Tag: National Science Day

  • National Science Day 2026 : पर्यावरणपूरक व्यवसाय, Sustainable Packaging आणि Green Supply Chain ची सुवर्णसंधी

    National Science Day 2026 : पर्यावरणपूरक व्यवसाय, Sustainable Packaging आणि Green Supply Chain ची सुवर्णसंधी

    राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष: पर्यावरणपूरक व्यवसाय, शाश्वत पॅकेजिंग (Sustainable Packaging)आणि ग्रीन सप्लाय चेन (Green Supply Chain)

    विज्ञानाशिवाय जग चालत नाही. माणसाने घेतलेला श्वास, माळरानावर उगवलेले झाड ते अवकाशात फिरणारे कृत्रिम उपग्रह – सगळंच विज्ञानाच्या भोवती चालत असतं तसेच अर्थकारण, नोकरी, उद्योग आणि व्यवसायही.

    आज जगभरात पर्यावरणपूरक व्यवसाय (Eco-friendly Business) हा केवळ ट्रेंड नसून, एक गरज बनली आहे. प्लास्टिक प्रदूषण, हवामान बदल, संसाधनांची कमतरता यामुळे कंपन्या आणि उद्योजकांना शाश्वत उपाय स्वीकारावे लागत आहेत. वैज्ञानिक क्षेत्रामधील Material science, biotechnology, AI, आणि nanotechnology यातील नवनवीन शोधांमुळे Biodegradable plastics, Smart recycling systems, Green energy logistics यासारख्या नवकल्पना निर्माण करणे शक्य झाले आहे.

    पर्यावरणपूरक व्यवसाय म्हणजे काय?

    पर्यावरणपूरक व्यवसाय म्हणजे असा उद्योग जो उत्पादन, पॅकेजिंग, वाहतूक आणि वापरात नैसर्गिक संसाधनांचा कमी वापर करतो, प्रदूषण कमी करतो आणि पुनर्वापराला प्रोत्साहन देतो.

    आजचे ग्राहक केवळ किंमत नाही तर ब्रँडचे पर्यावरणीय मूल्य (Eco Value) पाहून खरेदी करतात. त्यामुळे Green Business ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी नसून व्यवसायाची गरज बनली आहे.

    Reduce, Reuse, Recycle – व्यवसायासाठी Golden Formula

    Reduce (कमी वापर)
    – हलके पॅकेजिंग
    – कमी प्लास्टिक
    – डिजिटल बिलिंग
    म्हणजे खर्च कमी आणि पर्यावरण संरक्षणसुद्धा!

    Reuse (पुन्हा वापर)
    Glass bottles
    – Cloth bags
    – Returnable packaging
    यातून ग्राहकांची loyalty वाढते.

    Recycle (पुनर्निर्मिती)
    Recycled paper
    – Recycled plastic
    – Upcycled products
    त्यातून Circular Economy तयार होते. 

    Sustainable Packaging: 2026 चा एक मोठा ट्रेंड

    Sustainable Packaging म्हणजे काय?

    शाश्वत पॅकेजिंग (Sustainable Packaging) म्हणजे पुनर्वापर करता येणाऱ्या, जैवविघटनशील किंवा पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून पर्यावरणावर होणारी हानी कमी करणारी पॅकेजिंग प्रणाली.
    यामध्ये Recyclable साहित्य, Biodegradable साहित्य, Plant-based साहित्य यांचा वापर केला जातो.

    Sustainable Packaging Trend 2026

    1. Single-Use Plastic ला पूर्ण पर्याय
      जगभरातील अनेक देश Single-use plastic वर पूर्ण बंदी आणण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कागद, बांबू, बायोप्लास्टिक, मशरूम पॅकेजिंग यांची मागणी वाढत आहे.
    2. Plant-Based Packaging
      कॉर्न स्टार्च, गव्हाचा कोंडा, ऊसाच्या बॅगॅसपासून पॅकेजिंग तयार केली जात आहे. हे fully biodegradable आणि compostable असते. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाला मदत होते. 
    3. Smart Packaging
      QR code, RFID tag, recyclable ink वापरून digital traceability देणारी पॅकेजिंग हा मोठी ट्रेंड आहे. विशेषतः ई-कॉमर्स क्षेत्रात याचा वापर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. 
    4. Minimal Packaging
      Less is More – कमी साहित्य वापरून पॅकेजिंग करणे म्हणजे खर्च आणि कचरा दोन्ही कमी करणे. 

