Category: उद्योजकता

  • एकेकाळी फुकट वाटूनही न खपणारा कोका-कोला आज १९३ देशांत विकला जातोय.

    एकेकाळी फुकट वाटूनही न खपणारा कोका-कोला आज १९३ देशांत विकला जातोय.

    प्रत्येक गोष्टीला एक इतिहास असतो. एकदा सुरू झालेली गोष्ट लगेच यश मिळवते असे नाही त्यासाठी संयम, कठीण परिश्रम आणि अपयश पचविण्याची ताकद असणे महत्वाचे असते.

    आणि त्यांनी एसा ग्रिग्स कॅडलर यांना केवळ 2300 डॉलर ने कंपनीचे सगळे हक्क विकले.

    आणि त्यांनंतर  एसा ग्रिग्स कॅडलर यांनी कोका कोलाची रेसीपी बदलली. कोकेन काढून त्यांनी त्यात साखरेचे प्रमाण वाढविले. आणि त्याचवेळी बाजारात कोका कोलाचा प्रतिस्पर्धी तयार झाला. तो म्हणजे पेप्सी. कोका कोलच्या मागून आलेला पेप्सी ब्रॅंड देखील लोकांच्या पसंतीस उतरला.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • दांडेली अभयारण्य: कर्नाटकातील नैसर्गिक सौंदर्याचा खजिना

    दांडेली अभयारण्य: कर्नाटकातील नैसर्गिक सौंदर्याचा खजिना

    उत्तर कर्नाटकात स्थित असलेलं दांडेली म्हणजे कर्नाटकातील सर्वात मोठं दुसऱ्या क्रमांकाचं अभयारण्य. फारच कमी माणसांची वर्दळ, स्वच्छ प्रदूषणमुक्त हवा, हिरवागार निसर्ग, लहान लहान कौलारू घर, लहानश्या टपऱ्या आणि एखाद-दुसरं हॉटेल अशा वातावरणात असलेलं दांडेली. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गर्द झाडीच्या झुलत्या कमानी पाहिल्या की, वाटतं दांडेली जणूकाही आपल्या स्वागतासाठीच नटलेली आहे. त्या गर्द झाडीची शहरी लोकांना भीती वाटू शकते पण तिथली स्वच्छ हवा, पक्षांचा मंत्रमुग्ध करून टाकणारा किलबिलाट, काळी नदीचा शांत प्रवाह एकूणच सगळं वातावरण पाहिलं की दोन – तीन दिवस तरी तिथून मुक्काम हलवावा नाही वाटत.

    पुण्याहून दांडेलीचा रस्ता जवळपास 442 किलोमीटरचा आहे. पुणे- सातारा हायवेने कोल्हापूर मधून बेळगाव वरुन 2 तासात तुम्ही दांडेलीला पोहोचू शकता. पुण्याहून 8 – 8.30 तासांचा प्रवास करून जरी थकवा आला असेल तरी तिथल्या शांत वातावरणाने हा थकवा अगदी चुटकीसरशी निघून जातो.

    आणखी वाचा

  • व्यवसायाच्या शुभारंभापासून तो मोठे होईपर्यंत जी प्रोसेस आपण राबवतो ती आपल्या व्यवसायचे भविष्य ठरवते.

    व्यवसायाच्या शुभारंभापासून तो मोठे होईपर्यंत जी प्रोसेस आपण राबवतो ती आपल्या व्यवसायचे भविष्य ठरवते.

    आता व्यवसाय किंवा बिझनेस म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्प्या भाषेत सांगायचं, तर आपण एखादी वस्तू किंवा सेवा तिच्या खरेदीच्या किंवा निर्मिती मूल्यापेक्षा जास्त किंमतीने बाजारात विकतो आणि त्यातून नफा मिळवतो तेव्हा या व्यवहाराला बिझनेस म्हणजे व्यवसाय असं म्हणतात. पूर्वीच्या काळी चलन म्हणून वस्तूंचा वापर व्हायचा. अजूनही काही गावांमध्ये अशी पद्धत आहे कि वस्तूच्या मोबदल्यात वस्तू दिली जाते. मग प्रश्न हा पडतो आपल्या आजूबाजूला इतके लोक व्यवसाय करताना दिसत असतात, त्यातले काही यशस्वी असतात आणि तर काहींचा व्यवसाय ठराविक काळापुरताच सुरु राहून नंतर बंद पडतो. असं का होत असेल? तर एक म्हणीमध्ये याचं सार लपलेले आहे, ते म्हणजे, ‘शेतात काय पिकतं, यापेक्षा बाजारात काय विकलं जातं’ हे महत्वाचं  आहे. व्यवसाय म्हणून आपण ज्या गोष्टीचा किंवा प्रॉडक्टचा विचार करतो त्याचा आणि सध्याच्या बाजारात त्याची किती गरज आहे हा विचार फार महत्वाचा आहे.

