व्यवसाय मालक म्हणून, आपल्या मालमत्तेचे रक्षण करणे ही आपल्या यशाची आणि दीर्घकालीन टिकून राहण्याची गुरुकिल्ली आहे. उपकरणे आणि वस्तू यांसारख्या भौतिक मालमत्तेपासून ते ग्राहकांचा डेटा आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी यांसारख्या डिजिटल मालमत्तेपर्यंत, सुरक्षा उपाययोजना करताना अनेक गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. या लेखात, आपण आपल्या व्यावसायिक मालमत्तेचे रक्षण कसे करावे?, यासाठी काही सोपे आणि प्रभावी मार्ग पाहणार आहोत. चला तर, सुरुवात करूयात.
१. धोक्यांचे मूल्यांकन करा सर्वात प्रथम, आपल्या मालमत्तेला कोणत्या प्रकारचे धोके असू शकतात, हे समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी, आतील आणि बाहेरील दोन्ही प्रकारच्या धोक्यांचे मूल्यांकन करणारे एक सखोल “जोखीम मूल्यांकन” (Risk Assessment) करा. भौतिक सुरक्षा (जसे की, CCTV वगैरे.), सायबर सुरक्षा, कर्मचारी चोरी आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या गोष्टींचा विचार करा. धोक्यांची जाणीव झाल्यावर, आपण त्यांना रोखण्यासाठी योजना आखू शकता.
२. प्रवेशावर नियंत्रण ठेवा संवेदनशील क्षेत्र आणि माहितीमध्ये प्रवेश मर्यादित करणे, हे आपल्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाचे आहे. यासाठी, RFID कार्ड, पासवर्ड लॉक आणि बायोमेट्रिक स्कॅनर यांसारख्या प्रवेश नियंत्रण उपाययोजना राबवा. यामुळे अनधिकृत प्रवेश आणि चोरी रोखण्यास मदत होईल.
३. सुरक्षा प्रणालींमध्ये गुंतवणूक करा सीसीटीव्ही कॅमेरे, अलार्म आणि सॉफ्टवेअर यांसारख्या सुरक्षा प्रणाली स्थापित करणे आपल्या व्यावसायिक मालमत्तेसाठी अतिरिक्त सुरक्षा प्रदान करते. या प्रणाली चोरी आणि तोडफोड रोखण्यास मदत करतात आणि सुरक्षा घटना घडल्यास पुरावे देखील देतात. यासोबतच तुम्ही आपल्या स्थानिक व्यावसायिक कुलूप बनवणाऱ्याशी संपर्क करून स्मार्ट किंवा अतिरिक्त टिकाऊ लॉक मिळवू शकता. तुमच्या मौल्यवान मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी गुणवत्तेवर आधारित सुरक्षा (Security) प्रणालींवर गुंतवणूक करणे हा फायद्याचा खर्च ठरतो.
४. डेटाचा नियमितपणे बॅकअप ठेवा आजच्या डिजिटल युगात, डेटा सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. सायबर हल्ला, हार्डवेअर खराब होणे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे डेटा गमावण्यापासून बचाव करण्यासाठी आपण नियमितपणे डेटा बॅकअप घेणे आवश्यक आहे. ऑफसाईट किंवा क्लाऊड बॅकअप डेटा सुरक्षित ठेवण्यास मदत करतील. विश्वासार्ह बॅकअप घेऊन, तुम्ही खात्री बाळगू शकता की, तुमची महत्त्वाची व्यावसायिक माहिती सुरक्षित आहे.
५. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या आपले कर्मचारी हे आपल्या मालमत्तेचे रक्षण करण्यातील पहिली पायरी आहेत. त्यांना सुरक्षा प्रोटोकॉल आणि आपत्कालीन प्रक्रियांबद्दल प्रशिक्षण द्या. यामुळे ते सुरक्षा धोक्यांना ओळखण्यास आणि त्यांचा सामना करण्यास सक्षम बनतील. तुमच्या मालमत्तेचे प्रभावीपणे रक्षण करण्यात मदत करण्यासाठी तुमच्या संस्थेमध्ये सुरक्षा जागरूकता संस्कृतीला प्रोत्साहन द्या.
या सोप्या पद्धतींचा अवलंब करून आपण आपल्या व्यावसायिक मालमत्तेचे रक्षण करू शकता. तसेच, आपल्या यशाची आणि दीर्घकालीन टिकून राहण्याची शक्यता वाढवू शकता.
तुम्ही जर एक व्यावसायिक असाल, तर हा लेख लाईक केल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाहीत. तसेच, तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरील लेख वाचायला आवडतील, हे देखील कमेंट करून नक्की सांगा. सर्वात महत्त्वाचं तर राहिलंच… तुमच्या व्यावसायिक मित्रमंडळींनाही हा माहितीपूर्ण लेख नक्की शेअर करा.
