Government Schemes: शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. आर्थिक मदत, पीक विमा, सिंचन, सोलर पंप, कमी व्याजदरात कर्ज, शेती यांत्रिकीकरण, बागायती आणि पशुसंवर्धन अशा अनेक क्षेत्रांसाठी या योजनांचा फायदा होऊ शकतो.
1. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN)
पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ₹6,000 थेट बँक खात्यात दिले जातात. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये जमा केली जाते.
2. किसान क्रेडिट कार्ड (KCC)
शेतीसाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणारी ही योजना आहे. बियाणे, खत, औषधे आणि इतर शेती खर्चासाठी हे कर्ज उपयोगी ठरते.
3. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY)
ठिबक आणि तुषार सिंचनासाठी अनुदान दिले जाते. यामुळे पाण्याची बचत होण्यास आणि उत्पादन वाढण्यास मदत होते.
4. मृदा आरोग्य कार्ड योजना
या योजनेअंतर्गत जमिनीची तपासणी करून त्यातील पोषणद्रव्यांची माहिती दिली जाते. त्यामुळे योग्य प्रमाणात खतांचा वापर करून उत्पादन सुधारण्यास मदत होते.
5. प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY)
नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट आणि इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळू शकते. नुकसानभरपाईची रक्कम पिकाच्या नुकसानीनुसार ठरते.
6. e-NAM – राष्ट्रीय कृषी बाजार
या योजनेत थेट अनुदान मिळत नाही. मात्र शेतकऱ्यांना देशभरातील बाजारपेठांमध्ये आपल्या शेतीमालाला चांगला भाव मिळवण्याची संधी मिळते आणि मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होते.
7. कृषी यांत्रिकीकरण योजना
शेतीसाठी लागणाऱ्या विविध यंत्रांवर साधारण 40% ते 50% पर्यंत अनुदान मिळू शकते. ट्रॅक्टर, पॉवर टिलर, शेती अवजारे, स्प्रे मशीन यांसारख्या उपकरणांचा यात समावेश होतो.
8. राष्ट्रीय बागायती अभियान (MIDH)
फळबाग, भाजीपाला, मसाला पिके आणि फुलशेतीसाठी साधारण 40% ते 50% पर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.
9. पशुसंवर्धन आणि डेअरी योजना
दुग्धव्यवसाय, शेळीपालन आणि कुक्कुटपालनासाठी विविध योजनांअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाते. अनुदानाचे प्रमाण योजनेनुसार साधारण 25% ते 50% किंवा त्याहून अधिक असू शकते.
10. पीएम-कुसुम योजना (PM-KUSUM)
सोलर पंपासाठी 60% पर्यंत अनुदान मिळू शकते. हे प्रमाण राज्यानुसार बदलू शकते. सोलर पंपामुळे विजेचा खर्च कमी होण्यास मदत होते आणि काही प्रकल्पांमध्ये अतिरिक्त उत्पन्नाची संधीही उपलब्ध होऊ शकते.
लक्षात ठेवा
प्रत्येक योजनेची पात्रता, अनुदानाचे प्रमाण आणि अर्ज प्रक्रिया वेगवेगळी असू शकते. अर्ज करण्यापूर्वी संबंधित कृषी विभाग किंवा अधिकृत सरकारी पोर्टलवर माहिती तपासा.
सेंद्रिय शेती हा शेतीचा असा प्रकार आहे जिथे कृत्रिम रसायने, अजैविक खते व इतर हानिकारक पदार्थ. कीटकनाशके इत्यादींचा वापर न करता पिकांचे उत्पादन केले जाते.
सेंद्रिय शेती म्हणजे थोडक्यात – रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने शेती करणे होय.
सेंद्रिय शेतीत खालील प्रमुख घटकांचा समावेश होतो :
सेंद्रिय खतांचा वापर: कंपोस्ट, गोठ्याचे खत, हरीत खत (ग्रीन मॅन्युअर) यांचा वापर करून जमिनीची सुपीकता वाढविणे.
जैविक कीटक नियंत्रण: नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर करून कीटक आणि रोगांवर नियंत्रण ठेवणे.
शेती व्यवस्थापन: पीक बदलणे, मिश्र पीक पद्धती, आंतरपीक पद्धती आणि बहुपीक पद्धतीचा वापर करून जमिनीचे पोषण राखणे.
जैवविविधता वाढवणे: विविध प्रकारच्या पिकांची लागवड करून शेतीत जैवविविधता वाढवणे.
पाण्याचे संवर्धन: कमी पाण्यात अधिक उत्पादन
सेंद्रिय शेतीचे मुख्य प्रकार :
1. बायोडायनामिक शेती (Biodynamic Farming):
– बायोडायनामिक शेती ही सेंद्रिय शेतीची अशी पद्धत आहे, ज्यात सजीव तत्त्वांचा वापर केला जातो. या शेतीत पृथ्वी, प्राणी आणि वनस्पती यांच्यातील परस्पर सहकार्यावर विशेष भर दिला जातो.
2. वर्मीकल्चर (Vermiculture):
– वर्मीकल्चर या शेतीच्या प्रकारात गांडुळ खताचा वापर करून शेती केली जाते. यामध्ये गांडुळांचा वापर करून जमिनीची सुपिकता वाढवली जाते.
3. नैसर्गिक शेती (Natural Farming):
– नैसर्गिक शेतीमध्ये रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. या पद्धतीमध्ये नैसर्गिक घटकांचा वापर करून शेती केली जाते. या शेतीचे वर्णन कीटकनाशक मुक्त शेती असे केले जाते.
4. पर्माकल्चर (Permaculture):
पर्माकल्चर ही सेंद्रिय शेतीची अशी पद्धत आहे ज्यात शाश्वत शेती पद्धतींचा वापर करून शेती केली जाते. या शेती प्रकारात पर्यावरणाचे संतुलन राखून शेती केली जाते.
5. एक्वापोनिक्स (Aquaponics):
एक्वापोनिक्स ही पद्धत जलकृषी (Aquaculture) आणि हायड्रोपोनिक्स (Hydroponics) या दोन पद्धतींचे संयोग आहे. यामध्ये माशांचे पालन आणि पाण्यावर आधारित शेती केली जाते. पारंपरिक शेतीपेक्षा 6 पट जास्त नफा या शेतीतून मिळतो.
6. इंटिग्रेटेड फार्मिंग (Integrated Farming):
इंटिग्रेटेड फार्मिंगमध्ये विविध प्रकारच्या शेती पद्धतींचा संयोग केला जातो, ज्यात पशुपालन, फळबाग, पिकांचे उत्पादन इत्यादींचा समावेश असतो.
7. झिरो बजेट नैसर्गिक शेती (Zero Budget Natural Farming):
ही पद्धत भारतातील कृषी वैज्ञानिक सुभाष पालेकर यांनी विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये खर्च कमी करून शेती केली जाते आणि प्रामुख्याने नैसर्गिक साधनांचा वापर केला जातो.
हा प्रकार शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि पर्यावरण पूरक शेती करण्यासाठी मदत करतात.
सेंद्रिय शेतीचे फायदे खालीलप्रमाणे :
1. मृदास्वास्थ सुधारणा:
– सेंद्रिय शेतीत रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर टाळल्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते. जैविक घटकांचा वापर करून मातीची सुपिकता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.
2. पर्यावरण पूरक:
– सेंद्रिय शेतीत नैसर्गिक साधनांचा वापर केल्यामुळे पर्यावरणाला हानी पोहचत नाही. जल, मृदा, आणि हवेची गुणवत्ता राखली जाते.
3. आरोग्यदायी अन्न:
– सेंद्रिय शेतीत उत्पादन केलेले अन्न रसायनमुक्त असते. त्यामुळे या अन्नाचे सेवन केल्याने आपले आरोग्य चांगले राहते.
5. कमी खर्च:
– सेंद्रिय शेतीत रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर टाळल्यामुळे खर्च कमी होतो. शेतकऱ्यांना स्थानिक साधनांचा वापर करून शेती करणे सोपे होते.
6. शाश्वत शेती:
– सेद्रिय शेती शाश्वत शेतीची एक पद्धत आहे. यामुळे शेतीची उत्पादकता आणि टिकाऊपणा वाढतो.
7. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना:
– सेंद्रिय शेतीत स्थानिक संसाधनांचा वापर केल्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठांमध्ये आपले उत्पादन विकता येते.
