुमारे ४०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
दानशूर विक्रमवीर
बोल्ट आणि फेल्प्स या दोघांनीही स्वत:च्या नावाच्या सामाजिक संस्था सुरू केल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून दोन्ही खेळाडू अनेक गरजू लोकांना मदत करत असतात़ खेळाडू घडविणाऱ्या संस्था असो वा शिक्षण संस्था असो, साऱ्यांना सढळ हाताने मदत करण्यास हे दोन्ही खेळाडू मागेपुढे पाहत नाहीत.
बोल्ट ज्या शाळेत शिकला ती शाळा चांगली व्हावी यासाठी त्यानं पुढाकार घेतला होता. ज्या शहरात तो राहायचा तिथं खेळाचं मैदान त्यानं तयार केलंय आणि तिथं सगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात. आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे त्यानं लाखो डॉलर्सची मदत केली आहे.
फेल्प्सही याबाबतीत मागे नाही. फेल्प्सची संस्था अर्थातच पाण्यासाठी काम करतेय. स्विमिंग आर्मी तयार व्हावी असं त्याचं स्वप्न आहे. अमेरिकेत असलेल्या सध्याच्या अत्याधुनिक स्विमिंगच्या सुविधांपेक्षाही अधिक चांगल्या सुविधा तो होतकरू जलतरणपटूंना देऊ इच्छितो आणि त्यासाठी कामही करतो.
महाराष्ट्राच्या मातीने अनेक रत्नं घडवली, अनेकांनी स्व-कर्तृत्त्वावर नावलौकिक मिळवला. अनेक दिग्गजांनी स्वतःसोबतच महाराष्ट्राचं, भारताचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं. आज आपण अश्याच एका चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी महाराष्ट्राचा डंका भारताबरोबरच आख्ख्या जगात वाजवला, ज्यांनी खवय्यांना स्वर्गीय चवीची अनुभूती दिली, शेकडो हॉटेल्सची उभारणी करणारे आघाडीचे ते मराठी उद्योजक म्हणजे विठ्ठल कामत.
विठ्ठल कामत यांचे वडील व्यंकटेश कामत सुरुवातीला डिश वॉशर म्हणून काम करायचे. हे काम करत असताना सतत त्यांना वाटायचं की, आपलं स्वतःचं एक हॉटेल असावं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली, रात्रंदिवस काम केले आणि अखेरीस 1952 मध्ये त्यांनी सत्कार हे पहिले हॉटेल उभे केले. हे हॉटेल उभे करण्यासाठी व्यंकटेश कामत यांनी आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवले आणि व्यवसायाची उभारणी केली. हळूहळू व्यवसाय वाढू लागला. धंद्यात यश येऊ लागलं. सगळं काही आनंदात चालू होत. या अश्या आनंदाच्या वातावरणातच 1956 साली विठ्ठल कामत यांचा जन्म झाला. लहानपणापासून विठ्ठल कामत अभ्यासात हुशार होते, नवीन गोष्टी करण्यात त्यांना रस होता. अभ्यासात हुशार असणाऱ्या विठ्ठल यांनी 1973 साली मुंबईच्या रॉबर्ट मनी हायस्कूलमधून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
विठ्ठल यांच्या आईला नेहमी वाटायचं की, त्यांनी वडिलांना हॉटेलमध्येच मदत करावी, मात्र त्यांना इंजीनियर व्हायचं होतं. त्यांनी इंजीनियरिंगची पदवी मिळवली. इकडे वडिलांचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतच होता. वडिलांनी दोन चांगली हॉटेल उभी केली होती. मात्र अपयशाशिवाय यश मोठं वाटत नाही म्हणतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अपयश, संकटं ही येतच असतात, जवळच्याच एका व्यक्तीने फसवणूक करून विठ्ठल यांच्या वडिलांचे हॉटेल हिसकावले. त्यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अश्यावेळी त्यांच्याकडे असलेले दुसरे म्हणजेच सत्कार हॉटेलही असेच लुबाडले जाईल, या भीतीने विठ्ठल यांनी वडीलांसोबत काम करायचे ठरवले. त्यांचा हा निर्णय त्याच्या आई-वडिलांना देखील खूप आवडला. हेच होते विठ्ठल यांचे हॉटेल व्यवसायातले पहिले पाऊल. व्यवसाय कसा वाढेल यासाठी विठ्ठल काम करू लागले. त्यांनी मुंबईत ‘विठ्ठल कामत’ या नावाने अनेक हॉटेल्सची साखळीच उभी केली.
