Category: रंजक-रोचक माहिती

  • संख्येने कमी मात्र अब्जाधीशांमध्ये अव्वल; काय आहे पारशी समाजाची गोष्ट?

    संख्येने कमी मात्र अब्जाधीशांमध्ये अव्वल; काय आहे पारशी समाजाची गोष्ट?

    पारशी समाजाचा उगम कसा झाला?

    आजच्या घडीला केवळ देशातच नाही, तर विदेशात देखील भारताचे नाव गाजवत असलेली कंपनी म्हणजे टाटा समूह किंवा Tata Group of Industries आणि या कंपनीचे सर्वेसर्वा रतन टाटा. मात्र तुम्हाला माहिती आहे का हे रतन टाटा देखील पारशीच आहेत. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आज भारतीय व्यावसायिक क्षेत्रात सर्वोच्च  कामगिरी बजावणारा हा पारशी समाज मूळचा भारतीय नाही. सध्याच्या काळात जो देश इराण म्हणून ओळखला जातो त्याचं जुनं नाव होतं पर्शिया आणि म्हणून तिथून उगम पावलेले लोक पारशी म्हणून ओळखले जातात. पारशी समाज इ.स पूर्व ७व्या शतकापासून या भागात पाहायला मिळू लागला. मात्र त्यानंतर इराणवर अरबी मुस्लिमांकडून आक्रमणं व्हायला सुरुवात झाली. या भयावह आक्रमणांना तोंड देणं पारशी समाजाला जमणारं नव्हतं म्हणूनच त्यांनी स्थलांतर करायला सुरुवात केली. 

    विविध दिशांना निघालेल्या या जहाजांपैकी कैक जहाजं भारतातील गुजरात राज्याच्या सीमेला येऊन धडकली. परदेशातून आलेल्या या समजाला स्थानिकांशी संवाद मात्र साधता येईना आणि स्थानिक देखील या लोकांबद्दल आणि त्यांच्या भाषेबद्दल अनभिज्ञ होते. परिणामी सर्व खबर स्थानिक राजाच्या कानी घालण्यात आली. आता या अनोळखी लोकांशी संवाद साधायचा तरी कसा या विचारात असलेल्या राजाला अचानक एक कल्पना सुचली, त्याने ताबडतोब एक भरलेला दुधाचा पेला पारशी समूहासमोर आणून ठेवला. या काठोकाठ भरलेल्या पेल्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, की राज्याची लोकं सामावून घेण्याची मर्यादा संपली आहे आणि यात आणखी लोकांना सामावून घेता येणार नाही. 

    राजाच्या या निर्णयावर हताश न होता पारशी लोकांनी संयम बाळगला आणि त्यानंतर पारशी लोकांकडून आलेलं उत्तर सर्वांना अचंबित करणारं होतं. पारशी लोकांनी त्याच दुधाने भरलेल्या पेल्यात काहीशी साखर मिसळली आणि तो पेला पुन्हा राजासमोर ठेवला. राजा या उत्तरावर खुश झाला, तुमच्या समाजामध्ये आम्ही साखरेप्रमाणे विरघळून जाऊ असा मतितार्थ समोर ठेऊन पारशी लोकांनी त्यांच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर या स्वभावाचं उदाहरण प्रस्तुत केलं आणि  सर्वांना क्षणार्धात जिंकूनही घेतलं. बुद्धिमान, हुशार, मेहनती आणि शेतीचा अनुभव असलेल्या पारशी समाजाने दिलेल्या शब्दाचं  पालन केलं. ते राजाच्या छत्रछायेत आनंदाने राहू लागले  मात्र काही काळानंतर आलेल्या दुष्काळाने त्यांना देशाटन करायला भाग पडलं. त्याकाळात आपल्या भारतात विविध राज्यांमध्ये आपापसात युद्धं व्हायची, मात्र पारशी लोकांनी कधीही अशा युद्धांमध्ये भाग घेतला नाही, याउलट नेहमीच सर्व राज्यांशी जुळवून घेत व्यवसाय सुरु ठेवला. 