फेसबुक… हे नाव आपण ऐकले किंवा पाहिल्यानंतर आपल्याला सर्वात पहिलं दिसतं, ते म्हणजे फोटो, व्हिडिओ, मीम्स आणि असं बरंच काही. लहानांपासून ते म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी फेसबुक हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. ही झाली फेसबुकची एक बाजू. मात्र, याची दुसरी बाजूही आपण समजून घेतली पाहिजे. ती म्हणजे, फेसबुक हे फक्त मनोरंजनाचे किंवा वेळ घालवण्याचे माध्यम नाहीये. खरं तर, फेसबुक लघु उद्योजकांपासून ते वर्षाकाठी हजारो कोटींचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकासाठी महत्त्वाचं आहे.
अनेकांनी फक्त फेसबुकचा वापर करून आपला व्यवसाय शिखरावर नेऊन ठेवला आहे. परंतु अनेक व्यावसायिक असे आहेत, ज्यांनी आपल्या व्यवसायासाठी अद्याप फेसबुकचा वापर सुरूच केला नाहीये. मात्र, त्यांनी जर फेसबुकचा वापर केला, तर त्यांच्या व्यवसायात वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. आजचा हा लेख, त्या लोकांसाठी आहे, ज्यांना आपल्या व्यवसाय अनेक पटींनी वाढवायचा आहे. चला तर, फेसबुकचा वापर करून तुम्ही तुमच्या व्यवसायाला ‘चार चांद’ कशाप्रकारे लावू शकता, हे जाणून घेऊयात…
प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर तुमचा व्यवसाय लहान आहे की मोठा, याने काहीही फरक पडत नाही. प्रत्येक व्यवसाय फेसबुक बिझनेस पेजेसचा फायदा घेऊ शकतो. फेसबुक हे राजकीय तक्रारी, मजेशीर मीम्स, दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यापेक्षा खूप काही आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायाचे फेसबुक पेज तयार करता, तेव्हा तुम्ही सध्याचे आणि भविष्यातील कस्टमर (ग्राहक) शोधताना तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स सुधारू शकता. व्यवसायासाठी फेसबुकचा वापर करणे खूपच सोपे आहे. योग्य स्ट्रॅटेजी (रणनीती) वापरून तुम्ही तुमचा व्यवसाय वेगाने वाढवू शकता.
फेसबुक बिझनेस पेजची ताकद
सर्वसाधारणपणे अनेक युजर्स हे दिवसातून एकदा का होईना फेसबुकवर फेरफटका मारतच असतात. दैनंदिन आयुष्यात काय घडतंय, याच्याशी जोडले राहण्यासाठी ते दिवसातून एकदा तरी फेसबुक स्क्रोल करतातच. फेसबुक युजर्सला त्यांच्या मित्र आणि कुटुंबाशी जोडलेले राहायचे असते. तसेच, जगात घडणाऱ्या गोष्टींमधून काही ना काही शिकायचे असते. तसेच, त्यांच्या आवडत्या ब्रँड आणि बिझनेससोबत जोडले राहायचे असते. जर तुम्ही तुमच्या व्यवसायाशी संबंधित काही अनाऊन्समेंट (घोषणा) केल्या असतील, तर त्यादेखील त्यांना जाणून घ्यायच्या असतात.
चला तर, फेसबुक बिझनेस पेजचे मोठे फायदे काय आहेत? हे आपण जाणून घेऊयात…
व्यवसायासाठी फेसबुक बिझनेस पेज वापरण्याचे फायदे
१. ऑनलाईन प्रेझेन्स सुधारणे २. डायरेक्ट कस्टमर एंगेजमेंट ३. किफायतशीर मार्केटिंग ४. ऍनालिटिक्स आणि इनसाइट्स ५. जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रवेश मिळतो
१. ऑनलाईन प्रेझेन्स सुधारणे
प्रत्येक व्यवसायासाठी फेसबुक पेज असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, फक्त फेसबुक पेज असणे गरजेचे नाही, तर तुम्ही त्यावर दरदिवशी काही ना काही पोस्ट केले पाहिजे. जेणेकरून, तुमच्या ग्राहकांना तुमच्या व्यवसायाशी जोडले जावेसे वाटेल. तुम्ही तुमच्या फेसबुक पेजवर काय पोस्ट करत आहात, हे त्यांना जाणून घ्यायचे असते. तसेच, त्या पोस्टवर कमेंट करून तुम्ही त्याला रिप्लाय (प्रतिसाद) द्यावा असेही त्यांना वाटत असते. अशात, जर ग्राहक तुमच्या पेजवर आले आणि त्यांना कोणतीही पोस्ट दिसली नाही, तर ते तुमच्या पेजला रामरामही ठोकू शकतात. त्यामुळे तुम्ही सातत्याने तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स (ऑनलाईन उपस्थिती) सुधरवणे खूपच गरजेचे आहे.