8. सामाजिक फायदे:
– सेंद्रिय शेतीत शेतकरी आणि उपभोक्त्यांमध्ये अधिक विश्वास आणि जवळीक निर्माण होते. हे उत्पादन थेट शेतकऱ्यांकडून उपभोक्त्यांपर्यंत पोहोचवणे सहज शक्य होते.
सेंद्रिय शेतीच का ?
सेंद्रिय शेती निवडण्याची अनेक कारणे आहेत. जी विशेषत: पर्यावरण, आरोग्य, आणि आर्थिक फायद्यांशी संबंधित आहेत.
1. लवचिकता :
– सेंद्रिय शेतीमुळे मातीची गुणवत्ता सुधारली जाते, ज्यामुळे ती अधिक लवचिक आणि ताण सहनशील बनते. त्यामुळे दुष्काळ, पूर, किंवा हवामानातील अनपेक्षित बदलांचा परिणाम जमिनीवर त्या मानाने कमी होतो.
2. दीर्घकालीन आर्थिक लाभ:
– सेंद्रिय शेतीत सुरुवातीला खर्च थोडा जास्त वाटू शकतो, परंतु दीर्घकाळात जमीन सुपिक राहते, उत्पादनाची गुणवत्ता सुधारते, आणि शेतकऱ्यांना अधिक चांगला बाजारभाव मिळतो.
3. कमी ऊर्जा वापर:
– सेंद्रिय शेतीत यांत्रिक साधनांचा कमी वापर केला जातो आणि नैसर्गिक साधनांचा वापर केला जातो. यामुळे ऊर्जा वापर कमी होतो, जो पर्यावरणासाठी फायद्याचा असतो.
5. समुदायाची एकता:
– सेंद्रिय शेतीत शेतकरी, ग्राहक, आणि स्थानिक समुदाय एकत्र येतात. यामुळे सामाजिक एकता वाढते आणि समाजातील लोकांमध्ये एकमेकांबद्दल विश्वास निर्माण होतो.
6. जमिनीचा दीर्घकालीन टिकाव:
– सेंद्रिय शेतीत मातीची गुणवत्ता कायम राखली जाते, ज्यामुळे जमिनीचा दीर्घकालीन टिकाव राहतो. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा अधिक काळ फायदा मिळतो.
7. जलचक्राचे पुनरुज्जीवन:
– सेंद्रिय शेतीत पाण्याचा योग्य वापर आणि नैसर्गिक पद्धतींचा अवलंब केल्यामुळे जलचक्राचे पुनरुज्जीवन होते. यामुळे भूजल पुनर्भरण होते.
8. कमी प्रदूषण :
– सेंद्रिय शेतीत कीटकनाशकांच्या अवशेषांचा वापर टाळल्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होते. यामुळे पर्यावरणातील अपायकारक प्रभाव कमी होतात.
9. शेतकरी आत्मनिर्भरता:
– सेंद्रिय शेतीत शेतकरी रासायनिक कंपन्यांवर अवलंबून राहत नाहीत. त्याऐवजी, ते स्थानिक साधनांचा वापर करून आत्मनिर्भर बनतात.
10. सेंद्रिय उत्पादने निर्यात:
– सेंद्रिय उत्पादनांची जागतिक बाजारपेठेत मागणी वाढत आहे. सेंद्रिय शेतीत उत्पादने तयार करून शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करू शकतात, ज्यामुळे त्यांना अधिक लाभ मिळतो.
हे मुद्दे सेंद्रिय शेतीचे महत्त्व अधिक स्पष्ट करतात आणि सेंद्रिय पद्धती निवडण्याचे विविध पैलू दाखवतात.
अनेकांच्या मनात चांगल्या सरकारी किंवा स्थिर नोकरीबद्दल आकर्षण असते. “जिथे चांगल्या पगाराची आणि सुरक्षित भविष्यातील हमी आहे, ती नोकरी सोडून दुसऱ्या अनिश्चित क्षेत्रात का जावं?” असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, जुन्नर येथील काव्या ढोबळेने हा विचार बाजूला ठेवत, महिन्याला ७५,००० रुपये पगाराची चांगली नोकरी सोडून कृषीपूरक व्यवसायाचा मार्ग स्वीकारला. आज ती केवळ यशस्वीच नाही, तर दर महिन्याला लाखो रुपये कमवत आहे, आणि तिची कहाणी अनेकांसाठी आदर्श ठरली आहे.
काव्याच्या यशात एक महत्त्वाचा संदेश आहे. तो म्हणजे जर स्वतःवर विश्वास ठेवला आणि कठोर मेहनत केली, तर कोणतीही अडचण पार करता येते. मात्र, स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कधी कधी, “आपलं स्वप्न पूर्ण होईल का?” या शंकेतूनही काही जण जातात. पण हेही सत्य आहे की, अनेक व्यक्ती अपयशांवर मात करून उशिरा का होईना, यश मिळवतात. काव्यानेही हे सिद्ध करून दाखवलं आहे.
या लेखात आपण काव्याच्या जीवनातील संघर्ष, तिचं यश आणि त्यामागील मेहनतीचा प्रवास याविषयी जाणून घेणार आहोत.
शेतीची आवड आणि प्रेरणा
काव्याला लहानपणापासून शेतीची आवड होती. मात्र, त्या वेळी शेतीत करिअर करण्याची शक्यता धूसर वाटत होती. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. तिने जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीमध्ये पदविका पूर्ण केली आणि मुंबईतील सायन हॉस्पिटल येथे काम करण्यास सुरुवात केली.
सायन हॉस्पिटलमध्ये काम करत असताना तिला जाणवलं की रासायनिक शेती व त्यातून मिळणारे खाद्यपदार्थ मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम करतात. तिच्या या जाणिवेला कोरोनाच्या महामारीने अधिक धार दिली. कोरोना काळात रुग्णांची सेवा करताना आणि स्वतः कोरोना पॉझिटिव्ह होऊन गंभीर आरोग्य संकटातून जात असताना तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. महामारीमुळे झालेली हानी आणि मृत्यू पाहून तिला प्रकर्षाने जाणवलं की, मानवाच्या आरोग्यासाठी शुद्ध खाद्य हाच योग्य मार्ग आहे.आणि त्यासाठी सेंद्रिय शेती महत्वाची आहे.
तिने ठरवलं की नोकरी सोडून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे वळायचं. शेतीत उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिने सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास केला.
कृषी क्षेत्रातील नवा प्रयोग आणि व्यवसायाला सुरुवात
२०२२ हे वर्ष काव्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा ठरलं. तिने नोकरी सोडून शेती क्षेत्रात काम करण्याचा धाडसी निर्णय घेतला, जो अनेकांसाठी अचंबित करणारा होता. मात्र, तिचा निर्धार पक्का होता आणि पतीची साथ मजबूत होती.दोघांनी त्यांच्या पुण्यातील जुन्नर येथे असलेल्या पाच गुंठे शेतीतून गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्याचं ठरवलं. शेतकऱ्यांशी संवाद साधत रासायनिक खतांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर त्यांनी जागरूकता निर्माण केली आणि स्वतः गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग सुरू केला.
ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांनी एका शेतकऱ्याकडून एक किलो गांडुळे खरेदी करून छोट्या खोलीत खत निर्मितीला सुरुवात केली. ऑक्टोबरमध्ये तयार झालेलं पहिलं खत पाहून काव्याचा आत्मविश्वास वाढला. मार्च २०२३ मध्ये त्यांनी “कृषी काव्या” या ब्रँडच्या अंतर्गत व्यावसायिक विक्री सुरू केली. त्यांच्या उच्च गुणवत्तेमुळे मोठ्या प्रमाणात खताला मागणी वाढली. एका शेतकऱ्याने ५० हजार रुपयांचं खत खरेदी केलं, तर एका संस्थेनं २००० किलो गांडुळे खरेदी केली, ज्यामुळे तिला मोठं आर्थिक यशही मिळालं.
या यशाच्या जोरावर काव्या ने जैविक शेती आणि गांडूळ खत निर्मितीचा प्रसार अधिक व्यापक करण्यासाठी एक यूट्यूब चॅनल सुरू केलं. त्यात तिने शेतकऱ्यांना प्रगत शेती पद्धतींची माहिती देणारे व्हिडिओ तयार केले आणि इतर शेतकऱ्यांचे यशोगाथाही शेअर केल्या.अल्पावधीत तिच्या “कृषी काव्या” ब्रँडने जैविक शेतीसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलं.
