Tag: agriculture

  • शेतजमिनीच्या विक्रीचा इन्कम टॅक्स नियम; किती कर भरायचा, पैशांची बचत कशी कराल?

    शेतजमिनीच्या विक्रीचा इन्कम टॅक्स नियम; किती कर भरायचा, पैशांची बचत कशी कराल?

    शेती हा भारतीयांचा पारंपरिक व्यवसाय असून आजही ग्रामीण भागातील मुख्य रोजगार निर्मिती शेती किंवा शेतीशी संबंधित उद्योगातून होते. शेतीमुळे भारतीय लोकांच्या उदरभरणाची सोय होते. ज्या जमिनीत वर्षभरात कोणते ना कोणते पीक घेण्यात येते ती जमीन म्हणजेच शेतजमीन. आयकर कायद्याच्या दृष्टीने शेतजमिनीचे दोन प्रकार आहेत.
    ग्रामीण शेतजमीन
    ◆ शहरी शेतजमीन

    ग्रामीण शेतजमीन: अगदी अलीकडील जनगणनेनुसार (Census 2011) दहा हजार लोकसंख्या असलेल्या शहराच्या हद्दीबाहेर 2 किमी अंतर, दहा हजाराहून अधिक परंतु एक लाखाहून कमी लोकसंख्या असल्यास हे अंतर 6 किमी आणि एक लाखांहून अधिक लोकसंख्या असल्यास 8 किमी परिधाबाहेरील शेतजमीन ही ग्रामीण शेतजमीन समजण्यात येते. हे अंतर मोजताना हवाई अंतराचा (Aerial distance) विचार केला जातो.

    Investing in a plot in Talegaon offers several financial benefits FB 1200x700 compressed

    ● आयकर कायद्यातील कलम 45 नुसार ग्रामीण शेतजमीन ही मालमत्ता समजली जात नसल्याने त्यातून मिळणारे उत्पन्न हे शेतीचे उत्पन्न असल्याने त्यावर कलम 10(1) नुसार कोणतीही करआकारणी केली जात नाही. जर याशिवाय अन्य उत्पन्न असेल तर विवरणपत्र भरताना शेतीपासून मिळालेले उत्पन्न करमुक्त उत्पन्न म्हणून विहित नमुन्यात जाहीर करावे लागते.

    ● या जमिनीच्या विक्रीतून होणारा नफा/तोटा हा भांडवली नफा/तोटा मानला जात नाही. त्यामुळे त्याच्यावर कोणतीही आयकर आकारणी होत नाही. याला अपवाद जमिनीची खरेदी विक्री करणारे व्यापारी, त्याच्या दृष्टीने शेतजमीन ही खरेदी विक्री करण्याची व्यावसायिक वस्तू असल्याने या व्यवहारातून मिळणारे उत्पन्न हे त्यांचे व्यावसायिक उत्पन्न समजून त्यावर करआकारणी केली जाते.

    शहरी शेतजमीन: वर उल्लेख केलेल्या शेतजमिनी व्यतिरिक्त अन्य सर्व शेतजमीन ही शहरी शेतजमीन समजली जाते.

    ● शहरी शेतजमीन ही भांडवली मालमत्ता मानण्यात येते त्यामुळे ती धारण अथवा खरेदी केल्यापासून दोन वर्षांनी विकल्यास त्यातून मिळणारा नफा तोटा हा दीर्घकालीन भांडवली नफा तोटा समजण्यात येतो. त्यावर महागाई निर्देशांकातील फरकाचा लाभ (Indexation benefit) घेता येतो त्यावर 20% या एकाच दराने कर आकारणी केली जाते.

    fcba7005 dc91 4648 bf76 334f396fb905

    ● व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) किंवा त्यातील सदस्य शहरी शेतजमीनीतून मागील दोन वर्षात शेतीचे उत्पन्न मिळवत असतील तर त्यांना सदर जमीन विक्रीतून होणाऱ्या भांडवली नफ्यावरील करातून काही प्रमाणात सूट मिळू शकते.
    * जमीन हस्तांतरित केल्यापासून दोन वर्षांच्या आत नवीन शेतजमीन खरेदी करावी.