२. डायरेक्ट कस्टमर एंगेजमेंट
डायरेक्ट एंगेजमेंट हा एक फेसबुक बिझनेस पेजचा सर्वात मोठा फायदा आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हे इंटरॅक्शन्स सोपे व्हावे या अर्थाने डिझाईन केलेले असतात. विशेष म्हणजे, हे वैयक्तिक आणि बिझनेस या दोन्हींच्या बाबतीत लागू होते. त्यामुळे तुमच्या संभाव्य ग्राहकांना तुमच्याशी जोडून घेण्यासाठी त्यांच्याशी संबंध वाढवा. तुम्ही फक्त तुमच्या ग्राहकांना कमेंट आणि डायरेक्ट मेसेज करू शकत नाहीत, तर तुम्ही त्यांच्यासोबत तुमची मूल्ये, कौशल्य आणि कामाशी संबंधित आकडेवारीही शेअर करू शकता. नियमितपणे टार्गेटेड बातम्यांच्या फीडमध्ये दिसून तुम्ही तुमची कंपनी कशामुळे वेगळी बनते ते हायलाईट करू शकता.
३. किफायतशीर मार्केटिंग
आता अनेकांना वाटत असेल की, फेसबुक बिझनेस पेज सुरू करायचं म्हणजे, त्यासाठी कितीतरी रुपये खर्च करावे लागत असणार. मात्र, हा तुमचा गैरसमज आहे. फेसबुक बिझनेस पेज तयार करण्यासाठी एकही रुपया खर्च करावा लागत नाही. ही सुविधा मोफत आहे. मात्र, तुम्ही तिथे तुमच्या मार्केटिंग बजेटवर पैसे खर्च करू शकता. तुमच्या बिझनेस पेजची फॉलोईंग वाढवण्यासाठी आणि सोशल मीडिया स्ट्रॅटेजी कशी विकसित करायची, हे शिकत असताना फेसबुक जाहिरातीचाही विचार करा.
फेसबुक जाहिरातींद्वारे, तुम्ही फक्त तेव्हाच पैसे भरता, जेव्हा लोक तुमची जाहिरात पाहतात किंवा त्यावर क्लिक करतात. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचे आहे, हे ठरवले की, हे मार्केटिंग सर्वात किफायतशीर ठरते. त्यामुळेच आपल्या टार्गेट मार्केटचा विचार करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही फेसबुक जाहिरात टार्गेटिंगसाठी सर्वात आवश्यक असलेल्या डेमॉग्राफिक्सचा अभ्यास करा.
४. ऍनालिटिक्स आणि इनसाइट्स
तुम्ही एकदा फेसबुक बिझनेस पेज सुरू कसे करायचे हे शिकलात, की तुम्हाला प्रभावी अशा इनसाइट्स डॅशबोर्डचा ऍक्सेस मिळेल. तुमच्या साइटला भेट देणाऱ्या आणि तुमच्या पोस्टशी संवाद साधणाऱ्या लोकांचा ट्रेंड तुम्हाला दाखवण्यासाठी फेसबुक तुमच्यापुढे आकडेवारी आणून देते. याद्वारे तुम्ही तुमच्या जाहिरातींवर क्लिक करणाऱ्यांची संख्यादेखील पाहू शकता.
व्यवसायासाठी फेसबुक वापरण्याचा तुमचा दृष्टीकोन सुधारल्यामुळे हे उपयुक्त आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात कोणत्या गोष्टींची सुधारणा केली जाऊ शकते याबद्दल रियल-टाईम इनसाइट्स मिळतील. शेवटी, सोशल मीडिया मार्केटिंग योजना, सर्व मार्केटिंग स्ट्रॅटेजीप्रमाणे, आपण कालांतराने शिकत असताना बदलू शकता.
५. जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रवेश मिळतो
तुम्हाला रंजक बाब सांगतो. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण फेसबुकवर तब्बल तीनश कोटींहून अधिक लोकांचे अकाऊंट्स आहेत. तुमच्या टार्गेट प्रेक्षकांसाठी किंवा त्यांच्यापैकी काहींसाठी तुमच्या ब्रँडशी प्रथमच फेसबुकद्वारे ओळख करून देणे शक्य आहे. याला वर्ड-ऑफ-माऊथ मार्केटिंग म्हणून ओळखले जाते. बरेच लोक पैसे देऊन करणाऱ्या जाहिरातींपेक्षा मित्र, कुटुंब आणि अगदी अनोळखी लोकांच्या शिफारशींवर अधिक विश्वास ठेवतात. सोशल मीडियाच्या शब्दात सांगायचं झालं तर, वर्ड ऑफ माऊथ किंवा माऊथ पब्लिसिटी. म्हणजेच युजरच्या फेसबुक फीड किंवा इनबॉक्समध्ये शेअर्स, कमेंट्स, फॉलो इ. जेव्हा तुम्ही तुमच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये फेसबुकचा वापर करता, तेव्हा तुम्हाला या ऑरगॅनिक आउटरीचचा फायदा होतो.