    Green Supply Chain


    Green Supply Chain म्हणजे उत्पादन तयार करण्यापासून ग्राहकापर्यंत पोहोचण्याची संपूर्ण प्रक्रिया पर्यावरणपूरक बनवणे आणि म्हणजे पर्यावरणाला हानी न पोहोचवता व्यवसाय नफा मिळवणे.

    यामध्ये पर्यावरणपूरक कच्चा माल (Eco-friendly raw material), ऊर्जा कार्यक्षम उत्पादन (Energy Efficient Products), Green logistics (EV वाहतूक), Recyclable packaging यांचा समावेश होतो.

    Green Supply Chain चे फायदे

    1. खर्चात बचत
      ऊर्जा, पाणी आणि कच्चा माल कमी वापरल्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो.
    2. ब्रँड व्हॅल्यूमध्ये वाढ
      आज ग्राहक पर्यावरणपूरक ब्रँडला, त्यांच्या उत्पादनांना जास्त पसंती देत आहेत.
    3. सरकारी नियमांचे पालन
      भारत सरकार EPR (Extended Producer Responsibility) आणि प्लास्टिक बॅनसारखे नियम लागू करत आहे.
    4. जागतिक बाजारात प्रवेश
      पर्यावरणपूरक उत्पादनांना जागतिक बाजारातही महत्त्वाचे स्थान आहे. Green Supply Chain च्या माध्यमातून तयार झालेल्या उत्पादनांची वेगळी ओळख निर्माण होऊ शकते. 

    Recycled Products: वेगाने वाढणारी Green Businessची नवी सुवर्णसंधी

    Recycled Products इंडस्ट्री आज मल्टी-बिलियन डॉलर मार्केट झाली असून भारतात Startup आणि MSME साठी मोठी व्यवसाय संधी आहे. कचऱ्यातून उपयोगी उत्पादने तयार करून पर्यावरण संरक्षणासोबत नफा कमावणे ही Circular Economy ची मुख्य ताकद आहे.

    लोकप्रिय Recycled Business Categories:

    • Plastic Recycling: बाटल्या, पिशव्या, पाईप्स, फर्निचर
    • Paper Recycling: पॅकेजिंग बॉक्स, कार्डबोर्ड, स्टेशनरी
    • E-waste Recycling: मोबाईल व संगणकातील मौल्यवान धातू
    • Upcycled Fashion: जुन्या कपड्यांपासून बॅगा व फॅशन वस्तू
    • Tyre Recycling: रबर मॅट्स, फर्निचर, बांधकाम साहित्य

    Recycled Products व्यवसाय कमी भांडवलात सुरू करता येतो आणि कच्चा माल सहज उपलब्ध असल्यामुळे नव्या उद्योजकांसाठी ही उत्तम संधी आहे. योग्य मशिनरी आणि आवश्यक परवाने घेतल्यास व्यवसाय सुरळीत चालवता येतो. डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर ग्राहक मिळवता येतात आणि ब्रँड ओळख तयार करता येते. सरकारी प्रोत्साहन योजना आणि वाढती पर्यावरण जागरूकता यामुळे या उद्योगाची मागणी वेगाने वाढत आहे आणि भविष्यात मोठी कमाई व रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते.

    भारतीय उद्योजकांसाठी सुवर्णसंधी

    भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा कन्झ्युमर मार्केट आहे, परंतु कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक प्रदूषण ही भारतातील एक मोठी समस्या आहे. त्यामुळे Green Businesses हे केवळ CSR (Corporate Social Responsibility) नाही तर Profit Opportunity आहे.

    काही उदाहरणे:
    Zero-waste grocery stores
    Eco-friendly packaging startups
    Sustainable fashion brands
    Organic product brands

    तुम्ही पर्यावरणपूरक व्यवसाय का सुरू करावा?

    1.  ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी
    2.  दीर्घकालीन खर्च कमी करण्यासाठी
    3.  भविष्यातील कायद्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी
    4.  पर्यावरणासाठी योगदान देण्यासाठी

    उत्तर: वरीलपैकी सर्व कारणांसाठी!

    2026 मध्ये Sustainable Business, Eco friendly businesses का ट्रेंडिंग आहे?

    • Gen Z आणि Millennials Eco-conscious आहेत. 
    • ESG (Environmental, Social, and Governance) investing वाढत आहे.
    • सरकार Green regulations आणत आहे. 
    • सोशल मीडिया वर Sustainable Brands Viral होत आहेत. 