    या सर्व गोष्टींची तयारी झाल्यानंतर त्यासोबतच किंबहुना त्याआधीपासूनच विचार करावी अशी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निधी किंवा भांडवल. यामध्ये विचार करताना आपल्या व्यवसायाला किती पैसे आवश्यक आहेत हे तर महत्वाचे आहेच; पण त्यासोबतच व्यवसायातून नफा मिळेपर्यंत व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्यासाठी आवश्यक अतिरिक्त निधी आपल्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय असतात ते म्हणजे, आपण गुंतवणूकदारांकडून भांडवल घेऊ शकतो किंवा सरळ आपण बँकमधून कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो. नवीन उद्योजकांसाठी सरकारने उद्योजकता वाढीस लागावी यासाठी अनेक योजना देखील आणल्या आहेत आपण त्याचासुद्धा वापर करू शकतो.

    या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर तुम्ही तुमचा लहान-मोठा बिझनेस नक्कीच सुरु करु शकता, पण तो पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी तुमच्याजवळ काही उत्तम सवयी असणे गरजेचे आहे. आता या नेमक्या सवयी कोणत्या? अगदी थोडक्यात सांगायचं तर धाडस, आत्मविश्वास, रिस्क घेण्याची तयारी, दूरदृष्टी, संयम, कष्ट, जिद्, मेहनत, सातत्य आणि चिकाटी. हो हे शब्द बोलायला जितके सोपे वाटतात तितकीच हे सर्व अमलात आणण्यासाठी खूप मोठी मानसिक तयारी असणे गरजेचे आहे. ही मानसिक तयारी तेव्हाच असू शकते, जेव्हा तुम्ही खूप जास्त महत्त्वाकांक्षी असता आणि तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सर्व प्रकारे तयार असता.

    आपण एक गोष्ट नेहमी ऐकतो की यश मिळवणे जितके अवघड आहे, त्यापेक्षा यश टिकवणे जास्त अवघड असते. हे समीकरण व्यवसायाला सुद्धा लागू होते. व्यवसाय सुरु करणे जितके अवघड आहे, त्यापेक्षा सातत्याने तो चालवणे आणि त्याचा सर्वदूर प्रसार करणे अवघड आहे. अवघड असले, तरी अशक्य आजिबात नाही आणि हो शेवटी एवढं नक्की सांगता येईल की अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. जसा प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा त्याची पद्धत वेगळी अगदी तसेच प्रत्येकाचा अनुभव वेगळा आणि त्यातून आलेले शहाणपण हे त्याहून वेगळे. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेऊन पूर्व तयारी आणि पूर्ण तयारी करून नक्कीच आपण आपल्या स्वप्नातील व्यवसायच्या क्षेत्रात मैलाचा दगड पार करू शकू.

  • तीर्थन व्हॅली : याहून सुंदर अजून काय?

    तीर्थन व्हॅली : याहून सुंदर अजून काय?

    जिभी

    हिमाचल प्रदेशच्या तीर्थन व्हॅलीमधील एक निसर्गरम्य गाव म्हणजे जिभी. इथल्या वॉटरफॉलचं सौंदर्य काही औरच असतं. डोंगरांमधून खळखळत खाली येणारं पाणी मनाला एक वेगळीच शांतता देऊन जातं. सोबतच्या पक्षांचा चिवचिवाटही या आनंदात भर घालतो.

    जलोरी पास आणि सिरोलसार लेक

    इथल्या आकर्षणामध्ये ही दोन ठिकाणंसुद्धा महत्त्वाची आहेत. फक्त ठिकाणंच नाही तर इथपर्यंत पोहोचण्याचे रस्तेही तितकेच मनमोहक आहेत. रस्त्यावर बर्फाची चादर अंथरलेली असल्याचा भास या ठिकाणी जाताना होतो. मध्यभागी गोठलेला तलाव आणि चारही बाजूंनी बर्फच बर्फ. उंचावर असलेलं मंदिर. इथे एकदा आल्यानंतर तुमचा वेळ कसा जाईल याचा अंदाजही येणार नाही.

    चैहणी गाव

    तीर्थन व्हॅलीतील आणखी एक छोटसं गाव म्हणजे चैहणी. यालाच चैहणी कोठी सुद्धा म्हणतात. इथे एक कोठी आहे. लाकडांपासून तयार केलेली ही कोठी १५०० वर्ष जुनी आहे. इथे कुल्लूचे राजा राणा ढाढिया राहत होते. १५ मजल्यांची ही इमारत १९०५ मध्ये आलेल्या भूकंपात १० मजलीच शिल्लक राहिली आहे. या कोठीतच शृंगा ऋषींचं भंडारही आहे. या कोठीपासूनच साधारण एक किमीच्या अंतरावर शृंगा ऋषींचं मंदीर आहे.   

    तीर्थन व्हॅलीला केव्हा जाणार?

    तीर्थन व्हॅलीला भेट देण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे मार्च ते जून. यावेळी वातावरण फारच चांगलं असतं. जास्त थंडीही नसते. त्यासोबतच वेगवेगळ्या थरारक खेळांचाही तुम्ही इथे आनंद घेऊ शकता. उन्हाळ्यात जलोरी पास आणि हिमालयन नॅशनल पार्कची ट्रेकिंग सुद्धा करू शकता.

    कसे जाल?

    आणखी वाचा

  • स्वित्झर्लंडची मजा भारतात घ्यायचीये? मग या ठिकाणी जायलाच पाहिजे!

    स्वित्झर्लंडची मजा भारतात घ्यायचीये? मग या ठिकाणी जायलाच पाहिजे!