    ● करलाभ (54B) मिळवण्यासाठी खरेदी केलेली जमीन त्यापुढील तीन वर्षे विकता येत नाही.

    • विक्री वर्षाचे आयकर विवरण पत्र भरण्यापूर्वी जर शेतजमीन खरेदी करता येत नसेल, तर भांडवली लाभाची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेच्या भांडवली लाभ खात्यात जमा करावी. सदर रक्कम पुढे केव्हाही शेतजमीन खरेदी करण्यासाठी वापरता येईल. या खात्याचे व्याजदर बदलत असतात सध्या यावरील व्याजदर 7.15% प्रतिवर्षं असून व्याज करपात्र आहे. जर दोन वर्षात ही रक्कम वापरता आली नाही, तर ती भांडवली लाभ म्हणून पुन्हा करपात्र होईल.
    • विहित मुदत आणि मर्यादेत ही रक्कम राहते. घर घेण्यासाठी वापरल्यास त्यावर कर द्यावा लागणार नाही (54F), सध्या ही मुदत व्यवहार होण्यापूर्वी एक वर्ष ते व्यवहार झाल्यावर दोन वर्षाच्या आत असून त्याची अधिकतम मर्यादा 10 कोटी रुपये आहे.
    • पन्नास लाख रुपयांच्या मर्यादेतील भांडवली नफा सहा महिन्यांच्या आत मान्यताप्राप्त पायाभूत सुविधा रोख्यात गुंतवली असता त्या रकमेवर कर (54EC) भरावा लागत नाही. हे रोखे पाच वर्ष मुदतीचे असून त्यावर 5.25% व्याज प्रतिवर्षं मिळते. Rural Electric Corporation, Power Finance Corporation, Indian Railway Finance Corporation याचे रोखे वर्षभर आलटून पालटून सातत्याने येत असतात, त्यावर मिळणारे व्याज करपात्र आहे.
    • खरेदी केलेल्या जमिनीची किंमत भांडवली लाभाएवढी किंवा अधिक असल्यास भांडवली लाभ कर द्यावा लागणार नाही.
    • जर लाभ कमी असेल तर लाभातील फरकावर भांडवली लाभ कर द्यावा लागेल.

    शेतजमीन आणि कर यावर सातत्याने विचारले जमणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

    ★ ग्रामीण शेतजमीन हेच माझे उत्पन्नाचे साधन असून माझे इतर उत्पन्न आपले उत्पन्न आयकर मर्यादेहून कमी आहे, तर मला आयकर विवरणपत्र भरावे लागेल का?
    ■ आपले उत्पन्न विवरणपत्र भरण्याच्या सध्याच्या तीन लाख या मर्यादेहून कमी आहे, विक्री केलेली शेतजमीन भांडवली मालमत्ता म्हणून जमजली जात नसल्याने आयकर विवरणपत्र भरण्याची आवश्यकता नाही.

    ★ शहरी शेतजमीन विक्रीतून येणारी रक्कम निवासी घरात गुंतवल्यास आयकरात सवलत मिळेल का?
    ■ हो, यातील गुंतवणूक मुदत आणि मर्यादा यांचे पालन करावे.

    ★ शेतजमीन खरेदी करताना मुळातून कर (TDS) कापून घेतला जातो का?
    ■ शहरी शेतजमीन ही मालमत्ता समजली जात असल्याने पन्नास लाखांवरील व्यवहारावर 1% दराने मुळातून कर (कलम 194IA) कापला जाईल. ग्रामीण शेतजमीन खरेदी करताना असा कर कापला जाणार नाही.