    म्हणजेच, Green Business = Growing Business

    भविष्यातील यशस्वी व्यवसायासाठी नवा विचार

    3P = People + Planet + Profit = Sustainable Success

    केवळ नफ्याचा विचार न करता, लोकांसाठी व पर्यावरणासाठी योग्य उद्योग – व्यवसाय करणे! जो उद्योजक आज पर्यावरणपूरक धोरण स्वीकारेल, तो उद्या बाजारात आघाडीवर असेल.

    अशाच नवनवीन माहितीपर लेखांसाठी ‘नवी अर्थक्रांती’च्या वेबसाईटला नियमित भेट द्या!!

  • २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. हार्दिक शुभेच्छा…

    २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. हार्दिक शुभेच्छा…

    साधारण दीड लाख वर्षांपूर्वी कृत्रिमरीत्या अग्निनिर्मिती किंवा अग्नीचे नियंत्रण आवाक्यात आल्यानंतर मानवाने प्रगती करण्यासाठी पहिले पाऊल टाकले. काही अंशी स्थिरस्थावर झाल्यानंतर माणसाने सभोवतालच्या घटनांचा आणि त्या अनुषंगाने निसर्गाचा विचार करण्यास सुरुवात केली. मग स्वतंत्र ओळख होईल, अशी मानवी संस्कृती निर्माण झाल्यानंतर ‘हे जग कशाचं बनलंय?’ हा प्रश्न सर्वप्रथम उपस्थित झाला आणि रूढार्थाने विज्ञान विषयाची मुहूर्तमेढ रोवली गेली, असे म्हणता येईल. हे जग जमीन, पाणी, हवा, अग्नी आणि आकाश मिळून तयार झाले आहे, असे जवळपास सर्वच संस्कृतीमध्ये सांगण्यात येते. या सर्वच संस्कृतींनी सुरुवातीला केवळ तर्काच्या आधाराने निसर्गातील तत्त्वे उलगडण्याचा प्रयत्न केला.. त्या वेळी प्रयोगांसाठीची साधने जवळपास नव्हतीच. मात्र यातून निसर्गाच्या अनुषंगाने तत्त्वज्ञान आकाराला आले.

    National Science Day A Day to Honor Scientists and their Achievements!

    विज्ञानाची वाटचाल सुरू झाली, ती इथे. मर्यादित का होईना, प्रयोग करण्यासाठी खडक, पाणी, जमीन यांचा वापर झाला आणि निरीक्षण-तर्क यांच्या आधारे आकाशाचा अभ्यास सुरू झाला. खगोलशास्त्राचा इतिहास आज चार पर्वामध्ये विभागला जातो. पहिले पर्व थेट आदिकालापासून गॅलिलिओच्या कालखंडापर्यंतचे मानले जाते. या प्रदीर्घ कालखंडात फक्त उघड्या डोळ्यांनीच अवकाश निरीक्षण केले जाते. सतराव्या शतकाच्या प्रारंभी गॅलिलिओने खगोलीय निरीक्षणांसाठी सर्वप्रथम दुर्बीण वापरली आणि खगोलशास्त्राच्या दुसऱ्या पर्वाचा प्रारंभ झाला. अठराव्या शतकात वर्णपटीय विश्लेषणातून खगोलीय अभ्यास सुरू झाला, हे तिसरे पर्व. साधारण विसाव्या शतकाच्या मध्यापासून खगोलशास्त्राच्या चौथ्या पर्वाचा प्रारंभ झाला वेगवेगळ्या प्रारणांच्या दुर्बिणींचा उदय याच शतकाच्या मध्यावर झाला. या संदर्भात १९६७ मध्ये चंद्रावर ठेवलेले पाऊल हे मानवाने खऱ्या अर्थाने केलेले सीमोल्लंघन म्हणता येईल.

    अणुभौतिकीची वाटचालही अशीच जुनी आहे. इसवी सनपूर्व सहाव्या शतकात पदार्थाच्या लहानात लहान कणाला अणू असे संबोधले गेले होते. यानंतर किमान २४०० वर्षांनी एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी आधुनिक विज्ञानात अणुसिद्धांत मांडण्यात आला. तथापि अणूचे अद्ययावत स्वरूप स्पष्ट होण्यास विसावे शतक उजाडावे लागल़े. आज अणूच्याही मूलकणांची संकल्पना स्पष्ट होऊन, मूलकणांच्या टकरी घडवून माणूस विश्वाच्या प्रारंभीची स्थिती जाणून घेत आहे.