    मित्रांनो आपल्याला माहितीच आहे हिमाचल प्रदेश हे आपल्याकडचं असं ठिकाण आहे जे लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत प्रत्येकालाच आकर्षित करत आलंय. इथलं निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक इथं येत असतात. इथं वेगवेगळे फेमस टूरिस्ट स्पॉट्ससुद्धा आहेत. रोजच्या गर्दीपासून दूर जाऊन शांत ठिकाणी निसर्गसौंदर्य अनुभवायला आपल्या प्रत्येकालाच आवडतं आणि अशाच शांततेचा जर तुम्हालाही अनुभव घ्यायचा असेल, तर हिमाचल प्रदेशातल्या खजियारला तुम्ही नक्कीच भेट द्यायला हवी. “मिनी स्वित्झर्लंड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खजियारला अलौकिक निसर्गसौंदर्य लाभलं आहे.

    khajjiar-tourism

    खजियारच्या या मखमली प्रदेशात एका बाजूला बाराव्या शतकातील लाकडातील कोरीव कारागिरीचं “खज्जिनाग मंदिर” असून, त्याच्या गर्भगृहात नागदेवतेची मूर्ती आहे. १६व्या शतकात राजा बलभद्र बर्मनने येथे पांडवांच्या लाकडातील मूर्ती उभारल्या. राजा पृथ्वीसिंग यांची धार्मिक प्रवृत्तीची दाई “बाल्टू” ने १७ व्या शतकात या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. “मिनी स्वित्झर्लंड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खजियारमध्ये तुम्ही adventure ही करू शकता. इथं तुम्ही Paragliding पासून ते Horse Riding पर्यंत अनेक वेगवेगळ्या activities करू शकता. एवढचं नाही तर खजियारमध्ये तुम्ही trekking चाही अनुभव घेऊ शकता. या ठिकाणी राहण्यासाठी अनेक गेस्ट हाउसही आहेत. इथं तुमच्या राहण्याची उत्तम सोय होऊ शकते.

    खजियारला जाणार कसं?

    आणखी वाचा

  • महा सौंदर्य महाराष्ट्राचं !

    महा सौंदर्य महाराष्ट्राचं !

    पुणे ते जांभरूण हे अंतर ३१४ किमी आहे. पुणे, कोकरूड, मल्कापूर, अंबाघाट, निवळी गणपतीपुळे रोडने कोतवडे फाट्यावरून डावीकडे वळून जांभरूणला जातं येतं. रत्नागिरीहून हे अंतर साधारण २४ किमी इतकं आहे. गावाजवळ येताच निसर्गाचं वैभव बघून तुमची गावाबद्दलची उत्सुकता आणखी वाढेल. सतत खळखणाऱ्या नदीचा, पाटबंधाऱ्यांचा आवाज या ठिकाणी अनुभवायला मिळेल.

    आणखी वाचा

  • या माणसामुळे आपल्या घरापर्यंत  वीज पोहचली- निकोला टेस्ला

    या माणसामुळे आपल्या घरापर्यंत वीज पोहचली- निकोला टेस्ला

    पावसाळ्याचे दिवस होते. आकाशात वीजा कडाडत होत्या. सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. ऑस्ट्रिया-हंगेरी सीमेवरच्या लिका नावाच्या भागातील स्मिजन गावातील एका गर्भवती आईला गरोदारपणाच्या कळा सहन होत नव्हत्या. प्रसूतीची वेळ झाली होती. अखेरीस दाईच्या सहाय्याने आईने बाळाला जन्म दिला. बाळ जन्मल्यावर दाई म्हणाली की “एवढ्या घनघोर अंधारात जन्मेलेल्या या बाळाच्या आयुष्यात पण अंधार असेल का?” त्यावर आईने उत्तर दिले, “नाही हे बाळ संपूर्ण जगाला प्रकाशमान करेल.” १० जुलै १८५६ या दिवशी त्या वेळच्या ऑस्ट्रियामध्ये म्हणजे आजच्या क्रोएशियात जन्मलेल्या त्या बाळाचे नाव होते निकोला टेस्ला.

    लहानपणी त्याची तब्येत अतिशय नाजूक असे. लहान असताना त्याला प्रकाश तसेच वेगवेगळ्या आकृत्यांचे भास व्हायचे. त्यामुळं त्याला बऱ्याच वेळा हे कळत नसे की आपण जे पाहतो आहे, ते खरं आहे की खोटं! कुठलीही गोष्ट एकदा पहिली की त्याच्या डोक्यात फिट्ट बसायची. त्याला जेव्हा एखादी आकृती दिसायची, तेव्हा ती त्याच्या पूर्णपणे स्मरणात रहायची. ती आकृती कागदावर काढायची सुद्धा त्याला कधी गरज पडली नाही. शिक्षकांनी दिलेली गणितं मुलं उतरवून घेईपर्यंत निकोलाने ती मनातच सोडवूनसुद्धा टाकलेली असायची! वयाच्या नवव्या वर्षी टेस्लानं उडणाऱ्या माश्यांच्या हालचालींमधून मिळणाऱ्या ऊर्जेच्या जोरावर चालणारी विजेची मोटार बनवली.