    ★ शेतजमीन विक्री व्यवहार रोख रकमेत करता येईल का?
    ■ आयकर कायद्यातील तरतुदीनुसार (कलम 269ST) दोन लाखाहून अधिक रकमेचा व्यवहार रोख रकमेत करता येत नाही. ही तरतूद सर्व शेतजमीन विक्री व्यवहाराना लागू आहे.

    ★ आयकर कायद्यानुसार शेतजमीन खरेदीसाठी 54B, निवासी घरासाठी 54F आणि पायाभूत सुविधा रोखे 54EC यासाठी मिळणाऱ्या एक वा अधिक सवलती एकाच विक्री व्यवहारासाठी वापरता येतील का?
    ■ कायद्यात वरील प्रत्येक तरतूदी वेगवेगळ्या असून त्यात कोणतीही एक तरतूद एकाच व्यवहारासाठी वापरता येईल असे म्हटले नसल्याने एकाच व्यवहारासाठी एक वा अनेक तरतुदींचा एकत्रित लाभ मिळवण्यास कोणतीही कायदेशीर अडचण नाही.

    ©उदय पिंगळे, अर्थ अभ्यासक

    (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत लेखातील मते वैयक्तिक आहेत)

  • जाणून घ्या खरबूज शेतीविषयी संपूर्ण माहिती

    जाणून घ्या खरबूज शेतीविषयी संपूर्ण माहिती

    तापमान: खरबूज शेतीसाठी सरासरी तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअस असावे.

    पाऊस: खरबूज शेतीसाठी दरवर्षी 50 ते 75 सेंटीमीटर पाऊस आवश्यक असतो.

    आर्द्रता: खरबूज शेतीसाठी आर्द्रता 50 ते 60 टक्के असावी.

    प्रकाश: खरबूज शेतीसाठी पुरेसा सूर्यप्रकाश आवश्यक असतो.

    a-complete-guide-to-muskmelon-farming

    खरबूज शेतीसाठी आवश्यक जमीन खालीलप्रमाणे आहे:

    जमीनीचा  प्रकार: खरबूज शेतीसाठी हलकी, सुपीक आणि निचरा होणारी जमीन योग्य असते.

    जमिनीचा pH: खरबूज शेतीसाठी जमिनीची pH 6.0 ते 7.0 असावी.

    a-complete-guide-to-muskmelon-farming

    खरबूज शेतीची जोपासणी खालीलप्रमाणे केली जाते

    आंतरपिके: खरबूज शेतीत आंतरपिके घेऊन उत्पादन वाढवता येते. खरबूजसोबत वाल, मका, मूग, उडीद इत्यादी पिके घेता येतात.

    खत व्यवस्थापन: खरबूज शेतीसाठी चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर केला जातो. खरबूजाच्या शेतात रोप लावण्यापूर्वी 15 ते 20 किलो शेणखत प्रति रोप या प्रमाणात देऊन जमिनीची चांगली मशागत केली जाते.

    पाणी व्यवस्थापन: खरबूज शेतीसाठी नियमित पाणी देणे आवश्यक असते. खरबूजाच्या रोपट्याला लागवड केल्यानंतर 7 ते 10 दिवसांनी पहिल्यांदा पाणी दिले जाते. त्यानंतर 10 ते 15 दिवसांनी पुन्हा पाणी दिले जाते. फळधारणेच्या काळात पाण्याची आवश्‍यकता जास्त असते.

    आंतरमशागत: खरबूजाच्या शेतात वेळोवेळी आंतरमशागत करून तण काढून टाकले जाते. तण काढल्याने जमिनीत हवा खेळती राहते आणि मुळांना ऑक्सिजन मिळतो.

    कीड व रोग नियंत्रण: खरबूजाच्या शेतात कोळंबी, फळमाशी, फुलकिडे, पाने खाणारी अळी इत्यादी किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. या किडी आणि रोगांचा नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशके आणि बुरशीनाशके वापरली जातात.