    45037151 2305641402992949 1628658427641200640 n 1

    इंग्रजांची सत्ता आणि पारशी समाज

    पारशी समाज भारतात मुख्यत्वेकरून दलालीचा व्यवसाय (Brokerage business) करायचा. सर्वांशी जुळवून घेत ते व्यापार वाढवतच होते आणि अशातच व्यापाराच्या उद्देशाने काही मत्सरी पाऊलं भारतात उमटली. साधारण १६०८ साली इंग्रजांनी मसाल्याच्या व्यापाराचे निमित्त साधून भारतीय बाजारात आणि भूमीत प्रवेश मिळवला. भारताचे वैभव पाहून त्यांचे डोळेच दिपले आणि या संधीसाधू माणसांनी भारतावर राज्य करण्याचा निर्णय पक्का केला. काही स्वकीयांच्या धूर्त, फितूर आणि लालची स्वभावामुळे ते यशस्वी देखील झाले. इंग्रजांच्या जुलमी राजवटीखाली भारतीय जनता होरपळून निघत होती, मात्र पारशी समाजाने या संधीचं सोनं करून दाखवलं. सर्वात अगोदर पारशी लोकांनी इंग्रजांची भाषा शिकून घेतली, कारण भाषा हीच संवाद साधण्याचं महत्वाचं साधन आहे. पारशी लोकांनी इंग्रजी भाषेचा अभ्यास केल्याने इंग्रजांना देखील स्थानिकांशी संवाद साधण्यासाठी मदत मिळू लागली. इंग्रजी राजवटीत पारशी लोकं इंग्रजांकडे नोकरी करायचे आणि म्हणूनच त्याकाळात अनेक पारशी लोकं सरकारी कर्मचारी म्हणून पाहायला मिळत. पारशी लोकांच्या या स्वभावगुणांमुळे त्यांनी इंग्रजी राजवटीचा केंद्रबिंदू असलेल्या आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरलेला मुंबई/बॉम्बे मध्ये जम बसवला. 

    Cover2 1

    भारतात इंग्रजी सत्ता असताना घडलेला एक महत्वाचा प्रसंग म्हणजे चीन आणि युरोप यांमध्ये वाढलेला व्यापार. चीन युरोपला मोठ्या प्रमाणात चिनी मातीची भांडी, चहा आणि रेशीम पाठवायचा आणि युरोपकडून देखील या वस्तूंसाठी मागणी वाढत होती. दुसऱ्या बाजूला चीन आणि युरोप यांमधले वृद्धिंगत होणारे संबंध इंग्रजांना रुचणारे नव्हते आणि म्हणूनच त्यांनी पारशी लोकांच्या मदतीने चीनमध्ये अफूची निर्यात सुरु केली. येणाऱ्या  प्रत्येक दिवसासोबत चीनमधून अफूची मागणी वाढू लागली, एक वेळ तर अशी आली होती की चीनमध्ये प्रत्येक ४ पैकी ३ माणसं अफूच्या आहारी गेली होती. अफूच्या व्यापाराने इंग्रजांना काय फायदा झाला? एकतर चीनमधील लोकं अफूच्या नशेत असल्याने युरोपसोबतचा व्यापार कमी झाला आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या निर्यातीमुळे धानाचे पेटारे भरू लागले. 

    पारशी समाज आणि आज

    स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच पारशी समाज भारतात उत्तमरीत्या त्यांचा जम बसवून आहे. इंग्रजांची राजवट असताना देखील त्यांनी अनेक सन्मानित पदं सांभाळली होती. पारशी लोकं त्याकाळी अनेक जहाजांचे मालक होते, डॉक्टर होते आणि सरकारी कचेऱ्यांमध्ये काम देखील करायचे. पारशी लोकांनी जरी भरपूर पैसा कमावला असला तरीही आपण कोणत्या परिस्थितीमधून इथवर आलोय याची जाण त्यांना कायमच होती आणि म्हणूनच कमावलेल्या पैशांमधून त्यांनी मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी हॉस्पिटल्स आणि शैक्षणिक संस्थांची निर्मिती करत समाजाप्रती नेहमीच आपले कर्तव्य निभावलं. स्वातंत्र्योत्तर काळातही आपण जर का यांची संख्या मोजायला गेलो तर ती ०.००५ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही, मात्र भारतीय अब्जाधीशांच्या यादीत तीन ते पाच नावं ही पारशी समाजातील (टाटा, गोदरेज, पूनावाला, मिस्त्री, वाडिया) आहेत.

    एअरलाईन्स, सॉफ्टवेअर, कन्स्ट्रक्शन, फूड, हेल्थ यांसारख्या एक ना अनेक क्षेत्रांमध्ये पारशी समाज अव्वल कामगिरी बजावतोय. देशाची सुरक्षा, मनोरंजन, खेळ किंवा वैज्ञानिक क्षेत्राची समाजातील प्रत्येक क्षेत्रात या लोकांनी नाव कमावलं असल्याने व्यवसायातून झालेली सुरुवात आज अनेक दिशांना पसरलेली आहे. पारशी लोकांची संख्या अत्यंत नगण्य म्हणजे १४२ कोटींच्या देशात फक्त ५७००० असली तरीही सैन्य, मनोरंजन, व्यापार, विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये पारशी नाव कमावताना दिसतात. समाज थोडा असला तरी कर्तबगारांची संख्या खूप मोठी आहे. फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ, जमशेदजी टाटा, रतन टाटा, होमी भाभा, सायरस पुनावाला, आदी गोदरेज, बोमन इराणी अशी अनेक नावं या समाजाच्या कर्तृत्वाचे उदाहरण प्रस्तुत करतात.

    fb52ba bfc2bb9b6d884b34bcd6067456d2940fmv2

    आपण पारशी समाजाकडून काय शिकलो?