    त्याचे वडील हे चर्चमध्ये धर्मगुरू होते आणि आपल्या मुलानेसुद्धा आपल्यासारखेच काम करावे असं त्यांना वाटायचं. पण मुलाचा विज्ञान आणि गणिताकडे असलेला कल पाहून त्यांनी निकोलाला इलेक्ट्रीकल Engineering ला प्रवेश घेण्यासाठी संमती दिली. गणित आणि विज्ञानात अत्यंत हुशार असलेल्या निकोलाने १८७५ मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेऊन ९ परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. कॉलेजमध्ये असताना टेस्ला फाटे ३ वाजता अभ्यासाला बसायचा आणि रात्री ११ वाजेपर्यंत त्याचा अभ्यास अखंड सुरु असायचा. झोपेत वेळ वाया जाऊ नये म्हणून तो फक्त ४ तास झोपायचा.

     १८७५ला पॉलिटेक्नीकच्या द्वितीय वर्षाला असताना, अतिहुशारपणामुळे एका शिक्षकांसोबत त्याचे मतभेद झाले आणि त्या वर्षी तो नापास झाला. त्यातच त्याला जुगार खेळायची सवय लागली. अभ्यास झाला नाही आणि तो फायनल परीक्षेत नापास झाला. त्यामुळे तो त्यांचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण करू शकल नाही. एवढंच नाही तर त्यांने त्यांच्या कुटुंबियांशी आणि मित्रांशी असलेले संपर्क पूर्णपणे तोडले. १८८१ मध्ये टेलिग्राफ कंपनीमध्ये काम करून अनेक संप्रेषणात सुधारणा केली. टेलीफोन इम्प्लिफायरची नव्याने रचना केली, मात्र त्यावर स्वतःचे पेटंट घेतले नाही.

    घडल्या प्रसंगातून स्वतःला सावरत, इकडे-तिकडे काम केल्यानंतर, त्याला एडिसन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. एडिसन यांनी त्याला त्यांनी बनविलेला डायरेक्ट करंट जनरेटर (DC Generator) जास्त प्रभावी करून द्यायचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी त्याला सांगितले की, “जर तो या कामात यशस्वी झाला, तर त्याला ५० हजार डॉलर बक्षीस म्हणून मिळतील.” मिळणारे बक्षीस ही त्याच्यासाठी खूप मोठी रक्कम होती, म्हणून त्याने ते आव्हान स्वीकारले आणि तो कामाला लागला. दिवस रात्र एक करून, १८-१८ तास काम करून त्याने डायरेक्ट करंट जनरेटर अधिक प्रभावी करून दाखविला. एडिसन यांना हवे तसे बदल त्याने करून दाखवले. परंतु एडिसन यांनी आपला शब्द पाळला नाही. आणि पैसे द्यायला नकार दिला. झालेल्या अपमानामुळे त्याने एडिसनची कंपनी सोडली. त्यानंतर मग त्या दोघांमधील कलह संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरला. 

    त्यानंतर टेस्ला यांचा काही काळ खूप खडतर गेला. पैसे नसल्याने त्यांनी काही दिवस खड्डे खणण्याचे काम केले. त्यात त्यांना दिवसाला २ डॉलर्स मिळायचे. पण काही दिवसांनंतर त्यांचे नशीब पुन्हा उजळणार होते, कारण १८८७ मध्ये टेस्ला यांनी Induction Motor चा शोध लावला, जी AC म्हणजेच Alternating Current System वर काम करायची. ही मोटर इतकी शक्तिशाली होती की Electric मार्केटमध्ये आघाडीवर असलेले उद्योगपती जॉर्ज वेस्टिंगहाऊस यांचं लक्ष त्याकडे गेलं. टेस्ला यांनी जॉर्ज वेस्टिंगहाऊस यांच्यासोबत Alternating Current सिस्टीमवर चालणारी ही मोटर जगासमोर ठेवली. मात्र त्याही वेळी एडिसन यांनी त्याचा विरोध केला, कारण त्यावेळी संपूर्ण अमेरिकेत एडिसन यांची DC म्हणजेच Direct Current System कार्यरत होती. एडिसन टेस्ला वाद इतक्या विकोपाला गेला होता, की जेव्हा रेडियोच्या शोधामुळे मार्कोनी आणि टेस्ला यांच्यात भयंकर वाद निर्माण झाले त्यावेळी एडिसनने मार्कोनीला पाठिंबा दिला.

    शेवटी वयाच्या ८६व्या वर्षी आर्थिकदृष्ट्या पूर्ण बेजार झालेले निकोला टेस्ला न्यूयॉर्कच्या एका हॉटेलात 7 जानेवारी 1943 च्या रात्री झोपेतच कधी जग सोडून गेले हे सकाळपर्यंत कुणाला समजलं सुद्धा नाही! एडिसन, फॅरडे, मार्कोनी, आईनस्टाईन यांना जिवंतपणी जी प्रसिद्धी, जो मानसन्मान मिळाला तो टेस्ला यांना दुर्दैवाने मिळू शकला नाही. नाही म्हणायला या अवलियाच्या कामाची पोचपावती म्हणून, त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्ताने टाइम मासिकाने त्यांना front page वर स्थान दिले. यावेळी त्यांना ७० हून अधिक वैज्ञानिकांकडून कौतुकास्पद पत्रं आली. त्यावेळी त्यात आईनस्टाईन यांचेही पत्र होते. पण आज त्यांचा सन्मान म्हणून अमेरिकेमध्ये १० जुलै हा टेस्ला दिन म्हणून साजरा केला जातो. क्रोएशियातील १३०हून अधिक रस्त्यांना निकोला टेस्ला हे नाव दिले आहे. चंद्रावरील एका २६ किलोमीटर व्यासाच्या विवराला टेस्ला नाव देण्यात आले आहे. टेस्ला या इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीचं नाव सुद्धा त्यांच्या नावावरुनच ठेवलं आहे. मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये निर्माण झालेल्या एक लघुग्रहाचे नाव 2244 टेस्ला ठेवण्यात आले आहे आणि सर्बियाच्या १०० दिनारच्या नोटेवर टेस्ला यांचे चित्र आहे.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • Toyota ते Tesla अशा जगप्रसिद्ध ब्रँड्सची नावं कशी पडली?