अशाप्रकारे, फेसबुकचा वापर करून तुम्ही रुळावरून खाली उतरलेल्या तुमच्या व्यवसायाची गाडी पुन्हा रुळावर आणू शकता.
सोशल मीडियाच्या जगात वावरणाऱ्या मित्रमंडळींनो, तुम्हाला हा लेख कसा वाटला, हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच, तुमच्या कोणत्या मित्र-मैत्रिणींना त्यांच्या व्यवसायासाठी हा लेख फायदेशीर ठरू शकतो, असे वाटत असेल, तर त्यांनाही हा लेख नक्की शेअर करा. आणि हो, इतर कोणत्या विषयांवर लेख वाचायला आवडतील, हेदेखील कमेंट करून नक्की सांगा.
‘कोई भी धंदा छोटा नहीं होता और धंदे से बड़ा धर्म कोई नहीं होता’, हा डायलॉग आपण ऐकला असेलच. त्यामुळे आज आपण आजच्या लेखात धंदा/व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ टिप्स पाहणार आहोत. विशेष म्हणजे, या टिप्स इतर कुणी नाही, तर स्वत: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या इलॉन मस्कच्या आहेत. मस्क साहेबांची संपत्ती आजघडीला २१० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. म्हणजे आपल्या मुकेश अंबानींच्या दुप्पट.
मस्क हा PayPal, Tesla Motors, आणि SpaceX यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा संस्थापक आहे. मस्क त्याच्या नाविण्यपूर्ण विचारासाठी आणि जोखीम पत्करण्याच्या स्वभावासाठी ओळखला जातो. ज्या व्यक्तीच्या घरी श्रीमंती नांदते अशा मस्कला अनेकदा व्यवसाय चालवण्याबाबत सल्ला विचारला जातो. तेव्हा या लेखातून आपण त्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी सांगितलेल्या ५ महत्त्वाच्या टिप्स कोणत्या आहेत, हे पाहूयात…
इलॉन मस्कने व्यवसाय सुरू करण्यासाठी सांगितलेल्या ५ टिप्स (Elon Musk’s 5 Best Tips for Running a Business)
१. तुमच्या कामाप्रती कायम उत्साही राहा
धनाढ्य इलॉन मस्क (Elon Musk) याच्या मते यशस्वी होण्यासाठी तुम्ही जे काही करत आहात, त्याच्याबद्दल कायम उत्साही असलं पाहिजे. तो म्हणतो, “लोकांनी तेच केलं पाहिजे, ज्याची त्यांना आवड आहे. यामुळे त्यांना इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त आनंद मिळेल.”
२. जोखीम पत्करा
इलॉन मस्क असेही सांगतो की, तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल आणि तुमच्या बँक अकाऊंटमध्ये भर घालायची असेल, तर तुम्ही जोखीम पत्करण्यासाठी तयार असला पाहिजेत. २०१२ सालच्या एका मुलाखतीत मस्क म्हणाला होता की, “प्रत्येकजण एकाच साच्यात बसण्याचा प्रयत्न करत आहे. कारण, जोखीम घेण्याविरूद्ध एक प्रचंड पूर्वाग्रह आहे.” मस्कचा असाही विश्वास आहे की, कोणतीच जोखीम न घेणे, ही सर्वात मोठी जोखीम आहे. विशेषत: अशा जगात जे सातत्याने बदलत आहे. अपयशी ठरण्याची हमी एकमेव स्ट्रॅटेजी देते, ती म्हणजे जोखीम न घेणे.
३. कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा
इलॉन मस्क हा त्याच्या कामाच्या नैतिकतेसाठी ओळखला जातो. मस्क म्हणतो की, “चिकाटी ही खूप महत्वाची आहे. जोपर्यंत तुम्हाला हार मानायला भाग पाडले जात नाही, तोपर्यंत तुम्ही हार मानू नका.” मस्कचा विश्वास आहे की, यशस्वी होण्यासाठी लोकांना ‘जीवतोड काम’ करावे लागेल. इतरांपेक्षा जास्त मेहनत केल्याने तुमच्या यशाची शक्यता वाढेल.
मस्क असेही म्हणतो की, “एकसारख्या कामासाठी जर इतर लोक आठवड्याचे ४० तास कामात घालवत असतील आणि त्याच वेळी तुम्ही आठवड्याचे १०० तास काम करत असाल, तर तुम्हाला माहिती आहे की, त्यांना जी गोष्ट साध्य करण्यासाठी जिथे वर्ष लागतं, ते तुम्ही अवघ्या ४ महिन्यात कराल.” त्यामुळे तुम्ही कठोर परिश्रमासाठी तयार असले पाहिजे. तसेच, तुमचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागेल.