    खरबूज शेतीतून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी वरील गोष्टींचे काळजीपूर्वक पालन करणे आवश्यक आहे.

    आणखी वाचा

  • जाणून घ्या स्वीटकॉर्न शेतीविषयी संपूर्ण माहिती

    जाणून घ्या स्वीटकॉर्न शेतीविषयी संपूर्ण माहिती

    All-you-need-to-know-about-sweet-corn
    जाणून घ्या स्वीटकॉर्न शेतीविषयी संपूर्ण माहिती

    शेतकरी सातत्यान चांगलं पिक घेण्याचा प्रयत्न करतात परंतु कधीकधी त्यांना हवामानाचा आणि नैसर्गिक आपत्तींचा  सामना करावा लागतो.  अशा वेळी ते आपल्या शेतात हे पिक घेऊन भरघोस नफा कमवू शकतात. आज आपण या लेखाच्या माध्यमातून स्वीटकॉर्न ची शेती कशी करावी या विषयी माहिती घेऊयात. 

    आवश्यक हवामान आणि जमीन – 

    तसे तर  स्वीटकॉर्न  च्या शेतीसाठी कोणतीही जमीन चालते पण पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन जास्त फायदेशीर ठरते. ही एक उष्णकटिबंधीय वनस्पती आहे . या मक्यासाठी मातीची इष्टतम  PH श्रेणी 6.5 -7.5 इतकी आहे . उगवणीसाठी तापमानाची कक्षा 21 ते 32  डिग्री सेल्शियस इतकी आहे .  लागवड करण्याआधी मातीचे परीक्षण करून घ्यावे. स्वीटकॉर्न हे वाढीसाठी पोषकतत्त्वांची मागणी करणारे पिक आहे. या पिकाच्या वाढीसाठी नायट्रोजन ,  २ स्फरस, आणि  शियमची गरज असते. हे पिक खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाऊ शकते.  

    अशी करा लागवड –

    All-you-need-to-know-about-sweet-corn

    स्वीटकॉर्न ची लागवड ही मक्यासारखीच असते. आणि विशेष म्हणजे यामध्ये  मका पूर्ण परिपक्व होण्याआधीच तिची काढणी केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना झटपट नफा मिळवता येतो . चांगले पिक येण्यासाठी जमिनीमध्ये खाते आणि इतर पोषक तत्त्वांचा समावेश करणे गरजेचे आहे. लागवड करताना जमिनीत 20:20:20 हे खत हेक्टरी 100 किलो टाकावे आणि 10 किलो मायक्रोन्यू ३ टाकावेत.

    उन्हाळी हंगामात २-३ उथळ मशागतीची कामे आवश्यक असतात. खोल नांगरणी तण नियंत्रित करण्यासाठी आणि प्रभावी ओलावा संवर्धनासाठी देखील उपयुक्त आहे.

    बियाणे दर:

    All-you-need-to-know-about-sweet-corn

    1. शुद्ध पिकासाठी: 20-25 किलो/हे

    2. चारा मक्यासाठी: 40-50 किलो/हे

    3. सोयाबीनसह आंतरपीक घेण्यासाठी: 10kg/हेक्टर (1:3) किंवा 15 kg/hector (1:2)

    लागवड करताना अंतर 65X20 किंवा 75X20  इतके ठेवावे .

    जोपासणी –

    All-you-need-to-know-about-sweet-corn

    या पिकासाठी 75 ते 80% ओलावा असणारी जमीन उत्तम ठरते . मक्याची दोन वेळा आंतरमशागत आणि दोन वेळा हाताने खुरपणी केली जाते.  पहिल्या वेळेस केलेली आंतरमशागत रोपांमधल्या अर्थिंग साठी फायदेशीर असते. तण काढून टाकण्यासाठी तणनाशके आणि आंतरमशागती यांचा एकत्र वापर महत्त्वाचे तंत्र ठरू शकते. पावसाच्या उपलब्धतेवर सिंचनाचा कालावधी 6 ते 10 दिवस  इतका असतो . 