    Toyota ते Tesla अशा जगप्रसिद्ध ब्रँड्सची नावं कशी पडली?

    कुठलंही नाव ठेवताना त्यामागे काही ना काही कारण किंवा अर्थ असतो. जगप्रसिद्ध कार ब्रँड्सच्या नावामध्येसुद्धा काही रंजक गोष्टी लपल्या आहेत. पाहुया अशाच काही कंपन्यांबाबत.

    BMW

    जर्मनीचा BMW हा ब्रँड लक्झरी कोर्समध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. सुरूवातीला ही कंपनी दक्षिण जर्मनीच्या बव्हेरिया (Bavaria) या ठिकाणी विमानांचे इंजिन निर्मिती करत होती. त्यावेळी कंपनीचं नाव Bayerische Motoren Werke असं होतं. त्याचंच संक्षिप्त नाव हे BMW म्हणून ओळखलं जातं.

    BMW

    Fiat

    फियाट ही इटलीची सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. कंपनीनं 1899 मध्ये ट्युरिन येथे वाहन उत्पादन सुरू केलं. या कारखान्याचं नाव इटालियन ऑटोमोबिल्स फॅक्टरी ट्युरिन या नावानं ओळखलं जातं. याला इटालियन भाषेत Fabbrica Italiana Automobili Torino या नावानं संबोधलं जायचं. याचंच संक्षिप्त रूप FIAT हे आहे. १९६०-८० अशी सलग २० वर्षं Fiatजगातील तिसरी सर्वात मोठी कार कंपनी होती. 

    Fiat

    Hyundai

    दक्षिण कोरियाची ह्युंदाई हीदेखील भारतीय बाजारपेठेत सर्वांच्या परिचयाची कंपनी आहे. ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कार कंपनी आहे. कोरियन भाषेत Hyundai चा अर्थ ‘वर्तमान युग’ असा आहे. यावरच कंपनीचं नाव Hyundai असं ठेवण्यात आलं. १९६८ साली चुंग जु-युंग यांनी कोरियातील सेऊलमध्ये कंपनीची स्थापना केली होती.

    Hyundai

    KIA

    किया मोटर्सनं नुकतीच भारतीय बाजारपेठेत एन्ट्री केली आहे. या कारचं नाव दक्षिण कोरियन भाषेतील दोन अक्षरं 起 (ki) और 亞 (a) यांनी बनलं आहे. यातील ‘कि’ चा अर्थ उदय होणं किंवा बाहेर येणं आणि ‘या’ चा अर्थ पूर्व अथवा एशिया असा आहे. कंपनीच्या नावाचा पूर्ण अर्थ Rising From the east असा वाचला जातो.

    KIA

    Rolls-Royce

    Rolls-Royce ही ब्रिटिश वाहन उत्पादक कंपनी आहे आणि अनेक वर्षांपासून लक्झरी कार उत्पादनांसाठी ओळखीची आहे. या ब्रँडचं नाव कंपनीच्या दोन संस्थापकांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. 1884 मध्ये फेडरिक हेनरी रॉयस (rederick Henry Royce) यांनी एका इलेक्ट्रिक/मेकॅनिकल बिझनेसची सुरूवात केली होती त्यानंतर 1904 मध्ये त्यांनी पहिली कार तयार केली. ती कार त्यांनी आपले मित्र चार्ल्स स्टिवर्ट रोल्स (Charles Stewart Rolls) यांना दाखवली. त्यांना ती आवडलीही. त्यानंतर त्यांनी भागीदारी करून Rolls-Royce ही कंपनी सुरू केली. त्यानंतर 1904 मध्ये त्यांनी पहिली कार तयार केली. ती कार त्यांनी आपले मित्र चार्ल्स स्टिवर्ट रोल्स (Charles Stewart Rolls) यांना दाखवली. त्यांना ती आवडलीही. त्यानंतर त्यांनी भागीदारी करून Rolls-Royce ही कंपनी सुरू केली.

    Rolls-Royce

    Mercedes-Benz

    ऑटो सेक्टरमधील जुना ब्रँड म्हणून Mercedes-Benz ची ओळख आहे. यामध्ये त्यांच्या संस्थापकांचं नाव आहे. परंतु हे अर्धसत्य आहे. कार्ल बेंझ हे या ब्रँडचे संस्थापक होते. परंतु Mercedes हे नाव ऑस्ट्रियाचे बिझनेसमन एमिल जेलिनेक यांच्या मुलीच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. याबाबत सविस्तर आपण नंतर चर्चा करू.