एका मुलाखतीत ते सांगतात, त्यांच्या मित्राचा गुजरातमधील हॉटेल व्यवसाय तोट्यात जात होता, काही दिवसात ते हॉटेल बंद करायची पाळी येणार होती, अशाकाळात ते त्याच्या हॉटेलच्या व्यवस्थापनासाठी गुजरातला गेले, ते हॉटेल इतकं मोक्याच्या जागेवर होतं, की हॉटेल कसं काय चालत नाही हा एक प्रश्नच होता, हॉटेल हायवेला होते. गडबड होती होती ती मार्केटिंग आणि मॅनेजमेंटमध्ये. त्यांनी गेल्या गेल्या, हॉटेलसमोर अनेक गाड्या लावल्या, ज्यावरून असं वाटेल की, ‘बाप रे! या हॉटेलमध्ये किती गर्दी आहे.’ त्याबरोबरच त्यांनी हॉटेलमध्ये आलेल्या कस्टमरच्या गाड्या स्वच्छ करण्यासाठी काही लोक ठेवले. म्हणजे गाडी स्वच्छ होईपर्यंत ड्रायवर हॉटेलमध्ये काहीतरी खात बसेल. अश्या पद्धतीने ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या आयडीयांनी त्यांनी मित्राच्या हॉटेलची गाडी पुन्हा रुळावर आणली.
त्यानंतर ते मुंबईत आले, जेव्हा त्यांचे ‘सत्कार’ रेस्टॉरंट चांगले चालू लागले, तेव्हा विठ्ठल यांनी वडिलांना व्यवसाय वाढवण्याचा आपला विचार सांगितला. वडिलांनीही होकार दिला. त्यांनी हॉटेल व्यवसायाबद्दल अधिक माहिती गोळा करण्यासाठी लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये कूक म्हणून प्रति आठवडा 75 पौंडची नोकरी पत्करली. अनेक देशांचा प्रवास केला आणि हॉटेल व्यवसायातील बारकावे शिकून घेतले.
लंडनमध्ये आलेल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी धंद्यात नावीन्य आणले. एके दिवशी त्यांना कळले की, सांताक्रूझ विमानतळाजवळील फोर स्टार हॉटेल ‘प्लाझ्मा’ विकले जात आहे. त्यांनी ते विकत घ्यायचे ठरवले, पण त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते. मात्र त्यांनी हिंमत हारली नाही. बँकेतून कर्ज काढून कशीबशी त्यांनी पैश्यांची जुळवणी केली आणि ‘प्लाझ्मा’ विकत घेतले.
आणि त्याच ठिकाणी 1997 साली त्यांनी भारतातील पहिले इको-टेल फाइव्ह स्टार हॉटेल ‘ऑर्किड’ उभे केले. जे की, REDUCE – REUSE – RECYCLE या तत्वावर उभे आहे. हे हॉटेल एक इको-फ्रेंडली हॉटेल आहे. इथे कोणत्याही प्रकारचा कचरा तुम्हाला अजिबात पाहायला मिळणार नाही आणि विशेष म्हणजे हे हॉटेल जगातील Highest Award winning हॉटेल आहे. या हॉटेलला आतापर्यंत ३७५ पेक्षाही जास्त पुरस्कार मिळाले आहेत.
The orchid hotel pune
त्यांनी इतकं अफाट यश मिळवलं खरं पण ‘ऑर्किड’ च्या उभारणीवेळी त्यांच्या डोक्यावर कर्जाचा देखील बलाढ्य डोंगर उभा राहिला. या कर्जाच्या ओझ्यामुळे हॉटेल बंद करण्याची वेळ आली होती. तब्बल 282 कोटी रुपयांपर्यंत कर्ज वाढलं होतं. आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या ते खचले होते, आता पुढे काय होईल? पैश्यांची जोडणी कशी करता येईल? या विचाराने ते बैचेन झाले होते आणि अशातच त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार डोकावू लागले, मात्र एका दृश्यामुळे त्यांना संकटांना हरवण्याची प्रेरणा मिळाली. एका इमारतीच्या २३ व्या मजल्यावर एक पेंटर काहीही सुरक्षाकवच नसताना भिंत रंगवत होता आणि भिंत रंगवून झाल्यावर तो सुरक्षित खाली देखील उतरला, “जर तो पेंटर जीवघेणी जोखीम घेऊ शकतो तर मग मी नक्कीच परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो.” या विचाराने त्यांनी परिस्थितीशी दोन हात केले आणि शेवटी संकटांना हरवून दाखवले.