४. कायम चिकाटी ठेवा
इलॉन मस्क आज जगातील दुसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. इथपर्यंत पोहोचण्याच्या त्याचा मार्ग सोपा नव्हता. त्याच्याकडेही अपयशाचा मोठा वाटा होता, पण त्याने चिकाटी दाखवली आणि हार मानली नाही. मस्कने स्थापन केलेल्या Zip2 आणि PayPal या दोन्ही कंपन्यांमधून बाहेर पडल्यानंतर २००८च्या मंदीच्या लाटेत त्याची Tesla आणि SpaceX या दोन्ही कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होत्या. त्यामुळे अनेकांना वाटले की, आता मस्क पुन्हा एकदा अपयशाच्या खाईत लोटला जाईल. पण मस्कने त्याच्या आधीच्या चुकांमधून धडा घेतला आणि आज तो जगातली श्रीमंत व्यक्तींच्या मांडीला मांडी लावून बसला आहे. अशाप्रकारे कोणीही स्वतःचे आर्थिक टप्पे गाठण्यासाठी आणि प्रेरणा शोधण्यासाठी त्याच्या अनुभवातून शिकू शकतो.
५. स्वतःमध्ये गुंतवणूक करत राहा
इलॉन मस्क याचा एकच सर्वोत्तम सल्ला कोणता असेल, तर तो हा की, “तुम्ही गोष्टी चांगल्या प्रकारे कशा करता येतील याचा सतत विचार करा आणि स्वतःला प्रश्न विचारा.” वयाच्या अवघ्या ८ वर्षापर्यंत मस्क हा दिवसाला तब्बल १० तास वाचन करत होता. त्याची पुस्तक वाचण्याची आवड इतकी प्रचंड होती की, लायब्ररीत वाचण्यासाठी त्याच्याकडील पुस्तके संपली म्हणून त्याने संपूर्ण एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका वाचण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या वयात, मस्क सातत्याने काहीतरी शिकण्यावर आणि स्वत:मध्ये गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित करायचा. त्याने स्वतःला प्रोग्राम करायला शिकवले आणि वयाच्या १२ व्या वर्षी त्याने 500 डॉलर्समध्ये व्हिडिओ गेम लिहिली आणि विकली देखील. पुढे मस्कने पेनिल्व्हेनिया विद्यापीठातून भौतिकशास्त्र आणि अर्थशास्त्रात दुहेरी पदवी घेतली. मस्कने सतत स्वत:मध्ये आणि त्याच्या स्वप्नांमध्ये गुंतवणूक केली. आज पाहा मस्कने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
मस्क हा आपल्या काळातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक आहे. मस्कने अनेक व्यवसाय शून्यातून उभे केले आहेत. तसेच, आपली राहण्याची आणि काम करण्याची पद्धत बदलण्यात मदत केली आहे. मस्कचा सल्ला कोणत्याही व्यवसायात लागू केला जाऊ शकतो.
तुम्ही जर मस्कच्या या टिप्सचे पालन केले, तर तुम्हालाही यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
वाचक मित्रांनो, तुम्हालाही हा लेख आवडला असेल, तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. तसेच, तुम्हाला आणखी कोणत्या व्यक्तींच्या टिप्स वाचायला आवडतील, या कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा.
व्यवसाय करायचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मित्रांनो, असे अनेक बिझनेस स्टार्टअप आहेत, जे सध्याच्या बाजारात मोठ्या आव्हानांचा सामना करताना दिसत आहेत. मात्र, जर तुम्ही स्वतःचा स्टार्टअप लाँच करण्याचा विचार करत असाल किंवा आधीपासून या प्रक्रियेत उडी घेतली असेल, तर तुम्ही एक किंवा त्याहून अधिक कॉमन (Common) स्टार्टअप समस्या अनुभवल्या असतील. खरं तर, आज आम्ही तुम्हाला अशा ७ कॉमन स्टार्टअप चुका सांगणार आहोत, ज्यांच्यावर तोडगा काढला जाऊ शकतो. चला तर, वेळ न घालवता जाणून घेऊयात…
१. पात्र उमेदवार
हे जग वेगाने पुढे जात आहे. जगात अनेक लोक आहेत आणि त्यांच्यासाठी कधीही न संपणारे इंटरनेट कनेक्शनही आहे. अशात तुम्हाला वाटते की, नवीन स्टार्टअपमध्ये काम करण्यासाठी आपल्याला पात्र उमेदवार सापडतील. मात्र, दुर्दैवाने असे नसते. पात्र उमेदवार शोधणे हे तितकेच आव्हानात्मक असू शकते. तसेच, तुम्हाला पात्र उमेदवार जरी मिळाला, तरीही त्याच्या कामाची पद्धत, त्याची मूल्ये आणि इतर गोष्टी आवडतीलच असे होत नाही.
त्यामुळे नवीन स्टार्टअप आणि प्रस्थापित व्यवसायांसह पात्र उमेदवारांना जोडण्यासाठी चांगला ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या जॉब पोर्टल साइट्सचा वापर केल्याने तुम्ही फक्त आवश्यक पात्रता असलेल्यांचीच मुलाखत घेत आहात, याची खात्री करू शकता. इंटरनेट तुमच्या निवडी कमी करण्यासाठी अनेक उत्तम साधने ऑफर करत असताना तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवू नका.