    Mercedes-Benz

    Tesla

    इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टेस्लाच्या तोडीस तोड देणारी सध्या दुसरी कंपनी नाही. या ब्रँडच्या नावामागेही एक गोष्ट आहे. याचं नाव सर्बियन शोधकर्ते निकोला टेस्ला यांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. त्यांनी 1884 च्या दरम्यान अमेरिकेत प्रवास केला होता. ते आपल्या उत्कृष्ट इलेक्ट्रिक वर्क्ससाठी प्रसिद्ध होते.

    Tesla

    Datsun

    Datsun ही निस्सान या कंपनीचाच एक ब्रँड आहे. यातील DAT हे नाव त्याचे फायनॅन्सर्स डेन, आओयामा आणि टेकूची यांच्या नावाच्या सुरूवातीच्या अक्षरापासून करण्यात आलं आहे. त्यानंतर कंपनीनं आपली छोटी कार SON च्या आधारावर याचं नाव DATSON हे ठेवलं. परंतु जपानी भाषेत SON चा अर्थ नुकसान असा होतो. म्हणून त्यानंतर त्यांनी या कारचं नाव DATSUN असं केलं.

    Datsun

    Ford

    फोर्ड या कंपनीची स्थापना 1914 मध्ये करणअयात आली. या कंपनीचं नाव त्यांचे संस्थापन Henry Ford यांच्या नावावर ठेवण्यात आलं. Henry Ford हे कंपनीच्या मालकाच्या रुपात जगातील सर्वात धनवान आणि परिचित लोकांपैकी एक होते.

    Ford

    Toyota

    या ब्रँडचंही नाव कंपनीचे संस्थापन Sakichi Toyoda यांच्या नावावर ठेवण्यात आलं. टोयोडा हे वाल बोलण्यात आणि आधिक सुलभ होण्यासाठी याच्या स्पेलिंगमध्ये थोडे बदल करून ते टोयोटा असं करण्यात आलं.

    Toyota

    Skoda

    स्कोडा ही कंपनीदेखील आपल्या प्रिमिअम कार्ससाठी प्रसिद्ध आहे. या ब्रँडचं नाव कंपनीचे संस्थापक Emil Škoda यांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे.

    Skoda

    Volkswagen

    या कंपनीचं मुख्यालय जर्मनीतील वोल्फ़्सबर्ग येथे आहे. १९३७ मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. अडॉल्फ हिटलरनं सामान्य लोकांच्या गरजा पुरवणारी एखादी कार तयार करण्याचे आदेश दिले होते. या दरम्यान अनेक कंपन्या कार उत्पादन करत होत्या. परंतु Beetle नं एक स्वस्त मॉडेल सादर केलं होतं आणि ते हिटलरला आवडलंही. यानंतर या कंपनीला Volkswagen हे नाव देण्यात आलं. Volks आणि wagen याचा जर्मन भाषेत अर्थ जनता आणि वाहन म्हणजेच जनतेचं वाहन असा होतो.

    Volkswagen
  • व्यवसाय : छोट्या गोष्टी, मोठा परिणाम

    व्यवसाय : छोट्या गोष्टी, मोठा परिणाम

    सध्या लोकांचा कल या बिझनेस किंवा व्यवसाय या क्षेत्रात वाढताना जास्त दिसतोय. व्यवसाय करून स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्यावर अनेकांचा भर दिसून येतो आहे. उद्योजक व्हा आणि आपली स्वप्नं पूर्ण करा किंवा मोठी स्वप्नं पूर्ण करायची असतील, तर उद्योजक व्हावे लागेल असे मोटिव्हेशनल डायलॉग वाचून सध्याची तरुणाई मोठ्या प्रमाणात उद्योगाकडे वळताना आपल्याला दिसत आहे.

    व्यवसाय किंवा उद्योग सुरु करताना तुमच्या पाठीशी अनुभवाची शिदोरी असणे गरजेचे आहे. आता हा अनुभव एकतर तुम्हाला तुमच्या घरातच परंपरेने चालत आलेल्या व्यवसायात मिळू शकतो किंवा त्यासाठी काही काळ एखाद्या ठिकाणी नोकरी करून तुम्ही तो मिळवू शकता. अनेक संस्थांमध्ये तुम्हाला व्यवसायाचे परिपूर्ण आणि शास्त्रशुद्ध शिक्षण देऊन तयार केले जाते. हे सर्व आजमावल्यानंतर तुम्ही नेमकी व्यवसायाला सुरुवात करता, तेव्हा मात्र तुम्हाला वेगळेच अनुभव येतात. एकाच आजारावरील औषधाची मात्रा सर्वांना एकसारखी लागू पडत नाही तसेच व्यवसाय किंवा उद्योग ठराविक अशा एकाच मार्गाने चालवता येत नाही. प्रत्येकाच्या अनुभवातून तो वेगवेगळ्या पद्धतीने फुलवता जरूर येतो. यासाठीच व्यवसाय करताना काही टिप्सची गरज पडते.

    या टिप्स म्हणजे कोणतं व्यवसाय पुराण नसून अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला तुमचा व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी आणि त्याची व्यापकता वाढवण्यासाठी कामी येऊ शकतात.