    एखादी गोष्ट वाचल्यानंतर आपण त्यातून काय शिकलो याची जाणीव झाली पाहिजे. पारशी समाज हा हातावर मोजण्याएवढा जरी असला तरीही त्यांच्या शांत आणि मेहनती स्वभावामुळे ते अनेकांवर भारी ठरले आहेत. कदाचित त्यांना जन्मजात हा स्वभाव मिळालाही असेल, मात्र तरीही समोर आलेला प्रसंग कशाप्रकारे आपल्या फायद्याचा ठरू शकतो याचे धडे आपण पारशी समाजाकडून गिरवले पाहिजेत. अनेकवेळा फटकळ बोलण्यामुळे मह्त्वाची कामं होता-होता राहतात, मात्र या समाजात जर का टिकून राहायचं असेल आणि चार-चौघांमध्ये वावरायचं असेल तर तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवता आला पाहिजे. सर्वात शेवटी पारशी समाजाकडून शिकण्याची गोष्ट म्हणजे मेहनती स्वभाव, परिस्थिती कितीही बिकट असली तरीही ती केवळ मेहनतीच्या जोरावर बदल घडवता येतात. 

    आणखीन वाचा:

  • दक्षिण भारतात देखील बोलली जाते मराठी. ‘दक्षिणी मराठी’ मागील मराठा साम्राजाचा गौरवशाली इतिहास

    दक्षिण भारतात देखील बोलली जाते मराठी. ‘दक्षिणी मराठी’ मागील मराठा साम्राजाचा गौरवशाली इतिहास

    पुढे मुघल आणि ब्रिटिशांचे झालेले आक्रमण यामुळे भाषेची लिपी बदलली तरीही प्रामुख्याने भारतीय भाषांचा पाया हा बऱ्यापैकी देवनागरी लिपीतच आढळतो. हिंदी जरी आपली राष्ट्रभाषा असली तरीही सर्व राज्य भाषा या-ना-त्या प्रकारे हिंदीसोबत जोडल्या गेल्या आहेत, तरीही दक्षिणी भाषा जसं की तामिळ, तेलगू, मल्याळम यांची लिपी देवनागरीपेक्षा वेगळी मात्र परस्परांशी संबंधित आढळते. आज आपण या विविध भाषांबद्दल नाही, तर केवळ आपल्या मराठी भाषेबद्दल बोलणार आहोत.

    जर का आम्ही तुम्हाला विचारलं मराठी भाषा कोणत्या राज्यात बोलली जाते? तर तुम्ही साहजिकपणे महाराष्ट्र असंच म्हणाल. बरोबर? किंवा अधिकाधिक त्यात शेजारील राज्य गोव्याचं नाव जोडलं जाईल. पण जर का आम्ही म्हणालो की महाराष्ट्र आणि गोव्याव्यतिरिक्त मराठी भाषा आणखी एका राज्यात देखील बोलली जाते तर? आणि आश्चर्याची बाब म्हणजे हे राज्य भारताच्या दक्षिणी भागात वसलेलं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत मराठी साम्राज्याने विस्तार करायला सुरुवात केली होती, पुढे छत्रपती संभाजीराजे, ताराराणी आणि पेशव्यांच्या कारकिर्दीत मराठी साम्राज्य बहरलं, खुललं आणि वाढलं. इतिहासकार असंही सांगतात की नानासाहेब पेशवे राज्य सांभाळत असताना रघुनाथराव पेशव्यांनी थेट अटकेपार मराठी पताका फडकावली होती.

    Maratha palace Tanjore
    तंजावर मराठा पॅलेस

    मराठी भाषा दक्षिणेत कशी?

    दक्षिणेतील प्रसिद्ध राज्य म्हणजेच तामिळनाडूमध्ये तंजावर नावाच्या शहरात आजही लोकं मराठी बोलताना आढळतात. तुम्ही जर का या भाषिकांशी संवाद साधला तर लक्ष्यात येईल की या तंजावरच्या मराठी भाषेचे उच्चार हे तामिळ भाषेशी जुळणारे आहेत. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झालाच असेल की दक्षिण भागात मराठीचा उगम झाला तरी कुठून? तर इ.स. १६४० च्या आसपास छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे महाराष्ट्रातून कर्नाटकातील बेंगळुरू येथे स्थायिक झाले. ते इ.स. १६६४ मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत तेथेच राहिले. त्यांच्या आगमनामुळे तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील कन्नड आणि तमिळ भाषिक प्रदेशात मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा प्रसार होऊ लागला. अनेक मराठी घराणी कर्नाटकात स्थायिक झाली आणि तेथील समाजात मिसळली. त्यामुळे या प्रदेशात मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा प्रभाव वाढू लागला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू म्हणजेच व्यंकोजी राजे भोसले यांनी दक्षिणेत मराठी राज्याचा विस्तार केला. कर्नाटक राज्यापासून सुरु झालेली ही मोहीम दक्षिणेत चांगलीच रंगली. वर्ष १६७४ मध्ये व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावरचा राजा अळगिरी नायक याचा पराभव करून दक्षिणेत मराठी राज्याचा झेंडा रोवला.

