Tag: farming

  • जाणून घ्या खरबूज शेतीविषयी संपूर्ण माहिती

    जाणून घ्या खरबूज शेतीविषयी संपूर्ण माहिती

    तापमान: खरबूज शेतीसाठी सरासरी तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअस असावे.

    पाऊस: खरबूज शेतीसाठी दरवर्षी 50 ते 75 सेंटीमीटर पाऊस आवश्यक असतो.

    आर्द्रता: खरबूज शेतीसाठी आर्द्रता 50 ते 60 टक्के असावी.

    प्रकाश: खरबूज शेतीसाठी पुरेसा सूर्यप्रकाश आवश्यक असतो.

    a-complete-guide-to-muskmelon-farming

    खरबूज शेतीसाठी आवश्यक जमीन खालीलप्रमाणे आहे:

    जमीनीचा  प्रकार: खरबूज शेतीसाठी हलकी, सुपीक आणि निचरा होणारी जमीन योग्य असते.

    जमिनीचा pH: खरबूज शेतीसाठी जमिनीची pH 6.0 ते 7.0 असावी.

    a-complete-guide-to-muskmelon-farming

    खरबूज शेतीची जोपासणी खालीलप्रमाणे केली जाते

    आंतरपिके: खरबूज शेतीत आंतरपिके घेऊन उत्पादन वाढवता येते. खरबूजसोबत वाल, मका, मूग, उडीद इत्यादी पिके घेता येतात.

    खत व्यवस्थापन: खरबूज शेतीसाठी चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर केला जातो. खरबूजाच्या शेतात रोप लावण्यापूर्वी 15 ते 20 किलो शेणखत प्रति रोप या प्रमाणात देऊन जमिनीची चांगली मशागत केली जाते.

    पाणी व्यवस्थापन: खरबूज शेतीसाठी नियमित पाणी देणे आवश्यक असते. खरबूजाच्या रोपट्याला लागवड केल्यानंतर 7 ते 10 दिवसांनी पहिल्यांदा पाणी दिले जाते. त्यानंतर 10 ते 15 दिवसांनी पुन्हा पाणी दिले जाते. फळधारणेच्या काळात पाण्याची आवश्‍यकता जास्त असते.

    आंतरमशागत: खरबूजाच्या शेतात वेळोवेळी आंतरमशागत करून तण काढून टाकले जाते. तण काढल्याने जमिनीत हवा खेळती राहते आणि मुळांना ऑक्सिजन मिळतो.

    कीड व रोग नियंत्रण: खरबूजाच्या शेतात कोळंबी, फळमाशी, फुलकिडे, पाने खाणारी अळी इत्यादी किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. या किडी आणि रोगांचा नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशके आणि बुरशीनाशके वापरली जातात.

    खरबूज शेतीतून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी वरील गोष्टींचे काळजीपूर्वक पालन करणे आवश्यक आहे.

    आणखी वाचा

  • जाणून घ्या स्वीटकॉर्न शेतीविषयी संपूर्ण माहिती

    जाणून घ्या स्वीटकॉर्न शेतीविषयी संपूर्ण माहिती

    All-you-need-to-know-about-sweet-corn
    जाणून घ्या स्वीटकॉर्न शेतीविषयी संपूर्ण माहिती

    शेतकरी सातत्यान चांगलं पिक घेण्याचा प्रयत्न करतात परंतु कधीकधी त्यांना हवामानाचा आणि नैसर्गिक आपत्तींचा  सामना करावा लागतो.  अशा वेळी ते आपल्या शेतात हे पिक घेऊन भरघोस नफा कमवू शकतात. आज आपण या लेखाच्या माध्यमातून स्वीटकॉर्न ची शेती कशी करावी या विषयी माहिती घेऊयात. 

    आवश्यक हवामान आणि जमीन – 

    तसे तर  स्वीटकॉर्न  च्या शेतीसाठी कोणतीही जमीन चालते पण पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन जास्त फायदेशीर ठरते. ही एक उष्णकटिबंधीय वनस्पती आहे . या मक्यासाठी मातीची इष्टतम  PH श्रेणी 6.5 -7.5 इतकी आहे . उगवणीसाठी तापमानाची कक्षा 21 ते 32  डिग्री सेल्शियस इतकी आहे .  लागवड करण्याआधी मातीचे परीक्षण करून घ्यावे. स्वीटकॉर्न हे वाढीसाठी पोषकतत्त्वांची मागणी करणारे पिक आहे. या पिकाच्या वाढीसाठी नायट्रोजन ,  २ स्फरस, आणि  शियमची गरज असते. हे पिक खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाऊ शकते.  