    व्यवसायाच्या अगदी सुरुवातीपासून बोलायचे झाल्यास व्यवसायाची सुरुवात करत असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा जो बिझनेस प्लॅन तयार करत असतो, तो बिझनेस प्लॅन इन डिटेल प्रत्येकासोबत शेअर करू नका. कदाचित तुमचा हा बिझनेस प्लॅन पूर्णपणे चोरीला जाऊ शकतो आणि त्याचा तुम्हाला नाहक मानसिक किंवा आर्थिक त्रास सहन करावा लागू शकतो. योग्य आणि भरवश्याच्या व्यक्तींना हा प्लॅन दाखवा आणि गरज असेल तर सुधारणा करा…

    सुरुवातीला येणाऱ्या अनुभवांमध्ये निरीक्षणास येणाऱ्या चुका लक्षात घेऊन त्या चुका पुन्हा पुन्हा होणार नाहीत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सुरुवातीला तुमच्या पदरात अपयश आले, तर त्याला अनुभव म्हणून पाठीशी घ्या आणि चुकांची पुनरावृत्ती न करता, यशस्वी व्यवसाय करण्यासाठी सातत्य ठेवा.

    एखादा व्यवसाय सुरु करत असताना आपल्या मित्रपरिवारामध्ये किंवा नातेवाईंकांमध्ये आपले अनेक हितचिंतक असतात ज्यांना आपल्यासोबत यायचे असते, अशा काही विश्वासू लोकांना भागीदार किंवा गुंतवणूकदार म्हणून सोबत घेऊ शकता. यामुळे तुमच्या व्यवसायाला अधिक बळ मिळू शकते. त्यासोबतच आपल्या व्यवसायात आपण एकटेच जर सगळ्या प्रकारची व्यवस्था आणि काम करत असू, तर त्यामुळे आपल्या व्यवसायाच्या प्रगतीची गती कमी होऊ शकते. एकाचवेळी व्यवसायाचा सर्वांगीण विकास घडवायचा असेल, तर एक ग्रुप म्हणून अनेक सभासदांना सोबत घेऊन तम्ही व्यवसाय सुरु ठेऊ शकता.

    एकत्र येऊन एक ग्रुप म्हणून काम करत असताना संघटनात्मक वृत्तीतून व्यवसायातले अनेक विभाग एकाचवेळी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळले जाऊ शकतात. व्यवसाय सुरु केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय सुरु केला आहे, तेथील स्थानिकांना व्यवसायात सामावून घ्या. यामुळे व्यवसायाच्या अनेक लहान मोठ्या गरजांसाठी स्थनिकांच्या मदतीमुळे कमीतकमी खर्चात अनेक प्रकारची कामं पूर्ण होऊ शकतात. व्यवसायाच्या सुरुवातीला आणखी एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे, ती म्हणजे पैशांची आगाऊ व्यवस्था. अगदी सुरुवातीच्या काळात तुम्हाला अपेक्षित असा व्यवसाय किंवा नफा नाही झाला, तर तूट भरून काढण्यासाठी गाठीशी पैशांची व्यवस्था असणे अत्यंत गरजेचे असते. व्यवसाय सुरु केल्यानंतर ज्या नावाने आपण व्यवसाय सुरु केला आहे त्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. व्यवसायाने थोडीशी गती मिळवल्यानंतर आपण त्याचा ऑनलाईन मार्केटिंगचा उत्तम प्लॅन बनवणे हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी एखाद्या वेबसाईटचा तसेच सोशल मीडियाचा आपण चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याकडे आपण कळत नकळत दुर्लक्ष करू शकतो ती गोष्ट म्हणजे कायदेशीर बाबी. व्यवसाय सुरु होताच स्थानिक आणि राज्य यांचे कर कशापद्धतीने आहेत ते समजून घेऊन त्याप्रमाणे सर्व तरतूद करणे गरजेचे आहे.

    तुमच्या उद्योगामध्ये तुम्ही काही कर्मचारी घेतले असतील, तर त्यांच्याकडे लक्ष देणे आणि त्यांच्या गरजा समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यांच्या जर काही समस्या असतील तर त्या आणि त्यांच्यासाठी योग्य व मूलभूत सुविधा देणे अत्यंत महत्वाचे आहे. अशा रीतीने अगदी सुरुवातीपासून व्यवसायाच्या लहान-लहान गोष्टींकडे अगदी बारकाईने लक्ष दिले तर व्यवसायाची प्रगती आणखी जोमाने नक्कीच होऊ शकते.

    बाकी तुम्हाला आजचा आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर लेखला like आणि share करा channel ला subscribe करा.

  • तुमचा बिझनेस हा नेहमी Updated असणं गरजेचं आहे.

    तुमचा बिझनेस हा नेहमी Updated असणं गरजेचं आहे.

    व्यवसाय! हा शब्द उच्चारला की संपूर्ण सोशल मीडिया पटकन डोळ्यासमोरून तरळून जातो. व्यवसाय असा करा, तसा करा, तुम्ही अमकं केलं पाहिजे, तमकं केलं पाहिजे. अशा सतरा गोष्टी आणि या गोष्टी सांगणारे अठरा गुरु.