वर्षाला 24 लाख रुपये कमाई
काव्या चा गांडूळ खत तयार करण्याचा व्यवसाय २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रचंड यशस्वी ठरला. तिने या वर्षात जवळपास २४ लाख रुपयांची उलाढाल केली आहे आणि पुढील वर्षासाठी ५० लाख रुपयांचे ध्येय ठरवले आहे. तिच्या यशाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे शेतकऱ्यांना खत निर्मितीचे प्रशिक्षण देणे. काव्याने शेतकऱ्यांना गांडूळ खत तयार करण्याची तंत्रे शिकवण्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन केले, ज्यामुळे २०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या प्रक्रियेची माहिती मिळाली.
त्याचबरोबर, काव्या रासायनिक मुक्त शेतीच्या तत्त्वज्ञानावर जनजागृती करत आहे. तिच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना जैविक शेतीची महत्त्वाची माहिती मिळत आहे आणि ते आपल्या पारंपरिक पद्धतींमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. काव्याचे हे काम शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविणारे ठरले आहे, कारण ती त्यांना अधिक शाश्वत आणि आरोग्यदायी शेती करण्यासाठी प्रेरित करत आहे.
मित्रांनो, काव्या ची कहाणी खरोखरच अत्यंत प्रेरणादायक आहे.सरकारी नोकरी सोडून कृषी क्षेत्रात पाऊल ठेवणे आणि यशस्वी होऊन दाखवणे हि साधी गोष्ट मुळीच नाही त्यासाठी प्रचंड जिद्द आणि इछशक्ती लागते .तिचा हा प्रवास संघर्ष आणि समर्पणाचा आहे. तिने आपला ठाम निर्णय घेतला आणि अनेक अडचणींवर मात करत शेती व्यवसायात मोठे यश मिळवले. तिच्या या यशात फक्त आर्थिक लाभ नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचा महत्त्वाचा भाग आहे. काव्याची कथा आपणास शिकवते की, कठोर निर्णय आणि मेहनतीचा परिणाम लवकरच मोठ्या यशात बदलू शकतो.
ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांसाठी जमीन म्हणजे केवळ मातीची ढिगं नव्हे; ती त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या संघर्षाची, कष्टाची आणि आजी-आजोबांच्या आशीर्वादाची परंपरा असते. घरातील मोठ्यांच्या निधनानंतर किंवा वारसा नोंदीत बदल आवश्यक असताना “खाते वाटप” ही प्रक्रिया कुटुंबाला नव्याने उभी राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. परंतु त्या प्रक्रियेबद्दल योग्य माहिती नसल्यामुळे अनेकांना मनात भीती, शंका आणि प्रश्न असतात. जमीन वाटायची, पण कुणाचा हिस्सा कमी होऊ नये, कुणाला अन्याय होऊ नये, आणि पुढे आपापसात वाद निर्माण होऊ नयेत—याची काळजी प्रत्येकालाच वाटते.
खाते वाटप म्हणजे फक्त तुकडे करणे नाही, तर प्रत्येक वारसाला त्याचा कायदेशीर हक्क देणे हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे. याचा फायदा असा की, पुढे कर्ज, अनुदान, विक्री किंवा पिकांच्या नोंदी करताना कोणतीही अडचण येत नाही. एकाच सातबारावर राहिलेली जमीन सर्वांच्या एकत्र निर्णयाने योग्य तऱ्हेने विभागली की कुटुंबातील शांतता, विश्वास आणि एकमेकांवरील आदर अधिक दृढ होतो. म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्याने ही प्रक्रिया समजून घेणे आणि वेळेत पूर्ण करणे अत्यंत गरजेचे ठरते.
खाते वाटपासाठी आवश्यक कागदपत्रे
खाते वाटपाची प्रक्रिया सुरू करताना सर्वप्रथम विचारला जाणारा प्रश्न म्हणजे—“कुठली कागदपत्रे लागतात?” कारण कागदपत्रे अपुरी असली, किंवा एखाद्या खातेदाराची संमती नसली, तर प्रक्रिया महिनोंमहिने अडकून बसते. म्हणूनच खातेदारांची संपूर्ण नावे, जमिनीचा गट क्रमांक, क्षेत्रफळ, गाव-तालुका, अद्ययावत 7/12 आणि 8A उतारे ही मूलभूत माहिती आधीच तयार असणे महत्त्वाचे ठरते. जमिनीच्या मूळ मालकांचे निधन झाले असल्यास वारस प्रमाणपत्र अत्यावश्यक मानले जाते, कारण त्यावरूनच कोणाला किती आणि कसा हक्क आहे हे निश्चित होते. ओळखपत्रे जसे आधार, PAN, मतदार ओळखपत्रही प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहेत. सर्वात महत्त्वाचे—”संमतीपत्र”.
सर्व खातेदारांनी लेखी स्वरूपात वाटणी मान्य केल्याचे पत्र दिले, की संपूर्ण प्रक्रिया अधिक सहज पार पडते. काही वेळा गाव नमुना 2 किंवा जमीन नकाशा देखील लागतो, ज्यामुळे वाटणी कशी करता येईल याचे स्पष्ट चित्र तयार होते. योग्य कागदपत्रे असल्यास खाते वाटप फक्त एक सरकारी प्रक्रिया न राहता, कुटुंबासाठी शांतता आणि समाधानाची दिशा ठरते.
खाते वाटपाची सविस्तर प्रक्रिया
खाते वाटपाची प्रक्रिया फक्त कागदोपत्री नसते; ती प्रत्यक्ष तपासणी, मोजणी, पंचनामा आणि कायदेशीर पडताळणी यांच्या एकत्रित प्रवासातून पूर्ण होते. सर्व खातेदारांच्या संमतीनंतर तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला जातो. त्यानंतर तलाठी प्रत्यक्ष जमिनीची पाहणी करण्यासाठी येतो. किती जमीन कुठे आहे? रस्ता आहे का? पाणी, विहीर, कालवा किंवा इतर सुविधा कुणाला किती लागतील—हे सर्व पाहून तो प्राथमिक अहवाल तयार करतो. नंतर मंडळ अधिकारी आणि तलाठी मिळून पंचनामा तयार करतात. हा पंचनामा म्हणजे जमीन किती भागात विभागता येईल याचे प्रामाणिक चित्रण. हा अहवाल तहसीलदाराकडे जातो, जिथे तपासणी, सुनावणी आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम आदेश दिला जातो.
आदेश मिळाल्यावर महसूल विभाग प्रत्येक व्यक्तीच्या नावाने स्वतंत्र 7/12 तयार करतो. ही प्रक्रिया कधी कधी वेळ घेते, पण एकदा पूर्ण झाली की खातेदाराला त्याचा स्पष्ट ताबा, कायदेशीर हक्क आणि स्वतंत्र नोंद मिळते. अनेक कुटुंबांसाठी हा क्षण अत्यंत भावनिक असतो—कारण या कागदात त्यांच्या नात्यांची, मेहनतीची आणि हक्कांची नोंद असते.
खाते वाटपात वाद झाल्यास काय करावे ?
जमीन प्रश्न नाजूक असतो, त्यामुळे अनेक वेळा खाते वाटपात वाद निर्माण होतात. एखाद्याला वाटते की त्याचा हिस्सा कमी झाला; दुसऱ्याला वाटते की त्याला रस्त्याला लागून असलेला भाग मिळायला हवा; तर तिसरा पूर्वी झालेल्या तोंडी कराराचा किंवा शेतीतल्या त्याच्या योगदानाचा दाखला देतो. अशा वेळी तहसीलदार सरळ खाते वाटपाचा आदेश देऊ शकत नाही. अशा वादग्रस्त प्रकरणात तहसीलदार सर्व खातेदारांना नोटीस देऊन सुनावणी घेतो. पुरावे सादर केले जातात—जुने करार, पिकांची नोंद, कुटुंबातील जुने विभागणी दाखले इत्यादी. जर वाद गंभीर असेल, आणि तहसीलदार निर्णय देऊ शकत नसेल, तर प्रकरण नागरी न्यायालयात (Civil Court) पाठवले जाते.
न्यायालयच नंतर कोणाला किती हिस्सा मिळणार हे ठरवते व त्यानुसार आदेश दिला जातो. कोर्टाचा आदेश हा अंतिम असतो, आणि महसूल विभाग त्या आदेशानुसार खाते वाटप करतो. जरी वाद हा मानसिक थकवा आणणारा असला, तरी योग्य मार्गाने गेले तर न्याय मिळतो. अशा प्रक्रियेत कुटुंबातील विश्वास आणि संवाद खूप महत्त्वाचे ठरतात.