    अशी करा लागवड –

    All-you-need-to-know-about-sweet-corn

    स्वीटकॉर्न ची लागवड ही मक्यासारखीच असते. आणि विशेष म्हणजे यामध्ये  मका पूर्ण परिपक्व होण्याआधीच तिची काढणी केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना झटपट नफा मिळवता येतो . चांगले पिक येण्यासाठी जमिनीमध्ये खाते आणि इतर पोषक तत्त्वांचा समावेश करणे गरजेचे आहे. लागवड करताना जमिनीत 20:20:20 हे खत हेक्टरी 100 किलो टाकावे आणि 10 किलो मायक्रोन्यू ३ टाकावेत.

    उन्हाळी हंगामात २-३ उथळ मशागतीची कामे आवश्यक असतात. खोल नांगरणी तण नियंत्रित करण्यासाठी आणि प्रभावी ओलावा संवर्धनासाठी देखील उपयुक्त आहे.

    बियाणे दर:

    All-you-need-to-know-about-sweet-corn

    1. शुद्ध पिकासाठी: 20-25 किलो/हे

    2. चारा मक्यासाठी: 40-50 किलो/हे

    3. सोयाबीनसह आंतरपीक घेण्यासाठी: 10kg/हेक्टर (1:3) किंवा 15 kg/hector (1:2)

    लागवड करताना अंतर 65X20 किंवा 75X20  इतके ठेवावे .

    जोपासणी –

    All-you-need-to-know-about-sweet-corn

    या पिकासाठी 75 ते 80% ओलावा असणारी जमीन उत्तम ठरते . मक्याची दोन वेळा आंतरमशागत आणि दोन वेळा हाताने खुरपणी केली जाते.  पहिल्या वेळेस केलेली आंतरमशागत रोपांमधल्या अर्थिंग साठी फायदेशीर असते. तण काढून टाकण्यासाठी तणनाशके आणि आंतरमशागती यांचा एकत्र वापर महत्त्वाचे तंत्र ठरू शकते. पावसाच्या उपलब्धतेवर सिंचनाचा कालावधी 6 ते 10 दिवस  इतका असतो . 

    परिपक्वतेची चाचणी अशी करा –

    भुसाचे आवरण फिकट तपकिरी रंगाचे होते आणि दाणे बोटांच्या नखेने दाबणे खूप कठीण होते.

    काढणी –

    All-you-need-to-know-about-sweet-corn

    काढणीनंतर एक ते दोन दिवस रोपे शेतात सोडावीत. भुसा काढा आणि दाण्यांना 2-3 दिवस सूर्यप्रकाशात ठेवा. लाठी मारून किंवा हाताने किंवा शक्तीने चालवल्या जाणार्‍या मक्याच्या शेलर्सचा वापर करून शेलिंग करता येते.

     स्वीटकॉर्न  चा दर 140 – 200 रुपये प्रतिकिलो आहे. 

  • जाणून घ्या चंदन शेतीविषयी संपूर्ण माहिती

    जाणून घ्या चंदन शेतीविषयी संपूर्ण माहिती

    चंदन’ या वृक्षाचा वापर होम, हवन, तसेच आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. एवढंच काय तर सौंदर्य प्रसाधानांमध्ये देखील त्याचा वापर वाढला आहे; कारण चंदन चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. त्यामुळे चंदन शेतीतून चांगले उत्पन्न मिळवण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. चंदन शेतीविषयी आपल्या मनात अनेक समज, गैरसमज असतात ते कळण्यास या लेखाच्या माध्यमातून मदत होईल. 

    चंदन लागवड करत असताना सर्वप्रथम हे समजून घ्या की, यासाठी कोणतीही सरकारी परवानगी लागत नाही. पण काही  कायदेशीर बाबी आहेत त्या मात्र वेळोवेळी पूर्ण करून घ्याव्या लागतील. चंदनाची लागवड केल्यावर पहिल्यांदा तलाठ्याकडून सात-बारा वर नोंद करून घ्यावी. जर तुम्ही चंदन लागवड करत असाल तर सरकारकडून तीन टप्प्यात हेक्टरी 45,000 इतके अनुदान मिळेल. शेवटी झाडे तोडताना फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी घ्यावी. अधिक माहिती हवी असल्यास तालुका कृषी अधिकाऱ्याला भेटावे.   