    गुरुत्वाकर्षण गतीचे नियम विद्युतचुंबकत्व उष्मागतिकीचे नियम सापेक्षता सिद्धांत पुंजवाद हे भौतिकशास्त्रातील मैलाचे दगड ठरलेले आहेत. संदेशवहन हा मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आदिकालात हातवारे, खाणाखुणा, वेगवेगळे आवाज यातून संदेशवहनाची निर्मिती झाली. पुढे भाषालिपीमुळे हे काम खूपच सोपे होत गेले. वाहनांच्या माध्यमातून साध्य झालेला कमाल वेग आणि केवळ एका क्लिकच्या अंतराने जोडले गेलेले जग; यातून दळणवळण आणि संदेशवहन ही प्रगती गेल्या दीडशेच वर्षांतली आहे. आज विद्युतचुंबकीय प्रारणांच्या माध्यमांमधून ध्वनी आणि दृश्य स्वरूपाचे प्रसारण थेट समुद्रापारच नाही तर अंतराळातही अगदी सहज साध्य झाले आहे. आजच्या जगण्यात विद्युतचुंबकीय प्रारणांचे ऑक्सिजनइतकेच महत्त्व आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. उपग्रहांद्वारे भ्रमणध्वनींसाठी वापरल्या जाणाऱ्या रेडिओ लहरींच्या प्रक्षेपणाचे कार्य चालते, ते काही काळासाठी बंद पडले तरी माणसे कासावीस होतात.

    National Science Day A Day to Honor Scientists and their Achievements!

    रसायनशास्त्राची चार पर्वे सांगितली जातात. अतिप्राचीन काळापासून ख्रिस्तकाळापर्यंत जी काही रसायनशास्त्राची माहिती उपलब्ध होती ती गूढ असल्यामुळे या पर्वाला गूढपर्व असे संबोधले जाते. दुसरे पर्व ख्रिस्तकाळापासून सतराव्या शतकापर्यंतचे हा अल्केमी म्हणजेच किमयागारांचा काळ. तिसरे पर्व सतराव्या शतकाच्या मध्यापासून एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंतचे, त्या पर्वाला पारंपरिक रसायनशास्त्राचा कालखंड म्हणतात. त्यापुढचा कालखंड आधुनिक रसायनशास्त्राचा मानला जातो. रसायनशास्त्राच्या अनुषंगाने सांगायचे झाले तर इसवी सनपूर्व तीन हजार वर्षांपूर्वी फार तर नऊ ते दहा धातुस्वरूप मूलद्रव्ये परिचयाची होती, आज त्यांची संख्या ११८ झाली आहे.

    प्राचीन जीवशास्त्रामध्ये सृष्टिनिर्माणाचे श्रेय ईश्वराला बहाल करून जीवशास्त्र धार्मिकतेच्या बंधनाखाली होते. मात्र एकोणिसाव्या शतकातील उत्क्रांती सिद्धांताने या सगळ्याचा पाया उखडून टाकला. आज पेशीची जनुकीय संरचनाही समजावून घेण्यात आली आहे. जीवशास्त्रासंदर्भात इसवी सनपूर्व दोन ते तीन हजार वर्षांपूर्वी फक्त २०० आजार ज्ञात होते. आज ३० हजार आजारांची परिपूर्ण माहिती मानवजातीला झाली आहे. दूरस्थ ठिकाणी यंत्रमानवाच्या साहय़ाने केली जाणारी शस्त्रक्रिया, इथवर शरीरविज्ञानाची प्रगती केली आहे.

    कालखंड किंवा वेळेबाबत विचार केला तर आदिम काळात ढोबळपणे ऋतूंचे मोजमाप करणाऱ्या माणसाने आज सेकंदाचेही अब्जावधी भाग पाडले गेले आहेत आणि त्यावर तंत्रज्ञानही आधारलेले आहे. आज तळहातावर मावणारा संगणक सुरुवातीला अवाढव्य खोलीभर पसरलेला असायचा आणि संगणकाच्या पायाचा दगड रोवला गेला. सतराव्या शतकातल्या ‘अबॅकस’द्वारे.