हरकत नोंदवण्याची प्रक्रिया
खाते वाटप सुरू झाल्यावर एखाद्या खातेदाराला आपला हक्क धोक्यात आहे असे वाटल्यास त्याला हरकत नोंदवण्याचा पूर्ण अधिकार असतो. हरकत नोंदवल्यावर ती 7/12 उताऱ्यावर “हरकतदार” अशी नोंद करून दर्शवली जाते. यामुळे प्रक्रिया थांबत नाही, पण ती तपासणीसाठी तहसीलदारांकडे जाते. हरकत लिहिताना आपल्या बाजूचे पुरावे—मोजणी नोंदी, जुने जमीन करार, कुटुंबातील विभागणीची माहिती, तोंडी किंवा लेखी करार—हे सर्व दाखवणे गरजेचे असते. तहसीलदार सुनावणी घेतो, दोन्ही बाजूंचा मुद्दा ऐकतो आणि जमिनीची प्रत्यक्ष स्थिती तपासतो.
जर हरकत योग्य वाटली तर प्रक्रिया तात्पुरती थांबवली जाते; अन्यथा ती पुढे नेली जाते. परंतु हरकत जास्त गंभीर असेल तर प्रकरण न्यायालयात जातो. ही प्रक्रिया खातेदारांच्या हक्कांचे संरक्षण करते. हरकत देण्याचा उद्देश वाद निर्माण करणे नाही, तर आपला हिस्सा योग्य आणि न्याय्य मिळावा हा असतो. योग्य पुरावे, शांत संवाद आणि कायदेशीर मार्ग वापरल्यास हरकतीचे निराकरण अधिक सोपे होते.
ऑनलाइन खाते वाटप अर्ज आणि आधुनिक प्रक्रिया
आजच्या डिजिटल युगात महाराष्ट्र सरकारने खाते वाटप प्रक्रिया ऑनलाइन करून शेतकऱ्यांचे काम अधिक सोपे केले आहे. आता घरबसल्या aaplesarkar.mahaonline.gov.in या पोर्टलवरून Partition of Land साठी अर्ज करता येतो. खाते तयार करून लॉगिन केल्यावर Revenue Department निवडा आणि “Partition of Land” हा पर्याय वापरा. येथे अर्जदाराची माहिती, खातेदारांची नावे, जमिनीचे तपशील, नकाशा, कागदपत्रांचे स्कॅन अपलोड करणे—हे सर्व काही काही क्लिकमध्ये करता येते.
अर्ज सबमिट झाल्यावर तुम्हाला एक Application Number मिळतो ज्याद्वारे अर्जाची स्थिती तुम्ही सतत ऑनलाइन पाहू शकता. यामुळे तहसील कार्यालयात वारंवार जाण्याची गरज राहत नाही आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक होते. अनेक शेतकऱ्यांना ही ऑनलाइन सेवा मदतीचा हात देते, कारण वेळ आणि खर्च दोन्ही वाचतात. शिवाय, डिजिटल पद्धतीने नोंदी सुरक्षित राहतात आणि चुका होण्याची शक्यता कमी होते. प्रशासनाची ही आधुनिक पद्धत ग्रामीण भागातील लोकांना सोयीस्कर आणि आधुनिक शासनाचा अनुभव देते.
खाते वाटपाचे महत्त्व, फायदे आणि कुटुंबातील एकता
खाते वाटपाच्या मागे केवळ कायदेशीर प्रक्रिया नसते; ती कुटुंबातील विश्वास, आपुलकी आणि परंपरा उभे ठेवण्याची जबाबदारी असते. वेळेत आणि योग्य पद्धतीने केलेले खाते वाटप कुटुंबातील भविष्यातील वाद टाळते. प्रत्येक भावंडाला, प्रत्येक वारसाला त्याचा हक्क स्पष्ट मिळाला की मनात कोणताही गैरसमज राहत नाही. स्वतंत्र 7/12 मिळाल्यावर शेतकरी कर्ज, अनुदान, बियाणे, खत, विद्युत जोडणी अशा अनेक कामांसाठी स्वावलंबी होतो. विक्री करायची असल्यास अडथळे राहात नाहीत.
महत्वाचे म्हणजे—कायदेशीर दृष्टीने स्पष्ट ताबा असल्याने भविष्यात कुणीही बाहेरचा व्यक्ती किंवा संस्था जमीन बळकावण्याचा प्रयत्न करू शकत नाही. अनेकवेळा आपण पाहतो की, फक्त एक कागद कमी असल्यामुळे भावंडांमध्ये वर्षानुवर्षे कटुता निर्माण होते. म्हणूनच, जमिनीची वाटणी प्रेमाने, पारदर्शकपणे, सर्वांच्या संमतीने आणि कायदेशीर चौकटीत करणे आवश्यक आहे. जमीन ही पिढ्यांची धरोहर आहे—ती तुकडे करण्यासाठी नाही, तर प्रत्येकाला त्याचा हक्क देऊन कुटुंबाला मजबूत करण्यासाठी असते. खाते वाटप म्हणजे फक्त जमीन विभागणे नव्हे; ते म्हणजे नात्यांची मजबुती आणि भविष्यासाठीची सुरक्षित पायाभरणी.
सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड (KCC), जी शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक भांडवल उपलब्ध करून देते. या योजनेद्वारे शेतकरी कमी व्याजदरात कर्ज घेऊ शकतात आणि त्याचा उपयोग बियाणे, खते, कीडनाशके, शेती उपकरणे आणि इतर कृषी संबंधी गरजांसाठी करू शकतात. अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढवली, ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त २ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.
या योजनेचे विविध फायदे असून, अल्प व्याजदर, परतफेडीवर सवलत आणि त्वरित निधी उपलब्ध होणे हे योजनेचे मुख्य आकर्षण आहेत. मात्र, अनेकांना या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, पात्रता निकष कोणते आहेत याची पुरेशी माहिती नसते. या लेखात किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि योजनेचे संपूर्ण फायदे समजून घेऊया.
काय आहे किसान क्रेडिट कार्ड योजना ?
शेतीसाठी आवश्यक भांडवल मिळावे आणि पेरणीपूर्व अडचणींवर मात करता यावी, यासाठी भारत सरकारने १९९८ मध्ये किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज मिळते, जे खते, बियाणे, कीटकनाशके तसेच शेतीच्या इतर गरजांसाठी वापरता येते. गरज पडल्यास शेतकरी या कार्डद्वारे रोख रक्कमही काढू शकतात, ज्यामुळे शेतीचा खर्च सहज भागवता येतो.
ही योजना वेळोवेळी सुधारली गेली आहे. २००४ मध्ये यामध्ये गुंतवणूक कर्ज, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन आणि पशुपालन यांसारख्या उपक्रमांचा समावेश करण्यात आला.२००६-०७ मध्ये व्याज अनुदान योजना (ISS) सुरू करण्यात आली, ज्यामुळे अल्पकालीन कृषी कर्ज शेतकऱ्यांना केवळ ७% व्याजदराने मिळू लागले आणि आर्थिक ओझे कमी झाले. २०१२ मध्ये डिजिटल युगाची कास धरत इलेक्ट्रॉनिक किसान क्रेडिट कार्ड (e-KCC) सुरू करण्यात आले, ज्यामुळे व्यवहार अधिक सोपे, वेगवान आणि पारदर्शक झाले. तसेच आता योजेनची मर्यादा वाढवली गेली, ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त २ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया आणि फायदे
किसान क्रेडिट कार्ड योजना सरकारी आणि खासगी बँकांमार्फत राबवली जाते. राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs), सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे कार्ड मिळू शकते. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या अधिकृत बँकेत जाऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरावा लागतो. अर्ज मंजूर झाल्यानंतर किसान क्रेडिट कार्ड दिले जाते, ज्यामुळे शेतकरी आपल्या गरजेनुसार ठराविक मर्यादेत कर्ज घेऊ शकतात.
किसान क्रेडिट कार्डमुळे शेतकऱ्यांना सहज आणि कमी व्याजदरात कर्ज मिळते. हे कर्ज खते, बियाणे, कीटकनाशके आणि शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी वापरता येते. गरज भासल्यास शेतकरी या कार्डद्वारे रोख रक्कम काढू शकतात, त्यामुळे तातडीच्या खर्चासाठी मदत होते. व्याज अनुदान योजनेमुळे कर्जाचा आर्थिक बोजा कमी होतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळते आणि शेतीची उत्पादकता वाढते.