    चंदनाच्या झाडाची उंची 12 -15 मीटर असते आणि घेर 2-2.5 असतो. याची पाने सदाहरित असतात. त्यांचा आकार अंडाकार असतो आणि ते टोकाला निमुळते होत जातात. खोड सुरवातीला लहान असते, तेव्हा ते मऊ असते. जसजसे झाड मोठे होते तसे ते मजबूत आणि उभ्या चीरांचे बनते. चंदनाचे लाकूड कठीण असते. त्यामध्ये तेलाचे प्रमाण 1-6% असते. लाकडाचा बाहेरचा भाग कडक आणि सुगंध रहित असतो, तर आतला भाग पिवळस ते तपकिरी आणि सुगंधी असतो. चंदनाचे बी एकदल प्रकारातील असून ते पिवळसर असते. फळाचा वरचा भाग लुसलुशीत आणि गरयुक्त असून त्यामध्ये बी मिळते. हे बी काढून त्यापासून रोपे तयार केली जातात. 

    रोपे कशी तयार करावीत- 

    1

    लहान रोपे अति सूर्यप्रकाशात किंवा कमी पाण्यामुळे सुकून जातात. त्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. पहिला एक महिना हे बी सुप्तअवस्थेत असल्याने त्यावर पाणी आणि सूर्यप्रकाशाचा परिणाम होत नाही. यासाठी 50 ml जर्मिनेटर, 50 ml प्रिझम, आणि एक लिटर पाण्यात बी भिजवून ठेवावे. असे केल्यास एक महिन्यातच अंकुर दिसायला लागतील. 

    गादी वाफ्यावर बी लागवड पद्धत

    2

    गादीवाफे 2 प्रकारचे केले जातात. ज्या भागात पाऊस जास्त पडतो तेथे उंच गादीवाफे, तर इतर भागात जमिनीला समांतर खणून वाफे बनविले जातात. साधारणपणे वाफे 10 मीटर x 1 मीटर आकाराचे करून 15 सेमी उंची ठेवावी. यामध्ये लाल माती व चाळलेली वाळू 2:1 प्रमाणात घेऊन वाफे बनवावेत. अशा वाफ्यात प्रक्रिया केलेले 4 किलो बी पसरून घेऊन त्यावर 2 सेमी जाडीचा वाळूचा थर देऊन त्यावर वाळलेले गवताचे अच्छादन करावे. वाफ्यास रोज झारीने अथवा स्प्रिंक्लरने पाणी द्यावे. वाफ्यांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीची सोय (शेडनेट 50%) करावी. बी उगविल्यानंतर गवताचे आच्छादन अलगद काढून टाकवे. नर्सरीचे योग्य नियोजन होण्याच्या दृष्टीने बियाणे डिसेंबर-जानेवारीत पेरावे.

    पिशवीत रोपे लावणे

    3

    बी गादीवाफ्यावर पेरल्यानंतर 25 ते 30 दिवसात रोपे उगवण्यास सुरुवात होते. रोपे लगेच पिशवीत लावावीत. अशी रोपे लवकर रूजतात. रोपांवर दर 15 दिवस ते 1 महिन्याच्या अंतराने सप्तामृत 250 मिली 100 लि. पाण्यातून फवारावे. म्हणजे रोपांची निरोगी व जोमाने वाढ होते. साधारणपणे 6 ते 8 आठवड्यानंतर रोपांची सावली काढून टाकावी व रोपांच्या पिशव्या अधूनमधून फिरवत रहाव्यात. जेणेकरून मुळे जमिनीत रूजणार नाहीत. 6 ते 8 महिन्यामध्ये रोपे 25 ते 30 सेमी उंचीची तपकिरी रंगाचे खोड झालेली लागवडी योग्य उपलब्ध होतात. 1 किलो बियांपासून साधारणपणे 2,000 रोपे तयार होतात.

    कधी करावी लागवड

    4

    मान्सून सुरु होताच जुलै-ऑगस्ट महिन्यात या रोपांची लागवड करावी. त्यासाठी मार्च महिन्यात 16×12 अंतरावर 1.5×1.5×1.5 फुटाचे खड्डे खोडून घ्यावेत. या खड्ड्यांमध्ये निंबोळी खत किंवा सेंद्रिय खत टाकावे आणि पहिला पाऊस झाल्यावर रोपे लावावीत. चंदन हा एक अर्धपरजीवी वृक्ष आहे. त्यासाठी आधार म्हणून एक मजबूत झाड असावे. 

    आवश्यक हवामान आणि जमीन

    5

    चंदनाचे झाड 600 ते 1600 मिमी पर्जन्यमान असणाऱ्या क्षेत्रात येते. यासाठी 12-45 डिग्री सेल्शियस तापमान योग्य मानले जाते.  थंड हवामान, मध्यम पर्जन्यमान आणि भरपूर सूर्यप्रकाश या वनस्पतीसाठी पोषक ठरतो. चंदनाच्या झाडासाठी लाल, काळी माती, चिकणमाती, लोहयुक्त वाळूमिश्रीत जमीन पोषक ठरते. जमिनीचा सामू  6.5- 8 च्या दरम्यान असावा.