    WhatsApp Image 2024 07 20 at 4.08.55 PM

    तामिळनाडूमध्ये व्यंकोजी राजांचं राज्य सुरु झाल्यानंतर मराठी लोकांना महाराष्ट्राच्या भूमीमधून दक्षिणेत आणून वसवण्यात आलं, यामागचा केवळ उद्देश मराठीचा विस्तार असाच होता. व्यंकोजीराजांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र शहाजीराजे यांनी तब्बल अठ्ठावीस वर्षे राज्यकारभार सांभाळला आणि दक्षिणेत दबदबा निर्माण केला. असं म्हणतात दक्षिणेत मराठ्यांनी वर्ष १८५५ पर्यंत राज्य केलं आणि या संपूर्ण कार्यकाळात दक्षिण भारतात १२ विविध राजांनी कारभाराची धुरा सांभाळली होती. इतिहासातून मिळालेली माहिती असेही दर्शवते की या कैक दशकांच्या कालावधीत इथं अठरा पगड जातींमधली पाच लाख कुटुंबं वसवण्यात आली होती, या कुटुंबांच्या मराठी भाषेवर आजूबाजूच्या वातावरणाचा आणि दक्षिणी बोलीभाषेचा प्रभाव पडल्याने तंजावर मराठी भाषा उदयास आली.

    काही वर्षानंतर या कुटुंबांनी शिक्षण, काम आणि व्यवसायानिमित्त आजूबाजूच्या ठिकाणी ये जा सुरु केली आणि इतर भाषांचा देखील तंजावरच्या मराठीवर प्रभाव दिसून येऊ लागला. दक्षिणेतील मराठी राज्य जरी वर्ष १८५५ मध्ये संपलं असलं तरी आजही येथे मराठी संस्कृती जपली आणि जगली जाते. महाराष्ट्रातील खास सण जसे की गुढीपाडवा, गणेश चतुर्थी, संक्रांत असे विविध सण-उत्सव आजच्या घडीला देखील तंजावरमध्ये साजरे केलेले दिसतात. कदाचित हे वाचून तुम्ही आश्चर्याने थक्क व्हाल, पण तंजावरच्या या भागात स्थानिकांकडून अंबाबाईचा गोंधळ घातला जातो. यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की तंजावरच्या या भागात आजही मराठी भाषाच नाही, तर मराठी संस्कृती आणि मराठीचा संपन्न वारसा देखील जपला जातोय.

    दक्षिण भारतात पसरलेल्या मराठी भाषिकांनी आपल्या बोलीचे वेगळेपण आणि समृद्धी जपण्यासाठी आणि महाराष्ट्रासह इतरत्र राहणाऱ्या मराठी भाषिकांमध्ये त्याची ओळख करून देण्यासाठी दक्षिणी मराठी नावाचे नवीन YouTube चॅनेल सुरू केले आहे. हे चॅनेल दक्षिणी मराठी बोलीचे वैशिष्ट्ये, त्यातील शब्दसंग्रह, व्याकरण आणि संस्कृती यांच्यावर प्रकाश टाकण्यासाठी समर्पित आहे.

    असं म्हणतात आपल्याकडे अवघ्या काही किलोमीटर्सवर भाषा बदलत जाते आणि म्हणूनच उत्तर, दक्षिण आणि मध्य महाराष्ट्राच्या मराठी भाषेत बऱ्यापैकी तफावत दिसून येते. इथे बोलले जाणारे शब्द आणि आणि त्यांचे उच्चर यांमध्ये विविधता आढळते. महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी आणि कोकणपट्टी तसेच गोव्यात बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेवर कोकणी आणि मालवणी भाषेचा प्रभाव दिसून येतो. ही विविधता आपली ओळख आहे, मात्र तरीही आपण बोलत असलेलीच भाषा शुद्ध हे इतरांच्या मनावर बिंबवणायचा आपला प्रयत्न काही सुटत नाहीये.

    कळत-नकळतपणे आपण गावातील मराठी भाषिकांना अशुद्ध उच्चार करणारी लोकं म्हणून हिणवतो, त्यांची भाषा सुधारण्याचा प्रयत्न करतो. पुस्तकी भाषा आणि बोलीभाषा यांमधील फरकच आपल्याला समजून घ्यायचा नाही, कार्यालयीन किंवा पुस्तकी भाषा ही बऱ्यापैकी व्याकरणावर अवलंबून असते, मात्र बोलीभाषेला खरोखर अशी बंधनं असतात का? कदाचित ती भाषा ज्या चौकटीत जन्माला येते आणि वावरते त्याच वातावरणाचे संस्कार झाल्यामुळे शब्दोच्चार बदलत असावेत. आपल्या घराघरांमध्ये बोलली जाणारी ही आपली बोलीभाषा आहे आणि त्याला व्याकरणाचं बंधन लावलं जाऊ शकत नाही म्हणूनच आपल्यासारख्या सुशिक्षित माणसांना ही जाणीव असली पाहिजे की कोणतीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते. भाषेचा गोडवा हा ती भाषा जपण्यात आणि जगण्यात आहे. महाराष्ट्र राज्यापासून कैक दूर असलेल्या तंजावरकडून हीच गोष्ट शिकण्यासारखी आहे. तंजावरमध्ये मराठी साम्राज्य नसताना आजही जपला जाणारा हाच भाषेचा गोडवा मराठी माणसाचे मराठी भाषेप्रती प्रेम म्हणावे लागेल.