२. एचआर आणि पगार
स्टार्टअप सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात एचआर विभाग आणि त्याचे सर्व पैलू हाताळणे, यामुळे संपूर्ण स्टार्टअप प्रक्रियेत अतिरिक्त ताण आणि चिंता वाढवू शकते. त्यामुळे, तुमच्याकडे जे काही आहे ते पुरेसे आहे. तुमच्यासाठी फक्त तुमच्या ब्रँडची प्रतिमा आणि मूल्यांवर काम करणे, नवीन कर्मचारी नियुक्त करणे, दुकान सुरू करणे आणि आपल्या ग्राहकांचा शोध घेणे, हे महत्त्वाचे आहे. तुम्हाला शेवटची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे एचआर विभाग स्थापन करणे.
हा अधिकचा ताण टाळण्यासाठी, काही व्यवसाय एचआर विभाग हाताळण्यासाठी पीईओ (Professional Employer Organization) सेवा निवडतात. जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी सर्वोत्तम PEO कंपन्यांपैकी एक निवडता, तेव्हा तुमच्या सर्व HR संबंधी गरजांची काळजी घेतली जाते. यामुळे होतं असं की, तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित करू शकता.
३. वाढती स्पर्धा
सध्याच्या जगात प्रचंड स्पर्धा वाढली आहे. यामागील कारण फक्त एकच आहे. ते म्हणजे वेब. वेब पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात लोकांना जोडत असल्याने स्पर्धा वाढली आहे. नवीन व्यवसायांना त्यांच्या उद्योगांमध्ये अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते, ज्यामध्ये सारखाच व्यवसाय करणारे सुस्थापित व्यावसायिक आधीच मोठ्या संख्येने ग्राहकांचे नेतृत्व करतात. तसेच, आपली प्रतिष्ठाही निर्माण करतात. अनेकदा काही व्यवसाय मालक या आव्हानामुळे भारावून जातात, परंतु याकडे वाईट गोष्ट म्हणून पाहण्याऐवजी, वाढ होण्याची संधी म्हणून पाहा. स्पर्धेचा अभ्यास केल्याने, बाजार आणि तुमच्या भावी ग्राहकांबद्दल महत्त्वाची माहिती मिळू शकते.
४. मार्केटिंगसाठी कष्ट न घेणे
मार्केटिंग हा तुमच्या व्यवसायाच्या आत्मा आहे. कारण, यामुळेच नवीन ग्राहक तुमच्या स्टोअर किंवा वेबसाइटवर येतात. तसेच, तुमच्या ब्रँडची दृश्यमानता (Visibility) वाढवते आणि तुम्ही ज्या उद्योगात काम करत आहात, त्या उद्योगाचा एक प्रतिष्ठित भाग म्हणून तुमचा व्यवसाय स्थापित करण्यात मदत करते. अनेक स्टार्टअप्स मार्केटिंगसाठी संघर्ष करतात. कारण, त्यांच्याकडे पेरोलवर कोणीही नसते, ज्यामुळे त्यांना कळेल की, ते काय करत आहेत. मार्केटिंग किंवा SEO तज्ञ हा नवीन व्यवसायाचा व्यावहारिकदृष्ट्या एक आवश्यक घटक आहे. कारण, चांगल्या मार्केटिंगशिवाय, आपल्या उत्कृष्ट उत्पादनांबद्दल किंवा सेवांबद्दल कोणालाही माहिती होणार नाही.
तुम्ही जर मार्केटिंगमध्ये संघर्ष करत असाल, तर थर्ड पार्टी फर्म किंवा SEO तज्ञ नियुक्त केला पाहिजे. जेणेकरून तुमच्या नवीन व्यवसायाला तुमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत मिळू शकते. तसेच, ते सातत्याने तुमच्याकडे येत राहतील.
५. निधी (फंडिंग)
खरं तर, अनेक व्यवसाय असे असतात, ज्यांना पुरेसा निधी कधीच मिळत नाही, मिळतो का? दररोज किंवा आठवड्याला आपल्याकडे कल्पना येतात, त्यापैकी काहींवर आपण कृती करतो आणि इतर काही बॅकअपमध्ये अशा वेळेसाठी ठेवतो, जेव्हा आपल्याकडे जास्त पैसा, अधिक वेळ किंवा स्पष्टता असते. अनेक स्टार्टअप्सना निधीच्या कमतरतेच्या समस्येचा सामना करावा लागतो आणि काहींना मर्यादित बजेटमुळे काही उत्पादने आणि सेवाही मिळतात.