निकष आणि आवश्यक कागदपत्रे
या योजनेत अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे लागते , मात्र कमाल वयाची कोणतीही मर्यादा नाही. या योजनेत 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते, आणि हे कर्ज पाच वर्षांच्या आत परतफेड करता येते. किसान क्रेडिट कार्डाची वैधता देखील पाच वर्षे असते.
किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे काही आवश्यक कागदपत्रे असावी लागतात. ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, वीज बिल किंवा पाणी बिल यापैकी कोणतेही एक कागदपत्र लागते. तसेच, शेतकऱ्याने जमिनीचा मालकी हक्क किंवा भाडेकराराचे दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे. जर जमीन स्वतःच्या नावावर असेल, तर खतौनी, जमाबंदी किंवा पट्टा यासारखे कागदपत्र चालतात. जर शेतकरी भाडेकरू असेल, तर वैध भाडेकराराची कागदपत्रे द्यावी लागतात.
मित्रांनो, किसान क्रेडिट कार्ड योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आर्थिक मदत योजना आहे. या जर तुम्ही सुद्धा शेतकरी असाल आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर आपल्या जवळच्या बँकेत जाऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करा आणि कमी व्याजदरात कर्ज मिळवण्याची ही संधी गमावू नका.
आजच्या तरुणाईला वारंवार शेती किंवा संबंधित व्यवसायांकडे वळण्याची गरज आहे, असं सांगितलं जातं. मात्र, प्रत्यक्षात या क्षेत्रात आधुनिक प्रयोग, नवं तंत्रज्ञान आणि नवनवीन संधी शोधणाऱ्या तरुणांची संख्या अतिशय अल्प आहे यातच, जेव्हा पुरुषी वर्चस्व असलेल्या व्यवसायात एखादी महिला उतरते, तेव्हा तिला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. बायकांनी फक्त बायकांची कामं करावी, असा पारंपरिक दृष्टिकोन आजही प्रचलित आहे. त्यामुळे, महिला अशा व्यवसायात उतरली की, तिला हिणवलं जातं, आणि कधी कधी तिला “तू नाही करू शकणार” असं म्हणून मानसिक खच्चीकरण केलं जातं.
मात्र त्यांना जर योग्य वेळी योग्य संधी मिळाल्या, तर त्या कोणतंही काम करु शकतात. मग ते खेळ असो, राजकारण असो, सैन्य असो किंवा व्यवसाय असो, महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली प्रतिभा आणि यश सिद्ध केलं आहे. आज आपण अशाच एका २४ वर्षीय कृषीकन्या बद्दल चर्चा करणार आहोत जिने आपल्या प्रचंड मेहनतीच्या बळावर वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी दुमजली गोठा उभारून यशस्वी दुग्धव्यवसाय उभारून तरुणाईसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
ती तरुणी आहे अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील पारनेर तालक्यातील निघोज या गावाची रहिवासी श्रद्धा ढवण. श्रद्धाने आपले जीवन संघर्षाच्या बळावर यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेलं आहे. भौतिकशास्त्रात एम. एस. सी. शिक्षण घेतलेल्या श्रद्धा तायक्वांडो खेळाडू म्हणूनही प्रसिद्ध आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्रद्धाची लहानपणापासूनच म्हशींच्या व्यापारात घेतलेली मेहनत आणि त्याचा परिणाम तिच्या भविष्यावर झाला.
व्यवसायाची सुरुवात
शेतकरी कुटुंबातील श्रद्धाच्या वडिलांचा म्हशी खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्यामुळे घरी म्हशी आणल्या जायच्या. कधी चार-पाच म्हशी घरी असायच्या तर कधी एकही नसायची. घरची परिस्थितीही हलाखीची होती. वडील अपंग, भावंडं लहान म्हणून घरात जबाबदार व्यक्ती श्रद्धाच होती.
लहानपणापासूनच या वातावरणात वाढलेली श्रद्धा जसजशी मोठी होत गेली तसतसे आपल्या वडिलांकडून आता काम नाही, त्यांना आर्थिक हातभार लावला पाहिजे, या जाणिवेतून वयाच्या अकराव्या वर्षापासून तीही हे काम शिकू लागली. मुळातच अतिशय बुद्धिमान आणि मेहनती असलेल्या श्रद्धाने पुढे कॉलेज ला गेल्यापासून आपल्या भावाच्या मदतीने मोठ्या धडाडीने दोन म्हशी घेऊन पशुपालन आणि दुग्धव्यवसायाचा श्रीगणेशा केला.
प्रगती आणि विस्तार:
सुरुवातीला दोन म्हशींनी सुरूवात केली खरी, मात्र खरा प्रवास तर आता सुरु झाला होता. घर सांभाळण्यासाठी किंवा शिक्षणासाठी ती घर सोडून शहरात गेली नाही, तर गावातच बीएससी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. ती स्वतःच्या हाताने म्हशींचं दूध काढायची आणि मोटार सायकलवर बसून स्वतः दूध विकायला जायची. हा व्यवसाय श्रद्धाने नियोजनपूर्वक सांभाळला. व्यवसायात नफा मिळायला लागल्यावर तेच पैसे गुंतवून तिने व्यवसाय वाढण्यावर भर दिला. प्रसंगी कर्ज काढून तिनं उत्पादन कसं वाढेल, दुधाची गुणवत्ता कशी सुधारेल याकडे लक्ष दिलं. त्यासाठी म्हशींना कोणतं खाद्य दिलं गेलं पाहिजे याचा तिने नीट अभ्यास केला. शेण काढण्यापासून ते दूध काढणं, दूध घालणं, गोठा साफ करणं ही सगळी कामं तिने स्वतः केली. मात्र, जसजशी म्हशींची संख्या वाढत गेली, तसतसं कामगार ठेवण्याची गरज भासू लागली. आजच्या घडीला, श्रद्धाकडे तब्बल ८० म्हशी आणि तेवढी क्षमता असणारा दोन मजली गोठा आहे.
जोडव्यवसायाचा श्रीगणेशा
व्यवसाय करत असताना, काही वर्षांनंतर श्रद्धाने गोठ्यावर विविध प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली. गोठ्यातील मलमूत्र, शेण, आणि वाया जाणारे पाणी यांचा सखोल अभ्यास करून तिने शून्य कचरा व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केला. यासाठी तिने तज्ज्ञांच्या मदतीने बायोगॅस प्रकल्प उभारला, ज्यामध्ये शेण आणि मलमूत्राचा वापर केला गेला. या प्रकल्पातून पुढे बायोगॅसचे रूपांतरण करून वीज निर्मितीही केली गेली.
घरातील स्वयंपाकाचा गॅस, गोठ्यातील वीज आणि बोअरवेल, विहिरी, तसेच बायोगॅससाठी लागणाऱ्या दोन मोटारींसाठी लागणाऱ्या संपूर्ण वीजेचा खर्च, म्हणजेच जवळपास ८ ते १० हजार रुपये या प्रकल्पामुळे वाचले. याशिवाय, बायोगॅसच्या प्रक्रियेमुळे शेणातून निघणारा मिथेन गॅस जाळला जातो, जो पर्यावरणासाठी हानिकारक असतो. परिणामी, पर्यावरणावर होणारे दुष्परिणामही कमी झाले.
बायोगॅस प्रकल्पातून बाहेर पडणारी स्लरी शेतकऱ्यांनी वापरण्यास सुरुवात केली आहे. स्लरीमध्ये नायट्रोजनचे प्रमाण अधिक असल्यामुळे ती सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीसाठी उपयुक्त आहे. ऑरगॅनिक कार्बन वाढविण्यासाठीही स्लरीचा वापर केला जातो. साधारणपणे ५ ते १० रुपये प्रति लिटरने ही स्लरी विकली जाते, ज्यामुळे या प्रकल्पातूनही उत्पन्न मिळू लागले आहे.
याशिवाय, श्रद्धाने ‘गांडूळ खत प्रकल्प’ आणि जिवाणू जैविक खत प्रकल्प’ही सुरू केले आहेत. बायोगॅस प्रकल्पासाठी वापरात येणाऱ्या शेणाव्यतिरिक्त उरलेले शेण या प्रकल्पांत कुजवले जाते आणि त्याचा योग्य वापर केला जातो. या उपक्रमांमुळे श्रद्धाने गोठ्यावर शाश्वत आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापन पद्धती निर्माण केली आहे.