    परिपक्वतेची चाचणी अशी करा –

    भुसाचे आवरण फिकट तपकिरी रंगाचे होते आणि दाणे बोटांच्या नखेने दाबणे खूप कठीण होते.

    काढणी –

    All-you-need-to-know-about-sweet-corn

    काढणीनंतर एक ते दोन दिवस रोपे शेतात सोडावीत. भुसा काढा आणि दाण्यांना 2-3 दिवस सूर्यप्रकाशात ठेवा. लाठी मारून किंवा हाताने किंवा शक्तीने चालवल्या जाणार्‍या मक्याच्या शेलर्सचा वापर करून शेलिंग करता येते.

     स्वीटकॉर्न  चा दर 140 – 200 रुपये प्रतिकिलो आहे. 

  • शेतकऱ्यांसाठी सरकारच्या टॉप 8 बेवसाईट्स

    शेतकऱ्यांसाठी सरकारच्या टॉप 8 बेवसाईट्स

    1. माती आरोग्य कार्ड योजना

    मातीचं आरोग्य तपासून पीक घेण्यासाठी शासनाकडून सॉईल हेल्थ कार्ड ही योजना सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कार्ड मिळवण्यासाठी जवळच्या सेतू किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध असेल अशा ठिकाणी जाऊन www.soilhealth.dac.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर या पोर्टलमध्ये आपले स्वतःचे खाते तयार करावे लागते. या कार्डअंतर्गत त्या भागातील प्रयोगशाळेत मातीचे आरोग्य तपासले जाते. त्यावरुन संबंधित शेतातील मातीत कोणते पीक चांगले येऊ शकेल, त्याला पोषक औषधे आणि त्यांचे प्रमाण कसे असावे, याची माहिती मिळवता येते. या सुविधेमुळे शेतकरी आपल्या शेतीला पोषक असे पिक घेऊ शकतात. या संकेतस्थळावर मराठी भाषेसह एकूण 22 भाषांचा पर्याय उपलब्ध आहे.

    2. शेतकरी पोर्टल

    3. मेरा किसान पोर्टल

    हे एक मोबाईल किसान पोर्टल म्हणून परिचित आहे. www.mkisan.gov.in या वेबसाईटवर शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध प्रकारची माहिती मिळवता येते. त्यासाठी अगोदर या संकेतस्थळाचा सदस्य होणं आवश्यक आहे. त्यानंतर शेतकरी थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. तसेच मोबाईल सेवेद्वारे एसएमएसद्वारेही माहिती मिळवू शकतात. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्हीही भाषांचा पर्याय या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

    4. पंतप्रधान पीक विमा योजना

    शेतकऱ्यांवर विम्याचे कवच असावे यासाठी सरकारने ही योजना सुरु केली. या योजनेतर्गत प्रत्येक पिकावर विमा पद्धत उपलब्ध आहे. www.agri-insurance.gov.in या वेबसाईटवर मेंबर होणं गरजेचे आहे. त्यानंतर विम्यासाठी ऑनलाईन अर्जही करता येतो. स्वत:शी संबंधित सर्व माहिती भरल्यानंतर हिंदी भाषेत पुढील पर्याय उपलब्ध आहेत.

    5. पंतप्रधान कृषी विकास योजना

    शेतकरी पावसावर अवलंबून असतो. मात्र हे अवलंबित्व कमी करुन प्रत्येक शेतात पाणी पोहचवण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली. शेतात पाणी साठवणे, सिंचन आणि जलसंधारणाचे विविध पर्याय www.pmksy.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सोबतच शासनाच्या या उपक्रमांतर्गत येणाऱ्या सर्व योजनांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