    एकविसावे शतक हे सूक्ष्मातिसूक्ष्म म्हणजे नॅनोविज्ञान-तंत्रज्ञानाचे असेल असे म्हटले जाते. मात्र माणूस सूक्ष्मातिसूक्ष्म विज्ञानाकडे चौथ्या शतकात वळला होता. काचा, हिरे, माणिक,मोती यांच्यावरील नाजूक नक्षीकामातून सूक्ष्मातिसूक्ष्म विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रारंभ अगदी बीजरूपानेच का होईना, झाला होता.

    दैनंदिन व्यवहारातील विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातील असंख्य उदाहरणे डोळसपणे अभ्यासताना सामान्यजनांना एक प्रश्न पडायला हवा की विश्वाच्या प्रारंभापासून अस्तित्वात असलेले विज्ञान जर मानवाची आदिकालापासून साथसंगत करीत आहे तर विज्ञान आपलेसे का झाले नाही?

    देशोदेशीच्या क्षितिजांवर विस्तारलेल्या विज्ञानाचा अत्यंत महत्त्वाचा फायदा झाला आहे, तो म्हणजे मानवी जीवनात आलेली पारदर्शकता. निसर्गातील न सुटलेले प्रश्न मानवी मनात गूढ बनून राज्य करतात. याचा रोजच्या जीवनमानावर अनुचित प्रभाव पडत राहतो आणि यात सर्वसामान्य भरडले जातात. मात्र जसजसे नैसर्गिक घटनांमागील विज्ञानाचे आकलन होत जाते तसतसे मानवी मन कणखर होण्यास मदत होते. आजवरच्या वैज्ञानिक कालखंडाचा आढावा घेतला तर याचा प्रत्यय येईल. तथापि आज आपला देश महासत्तेकडे वाटचाल करताना सर्वसामान्यांची वैज्ञानिक मानसिकता सुदृढ होणे हे एक मोठे आव्हान आहे. दुर्दैवाने राज्यकर्ते आणि शासनकर्ते हे आव्हान स्वीकारण्याबाबत उदासीन आहेत.

    आजकाल कर्मकांडांशी विज्ञानाचा कसा तरी कुठे तरी ओढूनताणून संबंध जोडत कर्मकांडांचेच उदात्तीकरण होत आहे. यातून समाजाची दिशाभूल केली जात आहे. कर्मकांडांमुळेच मानवता धोक्यात आली आहे, हा न विसरता येणारा कटू इतिहास आहे.

    अखेर एका महत्त्वाच्या मुद्द्याचा उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे पर्यावरणऱ्हासाचा. पर्यावरणऱ्हास हा आजचा कळीचा मुद्दा आहे यात शंका नाही, परंतु त्याचे खापर विज्ञान-तंत्रज्ञानावर फोडले जात आहे. मुळात पर्यावरणऱ्हास हा विज्ञानाने केला की माणसाने, याचा विचार सर्वप्रथम झाला पाहिजे. विज्ञान-तंत्रज्ञानाचा गैरवापर टाळून जर पर्यावरणही समृद्ध आणि संपन्न अवस्थेत टिकून राहिले तर पृथ्वीचा आणि माणसाचा भविष्यकाळ उज्ज्वल असेल.

    >> आपण कुठे आहोत..?

    साधारण १४०० कोटी वर्षांपूर्वी विश्व तर ४५० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी निर्माण होऊन ३८५ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर पहिला जीव तयार झाला. यथावकाश ३०० कोटींपेक्षा जास्त वर्षे पार पडल्यानंतर म्हणजे ७० कोटी वर्षांपूर्वी प्राणी निर्माण झाले. यामध्ये मानवसदृश प्राणी अगदी अलीकडचा म्हणजे ४५ लाख वर्षांपूर्वीचा. आदिमानव ४ लाख वर्षांपूर्वी तर आजच्या आपल्या पूर्वजाची अवस्था १ लाख वर्षांपूर्वी प्राप्त झाली. हा मानव स्थिरस्थावर होऊन संस्कृती निर्माण होण्यास तब्बल ८० ते ९० हजार वर्षे लागली़. इसवी सनापूर्वीचा फार तर १० हजार वर्षांचा कालखंड ज्ञात असून आता इसवी सनानंतर फक्त २ हजार वर्षे पार पडली आहेत. पृथ्वीच्या आजवरच्या आयुष्याचा कालखंड एका वर्षांत मांडला तर, आपण ३१ डिसेंबरच्या रात्रीच्या शेवटच्या सेकंदातील आहोत.

    आणखी वाचा