    तंजावरची विशेषता

    तंजावरच्या मध्यभागी शिवगंगा दुर्ग पाहायला मिळतो आणि त्याच्या मध्यभागी चोल राज्यकर्त्यांनी बांधलेलं बृहदेश्वर मंदिर स्थित आहे. इतिहासकार असेही सांगतात की या बृहदेश्वर मंदिराच्या उभारणीत मराठ्यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे. कदाचित म्हणूनच आवारात असलेल्या गणपती मंदिरामध्ये शहाजीराजे, शिवाजीराजे, व्यंकोजीराजे आणि इतर मराठी शूर राजांच्या आयुष्यातील महत्वाचे क्षण आणि तारखा यांचा ठासून उल्लेख करणारा शिलालेख आढळतो.

    आणखी वाचा:

  • एकदम फिट झिरोधाच्या मालकाला ह्रदयविकाराचा झटका, काय आहेत यापासून स्वतःला वाचवण्याचे उपाय? डॉक्टर म्हणतात.

    एकदम फिट झिरोधाच्या मालकाला ह्रदयविकाराचा झटका, काय आहेत यापासून स्वतःला वाचवण्याचे उपाय? डॉक्टर म्हणतात.

    अश्नीर ग्रोव्हरचा सल्ला

    शार्क टँकचा माजी परीक्षक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) याने नितीन कामथ (Nithin Kamath) यांना आपल्या तब्येतीची काळजी आणि ब्रेक घेण्यास सांगितले आहे. त्याने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत म्हटले की, “यार, काळजी घे. असे होऊ शकते की, तुझ्यावर तुझ्या वडिलांच्या निधनाचा मोठा परिणाम झाला आहे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्यावरही खूप परिणाम झाला होता. एक दिवस मी पडलो होतो. एक ब्रेक घेऊन टाक.”

    image

    डॉक्टर काय सांगतात?

    डॉक्टर मनन वोरा यांनी त्यांच्या लिंक्डइन अकाऊंटवरून नितीन यांच्या स्ट्रोकविषयी भाष्य केले. ते म्हणतात की, एक डॉक्टर म्हणून हे संकेत देते की, १८ ते ५५ वयातील व्यक्तींमध्ये ही प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. तसेच, त्यांनी हा स्ट्रोक येण्यामागील शक्यताही सांगितल्या आहेत. जेणेकरून तुम्ही त्याची काळजी घेऊ शकता.

    १. तीव्र ताण

    भारतात अति-तणावाचे वातावरण असणे हे सामान्य आहे, परंतु कॉर्टिसॉलसारखे भारदस्त तणाव संप्रेरक रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकतात. तसेच, जळजळ होण्यास हातभार लावू शकतात, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.

    6f8c424b 3e22 49a2 9422 2fd41eb82be5.jpg

    २. झोपेची कमतरता

    सतत झोप न लागल्यामुळे सामान्य हार्मोनल संतुलन बिघडू शकते. तसेच, रक्तदाबही वाढू शकतो, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य आणि स्ट्रोकचा धोका संभवतो.

    b3de61fe ee85 4288 901b 5bf674a0a901.jpg

    ३. भावनिक आघात

    नितीन यांनी अलीकडेच त्यांचे वडील गमावले होते, ज्यामुळे कदाचित ते कामावर परत जाण्यापूर्वी या गोष्टीतून सावरले नसतील. अचानक भावनिक धक्का किंवा तणाव देखील हृदयविकाराच्या झटक्यास कारणीभूत ठरू शकतो.

    7c89183c 9bfa 408e 84d1 16543b048cb8.jpg

    ४. अतिविचार

    व्यायाम करणे सामान्यतः फायदेशीर असले, तरीही जास्त व्यायाम करणे आणि स्वतःवर मर्यादेपेक्षा जास्त जोर देणे, यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर ताण येऊ शकतो. यामुळेच स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

    c6849d17 5094 4da6 9fdb 9f5468a9a6c9.jpg

    ५. पाण्याची कमतरता (Dehydration)

    पाण्याच्या कमतरतेमुळे तुमचे रक्त घट्ट होते आणि तुमच्या रक्तवाहिन्या संकुचित होतात, ज्यामुळे तुमच्या हृदयावर कालांतराने ताण येऊ शकतो.

    e9248c88 60df 4e23 bf60 1d891ec918d4.jpg

    डॉक्टर वोरा पुढे सांगतात की, नितीन यांच्यासोबत जे घडलं, ते कुणासोबतही घडू शकतं, परंतु लक्षणं लक्षात घेऊन आणि लगेच कृती करून तुम्ही तात्काळ बरे होऊ शकता. त्यामुळे तुम्ही स्ट्रोकची लक्षणे FAST या शब्दाद्वारे समजू शकता.