आपल्या अनुभवाच्या बळावर मिळवलेले ज्ञान श्रद्धाने स्वतःपर्यंत मर्यादित न ठेवता पशुपालन आणि दुग्धव्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली. खरंतर श्रद्धाचे व्यवसायातील यश पाहून अनेकांना प्रेरणा मिळू शकते. तिच्या यशाचा अनुभव पाहून एखाद्याला म्हशीपालन व्यवसाय, दुग्धव्यवसाय सुरू करण्याची इच्छा होऊ शकते किंवा ‘जर एक मुलगी हे करू शकते, तर मी का नाही?’ असा विचार करायला लावू शकतो. पण या यशामागील खडतर प्रवास, सुरुवातीच्या अडचणी आणि संघर्ष यांचे महत्व समजून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच श्रद्धाच्या प्रशिक्षण केंद्रात तरुणांना अधिक प्राधान्य दिले जाते, ज्यामुळे त्यांना या प्रवासाची खरी जाणीव होऊ शकेल.
शून्य कचरा व्यवस्थापन पद्धतीसह, श्रद्धाच्या प्रशिक्षण केंद्रात बायोगॅसनिर्मिती, बायोवीजनिर्मिती, मुरघास, जीवाणू जैविक खत, गांडूळ खत, आणि गोमूत्रापासून बनविण्यात येणारी स्लरी यांसारख्या विविध प्रकल्पांचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षणार्थी ‘श्रद्धा फार्म’मधील कामकाजाची पद्धत समजून घेतात आणि त्यांना या प्रकल्पांद्वारे कशा प्रकारे शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने उत्पन्न मिळवू शकतो याची जाणीव होते. या विश्वासाने प्रशिक्षणार्थी केंद्रातून बाहेर पडतात आणि त्यांच्या यशाचा पाया घट्ट होत जातो.
एका म्ह्शीपासून सुरु झालेला हा व्यवसाय आता प्रचंड वाढला आहे. श्रद्धा त्या हजारो लाखो तरुणींसाठी प्रेरणास्त्रोत आहे. सोबतच कृषी क्षेत्रात “श्रद्धा फार्म” सध्याच्या घडीला खूप गाजलेलं नाव आहे. एक दोन म्हशींपासून सुरु झालेला हा व्यवसाय महिन्याला ७ ते ८ लाख श्रद्धाला मिळवून देतो.
शेती आणि पशुपालन हे क्षेत्र प्रचंड शारीरिक श्रम आणि कष्टांची मागणी करणारं क्षेत्र आहे, म्हणूनच अनेकजण या व्यवसायाकडे वळायला कचरतात. याचाच परिणाम म्हणून, शेतीला तरुणाईकडून कमी महत्त्व दिले जाते आणि काही लोकांना वाटते की, हा व्यवसाय फायदेशीर नाही. पण हा एक गैरसमज आहे. सध्याच्या काळात, तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती अधिक सुलभ आणि परिणामकारक होऊ शकते. मात्र, शेतीतून उत्पन्नाची शाश्वतता कमी असल्याने शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायांचाही विचार व्यावसायिक दृष्टिकोनातून करायला हवा.
पशुपालन हा एक दीर्घकालीन चालणारा व्यवसाय आहे. शेतकऱ्यांवर कितीही संकटे आली, तरी पशुपालन आणि शेतीपूरक इतर व्यवसाय शेतकऱ्यांना तारून नेऊ शकतात. त्यामुळे स्वतःचं करिअर घडवायचं असेल, स्वतःचा पैसा उभा करायचा असेल, तर केवळ मुलांनीच नव्हे, तर मुलींनीही या क्षेत्रात निसंकोचपणे येण्याची आवश्यकता आहे.
मित्रांनो, श्रद्धासाठी डेअरी फार्मचं काम करणं अगदीच सोपं नव्हतं, कारण तिला आपल्या मित्रमैत्रिणींच्या टोमण्यांना सामोरं जावं लागलं. गावातल्या लोकं श्रद्धाच्या कामावरून वेगवेगळे टोमणे मारत असत, पण श्रद्धाने त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. तिच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती, त्यामुळे श्रद्धाने डेअरी फार्मला यशस्वी व्यवसाय बनवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली.
तिच्या कार्याची दखल घेत तिला मागील वर्षी ‘एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’ बारामती येथे जागतिक महिला दिनानिमित्त ‘शारदा सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
श्रद्धा त्या हजारो, लाखो तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहे जे स्वतःच्या परिस्थितीला दोष देत काहीतरी करण्याची उमेद हारून बसलेत आणि तिचं कार्य त्या हजारो लोकांना दिलेली चपराक सुद्धा; जे म्हणतात, मुलगी म्हणजे परक्याचं धन, मुलगी म्हणजे काळजाला घोर. पण या विचारांना तडा देत, घरच्या व्यवसायासाठी लहानपणापासूनच झटणारी श्रद्धा आज आपल्या वडिलांचा खंबीर आधार बनली आहे. मुलगी म्हणजे बापाचा अभिमान, मुलगी म्हणजे बापाचा खरा आधार, हे तिने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवलं आहे.
शेती हा भारतीयांचा पारंपरिक व्यवसाय असून आजही ग्रामीण भागातील मुख्य रोजगार निर्मिती शेती किंवा शेतीशी संबंधित उद्योगातून होते. शेतीमुळे भारतीय लोकांच्या उदरभरणाची सोय होते. ज्या जमिनीत वर्षभरात कोणते ना कोणते पीक घेण्यात येते ती जमीन म्हणजेच शेतजमीन. आयकर कायद्याच्या दृष्टीने शेतजमिनीचे दोन प्रकार आहेत. ◆ ग्रामीण शेतजमीन ◆ शहरी शेतजमीन
★ ग्रामीण शेतजमीन: अगदी अलीकडील जनगणनेनुसार (Census 2011) दहा हजार लोकसंख्या असलेल्या शहराच्या हद्दीबाहेर 2 किमी अंतर, दहा हजाराहून अधिक परंतु एक लाखाहून कमी लोकसंख्या असल्यास हे अंतर 6 किमी आणि एक लाखांहून अधिक लोकसंख्या असल्यास 8 किमी परिधाबाहेरील शेतजमीन ही ग्रामीण शेतजमीन समजण्यात येते. हे अंतर मोजताना हवाई अंतराचा (Aerial distance) विचार केला जातो.
● आयकर कायद्यातील कलम 45 नुसार ग्रामीण शेतजमीन ही मालमत्ता समजली जात नसल्याने त्यातून मिळणारे उत्पन्न हे शेतीचे उत्पन्न असल्याने त्यावर कलम 10(1) नुसार कोणतीही करआकारणी केली जात नाही. जर याशिवाय अन्य उत्पन्न असेल तर विवरणपत्र भरताना शेतीपासून मिळालेले उत्पन्न करमुक्त उत्पन्न म्हणून विहित नमुन्यात जाहीर करावे लागते.
● या जमिनीच्या विक्रीतून होणारा नफा/तोटा हा भांडवली नफा/तोटा मानला जात नाही. त्यामुळे त्याच्यावर कोणतीही आयकर आकारणी होत नाही. याला अपवाद जमिनीची खरेदी विक्री करणारे व्यापारी, त्याच्या दृष्टीने शेतजमीन ही खरेदी विक्री करण्याची व्यावसायिक वस्तू असल्याने या व्यवहारातून मिळणारे उत्पन्न हे त्यांचे व्यावसायिक उत्पन्न समजून त्यावर करआकारणी केली जाते.
★ शहरी शेतजमीन: वर उल्लेख केलेल्या शेतजमिनी व्यतिरिक्त अन्य सर्व शेतजमीन ही शहरी शेतजमीन समजली जाते.
● शहरी शेतजमीन ही भांडवली मालमत्ता मानण्यात येते त्यामुळे ती धारण अथवा खरेदी केल्यापासून दोन वर्षांनी विकल्यास त्यातून मिळणारा नफा तोटा हा दीर्घकालीन भांडवली नफा तोटा समजण्यात येतो. त्यावर महागाई निर्देशांकातील फरकाचा लाभ (Indexation benefit) घेता येतो त्यावर 20% या एकाच दराने कर आकारणी केली जाते.
● व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) किंवा त्यातील सदस्य शहरी शेतजमीनीतून मागील दोन वर्षात शेतीचे उत्पन्न मिळवत असतील तर त्यांना सदर जमीन विक्रीतून होणाऱ्या भांडवली नफ्यावरील करातून काही प्रमाणात सूट मिळू शकते. * जमीन हस्तांतरित केल्यापासून दोन वर्षांच्या आत नवीन शेतजमीन खरेदी करावी.