    जोपासणी

    6

    चंदनाच्या झाडाला पाहिल्या वर्षी आठवड्यातून 2 -3 वेळा पाणी द्यावे. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी आठवड्यातून दोन वेळा पाणी द्यावे. पावसाची कमतरता असल्यास झाडाला पाणी कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी. सध्या चंदनाचा भाव 12000 ते 20,000 रुपये प्रतिकिलो असा आहे.

    Follow Google News

    आणखी वाचा

  • कमी खर्चात लाखोंची कमाई, बेबी कॉर्न लागवड करा

    कमी खर्चात लाखोंची कमाई, बेबी कॉर्न लागवड करा

    आजकाल मोठ-मोठे पदवीधर, सुशिक्षित वर्गातील लोक नोकरीपेक्षा शेती करण्यास जास्त प्राधान्य देत आहेत. उत्तम पद्धतीची आधुनिक शेती करून चांगलीच कमाई देखील कमवत आहेत. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत अशाच एका आधुनिक पिकाबद्दल बेबी कॉर्न या पिकाबद्दल.

    कॉर्न मंच्युरीयन, चिली, पकोडे, कॉर्न मसाला असे बेबी कॉर्नचे सगळेच पदार्थ प्रत्येकाच्याच आवडीचे असतात. त्यामुळे बेबी कॉर्नची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अगदी आपल्या घरापासून ते 5 स्टार हॉटेल्स, पिझ्झा, पास्ता चेन आणि छोट्या-मोठ्या रेस्टॉरंटमध्ये देखील कॉर्नला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

    तांदूळ आणि गहू या पिकांनंतर मका हे भारतातील सर्वात जास्त लागवडीचे पीक म्हणून ओळखले जाते. याच मक्याच्या अपरिपक्व कोंबांना बेबी कॉर्न असे म्हणतात. लागवडीनंतर दोन महिन्यांच्या आताच बेबी कॉर्न तयार होतात. बेबी कॉर्नमध्ये कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वं असतात. म्हणून आरोग्याच्या दृष्टीने ते खूप फायद्याचे मानले जाते, पण केवळ आरोग्याच्याच दृष्टीने नव्हे, तर आर्थिकदृष्ट्या विचार केला तर यातून खूप फायदा मिळू शकतो. एका एकरात बेबी कॉर्नच्या लागवडीसाठी जवळपास 15 हजार रुपये खर्च येऊ शकतो. फक्त 15 हजारांच्या गुंतवणुकीतून एकरी चार ते सहा क्‍विंटल उत्पादन घेऊन तुम्ही लाखोंची कमाई करू शकता. याचे उत्पादन तुम्ही वर्षातून केवळ एकदाच नाही तर 4 वेळा घेऊ शकता. फक्त इतकेच नव्हे तर तुम्हाला यातून दुप्पट नफा मिळवता येऊ शकतो. म्हणजे बेबी कॉर्नच्या कापणीनंतर त्याचा जो उर्वरित भाग असतो, तो जनावरांसाठी चारा म्हणून वापरता येऊ शकतो. शेतकरी त्याचा हिरवा चारा म्हणूनही वापर करू शकतात किंवा कापून सुकवल्यानंतर सुकी पेंडही बनवता येतो. मक्याचे खाद्य हे जनावरांसाठी अतिशय पौष्टिक मानले जाते. त्याचा चारा जनावरांना दिल्याने त्यांची दूध उत्पादन क्षमताही वाढते.

    फायदेमंद शेतीसाठी बेबी कॉर्न हा एक अगदी उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात बेबीकॉर्नचे उत्पादन घ्यायचे असेल मात्र तुम्हाला पैशांचा प्रश्न भेडसावत असेल, तर शासनाकडून तुम्हाला कर्ज मिळू शकते. भारत सरकार मका आणि बेबी कॉर्नच्या लागवडीसंदर्भात शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतकरी कर्ज उपलब्ध करून देते. याच्या सहाय्याने तुम्ही बेबी कॉर्नची शेती करून लाखोंनी पैसे कमवू शकता.

    अशा या बेबी कॉर्न लागवड ची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. हा लेख जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि नवी अर्थक्रांतीच्या यू ट्यूब चॅनलला आत्ताच subscribe करा.


    आणखी वाचा