    6. राष्ट्रीय शेती बाजार

    शेतकऱ्यांना त्यांचा माल आवडत्या बाजारात विकता यावा किंवा ग्राहकांना कोणत्या मालाचा बाजारबाव काय आहे याची घरबसल्या माहिती घेता यावी या उद्देशाने राष्ट्रीय शेती बाजार या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. agmarknet.dac.gov.in या संकेतस्थळावर जाऊन शेती मालाचा सध्याचा बाजारभाव तसेच ग्राहकांनाही ऑनलाईन बाजारभाव पाहता यावा याविषयीचे पर्याय उपलब्ध आहेत. पीक निवडून राज्य, जिल्हा, तालुका आणि जवळची बाजारपेठ निवडणे असे पर्याय या संकेतस्थळावर आहेत.

    7. ई-राष्ट्रीय शेती बाजार

    राष्ट्रीय शेती बाजार या योजनेप्रमाणेच शेतीमाल विक्री किंवा बाजारात शेतीमाल येण्याची वेळ, बाजारभाव आणि खरेदी विक्री यांची माहिती www.enam.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सध्या या संकेतस्थळावर देशभरातील काही मुख्य बाजारपेठांचा समावेश केला आहे. त्या बाजारपेठेमध्ये सध्या कोणत्या शेतीमालाला काय बाजारभाव मिळत आहे, हे पाहता येते. सोबतच ग्राहकांना देखील या संकेतस्थळाद्वारे खरेदी करण्यासाठी बाजारभावाविषयी खात्रीशीर माहिती मिळवता येते.

    8. राष्ट्रीय यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान पोर्टल

    शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीची कास धरायला लावणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. www.farmech.dac.gov.in या वेबसाईटला भेट दिल्यानंतर शेतीत आधुनिकीकरण कसं आणावं याबाबत सर्व माहिती उपलब्ध आहे. कोणत्या पिकासाठी कोणत्या यंत्राचा कसा वापर करावा ते या वेबसाईटवर व्हिडीओसह उपलब्ध आहे. यामुळे आधुनिक पद्धतीने शेती करणं सोप आहे…


  • तुमच्या शेतात मोती फुलवा आणि लाखो रुपये कमवा

    तुमच्या शेतात मोती फुलवा आणि लाखो रुपये कमवा

    आपल्या शेतात सुंदर सुंदर मोती, त्या मोत्यांना असलेली वाढती मागणी आणि त्यातून मिळणारे भरमसाठ पैसे, वा..! तुम्ही थोड्याच दिवसात लखपती होऊ शकता. हो हो पण जरा थांबा. कसंय स्वप्न बघायला काहीच लागत नाही ओ, मात्र ती स्वप्नं पूर्ण करायला खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यात तुम्ही मोत्यांची शेती करणार म्हटल्यावर मेहनतीशिवाय पर्यायच नाही.

    पहिल्यांदा आपण पाहूया ही शेती कशी केली जाते? त्यातून कसा फायदा मिळतो? याचं मार्केटिंग कसं केलं जातं?

    मोत्यांची शेती हा मत्स्यपालन प्रकाराचाच भाग आहे. यामध्ये ऑयस्टर पाळले जातात. ऑयस्टर म्हणजेच कालवे. हा शिंपल्यांचाच एक प्रकार असतो. कोकण्यात या कालव्यांची मस्त झणझणीत चटणी किंवा कालवं मसाला बनवलं जातं, त्याची चव आहा अप्रतिम. त्यात ते मस्त चुलीवर बनवलं असेल, तर मग काही विषयच नाही. स्वर्ग सुख! एकदा तुम्ही हे कालवं मसाला खाऊनच बघा. sorry sorry मी चुकून जरा मेजवानी परिपूर्ण किचन मध्ये घुसतिये… तर आपला मुद्दा आहे शेतीचा. हा तर, हे जे ऑयस्टर असतात म्हणजेच काल. ते गोळा करून त्यावर शस्त्रक्रिया करून, रोपन करून मग मोती गोळा केले जातात.  