● करलाभ (54B) मिळवण्यासाठी खरेदी केलेली जमीन त्यापुढील तीन वर्षे विकता येत नाही.
विक्री वर्षाचे आयकर विवरण पत्र भरण्यापूर्वी जर शेतजमीन खरेदी करता येत नसेल, तर भांडवली लाभाची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेच्या भांडवली लाभ खात्यात जमा करावी. सदर रक्कम पुढे केव्हाही शेतजमीन खरेदी करण्यासाठी वापरता येईल. या खात्याचे व्याजदर बदलत असतात सध्या यावरील व्याजदर 7.15% प्रतिवर्षं असून व्याज करपात्र आहे. जर दोन वर्षात ही रक्कम वापरता आली नाही, तर ती भांडवली लाभ म्हणून पुन्हा करपात्र होईल.
विहित मुदत आणि मर्यादेत ही रक्कम राहते. घर घेण्यासाठी वापरल्यास त्यावर कर द्यावा लागणार नाही (54F), सध्या ही मुदत व्यवहार होण्यापूर्वी एक वर्ष ते व्यवहार झाल्यावर दोन वर्षाच्या आत असून त्याची अधिकतम मर्यादा 10 कोटी रुपये आहे.
पन्नास लाख रुपयांच्या मर्यादेतील भांडवली नफा सहा महिन्यांच्या आत मान्यताप्राप्त पायाभूत सुविधा रोख्यात गुंतवली असता त्या रकमेवर कर (54EC) भरावा लागत नाही. हे रोखे पाच वर्ष मुदतीचे असून त्यावर 5.25% व्याज प्रतिवर्षं मिळते. Rural Electric Corporation, Power Finance Corporation, Indian Railway Finance Corporation याचे रोखे वर्षभर आलटून पालटून सातत्याने येत असतात, त्यावर मिळणारे व्याज करपात्र आहे.
खरेदी केलेल्या जमिनीची किंमत भांडवली लाभाएवढी किंवा अधिक असल्यास भांडवली लाभ कर द्यावा लागणार नाही.
जर लाभ कमी असेल तर लाभातील फरकावर भांडवली लाभ कर द्यावा लागेल.
शेतजमीन आणि कर यावर सातत्याने विचारले जमणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
★ ग्रामीण शेतजमीन हेच माझे उत्पन्नाचे साधन असून माझे इतर उत्पन्न आपले उत्पन्न आयकर मर्यादेहून कमी आहे, तर मला आयकर विवरणपत्र भरावे लागेल का? ■ आपले उत्पन्न विवरणपत्र भरण्याच्या सध्याच्या तीन लाख या मर्यादेहून कमी आहे, विक्री केलेली शेतजमीन भांडवली मालमत्ता म्हणून जमजली जात नसल्याने आयकर विवरणपत्र भरण्याची आवश्यकता नाही.
★ शहरी शेतजमीन विक्रीतून येणारी रक्कम निवासी घरात गुंतवल्यास आयकरात सवलत मिळेल का? ■ हो, यातील गुंतवणूक मुदत आणि मर्यादा यांचे पालन करावे.
★ शेतजमीन खरेदी करताना मुळातून कर (TDS) कापून घेतला जातो का? ■ शहरी शेतजमीन ही मालमत्ता समजली जात असल्याने पन्नास लाखांवरील व्यवहारावर 1% दराने मुळातून कर (कलम 194IA) कापला जाईल. ग्रामीण शेतजमीन खरेदी करताना असा कर कापला जाणार नाही.
★ शेतजमीन विक्री व्यवहार रोख रकमेत करता येईल का? ■ आयकर कायद्यातील तरतुदीनुसार (कलम 269ST) दोन लाखाहून अधिक रकमेचा व्यवहार रोख रकमेत करता येत नाही. ही तरतूद सर्व शेतजमीन विक्री व्यवहाराना लागू आहे.
★ आयकर कायद्यानुसार शेतजमीन खरेदीसाठी 54B, निवासी घरासाठी 54F आणि पायाभूत सुविधा रोखे 54EC यासाठी मिळणाऱ्या एक वा अधिक सवलती एकाच विक्री व्यवहारासाठी वापरता येतील का? ■ कायद्यात वरील प्रत्येक तरतूदी वेगवेगळ्या असून त्यात कोणतीही एक तरतूद एकाच व्यवहारासाठी वापरता येईल असे म्हटले नसल्याने एकाच व्यवहारासाठी एक वा अनेक तरतुदींचा एकत्रित लाभ मिळवण्यास कोणतीही कायदेशीर अडचण नाही.
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत लेखातील मते वैयक्तिक आहेत)
शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा. पर्यायाने शेतकरी हाच या व्यवस्थेचा कणा आहे. आपण शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असे म्हणतो. तो शेतात राबतो, पिकवतो म्हणूनच आपण पोटभरून खाऊ शकतो. पण, गेल्या काही वर्षांत देशभरात कर्जमाफी आणि शेतकरी संप हे मुद्दे चर्चिले जात आहेत. याला कारण असे की,आर्थिक परिस्थितीला कंटाळून आजवर कित्येक शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या. आजवर अनेकवेळा कर्जमाफी देऊनही या आत्महत्यांचे प्रमाण काही कमी झाले नाही. या आत्महत्या कशा थांबवता येतील? या प्रश्नाचे उत्तर अजूनही सरकारला सापडले नाही. पण, पुण्यातील एका माऊलीला या प्रश्नाचे उत्तर सापडले. त्या माऊलीचा हा प्रेरणादायी प्रवास…
पुण्याच्या मुळशीचा हा माऊली.
वडील शेतकरी. परंपरागत पद्धतीने शेती करणारे.
शेतीत फायदा नाही म्हणून माऊलीने दहावीनंतर ऑफिस बॉयची नोकरी पत्करली. बारा वर्षें नोकरी केली.
माऊलीच्या आयुष्यास कलाटणी मिळाली ती एका बातमीमुळे. ती बातमी ही होती, “10 गुंठ्यात 12 लाखाचे उत्पन्न.”
माऊली त्या शेतकऱ्यास जाऊन भेटला. तो फुलांची शेती करत असे. माऊली त्या शेतकऱ्याचे यश पाहून भारावला. स्वतःच्या शेतीत तोच प्रयोग करण्याचे ठरवले. नोकरीचा राजीनामा दिला. फुलांची शेती करण्याचा चंग बांधला आणि झपाटून कामाला लागला. बऱ्याच प्रयत्नांतून बँकेने दहा लाख कर्ज दिले आणि या माऊलीने ‘पुण्यातील पहिलंवहिलं पॉलिहाऊस’ उभं केलं आणि फुलांची हायटेक शेती सुरू केली.
पाणी, वीज, खतं आणि मजूर या सगळ्या गोष्टींचा कमीत कमी वापर, सोबत बाजारपेठेवरही लक्ष. या गोष्टींमुळे माऊलीने ‘दहा लाखाचं कर्ज अवघ्या एका वर्षात फेडलं.’
या पराक्रमाने बघता बघता माऊली हिरो झाला. वर्तमानपत्रे, टीव्हीवर माऊली झळकू लागला. माऊलीकडे कित्येक शेतकरी मार्गदर्शन घ्यायला येऊ लागले आणि यातून निर्माण झाली एक संस्था… ‘अभिनव फार्मर्स क्लब’. या गटात भागातील ३०५ शेतकरी सहभागी झाले. माऊलीने या साऱ्या शेतकऱ्यांची घडी व्यवस्थित बसविली. परिणामतः त्या सर्व ३०५ शेतकऱ्यांनी एकाच दिवशी ३०५ ‘मारुती 800’ गाड्या विकत घेतल्या.
आज कित्येक इंजिनिअर, डॉक्टर किंवा सीए या लोकांना सुध्दा ८ तास काम केल्यावर वार्षिक ५ लाख निव्वळ नफा राहत नाही. मात्र येथील शेतकरी दररोज फक्त ५ तास काम करुन हे उद्दिष्ट साध्य करतात. प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतःचा बंगला व चारचाकी सुध्दा आहे.