ही झाली विठ्ठल कामत यांची व्यावसायिक बाजू. पण विठ्ठल कामत हे एक बहुरंगी, बहुढंगी, बहूआयामी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे पर्यावरणावर देखील खूप प्रेम. हे विश्व, ही सृष्टी सदा हिरवळ आणि झाडा-झुडूपांनी तसेच प्राण्यांनी समृद्ध असावी असा त्याचा मानस आहे. यासाठी ‘पाथरे गाव’ सारख्या डोंगराळ भागात त्यांनी औषधी वनस्पतींची लागवड केली. मुंबईतील अनेक उद्यान दत्तक घेत शहर प्रदूषण विरहित बनवण्यास सहाय्य केले. ६० लाखांहून अधिक झाडे लावली. १०० पेक्षा जास्त टेकड्यांचे त्यांनी औषधी आणि स्थानिक झाडांमध्ये रुपांतर केले. पक्षीशास्त्रज्ञाच्या पेशाने त्यांनी ‘ऑर्किड’ हॉटेल जवळ पोपट गल्ली देखील तयार केली. तिथे नानाविविध प्रकारचे पोपट, इतर काही पक्षी पाहायला मिळतात, त्याबरोबर ओडिसा येथील “चिल्का सरोवर” येथे डॉल्फीन ऑबझर्वेटरी सेंटर”ची स्थापना केली. ऑर्किड हॉटेल, मुंबई आणि किल्ले जाधवगड येथे आई या नावाचे संग्रहालय देखील त्यांनी उभे केले. तिथे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू ठेवून पर्यावरणाला पूरक असा उपक्रम कामतांनी यशस्वी करून दाखवला.
The Orchid Jamnagar
विठ्ठल कामत यांचा हॉटेल व्यवसाय आज संपूर्ण जगभर पसरला आहे. त्यांना आजवर ११० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. यामध्ये इंडियन एक्सप्रेसचा सर्वोत्कृष्ट सीईओ उद्योग पुरस्कार, त्यानंतर दलाई लामा यांच्याकडून मिळालेला गोल्डन पीकॉक पुरस्कार, २०१० मध्ये ग्रीन हॉटेलीयर पुरस्कार, राजीव गांधी पुरस्कार, २०१२ मध्ये जर्मनचा जीवनगौरव पुरस्कार अश्या अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. विठ्ठल कामत हे ‘हॉटेल आणि रेस्टॉरेट असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष आहेत. या व्यतिरिक्त अनेक शैक्षणिक, औद्योगिक समितीवर सल्लागार म्हणून ते आपले काम करतात.
हॉटेल इंडस्ट्री मध्ये मराठी माणूस यशस्वी होऊ शकतो किंवा उद्योजक बनू शकतो असं क्वचित पहायला मिळतं, परंतु आज बरीच वेगवेगळी मराठी लोकं उद्योजक बनण्याचा किंवा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतात. अशांसाठी विठ्ठल कामत यांनी आपली हॉटेल इंडस्ट्रीमधील कारकीर्द आणि उद्योजक म्हणून यशस्वी केलेल्या वाटचालीचा संपूर्ण प्रवास त्यांच्या ‘इडली ऑर्किड आणि मी’, ‘उद्योजक होणारच मी’ आणि यश, अपयश आणि मी या पुस्तकांच्या माध्यमातून उद्योजकांपर्यंत पोहोचवला आहे.
जगभरात ४५० पेक्षाही अधिक रेस्टॉरंट उघडणारे एक यशस्वी उद्योजक, एक जाणकार लेखक, पर्यावरण आणि पक्षीविद्यातज्ञ, पूरातन वस्तूंचे अभ्यासक एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या विठ्ठल कामत यांचा आदर्श घेऊन आपण देखील संकटातून ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग शोधत यशाचे सर्वोच्च शिखर गाठू आणि आपल्या कामाचा डंका केवळ अटकेपर्यंतच नाही तर जगाच्या दाही दिशात पोहोचवू.
मित्रांनो, आजच्या जगात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात घडणाऱ्या बदलांची गती इतकी वेगवान आहे की डोळे वटवतात. या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात “कृत्रिम बुद्धिमत्ता” (AI) ही संकल्पना खूप गाजत आहे. पण नेमकं ही कृत्रिम बुद्धिमत्ता आहे तरी काय? तिचा इतिहास कसा आहे? आज ती कुठे पोहोचली आहे? भविष्यात तिची वाटचाल काय असेल? आणि याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होणार आहे? या सगळ्या गोष्टींची चर्चा करूया.