निधी कधीही पुरेसा पुरवठा करत नाही, परंतु स्टार्टअप आणि स्थापित व्यवसायांसाठी बरेच पर्याय असतात. नवीन स्टार्टअपसाठी एंजेल गुंतवणूकदार, बँक कर्ज आणि नेहमीच लोकप्रिय क्राऊड-फंडिंग यांसारखे काही पर्याय आहेत. गुंतवणूकीसाठी पैसे कर्ज म्हणून घेण्यापूर्वी किंवा स्वीकारण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या निधीच्या अटींची चांगली जाणीव आहे, याची खात्री जरूर करा.
६. वेळेचे खराब नियोजन
नवीन व्यवसाय जेव्हाही सुरू करतात, तेव्हा व्यवसाय मालक एक सामान्य चूक नक्कीच करतात. ती म्हणजे, त्यांना वाटते की, ते संपूर्ण व्यवसाय स्वत: व्यवस्थापित करू शकतात. आपल्या वैयक्तिक दृष्टिकोनातून इतरांवर विश्वास ठेवणे, अर्थातच कठीण काम आहे. तुमच्या व्यवसायाचे यश हे थेट तुमच्या वैयक्तिक यशाशी जोडलेले असते. वस्तुस्थिती अशी आहे की, प्रत्येकजण चांगला व्यवस्थापक नसतो. काही लोक जरी कल्पना, वित्त किंवा मार्केटिंगमध्ये उत्कृष्ट असले, तरीही व्यवसाय व्यवस्थापित करू शकत नाहीत. तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या व्यवस्थापनाशी संघर्ष होत असल्यास, तुम्हाला तो चालवण्यात मदत करण्यासाठी कोणालातरी कामावर घेणे, यात कसलीही लाज नाही. याव्यतिरिक्त तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखत असलेल्या व्यक्तीला, ज्याला व्यवस्थापन प्रक्रियेसाठी योग्य कौशल्ये माहिती आहेत, अशा व्यक्तीला व्यावसायिक भागीदार बनवण्यात कोणतीही अडचण नाही.
७. संवाद
नवीन स्टार्टअप म्हणजे एका कॉर्पोरेट छताखाली काम करणारी पूर्णपणे नवीन टीम असू शकते. अगदी उत्तम परिस्थितीतही संवाद आव्हानात्मक बनू शकतो. नवीन लोकांशी जुळवून घेणे प्रत्येकासाठी सोपे नसते, परंतु व्यवसायाच्या निरंतर यशासाठी तुमच्या सहकाऱ्यांमध्ये योग्य संवाद असणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाइन चॅट रूमसह एक संघ व्यवस्थापन प्लॅटफॉर्म सेट करा, जेणेकरून व्यवसायातील प्रत्येकजण सहजपणे एकमेकांशी संपर्क साधू शकेल, फायली शेअर करू शकेल आणि त्यातूनच कामांचे वाटपही करू शकेल.
तर मित्रांनो, आता व्यवसायात उतरताना किंवा उतरला असाल, तर तुम्ही या समस्या ओळखून त्यावर तोडगा काढू शकता.
तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर कमेंटमध्ये Yes असे लिहा. तसेच, तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवर लेख वाचायला आवडतील, हेदेखील कमेंट करून सांगायला विसरू नका. तुमच्या मित्रमंडळींनाही हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.
वयाची १८-२२ वर्षे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी का व्यवसाय करावा हा कोड्यात टाकणारा प्रश्न सर्व तरुणांना पडत असतो, कारण आईवडिलांवर अवलंबून राहण्याचे सोडून स्वतःच्या कर्तृत्वाने जगात आपला ठसा उमटवण्याचे हे वय असते. उमेद असते, आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी हवे ते करण्याची तयारी असते; पण आपल्याला काय हवे हे मात्र समजत नाही.
वयाची १८-२२ वर्षे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी का व्यवसाय करावा हा कोड्यात टाकणारा प्रश्न सर्व तरुणांना पडत असतो, कारण आईवडिलांवर अवलंबून राहण्याचे सोडून स्वतःच्या कर्तृत्वाने जगात आपला ठसा उमटवण्याचे हे वय असते. उमेद असते, आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी हवे ते करण्याची तयारी असते; पण आपल्याला काय हवे हे मात्र समजत नाही.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरुन एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर पुढे काय करणार? नोकरी की व्यवसाय? ह्या प्रश्नाला मिळालेली काही उत्तरे.
१. नोकरी करणार कारण घरची परिस्थिती व वातावरण व्यवसायाला अनुकूल नाही, शिवाय भांडवलसुध्दा नाही.
२. काही काळ नोकरी करणार, मग स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरु करणार आहे. काही दिवस नोकरी केली तर, भांडवल उभारणी करता येईल.
३. व्यवसायच करणार आहे काहीतरी. काहीही झाले तरी व्यवसायच करायचा.