एक एकर शेतीचे दोन तुकड्यात विभाजन केले जाते. एका तुकड्यात भाजीपाला लागवड केली जाते. उरलेल्या तुकड्यात पॉलिहॉऊस/ग्रीनहाऊस शेती केली जाते. या पॉलिहॉऊसमध्ये विदेशी भाज्या पिकवल्या जातात. या भाज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये विकल्या जातात. पिकवलेल्या भाज्या शेताच्या बांधावरुनच भरुन नेल्या जातात. त्यामुळे विकण्यासाठी बाजारात नेणे व वाहतूकीचा खर्च या गोष्टीसुध्दा शेतकऱ्याला कराव्या लागत नाहीत.
यासोबतच एक देवनी गाय सर्व शेतकऱ्यांनी पाळली आहे. तिला खाद्य कमी लागते मात्र ही गाय दूध जास्त देते. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते. या दुधाबरोबरच सर्व शेतकरी गोमूत्र साठवून ठेवतात व औषधे बनविणाऱ्या कंपन्यांना विकतात. त्यातूनसुध्दा चांगली कमाई केली जाते.
सध्या ‘अभिनव फार्मर्स क्लब’ या गटात ४५००० शेतकरी आहेत. ग्रुपकडून केली जाणारी शेती पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने केली जाते. ‘अभिनव फार्मर्स क्लब’ला या कामासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
केवळ “दहावी शिक्षण” झालेल्या माऊलीने आजवर ३५पेक्षा जास्त देशाचे दौरे केलेले आहेत, जे एखाद्या IT इंजिनीअर ला देखील जमले नसेल. आजवर माऊलीला २००० पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. हा माऊली म्हणजेच श्री. ज्ञानेश्वर बोडके.
भारतीय समाज शेतीकडे ‘डबघाईला आलेला व्यवसाय’ म्हणून पाहत असताना श्री. ज्ञानेश्वर बोडके यांनी शेतकऱ्यांना शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवण्याची ‘सिस्टिम’ शोधून काढली. ती यशस्वीपणे राबवली. डबघाईला आलेल्या शेतीला आणि शेतकऱ्यांना त्यांच्या प्रयत्नाने सुगीचे दिवस आले आहेत. त्यांना राष्ट्रपती पारितोषक सुद्धा जाहीर झाले आहे.
घरच्यांचा विरोध, आर्थिक परिस्थिती आणि अल्पसंतुष्टी वृत्तीला श्री. ज्ञानेश्वर बोडके बळी पडले असते. तर, आज ते कोठे असते? त्याच ऑफिसमध्ये… ऑफिसबॉय म्हणून… आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना श्री. बोडके यांना लाख संकटे आली असतील, पण ते तरीही डगमगले नाहीत आणि शेती फायद्याची कशी हे सिद्ध करून दाखविले. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.
१३ जानेवारी २०१८ रोजी या माऊलीला प्रत्यक्ष पाहण्याचा आणि ऐकण्याचा लाभ मु. पो. घारेवाडी, ता. कराड येथील बलशाली युवा हृदय संमेलनमध्ये मिळाला होता.
मटकी शेतीसाठी उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय हवामान योग्य आहे. हवामान उबदार आणि कोरडे असावे. सरासरी तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअस आणि वार्षिक पर्जन्यमान 50 ते 100 सेंटीमीटर असावे.
आवश्यक जमीन
मटकी शेतीसाठी मध्यम ते हलकी, सुपीक, चांगली निचऱ्याची आणि थोडीशी अम्लीय जमीन योग्य आहे. pH 6.5 ते 7.0 च्या दरम्यान असावे.
अशी करा लागवड
मटकीची लागवड उन्हाळ्यात केली जाते. बीजांची पेरणी सरी-वरंबे पद्धतीने केली जाते. पेरणीचं अंतर 30 x 30 सेंटीमीटर किंवा 45 x 45 सेंटीमीटर ठेवावे.
कशी करावी जोपासणी
मटकीची जोपासणी खालीलप्रमाणे केली जाते:
खरीप: पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी पहिली खुरपणी करावी. नंतर 15 ते 20 दिवसांच्या अंतराने दोन-तीन खुरपणी करावी.
पाणी व्यवस्थापन: मटकीला मध्यम पाणी लागते. पेरणीनंतर सुरुवातीला दररोज पाणी द्यावे. नंतर 7 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
खत व्यवस्थापन: मटकीला खताची गरज कमी असते. पेरणीपूर्वी जमिनीत शेणखत किंवा कंपोस्ट खत घालावे.
रोग आणि कीड नियंत्रण: मटकीला तांबेरा रोग आणि बोंडकी कीड यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या रोग आणि कीड नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.
कापणी
मटकीची कापणी 5 ते 6 महिन्यांनी केली जाते. कापणीनंतर मटकिला कोरडे करून साठवले जाते.
इतके मिळेल उत्पादन
योग्य निगा राखल्यास मटकीची प्रति हेक्टरी 10 ते 12 टन उत्पादन मिळते.
मटकीच्या जाती
मटकीच्या अनेक जाती आहेत. काही प्रमुख जाती खालीलप्रमाणे आहेत:
राजा मटकी, कांदे मटकी, काळी मटकी, सातपुडा मटकी, विदर्भ मटकी
या जातींमध्ये रोग आणि कीड प्रतिरोधक क्षमता चांगली असते. तसेच, या जातींमध्ये उत्पादन क्षमता देखील चांगली असते.
अशा या मटकी शेतीविषयी चीसंपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. हा लेख जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा.
कारले ही एक बहुवर्षायू वेलयुक्त वनस्पती आहे. हे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, चीन, आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि मध्य पूर्वेतील उष्ण आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशात उगवले जाते. कारल्याच्या चवीमुळे बऱ्याच लोकांना ते आवडत नसले तरीही त्यात पोषण असल्याने लोकं ही भाजी खातात.
त्यात जीवनसत्त्वे A, C आणि K, तसेच फायबर आणि पोटॅशियम असते. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. तसेच मधुमेह आणि हृदयरोग यांसारख्या रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करते. हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. कारले एक बहुगुणी भाजी आहे. ही एक औषधी वनस्पती असल्याने याला भरपूर मागणी आहे
हवामान
कारले लागवडीसाठी उष्ण आणि दमट हवामान आवश्यक आहे. तापमान 20 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. जास्त आर्द्रता आणि पाऊस कारले लागवडीसाठी फायदेशीर असतो. .
जमीन
कारले लागवडीसाठी चांगली निचरा होणारी, मध्यम खोलीची आणि सुपीक जमीन आवश्यक आहे. पीएच 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असलेल्या जमिनीत कारले चांगले वाढते.
लागवड
कारल्याच्या लागवडीसाठी चांगल्या जातीची निवड करावी जसे की, पुसा दौ मोसमी, अर्का हरित आणि कोईमतुर लांब. कारल्याची लागवड बियाणे किंवा रोपे लावून केली जाते. बियाणे लावण्यासाठी, 60×60 सें. मी. आकाराचे खड्डे तयार करावेत आणि त्यात 10 ते 15 ग्रॅम बियाणे टाकावेत. रोपे लावण्यासाठी, 60 सें. मी. अंतरावर रोपे लावावीत.
जोपासणी
कारले लागवडीसाठी आवश्यक ती जोपासणी खालीलप्रमाणे आहे:
पाणी: कारले लागवडीसाठी नियमित पाणी देणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात दररोज पाणी द्यावे आणि पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्याकडे लक्ष द्यावे.
खत: कारले लागवडीसाठी शेणखत, कंपोस्ट किंवा युरिया यासारखे खत देणे आवश्यक आहे.
तण नियंत्रण: कारले लागवडीत तण नियंत्रण करणे आवश्यक आहे. तण काढून टाकल्यास कारल्याची वाढ चांगली होते.
रोग आणि कीटक नियंत्रण: कारल्याला अनेक रोग आणि कीटकांचा प्रादुर्भाव होतो. रोग आणि कीटक नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.
उत्पन्न
योग्य निगा राखल्यास कारल्याचे एकरी 20 ते 25 टन उत्पादन मिळते.
जोपासणीतील काही टिप्स
कारल्याची लागवड करताना, एका ठिकाणी सलग दोन वर्षे लागवड करू नये.
कारल्यांची गळती होऊ नये यासाठी तोडताना काळजी घ्यावी.
कारले तोडताना, लांब काठीचा वापर करून तोडावीत, जेणेकरून वेलीला इजा होणार नाही.
अशा या कारले शेतीचीमाहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. हा लेख जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि नवी अर्थक्रांतीच्या यू ट्यूब चॅनलला आत्ताच subscribe करा.