    F: Face dropping (झुकलेला चेहरा)
    A: Arm weakness (हाताला कमजोरी जाणवणे)
    S: Speech difficulty (बोलताना अडचण होणे)
    T: Time to call 102 (१०२ या क्रमांकावर कॉल करणे)

  • बिल गेट्स यांना चहा पाजून जगाचे लक्ष वेधणारा Dolly Chaiwala आहे तरी कोण? जगात रंगलीय चर्चा

    बिल गेट्स यांना चहा पाजून जगाचे लक्ष वेधणारा Dolly Chaiwala आहे तरी कोण? जगात रंगलीय चर्चा

    ‘डॉली चायवाला’ (Dolly Chaiwala) हा बहाद्दर त्याच्या चहा बनवण्याच्या अनोख्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या स्टॉलचे नाव ‘डॉली की टपरी’ (Dolly Ki Tapri) असे आहे. याच नावाने त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अनेक भारतीयांसोबतच परदेशी व्यक्तीही डॉली चायवालासोबत व्लॉग बनवताना दिसतात. मात्र, यावेळी त्याच्या चर्चेत येण्याचं कारण जरा वेगळं आहे.

    डॉली चायवाला याने कुठल्याही साध्या सुध्या नाही, तर चक्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामील असलेले अब्जपती आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांना चहा पाजला आहे. “वन चाय प्लीज” म्हणत बिल गेट्स ‘डॉली की टपरी’वर चहा पिण्यासाठी हजर झाले होते आणि डॉलीचा चहा पिऊन तेदेखील त्याचे दीवाने झाले. खुद्द बिल गेट्स यांनी हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्ही भारतात प्रत्येक ठिकाणी इनोव्हेशन पाहू शकता. अगदी साधा चहा बनवतानाही.”

    44 1

    आता हा व्हिडिओ जगभरात आगीसारखा व्हायरल होत आहे. या व्हिडिओला ६ कोटींहून अधिक व्ह्यूज आणि ४५ लाखांहून अधिक लाईक्सही मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे, ११ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओवर कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

    कोण आहे डॉली चायवाला?

    माध्यमांतील वृत्तांनुसार, डॉली चायवाला नागपूरच्या सदर भागातील वीसीए स्टेडिअमजवळ ‘डॉली की टपरी’ नावाने चहाचा स्टॉल चालवतो. डॉली चायवाला सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे. नागपूरमध्ये लोक दूरहून या प्रसिद्ध चहावाल्याच्या स्टॉलवर चहा पिण्यासाठी हजेरी लावतात. डॉली चायवाल्याविषयी बोलायचं झालंं, तर त्याचा सोशल मीडियावर मोठा वावर आहे. तो आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलने चहा विकून सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. त्याचे इंस्टाग्रामवर १० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

    डॉली चायवाला एवढा प्रसिद्ध आहे तरी का?

    चहाच्या दुनियेत डॉली चायवाला हे नाव आता छोटे राहिले नाहीये. त्याच्या अनोख्या पेहरावासोबतच त्याच्या चहा देण्याच्या टेक्निकमुळे त्याची तुलना चक्क आयकॉनिक, दिग्गज हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपशी केली जाते. त्याच्या ट्रेंडी सेटअप आणि चहा बनवण्याच्या आकर्षक पद्धतीमुळे तो एक सेन्सेशन बनला आहे. स्टायलिश ग्लासेसमध्ये चहा देण्यापासून ते सिगारेट आणि टॉफी क्रिएटिव्ह पद्धतीने देण्यापर्यंत, डॉलीची टपरी नेहमीच चहाच्या शौकिनांनी गजबजलेली असते.

    लोकांच्या प्रतिक्रिया

    जेव्हा डॉली चायवाल्याचा बिल गेट्स यांच्यासोबतचा व्हिडिओ जसा व्हायरल झाला, तसा अनेक लोकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेनासा झाला. अनेकांनी व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या की, “मला वाटते की, हे एआय जनरेटेड आहे.” एकाने असेही म्हटले की, “हा डीपफेक आहे का?” दुसऱ्या एकाने कमेंट करत म्हटले की, “सर, तुमचे बिल ५६७८९० डॉलर्स इतके झाले.” आणखी एकाने कमेंट केली की, “डॉली चायवाला नाही, तर इंडियन जॅक स्पॅरो.”