    ही शेती करण्यासाठी 20*30 आकाराचा तलाव लागू शकतो. त्याची खोली 5-6 फुट खोल असावी लागते. तलाव उभा करण्यास जर पुरेशी जागा किंवा आर्थिक सोय नसेल, तर तुम्ही घरच्या घरी एक टाकी बनवून मोत्यांची शेती करू शकता. टॅंकच्या किंवा तलावाच्या अवतीभवती हिरवळ कायम राखण्यासाठी तुम्ही झाडं किंवा वेली लावू शकता. टॅंकमध्ये काही दिवस ऑयस्टर ठेवल्यानंतर त्याची शस्त्रक्रिया केली जाते.  ऑयस्टर शस्त्रक्रिया 15 दिवसांनी केली जाते.

    शस्त्रक्रियेअंतर्गत, देवाच्या किंवा फुलांच्या पानांच्या साध्या किंवा डिझाइनर मण्यासारख्या आकृत्या प्रत्येक ऑयस्टरमध्ये घातल्या जातात, 4 ते 6 मिली व्यासाचा. त्याची दोन्ही आवरणे हळुवार पद्धतीने उघडून त्यात त्यात बिया सोडल्या जातात आणि शिंपले बंद केले जातात. या ज्या बिया असतात, त्या जंगली वनस्पती पासून बनवल्या जातात. यासाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता किंवा जवळच्या कृषी-केंद्रातून देखील माहिती मिळवू शकता.

     हे ऑयस्टर नंतर नायलॉनच्या पिशव्यांमध्ये ठेवले जातात आणि बांबू किंवा पीव्हीसी पाईपमध्ये टांगल्या जातात आणि एक मीटर खोलीवर तलावामध्ये सोडल्या जातात. या ऑयस्टरचे खाद्य म्हणजे शेवाळ आणि जनावरांची विष्ठा. दीड, दोन वर्षं तलावात शेवाळ आणि जनावरांची विष्ठा टाकली, तर दोन वर्षानंतर शिंपल्यातील मोती परिपक्व झालेले असतात. यामध्ये सर्वात कठीण आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे. बीज तयार करून त्याचे रोपण करणे. त्यामुळे हे करताना योग्य मार्गदर्शन घेवूनच करावे. 

    एका शिंपल्यात दोन मोती तयार होतात हे, दोन मोती तयार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातील साधारण 70 रुपये खर्च करावे लागतात आणि त्या 70 रुपयांचे 2 वर्षानंतर तुम्हाला 3 ते 4 हजार रुपये मिळू शकतात. एका हंगामात तुम्हाला एका टॅंक मध्ये कमीत कमी 5000 मोती मिळू शकतात. त्या 5000 पैकी समजा 4000 मोती वाचले, तर तुम्हाला त्याचे साधारण ६० लाख रुपये मिळू शकतात. मात्र ही सगळी प्रक्रिया काळजीपूर्वक केली पाहिजे.

    कुठेही चूक झाल्यास शिंपल्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊन नुकसान होऊ शकते. त्यामुळे या व्यवसायात मोठी जोखीम देखील असते. मात्र एकदा का तुम्हाला या शेतीची संपूर्ण टेक्निक समजली की मग तुम्ही मालामालच!

    मोती तयार झाले की. दूसरा मुद्दा येतो तो विक्रीचा. सुरत, अहमदाबाद, हैदराबाद, मुंबई या शहरांमध्ये मोत्यांची मोठी बाजारपेठ आहे. मोत्यांची गुणवत्ता उच्चप्रतीची असल्यास त्याला बाराशे रुपये कॅरेट इतकी किंमत मिळते.   

    तुम्हाला वाटत असेल हे खूप रिस्की काम आहे, पण घाबरू नका, अशा बऱ्याच संस्था आहेत, ज्या या शेतीचं प्रशिक्षण देतात तसेच प्रत्येक जिल्ह्यात कृषी केंद्रं असतात, तिथे तुम्हाला उपयुक्त माहिती मिळू शकते आणि कसंय ना जो पर्यंत आयुष्यात risk नाही, तोपर्यंत मजा नाही. काय म्हणता? पटतंय ना!