आपल्या सगळ्यांच्याच घरात रिमोटवर चालणारे टीव्ही, आपल्या हातात असलेला स्मार्टफोन, किंवा कार चालवताना मिळणारे मार्गदर्शन, या सगळ्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) हात आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आत्ताच्या युगात आपल्या दैनंदिन जीवनात इतक्या सहजपणे रुतले गेलेलं हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे. सर्वप्रथम, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय ते समजून घेऊ. सोप्या शब्दांत सांगायचं तर, संगणकांना मानवी बुद्धिमत्तेसारखी शिकण्याची, समजण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता देणे हेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे ध्येय आहे. हे ध्येय गाठण्यासाठी विविध तंत्रज्ञानं वापरली जातात, जसे की मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नेटवर्क थिअरी इत्यादी.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास खूप जुना नाही. १९५० च्या दशकात या संकल्पनेवर पहिली चर्चा झाली. पण त्यावेळी संगणक तंत्रज्ञान इतके विकसित नव्हते, त्यामुळे ही संकल्पना तशीच राहिली. संगणक तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर 1990 च्या दशकात त्यावर पुन्हा संशोधन सुरु झालं. आता या क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. आज robots पासून ते स्वयंचलित गाड्यांपर्यंत, AI सर्वत्र आपले अस्तित्व दाखवत आहे. आत्ता आपण वापरत असलेले Google Assistant किंवा Siri सारखे व्हॉइस असिस्टंट्स, सोशल मीडियावरील व्यक्तिगत पसंतीनुसार दिसणाऱ्या जाहीरती, तुमच्या आवडीनुसार शिफारसी देणारे ऑनलाइन स्टोअर्स हे सगळं AI चीच उदाहरण आहेत.
आज आपण अनेक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर पाहतो आहोत, जसे की-
वैद्यकीय क्षेत्रात: आजारांचं निदान, औषधांचा शोध, शस्त्रक्रिया इत्यादी गोष्टींमध्ये
वित्तीय क्षेत्रात: धोका ओळखणं, गुंतवणूक सल्लागार, फसवणूक रोखणे इत्यादी गोष्टींसाठी
वाहतूक क्षेत्रात: स्वयंचलित वाहनं, वाहतूक नियंत्रण, अपघात टाळणे इत्यादी गोष्टींसाठी
AI ची वाटचाल खऱ्या अर्थाने आत्ता कुठे सुरु झाली आहे. भविष्यात AI आपल्या आयुष्याचा अधिकाधिक भाग होणार आहे. स्वयंचलित वाहनं सर्वत्र दिसतील, तुमच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार शिक्षण आणि वैद्यकीय सेवा सर्वसामान्य होईल आणि रोबोट्स आपल्यासोबत सहकारी म्हणून काम करतील. यामुळे आपला वेळ आणि श्रम बचत होईल, नवीन संधी उपलब्ध होतील आणि आपले जीवन सुखदायी बनण्यास मदत होईल.
तसेच, AI चा वापर योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर झाला तर मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ शकते, काही प्रमाणात बेकारी वाढू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नवीन नोकरीच्या संधी निर्माण होत आहेत. जसे की AI तज्ज्ञ, डेटा सायंटिस्ट, रोबोटिक्स इंजिनिअर इत्यादी. पण दुसरीकडे काही नोकऱ्या संपुष्टातही येऊ शकतात. जसे की कॉल सेंटरमधील ऑपरेटर्स, डेटा एंट्री ऑपरेटर्स इत्यादी. त्यामुळे या नवीन तंत्रज्ञानासोबत जुळवून घेणे आणि नवीन कौशल्य शिकणे गरजेचे आहे.
भविष्यात काय करायचं?:
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या फायद्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन ते आपल्या कल्याणासाठी वापरली पाहिजेत. यासाठी खालील गोष्टी महत्वाच्या आहेत:
शिक्षण आणि प्रशिक्षण: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात आणखी संशोधन आणि विकास करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर समाजाला या तंत्रज्ञानाची माहिती देणे आणि त्याचा योग्य वापर कसा करायचा ते शिकवणेही गरजेचे आहे. नियमन: AIचा अयोग्य वापर टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदे आणि नियमावली तयार करणे गरजेचे आहे. नैतिकता: AI तयार करताना आणि वापरताना नैतिकतेला प्राधान्य दिले पाहिजे.
आपण जर जबाबदारीने आणि सुबुद्धीनं कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला तर ते मानवाच्या प्रगतीचं आणि कल्याणाचं एक शक्तिशाली साधन ठरू शकते. ते मानवापेक्षा हुशार होईल का? ही चर्चा अजूनही सुरू आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की, AI आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनणार आहे. हे तंत्रज्ञान आपल्या नशिबाचा खेळ खेळवणार की आपल्या मदतगार ठरणार हे आपल्या हातातच आहे. म्हणून आपण या क्षेत्रात झपाट्याने होणारी प्रगती लक्षात घेऊन त्याचा सावधपणे आणि जबाबदारीने वापर केला पाहिजे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात होणारी प्रगती पाहता या चर्चा पुढेही चालूच राहणार आहेत. या तंत्रज्ञानाबद्दल जागरुक राहूया आणि ते आपल्या सर्वांच्या फायद्यासाठी वापरूया!