    बिल गेट्स यांचा भारत दौरा

    खरं तर, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी २८ फेब्रुवारी रोजी हैदराबादमध्ये मायक्रोसॉफ्टच्या भारत विकास केंद्राचा दौरा केला होता. याच ठिकाणी हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ शूट करण्यासाठी डॉली चायवाल्याला बोलावण्यात आले होते. डॉलीचा भाऊ शैलेश याने माध्यमांशी बोलताना या गोष्टीचा खुलासा केला. शैलेशनुसार, डॉलीला कोलॅबरेशन व्हिडिओ शूट करण्यासाठी बिल गेट्स यांच्या ऑफिसकडून बोलावण्यात आले होते. शैलेशने हा संपूर्ण नागपूरसाठी गौरवाचा क्षण असल्याचे सांगितले.

  • चेष्टा-मस्करीत सुरू झालेला प्लॅटफॉर्म कसा बनला जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया?

    चेष्टा-मस्करीत सुरू झालेला प्लॅटफॉर्म कसा बनला जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया?

    झुक्या भाऊंनी फेसबुकचा संसार कसा उभारला? जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक बद्दल.

    Facebook Journey:

    The History of Facebook and How It Was started

    लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत सर्वजण याचा वापर करताना दिसतात. जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या यादीत फेसबुकची एकहाती सत्ता आहे. व्हॉट्सअप (२०० कोटी) आणि इंस्टाग्राम (२०० कोटी) हे दोन्ही मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मही फेसबुकचा भाग आहेत. फेसबुकविषयी चर्चा करण्यामागील कारण असे की, आजच्याच दिवशी म्हणजेच ४ फेब्रुवारी रोजी फेसबुकची स्थापना झाली होती. जगभरात पसरलेल्या फेसबुकची सुरुवात नेमकी झाली तरी कशी, याचाच आढावा आपण आजच्या या लेखातून घेणार आहोत.

    फेसबुक हे एक असे समाजमाध्यम आहे, जे प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलं आहे. प्रत्येक वयाच्या व्यक्तीला आपलेसे करणाऱ्या या फेसबुकची सुरुवात होण्याची कहाणी खूपच रंजक आहे. खरं तर, २००३ मध्ये मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) हा पठ्ठ्या हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थ्याच्या भूमिकेत होता. मार्कचा सुरुवातीपासूनच कम्प्यूटर प्रोग्रॅमिंगमध्ये हातखंडा होता. २००३ मध्ये मार्कने हार्वर्ड स्टुडंट डिरेक्टरी सर्व्हर हॅक करून त्यातील सर्व प्रोफाईल गोळा करून फेसमास नावाची नवीन साईट तयार केली होती.

    या मजेशीर प्लॅटफॉर्मवर सुंदर तरुणींचे फोटो लावले जात होते. तसेच, यांपैकी सर्वात आकर्षक कोण आहे? याचं मत घेतलं जायचं. याबद्दलची माहिती हार्वर्डच्या व्यवस्थापनाला समजताच, त्यांनी तातडीने ही वेबसाईट बंद करून टाकली. यानंतर २००४ साल उजाडतं. वर्षाच्या सुरुवातीला मार्क झुकरबर्गने त्याच्या तीन सहकाऱ्यांच्या (डस्टिन मोस्कोवीट्ज, एड्युर्डो सॅव्हेरिन आणि ख्रिस ह्यूज) मदतीने भागीदारी करून फेब्रुवारी २००४मध्ये फेसबुक डॉट कॉमची सुरुवात केली.

    अशी झाली Facebook ची सुरुवात

    फेसबुकची सुरुवात ४ फेब्रुवारी, २००४ रोजी झाली. खरं तर, हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपल्या काही मित्रांसोबत कॉलेजात एकमेकांशी जोडण्यासाठी फेसबुक बनवले होते. लाँचिंगवेळी त्याने याचे नाव ‘द फेसबुक’ ठेवले होते. मात्र, नंतर द काढून फक्त फेसबुक असे नाव देण्यात आले. फेसबुकला आज २० वर्षे पूर्ण होत आहेत.

    The History of Facebook and How It Was started

    Facebook ने लाँच होताच गाठले यशाचे शिखर

    विशीतच झाला अब्जपती

    कीर्ती लहान, मूर्ती महान ही म्हण खरी करून दाखवण्याचं धाडस झुकरबर्गने केले. फेसबुकचे युजर्स दिवसेंदिवस वाढत गेले आणि ही जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट म्हणून उदयास आली. फेसबुकची वाढती लोकप्रियता पाहून यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचीही रांगच लागली. यामुळे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग वयाच्या अवघ्या २३ वर्षांच्या वयात अब्जपतींच्या यादीत सामील झाला. फेसबुकच्या लोकप्रियतेचा हा प्रवास अजूनही सुरूच आहे.