आता वरील तीनही प्रकारच्या तरुणांच्या मताचे विश्लेषण करुया. पहिल्या प्रकारात एकतर त्या तरुणाला नोकरीच करायची असते, मात्र व्यवसाय न करण्याची काही कारणे तो पुढे करत असतो. नोकरीची सुरूवात सुध्दा अगदी तुटपुंज्या उत्त्पन्नावर होते, मग पुढे त्या उत्त्पन्नात फार वेगाने वाढ होते असेही काही नाही. असे तरुण जीवनभर rat race मध्ये अडकून पडतात. नोकरी, पगार, घर, घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण, आरोग्य असे नेहमीचे प्रश्न सोडवतंच आयुष्य पुढे सरकत असते, त्यात फार उल्लेखनीय असे काही घडत नाही, पण ह्या चक्रात अडकलेला माणूस सहजासहजी बाहेर पडत नाही. हा निर्णय घेण्याची काही कारणे आहेत, त्यामध्ये जोखीम घेण्याचे धाडस नसणे, इच्छाशक्तीचा अभाव व न्यूनगंड ही काही महत्वाची कारणे आहेत, यावर थोड्याफार प्रयत्नांनी मात करता येते.
दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तींना काही काळ नोकरी करुन भांडवल उभे करायचे असते. काही प्रमाणात उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावायचा असतो. ह्या व्यक्तींना कमी प्रमाणात जोखीम घ्यायची असते. हेही थोड्याफार फरकाने पहिल्या प्रकारच्या व्यक्तीसारखी सुरवात करतात. मग पगार, संसाराचे प्रश्न व कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे rat race मध्ये अडकतात व बाहेर पडायची इच्छा असून बाहेर पडत नाहीत व पहिल्या प्रकारच्या व्यक्तीप्रमाणे यांचेपण आयुष्य फिरत राहते. स्वतः पैसे कमावणे हा भांडवल उभे करण्याचा केवळ एकमेव मार्ग नाही. इतर अनेक मार्गांनी भांडवल उभे करता येते. भांडवल निर्मितीचे इतर मार्ग पुढे आपण पाहणार आहोत. भांडवलाच्या इतर पर्यायांनी जीवनात वेगाने पुढे जाण्याचा मार्ग सापडेल.
तिसऱ्या प्रकारचे तरुण हे काहीसे ठाम, पण द्विधा मनस्थितीत असतात. या तरुणांना अधिक खोलात जाऊन प्रश्न विचारले तेव्हा समजले की, काहीतरी व्यवसाय करायचा म्हणजे कोणता व्यवसाय करावा याचा पुसटसा अंदाजही यांनी बांधलेला नसतो. इच्छाशक्ती असते मात्र दिशा घ्यायला वेळ लागतो. सांगणारेही कुणी नसतात. मग स्वतःच्या अंदाजावर पुढे जाण्याचा प्रयत्न चालू होतो. हे तरुण खूप काही करण्याची उमेद ठेवतात. पुढे जाऊन त्यांना हवे करुनही दाखवतात.
मी काही जणांना पाहिजे तेवढे भांडवल देतो, तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहात, असा प्रश्न विचारला की मग त्यांच्याकडे काही उत्तर नसते. भांडवल, मनुष्यबळ, प्रशिक्षण याचा पुरवठा बाहेरुन करता येतो. त्याचे असंख्य मार्गसुध्दा आहेत. व्यवसाय करण्यासाठी लागणारी वृत्ती स्वतःतच असायला हवी किंवा तिची जोपासना स्वतःहून करायला हवी, मग व्यवसाय यशाच्या शिखरावर नेता येईल.
नोकरी करताना उत्पन्नाच्या, खर्चाच्या मर्यादा पडतात. त्याउलट व्यवसायामध्ये २४ तास झोकून देऊन काम करता येते. शेकडो माणसांना काम देता येते. ती माणसे तुमच्यासाठी काम करत असतात. सुरूवातीची काही वर्षे संघर्ष केला की, मनाप्रमाणे उत्पन्न व पाहिजे तेवढा वेळ व्यवसायातून प्राप्त करता येतो. उत्पन्नात होणारी वाढ ही बांबूच्या रोपट्याप्रमाणे वेगाने होत असते. मनसोक्त जगण्याचा, स्वतःच्या स्वप्नांसाठी काम करण्याचा आनंद घेत व्यवसाय करणे हे नोकरीपेक्षा सरसच.
भारत हा तरुणांचा देश आहे. जगातील सर्वात जास्त तरुणांचा हा देश म्हणजे प्रत्येकाचे लक्ष आकर्षित करुन घेत असतो, पण इथल्या तरुणाईला या गोष्टीची कितपत जाणीव आहे हे जाणून घ्यावे लागेल. या तरुणाईची अवस्था कस्तुरीमृगासारखी आहे. कस्तुरी ही मृगाच्या नाभीत असते. मृग कस्तुरी शोधण्यासाठी सर्व जंगलभर सैरावैरा धावत असतो, पण त्याला स्वतःच्या नाभीत असलेल्या कस्तुरीची जाणीव कधीच होत नाही. आपल्यातल्या अपार शक्तीची जाणीव फार कमी तरुणांना आहे.