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी
  • शेतजमीन विकत घ्यायची आहे का? वाचा या 5 गोष्टी, नाहीतर पडाल नुकसानीत!

    शेतजमीन विकत घ्यायची आहे का? वाचा या 5 गोष्टी, नाहीतर पडाल नुकसानीत!

    बारामतीत जमीन खरेदीत शेतकऱ्याची 5 लाख रुपयांची फसवणूक.
    भावाभावात शेतजमिनीच्या हद्दीपायी बेदम हाणामारी.
    एकाने शेतकऱ्याची 7 एकर जमीन शिताफीने लुबाडली.

    अशा एक ना अनेक बातम्या आपण रोज वाचत असतो, ऐकत असतो. तर मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की, मूळ जमिनीचा मालक वेगळाच असतो आणि बनावट कागदपत्रे करून दुसऱ्याच कोणाकडून तरी जमिनीचे व्यवहार होतात आणि मग वेळ निघून गेल्यावर ते लक्षात येते. तसेच जमिनीवर कर्ज काढून खोटी कागदपत्रे तयार करून देखील जमिनीची विक्री केली जाते, तर अशावेळी कोणती दक्षता घेतली पाहिजे? चला तर पाहूया…

    1. सातबारा उतारा तपासा

    सातबारा उतारा हा जमिनीचा अधिकृत दस्तावेज असतो. यावर जमिनीचे क्षेत्रफळ, मालकाचे नाव, जमिनीचा प्रकार, कर्जाचा बोजा, न्यायालयीन खटल्याची नोंद इत्यादी माहिती असते. त्यामुळे सातबारा उतारा तपासून घेतल्यास, जमिनीशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास त्याची माहिती मिळू शकते. सातबारा उतारा तहसील कार्यालयातून किंवा तलाठ्याकडून मिळू शकतो.

    2. भूधारणा पद्धत तपासा

    महाराष्ट्रात भूधारणा पद्धतीनुसार जमिनीचे वर्गीकरण केले जाते. भोगवटादार वर्ग-1 मध्ये येणाऱ्या जमिनीची खरेदी-विक्री करण्यात कोणतेही निर्बंध नसतात. मात्र, भोगवटादार वर्ग-2 मध्ये येणाऱ्या जमिनीची खरेदी-विक्री करताना सरकारी अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. भूधारणा पद्धत तहसील कार्यालयातून तपासून घेता येते.

    3. शेतजमीनचा मूळ मालक कोण आहे हे तपासा

    शेतजमीन विकत घेताना त्या जमिनीचा मूळ मालक कोण आहे हे तपासणे आवश्यक आहे. अन्यथा, जमिनीची खरेदी केल्यानंतर मूळ मालकाकडून वाद होऊ शकतो. जमिनीचा मूळ मालक कोण हे सातबारा उतारावरून तपासून घेता येते.

    4. जमिनीचा खरेदी-विक्री करार नोंदणी करा

    शेतजमिनीची खरेदी-विक्री करार नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत करारामुळे, भविष्यात कोणत्याही वादात, कराराची नोंदणी हा महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. जमिनीच्या खरेदी-विक्री करारासाठी वकीलाचा सल्ला घेणे चांगले.

    5. वकीलचा सल्ला घ्या

    शेतजमीन विकत घेताना वकीलचा सल्ला घेणे देखील चांगले. वकील तुम्हाला जमिनीशी संबंधित सर्व कायदेशीर बाबींची माहिती देऊ शकतो. जमिनीशी संबंधित कोणताही वाद असल्यास, त्या बाबतीत वकीलाचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते.

    वरील गोष्टींची काळजी घेतल्यास, शेतजमीन विकत घेताना फसवणूक होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

    आणखी वाचा