    The History of Facebook and How It Was started

    Facebook मध्ये मोठा बदल

    तब्बल १८ वर्षे फेसबुक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीला २९ ऑक्टोबर, २०२१ रोजी वेगळे नाव मिळाले. मार्क झुकरबर्गने पॅरेंट कंपनीचे नाव बदलून मेटा (Meta) ठेवले. याचे उद्दिष्ट हे होते की, कंपनी मेटाव्हर्सच्या निर्माणावर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करू इच्छित होती. मेटाव्हर्स शब्दाचा वापर डिजिटल जगात व्हर्च्युअल आणि इंटरऍक्टिव्ह स्पेस समजून घेण्यासाठी केला जातो. मेटाव्हर्स खरं तर एक व्हर्च्युअल जग आहे, जिथे एक व्यक्ती शारीरिकरीत्या उपस्थित नसूनही उपस्थित राहू शकतो. मेटाच्या अंतर्गत येणाऱ्या फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम यांची नावे तीच राहतील, जी आधीपासून आहेत. झुकरबर्गच्या मते, कंपनीचे नाव बदलल्यानंतरही आमचे ध्येय लोकांना एकत्र आणणेच राहील.

  • भारताला पिनकोड सिस्टिम दिलीय या मराठी माणसाने…जाणून घ्या हा पिनकोड वाचायचा कसा?

    भारताला पिनकोड सिस्टिम दिलीय या मराठी माणसाने…जाणून घ्या हा पिनकोड वाचायचा कसा?

    168009552 1035126027014841 7473418956269391274 n

    आता तुम्ही सगळ्यांनी पिनकोड तर पाहिलाच असेल. पाहिलाच असेल काय, कित्येकदा लिहिला पण असेलच की हो. पण कधी विचार केलाय, ही भानगड कशी आणि का अस्तित्वात आली याचा? किंवा याच्या मागं नक्की कुणाचं सुपीक डोकं असेल याचा? ही आयडियाची कल्पना आहे श्रीराम वेलणकर या मराठमोळ्या माणसाची. यांनीच पूर्ण भारताला पिनकोडची देणगी दिलीय बरं…

    पोस्ट आणि टेलीग्राफ खात्यात नोकरीत असताना श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी त्यावर उपाय म्हणून १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली. त्यामुळेच श्रीराम भिकाजी वेलणकर यांना ‘पिनकोड’ प्रणालीचे जनक म्हणतात. या पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झाली हे खरं.

    ■ पिनकोडची रचना अशी आहे.

    पूर्ण देश ९ झोन मध्ये विभागला गेला आहे. यातले ८ झोन हे भौगोलिक विभाग आहेत, तर एक मिलिट्रीसाठी वापरला जातो.

    आता पाहूयात हा पिनकोड वाचायचा कसा..

    यातले पहिले दोन अंक पोस्ट ऑफिस दर्शवतात. म्हणजे यातही हा तक्ता वापरता येईल

    ११ – दिल्ली

    १२ व १३ – हरयाणा

    १४ ते १६ – पंजाब

    १७ – हिमाचल प्रदेश

    १८ ते १९ जम्मू आणि काश्मिर

    २० ते २८ – उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड

    ३० ते ३४ – राजस्थान

    ३६ ते ३९ – गुजरात

    ४० ते ४४ – महाराष्ट्र

    ४५ ते ४९ मध्य प्रदेश आणि छत्तीसगड

    ५० ते ५३ – आंध्र प्रदेश

    ५६ ते ५९ – कर्नाटक

    ६० ते ६४ – तामिळनाडू

    ६७ ते ६९ – केरळ

    ७० ते ७४ – पश्चिम बंगाल

    ५५ ते ७७ – ओरिसा

    ७८ – आसाम

    ७९ – पूर्वांचल

    ८० ते ८५ बिहार आणि झारखंड

    ९० ते ९९ – आर्मी पोस्टल सर्व्हिस

    history of pin code

    म्हणजे सहा आकडी पिनकोडमधला पहिला अंक दाखवतो- विभाग, दुसरा अंक- उपविभाग, तिसरा अंक – सॉर्टींग जिल्हा आणि राहिलेले शेवटचे तीन अंक हा त्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर असतो. उदाहरणार्थ ४१३००१ हा सोलापूरचा पिनकोड आहे. यात पहिला अंक दाखवतो- पश्चिम विभाग, त्यानंतर १३ हा पश्चिम विभागातल्या महाराष्ट्रातला एक उपविभाग दाखवतो, ४१३ हा अंक सॉर्टिंग जिल्हा दर्शवतो, तर शेवटचे तीन अंक – ००१ हा सोलापूर जिल्ह्यातल्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर आहे.

    आता पत्रं लिहिणं दुर्मिळ होत चाललं असलं तरी पिनकोड सिस्टिम कधीच इतिहासजमा होणार नाही. ही अशी पद्धत शोधणाऱ्या श्रीराम भिकाजी वेलणकरांना मानाचा मुजरा…!