    खरं सांगायचं झालं तर बिझनेस शिकवून किंवा वाचून शिकता येत नाही. तो करताना येणारे अनुभव आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जातात. अत्यंत समर्पित वृत्तीने झोकून देऊन बिझनेससाठी आपण मेहनत घेतली पाहिजे. बिझनेसची संपूर्ण रचना आणि व्यवस्था यावर नीट अभ्यास करून शुभारंभ केला की मागे वळून पाहण्याची गरज नाही.

    जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात बिझनेस सुरू करता, तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळात तुमचा चांगला जम बसलेला असतो. तुम्ही मन लावून आणि लक्ष देऊन सगळ्या गोष्टी करत असता, पण जेव्हा तुमचा बिझनेस ग्रो होतो आणि तुम्हाला सगळेजण एक यशस्वी बिझनेसमन म्हणून बघायला लागतात, तेव्हा नेमकं असं होतं की; आपल्या बिझनेसपेक्षा आपण बाकीच्या गोष्टींवर जास्त लक्ष देतो. ते म्हणतात ना, यश मिळवण्यापेक्षा यश टिकवणं फार जास्त अवघड असते. अगदी याच म्हणीप्रमाणे बिझनेसचा जम बसायला लागल्यानंतर आपले लक्ष विचलित होते आणि कळत नकळत आपण रोज वेगवेगळ्या चुका करायला लागतो. या चुका जेव्हा एक मर्यादा गाठतात, तेव्हा तुमच्या बिझनेसला उतरती कळा लागली म्हणून समजा.

    नेमकं याच विषयावर आपण या लेखामध्ये बोलणार आहोत. तुम्ही जेव्हा नुकताच बिझनेस सुरु केलेला असतो, तेव्हा तो तुमच्या ग्राहकांसाठीही नवीन असतो. अशावेळी तुमची आणि तुमच्या प्रॉडक्टची त्यांना आणि त्यांची तुम्हाला नुकतीच ओळख झालेली असते. सगळं नवीन नवीन असताना दोन्हीकडून समजुतदारपणा दाखवला जातो. पण जेव्हा हा सगळा नवा काळ ओसरून जातो, खरी मजा तेव्हा सुरु होते. बिझनेसमध्ये तोचतोचपणा येऊ नये यासाठी तुमची कसरत सुरु होते. त्यामधीलच एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रॉडक्टचा दर्जा कायम टिकवून ठेवणे.

    उदाहरण म्हणून आपण एक गोष्ट घेऊ. गोपाळला खाद्यपदार्थांचा भलताच नाद होता. एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ तो नेहमीच सर्वांसाठी बनवायचा. हळूहळू त्याचे हे पदार्थ त्याच्या नातेवाईकांमध्ये बरेच लोकप्रिय झाले आणि त्यासोबत गोपाळसुद्धा लोकप्रिय होऊ लागला. अशातच त्याच्या सर्व मित्रांनी त्याला इडलीचा व्यवसाय सुरु करण्याचा आग्रह केला. स्वतःचे हे नवे स्वप्न आणि थोडाफार अनुभव घेऊन इडलीच्या व्यवसायात गोपाळने एन्ट्री केली. बघता बघता त्याचा व्यवसाय त्याच्या हाताच्या उत्कृष्ट चवीमुळे सर्वदूर प्रसिद्ध झाला. ज्यामुळे त्याच्याकडे ग्राहकांची संख्या प्रचंड वाढू लागली आणि त्याच्यावर कामाचा ताण वाढू लागला. या वाढत्या गर्दीबरोबर त्याने त्याच्या सोबतीला कामासाठी कोणीच व्यक्ती ठेवली नसल्यामुळे इडलीच्या चवीवर, सर्व्हिसवर प्रचंड परिणाम होऊ लागला. ज्यामुळे त्याचा व्यवसाय पूर्णपणे मोडकळीस आला.

    गोपाळच्या या गोष्टीवरून आपण काय शिकलो? कळत नकळत चुका होत जातात, वेळीच त्या सुधारल्या जात नाहीत, त्याकडे पाहिलं जात नाही आणि या दुर्लक्षामुळे व्यवसाय कोलमडून पडू शकतो. म्हणजेच काय व्यवसायाची सुरुवात झाल्यांनतर एकदा जम बसला की त्याकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी गरजेनुसार जे बदल करणे महत्वाचे आहे, त्याकडे व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे.

    गोपाळचे उदाहरण घेतले, तर नेमक्या कोणत्या चुका झाल्या ते आपण पाहूया. जेव्हा तुमचा बिझनेस वेगाने प्रगती करत असतो, तेव्हा बिझनेसच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अनेक प्रकारचे बदल अपेक्षित असतात, हे बदल करत असताना बिझनेसच्या प्रॉडक्टवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते. गरजेनुसार मनुष्यबळ वाढवणे, कामाची रचना नीट लावणे, सर्व कामं शिस्तीने पूर्ण होत आहेत ना याकडे लक्ष देणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःहून वैयक्तिकपणे याकडे नीट लक्ष देणे. हे सगळं जमून आलं की, दर्जा टिकून राहतो आणि ग्राहकांचा उत्साहदेखील.

    थोडक्यात काय, तर तुमचा बिझनेस हा नेहमी updated असणे गरजेचे आहे. तुम्हाला काय वाटतं व्यावसायिक म्हणून किंवा ग्राहक म्हणून अजून कोणते बदल तुमच्या दृष्टीने करणे गरजेचे आहे. आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.